शेअरविषयक मार्गदर्शन अपेक्षित…

अव्यक्त's picture
अव्यक्त in काथ्याकूट
11 Nov 2013 - 1:16 pm
गाभा: 

शेअरविषयक मार्गदर्शन अपेक्षित…

मी साधारण सन २००७ मध्ये शेअर मार्केट मध्ये माझ्या अल्पमतीप्रमाणे सदरहू गुंतवणूक केली आहे ती अश्शी…

SCRIP NAME BUY PRICE

GUJ ALKALIES AND CHEMICALS 134

HOTEL LEELA VENTURES LTD 35

INFOTECH ENTERPISES LTD 150

IGATE GLOBAL SOLUTIONS LTD 472

RANBAXY LABORATORIES LTD 420

RELIANCE CAPITAL LTD 412

RELIANCE INDUSTRIES LTD 873.25

RELIANCE POWER LTD 130

reliance power च्या ipo नंतर शेअरमार्केटकडे share मार्केट मधील मंदी मुळे दुर्लक्षच झाले ते आजतागायत… २००७ मध्ये जे शेअर खरेदी केले तेच शेअर आजपर्यंत घेवून बसलो आहे… तरी ह्यापुढे परत शेअर मार्केट मध्ये पुन्हा active होऊन तोटा नाही तरी कमीत कमी नफा कमवायचा आहे… महिना १००० Rs गुंतवणुक करून महिना काठी कमीत कमी नफा होयील अस्से shares मध्ये गुंतवणूक करण्यासाठी तज्ञ मंडळीचे मार्गदर्शन अपेक्षित आहे… त्याचप्रमाणे वरील नमुद केलेल्या shares पैकी कोणते shares काढावे व कोणते ठेवावे (with explainations) ह्याविषयी सुद्धा मार्गदर्शन मिळावे हि नम्र विनंती… market मध्ये जुने न चालणारे shares काढून नवीन shares market मध्ये चालणारे भरायचे आहेत तरी विशेष मार्गदर्शन हवे आहे.

प्रतिक्रिया

टोटल पोर्ट फोलिओची त्यावेळची किंअत काय होती? आजची किंमत काय आहे?

ज्ञानव's picture

11 Nov 2013 - 2:13 pm | ज्ञानव

जर खरेदीची किंमत कळली तर प्रयत्न करू शकतो.

शेअर बाजारात गुंतवणूक करायची असेल तर, लोकांची मते मागणे बरोबर नाही.
आपण नोकरदार असाल तर शेअर बाजारात जी रक्कम गुंतवता ती आपला सर्व खर्च भागवून मग उरलेली रक्कम लवकर मिळणार नाही असे समजून गुंतवावी.
मी स्वत अशीच मते घेवून गुंतवत होतो जवळ जवळ २५ हजाराचा फटका पडला मग रोज अर्धा तास वेळ काढून कालचे शेअर त्याचे ग्राफ वेगरे समजावून घेवून जवळ जवळ २ - ३ महिने वाट बघितली आणि परत सुरवात केली आणि सगळ वचपा भरून काढला. त्यमुळे थोडा वेळ काढा अभ्यास करा आणि निर्णय घ्या.
लोक बरोबर सांगतीलही पण स्वतःचे निर्णय घ्या आणि त्याने येणाऱ्या फायद्याचा आनंद घ्या ……
तूर्तास शुभेच्छा

वाटाड्या...'s picture

11 Nov 2013 - 11:34 pm | वाटाड्या...

स्विंग ट्रेडिंग करा. लाँग राहु नका. ते दिवस गेले. ३-५% टक्के मिळाले की बाहेर पडा. कंटीन्युएशन, ओव्हरसोल्ड, ओव्हरबॉट पॅर्ट्नकडे लक्ष आणि अभ्यास करा. नेहेमी कॅटॅलिस्ट बघा. एवढ्या ३-४ गोष्टींवरसुद्धा बरेच पैसे कमावता येतील.

- (८३% ROI वाला) वाट्या...

लोटीया_पठाण's picture

13 Nov 2013 - 3:04 pm | लोटीया_पठाण

+
शेअर्स खरेदी करण्यापेक्षा डेरीवेतीव ट्रेडिंग करा.

अव्यक्त's picture

12 Nov 2013 - 2:16 am | अव्यक्त

जर खरेदीची किंमत कळली तर प्रयत्न करू शकतो.

अहो, ज्ञानव साहेब… scrip name च्या बाजुला २००७ सालातील buying price type केली आहे त्याची कृपया नोंद घ्यावी… आपल्यासारख्या experts चे मार्गदर्शन हवे आहे..

जेपी's picture

12 Nov 2013 - 12:47 pm | जेपी

reliance power चा ipo january 2008
आलता . तुम्हाला 2007 मध्ये 130 रु ला शेअर कसा मिळाला ?
सुरुवातीलाच भाव 400 रु . होता .

अवातंर-सांगा सांगा लवकर सांगा ,
कोरा कागद निळी शाई आमी कुणाला भित नाही .
=)) =)) =)) =))

श्रीगुरुजी's picture

12 Nov 2013 - 12:49 pm | श्रीगुरुजी

>>> महिना १००० Rs गुंतवणुक करून महिना काठी कमीत कमी नफा होयील अस्से shares मध्ये गुंतवणूक करण्यासाठी तज्ञ मंडळीचे मार्गदर्शन अपेक्षित आहे…

महिना १००० गुंतवणुकीत ब्रोकरेजसुद्धा सुटणार नाही. पैसे कमवायचे असतील तर दरमहा किमान १५-२० हजार गुंतवावे लागतील. अन्यथा बँकेत फिक्स्ड डिपॉझिट ठेवा.

मी-सौरभ's picture

12 Nov 2013 - 1:05 pm | मी-सौरभ

मिपा वरती एक गृहस्थ आहेत / होते त्यांच्या ओसरीवर जाऊन सल्ला घेउ शकता. ते कोण हे जाणुन घेण्यासाठि थोडा अभ्यास करावा लागेल :)

शैलेन्द्र's picture

12 Nov 2013 - 1:09 pm | शैलेन्द्र

:)

चैत्रबन's picture

10 Dec 2013 - 2:06 am | चैत्रबन

प्रकाटाआ

अव्यक्त's picture

12 Nov 2013 - 1:43 pm | अव्यक्त

reliance power चा ipo january 2008
आलता . तुम्हाला 2007 मध्ये 130 रु ला शेअर कसा मिळाला ?
सुरुवातीलाच भाव 400 रु . होता .

तथास्थू, आपली काही तरी गफलत होतेय… reliance power हा मला ipo मध्येच allot झाला होत्ता…वरिल shares त्याच्या आधी घेतले होत्ते…पन reliance power मुले घोर निराशाच पदरात पडली …. त्यामुळे share market मध्ये invest करण्याची इच्छा नाहीशी झाली ती थेट आजता गायत…. आणि power सुरवातीला महागड्या भावात मिळाला…तोच listed झाल्यावर कमी दरात उपलब्ध झाला … घोर फसवणुक केली….

अव्यक्त's picture

12 Nov 2013 - 1:45 pm | अव्यक्त

मिपा वरती एक गृहस्थ आहेत / होते त्यांच्या ओसरीवर जाऊन सल्ला घेउ शकता. ते कोण हे जाणुन घेण्यासाठि थोडा अभ्यास करावा लागेल Smile

कोण आहेत हे विद्वान जरा संस्थळ सुचवले तर उपकृत होईन…

मी-सौरभ's picture

12 Nov 2013 - 2:28 pm | मी-सौरभ

मिपाकरच थोडा शोध घेतला असता सापडतील. थोडा प्रयत्न करा की ;)

अव्यक्त's picture

12 Nov 2013 - 1:50 pm | अव्यक्त

श्री गुरुजी, मोलाच्या सल्याबाबत आपले शतशः धन्यवाद… आजच्या महागाईच्या जमान्यात तुमचा मोफत सल्ला अगदीच महत्वपूर्ण ठरतो…तरी कोणती गुंतणूक आणि कस्शात करावी गुंतवणूक…जरा तपशीलवार नमूद करून उपकृत करावे… धन्यवाद

अव्यक्त

जेपी's picture

12 Nov 2013 - 5:43 pm | जेपी

reliance power ने आमची पण सहा महिने बत्ती गुल केलती . थोड विस्तारीत लिहा आमाला नीट कळेल .
बाकी तुमच्या शेअर चे आजची किंमत कुठल्याही ब्रोकरेज फर्म च्या वेबसाईट वर कळेल

श्रीगुरुजी's picture

12 Nov 2013 - 8:23 pm | श्रीगुरुजी

खरं सांगू का? सध्या बीएसई इन्डेक्स २०००० च्या पुढे आहे. बहुतेक सर्व ब्लूचिप समभागांचे भाव त्यांच्या अत्युच्च पातळीला आहेत. (उदा. इन्फोसिस). पुढील काळात हे भाव फार वाढणार नाहीत. तरीसुद्धा अजून काही चांगले शेअर्स आहेत.

१) येस बँक - आजचा बंद भाव रू. ३२८ आहे. हा भाव वर्षाभरात ४०० च्या पुढे जाईल असे तज्ज्ञांचे मत आहे.
२) स्टेट बँक ऑफ इंडिया - आजचा बंद भाव रू. १७०० च्या आत आहे. हा भाव सहज २४०० च्या पुढे जाऊ शकतो. पण त्यासाठी महागाईचा दर व व्याजाचे दर कमी व्हावे लागतील. नजीकच्या भविष्यकाळात हे अवघड दिसते. पण २-३ वर्षे वाट पहायची तयारी असेल तर नक्कीच भरपूर फायदा होईल.
३) टीसीएस - अजूनही २१०० च्या आत आहे. या भावात सुद्धा नक्कीच व अल्पकाळात फायदा देऊन जाईल.
४) एल अ‍ॅन्ड टी - सध्या ९५० च्या आत आहे. पण फंडामेंटल्स चांगले असल्याने १२०० ची पातळी गाठू शकतो. पण एकदिड वर्षे थांबावे लागेल.

मारूती सुझुकी, टाटा मोटर्स चे शेअर देखील चांगले आहेत.

सध्या अशा समभागांचे रोज भाव बघत जा. इक्विटीमास्टर, मनीकंट्रोल अशा संकेतस्थळावर या शेअर्सचा पोर्टफोलिओ करून तुम्ही रोज अनेकवेळा भाव बघू शकता. ज्यादिवशी भाव कमी असेल त्यादिवशी चटकन जमेल तेवढे शेअर्स घेऊन टाका. ऑनलाईन ट्रेडिंग खाते उघडल्यास व्यवहार खूपच चटकन व आपल्या सोयीनुसार करता येतो.

अव्यक्त's picture

13 Nov 2013 - 1:39 pm | अव्यक्त

वाटाड्या...
स्विंग ट्रेडिंग करा. लाँग राहु नका. ते दिवस गेले. ३-५% टक्के मिळाले की बाहेर पडा. कंटीन्युएशन, ओव्हरसोल्ड, ओव्हरबॉट पॅर्ट्नकडे लक्ष आणि अभ्यास करा. नेहेमी कॅटॅलिस्ट बघा. एवढ्या ३-४ गोष्टींवरसुद्धा बरेच पैसे कमावता येतील.

वाटाड्या महोदय, आपण ज्या अगम्य भाषेत बोलत आहात ते सगळं डोक्यावरून गेलं जरा तपशीलवार सांगता का ?

वाटाड्या...'s picture

13 Nov 2013 - 10:05 pm | वाटाड्या...

बरं,

खरं म्हणजे मी कुणाला हे सांगत नाही कारण एक तर लोक फार अविष्वास दाखवतात आणि वेळ नाही हे सगळ सांगत बसायला. म्हणुन म्हणलं "आणि अभ्यास करा"..खाली बघा..

http://stockcharts.com/help/doku.php?id=chart_school:glossary_o
हे पण नक्की बघा..
http://www.jasonbondpicks.com/blog-posts/lesson-1-oversold-chart-pattern-3/

काही शंका आली तर (त्या येतील'च') विचारा...कुठल्याही भरमसाठ टीकरकडे बघण्यापेक्षा तुमच्या ऐपतीत बसतील अश्या शेअर्सवरच लक्ष ठेवा.

- वाट्या...

चौकटराजा's picture

13 Nov 2013 - 2:56 pm | चौकटराजा

फक्त १५ ते १८ टक्के फायदा झाला ( कमिशन ई खरच सोडून ) की शेअर निर्दयपणे विकून टाका. पाच सहा वर्षातील अभ्यासाने ऊच्च पातळी साधारण पणे कळेल ( १०० टक्के नीचांक व उचांक वोरेन बफे ला ही नाही सांगता येणार ) अशा पातळीला शेअरच्या नादी लागायचे नाही. मग फंदामेंटल कितीही चांगले असो. आपण शेअर विकून खूप श्रीमंत होऊ ही खुळचट समजूत काढून टाका . कमी रिस्क कमी नफा या तत्वावर सतत शेअर वी निवड बदलत रहा. जसे विकण्यात
निर्दयपणा हवा वाढत्या किमतीला तसा स्टॉप लॉस चे बाबतीतही. निग्रह महत्वाचा .

ज्ञानव's picture

9 Dec 2013 - 9:09 pm | ज्ञानव

निर्दयपणे विकून टाका बरोबर पण मग त्याला सोडून देऊ नका विसरू नका लक्ष ठेवा खाली वर होताना पकडा सोडा काहीतरी सतत करत राहा.
आहो आज दुकान उघडले आणि कुणी आले नाही म्हणून बंद करून "मराठी माणूस उद्योग धंद्यात मागे का ?" ह्यावर गप्पा मारायला का दुकान उघडायचे आहे.
शेअर मार्केट मध्ये पैसे हवेत आणि अभ्यास मात्र दुसर्याने करायला हवा हा मराठी बाणा सोडून मारा उडी तर जमेल हळूहळू पोहायला......