साहित्यः दोन वाट्या वरी तांदूळ, अर्धी वाटी साबुदाणा, मिरची पेस्ट, आले पेस्ट, जिरे पावडर, कोथिबिर, दाण्याचे कूट, मीठ, आले पेस्ट, खायचा सोडा, तेल किंवा तूप.
कृती: आप्पे करायचे असतील त्याच्या आदल्या दिवशी वरी तांदूळ आणि साबुदाणा वेगवेगळे भिजत घालावे. ७-८ तासांनी दोन्ही एकत्र मिक्सरवर वाटावे. मिश्रण इडलीच्या पिठाइतपत असावे. रात्रभर झाकून ठेवावे. सकाळी आप्पे करण्यापूर्वी या मिश्रणात अर्धा चमचा आले पेस्ट, अर्धा चमचा मिरची पेस्ट (आवडीनुसार प्रमाण घ्यावे.), मीठ, अर्धा चमचा जिरे पावडर, २-३ चमचे दाण्याचे कूट, चिरलेली कोथिंबिर मिसळावी. पाव छोटा चमचा खायचा सोडा घालून मिश्रण एकजीव करून घ्यावे. आप्पेपात्रात नेहमीच्या आप्प्याप्रमाणे आप्पे करावे. नारळाच्या दही घातलेल्या सैलसर चटणीसोबत खावे.
हे आप्पे गरमच छान लागतात.
प्रतिक्रिया
13 Nov 2013 - 5:45 pm | कवितानागेश
मस्तच लागतील.
फोटो दिसत नाहीयेत गं.
13 Nov 2013 - 5:48 pm | अनन्न्या
मला तर दिसतोय फोटो!
13 Nov 2013 - 6:09 pm | जेपी
काल टाकली असती तर आज करुन पाहिली असती . आता पुढच्या उपवासापर्यंत फोटो पाहुनच समाधान मानावे लागणार .
13 Nov 2013 - 6:12 pm | प्यारे१
एकादशी नि 'आप्पे' खाशी!
मस्तच.
फोटो बघून जळजळ झालेली आहे.
- आज निरहंकाराच्या प्रयत्नात ;) फलाहारी प्यारे
13 Nov 2013 - 6:32 pm | रेवती
पाकॄ छान आहे पण फोटू दे की!
13 Nov 2013 - 6:51 pm | अनन्न्या
मला तर फोटो दिसतोय, बाकीच्यांना का दिसत नाहीय?
13 Nov 2013 - 10:10 pm | प्रचेतस
फोटू सेटिंग बहुधा प्रायव्हेट झालेय.
पब्लिक सेटिग करा मग दिसेल फोटो सर्वांना.
13 Nov 2013 - 6:57 pm | विशाखा राऊत
फोटु का दिसत नाही
13 Nov 2013 - 11:27 pm | अत्रुप्त आत्मा
खान/पान धागा निघे सारखा,सुवास दरवळ चहूकडे
पाक कृती वेगळी आहे तरी गं तै....गेले फोटू कुणीकडे? :)
14 Nov 2013 - 7:50 am | स्पंदना
मस्त पाककृती अनन्या!
जो फोटो अल्बम आहे त्याला जोवर ओपन फॉर पब्लिक हे सटींग देत नाहीस तोवर फोटो दिसणार नाही, तेव्हढ कर.
14 Nov 2013 - 11:21 am | त्रिवेणी
फोटू प्लीज
14 Nov 2013 - 3:46 pm | कवितानागेश
अजून फोटो आले नाहीत.. :(
14 Nov 2013 - 6:11 pm | अनन्न्या
14 Nov 2013 - 11:56 pm | रुस्तम
मस्त...........
15 Nov 2013 - 12:08 am | रेवती
लै भारी फोटू!
15 Nov 2013 - 8:46 am | अत्रुप्त आत्मा
ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्हाआआआआआअ........! आता बरं वाटलं! :)
15 Nov 2013 - 2:38 pm | सानिकास्वप्निल
फोटो पण छान :)