मिपाकर सभ्य स्त्रीपुरुषहो,
राम राम!
परवाच मिपावर झानटामाटिक ब्रेडची पाकृ एका मिपाकराने दिली होती. त्यातला 'झानटामाटिक' हा शब्द मला इतका प्रचंड आवडला होता की आपण स्वत:ही एकदा घरी ही झानटामाटिक ब्रेडची पाकृ करायची असं मी ठरवलं होतं. त्याप्रमाणे आज आम्ही इथे सौताच्या हाताने केलेल्या झानटामाटिक ब्रेडची पाकृ व फोटू देत आहोत. आपल्याला तो फोटू आवडेल अशी आशा आहे! :)
पाकृ एकदम सोप्पी. ब्रेड चांगला कुस्करून घ्यायचा आणि नंतर फोडणी करून त्यावर छान परतून घ्यायचा. चवीप्रमाणे तिखट-मीठ घालायचं, चिमुटभर साखर घालायची! झाला तिच्यायला झानटामाटिक बिरेड तैय्यार! हाय काय अन् नाय काय! :)
तशी ही पाकृ वास्तविक अगदी लहानपणापासून आम्ही खात आलेलो आहोत. आमच्याकडे याला 'फोडणीचा पाव' असा चक्क मराठमोळा मध्यमवर्गीय घरगुती शब्द आहे. पण काय पण म्हणा मंडळी, याच फोडणीच्या पावाकरता 'झानटामाटिक ब्रेड' हा शब्द ऐकल्यापासून हा फोडणीचा पाव उगाचंच गिरगावातल्या गोरेगावकर चाळीतल्या कुणा शित्र्यांच्या की जोश्यांच्या घरातून उठला आणि डायरेक्ट नेपियन सी रोडवरच्या एखाद्या हायफाय, झानटामाटिक घरात जाऊन बसला असं वाटायला लागलं आहे. खरं सांगतो मंडळी, 'झानटामाटिक' हे नांव इतकं छान आहे की या फोडणीच्या पावाचं झानटामाटिक हे नामकरण झाल्यापासून मला तो अधिक आवडूही लागला आहे! :)
'नावात काय आहे?' असं ज्यानं कुणी म्हटलं आहे त्यानं जर लहानपणापासून खात असलेला फोडणीचा पाव हा 'झानटामाटिक ब्रेड' या नावाने खाल्ला असता तर त्यानेसुद्धा 'नांवात काय आहे?' असं म्हटलं नसतं! :)
असो...
तर मंडळी, हा घ्या आम्ही केलेला झानटामाटिक ब्रेड आणि हादडा! :)
आपला,
(झानटामाटिक) तात्या.
प्रतिक्रिया
23 Sep 2008 - 6:19 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
फोट्टो तर झकास आहे, त्यावरुन झानटामाटिक खदडायला भारीच लागत असेल असा अंदाज करतो.
पाकृ मस्त !!!
तात्या, तिकडचा मूड बरा असेल तेव्हा करुन पाहीन :)
23 Sep 2008 - 6:26 pm | सखाराम_गटणे™
>>तात्या, तिकडचा मूड बरा असेल तेव्हा करुन पाहीन
हा ब्रेड बघुन तिकडचा मुड नक्कीच चांगला होइल.
-----
नाडीला घाबरु नका, ज्योतिषाला पैसे देउन पटवा.
23 Sep 2008 - 7:26 pm | बिपिन कार्यकर्ते
अहो सर... तिकडचा मूड बरा असेल तर तुम्ही कशाला कराल? ;) तिकडूनच करणं होईल ना, हो की नाही? उलट तिकडचा मूड बरा नसेल आणि तुमच्यावर स्वतःच करुन खयची वेळ आली तर ही सोप्पी पाकृ एकदम झानटामाटिकच राहिल की नाही?
बिपिन.
23 Sep 2008 - 9:38 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गटण्या, बिपीन,
'मिपाच्या' आमच्या आयुष्यातल्या घुसखोरीने, आमच्या एका सुखी संसाराचा मुड हल्ली बिघडलाय. मिपावरील इतक्या रेसेपी दाखवल्या. पण कधी तिकडून प्रयत्न करुन पाहिन म्हटल्याचा आवाज सुद्धा आला नाही. मिपा ही सटवी कुठून यांच्या आयुष्यात आली असा अनेकदा आरोप होतो आमच्यावर. त्यामुळे झानटामाटिक आणि इतर रेसिपींना दाद देण्यापलिकडे आम्हाला काहीही करता येत नाही. :)
-दिलीप बिरुटे
(दु:खी )
23 Sep 2008 - 9:51 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
आमच्याकडे उलटीच गंगा आहे (नेहेमीप्रमाणे, आम्ही दोघेही विक्षिप्त ना)! मी इथे पडीक असते त्यामुळे अभिरला कटकट होत नाही. तो त्याचं काम करत बसतो आणि मला टवाळक्या करायला फोरम मिळालाय! :-)
(विक्षिप्त) अदिती
24 Sep 2008 - 11:17 am | बिपिन कार्यकर्ते
प्रा. डॉ.
>> 'मिपाच्या' आमच्या आयुष्यातल्या घुसखोरीने, आमच्या एका सुखी संसाराचा मुड हल्ली बिघडलाय.
एका सुखी संसाराचं म्हणजे असे किती संसार आहेत? आणि एकापेक्षा जास्त असतिल तर सुखी कसे? रहस्य सांगावे ही विनंति. ;)
ह.घ्या.
बिपिन.
23 Sep 2008 - 6:21 pm | मनस्वी
तात्या, आम्हीही ह्याला फोडणीचा पावच म्हणतो लहानपणापासून!
झानटामाटिक फोटू अन् पाकृ! आम्ही शेंगदाणे पण घालतो त्यात.
मनस्वी
*डोक्यावर बर्फ व जीभेवर साखर असली की सारे प्रश्न आपोआप सुटतात.*
23 Sep 2008 - 6:24 pm | विसोबा खेचर
आम्ही शेंगदाणे पण घालतो त्यात.
येस्स! आम्ही पण घालतो परंतु मी ते घालायला विसरलो.. :)
आपला,
(झानटामाटिक वेंधळा) तात्या.
23 Sep 2008 - 6:37 pm | छोटा डॉन
"झानटामाटिक ब्रेड " आम्ही काल रात्रीच हादडायला केला होता ...
ऐनवेळी कंपणीतुन येताना रुमवर भाजी शिल्लक आहे हे गॄहीत घरुन आलो होतो, पाहिले तर "बाकी शुन्य" ...
मग ऐनवेळचा उपाय म्हणुन केला ....
शेंगादाणेही घातले होते ...
पण रंग असा फोटोत दिसतो तसा नव्हता आला.
असो. " रंगात काय आहे" कुणीतरी म्हटलेच आहे ना ...
अवांतर : ह्याच्यासोबत " ऑरेंज ज्युस" ही चवीला एकदम झानटामाटिक लागतो ...
छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
23 Sep 2008 - 6:38 pm | मनस्वी
तू तर म्हणालास, पाटा-वरवंटा पोळपाटावर च्चेपून त्याचे तुकडे टाकले!
मनस्वी
*डोक्यावर बर्फ व जीभेवर साखर असली की सारे प्रश्न आपोआप सुटतात.*
23 Sep 2008 - 6:42 pm | रेवती
पाटा आणि वरवंटा हे दोन्ही पोळपाटावर कसे बुवा चेपायचे? (ह. घ्या.)
रेवती
23 Sep 2008 - 6:51 pm | छोटा डॉन
आमची मनस्वी म्हणते ...
पण आमच्याकडे तर " आलं लसुण " सुदीक नाय, मंग काय करायचं ???
तात्पुरते पाटा वरवंट्याचे बारीक तुकडे करुन ते पोळपाटलाटाण्यावर लाटले व नम्तर मिक्सरमध्ये भरडले तर चालतील काय असे तिला मी विचारले.
तर ती चालते असे म्हणाली ...
पण काल एवढा वेळ नसल्याने मी पटकन "पाटा-वरवंटा पोळपाटावर चेपुन" घेतला ...
समजले काय ?
नसेल तर जास्त लोड नका घेऊ ...
अवांतर विषयांतराबद्दल क्षमस्व !
छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
23 Sep 2008 - 7:24 pm | बिपिन कार्यकर्ते
डान्या... ऑरेंज ज्यूस कसाही झानटामाटिकच लागतो रे... ;)
23 Sep 2008 - 6:23 pm | किट्टु
भारी फोटो टाकला आहे. पाहुन एकदम खायची हुक्की झाली.
थोडी खादाड,
किट्टु :)
23 Sep 2008 - 6:25 pm | शितल
तात्या,
फोडणीच्या पावाचा फोटो मस्तच. :)
ती प्लेट हातात घ्यावी आणि रिकामी करूनच खाली ठेवावी असे वाटत आहे.
:(
23 Sep 2008 - 6:26 pm | प्रभाकर पेठकर
'फोडणीचा पाव' अर्थात शिंचा 'झानटामाटिक बिरेड' मस्तच.
फोडणीला टाकण्या आधी त्यावर किंचित पाणी किंवा पातळ ताक शिंपडावे. मस्त लुसलुशीत होतो.
23 Sep 2008 - 6:30 pm | शाल्मली
तात्या,
पा़कृचे नाव आणि फोटो दोन्ही झकास !
झानटामाटिक ब्रेड : नाव ऐकून खावासा वाटतो हे खरेच !
-- सौ. लिखाळ.
23 Sep 2008 - 6:32 pm | विसुनाना
फोडणीत कांदा गुलाबीसर परतून घेतला अणि थोडी कढीपत्त्याची पाने घातली तर झानटा डबल होतो असा अनुभव आहे. :)
23 Sep 2008 - 6:39 pm | रेवती
मीही कांदा, कोथिंबीर, शेंगदाणे घालते. पण हा फोटू तर मस्तच आलाय.
रेवती
23 Sep 2008 - 6:40 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
एकदम झानटामॅटिक!
तात्या, लय भारी ... मीपण झानटामाटीक ब्रेड करुन खाणार! त्यावर लिंबू पिळलं की आणखी जास्त मजा येते.
23 Sep 2008 - 7:14 pm | रामदास
रोज काहीतरी झानटामॅटीक करावे म्हणतो.
http://ramadasa.wordpress.com/ हा माझा ब्लॉग आहे.
23 Sep 2008 - 7:16 pm | लिखाळ
अरे वा फोटो मस्त !
आम्हाला रानडे बालक मंदिरात दुपारच्या वेळेस एकदा अशी ब्रडची भाजी /चिवडा / फोडणीचा पाव करायला शिकवला होता :)
म्हणजे मुलांनी पावाचे तुकडे करुन द्यायचे असे काम होते. तेव्हा मजा आली होती.
आता कुठल्याशा 'न्यू इंस्ग्लिश' स्कूल मध्ये केजी क्लास मधल्या किड्सना कुकींक कोर्सच्या अंडर त्यांच्या मिस असा डानटामाटिक ब्रेड कुक करायला टीच करत असतील अशी एक थॉट माइंडमध्ये आली. :)
-- लिखाळ.
23 Sep 2008 - 7:23 pm | बिपिन कार्यकर्ते
तात्या... चिटींग...
पाकृ लिहिताना, मिरची बद्दल काही लिहिलं नाहिस, म्हणजे 'हा पदार्थ तयार झाल्यावर (किंवा तयार झालाच तर ;) ) एखाद्या डिश मधे नीट भरून वर छान अश्या २-४ हिरव्या मिरच्या ठेवाव्या. लुक छान येतो" छाप. फोटो बघितला तर मस्त मिरच्या वगैरे मारके...
एकदा करुन बघितला पाहिजे. बाकी 'झानटामाटिक' (केवढा अवघड शब्द आहे हा टायपायला, मी सरळ वरुन कट्-पेस्ट केला) हा शब्दसुध्दा मस्तच हो...
बिपिन.
23 Sep 2008 - 7:36 pm | छोटा डॉन
बिपीनदा , ते " कॉपी + पेस्ट " असेल हो !
"कट" कसे करणार ह्या " ह ट म ल " फॉर्मॅटच्या पानावरुन ?
अशी काय सुविधा असल्यास आम्हाला सांगा, मग समाचार घेतो आमच्या विरोधकाचा ...
जाऊ दे, तुमच्या भावना समजल्या पण तरीही हात आवरत नव्हता .. ( कॄपया ह.घ्या.)
अवांतर : झानटामाटिक हा शब्द व ऑरेंज ज्युस कसाही चांगलाच लागतो ....
छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
23 Sep 2008 - 7:36 pm | ब्रिटिश टिंग्या
भापो!
24 Sep 2008 - 11:07 am | बिपिन कार्यकर्ते
टिंग्या, भापो म्हंजी भारतिय पोलीस का? का तुला भारी पोस्ट म्हनायचंय?
24 Sep 2008 - 11:00 am | बिपिन कार्यकर्ते
मापी द्यावी सर्कार येक डाव... खरं मंजी मला 'शीशीपी टेक्नॉलॉजी' आसं ल्ह्यायचं व्हतं पण त्ये कट्-पेस्ट सोपं व्हतं टायपायला म्हून कट्टाळा क्येला... पुन्यांदा न्हाई व्हायचं आसं. पन सर्कार तुमचं ते 'ह ट म ल' जरा खटमल सारकं वाटतं, नुस्तं वाचूनच आंगाला खाज आली पघा...
बिपिन.
23 Sep 2008 - 7:44 pm | विजुभाऊ
फोटो कुठे आहे? पाव खाऊन टाकला बहुतेक
डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवण्यापेक्षा त्या बर्फाचा आणि साखरेचा वापर करुन आईसक्रीम करा . प्रश्न निर्माणच होणार नाहीत
23 Sep 2008 - 7:46 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
इजाभौ,
जरा दम धरा, फोटू येईपर्यंत .... मग दिसेल सगळा झानटामॅटीक पाव, मिरची!
23 Sep 2008 - 7:58 pm | विजुभाऊ
दिसला दिसला. लैच येळ लागतो खाली यायला फोटुला
डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवण्यापेक्षा त्या बर्फाचा आणि साखरेचा वापर करुन आईसक्रीम करा . प्रश्न निर्माणच होणार नाहीत
23 Sep 2008 - 7:50 pm | प्राजु
झानटामाटीक तात्यांची झानटामाटीक रेसिपी....
चालूद्या..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
23 Sep 2008 - 9:03 pm | बापु देवकर
'झानटामाटिक बिरेड' मस्तच......
ह्यात जर उकड्लेल्या बटाटाच्ये काप टाकले तर....
23 Sep 2008 - 11:00 pm | रेवती
पाककृतींच्या पुस्तकात ब्रेडमध्ये बटाट्याच्या सळ्या तळून घाला असं लिहिलयं, म्हणजे ही सुद्धा एक पाकृ आहे.
रेवती
23 Sep 2008 - 10:01 pm | डॉ.प्रसाद दाढे
झानटमॅटीक ब्रेडमध्ये कोल्हापूरी मसाला टाकावा व चकणा म्हणूनही खावा (मिलिटरी रमबरोबर असले झानटमॅटीकच पाहिजेत.. सोबतीला भुर्जीही मस्त लागते)
(रमाका॑त) प्रसाद
23 Sep 2008 - 10:42 pm | भाग्यश्री
वा काय दिसतोय झानटामाटीक ब्रेड !!
मी पण कांदा,कोथिंबीर्,दाणे आणि लिंबू पिळून करते(यातलं फक्त लिंबू पिळाय्च.. बाकीचं नाही!) :) ... अप्रतिम लागतात!!
त्या बरोबर दही किंवा ताक पण आवडतं मला कधी कधी..
24 Sep 2008 - 8:15 am | ईश्वरी
तात्या , फोटो एकदम मस्त !
मी कांद्या बरोबर बारिक चिरलेला टोमॅटो ही घालते.
ईश्वरी
24 Sep 2008 - 8:31 am | धनंजय
आवडतो. पदार्थ शिळा झाला की फोडणीचा पाव, फोडणीचा भात वगैरे चटपटीत प्रकार करायला मिळतात.
(ताज्या पावाचा/पोळीचा/भाताचा हा झानिटाम्याटिक उपयोग करता येत नाही...)
**हिंदीच्या प्रभावामुळे म्हणा "झान्टा..." असे कुठले नाव खाद्यपदार्थासाठी आवडत नाही. झांट्यांचे काजू मात्र चालतात.**
24 Sep 2008 - 11:50 am | प्रगती
आम्ही याला ' पावाची कोशिंबिर' म्हणतो.
24 Sep 2008 - 12:09 pm | स्वाती दिनेश
लय भारी फोटू रे तात्या... मस्त !!
स्वाती