सुट्टीच्या दिवशी तेच तेच खायचा कंटाळा आला असेल तर एकदम मस्त आणि फक्त ३०-३५ मिनिटात होणारा हा pan पिझ्झा.
साहित्य :
पिझ्झा बेस (बेकरीत २५ रुपयाला ३ पिझ्झा बेस मिळतात )
२ पिझ्झा साठी ३ चीज कुब्स (जास्त चीज हवे असेल तर जास्त चीज कुब्स आणावेत)
पिझ्झा सॉस (कुठल्याही मॉल मध्ये किवा किराणा मालाच्या दुकानात सुधा मिळतो. )
लाल तिखट
मीठ
पातळ उभा चिरलेला कांदा , टोमाटो , ढोबळी मिरची
थोडसं तूप किवा बटर
ओरिगानो , चिली flex (हवेच असं काही नाही. नसले तरी चालतात. )
प्रथम चीज चे covers काढून फ्रीज मध्ये ठेवावेत . कारण पिझ्झा गरम असतानाच चीज घालायचं असता. नंतर कवर काढत बसलं तर तिकडे पिझ्झा गार होवून जातो .
कृती :
१. एका पसरत ताटात पिझ्झा बेस घ्यावा. वरचा भाग चमच्याने खरवडून काढावा. त्यावर ३-४ चमचे पिझ्झा सॉस पसरवून घ्यावा.
२. आता ह्याच्यावर उभा , पातळ चिरलेला कांदा, टोमाटो , ढोबळी मिरची पसरवून टाकावी . वरून लाल तिखट आणि मीठ हवा असेल तेवढा भुरभुरवा
३. आता बाजूचा चुरा पुन्हा त्याच्यावर पसरवा. आणि हाताने थोडा दाब द्यावा.
४. तवा गरम करून त्यावर तूप किवा बटर पसरवावे . त्यावर हा पिझ्झा घालावा. मंद आचेवर ४-५ मिनिटे भाजून द्यावा. आच मंदच ठेवावी नाहीतर त्याचा जळल मेलं लक्षण होतं .
५. उलथन्याने उलथून दुसर्या बाजूने ३ मिनिटे भाजावा.
६. आता ताटामध्ये उतरवून पटकन चीज किसून घालावे. आणि हाताने थोडा दाब द्यावा म्हणजे चीज पिझ्झ्यावर बरोबर बसेल.
झाला पिझ्झा. आता ह्याचे ४ किवा ६ भाग करावेत आणि खावेत.
प्रतिक्रिया
8 Dec 2013 - 8:45 pm | मुक्त विहारि
आम्ही (माझी मुले) गॅसच्या ऐवजी मायक्रोव्हेव वापरतात.
9 Dec 2013 - 11:10 am | दिपक.कुवेत
पिझ्झा आपला ऑल टाईम फेवरीट. आता ईथे पिझ्झा बेस शोधणे आले
9 Dec 2013 - 11:32 am | मुक्त विहारि
फाइलला "लुलु" नध्ये
किंवा
मंगफला "सुलतान सेंटर" मध्ये
9 Dec 2013 - 11:46 am | दिपक.कुवेत
शुवेखला ऑफिसच्या जवळच लुलु, सीटि सेंटर आणि सुलतान सेंटर आहे......चेक करतो आता
9 Dec 2013 - 12:00 pm | मुक्त विहारि
बेकरी सेक्शनला भेट द्या.
थोडे जास्त पैसे पण जवळ ठेवा.कारण त्या सेक्शनला गेल्या नंतर अरबी मिठाई घ्यायचा मोह होतोच.पिझ्झा खाल्यावर , काहवा आणि अरबी मिठाई हवीच.
9 Dec 2013 - 12:16 pm | दिपक.कुवेत
हे काय हो मुवि....मोठ्या मुश्किलीने अरबी मिठाईच्या खाण्यावर ताबा मिळवलेला तो आज तुम्हि परत आठवण करुन दिलीत. आता आणुन खाल्ल्याशीवाय काय चैन पडणार नाहि.
9 Dec 2013 - 11:26 am | पैसा
लिखाण आवडले. फोटो अंमळ मोठे हवे होते आणि पिझ्झा तव्यावर उलटला तर भाज्या तव्यावर पडणार नाहीत का?
9 Dec 2013 - 11:30 am | दिपक.कुवेत
नुसता पिझ्झा बेस तव्यावर दोन्हि बाजुन शेकवुन घ्यावा व मग भाज्या/सॉस घालुन खरपुस भाजावा
9 Dec 2013 - 11:33 am | मुक्त विहारि
मायक्रोव्हेव उत्तम
9 Dec 2013 - 11:34 am | म्हैस
disclaimer टाकायचं राहिलं . ज्यांच्याकडे microwave नाहीये त्यांच्यासाठी आहे हे. तव्यावरचा पिझ्झा खूप क्रिस्पी होतो
नाही पडत . भाज्या आणि तो चुरा पिझ्झ्यावर थोडासा हाताने दाबायचा . म्हणजे त्या पडत नहित. पिझ्झा बेस ला चिकटून बसतात
9 Dec 2013 - 3:25 pm | अनिरुद्ध प
भारतिय पद्धतिने केलेली ईटालियन पा क्रु आवडली.
9 Dec 2013 - 12:26 pm | प्यारे१
आवडला.
चारच भाग करा, मी हल्ली डाएटवर आहे. -सरदार (अॅक्च्युअली मुलीच्या नावावर आहे हा पण उगाच कशाला भांडणं ;) )
बाकी एक तर नाव तरी बदला नाहीतर खाणं तरी... ;)
9 Dec 2013 - 6:04 pm | दिपक.कुवेत
म्हैस का कधी पिझ्झा खाउ शकत नाहि? त्यांना पण नाविन्य नको?? (कॄ.ह.चा.घ्या)
9 Dec 2013 - 10:26 pm | बॅटमॅन
पाककलानिरक्षर असल्याने फटू बघून तरसणे आले.......
10 Dec 2013 - 12:13 pm | इरसाल
पाककलासाक्षर सध्या नायजेरियात अंडरग्राउंड झालेत म्हणे !
10 Dec 2013 - 12:19 pm | बॅटमॅन
त्यांना बोलवा!!!
10 Dec 2013 - 2:12 pm | इरसाल
दिसले दिसले (हे नॅनो जाहिरातीतली पोरगी वड्डते ना तसे वड्डुन हाये)ह्या नाय पण दुसर्या पिज्यावर दिसले !
10 Dec 2013 - 2:09 pm | प्यारे१
>>>पाककलासाक्षर
शब्द बदलूया का? हे म्हणजे अंगठ्याऐवजी गिरवू गिरवू स्वाक्षरी करता येणार्या प्रौढ साक्षरा एवढंच शिकलेला असं वाटतंय.
ते नायजेरियन मिपाकर पाककला'विभूषित' आहे हो! पाककलाउच्चशिक्षित तरी. :)
10 Dec 2013 - 2:13 pm | इरसाल
पाककला"रत्न"
10 Dec 2013 - 12:03 pm | उद्दाम
म्हशे, एक पिझ्झा सोनियाबैंनाही पाठवून दे. नाहीतर पोटात दुखेल तुझ्या.
10 Dec 2013 - 12:24 pm | अधिराज
बेणं दिसल तिथं फालतू कॉमेंट टाकतं.
10 Dec 2013 - 12:12 pm | श्रिया
रेसिपी आवडली.
11 Dec 2013 - 6:14 pm | म्हैस
कोण हि सोनियाबैं? आणि सोनियाच्या शापान का कधी म्हशीच्या पोटात दुखतं ?