भ्रमण जर्मनी.. ००

यसवायजी's picture
यसवायजी in भटकंती
9 Dec 2013 - 11:21 pm

--------------------------------------------------------------------------
भ्रमण जर्मनी.. ००
भ्रमण जर्मनी.. ०१ - म्युनिक
भ्रमण जर्मनी.. ०२ - साल्झबर्ग (ऑस्ट्रिया)
भ्रमण जर्मनी.. ०३ - नॉयश्वानस्टाईन कॅसल
भ्रमण जर्मनी.. ०४ - कलोन
--------------------------------------------------------------------------

जर्मनी..

BMW,फोक्सवॅगन, 'मर्सी' वाली जर्मनी..
FC Bayern Munich च्या 'जर्सी' वाली जर्मनी..

ब्लॅक फॉरेस्ट,हॅमबर्ग, कूकू क्लॉक'वाली जर्मनी..
रोमँटीक रोडवरच्या वॉक वाली जर्मनी..

बर्लीन, फ्रँकफर्ट, म्युनीक 'ओक्टोबर्-फेस्ट' म्हणजे जर्मनी..
जगात भारी अशी, 'बियर अ‍ॅट इट्स बेस्ट' म्हणजे जर्मनी..

हिटलर, नाझी,अन महायुद्धातली 'आग' म्हणजे जर्मनी..
राख...., पुन्हा पेटलेला 'चिराग' म्हणजे जर्मनी..

Exhibitions , ख्रिसमस मार्केटच्या 'धूम' वाली जर्मनी..
टेक्नॉलॉजीकल, इकॉनॉमीकल 'बूम' म्हणजे जर्मनी..

(बास आता.. न्हाईतर तेल हितच संपायचं.. :D )

तर...
ऑन-साईट जाणं (आम्हा बिगर ऐटीवाल्यांच्या) नशीबात नाही, आणी स्वखर्चाने परदेशी जायची (अजुनतरी) ऐपत नाही..

४-५ वर्ष चांगली 'घासवून' घेतल्यावर आमच्या सायबाला थोSSडी दया आली आणी म्हणाला,
"जा पोरांनो.. करा मज्जा.."
महिनाभर जर्मनीचा पोग्राम ठरला. आणी पहिल्यावहिल्या परदेशगमनाची तयारी चालु झाली. पुन्ह्यांदा 'अपुर्वाई' वाचुन काढलं..
पोटातले कावळे जादा ओरडाय लागले तर त्यांच्यापुरती कामाला येईल एवढी पाककला शिकुन घेतली. तशी भुक लागल्यास दिसलं ते खायची तयारी होतीच म्हणा.. MTR चे रेडी-टू-कुक, मॅगीची २५-३० पाकीटे, १ कुकर, प्रती-डोकी ४-५ किलो तांदुळ, ३ जीन्स, ५-६ टी-शर्ट यांनी बॅगा भरल्या..
१००० युरो कॅश आणी १००० चे डेबिट कार्ड थॉमस कुक कडुन घेतले.

९ जुन २०१३. पहाटे ५.५५ ची फ्लाईट. टर्कीश एअरलाईन (सस्तातली)
न्युरेंबर्गला जायचं होतं. तिथं वैशाख वणवा चालु होता. मुंबई-इस्तांबुल-न्युरेंबर्ग असा प्रवास होता.

भारतातल्या ४ टोकाची ४ टाळकी मुंबईत जमली.
दिल्लीवाला म्हणाला, "याSSर.. ऑक्टोबरफेस्ट मै जाना चाहिए था याSSर.."
म्या म्हटलं.. "फुकटात मिळालय.. गोड मानुन घे बाबा.."
युरोप पहायला मिळणार याची उत्सुकता होतीच.. टिवल्या-बावल्या करत, सौंदर्य न्याहाळत ;) प्रवास चालु झाला..

मुंबई ते टर्की ७ तास लागले. जाताना 'गॉड मस्ट बी क्रेझी' पाह्यला. विमान इस्तांबुलला पोहोचलं..
आणी आहाहा.. युरोपचं पहिलं दर्शन घडलं..
१.
1 (2)

२.
1 (1)

टर्कीला trans-continental country (आशीया+युरोप) म्हणतात. समुद्रकाठचं इस्ताम्बुल पाहुन डोळ्याचं पारणं फिटलं..
३ तास वेटींग टाईम होता. पेश्शल टर्कीश डिलाइट Lokum ची टेस्ट घेतली. कुणाकडेच 'चांगला' म्हणावा असा कॅमेरा नव्हता, पण तरी दिस्सल त्याचे फोटो काढायचं काम चालु होतं.
संध्याकाळी ७ ला न्युरेंबर्गला पोहोचलो. घड्याळं (अर्थातच मोबाईलमधली) साडे-तीन तास मागे सरकवली..
आणी विमानतळाबाहेर पाय ठेवताच.. श्वास घेताच.. 'तो' feeeeeel आला..
जर्मन कलीग रिसिव्ह करायला आला होता.. आज 'आवडी'त बसायची हौस पुर्ण झाली. सुरुवात चांगली झाली :) ..
-------------------------------
क्रमश: ? - तुम्ही म्हणाल तसं.. :)
-------------------------------
जाताजाता.. इन्फो आणी 'सुद्द्लेकनात' काही चुका असतील तर सांगा.. दुरुस्त करायचा प्रयत्न करेनच..
-------------------------------

प्रतिक्रिया

ओहो! मस्त सुरुवात हो यसवायजी. :) पुढील भागाच्या प्रतीक्षेत, जरा तेवढं सौंदर्याकडं लक्ष असू द्या म्हणजे झालं. येनो ;)

चला यसवायजी पण उतरले मैदानात , अजुन फोटो टाकायचे की ,
( मुन्नाभाइ ईश्टाईल ) ये तो " कमरा शुरु होने के पैलेच्च खतम हो गया ना मामु ;)

यसवायजी's picture

10 Dec 2013 - 10:33 pm | यसवायजी

@कमरा शुरु होने के पैलेच्च खतम >>
पिवशे.. अगं ही मयसबा हाय.. हितं अस्सच अस्तय.. जपुन बाई.. न्हाईतर धडपडशील कुटंतर.. ;)
अन हो.. फोटु टाकीनच की.. आता तु सांगीतलैस म्हंजे.. :D

आनंदराव's picture

9 Dec 2013 - 11:26 pm | आनंदराव

फुल्ल ऐश !
चालु दे

मुक्त विहारि's picture

10 Dec 2013 - 1:11 am | मुक्त विहारि

पुढील भागाच्या प्रतीक्षेत

प्रभाकर पेठकर's picture

10 Dec 2013 - 1:41 am | प्रभाकर पेठकर

मस्तं सुरुवात. टर्कीची दोन्ही छायाचित्र अप्रतिम आहेत. लवकर लवकर पुढचे भाग टाका.

अर्धवटराव's picture

10 Dec 2013 - 3:39 am | अर्धवटराव

चटपटीत सुरुवात :) येऊ देत पुढील भाग लवकर.

वेल्लाभट's picture

10 Dec 2013 - 6:28 am | वेल्लाभट

अरे क्या बात है! येउद्या पुढचं लिखाण अन फोटो

लॉरी टांगटूंगकर's picture

10 Dec 2013 - 6:58 am | लॉरी टांगटूंगकर

चनागिदे चनागिदे!!!

आतिवास's picture

10 Dec 2013 - 8:20 am | आतिवास

सुरुवात छान झालीय. पुढील भागांच्या प्रतीक्षेत आहे.

यशोधरा's picture

10 Dec 2013 - 8:44 am | यशोधरा

मस्त. गॉड्स मस्टबी क्रेझी मस्त सिनेमा आहे की नाही? :)

llपुण्याचे पेशवेll's picture

10 Dec 2013 - 9:51 am | llपुण्याचे पेशवेll

वा वा छान. कविता चांगली जमलिये आणि लेखनाने पण पकड घेण्यास सुरुवात केलिये.

दिपक.कुवेत's picture

10 Dec 2013 - 11:03 am | दिपक.कुवेत

टेक ऑफ तर मस्त घेतलाय......आता पटापट वेळ न दवडता पुढिल भाग येउ द्या बरं!

प्रशांत's picture

10 Dec 2013 - 11:24 am | प्रशांत

मस्त सुरुवात....

पुलेशु...

विवेक्पूजा's picture

10 Dec 2013 - 11:53 am | विवेक्पूजा

माझाही असाच अनुभव.... वर्षापुर्वीच्या आठवणी जागवल्या तुम्ही यसवायजी.
पु.भा.प्र.

अनिरुद्ध प's picture

10 Dec 2013 - 12:00 pm | अनिरुद्ध प

दिसत नाहीत्,बाकी वर्णन आवडले.

यसवायजी's picture

10 Dec 2013 - 6:17 pm | यसवायजी

आपण कुठला ब्राउझर वापरताय? मला वाटतय इतरांना दिसताहेत फोटो.
(निदान पेठकर काकांची कमेंट बघुन असं वाटतय)

मालोजीराव's picture

10 Dec 2013 - 12:08 pm | मालोजीराव

यसवायजी...मस्त हो

केदार-मिसळपाव's picture

10 Dec 2013 - 2:02 pm | केदार-मिसळपाव

विलकोमेन इन डॉइचलांड.(जर्मनीत आपले स्वागत आहे)
मस्त लिहा, शुभेच्छा.

केदार-मिसळपाव's picture

10 Dec 2013 - 2:10 pm | केदार-मिसळपाव

ह्म्म्म.. आवडले आहे ऑडी=आवडी...

प्यारे१'s picture

10 Dec 2013 - 2:11 pm | प्यारे१

मस्त रे एसवायजी!

दिव्यश्री's picture

10 Dec 2013 - 3:01 pm | दिव्यश्री

लेख आवडला.
जर्मनी खूपच मस्त देश आहे. जीवाची जर्मनी करा. ;)

राही's picture

10 Dec 2013 - 3:26 pm | राही

टेक-ऑफ मस्तच आहे. कविता आणि कथन दोन्ही छान. पुढला लेख वाचण्यासाठी उत्सुक.

मधुरा देशपांडे's picture

10 Dec 2013 - 3:53 pm | मधुरा देशपांडे

जर्मनीत स्वागत. पु.भा.प्र.

राजेंद्र मेहेंदळे's picture

10 Dec 2013 - 3:56 pm | राजेंद्र मेहेंदळे

या देशाला फक्त फ्रँकफर्ट्,म्युनिक वगैरे एअरपोर्ट् पुरतेच पाय लागलेत..आता तुमच्या लिखाणातुन सवडीने बघायला मिळेल...पुभाप्र

ऑडीला अस्सल मराठी नाव आवडले. देहूचा वाणी या आवडीतून भंडारा डोंगरावर जातानाचे चित्र अंमळ डोळ्यांपुढे तरळले =))

अत्रुप्त आत्मा's picture

10 Dec 2013 - 6:29 pm | अत्रुप्त आत्मा

लै लै भारी... आणी

(बास आता.. न्हाईतर तेल हितच संपायचं.. Biggrin )

हे तर त्याहून भारी! =))

ब्येस्ट हो एकदम. येउन्द्या अजुन.
बाकी काय बी असुन्दे म्या जन्दगित एकडाव तरी जाणारच जर्मनीला. :)
आन फकस्त हायडेलबर्ग पाहून येणार. आमा प्रिंटिंगवाल्याची काशी हरर्द्वार सगळे तिथच हाय म्हनत्यात.

बॅटमॅन's picture

10 Dec 2013 - 6:55 pm | बॅटमॅन

का बे असं काय आहे म्हणे हायडेलबर्गात?

कसलं प्रिंटींग करतैसा तुमी? ओफ्सेट/फ्लेक्स/स्क्रीन का ठपाक्-ठपाकवालं ?

अत्रुप्त आत्मा's picture

10 Dec 2013 - 7:24 pm | अत्रुप्त आत्मा

@स्क्रीन का ठपाक्-ठपाकवालं ?>>> http://www.pic4ever.com/images/171.gif

अभ्या..'s picture

10 Dec 2013 - 7:56 pm | अभ्या..

http://www.misalpav.com/node/24626 हे वाचला न्हाइसा जणू?
सगल करतो बघा आपण. काय हाय का यंदा तुमचं?

यसवायजी's picture

10 Dec 2013 - 9:17 pm | यसवायजी

म्हाईती हुतं.. पन असंच आपलं मज्जा म्हनुन थपाक्-थपाक.. ;)

@काय हाय का यंदा तुमचं?
म्या कवाधरनं तय्यार हाय ओ.. पर च्यायला कोन शिरीयस घेतच न्हाई आपल्याला..

वाचलंय बे पण हैडेलबर्गात मूजम हाय ते ठौक न्हौतं.

बाकी कै असलं तं सांगूच ;)

खेडूत's picture

11 Dec 2013 - 12:30 am | खेडूत

यस्स. हायडेलबर्ग ला प्रिंटींग मुझीयम पण हाय.
आता लई वर्ष झाली बगुन. पण झक्कास आहे. (फोटू आता पुण्याच्या घरात आहेत.)

पण हायडेलबर्ग ची खरी ओळख आमाला तरी स्टेफी ग्राफ चं गाव म्हणून होती!
मस्त सुंदर गाव आहे. एकदम स्टेफी सारखं! :)

http://www.heidelberg.com/www/html/en/startpage

मधुरा देशपांडे's picture

11 Dec 2013 - 3:19 am | मधुरा देशपांडे

हायडेलबर्ग नक्कीच सुंदर व प्रेक्षणीय आहे.
माफ करा परंतु स्टेफी ग्राफ बद्दल च्या माहितीत छोटासा बदल. स्टेफी ग्राफ मुळची हायडेलबर्ग ची नाही. तिचा जन्म मानहाइम या शहरातील आहे आणि पुढे तेथून जवळच असलेल्या ब्रूल या छोट्या गावात तिचे बालपण गेले आहे. ही दोन्ही गावे हायडेलबर्ग च्या अगदीच जवळ आहेत त्यामुळे कदचित ती हायडेलबर्ग ची आहे असे झाले असावे.

चांगली सुरुवात झालीये. पहिला फोटू जास्त आवडला.

यसवायजी's picture

11 Dec 2013 - 4:22 pm | यसवायजी

सर्वांचे आभार..
कविता आवडली हे वाचुन बरं वाटलं. (टायपायला बसल्यावर १०-१५ मिंटात केलीय...)

@ मधुरातै आणी केदार :- तुमची मदत लागेल. काही चुका असतील तर नक्की सांगा.
पुढचा भाग शनी/रविवारी टाकतो. सध्या एग्झॅम चालु आहे, अभ्यास करतोय :) ..