हिंदुस्थानचे मंगळ अभियान आणि सामान्य नागरिकांचे जीवन !

मदनबाण's picture
मदनबाण in काथ्याकूट
5 Nov 2013 - 5:24 pm
गाभा: 

आपल्या देशाने मंगळावर यान पाठवले आहे ही बातमी आता तुम्हा सर्वांना माहित झालीच असेल... तर सर्व प्रथम मी त्या सर्व शास्त्रज्ञ मंडळी / तंत्रज्ञ यांचे अभिनंदन करतो ज्यांनी त्यांची बुद्धीमत्ता वापरुन ही योजना साकरली आहे.
-
-
-
पण मला या निमित्त्यानी काही प्रश्न विचारावेसे वाटत आहेत, तुम्हालाही काही प्रश्न विचारावेसे वाटत असतील तर हा धागा त्यासाठीच टाकला गेलेला आहे.

१) आपल्या देशाला $172 billion debt आहे जे मार्च २०१४ पर्यंत देय आहे. ( संदर्भ :- India has to repay $172 billion debt by March 2014 माझ्या माहिती प्रमाणे मंगळ मोहिमेचा खर्च ७० मिलीयन आहे.जरी असे मानले की जर ही मंगळ मोहिम फत्ते झाली तर इतर अनेक देश आपल्याकडे अशाच आणि इतर आंतराळ मोहिमांसाठी येतील ज्यामुळे आपल्याला पैसा देखील मिळेल,पण ज्या देशातील नागरिकांना साधा कांदा विकत घेणे परवडत नाही,महागाईने तो पूर्णपणे पिचला गेला आहे त्याला या मंगळ मोहिमेचा काय फायदा ?

२) तंत्रज्ञानाचा विकास व्ह्यायलाच हवा, पण ज्या तंत्रज्ञानाच्या विकासामुळे सामान्य माणसाच्या आयुष्यात काहीच फरक पडणार नसेल तर त्याचा काय उपयोग ? हे मंगळयान मंगळाचा अभ्यास करेल...त्याच्या हवेत कुठला वायु आहे ? तिथे पाणी आहे का ? असेल तर कुठल्या अवस्थेत ? किंवा तिथे जीवसॄष्टी आहे का ? त्याचे काही पुरावे मिळतील का ? इ.इ. गोष्टींचा बहुधा वेध घेतला जाईल... पण जेव्हा महाराष्ट्रात दुष्काळ पडला तेव्हा लोक गटाराचे पाणी पीत होते... त्यांना मंगळावर पाणी असल्याने / नसल्याने फरक पडणार होता /आहे का ?मंगळवार जीवसॄष्टीचा शोध घेत असताना आपल्या देशात लुप्त होत जाण्यार्‍या प्राण्यांचे काय ? ते संपले तर मंगळावरुन इपोर्ट करता येतील काय ?
आपल्या देशातुन नष्ट होण्याच्या मार्गात असलेल्या प्राण्यांची यादी :- List of endangered species in India

३) वायुप्रदुषण प्रचंड वाढले आहे, आणि दिवाळीत फटाके फोडुन वाढवु नका असा संदेश माहितीजाला पासुन ते सॅटेलाईट चॅनल पर्यंत सगळ्यांनी दिले, मंगळावर ऑक्सिजन जरी सापडला तर त्याचा फायदा काय ?

४) रोज आपण बातम्या वाचत आहोत की चीन ने आपल्या देशात घुसखोरी केली, पाकिस्तान घुसखोरी करतोय आपल्या जवानांना बोकडा सारखे कापतोय ! ज्या देशाला त्यांच्या सिमेचे रक्षण करण्यात तसेच जवांनांचे आयुष्य वाचवण्यात सातत्याने अपयश येत आहे ते मंगळावर यान पाठवुन कोणत्या विजयाचा झेंडा फडकवणार आहेत ?

५)ज्या देशात साधी दुचाकी चालवण्यासाठी आदर्श रस्ते नाहीत, ज्या देशातले नागरिक हे मोठ्या संख्येने फक्त रस्ते अपघातात मारले जातात तोच देश मंगळ मोहिमेवर यान पाठवतो !
A Million Road Deaths In A Decade & Climbing

जाता जाता :- विज्ञान,तंत्रज्ञान, बुद्धीमत्ता आणि पैसा यांचा वापर करुन देशाचा आर्थीक विकास,सुबत्ता,सामन्य नागरिकाचे आयुष्य अधिक सुखकारक आणि जगण्यास सुलभ करण्यापेक्षा मंगळावर यान पाठवणे हे खरेच आपल्या प्रगतीचे लक्षण आहे का ? इतर देशांच्या तांत्रिक कौशल्याच्या पंगतीत जावुन बसण्याचा प्रयत्न करताना त्यांनी केलेली इतर प्रगती ( ज्यात वरील उल्लेखलेले मुद्दे देखील आहेत.) पाहता आपण मागे का ?

प्रतिक्रिया

=))

अतिशय विनोदी धागा.

चालूद्या.

मालोजीराव's picture

6 Nov 2013 - 7:02 pm | मालोजीराव

टेन्शन नको घेऊ सरकारचं,होऊ दे खर्च…
इस्रो छाव्यांमध्ये छावा…मंगळावर फक्त त्याचीच हवा :P

बॅटमॅन's picture

7 Nov 2013 - 12:12 am | बॅटमॅन

ISRO

पिशी अबोली's picture

7 Nov 2013 - 12:20 am | पिशी अबोली

इस्रोने वाघ पाठव्ला यानातून? बाप्रे...

डॉ सुहास म्हात्रे's picture

7 Nov 2013 - 12:30 am | डॉ सुहास म्हात्रे

सूर्यमालेतला सर्वात मोठा ग्रह गुरू आहे शुक्र नाही ! आकारमानाने पृथ्वीचा पाचवा आणि शुक्राचा क्रमांक सहावा आहे.

ते आहे हो, त्या मूळ लेखकाला जोशाच्या भरात भान राहिले नसावे. :)

डॉ सुहास म्हात्रे's picture

7 Nov 2013 - 7:59 pm | डॉ सुहास म्हात्रे

आसं बगा ते शुक्र आणि गुरू मंदी कमीतकमी ७८ कोटी व जास्तीतजास्त ११७ कोटी किलोमीटर अंतर आस्तया. उगाच फुड्च्या तितल्या यानाच्या फेरीत गफ्लत व्ह्वू नै म्हूनशान सांगिटलं ;)

बॅटमॅन's picture

7 Nov 2013 - 8:23 pm | बॅटमॅन

येस्सार!!

मालोजीराव's picture

7 Nov 2013 - 8:40 pm | मालोजीराव

एक्का काका त्या पोस्टर बनवणार्यांनी मुद्दाम शुक्र लिहिलंय…चर्चा व्हावी म्हणून…

चर्चा तर होणारच !

प्रचेतस's picture

7 Nov 2013 - 9:48 pm | प्रचेतस

त्याचा शुक्र वक्री असावा. =))

बाबा पाटील's picture

8 Nov 2013 - 12:36 pm | बाबा पाटील

अश्वगंधा आणी मुसली प्यायला सांगा त्याला.

बॅटमॅन's picture

9 Nov 2013 - 8:59 pm | बॅटमॅन

=)) =)) =))

बाकी आमच्या मते तरी हा स्त्रीवाद्यांचा डाव आहे. ते विंग्रजीत म्हणतात ना, पुरुष सगळे मंगळावरचे अन बायका शुक्रावरच्या? म्हणून त्यांनी स्वतःचा ग्रह सगळ्यात मोठा मानला ;)

डॉ सुहास म्हात्रे's picture

9 Nov 2013 - 10:46 pm | डॉ सुहास म्हात्रे

म्हणजे ते चित्र स्त्री (किंवा फितूर पुरुष) ग्राफिक डिझायनरनं कलेलं दिसतय तर ;)

बॅटमॅन's picture

21 Nov 2013 - 11:38 pm | बॅटमॅन

शक्यता विचारार्ह आहे ;)

आनंदी गोपाळ's picture

9 Nov 2013 - 11:53 pm | आनंदी गोपाळ

त्या पोस्टरमधे 'बघतोस काय रागानं, ओवरटेक केलंय वाघानं' असं नासाच्या किंवा रशियाच्या यानाला दाखवून लिवायला हवं होतं राव!

बॅटमॅन's picture

21 Nov 2013 - 11:39 pm | बॅटमॅन

करतील, करतील, तसेही करतील ;)

आ.गो. तुमच्यासाठी कायपण ;)

केदार-मिसळपाव's picture

5 Nov 2013 - 5:42 pm | केदार-मिसळपाव

हिंदुस्थानचे मंगळ अभियान आणि...
भारतातली गरिबी+क्रिश३ चा गल्ला+निवडनुकिवरचा खर्च+क्रिकेटवरचा खर्च + पतंगावरचा खर्च+दिवाळीच्या फटाक्यांचा खर्च+गणपतीची वर्गणी+तुमचा आमचा खर्च+नेत्यांचे जीवन+सिनेतारकांच्या पार्ट्या+...
अरे काय चाल्लय काय, उचलले बोट आणि काढला धागा...
पण खात्री आहे कि हा विनोदी धागा आहे...म्हणुन फक्त प्रतिसाद सन्ख्या वाढवतोय..

टवाळ कार्टा's picture

5 Nov 2013 - 5:50 pm | टवाळ कार्टा

+१११११११११

जेपी's picture

5 Nov 2013 - 5:45 pm | जेपी

चालु द्या . जेवढा काथ्था कुटला जाईल तेव्हढा फायदा .
बारदाना घेऊन येतो .

वर नमूद केलेले प्रश्न आहेत पण म्हणून बाकी प्रगती करायचीच नाही का? हे प्रकार खर्चीक असतातच! लोक गरीब आहेत, दोनवेळचे अन्न नाही, शौचालये नाहीत इ. प्रश्न सगळे निकालात काढून मगच आम्ही बाकीचा विचार करू असे ठरवले तर झाले कल्याण! जे गरीब आहेत त्यातले ५० टक्के लोक हे विचारी आहेत (असे धरून चालू)त्यांनी (वैध मार्गाने)गरिबी हटाव कार्यक्रम आपल्या कुटुंबापुरता कितपत हाती घेतलाय? पाणी नसलेल्या गावांनी पोपटराव पवारांकडून मार्गदर्शन घेण्याचा विचार केलाय का? अपल्या गल्लीत होणारे जातीय दंगे थांबवणे आपल्याच हातात आहे हे कितीजणांनी मान्य करून कृती केलीये (ज्यामुळे मालमत्तेचे नुकसान टळेल)? यातलं कणभरही आपल्यापुरतंही करायचं नाही अन् मोहिमा थांबवायच्या याला काय अर्थ आहे? वाईट, आळशी लोकांसाठी दुसर्‍यांनीही आपली बुद्धी गंज चढवत ठेवायची. हेच शास्त्रज्ञ नंतर परदेशी निघून गेले की ब्रेन ड्रेनचे हळ्हळणारे विचार करायचे. समाजात सगळ्या प्रकारच्या लोकांसाठी जागा आहे. गरिबांचा विचार गरीब बिच्चारे म्हणून होतो किंवा केल्यासारखा दाखवतात पण कित्येक बुद्धिवंत मुलामुलींना आपल्या देशात साजेसे, योग्यतेचे काम मिळत नाही. परदेशी जाण्याची संधी मिळेलच असे नाही. त्यांचे मानसिक हाल किती असतात याचा विचार कुठे केला जातो? त्यांचाही विचार व्हायला हवा. सगळ्या देशात गरीबी हटाव होईपर्यंत या बुद्धिवंतांनी काय करायचे? वाट बघत बसायची? असे असेल तर महाराष्ट्राने बिहार सुधारेपर्यंत वाट बघायला हरकत नाही. शेवटी देशबंधू आहेत ते आपले!

वर नमूद केलेले प्रश्न आहेत पण म्हणून बाकी प्रगती करायचीच नाही का?
माझा कोणत्याही प्रगतीला विरोध नाही, देशातल्या कोणत्याही व्यक्तीचा देखील प्रगतीला विरोध नसावा ! पण ज्या मूलभुत सुविधा आवश्यक आहेत त्या नसताना मंगळावर यान पाठवुन फायदा काय ? रस्ते नसलेल्या देशात नक्की ही कुठली प्रगती ?

@ बॅटमॅन
५ रुपयात पोटभर जेवण मिळते हा क्रूर विनोद ज्या देशात सहजते ने केला जातो... तिथे हा धागा विनोदी वाटल्यास दोष नसावा !

रस्ते नसलेल्या देशात नक्की ही कुठली प्रगती ?

प्रगती ही अनेक आघाड्यांवर होत असते ना! संशोधन हा प्रकार (बर्‍याच क्षेत्रातले) खर्चीकच असतो. काही प्रगती कुटुंब पातळीवर, काही गावपातळीवर, तालुका, जिल्हा, राज्य पातळीवर वेगवेगळ्या स्वरूपात असते तशी ही जगाच्या पातळीवर आहे. पातळी बदलली की खर्चाचे प्रमाण बदलते, किंवा (बरेचदा) बदलायला हवे. कित्येक गावांनी आपाला पाण्याचा, विजेचा आणि रस्त्याचा प्रश्न श्रमदानाने सोडवलाय की! आता मी फार याबाबतीत बोलत नाही कारण यातली कोणतीही गोष्ट मी केलेली नाही. एक दोनदा पुण्यात असताना आमच्या सोसायटीपुरता प्रयत्न म्हणून काही गोष्टी कराव्यात असे मनात येईपर्यंत दहा नकारच आले. उदा. सोलर पॅनल्स ब्सवणे, आमच्या एरियातील वीज बिले, घरांचे टॅक्स भरताना तिथे मिळणारी सेवा सुधारावी म्हणून काही विचार केला होता पण प्रतिसाद फारसा मिळाला नाही. निदान आपल्यापुरते काही प्रश्न चाम्गल्या मार्गाने सोडवण्याचा विचार होता. आता तर ऑनलाईन होतात ही कामे म्हणून ठीक आहे. त्यावेळी तसे नव्हते.

प्रगती ही अनेक आघाड्यांवर होत असते ना!
ज्या देशात माणसांठी रस्ते नाहीत तिथे मंगळयान काय कामाचे ? प्रश्न खर्च किती होतो ते महत्वाचे नसुन तो कोणत्या कारणासाठी केला जातोय आणि त्याने सामान्य माणसाच्या आयुष्यात काय फरक पडतो या बद्धल आहे.

बरं ठीक आहे. आपण आधी रस्ते बांधणी हातात घेऊ. त्यासाठी जे बजेट असते तेवढ्याच खर्चात ते काम होईल असे तुला वाटते का? ही कंत्राटे कशी मिळतात, कोणाला दिली जातात हे वेगळे साम्गावयास नको (त्याचं डिट्टेलवार वर्णन करू शकेन इतकं लहनपणापासून हेच बघितलय पण बोलणे अवघड आहे ना). एवढे करून रस्त्यांचं आयुष्य किती असतं? म्हण्जे परिस्थिती जैसे थे झाली ना!

म्हण्जे परिस्थिती जैसे थे झाली ना!
अगदी बरोबर ! मग अशा देशाचे मंगळ अभियान सुद्धा काय कामाचे ? कारण शेवटी परिस्थीती जैसे थे अशीच राहणार ना ?
अमेरिका देखील असाच उध्योग करते,पण तिथे रस्ते हे रस्त्यां सारखेच असतात ना ? तिकडच्या लोकांना श्रमदान करावे लागते का ?

आणखी किती प्रयत्न करू माझे अज्ञान लपवण्याचा? त्यापेक्षा तूच गप्प बैस. ;)

ज्या देशात माणसांठी रस्ते नाहीत तिथे मंगळयान काय कामाचे

मंगळावर तरी कुठे आहेत रस्ते? यान तिथे चालले की मग देशात पण चालेल की बिनरस्त्याचे. तेवढा रस्ते तयार करायचा खर्च पण वाचेल की?

विजुभाऊ's picture

6 Nov 2013 - 1:26 pm | विजुभाऊ

काही अंशी सहमत आहे.
पण अशा प्रत्येक गोष्टींचा विचार केला तर मग नक्की कोणत्या गोष्टीला प्राधान्य द्यायचे हे ठरवणे अवघड होते.
उदा :
अन्न हवे.संरक्षणावर खर्च कशाला हवा आहे
आरोग्य हवे आहे. रस्ते बांधणीवरचा खर्च कशाला करताय
सर्वाना शिक्षण हवे आहे. विमानतळासाठी खर्च कशाला?

हा विचार निवडणूकीतील सवंग भाषणांसाठी ठीक आहे. जनतेला असे विचार भावतात.
या सर्व गोष्टी एकमेकांवर अवलंबून आहेत.
उदा देशाच्या सुरक्षेसाठी अद्ययावत सैन्यदल हवे. सर्वांगीण आरोग्यासाठी संशोधन तसेच औषध निर्माण उद्योग असायला हवेत. औषधे इकडेतिकडे नेण्यासाठी रस्ते हवेत. रस्ते बांधणीसाठी वाहन उद्योग , सिमेंट उद्योग हवेत्.लोकाना शिक्षण हवे त्यासाठी संशोधन हवे. हे सगळे असेल तरच एकात्मिक विकास शक्य आहे.
बर्‍याचदा एखादे संशोधन कशासाठी आवश्यक आहे असा प्रश्न पडतो. कदाचित त्यावेळेस ते संशोध आणि तदनुषंगीक उद्योग हे बाल्यावस्थेत असतात. उदा: इलेक्ट्रीक एनर्जी निर्माण करणार्‍या मायकेल फॅरॅडे ला विचारले गेले होते की विद्युत शक्तीचा उपयोग काय? त्याने उत्तर दिले होते की नवजात बालकाचा तरी तसा काय उपयोग असतो? पण आज आपण बघतो बहुतेक जग विद्यूत उर्जेवर अवलंबून आहे.
अनेक संशोधने ही त्यावेळेस सर्वसामान्य माणसाला उपयोगी नव्हती मात्र त्यानंतर त्याचा मानवाला जीवनमान सुधारण्यासाठी खूपच उपयोग झालेला आहे. उदा :मायक्रो ओव्हन, मोबाईल , कम्युनिकेश क्रान्ती इत्यादी.
देशावरचे कर्ज आणि संशोधनावर होणारा खर्च यांचा परस्पर संबन्ध लावणे हास्यास्पद वाटते. अमेरीकेला आपल्यापेक्षा जास्त कर्ज आहे.म्हणून त्यानी नासा वर होणारा किंवा सी आय ए वरचा खर्च हा कधीच कमी केला नाही.
कर्ज होईल म्हणून एखादी गोष्टच टाळणे हा पलायन वाद होतो. काही कर्जे धरणे बांधण्यासाठी / रस्ते बांधण्यासाठी घेतली जातात. त्यांची परतफेड ही नीट प्लॅनिंग करून देश देतच असतो.

ज्या देशात माणसांठी रस्ते नाहीत तिथे मंगळयान काय कामाचे ?

हे विचारणे म्हणजे घरात दोन मुले असतील तर मोठा मुलाला ताप आलेला असताना धाकटा मुलगा जेवूच कसा शकतो असे विचारण्यासारखे आहे.
ज्या देशात माणसांसाठी रस्ते नाहीत त्या देशात..........
या गाळलेल्या जागा आयपील स्पर्धा हव्यात कशाला / ऑलिंपीक स्पर्धेत सहभाग कशाला / विमानतळ कशाला हवे / रणगाड्यांवर खर्च कशाला / अद्ययावत हॉस्पिटले कशाला / निवडणुकांवर खर्च कशाला / टीव्ही सीरीयल्स वर खर्च कशाला / क्रिकेट सामन्यांवर खर्च कशाला
असे अनेक प्रश्न विचारले जावु शकतात. ( या पैकी पहिला प्रश्न खरोखरच विचारकरण्याजोगा आहे.)
संशोधन हे त्याच्या जागेवर असते. इतर प्रश्न त्यांच्या जागी. एकमेकांत सरमिसळ करु नये

खटासि खट's picture

6 Nov 2013 - 1:31 pm | खटासि खट

रस्ते आणि यानाचा संबंध जोडायचा असल्यास रस्त्यावरून धावणारे यान बनवण्याबद्दल इस्त्रोला आदेश देणारं सरकार निवडून आणा.

अशोक पतिल's picture

6 Nov 2013 - 6:12 pm | अशोक पतिल

१०० % सहमत .

अशोक पतिल's picture

6 Nov 2013 - 6:15 pm | अशोक पतिल

@ विजुभाउ
१०० % सहमत

थॉर माणूस's picture

22 Nov 2013 - 12:12 pm | थॉर माणूस

आपले लोक टीनपाट क्रिकेट टीम खरेदीत ह्या पेक्षा जास्त पैसे लावतात, त्यांना शिकवायला हवं हे सगळं. जेवढे पैसे या मोहिमेवर खर्च झालेत तेवढ्यामधे आज हमरस्त्यांच्या रस्तारुंदीकरणाची काँट्रॅक्टपण घेत नाहीत ठेकेदार.

बरं हे पैसे कुठल्याही जीवनावश्यक, पायाभूत, मूलभूत वगैरे काय असते त्या सगळ्या गोष्टींना ढीगभर पैसे उपलब्ध करून उरलेल्या पैशांचे जे विज्ञानविषयक तरतूदींसाठी राखीव बजेट केले जाते तिथून येतात. त्यामुळे गरीब, गरजू वगैरे वगैरेंनी वाईट वाटून घेऊ नये. त्यापेक्षा त्यांनी कचरा कचरापेटीत टाकणे, त्याची विल्हेवाट निट लावली जाते का हे पहाणे, साधे सोपे नियम न मोडणे आणि करचुकवेगिरी न करणे इतक्या साध्या गोष्टी केल्या तरी पुरे.

तुमचा पहिला मुद्दाच परत वाचलात तर लक्षात येईल की या मोहिमेचा उद्देश फक्त क्षमता दाखवण्याचा नसून त्यातून आर्थिक नफा कमावण्याचासुद्धा आहे. आज आपण ज्या सगळ्या टेक्नॉलॉजीज वापरतो त्या सगळ्या अशा स्पेसरेस आणि टेक्नॉलॉजी रेसेस मधूनच जन्माला आल्यात. जेव्हा आपले उपग्रह पृथ्वीच्या कक्षांमधे स्थापित करण्यात येत होते तेव्हाही आपल्याकडे गरीब होतेच पण म्हणून तेव्हा ह्या गोष्टी थांबवल्या असत्या तर आपली इतर पिछाडीवर राहिलेल्या देशांप्रमाणेच आपली अवस्था असती (कदाचित असल्या गप्पा मारायला स्वस्त इंटरनेट, फोनही उपलब्ध झाले नसते)

हे असले जळकू लेख अमेरीकन, युरोपिअन पत्रकारांनी लिहीले तेव्हा गंमत वाटली होती. पण आपलेच लोक जेव्हा असे लिहीतात तेव्हा मात्र वाईट वाटते.

मंगळावर ऑक्सिजन जरी सापडला तर त्याचा फायदा काय ?

याऐवजी मंगळावर सोने सापडले तर? असा विचार करा.

खुप खुप वर्षांपूर्वी या देशाला आधुनिक शस्त्रांची गरज काय असा एका महान नेत्याने विचार केला. हा विचार किती "बरोबर" होता हे आपल्या हुशार शेजार्‍याने लागलीच दाखवून दिले होते.

याऐवजी मंगळावर सोने सापडले तर? असा विचार करा.
मध्यंतरी देशात आहे ते सोने विका असा सल्ला कोणी दिला होता ?

यसवायजी's picture

5 Nov 2013 - 10:10 pm | यसवायजी

जरी समजा सोने मिळाले तर त्यावर हक्क कुणाचा असेल? इंधनासाठी आधीच कुरघोड्या चालल्यात.. आणी इंधन मिळाले तरी ते तिथले इंधन आपण इथे वापरणार कसे?
भारताने शोधले म्हणुन इतर देश (उदा- अम्रिका, रश्या) गप्प बसतील?

चित्रगुप्त's picture

5 Nov 2013 - 6:23 pm | चित्रगुप्त

असे प्रकल्प जाहीर हेतूंखेरीज खेरीज प्रामुख्याने महत्वाच्या लष्करी आणि देशाच्या सुरक्षा-संबंधी संशोधनासाठी राबवले जात असतात, हे नमूद करू इच्छितो.
दक्षिण ध्रुव, उत्तर ध्रुव इ. च्या संशोधन मोहिमांमधेही हा महत्वाचा भाग असतो.
असे प्रकल्प राबवणारे लोक उच्च दर्जाचे संशोधक, विचारवंत असतात. दूधखुळे नव्हेत.
युद्ध आणि त्यासंबंधित संशोधन, यातून 'सामान्य नागरिकांच्या' दैनिक जीवनास अतिशय उपयोगी असे तंत्रज्ञान निर्माण केले गेले असल्याचा इतिहास आहे.
कदाचित ओकांसारखे सैन्यात दीर्घकाळ काम केलेल मिपाकर, आणि विज्ञानाशी संबंधित क्षेत्रातील मिपाकर यावर प्रकाश टाकू शकतील.

असे प्रकल्प जाहीर हेतूंखेरीज खेरीज प्रामुख्याने महत्वाच्या लष्करी आणि देशाच्या सुरक्षा-संबंधी संशोधनासाठी राबवले जात असतात, हे नमूद करू इच्छितो.
दक्षिण ध्रुव, उत्तर ध्रुव इ. च्या संशोधन मोहिमांमधेही हा महत्वाचा भाग असतो.
असे प्रकल्प राबवणारे लोक उच्च दर्जाचे संशोधक, विचारवंत असतात. दूधखुळे नव्हेत.
युद्ध आणि त्यासंबंधित संशोधन, यातून 'सामान्य नागरिकांच्या' दैनिक जीवनास अतिशय उपयोगी असे तंत्रज्ञान निर्माण केले गेले असल्याचा इतिहास आहे.
माझ्या माहिती नुसार लष्करी उपग्रह पूर्णपणे वेगळे आणि वेगळ्या क्षमतेचे असतात... कुठल्याही डिफेन्स रिलेटेड प्रकप्ला बद्धल ही मोहिम नक्कीच नाही.तसेच हा रकल्प राबवणारे लोक उच्च दर्जाचे संशोधक, विचारवंत असतात. दूधखुळे नव्हेत हे ठावुक असल्यानेच असे प्रश्न प्रकर्षाने विचारावेसे वाटतात.

चित्रगुप्त's picture

5 Nov 2013 - 8:30 pm | चित्रगुप्त

ही माहिती अति गोपनीय असल्याने तुम्हा-आम्हापर्यंत कधीच पहुचत नाही. अश्या काही महत्वाच्या प्रकल्पाशी संबंधित काही उच्च अधिकारी, संशोधक परिचयात होते, पण ते या बद्दल अवाक्षरही बोलत नाहीत, असा अनुभव आहे. अमेरिकन एम्बसीत अनेक वर्षे काम केल्याने याबद्दल थोडासा अंदाज आहे, एवढेच. म्हणजे परदेशी वकिलाती, मोठ्या संशोधन मोहिमा या हिमनगाप्रमाणे असतात. त्यांच्या कामापैकी फार थोडा भाग जाहीर असून मुख्य भाग गोपनीय असतो.
आपल्याला उघडपणे दिसते, त्यापेक्षा जग फार वेगळे, गुंतागुंतीचे, गोपनीय, अकल्पनीय, अद्भुत, खतरनाक आणि अज्ञात असते राव. हे सर्वच बाबतीत खरे आहे.

रस्ते वा अन्य सुविधांसाठी मंजूर होऊन खर्च होणार्‍या रकमेचा मोठा हिस्सा विविध लोकांच्या घशात जात असल्याने आपल्या इकडे त्या समस्या वर्षानुवर्षे तश्याच रहातात, त्या तशाच राहू देण्यातूनच दर वर्षी नवी कंत्राटे दिली जाऊ शकतात, हे सर्वविदित आहेच.

माहिती अधिकाराचा उपयोग करून याविषयी माहिती मिळवण्याचा प्रयत्न करावा, असे सुचवतो.

शिद's picture

6 Nov 2013 - 1:31 am | शिद

आपल्याला उघडपणे दिसते, त्यापेक्षा जग फार वेगळे, गुंतागुंतीचे, गोपनीय, अकल्पनीय, अद्भुत, खतरनाक आणि अज्ञात असते राव. हे सर्वच बाबतीत खरे आहे

जेपी's picture

5 Nov 2013 - 6:26 pm | जेपी

जिथ सधन व्यक्ति हि दारिद्ररेषेखालील योजनेत नाव लागव म्हणुन धडपडतो तिथ गरीबी सारखा प्रश्न कधि सुटण्याचा सुतराम शक्यता वाटत नाहि . त्यामुळे सर्वच आघाडीवर योग्य ते पाऊल उचलेच पाहिजे

अन्न सुरक्षा बीलामधली खर्चाची तरतूद जवळपास $२१ बिलीयन एवढी आहे.
करा भागाकार !

चौकटराजा's picture

5 Nov 2013 - 6:45 pm | चौकटराजा

जगातले बरेचसे लोक पीडित वा गरीब राहातात कारण
दुसर्यास गरीब ठेवणे ही एक मूलभूत मानवी विकृती आहे.( प्रेरणा म्हणा हवं तर ! )
बरेच जण आळशी, कल्पना शून्य असतात . म्हणून वरील मूलभूत प्रेरणेला खत पाणी मिळते.
या कारणे सामान्य लोकांचे हाल व श्रीमंत लोकांची चंगळ यात सनातन झगडा होतो. विशेष म्हणजे हा झगडा आहे असे
अति गरीब व अति श्रीमंताना वाटतच नसते. आता सुद्धा पहा या मंगळ अभियानाला मुकेश्॑ अंबानीचा विरोध असणार नाही ना मोलकरणीचा. वरचा लेख लिहिलेले हे मध्यम वर्गीय आहेत यात सर्व आले.

शैलेन्द्र's picture

6 Nov 2013 - 1:10 pm | शैलेन्द्र

ऑन डॉट..

+१११११११११११११११

मदनबाण's picture

5 Nov 2013 - 6:56 pm | मदनबाण

आता सुद्धा पहा या मंगळ अभियानाला मुकेश्॑ अंबानीचा विरोध असणार नाही ना मोलकरणीचा.
स्वतःचे पोट भरलेले असले की कुठलाही इतर विचार सहज करता येतो... बरं इथे तुम्ही मुकेश अंबानीच्या विरोध करण्या बद्धल म्हणताय... जरा त्यांच्या बायकोच्या हल्लीच झालेल्या वाढदिवसात झालेला खर्चाचा आकडा शोधुन पहा बरं !

तुला काय करायचय त्या खर्चाशी? तू तुझ्या बायकोच्या वादीला १००० रुपये खर्च केलास तर बापरे किती हा खर्च म्हणणारे किती गरीब आणून दाखवू? मग तुझी बायको किंवा मी आणि माझ्यासारख्या लाखोजणी फक्त किराणामालाची बिले भागली आणि वर्षाला दोन कपडे मिळाले की खूष राहणार्‍या आहोत का? कालच झालेल्या दिवाळी पाडव्याला नवर्‍यांनी (आपापल्या, प्रत्येकी एक) बायकांना ओवाळणीत काय दिलय ते बघितलस तरी उत्तर मिळेल. (नाही, असा धागा मी काढणार नाही, खरी उत्तरे मिळण्याची अपेक्षा नाही, मीही तसे देणार नाही). (बाणा, आता माझा धागा आला की तू चार प्रतिसाद दे म्हणजे सहज १०० प्रतिसाद होतील).

तुला काय करायचय त्या खर्चाशी?
हेच म्हणतो मी काय उपयोग मंगळावर यान पाठवुन ? ;) बायडीला पाडव्याला खुष ठेवले तर दोन वेळ मला धड जेवायला मिळेल याची निदान खात्री तरी देता येईल ! ;) मंगळयान देइल का ती खात्री ? ;)
बाकी तू धागा काढच !

चौकटराजा's picture

6 Nov 2013 - 5:24 am | चौकटराजा

मला तरूण असताना गरीबांबद्द्ल कळवळा असे व श्रीमंताबद्द्ल चीड . आता असे वाटते की गरीबी वा श्रीमंती या काहीशा नशीबाने काहीशा वर सांगितलेल्या मूलभूत प्रेरणेने व काहीशा उद्योगी वा आळशी स्वभावाने येतात.
मंगळावर यान नेऊन एकच गोष्ट साध्य होईल. " आम्ही मंगळाला तुडविला आता पत्रिकेतील मंगळाला फेकून द्या बाजूला " अशी वैचारिक क्रांति होईल .( कदाचित) .

llपुण्याचे पेशवेll's picture

6 Nov 2013 - 12:37 pm | llपुण्याचे पेशवेll

आपल्याला चंद्र तुडवता आला म्हणून अशी काही वैचारिक क्रांती वगैरे आलेली पाहीलेली नाही. :-)

मंदार कात्रे's picture

5 Nov 2013 - 7:05 pm | मंदार कात्रे

सगळे जग मूर्खाप्रमाणे सोन्याच्या मागे धावत आहे .पुराणकाळापासून सोन्याला चिकटलेल्या सगळ्या कविकल्पना बाजूला केल्या तर सोने केवळ एक चकाकणारा धातू आहे. पण या सोन्याच्या भ्रामक मोहापायी आपण भारतीय अब्जावधी डॉलर्स परकीय देशाना दान करत आहोत....!

दुसरे म्हणजे मन्गळावर सोने-चान्दी इत्यादी शोधण्यासाठी जायचे नसून भविश्यकाळात इन्धनाचे स्रोत ठरू शकणार्या अनेक वायू व मूलद्रव्यान्ची अतिशय महत्त्वाची माहिती मिळवणे हे एक महत्त्वाचे उद्दिशठ आहे .

इतरही अनेक उद्देश आहेत या मोहिमेपाठी . यास्तव भारताच्या सध्याच्या परिस्थितीत खर्चिक मन्गळ मोहीम राबवावी का? असा प्रश्न गैरलागू व अप्रस्तुत वाटतो.

मन्गळावर सोने-चान्दी इत्यादी शोधण्यासाठी जायचे नसून भविश्यकाळात इन्धनाचे स्रोत ठरू शकणार्या अनेक वायू व मूलद्रव्यान्ची अतिशय महत्त्वाची माहिती मिळवणे हे एक महत्त्वाचे उद्दिशठ आहे .
माहिती मिळवुन काय फायदा ? तिथले इंधन आणता येईल इकडे ? पाठवलेले यान जरी त्याच्या कक्षेत व्यवस्थित पोहचले तरी फार मोट्ठी गोष्ट ठरेल. प्रश्न खर्चा पेक्षा या मोहिमेतुन कोणता फायदा देश हितास, तसेच सामान्य माणसाठी हितकारक ठरणार आहे याचा आहे.ज्या ग्रहावर तुम्ही राहता तिथले पाणी कसे टिकुन राहिल यावर अधिक वेळ संशोधन आणि पैसा खर्च करणे जास्त उपयोगी की मंगळावर पाणी आहे की नाही यावर शोध घेणे फायदेशीर ?

खटपट्या's picture

7 Nov 2013 - 2:12 am | खटपट्या

माहिती मिळवुन काय फायदा ? तिथले इंधन आणता येईल इकडे ? पाठवलेले यान जरी त्याच्या कक्षेत व्यवस्थित पोहचले तरी फार मोट्ठी गोष्ट ठरेल.

थोडे थांबा. तूप खाल्यावर लगेच रूप कसे येईल. यान पोहचू तर दे.

बाकी "सोने मिळाल्यास त्यावर हक्क कोणाचा?" - हे म्हणजे बाजारात तुरी नि भट भटनीला मारि.

जेपी's picture

5 Nov 2013 - 7:16 pm | जेपी

रौप्य महोत्सवी माझा प्रतिसाद .

मदनबाणाच्या मूळ प्रश्नात तथ्य आहे. किंबहुना आमच्यात या विषयावर रंगलेली चर्चा इथे सर्वांसमोर यावी आणि सर्वांचा सहभाग व्हावा म्हणून या प्रश्नांतून चर्चा व्हावी असा उद्देश आहे.

मुळात एकूण संशोधनाचे बजेट रुद्ध अन्य विकासकामांचे बजेट हा प्रश्न नाही. शिवाय कोणत्याच प्रकारचे महागडे संशोधन नको असेही नाही.

आपण फक्त मंगळ मोहीम या विशिष्ट प्रकल्पाकडे पाहिलं तर त्यातून येत्या काळात काय फायदे होतील? तिथे सोनंच काय प्लॅटिनम जरी मिळालं तरी त्याची इथली किंमत k किती ?
अशा स्पेसिफिक माहितीसह समर्थन वा विरोध झाला तर सर्वानाच काहीतरी जाणायला मिळेल.

मंदार कात्रे's picture

5 Nov 2013 - 7:24 pm | मंदार कात्रे

आखाती देशामध्ये क्रूड ऑईल चे मोठे साठे असल्याचा शोध ब्रिटिशाना १९४० च्या दरम्याने लागल्यावर त्यानी अरब देशान्शी आपल्या फायद्याचे करार करून प्रचण्ड फायदा उठवला हे विसरू नका.

आज जरी मन्गळावरून इन्धन्स्रोत आणण्याचे मार्ग उपलब्ध नसले तरी भविश्यात ते नक्की उपलब्ध होवू शकतात .

असं कुठे मदनबाण म्हणतोय? "मंगळावर यान पाठवण्यासारखे प्रकल्प ईतर क्षेत्रातले तंत्रज्ञान विकसित करायला मदत करतो जेणे करून ईतर क्षेत्रातहि सुधारणा होऊ शकते. हे ईंग्लंड/अमेरीकेत होतं. आपल्याकडे होतंय का?" हा मुद्दा आहे.

दुर्दैवाने आपल्याला सेल फोन आले, ई-बिल पेमेंट करता आलं, माहिम-वरळी सी-लिंक बांधली, IPL मधे करोडोंची उलाढाल व्ह्यायला लागली की वाटतं we did it! निष्काळजी ग्राहकसेवा, पुण्यातल्या बलवंतपूरम सारख्या टोलेजंग ईमारतींपर्यंत पोचायचा भिकार रस्ता, पाण्याची/विजेची बोंब हे आपण चालवून घेतो.

वीस वर्ष झाली आपण उपग्रह सोडून. मालाड, ठाणे, चर्चगेट ईथलं हवामान अचूक सांगता येतं? "पश्चिम मुंबईत थोड्याफार सरी येतील" हिच भाषा असते.

बॅटमॅन/ केदार-मिसळपाव - या मोहीमेने तुमच्या आमच्या आयुष्यात फरक पडेल असं काय काय ठोस हाती लागेल असं तुम्हाला वाटतं ते सांगाल का?

विटेकर's picture

6 Nov 2013 - 9:55 am | विटेकर

पुण्यातल्या बलवंतपूरम सारख्या टोलेजंग ईमारतींपर्यंत पोचायचा भिकार रस्ता, पाण्याची/विजेची बोंब

सहमत .. मी बलवण्त्पुरम मध्येच राहतो ..बिल्डर लै चालू आहे .. गंडवल आम्हाला .! त्याच्यवर केस करता येईल का हो ?

lakhu risbud's picture

6 Nov 2013 - 10:37 am | lakhu risbud

विटेकर काका,भाकरी पाण्यासारखाच रस्त्याचा पण प्रश्न सुटेल,आस्ते'कदम'हि कामे होणारच आहेत फ़क्त मनपा च्या निवडणुकीपर्यंत धीर धरा.

विटेकर's picture

6 Nov 2013 - 11:07 am | विटेकर

कदमांचे कदम फारच अस्ते अस्ते आहेत !!! असो व्य. नि केला आहे.

पैसा's picture

5 Nov 2013 - 7:59 pm | पैसा

रेवतीशी बहुतांशाने सहमत आहे. ही मंगळ मोहीम जरी डिफेन्सशी थेट संबंधित नसली तरी दूर पल्ल्यावर अचून क्षेपणास्त्रे पाठवायच्या योजनेत आणि इम्धनाच्या कार्यक्षम वापरासाठी नक्कीच उपयोग होऊ शकेल. सगळे आक्षेप खरे असले तरी एका देशाच्या बजेटमधे ७० मिलियन्स ही अगदी लहान रक्कम ठरेल. त्याचा उपयोग "फील गुड" फ्याक्टर म्हणूनही होतो. तसे तर अण्वस्त्रे कार्यक्रम चालू आहेच. पण त्यातली कितीशी अण्वस्त्रे प्रत्यक्ष वापरली जाणार आहेत? महासत्ता वगैरे सगळे बाजूला ठेवा. मग सर्व सरकारे कला-साहित्य क्षेत्रातल्या मान्यवरांना पुरस्कार देतात. शौर्य पुरस्कार दिले जातात. त्यांचा थेट उत्पादक असा कोणता उपयोग दाखवता येईल? कला साहित्य संस्कृती हे सगळे जसे आवश्यक आहे तसे संशोधन सुद्धा आवश्यक आहे. जुन्या काळात संशोधक लोक स्वत;चे पैसे वापरून संशोधन करत असत. कधी राजेलोक त्यांना पैसे देत. आता सरकार पैसे पुरवते. यात काही चूक आहे असे वाटत नाही. या संशोधनचा उपयोग भविष्यकाळात सर्व जगाला होऊ शकतो. एक पाऊल उचलल्याशिवाय पुढे खड्डा आहे की रस्ता आहे हे कसं कळेल?

पैसातैशी सहमत ! ( व्हावच लागतं , त्या संपादक मंड्ळात आहेत ! )

राष्ट्राचा आत्मसन्मान

नावाची एक गोष्ट असते आणि त्यासाठी या बाबी अत्यंत आवश्यक आहेत ..
मदन्बाण म्हणतात , त्या हिशेबाने विचार करु गेल्यास , संरक्षणाचा खर्च देखील वायफळ च आहे. काय फरक पडतो चीन च्या अंकीत आपण असलो म्हणून ? निदान लोकांना पोत्भर खायला तरी मिळेल, चांगले रस्ते देखील मिळतील..???? पण आपण असा विचार करत नाही कारण भौतिक सुविधांच्यापल्याड अस्मिता म्हनून एक प्रकार असतो ( आठवा मोस्ले चा त्रिकोण ) , तो जसा व्यक्तिला आहे तसा राष्ट्रालाही आहेच आहे!
तस्मात.. या सार्या शंका गैरलागू आणि औचित्यभंग करणार्या आहेत.
धागा इनोदी असल्याने तूर्तास एवढेच पुरे!

मदनबाण's picture

6 Nov 2013 - 10:12 am | मदनबाण

राष्ट्राचा आत्मसन्मान
नावाची एक गोष्ट असते आणि त्यासाठी या बाबी अत्यंत आवश्यक आहेत ..
राष्ट्राचा आत्मस्न्मान फक्त मंगळावर यान पाठवुनच मिळतो ? मिल्खा सिंग ने सुद्धा राष्ट्रस्न्मान वाढवण्यात मदतच केली ना ? त्यांच्यावर आधारीत चित्रपटाने तरुणांना प्रेरणा दिलीच ना ?

संरक्षणाचा खर्च देखील वायफळ च आहे. काय फरक पडतो चीन च्या अंकीत आपण असलो म्हणून ?
संरक्षण खर्च इतर देश सुद्धा करतात,ते टेक्नॉलॉजिचा विकास आणि "वापर" देखील करतात... आज नेवाडामधे बसुन पाकिस्ताना ड्रोन करणारा अमेरिका या टेक्नॉलॉजिमधे अव्वल झाला आहे,पण आपले काय ? सिमेवर मुंडके धडावेगळे झालेला जवान आपलाच आहे ! त्याच्या आयुष्याची काहीच किंमत नाही ? त्याचे आयुष्य वाचवुन आतंकवाद्यांना ठार करणारी टेक्नॉलॉजी आपण कधी वापरणार ?
रोज इथल्या स्त्रीया आणि मुलींवर बलात्कार होत असताना आपण नक्की कुठली अस्मिता गोंजारत आहोत ?

खटासि खट's picture

5 Nov 2013 - 8:48 pm | खटासि खट

मंगळावर गेलेल्या यानामुळे गरिबी वाढणार आहे. हा मंगळ अधिकच वक्री होउन चक्री वादळे येण्याची शक्यता दिसते. विज्ञानाच्या प्रगतीचं असं हिडीस प्रदर्शन केल्याने स्वयंघोषित विज्ञानिष्ठ कल्टची बेमुर्वतखोर मंडळी बेताल होतील असं दिसत आहे. याच मंडळींनी देशातलं वातावरण बिघडवलेलं आहे. आमच्या काळी या मंडळींना तोंडातून ब्र काढण्याची सोय नव्हती. काय दिवस होते ते. हिंदू मुसलमान दंगली, खलिस्तानचे अतिरेकी, सुवर्णमंदिरातली कारवाई, जन अरुणकुमार वैद्य यांची जीवनचक्रातून पुण्यनगरीत मुक्ती, रामजन्मभूमी आंदोलन, बाबरी सपाटीकरण, मुंबई -गुजरातेतले युद्धसराव, मुंबईतली आतिषबाजी, राष्ट्रीय संत दाउद कासकर, टायगर मेनन यांचा विदेशदौरा, गोध्रा गुजरात चळवळ, गरजूंना कोळसा वाटप मोहीम, तू २(जी) खा मी ३(जी) खातो हे सामाजिक समरसता अभियान, बोफोर्स सांस्क्रुतिक निधी उभारणी, लोहपुरुषाचा मंगळाला टेकणारा लोखंडी पुतळा....

या रम्य वातावरणात गरिबीची चिंताच राहत नव्हती. म्हणूनच या राष्ट्रविघातक अमंगलमोहीमेचा तीव्र शब्दात निषेध
- टणाटण मसालेभात

गुलाम's picture

6 Nov 2013 - 12:48 pm | गुलाम

विज्ञानाच्या प्रगतीचं असं हिडीस प्रदर्शन केल्याने स्वयंघोषित विज्ञानिष्ठ कल्टची बेमुर्वतखोर मंडळी बेताल होतील असं दिसत आहे.

हा हा हा!!! मस्त प्रतिसाद. वाचून टारझन नावाच्या अफलातून आयडीची आठवण झाली..

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

5 Nov 2013 - 8:54 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मंगळावरील यानाचा खर्च आणि आजच्या काही समस्या सोडविण्यासाठी त्या निधिचा खर्च केला असता तर अशी काही तुलना तितकीशी पटत नाही. विचार येतो खरा. पण, शोधांचा हेतु सफल होतो तेव्हा त्याचे महत्त्व लक्षात येते. आज ते फार महत्वाचे नसेल वाटत पण संशोधकांना त्यात भविष्याच्या वाटा निश्चित दिसत असतीलच. यान अपयशी ठरले असते तर गेले आपले पैसे वगैरे असे म्हणता आले असते. आज तरी संशोधकांचे अभिनंदनच केले पाहिजे.

''बालाजी चरणी प्रतिकृती

भारताच्या मंगळमोहिमेला आशीर्वाद मिळविण्यासाठी इस्रोचे प्रमुख के. राधाकृष्णन यांनी सोमवारी तिरुपती बालाजीची पूजा केली. त्यांच्यासोबत त्यांची पत्नी पदमिनी होती. इस्रोच्या प्रत्येक उड्डाणापूर्वी यानाची प्रतीकृती घेऊन राधकृष्णन हे तिरुपती मंदिरात पूजेसाठी येत असतात. यावेळीही त्यांनी मंगलयानाची प्रतिकृती आणली होती. ती बालाजीपुढे ठेवण्यात आली." (सौजन्य मटा)

आपण कुठून कुठे चाललो ते मात्र मला समजत नाहीहे.

-दिलीप बिरुटे

प्यारे१'s picture

5 Nov 2013 - 9:10 pm | प्यारे१

जीवनविषयक अत्यंत मूलभूत प्रश्नांकडं नि समाजामध्ये असणार्‍या आत्यंतिक विरोधाभासावर तीव्र प्रकाशझोत टाकणारा हा धागा आहे असं मला वाटतंय.

बर्‍याचदाच अवकाशात काय चाललंयचं औत्सुक्य असणारांना पायाखाली काय जळतंय ते दिसत नाही. जळत नसलं तरी ते सुरळीत नाही हे ठाऊक देखील असतं मात्र कदाचित हेतुपुरस्सर दुर्लक्ष होत असतं.

परवाच मला असाच प्रश्न पडलेला की एवढे 'हाऊसिंग प्रोजेक्ट्स' करुन करायचंय काय? राहणारे कमी नि इन्व्हेस्ट्मेण्ट म्हणून घेणारे जास्त. बंगलेच्या बंगले रिकामे नि फूटपाथ्स तुडुंब भरलेली.

मात्र ह्या सगळ्यात जो खरंच कष्ट करुन दिवस काढतो त्याला काही कमी पडत नाही, त्याचा आलेख उंचावता दिसतो, त्याची धडपड कुठंतरी कामी येते असं दिसावं असं वाटत राहतं नि मी गप्प बसतो.

उगाच चुळबूळ करुन आपल्याकडून चळवळ उभी राहणार नाही हे ठाऊक असल्यानं, स्वतः पोह्याची डिश हातात घेऊन मेळ घाटचे कुपो षित बालकांचे फोटो न बघता त्यांना माझ्या स्वतःच्या हातून काही करता येणं शक्य आहे का हे पाहणं जास्त श्रेयस्कर.

हुप्प्या's picture

5 Nov 2013 - 9:28 pm | हुप्प्या

मंगळावर यान पोचवण्याचा थेट काही फायदा नसला तरी विज्ञानाच्या क्षेत्रात काहीतरी भरीव करू शकणारा इच्छिणारा देश अशी भारताची प्रतिमा निर्माण व्हायला ह्या मोहिमेचा हातभार लागेल. हे यान मंगळावर यशस्वीरित्या पोचले तर आणखीच चांगले.
अशाने कदाचित हायटेक उद्योजक भारताकडून आपले काम करुन घ्यायला जास्त उत्सुक असतील अशी एक आशा.
बाकी भ्रष्टाचाराने, बलात्काराने बरबटलेला असला तरी निदान ह्या देशात विज्ञान, तंत्रज्ञान जाणणारे हुषार लोक आहेत अशी एक पावती परकीयांना मिळेल.
याउलट सौदी अरेबिया, कुवेत ह्यासारखे अतीश्रीमंत देश बघा. इतका पैसा असून अशी कुठली मोहीम काढताना दिसत नाहीत.
ही मोहीम फत्ते झाली तर काँग्रेसलाही निवडणुकीत प्रचाराकरता एक मुद्दा मिळेल.
अर्थात हे फायदे असले तरी इतका खर्चिक प्रकल्प भारताने करावा का हा मुद्दा वादातीत नाही हे मान्य.

केदार-मिसळपाव's picture

5 Nov 2013 - 9:33 pm | केदार-मिसळपाव

मी "हिंदुस्थानचे मंगळ अभियान आणि सामान्य नागरिकांचे जीवन" ह्या विषयावर प्रतिक्रिया दिली होती.
हे दोन्हिही पुर्णपणे वेगळे विषय आहेत. "हिंदुस्थानचे मंगळ अभियान" हा भारताच्या (मानवाच्या) भविष्यकाळाशी निगडीत आहे तर "सामान्य नागरिकाचे जीवन" हा वर्तमानकाळाशी निगडित आहे.
पहिला विषय हा एक निरंतर चालु ठेवावे लागणारे संशोधन असुन त्यात बर्याच गोष्टी अन्तर्भुत आहेत.
आपले शात्रज्ञ सध्या बर्याच गोष्टींवर लक्ष देउन आहेत. ऊदाहरणादाखल जसेकी वातावरणात (अंतराळात) वेगाने जाणारे आणि जाउन पुर्वस्थानी परत येऊ शकणारे यान. दुसरे म्हणजे प्रुथ्वीच्या कक्षेबाहेरच्या वातावरणात टिकुन रहाण्यासाठी आवश्यक गोष्टी. तिसरे म्हणजे प्रुथ्वी बाहेरील इतर ग्रहांचा अभ्यास (तिथले वातावरण, मानवाच्या वस्तीसाठी अनुकूल गोष्टी ईत्यादी..) जगातले सर्व देश/लोक ही क्षमता प्राप्त करण्यासाठी प्रयत्नशील आहेत आणि त्यात आपणही आहोत. ह्या संशोधनाचे इतर दुरगामी फायदे आहेत. (जसे कि अंतराळ स्थानकाची उभारणी, प्रुथ्वीच्या कक्षेतील उपग्रहांचे व्यवस्थापन्,इतर देशांच्या उपग्रहांची टेहाळनी..). तुम्ही विचार करुन पाहा, आज आपले मानवी जीवन मानवनिर्मीत उपग्रहांमुळे किती सुसह्य बनले आहे. पुढे जाऊन हेच अंतराळ तंत्रज्ञान महत्वाचे ठरणार आहे. हे तंत्रज्ञान टप्या टप्याने विकसीत करावे लागते आणि ही मंगळमोहिम (त्यासाठी लागणार्या यानाचे प्रक्षेपण जे जवळ जवळ ३०० दिवस प्रवास करेल. पुढे कदाचीत ह्याच पठडीतले पण परत येणारे यान विकसीत करतांना ह्या माहितीचा खुप उपयोग होइल , अंतराळात संदेश आदन्-प्रदान, अंतराळातिल नॅव्हीगेशन विषयी ज्ञान) त्यातलाच एक भाग आहे. आणि लक्षात घ्या कि अशा प्रकारच्या संशोधनासाठी लागणारा निधी हा सध्या जरी चर्चेचा विषय असला तरी भविष्यात तो अतिशय नगण्य असेल कारण तसा पैसा कदाचित उभा करता येइल पण त्यासाठीचा वेळ मात्र मिळवता येणार नाही.

राहिला प्रश्ण "सामान्य नागरिकांचे जीवन " तर ह्या सगळ्या आपल्या वर्तमान समस्या आहेत. त्यासाठी सोडवण्यासाठी आपणच "लोकप्रतिनीधी" दर पाच वर्षांनी निवडुन देत असतो. बाकिच्या प्रगत देशांनी बहुतांशी प्रमाणात अश्या समस्या सोडवण्यात बर्यापैकी यश मिळवले आहे. आपण जोपर्यंत सार्वजनिक शिष्त, जवाबदार लोकव्यवस्थापन आणि नियोजन आपल्या देशात प्रस्थापित करत नाहीत तोपर्यंत गरिबी, उपासमार, वाहातुकिचे प्रश्न हे रहाणारच.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

6 Nov 2013 - 8:23 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

मंगळावर यान पाठवायचा आणि आज देशासमोर असणार्‍या समस्यांचा एकमेकांशी काडीइतका संबध नाहीये. ह्या मंगळ मोहीमेचे बाकी फायदे खर्चाचा मुद्दा बाजुला ठेवुन विचारात घ्यायला हवेत.

१. यानाचं क्रायोजेनिक ईंजिन आज एफिशियन्सि मधे जगात एक नंबर वर आहे. बाहेरील महासत्तांकडुन क्रायोजेनिक तंत्रज्ञानासाठी नकार मिळाल्यावर आपण अजुन जास्त चांगलं ईंजिन बनवु शकलो ही गोष्ट चांगली नाही का?
२. एवढ्या लांब अंतरावर जायला जर का यश मिळत असेल तर आपल्या आय.सी.बी.एम. (ईंटरकाँटीनेंटल बॅलेस्टीक मिसाईल्स) च्या टप्प्यात सगळं जगं आलय. ह्याचा अर्थ आपली कुरापत काढायच्या आधी महासत्ता आता ४ वेळा विचार नक्कीचं करतील. (आता आपलं सरकार दुसरं गाल पुढे करणारं आहे ह्याचा दोष तंत्रज्ञानाला देउन चालणार नाही).
३. कदाचीत ह्या संशोधनातुन आपल्याला माहीत नसणार्‍या नवीन धातु-अधातु, इंधन अश्या गोष्टींचा शोधही लागु शकतो. त्यांच्या शोधानी कदाचीत आजच्या आपण वापरत असलेल्या तंत्रज्ञानात अमुलाग्र बदलही होऊ शकतील.

गरिबी हटाव किंवा चांगले इन्फ्रस्ट्रक्चर बनावं साठी नुसत्या पैशाची नाही तर राजकीय आणि सामाजिक इच्छाशक्तीची गरज जास्त आहे.
इस्रो च्या सर्व शास्त्रज्ञांचं हार्दीक अभिनंदन.

आता थोडं गमतीमधे,

१. काय माहीत २५०० वर्षांनी आपली पुढची पिढी तिकडे बसुन मिपा वाचत असेल. ;)
२. महिला वर्ग "आमच्या ह्यांनी किनै, प्लुटो वरुन ही मार्थोयस ची आंगठी आणलीये" म्हणुन आपल्या बुधावर्च्या सोसायटीमधे मिरवत असेल. ;)
३. आम्च्या ह्यांन्ना किनै फिरायची काही म्हंजे काही हौस नाही बघा. शेजार्च्या घरी बघा दर विकांताला कमीत कमी चंद्रावर तरी शॉपींगला नेऊन आणतात, असही कदाचीत ऐकायला मिळेल. :P.
४. आमच्या मिपाकरांना दुसर्‍या सुर्यमालिकेमधे नोकर्‍या मिळतील, आणि तिकडेही ते मिसळीचे आणि खादाडीचे अड्डे बनवतील. :).

_______
(आय.आर.सी.टी.सी. च्या वेबसाईट ला शिव्या घालणारा)
मन उधाण वार्‍याचे.

विटेकर's picture

6 Nov 2013 - 10:15 am | विटेकर

२५०० वर्षांनी
हे जरा जास्त होते आहे .. तुम्हाला २५ वर्षांनी म्हणायचे आहे का ?

मदनबाण's picture

6 Nov 2013 - 10:20 am | मदनबाण

हे जरा जास्त होते आहे .. तुम्हाला २५ वर्षांनी म्हणायचे आहे का ?
तुम्ही फारच विनोदी अपेक्षा ठेवता बॉ... ;)
अहो आज तंत्रज्ञान इतके विकसित होउन सुद्धा लाईव्ह डिबेट मधे सॅटेलाईट लिंक बंद होउन कॅमेरा आणि आवाज क्षणात बंद होतो. ;)
कुठल्यातरी बॉम्बस्फोटात्,रस्ते अपघातात खपला नाहीर तर हे स्वप्न पाहात नक्कीच जगण्याची कसरत कराल याची मात्र कराल याची खात्री देउ शकतो बरं का ? ;)

विटेकर's picture

6 Nov 2013 - 10:52 am | विटेकर

कुठल्यातरी बॉम्बस्फोटात्,रस्ते अपघातात खपला नाहीर तर हे स्वप्न पाहात ....
अहो खपलो तर खपलो.. पुन्हा जन्मायचे आहेच की! " मी" थोडाच खपणार आहे ?
पुनरपि जननम.. पुनरपि मरणमं.. पुनरपि जननी जठरे शयनमं..
हाय काय आणि नाय काय !
जाता जाता...
Personal Computers have no future” - Olsen(Founder of Digital

“Airplanes are interesting toys but of no military value” - Marshal Foch

“This ‘TELEPHONE’ has too many shortcomings to be considered as a means
of communication” - Western Union Internal memo

“The earth is the center of Universe” - Ptolemy, IIND century

“Everything that can be invented has been invented” - Charles H Duell US Commissioner of Patents

पुनरपि जननम.. पुनरपि मरणमं.. पुनरपि जननी जठरे शयनमं..
तसं म्हणाला तर माणसाचा सगळा उध्योग हा मटेरिअल अ‍ॅडवान्समेंट करण्यातच चालु आहे ना ? स्पिरिच्युल डेव्हलपमेंट मधे रस घेणारे हातावर मोजता येतील इतकेच !
We are not meant to solve economic questions of life by
balancing on a tottering platform; rather, we are meant to solve the
ultimate problems of life which arise due to the laws of nature.
Civilization is static unless there is spiritual movement. The soul moves
the body, and the living body moves the world. We are concerned about
the body, but we have no knowledge of the spirit that is moving that
body. Without the spirit, the body is motionless, or dead.
The human body is an excellent vehicle by which we can reach eternal life.
It is a rare and very important boat for crossing over the ocean of
nescience which is material existence. On this boat there is the service
of an expert boatman, the spiritual master. By divine grace, the boat
plies the water in a favorable wind. With all these auspicious factors,
who would not take the opportunity to cross over the ocean of
nescience? If one neglects this good chance, it should be known that he
is simply committing suicide.There is certainly a great deal of comfort in the first-class coach of a train, but if the train does not move toward its destination, what is the
benefit of an air-conditioned compartment? Contemporary civilization
is much too concerned with making the material body comfortable. No
one has information of the real destination of life, which is to go back to
Godhead. We must not just remain seated in a comfortable
compartment; we should see whether or not our vehicle is moving
toward its real destination. There is no ultimate benefit in making the
material body comfortable at the expense of forgetting the prime
necessity of life, which is to regain our lost spiritual identity. The boat of
human life is constructed in such a way that it must move toward a
spiritual destination. Unfortunately this body is anchored to mundane
consciousness by five strong chains, which are: (1) attachment to the
material body due to ignorance of spiritual facts, (2) attachment to
kinsmen due to bodily relations, (3) attachment to the land of birth and
to material possessions such as house, furniture, estates, property,
business papers, etc., (4) attachment to material science, which always
remains mysterious for want of spiritual light, and (5) attachment to
religious forms and holy rituals without knowing the Personality of
Godhead or His devotees, who make them holy.These attachments,
which anchor the boat of the human body, are explained in detail in the
Fifteenth Chapter of the Bhagavad-gétä. There they are compared to a
deeply rooted banyan tree which is ever increasing its hold on the earth.
It is very difficult to uproot such a strong banyan tree, but the Lord
recommends the following process: "The real form of this tree cannot be
perceived in this world. No one can understand where it ends, where it
begins, or where its foundation is. But with determination one must cut
down this tree with the weapon of detachment. So doing, one must seek
that place from which, having once gone, one never returns, and there
surrender to that Supreme Personality of Godhead from whom
everything has begun and in whom everything is abiding since time
immemorial." (Bg. 15.3-4)Neither the scientists nor speculative philosophers have yet arrived at
any conclusion concerning the cosmic situation. All they have done is
posit different theories about it. Some of them say that the material
world is real, others say that it is a dream, and yet others say that it is
ever existing. In this way different views are held by mundane scholars,
but the fact is that no mundane scientist or speculative philosopher has
ever discovered the beginning of the cosmos or its limitations. No one
can say when it began or how it floats in space. They theoretically
propose some laws, like the law of gravitation, but actually they cannot
put this law to practical use. For want of actual knowledge of the truth,
everyone is anxious to promote his own theory to gain certain fame, but
the actual fact is that this material world is full of miseries and that no
one can overcome them simply by promoting some theories about the
subject.The Personality of Godhead, who is fully cognizant of
everything in His creation, informs us that it is in our best interest that
we desire to get out of this miserable existence. We must detach
ourselves from everything material. To make the best use of a bad
bargain, our material existence must be one-hundred-percent
spiritualized. Iron is not fire, but it can be turned into fire by constant
association with fire. Similarly, detachment from material activities can
be effected by spiritual activities, not by material inertia. Material
inertia is the negative side of material action, but spiritual activity is not
only the negation of material action but the activation of our real life.

"Science of Self Realization" by His Divine Grace A.C.
Bhaktivedanta Swami Prabhupada

इतरत्र लिहिलेले आकडे पुन्हा देतो.

'अंतराळ संशोधन व विकास' यासाठी आपल्या बजेटच्या ०.३% रक्कम राखलेली असते. त्यातील बहुतांश रक्कम ही दळणवळणासाठीचे व हवामान खात्याशी संबंधित उपग्रह व त्यांना वाहून नेणार्‍या वाहकांवर खर्च होतो. चांद्रमोहिमा/मंगळ मोहिमा वगैरे सारख्या नव्या मोहीमांसाठी या ०.३%च्या ८%च्या आसपास पैसा खर्च होतो.

भारताला आपल्या आर्थिक बजेटच्या ०.३% च्या ८% इतका खर्च केला म्हंजे लगेच या धाग्यात केलाय तशी ओरड (बोभाटा?) करणे योग्य कसे ठरावे? (हा खर्चही अख्ख्या एका मोहिमेवर वगैरे नाहीच, त्यातही अनेक मोहिमा वाटेकरी)

शिवाय या ०.३% खर्चातून हवामन खात्याच्या उपग्रहांमुळे शेतकरी, मासेमार वगैरेंना होणारे फायदे, दळवणळणाच्या उपग्रहांमुळे जवळजवळ आपल्या प्रत्येकाला होणारे फायदे मोजले तर लोकहित आहे हे ही नाकारता येऊ नये.

बरं, तुम्ही म्हणताय त्या समस्या नाहित असे नाही पण त्या काही १०-२० वर्षात सुटणार्‍या नव्हेत (किंबहुना त्या टेन्ड्स टु झिरो होऊ शकतील पण शुन्य होतील का नाही शंकाच आहे)

तेव्हा त्या समस्या सुटेपर्यंत आपण नुसते बसून का रहायचे? शिवाय त्या समस्यांवर भारत सरकार या योजनेच्या कित्येक पट खर्च करत आहे. उदा. द्यायचं तर अन्न सुरक्षा योजनेवर बजेट मध्ये १०,००० कोटींची तरतूद आहे. शिवाय ८०,००० कोटींच्या आसपास अन्नाशी संबंधित सबसिडी आहेत. (तुलनेने मंगळ यानाचा खर्च ४५० कोटी. १२५ कोटी लोकसंख्या असलेल्या देशाला ४५० कोटी रू खर्च होतोय हे लक्षात घ्या)

सरकार इतर समस्यांच्या तुलनेत मंगळयानासारख्या मोहिमांना प्राथमिकता देत असतं तर ही ओरड समजू शकलो असतो. मात्र प्रत्यक्षात अश्या रिसर्च वेस्ड मिशन्सना अजिबातच प्राथमिकता मिळताना दिसत नाहीये, खरंतर यावर अजून अधिक खर्च व्हायला हवा असे मी म्हणेन.

डेव्हलप केलेली किंवा मिळवलेली टेक्नॉलॉजी टेस्ट करणे, ट्रायल्स घेणे, व्हॅलिडेशन याबद्दल बोला. याशिवाय टेक्नॉलॉजी व्यर्थ आहे. अशा प्रकारच्या मोहीमेत आपल्ञा सामर्थ्याचा कस लागतो या आव्हानातून आपल्या उणिवाही स्पष्ट होतात आणि त्यावर मात करण्यासाठी विचार करता येतो. सोने मिळणे वगैरे काहीही आहे.

वडापाव's picture

6 Nov 2013 - 10:38 pm | वडापाव

इस्रोची ही मंगळ मोहिम आत्तापर्यंत सर्वांत स्वस्त आहे!!
फक्त ४५० कोटी म्हणजे रु.१२/किमी, मुंबईच्या रिक्षाभाड्यापेक्षाही कमी!!

या मोहिमेत किती पैसा खर्च झाला हा महत्वाचा मुद्दा नसुन, तंत्रज्ञानाच्या ज्या स्पर्धेत आपण उतरु पाहतो आहे त्या बद्धल अधिक आहे. अमेरिका,रशिया आणि युरोप हे देखील अशाच मोहिमा आखतात परंतु ज्या टेक्नोलॉजीचा वापर ते इतर क्षेत्रात करतात तिथे सुद्धा आपण स्पर्धा का करत नाही ? जर काही महिन्यांच्या कालावधीत आपण हा लो कॉस्ट प्रोजेक्ट करु शकतो,तर जिथे अशाच आणि अधिक तात्पर्याने करायच्या गोष्टीत ही तत्परता,तंत्रज्ञान का वापरले जात नाही ? संशोधन ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे,त्याचे कसे फळ मिळेल हे काळच ठरवतो...पण सामान्य माणसाची एक माफक अपेक्षा असते की त्याचे रोजचे जीवन अधिक सोप्पे आणि जगण्यास सुयोग्य कसे होईल यावर सुद्धा तितकेच लक्ष घातले जावे.ठाण्याच्या आणि दादरच्या रेल्वे स्थानकात आत्ता फिरते जिने लावले गेले आहे. ( फक्त काहीच ठिकाणी ) ही सुद्धा आपल्याला मोठी बातमी वाटते ! का ? प्रगत देशामधे ही स्थिती किती वर्षांपूर्वी केली गेली आहे ?
मुंबकरांना नविन लोकल मिळणार अशी बातमी आपल्या वर्तमान पत्रात छापली जाते, तेव्हा आपण हे देखील लक्षात ठेवले पाहिजे की चीन मधे आत्ता बुलेट ट्रेन धावत आहे, तर जपान मधे रेल्वेची वेळ इतकी काटेकोरपणे पाळली जाते की त्यांच्या वेळा पत्रकामधे संपूर्ण वर्षभरात फक्त १६ सेकंदाचा फरक पडतो. हे देश सुद्धा आंतराळ मोहिमा आखतात्,यावर आणि अशाच इतर गोष्टींमधे संशोधन करतात... पण आधी त्यांचे बेसिक इन्र्फास्ट्रक्चर मजबुत करण्याला जास्त महत्व आणि प्रायोरिटी देण्यात आली हे आपल्याला नाकारता येणार नाही.
इस्त्रोचे या यशाचे कौतुकच आहे,परंतु मला हे देखील लक्षात ठेवायला हवे की याच इस्त्रोला टाटा स्कायवाले कोर्टात खेचणार आहेत...का तर त्यांना कबुल केलेली ट्रान्सपॉन्डर कपॅसिटी ते अजुनही देउ शकलेले नाही. आजच्या घडीला देशात डिटीएच बिजनेस मोठ्या वेगाने वाढतोय... आपल्याकडे इस्त्रोने उभे केलेले उपग्रह असताना देखील झी / भारती एअरटेल /सन डायरेक्ट /रिलायन्स /व्हिडीयोकॉन हे परदेशी सॅटॅलाईटवर मायग्रेट झाले, का ? आपण मंगळावर यान पाठवण्याची क्षमता आणि तंत्रज्ञान विकसित करतो,पण भारतीय कंपन्यांना साधी ट्रान्सपॉन्डर क्षमता वाढवुन देउ शकत नाही ? शेवटी फायदा कोणाचा ? विदेशी सॅटेलाइट मालकांचा...

मी वारंवार आपल्या देशातल्या रस्त्यांचे उदाहरण देतो,कारण उत्तम रस्ते हे खर्‍या प्रगत राष्ट्रांच्या प्रगतीचे पहिले लक्षण मानले जाते...उत्तम रस्ते-कमी ट्राफिक-कमी प्रदुषन-इंधन खपात बचत-इंधन खपत कमी झाल्याने परकियचलन खर्चात कपात-अर्थव्यवस्थेवर कमी ताण-वेळेची बचत -दळवळणाची सुलभता- दळवळणाची सुलभतेने सामान्य नागरिकांच्या आयुष्यावर होणारा परिणाम. मुंबईचे सिंगापुर,शांघाय आणि कोकणाचे कॅलिफोर्निया हे फक्त पोकळ शब्दात पण प्रत्येक्षात काय ?

जाता जाता :- कुठल्याही संशोधनाला / प्रयोगांना माझा विरोध नाही,परंतु प्रगतराष्ट्र म्हणुन जर मिरवायचे असेल तर कुठेतरी बेसिक प्रायॉरिटीला मिशन क्रिटीकल बनवायला हवे ! ३०० माळ्यांची इमारत बांधायची इसेल तर त्याचा पायाही तितकाच भक्कम असावा ही अपेक्षा अयोग्य कशी ठरेल ?

डॉ सुहास म्हात्रे's picture

6 Nov 2013 - 11:26 am | डॉ सुहास म्हात्रे

मी वारंवार आपल्या देशातल्या रस्त्यांचे उदाहरण देतो,कारण उत्तम रस्ते हे खर्‍या प्रगत राष्ट्रांच्या प्रगतीचे पहिले लक्षण मानले जाते...उत्तम रस्ते-कमी ट्राफिक-कमी प्रदुषन-इंधन खपात बचत-इंधन खपत कमी झाल्याने परकियचलन खर्चात कपात-अर्थव्यवस्थेवर कमी ताण-वेळेची बचत -दळवळणाची सुलभता- दळवळणाची सुलभतेने सामान्य नागरिकांच्या आयुष्यावर होणारा परिणाम. मुंबईचे सिंगापुर,शांघाय आणि कोकणाचे कॅलिफोर्निया हे फक्त पोकळ शब्दात पण प्रत्येक्षात काय ?

याबाबतीत दोष पूर्णतः राजकिय इछाशक्ती, शुचिता आणि गव्हर्नन्सचा आहे... तेव्हा त्याचा रोख राजकारण्यांकडे आणि त्यांना निवडून देणार्‍या मतदाराकडॅ (तुमच्या-आमच्याकडे) असायला हवा. त्याबाबतित शास्त्र अथवा शास्त्रज्ञांना दोषी धरणे योग्य वाटत नाही... कारण ते त्यांचे काम कराताहेत (निदान इस्रोच्या बाबतित तरी), राजकारण्यांना ते काय करताहेत ते विचारायला पाहिजे.

कारण ते त्यांचे काम कराताहेत (निदान इस्रोच्या बाबतित तरी),
अगदी सहमत ! निदान काही लोक तरी या देशात असे आहेत जे दिलेल काम चोखपणे करत आहेत आणि त्यांचा अभिमान आहेच !
पण... मंगळावर यान पाठवले याचा अर्थ सर्वकाही साध्य करता आले असा होत नाही,सामान्य माणसाच्या आयुष्यात अशी १०० याने पाठवल्याने काहीच फरक पडणार नाही,पण चांगले रस्ते असल्यानी नक्कीच पडेल ना ?
देशातला एक विभाग उत्तम काम करतो आणि दुसरा काहीच करत नाही तर लक्ष कुठल्या भागाकडे दिले पाहिजे ? दैनंदिन गरजा भागवणे जर कठीण होणार असेल आणि तुमच्याकडे त्याचे उत्तर नसेल तर ते मंगळावर देखील नक्कीच सापडणार नाही.

चिगो's picture

6 Nov 2013 - 2:54 pm | चिगो

पण वर हृषिकेशने म्हटल्याप्रमाणे, जर हा खर्च अंतरीक्ष अभियानांसाठी "इयरमार्क" केलेल्या पैशांतूनच होत असेल तर त्याला हरकत का? रस्ते, वीजपुरवठा, शिक्षण इ. गोष्टींसाठी सरकारने प्रत्येक पातळीवर पैशांची तरतुद केलेली असतेच. आता जी तरतुद आहे, तोच पैसा जर भ्रष्टाचार, राजकीय/ शासकीय इच्छाशक्तीचा अभाव इ. कारणांनी योग्यपणे वापरला जात नसेल तर शास्त्रज्ञ त्यांना नेमून दिलेल्या कामावर जो पैसा योग्यपणे वापरतात, त्यावर टिका का? आपण जो प्रश्न उभा केलाय, त्याप्रमाणे जर हा खर्चही रस्ते, अन्नपुरवठा इ. कडे वळता केला, तरी त्याला जर आधीच्या पैशंप्रमाणे गळतीच लागणार असेल, तर फायदा काय? उपाय हा आहे, की दिलेल्या कामांना योग्य प्रकारे, योग्य मुदतीत आणि योजलेल्या बजेटमध्ये पुर्ण करण्यासाठी प्रयत्न करावा, सिस्टम्स बनवाव्यात.. नाहीतर मग ना मंगळ अभियान, ना धड रस्ते अशी स्थिती होईल..

मंदार कात्रे's picture

6 Nov 2013 - 11:49 am | मंदार कात्रे

इस्त्रोचे या यशाचे कौतुकच आहे,परंतु मला हे देखील लक्षात ठेवायला हवे की याच इस्त्रोला टाटा स्कायवाले कोर्टात खेचणार आहेत...का तर त्यांना कबुल केलेली ट्रान्सपॉन्डर कपॅसिटी ते अजुनही देउ शकलेले नाही. आजच्या घडीला देशात डिटीएच बिजनेस मोठ्या वेगाने वाढतोय... आपल्याकडे इस्त्रोने उभे केलेले उपग्रह असताना देखील झी / भारती एअरटेल /सन डायरेक्ट /रिलायन्स /व्हिडीयोकॉन हे परदेशी सॅटॅलाईटवर मायग्रेट झाले, का ? आपण मंगळावर यान पाठवण्याची क्षमता आणि तंत्रज्ञान विकसित करतो,पण भारतीय कंपन्यांना साधी ट्रान्सपॉन्डर क्षमता वाढवुन देउ शकत नाही ? शेवटी फायदा कोणाचा ? विदेशी सॅटेलाइट मालकांचा...

इस्रो ने व्यापारी तत्त्वावर उपग्रह भाड्याने द्यायचे असतील तर क्वालिटी ऑफ सर्व्हिस उच्चतम हवीच, तरच ग्राहक आकर्श्तित होतील.

विजुभाऊ's picture

6 Nov 2013 - 1:37 pm | विजुभाऊ

आजच्या घडीला देशात डिटीएच बिजनेस मोठ्या वेगाने वाढतोय...
सर्वसामान्य जनतेच्या किती समस्या हा व्यवसाय सोडवू शकलाय. त्या डीटीएच चा वापर कशाला करायचा तर " बालाजीच्या" सीरीयल्स बघायलाच ना? नाहीतर आयपील म्याचेस बघायलाच ना?
शेती / हवामान यासाठी किती टक्के डी टी एच बिझनेस वापरला जातो हो?

मंगळाचे अंतर सूर्यापासून पृथ्वीच्या तुलनेने जरी जास्त असले तरी सुर्यप्रकाशाची तीव्रता मंगळावर जास्त असते. मंगळावर सौर उर्जा घट बसवून ती उर्जा जमा करायची आणि लेसर किरणांमध्ये ती उर्जा रुपांतरीत करून पृथ्वीवर आणायची अशी एका शास्त्रज्ञाने संकल्पना मांडली होती. या सगळ्या कल्पना आत्ता जरी अतिरंजित वाटत असल्या तरी भविष्यात तंत्र ज्ञानाने हे चमत्कार होऊ पण शकतील.नंतर बैल गेला आणि झोपा केला असा प्रकार व्हायला नको

नंतर बैल गेला आणि झोपा केला असा प्रकार व्हायला नको
हॅहॅहॅ...आधी झोपल्या बैलाला तो झोपला आहे याची जाणीव तरी करुन द्या म्हणतो ! या ग्रहावर देखील जो मुबलक सूर्यप्रकाश येतो ना तो आधी वापरा, मंगळ आहेच बाजुला त्याला देखील स्टॅडबाय म्हणुन वापरु बरं का ! ;)

lakhu risbud's picture

6 Nov 2013 - 10:41 am | lakhu risbud
मदनबाण's picture

6 Nov 2013 - 10:50 am | मदनबाण

हॅहॅहॅ !
हे देखील वाचा बरं का... Will India be next semiconductor manufacturing facilities hub?
अजुन सेमिकंडक्टर सारख्या महत्वपूर्ण गोष्टीत आपण मागे आहोत !
बरं मंगळावर यान पाठवायचं म्हणता ? त्याने आम आदमीला काय फायदा? एका पक्षाचा राजपुत्र म्हणतो एक पूर्ण रोटी खा -१०० दिवस काम करा आणि आमच्या पक्षाला मत द्या !
Rahul Gandhi to aam admi: Eat full roti, work for 100 days, vote for Congress
आम आदमीला जर रोटीवर ठेवायचय, तर मंगळयान पाठवुन त्याच्यासाठी गुलाबजाम ची सोय होणार का ?

अग्निकोल्हा's picture

6 Nov 2013 - 10:56 am | अग्निकोल्हा

अमेरिकेतील रस्त्याचे कौतुक असणारे भारताच्या अवकाश मोहिमेला विरोध करत आहेत.

ज्या समस्या पैसा न्हवे तर राजकीय इच्चाशाक्तिने रखडल्या आहेत त्याचा वापर वैद्न्यानिक सिध्दातेला खो घालायला करणे यापेक्षा दुसरे खराब राजकारण नोहे!
एज अ प्रोढ़ मिपाकर इ फेल्ट पीती फॉर डी धागाकर्ता :(

नितिन थत्ते's picture

6 Nov 2013 - 11:00 am | नितिन थत्ते

खर्च करावा.

भावी अपत्यांच्या (आणि वृद्धत्वाकडे वाटचाल करणार्‍या आईवडिलांच्या) आयुष्याची, शिक्षणाची, संभाव्य आजारपणातील खर्चाची तरतूद पूर्ण केल्याशिवाय नवदांमपत्याने सिनेमा पाहण्यास जाऊ नये असा काहीसा युक्तिवाद वाटतो.

डॉन या वृत्तपत्राच्या साईटवरील इथे रझाक नावाच्या एका पाकिस्तानी वाचकाची ही प्रतिक्रिया बोलकी आणि मार्मिक वाटली: (अनुवाद मी केला आहे. चुभुद्याघ्या)

भारताला मंगळावर मिथेन मिळते का नाही याची काहीही पडलेली नाही. त्यांच्यासाठी ही केवळ गुंतवणूक आहे. तशीच गुंतवणूक जी त्यांनी काही दशकांपूर्वी सॉफ्टवेअर आणि आयटी क्षेत्रात केली होती. शिक्षण-संशोधनात गुंतवणूक करा, टॅलेंटला वाव द्या-जोपासा, तुमचे टॅलेंट जगाला दिसेल असे ते सगळ्यांसमोर मांडा आनि एक नवी इंडस्ट्री तयार करा असे ते सुत्र आहे. भारत $४५०बिलियन उलाढाल असणार्‍या 'रॉकेट' इंडस्ट्रीवर डोळा ठेऊन आहे. जर भारत पाश्चात्यांपेक्षा १/६ किंवा १/१० किंमतीत हे करू शकत असेल तर त्यांच्याकडे ही रॉकेट लाँचिंगचे जॉब ऑटसोर्स होतील. भारतासाठी ही सहज $२० ते $४० बिलीयन ची इंडस्ट्री बनू शकेल. आतापर्यंतच PSLVने १४-१५ युरोपियन उअप्ग्रहांना भुस्थिर कक्षेत पोचवलं आहे. जर हे (मंगळयान) मिशन यशस्वी झालं तर आंतरग्रहीय उड्डाणासाठीही त्यांची मदत घेतली जाऊ लागेल. आपण पाकिस्तानी लोकांनी यापासून शिकले पाहिजे. हे कटू असले तरी सत्य आहे.

मंदार कात्रे's picture

6 Nov 2013 - 11:52 am | मंदार कात्रे

असे असेल तर फारच छान!

डॉ सुहास म्हात्रे's picture

6 Nov 2013 - 11:12 am | डॉ सुहास म्हात्रे

माझ्या माहिती नुसार लष्करी उपग्रह पूर्णपणे वेगळे आणि वेगळ्या क्षमतेचे असतात... कुठल्याही डिफेन्स रिलेटेड प्रकप्ला बद्धल ही मोहिम नक्कीच नाही.तसेच हा रकल्प राबवणारे लोक उच्च दर्जाचे संशोधक, विचारवंत असतात. दूधखुळे नव्हेत हे ठावुक असल्यानेच असे प्रश्न प्रकर्षाने विचारावेसे वाटतात.

लष्करी आणि अंतराळ मोहिमांच्या प्रकल्पांतून अनेक सार्वसाधारण माणसाच्या जिवनात उपयोगी अश्या बर्‍याच गोष्टी निर्माण झाल्या आहेत. त्यांना "स्पिन ऑफ्" असे म्हणतात.

१. नासाच्या महत्वाच्या स्पिन ऑफ्स ची ही छोटीशी यादी...

1 Health and medicine
1.1 Light-emitting diodes (LEDs) in medical therapies
1.2 Infrared ear thermometers
1.3 Ventricular assist device
1.4 Artificial limbs
1.5 Invisible braces
1.6 Scratch-resistant lenses
1.7 Space blanket

2 Transportation
2.1 Aircraft anti-icing systems
2.2 Highway safety
2.3 Improved radial tires
2.4 Chemical detection

3 Public safety
3.1 Video enhancing and analysis systems
3.2 Fire-resistant reinforcement
3.3 Firefighting equipment

4 Consumer, home, and recreation
4.1 Temper foam
4.2 Enriched baby food
4.3 Portable cordless vacuums
4.4 Freeze drying

5 Environmental and agricultural resources
5.1 Water purification
5.2 Solar Cells
5.3 Pollution remediation

6 Computer technology
6.1 Structural analysis software
6.2 Remotely controlled ovens
6.3 NASA Visualization Explorer
6.4 Space Race Blastoff

7 Industrial productivity
7.1 Powdered lubricants
7.2 Improved mine safety
7.3 Food safety

(संदर्भः http://en.wikipedia.org/wiki/NASA_spin-off) गुगलून पाहिले तर अजून बरेच काही सापडेल.

याशिवाय इतर गोष्टी म्हणजे...

२. उपग्रह संशोधनामुळेच आजची मोबाईल टेलिफोन, दूरशिक्षण, दूरबँकींग, आंतरजाल वगैरे सेवा सामान्य माणसाच्या आवाक्यात आलेल्या आहेत.

३. हा प्रकल्प (ज्याचा ७० मिलियन म्हणजे साधारण ४५० कोटी हा खर्च म्हणजे भारताच्या बजेट मध्ये फार काळजी करण्याइतकी रक्कम नसलेला आहे) ही एक जगाला भारताच्या अंतराळ मोहिम क्षमतेची प्रभावपूर्ण जाहिरात म्हणूनही बघितले पाहिजे. आतापर्यंत भारताने आपले स्वतःचे उपगह अवकाशात पाठवून परकिय चलन वाचवले इतकेच नाही तर अनेक परदेशी (कोरिया, जर्मनी, बेल्जियम, इटली, इ.) उपग्रह अवकाशात पाठवून परकिय चल मिळवलेही आहे. शिवाय हे इतर देशांच्या तुलनेने खूप कमी किमतीत करून दाखवून याबाबतित बाजरपेठेत स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. त्यामुळे ही मोहीम यशस्वी होण्याने ते कमालिचे बळकट होईल... मग ७० मिलियन खर्चाचे ७,०० किंवा अगदी ७,००० मिलियनच्या फायद्यात रुपांतर करणे अशक्य नाही. हा या मोहिमेमागचा फार मोठा "स्पिन ऑफ्" म्हणता येईल.

४. या संशोधनातील पात्रता, त्याचे लष्करी उपयोग आणि राजकिय इच्छाशक्ती यांचा संगम झाला तर भारताची सतत कुरापत काढणार्‍या देशांवर काय परिणाम होउ शकेल हे सांगायला पाहिजेच असे नाही. कालच बातमी होती की चीनने भारताबरोबर अशा मोहिमांसाठी सहकार्य करण्याच्या प्रस्तावाचे संकेत दिले आहेत. ही कदाचित् एखादी राजकीय हूलही असू शकेल. पण आतापर्यंत चीनची (आणि जपानची सुद्धा) मंगळ मोहीम अयशस्वी झालेल्या आहेत हे ही विसरता येत नाही.

४. आज संगणक क्षेत्रातल्या भारतियांच्या कामगिरीने जागतिक पातळीवर भारताला जी पत, आर्थिक फायदा आणि स्वभिमान दिला आहे त्याची बरोबरी करण्याची किंवा त्याला ओलांडून पुढे जाण्याची भारतात सद्यातरी अवकाश-शास्त्राची पात्रता आणि तयारी आहे असे मला तरी वाटते.

अजून बरेच काही आहे, पण सद्या इतकेच पुरे.

मंदार कात्रे's picture

6 Nov 2013 - 11:54 am | मंदार कात्रे

सहमत भाउ!

खटासि खट's picture

6 Nov 2013 - 1:12 pm | खटासि खट

स्पिन ऑफ वर वेगळा लेख टाकाच.

माफ करा. तुम्ही नासाचा आढावा घेतला आहे.
इस्त्रोच्या यशाचे देशांतर्गत परिणाम (स्पिन ऑफ) यावर एक लेख तुम्ही लिहू शकाल असं वाटतं.

llपुण्याचे पेशवेll's picture

6 Nov 2013 - 1:14 pm | llपुण्याचे पेशवेll

सुंदर प्रतिसाद.

विटेकर's picture

6 Nov 2013 - 11:16 am | विटेकर

धन्यवाद ऋषिकेशजी ,,
योग्य संदर्भ दिलात ..थान्कु . जे त्या पकिस्तान्याला कळले ते एत्तदेशीयांना कळेल तो सुदिन..
(बाकी रझाक ही एत्तदेशीयच म्हणायला हवा ..कालपरवापर्यन्त त्याचे आजोबा -पणजोबा भारतात होते आणि उद्या परवा त्याचे नातवंडे- परतवंडे स्वःताला भारतीय म्हणून घेण्यात अभिमान बाळगतील...!! हा आशावाद खरा ठरेल अश्याच घटना आजू-बाजूला घडत आहेत ..)

हे असेच अवांतर खर्च करून काही सॅटेलाईट्स ढगात पाठवले म्हणून मिपा चालू आहे... किमान तितके तरी उपकार लक्षात ठेवावेत.

आपल्याकडे ४५० कोटीच्या अवकाश मोहिमेवर प्रष्णचिन्ह लावले जाते आणि २५०० कोटीच्या पुतळ्याचे कौतुक केले जाते.. हे दुर्दैव.

२५०० कोटींच्या पुतळ्याचं कौतुक ? नाही हो.. त्याचा तर एकदम शुद्ध निषेध..

धागाकर्त्या मदनबाणालाही २५०० कोटीचा पुतळा मंगळ मोहिमेपेक्षा बरा वाटतो असं म्हणणं चुकीचं ठरेल.

मंगळ मोहिमेचा मुद्दा हा फक्त सध्या थेट "मंगळ" मोहिम करण्याबाबत आहे अन्य स्पेस मिशन्स किंवा प्रोजेक्ट्सबद्दल नाही हे लक्षात घेतलं जावं.

या चर्चेत केवळ मंगळावर जीवसृष्टीचा शोध किंवा पाण्याचा शोध इतक्याच मर्यादित मुद्द्यापलीकडचे असंख्य मुद्दे आणि उद्दिष्टं समोर आली.

१. वैज्ञानिक सज्जता
२. अवकाशमोहिमा, विशेषतः मंगळ-मोहिमेइतक्या प्रगत मिशनसाठी आपण तयार आहोत यामुळे अंतराळ-विज्ञान संबंधित व्यवसायात आपल्याला मिळू शकणारा भावी आर्थिक लाभ
३. या निमित्ताने अन्य संरक्षणविषयक तंत्रांमधेही आपण सज्ज असल्याचा जागतिक संदेश
४. पुढच्या अनेक शक्यतांची दारं उघडणारं पहिलं पाऊल
५. प्रत्यक्ष मोहिमेचा सामान्य माणसाला थेट फायदा नसला तरी अप्रत्यक्ष असे फायदे असू शकणं. सध्या पब्लिकली जाहीर न केलेला अजेंडा असू शकणं

वगैरे मुद्दे आणि त्याला मदनबाणने केलेला उत्तम मुद्देसूद प्रतिवाद यामुळे ही चर्चा एकदम उपयोगी आणि माहितीपूर्ण झाली आहे.

सध्यातरी वाटला त्यापेक्षा हा प्रकल्प रास्त आहे असं दिसतं आहे.

खटासि खट's picture

6 Nov 2013 - 12:50 pm | खटासि खट

@ मदनबाण भाऊ
याआधी एक प्रतिक्रिया दिली होती. पण आमच्या बोटात वेडसरपणाची झाक असल्याने ती त्या मोडमधे दिली.
तुम्ही उपस्थित केलेले प्रश्न महत्वाचे नाहीत असं काहीच नाही. पण इथं अनेकांनी म्हटल्याप्रमाणे मंगळ मोहीमेशी त्याचा संबंध जोडण्यात गल्लत होतेय. त्या प्रश्नांची उत्तरं भलतीकडेच आहेत. तुम्ही घेतलेली ऑब्जेक्शन्स ठराविक भागातच विकास का या पद्धतीची असती तर ते सुसंगत झालं असतं. इस्पीकचा एक्का यांचा प्रतिसाद मस्त आहे. स्पिन ऑफ फार महत्वाचं. हा एका स्वतंत्र धाग्याचा विषय होईल.

याहीपुढे जाऊन (एक्का यांनी दिलेल्या यादीच्या) तंत्रज्ञानाचा वैयक्तिक जीवनात वापर हा मुद्दा कायम असल्यास वैज्ञानिक दृष्टीकोण तरी किती रुजलाय हे पहावं लागेल. मोबाईल स्वस्त झाले तरी हट्टाने आम्ही मोबाईल वापरत नाहीत असं सांगणारी मंडळी होती. प्रेत जाळण्यासाठी विद्युतदाहीनीचा वापर ही एक साधी गोष्ट आहे, ती सुद्धा केली जात नाही. अजूनही मुलींना उच्च शिक्षण दिलं जात नाही. तंत्रज्ञानाचा विवेकपूर्ण वापर ही तर पुढची पायरी आहे.

ही आपली सामाजिक अवस्था आहे. समाजातूनच प्रतिनिधी, प्रशासनातले नोकर जाणार आहेत. त्यांच्यात बदल झाल्याशिवाय, अवेअरनेस आल्याशिवाय तुम्ही म्हणता ते बदल सहज कसे येतील ? दंडुका घेऊन तर प्रत्येक प्रश्न सुटत नसतो. ( प्रतिसाद खूप संक्षिप्त आहे आणि प्रश्नांची व्याप्ती मोठी, तेव्हां भाव समजून घ्यावा ही विनंती ).

आंतरजालावर विविध वृतपत्रांच्या वेबसाईट्सवर वाचक अतिशय गमतीदार प्रतिक्रीयाही देतात. त्याचे काही नमुदे देत आहे:

१.
४५०कोटी म्हणजे भारतात काहीच वाटणार नाही. आमची पुणे वॉरीअर टिमसुद्धा १२०० कोटींना विकत घेतली आहे

२.
पृथ्वी ते मंगळ अंतर धरून हिशोब केला तर साधारण रु.१२ प्रतिकिमी खर्च आला. पुण्यात तर रिक्षाही याहून महाग आहे ;)

३.
चला दिवाळीतच तेही दहा वाजायच्या आत रॉकेट उडवलं ते बरं झालं!

विकास's picture

6 Nov 2013 - 11:06 pm | विकास

पृथ्वी ते मंगळ अंतर धरून हिशोब केला तर साधारण रु.१२ प्रतिकिमी खर्च आला. पुण्यात तर रिक्षाही याहून महाग आहे

नकोच त्या रिक्षा... या पुढे मी पुण्यात आल्यावर मंगलयानच वापरणार. :)

क्लिंटन's picture

6 Nov 2013 - 11:23 pm | क्लिंटन

शतक झळकावायचा मान माझा :)

अनुप ढेरे's picture

6 Nov 2013 - 1:46 pm | अनुप ढेरे

http://history.fnal.gov/testimony.html
हा संवाद वाचनीय आहे. १९६९ साली अमेरिकेमध्ये पार्टिकल अक्सिलरेटर बनवायला शेकडो मिलियन डॉलर्स खर्चावेत का? या विषयावरचा संवाद. त्यातला उल्लेखनिय भाग म्हणजे

SENATOR PASTORE. When you consider priorities, I know exactly what you mean, provided we have the money.

After all, when you have people who are hungry, the big question here is: Is it more important to put a man on the moon, or to fill the stomachs of our starving children?

DR. WILSON. It is most important to fill the stomachs of our starving children.

SENATOR PASTORE. You would put that as the first priority, would you not?

DR. WILSON. Yes, sir.

SENATOR PASTORE. Of course.

DR. WILSON. But it is also important to get on with the things that make life worth living, and, fortunately, it is possible to do these things in a manner which also contributes to the feeding of hungry children. We have seen great developments in the science of elementary particles in this country-a golden age of physics. We should not lose the tremendous momentum that has built up in this field. We should not pass up this opportunity. We have a great American tradition. The moment to move is here. We have the men who are ready and enthusiastic to get on with it. If we falter, I can see the whole effort dispersed and lost.

आणि

It only has to do with the respect with which we regard one another, the dignity of men, our love of culture... it has to do with: Are we good painters, good sculptors, great poets? I mean all the things that we really venerate and honor in our country and are patriotic about. In that sense, this new knowledge has all to do with honor and country but it has nothing to do directly with defending our country except to help make it worth defending.[4]

बाळ सप्रे's picture

6 Nov 2013 - 1:50 pm | बाळ सप्रे

संशोधनात २ प्रकार असतात.. मूलभूत (fundamental) आणि applied (मराठी शब्द ??)
मूलभूत नक्की काय साध्य होणार याची पूर्ण कल्पना नसते.. तर दुसर्‍या प्रकरात मूलभूत संशोधनातील साध्य वापरून त्याचा व्यावहारीक उपयोग करण्याचा प्रयत्न असतो..
मंगळावरील यान हे मूलभूत संशोधनाचा भाग आहे.. त्यातून मंगळावरील वातावरणाचा खूप विदा गोळा करता येईल व त्यातील पॅटर्न ओळ्खून पुढील संशोधनाला दिशा मिळेल..

लॉरी टांगटूंगकर's picture

6 Nov 2013 - 3:45 pm | लॉरी टांगटूंगकर

मुलभुत संशोधन कधी जादु दाखवेल सांगता येत नाही.
जगभर वापरल्या जाणार्या नॅस्ट्रॅन/सारख्या टुल्सची सुरुवात अशाच मोहीमेसाठी झाली असावी.
अशा गोष्टींचे फायदे लगेच दिसत नाहीत पण आज टेक्नोलॉजी घ्यायला प्रचंड पैसा बाहेर जातो तो कधी तरी भविष्यकाळात रोखता/कंट्रोल करता येइल.

प्यारे१'s picture

6 Nov 2013 - 4:10 pm | प्यारे१

applied उपयोजित

डॉ सुहास म्हात्रे's picture

6 Nov 2013 - 5:33 pm | डॉ सुहास म्हात्रे

खरं पाहिलं तर आजच्या घडीला "TRANSLATIONAL Research" ह्या एका फार महत्वाचा दुव्याने मुलभूत व उपयोजीत या दोन प्रकारच्या संशोधनातील रेखा अस्पष्ट केलेली आहे.

केवळ "स्पिन ऑफ"च नाही तर "मूळ संशोधनाचाही नक्की उपयोग काय?" हे काम सुरू करण्या अगोदर योग्य रित्या पटविल्याशिवाय हल्ली संशोधनाला बजेट मिळत नाही.

आजच्या मटा मधील लेखातील काही भाग इथे पेष्ट करतोय

अवकाशविषयक आपल्या मोहिमासुद्धा आपल्याच देशाच्या हितासाठी आपण आखलेल्या आहेत. आज दळणवळणसाठीचे १० आणि दूरसंवेदनाची शक्ती असलेले (रिमोट सेन्सिंग) १० असे आपले २० उपग्रह पृथ्वीच्या कक्षेत फिरत आहेत. त्यामुळे होणारे फायदे आपण अनुभवतच आहोत. अलीकडेच आलेल्या पायलिन या चक्रीवादळाची आपल्याला पूर्वसूचना मिळाली आणि आपण होणारे संभाव्य नुकसान टाळले, ही गोष्ट आपण नजरेआड करता कामा नये. त्यामुळेच खर्चाचा बाऊ करून मंगळमोहिमेवर टीका करणे गैर आहे. अशा मोहिमांतून मिळणारे ज्ञान हे अखेरीस मानवजातीला उपकारक ठरत असते.

बाबा पाटील's picture

6 Nov 2013 - 4:41 pm | बाबा पाटील

डोक्यावर पडलेला धागा.? याच्यापेक्षा चांगला शब्द माझ्याकडे तरी नाही.

चेतनकुलकर्णी_85's picture

6 Nov 2013 - 4:43 pm | चेतनकुलकर्णी_85

१ ९ ९ ८ साली झालेल्या "पोखरण -२ " नंतर शाळेत अश्याच धर्तीवर "भारताला गरज कशाची अणुबॉम्ब ची कि भाकरीची ? " अश्या नेभळट , कमजोर व गांधी वादाने ठासून भरलेल्या व ग्रासलेल्या मनोवृत्तीचे दर्शन करणाऱ्या निबंधाचे पेव फुटले होते . त्याच आशयाचा हा अपेक्षित धागा दिसतोय.

जाता जाता एवढेच सांगतो कि तंत्रज्ञान हे असे एकमेव क्षेत्र आहे कि ज्या मध्ये राजकारणी व इतर अक्षरशत्रू असलेल्या लोकांची लुडबुड हि जास्त नसते म्हणूनच कि काय आपण (भारताने ) तंत्रद्यानात विशेषतः अणुउर्जा न अंतराळ विज्ञानात विशेष अशी झेप घेतली आहे आणि ती हि कमी कालावधीत . अश्या लोकांची पाठ थोपटायची नसल्यास कमीत कमी पाय तरी ओढू नका राव .

टवाळ कार्टा's picture

6 Nov 2013 - 5:33 pm | टवाळ कार्टा

+१११

मुक्त विहारि's picture

6 Nov 2013 - 4:48 pm | मुक्त विहारि

वाचत आहे.

(अज्ञानी) मुवि

विटेकर's picture

6 Nov 2013 - 9:03 pm | विटेकर

स्शस्शतक

पिशी अबोली's picture

6 Nov 2013 - 9:06 pm | पिशी अबोली

मिपावरील धाग्यांचे इंधन गोळा केले तर आपला इंधनाचा प्रश्न सुटेल...

विकास's picture

6 Nov 2013 - 11:12 pm | विकास

जर येथे (अथवा इतरत्र अशा) चर्चा करत बसण्याऐवजी आपण सर्वच काम करु लागलो, समाजसेवा का काय असते ते करू लागलो तर जिडीपी वाढण्यास आणि सामाजीक प्रश्न सुटण्यास कित्ती मदत होईल! :) मंगलयान पण असायला हवे मदनबाणचे जे काही इतरत्र (आपण कमी असणारे) मुद्दे आहेत, त्यात देखील सुधारणा समांतर पद्धतीने झाली पाहीजे. Either -- Or ची भाषा बोलूया नको!

बाकी ते जाउंदेत, येथे जे कोणी भारतात रहाणारे भारतीय आहेत, त्यांनी किमान मतदारयादीत नाव नोंदवा आणि निवडणुकीत न चुकता, कुणाला हवे त्याला, पण मतदान करा...

हॅकिंगच्या धास्तीने म्हाडाची वेबसाइट बंद

http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai/mhada/articles...

ह्याच विषयावर आलेली एक प्रतिक्रिया -
आपल्या देशाने नुकतीच मंगळाच्या दिशेने झेप घेतली.. याच बरोबर अनेक क्षेत्रात गरुडझेप घेतली असताना आपण 'सायबर क्षेत्रात' इतके मागासलेलं असण फार लाजीरवाण आहे.

चित्रगुप्त's picture

7 Nov 2013 - 5:04 pm | चित्रगुप्त

आत्ताच मिपावर एका धाग्यात खालील मजकूर वाचला.

विसा साठी फार मोठी रांग नव्हती. माझ्यापुढे काही अमेरिकन आणि काही स्वीडिश लोक होते. त्यांना विसा पटापट मिळाला एकही प्रश्न न विचारता . मला मात्र पारपत्र बघताच तिथल्या अधिकार्याने १०० प्रश्न विचारले. का आलास , कशासाठी, कधी परत जाणार , कुठे कुठे फिरणार आहेस वगैरे वगैरे . हा अनुभव परदेशात बर्याच ठिकाणी येतो. आपल्याला अनेक प्रश्न विचारले जातात , खूप चौकशी केली जाते जी इतर देशातल्या नागरिकांची होत नाही.

मंगळ मोहीम वगैरेमुळे भारताची प्रतिमा जागतीक पटलावर सुधारेल, आणि हळू-हळू आपल्या नागरिकांना अशी वागणूक मिळणे कमी होइल, ही आशा.

जेपी's picture

7 Nov 2013 - 7:03 pm | जेपी

पत्रिकेतील मंगळावर जाता येत का ? चेआयला लई परेशान झालोय . आठव्या स्थानी आलाय म्हण , लय बेकार . ईचीबन शांती कर म्हणत्यात .

जेपी's picture

7 Nov 2013 - 7:06 pm | जेपी

108 वा प्रतिसाद माझा प्रतिसाद होता काय फरक पडेल का ?

आनंद घारे's picture

21 Nov 2013 - 10:55 pm | आनंद घारे

मंगळयानाबद्दल बरीच उत्सुकता जागी झालेली दिसते. या मोहिमेचा नफा तोटा वगैरेचा विचार न करता या विषयाची थोडक्यात ओळख करून देण्याचा एक प्रयत्न मी या लेखामध्ये करणार आहे.