गाभा:
मला आलेला डेबिट कार्डचा वाईट अनुभव….
माझे HDFC बँकेचे debit कार्ड मी emergency मध्ये june महिन्यात CANARA बँकेच्या ATM मध्ये वापरले.. काही तांत्रिक बिघाडामुळे मी काढलेल्या २० ० ० /- रुपयांपैकी १ ५ ० ० /- रुपये बाहेर आले आणि ५ ० ० /- रुपये कमी आले. मी HDFC शी email करून पिच्छा पुरवला पण त्यांनी CANARA बँकेचा report मागवून २ ० ० ० /- रुपये बाहेर आले होत्ते म्हणून मलाच खोट्यात पाडले… अशा प्रकारांची दाद कोठे मागावी ? कसा पाठपुरावा करावा ? अश्शी बॅंकेकडून होणारी फसवणूक कशी थांबवावी.?
म्हातारी मेल्याचं दुःख नाही पण काल सोकावतो… मार्गदर्शन अपेक्षित आहे.
प्रतिक्रिया
16 Dec 2013 - 6:34 am | मारकुटे
२००० च्या ऐबजी २५०० म्हणजे ५०० जास्त आले असते तर तुम्ही काय केले असते?
गम्मत जाऊ द्या..
कॅनरा बँक आणि एचडीएफसी बँक या दोघांना तुम्ही त्वरीत पत्र लिहून सविस्तर घटना क्रम कळवायला हवी होती तसेच एटीएम मधून कमी रक्कम आली अशी पोलीसात तक्रार देवुन त्याच्या एफायार ची प्रत पत्राला जोडायची होती.
16 Dec 2013 - 9:14 am | कंजूस
एटिएमच्या कंप्लेटमध्ये बैंकांना काहीही करायची इच्छा नसते .त्याचे काम दुसऱ्या एजंन्सिजना (आउटसोर्सिंग) दिलेले असते .
प्रवासाला गेल्यावर तिकडचे जवळचे मशिन बंद असल्यावर फजिती होते .
16 Dec 2013 - 9:21 am | फारएन्ड
लेखी तक्रार करा दोन्ही बँकांकडे (आणि दोन्ही पत्रात त्याचा उल्लेख करा). त्यांना उत्तर द्यावे लागेल.
16 Dec 2013 - 9:23 am | शिशिर
अशा वेळेस C C T V Camera ची काही मदत मिळू शकेल काय.....? म्हणजे ५००/ रुपये कमी आल्याचे चित्रात दिसत असल्यास... आणि Camera चालू असल्यास....
16 Dec 2013 - 9:58 am | संजय क्षीरसागर
तुमचे पैसे मिळतील. सगळ्या एटीएम्सचा डिटेल्ड रिपोर्ट बँकेकडे असतो. HDFC नं मागवलेला रिपोर्ट नक्की काय सांगतो याची सविस्तर माहिती घ्या. सिस्टम इतकी फुलप्रुफ असते की अशा प्रकारे पैसे कमी येणं आणि कॅनरा बँकेत नोंद नसणं अशक्य आहे.
16 Dec 2013 - 10:42 am | ब़जरबट्टू
ते काय म्हणतात ते तरी वाचा की.. हा किस्सा जुन मध्ये घडलाय.. ते डिसेंबर मध्ये विचारताहेत.. तरी पैसे परत मिळतील ?
16 Dec 2013 - 11:05 am | संजय क्षीरसागर
आयला, पोस्ट इतकी उशीरा टाकली असेल असं वाटलं नाही. आता सुद्धा पैसे परत मिळतील पण पाचशे रुपयाच्या मानानं मेहेनत फार करावी लागेल. तरी फोनाफोनी करुन ट्राय करायला हरकत नाही. (अर्थात सालाबादाप्रमाणे पुढे काय झालं ते सदस्य लिहीत नाहीत, पण आपण मदत करायची)
16 Dec 2013 - 10:14 am | दाते प्रसाद
मलापण असाच अनुभव चेन्नईमध्ये आला. HDFC Card in Canara Bank ATM.
पैसे आले नाहीतच , पण पैसे काढल्याची पावती मिळाली. HDFC ला फोन केल्यावर ८-१० दिवसांनी पैसे खात्यावर परत जमा झालेले दिसले.
16 Dec 2013 - 10:25 am | संजय क्षीरसागर
तेच म्हणतो.
16 Dec 2013 - 5:27 pm | ऋषिकेश
मला असा अनुभव दोनदा आला आहे
दोन्हीवेळा एक कॉल करताच ICICIने काही तपशील विचारून मग अर्ध्यातासात पैसे माझ्या अकाऊंडला पुन्हा जमा केले होते. (तपशील फक्त कोणत्या बँकेचे ATM, त्याचे स्थान, पैसे काधल्याची साधारण वेळ वगैरे स्वरूपाचेच असल्याचे आठवते आहे)
16 Dec 2013 - 6:05 pm | कवितानागेश
सेम पिंच. माझेपण ५०० असेच गेले आहेत.
१ दिवस कस्टमर केअरला फोन करुन बोम्बाबोम्ब केली. पण ५०० कमी आलेत याचे काही प्रूफ नाही म्हणाले ते! :(
पुन्हा एकदा सेम HDFC Card in Canara Bank ATM बोंबललं.
मग मात्र मी HDFC च्या लोकांच्या वाघासारखी मागे लागले.
शिवाय माझ्याकडे transaction cannot completed अशी रिसीट देखिल होती.
ती छापून मिडियाकडे तक्रार करेन अशी धमकी दिली! ;)
२० दिवसानी १००० रुपये परत जमा झाले.
16 Dec 2013 - 6:47 pm | गणपा
माऊनं नखं दाखवताच बँकवाले घाबरले. है शाब्बास माऊ.
बाकी ऋषिकेश म्हणतो तसा वेगळ्या बँकेचा अनुभव मलाही आलाय. वेळेत तक्रार अनं डिटेल्स कळवले की पैसे २-४ दिवसांत (हा कालावधी बँके बँकेवर अवलंबून आहे) परत मिळतात.
16 Dec 2013 - 9:38 pm | डॉ सुहास म्हात्रे
माऊनं नखं दाखवताच बँकवाले घाबरले. है शाब्बास माऊ.
एवढचं नाही डब्बल पैसे परत केले, आहात कुठे उर्फ व्हेरार्यु ?!17 Dec 2013 - 5:02 pm | कवितानागेश
डब्बाल नाहीत हो.
ते ५०० नाहीच मिळाले. म्हणून तर पुढे १०००चा प्रोब्लेम झाला तेंव्हा नखे काढली!
16 Dec 2013 - 6:17 pm | प्रकाश घाटपांडे
या बाबत सकाळ कि मटा या मधे बातमी मालिका आली होती. त्यात त्यांनी असे अनुभव आलेल्यांच्या बातम्या दिल्या होत्या. हे प्रकार नजरचुकीने होत नसून जाणीव पुर्वक होत असावेत अशी शंका बँकिंग तज्ञांनी व्यक्त केली होती.
16 Dec 2013 - 6:54 pm | सुहास..
गवि सुट्टीवर आहेत का ?
17 Dec 2013 - 1:10 pm | गवि
आलो.. आलो..
म्हणजे झालं असं की ओंबड्समनचा वेबपत्ता इत्यादि टंकले पण चुकून तिकडे त्या क्रेडिट कार्ड धाग्यावर.. :)
आरबीआयच्या बँकिंग ओम्बड्समनकडे तक्रार करणे हा या केसमधला एकमेव उपाय आहे.
ही लिंक वापरा; काही वॉर्निंग आली तरी कंटिन्यू करा, आरबीआयचीच वेबसाईट आहे.
https://secweb.rbi.org.in/BO/precompltindex.htm
ओम्बड्समनचे पत्ते:
http://www.rbi.org.in/Scripts/bs_viewcontent.aspx?Id=164
ओंबड्समनकडे केस गेली की बँकेला तातडीने कारवाई करावीच लागते.
16 Dec 2013 - 7:05 pm | ज्ञानव
प्रथम तुमचे खाते जिथे आहे त्या बँकेलाच लिहा. त्यात सी सी टू बँकिंग ओम्बडसमन करा (बहुतेक एवढे केल्यावरच काम होईल )
नाही झाले तर खरोखरच बँकिंग ओम्बडसमनला तक्रार करा
त्याच बरोबरीने ग्राहक सेवा मंचला तक्रार करा.
नक्की खात्री नाही पण १ वर्ष उशिरा पर्यंत ही तक्रार करता येते असे वाटते नंतर ती टाईम बार होऊ शकते.
17 Dec 2013 - 10:23 am | नन्दादीप
HDFC एटीएम धारकांनी CANARA एटीएम मधून पैसे काढू नयेत....
17 Dec 2013 - 10:38 am | सुबोध खरे
मी शक्यतो राष्ट्रीयीकृत बँका च्या ए टी एम मधून पैसे काढत नाही.
त्यांचे वापरलेले तंत्रज्ञान हे अद्ययावत नसते तर सर्वात कमी दरातील असते त्यामुळे त्यांच्या संगणक प्रणाली सुद्धा तशाच असतात. शिवाय त्यांच्या कर्मचार्याची नोकरी कायम असते त्यामुळे त्यांना एक प्रकारचा माज असतो( आमचे कोणीही काहीही बिघडवू शकत नाही). शिवाय त्यांचा मुख्य कार्यालयात तक्रार केली तरी काहीही होत नाही. अशा बर्याच तर्हेच्या अनुभवांमुळे मी शक्यतो राष्ट्रीयीकृत बँकाच्या जवळ जात नाही. सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी(PPF) तील खाते असल्याने वर्षात एकदा त्यांचे तोंड पाहावे लागते ते दुर्दैव आहे.
त्यापेक्षा सहकारी आणी खाजगी बँका शतपटीने बर्या.
18 Dec 2013 - 7:46 pm | कुसुमावती
बाकीच्या राष्ट्रीयीकॄत बँकांच्या बाबतीत कल्पना नाही, पण तंत्रज्ञानाच्या बाबतीत SBI मागासलेली नक्कीच नाही. गेले ३ वर्ष माझे SBI मध्ये बचत खाते आहे.SBI चे डेबिट कार्ड वापरताना प्रत्येक वेळी पिन वापरणे आवश्यक पुर्वीही होते आणि आताही आहे. (नविन नियमानुसार आता प्रत्येक बँकांच्या कार्डांना पिन वापरणे बंधनकारक आहे.) सध्याच्या काळात ज्या (भारतात चालणार्या) संस्थळांवर(वेबसाईट्सवर) नेट बँकीग उपलब्ध आहे तिथे SBI चा पर्याय जवळ सर्व ठिकाणी उपलब्ध आहे. तसेच नेट बँकीगसाठी SBI एकदाच वापरता येणारा परवलीचा शब्द तुमच्या खात्यावर नोंदवलेल्या भ्रमणध्वनीवर कळ्वते. तो दिल्याशिवाय तुमचे ट्रान्जॅक्शन (मराठी ??) पुर्ण होत नाही, हे मला जास्ती सुरक्षित वाटते. विषय डेबिट कार्डाचा आहे विषयांतराबद्दल क्षमस्व. हा प्रतिसाद राष्ट्रियीकॄत बँकाच्या मागासल्यापणाबद्दल आहे विशेषतः SBI बद्द्ल.
17 Dec 2013 - 10:42 am | ज्ञानव
पण सांभाळून रहा.सहकारी बँकांचे दिवस फारसे उरले नाहीत आता....आणि खाजगी बँकांनी स्वतःला आर्थिक शिस्तीत ठेवले तरच त्या तगणार आहेत
डॉक्टर साहेब नक्की सांभाळून रहाच.
17 Dec 2013 - 10:45 am | सुबोध खरे
बँक बुडाली तरीही त्यातील एक लाख रुपयापर्यंतची ठेव हि विम्याने संरक्षित असते. बाकी बँक बुडते कि तरंगते त्याच्याशी आपल्याला काय कर्तव्य? जर आपण कर्ज घेतले असले आणी बँक बुडाली तर उत्तमच कि हो.
17 Dec 2013 - 10:50 am | ज्ञानव
एक लाख रुपये जर तुमचे फिक्सला असतील तर ते संपूर्ण मिळत नाहीत त्याचे अनेक नियम उपनियम आहेत. बँकेत एक मन्युअल ठेवलेले असते ते एकदा जरूर वाचून पाहा.
विनोदाचा भाग म्हणून ठीक आहे कि बँक बुडाली तर उत्तमच....पण बुडण्या आधी वसुली करूनच ती बुडते.
तुमचे लोकर मध्ये असलेल्या सर्व वस्तू सोडल्यास कश्याचीच खात्री नसते.
प्लीज टेक केअर...सिरीअसली
17 Dec 2013 - 3:24 pm | सुखी
लॉकर मधल्या गोष्टीन्वर काही विमा छत्र असते का हो? आणि लॉकर फोडुन चोरी झाल्यास विमाचे पैसे ग्राहकाला मिळतात का?
17 Dec 2013 - 3:36 pm | ज्ञानव
लॉकर मधल्या गोष्टीन्वर काही विमा छत्र बँकेतर्फे नसते पण जर दागिने ठेवणार असाल किंवा घराची कागदपत्रे तर त्याचा विमा काढून मग ते तिथे तुम्ही ठेऊ शकता...किंवा ज्या वस्तूंचा विमा निघू शकतो आणि ज्या त्या लॉकर मध्ये राहू शकतात अशा वस्तू जर लॉकरमधून चोरीला गेल्यास पोलीस तक्रार आणि बँकेचे पत्र देऊन विम्याचे पैसे मिळू शकतात.
18 Dec 2013 - 3:45 pm | सुखी
धन्स
17 Dec 2013 - 10:44 am | वेताळ
एस्बीआय मशीन मध्ये वापरले त्या तीन ही वेळा पैसा मिळाला नाही पण अकॉउट मधुन पैसे वजा झाले. पण बरोडा मध्ये लेखी तक्रार दिल्यानंतर तीन दिवसामध्ये परत पैसे अकॉउट मध्ये जमा झाले. आता सहसा जे ते कार्ड ज्या त्या मशीन मध्ये वापरतो.
17 Dec 2013 - 10:45 am | सुबोध खरे
हे सर्वात उत्तम
17 Dec 2013 - 3:34 pm | प्रभाकर पेठकर
आत्तापर्यंतचा अत्योत्तम अनुभव HSBC बँकेचा आहे. अगदी जगभरात कुठेही कुठल्याही बँकेच्या ATM मधून पैसे काढले तरी कधी कसलीच समस्या आली नाही.
भारतात मात्र HSBC बँकेच्याच ATM मधून पैसे काढण्याचा प्रयत्न केला असता पैसे दिल्याची पावती मिळाली पण पैसे आलेच नाहीत. ताबडतोब त्यांच्या हेल्प लाईनला (दुबई) फोन केल्यावर त्यांनी माझ्या मस्कतच्या बँक खात्याचे तपशील विचारून ४८ तासांची मुदत दिली. ४८ तासांत, माझ्या खात्यातून वजा झालेले, पैसे खात्यावर परत जमा झाले.
HSBC चे सेवादर इतर बँकांच्या तुलनेत जास्त आहेत पण अन्यथा फार चांगला अनुभव आहे.
18 Dec 2013 - 7:55 pm | सुबोध खरे
+१
HSBC ची सेवा उत्कृष्ट आहे पण त्यांचे ए टी एम भारतभर सर्वत्र नाही. जर पगाराचे खाते असेल तर परवडते( माझे पगार खाते होते तेंव्हा सेवा घेतली होती) अन्यथा त्यांचे सेवा शुल्क फार आहे.
18 Dec 2013 - 9:43 pm | SAKHARBHAT
मी स्टेट बँक ऑफ त्रावणकोर (SBI ची असोसिएट बँक) मध्ये ATM Dispute Settlement विभागातच कार्यरत आहे. तुमची तक्रार रास्त आहे. ATM च्या एकूणच व्यापक प्रसारामुळे या बाबतीतल्या तक्रारीही खूप आहेत. पण खर म्हणजे ATM वर केल्या जाणाऱ्या रोजच्या व्यवहारांच प्रमाण पाहता अशा केसेसची संख्या अगदी अल्प आहे. तुमची तक्रार निकाली काढताना बँकेने तुम्हाला EJ log कॉपी दिली होती का? कॅनरा बँकेने तक्रार अस्वीकार करताना EJ log कॉपी HDFC ला पाठवली असणार, जी HDFC ने ग्राहकाला दिली पाहिजे. ही कॉपी तुम्ही Banking Ombudsman ला तक्रार करते वेळी देवू शकता. Banking Ombudsman ची लींक प्रतीसाद्कर्त्यानी वर दिलेलीच आहे. तुम्ही तुमची पहिली तक्रार व्यवहाराच्या तारखेपासून ३० दिवसात केली होती का? तसे असेल तर BO ने जर ही तक्रार ग्राह्य मानली तर आणि बँकेस पैसे देण्याचा आदेश दीला तर तुम्हाला नुकसान भरपाई म्हणून रुपये १००/ प्रती दिवशी या प्रमाणे पहिल्या तक्रारीच्या तारखेपासून ते पैसे खात्यात जमा होई पर्यंतच्या तारखेपर्यंत मिळतील. आणि खरोखरच अशी भरपाई मिळते, हे केवळ कागदावर नाही. मात्र पहिली तक्रार बँकेकडे ३० दिवसाच्या आत केली गेली पाहिजे.
19 Dec 2013 - 10:57 am | ज्ञानव
ह्या शब्दाचा फुल फॉर्म कळू शकेल का?
19 Dec 2013 - 11:05 am | गवि
इलेक्ट्रॉनिक जर्नल.
एटीएमच्या आत महत्वाचे व्यवहार नोंद करुन ठेवणारी यंत्रणा असते. या नोंदी पूर्वी जास्तकरुन कागदाच्या रोलवर आतल्याआत छापल्या जायच्या (म्हणूनच आपले पैसे बाहेर येण्याच्या आसपास आपल्याला एटीएमच्या पोटातूनही टर्र टर्र खर्र असा एक आवाज येतो.)
आताशा बर्याच ठिकाणी सॉफ्टवेअर (टेक्स्ट फाईल)च्या स्वरुपात एटीएमच्या आत स्टोअर करुन केंद्रीय ठिकाणावरुन नेटवर्कद्वारे खेचून ती गोळा केली जाते. यामुळे प्रत्यक्ष एटीएममधे काय घडलं याची नोंद मिळते.
19 Dec 2013 - 11:06 am | ज्ञानव
थंक्स
2 Jan 2014 - 10:48 pm | सन्जय गन्धे
एक वेगळा अनुभव - भारती बाजारमधे डेबिट कार्ड वापरताना माझ्या अकाऊंटमधून दोन वेळा पैसे डेबिट पडले होते. लेखी तक्रार वगैरे सर्व सोपस्कार करावेच लागले.कॉसमॉस बॅंकेची मुदत(परत अकाऊंटमधे जमा होण्याची)एक महिना आहे. तक्रारीनन्तर एक महिन्याने अकाऊंटला जमा झाले.
3 Jan 2014 - 7:20 am | कैलासवासी सोन्याबापु
आयला त्या बाबतीत एस बी आय झकास आहे राव!!! , ए टी एम मधुन पैसा बाहेर आला रे आला की मोबाईल वर ए टी एम लोकेशन नेमका विड्रॉल अन टीएक्सेन नंबर फटकन येतो, काही कंप्लेंट करायची असल्यास काही नको फक्त ती पावती जोडा एका लिहित अप्लिकेशन सोबत अन काम फत्ते