आज शाळेत कार्यक्रमासाठी गेलेलो असताना केबिन बाहेरच्या फळ्यावर सुविचार वाचले. ३७ वर्षापुर्वी माझ्या शाळेत हाच फळा वाचला होता. मागिल वर्षी हाच फळा वेगळ्या शाळेत वाचला होता. मुख्याध्यापकाना सुविचार आवड्ले असे म्हणताच त्यांनी एक निनावी पत्र काढुन दाखवले. ते येणेप्रमाणे.
वेळेला महत्व द्या - असतो कोणाला?
संकटाला तोंड द्या- मी ** दाखवतो
बुडत्याला आधार द्या- पोहोता येत नसेल तर पाण्यात उतरु नये.
घाबर्णायाला धीर द्या - सोसेल तेव्ढेच भयपट पहावेत.
गुरुजनाना मान द्या- ती कायम त्यांच्याच हातात असते. वेगळी द्यायला आणखी एक उगवावी लागेल.
मित्राना स्नेह द्या- त्याना दिला तर मैत्रिणीचे काय?
जीवनाला गती द्या- अधोगती मध्ये सुद्धा गती असते.
देशाला सर्वस्व द्या- ५४० देत आहे ते पुरे नाही का? परत आम्हा भिकारी लोकांकडे मागताय.
इथे देशाची पिढी वाया चालली आहे असे मला अजिबात म्हणायचे नाही. उलट अशा सुविचारांनी मुलांच्या कल्पनाशक्तिला वाव मिळुन ती प्रगल्भ होतात. त्यातला एखादा समुदेपशक पण होण्याची धनदाट शक्यता असते.
आता शिक्षक मंडळीनी नविन सुविचार काढावेत. तेच तेच परत परत रिसायकल करु नयेत.
प्रतिक्रिया
22 Sep 2008 - 12:08 pm | विसोबा खेचर
हा हा हा! सुविचार सह्हीच आहेत.. :)
त्यातला एखादा समुदेपशक पण होण्याची धनदाट शक्यता असते.
काय हो विनायकमास्तर, तुम्हीदेखील असेच समुपदेशक बनलात की क्काय? छ्या! तुम्हीदेखील अंमळ व्रात्यच दिसता! :)
असो, चालू द्या. धागा अंमळ मजेशीरच वाटतो आहे!
आता माझ्याकडून एक -
सुविचार - "खरा तो एकचि धर्म, जगाला प्रेम अर्पावे..."
या सुविचारामागिल आमचा विचार - "आम्ही प्रेम अर्पायला केव्हाचे तैय्यार आहोत परंतु जगातल्या बर्याचश्या तरुणींना आमचे प्रेम नकोच आहे! :(
आपला,
(विनायकमास्तरांचा चावट विद्यार्थी) तात्या टवाळकर. :)
22 Sep 2008 - 12:14 pm | विनायक प्रभू
http://vipravani.wordpress.com/
सुविचारांची तिरडी वळायला आम्ही नेहमीचे चार यशस्वी कलाकार होतो. सगळे व्यवस्थीत आहेत.
सुविचारंचा अंडरटेकर वि.प्र.
22 Sep 2008 - 12:17 pm | अनिल हटेला
शेजा-यावर प्रेम करावे !!
:-आम्ही कधीचे तयार बसलोत !!!!
नेहेमी खरे बोलावे !!!
:- २७ वर्षे झाली प्रामाणीक प्रयत्न करतोये !!!
सुंदर अक्षर हा दागीना आहे !!
:-- आम्ही फक्त कळ्फलक च वापरतो !!!
(ब्लॅक लिस्टेड )
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
22 Sep 2008 - 12:21 pm | सखाराम_गटणे™
खुन के बदले मे खुन तसे
प्यार के बदले मे प्यार
---
नाडी सतत विसरत असेल तर इलास्टीक वापरावे.
22 Sep 2008 - 1:15 pm | विजुभाऊ
प्रयत्ने वाळूचे कण रगडीता तेलही गळे
ऑइल टॅन्क फुटे पर्यन्त गाडी वाळूत रेटायचीच कशाला
शन्का: इनऑर्ग्यानीक मॅटर मधुन ऑर्ग्यानीक मॅटर तयार होऊ शकतो?
तुमची प्यान्ट ढील्ली होत असेल तर जाडी कमी झाल्याची तारीफ करू नका, हे मान्य करा की प्यान्टची नाडी ज्योतिषा कडे विसरलात
22 Sep 2008 - 3:46 pm | विनायक प्रभू
http://vipravani.wordpress.com/
ह्या बा़की खरां. चेमिस्ट्री ची वाट्च लावतात सुविचार वाले
बायो चेमिस्ट्री ची खूप आवड असलेला
वि.प्र.
22 Sep 2008 - 5:33 pm | विजुभाऊ
उद्याचे काम आजच करा
कारण उद्या दांडी मारायची आहे
22 Sep 2008 - 5:37 pm | विजुभाऊ
शत्रुवर सुद्धा प्रेम करा
आळस हा माणसाचा शत्रु आहे
24 Sep 2008 - 12:30 pm | विनायक प्रभू
http://vipravani.wordpress.com/
झकास विजुभाउ
22 Sep 2008 - 6:03 pm | विनायक प्रभू
http://vipravani.wordpress.com/
केल्याने होत आहे रे - आधी केलेच पाहिजे
ह्या सुविचाराचे लक्ष्मण ने केलेले वाटोळे
पहिल्या दिवशी पहिल्या ल चा ळ दुसर्या दिवशी शेवट्च्या ल चा ळ
आनंदी बाईचा वंशज होता तो.
वि.प्र.
22 Sep 2008 - 6:33 pm | जैनाचं कार्ट (not verified)
मित्राना स्नेह द्या- त्याना दिला तर मैत्रिणीचे काय?
=))
काय होतास तु काय झालास तु प्रभुदेवा !
जैनाचं कार्ट
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
आमचा ब्लॉग
22 Sep 2008 - 6:54 pm | झकासराव
=)) =)) =))
जबरा.......................
................
http://picasaweb.google.co.in/zakasrao
22 Sep 2008 - 7:01 pm | तात्या विंचू
हे देवा, सगळ्यांचे चांगले कर..
फक्त सुरुवात माझ्यापासून कर....... :)