गाभा:
http://www.theunrealtimes.com/2013/03/08/impressed-by-rahuls-lack-of-int...
राहुलजींनी लग्नाचा विचार नाही व भारताचा अनभिषिक्त सम्राट व्हायची इच्छा नाही. तमाम पायघड्या घालणारे काँग्रेसी चेले बुचकळ्यात पडले. पण ह्या थोर वर्तमानपत्राने आपला मोठ्ठा शोध लावला आहे की महाज्ञानी राहुलजी पोपच्या पदाकरता उत्सुक आहेत. आता सगळा उलगडा झाला.
अर्जुनाला जसा त्या गोष्टीत फक्त पोपटाचा डोळा दिसत होता तसा राहुलजींचा पोपपदावर डोळा आहे तर!
इंग्रजीत म्हण आहे की अपयश हा गुन्हा नाही तर उच्च ध्येय नसणे हा गुन्हा आहे. राहुलजींनी हेच आचरणात आणायचे ठरवलेले दिसते. त्यांना शुभेच्छा.
अर्थात ते जमले नाही तर भारतातील सर्वोच्च स्थान हात जोडून उभे आहेच!
प्रतिक्रिया
10 Mar 2013 - 7:50 am | नितिन थत्ते
तुमच्या दु:खात सहभागी आहे. ;)
10 Mar 2013 - 9:26 am | मैत्र
तुमच्या आनंदात सहभागी आहे :)
10 Mar 2013 - 9:31 am | नितिन थत्ते
धन्यवाद. :)
10 Mar 2013 - 9:56 am | श्री गावसेना प्रमुख
इथे राहुलजींच्या ऐवजी राष्ट्रवादी असे लेखाच नाव असत तर एव्हाना १०० झाले असते
10 Mar 2013 - 10:12 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
इश्वर सर्व ख्रिस्ती बांधवांचे रक्षण करो / त्यांच्या आत्म्याला शांती देवो.
10 Mar 2013 - 10:36 am | अविनाशकुलकर्णी
श्री राहुल भैया आपण ब्राह्मण आहोत असे म्हनतात....
जय मुल्निवासी
25 Oct 2013 - 12:21 am | खटपट्या
कृपया खालील लिंक ला भेट द्या. खरे खोटे देवाला माहित.
http://blog.sureshchiplunkar.com/2007/04/blog-post_18.html
25 Oct 2013 - 3:28 pm | मदनबाण
खटपट्या एका उत्तम ब्लॉगची लिंक दिल्या बद्धल धन्यवाद ! :)
(वाचक)
10 Mar 2013 - 1:17 pm | श्रीगुरुजी
>>> राहुलजींनी लग्नाचा विचार नाही व भारताचा अनभिषिक्त सम्राट व्हायची इच्छा नाही.
मला यापुढे निवडणुक लढविण्याची इच्छा नाही असे गेल्या अनेक वर्षांपासून शरद पवार सांगत आहेत.
मी लवकरच निवृत्त होणार असे श्री. रा. रा. सुशीलकुमार शिंदे सांगत आहेत.
सोनिया गांधींना राजकारणात व सत्ताकारणात अजिबात रस नसून केवळ नाईलाजाने त्या राजकारणात आहेत व म्हणूनच त्यांनी कोणतेही सत्तेचे पद स्वीकारलेले नाही.
मनमोहन सिंग हे अजिबात हाडाचे राजकारणी नसून त्यांना राजकारणात अजिबात रस नाही व निव्वळ नाईलाज म्हणून ते राजकारणात आहेत. (नुकतेच एके ठिकाणी वाचले की "Manmohan Singh has been grossly overestimated as an economic expert and, at the same time, he has been grossly underestimated as a politician.").
.
.
.
वरील वाक्यात जितके तथ्य आहे तितकेच तथ्य अमूल बेबीच्या वरील उद्गारात आहे !
11 Mar 2013 - 1:15 am | धन्या
थोडंसं ईतर पार्टीमधल्यांबद्दलही लिहा की. असा डीफरन्स का दाखवताय? :)
11 Mar 2013 - 1:35 am | मोदक
अंतर्जालावरून साभार!
26 Mar 2013 - 10:47 pm | विकास
माननीय दिग्विजय सिंग यांनी इकॉनॉमिक टाईम्समध्ये "Wrong to think Rahul does not want to be PM" या मुलाखतीत म्हणलेले पटले: "राहूलजींनी पंतप्रधान होण्यासाठी नकार दिलेला नाही, तर पहील्यांदा "लोकांचे भले करणे" अर्थात "welfare of the people" या मुद्यास प्राधान्य दिलेले आहे."
आता इंग्रजीत म्हणलेलेच आहे, charity begins at home त्याचा सोयीचा अर्थ घेऊन, आधी घरच्यांचे म्हणजे काँग्रेसजनांचे भले करणे आले. त्यासाठी सत्ता असणे आणि पंतप्रधान होणे देखील महत्वाचे ठरणारच!
त्या व्यतिरीक्त त्यांचे (दिग्गीराजांचे) म्हणणे आहे की गांधी-नेहरू घराण्याचा अध्यक्ष आणि पंतप्रधान वेगळाच, अशा दुहेरी सत्ताकेंद्रामुळे पक्षाची हानी होत आहे (देशाचे काय होते ते महत्वाचे नाही), त्यामुळे देखील राहूलजींनी पंतप्रधान होणे महत्वाचे आहे.
11 Mar 2013 - 12:55 am | कपिलमुनी
वर धागे निघायला लागलेत ..संमं इकडे लक्ष देइल का ??
11 Mar 2013 - 5:54 am | निमिष ध.
चर्चा करण्याआधी निदान त्या वर्तमानपत्राचे नाव तरी वाचा - अन रीयल टाइम!!!
11 Mar 2013 - 7:26 am | हुप्प्या
टीका करण्याआधी लेखाची जातकुळी तरी वाचा - राजकारण, मौजमजा!!!
महात्यागी राहुलजींचा येत्या निवडणुकीत पोपट होणे एकवेळ शक्य आहे (तो आकाशातील बाप असा दिवस दाखवणार नाही अशी आशा!) पण त्यांची पोप म्हणून निवड होणे दुरापास्त आहे (तो आकाशातील बाप असा दिवस दाखवणार नाही हे नक्की!)
सुदैवाने क्याथालिक लोकांच्या सर्वोच्चस्थानावर आरूढ होणे वंशपरंपरागत नसते!
11 Mar 2013 - 8:55 am | श्रीरंग_जोशी
लेखनप्रकारात जरी मौजमजा निवडलेले असले तरी वर प्रतिक्रिया लिहिणार्या व माझ्यासारख्या इतर अनेक वाचकांचे त्याकडे लक्ष गेले नाही. वरील प्रतिक्रियेनंतरच ती बाब लक्षात आली.
या प्रकारच्या लेखाच्या सुरूवातीलाच लेखनाचा उद्देश स्पष्ट शब्दांत लिहावा असे सुचवतो.
अवांतर - याच पठडीतले फेकिंगन्युज.कॉम संकेतस्थळ देखील रोचक आहे.
11 Mar 2013 - 8:24 am | विकास
या लेख/चर्चेचे वर्गिकरण जसे मौजमजेत आहे तसेच दुव्याच्या माध्यमात त्यांचा उद्देश देखील (satire, spoof, parody and humour portal) स्पष्ट आहे... :-)
त्यातील ममता बॅनर्जींवरील बातमीचे शिर्षकपण मजेशीर आहे: Mamata Banerjee demands ban on Mars after she’s told that it is called the red planet =))
11 Mar 2013 - 10:56 pm | आदिजोशी
सदर वर्तमानपत्राच्या संपादकांच्या बुद्धीचे जाहीर वाभाडे काढायचा टॉपिककर्त्याचा प्लॅन अति घाईमुळे बुमरँग झालेला आहे :)
26 Mar 2013 - 11:21 pm | आशु जोग
>इथे राहुलजींच्या ऐवजी राष्ट्रवादी असे लेखाच नाव असत तर एव्हाना १०० झाले असते
राष्ट्रवादीच्या दोन शाखा होणार
एक दादांची, दुसरी ताईंची (तिसरी विजयसिंह यांची)
राष्ट्रीय पातळीवर न रमता सरपंच परिषदेत घुटमळणारे साहेब
सध्या आजारी असून विश्रांति घेत आहेत.
24 Oct 2013 - 6:30 pm | श्रीगुरुजी
गेल्या २-३ दिवसात पप्पूबद्दल खूप महत्त्वाच्या गोष्टी समजल्या.
(१) पप्पूला पालकाची भाजी आवडत नाही. पानात वाढलेली पालकाची भाजी तो गुपचूप आजीच्या ताटात ढकलायचा. म्हणजे लहानपणापासून तो खूप खट्याळ आहे. म्हणजे हा 'बालक' 'पालक' टाकून देत होता. पण 'हिरवा' पालक आवडत नाही याचा अर्थ उघड आहे. निखिल वागळ्यांना चर्चेसाठी एक ज्वलंत विषय मिळालेला आहे.
(२) तो २००८ मध्ये बुंदेलखंडातल्या गावातले अशुद्ध पाणी प्यायल्यावर त्याचे पोट बिघडले होते. तिथे त्याला खूप डास चावले होते (बहुतेक तिथले डास रा.स्व.संघाचे असावेत). म्हणजे तो बिसलेरी सारखे चंगळवादी पाणी पीत नाही आणि डास आणि *डास यांचा त्याला खूप त्रास झाला होता. हा त्रास टाळण्यासाठी म.प्र.मधील भाजपचे सरकार घालवून तिथे काँग्रेसचे सरकार आणा असा अत्यंत योग्य पर्याय त्याने सुचविला आहे.
(३) भाजपवाले आगी लावतात आणि आम्हाला त्या विझवाव्या लागतात असे तो खेदाने म्हणाला. अग्निशामक दलासाठी त्याने अर्ज पाठविण्यास हरकत नाही.
(४) माझ्या कहाण्या न सांगता स्वतःच्या कहाण्या सांग असे त्याची आई म्हटली म्हणे. म्हणून तो आता आपल्या लहानपणाच्या आठवणी सांगणार आहे.
आगामी काळात अशाच सुरस कहाण्या येतील. तेव्हा तयार रहा.
24 Oct 2013 - 11:10 pm | आशु जोग
unreality लिहिलय ना
25 Oct 2013 - 2:48 pm | उद्दाम
पोप होण्यास शुभेच्छा.
विरोध / उपहास शंकराचार्यांचाही केला गेला होता. पण शे पाचशे वर्षानंतर ते आचार्य झाले.
------
३००० सालचा उद्दामाचार्य