ब्राउजर एक्स्टेंशन्स

मदनबाण's picture
मदनबाण in तंत्रजगत
11 Apr 2013 - 3:38 pm

नमस्कार मंडळी,सुझेच्या अ‍ॅन्ड्रॉइड धाग्यात अ‍ॅप्स देताना,विचार केला की इथे क्रोम आणि फायरफॉक्स वापरणारी बरीच मंडळी आहेत्.तेव्हा मला माहित असलेले आणि इथल्या अन्य टेक-सॅव्ही मंडळींना माहित असलेले ब्राउजर एक्स्टेंशन शेअर करण्यास काय हरकत आहे.

तर आता मी वापरत असलेले वरील दोन्ही ब्राउजर्सचे एक्स्टेंशन्स इथे देत आहे.

***************************************************

ब्राउजर एक्स्टेंशन हे अगदी छोटे सॉफ्टवेअर असते ज्यामुळे तुमच्या ब्राउजरची फंक्शनॅलिटी वाढवता येते.

आता सर्वात प्रथम मी जे एक्स्टेंशन्स इथे देणार आहे ते प्रायव्हसी इनहान्स करणारे आहेत.प्रायव्हसी बाबतीत बरेचसे इंटरनेट युजर्स जागरुक नसतात,पण जसे जसे नेटकरी मंडळींना ऑनलाईन प्राव्हसीचे महत्व आणि गरज समजु लागली आहे तस तसे या संदर्भातल्या अनेक एक्स्टेंशची निर्मीत होउ लागली आहे.

आत्ताचे युग जरी मोबाईल क्रांतीचे असल्या सारखे वाटत असेल तरी खरे तरी सुद्धा सध्याचे युग हे डेटा जनरेशन आणि येणारे प्रायव्हसीचे आहे. हे दोन्ही मल्टि बिल्यन डॉलर इंडस्ट्री ठरणार आहे.डेटा मधे डेटा सेंटर्स आणि ऑनलाईन स्टोरेज तसेच नविन डेटा स्टॉरेजचे आहे.तुमच्या लक्षात येईल की साध्या पेन ड्राईव्हची तसेच एक्सटर्नल युएसबीची कपॅसिटी प्रचंड वेगाने वाढली आहे.तसेच येणार्‍या काळात तुमच्या पिसी मधीली हार्डडिस्क ड्राईव्हची जागा एसएसडी {सॉलिड स्टेट ड्राइव्ह्स} घेतील.याची सुरुवात ऑलरेडी झालेली आहे,जो पिसी बुट होउन सुरु होण्यासाठी आणि वापर चालु करण्यासाठी सध्याच्या हार्डडिस्कमुळे वेळ लागतो,तेच एसएसडी ड्राईव्हमुळे फक्त जवळपास २० सेकंदात होईल. :) ३५० पेक्षा जास्त पानांचे वर्ड डॉक्युमेंट फक्त १० सेकंदात तुम्हाला तुमच्या पिसीवर ओपन करता येईल.

आता या डेटा जनरेशन आणि स्टोरेजचा एक अंदाज यावा म्हणुन उदाहरण देतो,युट्युबवर दर मिनीटाला ७२ तासांचे व्हिडीयो अपलोड केले जातात्,तर ४ बिलीयन तासांचे व्हिडीयो युट्यबर दर महिन्याला पाहिले जातात्,तसेच जगभरातुन २५% लोकांच्या मोबाईलवरुन युट्युब पाहिले जाते. यावरुन तुम्हाला डेटा जनरेशन आणि स्टॉरेज याचे महत्व कळुन येईल.

आता मूळ मुद्द्यावर येउया,तो म्हणजे प्राव्हसी... तुम्ही इंटरनेटवर सतत ट्रॅक केले जातात्,तुम्ही कुठल्या साईट वरुन कुठल्या दुसर्‍या साईटवर गेलात्,काय कंटेन्ट पाहिलेत्,किती वेळ कुठल्या साईटवर थांबलात याची पूर्ण माहिती मिळवली जाते.ट्रॅकरच्या सह्हायाने तुमचा माग काढला जातो.मग तुमची"प्रायव्हसी" राहिलीच कुठे ? मदनबाणने युट्युबर कुठली कुठली गाणी पाहिली,यावरुन याला कुठल्या प्रकारची गाणी आवडतात अशी माहिती ट्रॅकरच्या सहाय्याने काढता येऊ शकेल.या सर्व माहितीचा उपयोग अनेक प्रकारे करता येतो,जाहिरातीसाठी हे तर मुख्य करुन वापरलेच जाते,यात गुगल,फेसबुक आणि अनेक इंटरनेट जायंट्स आहेत.

मग आशा परिस्थीत आपण नेटवर आपली प्रायव्हसी जपण्यासाठी काय करु शकतो ? तर आपण ब्राउजर एक्स्टेंशन्सचा आधार घेउ शकतो.क्रोम आणि फायर फॉक्स साठी अशी प्रायव्हसी आणि डु नॉट ट्रॅक एक्स्टेंशन्स उपलब्ध आहेत.तसेच दोन्ही ब्राउजर्स मधे हा पर्याय सुद्धा देण्यात आलेला आहे.
********************************************************

आता माझ्या वापरातले एक्स्टेंशन्स देत आहे.

१) Collusion :- वर जे ट्रॅकिंग प्रकरण सांगितले आहे,ते पटकन समजुन घेण्यासाठी,तुम्ही नेटवर कसे ट्रॅक केले आहे ते पाहण्यासाठी हे एक उत्तम एक्स्टेंशन फायर फॉक्ससाठी आहे.

२) DoNotTrackMe :- ऑनलाईन प्रायव्हसी जपण्याचे हे अजुन एक उपयोगी एक्स्टेंशन,याने जाहिराती सुद्धा ब्लॉक केल्या जातात.

३) BetterPrivacy :- कुकीज {खायच्या नव्हे तर्,ब्राउजरच्या} ;)मुळे तुमचा माग काढणे सहज आणि सोप्पे होते,त्यांच्यावर नियंत्रण आणि त्यांचा नायनाट करण्यासाठी उपयोगी,प्रायव्हसी जपण्यासाठीचे हे अजुन एक उपयोगी एक्स्टेंशन.

४)Google Privacy :- जसे मी वर सांगितले आहे की गुगल प्रत्येकाला ट्रॅक करतो,आणि जरी फायरफॉक्स ब्राउजर मधे डु नॉट ट्रॅक ऑप्शन एनेबल केला असला तरी गुगल आणि इतर सर्च इंजिन्स या हेडरला इग्नोर करतात्,त्यामुळे या एक्स्टेंशनचा वापर गरजेचा झाला आहे.हे एक्स्टेंशन इन्स्टॉलकेल्यावर गुगल सर्च मारल्यास तुम्हाला फरक लगेच कळेल्,प्रत्येक लिंक जवळ प्रायव्हेट हा पर्याय दिसु लागेल्,जो आपण निवडु शकतो.

५)AVG Do Not Track :- अ‍ॅन्टीव्ह्यायरस बनवणार्‍या एव्हीजी कंपनीचे हे एक्स्टेंशन आहे. आता याच्या वापराचे उत्तम उदाहरण देतो,ते म्हणजे आपले मिपा.

मिपाच्या पानाच्या उजवीकडे फेसबुकचे एक सोशल प्लगइन (सोशल बटन) आहे,मला ते मी मिपावर असताना पहायचे नव्हते,तेव्हा हे एक्स्टेंशन कामाला आले्ए तुम्हाला ब्लॉक करायचा की नाही याचा पर्याय देते,तेव्हा जर मला परत मिपाच्या पानावर फेसबुकचे सोशल प्लगइन बघायचे असेल तेव्हा या पाना परते ते मी एनेबल करु शकतो.(लक्षात असु द्द्या की हे बटन सुद्धा तुमची वेगवेगळ्या प्रकारची माहिती काढु शकते.)

६) Ghostery :- अत्यंत उपयोगाचे प्राव्हसी एक्स्टेंशन.

७) Webutation - Reputation & Security :- जेव्हा तुम्ही गुगलवर एखादी गोष्ट शोधता तेव्हा अनेक पर्याय मिळतात्,यातली सुरक्षित साईट कोणती आणि किती प्रमाणात असुरक्षित कोणती याची माहिती या एक्स्टेंशनमुळे मिळते.हे WOT - Safe Surfing या एक्स्टेंशन प्रमाणेच चालते.
८)HTTPS Everywhere :- एचटीटीपीएस पेजेएर अ‍ॅटोमॅटिक रिडायरेक्ट केले जाते.तुम्ही तुमच्या जी मेल मधे लॉगइन करताना किंवा इतर सिक्युर साईटवर(बँकिंग /ट्रेडिंग इ.) ट्रॅन्झॅक्शन करताना अ‍ॅड्रेसबारवर पाहिलेत तर तुम्हाला डावीकडे कुलपाचे चित्र दिसुन येईल.{माझा आणि cipher strength चा अनेक वर्ष आधी संबंध आला होता जेव्हा माझ्या पिसीवर मी विंडोज २००० चालवत होतो,तेव्हा SSL साठी कमीत कमी cipher strength १२८बिट असावी लागते हे मला कळाले होते.} हे एक्स्टेंशन खुप उपयोगी आणि महत्वाचे आहे. माझ्या सहीतले युट्युबचे दुवे हे HTTPS चे असतात त्याचे कारण हे एक्स्टेंशनच होय.
९)Greasemonkey :- या एक्स्टेंशन शिवाय कुठल्याही टॉप एक्स्टेंशन्सची यादी पूर्ण होउ शकत नाही. स्क्रीप्टस वापरुन तुमचे ब्राउजर हवेतसे तुम्ही कस्टमाईज करु शकता. जसे मी माझ्या फायरफॉक्सवर केले आहे.
यासाठी https://userscripts.org/ या साईटचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो,मी आत्ता पर्यंतच फक्त २दा इथल्या स्क्रिप्ट्स वापरल्या आहेत.

ज्यांना या विषयी अधिक माहिती हवी त्यांनी खालील दुवे जरुर पहावेत / वाचावेत.
दुवे :-
DO NOT TRACK FAQ
How do I turn on the Do-not-track feature?
How to enable Chrome's Do Not Track option
Why Giving Us Control Of Our Online Data Is The Next Multi-Billion Dollar Opportunity
Do Not Track': The Next Billion-Dollar Industry?
What is tracking and AVG Do Not Track?

हे किडुकमिडुक लिखाण करण्यास उद्युक्त केल्या बद्धल पै तै आणि गणापासेठ चे आभार.
तुम्हीही जर कुठल्याही प्रकारचे एक्स्टेंशन्स वापरात असाल तर ते या धाग्यावर द्या.
हॅव सेफ सर्फिग... ;)

प्रतिक्रिया

गणपा's picture

11 Apr 2013 - 4:38 pm | गणपा

धन्स रे बाणा.
नक्कीच उपयोगी माहिती आहे. इतर मंडळीही यात भर टाकतीलच अशी अपेक्षा आहे.

दादा कोंडके's picture

11 Apr 2013 - 7:12 pm | दादा कोंडके

मस्त माहिती रे बाणा. पण मला जे अ‍ॅड ऑन्स माहीत आहेत ते फक्त लोकल डेटा साठवत नाहीत जेणेकरून तोच संगणक वापरणार्‍या दुसर्‍या वापरकर्त्याला तुम्ही काय काय केलंय ते कळणार नाही. तुम्ही आंजावर अनॉनिमस रहाण्याचा कुठलाही क्लेम ते करत नाहीत. तु सांगितलेले अ‍ॅड ऑन्स बघितले पाहिजेत वापरून.

मदनबाण's picture

11 Apr 2013 - 7:54 pm | मदनबाण

पण मला जे अ‍ॅड ऑन्स माहीत आहेत ते फक्त लोकल डेटा साठवत नाहीत जेणेकरून तोच संगणक वापरणार्‍या दुसर्‍या वापरकर्त्याला तुम्ही काय काय केलंय ते कळणार नाही. तुम्ही आंजावर अनॉनिमस रहाण्याचा कुठलाही क्लेम ते करत नाहीत.
खरं पाहिलं तर यासाठी अ‍ॅडऑन्स ची सुद्धा गरज नाही,कारण हेच काम क्रोम आणि फायरफॉक्स मधे प्रायव्हेट ब्राउजिंग मोड दिलेले आहेत.
फायरफॉक्स :- Tools=> Start Private Browsing किंवा Ctrl+Shift+ p
क्रोम :-Right Corner Button => New Incognito Mode किंवा Ctrl+Shift+n
पण या मोडमुळे तुम्हाला ऑनलाईन प्रायव्हसी मिळत नाही, हे लक्षात ठेवले पाहिजे.

अत्रुप्त आत्मा's picture

11 Apr 2013 - 7:16 pm | अत्रुप्त आत्मा

खुणावले आहे...नंतर वाचण्यात येइल. :)

चौकटराजा's picture

11 Apr 2013 - 8:04 pm | चौकटराजा

सगळेच बाण तुम्हाला विद्ध करीत नाहीत. तसा हा मदन बाण दिसतो आहे. वा ! बाणरौ धनेवाद ! हा धागा खुणावून ठेवतो.मग एकेकाचे पारायण करतो. ( ओले वस्त्र वगैरे वगळून ) .मी फायरफोक्स चा फ्यान हाय !

Incognito/ Private Browsing मोड मधे ब्राउजर उघडा आणि कोणत्याही account (google/ facebook इत्यादी) मधे लॉग ईन न करता वाट्टेल ते करा. काम झाले की विंडो बंद करा. तुम्ही logged in असलात तर गूगल तुमच्या गूगलच्या खात्याबरोबर ही माहिती जोडते. आणि तुमची एक प्रोफाईल तयार करते. Logged in नसाल तर ना रहेगा बास....

बर्‍याचशा सर्विसेस तुमच्या IP address ने तुमचा माग ठेवू शकतातच पण ते तर ही extensions वापरूनही थांबवणे शक्य नाही. ही extensions फक्त javascript आणि cookies रोखू शकतात.

चौकटराजा's picture

12 Apr 2013 - 9:15 am | चौकटराजा

आधुनिक जाल जगात " खाजगी" असं काही रहाणार नाही. मग तुम्ही फॅशन टीव्ही बघितला काय वा मिलिट्रीचे बंकर बघितले काय ?

Incognito/ Private Browsing मोड मधे ब्राउजर उघडा

Incognito (गूगल क्रोम) बद्दल सहमत..
यात तुमची कोणतीही माहिती ब्राउजर स्टोअर नाही करुन ठेवत.
पण Private Browsing (फायरफॉक्स) बद्दल मतांतरे आहेत..
येथे दिलेल्या प्रतिक्रीया जरा कन्फूजिंग वाटत आहेत..
कुणी खुलासा करु शकेल का??

माझ्या माहिती नुसार आधीच्या फाफॉ व्हर्जन मधे प्रायव्हेट ब्राउजिंग हा पर्याय निवडल्या नंतर नविन टॅब मधेच प्रायव्हेट ब्राउजिंग सुरु होत असे पण नविन व्हर्जन (२०.०.१) मधे प्रायव्हेट ब्राउजिंग मधे नविन विंडो उघडते. जसे क्रोम मधे Incognito हा पर्याय निवडल्यावर होते.हा संगळा गोंधळ या नविन व्हर्जनच्या न्यु प्रायव्हेट ब्राउजिंग विंडोमुळे घडत आहे.या बद्धल फाफॉ टिम काय निर्णय घेईल या बद्धल उत्सुकता आहे.बहुतेक पुढील व्हर्जन मधे जुनी पद्धत परत दिली जाईल.
जो दुवा तुम्ही दिला आहे,त्यावर अधिक माहिती इथे मिळेल :-
http://is.gd/9Mg8Ln
Private Browsing - Browse the web without saving information about the sites you visit

बाकी कुकी ट्रॅकींचा जर विचार करायचा असेल तर एक नविन एक्स्टेंशन उपलबध आहे.
Self-Destructing Cookies :- या एक्स्टेंशनमुळे सर्फिंग करताना किती ट्रॅकींग कुकीज कुठुन जमा होत आहेत त्याची माहिती एका छोट्याश्या पॉपअप विंडोमुळे मिळते.शिवाय त्यांचा नायनाट देखील केला जाईल.प्रायव्हसी चे महत्व जाणणार्‍यांसाठी हे एक उत्तम एक्स्टेंशन आहे. जमल्यास वापरुन पहा आणि वाटल्यास तुमचा अनुभवही इथे शेअर करा.

जाता जाता :- सध्या विचार करतो आहे की उद्या फाफॉ मोबल्यावर आल्यावर या धाग्याचा उपयोग त्यासाठी सुद्धा होईल का ?

कोमल's picture

26 Apr 2013 - 12:10 pm | कोमल

Self-Destructing Cookies छानच वर्क करतय.. धन्यवाद्ज...
मी सद्ध्या Don't track me Google फाफॉ आणि क्रोम साठी वापरत आहे.. आणि firebugs फाफॉ साठी वापरत आहे..
पण एक नॅनो शंका कधी कधी येतेच Don't track me Google हे Google क्रोमला कितपत रोखु शकेल? ;)

गुगलला रोखणे तसेही कठीणच,फक्त चीन हे काम आत्ता पर्यंत करु शकला आहे. ;)

कोमल's picture

26 Apr 2013 - 2:53 pm | कोमल

चीन.. दुखर्‍या नशीवर बोट ठेवलतं तुम्ही बाणराव.. :(

मदनबाण's picture

26 Apr 2013 - 6:29 pm | मदनबाण

ते घुसखोरी करतात आणि आपण निशेध नोंदवतो,ते त्यांच्या बॉर्डवर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करतात,पण आपल्या देशास इन्फ्रास्ट्रक्चर उभारण्यास मनाई करतात ! हे कोण सांगणारे ? असा प्रश्न देशातील पगारी मंत्री-संत्री विचारत नाहीत हेच आपल्या देशाचे दुर्दैव अजुन काय ! :(

सुहास झेले's picture

12 Apr 2013 - 4:09 am | सुहास झेले

सही धागा रे...

हे मी वापरत असलेलं एक्स्टेंशन

- Adblock Plus नको असलेल्या जाहिराती ब्लॉक करण्यासाठी विशेषतः मटा आणि फेसबुक वापरणाऱ्यांसाठी ;-)

- Easy YouTube Video Downloader यू ट्यूबचे व्हिडीओ वेगवेगळ्या फॉरमॅटमध्ये डाऊनलोड करायची सोय. व्हिडीओ एमपी३म्हणून पण सेव्ह करता येतो. यूट्यूबवर व्हिडीओ लोड करताना खाली डाऊनलोड असेल बटन येते. वापरायला एकदम सोप्पे.

अजून सांगेनच ..... :) :)

लॉरी टांगटूंगकर's picture

12 Apr 2013 - 11:24 am | लॉरी टांगटूंगकर

माझापण आवडता आहे,
Easy YouTube Video Downloader
अजून एक आवडता हा BYTubeD - Bulk YouTube video Downloader समोरच्या पानावर जे काहि यु ट्युब चे व्हिडीओ असतील ते सगळे खेचतो. समजा एक सर्चला उत्तर म्हणून २० व्हिडीओ दिसत आहे, उजवे बटन क्लीकून सगळे २० च्या २० घेता येतात..आणि इतर ठिकाणी दिलेल्या दिलेल्या यु ट्यूबच्या लिन्क्स साठी तिकडे जावे लागत नाही, आहे तिथे उजव्या बटणाच्या वापराने सगळे व्हिडीओ डाऊनलोड!
जाहिराती ब्लॉक करायला मी सरळ फ्लॅश प्लेअरच बंद करतो.

आणि एक प्रश्न म्हणजे प्रायव्हसीला इतके का महत्व देत आहात ?? समजा मला जाहिरातींनी फरक पडत नाही पण नेट बॅन्कीग वगैरे च्या संदर्भात पण हे महत्वाचे आहे काय ??
असल्या सिक्युरिटी बद्दल काही लिहावे. ब्लॉक करता करता हे एक्स्टेंशन्सच माहिती गोळा करून ठेवू नयेत.

मदनबाण's picture

13 Apr 2013 - 10:50 am | मदनबाण

आणि एक प्रश्न म्हणजे प्रायव्हसीला इतके का महत्व देत आहात ??
प्रायव्हसीला का महत्व देउ नये ते सांगा आधी.
तुमच्या नेट सर्फिंगची जर सगळी माहिती बाहेर जात असेल (एव्हढे अ‍ॅडऑन्स लावले तरी जातेच) तर त्याचा तुम्हाला नक्कीच विचार करायला हवा.

तुमच्या नेट सर्फिंगची जर सगळी माहिती बाहेर जात असेल (एव्हढे अ‍ॅडऑन्स लावले तरी जातेच) तर त्याचा तुम्हाला नक्कीच विचार करायला हवा.
हा धागा जरी एक्स्टेंशन्सचा असला तरी प्रायव्ही या विषयावर जालावर जे काही चालु आहे त्या संबंधी आणि एकंदर सायबर अ‍ॅटॅक या संबंधी माहिती मिपाकारांना द्यावीशी वाटल्याने इथे काही दुवे देत आहे.
सध्या जगभर आणि जालावर ज्यावर चर्चा चालु आहे ती म्हणजे NSA leaks, Edward Snowden आणि PRISM

या बद्धल सविस्तर माहिती खालील दुव्यांवर मिळेल :-
Edward Snowden was NSA Prism leak source - Guardian
Diplomatic intrigue: Where will unmasked NSA leaker go?
NSA leak fallout: LIVE UPDATES
World from Berlin: Prism Spying 'Attacks Basic Civil Rights
PRISM Spying Brings Questions For U.S. Allies

आता जरासे PRISM बद्धल :-
PRISM (surveillance program)
NSA Prism program taps in to user data of Apple, Google and others

उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया यांच्यातजी युद्धखोरीची धुसफुस चालु आहे,त्यातच मधे एक घटना घडली होती,त्या बद्धल माहिती खालच्या लेखात :-
Computer Networks in South Korea Are Paralyzed in Cyberattacks
अत्यंत वाचनिय लेख :-
Silent War
तुम्ही फायरफॉक्स उघडलेत तर तुम्हाला आता प्रथम हा संदेश दिसेल:-
Security and privacy are not optional. Stand with a broad coalition to demand that the NSA stop watching us: जो या दुव्याकडे बोट दाखवतो :- Stop Watching Us.

जाता जाता :- सर्व साधारण नेटकरी मंडळी प्रायव्हसीच्या बाबतीत जागरुक नसतात ! आता तरी जागरुक व्हा ! बिग बॉस इज वॉचिंग ऑलवेज ! या धाग्यात जी प्रायव्हसी एक्स्टेंशन्स दिली आहेत त्या बद्धल असलेली माहिती वाचा,जमल्यास त्याचा वापर देखील करा. १०० % सुरक्षा मिळेल याची खात्री नाही,पण काहीच सुरक्षा नसण्या पेक्षा काही तरी असलेली नेहमीच चांगली.
शेवटचे :--- थँस टु Instapaper

*** जर वर दिलेली माहिती तुम्हाला आवडली तर मला तसे जरुर कळवा. अशी माहिती गोळा करण्याचा माझा उत्साह अजुन वाढीस लागेल.

लॉरी टांगटूंगकर's picture

21 Jun 2013 - 3:27 pm | लॉरी टांगटूंगकर

दिलेल्या लिंक निवांतपणे रात्री वाचतो..

मी असा विचारल कारण सर्फिंग हिस्ट्री वरून बरेच चांगले सजेशन्सपण येतात. बर्याच ठिकाणी मीच अ‍ॅलर्ट तयार करून ठेवलेले आहेत. webinars वगैरे असले तर विशेष शोधाशोध न करता कळतं. फ्लिपकार्टपण माझ्या आवडीच्या विषयांमध्ये कोणतं पुस्तक आलं कि मेल करतय.

बाणशेठ एक प्रश्न, मला एखाद्या पेज वर दिसत असलेले सगळे फोटू सेव्ह करायचे आहेत तर काही अ‍ॅड ऑन आहे काय?? एखादा गुगल सर्च किंवा चेपुचा एखादा अक्खा अल्बम सेव्ह करायचा आहे. उदा. चिंटूच्या पेजवर जेपीजी मध्ये पाचशे चिंटू आहेत, सगळे उतरवून घ्यायचे आहेत. एक एक न करता अक्खा अल्बम, जमू शकते?

चेपुवरुन डाउनलोड मारण्यासाठी काही एक्स्टेंशन्स आहेत...
https://addons.mozilla.org/en-us/firefox/addon/facepaste/
https://addons.mozilla.org/en-us/firefox/addon/fluschipranie/
अधिक मदत इथे मिळेल :-
http://www.addictivetips.com/internet-tips/firefox-extension-lets-you-do...

बाकी गुगल सर्च किंवा चिंटु पेज बद्धल नक्की सांगता येत नाही,पण खालील अ‍ॅडऑन्सचा काही उपयोग होतो का पहा :-
https://addons.mozilla.org/en-us/firefox/addon/scrapbook/
https://addons.mozilla.org/en-us/firefox/addon/foxyspider/
https://addons.mozilla.org/en-US/firefox/addon/downthemall/

आतिवास's picture

12 Apr 2013 - 7:24 am | आतिवास

उपयुक्त माहिती,नक्की वापरुन बघते. लगेच सुरुवात केली आहे, बघू काय फरक पडतो आहे ते.
Google Privacy एकदाच करायचे की प्रत्येक वेळी वापरायचे हे नीट कळले नाही. करुन बघते - मग कळेल बहुधा.

प्रचेतस's picture

12 Apr 2013 - 8:33 am | प्रचेतस

मस्त रे बाणा.
उपयुक्त माहिती दिली आहेस.

अभ्या..'s picture

12 Apr 2013 - 9:53 am | अभ्या..

बाणराव खूप धन्यवाद फायरफॉक्स अ‍ॅडऑनच्या माहितीबद्दल.
झेलेअण्णा तुम्हाला पण. येऊ द्या अजून जरा फायरफॉक्सबद्दल. :)

ऋषिकेश's picture

12 Apr 2013 - 1:19 pm | ऋषिकेश

उपयुक्त!
विस्ताराने प्रतिसाद वेळ मिळाल्यास नक्की!

कॉम्प्युटरक्षेत्रात नसलेल्या लोकांनी हे ग्रीसमंकी कसं वापरायचं? मी डाउनलोड केलंय पण पुढे काय?

कॉम्प्युटरक्षेत्रात नसलेल्या लोकांनी हे ग्रीसमंकी कसं वापरायचं? मी डाउनलोड केलंय पण पुढे काय?
अगदी सोप्प काम आहे.ग्रीसमंकी डाउनलोड केल्यानंतर आता तुम्ही https://userscripts.org या संकेत स्थळावर जा.
इथे अनेक स्क्रीप्टस आहेत त्यातले मी एक स्क्रीप्ट वापरतो ते ग्रीस्मंकीच्या सहाय्याने कसे वापरायचे त्याचेच उदा. इथे देतो.
या संकेतस्थळाच्या उजवीकडे Script Search असा बॉक्स दिसेल. आता या बॉक्स मधे YouTube "Lights Out" असे टाईप करा. मग तुम्हाला अनेक पर्याय मिळतील. त्यातला YouTube "Lights Out" हा पर्यायावर टिचकी मारा की त्या स्क्रीप्ट बद्धलचे पान उघडेल.या पानाच्या टॉप राईट कॉर्नरवर "इनस्टॉल" हा पर्याय दिसेल,त्यावर टिचकी मारल्यावर स्क्रीप्ट रन होईल आणि ग्रीसमंकीच्या सहाय्याने ती ब्राउजरला लागु केली जाईल. तसा मेसेज देखील दिसेल.आता तुम्ही ब्राउजर बंद करा आणि पुन्हा चालु करा. युट्युबच्या पानावर जा... हवा तो व्हिडीयो उघडा.त्या व्हिडीयोच्या खाली आता तुम्हाला बल्बचा आयकॉन दिसु लागेल... त्यावर टिचकी मारा की व्हिडीयो सोडुन बाकीछ्या भागाचा प्रकाश बंद होतो आणि यामुळे फक्त व्हिडीयो पाहतानाची मजा घेता येते.

* एक उदाहरण म्हणुन मी वरची स्क्रीप्ट दिली अश्या असंख्य स्क्रीप्टस तिथे आहेत... तेव्हा त्याचा प्रयोग जरुर करुन पहा.
त्या स्क्रीप्टची लिंक इथे खाली देतो आहे,पण वरती ज्या पधतीने सांगितले आहे त्या पद्धतीने पान शोधण्याचा प्रयत्न करा कारण त्याचा फायदा तुम्हाला इतर स्कीप्टस शोधताना होईल.
http://is.gd/6VmzVz

पैसा's picture

13 Apr 2013 - 10:39 am | पैसा

अगदी उपयोगी धागा. मंद्या आणि लंबूटांग यांच्या प्रतिक्रिया आवडल्या. मी मात्र ही एक्सटेन्शन्स जास्त प्रमाणात माहिती गोळा करत असतील या भीतीने अजिबात वापरत नव्हते. आणखी प्रतिक्रिया वाचून पुन्हा विचार करीन.

मदनबाण's picture

13 Apr 2013 - 10:46 am | मदनबाण

मी मात्र ही एक्सटेन्शन्स जास्त प्रमाणात माहिती गोळा करत असतील या भीतीने अजिबात वापरत नव्हते. आणखी प्रतिक्रिया वाचून पुन्हा विचार करीन.
जर एक्स्टेंशन्स त्या त्या साईट वरुन म्हणजे क्रोमची साईट आणि फाफोची साईट वरुन घेतल्यास असा धोका असण्याची शक्यता कमीच आहे,कारण १) यांचे टेस्टींग झाल्यावरच त्यांना परवानगी मिळते २) ओपन सोर्स असल्याने जर लबाडी करण्याचा प्रयत्न झाला तर तो लगेच उघड होउ शकतो.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

19 Apr 2013 - 8:03 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सध्याचं फायरफॉक्स व्हर्जन [२१.]खूप बोअर वाटतं. तसा फीडबॅकही पाठवला आहे.

-दिलीप बिरुटे

सध्याच व्हर्जन २०.०.१ असे आहे आणि यात जाणवलेला बद्धल म्हणजे प्रायव्हेट ब्राउजींग ऑप्शन हा आता File=>New Private Window इथे गेला आहे,जो आधी Tools मधे होता.

आजचे एक्स्टेंशन :-
Cutyfox URL Shortener (bit.ly, is.gd, goo.gl) 1.4.1 :- या धाग्यात बरेचसे युआरएल शॉर्ट करुन दिलेले आहेत ते याच एक्स्टेंशनचा वापर करुन.मिपावर किंवा इतर ठिकाणी लिंक देताना जर त्याची लांबी अधिक असेल तर कंटाळवाणे काम होते,त्याला हा पर्याय उपयोगी आहे,एका क्लीक मधेच लांबलचक युआरएल शॉर्ट होउन जाते.:)
piks.nl URL Shortener :- हे क्रोमसाठी.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

27 Apr 2013 - 8:15 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>> सध्याच व्हर्जन २०.०.१ असे आहे
२१.० बेटा व्हर्जन.फायरफोक्स येथून डाऊनलोड करा.

-दिलीप बिरुटे

नीलकांत's picture

20 Apr 2013 - 1:37 pm | नीलकांत

बाणा अतिशय उत्तम माहिती दिलीस रे.
मी फायरफॉक्सच्या एक्स्टेंशन्स कायम वापरतो. वर तु माहिती दिली आहेच त्यासोबतच जे लोक डेव्हलपर आहेत ते लोक फायरबग, वेबडेव्हलपर टुलबार (फायरफॉक्स), फायर एफटीपी, आदी वापरतात हे खुप कामात येते. सोबतच युट्युबचे व्हिडीओ डाऊनलोड करण्यासाठी व्हिडीओ डाऊनलोड हेल्पर नावाचे अ‍ॅडऑन वापरा. उत्तम आहे.

ग्रिस मंकी सुध्दा छान आहे. गुगल बुक्स डाऊनलोड करता येतील, खरं तर जेव्हड्या स्क्रिप्ट्स तेवढ्या शक्यता आहेत ग्रिसमंकी बाबत. :)

अतिशय उत्तम माहिती बद्दल धन्यवाद मदनबाण.

मदनबाण's picture

26 Apr 2013 - 10:05 am | मदनबाण

धन्यवाद निलकांत ! :)

जे लोक डेव्हलपर आहेत ते लोक फायरबग, वेबडेव्हलपर टुलबार (फायरफॉक्स), फायर एफटीपी, आदी वापरतात हे खुप कामात येते.
या बद्धल जास्त माहिती नसल्याने ही अ‍ॅडऑन्स इथे दिली नव्हती,पण या बद्धल माहित होते.

सोबतच युट्युबचे व्हिडीओ डाऊनलोड करण्यासाठी व्हिडीओ डाऊनलोड हेल्पर नावाचे अ‍ॅडऑन वापरा. उत्तम आहे.
हो, हे मी अनेक वर्षांपासुन वापरतो आहे,एकदम सोप्पे आहे वापरायला.अनेकजण FlashGot देखील वापरतात.

आजचे एक्स्टेंशन :-
Click&Clean :- अनेकजण ब्राउजर हिस्ट्री क्लीन करण्यासाठी CCleaner वापरतात,पण हे एक्स्टेंशन अ‍ॅड केले की त्याची काही गरज राहत नाही.ब्राउजिंग हिस्ट्री,लोकल फ्लॅश शेअर ऑव्जेक्ट रिमुव्हल आणि सिक्युअर फाईल डिलीशन हे या एक्स्टेंशन वैशिष्ठ आहे.
Click&Clean :- हे क्रोमसाठी.

मदनबाण's picture

5 May 2014 - 11:18 am | मदनबाण

सोबतच युट्युबचे व्हिडीओ डाऊनलोड करण्यासाठी व्हिडीओ डाऊनलोड हेल्पर नावाचे अ‍ॅडऑन वापरा. उत्तम आहे.
हो, हे मी अनेक वर्षांपासुन वापरतो आहे,एकदम सोप्पे आहे वापरायला.अनेकजण FlashGot देखील वापरतात.

मंडळी जरा मला सांगा तर... तुमच्या पैकी किती जणांना youtube वरुन व्हिडीयो डाउनलोड मारायची सवय आहे ? आणि ज्यांना याची सवय आहे, त्यांना आत्ता एक गोष्ट पक्की माहित झाली आहे की 1080p व्हिडीयो डाउनलोड मारता येणे कधीच बंद झाले आहे. जालावर अनेक फोरम्सवर याच्या चर्चा रंगल्या आहेत... अनेकजण परत 1080p व्हिडीयो डाउनलोड कसा मारता येइल यावर टाळकी चालवण्यात व्यस्त आहेत, कोण DASH {Dynamic Adaptive Streaming over HTTP} वर चर्चा करतय तर, कोणी 1080p व्हिडीयो परत डाउनलोड मारता येण्यासाठी सॉफ्टवेअर बनवण्याचा प्रयत्न करतय.
आता आधीचे उपाय म्हणजे DownloadHelper किंवा http://keepvid.com/ वापरणारे लोक सुद्धा हैराण आहेत कारण जास्तीत जास्त 720p साइझ डाउनलोड मारता येते आणि आता सर्वांना 1080p ची चटक लागली आहे.
आहे काय उपाय यावर ? तुम्हाला याचे उत्तर माहित आहे ? असेल तर प्लीज नक्की सांगा बरं का...
गेले कित्येक महिने यावर माझी सुद्धा डोकेफोड चालली होती... मग अनेक शोध, फोरम्सच्या चर्चा सॉफ्टवेअरस ट्राय मारले... तरी योग्य आणि खात्रीशीर पर्याय काही मिळाला नव्हता... पण यावर आता उपाय मिळाला आहे. ;)

आता युट्युब ने नक्की काय केले आहे ज्यामुळे 1080p फाइल प्ले तर होते पण ती डाउनलोड मारता येत नाही ?
तर युट्युब DASH प्रोटोकॉल वापरुन adaptive streaming सुरु केले...त्यामुळे व्हिडीयोच्या दोन सेपरेट फाइल्स प्ले होतात. म्हणजे ऑडियो आणि व्हिडीयोच्या २ वेगळ्या फाइल्स एकत्र प्ले केल्या जातात. आणि हीच खरी मेख आहे ज्यामुळे 1080p व्हिडीयो डाउनलोड करणे बंद झाले आहे.

यावर उपाय ?
आहे ना...
सध्या तो उपाय मी वेळ मिळेल तसा वापरुन पाहण्याचे उध्योग करत आहे, काल त्यात यश मिळाले आहे, पण अजुन पूर्ण वापरण्याची माहिती समजवुन घेत आहे. :) अर्थात मी प्रोग्रॅमर नसल्याने यातली कुठलीही माहिती मला ठावुक नाही,आणि मी स्वतःकाही डेव्हलप केलेले नाही...फक्त वापरुन बघण्याचे काम करतोय...
जरा जालावर शोध घ्या... काही सापडलं तर ? ;)

*टीप :- वरील तांत्रिक विष्लेषणात चूक असण्याची शक्यता आहे, या बद्धल अधिक माहिती कोणाला असेल तर त्याचे स्वागत आहे. :) किंबहुना ती द्यावी अशी विनंती. जालावर जे काही तोडक मोडक वाचलं तेच जसं मला समजल तसच इथे दिल आहे.

निनाद's picture

5 May 2014 - 11:23 am | निनाद

मी डाऊनलोड करत नाही पण जाहिराती टाळायच्या असतील तर एसएमप्लेयर
http://smplayer.sourceforge.net/
वापरा. कोणतीही जाहिरात न येता युट्युब व्हिडियो पाहता येईल. :)

आता वरचा प्रतिसाद वाचल्यावर तुम्हाला हे कळलेच असेल की यू-ट्युबवरुन एचडी व्हिडीयो डाउनलोड करता येणे बंद झाले आहे आणि त्याचे कारण अर्थातच DASH {Dynamic Adaptive Streaming over HTTP} आहे.
यावरचा उपाय मी तुम्हाला आता देतो :-
१} सर्वात प्रथम FFmpeg हे तुमच्या पीसी मधे इन्स्टॉल करा. { याच्या २ पद्धती आहे,एक डायरेक्ट इन्स्टॉलर आणि एक झीप फाईल असे २ पर्याय आहेत, यातले २न्ही मी ट्राय मारले आहेत. झीप फाईलवाल्या पद्धतीला मी अधिक पसंती देइन.}
२} Download FFmpeg Installer किंवा Download FFmpeg {हा झीप फाईलवाला दुवा आहे.}
३} आता Complete YouTube Saver 5.4.5 हे फाफॉ अ‍ॅडऑन इन्स्टॉल करा.
४} आता हे अ‍ॅडऑन इन्स्टॉल झाल्यावर फाफॉच्या Tools => Complate Youtube Saver => Options इथे जा.
५} इथे पोहचल्यावर तुम्हाला खालील { General टॅब मधे Media Conversion Options हा पर्याय दिसुन येइल.}पर्याय दिसेल.
P1
यात Specify FFmpeg location... हा पर्याय दिसेल त्यावर क्लीक करा. आता तुम्ही जे FFmpeg इन्स्टॉल केले आहे त्याचा पाथ इथे द्या.
उदा. जर हा पाथ असा असेल तर तो तसाच द्या.
P2
योग्य पर्याय दिल्या बरोबरच तुम्हालाSpecify FFmpeg location... च्या डाव्या बाजुला FFmpeg Installed असे दिसुन येइल. याचा अर्थ अ‍ॅडऑन आणि FFmpeg हे एकमेकांना जोडले गेले आहे.
६} आता कुठल्याही ट्रू एचडी गाण्यावर जा आणि Complete YouTube Saver च्या आयकॉनवर क्लीक करा... तुम्हाला त्या फाइलचे सर्व प्रकार दिसुन येतील { जो व्हिडीयो प्ले केला आहे त्याचे} हवा तो सिलेक्ट करा आणि डाउनलोडवर क्लीक करा.
७} कोण म्हणत यू-ट्यूब वरुन 1080P व्हिडीयो डाउनलोड करता येउ शकत नाही ? ;) एन्जॉय डाउनलोडिंग अगेन फ्रॉम यू-ट्युब. :)
८} 1080P काय पण 4K व्हिडीयो सुद्धा तुम्ही यामुळे करु शकाल ! { काय आहे हे 4K ? :- 4K resolution }
९} आता एक लक्षात असु द्या, ते म्हणजे ऑडियो आणि व्हिडीयो या दोन्ही फाईल्स सेपरेटली डाउनलोड केल्या जातात आणि नंतर FFmpeg च्या सहाय्याने त्या एकत्रीत मर्ज केल्या जातात. तुम्हाला डाउनलोड झाल्यावर स्क्रीनवर एखादी डॉस विंडो ओपन झालेली दिसेल त्यात मर्ज करण्याबाबत विचारणा असेल व Y & N हे पर्याय दिसतील तर तिथे Y टाईप करुन एंटर की प्रेस करावी. { मी माझ्या सिस्टीमवर FFmpeg चे फोल्डर हाइड करुन टाकले आहे, त्यामुळे सध्या हा पर्याय मला विचारला जात नाही.डॉस विंडो क्षणात उघडुन बंद देखील होते आणि मला काहीही टाईप करावे लागत नाही... हा माझ्या पुरता जुगाड मी केला आहे. }
वरती दिलेली प्रोसेस नीट समजत नसल्यास इथे जावे :- http://www.cys-audiovideodownloader.com/Converter.html

आत्ताची सही :- Whistle Baja... :- Heropanti

मदनबाण's picture

2 Aug 2014 - 9:35 am | मदनबाण

गुगले ने परत यू-ट्युबवर चेंजेस केले त्यामुळे वरचे अ‍ॅडऑन वापरुन व्हिडीयो डाउनलोड करताना ० byte फाईल्स दिसु लागले.
पण त्यावर तोडगा काढुन नविन व्हर्जन रिलीज केले आहे.
Complete YouTube Saver चे नविन रिलीज आता इथे उपलब्ध आहे :- Version 5.5.2
एन्जॉय ! ;)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Dhadhang Dhang ;) { Rowdy Rathore }

सुधीर's picture

20 Apr 2013 - 7:54 pm | सुधीर

गेल्या २ दिवसांपासून मी लीचब्लॉक वापरतोय. काही संस्थळं करमणूक, ज्ञानार्जनासाठी वा अगदी गरज म्हणून जरी उपयोगी असली तरी त्यात फार वेळ घालवला तर उत्पादक असं काहीच होत नसतं. अगदी साधं उदा. घ्यायचं तर मला सारखं सारखं ई-मेल्स चेक करत राहण्याची सवय आहे. म्हटलं तर गरज आहे, पण किती वेळ त्यात घालवावा हे व्यक्तीगत आहे. काही लोकं संयमी असतात. त्यांचा स्वतःच्या कृतीवर ताबा असतो. माझ्यासारख्यांना थोडी शिस्त लावण्यासाठी हे एक्स्टेंशन किती उपयोगी पडतयं ते काही काळाने कळेलच. :) ह्या एक्स्टेंशन मध्ये ठराविक वर्गातल्या (उ.दा. मराठी-संस्थळं वा इमेल्स वा न्यूज) संस्थाळांसाठी ठराविक तासांमागे किती वेळ द्यावा (उ.दा. दर ३ तासांमागे १० मि.) हे आपण ठरवू शकतो. ह्या ठराविक वेळेनंतर त्या वर्गातली सगळीच संस्थळं तुम्हाला ठराविक तासासाठी निषिद्ध होतात.

अर्थात वाईट सवयी मोडायला खूप कष्ट पडतात. माझा वेळ संपला म्हणून मी हा प्रतिसाद फायरफॉक्स मधून न देता क्रोम मधून देतोय :)

गमभनचं फायरफॉक्स एक्स्टेंशन वापरून चेपु किंवा इतर कुठेही थेट मराठीत टाईप करता येतं.
मी स्वतः क्रोम वापरतो. मराठीत थेट टायपिंग साठी गमभन सारखं कुठलं एक्स्टेंशन आहे का? शक्यतो गमभन कारण आता ते वापरायची सवय लागली आहे.

चैतन्यकुलकर्णी's picture

27 Apr 2013 - 6:15 pm | चैतन्यकुलकर्णी

mozilla archieve format - संपुर्ण वेब पेज (इमेज वगैरे सहीत) साठवण्यासाठी,
print PDF - महत्वाचे ब्लॉग/वेबपेज PDF फाईलमध्ये साठविण्यासाठी,

@सुधीर्,मराठे आणि चैतन्य धन्स...

ColorfulTabs 18.5 :-आपण सर्फिग करताना एकाच विंडोत अनेक टॅब्स उघडतो...पण त्यांची संख्या वाढल्यावर पटकन हव्या त्या टॅबवर जाणे कठीण जाते,कारण प्रत्येक टॅबचा रंग सारखाच असतो.या एक्स्टेंशनचा वापर केल्यामुळे प्रत्येक टॅब वेगळ्या रंगाची दिसते...एक अत्यंत उपयोगी अ‍ॅप.काही रंग जरा भडक वाटले पण ओव्हरऑल फील चांगला वाटला.

जाता जाता :- फाफॉचा पहिला लुक खालील व्हिडीयोत...

State of the Art
The New Firefox Is Fantastic. So Is Every Other Web Browser. :- http://alturl.com/bzvc3

सुहास झेले's picture

4 May 2014 - 10:12 am | सुहास झेले

यप्प... निव्वळ अल्टीमेट. फायरफॉक्स रॉक्स :)

मदनबाण's picture

15 Oct 2013 - 4:32 pm | मदनबाण

आजचे एक्स्टेंशनः-
Awesome Screenshot {क्रोमसाठी}
Awesome Screenshot Plus {फाफॉसाठी}
बर्‍याच वेळी जालावर वाचन करताना आपल्याला स्क्रीन शॉट घ्यायचा असतो... यासाठी हे एक्स्टेंशन उपयुक्त आहे.

goo.gl URL Shortener
या आधी सुद्धा काही URL Shortener दिली होती,हे सध्या मी क्रोम मधे वापरत आहे. एकदम उपयोगी.

सुधीर's picture

15 Oct 2013 - 10:28 pm | सुधीर

ऑसम आवडलं. एव्हरनोट मध्ये बातम्या/लेख आणि खास करून ग्राफ्स टॅग लावून साठवून ठेवण्यास उपयोगी पडेल.

कोमल's picture

15 Oct 2013 - 10:33 pm | कोमल

मस्तच.. मागच्याच आठवड्यात अ‍ॅडवले दोन्ही ब्राऊजरना..

मदनबाण's picture

22 Feb 2014 - 9:22 am | मदनबाण

आजचे एक्स्टेंशन्स आणि अ‍ॅडऑन्स :-
क्रोमसाठीचे प्रायव्हसी प्रोटेक्शन चे एक्स्टेंशन्स Disconnect
Disconnect, named one of the 100 best innovations of 2013 by Popular Science and one of the 20 best Chrome extensions by Lifehacker
फायरफॉक्ससाठी चे प्रायव्हसी अ‍ॅडऑन Priv3 0.2
या बद्धल अधिक माहिती इथे मिळेल :- http://goo.gl/Iyuvnw
या अ‍ॅडऑन बद्धल एक महत्वाची गोष्ट म्हणजे एक या अ‍ॅडऑन टीम मधे Mohan Dhawan या भारतीय व्यक्तीचा सहभाग आहे. वरील दुव्यात या अ‍ॅडऑन बद्धल अधिक माहिती मिळेल.

वरीत एका प्रतिसादात Click&Clean या एक्स्टेंशन / अ‍ॅडऑन बद्धल सांगितले आहे त्यात एक सेटींग वापरुन तुम्हाला Google Secure Search over SSL एनेबल करता येइल.
दुवा :- Search more securely with Google Secure Search over SSL

वरती दिलेला एक दुवा चुकला आहे, तो खालील प्रमाणे आहे :-
या बद्धल अधिक माहिती इथे मिळेल :- The Priv3 Firefox Extension

सुहास झेले's picture

23 Feb 2014 - 4:05 pm | सुहास झेले

Disconnect आवडलं... सहीच आहे एकदम :)

मदनबाण's picture

23 Feb 2014 - 5:09 pm | मदनबाण

हो. कोणत्या साईटवर किती ट्रॅकर्स आहेत ते समजायला या सर्व एक्स्टेंशन्स / अ‍ॅडऑनमुळे फायदा होतो. इथे आधी {काल पर्यंत ५ ट्रॅकर्स {फेसबुक प्लगइन धरुन} होती, आज फक्त २ फेसबुक प्लगइन धरुन} दिसत आहेत. त्यातल्या एकाच नाव piwik analytics आहे तर दुसर्‍याच फेसबुक सोशल प्लगइन.
मला स्वतःला विचारशील तर आय हेट ट्रॅकर्स. ;)

मदनबाण's picture

3 May 2014 - 5:01 pm | मदनबाण

यात थोडा बदल करतो...
मला वाटतं की YouTube चे embed केलेले व्हिडीयो प्ले केले असता तिथल्या ट्रॅकरचा काउंट मोजला जातो त्यामुळे जास्त मोजले गेले असण्याची शक्यता आहे.