मि.पा वर नवीन सोयींबाबत

निरु's picture
निरु in काथ्याकूट
14 Nov 2013 - 10:47 am
गाभा: 

नमस्कार. मि. पा. वर मी तसा नवीनच आहे. भटकंती करता करता मनोगतावरुन इथे आलो आणि इथलाच होतोय हळूहळू.

एक दोन सोयी मि. पा. वर असाव्यात असे वाटते.

१. शोध: एखादी कथा, कविता, लेख आवडला आणि चुकून वाचनखुणेत घालायचा राहिला तर काही दिवसांनी परत आल्यावर तो पुन्हा सगळ्या पानांवर शोधत बसावा लागतो. त्याऐवजी प्रत्येक विभागात अथवा संपूर्ण मि.पा. वर 'शोध'ची सोय ( Search Functionality) असल्यास त्याचा खूप उपयोग होईल. त्याचप्रमाणे, एखाद्या विषयावर मि.पा. करांनी किती लेख / कविता / चर्चा केल्या आहेत तेही शोधणे शक्य आणि सोपे होऊन जाईल. लेखाप्रमाणेच मि.पा.कराबद्दलही हे करता येईल. मि.पा कराला Tracker मध्ये घालण्यापूर्वी त्याचे सर्व लेखन एकत्रितपणेही बघता येईल.

२. संपर्कः मि.पा वर एकमेकांशी व्य.नि. द्वारा संपर्क साधणे शक्य आहेच. परंतु संपादक मंडळ अथवा तांत्रिक मंडळातील मंडळींशी संपर्क करावयाचा असल्यास त्या त्या मंडळींची नावे 'मदत पान' वरुन घेऊन त्यांना व्य.नि.पाठवावा लागतो. त्यापेक्षा 'तांत्रिक मंडळ', 'संपादक मंडळ' अश्या नावांनी नवीन संपर्क प्रतिनिधी नावे बनविल्यास दर वेळी मदत पानावर जाण्याचा त्रास वाचु शकेल. या प्रातिनिधिक नावांना पाठविलेला निरोप त्या मंडळातील सर्व सभासदांन मिळेल अशी व्यवस्था केली तर ते उपयुक्त ठरेल. जर या मंडळातील मंडळी बदलली तरी आम्हा सामान्य मि.पा.करांना नवीन मंडळींची नावे बघत बसण्यापेक्षा प्रातिनिधिक नावाला व्य.नि. पाठविला की काम सोपे होईल.

३. या प्रातिनिधिक नावांना मि.पा.वर आगमनाची वार्ता दिल्याशिवायही व्य.नि. पाठवण्याची सुविधा असावी जेणेकरुन मि.पा.चे सभासद अथवा मि.पा.चे सभासदोत्सुक यांना आवागमनात काही त्रास झाल्यास तांत्रिक मंडळाला त्वरीत व सोप्या रीतीने संपर्क करता येईल. तांत्रिक मंडळातल्या सर्व मंडळींना हे निरोप जातील व ते त्यांच्या वेळेप्रमाणे प्रश्न सोडवू शकतील. त्याद्वारे कोण्या एकावर हा भार पडणार नाही.

ही विनंतीवजा सूचना आहे. त्यावर मि.पा.करांनी त्यांचे अभिप्राय द्यावेत ही विनंती. माझे काही चुकले असेल अथवा एखादी सोय आधीच उपलब्ध असेल तर कळवावे. एक छान चर्चा-संवाद व्हावा आणि मि.पा.ला लाभ हीच इच्छा.

चूक्-भूल द्यावी घ्यावी. धन्यवाद.

-निरु

प्रतिक्रिया

जेपी's picture

14 Nov 2013 - 11:18 am | जेपी

आपल्या सुचनांकडे जरुर पाहिले जाईल .
येत राहा .
भावी संपादक - तथास्तु =))

अतिअवातंर - दोन महिन्यापासुन मी पण सुधारणांसाठी कोकलतोय .

(संम ह घ्या )

तोपर्यंत सं.मं. त वर्णी लागणार नाही.

यसवायजी's picture

15 Nov 2013 - 6:27 pm | यसवायजी

:))

वडापाव's picture

14 Nov 2013 - 2:19 pm | वडापाव

समजा एखाद्या धाग्यात १० नवीन प्रतिसाद असतील. प्रतिसादांच्या पहिल्या पानावर २ आणि पुढच्या पानावर उरलेले ८ असतील, तर हे दोन नवे प्रतिसाद कोणते ते कळतं, पण दुस-या पानावर गेल्यावर प्रतिक्रियांना लावलेलं 'नवीन' हे लेबल निघून जातं. मग नवीन प्रतिक्रिया नेमक्या कोणत्या ते शोधत बसावं लागत

हो ना! त्यातून दुसर्‍या तिसर्‍या पानावर प्रतिसाद नेणारे धागे या ना त्या कारणाने वाचनीयच असतात. अशा वेळी (श्री ब्याटम्यान यांच्या भाषेत) "कलपड" होतो...

पैसा's picture

14 Nov 2013 - 3:11 pm | पैसा

१) द्रुपल अपग्रेड करताना मिपावरील शोध ऑप्शन पूर्ण बंद पडला आहे. परत सुरू करण्यासाठी मिपा २ दिवस बंद करावे लागेल म्हणून सध्या ते काम मागे ठेवले आहे. तोपर्यंत कृपया गूगल सर्चचा ऑप्शन वापरावा ही विनंती. त्यात तुम्हाला एखाद्या सदस्याचे सर्व लेखन वगैरे काहीही पॅरामीटर्स शोधता येतील.

२) संपादक मंडळ हा आयडी पूर्वीपासून वापरात आहेच. त्या आयडीला व्यनि/खरड् करून तुमचे जे काही म्हणणे असेल ते सर्व संपादकांपर्यंत तुम्ही पोचवू शकता.

३) फेसबुकवर मिपाकर ग्रुप आहे आणि मिपाचे अधिकृत पान आहे. तिथे संपर्क करू शकता. त्याशिवाय mipa.sampadak@gmail.com हा जीमेलचा आयडी आहे. मात्र तो खूप रेग्युलर वापरला जात नाही. त्यामुळे तिथे संपर्क केल्यास उत्तराला वेळ लागू शकतो.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

14 Nov 2013 - 3:30 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मिपावर विविध सोयी मिळाव्यात आणि मिळाल्याच पाहिजेत यासाठी आपल्या आणि मिपाकरांच्या विविध सुचना महत्त्वाच्याच असतात. वर पै म्हणतात त्या प्रमाणे ड्रुपल अद्यावत केले तेव्हा पूर्वीच्या अनेक सोयी गेल्या काही नवीन आल्या. अजून अनेक सोयी मिळाव्यात यासाठी आपल्याप्रमाणे आम्ही सर्वच संपादक आणि मिपाकर आपले सर्वेसर्वा नीलकांतशी संपर्कात असतो. आपल्या मागण्यांची दखल सर्वच संपादक घेतात आणि चावडीत लिहितात. मिपावर सोयी सवलतींच्या बाबतीत नीलकांत आणि प्रशांत पर्यंत मिपाला काय हवं नको ते सांगितल्या जात असतं. प्रशांत आणि तांत्रिक काम पाहणारे अनेकदा सहजपणे होईल अशी कामं करत असतातच.. आपल्या मालकांची नोकरी जरा जवाबदारीची आणि धावपळीची असते, वेळ मिळतो तेव्हा ते मिपावर असतातच, असतात. आणि काही सेवा देण्याच्या प्रयत्नात ते नेहमीच असतात.

आपल्या मागण्यांची कोणी दखलच घेत नाही असे वाटू नये म्हणून ही एका संपादकाची मनमोकळी पोच. :)

-दिलीप बिरुटे

निरु's picture

15 Nov 2013 - 9:23 am | निरु

माझ्या सूचनांची दखल घेऊन प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद.
प्रति पैसा / ज्योति कामत, धन्यवाद. आपण सुचवलेले पर्याय वापरुन पहातो. काही अडचण आल्यास संपर्क साधेनच.
प्रति प्रा.डॉ.दिलीप बिरुटे, संपादक मंडळाने त्वरीत दिलेल्या उत्तरांमुळे मि.पा. करांचे असलेले गैरसमज दूर होतील यात शंकाच नाही.

चूक्-भूल द्यावी घ्यावी. धन्यवाद.

-निरु

नानबा's picture

15 Nov 2013 - 12:55 pm | नानबा

एखाद्या व्यक्तीने मिपा वर आल्यापासून केलेले सगळे लिखाण एकत्रितपणे सापडू शकेल असं काहीतरी करता आलं तर फार बरं होईल. म्हणजे त्याचा आयडी टाकल्यावर त्याने केलेले सगळे लिखाण एकत्र वाचता येईल. गवि, रामदास यांच्या लिखाणासाठी या सोयीचा फार फायदा होईल...

टवाळ कार्टा's picture

15 Nov 2013 - 5:54 pm | टवाळ कार्टा

+११११११११११

अनुप ढेरे's picture

15 Nov 2013 - 5:59 pm | अनुप ढेरे

तस करणं सोपय. ज्याचं लिखाण वाचायचय त्याच्या प्रोफाईलवर जा.
उदा:
http://www.misalpav.com/user/3902

आणि याच्यापुढे /authored असं लावा.
उदा: http://www.misalpav.com/user/3902/authored

नानबा's picture

18 Nov 2013 - 7:44 am | नानबा

तस करणं सोपय. ज्याचं लिखाण वाचायचय त्याच्या प्रोफाईलवर जा.
उदा:
http://www.misalpav.com/user/3902

आणि याच्यापुढे /authored असं लावा.
उदा: http://www.misalpav.com/user/3902/authored

धन्यवाद हो...

अमेय६३७७'s picture

15 Nov 2013 - 1:35 pm | अमेय६३७७

संपादनाची सोय असावी असे वाटते, अर्थात मी इथे नवीनच आहे त्यामुळे या विषयावर आधीच काही निर्णय झालेला असल्यास माहिती नाही पण अनवधानाने राहिलेल्या चुका इ. साठी संपादन सोयीचे ठरू शकेल.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

18 Nov 2013 - 7:24 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

संपादनाची सोय अनेकदा दिली आणि दुर्दैवाने पुन्हा काढून घ्यावी लागली. संपादनाची सोय असली पाहिजे, याच्याशी व्यक्तिगत मी सहमत आहे. पण, दुर्दैवाने कमीत कमी आत्तापर्यंतच्या माझ्या मिपाच्या वावरात दहा तरी लोकांनी किरकोळ धुसफुशीच्या कारणाने आपले सर्वचे सर्व लेखन काढून टाकले आहे. मला उत्तम लेख काढल्याचे जसे दु:ख वाटते त्याचबरोबर इतर मिपाकरांनी वेळात वेळ काढून अतिशय अभ्यासपूर्ण, मनोरंजक, आणि माहितीपूर्ण लिहिलेले कितीतरी प्रतिसाद त्यामुळे गमवावे लागले आहेत. आणि केवळ या आणि याच कारणाने ही सोय काढावी लागली आहे.

आम्ही संपादकांची आणि नीलकांतशी यापूर्वीही चर्चा झाली होती आणि नीलकांतही तसा स्वसंपादनाच्या सोय देण्याबाबत अनुकुल आहे पण एखादं ड्रूपलंच उत्तम मोड्यूलवर काम करावे लागेल असे ते बोलले होते. जसा एखादा लेख किंवा प्रतिसाद टाकल्यानंतर तो लेख किंवा प्रतिसाद बदलल्यानंतरही आम्हा संपादकांना मूळ लेखन किंवा प्रतिसाद दिसावा त्यात काही बदल करता येऊ नये. (जसे लेखन अप्रकाशित केल्यावर अप्रकाशित लेखन आम्हा संपादकांना दिसते इतरांना नाही) तसे जर काही करता आले तर भविष्यात स्वसंपादनाची सोय नक्कीच मिळेल. खरं तर नीलकांतला जराशी सवड मिळाली पाहिजे, नीलकांत हे नक्की करतील असा माझा विश्वास आहे. (चुभुदेघे)

-दिलीप बिरुटे

चौकटराजा's picture

18 Nov 2013 - 9:14 am | चौकटराजा

मिपा वर " जिलबी " नावाचे नवीन दालन चालू करावे !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

18 Nov 2013 - 11:13 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

;)

-दिलीप बिरुटे