विकी डोनर सिनेमा
विकी डोनर या चित्रपटात असे पात्र दाखविले आहे की ज्याचा व्यवसाय पैसे घेउन वीर्य विकणे हा आहे. आणि त्याच्या वीर्याचा वापर अपत्यहीन जोडप्यांना मुल व्हावे यासाठी केला जातो.या चित्रपटाद्वारे एक संदेश देण्यात आला आहे की अशा प्रकारे आपले वीर्य विकणे यात काहीही गैर नाही आणि याने अपत्यहीन जोडप्यांच्या आयुष्यात मुल यायचा मार्ग मोकळा होतो आणि त्यांचे जीवन आनंदी होते. चित्रपटाच्या शेवटी सर्वजण यातील नायकाच्या या कामाचे कौतुक करतात व त्याचा स्विकार करतात व चित्रपट वीर्यदान कशी चांगली गोष्ट आहे हे त्याचा अंगिकार केला पाहीजे हे ठसवितो.
वीर्यदान आणि नियोग एक तुलना
आता गंमत अशी आहे की आपल्या संस्कृती त तर या साध्या निरुपद्रवि वीर्यदान पेक्षा ही अधिक प्रगत अधिक प्रभावी अशी नियोगा ची विलक्षण परंपरा होती. व तिला मुख्य म्हणजे धर्म व जन मान्यता ही होती. तिचा वापर होत होता त्या संदर्भात धर्मशास्त्रांनी व्यवस्थित नियम ही घालुन दिलेले होते. तर असा जो समाज एके काळी नियोगा चा सरळ स्वच्छ अवलंब करीत होता जो नंतरच्या काळात अनेक कारणांनी बंद होत गेला. ( त्यातील एक महत्वाचे म्हणजे कलिवर्ज्य या योजनेनुसार इतर अनेक गोष्टींसोबत नियोगा वर ही बंदी घालण्यात आली ) अशा समाजाला वीर्यदान या नियोगा च्या तुलनेत अत्यंत साध्या आणि अजिबात COMPLICATED नसणार्याय विषयावर शिक्षीत/प्रोत्साहीत करण्यासाठी एक सिनेमा काढावा लागतो.आणि गंमत म्हणजे त्यातील नायकाचे असे वीर्यदान करणे आजही बर्याोच जणांना आवडत- रुचत- पचत नाही कुठेतरी सांस्कृतीक धक्का बसल्यासारखे वाटते हा मला काळाने केलेला एक मोठा विनोद वाटतो. म्हणुन या निरुपद्रवी वीर्यदाना पेक्षा कैक पट व्यापक प्रभावी असलेली नियोग पध्दती नेमकी कशी होती हे मांडावेसे वाटते.
प्राचीन भारतीय संस्कृती त नियोग ही एक नियमबद्ध, धर्मशास्त्र संमत, सर्ववर्णीयांस परवानगी असलेली एक परंपरा होती. या द्वारे ज्या स्त्रिला विधवा झाल्यावर मुल झालेले नसल्यास अथवा पति जिवंत असतांना त्याच्या नपुसंकते ने अथवा असाध्य आजाराने पुत्र प्राप्ती संभव होत नसल्यास.पति च्या संमतीने अथवा ज्येष्ठांच्या/ गुरुंच्या संमतीने एखाद्या दुसर्यात पुरुषाची नेमणुक करुन त्याच्याशी रीतसर नियमांचे पालन करुन संभोग करुन पुत्र प्राप्ती करुन घेण्याचा हक्क देण्यात आला होता. यात कुठ्ल्याही चमत्काराने अथवा शक्तीने पुत्र प्राप्ती करुन देणे असे कधीच नव्हते.रीतसर मान्यताप्राप्त संभोगाने पुत्र प्राप्तीची ही एक धर्मसंमत आणि व्यावहारीक अशी परंपरा होती.
नियम कायदा बनविणारे धर्म साहीत्य व त्याचे ढोबळ वर्गीकरण
सर्वसाधारणपणे प्राचीन धर्म साहीत्यात श्रुती (मुळ वेद साम-अथर्व-रुग्वेद-यजुर्वेद ) ,स्मुर्ती ( उदा.मनुस्मृती, नारद्स्मृती इ.) धर्मसुत्रे ( बौधायन. आपस्तंब इ.) पुराणे ( विष्णुपुराण,मत्स्य्पुराण इ.) अशी विभागणी असते. त्यानंतर विवीध टीकाकारांच्या टीका जशी (मनुस्मृती वरील मेधातीथी ने केलेले भाष्य,) यात बहुतेक वेळा एका समान मुद्यांवर भरपुर भेद असतात. यात शेवटचा निकाल हा श्रुती त काय आहे यावर होत असतो. पण एखादा विषय घेउन तुम्ही शोध घेतला जसे उदा इथे नियोग या SPECIFIC विषया वर निरनिराळ्या ठिकाणी काय लिहीलेले आहे हे जर बघीतले तर त्या विषयाचे एक निश्चित चित्र बर्याषपैकी समोर येते. मतभेद जरी आढळले तरी एकदंरीत शास्त्रकर्त्यांची त्या विषयासंबंधीची भुमिका काय आहे आणि त्यांना नेमके काय अभिप्रेत होते. हे निश्चितच लक्षात येते. त्याहुन महत्वाचे म्हणजे एखाद्या विषयासंदर्भात घेतलेली भुमिका काळानुरुप कशी बदलत जाते कुठल्या कारणांनी ही भुमिका बदलते हे पाहणे हा ही एक मोठा INTERESTING भाग असतो.
या लेखाच्या सोर्स विषयी
आता आपण नियोगा विषयी निरनिराळ्या महत्वाच्या धर्मशास्त्रां मध्ये काय ,तरतुदी, नियम व तत्वे व व्याख्या होत्या या बघुयात म्हणजे नियोग या परंपरे विषयीचे अधिक चित्र स्पष्ट होत जाईल. ( खालील सर्व नियम मुळ संस्कृत भाषेत मुळ ग्रंथात व्यवस्थित उपलब्ध आहेत हा त्यांचा थोडक्यात मराठी अनुवाद आहे. जाणकार मुळ संस्कृत श्लोक कधीही तपासुन पाहु शकतात) या खालील विवेचना चा मुख्य आधार ( HISTORY OF DHARMSASTRA VOLUME II , PART -1 , CHPTER XIII, ( NIYOGA ) PAGE NO. 599 TO 607 ) हा आहे याचे लेखक आहेत श्री पांडुरंग वामन काणे हे या विषयांतील अत्यंत अधिकारी व्यक्ती मानले जातात आणि माझ्या अल्प सामान्य झानानुसार हे भारतरत्न हा सम्मान मिळवणारे पहीले मराठी माणुस आहेत. हा ग्रंथ अत्यंत मोठा जवळजवळ ६००० पानांचा आणि संशोधकीय वर्तुळात प्रतिष्ठा प्राप्त आहे. अर्थात याचा अर्थ असा नाही की यातील सर्वच मते बरोबर च आहे किंवा चिकीत्सेची गरज च नाही असे सुचविण्याचा हेतु अजिबात नाही. जाणकार मुळ ग्रंथ पडताळुन पाहु शकतात.)
नियोगा संबधी सर्वात जुने धर्मशास्त्र गौतमधर्मसुत्र चे विवेचन बघा
१-अशी स्त्री जीचा पति मरण पावलेला आहे, आणि जीला मुल व्हाव अशी इच्छा आहे ती आपल्या पतीच्या भावा कडुन पुत्र प्राप्ती घरातील ज्येष्ठांच्या संमतीने करुन घेउ शकते.
२-आणि मासिक पाळीचे पहीले चार दिवस वगळुन त्यानंतर च्या दिवसांत ती पतीच्या भावाशी पुत्र प्राप्तीसाठी संभोग करु शकते..
३-जेव्हा पतीचा भाउ अस्तीत्वात/ ऊपलब्ध नसेल तेव्हा ती सपिंड, सगोत्र ,सप्रवरा कींवा स्व-वर्णिय पुरुषाशी पुत्र प्राप्तीसाठी संभोग करु शकते.( काही शास्त्रकारांच्या मते केवळ दीर च हे काम करु शकतो इतर कोणी नाही यात पुष्कळ मतभेद आहेत)
४-या नियोगा चा वापर स्त्रिला केवळ दोन पुत्रां पुरताच करता येउ शकतो. त्याहुन अधिक नाही.
५-जेव्हा पति जिवंत असेल आणि पुत्र निर्मीती साठी सक्षम नसेल आणि त्याच्या परवानगीने जेव्हा नियोग घडवला जाउन जर पुत्र निर्मीती झाली तर असा पुत्र हा त्या पति चा मानला जाईल.
६- वरील प्रमाणे झालेला पुत्र क्षेत्रज म्हणुन ओळखला जातो. वरील स्त्रि क्षेत्र म्हणुन ओळखली जाते.अशा स्त्रिचा पती हा क्षेत्रिन आणि ज्याची नेमणुक या कार्यासाठी केली जाते त्याला बिजिन (जो बीजारोपण करतो ) अथवा नियोगीन असे म्हटले जाते.
वसिष्ठ धर्मसुत्रा चे नियोगा संबंधी नियम बघा
१-विधवा स्त्रिचा पिता अथवा भाउ यांनी गुरुंची बैठक बोलाविली पाहीजे आणि त्यांच्या संमतीने च मग बिजीन ची नेमणुक पुत्र प्राप्तीसाठी केली पाहीजे.
२-यात काही प्रतिबंध घातलेले आहेत. जर विधवा स्त्रि पति वियोगाने वेडी अथवा मानसिक संतुलन हरवलेली असेल, अथवा म्हातारी असेल अथवा रोगग्रस्त असेल तर मात्र नियोग करण्यास मनाई आहे.
३-बिजीन ने प्रजापती मुहुर्त ( हा जसा ब्रम्ह मुहुर्त आहे तसा एक मुहुर्त आहे ) बघुन , पतिसारखी भेट घेउन, मात्र कोठल्याही प्रणय क्रिडा न करता, तिला शिवीगाळ न करता तिचा धिक्कार न करता च पुत्रप्राप्ती साठी विधवे शी संभोग केला पाहीजे.
४-संपत्ती त सहभाग मिळेल या हेतुन बिजीन नियोग करीत असेल तर त्याला प्रतिबंध केला पाहीजे. बिजीन ने कर्तव्य भावनेने निस्वार्थ भावनेने हे सर्व केले पाहीजे ही शास्त्रकाराची अपेक्षा आहे.
बौधायन धर्मसुत्राने केलेली क्षेत्रज ची व्याख्या
असा पुत्र जो
अ-जो विधवे च्या परवानगीने
ब-नपुंसक पुरुषाने आपल्या स्त्रिशी संभोग करण्यास दीलेल्या परवानगीने
क-असाध्य आजाराने ग्रस्त अशा पुरुषाने आपल्या स्त्रिशी संभोग करण्यास दिलेल्या परवानगीने
करण्यात आलेल्या परपुरुषा बरोबर च्या ( बिजीन ) संभोगाने झालेला आहे. असा पुत्र जो या वरील संमत संभोगाद्वारे झालेला आहे तो क्षेत्रज म्हणुन ओळखला जातो.
मनुस्मृती त आलेले नियोगा संबधी चे नियम
( नियोगा विषयी मनु दोन परस्पर विरोधी भुमिका घेतो काही श्लोकांत तो नियोगा चा पुर्णपणे विरोध ही करतो व काहीत समर्थन करतो जागेअभावी विरोधाचे श्लोक घेतलेले नाहीत आणि लेखाचा हेतु नियोगाला काय व कशी संमती होती हा आहे. त्यावरील मतभेद व नियोगावर नंतर बंदी कशी व का आणली हा स्वतंत्र लेखाचा विषय आहे )
तर मनुस्मृती नुसार ,
एखादी विधवा जेव्हा नियोगासाठी पतीचा भाउ अथवा पती च्या सपिंड पुरुषाशी संभोग करते आणि जर तिला त्यानंतर ही पुत्रप्राप्ती झाली नाही तर ती दुसर्या एखाद्या पुरुषाचा वापर नियोगासाठी करु शकते मात्र मनुस्मृती त्यासाठी दोन नियम लावते.
१-अशा बिजीन ने अंधारात च स्त्रिशी संभोग केला पाहीजे
२-अशा बिजीन चे शरीर भरपुर तुप व तेलाने माखले पाहीजे.
३-आणि याने केवळ एक च पुत्र या विधीने जन्माला घातला पाहीजे.(इथे वरील धर्मशास्त्रांशी मनु विरोध दर्शवितो दोन एवजी एकच पुत्राची परवानगी देतो.)
कौटील्याचे नियोगा संबधीचे नियम
१-जो राजा म्हातारा अथवा असाध्य व्याधी ने ग्रस्त आहे अशा राजाने अशा मातृबंधु ची ज्यात त्याच्या स्वत: सारखेच चांगले गुण आहेत अशा पुरुषाची नेमणुक नियोगासाठी करुन त्याद्वारे राणी कडुन पुत्र प्राप्ती करुन घेतली पाहीजे.
२-जो ब्राम्हण पुत्रा शिवाय च मेला आहे. त्याच्या पत्नी साठी ही मातृबंधु अथवा सपिंड पुरुषाची बिजीन म्हणुन नेमणुक करुन पुत्र प्राप्ती करुन घेतली पाहीजे.
आता वरील नियोगाच्या विधी संबंधातील कौटील्याचे नियम पहा कुठल्या कंडीशन्स मध्ये नियोग होउ शकतो वगैरे संबधीचे नियम व अटी.
१-नवरा जिवंत अथवा मृत असो त्याला अगोदर्च पुत्र असेल तर नियोग करता येत नाही.
२-नियोगासाठी नेमलेला बिजीन हा नवर्यााचा भाउ अथवा सपिंड अथवा सगोत्र ( पतिचा) अथवा स्वजातीचा (पतिच्या) च असला पाहीजे अन्य पुरुष अलाउड नाही.
३-कुटुंबातील गुरुंनी बसुन चर्चा करुन च नियोगाचा निर्णय घेतला पाहीजे.
४-या कामासाठी नेमलेल्या बिजीन ने वासने ने प्रेरीत होउन संभोग न करता कर्तव्यभावनेने च याला अंमलात आणले पाहीजे.
५-बिजीन ला अगोदर तुप व तेलाने व्यवस्थित मर्दन केले पाहीजे.( जेणेकरुन कर्तव्यभावना शाबुत राहील वासना निर्माण होणार नाही हा हेतु आहे)\
६-बिजीन ने या स्त्रिशी मधुर संभाषण किंवा चुंबन किंवा अथवा प्रणय ( फ़ोर प्ले –कोर्टशिप –) न करता संभोग उरकला पाहीजे.( जेणेकरुन कुठलाही बॉन्ड दोघांत उत्पन्न व्हायला नको)
७-हा संबध फ़क्त एक अथवा दोन पुत्र होइ पर्यंत च अलाउड आहे.
८-स्त्रि ही बिजीन पेक्षा वयाने लहान हवी आणि निरोगी हवी.
९-एकदा नियोगाद्वारे पुत्र प्राप्ती झाली की नंतर मात्र बिजीन आणि स्त्रि यांनी परस्परांशी संबंध सासरा व त्याची सुन असे ठेवले पाहीजेत.
१०-असा नियोग जर ज्येष्ठांच्या संमती विना झाला तर तो पाप मानण्यात येईल.
११-जरी ज्येष्ठांची संमती असेल मात्र पत्नीला जर स्वत:च्या पती पासुन अगोदरच पुत्र प्राप्ती झाली असेल तर वरील ज्येष्ठांची संमती असुनही हा नियोग पाप मानण्यात येईल.
नियोगा संदर्भात मनात निर्माण होणारे काही प्रश्न व शंका ( जाणकारांनी प्रकाश टाकावा )
१-शास्त्रकर्त्यांचा बिजीन आणि स्त्रि दरम्यान जो भावबंध निर्माण न होउ देण्याचा प्रयत्न आहे तो खरच प्रत्यक्षात यशस्वि होत असेल का ? ( याच मुद्यावर अमोल पालेकरांचा एक चित्रपट येउन गेला आहे यात एका राणीला नियोगासाठी राजा पाठवितो सुरुवातीला फ़ारशी उत्सुक नसलेली राणी मात्र नंतर बिजीन ने दिलेल्या संभोगसुखाने बदलत जाते, त्याच्यात मनाने गुंतत जाते अस काहीस त्यात फ़ार तरलतेने दाखविलेल आहे)
२-अंगाला तुप तेल लावुन एक प्रकारे बिजीन विषयीचे आकर्षण कमी करण्याचा प्रयत्न कीतपत यशस्वि होत असावा?
३-ज्येष्ठ च सर्व ठरवित असत त्यांची संमती ही अट जवळजवळ प्रत्येक च धर्मशास्त्र घालते. तर ती जी काय स्त्रि आहे तीच्या संमती विषयी तर काही कुठे फ़ारसा नियम वगैरे दिसत नाही की नेहमीप्रमाणे स्त्रिची संमती गृहीत च धरलेली दिसतेय.
४-पुत्र प्राप्ती हाच शब्द सर्वत्र स्पष्टपणे वापरला आहे कन्या प्राप्ती हा काही उद्देश दिसत नाही. कन्येसाठी काही नियोगाचा अवलंब केलेला दिसत नाही. पण उद्देश जरी पुत्र असला आणि झालीच कन्या तर काय बर करीत असावेत ? एक संधी अधिक देत असणार काय? उल्लेख तर काही आढळला नाही असा. जाणकारांनी प्रकाश टाकावा.
५-आजच्या काळात या नियोग परंपरेचे पुन्हा एकदा पालन करणे सुरु केले तर त्याचे काय सामाजिक नैतिक परीणाम होतील?
६-आणि मुख्य म्हणजे स्त्रियांच या नियोग परंपरेला समर्थन असेल की विरोध आणि कुठल्या मुद्यावर ?
प्रतिक्रिया
5 Nov 2013 - 8:02 pm | शैलेन्द्र
एक खुप चांगला, व चर्चा करण्याजोगा विषय..
२०० नक्की..
5 Nov 2013 - 8:02 pm | जेपी
उत्सुकता वाढलीय . जाणकारांच्या प्रतिसादा ची वाट पाहतो
5 Nov 2013 - 8:31 pm | खटासि खट
नियमांच पालन झाले कि नाही यासाठी पंचांची नेमणूक वगैरे ?
5 Nov 2013 - 8:36 pm | पैसा
यासंबंधी महाभारतातले उल्लेख तर स्पष्टच आहेत. नंतर ही प्रथा बंद झाली तरी उत्तर भारतात पंजाबात मृत नवर्याच्या धाकट्या भावाशी लग्न करणे या स्वरूपात अलीकडे पर्यंत चालू होती. अद्याप चालू असेल तर माहित नाही. यावर आधारित राजेन्द्र सिंह बेदींच्या "एक चादर मैली सी " ची आठवण झाली. या कादंबरीवर आधारित एक उत्कृष्ट सिनेमा आला होता आणि त्यात हेमामालिनी आणि ऋषि कपूर यांची सुंदर कामे होती.
इतर गोष्टींबद्दल चर्चा वाचायला आवडेल. पुत्रप्राप्ती हाच उद्देश दिसतो आहे. म्हणजे जर मुलगी झाली तर परतून नियोग करत असावेत. अशा मुलीच्या पालन पोषणात काही अडचण येण्याचे कारण दिसत नाही. जसे पुत्रप्राप्तीसाठी यज्ञ केल्यावर द्रुपदाला २ मुले मिळाली. धृष्टद्युम्न आणि द्रौपदी. त्या दोघांनाही द्रुपदाची मुलेच म्हटले गेले.
6 Nov 2013 - 7:27 am | खटासि खट
लेखात उल्लेख केलेल्या नियोगसंततीला समाजमान्यता होती हे धाडसी विधान आहे का ? तसं असतं तर साधूने फळ दिलं, प्रसाद दिला वगैरेसारख्या कथा दिसल्या नसत्या.
@ पैसा
एक चादर मैली सी... अतिशय सुंदर सिनेमा. धन्यवाद आठवण करून दिल्याबद्दल
माझ्या मित्राने उप्र मधल्या एका परंपरेबद्दल सांगितलं होतं. त्याच्या साईटवर एका कामगाराने तो बाप बनल्याबद्दल पेढे वाटले. तेव्हां दोघातिघांनी त्याला विचारलं कि वर्षभरात तू गावी गेला नाहीस तरी हे कसं झालं ? तेव्हां त्याने सांगितलंकि हमारे भाई लोग है न !
त्या वेळी नुकतेच कॉलेजमधून बाहेर पडलो असल्याने या घटनेवर खूप हसलो. पुढे मित्राने थाप मारली कि काय असं वाटू लागलं. असं कुठं असतं का असं वाटू लागलं. नंतर प्रवास आणि वाचन यामुळे अनेक ठिकाणच्या अविश्वसनीय प्रथा कळू लागल्या. भारत काय चीज आहे हे कळलं. मग उप्रत जायचा योग आला. नेहमी जाणाने ओळखी झाल्या होत्या. तेव्हां मित्राच्या किश्श्याचा विषय ( जो अजूनही डोक्यात घोळत होता) काढला. तेव्हां त्याने जे काही सांगितलं ते मित्राच्या किश्श्याला पुष्टी देणारं होतंच, पण गरिबीतून येणा-या अपरिहार्यतेला आपण हसलो याबद्दल पश्चात्ताप करायला लावणारंही होतं. चार पाच भाऊ, बहिणी, आई वडील असं कुटुंब. शेतीचा तुकडा असला तरी तुटपुंजं उत्पन्न. ओला-सुका दुष्काळ. रोजगाराचा अभाव. अठरा विश्वे दारिद्र्य हा शब्दही या दारिद्र्याचं वर्णन करायला कमी पडावा. स्थानिक जमीनदार किंवा धनदांडग्यांची जवळपास राबवून घेण्याची वृत्ती. यातून मार्ग काढण्यासाठी कुटुंबातल्या एका सदस्याला मुलूखगिरी करावी लागते. त्याने पैसे पाठवायचे, त्यातून इतरांनी शेतीची कामं चालू ठेवायची. कधी कधी एकापेक्षा जास्त सदस्यही गरजेनुसार गाव सोडतात. येण्याजाण्याचा खर्च नको म्हणून ते सदस्य तिकडेच राहतात. वंश चालवण्यासाठी घरातील इतर सदस्यांकडून कार्यवाही केली जाते. ही प्रथा उप्र मधल्या काही भागात अस्तित्वात होती. आता (कदाचित इतर ठिकाणचं पाहून) त्यात फरक पडत चालला आहे. कामगार आता आपल्या जोरूला घेऊन शहरात येतात किंवा अधूनमधून गावाकडे जातात.
6 Nov 2013 - 5:55 pm | कुमारकौस्तुभ
लेखात उल्लेख केलेल्या नियोगसंततीला समाजमान्यता होती हे धाडसी विधान आहे का
एखादी प्रथा जेव्हा समाजात व्यवस्थित खोलवर रुजते वापरात आणली जाते तेव्हाच तिच्या संदर्भात निरनिराळे नियम
घालुन देण्याची निकड निर्माण होत असते. शास्त्रकार यावर इतके नियम बनवितात व्याख्या निश्चीत करतात या सर्व गोष्टी एखाद्या समाजमान्यता नसलेल्या किंवा कमी प्रमाणात प्रचलित असलेल्या परंपरे बाबत घडत नाहीत. एके काळी तर कानीबालीझम ही सर्वत्र ( सर्व जगांत) प्रचलित होता तर नियोग कोणती मोठी गोष्ट आहे ?
6 Nov 2013 - 11:38 pm | मृगनयनी
छान लेख! .. काही वर्षांपूर्वी याच विषयावर अमोल पालेकरांचा "अनाहत" हा पिक्चर आला होता. सोनाली बेन्द्रे-बहल'ने त्यात राणीचा रोल केला होता. (बहुधा) गिरिश कर्नाड'जींनी राजाचे काम केले होते. पण या पिक्चरमध्ये नियोगासाठी जो पुरुष दाखवला होता, तो राजाच्या सगोत्र वंशातला वगैरे नव्हता. फक्त तो सशक्त, निरोगी असावा, अशी राजाची अपेक्षा असल्याचे दाखवले होते...........
7 Nov 2013 - 1:23 am | रुस्तम
अंनत नाग यांनी राजाचे काम केले होते
7 Nov 2013 - 8:21 am | मृगनयनी
ओह.. येस्स... राजाचे काम 'अनन्त नाग'जींनी केले होते. बहुधा दीप्ती नवल देखील आहे मूव्हीमध्ये... दीड तासाची एक सुन्दर मूव्ही!!!! ... :)
5 Nov 2013 - 8:42 pm | प्रचेतस
उत्तम विषय.
जाणकारांच्या प्रतिसादांच्या प्रतिक्षेत.
5 Nov 2013 - 10:40 pm | हवालदार
यातले जाणकार कोण आणि कसे ठरवणार हे जाणून घेण्याची उत्सुकता आहे.
5 Nov 2013 - 10:41 pm | प्रचेतस
जाणकार म्हणजे श्रॄती, स्मृती, पुराणांची माहिती असलेले हो. नियोग केलेले नै कै. =))
5 Nov 2013 - 10:50 pm | हवालदार
धन्यवाद :-)
6 Nov 2013 - 1:48 am | चित्रगुप्त
धत्तेरेकी!! म्हणजे आम्ही यातून बाद झालो. आम्ही आपले कळ-फलक सरसावून बसत होतो.
5 Nov 2013 - 11:07 pm | शैलेन्द्र
पहिली समिधा पडली..
5 Nov 2013 - 11:06 pm | सुबोध खरे
आजच्या काळात हि अशी गुंतागुंत निर्माण करण्याची गरजच नाही. शुक्राणू पेढया (स्पर्म बैंक ) सर्वत्र उपलब्ध आहेत. तेंव्हा बर्याच पुरुषांच्या वीर्यापासून तयार केलेले(pooled) शुक्राणू वापरून कृत्रिम गर्भधारणा करता येते त्यात विविक्षित एका पुरुषाचे शुक्राणू वेगळे काढता येत नसल्यामुळे मुलाच्या पितृत्वावर दावा ठोकण्यासाठी कोणी येत नाही. आणि स्त्रीची कोणतीही भावनिक गुंतवणूक न झाल्याने पुढची गुंतागुंत टळते. शिवाय यौनशुचीता(तथाकथित) राखल्याने त्या स्त्रीचा नवरा सुद्धा खुश असतो.
बाकी स्त्रीला पुरुषसुख(नियोग वगैरे) मिळवायचे इतर मार्ग आहेत पण तो इथला विषय नाही.
5 Nov 2013 - 11:10 pm | शैलेन्द्र
स्पर्म्स पूल करतात का? माझ्या माहितीप्रमाणे तरी वेगवेगळे ठेवतात.
6 Nov 2013 - 11:38 pm | संजय क्षीरसागर
या एकाच वाक्यात डॉक्टरांनी धाग्याचा "विनियोग" केला आहे.( त्यापुढच्या वाक्यावर बोलायला नवा 'आयोग' नेमावा लागेल ही गोष्ट वेगळी!)
6 Nov 2013 - 6:28 am | खटपट्या
त्या काळीसुद्धा प्रोफेशनल बिजिन असतील का ?
6 Nov 2013 - 9:21 am | उद्दाम
छान
6 Nov 2013 - 1:51 pm | फिरंगी
सहमत ……
6 Nov 2013 - 5:46 pm | रघुपती.राज
या संदर्भात काही आणखी काही लिहावेसे वाटते आणि काही प्रश्न विचारावेसे वाटतात.
राजवाडे लिखित भारतीय विवाह सन्स्थेचा इतिहास आणि पा वा काणे यांचे काही लेखन वाचून मला असे वाटते की गेल्या पाचशे वर्षात भारतीय स्त्रीला परंपरांच्या जोखडात अडकवण्यात आले आहे. भारतीय कुटुंब पद्धती सुरुवातीला स्त्री प्रधान होती, असे दिसते. भारतीय स्त्रिया कुटुंब, अर्थकारण, वंश-वारसा यात स्वतंत्र निर्णय घेऊ शकत होत्या. एकाच कुटुंबात एकाच आईची पण वेगवेगळे पिते असलेली मुले असत. पण हळू हळू यात फरक होत गेला. पुरुष प्रधान कुटुंबे आली. त्याची कारणे सांगायची ही जागा नव्हे.
अपत्य (येथे पुत्र हा शब्द मुद्दाम टाळला आहे) प्राप्ती करिता नियोग हि सर्वमान्य पद्धती होती. यात कोणी कसे नियम घातले आहेत या पेक्षा त्या काळातील सामाजिक आणि आर्थिक गरजा यावर अधिक लक्ष देणे मला योग्य वाटते. येथे लेखकाचा अपमान करायचा हेतू नाही. पण एका विशिष्ट प्रथा किंवा चाली मागील तर्क समजला तर मग नियम योग्य की अयोग्य हे देखील कळायला सोपे जाईल.
चाणक्य हा अर्वाचिन भारतातील एक ज्ञात व्यक्ती असून तो जर या नियोग पद्धतीबद्दल नियम लिहित असेल तर हि पद्धत चाणक्य काळात वापरली जात असेल असे म्हणायला हरकत नाही. त्या काळात मानवाचे आयुर्मान कमी होते. युद्धे होत असत व प्राणहानी होत असे. पुनरुत्पादन ही एक ' अत्यावश्यक' गरज होती. यांत्रिकीकरण कमी होते. त्यामुळे मेहनतीची कामे खूप असावीत आणि म्हणून पुरुष संतती आवश्यक होती. त्यामुळे त्या काळात स्त्रियाही या बाबतीत एक सामाजिक गरज म्हणूनही नियोग पद्धतीने अपत्य प्राप्ती करून घेत असाव्यात. येथे मी हे नाकारत नाही की, पुरुष प्रधान संस्कृती, एकत्र कुटुंबातील संपत्तीचा हिस्सा राखणे आदी हेतू प्रमुख शकतात. पण येथे मी एक नमूद करू इच्छितो की, 'सती'म्हणून विधवा स्त्रीला पेटवून देण्यापेक्षा तिला अपत्य प्राप्तीची संधी देणे केव्हाही चांगले. फक्त तिच्यावर नियोग लादु नये. अलीकडच्या काळातील सुधारणावादी याला एक मूर्खपणा देखील म्हणतील व यामुळे स्त्रीचे स्वतंत्र अस्तित्व राहत नाही इत्यादी मुद्दे आणतील. पण येथे एक गोष्ट विसरून चालणार नाही. त्या काळात बहुतांश म्हातारी माणसे मुलांच्या आधाराने वृद्धापकाळ घालवीत असत. त्यामुळे हक्काचा आधार मिळवण्याची एक तरतूद म्हणून नियोग कडे बघणे आवश्यक आहे. आता या पार्श्वभूमीवर नियम कसे बनवायचे व कसे पाळावे ते ज्याचे त्याला माहित.
येथे मला काही प्रश्न विचारावेसे वाटतात:
१) स्पर्म बँक - आय वी एफ इत्यादी कृत्रिम पद्धत अपत्य प्राप्तीकरिता वापरली जाते. पण यात बहुतांश केसेस मध्ये खूप गुंतागुंत झाल्याचे ऐकू येते. ज्या स्त्रीवर आय वी एफ किंवा तत्सम इतर प्रणाली वापरल्या जातात त्यांना गरोदर पणात व प्रसूती मध्ये फार त्रास काढावा लागतो. अशा काही केसेस बघितल्या आहेत. यात वैद्यकीय व्यावसायिकांचे आर्थिक संबंध देखील गुंतले आहेत. पदव्युत्तर शिक्षण घेतलेली दोन डॉक्टर भावंडे दत्तक मुलाचा / मुलीचा पुरस्कार करताना या सगळ्या गुंतागुंतीपासून दूर राहायला सांगताना बघितली आहेत. खरेच या आधुनिक उपचार पद्धती अपत्य प्राप्ती साठी चांगल्या आहेत का?
२) अपत्यहीन जोडप्याकरिता मी दत्तक सुचवतो. परंतु बहुतांश मंडळीना ते मुल 'आपले' वाटत नाही. काहीना आय वी एफ किंवा तत्सम इतर प्रणाली परवडत नाही. अशी मंडळी खरेच नियोगाचा मार्ग अवलंबू शकतात का?
३) योनी शुचितेचा फाजील बाऊ करणाऱ्या आपल्या समाजात नवर्याला 'आपले' मुल नसले तरी चालेल पण तो 'बायकोचे' मुल स्वीकारू शकेल का?
४) शिक्षणाच्या प्रसारानंतर स्त्री आर्थिक दृष्टा स्वयंपूर्ण आहे. तिला वर्गमित्र आहेत, कार्यालयीन सहकारी आहेत. अशी स्त्री आजच्या काळात अश्या एखाद्या पुरुषाकडून अपत्य प्राप्ती ( नवरयाला अंधारात न ठेवता) करून घेऊ शकेल का?
(टीप : मी क्वचितच लिहितो. त्यामुळे शब्द निवड चुकणे, शुद्ध लेखन न जमणे शक्य आहे. चुकांबद्दल क्षमा असावी)
6 Nov 2013 - 10:34 pm | रमेश आठवले
'आता गंमत अशी आहे की आपल्या संस्कृती त तर या साध्या निरुपद्रवि वीर्यदान पेक्षा ही अधिक प्रगत अधिक प्रभावी अशी नियोगा ची विलक्षण परंपरा होती. व तिला मुख्य म्हणजे धर्म व जन मान्यता ही होती.' ---
नियोगामध्ये एका स्त्रीची अगतिकता आहे. इतर ठरवतील त्या पुरुशाशी संभोग करावा लागे आणि गर्भधारणेची चिन्ह दिसेपर्यंत म्हणजे अनेक वेळा करावा लागे. शारीरिक जवळकी बरोबर भावनिक जवळीक होणे ही नैसर्गिक प्रक्रिया आहे . असे झाल्या नंतर इतर मंडळी हे सर्व दिव्याचे बटन दाबल्यासारखे बंद करीत असत. सध्याची tecnology उपलब्ध नसल्याने वंश चालू ठेवण्या साठी नियोग हा अपरिहार्य मार्ग स्वीकारावा लागत होता.
या उलट अलीकडे तिला मुल हवे कि नाही हे स्त्री स्वत: ठरवू शकते. तसेच विर्यदाता पुरुषाची ओळख गुप्त ठेवली जाते.आणि हे समाजानी मान्य केले आहे. अशा अपत्यांना अनैतिक स्मब्दधातून निर्माण झालेली मूले असा शिक्का लागत नाही..
vicky donor हा चित्रपट पाहिला नाही. त्या मुळे त्याच्या कथे बद्दल लिहू शकत नाही.
२. सद्याचे नियोग चे उदाहरण म्हणजे एकलव्य हा हिंदी सिनेमा. त्यात राजाला अपत्य होऊ शकत नसल्याने राणीबरोबर संभोग करण्याचे काम एकलव्य या नावाच्या त्याच्या सरदारावर सोपवले जाते आणि आणि तो ते काम राजनिष्ठे च्या भावनेच्या विरुद्ध आहे हे माहित असून ही करतो. अमिताभ बच्चन यांनी एकलव्य ची भूमिका केली आहे.
३.नियोगी, नेगी, अशी आडनावे आहेत . त्यांचा उद्ग्म या नियोग प्रथेतून झाला आहे का ?
7 Nov 2013 - 1:53 am | खटपट्या
नुकतेच माझ्या नेगी नावाच्या मित्राला तिळे झाले आहे.
7 Nov 2013 - 9:05 am | ऋषिकेश
मला मुळात समाजाचा येनकेनप्रकारेण मुल हे व्हायलाच हवे हा हट्टच समजू शकत नाही. नैसर्गिक रित्या झालं मुल तर ठिक... नै तर नै काय फरक पडतो?
बाकी, चालु दे.
7 Nov 2013 - 10:42 am | डॉ सुहास म्हात्रे
फरक पडता है भाय... वंशवृद्धी हा सर्व प्राण्यांचा मूलभूत स्वभाव आहे.
तसे नसते तर (मानवाची सगळी सफर इतक्या महाविनाशातून झालेली आहे की) आपण आज मिपावर चर्चा करायला आस्तित्वातच आलो नसतो.
7 Nov 2013 - 11:52 am | ऋषिकेश
ते सगळं ठिक.. समाजाला/इतरांना फरक काय पडतो?
मुल होऊ नयेत असं म्हण्णं नै.. स्वतःला मुल व्हावसं वाटणं वगैरे बद्दल शंका/आक्षेप नाही.
ती झालीच पाहिजेत या समाजाच्य हट्टामागचा तर्क समजत नै
एखाद्याला नै झाली मुलं तर नै.. तुम्हाला (पक्षी समाजाला) काय फरक पडतो.. कशाला इतकं पिडावं/वेगळी वागणूक द्यावी त्यांना??
7 Nov 2013 - 12:54 pm | मराठी कथालेखक
आता "मूल न होणे" बरोबरच "स्वेच्छेने मुल होवू न देणे" (म्हणजे पालकत्वाची आवड नसल्यास) ही संकल्पना देखील रुजू लागलीय. याला सहसा DINK (Double income no kids) असे म्हणतात कारण बहूतेकरुन स्त्री-पुरुष (नवरा बायको वा लिव्ह ईन पार्टनर्स) दोघेही करिअर मध्ये व्य्स्त आणि करियर मध्येच अधिक रमणारे असतील तर असा निर्णय घेतात.
तसेच "लिव्ह-ईन" चे प्रमाण वाढू लागले आहे आणि "लिव्ह-ईन" जोडपे सहसा मुल जन्माला घालत नाहीत, समाजाचे बंधन तर त्यांनी झुगारलेले असतेच.
7 Nov 2013 - 2:33 pm | ऋषिकेश
मुळाअत DINK चा समाजाशी फारसा संबंधच येत नाही. त्यांची केसच वेगळी आहे. (ते त्यांच्या जागी योग्य असतीलही - मी द्वीधेत आहे)
मात्र समागम करूनही + माफक इच्छा असूनही मुले होत नाहित त्या जोडप्यांना समाजात इतकं पिडलं जाताना बघितलं आहे की त्या प्रकाराची तिडीक बसली आहे.
7 Nov 2013 - 10:56 am | शैलेन्द्र
सजीवांचे सगळे अस्तित्वच DNA पुढे संक्रमित करण्याच्या उद्देशाने असते.
7 Nov 2013 - 11:13 am | ग्रेटथिन्कर
आँ
7 Nov 2013 - 12:12 pm | रमेश आठवले
नियोग प्रघात रूढ झाला त्यावेळी आपला वंश आणि आपले आडनाव पुढे चलू राहिले पाहिजे अशी सर्वांची समजूत असे. तसेच आपली ऐहिक संपत्ती आपल्या मागे घरातच रहावी आणि आपल्याला पिंड दान करण्यासाठी पुत्र असला पाहिजेच अशी धारणा होती. विशेषत: राजघराण्यात वंशज असणे आवश्यक होते. या सगळ्यावर तोडगा म्हणून नियोग चा प्रघात निर्माण झाला.
नंतर दत्तक घेण्याचा प्रघात सुरु झाला. त्यामुळे नियोगाला महत्व राहिले नसावे असा माझा तर्क आहे.
7 Nov 2013 - 1:41 pm | चिगो
वरील नियमांप्रमाणे कुंती/माद्रीला देवांकडून झालेली पुत्रप्राप्ती "लिगल" ठरते का? कर्णाचं एकदा सोडून द्या, पण
ह्यातल्या पहील्या नियमानुसार तर युधिष्ठीरानंतर झालेली मुले 'इनव्हॅलिड अॅब इनिशियो" ठरतात. तसेच, "पुरुषाच्या" पुत्रप्राप्तीसाठी ही सोय असल्याने माद्रीलाही पुत्रप्रप्तीचा अधिकार नव्हता, नाही का? मग ही मुले "पांडव" कशी आणि त्यांची बाजू न्याय्य कशी?
.... झाली काडी टाकून. (पेटल्यास बघू.) ;-)
7 Nov 2013 - 2:09 pm | प्रचेतस
अहो ते देव हे उत्तरकुरु होते असे म्हणतात. :)
7 Nov 2013 - 2:55 pm | संजय क्षीरसागर
त्यामुळे कुरुकुरीला जागाच नाही.