आपण नकळत कोणा CULT च्या जाळ्यात अडकला आहात का ?

गुल-फिशानी's picture
गुल-फिशानी in काथ्याकूट
20 Oct 2013 - 12:36 pm
गाभा: 

मित्रांनो!
एक विनंती
आपण अशा कोणत्या संघटने चे सभासद बनला आहात का की जी प्रत्यक्षात एक cult आहे? आपण ज्या ही संघटनेत (धार्मीक वा तत्सम) असाल त्या संघटने च्या कार्यप्रणाली चे संचालकांचे एकदा तरी कठोर परीक्षण करुन बघा जर त्यात खालील प्रकारच्या गोष्टी आढळत असतील तर वेळीच सावध व्हा आणि आपला अमुल्य वेळ,पैसा आणि क्षमता वाया जाण्या पासुन स्वतःला वाचवा ही कळकळीची नम्र विनंती !
CULT म्हणजे नेमके काय ? तिची वैशिष्ट्ये कोणती ?
याची एखादी स्पष्ट व्याख्या करणे तसे फार अवघड आहे पण अशा संघटने त काय चालते काय नाही हीची कार्यप्रणाली कशी आहे यावरुन कुठली संघटना cult आहे व कुठली normal organization आहे हे निश्चितपणे ठरवता येते.या विषयावर भरपुर संशोधन झालेले आहे आणि आंतरजाला वर ही भरपुर माहीती उपलब्ध आहे.या संशोधना च्या आधारे cult ची काही specific features आहेत जी संशोधना अंती निश्चित केली गेली आहेत ती खाली दिलेली आहेत.आपण एकदा प्रामाणिक पणे आपण ज्या संघटनेचे सभासद आहात तीला ही लागु पडतात की नाही हे तपासुन पहावे. नसतील लागु पडत तर आनंद च आहे पंण जर असे काही तुमच्या संघटनेत तुम्हास आढळत असेल तर मात्र वेळीच सावध व्हा ही विनंती!
१-प्रमुख/गुरु सर्वज्ञ सर्वव्यापी सर्वशक्तीमान
cult चा प्रमुख व्यक्ती व त्याच्या निकटचे सभासद यांना जगाचे अंतिम ज्ञान हे पुर्णपणे झालेले आहे,त्यांना प्रत्येक प्रश्नाचे उत्तर मिळालेले आहे ते जिवनाचे संपुर्ण रहस्य आणि भुत-भविष्य (शिष्या चे धरुन )जाणता ते big boss knows everything या पध्दतीने वारंवार शिष्यांना सांगितले जाते.ते सर्वव्यापी आहेत कुठे ही काय चालु आहे ते सर्व जाणतात (त्याच्यापासुन तुमची कुठलीही गोष्ट लपुन राहु शकत नाही) आणि ते सर्वशक्तीमान आहेत ते काहीही करु शकतात absolutely anything
२-चिकीत्सेला संपुर्ण विरोध
प्रमुख/गुरु ने केलेल्या कुठल्याही विधानाला किंवा संघटने मांडलेल्या कुठ्ल्याही थेअरी ला किंवा नियम वा तत्वांची चिकीत्सा करायला परवानगी तर नसतेच.पण असे करणे म्हणजे बंडखोरी किंवा वेडेपणा चे/ पतित झाल्याचे लक्षण मानले जाते व त्यावर योग्य असा इलाज शि़क्षा अथवा समज (brainwash) करुन दीला जातो, असे करणार्‍याला सह्जासहजी सोडले जात नाही ( हा प्रयोग करुन बघा)
३-बिनशर्त संपुर्ण समर्पणाची अपेक्षा
शिष्याने स्वतःची कुठली ही अट न ठेवता स्व्तः चे संपुर्ण शारीरीक-आर्थिक-मानसिक समर्पण गुरु/संघटने प्रती करावे ही मागणी वारंवार वेगवेगळ्या प्रकारे केली जाते.यात संपत्तीचा मोठा वाटा देण्यापासुन ते उत्पन्नातील ठराविक भाग दर महीना देण्यासाठी दबाव आणला जातो अशा दानाचे महत्व सतत बिंबविले जाते. विवीध प्रकारची शारीरीक कामे विनामोबदला सेवेचे मह्त्व पटवुन करवुन घेतली जातात ( चपला सांभाळणे ते पुस्तके विकणे ते प्रत्यक्ष गुरु सेवा करणे इ.) ( नकार देउन बघा )
४-अंतिम,अपरीवर्तनीय अशी एक Typical Exclusive Theory
प्रत्येक cult आपल्या सभासदांना एक असे रेडीमेड गोळीबंद तत्वज्ञान देतात जे की अंतिम सत्य च आहे असे भासविण्यात येते. या Typical Exclusive Theory ला वर म्हटल्या प्रमाणे कधीही चुकुनही challenge करता येत नाही.यात काय वाटेल ते असु शकते जसे आपले गुरु कोणाचा अवतार आहेत पासुन ते एक धुमकेतु अमुक दिवशि येणार त्याला धरुन आपल्याला जायचे आहे म्हणुन आत्मह्त्ये साठी तयारी करा ते अमुक दिवशी जगबुडी होणारच आणि आपण जे सर्व दीक्षीत आहोत तेच जिवंत राहणार किंवा जगातील प्रत्येक स्त्री-पुरुष हे बहीण भाउ च आहेत काय वाटेल ते यात बरेच नियमांची जंत्री असु शकते, बाहेरच्यां विषयी एक मार्गदर्शन केलेले असते काय चांगले काय वाईट याचे वर्गीकरण केलेले असते. याचा इतका पगडा शिष्यांवर टाकण्यात येतो. कि ते पुर्ण जिवनाल याच Typical Theory च्या चश्म्यातुन च बघतात.स्वतः च्या अनुभवाशी व बुध्द्दी शी ही असे शिष्य प्रामाणिक राहु शकत नाही. ही गोष्ट अत्यंत वाईट आहे.ते सभोवताली घडणार्‍या कुठ्ल्याही घटनेचा अन्वयार्थ निखळ चिकीत्सा करुन लावु शकत नाहीत.आणि ते पराकोटीचे संकुचित आणि संवेदनाशुन्य बनत जातात ( फलाइन वाद्ळ ना बरोबर च आहे आपल्या गुरुजींनी नव्हत का सांगितल की......)
५-आपण "विशेष" आहात म्हणुनच येथे आहात !
हे गाजर प्रत्येकच cult देते. यात शिष्यांना सतत एक गोष्ट सांगितली जाते की ते नक्की काहीतरी वेगळे आहेत सामान्यांपेक्षा विशेष आहे म्हणुन तुम्ही आमच्या संघटनेचे सभासद बनला आहात.तुमचे पुर्वजन्मी चे पुण्य वा संचित आहे ज्यामुळे तुम्ही येथे आहात.यात माणसाचा स्वाभाविक अहंकार भरपुर खतपाणी घालुन फुलविला जातो. यांचा खास शब्द म्हणजे तुम्ही chosen few आहात.आणि म्हणुन मग या शिष्यांचा द्रुष्टीकोण हा इतर लोकांविषयी हे "बाहेर चे" कोणी तरी दुर्दैवी जीव आहेत ( जे आमच्या संघात नाहीत) असा किंवा हे लायक च नाहीत असा बनत जातो.
क्रमशः

प्रतिक्रिया

प्रकाश घाटपांडे's picture

20 Oct 2013 - 1:32 pm | प्रकाश घाटपांडे

मस्तच. प्रत्येकाला कुठला ना कुठला कल्ट लागतोच जगायला.

गुल-फिशानी's picture

20 Oct 2013 - 2:16 pm | गुल-फिशानी

प्रत्येकांच व्यक्ती म्हणुन जे स्वातंत्र्य आहे ना एक सारासार विचार करुन-अनुभव घेउन-चुका करुन/सुधारुन आपल्या जीवनात आपला निर्णय घेण्याच ते अबाधित राहावं.आपल्या धडावर आपलं च डोक असाव. ते या cult मध्ये माणुस हरवुन बसतो. बाकी प्रत्येकाला जीवनात जगायला स्वतःसाठी एक तत्वज्ञान लागतच. फक्त ते आपल स्वतःच्या अनुभवातुन/चिंतनातुन आलेल असल म्हणजे झाल.

ग्रेटथिन्कर's picture

20 Oct 2013 - 1:55 pm | ग्रेटथिन्कर

अरे आम्ही काय कुणाचे खातो रे श्रीराम आम्हाला देतो रे-समर्थ रामदास

अरे आम्ही काय कुणाचे खातो रे श्रीराम आम्हाला देतो रे-समर्थ रामदास

या रामदासांच्या उक्तीतुन आपण नेमक काय सांगु इच्छीतात मला काहीच कळल नाही कुपया अधिक स्प्ष्ट केल तर बर होइल.

रॉजरमूर's picture

21 Oct 2013 - 12:21 am | रॉजरमूर

बिनडोक पणाच्या कौमेंट टाकतात आणि वर ग्रेट थिंकर म्हणून id घेतलाय

विजुभाऊ's picture

20 Oct 2013 - 2:32 pm | विजुभाऊ

आर्ट ऑफ लिव्हिंग हे देखील तुम्ही म्हणता त्याप्रमाणे एक कल्टच म्हणता येईल

विजुभाउजी
आपण art of living संदर्भात खालील दुवा जरुर पाहावा
http://artoflivingfree.blogspot.in

अत्रुप्त आत्मा's picture

20 Oct 2013 - 2:53 pm | अत्रुप्त आत्मा

MLM कंपन्या ह्या सुद्धा "कल्ट"च असतात ... !

मी एकदा एका जपान लाइफ नावाच्या एका MLM कंपनीच्या कार्यक्रमाला गेलो होतो. (हे एका महान गादी रुपये एक लाख फक्त कींमत असलेल्या सेमिनार होते ) माझ्या मित्राच्या (?) भयानक आग्रहानंतर आणि कुछ दोस्त की खातिर जसे आपण कधी कधी नादानी करतो तसे. आणि काय सांगु तुम्हाला पुढील काही तासांत जी काही अफाट करमणुक झाली की ज्याचे नाव ते. आणि त्याच बरोबर मला दुनिया झुकती है झुकानेवाला चाहीये याचा आणि मित्राला दोस्त दोस्त ना रहा असा प्रत्यय मी त्यात जॉइन व्हायला नकार दील्यावर एकाच वेळी आला.

चौकटराजा's picture

20 Oct 2013 - 2:57 pm | चौकटराजा

सारासार विचार शक्तीला मार कल्टी असे जे म्हणतो तो कल्ट !

मुक्त विहारि's picture

20 Oct 2013 - 3:30 pm | मुक्त विहारि

"सारासार विचार शक्तीला मार कल्टी असे जे म्हणतो तो कल्ट !"

जबरा...

जिजाजी,

नाव बदला आपले..

डॉ सुहास म्हात्रे's picture

20 Oct 2013 - 6:29 pm | डॉ सुहास म्हात्रे

एकदम चपखल ! :)

विजुभाऊ's picture

20 Oct 2013 - 3:17 pm | विजुभाऊ

तेच म्हणतो. अ‍ॅम वे हा एक मोठा कल्ट

अ‍ॅम वे हा एक मोठा कल्ट
विजुभाउजी
हा ही एक मह्त्वाचा मुद्द्दा आहे की फक्त धर्माशी संबधित किंवा धर्म आधारीत च संघटना कल्ट असतात असे अजिबात नाही. धर्माशी काहीही संबध नसलेली AMWAY ही एक कल्ट च आहे कारण ती अनेक निकषांवर कल्ट प्रमाणे च काम करते.
जालावरील खालील दुवे आपण अवश्य अभ्यासा यावर भरपुर खल अगोदर च झालेला आहे. यातील काही भाग तर प्रचंड मनोरंजक आणि धक्कादायक असा आहे.
http://marriedtoanambot.blogspot.in
http://amwayglobalcultintervention.blogspot.in

माझ्या हाताला एखादाजरी अ‍ॅमवे वाला लागला ना...संपलाच समजा. 'ह्ये धुते' मी त्यांना. सुरवातच करायची "हे बघ तू मला मित्र -मैत्रीण न समजता एक टारगेट समजते आहे, अन मला सुद्धा टार्गेटचीच गरज होती"..अशे पळतात म्हणुन सांगु..मागच्या बाजुला धूर निघालेला अगदी स्पष्ट दिसतो.

जबरी आयडिया दिलीत अपर्णा ताई. नाक मी दम करके राख ही सालो ने.

डावी विचारसरणी हाही एक मोठाच कल्ट आहे. सर्वांत मोठी मजा अशी की लोकांना वाटते की अन्य कल्ट ना कल्टी दिली की माणूस आपोआप डाव्या विचारसरणीकडे झुकतो. पण हाही एक कल्ट आहे हे लोकांना कळत नाही.

डावी विचारसरणी फॉलो करणारे बरेच कॉम्रेड वागणुकी च्या बाबतीत खरोखर एखाद्या धर्मा वर आधारीत कल्ट च्या मेंबरांना ही बहुतेक वेळा भारी पडतात. त्यांचे मार्क्सवादा ला एखाद्या धर्मा सारखे पवित्र मानणे किंवा मार्क्स वाक्यं प्रमाणं धरुन चालणे हे अगदी उघड कल्टीश असले ( यांना च वैतागुन मार्क्स म्हणाला होता thank god i am not communist) तरी ही कम्युनीझम खालील काही कारणासाठी त्याला कल्ट म्हणन्यात अडचण येते असे माझे मत आहे ती कारणे अशी-
१- कम्युनिझम चे एकच एक असे केंद्र आता तरी उरलेले नाही जसे चायनीज-इंडीयन-क्युबन आपापल्या interpretation प्रमाणे मार्क्सवाद राबवितात
२-ती विचारसरणी ही इतकी निरनिराळे फाटे फुटुन वेगळी झालेली आहे की एक दुसर्‍या पे़क्षा अगदी स्वतंत्र झालेल्या आहेत जसे माओवादी-भाकप-चायनीज जे मर्यादेत कॅपिटलला ही गैर मानत नाही तात्पर्य अगदी वेगळ्या विचारसरणी आहेत.
३-किंवा एकच एक असा एखादा स्टेलिन सारखा लिडर ही नाही जो सर्वांना कंट्रोल करतो किंवा एखादा एकच कंट्रोल ग्रुप नाही.( जे असते तर सह्ज कल्ट म्हणता आले असते)
४-सर्वात मोठी अडचण अशी असते की जर इतक्या व्हेग विखुरलेल्या विचारसरणि ला जर कोंबुन कल्ट मध्ये कोंबले तर मग कल्ट ची व्याख्या प्रमाणा बाहेर ताणली जाउन आपला अर्थ आणि रोख हरवुन बसते. त्यामुळे जे खरेखुरे कल्ट स्पेसीफिकली टारगेट होउ शकत नाहीत.
आणि मग ती संकल्पना ( ब्रम्ह किंवा ताओ सारखी ) अतीसर्वसमावेशक होउन जाते ज्यात काय वाटेल ते कोंबण्याची मुभा मि़ळते. या वर माझ्या अल्प माहीती प्रमाणे या क्षेत्रांतील तज्ञांनी ( मी नव्हे) एक क्याटेगरी वापरली आहे जी अगदी अचुक अशी टर्म आहे. ती म्हणजे not cult but cult-like
तर अगदी अचुक म्हणावयाचे तर माझ्या मते आपण असे म्हणु शकतो की
communism is not a cult but cult-like.

विजुभाऊ's picture

20 Oct 2013 - 11:25 pm | विजुभाऊ

असे असेल तर मग रा. स्व. सं. किंवा सनातन प्रभात हे देखील कल्ट ठरतात

llपुण्याचे पेशवेll's picture

21 Oct 2013 - 10:47 am | llपुण्याचे पेशवेll

सहमत. हल्लीच आम्ही विज्युईझ्म हा नवीन कल्ट तयार होताना पाहीला आहे.

जयंत कुलकर्णी's picture

20 Oct 2013 - 4:24 pm | जयंत कुलकर्णी

या माणसाच्या बोलण्यातून तो एखाद्या कल्टचा सभासद असावा असे वाटते आहे का ?

इष्टुर फाकडा's picture

20 Oct 2013 - 5:37 pm | इष्टुर फाकडा

अवघड आहे....

आशु जोग's picture

20 Oct 2013 - 5:19 pm | आशु जोग

यांना अप्रत्यक्षपणे काही सुचवायचय का ?
भारतातील बाँबस्फोटवादी संघटना यात मोडू शकतात... यांच्यात आत्मघातकी सदस्यही असतात. त्यांना मोबदला म्हणून देण्यासारखे काही नसेल तर 'जन्नत आणि मग हूर' अशी काय काय प्रलोभने दाखवली जातात.

तिमा's picture

20 Oct 2013 - 5:27 pm | तिमा

फक्त ग़ालिबचाच कल्ट आवडतो.

गुल-फिशानी's picture

20 Oct 2013 - 9:44 pm | गुल-फिशानी

मी ही गालिबच्याच कल्ट वाला आहे त्या नात्याने आपला गुरुबंधु आहे. आपणाशी गालिब गुरुजींच्या वर सत्संग करावयास मिळाल्यास आनंद होइल.
जय गुरुदेव !

सृष्टीलावण्या's picture

20 Oct 2013 - 6:32 pm | सृष्टीलावण्या

पण वरील सर्व अनुभव देतात. विशेषकरून - आपण "विशेष" आहात म्हणुनच येथे आहात !

:P :) :D

श्रीगुरुजी's picture

20 Oct 2013 - 8:31 pm | श्रीगुरुजी

भारतातील निधर्मांध मंडळी हा पण एक कल्ट आहे. अरूंधती रॉय, महेश भट्ट, तिस्ता सेटलवाड, निखिल वागळे, प्रफुल्ल बिडवाई इ. या कल्टमध्ये अग्रस्थानी आहेत. या कल्टमध्ये नुकतेच अनंतमूर्ती, अमर्त्य सेन इ. मंडळी जॉईन झाली आहेत. काँग्रेस, कम्युनिस्ट इ. पक्षातील मंडळी या कल्टचे तहहयात सदस्य असतात.

ग्रेटथिन्कर's picture

20 Oct 2013 - 9:44 pm | ग्रेटथिन्कर

हारएसएस हा ही एक कल्टच आहे की... गांधीजीना शिव्या देणे, जातीयवाद पसरवणे ,हिंदू मुस्लिमात लावुण देणे हे आपले काम आहे असे हारेएसी कल्ट समजतात ....एका विशिष्ट जातीचे लोक या कल्टचे तहहयात सदस्य असतात.

टिवटिव's picture

20 Oct 2013 - 10:41 pm | टिवटिव

आलात मुद्यावर....

चौकटराजा's picture

21 Oct 2013 - 6:31 pm | चौकटराजा

हारेसेस मुळेच बिहारात पूर येतो ,महाड चिपळूणला तर दरवर्षी येतो .कांदा महाग होतो दुधाचा भाव दर दोन महिन्याला वाढतो विक्रमी उत्पादन होते तरी गहू महागच होतो, कोळसा अधिक काळा होतो.जमीनीचे भाव अव्वाच्या सव्वा वाढतात.
एके काळी " तिथं " गेलेला पण खर्‍या अर्थाने धर्मनिरपेक्ष चौ रा.

प्रकाश घाटपांडे's picture

20 Oct 2013 - 8:55 pm | प्रकाश घाटपांडे

निधर्मांध या शब्दावर एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत!

मी स्वतःला शहाणे समजणार्‍यांच्या CULT च्या जाळ्यात अडकलो आहे.

आमच्या या कल्टमध्ये आपलीच टोपी लाल कशी आहे हे जगाला ओरडून सांगितलं जातं. समोरच्याची नेहमी अक्कल काढली जाते. जे काही कळतं ते मलाच कळतं, बाकी सारे अडाणभोट आहेत असं बेंबीच्या देठापासून कोकललं जातं. या कल्टमध्ये संभाषणामधील शेवटचं वाक्य आपलंच असायला हवं असा अटटाहास असतो.

हे सारे तुम्हाला जमणार असेल तर तरच आमच्या कल्टमध्ये सामिल व्हा.

llपुण्याचे पेशवेll's picture

21 Oct 2013 - 11:08 am | llपुण्याचे पेशवेll

सहमत. मी देखील असेच स्वतःला फार भारी समजणार्‍या रॉयल एन्फील्ड कल्टचा अनुभव घेतला आहे. ३५० वा ५०० सीसी इंजिनाच्या गाड्या (मग त्या कितीही वॉबल(मराठी शब्द लक्षात येत नाही?) असल्या तरीही) लई भारी म्हणून, १००-१५० सीसी वाल्यांकडे तुच्छतेने पहायचे. मग या गाड्यांपेक्षा भारी गाडी असेल जसे सीबीआर, पल्सर एनएस वगैरे तरीही त्याची आणि या गाड्यांची कॅटेगरी वेगळी आहे वगैरे म्हणून आपलीच लाल म्हणायचे, याचा अनुभव घेतला आहे.

मुक्त विहारि's picture

21 Oct 2013 - 5:27 pm | मुक्त विहारि

ही देवाने दिलेली भेट आहे.....

आमचा वारू आहे तो.

परवाच माझ्या रॉयल एन्फील्डची आणि डायनॅसोरची टक्कर झाली.तो डायनॅसोर ढगात ऊडाला.बरे आणि गेला तो नमका ड्रॅगनच्या पाठीवरच.तो ड्रॅगन पण म्हणाला

रॉयल एन्फील्ड वाल्यांच्या नादी लागायचे नाही.

माझ्या कडे खूप किस्से आहेत रॉयल एन्फील्डचे...

सुहासदवन's picture

22 Oct 2013 - 2:38 pm | सुहासदवन

माझ्या कडे खूप किस्से आहेत रॉयल एन्फील्डचे...

मुवि होऊन जाऊ द्या एकदा ……

अर्धवटराव's picture

21 Oct 2013 - 12:07 am | अर्धवटराव

पण अखील विश्वात या कल्टचे कल्प्रीट आणि कल्टीश आढळ्तात... त्याला लग्न म्हणतात.

स्पंदना's picture

21 Oct 2013 - 3:35 am | स्पंदना

हो आहे.
आम्ही सांगतो...तुम्ही मस्तवाल आहात म्हणुन येथे आहात...!!!!

(आम्ही म्हणजे मिपा, उगा मी स्वतःला मिपा समजते अस समजू नये)

मालोजीराव's picture

21 Oct 2013 - 5:34 pm | मालोजीराव

ऐन वेळी कल्टी मारणारे पण कल्ट असावेत काय ?

कुंदन's picture

22 Oct 2013 - 1:10 pm | कुंदन

सहकार हा एक CULT समजावा का?