सॅन होजे-सॅन फ्रान्सिस्को व परिसर बे एरियामधील मिसळपाव सभासदांचा कट्टा आयोजित करण्याचा मानस आहे. सर्किटराव व एक शी बोलणे झाले असून २७ सप्टेंबर २००८ अशी प्रस्तावित तारीख आहे. वेळ - स्थानिक वेळेनुसार सायंकाळी ४ ते ७ (प्रस्तावित)
प्रस्तुत प्रस्तावाचे/काथ्याकुटाचे उद्देश पुढीलप्रमाणे -
०. कट्ट्याची तारीख आणि वेळ सोईची नसल्यास पर्यायी तारीख आणि वेळ सुचवणे. जास्तीत जास्त सहभागींच्या सोईनुसार अंतिम तारीख आणि वेळ निश्चित करणे. सध्या उपलब्ध माहितीनुसार वरील तारीख आणि वेळ प्रस्तावित केली गेली आहे.
१. कट्टा कोठे भरवावा, याबाबत विचारविनिमय. इच्छुक सहभागींनी सूचना केल्यास उत्तम. सध्या ठिकाणाबाबत कोणतीही सूचना आलेली नाही; मात्र आधीच्या खाजगी संभाषणांमधून चर्चिले गेल्याप्रमाणे वसोना पार्क हे नाव समोर आहे. किंवा लेकवूड पार्क,सनीवेल. दुसरा प्रस्ताव आहे तो कोणाच्यातरी घरी जमण्याचा; पण कट्टेकरी/दंगेकरी,त्यांचे स्वभाव नि आवडीनिवडी यांबाबत जी आंतरजालीय ओळख झाली आहे,ती लक्षात घेता स्वतःच्या घरी कट्टा भरविण्यासाठी पुढाकार कोणी घ्यावा, याबाबत कोणाचे नक्की काही मत झालेले दिसत नाही :)
२. कट्टा होईल त्या दिवशीचा अधिकृत उपाहार काय असावा? मिसळपाव आणि आणखी काही पूरक पदार्थ, शीतपेये किंवा अन्य काही (संध्याकाळची प्रस्तावित वेळा लक्षात घेता इच्छुक सहभागींनी दुपारचे भोजन उरकून येणे अध्याहृत आहे ;) ) याबाबत चर्चा आणि वॉलन्टिअरिंग ;)
३. कट्ट्यासाठीचे कार्यक्रम - चर्चा, वादविवाद, गप्पा, गझला-कविता, नाट्यछटा, नकला, गाणी इ. उत्स्फूर्तपणे कार्यक्रम करण्यास प्रोत्साहन असेलच, पण आधीच काही ढोबळ स्वरूप नि कार्यक्रम ठरवता आले तर उत्तम, असे वाटते.
इच्छुक सहभागींनी वरील मुद्द्यांपैकी पहिल्या मुद्द्यावर अधिक विचार केल्यास उत्तम. दुसर्या आणि तिसर्या मुद्द्यांवरील चर्चा सहभागींबरोबरच इतर मिसळपावकरांसाठी खुली आहेच. तेव्हा सर्वच सूचनांचे स्वागत आहे.
अपेक्षित सहभाग -
१. सर्किट
२. बेसनलाडू
३. एक
४. नाटक्या
५. बबलु-अमेरिकन
६. श्रीकृष्ण सामंत
७. फटू
खेरीज सहभागींचे कुटुंबिय आणि मित्रगण यांच्यासाठीही खुले आमंत्रण आहेच. दक्षिण कॅलिफोर्निया/लॉस एन्जेलिस मधून कोणाला येण्याची इच्छा असेल आणि जमणार असेल तर आगाऊ कळवावे, म्हणजे वास्तव्य आणि इतर पाहुणचाराची व्यवस्था करता येईल (पिवळा डांबिस, नंदन, भाग्यश्री, घाटावरचे भट व इतरांसाठी ही खास सूचना :) ).
त्याशिवाय सॅन होजे, सनीवेल, सॅन रॅमॉन, सॅन्टा क्लॅरा, सॅन फ्रान्सिस्को, फोस्टर सिटी, फ्रीमॉन्ट,मिल्पिटास, रेडवूड शोर्स मधील मिसळपावकरांनी संपर्क साधून सहभागी व्हायचे म्हटले तर आनंद होईल. अधिक माहितीसाठी या काथ्याकुटावरील प्रतिसादांकडे लक्ष ठेवावे आणि मला व्यक्तिगत निरोप पाठवून आपले नाव व संपर्क क्रमांक कळवावा. जेणेकरून पुढील समन्वय साधणे शक्य होईल.
धन्यवाद.
मिसळपाव कट्टा - सॅन होजे/सॅन फ्रान्सिस्को व परिसर बे एरिया
गाभा:
प्रतिक्रिया
10 Sep 2008 - 2:05 am | नाटक्या
मी नक्कीच येइन.
कट्टा माझ्या घरी केल्यास चालू शकेल. मी फ्रिमाँट येथे रहातो. त्यामुळे ईस्ट बे मधील मंडळींना देखील सोयीचे होईल..
साधारणतः किती लोकं येणार हे जर कळले तर 'ईतर' व्यवस्था करणे सोपे पण होईल..
- नाटक्या
10 Sep 2008 - 2:12 am | चतुरंग
मस्त! भरपूर मिपाकर सहकुटुंब, सहमित्र जमूदेत! मजा करा. आमच्या शुभेच्छा.
(खुदके साथ बातां : रंग्या, एखादी कॉन्फरन्स नाही का रे त्या सुमारास बे-एरियात? ;) )
चतुरंग
10 Sep 2008 - 2:19 am | नाटक्या
हीच कॉन्फरन्स समजुन आलात तरी चालेल.. किंबहूना स्वागतच होईल...
- नाटक्या
10 Sep 2008 - 2:28 am | सर्किट (not verified)
नाटक्या,
रंगाला बहुतेक तिकीट एक्स्पेन्स करायचे असेल ;-)
-- सर्किट
10 Sep 2008 - 2:33 am | नाटक्या
कंपनी स्टार्ट अप आहे. त्यामुळे याहू सारखी दिवाळी साजरी करणे परवडणार नाही..
- नाटक्या..
10 Sep 2008 - 6:55 pm | चतुरंग
बघा कसं बरोब्बर ओळखलं त्यांनी! ;)
चतुरंग
10 Sep 2008 - 2:45 am | भाग्यश्री
अरे वा ठरला का एकदाचा कट्टा करायचे? मी याच विकेंडला येतेय सॅन्टा क्लाराला.. तेव्हा परत २७ ला येणं जमेल की नाही माहीत नाही..
जमलं तर सहीच!
10 Sep 2008 - 3:57 am | मुक्तसुनीत
कट्ट्यास शुभेच्छा !
(खुदके साथ बातां : मुशा , एखादी टेले-कॉन्फरन्स (म्हन्जे आपले वेब्-काष्ट हो !!) नाही का रे करता येणार बे-एरियात? )
10 Sep 2008 - 4:26 am | नाटक्या
करता येईल ना!! याहू तात्काळ निरोप्या वरून पाहू शकाल. वेळ आणि ठिकाण नक्की झाल्यावर कळवतो..
- नाटक्या..
10 Sep 2008 - 4:31 am | बेसनलाडू
याहू वर कॉन्फरन्स् करता येईल. रंगाशेठलाही तिकिट एक्स्पेन्स् क्लेम् करायची भानगड नको ;)
तूर्तास शनिवार २७ सप्टेंबर २००८ रोजी स्थानिक वेळेनुसार सायंकाळी ४ ते ७ हीच निश्चित वेळ. एखाद दिवस थांबून मग शिक्कामोर्तब करून टाकायचा विचार आहे.
(आमंत्रक)बेसनलाडू
10 Sep 2008 - 4:03 am | एक
खाण्यापिण्याची काही सोय करायची असेल तर नक्की सांगा.
10 Sep 2008 - 6:00 am | नंदन
त्याच्या आधीचा (२० सप्टें) किंवा नंतरचा (४ ऑक्टो) वीकांत चालण्यासारखा आहे का? २७ च्या वीकांताला नेमकी बे एरियावरूनच मित्रमंडळी येत आहेत. :(
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
10 Sep 2008 - 6:37 am | बेसनलाडू
अनधिकृत कट्टा करू :)
पण २० ला सगळ्यांनाच चालणार असेल आणि तुलाही जमणार असेल, तर माझी हरकत नाही. मी २० ला मोकळा वेळ ठेऊ शकेनच.
(अनधिकृत)बेसनलाडू
10 Sep 2008 - 6:40 am | नाटक्या
> अनधिकृत कट्टा करू
.. मला पण चालेल.
- नाटक्या
10 Sep 2008 - 12:45 pm | बबलु
मी एका पायावर तयार आहे. :)
२० किंवा २७ सुद्धा चालेल.
....बबलु-अमेरिकन
10 Sep 2008 - 12:53 pm | नंदन
२० सप्टेंबर चालेल का सर्वांना? पिडांकाका/सर्किटराव?
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
10 Sep 2008 - 9:37 pm | सर्किट (not verified)
२० ला मला नाही रे जमणार. मला फक्त २७-२८ च्या विकांतालाच जमू शकेल. पण २१ ला इथे असणार असशील तर आपण भेटू शकतो.
-- सर्किट
10 Sep 2008 - 10:04 pm | पिवळा डांबिस
२० ला मला नाही रे जमणार!
१५ ते १९ मी सॅन डियागोमध्ये आहे (विसरलास?:))
लगेच २० ला विरुद्ध दिशेला इतक्या लांब यायला नाही जमणार...
(घरची लाकडं फोडायची असतात!!!!:))
२७ असेल तर काही विचार करता येईल...
त्यानंतरच्या तारखांनाही विचार करता येईल....
10 Sep 2008 - 12:57 pm | धमाल मुलगा
करा मज्जा :)
सही रे बेसनलाडु!
एकदम मिटींगीचा अजेंडाच लिहिला हैस की रं :)
करा करा, च्यायला, केव्हाचं घोळतंय तिकडं कट्टा करायचा, आमच्या डांबिसकाकांना आता किती बरं आणंद झाला असेल :)
मस्त मजा करा, आणि हो, फोटो बिटो द्या इथं चढवून.
कट्ट्याला शुभेच्छा!
(जमल्यास त्या नंदनला काँप्युटर्सपलिकडे लिवंत माणसंही असतात ह्याची आठवण करुन द्या.)
10 Sep 2008 - 9:48 pm | नाटक्या
जर सगळ्यांना शक्य असेल आणि मंजुर असेल तर आपण संध्याकाळी ६:३० वा. जमूया. शनिवार असल्यामुळे दुसर्या दिवशी उठण्याची पण घाई नसेल तेव्हा रात्री उशीरापर्यंत कट्ट्यावर निवांत गप्पा हाणता येतील. खाणे-पिणे पण चापून करता येईल. मिसळ-पाव, पुलाव, मसाला-पापड, सॅलड वगैरे वगैरे असा भक्कम बेत करावा म्हणतो.. मिसळ-पाव ची जवाबदरी माझी. बाकी सगळ्या गोष्टी सारख्या वाटून घेवू. काय पटते का?
- नाटक्या...
10 Sep 2008 - 9:48 pm | नाटक्या
जर सगळ्यांना शक्य असेल आणि मंजुर असेल तर आपण संध्याकाळी ६:३० वा. जमूया. शनिवार असल्यामुळे दुसर्या दिवशी उठण्याची पण घाई नसेल तेव्हा रात्री उशीरापर्यंत कट्ट्यावर निवांत गप्पा हाणता येतील. खाणे-पिणे पण चापून करता येईल. मिसळ-पाव, पुलाव, मसाला-पापड, सॅलड वगैरे वगैरे असा भक्कम बेत करावा म्हणतो.. मिसळ-पाव ची जवाबदरी माझी. बाकी सगळ्या गोष्टी सारख्या वाटून घेवू. काय पटते का?
- नाटक्या...
10 Sep 2008 - 9:58 pm | वाटाड्या...
फारच लांब आहे...मी डेट्रॉइट ला आहे. कट्ट्याला शुभेच्छा...
11 Sep 2008 - 1:14 am | घाटावरचे भट
हा हंत!!!!
२७ला कट्टा आणि १ तारखेला परीक्षा :( :(
माझ्यापण लांबूनच शुभेच्छा कट्ट्याला...
--आपलेच (आणि घाटावरचे) भट...
उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्य वरान्निबोधत ~ स्वामी विवेकानंद
11 Sep 2008 - 2:11 am | एक
१४ नंतरचा लगेचचा विकेंड आहे त्यामुळे इतके दिवस तुंबून राहिलेली "पूल पार्टी" त्यादिवशी उपटली नाही तर नक्कि जमू शकेल.
17 Sep 2008 - 4:30 am | बेसनलाडू
कट्ट्यासंबंधी सर्वांच्या सोईचा एकत्रित विचार करता पुढील वेळ आणि स्थळ निश्चित झाले आहे.
स्थळ - नाटक्याचे घर, फ्रीमॉन्ट - विस्तृत पत्ता लवकरच देण्यात येईल.
वेळ - शनिवार दि. २७ सप्टेंबर २००८, स्थानिक वेळेनुसार सायंकाळी ४ ते ७ (किंवा ५ ते ८?); गरज पडल्यास सर्वांची सोय पाहून घड्याळी वेळ पुढे-मागे करता येईल, पण तारीख हीच सोईची आहे, असे दिसते.
निश्चित सहभाग -
१. नाटक्या २. सर्किट ३. बेसनलाडू ४. एक ५. बबलु-अमेरिकन हे मिपाकर आणि काही मित्रमंडळी आणि/किंवा कुटुंबिय
सहभागाच्या प्रतीक्षेत (?) - १. फटु २. श्रीकृष्ण सामंत ३. पिवळा डांबिस ४. भाग्यश्री
यापुढील चर्चा - कट्ट्यासाठीचा मेनू (मिसळपावसोबत आणखी काय? :) ) आणि (असल्यास) प्रस्तावित कार्यक्रम.
कट्ट्याला येण्यासाठी सॅन होजे, मिल्पिटास,सनीवेल,सॅन्ता क्लॅरा भागातून कोणाला राइड हवी असल्यास माझ्या गाडीत २ ते ३ जणांसाठी जागा असेल.
(आमंत्रक)बेसनलाडू
17 Sep 2008 - 4:42 am | मुक्तसुनीत
फोटो येतीलच. रेकॉर्डींगही करा. सर्कीटराव हे उत्तम गाणार्यांपैकी आहेत. (ध्वनिमुद्रणाच्या प्रतीक्षेत असणारे एक हौशी गायक. ) त्यांची दादागिरी ( या बाबतीत तरी) सहन करू नका. गायल्याशिवाय थेंबसुद्धा चाखायला मिळयची नाही म्हणावे ;-)
आणि हो , बाकीच्याही गुणी मिसळपावकरांना ऐकायला आवडेल !
17 Sep 2008 - 5:25 am | नाटक्या
४-७ (किंवा ५-८) असण्या पेक्षा ७ ते कितीही करुया का? म्हणजे खादाडी करुन गप्पा टाकायला बसता येईल आणि खाण्यामध्ये गप्पांचा (आणि गप्पांमध्ये खाण्याचा) व्यत्यय येवून रसभंगही होणार नाही.
मेनू (माझ्या मताप्रमाणे):
१. मिसळ-पाव
२. पुलाव (किंवा कुठला तरी भात)
३. भाताबरोबर काहीतरी (कढी/आमटी सारखा एखादा पदार्थ)
४. एखादा गोड पदार्थ
५. जमल्यास एखादे appetizer.
५. शितपेये(म्रुदु किंवा कठीण)/ज्युसेस ;-)
मिसळीची जवाबदारी माझी (जर कोणाची हरकत नसल्यास).
- नाटक्या...
17 Sep 2008 - 5:43 am | भाग्यश्री
मला नाही जमणार.. २०च्या विकेंडला येणं होतंय माझं.. परत एकदा जमणं अवघड.. :(
तरी, कट्ट्याला शुभेच्छा! वेस्ट कोस्टातला बहुचर्चित पहीला वहीला कट्टा दणक्यात होऊन जाऊदे!
गाणी असतील तर रेकॉर्डींग करा प्लीज..
17 Sep 2008 - 5:47 am | नाटक्या
मला वाटले होते की तुम्ही याल म्हणून. आला असता तर बरे झाले असते. हरकत नाही कधीतरी तुम्ही कट्टा आयोजीत करा. आम्ही नक्की येऊ. तोवर आमच्या फोटो/रेकॉर्डींग वर समाधान माना.. ;-)
- नाटक्या..
17 Sep 2008 - 6:30 am | बबलु
आमच्या आउटलूक च्या क्यालेंडर वर "MiPa Katta" रिझर्व झाला आहे. ::)
....बबलु-अमेरिकन
19 Sep 2008 - 9:15 am | चिंचाबोरे
इतक्या उशिरा प्रतिसाद दिल्याबद्दल क्षमस्व. पण मीही या कट्ट्यात सामिल होइन.
19 Sep 2008 - 1:49 pm | बेसनलाडू
कुठे जमायचे आहे तो पत्ता आणि संबंधित दूरध्वनी क्र. लवकरच तुम्हांला पाठवतो.
सहभागी झाल्याबद्दल सहर्ष धन्यवाद.
(आभारी)बेसनलाडू
19 Sep 2008 - 2:20 pm | भडकमकर मास्तर
ह्ये मस्त झाले...
आम्ही लक्ष ठेवूनआहोतच्...कट्ट्याला शुभेच्छा...
आता अजून एकदा फोटो , रेकॉर्डिंग ची वाट पाहतोय...
___________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
20 Sep 2008 - 6:41 am | चिंचाबोरे
चालेल आणि गोड पदार्थ करायची जबाबदारी मी घेईन??
20 Sep 2008 - 12:24 pm | बेसनलाडू
काय आणताय? साधारण १०-१२ जणांसाठी हवे आहे या हिशेबाने आणल्यास उत्तम!
(हावरट)बेसनलाडू
20 Sep 2008 - 7:21 am | प्राजु
कट्ट्याला माझ्या तर्फे शुभेच्छा! :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
22 Sep 2008 - 1:17 pm | स्वाती दिनेश
माझ्याही शुभेच्छा!!कट्ट्याला भरपूर मजा करा ,चित्रं आणि वृत्तांत लवकर टाका, जमले तर चित्रीकरणही करा..:)
स्वाती
20 Sep 2008 - 12:22 pm | बेसनलाडू
कट्ट्याचे स्थळः
38592 Wilde Terrace,
Fremont, CA - 94536
संपर्कासाठी दूरध्वनी : नाटक्या - (408)832-5099
बेसनलाडू - (919)412-4663
(आमंत्रक)बेसनलाडू
22 Sep 2008 - 11:16 am | चिंचाबोरे
सरप्राईज!सरप्राईज!!
23 Sep 2008 - 3:07 am | नाटक्या
"सरप्राईज!सरप्राईज!!" असे ओरडताय काय? काय सरप्राईज ते तर सांगा?
(आश्चर्यचकित) नाटक्या.. :O
23 Sep 2008 - 3:21 am | भाग्यश्री
काय सरप्राईज आहे ते सांगितले तर ते सरप्राईज राहील का! :)
23 Sep 2008 - 11:40 am | बबलु
गोड पदार्थाची डीश सरप्राईज आहे.
....बबलु-अमेरिकन