काही बाबतीत सल्ला हवा आहे. अगदि घरगुती वापरातील इएलेक्ट्रॉनिक वस्तूंपासून ते अगदि नाव लावण्यापर्यंत.
इथे विचारण्यास संकोच वाटतो आहे. पण मदत मिळण्याची , निदान योग्य बाजूकडे अंगुलीनिर्देश होण्याची बरीच शक्यता वाटल्याने इथे धागा टाकतो आहे.
१. विवाहोत्तर मुलीने नाव आहे तसेच ठेवले, तर सरकारदरबारी कुठे अडचण येण्याची शक्यता आहे का? किंवा बँक, पासपोर्ट, व्हिसा ह्या ठिकाणी काही
त्रास होउ शकतो का?
एक काल्पनिक नावांनी उदाहरण घेउ. समजा, "अवनी महेश गणोरे " हिचं "नरेश सोपान आवळे" ह्याच्याशी लग्न झालं; तर आधीचं आहे तसच नाव तिला सुरु ठेवण्यास काय काय अडचणी आहेत?
पर्याय/शंका १:- विवाहापूर्वी आणि विवाहानंतरही अवनी महेश गणोरे हेच नाव ठेवायचं असल्यास खरं तर काही अडचण यावयास नको. पण परवा मी आणि माझी पत्नी
मतदारसंघातील नावनोंदणीच्या एका कामासाठी गेलो होतो. तिथे त्या व्यक्तीने तिचे नाव लिहून घेतले. विवाह प्रमाणपत्राकडे बघत मग पतीचे, म्हणजे माझे नाव लिहून घेतले. आणि अचानक
माझे first name तिचे middle name म्हणून लावले.
ती काहीतरी विचित्र केस होउ लागली. म्हणजे अवनी महेश गणोरे हिचे नाव अवनी नरेश गणोरे असे काय च्या काय लागले गेले.
"ते आहे तसेच ठेवायचे आहे" म्हटले तरी तेथील व्यक्ती ऐकेना.
आता ह्याबाबतीत कुणी सल्ला देइल का?
नाव जश्शाला तसं ठेवणं चूक आहे का? किंवा व्यवहारात काही अडचणी येउ शकतात का?
.
पर्याय/शंका २:- गणोरे - आवळे हे संयुक्त आडनाव लावायचं असेल तर मिडल नेम काय लावायची पद्धत आहे? पूर्वीचं "महेश" हेच मिडल नेम राहील की "नरेश" हे नाव लावायला लागेल? (खरं तर संयुक्त आडनावही लावायची इच्छा नाही; पण वेळ पडलीच, तर ठाउक असावे.)
.
.
पुढील शंका:-
घरात गीझर घ्यायचे घाटत आहे. कोणता बरा राहील? गीझर वापरण्याबाबत आपला अनुभव काय आहे?
गॅसवर चालणार्या गीझरपेक्षा विजेवर चालणारा गीझर बरा , सोयीचा असे वाटते.
कुटुंबाचा आकार लहान असेल, तर किती क्यापेसिटीचा गीझर पुरेसा ठरतो?
मुळात तो काहीतरी इन्स्टंट वाला अन् क्यापेसिटी वाला असे भेद आहेत ना त्यात? तर इन्स्टंट बरा की क्यापेसिटीवाला?
किती क्यापेसिटी neccessary and sufficient आहे लहान आकाराच्या कुटुंबात?
गीझरचा जीवनकाळ (लाइफ) व सुरक्षेच्या दृष्टीकोनातून विचार केल्यास कोणता ब्रॅण्ड बरा?
.
.
पुढील शंका :-
पुण्यात किम्वा पिंपरी चिंचवडात फिरत्या लायब्रर्या उपलब्ध आहेत का? त्यांचे नाव, पत्ते, संपर्क माहिती कुठून मिळेल?
.
.
पुढील शंका:-
पिंपरी चिंचवडात हिरो होण्डाची दुचाकी सर्व्हिसिंगला टाकण्यास चांगले ठिकाण ठाउक आहे का? एखाद्या चांगल्या , कुशल मेकॅनिकचा पत्ता देउ शकाल काय?
.
.
मंडळी, ह्या धाग्यावर थट्टा वगैरे करायला स्कोप दिसतो आहे. पण पुरेशी माहिती मिळण्यापूर्वी धागा भरकटावू नये ही विनंती.
"ह्या शंका इथे का टाकल्या" (गीझर, सर्व्हिसिंग वगैरे) हा प्रश्न उपस्थित होउ शकतो; पण जालावर उपलब्ध असलेली सर्वच माहिती खात्रीशीर वाटत नाही.
बाहेर paid articles, paid reviews असण्याची शक्यता असते. मराठी आंजावर ते नसते असे वाटते. म्हणून इथे ह्या शंका देत आहे.
इथे तुलनेने थोडाफार अंदाज असतो.
--मनोबा
प्रतिक्रिया
11 Nov 2013 - 10:03 pm | जेपी
आमी काथ्था कुटायचा सोडल आहे . धागा विनोदी दिसत असल्यान शिनीयरच्या प्रतिशेत .
भावी संपादक - तथास्तु
11 Nov 2013 - 10:09 pm | मन१
धाग्यातील विनोद समजला नाही.
लोकांचे इथे काय अनुभव आहेत ते विचारतोय.
तुमची मदत मिळाल्यास आनंद होइल.
11 Nov 2013 - 10:23 pm | श्रीरंग_जोशी
विवाहोत्तर नाव बदलून अनेक अडचणींचा सामना करणारी उदाहरणे पाहिली आहेत. अन मुख्य म्हणजे एकच व्यक्ती तीन-तीन नाव-आडनावांनी ओळखली जाताना पाहिली आहे. उदा. मुळ नाव रमा काळे, लग्नानंतरचे सुमा गोरे, अन प्रथम नाव बदलले तरी व्यवहारात जुनेच राहते पण आडनाव नवर्याचे लावले जाते म्हणून रमा गोरे (सदर नावे काल्पनिक आहेत). चांगलाच गोंधळ होऊ शकतो.
तसेही तत्वतः कुणाचेही नाव बदलणे जाणे पटत नाहीच. माझ्या पत्नीचे नाव, आडनाव व मध्य नाव (वडिलांचे नाव) आजही तेच आहे जे लग्नापूर्वी होते. कुठेही समस्या जाणवली नाही.
11 Nov 2013 - 11:18 pm | शिद
माझी पत्नीच्या पासपोर्टवर अजुन देखील तिचे लग्नापूर्वीचे नाव असुन कधीही विजा काढताना किंवा परदेशवारी करताना कुठेही समस्या जाणवली नाही. फक्त पुराव्यानिमित्त तेवढे लग्नाचा दाखला जवळ बाळगले म्हणजे झाले.
12 Nov 2013 - 4:39 pm | कानडाऊ योगेशु
इन फॅक्ट लग्नानंतर नाव बदलल्याने एका स्त्री सहकार्याला ("र्या" का "र्या" हो विजुभाऊ ?) झालेला त्रास माहीती आहे. नाव बदलल्यानंतर जिथे जिथे माहेरचे नाव वापरले होते तिथे तिथे तिला प्रति़ज्ञापत्र द्यावे लागले. अजुनही माहेरच्या नावावरचे काही व्यवहार जर अपूर्ण असतील तर तिला नेहेमी हे पटवुन द्यावे लागते कि "ती मीच" म्हणुन.
11 Nov 2013 - 10:30 pm | प्रचेतस
गॅस गीझर बराच बरा असा व्यक्तिगत अनुभव, खूप परवडतो. ज्योती गॅस गीझर्स चांगल्या क्वालिटीचे आहेत एकदम. ६ लिटर्स कपॅसिटीचा पुरेसा ठरावा. वीजेवर चालणारा गीझर मात्र लै वीज खातो.
फिरती लायब्ररी आहे एक. लवकरच त्यांचा संपर्क क्रमांक देतो. बाकी चिंचवडमधले कल्पना वाचनालय चांगले आहे. बरीच पुस्तके आहेत पण लायब्ररीयन बै जरा खडूस आहेत.
सेहगलला टाक सर्व्हिंसिंगला. बाकी चांगले म्याकेनिक २/३ आहेत. त्यांचे पत्ते देतो.
बाकी काय बे मनोबा, चिंचवडकर झालास. कधी भेटतोयेस आता? कट्टा करू एखादा.
11 Nov 2013 - 10:38 pm | मन१
माहितीची वाट पहातोय. जोवर देणार नाहिस, तोवर पिच्छा पुरवत राहीन.
इथे दे माह्तिई नाहीतर व्य नि कर; पण शक्य तितक्या लवकर शक्य तितकी अधिक माहिती दे रे बाबा.
.
कट्ट्यांना यायला आवडेल. कट्त्यासाठी कुनी हाक मारली तर शक्यतो कट्ट्यास हजेरी लावण्याचाच प्रयत्न असतो/असेल.
आमंत्रणाची वाट पाहतो आहे.
14 Nov 2013 - 7:47 pm | मन१
तपशीलवार माहिती कधी देताय वल्लीशेठ?
14 Nov 2013 - 10:32 pm | प्रचेतस
अजून नंबर नाय मिळाले रे. एक- दोन दिवसांत देतोच.
14 Nov 2013 - 10:47 pm | प्यारे१
अरे असं का करतोय वल्ली?
मनोबाला कर की रे मदत.
मी लांब आहे म्हणून नाहीतर मीच केली असती.
मी बायकोचा पासपोर्ट नवीन नावानेच काढलाय.
बाकी, व्हिसा काढताना बघू काय काय होतं ते.
14 Nov 2013 - 10:51 pm | प्रचेतस
अरे मी नाय दिले तरी मनोबा शोधेल याची खात्री आहे.
तरी मला ते पत्ते मिळाल्यावर मी लगेच देईनच.
11 Nov 2013 - 10:53 pm | चेतनकुलकर्णी_85
गॅसवर चालणार्या गीझरपेक्षा विजेवर चालणारा गीझर बरा , सोयीचा असे वाटते.
सरळ सोलर हिटर बसवून घ्या . ग्यास किंवा विजेच्या हिटर च्या फंदात पडू नका कारण दोघांचे दर सध्या वाढत आहेत .
12 Nov 2013 - 3:11 pm | llपुण्याचे पेशवेll
सोलर हिटर बोरींगचे पाणी असेल तर मात्र चांगले गंडतात. म्हणजे पाणी गरम होत नाही असे नाही परंतु ते क्षार साठून तुंबतात.
सोलर हिटर महागही असतात परंतु सरकारकडून २% दराने कर्ज मिळते म्हणे सोलर हिटर बसवायला.
12 Nov 2013 - 1:19 am | काळा पहाड
काय कळ्ळं नाय ब्वा. तुमाला अवनी सोपान गणोरे नाव हवंय की अवनी सोपान आवळे?
12 Nov 2013 - 1:22 am | काळा पहाड
खिक्
12 Nov 2013 - 12:07 pm | मन१
F१
12 Nov 2013 - 12:14 pm | प्रसाद गोडबोले
माझ्यामते ह्या इथे माहिती मिळु शकेल http://bit.ly/u8YVBf
:D
12 Nov 2013 - 12:43 pm | पिलीयन रायडर
नावाची चर्चा चाल्लीये बायांनो.. या इकडं..
हां तर मनोबा, नाव बदललं नाही म्हणुन काहीही फरक पडत नाही. नाव न बदलता परदेशात जाऊन, राहुन काहीही त्रास न झालेली उदाहरणे मि.पा वरच आहेत. माझेही नाव बदलेले नाही, आणि अजुन तरी मला काही त्रास झाला नाही. (मी अजुन परदेशात गेलेले नाही, पण घर घेताना माहेरच्या नावावर नवर्या सोबत मिळुन कर्ज घेतले आहे. घराच्या कयदेशीर कागदपत्रांवरही माहेरचेच नाव आहे.)
फक्त जिथे विवाहीत आहे असे दाखवायचे आहे तिथे विवाह नोंदणी केलेले प्रमाणपत्र दाखवावे.
आणि अनेकदा माहेरच्या नावापुढे Miss or Mrs. हा प्रश्न पडु शकतो, तर त्या ऐवजी Ms असे लावायचे असते.
दोन्ही नावे लावायची असल्यास "मुलीचे नाव - नवर्याचे नाव - माहेरचे आडनाव- सासरचे आडनाव " अशी साधारणत: पद्धत असते.
२. गिझर - आम्ही पुष्क्ळ शोधाशिध करुन १० लिटर चा Havells चा Bueno गिझर घेतला. पुण्यात रविवार पेठेत "आकाशवाणी" नावाचे दुकान आहे. (बहुदा पासोड्या विठ्ठला जवळ, तिथेच सर्व इलेक्ट्रिकल्स ची दुकाने आहेत) तिथे सर्वात स्वस्त मिळाला. तिथुनच फॅन, ट्यब्स वगैरे घेतलं. तिथे बाकीचेही गिझर मिळतील.
पण हा गिझर कधी आम्ही वापरलाच नाही कारण बिल्डींगमध्ये सगळ्यांनी मिळुन बिल्डर कडुनच सोलर हिटर लावुन घेतला. अगदी धो धो पावसातही गरम पाणी मिळते. आता बरीच थंडी असल्याने सकाळी ९-१० च्या सुमारास गरम पाणी मिळते पण कडक उकळते पाणी १२ नंतरच.. खर्च २००००/- आला होता.
लायब्ररीचं आईला विचारुन सांगते. एक आहे फिरती लायब्ररी. नंबर बघते मिळतो का ते.
12 Nov 2013 - 5:00 pm | बॅटमॅन
येस!!! वन टैम सोलर बसवलेय आता मिरजेतल्या घरी. नळ सुरू केला की हातपाय भाजतातच जणू :) कढत पाणी रात्रंदिवस णो टेण्षण.
12 Nov 2013 - 1:39 pm | मैत्र
१. वैयक्तिक अनुभव आहे - आजपर्यंत अशी अडचण आलेली नाही. पासपोर्ट, स्वतंत्र व्हिसा, डिपेंडंट व्हिसा यात आत्तापर्यंत कुठेही अडथळा आला नाही.
एक फरक आहे की बायकोच्या नावात मिडल नेमच नाहीये. त्यामुळे "अवनी नरेश गणोरे" हा प्रॉब्लेम कधी आला नाही. अर्थात पुण्यातल्या किंवा इतरत्र आडमुठ्या सरकारी लोकांचा तुम्ही लिहिल्याप्रमाणे असा अनुभव नाही की मिडल नेम नाही तर चालणार नाही.
माझ्या माहितीमध्ये एक जोडी आहे जिथे मुलीने नाव आणि आडनाव बदललेले नाही. दोघेही पुणेकर मराठी आहेत आणि काही अडचण आलेली नाही.
२. गिझर - गॅस गिझर स्वस्त असतो पण पहिली गोष्ट म्हणजे तो ज्योती सारख्या खाजगी सिलिंडर व्यतिरिक्त बेकायदेशीर आहे. आणि इलेक्ट्रिक पेक्षा धोकादायक आहे.
गॅस आत कोंडून चक्कर येण्याचा धोका असतो. नेहमी घडतेच असे नाही. नात्यात २-३ घरात अनेक वर्षे विनातक्रार वापरात आहे. पण अगदी शेजारीच गॅस मुळे बाथरूममधल्या हवेचे कंपोझिशन बदलून चक्कर येणे /अर्धवट शुद्ध हरपणे असे प्रकार झालेले आहेत.
इलेक्ट्रीक मध्ये १५ आणि २५ लिटर चे मिळतात. लहान कुटूंब कमी वापर - १५ लिटर चांगला कारण पटकन पाणी तापते आणि वीज वाया जात नाही. पण अर्थात पाणी लवकर संपते. नाही तर २५ लिटर योग्य. - "रॅकॉल्ड" चा अनेक घरात अनेक वर्षांचा उत्तम अनुभव आहे. सोल-रे हाही एक दुसरा चांगला मेक आहे.
३. पिंचि आणि होंडा दोन्हीही नसल्याने हा प्रश्न ऑप्शनला
४. अब चौकातल्या एका अतिशय प्रसिद्ध दुकानाची फिरती लायब्ररी आहे.
१५०-२०० रुपये महिना - ५ पुस्तके किंवा ४ पुस्तके व एक दिवाळी अंक - महिन्यातून एकदाच ठराविक दिवशी बदल - उदा. तिसर्या बुधवारी -- हा दिवस तुमच्या भागाप्रमाणे ठरलेला असतो. वाचकाला ठरवता येत नाही.
त्या दिवशी घरी नसल्यास अब चौकात जाऊन बदलू शकता - महिन्यातून एकदा.
गाडी घराशेजारी आली की दिलेल्या नंबरवर फोन येतो. जाऊन पुस्तके बघून बदलून घ्यायची.
किमान सहा महिने सभासदत्व ठेवावे लागते.
पुस्तके चांगली आहेत. गेल्या सहा ते आठ महिन्यात एकूण उत्तम अनुभव आहे.
अजून काही पर्याय - जास्त पुस्तकांचे / बदलाचे उपलब्ध आहेत. त्याबद्दल तपशील मला माहीत नाही.
तुम्हाला हा प्रकार चांगला वाटल्यास व्यनि करा. विचारून फोन / पत्ता व्यनि करेन.
12 Nov 2013 - 3:39 pm | त्रिवेणी
लायब्ररी डिटेल्स आम्हाला पण सांगाल का? म्हणजे आमच्या भागात येत असेल किवा नसेल येत तर मी त्यांच्या दुकानात पण जावू शकेल.
गॅस गिजर- आमच्या ओळखीतली एक व्यक्ति एक व्यक्ति यामुळे मरण पावली. तरुण मुलगा होता. आंघोळीला म्हणून गेला आता नक्की आठवत नाही पण खूप वेळ झाला बाहेर आला नाही म्हणून बगितले तर तो आताच गेला होता. काहीतर गॅस लिक का कायसे झालेले. आता नक्की आठवत नाही.
आमच्याकडे रेकोल्ड चा 25 लीटर गीजर आहे, 4 वर्ष झाली व्यवस्थित सुरू आहे. आता कुटुंब छोटे असले तर नंतर मोठे होणारच असते सो 25 लिटर ठीक आहे.
12 Nov 2013 - 1:53 pm | प्यारे१
आयडी शोभेलसा घेतलाय मनोबापंत. (मनराव वेगळे आहेत म्हणून राव नको)
मनोबाला विचारायचं म्हणण्यापेक्षा काहीतरी 'सांगायचं' अस्तं असं वाटतंय. :)
जाणकार मिपाकर मदत करतीलच.
आम्हाला सुद्धा कदाचित फायदा होईल.
12 Nov 2013 - 2:20 pm | मन१
चौकशी आणि विचारणा हा आणि एवढाच हेतू आहे. धाग्यातील माहितीर्त भभर घालता आली तर आभारी राहिन.
12 Nov 2013 - 2:49 pm | मन१
चौकशी आणि विचारणा हा आणि एवढाच हेतू आहे. धाग्यातील माहितीर्त भभर घालता आली तर आभारी राहिन.
14 Nov 2013 - 7:46 pm | मन१
सर्वांचे मनःपूर्वक आभार.
मालक - संपादक ह्यांना विनंती:-
धाग्यांसाठी एक विभाग सुरु करावा. तात्कालिक माहिती व चर्चा त्यात असल्यानं हवं तर काही काळानं त्या विभागातील धागे उडवले तरी चालतील. मला बर्याच वेळी चौकशी करायचं काम पडतं. इतरांनाही पडत असेल तर तो विभाग कामाला येइल.
खरडफळा नावाची वस्तू आधीच आहे ह्याची कल्पना आहे; पण त्याचा reach फारच कमी आहे.
धाग्यात एखादी गोष्ट टाकली, तर अधिकाधिक लोकांचं लक्ष वेधून घेता येतं. म्हणून म्हटलं वेगळा विभाग असलेला बरा.
"तात्कालिक" ह्या नावानं. शिवाय मागेपुढे जेव्हा केव्हा सर्व्हरची साफसफाई करायची वेळ येइल तेव्हा तीए करणं ह्या "तात्कालिक" विभागामुळं नक्कीच शक्य होइल.