बीटकॉईन: डिजीटल वा व्हर्च्युअल करन्सी, सत्य की मिथ्था ??

प्रसाद भागवत's picture
प्रसाद भागवत in काथ्याकूट
9 Dec 2013 - 10:32 am
गाभा: 

मी शाळेंत असताना एकदा तीव्र नाणेटंचाई निर्माण झाली, सुट्ट्या पैशांच्या कमतरतेवर उतारा म्हणुन मुंबईत 'बेस्ट' ने स्वतःची अशी कुपन्स छापली होती ........ मला जाणवलेली ही चलन विषयक पहिली समस्या. नंतर बरीच स्थित्यंतरे झाली, विद्यार्थी दशेंतील स्वप्नवत जगांतुन खर्या जगात येणे झाले आणि अर्थशास्त्राच्या पुस्तकांतुन पिडणार्या चलन फुगवटा आणि व्यवहारांत भेडसावणार्या चलन तुटवडा यांच्यासारख्या गंभीर समस्यांची ओळ्ख झाली. त्यातुन पुढे सरकतो नाही तोच नव्या शतकाच्या उदयाबरोबरच संगणकाच्या क्रुपेमुळे आभासी जगाची अनुभुती येउ लागली. क्लासरुम् असो वा, खेळाचे मैदान, मित्र/मैत्रीण किंवा डॉक्टर्स , अशा जवळजवळ सर्वच गोष्टी आज Virtual वा 'आभासी' स्वरुपांत उपलब्ध आहेत. असे असताना आर्थिक क्षेत्र तरी याला अपवाद कसे असेल ?? तेथेही 'आभासी' चलन या संकल्पनेचा उदय झाला आहे. बेस्ट च्या कुपनापासुन सुरु झालेली यात्रा आता 'बीट्कॉईन' या आभासी चलनापर्यंत पोहोचली आहे. आणि असे निश्चितपणे म्हणता येईल की कॉम्प्युटर वा आयफोन यानी ज्याप्रमाणे आपल्या दैनंदीन जीवनांत क्रांती घडवली अगदी तशीच क्रांती 'बीट्कॉईन' हे 'आभासी' चलन आर्थिक जगतात घडवु पहात आहे. अर्थकारणातील आजच्या ह्या एका लक्षवेधी विषयावर प्रकाश टाकण्याचा हा प्रयत्न.

संगणकीय युग अवतरल्यानंतर शासनव्यवस्था वा मध्यवर्ती बॅंकाच्या हस्तक्षेपा पासुन मुक्त, भौगोलिक बंध ने नसलेली, विनिमयास सोपी अशी समांतर चलनप्रणाली वापरांत कशी आणता येईल या चे प्रयत्न नव्वदीच्या दशकांत च सुरु झाले होते. Ecash वा b-money यांच्यासारखी काही मॉडेल्स बाजारात उतरविण्यात आली ही, मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे ह्या प्रयत्नांना तितकेसे यश लाभले नाही. 01 नोव्हेंबर, 2008 रोजी सतोशी नकामोटो नामक एका जपानी माणसाने एक संशोधन वजा लिखाण प्रसिध्द केले आणि या विषयावर काम करणार्यां धुरिणांच्या जगात एकच खळ्बळ माजली. डिजीटल किंवा व्हर्च्युअ ल करन्सी अंमलात आणण्या च्या बाबतीत असलेली सर्वात मोठी अडचण 'डबल-स्पेंडिंग' म्हणजेच वापराची द्विरुक्ती होण्याचा धोका दुर करण्यांत नकामोटो साहेबांनी सादर केलेली योजना यशस्वी झाली होती. या शोध निबंधात अशा आभासी चलनास 'बीट्कॉईन' असे संबोधण्यांत आले होते. आणि हेच ते आजचे बहुचर्चित 'बीट्कॉईन' (क्रमशः)

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

9 Dec 2013 - 10:35 am | मुक्त विहारि

लेख आवडला..

या विषयावर तपशीलवार वाचण्याची इच्छा होतीच. पुढील भागांची वाट पाहात आहे. धन्यवाद.

आनंदी गोपाळ's picture

10 Dec 2013 - 2:57 pm | आनंदी गोपाळ

सध्या तरी हिडन नेट / अंडरनेटमधे बिटकॉईन्स वापरून बेकायदेशीर व्यवहार जोरात सुरू आहेत. टॉर वापरून हे उद्योग चालतात..

पुढचा भाग कधी? जरा मोठा भाग लिहावा ही विनंती.

मारकुटे's picture

11 Dec 2013 - 10:59 am | मारकुटे

याच विषयावर एक काथ्याकुट टाकला होता. अपेक्षा होती की काहीतरी माहिती मिळेल. सदर काथ्याकुटाचा नोड आता दिसत नाही. काय झाले ते कळत नाही. बिटकॉईन मधे असे पैसे गायब होत नाही ना असा विचार मनात आला. तसे होत असेल तर अवघ्ड आहे. कोण कर्ता करविता रक्षक भक्षक आहे ते कळत नाही. जो असेल तो सुखी राहो.