रामायणात एक सुन्दर गोष्ट आहे.
विश्वामित्रांनी दशरथाकडून राम-लक्ष्मणांना राक्षसांच्या वधासाठी मागून नेले, तेव्हा त्यांना वनात प्रथम बला-अतिबला या दोन विद्या शिकवल्या. त्यानंतर जेव्हा त्यांना दिव्यास्त्रे देण्याची वेळ आली तेव्हा काही अस्त्रे विश्वामित्रांनी दोघांना दिली आणि त्यानंतर ते म्हणाले,
यानंतर काही अस्त्रे मी फक्त रामालाच देणार आहे. कारण त्यांचा वापर करण्यासाठी लागणारा संयम फक्त त्याच्याकडेच आहे.
महाभारतातही अशीच काहीतरी गोष्ट आहे.अर्जुन आणि अश्वत्थाम्याची.
या सर्व गोष्टी आता आठवण्याचे कारण असे की नव्याने येऊ घातलेल्या अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यात देखील अशीच एक तरतूद आहे, ती म्हणजे अन्धश्रद्धेच्या प्रकरणात पिडीत व्यक्तीशिवाय ईतर त्रयस्थ व्यक्ती देखील तक्रार करू शकते.
या तरतूदीचे रूपांतर अश्वत्थाम्याचा हातातील ब्रह्मास्त्रात होउ नये एव्हढीच अपेक्षा.
प्रतिक्रिया
12 Dec 2013 - 11:47 am | वडापाव
काल-परवाच याविषयी एबीपी माझावर सविस्तर चर्चा झालेली पाहिली होती. त्यात शाम मानव सुद्धा होते. तू-नळीवर त्या चर्चेचा धागा शोधतोय पण सापडत नाहीये.
हा धोका असला तरीही ही तरतूद करणं त्याहून जास्त महत्त्वाचं वाटतं कारण जो अत्याचार करतो, तो तर तक्रार करणार नाही... आणि जो अत्याचार सहन करतो, तो आपल्याच माणसांना शिक्षा होऊ नये या भितीपोटी, किंवा, 'आपण हे सगळं भोगलंच पाहिजे... तरच आपलं चांगलं होईल' या अंधश्रद्धेपोटी तक्रार करत नाही. त्यामुळे अशा परिस्थितीत तिस-या व्यक्तीने मध्यस्थी केलेलीच बरी असं वाटतं. या तरतुदीचा तिस-या व्यक्तीला फायदा होण्याऐवजी नुकसान होण्याचीच जास्त लक्षणं दिसतात. अत्याचार सहन करणा-या माणसाची हिम्मत होत नाही हे बघून त्याचं भलं करण्याच्या फंदात एखादा तक्रार करायचा, आणि चौकशी सुरु झाल्यावर अत्याचार सहन करणा-या व्यक्तीसकट सगळ्या संभाव्य साक्षीदारांनी दबावाखाली येऊन पल्टी मारावी, म्हंजे पडला का त्रयस्थ माणूस तोंडावर!!!
या तरतुदीचा गैरफायदा घेता येऊ शकतो म्हणता - असेलही. पण म्हणजे नेमका कसा याबाबतीत मात्र साशंक आहे. एखाद्या उदाहरणातून समजवू शकाल का??
12 Dec 2013 - 1:08 pm | आनन्दा
आता क्रमांक बदलले असतील, पण
१. हे सर्व गुन्हे दखलपात्र आणि अजामीनपात्र असतील असे कायदा सांगतो.
२. नियम १३ प्रमाणे - ज्यायोगे मानसिक/ शारिरिक /आर्थिक बाधा पोचत नाही अश्या गोष्टी या कायद्यांमध्ये येत नाहीत.
याचाच व्यत्यास म्हणजे - ज्यायोगे मानसिक/ शारिरिक /आर्थिक बाधा पोचू शकते त्या सर्व गोष्टी या कायद्या-अन्वये दखलपात्र/ अजामीनपात्र गुन्हा आहेत. या संदिग्धतेमुळे खालील परिस्थिती येउ शकते -
मी घरात सत्यनारायण घातला - सत्यनारायणाच्या कथेत देवाचा कोप झाल्याच्या अनेक कथा आहेत. म्हणजेच याचा अर्थ असा होउ शकतो की मी अतींद्रीय शक्तींच्या भीतीने ही पूजा घातली, आणि जर लोकांना तीर्थप्रसादाला बोलावले, तर त्याचा प्रचार केला असे देखील होउ शकते.
आता गम्मत म्हणजे हा अजामीनपात्र गुन्हा आहे. माझे माझ्या भागातील पोलीस अधिकार्याशी जमत नाही, काही कारणामुळे. शेजार्याशी माझा जमीनीवरून वाद आहे. शेजार्यानी तक्रार केली, आणि काही शहानिशा न करता मला अटक झाली. कारण "दखलपात्र आणि अजामीनपात्र"
किंवा सत्यनारायण सोडा, उद्या मी कोणाला गोमूत्र प्यायला दिलं तरी देखील तो "दखलपात्र" गुन्हा होउ शकतो. पंचगव्य हा तर हिंदूंमधला पवित्र विधी आहे.
हे झाले मला सहज दिसणारे मुद्दे. मी काही कायदेपंडीत नाही, तेव्हा यामध्ये कायदेपंडीत अधिक भाष्य करू शकतात.
12 Dec 2013 - 1:16 pm | आनन्दा
"एखादी व्यक्ती अपशकुनी आहे, रोगराई पसरण्यास कारणीभूत आहे इत्यादी सांगून त्या व्यक्तीचे जगणे मुश्कील करणे. "
- यासाठी सामाजिक बहिष्काराला प्रतिबंध करणारा कायदा आहे. त्यासाठी या "दखलपात्र, अजामीनपात्र आणि थर्ड पार्टी च्या तक्रारी घेणार्या" कायद्याची गरज नाही.
या तीन गोष्टी वरील कारणासठी खोडसाळपणे वापरल्या तर काय होईल याचा विचारही करवत नाही.
13 Dec 2013 - 7:23 pm | बाबा पाटील
मी कोणाला गोमूत्र प्यायला दिलं तरी देखील तो "दखलपात्र" गुन्हा होउ शकतो.......,माझ्या असायटीस, दमेकरी, राजयक्ष्मा,वजनदार पेशंट या सगळ्यांच दणकुन गोमुत्र पाजतो राव ते पण आता कस व्हायच्,आणी रामदेव बाबांच्या गोझरण अर्काच कस होणार
13 Dec 2013 - 6:12 pm | संपत
ह्या तक्रारी केवळ निरीक्षक दर्जाचा अधिकारीच नोंदवू शकेल,तो एवढे तारतम्य बाळगेल असे श्याम मानव म्हणालेसे वाटते. पुजाऱ्याकडून नोकरीत बढती मिळावी म्हणून घातल्या गेलेल्या सत्यनारायणाच्या पुजेला तो आक्षेप घेणार नाही कदाचित,पण जर एखाद्या मांत्रिकाकडून मी अकस्मात धनलाभ व्हावा म्हणून वेताळ किंवा मरीआईचा काही विधी केला तर तो हे तारतम्य किती दाखवेल ह्यात शंकाच आहे.कारण सत्यनारायण हा प्रस्थापितांचा देव आहे तर वेताळ हा काही विशिष्ट जमातींचा.
13 Dec 2013 - 7:24 pm | विवेकपटाईत
काय द्या ह दुरुपयोगा साठीच वापरण्याची शक्यता जास्त. (आपली यंत्रणा आधीच कुचकामी आहे, त्यात गावांत आपसी दुही ही असतेच. रत्यावर बसणार पोपट घेऊन भविष्य सांगणारे , जोतिषी पण काय द्याचा कचाट्यात सापडतील. (दूरदर्शन वर कोट पेंट घातलेले निवडूकीत कोण जिंकणार सांगणारे 'विशेषज्ञ' असतात, ते सापडणार नाहीत).
15 Dec 2013 - 1:33 pm | प्रसाद गोडबोले
कायदा अत्यावश्यकच होता
पण
पैजेवर सांगतो ह्या कायद्याचा दुरुपयोग होणारच आहे ...सर्वांनी तयार रहावे ..
ज्योतिष लोकांनी म्हणे ह्या कायद्याचा बडगा बसु नये म्हणुन डिस्क्लेमर साईन करुन घ्यायचं ठरवलय . आणि लग्गेच अंनिसने असला डिस्क्लेमर कायद्यापुढे चालणार नाहे हे घोषितही केलय (मग तर ह्या हिशेबाने म्युचुअल फंडांनाही ह्या कायद्याखाली आणता येईल नै ;)).
सध्ह्या लगेच नाही पण उद्या परवा कधी तरी " ह्या बामणानं सत्यनारायण घालायला सांगितला अन दक्षिणेच्या नावाखाली लुबाडलं " अशा केसेसही ह्या कायद्याखाली येणार अशी वारंवार शंकेची पाल चुकचुकत आहे मनात ( बायदवे , मी स्वतः अंनिस समर्थकांशी बोलुन हे असे होणार नाही हे क्लीयर करुन घेतलय ...पण उद्याचं काय सांगता ? ).
अवांतर :
१.हिकडं मुंबैत जॉनी लिव्हर कुठल्या तरी चमत्कारिक परीवर्तनाची जोरदार जाहिरात करतोय सगळ्या लोकल बेस्टवर जाहिराती झळकत आहेत ( मोस्ट प्रोबॅबली ही ख्रिस्ती धर्मप्रचाराची एक पध्दत आहे ) त्यावर केस कशी आणि कुठे करता येईल ?
२. होमिओपॅथीचं काही सायंटीफीक प्रूफ आहे का हो ? ( माझ्या माहीतीनुसार नाहीये ) त्यांनाही घेता येईल का ह्या कायद्याच्या कोपच्यात ?
३. लोकल मधे ह्यांव बंगाली बाबा त्यांव बंगाली बाबा वशीकरण स्पेशालिस्ट वगैरे जाहिराती लागलेल्या असतात त्यांच्या विरुध्द केस कशी करता येईल
अतिअवांतर : सदर कायद्या मुLe मला वश असलेले १ चेटुक , १ वेताळ , १ भानामती , आणि ५ झाडे सुशिक्षित बेकार झाली आहेत , त्यांचे बेकारी भत्त्यासाठी नाव कुठे नोंदवावे लागेल :D
21 Dec 2013 - 8:18 pm | आनन्दा
तुमचा होमिओपथी वर राग का?
22 Dec 2013 - 12:35 am | प्रसाद गोडबोले
>>> कारण माझ्या माहीती प्रमाणे होमिओपॅथी हे सायंटीफीकली प्रुव्हन गोष्ट नाहीये . (थोडक्यात त्या होमिओपॅथीच्या गोळ्यांनी होतो तो परिणाम हा प्लेसबो इफ्फेक्ट http://en.wikipedia.org/wiki/Placebo असतो असा माझा अंदाज आहे )
ह्या संदर्भ्जात कोणतात रीसर्च पेपर असल्यास लिन्क द्यावीत ही विनंती !
24 Dec 2013 - 11:07 am | आनन्दा
शक्य झाल्यास हे पुस्तक वाचून काढा.
Impossible Cure
आपले गैरसमज दूर झाले तर मला आनंदच होईल.
24 Dec 2013 - 12:39 pm | प्रसाद गोडबोले
धन्यवाद ! पुस्तक सध्या वर वर चाळत आहे . ( पण ह्यात काही सायंटीफीक डेटा आणि प्रुफ दिसेल असे वाटत नाहीये )
असो. आम्ही आपले विकीपंडीत ...विकीवर हे दिसले http://en.wikipedia.org/wiki/Homeopathy , पहिल्याच पॅरा मधे होमिओपॅथी सुडोसायन्स असल्याचा दावा आहे !!
( अर्थात विकीवर कोणीही एडीट करु शकते ...आणि जर खरच होमिओपॅथी प्रुव्ह्ड सायन्स असेल तर कोणीतरी करेलही !! )
असो . पुनश्च एकवार धन्यवाद !!
24 Dec 2013 - 1:43 pm | आनन्दा
दुर्दैवाने होमिओपॅथिक औषधांमध्ये "फिजिकली" काहीच नसल्यामुळे असा निष्कर्ष करणे सोपे आहे. पण होमिओपॅथीने मिळालेल्या आश्चर्यकारक रिझल्ट्स कडे पाहता तूर्तास अज्ञेय आहे असे म्हणणे मला योग्य वाटते. तसेही एखादी गोष्ट थोतांड आहे असे म्हणणे सोपे असते.
या पुस्तकातही "साय॑ंटिफिक डाटा" नाही, पण स्टॅटिस्टिकल मात्र आहे.
17 Dec 2013 - 10:11 am | मारकुटे
हा कायदा मुस्लिम आणि ख्रिश्चनांना लागू आहे का?
22 Dec 2013 - 1:09 pm | श्रीगुरुजी
>>> हा कायदा मुस्लिम आणि ख्रिश्चनांना लागू आहे का?
हिंदू सोडून इतर धर्म पुरोगामी असल्याने त्यांच्यात अंधश्रद्धा नसतात. त्यामुळे हा कायदा त्यांना लागू करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.
आणि समजा हा कायदा त्यांना लागू करायचा असेल तर तशी मागणी त्यांच्याकडून व्हायला हवी. समान नागरी कायदा हा मुस्लिमांनी मागणी केली तरच त्यांना लागू केला जाणार आहे. उगाच घटनेत आहे किंवा संसदेत संमत झाला म्हणून लगेच तो त्यांना लागू होत नाही. तसेच आम्हाला जादूटोणाविरोधी कायद्याखाली आणा अशी त्यांनी मागणी केली तरच हा कायदा त्यांना लागू होईल, अन्यथा नाही.
22 Dec 2013 - 1:14 pm | सुहासदवन
समान नागरी कायदा हा मुस्लिमांनी मागणी केली तरच त्यांना लागू केला जाणार आहे. उगाच घटनेत आहे किंवा संसदेत संमत झाला म्हणून लगेच तो त्यांना लागू होत नाही.
___/\___ जय हो
24 Dec 2013 - 2:20 pm | बाळ सप्रे
समान नागरी कायदा नसणे निषेधार्हच आणि लज्जास्पदही !!
पण म्हणून त्याचा राग धरुन जादुटोणा कायद्याची खिल्ली उडवणे हास्यास्पद !!
20 Dec 2013 - 7:56 pm | प्रसाद गोडबोले
http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/pune/ant-superstition...