शाळेचे दिवस आले नं की मला लहानपणापासून एक प्रश्न पडतो, म्हणजे स्साला हे फळ्यावर लिहून दाखवायचे खूळ सर्वात पहिले मानवाच्या डोक्यात कधी आलं असेल? म्हणजे सगळ्यात पहिला खडू कोणी बनवला असेल? कधी बनवला असेल?
आणि कसा बनवला असेल. विशेषतः खराट्यांचं कौतुक वाटतं हो, तिच्यामारी कोणाच्या सुपीक डोक्यात आलं असेल कि आधी जिप्सम वगैरे आणा, मग भुकटी खाली पाडल्यावर साच्यात काढायचा प्रकार म्हणजे "सृष्टीच्या सृजनशीलतेचा अप्रतिम नमुना असलेल्या मानवाच्या सृजनशीलतेची आणि कल्पकतेची आणि हात कि सफाईची आणि कृष्णपृष्ठीयश्वेतशिंतोडीकरणाची हाईट" वाटते मला!
तसेच इतर अन्य पदार्थांचे ही, जसे कि शामवदनसफेती ! साला तो टाल्कमचा धोंडा, त्याचा अंग घासायसाठी वापरून झाल्यावर, त्याची पूड पडायला लागल्यावर पुन्हा चेह-यावर फासण्यासाठि वापरणे भारीच. कोणाला सुचलं असेल हे असं?
अर्थात हे सगळं एकाच दिवसात सुरु झालेलं नसावं असा माझा अंदाज. या कृती उत्क्रांत होत गेल्या असतील. या कृतींच्या जन्माची, उत्क्रांतीची काही कहाणी असेलच नं.
जाणकार मंडळींच्या प्रतिक्रियांच्या प्रतीक्षेत.
प्रतिक्रिया
30 Oct 2013 - 2:34 pm | खटासि खट
गडबड झालीच :D
खराटा राहीलाच लका इथं, कारागिराचं असं वाचा.
तसदीबद्दल माफी !
30 Oct 2013 - 2:37 pm | अनिरुद्ध प
आहे,(बाकी सद्ध्या मिपावर मात्र माहितीच्या आधारावर 'डु' ची बाराखडी मनोरन्जकच)
30 Oct 2013 - 2:41 pm | विअर्ड विक्स
हि बाराखडी ग पर्यंत नाही पोचली म्हणजे मिळवली………………
30 Oct 2013 - 2:43 pm | दिपक.कुवेत
जगात प्रत्येक गोष्टचं कधी ना कधी पहिल्यांदा झालेली असते.....पहिल्यांदा कुणाला प्रेमाचा सा़क्शात्कार झाला असेल?, पहिल्यांदा कुणाचा हात/पाय फ्रॅक्चर झाला असेल?, कुणाच्या मुलानी पहिलं पाउल टाकलं असेल?, दिवाळिचा पहिला फटाका-लवंगीबार उडवला असेल? अश्या कैक प्रश्नांवर धागे काढता येउ शकतील.
मालक थोडि जागा बाकि काथ्याकुट विषयांसाठिपण ठेवा कि!
30 Oct 2013 - 2:50 pm | खटासि खट
आम्ही कुटं अडवलंय वं सायब ?
30 Oct 2013 - 2:50 pm | बॅटमॅन
लाडू, झाडू, खडू, गडू, पुढे काय?
बाकी नेटवर पाहताना दिसले की खडूचे मटीरिअल ड्रॉइंग करण्यासाठी अगदी प्रागैतिहासिक काळापासून वापरले जायचे. पण आज पाहतो त्या स्वरूपात खडू साधारण १८व्या-१९व्या शतकापासून सुरुवात झाली. तेलकट रंगाचे खडू १५ व्या शतकात इटलीत १५व्या शतकात पहिल्यांदा वापरले गेले तरी मोठ्या प्रमाणावरती वापर सुरू साधारण १८-१९व्या शतकातच सुरू झाला.
http://people.lis.illinois.edu/~chip/projects/timeline/1800keys.html
बाकी भारतात काय होतं माहिती नाही, विशेषतः ब्रिटिशपूर्व काळात लोक धुळाक्षरे गिरवायचे इतकेच ऐकून माहिती आहे. आज पाहतो तसली दगडी पाटी ब्रिटिशपूर्व काळात होती किंवा नाही याबद्दल साशंक आहे.
30 Oct 2013 - 2:54 pm | खटासि खट
वाघुळदादा लिंक लैच भारी दिलेली हाय. आपला प्रतिसाद अॅप्रिशियेट करण्यात येत आहे.
30 Oct 2013 - 4:55 pm | चौकटराजा
लाडू, झाडू, खडू, गडू, पुढे काय?
बियाटू ,
बालके चौ रा चा
कृ सा न वि वि
व्यंजनांच्या पाचव्या गटात काही तरी मिळण्याची शक्यता आहे बॉ !
30 Oct 2013 - 2:55 pm | डॉ सुहास म्हात्रे
मी तर नाय बाँ ! खर्र खर्र...
30 Oct 2013 - 3:10 pm | विजुभाऊ
साडू आणि भाडू राहीले की रे ब्याट्या.
30 Oct 2013 - 3:13 pm | बॅटमॅन
भाडू कोण =)) तदुपरि साडू कोण बनला याचे उत्तर नसले तरी कधी बनला याचे उत्तर देऊ शकतो. जगात पहिल्या काही लग्नावेळी झालं असेल हे. जास्त खोलात जायचं तर इरावती कर्व्यांचं 'किनशिप ऑर्गनायझेशन इन इंडिया' वाचावं लागेल.
31 Oct 2013 - 6:43 am | सव्यसाची
अतिशय भारी पुस्तक आहे हे.. थोडेसेच वाचून झाले पण किती मोठ्या स्तरावरती काम केले आहे हे कळतेच..
31 Oct 2013 - 10:50 am | बॅटमॅन
+११११११११११११११११११११११.
सिंप्लि ग्रेट.
अवांतरः कधी भेटणारेस गौतमदांना ?
31 Oct 2013 - 10:09 am | विश्वनाथ मेहेंदळे
अजून खोलात जायचे असेल तर "द सेकंड सेक्स" ला पर्याय नाही. आणि ते या विषयचे बायबल असल्याने त्याहून खोलात जाताच येणार नाही !!! :-)
31 Oct 2013 - 10:52 am | बॅटमॅन
अलीकडे काही नवीन नावे कळाली आहेत. त्यामुळे बोव्हारीणबाईंचा एकाधिकार बहुतेक जाईल याची कल्पना आहे.
उदा.
http://en.wikipedia.org/wiki/Gender_Trouble
बोव्हारीणबाईंवर टीका आहे काही ठिकाणी. सारांश पाहिला तर दम तरी वाटतोच आहे. पण इतकी वर्षे झाली तरी तीच नावे अन तेच बायबल उगाळणार्यांना अजून काय बोलावे म्हणा. :)
30 Oct 2013 - 5:51 pm | पैसा
कशाला नको ती आठवण करून देताय? शाळा म्हणजे आयुष्यातली सगळ्यात मोठी ट्रॅजेडी!
30 Oct 2013 - 5:59 pm | बॅटमॅन
ट्र्याजेडीतच जास्ती रस असतो लोकाण्णा =))
30 Oct 2013 - 5:59 pm | आतिवास
'मिपा'वर 'असला' धागा सर्वात प्रथम कुणी काढला होता? :-)
30 Oct 2013 - 6:00 pm | बॅटमॅन
खत्री सवाल =))
मिपावर पहिल्यांदा जिल्बी कोण अन कधी व कुठे टाकली होती, येणी प्वायण्टर्स?
30 Oct 2013 - 6:01 pm | केदार-मिसळपाव
हा घ्या खडू चा डोंगर
30 Oct 2013 - 6:06 pm | बॅटमॅन
नवीन अशा असंख्य गोष्टीही विज्ञान निर्माण करत असतं. फक्त त्याला विज्ञान न म्हणता इंजिनिअरिंग म्हणायची फ्याशन आहे इतकंच. डिस्कव्हरी करणारे ते सैण्टिस्ट असे म्हण्णे फ्याशणेबळ आहे इतकेच. बाकी येडिसण दिवेकर , लेथवाला हेन्री मॉड्स्ले, इ.इ. हे सर्वच वैज्ञानिक आहेत आमच्या मते.
30 Oct 2013 - 6:12 pm | केदार-मिसळपाव
विज्ञान नुसतीच निसर्गाच्या अज्ञात नियमांची उकल करत नसतं तर असंख्य नविन गोष्टीही निर्माण करत असतं.
30 Oct 2013 - 6:17 pm | बॅटमॅन
येस्सार!
30 Oct 2013 - 6:20 pm | सूड
आता
30 Oct 2013 - 6:21 pm | सूड
=))
30 Oct 2013 - 6:25 pm | पैसा
फारच गंभीर चर्चा होईल तिथे!
30 Oct 2013 - 7:34 pm | प्यारे१
___/\___
सूडकेश्वर नि पैसामाऊली.
भारी आहात!
30 Oct 2013 - 8:29 pm | सूड
...म्हंजी नवाल म्हनायचं !!
30 Oct 2013 - 7:15 pm | ध्यानस्थ बगळा
रडू आणि भिडू चे क्वापीराईट मी घेतलेत.
30 Oct 2013 - 8:34 pm | चौकटराजा
पहिला भिडू ईव्ह किंवा अॅडमने निर्माण केला !
31 Oct 2013 - 5:14 am | स्पंदना
ऑ?
ध्यानात पण रडायच असत का काय?
नाही नाही, तुम्हाला रडूचे अधिकार देता येणार नाहीत.
खर सांगायच तर....ओ गप ध्यानात बसा !
31 Oct 2013 - 12:33 pm | डॉ सुहास म्हात्रे
विज्ञान नुसतीच निसर्गाच्या अज्ञात नियमांची उकल करत नसतं तर असंख्य नविन गोष्टीही निर्माण करत असतं.
१. शोध (डिस्कव्हरी): सृष्टीत अगोदरपासून आस्तित्वात असलेली गोष्ट शोधून काढणे. उदा: गुरुत्वाकर्षण, अमेरिकेचा शोध, इ.
२. नवशोध (इन्व्हेन्शन): सृष्टीत अगोदर आस्तित्वात नसणारी गोष्ट मूर्त रुपात तयार करणे / एखादा तशा प्रकारचा विचार मांडणे. उदा: रेडिओ, टेलिफोन, इ.
३. नियम (लॉ अथवा रूल): सृष्टीत अस्तित्वात असलेली, वारंवार घडणारी आणि कार्यकारणभाव शास्त्रियरित्या पूर्णपणे सिद्ध झालेली घटना. उदा: न्युटनचे नियम. नियमाच्या बाबतीत शास्त्रज्ञांत दुमत नसते.
४. सिद्धांत (थियरी): सृष्टीत अस्तित्वात असलेल्या पण कार्यकारणभाव शास्त्रियरित्या पूर्णपणे सिद्ध न झालेल्या गोष्टीबद्दलचा शास्त्रिय अंदाज. जेव्हा शास्त्रज्ञांत एखाद्या गोष्टीबद्दल एकवाक्यता नसते तेव्हाच अनेक संभाव्य सिद्धांत असू शकतात. उदा: हिमयुग का आणि कसे अवतरते ?
31 Oct 2013 - 1:12 pm | अनिरुद्ध प
+१११ सहमत
31 Oct 2013 - 1:57 pm | केदार-मिसळपाव
विज्ञान नुसतीच निसर्गाच्या अज्ञात नियमांची उकल करत नसतं - ह्यात शोध, नियम आणि सिद्धांत सगळे आले.. म्हणजे एखादा माहित नसलेला नियम शोधुन काढणे (उदा. गुरुत्वाकर्षणाचा नियम किंवा एखादा शास्त्रिय सिद्धांत मांडणे, अमेरिकेचा शोध ह्यात नाही बसत, तो मुक्तपीठ वाल्यांसाठी राखीव आहे).
असंख्य नविन गोष्टीही निर्माण करत असतं.- ह्यात तुमचा दुसरा मुद्दा आला (नवशोध, नवनिर्माण अथवा नवनिर्मीती).
लै किस पाडला स्वाक्षरीचा...
2 Nov 2013 - 9:05 pm | डॉ सुहास म्हात्रे
लै किस पाडला स्वाक्षरीचा...
च्यामारी ती समदी स्वाक्शरी हाय होय तुमची... मंग आमचं कायबी म्हन्न नाय बा ! स्वाक्शरी म्हंजी स्वाक्शरी म्हंजी स्वाक्शरी अस्ती, तेत कोनालाबी बोलाचा काम नाय ! स्वाsssरी. (तरीबी जरा लांबडिच हाय बगा, म्हनूनशान थॉsssडा घोळ झाला बगा ;) )
5 Nov 2013 - 3:52 pm | केदार-मिसळपाव
स्वाक्क्सरी म्हंजी कशी उमगली पाहिजे सम्द्यांना...
मी ही काही वाक्ये एका लेखात बघितली, म्हंटले कि चला आपली स्वाक्षरी म्हणुन वापरुया. त्यानंतर वटवाघुळ-बुवांकडुन तिला अजुन पैलु पाडुन घेतलेत. थोडी लांबलिये खरी तरी पुढची स्वाक्षरी मिळेपर्यंत हि चालवुया, कसे?...
31 Oct 2013 - 1:57 pm | शशिकांत ओक
हे सिक्वेल चाललय वाटते. चालू दे.
2 Nov 2013 - 7:07 pm | अमोल मेंढे
बघा जरा..
3 Nov 2013 - 4:00 am | रमेश आठवले
अर्थमंत्री चिदम्बरम यांन चिडू हे टोपण नाव सर्वात पहिले कोणी दिले ?
सर्वात पहिला भिडू कोण ?
विटी- दांडू मधील दांडू हे नाव कोणी दिले ?
वगैरे वगैरे वगैरे