समलैंगिकता- एक विकृती -विनाशाचा मार्ग

विवेकपटाईत's picture
विवेकपटाईत in काथ्याकूट
12 Dec 2013 - 7:52 pm
गाभा: 

समलैंगिक संबंधावर काही म्हणायचा आधी सृष्टीचीच्या प्रक्रीये पासून हा लेख सुरु करतो. सध्या वैज्ञानिक भाषेत म्हणायचे झाले तर "बिग बैंग" पासून सृष्टीची निर्मिती प्रक्रिया सुरु आहे. निर्मितीसाठी विभिन्न तत्व दुर्घटनावश (वैज्ञानिक भाषा) एकत्र आले आणि आजची सृष्टी डोळ्यांसमोर आहे.

आमच्या सारखे लोक असंख्य परमेश्वराला मानणारे लोकांच्या मते परमेश्वराच्या मनात एका पासून अनेक होण्याची इच्छा निर्माण झाली आणि सृष्टीच्या निर्मितीची सुरवात झाली. प्रथम माया आणि माये पासून या मायावी सृष्टीची निर्मिती झाली. त्या काळापासून परमात्मा रचित प्रत्येक जीव/ पदार्थ "एका पासून अनेक होण्याची" इच्छा मनात धारण करून सृष्टी निर्मितीची परमेश्वराची इच्छा पूर्ण करीत आहे. आपल्या सृष्टीचा विकास या मुळेच होत आहे. जेंव्हा ही इच्छा संपेल सृष्टी ही संपेल. आपल्या ज्ञात ब्रम्हांडाचा अंत होईल.

परमेश्वराने 'स्त्री-पुरुष' या रूपाने मानवजातीची निर्मिती केली आहे. सृष्टीतल्या अन्य जीवांप्रमाणे 'एका पासून अनेक होण्याची' परमेश्वरी इच्छा आपल्यात ही आहे. हीच इच्छा मनात धारण करून स्त्री-पुरुष एका दुसरऱ्या कडे आकर्षित होतात. स्त्री 'बीज', 'पुरुष वीर्य' धारण करते आणि मानवाची एका पासून अनेक होण्याची मूळ इच्छा पूर्ण होते. स्पष्ट आहे, स्त्री-पुरुषांच्या मीलनाचा मूळ उद्दिष्ट संतान प्राप्ती होय. या मुळेच 'एका पासून अनेक होण्याची" मानवाची इच्छा पूर्ण होते व आनंद ही मिळतो. केवल यौन आनंदा साठी ठेवलेल्या स्त्री-पुरुष संबंधाना आपल्या प्राचीन मनीषीनी कधीही उचित मानले नाही कारण अश्या संबंधा मुळे समाजात विकृती पसरते. म्हणून प्राचीन ऋषी-मुनींनी (सर्व धर्म आणि परंपरेत) स्त्री-पुरुषांच्या या संबंधाना 'विवाह' या रूपाने परिभाषित केले.

आज समाजातले तथाकथित बुद्धीजीवी (अति शहाणे) समलैंगिकतेला संबंधाना आणि विवाहांना मान्यता द्या अशी मागणी करत आहे. त्यांना एकाच विचारायचं आहे, समलैंगिक व्यक्ती परमेश्वर प्रदत्त मानवाची 'एका पासून अनेक होण्याची' मूळ इच्छा पूर्ण करू शकतो का? आपण सर्वाना माहित आहे. बिना पुरुष वीर्य धारण केल्या स्त्री बीज फलित होऊ शकत नाही. समलैंगिक व्यक्ती 'एका पासून अनेक होण्याची' मानवाची मूळ इच्छा कधीच पूर्ण करू शकत नाही. आपणास वाटत असेल केवळ यौन आनंदा साठी समलैंगिक संबंध ठेवले जात असतील. पण इथे एक गोष्ट नमूद कारणे जरुर आहे. 'आनंद' निर्मिती मधे असतो, जिथे निर्मिती नाही तिथे आनंद मिळण्याची यत्किंचित ही शक्यता नाही’. समलैंगिक व्यक्तींना 'यौन आनंद' कधीच प्राप्त होत नाही. अश्या व्यक्ती आयुष्यभर पीडा आणि दुख: भोगतात, हेच वास्तव. खरे म्हणजे समलैंगिकता माणसात दडलेली एक विकृती आहे. एक मानसिक आजार आहे. योग्य डॉक्टरी सल्ला आणि चिकित्सा केल्यास त्याला या विकृती पासून मुक्ती सहज मिळू शकते. मानसिक विकृती नेहमीच झपाट्याने कुठल्याही समाजात तीव्रतेने पसरते. समलैंगिकतेला प्रोत्साहन देणे म्हणजे मानवजातीला विनाशाच्या मार्गावर प्रवृत्त कारणे होय. या विकृतीला प्रोत्साहन दिल्यास सृष्टी निर्मितीचे चक्र तुटून जाईल आणि मानवजाती समेत संपूर्ण सृष्टीचा विनाश होईल. हे आपल्याला चालेल का?

प्रतिक्रिया

ज्यांना जे हवे ते करु द्यावे...असल्या गोष्टींमुळे विनाश झाला असता तर केव्हाच झाला असता...
आपण का उगाच ह्या चर्चा (खरतर वांझोट्या चर्चा म्हणायचा मोह आवरत नाही) करून वेळ वाया घालवायचा?

तुमचा अभिषेक's picture

13 Dec 2013 - 11:01 pm | तुमचा अभिषेक

सहमत, पुढे झालेली घिसीपिटी आपल्या भाषेत सो कॉलड वांझोटी चर्चा वाचायची जराही इच्छा नाही.

मात्र जर प्रजोत्पादन वा निर्मिती वगैरे हेच निकष लावायचे ठरवले तर हस्तमैथुन सुद्धा अनैसर्गिकच झाले.. असो !

शैलेन्द्र's picture

12 Dec 2013 - 8:04 pm | शैलेन्द्र

हे अन ते..
लोकहो, तुमच्या खाजगी आयुष्यात नाक खुपसायचा आम्हाला अधिकार नाही आणि आमची खाजगी मतं बदलायची तुम्हाला गरज नाही..
जोवर आपल्याला एकमेकांचा त्रास नाही तोवर फुकट एकमेकांच्या नाकातल्या खपल्या का काढाव्या?

इष्टुर फाकडा's picture

12 Dec 2013 - 8:12 pm | इष्टुर फाकडा

'आनंद' निर्मिती मधे असतो, जिथे निर्मिती नाही तिथे आनंद मिळण्याची यत्किंचित ही शक्यता नाही’. समलैंगिक व्यक्तींना 'यौन आनंद' कधीच प्राप्त होत नाही. अश्या व्यक्ती आयुष्यभर पीडा आणि दुख: भोगतात, हेच वास्तव.

मग कंडोम च्या वापराबद्दल तुमची काय मते आहेत? गरज नसताना खाण्यामधून फक्त विष्ठेच्या निर्मितीचा आनंद घ्यायचा का? सगळ्याच मानवांना एका पासून अनेक होण्याची इच्छा असते हे हास्यास्पद आहे. लोकांच्या बेडरूम मध्ये शिरण्याचा नैतिक अधिकार कोणालाही नाही.

विद्युत् बालक's picture

12 Dec 2013 - 8:14 pm | विद्युत् बालक

उद्या पुढे मागे समलैगिकता हे हूच्चब्रू तेचे सिम्बल होणार हे नक्की आहे !
उद्या कोण्या मुलीने "यु नो माय हबी इस बाय स्टील ही लव्ज मी लॉट " असे आनंदाने म्हटले तरी आश्चर्य वाटू नका .

आबा's picture

13 Dec 2013 - 2:03 am | आबा

At least they'll have an advantage of being true.

मृत्युन्जय's picture

13 Dec 2013 - 11:31 am | मृत्युन्जय

Bisexuality is a gift. It immediatley doubles your chances of getting a date on a Saturday evening. ;)

- Author Unknown

प्रकाश घाटपांडे's picture

12 Dec 2013 - 8:15 pm | प्रकाश घाटपांडे

http://www.aisiakshare.com/node/2345 येथील चर्चा जरुर वाचावी. मिपावरील http://www.misalpav.com/node/26406 चर्चा उद्बोधक आहे. समलैंगिकतेला विकृती मानणे हे अज्ञानातुन निर्माण झाले आहे. समलिंगिकते मागील प्रेरणा ही नैसर्गिकच असते.

काय अप्रतिम लेख आहे. पूर्ण सहमत आहे हेवेसांनल. ब्रह्मचर्य हेच जीवन हे मात्र विसरलात बरे का धागाकर्ते साहेब. तुमचा विरुद्धलिंगी संभोग कित्ती जरी णैसर्गिक वैग्रे असला तरी ब्रह्मचर्य हेच जीवन अन वीर्यनाश हा मृत्यू हे विसरलात तर त्याच्याइतके दुर्दैवी काही नसेल.

अविनाशकुलकर्णी's picture

12 Dec 2013 - 8:38 pm | अविनाशकुलकर्णी

सुप्रिम कोर्टाच्या निर्णयाने समाज २ पाऊले मागे गेला होता...कशाला करता काळजी सोनिया राहुल वटहुकुम काढणार आहेत..समाजाला ४ पाऊले पुढे नेण्या साठी..........

राजेंद्र मेहेंदळे's picture

12 Dec 2013 - 8:54 pm | राजेंद्र मेहेंदळे

असे एकदा म्हटल्यावर प्रश्नच कुठे आला?
*dash1* *DASH* *WALL*

खटासि खट's picture

12 Dec 2013 - 9:43 pm | खटासि खट

केवळ स्त्रियांसाठी
असे बोर्डस बेकायदेशीर ठरले का ?

सहसा मी अश्या धाग्यांवर प्रतिसाद देत नाही पण काही महत्वाचे प्रश्न आहेत
सृष्टीची प्रेरणा एका पासून अनेक होणे हीच आहे, हे कसे ठरवलेत? (कृपया परमेश्वरी इच्छा वगैरे जार्गन बाजूला ठेवून स्पष्टीकरण शोधायचा प्रयत्न करा.)

तुम्ही तसा प्रयत्न करणार नाही याची कल्पना आहे. आपल्या मर्यादित आकलन क्षमतेच्या बाहेर बरीच सृष्टी असते. स्वतःला प्रमाण माणून वैश्विक नियम तयार करण्याची प्रेरणा अनेकवेळा अंगलट आलेली आहे. तुम्हीही तीच चूक करत आहात. कायदा वगैरे बाजूला ठेवा पण आजिबात माहिती नसताना स्वतःच्या अश्मयुगीन ज्ञानावर विसंबून राहून तुम्ही जजमेंट्स तयार करणार आणि कोणितरी दुखावले जाणार हे लक्षात येत नाही का? लैंगिक प्रेरणा ही गोष्ट मॉस्लोच्या उतरंडीवरच्या सर्वात तळाला आहे. कोणाच्या इतक्या मूलभूत स्वरूपाच्या हक्कांवर बंधने घालण्याच्या नैतिक अधिकार तुम्हाला आहे का? डॉक्टरी सल्ल्याबद्दल बोलताहात म्हणून सांगतो, आधुनिक वैद्यकशास्त्राला प्रमाण मानणार्‍या एखाद्या डॉक्टरांना "एकापासून अनेक व्हायची प्रेरणा", "निर्मितीचा आनंद" वगैरे बुलशीट सांगून पहा. कदाचित ते तुमचेच काउंसेलिंग करतिल.
बाकी सृष्टी स्वतःची काळजी घेण्यास समर्थ आहे. सध्या फक्त मानवप्राण्याच्या जीवशास्त्राविषयीच अज्ञान दूर केलंत तरी पुरे.
असो शुभेच्छा

अत्रुप्त आत्मा's picture

13 Dec 2013 - 12:14 am | अत्रुप्त आत्मा

@ सृष्टीतल्या अन्य जीवांप्रमाणे 'एका पासून अनेक होण्याची' परमेश्वरी इच्छा आपल्यात ही आहे. हीच इच्छा मनात धारण करून स्त्री-पुरुष एका दुसरऱ्या कडे आकर्षित होतात. स्त्री 'बीज', 'पुरुष वीर्य' धारण करते आणि मानवाची एका पासून अनेक होण्याची मूळ इच्छा पूर्ण होते. स्पष्ट आहे, स्त्री-पुरुषांच्या मीलनाचा मूळ उद्दिष्ट संतान प्राप्ती होय. >>> http://www.sherv.net/cm/emoticons/shocked/you-dont-say-smiley-emoticon.gif

सांजसंध्या's picture

13 Dec 2013 - 9:28 am | सांजसंध्या

अशी किती भुतं बाळगून आहात ? ;)

अत्रुप्त आत्मा's picture

13 Dec 2013 - 10:50 am | अत्रुप्त आत्मा

@अशी किती भुतं बाळगून आहात ? >>> =)) भू'तलावरील मृत लोकसंख्ये एव्हढी! =))

वेगवेगळे चेहेरे माझे,वेगवेगळे मुखवटे ही। http://www.sherv.net/cm/emoticons/horror/vampire-mask-smiley-emoticon.gif
अश्या भावनी लिहिले कोणी,केवळ हसतो ह्ही..ह्ही..ह्ही!!! http://www.sherv.net/cm/emoticons/memes/troll-face-meme-smiley-emoticon.gif

बॅटमॅन's picture

13 Dec 2013 - 4:18 pm | बॅटमॅन

ह्ही..ह्ही..ह्ही!!!

जरी म्हण्शील ई ई ई तरी मी असा हासेन ह्ही..ह्ही..ह्ही!!! ;) =)) कै आठवतं का लोकहो :yahoo:

सूड's picture

13 Dec 2013 - 4:48 pm | सूड

>>कै आठवतं का लोकहो

तर तर !! आम्ही काय भांडे लपवित नाही. :#

अत्रुप्त आत्मा's picture

13 Dec 2013 - 4:53 pm | अत्रुप्त आत्मा

खाटुकखुडखुडे म्यानंगुडगुडे.... खट्याक...खट्याक...खट्याक...!!! =))

खाटुकखुडखुडे म्यानंगुडगुडे.... खट्याक...खट्याक...खट्याक...!!!

एक सुधारणा फक्त. ते "खट्याक" ऐवजी "खटक्यांव्" पाहिजे होतं.

माननीय लेखक महाशय यांची तळमळ दिसून आली. आता एक संकट येऊ घातलंय त्याबद्दल लेखकांकडून मार्गदर्शन मिळू शकेल, तसंच या संकटातून मुक्तीचा मार्गही मिळू शकेल या भाबडया आशेने इथं येणा-या संकटाविषयी लिहीत आहे.

केंद्र सरकार कोर्टाच्या निकालाविरुद्ध वटहुकूम आणणार आहे. म्हणजेच प्रत्येक व्यक्तीला समलैंगिक संबंध ठेवणं कायद्याने बंधनकारक होणार आहे अशी भीती बाळगायला हरकत नाही. या प्रश्नात आपण लक्ष घालावे आणि देशभक्त बांधवांना दिलासा द्यावा ही नम्र विनंती.

आतिवास's picture

13 Dec 2013 - 8:17 am | आतिवास

मी टाईम मशिन वापरुन चुकून पंधराव्या किंवा सोळाव्या (किंवा कितव्याही, पण नको असलेल्या!)शतकात तर गेले नाही ना? :-(

चौकटराजा's picture

13 Dec 2013 - 10:02 am | चौकटराजा

सृष्टीला स्वत: ची काही आकांक्षा नाही. कारण ती असार आहे. पण स्थित्यंतर हा सृष्टीचा स्थायीभाव आहे. हे घडण्यासाठी
अनेक योजना विश्वात आहेत. मानवी संस्कृतीतील असे संभ्रम , विवाद, हे कशाच्या तरी निर्मिती साठी व कशाच्या तरी नाशासाठीच आलेले आहेत. कारण ' स्थित्यंतर'. एखाद्या माणसाला दुसर्‍याचा खून करण्याची इच्छा होणे हे देखील स्थित्यंतर हे उद्देष्ट ठेवूनच होते.
बाकी प्रजानिर्मिती ही स्थित्यंतर' घडण्यासाठी असते. त्यात प्रेम माया , वासना यांचा मुलामा जीवामात्रात चढविला जातो
इतकेच.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

13 Dec 2013 - 10:11 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सृष्टीचा विनाश होईल असं कै वाटत नाही. बाकी, चर्चा चालू द्या....!

-दिलीप बिरुटे

llपुण्याचे पेशवेll's picture

13 Dec 2013 - 11:22 am | llपुण्याचे पेशवेll

लेखकाच्या विचारांशी अंशतः सहमत आहे. समलिंगी वाले लोक मला तरी एक प्रकारचा मानसिक रोग असलेले वाटतात. मी देवाला प्रार्थना करत असतो की या लोकांना देखील चांगली बुद्धी देऊन नॉर्मल बनव.
एखादा मनुष्य समलिंगी असेल तर मला काहीही प्रॉब्लेम नाही एक रुग्ण म्हणून दुर्लक्ष करता येईल परंतु हल्ली हुच्चभ्रू विचारजंतांनी या समलिंगीत्वाचा जो काही बाऊ केला आहे आणि त्याला विरोध असणारे म्हणजे प्रतिगामी बुरसटलेले असा जो काही बाहुला उभा केला आहे त्याची प्रचंड चीड येते. ज्याना असे वाटत असेल की न्यायालयाच्या निर्णयाने देश ४ पावले मागे गेला, त्यांनी खुशाल देश सोडून जावे. आणि समलिंगी लोकांच्या संबंधांचा जो प्रचंड प्रचार, चर्चा, जाहीरात केली जात आहे ती डोक्यात जाणारी आहे.
असो.
देवा या विचारजंतांनाही चांगली बुद्धी दे.

चिरोटा's picture

13 Dec 2013 - 1:09 pm | चिरोटा

परंतु हल्ली हुच्चभ्रू विचारजंतांनी या समलिंगीत्वाचा जो काही बाऊ केला आहे आणि त्याला विरोध असणारे म्हणजे प्रतिगामी बुरसटलेले असा जो काही बाहुला उभा केला आहे त्याची प्रचंड चीड येते.

+१. अशा प्रकारचे लोक्(समलिंगी)मिडिया,फॅशन्,चित्रपटसृष्टी उद्योगात बरेच आढळतात. देश सोळाव्या शतकात गेला,देशाचे आता खरे नाही वगैरे जे चालु आहे त्यात हे लोक आघाडीवर आहेत.समलिंगींविरुद्ध लिहिले की मग लिहिणारे तालिबानी,बुरसटलेल्या विचारांचे होतात.

शैलेन्द्र's picture

13 Dec 2013 - 1:10 pm | शैलेन्द्र

+११११
तुमचे "ओरीएंटेशन्स" तुमच्या-तुमच्यात ठेवा ना, आम्हाला त्याचा त्रास नाही आणि आमची मान्यताही मागू नका

नावातकायआहे's picture

13 Dec 2013 - 4:07 pm | नावातकायआहे

तुका म्ह्णे शांत रहावे
जे जे होईल ते ते पहावे

अनुमोदन किंवा नकार हा ज्याच्या त्याच्या बौधिक पातळीचा निर्देशांक आहे!

उद्दाम's picture

13 Dec 2013 - 11:26 am | उद्दाम

'आनंद' निर्मिती मधे असतो, जिथे निर्मिती नाही तिथे आनंद मिळण्याची यत्किंचित ही शक्यता नाही’. समलैंगिक व्यक्तींना 'यौन आनंद' कधीच प्राप्त होत नाही. अश्या व्यक्ती आयुष्यभर पीडा आणि दुख: भोगतात, हेच वास्तव.

हस्तमैथुन हाही गुन्हाच का? जर तो गुन्हा नसेल, आणि त्याने आनंद निर्माण होत असेल तर यौन आनंदाचा आग्रह का हवा?

ऋषिकेश's picture

13 Dec 2013 - 12:10 pm | ऋषिकेश

प्रचंड विनोदी धागा!

भिन्नलिंगी व्यक्ती या त्यांच्या लहान वयात आजुबाजुला अशा गोष्टी बघुन किंवा त्यांच्यावरच असे प्रसंग आल्याने निर्माण झालेली विकृती असते असे कोणी म्हटले तरी आता आश्चर्य वाटणार नाही!!

म्हैस's picture

13 Dec 2013 - 12:12 pm | म्हैस

हीच इच्छा मनात धारण करून स्त्री-पुरुष एका दुसरऱ्या कडे आकर्षित होतात.

ह्याच्याशी मी अजिबात सहमत नाही . परंतु हि विकृती आहे, निसर्ग नियमांमध्ये ढवलाढवळ अहे. हे कुसंस्कार आहेत . ह्याच्याशी मात्र सहमत आहे .
बाकी व्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली हे बरोबर आहे म्हणून हवेत उडणार्यान्ना जेव्हा त्यांचीच मुले , भाऊ , बहिण किवा इतर कोणी असा जबरदस्त धक्का देतील तेव्हा हे हवेत उडण्याच विसरून धडकन तोंडावर आपटतील .

समलैंगिकतेला विकृती मानणे हे अज्ञानातुन निर्माण झाले आहे. समलिंगिकते मागील प्रेरणा ही नैसर्गिकच असते.

आपण समाजात राहतो . जो पर्यंत आपल्या घरापर्यंत येत नाही, आपल्याला त्रास होत नाही म्हणून अश्या चुकीच्या गोष्टींना विरोध न कारण हीच वृत्ती समाजाला घटक ठरते . आत्ता हे थोड आहे म्हणून . पण नंतर ह्याला नैसर्गिक समजून हि कीड जर संपूर्ण समाजात फोवावली तर पुढे काय परिणाम होतील हा साधा विचार मनात येत नाही का?

नंदन's picture

13 Dec 2013 - 12:38 pm | नंदन

बाकी व्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली हे बरोबर आहे म्हणून हवेत उडणार्यान्ना जेव्हा त्यांचीच मुले , भाऊ , बहिण किवा इतर कोणी असा जबरदस्त धक्का देतील तेव्हा हे हवेत उडण्याच विसरून धडकन तोंडावर आपटतील .

हा सोयीस्कर निष्कर्ष झाला. चित्रा पालेकरांचं उदाहरण दुसर्‍या धाग्यावर आहेच, पण माझ्याच शाळेतल्या मैत्रिणीच्या मराठी मध्यमवर्गीय पालकांचं उदाहरणही माहितीत आहे. शिवाय दुटप्पी वागणारे लोक (समाजात एक भूमिका, घरी निराळी) हे असतातच. हुंडा, जात-पात मानणे हीच उदाहरणं घ्या. त्यांची मूळ मुद्द्याशी गल्लत करण्यात काय हशील?

आत्ता हे थोड आहे म्हणून . पण नंतर ह्याला नैसर्गिक समजून हि कीड जर संपूर्ण समाजात फोवावली तर पुढे काय परिणाम होतील हा साधा विचार मनात येत नाही का?

समलैंगिकता हा साथीचा रोग थोडाच आहे की कलम ३७७ रद्द केलं रे केलं की संपूर्ण समाजात फोफावेल? शिवाय आजपर्यंत इतर देशांत समलिंगी संबंधांना मान्यता मिळाली आहे, त्यांच्या समाजजीवनावर काही विपरीत परिणाम झालेला आढळलेला नाही. युरोपियन देशांचं जाऊ द्या, नेपाळसारख्या आपल्या संस्कृतीशी साधर्म्य असणार्‍या देशाचं उदाहरणही पुरेसं बोलकं ठरावं.

एकंदर राहुल गांधी आणि समलिंगी यांच्याविरोधात बोलण्यास आता मनाई आहे असे जाणवते.

भारतात अनेकांना "होमोफोबिया" या मानसिक आजाराची लागण आहे असे वाचनात होते. मराठी आंजावर अनेकांची मते वाचल्यावर त्यांची संख्या बरीच मोठी आहे हे जाणवले. केवळ सामान्य व्यक्तीच नाही तर काही वैद्यकशास्त्राशी संबंधित लोकही या आजाराने ग्रस्त दिसतात.

या आजारावर अजून तरी औषध निघालेले नाही (पुढे निघेलही कोणी सांगावे?). तोवर किमान या लोकांनी योग्य वेळी समुपदेशन वगैरे उपचाराद्वारे काही उपयोग होतो का ते बघावे.

साती's picture

13 Dec 2013 - 1:25 pm | साती

शुंदल प्लतिशाद!

राजेंद्र मेहेंदळे's picture

13 Dec 2013 - 1:24 pm | राजेंद्र मेहेंदळे

>>>या विकृतीला प्रोत्साहन दिल्यास सृष्टी निर्मितीचे चक्र तुटून जाईल आणि मानवजाती समेत संपूर्ण सृष्टीचा विनाश होईल. हे आपल्याला चालेल का?>>>
पण मग विरुद्धलिंगी व्यक्तींना प्रोत्साहन दिल्यास सृष्टी निर्मितीचे चक्र अचाट वेगाने फिरुन लोकसंख्या विस्फोट होईल आणि ते सुद्धा फारच महागात पडेल..काहीतरी मध्यममार्ग काढा बुवा

खटासि खट's picture

13 Dec 2013 - 1:38 pm | खटासि खट

एका पासून अनेक होण्याची" इच्छा >>
महाराज धृतराष्ट्राच्या पत्नीने असंच काही तरी केलं होतं ना ? पुन्हा ते तंत्रज्ञान वापरायला हवं.

सध्या भारताला "एकापासुन अनेक" ची इच्छा नको, तर "एकापासुन एकच" ची गरज आहे.

प्रसाद गोडबोले's picture

13 Dec 2013 - 2:28 pm | प्रसाद गोडबोले

ह्याला म्हणतात अकलेचे तारे तोडणे !!

मराठी कथालेखक's picture

13 Dec 2013 - 3:01 pm | मराठी कथालेखक

मी याबद्दल एक लेख वाचल्याचं आठवतं. नेमके शब्द आणि तपशील जरी आठवत नाहीयेत पण साधारण अर्थ असा होता की "लैंगिकतेच्या विकासात अवयव आणी हार्मोन्स या दोन्हीचा योग्य विकास महत्वाचा असतो. पण काही व्यक्तीच्या बाबत यामध्ये गुंतागुंत निर्माण होते. मग अवयव स्त्रीचे आणि हार्मोन पुरुषाचे (वा याविरुध्द) अशी परिस्थिती निर्माण होते. यामुळे समलिंगी आकर्षण, उभयलिंगी आकर्षण ह्या विकृती ही निर्माण होतात. अनेकदा अशा व्यक्ती संततीनिर्मितीस अक्षम असतात"

मला वाटते समलिंगी संबंध हा समाजाच्या दृष्टीने संवेदनशील विषय असला तरी त्याकडे पाहताना जीवशास्त्रीय माहितीचे भानही ठेवले पाहिजे.

परंतु याबरोबरच कोणत्याही आकर्षणात शारिरिक प्रेरणे बरोबरच संस्कारांचा ही काही भाग असेल असे मला वाटते. तेव्हा समलिंगी संबंधांची ईतकी जास्त चर्चा वा जाहिरातही होवू नये की कोवळ्या/अपरिपक्व मुलांमध्ये त्या आकर्षणाचा काही संस्कार घडण्याची शक्यता निर्माण व्हावी.

विवेकपटाईत's picture

13 Dec 2013 - 7:43 pm | विवेकपटाईत

सर्वाना धन्यवाद.

'आपल्याला माहितच आहे घरातल्या एका व्यक्तीच्या 'चांगल्या/ किंवा वाईट कार्यामुळे, घरातल्या सर्वांवरच त्याच्या प्रभाव पडतो.

पण स्वत:च्या घरात असा प्रकार घडला तर कोणाला ही आवडणार नाही. कुणीही आई वडील कितीही प्रगत विचारांचे असले तरी ही त्यांना आपल्या मुला साठी बायको/नवरा पुरुष म्हणून आवडणार नाही. हे १००% टक्के खर आहे.

मी स्वत: समलिंगी संबंधाना अपराध मानीत नाही, फक्त एक विकृती मानतो. विकृती मनात कुठून ही आली असली आपण उपाय शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे. विकृतीला मान्यता देणे म्हणजे पळवाट.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

13 Dec 2013 - 8:43 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

विकृती मनात कुठून ही आली असली आपण उपाय शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

शास्त्रज्ञ हेच करत आहेत. फक्त काय आहे ना, की शास्त्रज्ञ याला विकृती मानत नाहीत. आयुष्यभर, या विषयाचा अभ्यास करणाऱ्या लोकांना जे मान्य नाही ते सामाजिक शास्त्र/ विज्ञान म्हणून पसरवण्याचा अगोचरपणा कशाला?

कुणीही आई वडील कितीही प्रगत विचारांचे असले तरी ही त्यांना आपल्या मुला साठी बायको/नवरा पुरुष म्हणून आवडणार नाही. हे १००% टक्के खर आहे.

आणि ही तुमची आकडेवारी कुठून आली? इथले व्हीडीओ पहा. सगळ्या मुलाखती LGBT लोकांच्या आहेत. यातल्या अनेकांच्या आईवडलांनी त्यांच्या मुलांच्या लैंगिकतेचा स्वीकार केला आहे. त्यातून नाही केला आई-वडलांनी स्वीकार तर काय फरक पडतो? दोघांना एकत्र रहायचं आहे आणि आईबापाने विरोध केला म्हणून पळून गेले, असले भिकार टाईप्स हिंदी सिनेमे पाहिलेले नाहीत का? तसंच हे ही लोक करतील.

आबा's picture

13 Dec 2013 - 8:46 pm | आबा

का नाही आवडणार?
काय उपकार आहेत की काय चालवून घेणं म्हणजे...
एखाद्याच्या "मूलभूत" अधिकारावर गदा न आणने म्हणजे प्रगत विचार का?
हे म्हणजे युद्ध न करण्यासाठी शांततेच नोबेल देण्यासारखं नाही का?

विनायक प्रभू's picture

13 Dec 2013 - 8:36 pm | विनायक प्रभू

चालेल ़का?
हो.
काय व्हायचे एकदा होउन जाउ दे.

विसुनाना's picture

14 Dec 2013 - 4:22 pm | विसुनाना

लेखक महिदय, तुम्ही जर समलैगिक असतात तर तुमचे समलैगिकतेबाबत काय विचार असते?