सगळ्यात पहिला लाडू कोणी बनवला असेल ?

घन निल's picture
घन निल in काथ्याकूट
28 Oct 2013 - 6:22 pm
गाभा: 

सणासुदीचे दिवस आले न कि मला लहानपणा पासून एक प्रश्न पडतो , म्हणजे साला हे गोड धोड पदार्थ बनवण्याचं सर्वात पहिले कधी समजल असेल मानवाला ? म्हणजे सगळ्यात पहिला लाडू कोणी बनवला असेल ? कधी बनवला असेल ?
आणि कसा बनवला असेल …. विषेतः अनारस्यांच कौतुक वाटतं हो ,चायला कोणच्या सुपीक डोक्यात आलं असेल कि आधी तांदूळ वगेरे काय भिजत ठेवा मग सगळी रेसिपी झाल्यावर त्याच्यावर ते खस खस लावण्याचा प्रकार म्हणजे "श्रुष्टीच्या सृजनशीलतेचा अप्रतिम नमुना असलेल्या मानवाच्या सृजनशीलतेची आणि कल्पकतेची आणि खादाडपनाची आणि जिभेचे चोचले पुरवण्याची हाईट " वाटते मला …
तसेच इतर अन्य पदार्थांचे हि , जसे कि चकली , साला तो सो-या त्यात तो उंडा कोंबून परत वि'शि'ष्ट आकारात तो बाहेर काढून तळणे म्हणजे भारीच … कोणाला सुचलं असेल हे असं …
अर्थात हे सगळं एकाच दिवसात सुरु झालेलं नसावं असा माझा अंदाज … हे पदार्थ उत्क्रांत होत गेले असतील …
या पदार्थांच्या जन्माची , उत्क्रांतिची काही कहाणी असेलच न…
जाणकार मंडळींच्या प्रतिक्रियांच्या प्रतीक्षेत …

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

28 Oct 2013 - 6:29 pm | प्रचेतस

हा धागा पहा.
लाडू असं नै पण बाकी मनोरंजक माहिती आहे.

बॅटमॅन's picture

28 Oct 2013 - 6:52 pm | बॅटमॅन

मस्त लेख आहे. त्याहीपेक्षा अतिशय जास्त तपशीलवार माहिती पाहिजे असेल तर मायबोलीवर "अन्नं वै प्राणा:" नामक १०-१२ भागांची लेखमाला वाचणे. नाद खुळा आहे. शेकड्याने रेफरन्सेस भरलेत.

प्रचेतस's picture

28 Oct 2013 - 7:04 pm | प्रचेतस

लिंक दे की बे.

अबे हपिसात माबो ब्यान आहे. "अन्नं वै प्राणा:" असे गुगललेस मायबोली.कॉम देऊन की येईल बघ. चिनूक्स नामक आयडीने लिहिलेली लेखमाला आहे.

राघवेंद्र's picture

28 Oct 2013 - 8:06 pm | राघवेंद्र

http://www.maayboli.com/node/2802

धागा छान आहे.

प्रचेतस's picture

28 Oct 2013 - 10:10 pm | प्रचेतस

धन्स बॅट्या आणि राघवदा.

घन निल's picture

29 Oct 2013 - 10:29 am | घन निल

मस्त लेख ! वाचनखूण गोठवली आहे !

मन१'s picture

28 Oct 2013 - 10:33 pm | मन१

लेख जबरदस्त आहे. वेळेअभावी मी नक्की कशाकशाला मुकत होतो /आहे हे सुद्धा कळणे कठीण आहे.
तुला माहित असलेलं जालावर जे काही वाचनीय असेल ते शेयर कर म्हणून मागेही म्हणालो होतो.
असे जित्के तुझे आवडिचे वेगवेगळ्या विषयातील धागे असतील, ललित्,माहितीपूर्ण्,विनोदी,गंभीर, भावनिक वगैरे वगैरे कसेही असू देत किंवा अगदि "मोकलाया दाहि दिशा" सारखं ऑल टैम ग्रेट रत्न असू देत; ते शेयर कर रे बाबा. प्लीझ.

लॉरी टांगटूंगकर's picture

28 Oct 2013 - 7:09 pm | लॉरी टांगटूंगकर

असाच बॅट्याचा पण शिवरायाचे कैसे जेवणे म्हणून लै विन्त्रेष्टिंग लेख आहे ..

बॅटमॅन's picture

28 Oct 2013 - 7:31 pm | बॅटमॅन

त्यात १-२ उल्लेखांच्या आधारे केलेला कल्पनाविस्तार आहे इतकेच. :)

चित्रगुप्त's picture

28 Oct 2013 - 11:44 pm | चित्रगुप्त

शिवरायाचे कैसे जेवणे

दुवा द्या की जरा या लेखाचा.

घन निल's picture

29 Oct 2013 - 10:36 am | घन निल

भारी आहे लेख ! अजून असा एक किस्सा कोना आठवले नावाच्या लेखकाचे एक सरदार बापू गोखल्यान्वरचे एक पुस्तकात आहे त्यात वाचला होता,दुसर्या बाजीराव चा तो किस्सा द्राक्षांच्या सारा(ज्यूस म्हणा हवे तर ) बद्दल होता ,पण आठवत नाहीये आणि ते पुस्तक गावी आहे आता , दिवाळीत गेल्यावर शोधून टाकतो

सबब "सगळ्यात पहिला लाडू कोणी खाल्ला असेल?" ह्याचा एकदा शोध लागला कि आपोआप तुमच्या प्रश्नाचं उत्तर सापडेल. बाकि प्रश्न गहन विचार करायला लावणारा आहे खरा.

असो अहो कुठे ह्या फंदात पडताय....मस्त खायचा/प्यायचा आनंद लुटा आणि स्वस्थ रहा.

दिवाळिच्या हार्दिक शुभेच्छा!

घन निल's picture

29 Oct 2013 - 10:44 am | घन निल

अहो संशोधनाच्या कामास मिपाकरांना लावले कि मी आपला फराळ करण्यास मोकळा ! काय समजलात ! ( कानातला अत्तराचा फाया तर्जनी अन अंगठ्यात धरून सुगंध घेतानाची स्मायली !!)

माझीही शॅम्पेन's picture

28 Oct 2013 - 7:11 pm | माझीही शॅम्पेन

प्रबोधनपर धागा :) , मीपा वर विचारयाच तर सर्वात आधी जिलेबी कोणी पाडली असेल !!

अत्रुप्त आत्मा's picture

28 Oct 2013 - 7:43 pm | अत्रुप्त आत्मा

@ सर्वात आधी जिलेबी कोणी पाडली असेल !!>>> =)) @@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@ =))

स्वतःला रेफर करण्याची ट्याक्ट बाकी आवडली हो ;)

-करीन खात्मा.

अत्रुप्त आत्मा's picture

28 Oct 2013 - 7:56 pm | अत्रुप्त आत्मा

:-D

:P

=))

यसवायजी's picture

28 Oct 2013 - 7:57 pm | यसवायजी

@करीन खात्मा
:))

डॉ सुहास म्हात्रे's picture

28 Oct 2013 - 11:09 pm | डॉ सुहास म्हात्रे

काय ? करी 'न' खात्मा? चांगला झणझणीत पदार्थ दिसतोय. पाकृ टाका ;)

लाडू कोणी केले असतील??? बरं, जरा हे पुढ्यातले खुसखुशीत शंकरपाळे संपवतो मग निवांत विचार करेन.

रेवती's picture

28 Oct 2013 - 8:36 pm | रेवती

मला वाटलं यावर्षीच्या फराळाच्या पदार्थात लाडू पहिल्यांदा कोणी बनवले? असे विचारायचे आहे काय. असो. तुमच्या प्रश्नाचे उत्तर माहीत नाही.

चित्रगुप्त's picture

28 Oct 2013 - 11:39 pm | चित्रगुप्त

खरंच विचार करणीय गोष्ट आहे. याचे नक्की उत्तर ठाऊक नसले, तरी कल्पना करू शकतोच की आपण. म्हणजे 'कोणी बनवला' बद्दल जरी नाही, तरी 'लाडू' हा पदार्थ कसकसा उत्क्रांत होत गेला असावा, वगैरे बद्दल कल्पनाविलास....
समर्थांनी दासबोधात त्याकाळी प्रचलित असलेल्या शेकडो खाद्यपदार्थांची नावे दिलीत. (त्यातली बरीच हल्ली माहितही नाहीत कुणाला) कुणीतरी हुडकून टाका कि जरा इथे.

समर्थांनी दासबोधात त्याकाळी प्रचलित असलेल्या शेकडो खाद्यपदार्थांची नावे दिलीत. (त्यातली बरीच हल्ली माहितही नाहीत कुणाला) कुणीतरी हुडकून टाका कि जरा इथे.

हे काय हो "एक तुतारी द्या मज आणुनि" टाईप..?!! ;)

पैसा's picture

29 Oct 2013 - 12:00 am | पैसा

संत एकनाथांच कृत रुक्मिणीस्वयंवरात रुखवताचे रसाळ वर्णन आहे. त्यात लाडू आहेत!

अत्यंत लाडें वळिले लाडु| विवेकतिळवियाचे जोडु||
सुरस रसें रसाळ गोडु| चवीनिवाडु हरि जाणे||

रामनवमी, चैत्र, शके १४९३

बॅटमॅन's picture

29 Oct 2013 - 12:08 am | बॅटमॅन

येकदम विंट्रेष्टिंग!!! नाथांच्या वाङ्मयात कुठेतरी एके ठिकाणी इडलीचा उल्लेख असल्याबद्दलही वाचल्याचे अंधुकसे आठवतेय. त्यांचे कुटुंब गिरिजादेवी कन्नड असल्याचा परिणाम असावा.

पैसा's picture

29 Oct 2013 - 12:21 am | पैसा

रुक्मिणीस्वयंवरातील या रुखवतामधे फोडणीचे शाक, काचर्‍या, कोशिंबिरी, अनारसे, शेवया, लाडू, पापड, कुरवड्या, खारी भोकरे, पुर्‍या, गुळवर्‍या, क्षीरधारिया, इडुरिया (?), फेण्या, अमृतफळे, घार्‍या, खांडवी, मांडे, भात एवढ्या पदार्थांचे उल्लेख आहेत.

ज्ञानेश्वरांचे मांडे तर प्रसिद्धच!

सापडली!! ती इडुरिया म्हणजेच इडली!!!!!!

बाकीच्या यादीबद्दलही धन्यवाद!

बाकी ज्ञानेश्वरांचे मांडे तर काय सांगावे, लै फ्येमस.

अडगळ's picture

29 Oct 2013 - 10:12 am | अडगळ

अशा एका पदार्थाचा उल्लेख वैदिक वाग्मयात येतो तो इडली सारखाच अस्तो असं दुर्गाबाई भागवतांनी एक लेखात लिहील्याचे आठवते. (ऐस्पैस गप्पा - प्रतिभा रानडे)

चित्रगुप्त's picture

29 Oct 2013 - 5:14 am | चित्रगुप्त

'शाक' चा अर्थ 'फोडणी देऊन केलेला पदार्थ' असा असावा. ('शाक'चे मूळ संस्कृत रूप काय आहे?) कारण एकदा खास नेपाळी रेस्तोरां मधे जेवण्याचा योग आला होता, तिथे मेनुकार्डावर 'Aloo ko Shaak' 'Dahi ko Shaak' 'Dal ko Shaak' अशी पदार्थांची नावे होती. आधीतर ही बटाट्याची भाजी, कढी, वरण इ. ची नावे आहेत, हे कळलेच नाही.

पैसा's picture

29 Oct 2013 - 8:33 am | पैसा

शाक म्हणजे भाजी. म्हणूनच शाकाहारी म्हणजे फक्त भाज्या/वनस्पती खाणारे असा खरा अर्थ आहे.

हॅहॅहॅ... लाडुच ठीक आहे हो पण चक्का टांगुन मग त्याचे श्रीखंड बनवणार्‍याला संशोधकाला मी फार मानतो बाँ ! ;)

(कडकबुंदी प्रेमी) ;)

उद्दाम's picture

29 Oct 2013 - 11:42 am | उद्दाम

पहिले श्रीखंड भीमाने बनवले आणि ते श्रीकृष्णाला दिले, त्यावरुनच नाव श्रीखंड ठेवले.

पैसा's picture

29 Oct 2013 - 12:26 pm | पैसा

भौ, हे कुठे वाचलंत हो? ;) माझी माहिती जरा वेगळी आहे. अगदी आर्यांच्या काळात श्रीखंड हा पदार्थ शिखरिणी नावाने प्रख्यात होता.

कवितानागेश's picture

29 Oct 2013 - 1:15 pm | कवितानागेश

हेपण दुर्गाबाई भागवतांच्या याच वर उल्लेखलेल्या पुस्तकात आहे.

पैसा's picture

29 Oct 2013 - 9:08 am | पैसा

http://spokensanskrit.de/index.php?page=8 इथे लड्डु म्हणजे एक गोड पदार्थ असा अर्थ आहे. पण लाडू किती जुने हे माहित नाही. गणपतीचे एखादे जुने शिल्प लाडू हातात धरलेले सापडले असेल तर लाडू त्याहून जुने असतील एवढे नक्की म्हणता येईल.

प्रचेतस's picture

29 Oct 2013 - 9:10 am | प्रचेतस

हे आहे वेरूळचे.

a

यसवायजी's picture

31 Oct 2013 - 10:40 am | यसवायजी

लाडु पाहीजेत? हे घ्या.. यु जस्ट नेम इट.. हॅव इट..
ग्रेट हां वल्ली..

वेल्लाभट's picture

29 Oct 2013 - 10:47 am | वेल्लाभट

लाडू साऱखा शब्दशः आणि अर्थानेही Allround पदार्थ मी आजवर दुसरा बघितलेला नाही. जाम आवडतात मला लाडू. राजगिरा सोडून कुठलाही आवडतो. वन डिश मील चं बेस्ट उदाहरण - लाडू.

ज्या कुणी काढला असेल तो जिनियसच होता माझ्यासाठी ! क्या बात. चायला एखादा बेसनाचा किंवा मुगाचा लाडू हाणावासा वाटतोय....

उद्दाम's picture

29 Oct 2013 - 11:12 am | उद्दाम

पहिले श्रीखंड भीमाने बनवले आणि ते श्रीकृष्णाला दिले, त्यावरुनच नाव श्रीखंड ठेवले. लाडवाबद्दल माहिती नाही.

गवि's picture

29 Oct 2013 - 11:37 am | गवि

तंबिटाचा का???!

पैसा's picture

29 Oct 2013 - 12:27 pm | पैसा

तुम्हाला पाककृती देणार सांगून ३ वर्षे झाली तरी अजून दिली नाही तेच हे लाडू ना?

रेवती's picture

31 Oct 2013 - 2:53 am | रेवती

देवा, मला माफ कर. कुठून गविंना सांगून बसले असं झालय.
पैसाताई, काडी टाकलीस ना! थाम्ब बघते तुझ्याकडे!

ते राघवदास लाडू म्हणजे नेमके कसे असतात ?

माझ्या माहीतीप्रमाणे राघवदास लाडू म्हणजे बेसन अन रवा मिक्स लाडू. मला आवडतात.

रेवती's picture

31 Oct 2013 - 2:58 am | रेवती

हरभरा डाळीचा जाडसर रवा काढायचा (गिरणीत काढून मिळतो). दूध आणि साजूक तूप लावून ठेवून द्यायचा. मग साजूक तुपावर भाजायचा. नंतर ओला नारळ व खवा घालून भाजायचा. साखरेच्या पाकात घालायचा. मी एकदोनदा खाल्लाय. अफलातून चव असते पण डाळीचा रवा परतत बसणे हे पेशन्सचे काम आहे. मिपाकर सानिकेनं वाटल्या डाळीचे लाडू म्हणून त्याच्या जवळ जाणारा प्रकार दिला होता. तोही सुरेख होता.

त्रिवेणी's picture

29 Oct 2013 - 12:33 pm | त्रिवेणी

मला लाडू आवडत नाही, मी लाडू करत नाही, सो पहिला लाडू कोणी केला हा विचार करणार नाही.
कृपया वरील प्रतिसात हलके घ्या.
(चकलीप्रेमी)त्रिवेणी

घन निल मी सुद्धा यावेळी फराळ बनवताना हाच विचार करत होते. किती निगुतीने, चवीचा, रंगाचा, आकाराचा असा सगळा विचार करुन बनवला आहे हा फराळ! आपण नुसते सांगितल तस बनवत रहातो. अन त्यातही चुका करतो.

वरचे प्रतिसाद अन लिंका मस्तच!
आता कस दिवाळीच वातावरण वाटायला लागल.
इकडे फराळाची चर्चा, तिकडे घर सफाई......व्वाह! इतक दूर राहूनही सगळ्यांच्यात असल्या सारख वाटल. धन्यवाद.

मिपावर असे प्रश्न विचारण्याचा वेगळाच आनंद मिळतो तो येणाऱ्या सगळ्या प्रतिक्रियांमुळे … अगदी सगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया आपल्याला हेच दाखवत असतात कि या विषयाला किती पैलू आहेत… मस्त वाटले सगळे प्रतिसाद !

तहानलाडू भूकलाडू नक्की कशाला म्हणतात? खरच असं काही असतं का फक्त गोष्टींपुरतं?