आपण नकळत कोणा CULT च्या जाळ्यात अडकला आहात का ?( दुसरा व अंतिम भाग )

गुल-फिशानी's picture
गुल-फिशानी in काथ्याकूट
21 Oct 2013 - 11:05 am
गाभा: 


६- आचरणे व सोहळे (Rituals & Events) यांचा एक कायमस्वरुपी मजबुत कार्यक्रम.

अशा CULT मध्ये शिष्यांना कायम दोन पातळींवर एक कार्यक्रम दीलेला असतो आणि तो काटेकोरपणे अमलात आणणे यातच कशी अवघ्या जीवनाची सार्थकता आहे हे सतत हॅमरींग केले जाते.
यात वैयक्तीक पातळीवर आचरणाची असंख्य नियम व कामे (Rituals) नेमुन दीली जातात.यातील बहुसंख्य ही सोपी परंतु निर्बुद्ध आणि प्रचंड repetitive अशी असतात. यात काय खावे काय नाही, कुठल्या दीवशी ,कपडे इ. संबधी चे असंख्य नियम, अमुक इतके तास दररोज अमुक एक क्रिया करणे. इ, याची अनेक उदाहरणे आहेत पण जागा पुरणार नाही,
आणि सामुहीक पातळीवर असंख्य सोह्ळे (Events) चे आयोजन सातत्याने केले जाते. जसे प्रमुखाचा वाढदिवस, कोणतातरी महत्वाचा दिवस, initiation चा कार्यक्रम इ.अनेक ( परत जागा कमी पडते भाउ)
या कार्यक्रमा ने CULT सभासदांना कायमची संघटने शी अक्षरशः जखडुन ठेवते NO EXIT.
या Events द्वारे सभासदांचे प्रचंड आर्थिक व इतर शोषण केले जाते, जसे देणग्या,कार्यक्रमाला कार्यकर्ता म्हणुन राबविणे इ,यातुन संघटने च्या नविन भरती साठी ही पोषक अशी वातावरण निर्मीती ही होत असते.( बघितलत का ? कीत्ती कीत्ती आणि कुठुन कुठुन लोक आली होती कार्यक्रमाला आणि हो ते फॉरेनर्स......)
वैयक्तीक Rituals मुळे माणसाला एका भ्रामिक security & consistency चा दिलासा मिळतो,पण होत काय की सर्वात महत्वाच म्हणजे आत्मपरीक्षणासाठी (soul searching) साठी जो एक निवांतपणा आवश्यक असतो तो अशा Rituals मध्ये दिवस-रात्र गुंतल्यामुळे कधिच मिळत नाही. सभासद कायम एका उन्मादी अवस्थेतच दिसतो.( जरा निरी़क्षण करुन बघा)
७- अधिकार पदांची उतरंड (hierarchy)

याचा वापर प्रत्येक कल्ट करते. यात जसे कॉर्पोरेट विश्व्वा त जशी श्रेणीची व्यवस्था कि चेअरमन-व्हाइसचेअरन-मॅनेजर-इ. असते तशाच पोस्ट प्रत्येक संघटनेवाइज वेगवेगळ्या असु शकतात त्या आखुन दीलेल्या असतात. जसे प्रमुख गुरु सर्वात टॉपवर त्याच्या खाली उपगुरु मग उपउप मग शाखा प्रमुख इ.इ. सर्वात खाली अनेक साधारण सभासद.मग खालच्यांना वरच्या आणि वरच्यांना त्याहुन वरच्या पोस्ट चे प्रमोशन मिळविण्यास भरपुर प्रोत्साहन दीले जाते. याने संघटने चा अफाट विस्तार साधला जातो.अर्थात मग संघटने च्या प्रमोशन साठी टारगेट ही अ‍ॅचिव्ह करावे लागतात कीती नविन भरती केली, संघटनेचे कीती लेव्हल कीती कोर्सेस करुन गाठली. यातुन कीती इनर सर्किल मध्ये जाउ याची जोरदार चढाओढ सभासदां मध्ये लागते. मात्र सहसा यात वर जाण्याची एक लिमीट असते एक glass ceiling असते. आणि यातील सर्वात मोठा विरोधाभास म्हणजे बाह्य जगा चा संपुर्ण त्याग करुन आलेले सर्व या अंतर जगतात परत तोच बाहेर चाच रॅटरेस चा पॅटर्न फॉलो करतात. जी धडपड बाहेर मॅनेजर बनण्यासाठी होती तिच आता उपगुरु बनण्यासाठी सुरु होते. धडपड चालुच फक्त फोकस बदलला मनाला शांती नाही ती नाहीच. तिच मनाची तगमग तगमग!
८-आमच्यात याच अन्यथा तुमचा निषेध असो ! ( convert or condemn)
यात एककलमी कार्यक्रम अत्यंत आक्रमकतेने राबविला जातो तो म्हणजे आपल्या संघटनेची सभासद संख्या वाढविणे संघटनेत convert करण्यासाठी हरेक प्रकारचे मार्ग अवलंबिले जातात पुस्तके-टिव्हि चॅनल्स - मिटींग्ज वन टु वन बेसीस यात असंख्य प्रलोभनांची उधळण केली जाते जर तुम्ही आमच्यात आलात तर तुमच्या या ते त्या जगापर्यंत कसे आणि कीती कल्याण होइल हे असंख्य पद्धतीने ठसविण्यात येते, आणि यात कुणी कशाने पिडीत असेल तर मग विचारायलाच नको कोणी व्यसनाने -आर्थीक परीस्थीतीने- आरोग्याने वा कुठल्याही कारणाने " ग्रस्त" असेल तर असे "ग्रस्ती" हा तर ऑल टाइम फेव्हरीट सॉफ्ट टारगेट ( catch them young च्या चालीवर catch them broken ) करुन त्यांना संघटने त ओढण्याचा जोरदार आक्रमक प्रयत्न करण्यात येतो.
यातला दुसरा भाग भयानक असतो जर वरील सर्व करुन ही एखादा जॉइन होत नसेल आणि कुठल्याही कारणाने संघटनेला विरोध करीत असेल तर मग मात्र अशांचा जबरदस्त निषेध केला जातो. बदनामी ते मारहाण ते काहीही ( संघटने च्या कट्ट्र्र्र्र ते च्या प्रमाणात विरोधकां ना दडपले जाते.यात सर्व माणुसकी विसरली जाते.
९- सभासदा ला "बाहेरच्यां " पासुन तोडणे ( आयसोलेशन)
सभासदांना अधिका अधिक संघटने च्याच लोकांशी सोशलाइज करण्यास प्रोत्साहन दीले जाते.सभासदांना बाहेरच्या जगाशी गरजेपुरते वरवरचे संबध आणि याच्या उलट " आतील आपल्या " लोकांशी अधिकाअधिक जवळीक वाढेल असे पोषक वातावरण पुरविले जाते. अशा सभासदांचा त्यांच्या जुन्या मिंत्रांशी-कुटुंबियाशी ही (जर ते सभासद नसतील) तर संवाद कमी कमी वा तुटक होत जातो. अशांचा समाजातील वावर एका फॉर्मेलीटी सारखा होत जातो. ते अधिका अधिक संवेदनाशुन्य व कमालीच्या संकुचित स्वभावाचे होत जातात. त्यांच्याशी संवाद साधणे अवघड होत जाते. असा सभासद हा दुहेरी पातळी वर जगु लागतो. बाहेरच्या साठी काहीही करणार नाही पण आतल्या एखाद्या साठे जान भी हाजिर है, यांचे सर्व प्रेम-मदत अपनो के लिये ( आपल्या संघटनेतला असेल तरच) बाहर वाले जाओ भाड मे. असे व्हावे यासाठी जाणीवपुर्वक काम केले जाते. कारण सभासद जेवढा आयसोलेटेड होतो तेवढ्याच प्रमाणात तो संघटने वर डिपेंड होत जातो. सभासदाचा बाहेरच्या जगाशी जो नॉर्मल संबध असतो तो तुटत जातो त्याचे फार दुरगामी परीणाम अशा सभासदावर होतात.
१०- सभासदा चा मेंदु निर्मल-स्वछ-चकचकीत करणे ( ब्रेनवॉश)
या बद्द्ल तर काय बोलावे बस नाम ही काफी है. याच्या असंख्य मेथड निर्माण केलेल्या आहेत.यात सभासदांच्या सारासार विवेका चा अक्शरशः चुराडा केला जातो. यावर टंकुन टंकुन बोट तुटुन जातील म्हणुन एक आळशी पणा करतो या लिंक्स तुम्हाला देतो मग तुम्ही तुमच काय ते बघुन घ्या बुवा मी आता थांबतो
http://www.cultwatch.com
www.culteducation.com

आणि एक राहील..
मी काही या विषयातील अधिकारी माणुस नाही जे काय माझ्या अनुभवा-वाचना ने थोडेफार आकलन झाले ते तुमच्या बरोबर शेअर केले इतकेच यात उणिवा चुका असु शकतील जाणकारांनी सुधारुन दील्यास आनंद होइल आभार आणि चुकासांठि माफी अगोदरच मागुन मोकळा होतो.

प्रतिक्रिया

खटपट्या's picture

21 Oct 2013 - 11:51 am | खटपट्या

प्रचंड सहमत !!!!

हे नियम लावले तर जगातला दुसर्‍या क्रमांकाचा धर्म कल्ट ठरेल काय? मागे कुठेतरी "जैन धर्म हा सुद्धा कल्ट आहे" अश्या अर्थाचा लेख वाचल्याचं स्मरत आहे.

विजुभाऊ's picture

22 Oct 2013 - 2:39 am | विजुभाऊ

बहुतेक धर्म हे कल्टच असतात. ते तुमचे मानसीक / व्यावसायीक शोषण करतात.
जे धर्मांध असतात ते तर शोषीत असतात. तन मन धन सर्वांचे शोषण होते हे त्याना उमगत नाही.
कुटुंबाची वाताहात झाल्या नंतर किंवा कदाचित मेल्यानंतर देखील त्याना उमगत नाही.
उदा: सावता माळी , तुकाराम , ज्ञानेश्वर , रामदास स्वामी , ओसामाबीन लादेन , संपूर्ण अफगाणीस्थान देश ,मोहम्मद अट्टा , कसाब हे सारे धार्मीक कल्टचे शोषीत आहेत. धर्मावरील श्रद्धेपुढे त्यानी स्वतःचे समाजाचे कुटुंबाचे जीणेदेखील ओवाळून टाकले.

प्रकाश घाटपांडे's picture

22 Oct 2013 - 4:20 pm | प्रकाश घाटपांडे

लेख आवडलाच.
संघटनेत किती अवमान झाला तरी तो म्हणत राहतो कि मी सच्चा ........ आहे. बर्‍याचदा तो एखाद्या कल्ट मधून बाहेर पडलाच तर बाकीचे त्याला टोचून टोचून बेजार करतात. त्यामुळे बाहेर पडायचे दरवाजे बंद. इतके वर्ष त्याने त्या कल्ट मधे काम केलेल असत त्यामुळे त्याची अवस्था अशी होते कुत्ता न घर का न घाट का |

मन१'s picture

23 Oct 2013 - 7:35 am | मन१

सहमत. पण आता हरेकजण "कल्ट कसे वाईट आहेत" वगैरे वगैरे बोलू लागेल. स्वतः एखाद्या कल्टचा भाग असल्यासारखचं.
चालायचच. माझे एक परिचयतील गृहस्थ कित्येकदा स्वतः चष्मा घातल्याचं विसरतात . आणि शोधून हैराण होतात चष्मा. शोअधताना त्यांना बर्‍याचदा इतरांचे चष्मे सापडातात; स्वतःचा मात्र डोळ्यावर तसाच्व!
इथेही तसेच होताना दिसते.