गाभा:
नमस्कार मिपा मध्ये लिहायचा माझा पहिलाच प्रयन्त आहे.
मला (खरे तर आम्हाला ) माहिती पाहिजे आहे कि Infertility साठी आयुर्वेद किती फायद्याचे आहे? आमच्या लग्नाला ५ वर्षे झाली आहेत. (बघून कोणाला तसे वाटणार नाही इतके तरुण आहोत अजून ;))
मुलासाठी पर्यंत चालू आहेत पण अजून यश नाही. डॉक्टर IUI आणि IVF सांगत आहेत. पण मला त्याची भीती वाटते.
मला जाणून घ्यायचे आहे कि आयुर्वेद मध्ये उपचार केले तर किती वेळ लागतो? पुणे (पिंपरी चिंचवड असेल तर उत्तम) ला चांगले आयुर्वेदिक क्लिनिक आहे का?
सध्या तरी इतकेच लिहते? कदाचित मला काय लिहायचे आहे ते नीट लिहिले नसेल तर समजून घ्या? आणि योग्य मार्गदर्शन करा
आई बनण्यासाठी आतुर असलेली :(
कोमल
प्रतिक्रिया
12 Dec 2013 - 11:17 am | बाबा पाटील
वंध्यत्वावर उपचार आहेत पण केस स्टडी पुर्ण झाला पाहिजे.
12 Dec 2013 - 11:22 am | komal.tejas
अगदी वाईट (complicated ह्या अर्थी ) केस असेल तर किती वेळ लागतो
12 Dec 2013 - 11:29 am | komal.tejas
व्यनि केला आहे
12 Dec 2013 - 11:52 am | अर्धवटराव
पण तुमच्या इच्छा लवकर पूर्ण होवोत अशी सदिच्छा व्यक्त करतो.
12 Dec 2013 - 2:51 pm | आनंदराव
जस्त विचार करु नका.
तेन्शन घेउ नका.
पहिले हे बघा कि तुम्ही दोघे एक्मेकना किती वेल देता.
आपल जोदीदार बरोबर मन मोकले करा. आनि सतत हसतमुख रहा.बघा कुथल्याहि औशधाची गरज पद्नार नाही.
12 Dec 2013 - 2:58 pm | कपिलमुनी
>> बघा कुथल्याहि औशधाची गरज पद्नार नाही.
तुमच्या सदिच्छा कळल्या ..पण असले भलते सल्ले देउ नका ..
12 Dec 2013 - 3:05 pm | komal.tejas
ते सर्व चालू आहे. त्याशिवाय अजून काही issues आहेत
Technically सांगायचे झाल्यास PCOD मुळे गर्भधारणा होत नाही
12 Dec 2013 - 3:05 pm | आनंदराव
कपिलमुनी,
आहो या सल्ल्यात काय वाईट आहे?
12 Dec 2013 - 3:09 pm | परिंदा
मायबोलीवर डॉ. साती म्हणून एक तज्ञ आहेत. त्यांनी यावर काही लेख लिहीले आहेत ते एकदा वाचा.
http://www.maayboli.com/node/34323
12 Dec 2013 - 4:32 pm | सौंदाळा
अहो साती मिपावर पण आहेत.
कोमलताई, सातीनापण व्यनी करा.
13 Dec 2013 - 8:39 am | komal.tejas
डॉक्टर साती ह्याचा मिपा वर ID काय आहे? ते पुण्यात असतात का?
13 Dec 2013 - 10:22 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
साती यांचा आयडी
-दिलीप बिरुटे
13 Dec 2013 - 10:58 am | komal.tejas
धन्यवाद त्यांना व्यनि केला आहे. :)
14 Dec 2013 - 1:27 pm | साती
अहो त्यांना आयुर्वेदिक उपचाराविषयी माहिती हव्येय.
माझे लेख अॅलिपथिक दृष्टीकोनातून लिहिलेले आहेत.
;)
मी इनफर्टीलिटी तज्ज्ञ नाही पण इनफर्टीलिटीशी संबंधित एंडोक्रिनॉलॉजिकल प्रॉब्लेम्स ची तज्ज्ञ आहे.
या अंतर्गत थायरॉईड, डायबेटीस आणि पिसीओडी येतात.
मी महाराष्ट्रात रहात नाही आणि नेट कन्सल्टेशन करत नाही.
क्षमस्व.
12 Dec 2013 - 3:11 pm | आनंदराव
कोमल, या प्रोब्लेम वर आयुर्वेदामधे अक्सीर ईलाज आहे.
माझ्या परिचयाच एक डोक्तर आहेत, कोथरुद मधे.
चालतील का?
12 Dec 2013 - 3:45 pm | komal.tejas
नक्की
मला व्यनि करा किंवा इथे दिलात तरी चालेल. आणि आम्ही अश्या डॉक्टर च्या शोधात आहोत जे खरेच गरज असेल त्या प्रमाणे उपचार करतील. ( जे भेटणे फार अवघड आहे.)
अवांतर - डॉक्टर सारख्या चांगला पेश्या मध्ये असे का दिसते.
मला मुंबई च्या Dr पुरंदरे मुळे फरक जाणवत होता पण त्या जुन्या पद्धती ने उपचार करायच्या आणि फारच कडक होत्या :(
मी फार असंबद्ध लिहित आहे का? मला जाणवतेय पण भावना व्यक्त करता येत नाही आहेत
12 Dec 2013 - 4:05 pm | कवितानागेश
तुम्ही कुठे राहता? तुमच्या जवळपास असलेलेच डॉक्टर सांगता येतील.
12 Dec 2013 - 4:56 pm | komal.tejas
चिंचवड (KSB चौक जवळ)
12 Dec 2013 - 3:15 pm | प्रभाकर पेठकर
समस्या गंभीर आणि सल्ले देण्यासाठी वैद्यकिय ज्ञानाची नितांत गरज आहे. ते (वैद्यकिय ज्ञान) नसल्याकारणाने कुठलाही सल्ला नाही. मनापासूनच्या सदिच्छा मात्र तुमच्या पाठीशी आहेत. यश येताच मिसळपावावर सर्वांस कळविणे.
वाचतो आहे.
12 Dec 2013 - 4:52 pm | ऋषिकेश
वैयक्तिक इच्छा असल्याने शुभेच्छा आहेतच.
फक्त निव्वळ अपत्यप्राप्तीसाठी कारणासाठी शरीरावर कोणतेही टोकाचे अत्याचार करण्याआधी भविष्याचा व आपल्याला नक्की काय व किती किंमत देऊन मिळवायचे आहे याचा विचार करावा असा (आगाऊ) सल्ला.
निव्वळ पालकत्त्वाची इच्छा असेल तर अपत्य दत्तकही घेता येते.
=====
इतक्या खाजगी विषयात मी दिलेले सल्ले कोणतीही खाजगी सीमारेषा ओलांडत असल्यास आगाऊ माफी मागतो
12 Dec 2013 - 5:02 pm | komal.tejas
मिपा वर विषय मांडल्याने आता काही खाजगी नाही आहे.ह्या विषयावर अजून आपल्याइथे अजून मोकळी चर्चा होत नाही.
दुसरा मुद्दा पण आम्ही ध्यान्यात घेतला आहे. पण अजून इतके वय झाले नसल्याने तसेच माझी मानसिक तयारी नाही अजून त्या साठी सध्या तरी तो मुद्दा बाजूला आहे.
धन्यवाद तुमच्या मताबद्दल.
12 Dec 2013 - 5:00 pm | नित्य नुतन
कोमल, आयुर्वेदात माहित नाही, परंतु माझे २ पैसे - indusladies.com या site वर बरीच माहिती मिळेल PCOD च्या अनुभवांबद्दल
12 Dec 2013 - 5:04 pm | komal.tejas
indusladie site मस्तच आहे. अनेक जणांचे अनुभव आहेत. पण पुणे मध्ये treatment बद्दल पाहिजे तशी माहिती नाही मिळाली.
12 Dec 2013 - 5:06 pm | राजेंद्र मेहेंदळे
वैद्यकीय ज्ञान नसल्याकारणाने केवळ शुभेच्छा ..आणि ऋषिकेश यांच्या प्रतिसादाशी सहमत
शेवटी निर्णय तुमचा
12 Dec 2013 - 5:30 pm | शैलेन्द्र
IUI/IVF/ICSI यांत घाबरण्यासारखे काहीच नाही. सुदृढ अपत्यप्राप्तीसाठी वय हे सगळ्यात महत्त्वाचे परिमाण आहे. ज्यात यशाची शक्यता कमी आहे अशा आयुर्वेदासारख्या उपचार पद्धतीने तुमचा वेळ वाया जाईल, आणि कदाचित संधीही..
शुभेच्छा..
13 Dec 2013 - 11:06 am | बाळ सप्रे
+ सहमत
यावरील मी पाहिलेल्या काही केसमध्ये आयुर्वेदिक उपचारात फक्त कोठा साफ करण्याचाच भाग होता !!!
4 Jan 2014 - 3:10 am | आयुर्हित
सर्वप्रथम आपली क्षमा मागतो. पण आयुर्वेदाबद्दल आपले मत साफ चुकीचे आहे, असेच मला खात्रिशीर पणे वाटते आहे, हे मी येथे नम्रपणे येथे नमूद करत आहे. कदाचित आपला अनुभव वेगळा असू शकतो, पण तरीही अशा प्रकारे चुकीचा सल्ला व जनरल स्टेट्मेन्ट देउ नये हि विनन्ति.
कळावे, लोभ असावा.
आपला लाडका : आयुर्हीत
13 Dec 2013 - 8:50 pm | स्रुजा
अगदी हेच सांगायचे आहे.
मला हा प्रोब्लेम खूप जवळून माहिती आहे . मी कुणी डॉक्टर नाही पण जेवढं मला माहिती आहे तेवढं सांगते वजन कमी करणं हा सगळ्यात पहिला उपाय. PCOD मध्ये ५% वजन कमी झाला तरी बराच फरक होतो. दुसरी गोष्ट अशी की IUI आणि natural pregnancy या मध्ये फारसा फरक नाही . जर स्पर्म quality चांगली असेल तर IUI ची गरज नाही .
PCOS चा मुख्य प्रोब्लेम असा असतो की एक तर follicles तयार होत नाहीत किंवा ३-४ एका वेळी तयार होतात . ३-४ मध्ये जुळे किंवा तिळे होण्याचा धोका असतो. त्या मुळे डॉक्टर्स ना सतत No response आणि over response यात सुवर्णमध्य साधावा लागतो. अनेकदा overies hyper simulation मध्ये गेल्याने त्या महिन्यात प्रयत्न करू नका असं सांगायची वेळ येते. कारण २ पेक्षा जास्त follicles जर fertilise झाले तर ती गर्भधारणा त्रासदायक असते. या मुळे IUI किंवा naturally प्रयत्न करणं यात संयमाचा कस लागतो .
IVF चा मुख्य फायदा हा की जितके follicles तयार होतील तितके हवेच असतात . IVF दर वेळी यशस्वी होईल च असं नाही पण यामध्ये odds are favourable . IVF ला टाळू नका . मला एक डॉक्टर माहिती आहेत त्यांचं नाव तुम्हाला व्यनि मध्ये पाठवलं आहे .
आयुर्वेद बद्दल फारशी माहिती नाही . वर दिलेली माहिती तुम्हाला आधीच असेल कदाचित… मला मनापासून सांगावसं वाटलं
तुम्हाला मनापासून शुभेछा .
मी एका ठिकाणी एका डॉक्टर चं मत वाचलं होतं : PCOS असेल तर गर्भधारणा होईल की नाही हा कधीच प्रश्न नसतो . कुठल्या उपायांनी होईल हे फक्त शोधून काढावा लागतं .
एकदा तुम्हाला हवी ती बातमी आली की मागचा त्रास लक्षात पण राहणार नाही . ही प्रक्रिया enjoy करा . होणार्या गोष्टी होतात च . तुमचं मानसिक स्वास्थ्य आत्ता तुमचा हुकुमाचा एक्का आहे असं समजा .
14 Dec 2013 - 7:34 am | komal.tejas
farch sundar lihile aahe tumhi....manala ubhari aali
Thanks a lot
14 Dec 2013 - 10:31 am | स्रुजा
:)
4 Jan 2014 - 3:09 am | आयुर्हित
सर्वप्रथम आपली क्षमा मागतो. पण आयुर्वेदाबद्दल आपले मत साफ चुकीचे आहे, असेच मला खात्रिशीर पणे वाटते आहे, हे मी येथे नम्रपणे येथे नमूद करत आहे. कदाचित आपला अनुभव वेगळा असू शकतो, पण तरीही अशा प्रकारे चुकीचा सल्ला व जनरल स्टेट्मेन्ट देउ नये हि विनन्ति.
कळावे, लोभ असावा.
आपला लाडका : आयुर्हीत
12 Dec 2013 - 6:50 pm | प्रकाश घाटपांडे
डॉ साती यांचे या विषयावरील लेख वाचा. http://www.maayboli.com/node/35029
12 Dec 2013 - 8:50 pm | चैदजा
आम्ही यातुन गेलो आहोत.
हे खाऊ नये.
-- रात्रीच्या वेळी दही.
-- तोंडल्याची भाजी.
-- मेंन्टॉस, मिंट असलेले पदार्थ.
-- चिंचेचा गोळा/गोळी.
-- रात्रीच्या वेळी शक्यतो जास्ती मसाला घातलेले पदार्थ खाऊ नये.
-- पेप्सी, कोक टाळावे.
हे खावे.
-- मोड आलेले कडधान्य
-- काजु, बदाम - दररोज सकाळी दुधाबरोबर. बदाम पाण्यात रात्रभर भिजवावे.
-- डाबर च्यवनप्राश
IUI ला घाबरू नये. पण शक्यतो ५-६ वेळाच करावे. (जर एकदा करुन ऊपयोग झाला नाही तर).
डॉ चे नाव व्यनि केले आहे.
13 Dec 2013 - 4:43 pm | आनंदमयी
हो! नक्कीच आहे. आयुर्वेदामध्ये उत्तरबस्ति व इतर पंचकर्म चिकीत्सापध्दती अपत्यप्राप्तीसाठी लाभदायक आहेत. आयुर्वेदासंदर्भात कोणतीही शंका मनात न बाळगता आपल्या नजीकच्या आयुर्वेदीक चिकीत्सालयाशी संपर्क साधा किंवा 'वाय एम टी आयुर्वेदीक हॉस्पिटल', खारघर, नवी मुंबई येथे मंगळवार किंवा शुक्रवारच्या स्त्रीरोग ओ पी डी ला अवश्य भेट द्या. आमच्या हॉस्पिटलचं हे संकेतस्थळ
www.ymtayushman.org/Hospital.html
16 Dec 2013 - 11:27 am | निरु
माझी पत्नी पुण्यात कोथरुड मध्ये एका वैद्यांकडे ओ.पी.डी. अनुभवासाठी जाते. त्या वैद्य बाईंनी बर्याच जोडप्यांचे गर्भधारणेविषयीचे प्रश्न सोडविलेले आहेत. या विषयावर त्यांनी काही पुस्तकेही लिहिलेली आहेत. अधिक माहितीसाठी व्य. नि. करावा.
संततिप्राप्तीसाठी शुभेच्छा.
18 Dec 2013 - 11:11 am | धनू_२२६
व्यनि केला आहे.
4 Jan 2014 - 3:40 am | आयुर्हित
सर्वप्रथम आपणास मनापासून धन्यवाद, असा अतीमहत्त्वाचा विषय आपण मिपा वर टाकल्याबद्दल.
आई बनण्यासाठी आतुर आहात तर त्यासाठी आमच्या खूप साऱ्या शुभेच्छा.आणि हो जगात असा एकही विषय नाही, ज्यावर काही उपाय नाही.फक्त आत्मविश्वास व त्या अगाध शक्तीवरची (देव,अल्लाह,Jesus काहीही म्हणा) श्रद्धा असली पाहिजे.
हा खूप नाजूक विषय असतो, जेव्हा लग्नाला ५ वर्षे उलटूनही अपत्य प्राप्ती होत नाही, हे प्रत्यक्ष आम्ही अनुभवलेले आहे.ह्यातही माणसापेक्षा स्त्रीजातीलाच जास्त सहन करावे लागते, मग तो दोष कोणाचाही असो! असो.
मला आपल्या कडूनबरीचशी माहिती लागणार आहे.आपण माझ्या Ayurhit@gmail.com वर email संपर्क करू शकता.
कळावे,
आपला हीतचिंतक
आयुर्हीत