जराजर्जर म्हातारपण ....

मुक्त विहारि's picture
मुक्त विहारि in काथ्याकूट
19 Oct 2013 - 8:28 am
गाभा: 

मागच्या आठवड्यात एक ओळखीची व्यक्ती देवाघरी गेली.थोडे वाईट वाटले पण का कुणास ठावूक
आनंद जास्त झाला.खरे तर गेलेल्या व्यक्ती विषयी असे बोलू नये, पण खरेच वाटले की सुटली बिचारी..काहीतरी ९०/९२ वय असेल..कुणी मोजलंय…

८५ ओलांडली आणि त्यांना लकवा झाला, पुढची ५/७ वर्षे अंथरुणालाच खिळून होती.रोज देवाची पार्थना करायची की मला घेवून चल.पण देव काही प्रसन्न होत न्हवता..परवा झाला.....

मागच्या भेटीत इच्छा नसतांना पण त्यांच्या भेटीला जावे लागले.माझा स्वभाव माणूस घाणा नाही आहे पण महिनोन महिने आजारी असलेल्या माणसांना भेटायला जायला नको वाटते.त्यांच्या पण काही अडचणी असतात.
पण अशीच एक जनरीत म्हणून जावे लागते.

सुदैवाने बायको समजूतदार असल्याने तिने आधीच भेटीची वेळ ठरवली.त्यांच्या नातीनेच फोन उचलला होता त्यामुळे वेळ ठरवतांना काही अडचण नाही आली.बऱ्याच वेळा समान वय आणि त्यामुळे येणारे समान विचार, सुसंवाद साधायला मदत करतात…

भेटायला गेलो.घरात इन-मीन चारच माणसे.आजारी व्यक्ती, तिची सून, नात आणि नातीचा मुलगा.
घर स्वच्छ आणि नीट-नेटके होते तरी,घरावर एक उदास छाया पडलेली दिसत होती.निदान मला तरी तसे जाणवत होते.

खूप दिवसांनी त्या घरी गेल्याने हळूहळू जुन्या आठवणी निघाल्या.आणि मग तिच्या आठवणी मनात रुंजी घालायला लागल्या…

सदैव हसतमुख आणि टवटवीत असलेला चेहरा आता दुर्मुख आणि मलूल दिसत होता.घरातील सतत असलेला गोतावळा आणि गडबड गोंधळ पण कुठेच दिसत न्हवत.ज्या हाताने एके-काळी सर्व आळीला पुरण-पोळी खायला घातली तोच हात आता स्वत:ची औषधाची गोळी पण घेवू शकत न्हवता आणि सलाईन व इंजेक्शनच्या सुयांनी खिळखिळा झाला होता.वेळ-प्रसंगी स्वत:च्या आईला पाठीवर घेवून दोन-दोन जिने चढणारे पाय आता चाकाच्या खुर्चीत पण बसायला नकार देत होते.जे कान परसदारी पडलेले पान पण ऐकू शकत होते ते आता कानाचे यंत्र लावून पण ऐकायला मदत करत न्हवते.सगळी गात्रे शिथिल तर झाली होतीच पण आता शरीर पण परावलंबी झाले होते.

सुदैवाने घरचे ठीक होते म्हणून आर्थिक अडचण जास्त न्हवती पण सामाजिक अडचण मात्र खूप होती.गेली कित्तेक वर्षे सगळे कुटुंब ना कुठे एकत्र सहलीला गेले ना ही सिनेमाला.घरातील एक आजारी व्यक्ती संपूर्ण घर असे दुळे-पांगळे केलेले त्या व्यक्तीला पण आवडले नसते.पण म्हातारपण आणि आजारपण ह्यामूळे ती व्यक्ती हतबल झाली होती.

ती मंडळी पण आधीचा थोडा संकोच दूर करून मनापासून गप्पा मारू लागली…बोलतांना चुकून पण आजारी व्यक्तीचा उल्लेख मनात असूनही ओठावर आणला नाही.घरी आलो आणि थोड्या वेळाने त्यांच्या नातीचा फोन आला.आमची भेट तिला आणि तिच्या आईला आवडली असे म्हणाली.इतर मंडळी फक्त आजारपण आणि निरनिराळे औषधोपचार ह्या विषइच बोलत असल्याने आणि आम्ही कटाक्षाने तेच टाळल्याने तर आनंद झालाच, शिवाय त्यांच्या सेवा-सुश्रुतेच्या काळात आम्ही तिथे नसल्याने त्यांना जास्त समाधान वाटले.

रात्री जेवण झाले आणि शतपावली करतांना मनात विचार आला, की अरे हे तर आपल्या बाबत पण नक्कीच होऊ शकते.आज आपल्याकडे आर्थिक पाठबळ आणि मनुष्यबळ आहे पण उद्या हे दोन्ही नसेल तर काय?बरे तसेही ७५ वय ओलांडले की आपण कुठेच शारीरिक मदत करू शकत नाही.बरं आपण तर काही साधू-संत नाही की जेणेकरून देव आपल्याला स्वत: घ्यायला येईल

भेंडी हे असले परावलंबी जीवन जगण्यापेक्षा आणि इतरांना वेठीस धरण्यापेक्षा, मग आपण स्वत:, आपण होवून देवाघरी हसत-मुखाने आणि सर्वांचा मजेत निरोप घेवून गेलो तर.....

चला एक ध्येय मिळाले.

आता निवृत्ती नंतर इच्छा मरणाचा कायदा लवकरात लवकर मंजूर व्हावा ह्यासाठी प्रयत्न करायच्या मागे लागावे

प्रतिक्रिया

स्पंदना's picture

19 Oct 2013 - 9:10 am | स्पंदना

अवघड आहे मुवि. सुटता सुटत नाही संसारमाया.
डोळ्यासमोर मरण दिसत असतानासुद्धा ते स्विकारणे कठिण जाते, मग अस मागुन मरण स्विकारता येइल का?
देव जाणे. मात्र तुमचा आजार्‍याला भेटायला जातानाचा पुर्व-विचार आवडला. माझ्या आत्या, ज्या रुइया मध्ये प्रोफेसर होत्या, त्या अश्याच किती वर्षे बरं? ९४ ते ९८ हो चार वर्षे...बोलण नाही, हलण नाही, एव्हन स्वतःच स्वतः गिळण सुद्धा नाही. काय अवस्था होते घराची. आम्ही जायचो भेटायला. काही बर वाटायच नाही.

मुक्त विहारि's picture

19 Oct 2013 - 9:24 am | मुक्त विहारि

एका ठराविक वया नंतर मुला मुलींचे संसार उभे राहीलेले असतात.

त्यांना आई-वडील हवे असतात.पण आजारी आई-वडीलांची सेवा करायची ही आपले करीयर सांभाळायचे? ह्या दोलायमान स्थितीमुळे दोन्ही ठिकाणी ओढाताण होवू शकते.अर्थात हे पण थोडेसे एकतर्फी आहे.

निदान माझ्या घरात मनुष्य बळाचा त्रास नाही.माझी बायको नौकरी करत नसल्याने आणि मुले पण मदत करण्या इतकी मोठी असल्याने माझ्या आई-वडीलांना आणि सासूला तो त्रास नाही.पण उद्या माझी मुले परदेशी किंवा परगावी गेली आणि मला जर अंथरूणा वर खिळून राहण्याचा आजार झाला तर?

मला स्वतःला कुणाचीही शारीरीक किंवा आर्थिक मदत घ्यायला आवडत नाही.पण माझ्या अशा स्थितीने माझ्या मुलांची ओढाताण होणारच. मग मी शांतपणे म्रुत्युला का स्वीकारु नये?

आत्महत्या ही पळवाट आहे आणि
इच्छा मरण हे सर्वतः वेगळे आहे...

स्पंदना's picture

19 Oct 2013 - 9:29 am | स्पंदना

आत्महत्या ही पळवाट आहे आणि
इच्छा मरण हे सर्वतः वेगळे आहे...

हे माहिती आहे. पण कल्पना करवत नाही. मन तस कमकुवत आहे.

मुक्त विहारि's picture

19 Oct 2013 - 9:53 am | मुक्त विहारि

मान्य.सहमत...

पण निदान माझ्या पुरते तरी, मुलांनी माझी सेवा करण्यासाठी त्यांच्या करीयर कडे दुर्लक्ष करू नये असे वाटते.बायको करेलच. पण नेमके त्याच वेळी ती पण थकली असेल तर.वेळ काही सांगून येत नाही.इतरांसाठी आपण अडचण होण्यापेक्षा आपण स्वतः हूनच दूर झालेले बरे.

आणि ह्या आधी पण अशा इच्छा मरण्याच्या कथा आपल्या कडे होत्याच की.(अति अवांतर. महाभारतात पण गांचारी,कुंती, ध्रुतराष्ट्र यांनी इच्छा मरण स्वीकारले.तर रामायणांत श्रीरामाने पण इच्छा मरण स्वीकारले. असे ऐकुन आहे.)

डॉ सुहास म्हात्रे's picture

19 Oct 2013 - 10:56 am | डॉ सुहास म्हात्रे

लेखातिल म्हणणे पटले. इच्छामरण हा खरं तर मानवाधिकार असायला हवा. मात्र त्याच्या आडून स्वार्थासाठी "इच्छामरण देण्याचे" प्रकार होण्याची शक्यता आहे... हीच त्याबाबत कायदा न येण्याची एक महत्वाची मेख आहे.

आणखी कारण म्हणजे "जीवन-मरण देवाची देण आहे... मानवाला त्यात हस्तक्षेप करण्याचा हक्क नाही" ही बहुतेक सर्व ताकदवान धार्मिक गटांची समजूत आहे. हेच कारण (म्हणजे हे कारण मान्य असणार्‍या मतदारांची संख्या) पाश्चिमात्य देशांत इच्छामरण कायदा आणण्यात मोठा अडसर आहे. भारतात त्याचं कुठल्या दिशेने राजकारण केलं जाईल हे आजच्या घडीला ब्रम्हदेवालाही सांगणे कठीण आहे :)

माफ करा! तुमच्या लेखातील विचारांशी अजिबात सहमत नाही. आणि असे विचार कुणीही मनात आणू नयेत असेच मला वाटते.
मी तरी माझ्या घरातील कुणाही लहानथोर व्यक्तीबाबत असे विचार करू शकत नाही.

महाभारतातील धृतराष्ट्र, गांधारी आणी कुंती यांनी वानप्रस्थाश्रम स्विकारला होता. आणि जंगलाला लागलेल्या आगीत त्यांचा मृत्यु झाला.

श्रीरामाने शरयू नदीत प्रवेश केला अशी कथा आहे. म्हणजे नक्की काय केले याबद्दल वेगवेगळे तर्क आहेत.
आणि श्रीरामाचे चरित्र आणी त्याने जन्मभर जपलेली तत्त्वे पाहता, इच्छामृत्यु सारखी पराभूत कल्पना तो स्विकारेल असे वाटत नाही.

***

मुक्त विहारि's picture

19 Oct 2013 - 11:12 am | मुक्त विहारि

"माफ करा! तुमच्या लेखातील विचारांशी अजिबात सहमत नाही. आणि असे विचार कुणीही मनात आणू नयेत असेच मला वाटते.मी तरी माझ्या घरातील कुणाही लहानथोर व्यक्तीबाबत असे विचार करू शकत नाही."

आपण सुदैवी आहात आणि सध्या मी पण सुदैवी आहे.

पण समजा उद्या माझ्याकडे

१. पैसा नाही
२. मुलांकडे पैसा नाही किंवा मुलांचा कुठलाच आधार नाही
३. नातेवाईक जवळ नाहीत किंवा असलेच तर मदतीला तयार नाहीत.
४. शारीरीक बळ नाही....

तर अशावेळी मी कुठे जावू?

त्यापेक्षा जर मी शांतपणे नीट निर्णय घेवून चार-चौघांना सांगून.देवाघरी गेलो तर त्यात वाईट काय?

देशपांडे विनायक's picture

19 Oct 2013 - 11:16 am | देशपांडे विनायक

गेली १३ वर्षे या विषयावर विचार करत आहे . वडील गेल्याचे निमित्य झाले . वडील वयाच्या ९२ वर्षापर्यंत ठणठणित होते . मधुमेह , रक्तदाब असले त्रास नव्हते. bathroom मध्ये पडले. कमरेचे हाड मोडले आणि त्यांनी अंथरूण धरले . सर्व विधी अंथरुणात करण्यासाठी त्यांना आम्हा मुलांची मदत घेणे नको नकोसे होत होते . एक दिवस मला म्हणाले '' तुझे इतके डॉक्टर मित्र आहेत . त्यांच्याकडून मला एखादी गोळी दे ज्यामुळे मी विनात्रास हा देह सोडू शकेन . माझं आयुष्य समाधानात गेल आहे . माझी कुणाबद्दल कसलीच तक्रार नाही . आता मला जगावेसे वाटत नाही ''
मी त्यांना म्हणालो '' तुम्ही समाधानात आहात हे मी जाणतो पण या गोष्टीकडे दुर्लक्ष करून माझ्याकडे
अशा गोळ्याची मागणी करणारे कितीतरी लोक येतील आणि त्या गोळ्या गैर उद्देशाने वापरल्या जातील याची भीती मला वाटते .म्हणून मी तुम्हाला गोळी देणार नाही ''
इच्छा मरणाचा कायदा केला तर त्याचा गैर उपयोग पाहताना आपले मरण ओढवेल !!
आयुष्यभर कायदा पाळणाऱ्याने मरणासाठी कायदा मोडणे हेच दर्शवेल कि कायदा मोडण्याची ताकद असताना समाज स्वाथ्य करिता त्याने कायदा पाळला .
अशा माणसाबद्दल माझ्या मनात आदर असेल .

मुक्त विहारि's picture

19 Oct 2013 - 11:30 am | मुक्त विहारि

"आयुष्यभर कायदा पाळणाऱ्याने मरणासाठी कायदा मोडणे हेच दर्शवेल कि कायदा मोडण्याची ताकद असताना समाज स्वाथ्य करिता त्याने कायदा पाळला."

म्हणूनच म्हणालो की कायदा हवा....

"इच्छा मरणाचा कायदा केला तर त्याचा गैर उपयोग पाहताना आपले मरण ओढवेल !!"

हे पण मान्य.पण मग असे काहीतरी केले पाहिजे की त्या कायद्याचा कुणी गैर वापर पण करू नये.मला जसे सुचत आहे तसे देत आहे.

१. अर्ज घ्या.
२. सिव्हिल सर्जनची स्वाक्षरी घ्या.(गंभीर आजारपण.)
३. पोलीस अधिक्षकाची स्वाक्षरी घ्या.
४. जिल्हा कलेक्टर बरोबर अर्जदाराची मुलाखत घ्या.आणि त्याचे व्हिडियो रेकॉर्डिंग करा.जेणे करून पुढचा त्रास होणार नाही.
५. वर्तमान पत्रात जाहीरात द्या.

आज काल एका महिन्याच्या नोटीसवर आयुष्य ठरते.मग सगळे आयुष्य भोगल्यावर एका महिन्याच्या नोटीसवर देवाघरी का नको जायला?

पण आता उताराची गाडी, शरीरच थकणार... त्या परिस्थितीत मनही तरतरीत राहिल असे नाही. आप्तस्वकियांची गंभीर आजारपणे जवळुन बघितली आहेतच. खडतरतेची भिती नाही तरीही असहाय्य अवस्थेची भिती वाटते. शरिराचा भार असह्य असेल व आर्थिक परिस्थिती अनुकुल नसेल तर इछ्चामरण हे रुग्णाच्या द्रुष्टिने वरदान ठरेल असे वाटते. निसर्ग तसाही क्रुर आहेच व सर्व्हायवल ऑफ फिटेस्टचा नियम यात कुठेही तोडलाही जात नाहिये.

मुक्त विहारि's picture

19 Oct 2013 - 1:13 pm | मुक्त विहारि

व आर्थिक परिस्थिती अनुकुल नसेल तर ......

फार बिकट अवस्था होते हो.

खूप जवळून आणि अस्वस्थ करणारे किस्से(?) बघीतले आहेत.

मायबाप सरकार..हो सरकारच... सुखाने जगू पण देत नाही(कारण पैसा नाही,फुकट औषधोपचार नाही)... आणि कायदा नसल्याने मरू पण देत नाही...

प्रकाश घाटपांडे's picture

19 Oct 2013 - 12:52 pm | प्रकाश घाटपांडे

होय इच्छामरणावर नेहमी चर्चा होतात पण तो अप्रिय विषय असल्याने बर्‍याचदा टाळला जातो. मिपावर हा विषय एकदा घेतला होता
परमसखा मृत्यू : किती आळवावा

मुक्त विहारि's picture

19 Oct 2013 - 1:08 pm | मुक्त विहारि

माफ करा,

मला त्याची माहीती न्हवती...

मग मी माझा धागा उडवायला सांगू का?

प्रकाश घाटपांडे's picture

19 Oct 2013 - 1:20 pm | प्रकाश घाटपांडे

मग मी माझा धागा उडवायला सांगू का?

छे छ! अहो तस नाही. मी तुमच्या लेखाला पूरक अशी माहिती आपल्या व वाचकां पर्यंत पोहोचवली. एखाद्या विषयावर अनेक धागे असू शकतात. प्रत्येक विषयवार अगोदर कुणी लिहिले आहे का हे तपासून मगच लिहायचे झाल्यास ते व्यावहारिक दृष्ट्या शक्य नाही.आणि त्याची गरज ही नाही.

मुक्त विहारि's picture

19 Oct 2013 - 1:33 pm | मुक्त विहारि

"परमसखा मृत्यू : किती आळवावा..."

हा लेख माझ्या लेखापेक्षा जास्त सखोल आहे.लेखाची लिंक दिल्याबद्दल धन्यवाद,,,

इच्छामरण ह्या संकल्पनेला माझा पाठींबा आहे. कायदा झाला आणि वापरायची गरज पडली तर नक्की वापरेन.

प्रकाश घाटपांडे's picture

19 Oct 2013 - 1:29 pm | प्रकाश घाटपांडे

या निमित्ता सुखांत या चित्रपटावर चर्चा झाली होती त्याचीही आठवण झाली.

साती's picture

19 Oct 2013 - 2:39 pm | साती

माझे मत इच्छामरणाच्या बाजूने आहे परंतू त्याची अंमलबजावणी कशी करावी याबद्दल साशंक आहे.
माझ्या पंच्याण्णव वर्षांच्या आजीनेही असेच खुब्याच्या हाडाच्या फ्रॅक्चरच्या ऑपरेशननंतर मला म्हटले.
पण डॉक्टर असूनही मी तिची इच्छा पूर्ण करण्यास असमर्थ होते.
शेवटी प्रायोपवेशनाने तिने एका आठवड्यात देह ठेवला.अर्थात तिच्या आजारी अवस्थेमुळे एका आठवड्यात तिला हे शक्य झाले

मुक्त विहारि's picture

19 Oct 2013 - 4:28 pm | मुक्त विहारि

८ ते १० दिवस पुरतीलही.

पण ७५ ते ८० असे वय असणार्‍यांनी काय करावे?

माझ्या ९८ वर्षाच्या आजोबांनी एक महिना प्रायोपवशन केले. म्हणजे एक महिना जेवण सोडले,मग शेवटी पाणीही सोडले. त्यांना १०० वर्षे जगायचे नव्हते,

वयाचा पासष्ठीनंतर आपल्यावर अवलंबून असलेल्यांची सोय करून जीवन सम्पवावे. उगाच खीतपत इतरांच्या करुणेवर जगण्यापेक्षा स्वतःच्या इच्छेने जीवन संपवलेले चांगले. सुखाने जगता येत नसेल तर निदान सुखाने मेलेले बरे.

खटपट्या's picture

20 Oct 2013 - 2:56 am | खटपट्या

६५ म्हणजे खूप लवकर होतेय. ६५ चे आजी आजोबा मस्त गप्पा मारत फिरत असतात.

चौकटराजा's picture

20 Oct 2013 - 9:06 am | चौकटराजा

विजुभौ तुमचा हा प्ल्यान मला जमला तर मी गेल्यानंतरही परत येईन. मग कधीही न केलेली गोष्ट मी करेन....तुमच्या बरोबर तिसर्‍या पेगने मोक्ष गाठीन . मग मोक्ष उतरला की परत निजधामी जाईन .

@ मुवि ,,,धागा अत्यंत गंभीर विषयावर आहे याची जाणीव आहे. माझी आई म्हणायची 'मरायच्या दिवसा" ला पुण्यतिथी
का म्हणतात ? आयुष्यभराचे पुण्य तुम्ही कसे मरता यावर ठरते."

मुक्त विहारि's picture

20 Oct 2013 - 3:48 pm | मुक्त विहारि

तुमची झेप आम्ही आज ओळखत नाही.

डोंबिवलीच्या मुली फार हुषार आहेत.

धागा अजिबात गंभीर नाही आहे.

वैयक्तिक द्रुष्ट्या मला इच्छामरण करणे फार सोपे आहे.जन्म जरी माझ्या हातात नसला तरी म्रुत्युची वेळ मी ठरवली आहे.त्यासाठी कुणालाही कायद्याचा पेच पडता कामा नये आणि त्यांच्या वेळेचा,करियरचा सत्यानाश होवू नये म्हणून योग्ये ती काळजी आत्ता पासूनच घेत आहे.

पण.....

ज्यांना कायद्याची मदत लागेल त्यांचे काय? ह्या साठीच हा धागा काढला..

थोडक्यात लष्कराच्या भाकर्‍या भाजतोय असे म्हणाना....

ज्या व्यक्तीला त्यासाठी कायद्याचा आधार घ्यावाच लागत असेल त्यांचे काय?

चित्रगुप्त's picture

20 Oct 2013 - 7:30 pm | चित्रगुप्त

ज्ञानेश्वरांनी जी समाधी घेतली, त्याविषयी तांत्रिक माहिती आहे का उपलब्ध?
म्हणजे नेमके काय, कसे केले वगैरे?
माझा याविषयी एक तर्क आहे, (अर्थातच काहीही अनुभव नाही), तो असा:
श्वसनक्रिया ही फुफ्फुसांच्या आकुंचन-प्रसरणाने चालते, आणि ते आकुंचन-प्रसरण उदरपटलाच्या स्वयंप्रेरित हालचालीमुळे घडते.
योग, प्राणायम इ. च्या अभ्यासाने हळूहळू या उदरपटलाच्या हालचालीवर ताबा मिळवता आला, आणि त्याची हालचाल थांबवता आली, तर झाले काम.
अर्थात हे अतिशय अवघड असणार. तर याबद्दल कुणाला काही माहिती?

प्रकाश घाटपांडे's picture

20 Oct 2013 - 7:50 pm | प्रकाश घाटपांडे

श्वसनक्रिया ही फुफ्फुसांच्या आकुंचन-प्रसरणाने चालते, आणि ते आकुंचन-प्रसरण उदरपटलाच्या स्वयंप्रेरित हालचालीमुळे घडते.

याचा जिवंत समाधी प्रकरणाशी काही संबंध असू शकतो कि नाही ते माहित नाही पण यावर आज डॉ राजीव शारंगपाणी यांचा लोकसत्तातील लेखात थोडा उल्लेख आहे.

चित्रगुप्त's picture

20 Oct 2013 - 10:24 pm | चित्रगुप्त

म्हातारा बहु जाहलो, कवणही त्राता नसे भेटला
भाताची तजवीज तेच उदरी भाता गमे पेटला
हातामाजि नसेच येक कवडी हा ताप आता हरी
दातारा मज वाचवी सदय हो माता पिता तू हरी

नेदरलँडचे माजी पंतप्रधान आणि त्यांच्या पत्नी यांनी स्वीकारलं स्वेच्छामरण! एकमेकांचे हात हातात घेत जगाचा निरोप

https://www.loksatta.com/desh-videsh/former-dutch-pm-and-wife-die-hand-i...

भारतात पण, हा कायदा यायला हवा...

सुधीर कांदळकर's picture

16 Feb 2024 - 8:26 pm | सुधीर कांदळकर

अन्नपाण्याचा त्याग करून देह सोडला होता. मी देखील तसेच करणार आहे. सामान्यांचा प्राण आठवडाभरात जातो. वयस्करांच्या नैसर्गिक मृत्यूची फार चिकित्सा कुणी करीत नाही. माझे वय ७१. सुया आणि नळ्या लावून जगणे मला नामंजूर आहे. आजारी पडलो आणि जर माझी शुद्ध गेली तर इस्पितळात न्यायचे नाही. थेट स्मशानात असे सार्‍या निकटवर्तियांस बजावून ठेवले आहे.

कर्नलतपस्वी's picture

16 Feb 2024 - 9:44 pm | कर्नलतपस्वी

इच्छामृत्यु कधीही चांगला.

प्रत्येक गोष्टीला एक्स्पायरी डेट असते मग माणसाला का नको.

आखेरच्या वळणावर यावा
मंद सुगंधी असा फुलोरा
थकले पाऊल सहज उठावे
आणी सरावा प्रवास सारा

-आरती प्रभू

किंवा....

खुशाल गळता गळा दळांनो
हसत सरा माझीया क्षणांनो
बघे क्षणांच्या पानगळीत मी
अक्षयपण उमले.....

म्हणून खंत नाही

झुळूक आणखी एक
आणखी एक पान गळले

मी तयार आहे पण तो तयार आहे का?

कर्नलतपस्वी's picture

16 Feb 2024 - 9:44 pm | कर्नलतपस्वी

इच्छामृत्यु कधीही चांगला.

प्रत्येक गोष्टीला एक्स्पायरी डेट असते मग माणसाला का नको.

आखेरच्या वळणावर यावा
मंद सुगंधी असा फुलोरा
थकले पाऊल सहज उठावे
आणी सरावा प्रवास सारा

-आरती प्रभू

किंवा....

खुशाल गळता गळा दळांनो
हसत सरा माझीया क्षणांनो
बघे क्षणांच्या पानगळीत मी
अक्षयपण उमले.....

म्हणून खंत नाही

झुळूक आणखी एक
आणखी एक पान गळले

मी तयार आहे पण तो तयार आहे का?

कुमार१'s picture

18 Feb 2024 - 9:26 am | कुमार१

इच्छा मरणाचा कायदा लवकरात लवकर मंजूर व्हावा.

चित्रगुप्त's picture

18 Feb 2024 - 12:46 pm | चित्रगुप्त

'मेडिकल विल' नामक एक इच्छापत्र असते असे ऐकले आहे. माझ्या मामीने केले होते. याविषयी कोणी सविस्तर माहिती दिली तर उपयोगी होईल.

चौथा कोनाडा's picture

20 Feb 2024 - 5:30 pm | चौथा कोनाडा

" मेडिकल वील" हे प्रथमच वाचण्यात आले . आंतरजालावर शोधताना थेट माहिती सापडली नाही पण खालील एक फॉर्म सापडला.
या फॉर्म नुसार या फॉर्मसाठी रीतसर शासकीय नोंदणी करणे (रजिस्ट्रेशन) साक्षीदार (विटनेस) हे गरजेचे आहे.

*********
मी एक प्रौढ, सुदृढ मनाचा आहे आणि माझ्या स्वतःची ही ‘घोषणा’ करत आहे
इच्छा, म्हणजे स्वेच्छेने आणि काळजीपूर्वक विचार केल्यानंतर.
जर वेळ आली तर मी यापुढे माझ्या संदर्भात निर्णय घेण्यात भाग घेऊ शकत नाही.

वैद्यकीय उपचार, या 'घोषणा'मध्ये माझ्या अंतिम अभिव्यक्तीचा समावेश असेल
इच्छा सर्व संबंधितांनी या शुभेच्छा विचारात घ्याव्यात ही विनंती

माझ्या आयुष्याबाबत कोणताही वैद्यकीय निर्णय घेण्यापूर्वी. कोणत्याही वेळी, मी:

1. असाध्यआजाराच्या टप्प्यावर पोहोचणे आणि वाजवी नसताना कोमात जाणे
चेतना परत येण्याची अपेक्षा, किंवा
2. रोगाची स्थिती आहे ज्यापासून मला वाजवी अपेक्षा नाही
जीवनाच्या स्वीकार्य गुणवत्तेसह पुनर्प्राप्त करणे
3. कोणतीही वाजवी अपेक्षा न करता सतत वनस्पतिवत् होणारी अवस्था गाठा
लक्षणीय संज्ञानात्मक कार्य पुन्हा प्राप्त करणे.

नंतर पुढील पावले उचलणे आवश्यक आहे. तीन डॉक्टरांचे पॅनेल तयार करावे अशी माझी विनंती आहे
प्रशासकाद्वारे योग्य ते अनुभवी तज्ञ आणि नेमावेत.
मला उपचारासाठी दाखल केलेल्या हॉस्पिटलचे प्रमुख तेव्हा त्यांचे मत असावे

पुढील तीनपैकी कोणत्याही/सर्व परिस्थितीची पुष्टी झाल्यास:
मग मी पुढील जीवन जगण्यास नकार दिला असे गृहित धरले पाहिजे
खाली सूचीबद्ध केल्याप्रमाणे उपचार टिकवून ठेवणे. यापैकी कोणतेही उपाय आधीच सुरू झाले आहेत,
ते उपचार बंद करावेत

1. इंट्राव्हेनस द्रवपदार्थ आणि प्रतिजैविकांसह औषधे
2. नासोगॅस्ट्रिक ट्यूब किंवा गॅस्ट्रोस्टोमीद्वारे कृत्रिम आहार
3. डायलिसिस
4. कृत्रिम श्वसन
5. केमोथेरपी
6. कार्डिओ-पल्मोनरी पुनरुत्थान

इतर काही असल्यास : (कृपया हाताने लिहा)
या ‘घोषणापत्रा’चा माझ्या कुटुंबातील सदस्यांनी सन्मानाने स्वीकार करावा अशी माझी विनंती आहे

वैद्यकीय किंवा शस्त्रक्रिया नाकारण्याच्या माझ्या कायदेशीर अधिकाराची अंतिम अभिव्यक्ती म्हणून डॉक्टर
अशा नकाराचे परिणाम स्वीकारणारे उपचार.

माझ्या नियमित डॉक्टरांना कळवले ………………………………………..
या घोषणेचे पालन सुरक्षित करण्यासाठी, शक्य तितके वैद्यकीय निर्णय घेणे
माझ्या वतीने वेळोवेळी आवश्यक असेल, मी याद्वारे खालीलप्रमाणे नियुक्त करतो
माझे सरोगेट निर्णय घेणारे/चे किंवा हेल्थ केअर पॉवर ऑफ ॲटर्नी. S/तो/ते
ही जबाबदारी स्वीकारली आहे. मी याद्वारे माझ्या मुखत्यारपत्रात निहित आहे
वैद्यकीय माहिती मिळवण्याची, निर्णय घेण्याची आणि माझ्यावर कारवाई करण्याची शक्ती
या ‘घोषणा’ मध्ये व्यक्त केलेल्या शुभेच्छांच्या संदर्भात, तरीही
इतर कोणत्याही व्यक्तीचे कोणतेही विरुद्ध विचार.

****** *** ***

जवळचे मित्र किंवा नातेवाईकांनी असे इच्छापत्र केले आहे असे ऐकण्यात / पाहण्यात नाही.

तज्ज्ञ / अनुभवी मिपाकरांनी या व्यक्त व्हावे !

उपाशी बोका's picture

22 Feb 2024 - 12:37 pm | उपाशी बोका

माझे Advance directive पुढीलप्रमाणे आहे, ते शब्दशः इथे देत आहे. कुणाला वापर करायचा असेल तर करू शकता. (योग्य तो बदल करून अथवा न करता).

Dear Medical Advocate,

If you’re reading this because I can’t make my own medical decisions, please understand I don’t wish to prolong my living or dying, even if I seem relatively happy and content. As a human being who currently has the moral and intellectual capacity to make my own decisions, I want you to know that I care about the emotional, financial, and practical burdens that dementia and similar illnesses place on those who love me. Once I am demented, I may become oblivious to such concerns. So please let my wishes as stated below guide you.

• I wish to remove all barriers to a natural, peaceful, and timely death.
• Please ask my medical team to provide Comfort Care only.
• Try to qualify me for hospice.
• I do not wish any attempt at resuscitation. Ask my doctor to sign a do-not-resuscitate order and order me a do-not-resuscitate bracelet from the Medic Alert Foundation.
• Ask my medical team to allow natural death. Do not authorize any medical procedure that might prolong or delay my death.
• Do not transport me to a hospital. I prefer to die in the place that has become my home.
• Do not intubate me or give me intravenous fluids. I do not want treatments that may prolong or increase my suffering.
• Do not treat my infections with antibiotics, give me painkillers instead.
• Ask my doctor to deactivate all medical devices, such as defibrillators, that may delay death and cause pain.
• Ask my doctor to deactivate any medical device that might delay death, even those, such as pacemakers, that may improve my comfort.
• If I’m eating, let me eat what I want, and don’t put me on “thickened liquids”, even if this increases my risk of pneumonia.
• Do not force or coax me to eat.
• Do not authorize a feeding tube for me, even on a trial basis. If one is inserted, please ask for its immediate removal.
• Ask to stop, and do not give permission to start, dialysis.
• Do not agree to tests whose results would be meaningless, given my desire to avoid treatments that might be burdensome, agitating, painful, or prolonging of my life or death.
• Do not give me a flu or other vaccine that might delay my death, unless required to protect others.
• Do keep me out of physical pain, with opioids if necessary.
• Ask my doctor to fill out the medical orders known as POLST (Physician Orders for Life-Sustaining Treatment) or MOLST (Medical Orders for Life-Sustaining Treatment) to confirm the wishes I’ve expressed here.
• If I must be institutionalized, please do your best to find a place with access to nature, music or art workshops, if I can still enjoy them.

चौथा कोनाडा's picture

21 Feb 2024 - 5:57 pm | चौथा कोनाडा

ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर आणि रोहिणी हट्टंगडी भुमिका असलेला सिनेमा 'आता वेळ झाली' प्रदर्शित होणार आहे.

सिनेमाचा विषय : "दया दाखवून मरण 'देता' का येत नाही?"

या विषयी चर्चा इथे : https://www.youtube.com/watch?v=04aBOaRY3P8

चित्रगुप्त's picture

22 Feb 2024 - 5:26 am | चित्रगुप्त

बापरे. या 'मेडिकल विल' चा मराठी अवतार वाचून झीट आली आहे.
इंग्रजीत असे एक 'लिव्हिंग विल डिक्लरेशन' सापडले, त्याचा दुवा:
https://dph.illinois.gov/content/dam/soi/en/web/idph/files/forms/living-...

आणखी एक विसृत माहिती देणारा दुवा:
https://www.findlaw.com/forms/resources/estate-planning/living-will/samp...

असा विचार अंमलात आणण्या अगोदर एक करून पहा. (सध्या बसचे तिकिट काढण्याइतपत ऐपत आणि चालण्याची थोडी ताकद एवढे गृहित धरतो.)

भारतातील मोठे संत होऊन गेलेल्या कोणत्याही स्थानी जावे.
तिथे थोडी चौकशी करावी. जमेल तसे तिथले काम करावे. तिथलाच प्रसाद निर्वाहाला घ्यावा.
जो जप/ध्यान/साधन सांगितलेले असेल तसे मनापासून करण्याचा प्रयत्न करावा (आपला विश्वास असो वा नसो).
जर तिथे जागा मिळाली तर खोलीत नाही तर तिथेच एखाद्या जवळच्या मंदिरात रात्री झोपावे.

काही महिने असं करण्याचा प्रयत्न करावा.
त्याउपरही आता नको जगायला असा विचार येत असेल तर त्याच गावी प्रायोपवेशन करण्याचा प्रयत्न करावा.

:-)

मुक्त विहारि's picture

22 Feb 2024 - 9:57 pm | मुक्त विहारि

आजारपणामुळे असह्य वेदना होत असतील आणि त्यातून वाचायची सुतराम शक्यता नसेल , तर काय करायचे?

गरीबी आणि दुर्धर आजार एकत्र येणे फार वाईट आणि त्यातून कुणी जिवलग जवळ नसेल तर, नरक यातना... (ह्या केसेस, जवळ जवळ दर आठवड्याला बघत आहे...)

कायदा इच्छामरण देत नाही आणि मृत्यू जवळ करत नाही..

राघव's picture

23 Feb 2024 - 10:03 pm | राघव

म्हणूनच आधी गृहितक सांगितलेले आहे.

आणि तसेही मरायचाच विचार फायनल केलेला असेल तर काय फरक पडतो किती वेदना आहेत, किती रोग आहेत, कोण जवळ आहे/नाही किंवा आणिक कशाने?
इथे मरण्यापेक्षा संतस्थानी मरणे कधीही चांगलेच.

हा पण एक वेगळा पैलू आहे.

वैयक्तिक सांगायचे तर, एकदा का अशी स्थाने प्रसिद्ध झाली की, ह्या ना त्या प्रकारे, बाजार चालू होतो.

त्यामूळे, वेदना रहित आणि त्वरित आलेला मृत्यू आलेला उत्तम, हा माझ्या विचारांचा पैलू.

बाय द वें,

तुमच्या बरोबर वाद विवाद करतांना आनंद झाला.

वेगळे विचार समजले.

बायकोला पण तुमचा प्रतिसाद वाचायला दिला, ती पण तुमच्या विचारांशी सहमत आहे.

इच्छा मरण हवे, असे आम्हा दोघांनाही वाटते. बघू या. पुढे काय करायचे ते. अर्थात, अजून काही वर्षे तरी, इच्छा मरणाची गरज नाही... त्यामूळे, मरण कुठे आणि कशा प्रकारे घ्यायचे? हा प्रश्न तूर्त बाजूला ठेवला आहे...

तसं मी सहसा वादात पडत नाही. पण अगदीच राहवलं नाही म्हणून लिहिलं.

मला आत्मघाताचा विचारच सहन होत नाही.
स्वतः ठाकुर सांगून गेलेयत.. "जो आत्मघात करतो त्याच्या देहाला नारळाच्या एका वाळक्या पानावर टाकून स्मशानात न्यावे आणि जाळून टाकावे.. त्याला कोणतेही पवित्र संस्कार निषिद्ध आहेत. त्याच्यासाठी शोक सुद्धा करू नये इतका तो हीन." स्वतः ठाकुर अत्यंत कोमल हृदयाचे आणि तरिही अशा गेलेल्या व्यक्तीबद्दल ते असे म्हणतात, म्हणजे किती तीव्र भावना असतील त्यांच्या. कितीही वाईट परिस्थिती असली तरी आत्मघाताला ते नाहीच म्हणतात.

मी अगदीच नगण्य तसा तर. वाईट परिस्थिती कुणाची कशामुळे येते आणि तिला तोंड कसे द्यावे हे मला खरंच माहित नाही. पण आजवरच्या स्वानुभवातून एवढे शिकलोय की प्रत्येक घटनेमागे जसे पूर्वकर्म असते, तसेच अशा घटनेतील आपल्या वागणुकीमुळे घडणाऱ्या परिणामांवर पुढील भोगही अवलंबून असतात.

ठाकुरच म्हणतात, "शेताच्या बांधावरून जातांना मुलानं बापाचा हात धरला असल्यास तो पडू शकतो, पण बापानं मुलाचा हात धरला असल्यास बाप असा पडू देत नाही". गुरुची महती आपण पामर काय सांगणार.. स्वत: समर्थ म्हणतात, "आता सद्गुरु वर्णवेना..".

--

बाकी राहिला बाजार माजण्याचा प्रश्न.. तर संतस्थान असं पहावं जिथं सरकारचा तेथील कारभारात हस्तक्षेप नाही. बाकीची काळजी असण्याचं कारण नाही, ते त्या स्थानाचा मालक बघून घेईल. :-) मला काही दिवसांसाठी का होईना असं जाऊन पहायचं आहे एखाद्या स्थानी. बघुयात कधी जमते ते.

मुक्त विहारि's picture

26 Feb 2024 - 12:36 pm | मुक्त विहारि

साहजिकच आहे..

तुमची विचारसरणी जरी वेगळी असली तरी, तीर्थक्षेत्राचा अनुभव घेऊन बघायला हरकत नाही.

बघू या कसे जमते ते.. काही गोष्टी काळाच्या उदरात लपलेल्या असतात.आपणच संयम पाळला पाहिजे..

विवेकपटाईत's picture

23 Feb 2024 - 4:44 pm | विवेकपटाईत

प्रारब्धात लिहलेले भोग भोगावे लागतात. मृत्यू मागून मिळत नाही.

सौन्दर्य's picture

24 Feb 2024 - 12:01 am | सौन्दर्य

पूर्वी (म्हणजे फारच पूर्वी) वानप्रस्थाचा पर्याय उपलब्ध होता त्यामुळे अमुक एक वय उलटून गेल्यावर मनुष्य जंगलात अथवा निर्जन स्थळी निघून जाऊन तेथेच मुक्त होऊ शकत होता, त्याचा भार कोणावरही पडत नव्हता, आता तो पर्याय उपलब्ध (निदान माझ्या माहितीत तरी) नसल्यामुळे हे प्रश्न भेडसावत आहेत.

जर ह्या ऐहिक संसाराचा मोह सोडला, तर मृत्यु लवकर येणे शक्य आहे का ?

राघव's picture

24 Feb 2024 - 4:15 am | राघव

हेच म्हणायचे आहे. सर्वसंगपरित्याग करून वर सांगितल्याप्रमाणे जावे असेच म्हणायचे आहे.
मान्य की अगदी वनात जाणे अशक्य असेल, पण असे जाणे हेही काही कमी नाही.

वाटते तेवढे हे सोपे नाही. तब्येत, पैसा सर्व असतांनासुद्धा अगदी तिकिटापुरते पैसे घेऊन अशा ठिकाणी जाणे आणि पैसा न कमवता जमेल तसे राहणे.. खूप कठीण आहे.
हे तेव्हाच होऊ शकते जेव्हा स्वतःबद्दलची काळजी सुटेल. मरायचाच विचार केला असल्यास असं करणे कदाचित शक्य होईल असे वाटते. असो.