समलैंगिकतेला गुन्हा ठरविण्याच्या संदर्भातील सुप्रीम कोर्टाच्या निर्णया विषयी आपले काय मत आहे ?

मारवा's picture
मारवा in काथ्याकूट
11 Dec 2013 - 6:53 pm
गाभा: 

ताज्या बातमी नुसार सुप्रीम कोर्टाने २००९ मध्ये दिल्ली हायकोर्टाने दिलेल्या निर्णयाविरोधात निकाल दिलेला आहे. या अनुसार आता दोन समलैंगिक व्यक्तीं मधील लैंगिक संबध हे आता कायद्यानुसार कलम ३७७ नुसार हे गुन्हा मानण्यात येतील. आणि या फ़ौजदारी गुन्ह्यानुसार अशा संबध ठेवणारया व्यक्तीला अधिकात अधिक १० वर्षांच्या शिक्षेची कायद्यात तरतुद आहे.
या निकाला मुळे अनेक वर्षांपासुन आपल्या मुलभुत मानवी हक्कांसाठी लढा देणारया समलैंगिकाच्या चळवळीला जबर धक्का बसलेला आहे. या निर्णयांवर प्रतिक्रीया देतांना वृंदा करात यांनी असे म्ह्टले आहे की “हा अतिशय चुकीचा निर्णय आहे दोन प्रोढ व्यक्तींनी परस्पर संमतीने केलेल्या संबधाना बेकायदा ठरविणे चुकीचे आहे.” तर बाबा रामदेव यांनी अशी प्रतिक्रीया दिलेली आहे की समलैंगिकता ही मुळात अनैसर्गिक आहे आणि हे फ़क्त एक वाईट व्यसन फ़क्त आहे. शिवाय त्यांनी समलैंगिकांना आपल्या आश्रमात येण्याच निमंत्रण दिलेल आहे आणि अस सांगितले आहे की ते ह्या व्यसनापासुन समलैंगिकांची मुक्ती करुन देउ शकतात.
तर एक संवेदनशील विचारी भारतीय नागरीक म्हणुन या सुप्रीम कोर्टाच्या निर्णया कडे आपण कशा रीतीने बघतात ? एकंदरीत समलैंगिकता ही तुम्हाला विकृती वाटते की नाही ? यात समलैंगिकाच्या मुलभुत मानवी हक्कांची पायमल्ली झाली आहे अथवा नाही ? एकुण समाजाला हा निर्णय अधोगती कडे नेणारा आहे की प्रगती कडे?
कृपया यावर गंभीर रीत्या मतप्रदर्शन करावे ही अतिशय नम्र विनंती.

प्रतिक्रिया

साती's picture

11 Dec 2013 - 8:09 pm | साती

असा काही निर्णय मूळात नविन दिलेला नाही.
सर्वोच्च न्यायालयान फक्तं इतकच म्हटलंय की 'इंडियन पिनल कोडनुसार हा गुन्हा ठरतो.
जर गुन्हा ठरवायचा नसेल तर तो अधिकार न्यायालयाचा नाही.
संसदेत विधेयक मांडून बहुमताने तो कायदा बदलून घ्यावा.'
आता हे सरकारच्या आणि समलैंगिक लॉबीच्या हातात आहे की अशा कायदाबदलाच्या विधेयकाचा प्रस्ताव करून तो बहुमताने संमत कसा करून घ्यायचा.

साती's picture

11 Dec 2013 - 8:11 pm | साती

माझे मत परस्परसंमतीने होत असलेले समलैगिक व्यवहार शिक्षेस पात्रं ठरू नयेत मात्रं त्याना एक जोडपे अशी कायदेशीर मान्यता आणि अधिकारही मिळू नयेत.

मृगनयनी's picture

11 Dec 2013 - 9:34 pm | मृगनयनी

सहमत टू- साती'जी ..... समलैंगिक लोकांच्या विवाहाला कायदेशीर मान्यता मिळू नये..... त्याचबरोबर मला असे वाटते.. की "अश्या" लोकांना मानसोपचारतज्ज्ञांची जास्त गरज आहे. कारण अनैसर्गिक संबंध ही एक विकृती आहे. कितीही आधुनिकतेचा आव आणला किन्वा पाश्चिमात्य देशांचे अनुकरण करण्याचे ठरवले, तरीही अनैसर्गिक संबंध हे सम्पूर्ण समाजाला विघातक ठरू शकतात. तसेच त्यामुळे होणारे रोगही गंभीर स्वरूपाचे असतात. न जाणो अश्या विघातक संबंधांना मान्यता मिळाल्यावर उद्या "हे" लोक जनावरांबरोबरही संबंध ठेवण्यास मागेपुढे पाहणार नाहीत....
त्यांमुळे अ‍ॅक्चुअल परिस्थितीनुसार जे मुलं मुली समलैंगिक आहेत, त्यांना उचित मार्गदर्शन करून, तज्ज्ञांच्या मदतीने त्यांचे मतपरिवर्तन होणे गरजेचे आहे.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

11 Dec 2013 - 9:45 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

आश्चर्य वाटलं.

एकेकाळी स्त्रियांना खासगी मालमत्ता जमवणे, शिक्षण घेणे, निवडणूकीत मतदार आणि एक प्रतिस्पर्धी म्हणून भाग घेण्याचे आणि इतर अनेक अधिकार नाकारले गेले होते. आता घटनेने हे अधिकार स्त्रियांना दिलेले आहेत. दलित आणि कृष्णवर्णियांना माणूस म्हणून जगण्याचे अधिकार नाकारले गेले होते.

आज आम्हां बहुसंख्यांना आहेत ते अधिकार, कोणी वेगळ्या प्रकारे जन्माला आले म्हणून त्यांना देऊ नयेत याबद्दल फार आश्चर्य वाटलं आणि खेदही झाला.

... जसं काही समलैंगिक म्हणून जन्माला येणं हा गुन्हा आहे आणि तो कोणी स्वतःच्या मर्जीने केला आहे.

या प्रतिसादातला appologetic सूर मी बहुसंख्यांमधली एक आहे म्हणून आहे. अल्पसंख्य लोकांनी जोमाने विरोधी सूर लावावा. हा असा:

बिंदुमाधव खिरेंचं पत्र

First Published in Debonair, Annual issue, 2000

The answer in many respects depends on what we mean by homosexuality. Do we limit ourselves only to sexual acts between members of the same sex and leave out romantic affection? Do we distinguish between those men who occasionally have sex with other men but otherwise live heterosexual lives, and those for whom their sexual preference forms the core of their identity? Do we consider same-sex intercourse that occurs in the course of a subterfuge, or as a result of frustration or desperation? And do we include liaisons involving those who consider themselves neither male nor female (for example, hijras)? Definitions are important because ‘homosexuality’ does not connote the same thing to all people. Besides, the meaning has changed over time. As has the meaning of heterosexuality.

Until early 20th century, ‘heterosexuality’ was used to refer to ‘morbid sexual practices’ between men and women such as oral and anal intercourse, as opposed to ‘normal’ procreative sex. The term homosexuality – that is so casually used today and is almost an everyday vocabulary – came into being only in the late 19th century Europe when discussions on the varied expressions of sex and sexuality became acceptable in academic circles. The term was used to describe “morbid sexual passion between members of the same sex.” It was declared ‘unnatural’ by colonial laws, as unnatural as casual sex between men and women that was not aimed at conception.

The term homosexuality and the laws prohibiting ‘unnatural’ sex were imposed across the world through imperial might. Though they exerted a powerful influence on subsequent attitudes, they were neither universal nor timeless. They were – it must be kept in mind – products of minds that were deeply influenced by the ’sex is sin’ stance of the Christian Bible. With typical colonial condescension, European definitions, laws, theories and attitudes totally disregarded how similar sexual activity was perceived in other cultures.

There never has been across geography or history a standard expression of, or a common attitude towards sexual acts between members of the same sex. Love of a man for a boy was institutionalised in ancient Greece, amongst Samurais in Japan, in certain African as well as Polynesian tribes. Amongst some Native and South American tribes, erotic relationships between men was acceptable so long as one of the partners was ‘feminine’. For Arabs, so medieval travellers claim, ‘women were for home and hearth, while boys were for pleasure’. These cultures offer no synonym for same-sex intercourse. It was perhaps a practice that did not merit definition, categorization or even condemnation. So long as it did not threaten the dominant heterosexual social construct.

To find out if homosexuality or same-sex intercourse existed in India, and in what form, we have to turn to three sources: images on temple walls, sacred narratives and ancient law books.

What the walls show

Construction of Hindu temples in stone began around the sixth century of the Common Era. Construction reached climax between the twelfth and the fourteenth century when the grand pagodas of eastern and southern India such as Puri and Tanjore came into being. On the walls and gateways of these magnificent structures we find a variety of images: gods, goddesses, demons, nymphs, sages, warriors, lovers, priests, monsters, dragons, plants and animals. Amongst scenes from epics and legends, one invariably finds erotic images including those that modern law deems unnatural and society considers obscene. Curiously enough, similar images also embellish prayer halls and cave temples of monastic orders such as Buddhism and Jainism built around the same time.

The range of erotic sculptures is wide: from dignified couples exchanging romantic glances, to wild orgies involving warriors, sages and courtesans. Occasionally one finds images depicting bestiality coupled with friezes of animals in intercourse. All rules are broken: elephants are shown copulating with tigers, monkeys molest women while men mate with asses. And once in a while, hidden in niches as in Khajuraho, one does find images of either women erotically embracing other women or men displaying their genitals to each other, the former being more common (suggesting a tilt in favour of the male voyeur).

These images cannot be simply dismissed as perverted fantasies of an artist or his patron considering the profound ritual importance given to these shrines. There have been many explanations offered for these images – ranging from the apologetic to the ridiculous. Some scholars hold a rather puritanical view that devotees are being exhorted to leave these sexual thoughts aside before entering the sanctum sanctorum. Others believe that hidden in these images is a sacred Tantric geometry; the aspirant can either be deluded by the sexuality of the images or enlightened by deciphering the geometrical patterns therein. One school of thought considers these images to representations of either occult rites or fertility ceremonies. Another suggests that these were products of degenerate minds obsessed with sex in a corrupt phase of Indian history. According to ancient treatises on architecture, a religious structure is incomplete unless its walls depicts something erotic, for sensual pleasures (kama) are as much an expression of life as are righteous conduct (dharma), economic endeavours (artha) and spiritual pursuits (moksha).

Interpretations and judgements aside, these images tell us that the ‘idea’ of same-sex and what the colonial rulers termed ‘unnatural’ intercourse did exist in India. One can only speculate if the images represent the common or the exception.

What the stories suggest

In Indian epics and chronicles, there are occasional references to same-sex intercourse. For example, in the Valmiki Ramayana, Hanuman is said to have seen Rakshasa women kissing and embracing those women who have been kissed and embraced by Ravana. In the Padma Purana is the story of a king who dies before he can give his two queens the magic potion that will make them pregnant. Desperate to bear his child, the widows drink the potion, make love to each other (one behaving as a man, the other as a woman) and conceive a child. Unfortunately, as two women are involved in the rite of conception, the child is born without bones or brain (according to ancient belief, the mother gives the fetus flesh and blood, while the father gives the bone and brain). In these stories, the same-sex intercourse, born of frustration or desperation, is often a poor substitute of heterosexual sex.

More common are stories of women turning into men and men turning into women. In the Mahabharata, Drupada raises his daughter Shikhandini as a man and even gets ‘him’ a wife. When the wife discovers the truth on the wedding night, all hell breaks loose; her father threatens to destroy Drupada’s kingdom. The timely intervention of a Yaksha saves the day: he lets Shikhandini use his manhood for a night and perform his husbandly duties. In the Skanda Purana, two Brahmins desperate for money disguise themselves as a newly married couple and try to dupe a pious queen in the hope of securing rich gifts. But such is the queen’s piety that the gods decide to prevent her from being made a fool; they turn the Brahmin dressed as a bride into a real woman. The two Brahmins thus end up marrying each other and all ends well. According to a folk narrative from Koovagam in Tamil Nadu, the Pandavas were told to sacrifice Arjuna’s son Aravan if they wished to win the war at Kurukshetra. Aravan refused to die a virgin. As no woman was willing to marry a man doomed to die in a day, Krishna’s help was sought. Krishna turned into a woman, married Aravan, spent a night with him and when he was finally beheaded, mourned for him like a widow. These stories allow women to have sex with women and men to have sex with men on heterosexual terms. One may interpret these tales as repressed homosexual fantasies of a culture.

Perhaps the most popular stories revolving around gender metamorphoses are those related to Mohini, the female incarnation of Lord Vishnu. They are found in many Puranas. Vishnu becomes a woman to trick demons and tempt sages. When the gods and demons churn the elixir of immortality out of the ocean of milk, Mohini distracts the demons with her beauty and ensures that only the gods sip the divine drink. In another story, Mohini tricks a demon with the power to incinerate any creature by his mere touch to place his hand on his own head. Mohini is so beautiful that when Shiva looks upon her he sheds semen, out of which are born mighty heroes such as Hanuman (according to Shiva Purana) and Ayyappa (according to the Malayalee folk lore). One wonders why Vishnu himself transforms into a woman when he could have appointed a nymph or goddess to do the needful. However, devotees brush aside even the suggestion of a homosexual subtext; for them this sexual transformation is merely a necessary subterfuge to ensure cosmic stability. He who is enchanted by Mohini’s form remains trapped in the material world; he who realizes Mohini’s essence (Vishnu) attains liberation.

In the Brahmavaivarta Purana, Mohini tells Brahma, “Any man who refuses to satisfy a willing woman in her fertile period is a eunuch.” This idea is explicit in the Mahabharata when Arjuna is deprived of his manhood after he spurns the sexual attentions of the nymph Urvashi. Consequently, the mighty archer is forced to live as a ‘eunuch dance teacher’ called Brihanalla in the court of King Virata for a year. All this suggests that in ancient India, men who were ‘unlike men’, unwilling or incapable to have intercourse with women, were deprived of their manhood and expected to live as women in the fringes of mainstream society. Perhaps this explains the existence of the hijra community in India. Like Brihanalla of Mahabharata, hijras have served in the female quarters of royal households for centuries.

Hijras are organized communities comprising of males who express themselves socially as women. They are a mix of transsexuals (men who believe themselves to be women), transvestites (men who dress in women’s clothes), homosexual (men who are sexually and romantically attracted to men), hermaphrodites (men whose genitals are poorly defined due to genetic defect or hormonal imbalance) and eunuchs (castrated men). In one of the many folk stories associated with Bahucharaji (patron goddess of hijras worshipped in Gujarat), the goddess was once a princess who castrated her husband because he preferred going to the forest and ‘behaving as a woman’ instead of coming to her bridal bed. In another story, the man who attempted to molest Bahucharaji was cursed with impotency. He was forgiven only after he gave up his masculinity, dressed as a woman and worshipped the goddess.

The idea of men who are not quite male or female was known in India for a long time. Such beings were known as kliba. In the Brahmana texts, written eight centuries before Christ we learn that when the gods separated the three worlds, there was sorrow. The gods cast the sorrow of the heaven into a whore (socially improper woman), the sorrow of the nether regions into the rogue (socially improper man) and the sorrow of earth into the kliba (biologically imperfect human). In later Hindu texts such as Manusmriti, the kliba was forbidden for participating in rituals; he was not allowed to possess property. Scholars believe the kliba was an umbrella term not unlike present-day words like namard and napunsak, which could mean anything from sexually dysfunctional male to impotent man to homosexual. One text describes fourteen different types of klibas, one of whom is a man who uses his mouth as a vagina (mukhabhaga). Hijras believe that they are neither male nor female, making them the descendents of the ancient kliba (though there is no definite proof in this regard). According to hijra folklore, when Rama went to the forest in exile, he asked the men and women of Ayodhya who had followed him to return to the city. Since he said nothing to those who were neither male nor female, these waited outside the city until he returned. Touched by their devotion, Rama declared that the non-man would be king in the Kali Yuga.

What the scriptures reveal

The Kali Yuga marks the final phase in the cosmic lifespan, the era before the flood of doom. Hindu scriptures state that in this age all forms of sexual irregularities will occur. Men will deposit semen in apertures not meant for them (Mouth? Anus?). According to Narada Purana: “The great sinner who discharges semen in non-vagins, in those who are destitute of vulva, and uteruses of animals shall fall into the hell ‘reto-bhojana’ (where one has to subsist on semen). He then falls into ‘vasakupa’ (a deep and narrow well of fat). There he stays for seven divine years. That man has semen for his diet. He becomes the despicable man in the world when reborn.” Clearly an acknowledgement, but not acceptance, of homosexual conduct.

In the Kamasutra, there is a rather disdainful reference to male masseurs who indulge in oral sex (auparashtika). The author of this sex manual was not a fan of homosexual activities though he did refer to them in his book. Reference, but not approval, to homosexual conduct does occur in many Dharmashastras. These Hindu law books tell us what is considered by Brahmins to be acceptable and unacceptable social conduct. Since laws are not made on activities that don’t exist, a study of these scriptures does give an insight into behaviours in ancient India that merited a law.

The Manusmriti scorns female homosexuals. It states, “If a girl does it (has sex) to another girl, she should be fined two hundred (pennies), be made to pay double (the girl’s) bride-price, and receive ten whip (lashes). But if a (mature) woman does it to a girl, her head should be shaved immediately or two of her fingers should be cut off, and she should be made to ride on a donkey.” There are no kind words for a male homosexual either: “Causing an injury to a priest, smelling wine or things that are not to be smelled, crookedness, and sexual union with a man are traditionally said to cause loss of caste.” And: “If a man has shed his semen in non-human females, in a man, in a menstruating woman, in something other than a vagina, or in water, he should carry out the ‘Painful Heating’ vow.” Further: “If a twice-born man unites sexually with a man or a woman in a cart pulled by a cow, or in water, or by day, he should bathe with his clothes on.” The ‘Painful Heating’ vow is traditionally said to consist of cow’s urine, cow dung, milk, yogurt, melted butter, water infused with sacrificial grass, and a fast of one night. Compared to the treatment of female homosexuals, the treatment of male homosexuals is relatively mild. Note that there are no threats of ‘eternal’ damnation, unlike the dogmas of Judeo-Christian-Islamic scriptures. There is nothing permanent in the Hindu world. There is always another life, another chance.

An overview of temple imagery, sacred narratives and religious scriptures does suggest that homosexual activities – in some form – did exist in ancient India. Though not part of the mainstream, its existence was acknowledged but not approved. There was some degree of tolerance when the act expressed itself in heterosexual terms – when men ‘became women’ in their desire for other men, as the hijra legacy suggests. The question that remains now is: how does attitudes towards homosexuals in ancient India affect modern-day attitudes? Is our approval or disapproval of same-sex affection and intercourse dependent on ancient values? And while we ponder over the questions, we must remind ourselves that the ancient sources that censure homosexual conduct, also institutionalised the caste system and approved the subservience of women.

प्रसाद प्रसाद's picture

12 Dec 2013 - 12:23 pm | प्रसाद प्रसाद

हा लेख कोणी लिहीला आहे?

बिपिन कार्यकर्ते's picture

12 Dec 2013 - 9:56 am | बिपिन कार्यकर्ते

सहमत आहे.

विशेषतः : "आज आम्हां बहुसंख्यांना आहेत ते अधिकार, कोणी वेगळ्या प्रकारे जन्माला आले म्हणून त्यांना देऊ नयेत याबद्दल फार आश्चर्य वाटलं आणि खेदही झाला.

... जसं काही समलैंगिक म्हणून जन्माला येणं हा गुन्हा आहे आणि तो कोणी स्वतःच्या मर्जीने केला आहे."

पैसा's picture

11 Dec 2013 - 9:26 pm | पैसा

+1

क्लिंटन's picture

11 Dec 2013 - 9:31 pm | क्लिंटन

+१. टंकविण्याचे श्रम वाचविल्याबद्दल धन्यवाद.

सकाळपासून एन डी टीव्ही वर हा मुद्दा इतक्या जोराने मांडला जातोय की जणू हा भारतापुढील सर्वात मोठ्ठा प्रश्न आहे.
इतक्या किरकोळ आणि फालतु मुद्द्याचे एवढे स्तोम कशाला?

साती's picture

11 Dec 2013 - 8:31 pm | साती

चघळायला कायतरी हवं असतं त्यांना.
निवडणूकांचं हाडूक चघळून चघळून संपत आलं.

मारवा's picture

11 Dec 2013 - 8:53 pm | मारवा

इतक्या आकिरकोळ णि फालतु मुद्द्याचे एवढे स्तोम कशाला?

मारवा's picture

11 Dec 2013 - 8:54 pm | मारवा

इतक्या आकिरकोळ णि फालतु मुद्द्याचे एवढे स्तोम कशाला?

इतकी असंवेदनशीलता कशी असु शकते काही समजत नाही, जरी आपल्या धारणांच्या विरोधात एखादी बाब असेल तरी कोणा दुसरया व्यक्ती साठी जो जीवनाचा आत्मसम्मानाचा महत्वाचा प्रश्न असु शकतो. कोणाच्या मुलभुत स्वातंत्र्याला संपविण्याचा प्रयत्न होत असतांना एक माणुस म्हणुन कीमान प्रश्न ही महत्वाचा वाटु नये?
खरच आयुष्यात अशा कसोटीच्या प्रसंगात नियतीने तुम्हास तरी टाकु नये अशी सदीच्छा करतो
बाकी संवेदनशीलता विकसीत करता येत नाही हे खरे ती असते किंवा नसते

अनुप ढेरे's picture

11 Dec 2013 - 9:18 pm | अनुप ढेरे

हाच प्रतिसाद अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या धाग्यावर पण फिट्ट बसेल.

विकास's picture

11 Dec 2013 - 9:53 pm | विकास

तर एक संवेदनशील विचारी भारतीय नागरीक म्हणुन या सुप्रीम कोर्टाच्या निर्णया कडे आपण कशा रीतीने बघतात ?
मला वाटते सुप्रिम कोर्टाचा निर्णय हा वर साती यांनी म्हणल्याप्रमाणे कायदा काय आहे या संदर्भात आहे. जर कायद्यात इंटप्रिटेशन करण्यास वाव नसला तर कोर्ट फक्त कायदा काय म्हणतो ते सांगू शकतो. आणि तोच प्रकार येथे झालेला आहे. कोर्ट सरकारला म्हणते की "बॉल इज इन युअर कोर्ट"!
वास्तवीक यातील मुद्दा हा केवळ समलैंगिकांसंदर्भात आणि कलम ३७७ पुरताच मर्यादीत नाही... तो असा आहे की अजूनही ब्रिटीशांनी केलेले कायदे आपण का वापरत आहोत? प्रत्येक कायद्याची वर्तमानास धरून छाननी करून तो पुन्हा नव्याने करणे गरजेचे आहे. ३७७ कलम हे मला वाटते ब्रिटीश / ख्रिस्ती नैतिकमुल्यांच्या आधारावर तयार केले गेले होते. त्याचा भारतीय संस्कृतीशी काही संबंध नव्हता. याचा अर्थ भारतीय संस्कृतीत (आणि आजच्या समाजातही) (लग्न आणि त्या संबंधीत) समलैंगिकांना समान वागणूक देणे मान्य होते/आहे असा अर्थ नाही. पण धर्माधारीत बंधने होती असे ऐकलेले तरी नाही.

एकंदरीत समलैंगिकता ही तुम्हाला विकृती वाटते की नाही ?
विकृती या शब्दाचा अर्थ केवळ "निसर्गातूनच तयार झालेली अनैसर्गिक प्रवृत्ती" इतक्याच मर्यादीत अर्थाने घेतला आणि निसर्गात लैंगिक संबंध हे प्राथमिकरीत्या प्रजननासाठी समजले तर केवळ त्या अर्थाने ती विकृती ठरू शकते. पण त्यास "निसर्गातूनच तयार झालेली अनैसर्गिक प्रवृत्ती" असे म्हणणे वैद्यकीय दृष्ट्या योग्य आहे का हे मला माहीत नाही. बाकी कुठल्याही अर्थाने त्याला विकृती समजू नये असे वाटते. अमेरीकेत मॅसॅच्युसेट्स हे गे मॅरेजला परवानगी देणारे पहीले राज्य आहे. येथे अनेकांना जवळून पाहीले आहे, अनेकांशी (गे अथवा लेस्बियन कपल्स) चांगल्या ओळखी आहेत. या सर्वात कुठे विकृती आणणे मला योग्य वाटत नाही. माझ्या दृष्टीने तेजपाल, असाराम बापू आणि त्यांचे चिरंजीव ह्यांनी दाखवलेली वृत्ती ही ज्या (सरळ, समलिंगी वगैरे) कोणाच्यात असेल ती हीन या अर्थान विकृती. असो.

यात समलैंगिकाच्या मुलभुत मानवी हक्कांची पायमल्ली झाली आहे अथवा नाही ?
होत आहे. पण त्याला कोर्ट अथवा सुप्रिम कोर्टाचा निर्णय जबाबदार नाही. ती आधीपासूनच झालेली आहे.

एकुण समाजाला हा निर्णय अधोगती कडे नेणारा आहे की प्रगती कडे?
परत तेच उत्तरः त्याला कोर्ट अथवा सुप्रिम कोर्टाचा निर्णय जबाबदार नाही. कोर्टाने कायद्याचे इंटरप्रिटेशन केलेले आहे. जर कायद्यात हा स्पष्टपणे गुन्हा म्हणलेला असेल तर तसे म्हणलेच नाही असे जर कोर्टाने म्हणले तर त्यांचा हेतू कितीही उदात्त असला तरी तो निर्णय एक न्याय संस्था म्हणून अधोगतीकडे नेणारा ठरला असता.

अजून थोडे मतः राजकारण आणि निवडणुका

काँग्रेसबद्दल: "...India’s Congress-led government has been reluctant to take a firm stand on the issue. The health ministry, which has extensive programmes to combat HIV/Aids, supported gay groups, arguing that the ban on same sex lovemaking hindered efforts to reach out to gay men at high risk of contracting HIV. But the conservative interior ministry argued that overturning the ban would threaten the social order."

भाजपाच्या सिंघल नामक नेत्यांनी या खटल्यात समलैंगिकांच्या विरोधात अर्ज केला होता. त्यास भाजपाचा अधिकृत पाठींबा होता का ते माहीत नाही. पण हे सिंघल आता हयात नाहीत.

एकूणच भाजपा आणि काँग्रेस तसेच इतर पक्ष निवडणुकीच्या तोंडावर काही ठोस भुमिका घेतील असे वाटत नाही. कारण त्यांना त्यात त्यांच्या व्होटबँकच्या मानसिकतेचा अधिक विचार करावा लागेल. पण २०१४ च्या निकालानंतर जे कोणी सरकार येईल त्यांना मात्र भुमिका आणि निर्णय घ्यावे लागतील असे वाटते.

राजेश घासकडवी's picture

12 Dec 2013 - 6:26 am | राजेश घासकडवी

प्रतिसाद आवडला. विशेषतः 'बॉल इज इन युअर कोर्ट' हा भाग. कायदा कालबाह्य आहे, पण पुस्तकात तो अजून आहे. तो बदलण्याचं काम सरकारचं आहे. हे धार्ष्ट्य या निवडणुकांआधी कोणी दाखवेल असं वाटत नाही.

पण त्यास "निसर्गातूनच तयार झालेली अनैसर्गिक प्रवृत्ती" असे म्हणणे वैद्यकीय दृष्ट्या योग्य आहे का हे मला माहीत नाही.

नैसर्गिक-अनैसर्गिक या शब्दांनी फार घोळ माजवलेला आहे. मानवाने आत्तापर्यंत ठरवलेलेल नैतिकतेचे कायदे तो निसर्गावर ढकलतो. किंवा ९५% लोक वागतात त्यापेक्षा वेगळं, याला अनैसर्गिक म्हटलं जातं. पण निसर्गात प्रत्यक्ष काय आहे? शेकडो प्रजातींमध्ये समलिंगी वागणूक दिसते. मानव हा या बाबतीतही 'इतर प्राण्यांप्रमाणेच एक' दिसतो. मग या सगळ्याकडे डोळेझाक करून आपल्याच नैसर्गिकतेच्या कल्पनांचा आरोप निसर्गावर करायचा हे योग्य नाही.

बाकी कुठल्याही अर्थाने त्याला विकृती समजू नये असे वाटते.

हे बरोबरच.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

12 Dec 2013 - 9:52 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>>>> शेकडो प्रजातींमध्ये
समलिंगी वागणूक दिसते.

काही उदाहरणे ?

-दिलीप बिरुटे

बिपिन कार्यकर्ते's picture

12 Dec 2013 - 9:58 am | बिपिन कार्यकर्ते

या वरून बरीच माहिती मिळावी.

http://en.wikipedia.org/wiki/Homosexual_behavior_in_animals

खटासि खट's picture

12 Dec 2013 - 10:54 am | खटासि खट

+१
हीच लिंक द्यायला आलो होतो..

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

12 Dec 2013 - 6:50 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

माहितीपूर्ण दुवा...!!!

-दिलीप बिरुटे

वाटाड्या...'s picture

11 Dec 2013 - 10:22 pm | वाटाड्या...

"निसर्गातूनच तयार झालेली अनैसर्गिक प्रवृत्ती" असं म्हणायचं असेल तर आधी नैसर्गिक प्रवृत्तीचे रेफरन्सच चेक करावे लागतील. कारण ते रेफरन्स त्या त्या काळाला आणि मनोप्रवृत्तीला अनुसरुनच झाले असतील.

मुक्तसुनीत's picture

11 Dec 2013 - 10:28 pm | मुक्तसुनीत

समलैंगिकता - समान लिंगी व्यक्तीबरोबरचं मैथुन हे त्यात आलं - बेकायदेशीर असावी का ?

नाही. लैंगिक व्यवहाराला उभयपक्षी संमती असणार्‍या दोन प्रौढ व्यक्तींमधल्या गोष्टी या मधे काहीही बेकायदेशीर असणं बरोबर नाही. यामधे न्यायालय, पोलीस, सरकार किंवा अन्य लोक यांचा काही संबंधच नाही.

थोडक्यात
- बळजबरीने केलेल्या लैंगिक क्रिया
- शोषणाधारित व्यवस्थेमधे अंतर्भूत असलेला लैंगिक व्यवहार
- कायद्याच्या दृष्टीने अज्ञान असणार्‍या मुलामुलीबरोबरचा (अगदी त्या मुलाने/मुलीने संमती दिलेली असली तरीचा) लैंगिक व्यवहार
- सार्वजनिक ठिकाणी केलेला लैंगिक व्यवहार

या गोष्टी कायद्याच्या कक्षेत येणार्‍या आणि पर्यायाने बेकायदेशीर असाव्यात. त्या तशा आहेतच. याची अंमलबजावणी कशी होते, कितपत परिणामकारक रीतीने होते, होते की नाही वगैरे प्रश्न निराळे. "ऑन पेपर" या गोष्टी अवैध आहेत. आणि त्या अवैध असणं मला बरोबर वाटतं.

दोन प्रौढ व्यक्तींमधला समलैंगिक व्यवहार यामधे येऊ नये असं मला वाटतं. बस्स. इतकंच.

सुप्रीम कोर्टाच्या निकालामुळे या अशा "कन्सेंटींग अ‍ॅडल्ट्स"मधल्या खासगी व्यवहाराला बेकायदेशीर ठरवले गेलेले आहे. हा मूलभूत वैयक्तिक स्वातंत्र्यावरचा बडगा आहे. त्याचा मी विरोध करतो.

कवितानागेश's picture

11 Dec 2013 - 10:41 pm | कवितानागेश

मूळात कुणाच्याही 'लैंगिकतेबद्दल' कुठला कायदा कसा काय असू शकतो?
कुणावरही कुठलयाही प्रकारची 'जबरदस्ती' होउ नये किंवा कुणी उगाच चिथावले जाउ नये, यासाठी कायदा असणे आवश्यकच आहे. १८ वर्षे (की १६?) वयाखालील कुठल्याही व्यक्तीला देखिल लैगिक संबंधा संदर्भात कायद्याचे संरक्षण हवेच.
पण त्यापुढे कुणी काय करायचं हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे.
जर का २ समलैगिक एकमेकांना त्रास न देता आनंदानी एकत्र राहात असतील तर तो 'गुन्हा' नक्कीच नाही.

आणि मुळात लैंगिकतेसंदर्भात असा कितीसा अभ्यास झाला आहे, की त्याबाबतीत कायदा करावा??
जर का मनाच्या डॉक्टरांचे असं म्हणणं असेल की समलैंगिकता चूक आहे, तर त्यासाठी समुपदेशन किम्वा इतर काही औषधे/ उपचार यापैकी कशाची गरज आहे हे पाहून त्याप्रमाणे उपाय करावेत.

काहीजण काचा खातात किन्वा धातू खातात, त्यांचे नाव मात्र 'वर्ल्द रेकॉर्ड' मध्ये येते, तेही अनैसर्गिकच आहे. शिवाय त्रासदायकही अहे. त्यांच्यावर गुन्हा नोंदत नाही!
मग समलैगिकांवर उगाच दात का धरायचा? त्यापेक्षा असं का होतय त्याच्या मूळापर्यंत जाउन शोध घेउन उपाय करावा.

शेवटी ज्याची त्याची आवड हो....फक्त वाइट गोष्ट एकच आहे म्हणजे मगाशी जेवताना बातम्या लावल्यावर शेजारी बसलेल्या सहा वर्षाच्या पिल्लाने त्या बातम्या पाहुन विचारले, पपल्या, "हे समलैंगिक म्हणजे काय रे ?" पटकन कार्टुन नेटवर्क लावण्याशिवाय माझ्यापुढे पर्याय नव्हता राव.
बाकी तुमच चालु द्या......

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

12 Dec 2013 - 12:31 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

खरंय. या भिन्नलैंगिक पालकांची अडचण समजून घेऊन समलैंगिकतेला लवकरात लवकर मान्यता द्यावी. वाद संपले की चर्चा संपेल आणि मग अशी पंचाईत होणार नाही.

'योनीच्या मनीच्या गुजगोष्टी'संदर्भातल्या मुलाखतीचा हा भाग जरूर पहा. त्याचा फायदा झाला-न-झाला हा लेख वाचा. मुलाशी बोला. त्याला समजलं तर तो अनुभव लिहा. नाही तर मुलांच्या गमतीजमती म्हणून काय तो अनुभव लिहा.

बिपिन कार्यकर्ते's picture

12 Dec 2013 - 10:01 am | बिपिन कार्यकर्ते

एके काळी साक्षात वडिलांना 'पपल्या' म्हणणं हे विकृत समजले जात असे. असो.

पैसा's picture

11 Dec 2013 - 11:01 pm | पैसा

सुप्रीम कोर्टाचे काम असलेल्या कायद्याचा अर्थ लावून त्या चौकटीत निकाल देणे. कायदा करणे हे कोर्टाचे काम नव्हे तर विधी मंडलाचे अर्थात संसदेचे काम आहे.

विकास's picture

11 Dec 2013 - 11:34 pm | विकास

जे काही थोडेफार वाचून समजले ते "ढोबळ मानाने" असे. २००९ साली दिल्ली हायकोर्टाने ३७७ कलम रदबादल करण्याचा निर्णय दिला. त्यानंतर काही हिंदू-मुस्लीम-ख्रिश्चन ग्रूप्स हे सुप्रिम कोर्टाकडे गेले आणि असे रदबादल करणे योग्य आहे का असे विचारले. त्यावर सुप्रिम कोर्टाचे इतकेच म्हणणे आहे की कायदे करणे अथवा बदलणे हे विधीमंडळाचे/लोकसभेचे काम आहे.

यात फक्त मुद्दा इतकाच रहातो की जर ते घटनेने दिलेल्या मानवी हक्क संरक्षणाच्या विरोधात असेल तर सुप्रिम कोर्ट असा कायदा-कलम रद्द करू शकते. ते तसे का केले नाही हा प्रश्न उरतो. मला कुठे तरी वाटते की त्या संदर्भात बचाव केला गेला नसावा कारण आता ते तो मुद्दा घेऊन परत कोर्टात जाणार आहेत.

कुठल्याही राजकर्त्यांना हा मुद्दा जर कोर्टाने सोडवला तर हवा असेल असे वाटते. असो.

अर्धवटराव's picture

11 Dec 2013 - 11:27 pm | अर्धवटराव

वर विकासरावांनी विकृती व कायद्यासंदर्भात पर्फेक्ट विष्लेशण दिलं आहे. त्याहुन अधिक काहि सांगायची गरज नाहि.

पण एक मुद्दा असा, कि समलैंगीकता हि खरच फक्त जन्मजात असते कि ति डेव्हलप करता येते?? जर ति डेव्हलप करता येत असेल तर तिचे व्यापारी मुल्य, कौटुंबीक आणि सामाजीक ढाचाला धक्का लावायची त्याची क्षमता, आणि एकुणच वैयक्तीक स्वातंत्र्याच्या कक्षेत होणारे बदल... यासर्वांचे एकत्रीत परिणाम किती? माझ्या मते प्रचंड. अमेरीकेत वा जगात इतर कुठेही समलैंगीक संबंधांना मान्यता मिळणे, वा समलैंगीक व्यक्तींची सोशल मानसीकता अगदी नॉर्मल असणे वगैरे उदाहरणं फार उथळ आहेत (सुपरफिशीयल या अर्थाने).

कायदा जर या परिणामांना उपद्रवमुल्य मानत असेल, व ते उद्भवुच नये म्हणुन अगदी प्राथमीक लेव्हललाच त्याला बेकायदेशीर म्हणुन ठरवत असेल तर ते समजण्यासारखं आहे. पण हे बेकायदेशीर ठरवण्यामुळे समाजातील एका घटकाची प्रचंड कुचंबणा होतेय हे वास्तव देखील डोळ्याआड करता येणार नाहि.

समलैंगीक संबंधातील हि जी न्युसन्स व्हॅल्यु आहे तिला अटकाव करुन या संबंधांना मान्यता देणं हाच एक मार्ग आहे. पण ते फार कठीण आहे. ज्या अंधश्रद्धा सरळ सरळ मनुष्याच्या जगण्याच्या अधिकाराची पायमल्ली करतात त्यांना क्रिमिनल अफेन्स म्हणुन अटकाव करण्यापेक्षा आपल्याला त्याला अंधश्रद्धा निर्मुलनाच्य कायद्यांतर्गत वर्ग करावं लागतं... हि आहे आपली सध्याची मॅच्युरिटी लेव्हल. समलैंगीकतेबद्दल तर फार प्रगल्भता दाखवावी लागणार आहे.

अर्धवटराव's picture

11 Dec 2013 - 11:28 pm | अर्धवटराव

आतलं मॅटर कुठं गायबलं??
-----------------------------------------
वर विकासरावांनी विकृती व कायद्यासंदर्भात पर्फेक्ट विष्लेशण दिलं आहे. त्याहुन अधिक काहि सांगायची गरज नाहि.

पण एक मुद्दा असा, कि समलैंगीकता हि खरच फक्त जन्मजात असते कि ति डेव्हलप करता येते?? जर ति डेव्हलप करता येत असेल तर तिचे व्यापारी मुल्य, कौटुंबीक आणि सामाजीक ढाचाला धक्का लावायची त्याची क्षमता, आणि एकुणच वैयक्तीक स्वातंत्र्याच्या कक्षेत होणारे बदल... यासर्वांचे एकत्रीत परिणाम किती? माझ्या मते प्रचंड. अमेरीकेत वा जगात इतर कुठेही समलैंगीक संबंधांना मान्यता मिळणे, वा समलैंगीक व्यक्तींची सोशल मानसीकता अगदी नॉर्मल असणे वगैरे उदाहरणं फार उथळ आहेत (सुपरफिशीयल या अर्थाने).

कायदा जर या परिणामांना उपद्रवमुल्य मानत असेल, व ते उद्भवुच नये म्हणुन अगदी प्राथमीक लेव्हललाच त्याला बेकायदेशीर म्हणुन ठरवत असेल तर ते समजण्यासारखं आहे. पण हे बेकायदेशीर ठरवण्यामुळे समाजातील एका घटकाची प्रचंड कुचंबणा होतेय हे वास्तव देखील डोळ्याआड करता येणार नाहि.

समलैंगीक संबंधातील हि जी न्युसन्स व्हॅल्यु आहे तिला अटकाव करुन या संबंधांना मान्यता देणं हाच एक मार्ग आहे. पण ते फार कठीण आहे. ज्या अंधश्रद्धा सरळ सरळ मनुष्याच्या जगण्याच्या अधिकाराची पायमल्ली करतात त्यांना क्रिमिनल अफेन्स म्हणुन अटकाव करण्यापेक्षा आपल्याला त्याला अंधश्रद्धा निर्मुलनाच्य कायद्यांतर्गत वर्ग करावं लागतं... हि आहे आपली सध्याची मॅच्युरिटी लेव्हल. समलैंगीकतेबद्दल तर फार प्रगल्भता दाखवावी लागणार आहे.

पिवळा डांबिस's picture

12 Dec 2013 - 12:01 am | पिवळा डांबिस

काही वर्षांपूर्वी मी इथेच मिपावर एक अलिशिया नांवाचं व्यक्तिचित्र लिहिलं होतं.
http://www.misalpav.com/node/5469
ते वाचून आपल्या रामदासकाकांनी काहिसं म्हंटलं होतं की, "काही सामाजीक समस्या अजून तरी इथे फारशा सोडवाव्या लागत नाही आहेत. पण मनानी येणार्‍या भविष्यकाळाची तयारी केली आहे"
म्हणून म्हंटलं की काका, पाणी आलं हो घराच्या पायरीपर्यंत! करा तरंगायला सुरुवात!! :)

बाकी सिरियसली, हे बदल रोखण्याचा कुणी प्रयत्न करणं हे माझ्या मते केरसुणीने समुद्राच्या लाटा परतवण्याचा प्रयत्न करण्यापैकी आहे!!

पहाटवारा's picture

12 Dec 2013 - 9:00 am | पहाटवारा

बाकी सिरियसली, हे बदल रोखण्याचा कुणी प्रयत्न करणं हे माझ्या मते केरसुणीने समुद्राच्या लाटा परतवण्याचा प्रयत्न करण्यापैकी आहे!!

मुद्धेसूद ! आज ना ऊद्या हे होईल .. कित्येक राजकीय मंडळी पण सध्या या बाजूने बोलता आहेत ज्यांच्या हाती आता हा कायदा मोडित काढ्ण्याची जबाबदारी आहे .. पण जेव्हा हि २०१४ ची धामधूम शांत होइल तेव्हाच !
-पहाटवारा

निर्णय फारसा पटला नाहीये. दोन प्रौढ व्यक्तींचा हा खुशीने घेतलेला निर्णय असू शकतो. जर ही गोष्ट बेकायदेशीर ठरवली तर समाजात कित्येक स्त्री पुरुष जोडपी लग्नाविना रहात असल्याचे दिसते. आता तेही कायदेशीर लग्न नाही वगैरे आहेच पण दोन मनुष्यांमधल्या या निर्णयाला जर मान्यता मिळू शकते तर समलिंगींना का नाही? मला नक्की आठवत नाही पण काही वर्षांपूर्वी लिव्ह इन नात्याला हिरवा बावटा मिळाला होता ना? तिथे ज्या अटी लागू केल्यात तशा इथेही लागू व्हाव्यात. मला (अनेकांना)अजूनही समलिंगी संबंध असलेली जोडपी हे वास्तव पचायला अवघड जाते पण म्हणून अशा जोडप्यांना जगण्याचे वेगळे नियम लागू करणे हे मान्य नाही. आमच्या ओळखीचे असलेले एक जोडपे आनंदात असते हे पाहिले आहे. बाकी समाजाची प्रगती वगैरे बाबतीत म्हणायचे झाल्यास कोणत्या स्त्री, पुरुषाला (यात लहान मुलेही आली) आनंदाने जगता येण्यापैकी कोणताही अधिकार काढून घेणे हे अधोगतीचेच लक्षण आहे.

विकास's picture

12 Dec 2013 - 7:40 am | विकास

आजचा या विषयावरील लोकसत्तेचा अग्रलेख वाचण्यासारखा आहे: लिंगालिंग भेद अमंगळ

चौकटराजा's picture

12 Dec 2013 - 8:30 am | चौकटराजा

काटा रुते कुणाला आक्रंदतात कोणी
मज फूलही रूतावे हा दैवयोग आहे
वरील ओळीचा कवीने प्रकट केलेले अर्थ असा आहे की मी इतका नाजूक आहे हे की मला फूलही काट्यासारखे त्रास देते. हे कसले माझे सुदैव ?
आपल्या हेट्रो सेक्सुअल ( त्यात मी ही आलो) बहुल समाजाचा असा समज आहे की आम्ही म्हणतो ते प्रमाण ! मग निसर्ग काहीही म्हणो. Nothing is peversion under the sun unless it hurts the other soul ! " अशी माझी
विकृतीची व्याख्या आहे. म्हणूनच मी मांसाहारी लोकाना परव्हर्ट मानीत नाही. ( रामदेव बाबा मानत असतील बहुदा ).
समाजातील काही जणाना मांसाहार, दारू पिणे, तंबाखू खाणे, हे जर परव्हर्शन वाटायला लागले तर त्यांची अवस्था " फूलही रूतावे " अशा सारखी झाली आहे असे म्हणणे प्राप्त आहे. तेच हेत्रो सेक्सुअल लोकांचे झाले आहे.
वरील कलम हे बायबलातील काही मुल्ल्यांवर आधारित आहे मूळ कायदा ब्रिटीशानी केलेला आहे.व आपल्या इतिहासाचा अभ्यास न करता ते घटनाकारानी आंधळेपणाने दंडविधानात जसे च्या तसे स्वीकारले आहे. सबब संसदेने ते रद्द्द केल्याशिवाय या " विकृता" न्याय मिळणार नाही.
आश्च्यर्याची बाब अशी की ज्या गोष्टीला निसर्गाचा काही आधार नाही अशा धर्म व जाती चे अस्तित्व मान्य करून कुणाला
बहु विवाह करण्यास परवानगी, कुणास शस्त्र बाळगण्यास मुभा , हेलमेट सक्ती मधून कायदेशीर सूट अशी खिरापत वाटणार्‍या घटनाकाराना , लेस्बियन, गे यांचे अस्तित्व या निसर्गात आहे याचा विसर पडला असावा. घटना समितीत वैद्यक व्यवसायाचा प्रतिनिधी बहुतेक नसावा असे वाटते.

विकास's picture

12 Dec 2013 - 8:58 am | विकास

आश्च्यर्याची बाब अशी की ज्या गोष्टीला निसर्गाचा काही आधार नाही अशा धर्म व जाती चे अस्तित्व मान्य करून कुणाला बहु विवाह करण्यास परवानगी, कुणास शस्त्र बाळगण्यास मुभा , हेलमेट सक्ती मधून कायदेशीर सूट अशी खिरापत वाटणार्‍या घटनाकाराना

एकदम आवडला...

अत्रुप्त आत्मा's picture

12 Dec 2013 - 2:46 pm | अत्रुप्त आत्मा

@आश्च्यर्याची बाब अशी की ज्या गोष्टीला निसर्गाचा काही आधार नाही अशा धर्म व जाती चे अस्तित्व मान्य करून कुणाला
बहु विवाह करण्यास परवानगी, कुणास शस्त्र बाळगण्यास मुभा , हेलमेट सक्ती मधून कायदेशीर सूट अशी खिरापत वाटणार्‍या घटनाकाराना , लेस्बियन, गे यांचे अस्तित्व या निसर्गात आहे याचा विसर पडला असावा. घटना समितीत वैद्यक व्यवसायाचा प्रतिनिधी बहुतेक नसावा असे वाटते>>> +++++++१११११११११११११

नॉन रेसिडेन्षियल मराठी's picture

12 Dec 2013 - 9:13 am | नॉन रेसिडेन्षिय...

वरील कलम हे बायबलातील काही मुल्ल्यांवर आधारित आहे मूळ कायदा ब्रिटीशानी केलेला आहे.व आपल्या इतिहासाचा अभ्यास न करता ते घटनाकारानी आंधळेपणाने दंडविधानात जसे च्या तसे स्वीकारले आहे. सबब संसदेने ते रद्द्द केल्याशिवाय या " विकृता" न्याय मिळणार नाही.

बरोबर आहे !

नॉन रेसिडेन्षियल मराठी's picture

12 Dec 2013 - 9:18 am | नॉन रेसिडेन्षिय...

वास्तविक पाह्ता आपले पुरान अनि इतिहास काय सान्गताय हे बघितले असते तर हा कायदा च मुळीच बनवला नसता.खजुराहो जावुन पहा म्हनावे आधि.

ऋषिकेश's picture

12 Dec 2013 - 9:46 am | ऋषिकेश

कोर्टाने बॉल संसदेच्या अधिकारकक्षेत ढकलला आहे. (हे मला दुटप्पी वाटलं - पण तो वेगळा मुद्दा आहे)

म्हणजे अर्थात पुन्हा चळवळीचा मार्गच उरतो आहे.

येत्या निवडणूकीत काँग्रेस व भाजपा यांपैकी जोपक्ष हा भारतीय नागरीकांवर अन्याय करणार्‍या कायद्यात बदल घडवण्याचे वचन देईल त्या पक्षाला मी येत्या निवडणूकीत मतदान करण्याचे जाहिर वचन देतो.

काँग्रेसपक्षा कडून आलेली स्वागतार्ह विधाने. रुलिंग पक्षाच्या पक्षाध्यक्षांनी, व सरकारमधील अर्थमंत्र्यांनी व कायदा मंत्र्यांनीही या निकालाशी असहमती दर्शवली आहे हे योग्यच झाले.

अर्थात अजूनही काँग्रेसनेही ३७७मध्ये बदल करायचे वचन दिलेले नाहिच्चे
भाजपा/मोदींकडून तर अपेक्षित व दुर्दैवी मौन! :(

इष्टुर फाकडा's picture

12 Dec 2013 - 7:25 pm | इष्टुर फाकडा

आलेका मोदींवर ??? गंगेत घोडं न्हालं म्हणायचं तुमचं :) असो, मुळात कायद्याचा कोर्टाच्या निर्णयाशी घंटा समंध नाहीये हे समजून घ्या. उच्च न्यायालयाला कायदा माहित न्हवता म्हणून त्यांनी आधीच निर्णय दिला असं म्हणायचं का काय? लोकसत्ताच्या संपादकीय मधला हा परिच्छेद वाचा-

"कोणी कोणत्या मार्गाने कसे आणि किती शारीर समाधान मिळवावे ही समाजाने ठरवण्याची बाब नाही. जोपर्यंत त्याच्या वा तिच्या समाधान मिळवण्यात कोणावर अत्याचार वा जोरजबरदस्ती नसेल तर अन्य कोणी त्यात लक्ष घालण्याचे काहीही कारणच नाही. उच्च न्यायालयाने दोन वर्षांपूर्वी हेच तत्त्व मान्य केले होते आणि समलिंगी संबंधांत गुन्हेगारी काहीही नाही असा स्वच्छ निर्वाळा दिला होता. सर्वोच्च न्यायालयाने इतिहासाचे चक्र पुन्हा उलटे फिरवले आणि अशा संबंधांवर बंदी घातली. उच्च न्यायालयास जे कळते ते सर्वोच्च न्यायालयाने ध्यानात घेऊ नये, हे दुर्दैव. आज जगात समलिंगी विवाह कायदेशीर ठरवले जात असताना आपल्या सर्वोच्च न्यायालयाने अशी मध्ययुगीन भूमिका घ्यावी हे अधिकच दु:खदायक. बदल करावा असे या ३७७ कलमात काही नाही आणि करायचा असल्यास तो संसदेने करावा असेही सर्वोच्च न्यायालयाने कालचा निकाल देताना नमूद केले आहे. हे आश्चर्यकारक म्हणावयास हवे.
कारण सर्वोच्च न्यायालयाने असे भाष्य करून या निर्णयाचा चेंडू संसदेकडे तटवला आहे. एरवी स्वत:ला हवे असेल त्यावर भाष्य करताना सर्वोच्च न्यायालय अनेक जुन्या कलमांचा स्वत: अर्थ लावते वा संसदेने तो अमुकच प्रकारे लावावा अशी अपेक्षा व्यक्त करते. याचा अर्थ असे करणे सर्वोच्च न्यायालयास वज्र्य आहे, असे नाही. मंत्र्यासंत्र्यांच्या वाहनांवर लाल दिवा असावा की नसावा आणि हा लाल दिवा लावण्याचा विशेषाधिकार कोणास असावा याबाबतचे नियमही ब्रिटिशकालीनच होते. मंगळवारी त्यावर निर्णय देताना हे नियम बदलले जावेत असा स्वच्छ आदेश सर्वोच्च न्यायालयाने संसदेस दिला. न्यायालयीन चौकट सोडून प्रशासकीय पातळीत हस्तक्षेप केला जात असल्याचा संशय यावा असे अनेक निर्णय सवर्ोेच्च न्यायालयाने अलीकडच्या काळात दिले आहेत. तेव्हा संसदेस याबाबत निर्देश देणे सर्वोच्च न्यायालयास मान्यच नाही, असे नाही.
अशा परिस्थितीत लैंगिकतेबाबतचा मागास कायदा बदला अशी नि:संदिग्ध भूमिका सर्वोच्च न्यायालयाने घेणे ही काळाची गरज होती. हे कर्तव्य सर्वोच्च न्यायालयाने पार न पाडल्यामुळे नकळतपणे सनातन्यांना बळ मिळते. याबाबतच्या कायद्यात बदलाची जबाबदारी लोकप्रतिनिधींवर सोडणे हे अपेक्षाभंगास निमंत्रण देणारे ठरेल. इतकी प्रागतिक अपेक्षा त्यांच्याकडून ठेवणे धाष्टर्य़ाचेच. समलिंगी भिन्नलिंगी हा भेदाभेद अमंगळ आहे. सर्वोच्च न्यायालयानेच तो केल्यामुळे तर ते अधिकच क्लेशदायक. आता यावर पुनर्विचार याचिका दाखल होईल तेव्हा तरी सर्वोच्च न्यायालयाने अधिक समंजस आणि प्रागतिक भूमिका घ्यावी."

उलट कोन्ग्रेस या मुद्याचं राजकारण करत आहे. एरवी भ्रष्टाचारासकट सर्व गोष्टींवर मुग गिळून बसणाऱ्या बाई या मुद्द्यावर अचानक कशा बोलल्या ?? त्या यासाठी बोलल्या कि तुमच्यासारखे लोक याच मुद्द्यावर मोदींकडून प्रतिक्रियेची अपेक्षा धरणार ! आणि त्यांना पर्यायाने मागास ठरवणार. मुळात न मोदी पंतप्रधान आहेत न जज ! उगा आपलं कुत्र्याचं शेपूट गाढवाला लावून काँग्रेस तुमचं माकड बनवणार आणि आम्ही मुल मुद्दे विसरून नाही त्या गोष्टीत गुंग.
लोकसत्तेच्या लेखाची हि लिंक :
http://www.loksatta.com/sampadkiya-news/gay-sex-illegal-says-supreme-cou...

चिगो's picture

12 Dec 2013 - 11:38 pm | चिगो

कोर्टाने बॉल संसदेच्या अधिकारकक्षेत ढकलला आहे. (हे मला दुटप्पी वाटलं - पण तो वेगळा मुद्दा आहे)

हेच.. "लाल दिव्याची गाडी" सारख्या क्षुल्लक विषयावर निर्णय देणारे सर्वोच्च न्यायालय "समलैंगिक संबंध" ह्यासारख्या महत्त्वाच्या विषयावर अशी कण्णी मारतेय, ह्याचं आश्चर्य वाटतंय. अचानक सर्वोच्च न्यायालयाला आपल्या मर्यादांची जाणीव वगैरे व्हायला लागलीय का काय? ;-)

अवांतर : आमच्या एका मित्राने सांगितलेला हा धासु वनलायनर.. After Supreme Court's verdict, feelings of Gay community, "Analyse the Penal Code, Don't penalise the Anal Code.." ;-)

सुबोध खरे's picture

12 Dec 2013 - 10:22 am | सुबोध खरे

प्रचलित वैद्यकीय ज्ञानाच्या आधारे असे म्हणता येईल कि समलिंगी असणे हे अनैसर्गिक नाही. ते अल्पसंख्यांक आहेत म्हणून त्यांना समाजबाह्य किंवा गुन्हेगार ठरवणे हे चूक आहे. मी पुरुष म्हणून जन्माला आलो त्यामुळे मला एखाद्या( किंवा कोणत्याही) स्त्री बद्दल आकर्षण वाटणे हे नैसर्गिक आहे हे आपण मान्य केलेले आहे. तसेच एखादा पुरुष म्हणून जन्माला आला परंतु त्याला इतर पुरुषांचे आकर्षण वाटते हा त्याचा दोष नाही.(तसेच स्त्रियांचे आहे) हा त्याच्या मेंदूचे वायरिंग तसे असल्याने होते.(केमिकल लोच्या सारखे). कदाचित यावर उद्या औषध निघू शकेल.आपण त्यांना समजावून घेणे हे आवश्यक आहे. कायदा केंव्हाच कालबाह्य झाला आहे. आणि तो बदलणे अत्यावश्यक आहेच. पण राजकीय स्वार्थ बर्याच समाज हितोपयोगी गोष्टींच्या आड येतो. (उदा. अंधश्रद्धा विरोधी विधेयक)
तोवर तरी त्या माणसाला गुन्हेगार नव्हे तर एक रुग्ण म्हणून वागवणे आवश्यक आहे. जर तुम्ही अपंगाना अंधांना त्यांचे अधिकार मिळवून देता(दिलेले आहेत) तर समलिंगी लोकांना त्यांचे अधिकार का मिळू नयेत.
हाच मुद्दा मुस्लिम स्त्रियांच्या बाबतीत लागू होतो.केवळ एका विशिष्ट धर्मात जन्म झाला म्हणून देशाचे अनेक कायदे त्यांना लागू होत नाहीत पण राजकीय औचित्य (political correctness) याबद्दल फारशी चर्चा होऊ देत नाही.
इतरांनी म्हटले आहे तसे कायदा करणे हे कोर्टाचे काम नाही त्यामुळे कोर्टाने आमच्यावर अन्याय केला म्हणून टाहो फोडणार्यांचे मला आश्चर्य वाटते. कदाचित कायद्याबद्दल अपुरे ज्ञान हे त्याचे कारण असेल. ( मला कायद्याचे ज्ञान आहे असा माझा दावा नाही).
न्यायालयीन कृतीवाद (judicial activism) म्हणून सर्वोच्च न्यायालयाला ते करता आले असते काय ? हा कायदेतज्ञांचा विषय आहे.

ऋषिकेश's picture

12 Dec 2013 - 10:41 am | ऋषिकेश

तोवर तरी त्या माणसाला गुन्हेगार नव्हे तर एक रुग्ण म्हणून वागवणे आवश्यक आहे

अत्यंत संतापजनक आणि खेदपूर्ण विधान
यु टु ब्रुटस? असो!

सुबोध खरे's picture

12 Dec 2013 - 10:46 am | सुबोध खरे

कदाचित रुग्ण म्हटल्यामुळे आपणास संताप आला असेल पण सध्या असिडीटी किंवा सर्दीचा रुग्ण असतो त्या तर्हेने मी म्हटले. आपण त्यांना मनोरुग्ण ठरवून मोकळे झालात असे दिसते.
असो, गैरसमजाबद्दल क्षमस्व

मनोरुग्ण नव्हे कोणत्याही तर्‍हेचा रुग्ण कसा काय?

काही हार्मोन्सच्या वेगळेपणामुळे निर्माण होणारी ती नैसर्गिक प्रकृती आहे. जर हे नैसर्गिक वेगळेपण ही विकृती/आजार मानायचे ठरवले तर टक्कल पडण्यापासून ते डावरे असण्यापर्यंत अनेक गोष्तींना आजार समजावा लागेल

बिपिन कार्यकर्ते's picture

12 Dec 2013 - 11:32 am | बिपिन कार्यकर्ते

पूर्णतः सहमत.

साती's picture

12 Dec 2013 - 3:55 pm | साती

समलैंगिकता ही हार्मोनल बदलांमुळे होणारी गोष्ट आहे याबद्दल कुठलाही ठोस पुरावा नाही.
सगळे स्पेक्युलेशन आहेत.

ऋषिकेश's picture

12 Dec 2013 - 4:08 pm | ऋषिकेश

ह्म्म.. हे खरे आहे. पण यात हार्मोनल घटकांचा मोठा सहभाग आहे असे अनेक तज्ञांचे मत असल्याचे वाचनात येते.

किमान, ज्या गोष्टी एखाद्या व्यक्तीला "हेट्रोसेक्स्युअल" करतात (खरेतर ज्यामुळे एखादी व्यक्ती हेट्रोसेक्स्युअल असते) त्याच घटकांचे वेगळेपण दुसर्‍याला होमोसेक्श्युअल करतात (त्याच मुळे दुसरी व्यक्ती होमोसेक्स्युअल असते) इतपत विधान ग्राह्य आहे का?

साती's picture

12 Dec 2013 - 6:44 pm | साती

नाही.

कदाचित रुग्ण म्हटल्यामुळे आपणास संताप आला असेल पण सध्या असिडीटी किंवा सर्दीचा रुग्ण असतो त्या तर्हेने मी म्हटले.

कदाचित रुग्ण म्हटल्यामुळे आपणास संताप आला असेल पण सध्या असिडीटी किंवा सर्दीचा रुग्ण असतो त्या तर्हेने मी म्हटले.
या लेखावरील आपले मत वाचावयास आवडेल
The American Psychological Association, American Psychiatric Association, and National Association of Social Workers stated in 2006:
“ Currently, there is no scientific consensus about the specific factors that cause an individual to become heterosexual, homosexual, or bisexual—including possible biological, psychological, or social effects of the parents' sexual orientation. However, the available evidence indicates that the vast majority of lesbian and gay adults were raised by heterosexual parents and the vast majority of children raised by lesbian and gay parents eventually grow up to be heterosexual. ”

The Royal College of Psychiatrists stated in 2007:
“ Despite almost a century of psychoanalytic and psychological speculation, there is no substantive evidence to support the suggestion that the nature of parenting or early childhood experiences play any role in the formation of a person's fundamental heterosexual or homosexual orientation. It would appear that sexual orientation is biological in nature, determined by a complex interplay of genetic factors and the early uterine environment. Sexual orientation is therefore not a choice. ”

The American Academy of Pediatrics stated in Pediatrics in 2004:
“ Sexual orientation probably is not determined by any one factor but by a combination of genetic, hormonal, and environmental influences. In recent decades, biologically based theories have been favored by experts. Although there continues to be controversy and uncertainty as to the genesis of the variety of human sexual orientations, there is no scientific evidence that abnormal parenting, sexual abuse, or other adverse life events influence sexual orientation. Current knowledge suggests that sexual orientation is usually established during early childhood. ”

सुबोध खरे's picture

12 Dec 2013 - 7:30 pm | सुबोध खरे

मी मूळ काय लिहिले आहे ते लक्षात न घेता काही लोकांनी गहजब केला. म्हणून ते परत उधृत करीत आहे "तसेच एखादा पुरुष म्हणून जन्माला आला परंतु त्याला इतर पुरुषांचे आकर्षण वाटते हा त्याचा दोष नाही.(तसेच स्त्रियांचे आहे) हा त्याच्या मेंदूचे वायरिंग तसे असल्याने होते.(केमिकल लोच्या सारखे). कदाचित यावर उद्या औषध निघू शकेल.आपण त्यांना समजावून घेणे हे आवश्यक आहे. कायदा केंव्हाच कालबाह्य झाला आहे. आणि तो बदलणे अत्यावश्यक आहेच."
उद्या जर मेंदूचे वायरिंग सुधारण्याचे औषध निघाले तर त्या व्यक्तीला रुग्ण मानण्याची तयारी असेल काय? टक्कल पडणे यावरही काही औषधे आहेत आणी ती देणाऱ्या डॉक्टरकडे येणाऱ्या माणसाला आपण रुग्ण नाही तर काय म्हणणार.
डावरे पण यात मेंदूमध्ये कोणतीच विकृती नाही. तेंव्हा टक्कल आणी डावरे पण यात गल्लत नको.
मनोविकार तज्ञांनी असे म्हटले आहे कि आज उपलब्ध असलेल्या निदानाच्या पद्धतीप्रमाणे अजूनतरी कोणतीही विकृती समलिंगी व्यक्तीमध्ये सापडलेली नाही. म्हणजे पुढे सापडणार नाही असे नव्हे(सापडेल असेही नाही).
समलिंगी व्यक्तीना आपल्या आवडत्या व्यक्ती बरोबर राहण्याचा अधिकार मिळावा असेच मी म्हणतो. पण केवळ रुग्ण म्हटल्यामुळे काही लोकांना राग आला आणी ते अनैसर्गिक पासून कंडोम वापरणे अनैसर्गिक पर्यंत घसरले.
नाकाने पाणी पिणे हेही अनैसर्गीकच आहे म्हणून त्याचा इलाज करायला पाहिजे हे चुकीचे आहे.

रामपुरी's picture

13 Dec 2013 - 2:44 am | रामपुरी

डॉ. शी नेहेमीप्रमाणे सहमत. यावर जास्त संशोधन होणे गरजेचे आहे आणि डॉ म्हणतात तशी विकॄती सापडलीच तर त्यावर औषध सुद्धा.
समलैंगिकांपैकी बरेच जण हे लहान वयात अशा प्रवॄत्तीना बळी पडल्याने किंवा एक फॅड म्हणून किंवा अशाच काही कारणानी समलैंगिक "बनतात" असा एक मुद्दा वाचनात आल्याचे स्मरते. कोठे केंव्हा ते काही केल्या आठवत नाहीये.

खटासि खट's picture

12 Dec 2013 - 10:50 am | खटासि खट

या विषयावर काही ठिकाणच्या चर्चा वाचनात आल्या होत्या याआधीही. एखादी व्यक्ती डावखुरी असते म्हणजे ती रुग्ण असते का ? ती विविधता आहे तसंच समलैंगिकतेबाबत आहे. अमेरिकन तसंच ब्रिटीश मानसोपचार तज्ञांच्या सोसायटीने याबद्दल जाहीर केलेल्या लेखांच्या लिंक्स लगेचच हातासरशी देता येत नसल्याने अधिक भाष्य करत नाही.

सुबोध खरे's picture

12 Dec 2013 - 11:02 am | सुबोध खरे

साहेब असंगत आचरण(DEVIATION) आणी विविधता(VARIATION) यात गल्लत होत आहे.
माणूस डावरा असतो ते त्याचा उजवा मेंदू जास्त सशक्त असतो म्हणून तसेच दोन्ही मेंदू समान असणारे त्यामुळे दोन्ही हात सारख्याच क्षमतेने वापरणारे सुद्धा आहेत(AMBIDEXTROUS) यात अनैसर्गिक काय आहे?
भिन्नलिंगी संभोगातून संतती निर्माण व्हावी हा निसर्गाचा संकेत आहे. समलिंगी संभोगातून काय निष्पन्न होणार?

खटासि खट's picture

12 Dec 2013 - 11:09 am | खटासि खट

संतती होणं हाच निकष असेल तर ज्या भिन्नलिंगी जोडप्यांना संतती होत नाही त्यांना वाळीत टाकणार का ? संतती होण्यासाठीच विवाह केले पाहीजेत का ? निव्वळ आनंदासाठॉ दोन व्यक्तींनी एकत्र राहील्यास त्यांना गुन्हेगार ठरवणार का ?

खटासि खट's picture

12 Dec 2013 - 11:15 am | खटासि खट

माफ करा मी विविधता हा शब्द मराठी प्रतिशब्द म्हणून वापरला. मला Natural Diversity म्हणायचं होतं (मराठी शब्द = वैविध्य हाच आहे कि नाही माहीत नाही).

सुबोध खरे's picture

12 Dec 2013 - 1:57 pm | सुबोध खरे

संतती होणे हा निकष नाही. आणि आनंदासाठी दोन व्यक्ती एकत्र आल्या तर तो गुन्हा नक्कीच नाही. पण जोवर हकायदा बदलत नाही तोवर समाजाने त्यांना सन्मानजनक वागणूक देणे हे आवश्यक आणि अपेक्षित आहे. समलिंगी संभोग हे वैविध्य नसुन केंद्रापासून मार्ग विचलन(deviation) आहे. शंभर टक्के लोक एकच परिमाणात येणार नाहीत हि वस्तुस्थिती आहे.
वंश सातत्य हे निसर्गाच्या मुलभूत प्रेरणेतील एक आहे. समलिंगी संभोग हे त्यात बसत नाही एवढेच मला म्हणायचे होते पण कदाचित माझ्या मुलभूत समज शक्तीत काहीतरी घोटाळा असावा( बेसिक मध्ये लोच्या).
असो

ऋषिकेश's picture

12 Dec 2013 - 11:17 am | ऋषिकेश

भिन्नलिंगी संभोगातून संतती निर्माण व्हावी हा निसर्गाचा संकेत आहे. समलिंगी संभोगातून काय निष्पन्न होणार?

संततीप्राप्ती हा भिन्नलिंगी संबंधातील संभाव्य परिणाम आहे, शारीरीक संबंधांमागचा उद्देश नव्हे!

बाकी कंडोम वापरून संबंध ठेवणे हे इतर कोणत्याही संबंधांपेक्षा अनैसर्गिक आहे. मग ते वापरून सम/भिन्नलिंगी व्यक्तींनी संभोग करणे हा गुन्हा आहे असेही म्हणावे का?

संततीप्राप्ती हाच भिन्नलिंगी संबंधाचा उद्देश आहे.संभाव्य परिणाम नाही. निसर्गात प्राणी आपल्या आनंदासाठी नव्हे तर संततीसाठीच संबंध ठेवतात आणि त्यासाठी कित्येक नरांमध्ये युद्ध होते. काही जातीच्या कोळ्या मध्ये मादी नराला खाउन टाकते. काही जातीत नर मृत्यू पावतो. असे असूनही नर संबंध साठी उद्युक्त होतो. मांजर चित्ता या प्राण्यांमध्ये मादीसाठी संबंध हा अतिशय दुखःदायक असतो त्यामुळे त्यांचे प्रणयाराधन हे अतिशय वादळी असते हे सर्व वंश सातत्य टिकण्यासाठी निसर्गाने निर्माण केले आहे.
माणूस हा एक प्राणीच आहे आणि मानवाने अंतः प्रेरणेवर(instinct) अजून पूर्ण विजय मिळवलेला नाही. तरीही नको असलेल्या संततीला जन्म देऊ नये यासठी संतती नियमन वापरणे हे पूर्ण निसर्गाच्या विरुद्ध नाही कारण वासना हि निसर्गाने निर्माण केली आहे. तिचे शमन व्हावे पण नको असलेली संतती जन्माला घालणे नको यासाठी ती साधने वापरणे अनैसर्गिक कसे?
कंडोम वापरणे (सम किंवा भिन्न लिंगी व्यक्तीने) हा गुन्हा कसा? संतती नको म्हणून कंडोमचा शोध लावला गेला समलिंगी संबंधासाठी नाही.
गुदद्वाराची त्वचा हि शारीरिक संबंधासाठी बनलेली नाही. ती त्वचा तोंडातील त्वचे इतकीच( एकाच थराची) नाजूक असते. परंतु योनीची त्वचा निसर्गाने संबंधासाठीच बनविली असल्याने ती बहु थराची आणि जाड असते.शिवाय उद्दिपनाने त्यात वंगण( lubrication) तयार होते. असे कोणतेही वंगण आपल्या गुदद्वारात नसते किंवा तयार होत नाही. समलिंगी संबंधाने आपले गुदद्वार सैल पडून शौचावरील ताबा जातो. अस कोणताही परिणाम योनीत होत नाही. अर्भकाचा जन्म होण्यासाठी योनी दहा सेमी पर्यंत ताणली जाउ शकते. हेसार्व आम्हाला आमच्या एम बी बी एस च्या पहिल्या वर्षाच्या पहिल्या अर्धा वर्षात बेसिक म्हणून शिकवले जाते.
आता आमच्या बेसिक मध्ये लोच्या आहे असे आपल्याला वाटत असेल तर बोलणे थांबवू या.
मी पण परत शाळेत जाऊन पाहतो( back to school) कि नव्या जमान्याचे ज्ञान काही बदलले आहे काय?
असो आपले मत आपल्यापाशी.
“Discussion is an exchange of knowledge; argument is an exchange of ignorance”

संततीप्राप्ती हाच भिन्नलिंगी संबंधाचा उद्देश आहे.संभाव्य परिणाम नाही.

=))

असो. बाकी प्राणी आणि माणसे हे एकमेकांपेक्षा वेगळे आहेत का ते आधी नक्की करा मग आपण परिणाम काय नी उद्देश काय ते ठरवु. कंडोम वापरताना म्हणता प्राणी व माणूस यांना लावायचे नियम वेगळे असावेत. मात्र पहिल्या परिच्छेदात शारिरिक संबंध ठेवतानाचे नियम सांगताना म्हणताय प्राण्याच्या अंतःप्रेरणेचे नियम माणसांनाही लावावेत! म्हणून म्हटलं बेसिकमध्ये लोचा आहे. (बेसिक म्हणजे पुस्तकी माहितीत नव्हे बेसिक मतांत)

गुदद्वाराची त्वचा हि शारीरिक संबंधासाठी बनलेली नाही. ती त्वचा तोंडातील त्वचे इतकीच( एकाच थराची) नाजूक असते. .............. हेसार्व आम्हाला आमच्या एम बी बी एस च्या पहिल्या वर्षाच्या पहिल्या अर्धा वर्षात बेसिक म्हणून शिकवले जाते

माणसाचे आतडे/दात वगैरे शाकाहारी अन्नासाठी बनल्यासारखे दिसते पण माणसाला मेंदू नावाचा अवयवही (सामान्यत: प्रत्येकाला) दिला असल्याने माणूस मांसाहारही मांसावर प्रक्रिया करून खातो- पचवू शकतो. कोणताही प्राणी अन्य प्राण्यांचे दूध पिऊन वाढत नाही माणूस वाढतो. इतरही अनेक उदाहरणे थोडक्यात काय माणसाला प्रत्येक गोष्ट निसर्गाने पुरवली नाहोये कारण त्याला "तल्लख मेंदु" दिला आहे. आता त्याचा वापर न करता केवळ निसर्गदत्त गोष्टीच वापरायच्या ठरवल्या तर अजूनही माणूस जंगलातच असता किंबहुना कदाचित जगूच शकला नसता.

असो. माणसाशी संबंधीत असे मुद्दे स्पष्ट मांडलेत तर प्रतिवाद करता येईल अन्यथा "आर्ग्युमेंट" शिवाय हाती काही लागणार नाही यावर सहमत.

समांतर:
मुखमैथून, गुदमैथुन, हस्तमैथुन अनैसर्गिक आहे हे तुमचे मत फक्त समलिंगी व्यक्तींपुरतेच आहे का भिन्नलिंगींनाही लागु आहे?

शैलेन्द्र's picture

12 Dec 2013 - 5:55 pm | शैलेन्द्र

संततीप्राप्ती हाच भिन्नलिंगी संबंधाचा उद्देश आहे.संभाव्य परिणाम नाही.

Lol

यांत हसण्यासारखं काय होतं ते खरचं समजल नाही.

बाकी समलींगी आकर्षण हे जणुकीय(अनुवांशिक नव्हे) आहे का, आणि असेल तर त्याचा उद्देश काय? ज्यांनी सेल्फिश जीनबद्दल वाचलय त्यांना असे प्रश्न नक्कीच पडतात. पुनरुत्पादन हे नुसत्या संभोगाचेच नाही तर संपूर्ण सजीव आयुष्याचे कारक आहे, मग समलैंगीकतेची प्रेरणा हा नैसर्गीक दोष मानायचा का? असे बरेच प्रश्न विज्ञानाला पडतात, व त्याची उत्तरे अजुन मिळायचीत..

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

12 Dec 2013 - 8:52 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

Evolutionary psychology या विषयावर संशोधन करणाऱ्या एका प्राध्यापकाचं व्याख्यान ऐकलं. (तुम्हीही इथे पाहू-ऐकू शकता.) त्यात त्यांचं म्हणणं असं की समलैंगिकतेचं एकच एक असं, उत्क्रांतीजनक कारण नाही. तसं असतं तर ते आत्तापर्यंत सापडलं असतं. पण त्यासाठी दोन-चार कारणं असावीत आणि प्रत्यके कारणाचं २०-३०% महत्त्वं असावं. त्यातलं एक कारण मला आठवतंय ते म्हणजे समलैंगिक लोकांची स्वतःची मुलं असू शकत नाहीत. (आता तंत्रज्ञान आलेलं आहे, पण हा उत्क्रांतीशी संबंधित प्रश्न आहे.) समलैंगिक आपल्या भावंडांच्या मुलांचं रक्षण, त्यांचं भरण-पोषण यात महत्त्वाची भूमिका बजावतात. भावंडांची मुलं आणि व्यक्तीची गुणसूत्रं २५% समान असतात. गुणसूत्रांचं सातत्य राखण्याचं हे कारण.

समलैंगिक पुरुषांवर जनानखाना सांभाळण्याची जबाबदारी देता येते हे आणखी एक कारण.

मुखमैथून, गुदमैथुन, हस्तमैथुन अनैसर्गिक आहे.मग ते समलिंगी असो कि भिन्न लिंगी त्यात शंका नाही. नाकाने पाणी पिणे हेसुद्धा अनैसर्गिक आहे म्हणून तो गुन्हा ठरत नाही तसेच गुदमैथुन, मुख मैथुन हा गुन्हा असू नये. दुर्दैवाने ३ ७ ७ कलम जेंव्हा पास केले तेंव्हा त्या वेळेच्या समजुतीप्रमाणे समलिंगी संबंधाला गुन्हा ठरविले गेले आहे. (हस्त मैथुन मध्ये दोन व्यक्ती येत नसल्यामुळे त्याला वेगळे परिमाण लावावे लागेल. शिवाय त्या कायद्याप्रमाणे PENETRATION होत नसल्यामुळे तो या कायद्याच्या अखत्यारीत येत नाही. हस्त मैथुन हे अनावर भावनांना वाट करून देण्याचा एक रस्ता आहे ).
आपणाला अनैसर्गिक म्हटल्यामुळे एवढा राग का येतो ते समजत नाही. (बायकोने नवर्याला मारणे हे सुद्धा अनैसर्गिक आहे पण कित्येक मूक नवरे मार खाऊन गप्प बसतातच कि )
प्रत्येक कायदा हा बरोबर असतोच असे नाही.
याचे एक उदाहरण म्हणजे स्त्री भ्रूण हत्या विरोधी कायदा--यात जो रेडियोलोजीस्ट किंवा स्त्रीरोग तज्ञ गर्भलिंग चिकित्सा करतो आणी/किंवा गर्भपात करतो तो दोषी आहेच यात वाद नाही पण जे जोडपे स्त्री गर्भहत्या करते त्याच्या विरुद्ध कोणताही गुन्हा होत नाही. मनुष्यवधाचा कायदा -- खून करणारा गुन्हेगार आहेच पण सुपारी देणारा हासुद्धा तितकाच गुन्हेगार असतो. पण स्त्री भ्रूण हत्या कायदा त्याबद्दल काहीच म्हणत नाही.
असो

राजेश घासकडवी's picture

13 Dec 2013 - 4:52 am | राजेश घासकडवी

मुखमैथून, गुदमैथुन, हस्तमैथुन अनैसर्गिक आहे.

अहो, जरा जपून विधानं करा हो.
हस्तमैथुन - घोडे, कुत्रे, हरणं आणि माकडंदेखील करतात. मनुष्यजातीतला जवळपास प्रत्येकजण जे सहजगत्या आपलंआपण कोणी न शिकवता शिकतो त्याला अनैसर्गिक कसं म्हणता? उद्या तुम्ही चुंबन घेणंही अनैसर्गिक म्हणाल.
मुखमैथुन - हेदेखील वेगवेगळ्या प्राण्यांत आढळून आलेलं आहे.
गुदमैथुन - हे तर कित्येक प्राण्यांमध्ये दिसून आलेलं आहे.

आता तुम्ही जर अनैसर्गिक या शब्दाची व्याख्याच तुमच्या मनासारखी केली असेल तर ती स्पष्ट तरी करा, म्हणजे चर्चा करण्याची गरज पडणार नाही.

सुबोध खरे's picture

13 Dec 2013 - 9:44 am | सुबोध खरे

केवळ प्राण्यांमध्ये दिसली म्हणून तिला नैसर्गिक मानणे हे बरोबर नाही. मिझोरम मध्ये एका जातीचे पक्षी एका विविक्षित दिवशी शेकडोंच्या संख्येने आत्महत्या करताना आढळून आले. ते नैसर्गिक असेल का?
सापांमध्ये दुसर्या नराबरोबर संबंध ठेवणाऱ्या मादीला नर एखादे वेळी खाउन टाकतो. मार्जार कुळातील नर आपल्याच जातीच्या( पण आपल्या नसलेल्या) अर्भकांना मारून टाकतो म्हणजे मादी परत माजावर येउन त्याच्याशी संपर्क करते.
अशी उदाहरणे मानवात आपण स्वीकार कराल काय?
मी समलिंगी संभोग अनैसर्गिक का आहेत ते कारणासहित स्पष्ट केले आहे. अनैसर्गिक म्हणजे बेकायदेशीर असे नव्हे. नाकाने पाणी पिणे हे सुद्धा अनैसर्गिक आहे म्हणून ते बेकायदेशीर धरून त्या व्यक्तीचे नाक कापाल काय? तसेच समलिंगी संबंध हे अनैसर्गिक आहेत म्हणून ते बेकायदेशीर ठरवून त्यांना शिक्षा करावी हे चुकीचे आहे इतकेच मी म्हटले होते. त्यावर काही विद्वान लोकांनी गदारोळ केला होता.
चुंबनाचे मूळ उद्दिष्ट काय हे आपण मला सांगाल काय? त्याचा आणि अनैसर्गिक संबंधाचा काय संबंध?
असो

अनुप ढेरे's picture

12 Dec 2013 - 6:23 pm | अनुप ढेरे

अवांतर : संतती नियमन हे काही धर्मांच्या नियमात बसत नाही असं ऐकलं होतं. त्यांच्यासाठी तरी लैंगिक संबंध हे प्रजननासाठीच असतात.

खटासि खट's picture

12 Dec 2013 - 11:27 am | खटासि खट

http://www.amazon.com/Biological-Exuberance-Homosexuality-Diversity-Ston...

नैसर्गिक कशाला आणि अनैसर्गिक कशाला म्हणायचं ?
तुम्हाला जे अनिसर्गिक वाटतंय तेच निसर्गतः असल्याने काहींचा नाईलाज आहे. उद्या अशा लोकांचं बहुमत झाल्यास कायदे काय असतील किंवा असावेत असं वाटतं ?

कपिलमुनी's picture

12 Dec 2013 - 3:02 pm | कपिलमुनी

>> तोवर तरी त्या माणसाला गुन्हेगार नव्हे तर एक रुग्ण म्हणून वागवणे आवश्यक आहे.

त्याच्या अगोदर त्यांनी कयद्या बद्दल भाष्य केले आहे .. जर कायदा बदलला तर गुन्हेगार ठरवायची वेळ येणार नाही ..

चौकटराजा's picture

12 Dec 2013 - 4:01 pm | चौकटराजा

माझ्या वाचना प्रमाणे असे लैंगिकतेचे वायरिंग मेंदूत असते पण ते परिस्थितीनुसार बदलतेही ! याच विषयावर शबाना आजमी असलेला " फायर" हा सिनेमा आहे. मी जर ड्रग्ज प्रमाणे समजा या रोगाच्या आहारी गेलो असेल व उठ सूट समाजातील
पुरूषाना " गळाला" लावायचा प्रयत्न करायला लागलो. तर यात कायदा व वैद्यक यांचा प्रवेश होतो. एरवी समतोल आहार
न घेणार्‍याला देखील रुग्ण ठरवावे लागेल व जास्त झोपणार्‍याला देखील म्हणूनच hurting to other soul चा मुद्दा मांडला आहे.

काही लोक बायसेक्शुअल असतात ते या वायरिंगच्या बदलामुळे का?

man v/s wild हा कार्यक्रम आपण पहात असाल तर त्यातला श्री बेअर हा आळ्या सुद्धा खातो. मांसाहारी लोकाना देखील
किळस येईल असे ते दिसते. तरीही मी पूर्ण शाकाहारी असूनही बेअरला अनकॉमन मानतो अननॅचरल नाही. या दुनियेत अनैसर्गिक काहीही नाही अगदी असेलच तर ..... तर ती मानवी संस्कृति आहे.

खटासि खट's picture

12 Dec 2013 - 10:41 am | खटासि खट

सुप्रीम कोर्टाचं निकालपत्र कुणी वाचलंय का ?
जितकी माहीती आतापर्यंत मिळाली त्यावरून दिल्ली उच्च न्यायालयाच्या निकालपत्रातील दोन परीच्छेदाचा विषय सर्वोच्च न्यायालयापुढे होता. अशा वेळी ज्या भागावर निकाल दिला गेला आहे त्यावरच विचार होतो कि कोर्टापुढे नव्याने पुरावे सादर करणं शक्य असतं याबद्दल कायद्याचे पदवीधर सांगतील. खूप खोलात न जाता सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली न्यायालयाने पुरेसा विदा न जमवताच निर्णय दिल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे असं आतापर्यंतच्या चर्चा ऐकताना कळालं. नैसर्गिक कि अनैसर्गिक याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने टिप्पणी केली आहे का ? माझ्या माहीतीप्रमाणे त्यांनी फक्त कायद्याचा विचार केला आहे. संसदेत जो काही जुना पुराणा कायदा आहे त्यात बदल करण्याची निकड संसदेला भासली नाही म्हणजेच जुन्या कायद्याला संसदेची मान्यता आहे असं कोर्टाने भाष्य केल्याचं समजतं. कायदा जेव्हां केला गेला तेव्हां समलैंगिकांबद्दल जी भावना होती त्याप्रमाणे तो केला गेला. त्यानंतर वेळोवेळी आलेल्या संसद सदस्यांना समलैंगिकांसाठी काही कायदा अस्तित्वात आहे याचीही जाणीव नसेल, तसंच कुणी आम्ही समलैंगिक असल्याने आमच्या हक्कांचं काय असं विचारलंच नसल्याने तो प्रश्न कधीही ऐरणीवर आलेला नसणार.

गेल्या काही वर्षात पाश्चात्य देशातून समलैंगिकता ही विकृती नसून नैसर्गिक विविधता आहे असं मानसोपचार तज्ञांना आढळून आलेलं आहे. त्या व्यक्तीचा कल समलिंगक संबंधांकडे असणे ही नैसर्गिक प्रवृत्ती आहे, याला ती व्यक्ती बिल्कुल जबाबदार नाही, तसंच ती व्यक्ती कुठल्याही प्रकारे मानसिकदृष्ट्या आजारी नाही हे सिद्ध झाल्याने समलैंगिक व्यक्तींना माणूस म्हणून जगू द्यावं असा विचार पुढे आला. भारतात तोपर्यंत अर्थातच कसल्याच हालचाली, जागृती नव्हती.
काही व्यक्ती आण संस्था यांनी हा प्रश्न सतत लावून धरल्याने आम्ही समलैंगिक आहोत हे सांगणा-या व्यक्ती पुढे आल्या. तोपर्यंत तेबेकायदेशीर कृत्य असल्याने कुणी पुढेच येत नव्हतं. पोलिसांनी अशा लोकांचा अनन्वित छळ केल्याचे रिपोर्ट्स काही संस्थांनी प्रसिद्ध केले आहेत.

उच्च न्यायायल्याच्या निकालाच्या ज्या भागावर सर्वोच्च न्यायायलाने टिप्पणी केली आहे त्यापुरताच हा मामला मर्यादीत असल्याने ही सर्व माहीती नव्याने वरच्या न्यायालयात ठेवता येत नाही असं ऐकून आहे. उच्च न्यायालयाने मात्र समलैंगिकतेबाबतचा कायदा घटनेच्या इतर दोन कलमांना छेद देत असल्याने तो रद्द ठरत असल्याची भावना बोलून दाखवली होती. मेडीया लगेचच कोर्टाने नवा कायदा केला अशा स्वरूपाच्या बातम्या देत असल्याने ज्युडीशिअल अ‍ॅक्टीव्हिझम बाबत चर्चा सुरू होतात. असे विषय किमान माहीती न घेता प्रतिक्रिया दिल्या गेल्याने गैसरसमजात भर पडत जाते.

आता इतकं झाल्यानंतर हा विषय ज्युडीशिअरीकडे नेण्याचे सगळे मार्ग बंद झाले आहेत. यावर फक्त संसदेत नव्याने चर्चा होऊन कायदा होईल अशी आशा करायला हरकत नाही. बहुसंख्यांकाकडून झुंडशाहीने कायदे बनल्यास राज्यसभेवर विचारी सदस्य असावेत या दृष्टीने तिचं अस्तित्त्व होतं. त्याला गेल्या काही वर्षात हरताळ फासण्यात आलेला असला तरी राज्यसभेकडून अनेकदा बरेच कायदे पुन्हा पाठवण्यात आले आहेत. तसंच राष्ट्रपतींना कायदा संसदेकडे परत पाठवण्याचा अधिकार देशाचा प्रथम नागरीक म्हणून आहेच. तसंच सर्वोच्च न्यायायलयाचं मत मागवलं जात असल्याने आणि नुकतंच इतकं मंथन झालेलं असल्याने न्यायपालिकेकडून योग्य ते मत दिलं जाईल याची आशा वाटते. या संदर्भात काम करणा-या व्यक्ती, संस्था संसदेत कायदा बनताना आपल्याकडची माहीती आणि भूमिका संसदेपुढे ठेवतीलच.

या पार्श्वभूमीवर न्याय देणारा कायदा बनण्यास अडचण नसावी असं मानण्यास खूप जागा आहे. तस्मात कोर्टाने काहीतरी नव्याने कायदा बनवला आहे असं समजून भुई धोपटण्याचं कारण नाही. तसंच प्रायव्हेट मधे तुम्ही काय करता याची घरोघरी जाऊन चौकशी होईल असंही समजण्याचं कारण नाही. जगण्याचा अधिकार हिरावून घेतला वगैरे गळे काढण्यालाही अर्थ नाही. खुले आम अशा व्यक्तिंना एकत्र राहण्यात कायद्याने अडचण होईल इतकंच. पण जर विपरीत कायदा बनलाच तर मात्र दुर्दैव समजून पुन्हा सर्वोच्च न्यायालयात त्या कायद्याला आव्हान देणं इतकंच हाती राहतं.

माझ्या माहितीप्रमाणे व अजुन तरी असे नमुने बाळ जन्माला घालु शकत नाही मग जर निसर्गाने जर मनुष्य प्राण्याला भिन्नलिंगी प्रजननक्षम बनवले असेल तर हा प्रकार थोडा मानसिक विकृतीत मोडत नाही का ? मग भले त्याला गुन्हेगार नका म्हणु पण अश्या नमुन्यांना उपचाराची नक्की आवश्यकता असते.

निसर्गाने प्रजननक्षम बनवून देखील ब्रम्हचारी व्यक्ती प्रजनन करत नाहीत. हे अनैसर्गिक वाटत नाही का?

ब्रम्हचर्य ही देखील मानसिक विकृती म्हणावी का? त्यांच्यावर उपचार करावेत का?

ऋषिकेश's picture

12 Dec 2013 - 11:29 am | ऋषिकेश

हा हा.. याच नियमाने कंडोम वापरणार्‍यांना, गर्भनिरोधक गोळ्या घेणार्‍यांनाही मानसिक उपायांचे कोर्सेस लावावे लागतील ;)

खटासि खट's picture

12 Dec 2013 - 11:30 am | खटासि खट

तंत्रज्ञान विकसित होत असल्यानं अशा लोकांना बाळ जन्माला घालणेही अशक्य नाही. पण मुळात विषयच तो नाही. लैंगिक वैविध्य हे निसर्गानेच घडवून आणलेलं असल्याने "वेगळं" ठरणा-या व्यक्तींना आपण केवळ बहुसंख्यांक असल्याने अस्पृश्य ठरवणार का, हा प्रश्न आहे.

ब्रम्हचर्य ही देखील मानसिक विकृती आहे असे नाही. कुत्र्यांच्या कळपात फक्त पुढारी नर आणि मादी प्रजोत्पादन करतात इतर नर आणि माद्या नाही.निसर्गात जो नर सशक्त नाही त्याला मादी मिळत नाही. पण हे सुप्रजानना साठी कदाचित आवश्यक असावे.सक्तीचे ब्रम्हचर्य वा खुशीचे अनैसर्गिक नाही.

माझ्या मागच्या आठ दहा वर्षाच्या वैद्यकिय व्यवसायात एकच गोष्ठ लक्षात आली की ही जी जमात आहे त्यांना उपचाराची नितांत आवश्यकता आहे फक्त शाररिक नाही तर मानसिक देखिल कारण यांच्या मेंदुत प्रचंड मोठा केमिकल लोच्या झालेला असतो. जन्मतः तृतियपंथी असन वेगळ आणी नंतर नको ते इंटरेस्ट डेव्हलप होन वेगळ.या नंतरच्या प्राण्यांना उपचाराची खरच आवश्यकता असते.

साती's picture

12 Dec 2013 - 6:59 pm | साती

बाबा पाटील, सहमत.
मारवा विकीपिडियावरच्या लिंक्स हा पुरावा ग्राह्य धरण्याजोगा नाही.
अशीच एक चर्चा मागे दुसर्‍या संस्थळावर झाली होती आणि तिथे मी वर खरे डॉ यांनी मांडलेली मते मांडली होती.

असो, मी मात्र आत्तापर्यंत जितके होमो पाहिलेत ते सगळे परिस्थितीवश , कुतुहुल म्हणून , गंमत म्हणून झालेले होते .
अजून होमो स्त्री मी प्रत्यक्ष पाहिली नाही.

परिंदा's picture

12 Dec 2013 - 7:16 pm | परिंदा

.या नंतरच्या प्राण्यांना उपचाराची खरच आवश्यकता असते.

मग यावर वैद्यकिय/मानसिक उप्चार आहेत का? कोणी तसे उपचार घेतले आहेत का? बरा झाल्याची उदाहरणे आहेत का?

साती's picture

12 Dec 2013 - 8:15 pm | साती

माझ्या पाहण्यात कित्येक पुरुष अश्याप्रकारे काऊंसेलिंगनंतर किंवा कालपरत्वेही होमो किंवा बायसेक्श्युअल ओरिएंटेशन कडून हेटेरोसेक्श्युअल झालेले आहेत.
मात्रं समलैंगिकता समर्थकांचा यावर असा आक्षेप असतो की आपण वेडे किंवा वेगळे ठरू नये म्हणून बरेच होमो मन मारून हेटेरो रिलेशन्स स्विकारतात.
माझे जरी प्रॅक्टिसमध्ये असे निरीक्षण नसले तरी या विरूद्ध पुरावा द्यावा असा पुरेसा डाटा मजकडे नाही.
(माझी मुख्य प्रॅक्टिस एंडॉक्रिनॉलॉजीची आहे)

आपल या विषयी काही ही म्हणण नाही ...म्हणाल तर अश्या बाबतीत सहसा आम्ही नितीन थत्ते मोड मध्ये असतो ...पण आज ची ही चर्चा वाचुन .....

लोक मान्यतेसाठी किंवा अमान्यतेसाठी कोर्टाकडे का जात आहेत हा प्रश्न मला पडला ...समाजाने त्यांच्याकडे आदराने पहावे म्हणुन असेल ..तर जबरदस्तीने वा कोर्टाच्या आदेशाने पब्लीक कधीपासुन आदर करायला लागले ब्वा ?

फक्त स्विकार करावा, कायद्याने त्रास देऊ नये इतकाच उद्देश आहे. कायदा झाला म्हणजे शनिवारवाड्यावर भव्य सत्कार समारंभ ठेवावा किंवा अभिनंदनाचे फ्लेक्स लावावेत असं कुणी म्हटलेलं नाही.

सुहास..'s picture

12 Dec 2013 - 11:45 am | सुहास..

फक्त स्विकार करावा, >>>
कोणी ? कायद्याने की समाजाने ...समाजाने म्हणाल तर यातील फक्त म्हणताना जेव्हढे सोप्पे लिहायला वाटते, तितके अवघड समाजमान्यता करण्यास ( अर्थात तिकडे उसगावात बसुन , किंवा त्या संस्काराशी नेमका भारतीय समाज पध्दतीशी तुलना करून, समाजमनाचा अभ्यास बाजुला ठेवुन " फक्त स्विकार करावा " हे ही तितकेच सोप्पे ..)

कोर्टापुढे तुम्ही, वाद-प्रतिवाद करत, पुराव्याअभावी वा पुराव्यानिशी काहीही साबित करु शकता , तितके सोप्पे ते समाजात नाही ....असो ...हा संवाद पुन्हा ...भारत विरूध्द इंडिया असा व्हायचा ...

मनिषा यांच्या प्रतिसादाखाली लिंक दिलेली आहे. बाकि समाज सहजासहजी बदलत नाही असं म्हणायचं असेल तर खरच वेगळा विषय आहे.

ऋषिकेश's picture

12 Dec 2013 - 12:03 pm | ऋषिकेश

लोक मान्यतेसाठी किंवा अमान्यतेसाठी कोर्टाकडे का जात आहेत हा प्रश्न मला पडला ...समाजाने त्यांच्याकडे आदराने पहावे म्हणुन असेल ..तर जबरदस्तीने वा कोर्टाच्या आदेशाने पब्लीक कधीपासुन आदर करायला लागले ब्वा ?

कारण सद्य कायदा असे संबंध ठरवणार्‍या व्यक्तीला क्रिमिनल - गुन्हेगार ठरवतो.
यामुळे पोलिसांपासून अनेकांच्या हातात अश्या व्यक्तींना त्रास द्यायला आयते साधन मिळते.

त्यांना आपलेसे करा/स्वीकारा वगैरे लांब राहिले याच्याशी सहमत आहेच पण त्यांना किमान त्रास देऊ नका - त्यांना कायद्याने गुन्हेगार ठरवू नका असे किमान म्हणणे सध्या आहे.

सुबोध खरे's picture

12 Dec 2013 - 2:02 pm | सुबोध खरे

+१

मृत्युन्जय's picture

12 Dec 2013 - 11:10 am | मृत्युन्जय

समलैंगिकतेला गुन्हा ठरवणारे कलम ३७७ किती लोकांनी वाचले आहे ही शंका आहे:

Whoever voluntarily has carnal intercourse against the order of nature with any man, woman or animal, shall be punished with imprisonment for life, or with imprisonment of either description for term which may extend to ten years, and shall also be liable to fine.

Explanation: Penetration is sufficient to constitute the carnal intercourse necessary to the offense described in this section

माझे कायद्याचे आणि "carnal intercourse" या शब्दांचे ज्ञान आणि आकलन थोडे आहे पण जेवढे मला कळले त्या अनुसार विचार करता समलैंगिकता सोडुन खालील गोष्टीही बेकायदेशीर आहेतः

१. एका पुरुषाने एका स्त्रीबरोबर (अगदी लग्नाची बायको असेल तरीही) गुदद्वारातुन केलेला संभोग.
२. एका पुरुषाने एका स्त्रीबरोबर (अगदी लग्नाची बायको असेल तरीही) मुखाद्वारे केलेला संभोग.

कायदा म्हणतो " Penetration is sufficient to constitute the carnal intercourse ". Penetration कश्यात हे स्पष्ट केलेले नाही. त्यामुळे योनी वगळता इतर कुठल्याही अवयवाशी अथवा वस्तुशी संबंधित Penetration असेल तर ते कलम ३७७ मध्ये येते. याचा अर्थ यात केवळ समलैंगिक येत नाहित तर सर्वसामान्य माणसे देखील येतात. वरच्या २ उदाहरणांचा संदर्भ लक्षात घेता धार्मिक आणि कायदेशीर पद्धतीने विवाहबंधनात अडकलेले भिन्नलिंगी Adventurous जोडपी देखील येतात.

आता "Against the order of nature" या शब्दांचा विचार करुयात. "order of nature" म्हणजे काय? यात केवळ Vaginal Intercourse येतो का? तर नाही. निसर्गाची आज्ञा ही आहे की स्त्री आणि पुरुषांनी (रादर नराने आणि मादीने) अपत्यप्राप्तीसाठी संभोग करावा. हा मुद्दा थोडा विवादास्पद आहे. पण तरीही कायद्याच्या भाषेत बोलायचे झाल्यास त्याचा अर्थ वरीलप्रमाणेच होतो. तर मग संततीनिरोधक साधने वापरुन केलेला कुठलाही संभोग कलम ३७७ च्या व्याख्येत येइल. म्हणजे अगदी लग्नाच्या नवरा बायकोने जरी निरोध वापरुन संभोग केला तर तो "Against the order of nature" असेल. इतर स्त्री पुरुषांमधला संभोग तर यात येणारच येणार (संतती प्रतिबंधक साधने वापरल्यास). तसेच जर एखाद्या दांपत्याने संतती प्रतिबंधक शस्त्रक्रिया करुन घेतली तर त्यानंतर केलेला प्रत्येक संभोग बेकायदा असेल. संततीची अपेक्षा न ठेवता निव्वळ आनंदासाठी केलेला प्रत्येक् संभोग बेकायदा ठरेल.

आता ३७७ एकुण सगळ्यांच्याच घराच्या उंबरठ्यावर आल्यासारखा वाटतो ना?

सुबोध खरे's picture

12 Dec 2013 - 2:13 pm | सुबोध खरे

गुन्हे विज्ञान शाखेचा अभ्यास करताना आम्हाला शिकवले होते ते असे कि अनैसर्गिक संभोग (मौखिक वा गुदद्वारात) मग तो नवरा आणि बायकोत असेल तरीही तो गुन्हा आहे. यात बायकोशी तिच्या इच्छे विरुद्ध संभोग हि येतो(फक्त तो बलात्कारात न धरता sexual assault मध्ये येतो(तेंव्हा येत असे).
संतातीनियमक साधने वापरणे हा गुन्हा ठरू शकत नाही कारण आपल्याला किती मुले होऊ देणे हा माणसाचा आणि स्त्रीचा मुलभूत हक्क(fundamental right) आहे आणि त्यासाठी वापरात येणारी साधने हि कायद्याच्या अख्त्र्यारीत येतात. शिवाय नको असलेल्या अर्भकाचा गर्भपात यात संतती नियामक साधनाचे अपयश हे सर्वात महत्वाचे कारण आहे.
त्यामुळे संततीनियमनाची साधने वापरून केलेला संभोग हा बेकायदेशीर आहे हा मुद्दाच गैर लागू आहे.(exclusion clause).
आपले म्हणणे अशा तर्हेने समर्थनीय होणार नाही

संतातीनियमक साधने वापरणे हा गुन्हा ठरू शकत नाही कारण आपल्याला किती मुले होऊ देणे हा माणसाचा आणि स्त्रीचा मुलभूत हक्क(fundamental right) आहे

जर गुदमैथुन,मुखमैथुन अनैसर्गिक आहे तर कंडोम लाऊन संभोग नैसर्गिक कसा याचे उत्तर मिळाले नाही.

मृत्युन्जय's picture

12 Dec 2013 - 2:27 pm | मृत्युन्जय

डॉक समलैंगिकता हाही घटनेच्या कलम २१ नुसार वैयक्ति स्वातंत्र्याच्या विरोधात जातो. इथेही म्हणजे कलम १५ किंवा २१ अनुसार देखील कायद्याची एक पाचर मारुन ठेवलेली आहेच ही गोष्ट वेगळी. पण हे अमान्य करता येत नाही की Absence of Freedom of Sexual Orientation हे घटनेच्या मुलभूत सिद्धांताच्या अगदी विरोधी आहे. मूल होउ न देणे किंवा गर्भपात करुन घेणे हे जर मूलभूत हक्कांमध्ये मोडत असेल तर मग लैंगिक स्वातंत्र्य का नाही?

मी काय योग्य आणि काय अयोग्य या मुद्द्यावर नाही आहे. तो वेगळा चर्चेचा मुद्दा आहे. पण कलम ३७७ इतके कालबाह्य आहे की मी लिहिलेले सगळे प्रसंग / घटना / अभिव्यक्ती कलम ३७७ नुसार गुन्हा ठरतो. अगदी नसबंदी सुद्धा. नसबंदी विरुद्ध गुन्हे दाखल होत नाहित कारण त्याचा प्रसार सरकार स्वतः करते आहे. मग शिक्षा नक्की कोण करणार? पण लैंगिक स्वातंत्र्याबाबत तसे नाही म्हणुन गुन्हे दाखल होतात, छळवणुक होते, शिक्षा होते.

आणि समलैंगिकता सोडा पण वैवाहित भिन्नलिंगी जोडप्यांचे दोघांच्या पुर्ण संमतीन होणारे लैंगिक आचरण देखील ३७७ नुसार गुन्हा आहे (योनीसंबंध सोडुन) तर मग ३७७ कालबाह्य नाही का?

सुबोध खरे's picture

13 Dec 2013 - 10:50 am | सुबोध खरे

कलम ३ ७ ७ संपूर्णपणे कालबाह्य आहे हे मी सर्वात प्रथम म्हटलेच होते. आणि तो कायदा पूर्णपणे बदलाने हि काळाची गरज होती परंतु आपल्या कल्याणकारी विधायकानी मतांसाठी काहीही केले नाही कारण धर्म मार्तंड लोकांच्या विरोधात जाण्यापेक्षा कोर्टवर राळ उडविणे किती सोपे आहे हे आपण पहिलेच आहे.
जर (अगदी काल परवा पर्यंत) २०१३ मध्ये निर्भया प्रकरणात कायद्यात बदल केला तेंव्हा सुद्धा विधायकानी हा कायदा बदललेला नाही. अगोदर सुद्धा १ ९ २ व्या कायदा आयोगाने ३ ७ ७ प्रकरण वगळावे असे सांगूनही सरकारने काहीही केले नाही त्याअर्थी सरकारला ते मान्य आहे असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. जर एखादा कायदा २० १ ३ साली विचार विनिमय होऊनही हे कलम कायम ठेवले आहे तर ते कालबाह्य कसे हे विचारत न्यायालयाने फक्त त्याची घटनात्मक वैधता ठरविली आणि हा निकाल दिला. आपले सर्व अति शहाणे(पुरोगामी) शहाणे( संसद सदस्य) आणि अर्धे शहाणे (जनता) यांनी न्यायालयाच्या विरुद्ध राळ उठविली. आपले अटर्नी जनरल वहानवटी यांनी सुद्धा न्यायालयाने पुरोगामी होण्यासाठी काही केले नाही म्हणून टाईम्स ऑफ इंडिया मध्ये वक्तव्य केले आहे. त्यांना लोकांसमोर हे विचावेसे वाटते कि आपल्या (मुसलमान) समाजाला दुखवू नये म्हणून तुम्हीसुद्धा राजकीय दृष्ट्या चतुर वक्तव्ये करता?
असो मिळाला तर मी त्या निकालाचा दुवा देईनच पण त्या निकालात स्पष्टपणे असे म्हटलेले आहे जर संसद सदस्यांना ते कलम मान्य आहे आणि गेल्या तेरा वर्षात अनेक वेळा त्यावर विचार होऊन आणि त्याला संलग्न कायद्यात फेरफार होऊनसुद्धा त्यांनी हे कलम तसेच ठेवले तर (ते रद्दबातल ठरवणे) त्यांचे काम न्यायालयाने करणे कितपत बरोबर होईल? आम्ही फक्त त्त्या कल्माची घटनात्मक वैधता तपासून पाहिली. दिल्ली उच्च न्यायालयाने सुद्धा ते घटनात्मक वैध आहे असेच म्हटले आहे फक्त उच्च न्यायालयाने परस्पर संमतीने समलिंगी सम्भोग करणे हा गुन्हा नाही इतकेच म्हटले आहे.
असो.
"sitting on judgement of disputed or partial facts is not prudent ."
"It is easy to blame someone than do something constructive."

मृत्युन्जय's picture

13 Dec 2013 - 11:43 am | मृत्युन्जय

मी तो निकाल थोडाफार वाचला आहे डॉ़क. त्यामुळे माझा प्रतिसाद प्रथमपासुन ३७७ च्या उपयुक्ततेबद्दलच होता. न्यायालयाच्या निर्णयाच्या अनुषंगाने किंवा समलैंगिकांच्या अधिकारांच्या अनुसाराने मी तो लिहिलेला नाही. पण इथे काय नैसर्गिक आणि काय अनैसर्गिक हे ठरवणार्‍या बहाद्दरांना कायद्याने काय नैसर्गिक ठरवले आहे याबद्दल कितपत माहिती आहे हे दाखवुन देण्यासाठी तो प्रतिसाद होता. तुम्ही यातला निदान काही भाग तरी व्यवसायाच्या निमित्ताने जाणुन घेतला आहे. ज्यांनी कलम ३७७ मुळातच वाचले नाही आहे त्यांनी समलैंगिकतेबद्दलच्या कायद्याबद्दल बोलणे किती हास्यास्पद ठरु शकते हे दाखवण्यासाठी तो प्रतिसाद दिला होता. ३७७ ची व्याप्ती फक्त समलैंगिकांबद्दल नाही आहे. जर उद्या एखाद्याने कायद्यावर बोटच ठेवायचे म्हटले तर ९०% प्रौढ (आणी कदाचित ९५% विवाहित) जनता गजाआड करायला पाहिजे.

निसर्गाने प्रजननक्षम बनवून देखील ब्रम्हचारी व्यक्ती प्रजनन करत नाहीत. हे अनैसर्गिक वाटत नाही का?

ब्रम्हचर्य ही देखील मानसिक विकृती म्हणावी का? त्यांच्यावर उपचार करावेत का?

या संबंधी कायदा करणे का जरूरी आहे? कारण हा सर्वस्वी वैयक्तीक, खाजगी प्रश्नं आहे. त्यातून समाजाला काही त्रास होतो आहे का? कारण हा प्रश्नं हल्लीच बातम्यांमधे झळकायला लागला आहे. त्या आधी असे लोक नव्हते का? आणि अशा व्यक्तींमुळे समाजात काही अशांतता, धोका इ. निर्माण झाल्याचे ऐकीवात नाही. किंवा अशा व्य्क्तींमुळे समाजाची सांस्कृतीक, नैतीक अथवा धार्मिक हानी झाल्याचेही उदाहरण नाही.

अशा संबंधाना सामाजिक मान्यता मिळू नये.. (असं मला वाटतं), पण तो गुन्हा का समजावा?
यात जबरदस्तीने केलेला संबंध असेल तर तो गुन्हा आहे, पण तो भिन्नलिंगी संबंध ठेवणार्‍यां साठी पण गुन्हाच आहे ना? मग वेगळा कायदा कशाला?

समलिंगी संबंध मला नैसर्गिक/ नॉर्मल आहेत असे वाटत नाही. (कदाचित माझे या संदर्भातील ज्ञान अती तोकडे असल्यामुळे असेल) . शास्त्रीय दृष्ट्या देखिल असे संबंध असणे योग्यं नसावेत कारण दोन भिन्न अधिभार (+ve, -ve)असलेल्या धृवात (पोलस) आकर्षण असते. समान अधिभारांमधे आकर्षण नसते. मला वाटते असे लोक विकृत नाहीत पण आजारी समजावेत. त्यांना समुपदेशनाने समजवायचा प्रयत्नं करावा अन्यथा त्यांना त्यांच्या पद्धतीने राहू द्यावे. पण कायदे करून त्यांना समाजापसून वेगळे करू नये.

आणि समलिंगी सबंध असणार्‍या व्यक्तींनी उगीचच "प्राऊड टु बी गे " वगैरे फलक झळकावून आपल्या लैगिकतेचे प्रदर्शन करू नये. तुमच्या प्रवृत्ती निसर्गदत्त आणि सहज आहेत असे तुम्ही समजताना ना ? मग त्या तशाच स्विकारा. म्हणजे आपल्या वेगळे असण्याचे जाहीर प्रदर्शन करायचे आणि मग समाज आम्हाला वेगळे समजतो म्हणून दूषणे द्यायची.. याला काय अर्थ आहे?
(अवांतर : हा कायदा केला तरी अंमलात कसा आणणार? म्हणजे कुणीतरी तक्रार करायला हवी ना? )

खटासि खट's picture

12 Dec 2013 - 11:49 am | खटासि खट

Homosexuality is biologically natural, not deviant.

"Gay rights" are not "special" rights. They are human rights.

"Gay rights" are not now being "granted." Instead, they are no longer -- or should no longer be -- being taken away.

Homosexuals are humans. So, naturally, they deserve all the same human rights that heterosexuals do, including the rights to employment, housing, marriage, hospital visits, and inheritance. Without discrimination.

http://www.standard.net/stories/2013/03/22/homosexuality-biologically-na...
( गेल्या काही अनुभवातून आपण जी बाजू मांडतो आहोत त्यापैकी आपण एक आहोत असं नाही हे आवर्जून सांगावे असं वाटू लागलेलं आहे).

समलिंगी संबंध मला नैसर्गिक/ नॉर्मल आहेत असे वाटत नाही. (कदाचित माझे या संदर्भातील ज्ञान अती तोकडे असल्यामुळे असेल)

There is almost unanimous medical and psychiatric opinion that homosexuality is not a disease or a disorder and is just another expression of human sexuality. Homosexuality was removed from the Diagnostic and Statistical Manual of Mental Disorders (DSM) in 1973 after reviewing evidence that homosexuality is not a mental disorder.

In 1992, the World Health Organisation removed homosexuality from its list of mental illnesses in the International Classification of
Diseases (ICD 10). Guidelines of the ICD 10 reads: “disorders of sexual preference are clearly differentiated from disorders of gender identity and homosexuality in itself is no longer included as a category.”

According to the Amicus brief filed in 2002 by the American Psychiatric Association before the United States Supreme Court in the case of Lawrence v. Texas:
“According to current scientific and professional understanding, however, the core feelings and attractions that form the basis for adult sexual orientation typically emerge between middle childhood and early adolescence. Moreover, these patterns of sexual attraction generally arise without any prior sexual experience.” [page 7 of Amicus brief] Thus, homosexuality is not a disease or mental illness that
needs to be, or can be, 'cured' or 'altered', it is just another expression of human sexuality.

इरसाल's picture

12 Dec 2013 - 1:27 pm | इरसाल

काय बोलणार आता ?

https://encrypted-tbn1.gstatic.com/images?q=tbn:ANd9GcSee0GGFgUKk6A4w9WdSLEUDiIDCLNIUsgXAFiVx3E-DGC515Wy

मंदार कात्रे's picture

12 Dec 2013 - 3:19 pm | मंदार कात्रे

समलैंगिकतेला गुन्हा ठरविण्याच्या संदर्भातील सुप्रीम कोर्टाच्या निर्णया बद्दल न्यायालयाचे हार्दिक अभिनन्दन !

अतिशय योग्य निर्णय !!!

सुहास..'s picture

12 Dec 2013 - 4:56 pm | सुहास..

जस्ट नाऊ फ्रॉम फेसबुक

समलैंगिकताना कळवळा वाला ,बळेच जास्ती सुधरेलपणना आव आणि राहीनात ..
जर समजा यासना भाऊ ,बहीण.पोऱ्या,पोर ,बाप नी समलिंगी लफडा कयात ते यासले खपयी का ??

Dhananjay Borgaonkar's picture

12 Dec 2013 - 5:28 pm | Dhananjay Borgaonkar

+५००

इरसाल's picture

12 Dec 2013 - 9:35 pm | इरसाल

कसा दिधा वासुभौ,
नवं काही करी र्‍हायनु असं दाखाडाले ह्या लोके तठे तेस्ले सपोर्ट करी र्‍हायनात.
पन तेस्नावर वखत पडु द्या देखा कस मांघे मिरच्या बयतस त्या ?

मृगनयनी च्या मताशी सहमत अहे.
खरं तर समलैंगिक म्हणून कोणी जन्माला येत ह्याला काही शास्त्रीय पुरावा आहे का?
आणि हे फॅड आत्ताच का आलंय? उगीच सीनेमा मध्ये बघून , काहीतरी विकृत पुस्तके वाचून , इंटरनेट वर बीभत्स काहीतरी बघून त्यातला एखादा जरी गुण आपल्याशी जुळला कि आपण समलैंगिक आहोत अशी धारणा करून घेणारे लोक अहेत. लाखो वर्षांपासून मानवजात पृथ्वीवर आहे . पण हि थेरं आत्ताच्या काही वर्षातच का सुरु झाली आहेत? स्त्री आणि पुरुष अश्या २ जाती का बनवल्या गेल्या आहेत? हि तर निसर्गात प्रचंड ढवळा ढवळ झाली . तेव्हा असा गुन्हा करणार्यांना शिक्षा होणं बरोबर अहे.
ह्या लोकांना नसतात काही कामं . मग असं काहीतरी सुचतं . म्हणतात न रिकामं मन , सैतानाचं घर. म्हणूनच समलैंगिकतेच्या नावाखाली असले सैतानी विचार सुचतात .
मला वाटतं हि खचितच विकृती आहे आणि अश्या लोकांना मानसोपचार तज्ञांकडून योग्य उपचार मिळाले . त्यांचं योग्य councelling झालं तर त्यांची हि विकृती जावू शकते .

मला वाटतं हि खचितच विकृती आहे आणि अश्या लोकांना मानसोपचार तज्ञांकडून योग्य उपचार मिळाले . त्यांचं योग्य councelling झालं तर त्यांची हि विकृती जावू शकते .
There is almost unanimous medical and psychiatric opinion that homosexuality is not a disease or a disorder and is just another expression of human sexuality. Homosexuality was removed from the Diagnostic and Statistical Manual of Mental Disorders (DSM) in 1973 after reviewing evidence that homosexuality is not a mental disorder.

In 1992, the World Health Organisation removed homosexuality from its list of mental illnesses in the International Classification of
Diseases (ICD 10). Guidelines of the ICD 10 reads: “disorders of sexual preference are clearly differentiated from disorders of gender identity and homosexuality in itself is no longer included as a category.”

According to the Amicus brief filed in 2002 by the American Psychiatric Association before the United States Supreme Court in the case of Lawrence v. Texas:
“According to current scientific and professional understanding, however, the core feelings and attractions that form the basis for adult sexual orientation typically emerge between middle childhood and early adolescence. Moreover, these patterns of sexual attraction generally arise without any prior sexual experience.” [page 7 of Amicus brief] Thus, homosexuality is not a disease or mental illness that
needs to be, or can be, 'cured' or 'altered', it is just another expression of human sexuality.

Dhananjay Borgaonkar's picture

12 Dec 2013 - 5:35 pm | Dhananjay Borgaonkar

अतिशय योग्य निर्णय..स्वागत आहे या निर्णयाच.
आता मिपावर पण गे,लेस्बिअन परेड निघेल की काय याची भिती वाटायला लागली आहे.

९५% लोक वागतात त्यापेक्षा वेगळं, याला अनैसर्गिक म्हटलं जातं.

मुळीच नाही . एखादा कुणी काही वेगळा केला जे समाज्याच्या हिताचं, इतरांचं ध्यान वाढवणार , इतरांचं जीवन सुखी करणार असेल तर सगळे त्याचा उदो उदोच करतात . शास्त्रज्ञ , संत , उद्योजक हे ह्या ९५% टक्क्यांच्या बाहेर जावून काही करतात म्हणूनच ते तसे असतात

निसर्गाने प्रजननक्षम बनवून देखील ब्रम्हचारी व्यक्ती प्रजनन करत नाहीत. हे अनैसर्गिक वाटत नाही का?
ब्रम्हचर्य ही देखील मानसिक विकृती म्हणावी का?

निसर्गाने हाथ , पाय, दात देवून देखील दिसेल त्याला बुक्क्या मारत, लाथा घालत, चावत न सुटणे हे अनैसर्गिक वाटत नाही का ……… असंच म्हणण्यासारख आहे . दिलेल्या गोष्टीचा वापर करणे , न करणे का व्यैयक्तिक प्रश्न अहे. त्याचा चुकीचा वापर होतो तेव्हा तो सामाजिक प्रश्न होतो

बेकायदेशिर ठरवले गेले आहेत,
मग आता?

सूड's picture

12 Dec 2013 - 6:53 pm | सूड

चाललेली चर्चा म्हणजे कोणाच्या म्हशी नि कोणाक उठाबशी !!

प्यारे१'s picture

12 Dec 2013 - 7:09 pm | प्यारे१

+१
अगदी अगदी! =))

तावातावाने (म्हणजे ताव(इथे फूल्स कॅप कागद अपेक्षित ) भरभरुन) चर्चा करणारे मिपाकर पाहून अम्मळ 'नैसर्गिक' मौज वाटली.

साती's picture

12 Dec 2013 - 8:35 pm | साती

नसती उठाठेव ही मुळीच नाही.
हळुहळू आपली मुलेही सेक्श्युअली अवेअर होणार आहेत.
अश्यावेळी जर होमो इज ऑल्सो अ नॉर्मल वे ऑफ लिविंग हे त्यांच्या कानीकपाळि सतत आदळलं गेलं तर चुकून होणारी पर्वर्जन्स, पौगंडावस्थेतील लैंगिक साहसे यांनाच ते नॉर्मल समजतील आणि आयुष्यातल्या एका मोठ्या सुखाला मुकतील अशी सार्थ भिती मला वाटते.
हे होऊ नये म्हणून तरी समलैंगिकतेला कायदेशीर मान्यता मिळू नये असे मला वाटते.
पॉलिटिकली करेक्ट रहावे किंवा आयसीडीमधून समलैंगिकता काढून टाकलीय याकरिता माझे वैयक्तिक मत काय आहे याची चर्चा करणे चुकीचे ठरू नये.

मृत्युन्जय's picture

13 Dec 2013 - 11:45 am | मृत्युन्जय

डॉक पौगंडावस्थेत ९०% मुलामुलींच्या मनात कधी ना कधी समलैंगिक व्यक्तींबद्दल लैंगिक आकर्षण वाटते हे खरे आहे का?

सूड's picture

13 Dec 2013 - 2:49 pm | सूड

>>हळुहळू आपली मुलेही सेक्श्युअली अवेअर होणार आहेत.
अश्यावेळी जर होमो इज ऑल्सो अ नॉर्मल वे ऑफ लिविंग हे त्यांच्या कानीकपाळि सतत आदळलं गेलं तर चुकून होणारी पर्वर्जन्स, पौगंडावस्थेतील लैंगिक साहसे यांनाच ते नॉर्मल समजतील आणि आयुष्यातल्या एका मोठ्या सुखाला मुकतील अशी सार्थ भिती मला वाटते.

सगळं मान्य. आमच्या कॉलेजात सेक्स एज्युकेशनवर दोन दिवसांचा सेमिनार झाला होता. (आता सेक्स एज्युकेशन म्हटल्यावर लगेच भुवया उंचावतील. सेक्स एज्युकेशन म्हणजे फक्त स्त्रीपुरुष संबंध नव्हे तर अगदी बायकांची मासिक पाळी म्हणजे काय, त्या दिवसात त्यांना किती त्रास होतो इथपासून ते मूल जन्माला देताना बाईला किती त्रास सोसावा लागतो इथवर सगळं व्याख्यात्याने सांगितलं. शेवटी हेही म्हणाला की तुम्हाला जन्म देताना तुमच्या आईनेही हा त्रास भोगलेला आहे, तेव्हा तिचा किती आदर राखायचा ते तुम्हीच ठरवा. घरात आई असेल, बहीण असेल महिन्यात ठराविक दिवशी ती चिडचीड करताना दिसली तर तिचा प्रॉब्लेम काय आहे ते समजून घ्या. ह्या गोष्टी त्या तुम्हाला सांगू शकत नसतील, समजून घेणं तुमचं काम आहे. हे इतक्यासाठी लिहावं लागलं की सेक्स एज्युकेशन म्हटलं की "लग्नानंतर पहिल्या रात्री आणि त्यानंतर काय करायचं हेच शिकवत असणार" किंवा "या गोष्टी शिकवायची गरज नसते " असा सूर काढणारे काही महाभाग आहेत.) तर आता मूळ मुद्दा, या व्याख्यात्यानेही आम्हाला समलिंगी संबंध हे नैसर्गिकच असतात त्यामुळे त्यात वावगं काहीच नाही असं सांगितलं होतं. त्यावरुन आमची झालेली धारणा अशी की हे शाकाहार-मांसाहाराइतकं सहज असावं. काही लोकांना प्राणी हे अन्न म्हणून खाणं पटत नाही ते शाकाहारी असतात आणि जे चवीनं खातात ते मांसाहारी. त्यामुळे उद्या कोणीही मला तो/ती समलिंगी असल्याचं सांगितलं तर थोडासा धक्का बसेल पण त्या व्यक्तीला मी लगेच बाजूला काढणार नाही. (निदान अजून तरी असं वाटतंय.) माझा मुद्दा हा होता की इथे काथ्याकूट करुन काय निष्पन्न!!

मुळात या विषयातल्या जाणकारांतच इतके मतभेद असतील तर आमच्यासारख्या सामान्यांनी तो मुद्दा उगाच का चघळत बसावं. कोर्टाने निर्णय दिला म्हणून लगेच काही आभाळ कोसळलेलं नाहीये. ज्यांना या पद्धतीने आनंद घ्यायचा असतील ते घेतीलच. आपण इथे काथ्याकूट करत बसण्यात अर्थ काय !!

प्यारे१'s picture

13 Dec 2013 - 3:10 pm | प्यारे१

+११११
नेमकं. लाईक्ड रे सूडकेश्वर.
'बाऊ' केला जातोय दोन्ही बाजूंनी तो नसावा एवढंच!

मालोजीराव's picture

13 Dec 2013 - 7:13 pm | मालोजीराव

'बाऊ' केला जातोय दोन्ही बाजूंनी

शिद's picture

13 Dec 2013 - 3:13 pm | शिद

मुळात या विषयातल्या जाणकारांतच इतके मतभेद असतील तर आमच्यासारख्या सामान्यांनी तो मुद्दा उगाच का चघळत बसावं. कोर्टाने निर्णय दिला म्हणून लगेच काही आभाळ कोसळलेलं नाहीये. ज्यांना या पद्धतीने आनंद घ्यायचा असतील ते घेतीलच. आपण इथे काथ्याकूट करत बसण्यात अर्थ काय !!

नाहीतर काय? फुकटच्या वांझोट्या चर्चा...

अर्धवटराव's picture

14 Dec 2013 - 2:27 am | अर्धवटराव

माणसाची (किंवा सजीवाची म्हणुया) कामेच्छा इतकी जबरदस्त पॉवरफुल्ल आहे कि कुठल्याहि कायद्याने, नितीनियमाने, सामाजीक संकेताने वा धार्मीक कर्मकांडाने तिला थोपवता येत नाहि. येत्या काहि वर्षात मेनी-टु-मेनी असे लैंगीक संबंध समाजात प्रस्थापीत झालेले असतील; मग त्यात वैवाहीक, विवाहबाह्य, समलिंगी, विषमलिंगी, इलेक्ट्रोनीक, बायो-मेकॅनीकल, कदाचीत मनुष्येतर प्राणी हे सर्व आलं. कुणी कितिही काथ्या कुटला तरिही हे होणारच. त्यातुन काहि दु:ष्परिणाम समोर आले आणि ते काहि जणांना उमजले तर तेव्हढ्यापुरतं एक नवीन प्रिकॉशनरी पद्धत माणुस विकसीत करेल. मनुष्यप्राण्याची हौस.... बाकि काहि नाहि.

अवांतरः पण याबद्द्ल काथ्याकुट करण्यात काय अर्थ असं म्हणु नका राव. मनोरंजनाचा एव्हढा मोठा खजीना अन्यथा कुठे उपलब्ध होणार ? हुषारी आणि शहाणपण, नसलेली हुषारी आणि नसलेलं शहाणपण, काव्य-शास्त्र-पुराण-विज्ञान-कला-संस्कृती-हटवादीपणा-बुद्ध्यांक-हॅप्पी बड्डे केक-अ/नसलेली अक्क्ल काढणे... आणि काय काय वापरलेली भेळ अन्यथा कुठे चाखायला मिळेल ?

कवितानागेश's picture

14 Dec 2013 - 12:35 pm | कवितानागेश

म्हणजे माणसाची वादविवादेच्छा जास्त पॉवरफुल आहे म्हणायची.. :P
चालुद्या!

अभ्या..'s picture

14 Dec 2013 - 1:32 pm | अभ्या..

अर्र गिरजाप्रसादभाऊ ते वैचारिक मैथुनाचा संदर्भ आत्ता लागला बघा ;-)
.
.
बाकी मोउतै तुमचे हे गुलाबी मार्जारमुख अन पाभेंचा निळ्वर्तुळाकार अगदी गर्दित टांगा उठून दिसावा तसे दिसतात प्रतिसादाच्या गर्दित. :-D

सौंदाळा's picture

13 Dec 2013 - 3:28 pm | सौंदाळा

+१
याच आशयाचे लिहायचे होते पण कोणत्या शब्दात लिहावे समजत नव्हते. तुम्ही अगदी नेमक्या शब्दात सांगितले.

उद्दाम's picture

12 Dec 2013 - 7:14 pm | उद्दाम

पण समलिंगी माणसाला तुरुंगात घालून काय साध्य होणार? तसेही तुरुंगातील पब्लिकही समलिंगीच बनलेलं असतं. म्हणजे १० वर्षे याला तुरुंगात घातलं तर हा काय तिथे ब्रह्मचर्य सत्य अस्तेय म्हणत बसेल का? तिथेही तो तेच करणार.. मग बाहेर त्याचं तो काय करतो ते त्याला करु द्यावं. ... हेच उत्तम नै का? :)

स्टुपिड's picture

12 Dec 2013 - 8:55 pm | स्टुपिड

सुप्रीम कोर्टाचा निर्णय काय, चर्चा काय! आग रामेश्वरी अन बंब सोमेश्वरी असला प्रकार! अरे काय चाल्लंय काय! तीन तीन डॉक्टर लोक काय सांगतात ते निदान ऐकून समजून तरी घ्यायचा प्रयत्न करा!!

काळा पहाड's picture

13 Dec 2013 - 12:38 am | काळा पहाड

स्वैराचार

एक डॉक्टर असून तुमचं या बाबतीत असं मत असेल तर आमच्या सारख्या सामान्यांची काय कथा. भारताला खरंच जगातल्या शास्त्रीय संशोधनाचा अभ्यास करण्याची गरज आहे. बाय द वे, संस्कारांबद्दल खालील व्याख्या वाचली:
'Sanskar' is a process, which transforms a person into an ideal & outstanding personality by eradicating/controlling the negative mental tendencies existing in him and by inculcating human values & qualities to make him more dynamic, discreet, duty conscious and responsible towards himself as well as family and the society.
सोसायटी ही फक्त तुमच्या विचारांच्या मनाच्या माणसांची बनत नाही. त्यात वेगवेगळ्या मतप्रवाहाचे लोक सुद्धा असतात. म्हणून फक्त माझेच ते संस्कार आणि इतरांचे ते स्वैराचार हा हट्टाग्रह झाला. समाजातल्या डॉक्टर, शिक्षक, वकील अशा लोकांनी समाज प्रबोधनात पुढे असण्याची गरज असते. आपल्या पूर्वाग्रहांच्या ठिसूळ पायावर तर्कशून्य व शास्त्रीय कसोटीवर न टिकणारा युक्तीवाद करण्याची नव्हे.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

13 Dec 2013 - 3:28 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

शब्दांबद्दल माफी मागण्यापेक्षा या विषयाचा अभ्यास वाढवून विधानं केलीत तर बरं होईल. वैद्यकाचा अभ्यास करून, त्याचा व्यवसाय करणाऱ्यांनी बाळगलेली अंधश्रद्धा ("स्वैराचार", "औषधाची गरज") पाहून जास्त त्रास होतो.

बाबा पाटील's picture

13 Dec 2013 - 8:24 am | बाबा पाटील

माफी हा शब्द फक्त मी वापरलेल्या शब्दांबद्दल होता,मताबाबात नाही. जे वापरले ते श्ब्द अतिशय जाणिवपुर्वक वापरले होते कारण मागच्या आठ दहा वर्षात जो काही वैद्यकिय व्यवसाय करत आहे तो आयुर्वेदाचा या मध्ये सेक्स मेडीसिन किंवा लैंगिक समस्यांवर उपचार करण्यास जे रुग्न येतात त्यात एकुन रुग्नांच्या सरासरी ४० टक्के प्रमाण असते.आनी त्यातल्या ६० टक्के रुग्नांना या खुळचट कल्पनांपाइ फक्त योग्य सल्ल्याची गरज असते. दुर्देवाने मागच्याच आठवड्यात असेच एक तरुण जोडपे आले होते लग्नाला सहाच महिने झालेले,त्यातला पुरुषाला हाच प्रॉब्लेम होता जवळ जवळ दोन तास त्याच्याशी सगळ्या गोष्टी समजाउन सांगत होतो.त्याच्यासाठी उपचार ही देता आले असते,पण मध्येच मुलाच्या आईने अत्यंत वाईटपद्धतीने त्या बिचार्‍य पोरीवरच आक्षेप घेतले,शेवट २३-२४ वर्षाची पोर लग्नाला सहा महिने होउन गेलेत अश्यापद्धतीने जर संसार असेल तर यातुन काय निश्पन्न होणार.ही एक केस नाही कित्येक संसार यातुन बर्बाद होताना डोळ्या समोर पाहिले आहेत.मेणबत्या पेटवुन बोंबा मारण फार सोप असत हो प्रत्यक्षात अश्या केसेस ज्यावेळेस हँडल कराव्या लागतात ना कळत आपले भारतीय संस्कार आणी स्वैराचार यातला फरक काय.

>>>मेणबत्या पेटवुन बोंबा मारण फार सोप असत हो प्रत्यक्षात अश्या केसेस ज्यावेळेस हँडल कराव्या लागतात ना कळत आपले भारतीय संस्कार आणी स्वैराचार यातला फरक काय.

खळ्ळ खट्याक!
-बाबा पाटील फॅन फाऊंडेशन अध्यक्ष प्यारे

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

13 Dec 2013 - 8:25 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

विषय काय, प्रतिसाद काय?

तुमच्या कोणा एका गिऱ्हाईकाला संभोग कसा करावा हे समजत नाही म्हणून समलैंगिक जन्माला आलेल्या भलत्याच कोणी लोकांनी त्यांच्या मेंदूच्या वायरींगप्रमाणे वागू नये? आणि भारतीय संस्कार म्हणजे नक्की काय? मनुस्मृति का कामसूत्र? मनुस्मृतिमधे समलैंगिकतेला शिक्षा दिलेली आहे. कामसूत्र, मध्य भारतातली १० व्या, १२ व्या शतकात बनवलेली अनेक शिल्पं, जुनी चित्रं यांमधे समलैंगिकता चितारलेली आहे.

गिऱ्हाईकांमधे तुम्हाला दिसलेले पॅटर्न्स शास्त्र म्हणून लोकांनी स्वीकारावेत अशी इच्छा असेल तर ते शास्त्रशुद्ध पद्धतीने मांडा. तुमच्या विषयात जी काही जर्नल्स प्रसिद्ध होत असतील, लॅन्सेटसारखी, ती वाचा. Peer reviewed journals मध्ये भावनांना हात घालून आणि संस्कृतीच्या आणाभाका देऊन विज्ञानाच्या नावाखाली मनुवाद आणि अंधश्रद्धा पसरवत नाहीत.

मेणबत्त्या लावून भावना प्रकट करणाऱ्यांना कमी लेखण्याआधी थोडा विचार करा. अहिंसेने लढा चालवणारे नेल्सन मंडेला ५-६ दिवसांपूर्वी गेले, जगभरातून त्यांच्या मृत्युबद्दल दुःख व्यक्त झालं. खळ्ळखटॅकला मराठी "संस्कृती" बनवणारे नेते गेले तेव्हा जगभरात किती देशांमधे ही बातमी आली? मेणबत्ती समुदायला नावं ठेवणाऱ्या सुशिक्षित लोकांकडून विज्ञान, वैज्ञानिक विचारसरणी आणि तर्काची होणारी कत्तल अपेक्षित म्हणावी का?

तो एक रुग्न तसा असा विषयच नाही असे कित्येक आहेत्,दुर्देवाने त्याचे प्रमाण दर वर्षी वाढतच आहे.इकडुन तिकडुन सर्च करुन लेक्चर झाडण आणी आपण शहाणे आहोत असे दाखवण वेगळ आणी प्रत्यक्षात असे रोगी हाताळण वेगळ्, हे एकतर खुपच शांत असतात किंवा प्रचंड आक्रास्ताळे.या गोष्ठींना आळा घालण केवळ आणी केवळ त्यांना योग्य समोपदेशन करुन्,त्याचबरोबर काही सायकॅट्रीस्ट व एन्डोक्रॅनोलोजिस्ट काही आयुर्वेदिक औषधे यानेच शक्य होत आहे,सध्या आम्ही काही मित्र अश्या रुग्नांवर संयुक्त उपचार करत आहोत आणी त्याचे चांगले परिणाम दिसत आहेत.
पण तुमच्या सारखे जर काही विकृतीलाच प्रकृती म्हणु लागले तर्,शेवटी ज्याचा त्याचा प्रश्न ज्याचे त्याचे स्वातंत्र्य.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

14 Dec 2013 - 5:19 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

.इकडुन तिकडुन सर्च करुन ...

तुम्ही कुठून शिकलात मग? तुम्ही हे सगळं संशोधन स्वतः केलेलं आहे असा तुमचा दावा आहे का? बघू या तुमचे रीसर्च पेपर्स.

तुम्हाला समलैंगिकता वेगळी आणि हेटरो लोकांच्या लैंगिक अडचणी हे वेगळे मुद्दे आहेत हेच समजलेलं नाहीये. अजून काय बोलणार?

उद्दाम's picture

14 Dec 2013 - 10:58 am | उद्दाम

सहमत

समलैंगिकतेला संस्कृती अथवा किमान समाजात जुन्या काळापासून आहे म्हणून प्रवृत्ती म्हणून सिद्ध करु पाहणारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा!
मनुस्मृति कुणी नि कशी नि कधी राबवली त्याचा संदर्भ द्याल काय? कामसूत्रामध्ये दिलेलं आहे म्हणून ते खरंच आहे (सगळे लोक झाडून असं करत होते असं) असं असतं का? ती चित्रं का नि कधी नि काय कारणानं आकारास आली ह्याबाबत काय अभ्यास?
माणसातली समलैंगिकता नैसर्गिक नि मुख्य म्ह्णजे जन्मजात असते असा काही अभ्यास झालेला आहे का? काय विदा?

एखादी प्रवृत्ती फक्त तुलनेने कमी लोकांत आढळते म्हणून ती विकृती होते काय?

अ‍ॅबसेन्स ऑफ प्रूफ हा प्रूफ ऑफ अ‍ॅबसेन्स होतो काय?

एखादी गोष्ट सरसकट असली तर प्रवृत्ती असते अन म्हणून अ‍ॅक्सेप्टेबल असते काय- उदा. बायकांना मारहाण वगैरे?

ती चित्रं का नि कधी नि काय कारणानं आकारास आली ह्याबाबत काय अभ्यास?

तुम्हीच सांगा काय अभ्यास आहे तो. समलैंगि कता ही विकृती आहे म्हणून कंठशोष करणार्‍यांवरच बर्डन ऑफ प्रूफ पडते तसे सिद्ध करण्याचे.

माणसातली समलैंगिकता नैसर्गिक नि मुख्य म्ह्णजे जन्मजात असते असा काही अभ्यास झालेला आहे का? काय विदा?

किमान एक विदाबिंदू मिपावरच आहे, तो सोयीस्करपणे दुर्लक्षित करून बिनबुडाची तर्कटे मांडत बसल्यास वाढदिवसाचा केक कुणाला आणावा ते दिसतंच आहे.

प्यारे१'s picture

14 Dec 2013 - 2:16 am | प्यारे१

While the sexual nature of these carvings have caused the site to be referred to as the Kamasutra temple, they do not illustrate the meticulously described positions. Neither do they express the philosophy of Vatsyayana's famous sutra. As "a strange union of Tantrism and fertility motifs, with a heavy dose of magic" they belief a document which focuses on pleasure rather than procreation. That is, fertility is moot.[citation needed]

The strategically placed sculptures are "symbolical-magical diagrams, or yantras" designed to appease malevolent spirits. This alamkara (ornamentation) expresses sophisticated artistic transcendence over the natural; sexual images imply a virile, thus powerful, ruler.[7]

ह्यावर आव्हानं देता येणार आहेत, ही अधिकृत माहिती नाही हे देखील मान्य. पण किमान एवढं तरी दिसतं की समलैंगिकता कधीही सामान्यपणं (कॉमन प्रॅक्टीस) केली गेलेली गोष्ट नव्हे. ती जाणीवपूर्वक डेव्हलप केली गेलेली गोष्ट आहे. ह्यात मिपावरच्या व्यक्तीचा विषय म्हणाल तर जन्मजात जाणवणरी गोष्ट नव्हे ती जशी मिसळपाववर 'बिंबवली' जात आहे. नैसर्गिकच्या आपल्या व्याख्येप्रमाणे असेल देखील नैसर्गिक पण जन्मजात खचित नाही. डावरे लोकांप्रमाणे वगैरे.
बाकी माणसानं आपल्या बुद्धीनं अनेक बदल करुन घेतले आहेत. अनेक न जमणार्‍या गोष्टी इच्छाशक्तीच्या जोरावर केलेल्या आहेत. नैसर्गिक गोष्टींना स्ट्रीमलाईन केलेलं आहे. समलैंगिकतेबाबत त्या गोष्टीचा त्रास होत नसेल तर चालू द्या की! (मी वर कुठंही विकृती म्हटलेलं नाहीये. माझ्या मुखी तो शब्द घालू नये)

बाकी समलैंगिकता हेच जीवन असं म्हणालात तरी आमची काहीही हरकत नाही. पेंड्युलमच्या एका झोल्याच्या विरोधात आपण दुसर्‍या बाजूला तर स्वीकारत नाही आहोत ना हे पाहिलं की झालं.
डॉक्टर म्हणून बाबा पाटलांना काही अनुभव आलेले असतील त्यांनी तसे मांडले असावेत. ते व्यक्तीशः पटलेले आहेत.

स्वगतः जिकडची धुणी तिकडंच धुणे हा कार्यक्रम खुद्द मालकिण बाईने 'कांदा करेल वांदा' नं खोटा पाडलेला दिसला. नेहमीचं सोयिस्कर धोरण तिथं देखील दिसलंच. तत्त्वतः सारखंच! =)

बॅटमॅन's picture

14 Dec 2013 - 3:00 am | बॅटमॅन

ह्यावर आव्हानं देता येणार आहेत, ही अधिकृत माहिती नाही हे देखील मान्य. पण किमान एवढं तरी दिसतं की समलैंगिकता कधीही सामान्यपणं (कॉमन प्रॅक्टीस) केली गेलेली गोष्ट नव्हे. ती जाणीवपूर्वक डेव्हलप केली गेलेली गोष्ट आहे.

खजुराहोची मंदिरे तंत्रमार्गातील सिंबॉलिझमने प्रभावित आहेत यावरून समलैंगिकता अनैसर्गिक आहे हे कसे ठरवले? हे म्हणजे गोठ्यातल्या गाईला कालवड झाली म्हणून आज मी डब्यात पोहे आणले म्हणण्यापैकी आहे.अन वात्स्यायन हे भारतीय कामशास्त्रातले एकमेव नाव असे समजणार्‍यांनाही एक केक भेट. एक खजुराहोच्या उदाहरणावरून पूर्ण जगावर निष्कर्ष काढू पाहणे, मधल्या कसल्याही लिंकचा विचार न करणे हे ही लौकिकाला साजेसंच आहे.

ह्यात मिपावरच्या व्यक्तीचा विषय म्हणाल तर जन्मजात जाणवणरी गोष्ट नव्हे ती जशी मिसळपाववर 'बिंबवली' जात आहे. नैसर्गिकच्या आपल्या व्याख्येप्रमाणे असेल देखील नैसर्गिक पण जन्मजात खचित नाही. डावरे लोकांप्रमाणे वगैरे.

पुन्हा तेच! जन्मजात गोष्ट बर्‍याच वर्षांनी समजणे आणि जन्मतः समजणे यात गुणात्मक फरक नक्की काय आहे? समजा मला क्लासिकल म्यूझिक आवडते हे क्लासिकल म्यूझिक ऐकल्याशिवाञ समजले नाही तर त्यात अनैसर्गिक काय आहे? बेसिकचा भयंकरच लोच्या आहे.

बाकी माणसानं आपल्या बुद्धीनं अनेक बदल करुन घेतले आहेत. अनेक न जमणार्‍या गोष्टी इच्छाशक्तीच्या जोरावर केलेल्या आहेत. नैसर्गिक गोष्टींना स्ट्रीमलाईन केलेलं आहे. समलैंगिकतेबाबत त्या गोष्टीचा त्रास होत नसेल तर चालू द्या की! (मी वर कुठंही विकृती म्हटलेलं नाहीये. माझ्या मुखी तो शब्द घालू नये)

हॅ हॅ हॅ. माहिती चेक करायचा आळस आहे की धादांत असत्य असले तरी माझेच म्हणणे खरे म्हणून दामटायचे आहे?

जर समलैंगिकता हे मानवी "इन्व्हेन्शन" असेल- तुमच्याच भाषेत बोलायचे झाले तर- तर मग मानवेतर प्राण्यांत असा बिहेवियर दिसतो त्याची संगती आपली नैसर्गिक बुद्धी काय लावणारे जरा कळूद्या. माहिती चेक कराञचा वकूब नसणे हे जरा नवीनच आहे माझ्यासाठी.

http://en.wikipedia.org/wiki/Homosexual_behavior_in_animals

बाकी समलैंगिकता हेच जीवन असं म्हणालात तरी आमची काहीही हरकत नाही.

आपला सल्ला अन प्रवचने आपल्याकडेच ठेवावीत, अन्य लोकांना त्याची गरज असल्याच्या भ्रमात उपदेश करत फिरू नये.

पेंड्युलमच्या एका झोल्याच्या विरोधात आपण दुसर्‍या बाजूला तर स्वीकारत नाही आहोत ना हे पाहिलं की झालं.

या विधानाला काय शेंडा ना बुडखा. समजा गे-पण हे नैसर्गिक आहे असे म्हटल्यास यातून काय सिद्ध होते? आणि कशाचा स्वीकार अन त्याने नक्की काय आभाळ कोसळणारे? धड विदा नाही अन लॉजिक तर नाहीच नाही. सारासार विचार करता येत असेल तर काही अर्थ आहे चर्चेत, अन्यथा मुक्ताफळ नामक कॅटॅगिरीतच याची जिम्मा होते.

डॉक्टर म्हणून बाबा पाटलांना काही अनुभव आलेले असतील त्यांनी तसे मांडले असावेत. ते व्यक्तीशः पटलेले आहेत.

धनंजय यांचा लेखही मला व्यक्तिशः पटलेला आहे. सो व्हॉट?

स्वगतः जिकडची धुणी तिकडंच धुणे हा कार्यक्रम खुद्द मालकिण बाईने 'कांदा करेल वांदा' नं खोटा पाडलेला दिसला. नेहमीचं सोयिस्कर धोरण तिथं देखील दिसलंच. तत्त्वतः सारखंच!

हॅप्पी बर्थडे!

प्यारे१'s picture

14 Dec 2013 - 3:03 am | प्यारे१

:)

बॅटमॅन's picture

14 Dec 2013 - 3:14 am | बॅटमॅन

*ROFL*

कवितानागेश's picture

14 Dec 2013 - 12:44 pm | कवितानागेश

बिवेअर!
अ‍ॅबसेन्स ऑफ प्रूफ हा प्रूफ ऑफ अ‍ॅबसेन्स होतो काय?>
हे स्टेट्मेंट कुणालाही कधीही कुठल्याही दिशेने मारता येइल! ;)
बाकी चालुद्या..

बॅटमॅन's picture

14 Dec 2013 - 1:19 pm | बॅटमॅन

हा हा हा ;)

मराठी कथालेखक's picture

15 Dec 2013 - 12:44 pm | मराठी कथालेखक

आदिती,
तुमची लेखन शैली आवडली.. खळ्ळ खट्याक वाल्यां संस्कृतीरक्षकांना माझाही विरोध आहे.
थोडे अवांतर : हे संस्कृतीरक्षक काही वर्षापुर्वी वॅलेंटाईन डे ला तोडफोड करुन संस्कृतीरक्षण करायचे. मग त्यांच्या कळाले की यामुळे त्यांची लोकप्रियता कमी होते आहे , मग त्यांनी ते प्रकार बंद केलेत. एकुणात काय तर त्यांचे संस्कृतीरक्षण वा पुरोगामित्व मतांच्या गणितावर अवलंबून असते, एखाद्या विषयाचा खोलवर अभ्यास वा उहापोह नसतोच कधी.

काय नैसर्गिक अणि काय नाही ते ठरवण्याची गरज आहे. ते ठरवण्याचा अधिकार नक्की कोणाला ? कुठल्याही प्राण्यानी केलेले कोणतेही कृत्य किंवा कोणताही विचार हा साकल्यानि पाहता निसर्गाचाच भाग आहे.

माझे व्यक्तिगत मत असे आहे की हा व्यक्तीस्वातन्त्र्याचा प्रश्न आहे.

न्यायालयाच्या निर्णयाच्या विरोधात मी नाही, कारण कायदे बनवण्याचे काम संसदेचे आहे, ह्या कायद्यात सुधारणा व्ह्यावी असे वाटते, पण न्यायालयानी त्यात हस्तक्षेप करायला हवा होता की नाही ह्याबद्दल मत देण्याएवढा माझा अभ्यास नाही. ह्या ह्या लेखामधे ब्रिटिश कायद्याचा ह्यासंदर्भातला प्रवास दिला आहे, आपले कायदे सुद्धा कळानुरुप अभ्यासले गेले आणि गरजेनुसार बदलले पाहिजेत.

आणि महत्वाचे म्हणजे हा अतिशय कॉण्ग्रेस च्या पथ्यावर पडलेला निर्णय आहे. सध्याची राजकिय परिस्थिती बघून त्यांनीच उद्युक्त केला असावा अशी शंका मला येते. ह्यानी दोन उद्देश सफल होतात -

१) निवडणुका आणि त्यात झालेले मतांतर यापासून लोकांचे लक्ष वळवणे.
२) अनेक कट्टर हिंदु संस्थांचा (रामदेव बाबा वगैरे) कायमच समलिंगी प्रश्णांना विरोध होता. आणि त्यांचा मोदी आणि भाजपा ला उघड पठिंबा आहे, त्यामुळे राहुल आणि काँग्रेस च्या न्यायालयाविरोधात प्रतिक्रिया लगेच वाचनात आल्या, आणि त्यांना ती मते तरी खेचता येतिल, आणि मोदि / भाजपाला (त्यांचे मत आणि काळाची गरज काहीही असली तरि) सावध प्रतिक्रिया द्यावी लागेल (मी तर अजुन वाचली नाही.. )

कळावे, लोभ असावा.

काळा पहाड's picture

12 Dec 2013 - 10:43 pm | काळा पहाड

काय ठरलं मग?

वरती काहींच्या प्रतिसादांमध्ये राजकारण्यांसदर्भात लिहीले गेले आहेच. येथे किंचित सविस्तर...

भादंवि कलम ३७७ हे जुनाट आहे. नाझ फाउंडेशनच्या अपिलमधे म्हणल्याप्रमाणे, "It is based on Judeo-Christian moral and ethical standards which conceive of sex on purely functional terms, that is, for
procreation." तरी देखील त्यात समलिंगी अथवा तत्सम शब्द नाही आहेत. वर इतर प्रतिसादात देखील आले आहेच, ते इतकेच म्हणते: Unnatural offenses.--Whoever voluntarily has carnal intercourse against the order of nature with any man, woman or animal, shall be punished with 1*[imprisonment for life], or with imprisonment of either description for a term which may extend to ten years, and shall also be liable to fine. Explanation.-Penetration is sufficient to constitute the carnal intercourse necessary to the offence described in this section.

त्यातून बरेच अर्थ निघतात, पण एखादाच वकील हवा आहे ज्याला इतकेच सिद्ध करायचे आहे की Unnatural offenses म्हणजे काय ते. पण असे गृहीत धरूयात की ते कलम तसेच राहत आहे आणि ते समलिंगींच्या विरोधात आहे. मग नाझ फाउंडेशन अथवा तत्सम इतर सेवाभावी संस्थांना सरकारमान्यता कशी मिळते? ते अधिकृतपणे काम कसे करू शकतात. थोडक्यात हा मुद्दा केवळ या कलमापुरता मर्यादीत नाही. तर त्यातील सर्व कंगोरे वगैरे वन्स फॉर ऑल काढून टाकणे महत्वाचे आहे असे वाटते.

सुप्रिम कोर्टाने न्यायपत्रिकेत शेवटी काय म्हणले आहे?
While parting with the case, we would like to make it clear that this Court has merely pronounced on the correctness of the view taken by the Delhi High Court on the constitutionality of Section 377 IPC and found that the said section does not suffer from any constitutional infirmity. Notwithstanding this verdict, the competent legislature shall be free to consider the desirability and propriety of deleting Section 377 IPC from the statute book or amend the same as per the suggestion made by the Attorney General.

थोडक्यात त्यांना दिल्ली हायकोर्टाने काढलेला अर्थ बरोबर का चूक असे विचारले होते त्यांनी सांगितले तसा अर्थ काढणे चूक आहे पण कायदा बदल्यास योग्य होईल असे देखील त्यांचे मत असावे असे वाटण्यास जागा आहे.

आता राजकारणी काय म्हणाले?
खटला चालू असताना आरोग्य मंत्रालयाकडून ३७७ नाझ फाउंडेशनच्या बाजूने अधिकृत मत होते तर गृहमंत्रालयाचे मत हे ३७७ आहे तसे ठेवावे असे होते. म्हणूनच आज सुशीलकुमार शिंद्यांचे “We have to abide by the decision” असे आणि इतकेच मत प्रसिद्ध झाले आहे.

सोनीया गांधींनी डरकाळी फोडली आहे. राजकारणी (कुठल्याही पक्षाचा/विचाराचा असोत), शिंकला तरी त्यात राजकारण असते. त्यामुळे एरवी गप्प रहाण्यात पंतप्रधानांशी स्पर्धा करणार्‍या सोनीयाजींनी अथवा राहूल गांधींनी आत्ता कळवळून बोलणे यात आश्चर्य काहीच नाही.

काँग्रेसचे जयराम रमेश यांच्यासारखे काही मंत्री/नेत्यांनी स्पष्ट शब्दात कोर्टाच्या निर्णयाचा विरोध केला आहे.

भाजपा कडून सुषमा स्वराज सोनीया गांधींच्या प्रतिक्रीयेचा संदर्भ घेत म्हणाल्या, ""There is no need to be so disappointed. The Supreme Court has said the government can frame a law, Call an all-party meeting, draft a proposal. Just saying it is unfortunate won't serve any purpose, We will react when we see the government's proposal. We cannot react to the apex court judgment"

भाजपाचे राज्यसभेचे खासदार आणि राष्ट्रीय खजीनदार, पियुष गोयल यांनी "There's nothing unnatural in these relationships and I hope the law is amended at the earliest." असे म्हणले आहे. मोदी आणि जेटलींची विधाने अजून तरी दिसलेली नाहीत.

समाजवादी, तॄणमूल आणि संयुक्त जनतादल यांना निर्णय योग्य वाटला आहे आणि ते कायदा बदलण्याच्या विरोधात आहेत.

आडाखा:

भारतीय जनता अजून समलिंगी समाजाबाबत "ओपन माईंडेड" आहे अशातला भाग नाही. त्यात सर्वच राजकीय पक्षांचा मतदार येतो. त्यामुळे काँग्रेसने कितीही डरकाळ्या फोडून आपले लिबरलत्व सिद्ध करण्याचा प्रयत्न केला तरी कायदा व्गैरे बदलण्यास ते संसदेत काही ठोस करतील असे वाटत नाही. नुसताच आवाज करायचा पण काही करायचे कसे नाही हे लोकपाल बिला संदर्भात आत्ता बघणे झाले आहेच आणि अजून्ही बघत आहोतच. त्यामुळे हे फारच सोपे आहे.

पण एकंदरीत काँग्रेस नेतृत्व आणि अगदी भाजपा नेतृत्व देखील (इतर पक्षांचे माहीत नाही) समलिंगींना हक्क देण्याच्या विरोधात असतील असे वाटत नाही. तपशील कसा असेल हा अर्थातच मुद्दा आहे/राहील. त्यामुळे मला वाटते की, २०१४च्या निवडणुका होईस्तोवर हे घोंघडे परत एकदा भिजवून सुप्रिम कोर्टात टाकले जाईल, जर योग्य कारणावरून परत कोर्टात गेले आणि सुप्रिम कोर्टाने योग्य निर्णय दिला तर केस-लॉ होईल आणि राजकारण्यांना काही निर्णय न घेता, सुप्रिम कोर्टाची आज्ञा शिरसावंद्य मानतील.

बॅटमॅन's picture

12 Dec 2013 - 11:38 pm | बॅटमॅन

काय फालतूपणा चालवलाय राव. धनंजय यांचा लेख वाचायचे तरी कष्ट घेतलेत का मिपावरच्या डाक्तरांनी?

http://www.misalpav.com/node/3827

नंदन's picture

13 Dec 2013 - 12:07 am | नंदन

शिवाय समलैंगिकता इतकी वर्षं नव्हती - पाश्चात्यांच्या प्रभावामुळे सुरू झाली - मुलं टीव्हीवर पाहून समलिंगी बनतील इ. म्हणणार्‍यांनी खजुराहो वा अन्य ठिकाणची शिल्पं किंवा मनुस्मृतीसारख्या ग्रंथांतले उल्लेख पाहिले/वाचले नसावेत :)

बॅटमॅन's picture

13 Dec 2013 - 12:12 am | बॅटमॅन

नैतर काय! तरी नशीब ते सेक्शन्स ब्रिटिश आगमनानंतर आले असे कोणी म्हणत नाही ;)