अन्नाची नासाडी

राजेंद्र मेहेंदळे's picture
राजेंद्र मेहेंदळे in काथ्याकूट
27 Nov 2013 - 2:03 pm
गाभा: 

नमस्कार मिपाकर
हा विषय बरेच दिवस मला छळत आहे पण कसा मांडावा समजत नाहिये.

मी एका मोठ्या आय.टी. कंपनीत काम करतो जिथे साधारण २०-२५ हजार लोक कामाला येतात. कँपसमध्ये २-३ फूड कोर्ट आहेत आणि खायला प्यायला चंगळ आहे. तुमची जेवढा खर्च करायची तयारी असेल तसे अगदी २५ रुपयापासुन ५०० रुपयापर्यंत सर्व काही मिळते. खाउन झाले की लोक आपापल्या प्लेट घेउन खरकटे टाकायच्या खिड्क्यांजवळ नेउन ठेवतात.तिकडचे चित्र न बघवण्यासारखे असते.

बर्‍याच डिशमध्ये अन्न तसेच वाया गेलेले /राहीलेले दिसते. चव न आवडणे, भूक नसणे, जास्त वाढलेले असणे कारण काहीही असो .शेवटी ते वायाच जाते. एका मोठ्या कंटेनरमध्ये सर्व जमा करुन बाहेर नेले जाते.

अजुन एक चीड आणणारा प्रकार म्ह्णजे प्रोजेक्टमध्ये कोणाचा वाढ्दिवस असेल तर पूर्ण टिम फूड कोर्टमध्ये जमते,एक दोन जण केक घेउन येतात आणि हॅप्पी बर्थडे टू यु च्या गजरात तो कापुन नंतर त्याच्या चेहर्‍याला फासतात. किंवा फासायला एक आणि खायला वेगळा केक असतो .

मी काही या सेलिब्रेशनच्या विरोधात नाही.पण अन्नाची नासाडी का? हे सर्व थांबवायला किंवा निदान कमी करायला काय करता येइल ?

प्रतिक्रिया

वडापाव's picture

27 Nov 2013 - 2:12 pm | वडापाव

काही खानावळीत किंवा हॉटेलमध्ये 'कृपया अन्न वाया घालवू नये. हवे तेवढेच वाढून घ्यावे' अशा अर्थाच्या पाट्या पाहिल्याचं आठवतं. चर्नी रोडच्या एका पावभाजीसाठी प्रसिद्ध असलेल्या (नाव आठवत नाही) हॉटेलात मध्यंतरी 'कृपया कांदा नको असल्यास तसे आधीच सांगावे' असं लिहिलेला कागद चिकटवलेला पाहिला. अर्थात त्यामागचा हेतू महागड्या कांद्याची बचत करणे हा होता.

सुनील's picture

27 Nov 2013 - 2:16 pm | सुनील

चर्नी रोडच्या एका पावभाजीसाठी प्रसिद्ध असलेल्या (नाव आठवत नाही)

सुख-सागर तर नव्हे?

बाकी धागाप्रस्तावाशी सहमत!

अपूर्व कात्रे's picture

27 Nov 2013 - 3:36 pm | अपूर्व कात्रे

"मनोहर पावभाजी" गिरगाव चर्चच्या बाजूला, Voice of Indiaच्या लाईनीत

वडापाव's picture

27 Nov 2013 - 3:43 pm | वडापाव

हा बरोब्बर!!! तीच!! :)

रमेश आठवले's picture

28 Nov 2013 - 1:43 am | रमेश आठवले

मी एकदा काळबादेवी भागात एका गुजराती खानावळीत जेवावायला गेलो होतो . थाळीमध्ये ८-९ छोट्या वाट्या ठेवल्या होत्या. प्रत्येक वाटीत बुडाशी अगदी थोडासा पदार्थ म्हणजे दाल, कढी, छास, भाजी १, भाजी २, उसळ, लोणचे, चटणी, वगैरे वाढलेले होते . मी कुतुहलाने मालकाला याबद्दल विचारले तर त्याने समजाऊन सांगितले कि मेनू मधल्या सगळ्या पदार्थांची चव घेऊन त्यापैकी तुम्हाला आवडेल तो पदार्थ पाहिजे तेवढा मागून घ्या. तुम्ही पोटभर जेवा आणि अन्नाची नासाडी ही टाळा.

सौराष्ट्रातील मोरबी या मोठ्या गावात एका हॉटेलात जरा वेगळी पद्धत पाहिली. जेवणाच्या मेनू मधील सर्व पदार्थ तुमच्या टेबलावर आणून ठेवतात. त्या पैकी तुम्हाला आवडतील तेवढेच पदार्थ तुमच्या ताटात वाढून घ्या किंवा वाढायला सांगा. तुमचे बिल तुम्ही घेतलेल्यां पदार्था वर ठरवले जाइल. या प्रकारातही अन्नाची नासाडी होत नाही .

दिपक.कुवेत's picture

27 Nov 2013 - 2:12 pm | दिपक.कुवेत

तसहि आपण सल्ला द्यायला गेलो कि लोक आपल्यालाच वेडयात काढतात त्यामुळे लक्ष न देणे हाच उपाय. किमान आपण जे खायला घेउ निदान ते तरी काहि शील्लक राहणार नाहि हे बघणे. ईकडे सुद्धा हिच परीस्थीती आहे त्यामूळे बघीतल्यावर हळहळण्याशीवाय काहिच करु शकत नाहि.

शिद's picture

27 Nov 2013 - 5:02 pm | शिद

किमान आपण जे खायला घेउ निदान ते तरी काहि शील्लक राहणार नाहि हे बघणे.

शनीवारच्या लोकसत्ता अंकात ऐक लेख आलता .
त्या अर्बन लीव्हज या संस्थेबद्दल माहिती आहे .
वाचा .
लिंक देता येत नाहीये .

पैसा's picture

27 Nov 2013 - 2:28 pm | पैसा

कोट्यवधी लोकांना एकवेळ जेवण सुद्धा पुरेसे मिळत नसताना अशी नासाडी पहावत नाही. आपल्याला जमेल तेवढे आपण करू शकतो. स्वतः अन्न वाया जाऊ न देणे बरोबरच्या लोकांना सांगणे एवढे नक्कीच करता येईल.

तोंडाला केक फासणे हा तद्दन मूर्खपणा आहे. आपण केक कधीही जास्त खाऊ शकत नाही. कारण पचायला भयंकर जड जातो. आमच्या ऑफिसमधे वाढदिवसाच्या पार्टीला मी कधीही केक आणून वाटला नाही. त्याऐवजी एखादा मिठाईचा तुकडा, फळ असंच आणत असे. सगळ्यात सोपी गोष्ट म्हणजे आपल्या वाढदिवसाला केक आणायचा नाही, आणि मित्रांनाही आणू द्यायचा नाही. एकाचं बघून आणखी ४ जण तसं करायला लागतात. अशी नासाडी करू नये हे बहुतेक लोकांना पटत असतं, पण इतर करतात म्हणून ते करतात असंही बरेचदा बघायला मिळतं.

विशाल चंदाले's picture

27 Nov 2013 - 2:29 pm | विशाल चंदाले

बऱ्याच कंपनीत कॅफेटेरिया मध्ये जे अन्न वाया जातं त्यासाठी एक इंडीकेटर असतो( म्हणजे आज किती किलो अन्न वाया गेलं हे दाखवण्यासाठी ती कचरा कुंडी एका वजन काट्या वर ठेवलेली असते.) आणि आपण जर त्यात भर टाकली कि तो आणखी वाढतो. त्यात भर टाकणार्याला ते दिसत. त्यामुळे हे शक्य आहे कि जर रोज असं होत असेल तर लोकं तो इंडीकेटर बघून अन्न कमी घेतील किंवा वाया घालवणार नाहीत. तुम्ही असं काही करू शकलात तर उत्तमच. :)

कपिलमुनी's picture

27 Nov 2013 - 2:38 pm | कपिलमुनी

मी एका मोठ्या आय.टी. कंपनीत काम करतो जिथे साधारण २०-२५ हजार लोक कामाला येतात. कँपसमध्ये २-३ फूड कोर्ट आहेत आणि खायला प्यायला चंगळ आहे

सुहास झेले's picture

27 Nov 2013 - 3:42 pm | सुहास झेले

:)

राजेंद्र मेहेंदळे's picture

27 Nov 2013 - 3:44 pm | राजेंद्र मेहेंदळे

व्य नि करतो

कपिलमुनी's picture

27 Nov 2013 - 3:51 pm | कपिलमुनी

गंमतीने विचारले ..
व्यनि बद्दल धन्यवाद !

Dhananjay Borgaonkar's picture

27 Nov 2013 - 3:12 pm | Dhananjay Borgaonkar

खरच खुप चिड येते हे अस अन्न वाया जातय बघितल्यावर. अजुन एक कारण म्हणजे वाढपी.
काही काही वाढपी एवढ्या जोशात असतात की, किती वाढु आणि किती नको अस होतं त्यांना, त्यामुळे देखील बरीच नासाडी होते अन्नाची.पण स्वतः वाढुन घेतलेले अन्न जात नाही म्हणुन टाकुन देणे याहुन मुर्ख कोणी नाही.
अजुन एक मी बघितलय म्हणजे थाळी असेल तर अन्न जास्त वाया जातं. जंकफुड असेल तर खुप कमी प्रमाणात अन्न वाया जातं.
या वाढदिवसाच्या फॅडची जास्त चिड येते, स्वस्तातला केक फासण्यासाठी आणि महागातला केक खाण्यासाठी.स्वस्त म्हणुन अन्नाची नासाडी करायची?

प्रभाकर पेठकर's picture

28 Nov 2013 - 1:04 pm | प्रभाकर पेठकर

अक्कलकोटच्या स्वामी समर्थ मंदिराच्या भोजनालयात, नको-नको म्हणेपर्यंत, वाढप्याने बद्कन भात वाढला आणि नाईलाजाने आम्हाला तो टाकावा लागला. कारण आम्हा सगळ्यांच्याच ताटात ढिगभर भात वाढून तो निघून गेला होता. मी बसलो होतो तिथे अगदी समोरच, 'ताटात अन्न टाकू नका' असा, समाज प्रबोधनात्मक, फलक होता. त्याच्या शेजारीच, 'भक्तांना नको असेल तर खोट्या आग्रहाने भरमसाठ अन्न वाढू नका' असा, फक्त वाढप्यांसाठी, एक फलक लावला पाहिजे. फार वाईट वाटलं. कचरा कुंडीत भरपूर खरकटं होतं. अक्कलकोट संस्थानाच्या मंदिरात, स्वामी समर्थांच्या सानिध्यात, त्यांची सेवा करणार्‍या वाढप्यांमध्येच 'अकलेची' इतकी वानवा असेल असे वाटले नव्हते. देणगीची पावती फाडायला (अन्न विनाशुल्क आहे पण देणगी भोजनालयातच स्विकारली जाते) बसलेल्या माणसाजवळ मी तक्रारही केली. तेंव्हा, 'अहो, इथे जास्त करून शेतकरी, श्रमिक वर्ग येतो. त्यांना भात भरपूर लागतो. तुम्हा शहरी भक्तांना कदाचित तेवढा भात खायची सवय नसेल पण बाकी सर्वांना एवढा भात लागतोच. आणि स्वामींच्या चरणी आलेला कुठलाही भक्त उपाशी परत जाऊ नये म्हणून तशी पद्धतच आहे.' असे म्हणाला. काय बोलणार, कपाळाला हात लावला.
आपल्याकडे देवाधर्माच्या नांवावर जो दुधातुपाचा नाश होतो तो पाहिला की अंगावर काटा येतो.

उपहारगृहांच्या पार्ट्यांमधूनही भरपूर अन्न (कधी कधी) उरतं. भारतात हे अन्न कचर्‍यात न टाकता भिकार्‍यांना, अनाथालयांना, वृद्धाश्रमांना पाठवलं जातं. पण त्यातही, कोणाला अगदी कुठल्याही कारणाने, कांही विषबाधा झाली तर समाजसेवी(?) संघटना उपहारगृहाला कोर्टात खेचतात. ज्या पार्टीसाठी ते अन्न वापरलं होतं त्या पार्टीत कांही विषबाधा झाली नसेल तर कांही कारवाई होत नाही. पण कांही काळ कोर्टकचेर्‍यात जाऊन वेळेचा अपव्यय आणि मनस्ताप पदरी येतो. त्यामुळे मी तरी ते अन्न भटक्या प्राण्यांना खाऊ घालणे योग्य समजतो.

अनिरुद्ध प's picture

27 Nov 2013 - 3:43 pm | अनिरुद्ध प

"अन्न हे पूर्णब्रह्म" हि संकल्पना मागे पडली आहे हे एक कारण असु शकते.

नवनाथ पवार's picture

27 Nov 2013 - 4:10 pm | नवनाथ पवार

पूर्णपणे सहमत आपल्या मतांशी

आमच्या कंपनीत सगळे पदार्थ खाऊन ताट परत केल्यास (अगदी कमी अन्न उरल्यास किंवा जराही अन्न फुकट न घालवल्यास) एक एक्लेअर्स देण्यास सुरवात झाली होती. हाफिसातीलच एका हौशी ग्रुपने हे आपणहून सुरू केले होते. हे सुरू केल्यावर आठवडाभर डिश ल्यांडिंग एरीया बराच 'बघणेबल' होता. पुन्हा ये रे माझ्या मागल्या

बाकी, फुड कोर्ड हा शब्द + २०-२५हजार एम्लॉई ऐकून कंपनीचा अंदाज केला गेल्या आहे ;)

राजेंद्र मेहेंदळे's picture

27 Nov 2013 - 7:03 pm | राजेंद्र मेहेंदळे

>>फुड कोर्ड हा शब्द + २०-२५हजार एम्लॉई ऐकून कंपनीचा अंदाज केला गेल्या आहे >>
पण मी गावाचे नाव वगैरे डिटेल्स कुठे दिलेत?

प्रमोद देर्देकर's picture

27 Nov 2013 - 5:19 pm | प्रमोद देर्देकर

नुसतेच खाणे नाही! आता तर इतरही बर्याच विषयात नासाडी होतेय, माझ्या कंपनीतील नासाडी बद्दल सविस्तर सांगेन उद्या.

बाप्पू's picture

27 Nov 2013 - 5:42 pm | बाप्पू

हे लोक इथे काम करण्यासाठी येतात कि party करण्यासाठी थे कळत नाही कधी कधी मला…!!
४० -४५ वय असणारे पण नुकत्याच विशीत आलेल्या मुलीच्या चेहऱ्यावर केक फासायला धावत जाताना मी पहिलेय…!!
वाढदिवस साजरा करण्याला माझा विरोध नाहीये पण आपण office मध्ये आहोत college मध्ये नाही हे भान ठेवले पाहिजे ना ???
या सर्व गोष्टीमुळे अन्नाची नासाडी तर होतेच… पण कॅन्टीन मध्ये पण गलिच्छपणा पसरतो…

थोडस अवांतर : केक फासून झाल्यानंतर या लोक्कांना pizza आणि coke च का लागतो. ? बर ते खाण्यालाही माझा विरोध नाहीये पण त्याचे box आणि बाटल्या तरी व्यवस्थित कचराकुंडीत टाका ना… बिचारे सफाई कर्मचारी काहीहि न बोलता निमुटपणे साफ करत बसतात या लोकांनी केलेली घाण…!!

>>वाढदिवस साजरा करण्याला माझा विरोध नाहीये पण आपण office मध्ये आहोत college मध्ये नाही हे भान ठेवले पाहिजे ना ???

म्हंजे कॉलेजातल्या पोरांनी केक फासून सत्यानाश केला चालेल असं म्हणायचं का??

प्रभाकर पेठकर's picture

28 Nov 2013 - 1:33 pm | प्रभाकर पेठकर

४० -४५ वय असणारे पण नुकत्याच विशीत आलेल्या मुलीच्या चेहऱ्यावर केक फासायला धावत जाताना मी पहिलेय…!!

ही: ही: ही; 'लाईफ स्टार्ट्स अ‍ॅट फॉर्टी' असे म्हणतात. असो.

कदाचित ही माणसे पित्याच्या ममतेने केक फासत असावीत.

शिवाय ही पद्धत नविनच आहे. म्हणजे आज जे ४०-४५ चे आहेत ते विशीत असताना अशी पद्धत नव्हती. म्हणजे त्यांना असा 'चान्स' कधी मिळाला नाहीए. आता तरूणाईनेच समर्थन केलेल्या मुक्त समाजात त्यांना ही संधी चालून आली आहे तर (फक्त) त्यांच्यावर नैतिक बंधन घालणे तरूणाईला शोभते का? धीस इज चिटींग.

ह्यातील वरील मजेचा भाग हलकेच घ्यावा.

पण, ह्या वयोगटाला (४०-४५ आणि त्या वरील वयोगटातील) असे कांही करण्याचा नैतिक अधिकार नाही हे मान्य केले तरी विशीतल्या तरूणांना विशीतल्याच तरूणीच्या चेहर्‍यावर केक फासणे 'नैतिकतेत' बसते का? त्यांनी केली तर ती अन्नाची नासाडी होत नाही का?

तसेच, अजुन, आजचे विशीतले तरूण जेंव्हा पंचेचाळीशीत पोहोचतील तेंव्हा ते मागे राहणार आहेत का? तेंव्हा तर अशा तरूणीला मिठीत घेऊन पापे घेणेही सुरू झाले असेल.

जेंव्हा एखाद्या पंचेचाळीशीतील प्रौढाचा वाढदिवस साजरा होतो, त्याच्या चेहर्‍यावरही केक फासला जातो (तशी रुढ पद्धतच आहे म्हणा), तेंव्हा विशीतल्या तरूणी नाही धावत पुढे पुढे? की पुढारलेल्या समाजात केक फासणे आणि फासून घेणे हे दोन्ही अधिकार फक्त विशीतल्या तरूणींनाच प्रदान केलेले आहेत.

मला वैयक्तिक रित्या हे अन्नाशी खेळणे, अन्नाची फेकाफेक, जाड्या-रड्याच्या चित्रपटात लहानपणी पाहतानाही कधी रुचली नाही. 'अन्न हे पूर्णब्रह्म' ह्या संस्कारातच वाढलो आहे. त्यामुळे तरूणपणीही नाही आणि आता ह्या वयातही, कोणा तरूणीच्या किंवा तरुणाच्या किंवा समवस्कांच्या अंगालाही केक फासत नाही, कोणाला असे करू देत नाही.

लग्नकार्यातही हार घालायच्या वेळी नवरा-नवरीला उचलून घेण्याचे छचोर प्रकारही मला रुचत नाहीत. आपल्या मनाला त्रास होऊ नये म्हणून दूरूनच अक्षता टाकतो. असो.

बॅटमॅन's picture

28 Nov 2013 - 2:33 pm | बॅटमॅन

मला वैयक्तिक रित्या हे अन्नाशी खेळणे, अन्नाची फेकाफेक, जाड्या-रड्याच्या चित्रपटात लहानपणी पाहतानाही कधी रुचली नाही. 'अन्न हे पूर्णब्रह्म' ह्या संस्कारातच वाढलो आहे. त्यामुळे तरूणपणीही नाही आणि आता ह्या वयातही, कोणा तरूणीच्या किंवा तरुणाच्या किंवा समवस्कांच्या अंगालाही केक फासत नाही, कोणाला असे करू देत नाही.

लग्नकार्यातही हार घालायच्या वेळी नवरा-नवरीला उचलून घेण्याचे छचोर प्रकारही मला रुचत नाहीत. आपल्या मनाला त्रास होऊ नये म्हणून दूरूनच अक्षता टाकतो. असो.

प्रचंड सहमत. उचलाउचलीसारखा मूर्खागमनी प्रकार पाहिला की डोकेच फिरते. इतक्या बिनडोकपणे कसे वागू शकतात याचे आश्चर्य वाटते अन लाजही. मध्ये बातमी आली होती की अशा एका उचलाउचलीच्या वेळेस वधूच्या हातातील माळ वराऐवजी भटजीच्या गळ्यात जाऊन पडली! वर सगळे निर्लज्जपणे खिदळत होते म्हणे. काडीची अक्कल नसली की असे होणारच.

राजेंद्र मेहेंदळे's picture

27 Nov 2013 - 7:09 pm | राजेंद्र मेहेंदळे

या विषयावर वेगळा धागा निघु शकतो

>>त्याचे box आणि बाटल्या तरी व्यवस्थित कचराकुंडीत टाका ना>> सी.सी.डी मधुन घेतलेले कॉफी ग्लास,डॉमिनोज पिझ्झाचे रिकामे बॉक्स,चहाचे रिकामे कागदी कप ,फ्रूटीचे पॅक यांचे नमुने प्रत्येक कट्ट्यावर आणि झाडांमागे बघायला मिळतील्.सगळीकडे कचराकुंड्या आहेत तरी.....सुशिक्षित लोक सुसंस्कृत असतातच असे नाही

कामाच्या ठिकाणाचे स्थान पक्के होत चालले आहे. आणखी माहिती येउ दे :)

पिझ्झाचे रिकामे बॉक्स तर अगदी त्रासच आहेत. एकतर छोट्या कचराकुंडीत मावत नाही, कोणी मोठ्या कचराकुंडीत टाकला तर ती ब्लॉकच होते. म्हणजे इतर कोणी त्यात कचरा टाकूच शकत नाही.

रेवती's picture

27 Nov 2013 - 7:31 pm | रेवती

लेखनाशी सहमत. शाळांच्या क्याफेटेरियातही साधारण असेच चित्र असते.

बाप्पू's picture

27 Nov 2013 - 8:30 pm | बाप्पू

>>म्हंजे कॉलेजातल्या पोरांनी केक फासून सत्यानाश केला चालेल असं म्हणायचं का??

मला तसे म्हणायचे नाहीए.. पण आपण आता एका कंपनी मध्ये नोकरी करतो,,,विद्यार्थीदशेत नाही आहोत.
थोडक्यात "आपण आता मोठे झालो आहोत" हे सुचवायचे होते... :)

"आपण आता मोठे झालो आहोत"

आहो बाप्पू, मोठे झालो म्हणून माणसं अन्न पानात टाकायची किंवा त्याचा येनकेन प्रकारे सत्यानाश करायची थांबली असती तर कशाला हवं होतं.
मित्राच्या वडलांचंच उदाहरण आहे. कुठेही पंगतीला बसलेत आणि त्यांनी पानात काही टाकलं नाही असा दिवस अजून यायचाय. बरं चिरंजीवही तसेच!! मागं एका लग्नात अगदी काहीच नाही तर बापलेक दोघंही दोन दोन पुर्‍या पानात टाकून उठले होते. बरं या पुर्‍या वाढप्याकडनं त्यांनीच मागून घेतल्या होत्या. अन्नाची नासाडी करायला वयाचं बंधन नसतं.

>>>मित्राच्या वडलांचंच उदाहरण आहे.
ह्यासाठी कदाचित
>>>वय वाढले तरी लायकी अन अक्कल वाढत नाही याचे लै पुरावे आजकाल मिळू लागलेत
हे रेडीमेड उत्तर असावं! ;)

बाप्पू's picture

27 Nov 2013 - 9:02 pm | बाप्पू

>>>वय वाढले तरी लायकी अन अक्कल वाढत नाही याचे लै पुरावे आजकाल मिळू लागलेत

याचाच आणखी एक पुरावा माझ्या कॉमेंट मध्येहि आहे... :)

४० -४५ वय असणारे पण नुकत्याच विशीत आलेल्या मुलीच्या चेहऱ्यावर केक फासायला धावत जाताना मी पहिलेय…!!

अग्निकोल्हा's picture

27 Nov 2013 - 10:55 pm | अग्निकोल्हा

त्या बहुतांश विशित नव्हे तिशित आलेल्या असतात. तसही वयावरून लायकी अथवा अक्कल जोखायचा प्रयत्न करणे शहाणपनाचे नसतेच हेच उत्तरोत्तर सिध्द होत जाईल....

फुकट मिळालेले अन्न फेकून देणारा खरा कृतघ्न, बाकीचे चालायचेच. विकत घेउन उष्टे सोडलेले अन्न कोणाच्या पोटात जाऊ नये असे त्यावर थोडच लिहलेले असते? इट्स अ कोलेट्रल डेमेज...

मधुरा देशपांडे's picture

27 Nov 2013 - 9:10 pm | मधुरा देशपांडे

असाच अनुभव साधारण सगळ्या ठिकाणी येतो. मी ४० रुपये देतो ना एका ताटासाठी, मग मी तेवढे अन्न वाढून घेणार, वाया गेले तरी चालेल ही वृत्ती दिसते बरेचदा. शिवाय मग इतर तुम्ही दिलेली इतर कारणे. पण या सगळ्याची सुरुवात बरेचदा घरापासूनच होते. अन्न वाया घालवू नये हे लहानपणापासूनच जर घरात बघितले असेल, तर हे असे होणार नाही.

जातवेद's picture

27 Nov 2013 - 10:20 pm | जातवेद

मला स्वता:ला अन्न टाकलेले अजिबात आवडत नाही (तमालपत्र वगैरे सोडून). फेज १ मधे रोज काल किती किलो अन्न वाया गेले ते फळ्यावर लिहुन ठेवलेले असायचे. त्याच्याकडे पाहुन रोज राग यायचा. अगदी ३० ते ४० किलो पर्यन्त वगैरे आकडा असायचा. हल्ली आकडे टाकलेले दिसत नाहीत.
याची कारणे काय तर, भुक नसताना जास्तीच घेणे नाही तर अन्न बेचव असणे.
कोणी उगाच कशाल पैसे वाया घालवायला अन्न घेउन टाकून देईल? माझ्या मते जास्त करून 'अन्न बेचव असणे' यामुळेच हे होते.

अन्न बेचव असण्याशी सहमत आहे. बर्‍याचदा त्याचमुळे कुंपिणीचे अन्न सोडून आंध्रा मेसमध्ये जातो हादडायला. आत्मा तृप्त, पोट संतृप्त आणि झोप त्याहून संपृक्त येते =))

खबो जाप's picture

28 Nov 2013 - 8:54 am | खबो जाप

+१००

आशु जोग's picture

27 Nov 2013 - 10:29 pm | आशु जोग

जेवल्यावर ताट स्वच्छ नाही

प्रोग्रॅमिंगही असेच गलिच्छ करत असणार. अ‍ॅवेलेबल रेसोर्सेस कसेही वापरून टाकत असणार. गारबेज कलेक्टर आहेच यांची घाण काढायला.

राजेश घासकडवी's picture

27 Nov 2013 - 10:39 pm | राजेश घासकडवी

श्रीमंतांनी अन्न वाया घालवलं नाही, तर गरीब शेतकऱ्याच्या उत्पादनाचा उठाव कमी होऊन भाव आणखीनच पडणार नाहीत का? मला तसं इकॉनॉमिक्समधलं कळत नाही, पण ट्रिकल डाउन वगैरे शब्द मोठ्या मोठ्या इकॉनॉमिस्ट्सकडून ऐकले आहेत.

आदूबाळ's picture

28 Nov 2013 - 12:53 pm | आदूबाळ

अंशतः सहमत आहे. जसा महागाई कमी करायचा एक (अघोरी) उपाय असतो "नोटा जाळणे" तसा शेतीमालाची मागणी वाढवायचा उपाय अन्न वाया घालवणे असू शकतो.

पण

भारतात शेतीमालाच्या बाबतीत "वितरण" हा मोठा अडसर आहे. (अमर्त्य सेन दुष्काळाचं कारण हेच देतात). टाकलेले अन्नपदार्थ (गहू, तांदूळ वगैरे) योग्य पद्धतीने वितरण करून कमी उत्पन्न घटकांपर्यंत पोचवता येणार आहेत का? सध्या तशी सिस्टिम अस्तित्वात नाही.

--

पुण्यातल्या कंपन्यांच्या बाबतीत बोलायचं झालं तर सँडविक एशिया आणि कमिन्स या दोन कंपन्यांत अन्नाची कमीत कमी नासाडी होताना पाहिली आहे. त्याचं कारण बहुदा "जेवण चवदार असतं" हे असावं.

आशु जोग's picture

3 Dec 2013 - 7:11 pm | आशु जोग

राजेश घासकडवी

श्रीमंतांनी अन्न वाया घालवलं नाही, तर गरीब शेतकऱ्याच्या उत्पादनाचा उठाव कमी होऊन भाव आणखीनच पडणार

तुम्ही एकच बाजू ध्यानात घेताय...

"अन्न वाया घालवलं" म्हणतो यातच सगळ आलं

दारु सिगारेट मधून खूप टॅक्स मिळतो पण त्याच्या कितीतरी पटीने कोणत्याही देशामधे या लोकांच्या आजारपणावर खर्च होतात.

अर्धवटराव's picture

27 Nov 2013 - 10:47 pm | अर्धवटराव

माझा टीम लीड अगदी मुद्दाम घरपूर अन्न पानात टाकायचा. कारण काय, तर म्हणे त्यावर इतर किटकांचा हक्क आहे व आपण ते केलेच पाहिजे आणि आमच्यात अगदी आवर्जुन असं करतात (तो मल्लु होता). मला तसंही त्याच्या बुद्धीमत्तेची कीव यायची (टीम लीड त्याकरताच असतो ;) ) आणि हे तत्वज्ञान ऐकुन घेरी येणं बाकि होतं फक्त.

आशु जोग's picture

27 Nov 2013 - 11:27 pm | आशु जोग

राजेश घासकडवी

नेहमी गंभीर आणि उपयोगी विषयावर असलं काहीतरी टाकलच पाहिजे का !

राजेश घासकडवी's picture

28 Nov 2013 - 6:50 am | राजेश घासकडवी

नेहमी? तुम्हाला जर एखाद्या विषयावर वेगळादृष्टिकोन आलेला आवडत नाही तर तसं सांगा की सरळ. 'नासाडी कशी वाईट' असं म्हणणाऱ्या लेखावर कोणी 'नासाडीचे अप्रत्यक्ष फायदे असतात' असं म्हटलं तर जरा विचार करून बघा इतकंच.

तुमचा जसा गैरसमज झाला तसा सगळ्यांचाच होऊ नये म्हणून माझा विचार थोडा समजावून सांगतो.

हे अन्नाची नासाडी करणं वगैरे उच्चवर्गीयांमध्ये चालतं. गरीब लोकं - भारतातली सुमारे ७५% जनता अन्न अतिशय जपून वापरते. मुळात तुम्ही घरून डबा न नेता फूड कोर्टमध्ये खाता तेव्हा पैशांची नासाडी करत असताच. घरून डबा नेण्यापेक्षा फूड कोर्टमध्ये खाणं यासाठी किमान तिप्पट खर्च येतो. वाईटसाईट खाल्लं जातं ते वेगळंच, पण ते आपण सध्या बाजूला ठेवू. सगळ्याच उच्चवर्गीयांनी - म्हणजे ज्यांना दिवसाला दरडोई दोनशे रुपयांपेक्षा खर्च करणं परवडतं, अशांनी फूडकोर्टमध्ये खाण्याऐवजी घरून डबे नेले, तर आख्खा फूडकोर्ट बिझनेस कोसळणार नाही का? मग त्यावर आधारित असणाऱ्या लाखो लोकांचं उत्पन्न बुडणार नाही का? थोडासा वेळ वाचवण्यासाठी श्रीमंत लोक तिप्पट खर्च करायला तयार असतात म्हणून ज्यांचं पोट भरतं, त्यांना पैसे मिळाले नाहीत तर तेही काटकसरीने जगतील. शेवटी तळात असलेल्या शेतकऱ्याचा माल किती उठणार हे या श्रीमंतांनी केलेल्या नासाडीमुळेच ठरत नाही का? श्रीमंतांनी डिमांड कमी केली तर गरीबांनी केलेल्या सप्लायच्या किमती घटून गरीब आणखीन गरीब नाही का होणार?

मी त्यासाठी मुद्दामून नासाडी करावी असं म्हणत नाहीये, तर सद्यस्थिती काय ते सांगतो आहे.

हुप्प्या's picture

28 Nov 2013 - 1:38 pm | हुप्प्या

तमाम उच्चवर्गीय अन्नाची नासाडी करतात व तमाम गरीब अन्न जपून वापरतात ह्याला काही आधार? तसेच ७५ % वगैरे आकडे कसे आले? सगळ्याच उच्चवर्गीयांना अन्नाची नासाडी झाल्याची पर्वा नसते हे मला खरे वाटत नाही. अगदी गरीब घरातही लग्न वगैरे कार्याच्या वेळेस अन्न नासाडी झालेली बघायला मिळते.
घरून डबा नेण्याऐवजी फूड कोर्टात खाल्ले तर किमान तिप्पट खर्च येतो हे सरधोपट विधान वाटते. मुळात पैशाचा माज वा पैसे उधळायचे म्हणूनच फूड कोर्टात खाल्ले जाते हे गृहितक अजब आहे. स्वैपाक, डबा भरणे इ. करायला वेळ नाही म्हणून कितीतरी वेळा नाईलाजास्तव बाहेरचे खाल्ले जाते. घरचे कुणी आजारी आहे, कुणाची परीक्षा आहे, अन्य काही कार्य आहे असे असल्यावरही लोक डबा न नेता बाहेरच विकत घेतात.
समजा फूड कोर्ट अवाच्या सवा पैसे लावत आहे. आणि समजा तमाम लोक शहाणे झाले आणि डबे आणू लागले तर फूड कोर्ट कोसळेलच हे कशावरून? कदाचित दुसरी म्यानेजमेंट येईल जी घरगुती जेवण वाजवी खर्चात बनवू लागेल, कदाचित वेगळ्या प्रकारचे जेवण मिळू लागेल, कदाचित महागडे पण आरोग्याला चांगले असे जेवण बनवायचा कुणी प्रयत्न करु पाहेल. फूड कोर्ट प्रकरण कोसळेल आणि त्यावर अवलंबून असणारे सर्व देशोधडीला लागतील असे म्हणणे जरा अतिरेकी वाटते.
मुळात अन्नाची नासाडी म्हणजे ऊर्जेची नासाडी आहे. त्यातली सूर्याची ऊर्जा फुकट म्हणून कदाचित दुर्लक्षित ठेवली तरी बाकी अनेक गोष्टी आहेत. उदाहरण म्हणून चपाती पाहिली तर गहू कापणे, मळणी करुन गहू वेगळे करणे, ते उपभोक्त्यापर्यंत नेणे, गव्हाचे पीठ करणे, त्याकरता होणारी वाहतूक, पीठ चाळणे, पीठ मळणे, लाटणे, भाजणे, बाकी लागणारी सामग्री, तेल, पाणी, गॅस वगैरे त्याची निर्मिती वाहतूक इ., मग चपाती काही काळ ठेवणे, टिकवणे, त्याकरता लागणारे डबे, फ्रिज जे काही असेल ते, खाणार्‍यापर्यंत पोचवणे ह्या सगळ्या गोष्टीला ऊर्जा खर्च होते. हे सगळे होऊन ते पुन्हा मातीत मिळणार असेल तर ती ऊर्जा वायाच गेली. कारण गहूच मातीत टाकून देणे कितीतरी स्वस्तात पडले असते.
आता चमचमीत भाज्या, पनीर, चीजसारखे महागडे पदार्थ याकरता अधिकच खर्च होतो.
हे पदार्थ बनवून ते वाया घालवणे म्हणजे नळाचे पाणी तासनतास उघडे ठेवून गटारात सोडून देण्यासारखेच घातक आहे.

राजेश घासकडवी's picture

28 Nov 2013 - 11:00 pm | राजेश घासकडवी

तमाम उच्चवर्गीय अन्नाची नासाडी करतात व तमाम गरीब अन्न जपून वापरतात ह्याला काही आधार?

मी लिहिलेलं आहे की अन्नाची नासाडी उच्चवर्गीयांत चालते. प्रत्येक उच्चवर्गीय नासाडी करतो असं म्हटलेलं नाहीच. गरीब लोकांना नासाडी करण्याइतके पैसेच नसतात.

सेच ७५ % वगैरे आकडे कसे आले?

जरा प्रतिसाद नीट वाचा हो. सर्वासाधारणपणे दरडोई दरदिवशी २०० रुपये खर्च करू शकणारे लोक असंही म्हटलेलं असेल. ते वरचे २५% असावेत असा अंदाज आहे. तो आकडा ७५% आहे की ८०% आहे की ८१.३४% आहे याने माझ्या युक्तिवादात काहीही फरक पडत नाही. बहुतांश लोकांना अन्नाची नासाडी करणं परवडतच नाही. हे परवडतं ते वरच्या २५ पर्सेंटाइलमधले असतात एवढंच.

मुळात पैशाचा माज वा पैसे उधळायचे म्हणूनच फूड कोर्टात खाल्ले जाते हे गृहितक अजब आहे.

अहो तुम्ही माझा प्रतिसाद न वाचताच लिहीत आहात का? माज आणि उधळणे हे शब्द मी कुठे वापरले आहेत? आणि गृहितक? जे घडतंय ते शक्य तितक्या योग्य शब्दात लिहिलं तर त्यावर या असल्या प्रकारचा हेत्वारोप का?

स्वैपाक, डबा भरणे इ. करायला वेळ नाही म्हणून कितीतरी वेळा नाईलाजास्तव बाहेरचे खाल्ले जाते. घरचे कुणी आजारी आहे, कुणाची परीक्षा आहे, अन्य काही कार्य आहे असे असल्यावरही लोक डबा न नेता बाहेरच विकत घेतात.

गरीबांकडे असे काही प्रश्न नसतातच का? पण त्यांना ते कष्ट सहन करून वर डबा तयार करणं अनिवार्य ठरतं. श्रीमंतांना ते एक्स्ट्रा कष्ट घ्यावे लागत नाहीत. तेव्हा नाइलाज हा शब्द प्रत्येक व्यक्तीनुसार बदलतो.

समजा तमाम लोक शहाणे झाले आणि डबे आणू लागले तर फूड कोर्ट कोसळेलच हे कशावरून? कदाचित दुसरी म्यानेजमेंट येईल जी घरगुती जेवण वाजवी खर्चात बनवू लागेल,

यालाच नासाडी कमी होणं म्हणतात.

मुळात अन्नाची नासाडी म्हणजे ऊर्जेची नासाडी आहे.

हा मुद्दा बरोबर आहे. पुढे तुम्ही नुसतीच ऊर्जा नाही तर संसाधनं किंवा रिसोर्सेस या अर्थाने म्हणता तेही बरोबर आहे. माझाही तोच मुद्दा आहे. सर्वच श्रीमंतांनी या रिसोर्सेसची मागणी कमी केली (मुख्यत्वे नासाडी कमी करून, गरीबांसारखंच राहून) तर ते रिसोर्सेस पुरवणारे (बहुतेक गरीब) आपली नोकरी गमावून बसतील असा माझा मुद्दा आहे.

पुन्हा 'नासाडी असावी' असा माझा मुद्दा नाही. तर 'सद्यपरिस्थितीत होणाऱ्या नासाडीवर अनेक लोकांची पोटं अवलंबून आहेत' असा मुद्दा आहेे. तेव्हा नासाडीवर प्रच्छन्न टीका करण्याआधी त्याचाही विचार करावा. हळूहळू नासाडी कमी करत जावं, आणि ही नासाडी कमी करण्यासाठी लोकांना कामाला लावावं हे सगळ्यात उत्तम.

राजेंद्र मेहेंदळे's picture

28 Nov 2013 - 2:00 pm | राजेंद्र मेहेंदळे

>>>मुळात तुम्ही घरून डबा न नेता फूड कोर्टमध्ये खाता तेव्हा पैशांची नासाडी करत असताच.>>>

बाहेरगावातुन नोकरीसाठी इकडे आलेल्या बॅचलर मुलामुलींचे काय?ते तर झोपण्यापुरतेच घरी जातात. बाकी सकाळ/संध्याकाळचा नाश्ता,दुपारचे आणि रात्रीचे जेवण यासाठी कंपनीच्या फूड कोर्ट्वरच अवलंबुन असतात.बाकी इतर मिपाकरांनी लिहीलेली कारणे आहेतच.

प्रभाकर पेठकर's picture

28 Nov 2013 - 2:08 pm | प्रभाकर पेठकर

बाहेरगावातुन नोकरीसाठी इकडे आलेल्या बॅचलर मुलामुलींचे काय?

घरगुती डबा देणारे खुप जणं असतात. ते ऑफिसातही डबे पोहोचवतात.

राजेश घासकडवी's picture

29 Nov 2013 - 1:45 am | राजेश घासकडवी

घरगुती डबा देणारे खुप जणं असतात. ते ऑफिसातही डबे पोहोचवतात.

बरोबर आहे पेठकर काका. अनेक लोक डबा घेऊन जातात. पण तरीही ती दोन फूडकोर्टं चालण्यासाठी त्यात दररोज हजारो लोक येऊन जातात की नाही? आता तुम्ही याच रेस्टॉरंट बिझनेसमध्ये आहात. तुमच्या रेस्टॉरंटमध्ये येणारे लोक उद्यापासून दररोज डबा घेऊन आले तर तुमचा धंदा बुडेल की नाही? नुसती तुम्हालाच नाही, तर तुम्हाला कच्चा माल पुरवणारे, तुमच्या रेस्टॉरंटमध्ये काम करणारे या सगळ्यांना वेगवेगळ्या प्रमाणात झळ पोचेलच की.

मी तर उलट तुमच्या धंद्यासाठी चांगली गोष्ट म्हणतो आहे. ज्यांना परवडेल त्यांनी खरं तर रेस्टॉरंटमध्ये खाऊन काही अतिरिक्त पैसे खर्च करावेत. काही प्रमाणात नासाडी होण्यातच भलं आहे अशी सध्याची व्यवस्था आहे. ती बदलून जवळपास शून्य नासाडी पण तरीही कोणाच्या पोटावर पाय नाही या व्यवस्थेपर्यंत जाणं भल्याचं. पण ते कसं जाता येईल याची कोणाला कल्पना नाही.

प्रभाकर पेठकर's picture

29 Nov 2013 - 10:12 am | प्रभाकर पेठकर

काही प्रमाणात नासाडी होण्यातच भलं आहे अशी सध्याची व्यवस्था आहे. ती बदलून जवळपास शून्य नासाडी पण तरीही कोणाच्या पोटावर पाय नाही या व्यवस्थेपर्यंत जाणं भल्याचं. पण ते कसं जाता येईल याची कोणाला कल्पना नाही.

संस्कार. जे ह्या लेखाद्वारेसुद्धा होत आहेत. पुढच्या पिढीवर तसे संस्कार करणे अत्यंत आवश्यक आहे. त्याच बरोबर अशा चर्चांमधून, कांही अनुभवांमधून समवस्यकांवरही अन्ननाश टाळण्याचे संस्कार करता येतील.

आमच्या उपहारगृहात कोणी अन्न टाकले असेल तर (तसे माझ्या लक्षात आल्यावर) मी त्या गिर्‍हाईकास व्यक्तीशः विचारतो की, 'अन्न का टाकून दिलं आहे?' 'आवडलं नाही का?' 'चवीबाबत कांही समस्या आहे का?' इ.इ.इ. शिवाय उरलेले अन्न पॅक करून घरी नेण्यासाठीही प्रवृत्त करतो.

पार्टीच्या वेळी लोकं आमच्या इथे ज्या ऑर्डर्स बुक करतात त्यांनाही पार्टीला किती माणसे येणार आहेत? माझ्या पदार्थांव्यतिरिक्त आणखिन काय पदार्थ आहेत? वगैरे विचारून त्यानी ऑर्डर केलेले पदार्थ जास्त असतील तर ते कमी करून हे कमी करून दिलेले पदार्थ कसे पुरतील हे त्यांना समजावून सांगतो. त्यांचे पैसे आणि अन्नाची संभाव्य नासाडी टळते. माझा नफा कमी होतो पण गिर्‍हाईक टिकून राहते.

उपहारगृह बंद पडली तर त्या व्यवसायाशी निगडीत मालक/कामगार उपाशी मरतील ही भिती अनाठायी आहे. इकॉनॉमिक्स मध्ये सप्लाय-डिमांड नात्यात 'Supply creates its own Demand' असाही एक निष्कर्ष आहे. एखादा व्यवसाय बंद पडला तर त्या व्यवसायाशी निगडीत माणसे दुसरा एखादा व्यवसाय शोधून काढतात आणि तिथे ही माणसे सामावली जातात. गरज आणि उपलब्धता दोन्ही एकमेकांना साहाय्यक आणि पुरक ठरून समतोल साधला जातो. तेंव्हा भिती नसावी.

अन्नाची नासाडी टाळण्यासाठी संस्कार आणि समाज प्रबोधनाशिवाय तरणोपाय नाही.

राजेश घासकडवी's picture

29 Nov 2013 - 11:51 am | राजेश घासकडवी

बाकीचं ठीक, पण

'Supply creates its own Demand'

हे बरोबर नाही हो. नाहीतर प्रचंड सप्लाय आहे, पण डिमांडच नाही अशी रेसेशनची परिस्थिती कधी आलीच नसती. सत्तरीच्या दशकात दिसून आलेलं स्टॅग्फ्लेशन दिसलं नसतं. लोकांनी डिमांड कमी केली की धंदे बुडतात, त्या धंद्यांत काम करणाऱ्या लोकांची नोकरी जाते. कदाचित त्यांना इतर ठिकाणी मिळेलही नोकरी, पण या बदलासाठी अनन्वित कष्ट होतात. १९२९ सालची मंदी कित्येक वर्षं टिकली. एवढ्या मागे कशाला जा, २००८ सालचा गोंधळ अजून पूर्णपणे निस्तरलेला नाही. तेव्हा घरांचा सप्लाय केवढा तरी वाढलेला होता. पण डिमांड धाप्पकन खाली आलीच की. आणि मग लाखो लोकांची घरं गेली.

अन्न हे पूर्णब्रह्म, देव वगैरे नसून एक अत्यावश्यक का असेना पण प्रॉडक्ट आहे हे लक्षात घेतलं की नासाडीकडे एक्सेस डिमांड किंवा रिसोर्स युटिलायझेशन इनएफिशियन्सी वगैरे स्वरूपात बघता येतं. मग नासाडी कमी करण्याच्या फायद्यातोट्यांचा विचार करता येतो. असो, आत्ता जे प्रतिसादांचं स्वरूप दिसतं आहे त्यात कोणाला असा विचार करण्याची इच्छा दिसत नाही.

परिंदा's picture

29 Nov 2013 - 12:09 pm | परिंदा

'Supply creates its own Demand'

कोकाकोला, पेप्सी इत्यादी शितपेयांच्या बाबतीत काय? कोणाला या पेयांची काही गरज नसताना उगाचच विकली जातात ना.

अर्धवटराव's picture

30 Nov 2013 - 12:34 am | अर्धवटराव

अन्नाची नासाडी टाळणे -> रेस्टराँ बिझनेसमधे डिमांड कमि होणे-> त्या बिझनेससंबंधी लोकांच्या पोटावर पाय पडणे
हे गृहीतक चुकीचं आहे

अन्नाची नासाडी टाळ्णे-> पुष्कळसं रॉ मटेरीअल मार्केटमधे उपलब्ध होणे-> त्यातुन निम्न आर्थीक परिस्थितीवाल्या लोकांसाठी माफक दरात अनेकानेक छोटेखानी खानावळी सुरु होणे-> रेस्ट्राँ व्यवसायाची वृद्धी होणे.
असा मस्त कारभार होईल. आज एका फूडचेनवाल्याच्या खिशात जाणारा पैसा अनेक खानावळीमालकांकडे डायवर्ट होईल. तस्मात चिंता नसावी.

राजेश घासकडवी's picture

30 Nov 2013 - 5:53 am | राजेश घासकडवी

छे हो,

अन्नाची नासाडी टाळ्णे-> पुष्कळसं रॉ मटेरीअल मार्केटमधे उपलब्ध होणे-> शेतकऱ्याला कमी भाव मिळणे-> कर्ज फेडणं अधिक कठीण होणे -> शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढणे

असं साधं समीकरण आहे. तुम्हाला मध्यम खाणावळवाल्यांची का चिंता आहे कळलं नाही.

अर्धवटराव's picture

30 Nov 2013 - 7:49 am | अर्धवटराव

तुमचा मुद्दा अगदी बरोबर आहे. मार्केट्मधे रॉ मटेरीअल वाजवी किमतीत अव्हेलेबल आहे, सामान्यांना गरज आहे, उपासमारी घटवायची चांगली संधी आहे... पण सुज्ञ लोक या संधीचा फायदा घेण्याऐवजी सगळं साहित्य गटारात फेकुन देतील व शेतकरी आत्महत्येला मोकळे होतील.

पण मग श्राद्धाचं जेवण बनवणार्‍यांचा बिझनेस जोमात चालेल ना... तो कसा रोखायचा? ह्म्म्म.. सगळं अन्न कावळ्यांना खाऊ घालायचं... उरलेलं नदीत फेकुन द्यायचं... पण मग स्मशान चालवणारे आणि कोळ्यांचा धंदा तेजीत येईल... छ्या... कसंही करुन फायदा काहि टळत नाहि बॉ :(

राजेंद्र मेहेंदळे's picture

29 Nov 2013 - 1:33 pm | राजेंद्र मेहेंदळे

>>शिवाय उरलेले अन्न पॅक करून घरी नेण्यासाठीही प्रवृत्त करतो. >>
मी सुद्धा कधीही हॉटेलमध्ये गेलो आणि अन्न उरले (जसे रोटी भाजी खाल्ल्यावर उरलेली भाजी) तर पॅक करुन घरी घेउन जातो. आणि बाहेरच्या देशातसुद्धा could you please box it for me? विचारतो किंबहुना तेच विचारतात पदार्थ उरलेला बघुन

चेतनकुलकर्णी_85's picture

27 Nov 2013 - 11:29 pm | चेतनकुलकर्णी_85

मी पूर्वी काम करत असलेल्या एका एम एन सी (नॉन आय टी ) मध्ये उरलेले अन्न हे अनाथालयाला पोचते व्हायचे व सध्या च्या सरकारी हाफिसात उरलेले व टाकलेले अन्न हे बायोगास प्लांट मध्ये वापरले जाते .

आय टी लोकांची वृत्ती बदलणार नाही तुम्ही तुमच्या हापिसात बायोग्यास ची कल्पना मांडा बघू कदाचित "ओउट ऑफ बॉक्स थिंकिंग" चे बक्षीस पण मिळेल :D

शंका : पिझ्झा बायोग्यास निर्मितीला तरी मदत करतो का ?

शेखर's picture

28 Nov 2013 - 12:23 am | शेखर

आज काल आय टी च्या लोकांना शिव्या दिल्या शिवाय उच्चभ्रु होता येत नाही.

कपिलमुनी's picture

28 Nov 2013 - 12:11 pm | कपिलमुनी

पुरोगामी !
आय् टी वाले बाय डीफॉल्ट उच्चभ्रु असतात ..

आदूबाळ's picture

28 Nov 2013 - 12:41 pm | आदूबाळ

शंका : पिझ्झा बायोग्यास निर्मितीला तरी मदत करतो का ?

पिझ्झ्यामुळे शरीराच्या पश्चिम आघाडीवर ढामढूम होते. त्यामुळे बायोग्यास-निर्मिती होते असं म्हणायला हरकत नाही.

तोंडाला केक फासण्याची गलिच्छा फ्याशन कोणी आणली हे कळाले तर त्या महाभागाला एक पार्श्वभागावर लत्तप्रहार बक्षीस देईन म्हणतो

रुस्तम's picture

28 Nov 2013 - 7:51 am | रुस्तम

पार्श्वभागावर लत्तप्रहार बक्षीस :D :) :D :) :D

२०-२५ हजार आय टी कामगार असलेल्या आणि आपली मुल्ये जपणार्या कंपनीच्या फुड कोर्ट चा माझाही अनुभव असाच काही आहे.येथे ताटात अन्न टाकण्याचे प्रमाण खुप आहे.
या विषयावर कंपनीच्या फोरम वर नेहमी खुप चर्चा झडतात आणि प्रत्येकाचा रोख हा अन्नाची नासाडी रोखली जावी असाच असतो. फोरम वर आपले विचार मांडताना तर प्रत्येकजण तसे भासवत असतो पण फुड कोर्ट मधील द्रुष्य एकदम वेगळे. डिश लॅंडींग एरिया मध्ये १० मिनीटे थांबुन टाकल्या जाणार्या अन्नाकडे बघितले तर डोके सुन्न होइल असे.

वाढदिवसाच्या पार्ट्या तर अगदी आली लहर केला लहर या स्वरुपाच्या असतात.सरळ सरळ केकची रंगपंचमीच जणु.आगोदर ज्याचा वाढदिवस त्याला/तिला मग मोर्चा बाकी लोकांकडे, त्यासाठी मग केक लावण्यासठी पळापळ, नाहीतर मग फेकाफेकी.यानंतर तोंडाला लावलेला केक धुवुन बेसिन एरिया घाण आणि बेसिन ब्लॉक करणे आले.

काही दिवसांपुर्वी एक स्त्री एम्प्लोयी ओरडत पुढे पळतेय आणि मागे तोंडावर केक फासलेला हातात केक चा मोठ्ठा तुकडा घेऊन तिचा परुष सहकारी तिच्या मागे मागे पळतोय असे द्रुष्य बघितले.

आसिफ.

चिर्कुट's picture

28 Nov 2013 - 3:56 pm | चिर्कुट

खव पाहा रे..

जर्मनी मधला हा अनुभव वाचा आणि पहा ते लोक किती जागृत आहेत.

http://www.moneylife.in/article/penalty-for-wasting-food-can-we-follow-t...

स्पंदना's picture

28 Nov 2013 - 4:33 am | स्पंदना

काय..थोड सांगुन बघायच. थोड आपण आपला नियम पाळायचा अस करुन बघा.
बाकी मलाही अन्न टाकणारे लोक अजिबात आवडत नाही. मी माझ्या मुलांना सांगते, भाताच एक कण शिजायला जरी अर्धातास लागला तरी त्याला शेतात चार महिने लागतात तयार व्हायला. सो एकही शित टाकायच नाही.
कधी ऐकतात कधी नाही. यु आर ऑलवेज लाइक धिस पण म्हणतात. :(

भाताच एक कण शिजायला जरी अर्धातास लागला तरी त्याला शेतात चार महिने लागतात तयार व्हायला

झकास ,
आवडलं,
पटलं.

भावाने सांगितलं की पुण्यात म्हणे एक रेस्टॉरंट आहे जिथे त्याने जेवण पूर्ण संपवल्यावर मालकाने १०% डिस्काऊंट दिला, अन्न वाया न घालवल्याबद्दल. (भावाने आनंदाने २०% टीप दिली!) रेस्टॉरंटचं नाव विसरलो, पण तिथे म्हणे ही कायमची प्रथा आहे.

यसवायजी's picture

28 Nov 2013 - 8:48 am | यसवायजी

Durvankur. Tilak rd.

प्रभाकर पेठकर's picture

28 Nov 2013 - 2:22 pm | प्रभाकर पेठकर

चिपळूणात ह्या विरुद्ध पाटी पाहिली.
'नको असल्यास आधीच सांगावे. ताटात अन्न टाकल्यास ५ रुपये दंड करण्यात येईल.' हे मला १० टक्के सवलत देण्यापेक्षा जास्त योग्य वाटतं.

ताटात टाकणार्‍यांची संख्या तशी, न टाकणार्‍यांपेक्षा, कमी असते. त्यामुळे लोकांना शिस्त लावताना, सवलती पोटी, उपहारगृहाच्या मालकालाच भुर्दंड पडेल. शिवाय ह्यांनी आधीच १०% किमती वाढविलेल्या आहेत ( नाही तर कसे परवडते?) असा गैरसमज जनमानसात पसरू शकतो.

त्यामुळे पदार्थांच्या किमती रास्त ठेवून अन्नाची नासाडी करणार्‍यास दंड आकारणे जास्त व्यवहार्य आणि नैतिक ठरेल.

यसवायजी's picture

28 Nov 2013 - 3:49 pm | यसवायजी

'तु नही तो और सही' म्हणणारे पण असतात. त्यामुळे दंडापेक्षा सवलतच गिरर्‍हाईकाला जास्त आकर्षीत करेल.
शेवटी मालकाला हॉटेल चालवताना विचार तर करावाच लागेल ना काका..

(मला असं वाटतं.. बाकी पेठकर काकांचा (मालकांचा) एक्ष्पेरिएन्चे जास्तच आहे म्हणा..)

प्रभाकर पेठकर's picture

28 Nov 2013 - 4:29 pm | प्रभाकर पेठकर

उपहारगृह उत्तम प्रकारे चालत असेल तर दंडाचेही कौतुक होते.
न चालणार्‍या उपहारगृहाला सवलतीच्या कुबड्या घ्याव्या लागतात.
दुर्वांकुराचे नांव नक्कीच मोठे आहे. ते कांही न चालणार्‍या उपहारगृहांपैकी नाही हे मी जाणतो. मी एक सर्वसामान्य नियम सांगितला आहे.
तसेच, स्थानपरत्वेही उपहारगृह मालकांची धोरणे बदलत असावित.

मृत्युन्जय's picture

29 Nov 2013 - 11:12 am | मृत्युन्जय

एक ग्राहक म्हणून मला दुर्वांकुरची पद्धत बरोबर वाटते. मी जेव्हा जागेवर बसतो तेव्हा मला माहिती असते की मला २०० रुपये द्यावे लागणार आहेत. त्यातले २० कमी झाले तर उत्तमच आहे. काही कारणाने मी ताट पुर्ण रिकामे नाही करु शकलो तर चूक माझी आहे आणि मी पुर्ण पैसे भरेन जे भरण्याची मानसिक तयारी मी आधीच केली आहे.

एखाद्या माणसाला सवलत देण्याचा अधिकार उपहारगृहचालकाला नक्कीच आहे. शिक्षा देण्याचा नाही. जर उपहारगृह चालक पोलिसाच्या भूमिकेत शिरला (दंड वगैरे) तर त्याची आणि गिर्‍हाइकांची भांडणे होतील. शिवाय ताटाचा दर जर १८० असेल तर जेवायला बसताना गिर्‍हाइकाची मानसिकता १८० भरण्याचीच असते. जर त्याला २०० रुपये भरण्याची सक्ती केली गेली तर तो आपसूक बिथरेल. मेनु कार्डावर, हॉटेलमध्ये आणि अगदी टेबलावर जरी ही दंडाची सूचना स्पष्टपणे लिहिली असेल तरी शेकडा दहा टक्के लोक आम्ही हे वाचलेच नाही अशी भूमिका घेइल्. अगदी त्याला हे स्प्ष्टपणे सांगितले जरी तरी त्याला हे ज्यादा आकार देणे अपमानास्पदच वाटेल. याउलट सवलत नाही मिळाली तर ठीक आहे म्हणून कोणीही सोडुन देइल.

दंडात्मक कारवाईने उपहारगृहातल्या कटकटी वाढतील. मॅनेजरला दुसरे काही काम नसल्यासारखे त्याला लोकांशी या पॉलिसीवरुन हुज्जत घालत बसावे लागेल. सवलत मिळवण्यावरुनही एक दोन जण कटकट करण्याची शक्यता नाकारता येत नाही पण ती संख्या खचितच कमी असेल.

प्रभाकर पेठकर's picture

29 Nov 2013 - 12:17 pm | प्रभाकर पेठकर

जर उपहारगृह चालक पोलिसाच्या भूमिकेत शिरला (दंड वगैरे) तर त्याची आणि गिर्‍हाइकांची भांडणे होतील.

'दंड केला जाईल' असे म्हंटले म्हणजे लगेच पोलीसाच्या भूमिकेत शिरला असे होत नाही. दंड भरला नाही तर लगेच ऊपहारगृहाने पाळलेलेल गुंड गिर्‍हाईकाला बदडून, उचलून बाहेर फेकून देत नाहीत. समजावून सांगितले जाते असे करू नका. हे गैर आहे. दंडापोटी रक्कम वसूल करणे हा उद्देश नसून पाटी पाहून अन्नाची नासाडी करणार्‍यांचे प्रमाण कमी व्हावे ही त्यामागील भावना आहे. पाटी लिहून ठेवली म्हणजे लगेच दंड वसूल केला जातो असे नाही. ह्या उलट सवलतीच्या फलकाच्या बाबतील अटीची पूर्तता करणार्‍या गिर्‍हाईकास सवलत ही द्यावीच लागेल.

उपहारगृहात हात धुवायच्या जागीही 'केस विंचरू नयेत', 'नाक शिंकरु नये', 'घसा खाकरू नये', 'ताटात हात धुवू नयेत' वगैरे वगैरे सूचना फलक असतातच त्यापैकीच हा 'ताटात अन्न टाकले तर ५ रुपये दंड केला जाईल' एक फलक. दंड केलाच जाईल असे मला वाटत नाही. पण फलकाचा परिणाम नक्की होतो. (माझ्यावर तरी झाला होता) त्या मागिल भावना ओळखून गिर्‍हाईके समंजसपणा दाखवतात. आपल्याला हवे तेवढेच ताटात वाढून घेतात.

शिवाय ताटाचा दर जर १८० असेल तर जेवायला बसताना गिर्‍हाइकाची मानसिकता १८० भरण्याचीच असते. जर त्याला २०० रुपये भरण्याची सक्ती केली गेली तर तो आपसूक बिथरेल

दंडाची रक्क्म फक्त ५/- रुपये आहे. म्हणजे १८०/- भरायची मानसिकता असणार्‍याला खरोखर दंड वसूल करायचा म्हंटला तरी फक्त १८५/- रुपये खर्च येईल. शिवाय त्याची चूक त्याच्या पदरात घातल्यावर तो कांही कटकटही करणार नाही. उलट पुढच्या वेळी तो ही गोष्ट नक्कीच लक्षात ठेवेल.
सवलतीच्या धोरणात सर्वांनीच ताट साफ केले तर ते ताट प्रत्येकाला १६२/- रुपयाला पडेल. आणि तोच दर वाजवी आहे असे सिद्ध होईल (कारण १६२/- रुपयातही उपहारगृह मालकाला अपेक्षित फायदा आहेच) आणि १८०/- हा दर अवाजवी आहे असा समज गिर्‍हाईकांमध्ये पसरेल. (दुर्वांकूराचे दर मला माहित नाही. पण इतर उपहारगृहांपेक्षा नक्कीच १०% जास्त असतील असे मला वाटते आहे. असो.)

अजून एक सवलत मला ठाऊक आहे. ती म्हणजे, 'होम डिलीव्हरी वर १०% सूट देण्यात येईल.' गिर्‍हाईकांनी ओसंडून वाहून जाणार्‍या उपहारगृहातील ही पाटी आहे. त्या मागील व्यवहार असा आहे की गिर्‍हाईकाने आपल्या घरी जेवण मागवले तर जे टेबल त्याने उपहारगृहात अडवून ठेवले असते ते मो़कळे राहून तिथे दूसरे गिर्‍हाईक बसू शकते आणि विक्री वाढते. इथे सूट दिल्याने कमी होणारा फायदा वाढीव विक्रीतून भरून निघतो त्यामुळे वाजवी किमतीच्या खाली दर लावण्याचे समर्थन होते. मूळ दर अवाजवी वाटत नाही.

दंडात्मक कारवाईने उपहारगृहातल्या कटकटी वाढतील. मॅनेजरला दुसरे काही काम नसल्यासारखे त्याला लोकांशी या पॉलिसीवरुन हुज्जत घालत बसावे लागेल.

असे कांही घडत असल्याचे मी तिथे असतानाच्या एका तासात जाणवले नाही. उलट त्या फलकाचे गिर्‍हाईकांकडून कौतुक होत असल्याचे दिसून आले. शिवाय फलकातील वेगळेपणामुळे ती एक 'बातमी' होऊन, बाहेर गेल्यावरही चर्चा होऊन (जशी इथे होत आहे) त्यामागच्या मूळ भावनेचा, अन्नाची नासाडी करू नये, प्रसार होण्यास मदत होत आहे.

मी स्वतः पुरत पहिले बघतो,जेवढ पाहिजे तेव्हढे घेणे आणि घेतले तेवढे संपवणे.
माझ्या बरोबर कोणी जेवत असेल आणि ताटात काही टाकले की मोठा असेल तर आवडले नाही म्हणून सांगतो आणि बरोबरचा मित्र असेल तर सरळ लाज काढतो.
एखाद्या पदार्थाची चव बिघडली असली तर मालकाला वाद घालून टेस्ट करायला लावतो.
आधी तुझ काय जातय, मी पैसे देतो, कशाला शहाणपणा शिकवतो वेगॆरे व्हयाच पण आजकाल माझ्याबरोबर जेवणारे मित्र स्वतःहून संपवण्याचा प्रयत्न करतात आणि हसत/चेष्टेत का होईना सॉरी म्हणतात.

जग एका दिवसात बनले नाही त्यामुळे बदल पण एका दिवसात होणार नाही

सौंदाळा's picture

28 Nov 2013 - 10:15 am | सौंदाळा

पुण्यातले दुर्वांकुरवाले मानकर जर ताटात काही टाकले नाही तर १०% सवलत देतात म्हणे बिलात.
हा पण चांगला प्रयोग आहे.

अनिरुद्ध प's picture

28 Nov 2013 - 12:09 pm | अनिरुद्ध प

मला तरी आला नाही,दुर्वान्कुर मध्ये जेवायला गेलो होतो तेव्हा.

कपिलमुनी's picture

28 Nov 2013 - 12:13 pm | कपिलमुनी

१०% सवलत आहे ..

अनिरुद्ध प's picture

28 Nov 2013 - 12:17 pm | अनिरुद्ध प

सवलत नंतर सुरु झाली असावी (मी जाउन आल्या नन्तर)

शिल्पा नाईक's picture

28 Nov 2013 - 4:20 pm | शिल्पा नाईक

दुर्वांकूर च जेवणच इतक छान असत की टाकल जात नाहीच :)
आम्ही गेलो होतो तेव्हा पण discount होता. रु २०.

अग्निकोल्हा's picture

28 Nov 2013 - 10:33 am | अग्निकोल्हा

जाड जालाय्सा.... देशात उपाशी बालके असताना अन्नाची ही नासाडि?

प्रकाश घाटपांडे's picture

28 Nov 2013 - 11:47 am | प्रकाश घाटपांडे

अन्न वाया गेले की फार मानसिक त्रास होतो. आग्रह करु करु खायला घालणार्‍या लोकांपासून लांब राहतो. मला आग्रहाचा त्रासही होतो व चीड ही आहे.

नाखु's picture

28 Nov 2013 - 12:22 pm | नाखु

पूर्ण सह्मती.

प्रकाश घाटपांडे's picture

28 Nov 2013 - 1:26 pm | प्रकाश घाटपांडे

पुर्वी वरपक्षाकडील चिमुरड्या पोरीचे ताट देखील स्वतंत्र पान म्हणून मोजावे लागायचे. हल्ली बुफे मुळे अन्नाची नासाडी कमी झाली आहे ते एक बर आहे.

नाखु's picture

28 Nov 2013 - 3:12 pm | नाखु

बुफे मुळे अन्नाची नासाडी कमी झाली अस फार दिसून येत नाही ,उलट पहिल्यांदाच जास्त नाही घेतले तर कांउटर बंद होईल आश्या पद्धतीने "भरगच्च" ताट घेऊन अत्य अल्पोहार करणारेच जास्त.
आणी हे जर दाखवून दिले तर "तुझ्या @@@@चे टाकतोय का असा अविर्भाव" हमखास.

प्रकाश घाटपांडे's picture

28 Nov 2013 - 3:34 pm | प्रकाश घाटपांडे

पंगत या प्रकारा पेक्षा तुलनेने बुफे मधे नासाडी कमी आहे असे माझे निरिक्षण आहे

नाखु's picture

28 Nov 2013 - 3:53 pm | नाखु

सहमत

काही महाभाग बुफे मध्ये देखील अगदी भरमसाठ वाढून घेतात कारण काय कोण सारखं सारखं रांगेत उभे राहणार.
आणि मग हेच अन्न मग सरळ टाकून देतात.

ना युद्ध चालूय ना म्हादुश्काळ. उणिव आहे ती फक्त व्यवस्थेची जी सर्वाकड़े अन्न विकत घेण्या इतपत पैसा वितरित करेल....

उगा वाया जाणारे अन्न वाचवून किती पोटे भरणार ? आज दान करालहि उद्या सुधा ते शक्य असेल का?

आशु जोग's picture

28 Nov 2013 - 7:40 pm | आशु जोग

अग्निकोल्हा

तुम्ही आजतक वर असता काय !
नाही म्हणजे तुमचे विचार इतरांपेक्षा वेगळे असतात

अग्निकोल्हा's picture

28 Nov 2013 - 10:59 pm | अग्निकोल्हा

है की नै हिंदू ?

भ ट क्या खे ड वा ला's picture

28 Nov 2013 - 7:45 pm | भ ट क्या खे ड वा ला

एक किलो तांदूळ शेतात तयार होण्यासाठी ५००/७०० लिटर पाणी लागते. नेरळ येथील भडसावळे यांच्या "सगुणा बाग" येथे याविषयी सविस्तर माहिती मिळते. अन्नाची नासाडी थांबविण्यासाठी लहानपणीच प्रबोधन होणे आवश्यक आहे. अलीकडेच कल्याण ला एका हॉटेलात पाटी पाहिली " Food is God do not waste it " असो देव म्हणून का होईना नासाडी थांबवण्याचे आवाहन आवडले
या निमित्ताने एक श्लोक हि आठवला.

वदनी कवल घेता नाम घ्या मातृ भू चे
सहज स्मरण होते आपुल्या बांधवांचे
कृषीवल क्रुशिकर्मि राबती दिन रात्र
श्रमिक श्रम करोनी वस्तू त्या निर्मितात
स्मरण करुनी त्यांचे अन्न सेवा खुशाल
उदर भरण होते चित्त होण्या विशाल ||

बहुगुणी's picture

29 Nov 2013 - 9:05 am | बहुगुणी

अगदी फूड कोर्ट्स /खानावळींत लावावा इतका चांगला आहे, कवि कोण?

आशु जोग's picture

28 Nov 2013 - 7:51 pm | आशु जोग

प्रकाश घाटपांडे
यांचे नि माझे एवढे एकमत कसे होते कोणास ठाऊक.

लग्नातला आग्रह ही तर तिडीक आणणारी गोष्ट आहे. त्यातही वराच्या किंवा वधूच्या लांबच्या नात्यातल्या नातेवाइकांचा उत्साह ओसंडून वाहत असतो.

एका जवळच्या लग्नातली गोष्ट,
लोकांची जेवणे आटोपत आली, पंगत उठायला लागली तेव्हा मुलीच्या वयोवृद्ध काकांना हुक्की आली. ते गुलाबजामाचे पातेले घेवून आले आणि ज्यांच्याशी ओळख पाळख नाही अशाही लोकांना आग्रहाने वाढायला लागले. एका तरुण मुलापाशी आले. त्याने जेवण संपवून पान अगदी स्वच्छ केले होते. तो एकच वाढा म्हणत असताना त्यांनी जास्त वाढले वर मखलाशी "माझं गणित कच्चय, एक म्हटलं की मी दोन वाढतो"

तो तरुण मुलगा खवळलाच, "भांडाभांडी वादावादी सुरु झाली"

ते आजोबा छोटं तोंड करुन माघारी निघून गेले...

प्रकाश घाटपांडे's picture

28 Nov 2013 - 8:11 pm | प्रकाश घाटपांडे

आग्रह माझ्या शारिरिक व मानसिक प्रकृतीला मानवत नाही हे मी प्रथम स्पष्ट पणे व नम्र पणे सांगतो. तरीही काही लोक ऐकत नाही. मग मी आवडत नसताना आग्रह करणार्‍या लोकांकडे मी परत कधीही जात नाही असे स्पष्टपणे सांगतो. ऐकत नसलेल्या जुनाट लोकांवर मी " तुम्हाला वाढायच तेवढ तुम्ही वाढा मला जेवढ खायच तेवढ मी खाईन. अन्न वाया गेल्याचे पाप तुम्हाला लागेल." असे सांगतो.

हा असा अतिआग्रह एका मारवाडी मित्राच्या लग्नात झाला होता. जेवण तर एकदम गोड आणि तुपाळ. त्यात आम्ही मुलाकडचे असल्याने अतिआग्रह करुन वाढतच होते. कसेबसे संपवले.

नवर्‍यामुलाची तर कीवच येत होती. जो तो येत होता आणि लाडू भरवून्(कोंबून) जात होता. बिचार्‍याच्या पोटाचे काय झाले असेल देव जाणे. आम्हीही त्याची बिकट परिस्थिती जाणून आहेरात हाजमोला दिला. :)

सुहासदवन's picture

29 Nov 2013 - 2:40 pm | सुहासदवन

मी देखील असच करतो. ऐकत नाही म्हणजे काय?

पाप पुण्याच्या निमित्ताने का होइना पण बरोबर ताळ्यावर येतात!

युगन्धरा@मिसलपाव's picture

29 Nov 2013 - 3:04 pm | युगन्धरा@मिसलपाव

खरच आय टी कंपन्यांमधे खुपच नासाडि होते अन्नाचि .
वाडपि पण बदा बदा वाधत जातो नको म्ह्ट्ल तरि.

पुतळाचैतन्याचा's picture

29 Nov 2013 - 8:03 pm | पुतळाचैतन्याचा

यावर मी थोडा विचार केला होता …एक वेब साईट काढायची आणि तिथे गरजू संस्था आणि हॉटेल, मंगलकार्यालये यांना जोडायचे…अनेक नवीन कल्पना यात घालता येतील…कोणी वेब डेव्लोपर आणि मदत करायची इतरांची(तुम्हा सर्वांची) इच्छा असेल तर निश्चित प्रयोग करून बघू शकतो…!!!

आशु जोग's picture

30 Nov 2013 - 4:03 pm | आशु जोग

डेव्लोपर

ये क्या होता है !