आपले केंद्रीय अन्न पुरवठा मंत्री थॉमस यांनी अन्नसुरक्षा बिलाचा गोषवारा असलेली एक पुस्तिका नुकतीच व्हेटीकन मध्ये जावून पोपच्या पायावर घालून आणली म्हणे.
याला आपली हरकत असायचे कारण नाही. आपणही दिवाळीला हिशोबाच्या वह्या भवानीला दावून आणतोच कि ! क्याथोलीकांची श्रद्धास्थाने व्यक्तीस्वरुपातही आहेत एवढेच.
म्हणून फक्त हे सरकारी प्रेस रिलीज मध्ये सापडते, माध्यमांमध्ये नाही. याची बातमी व्हायचे कारणही नाही, मान्य.
http://pib.nic.in/newsite/erelease.aspx?relid=99965
गोची तेव्हा होते जेव्हा आपण याच घटना एखाद्या मंत्र्याच्या आणि शंकराचार्यांच्या बाबतीत घडल्या अशी कल्पना करून ब्रेकिंग न्यूज चे मथळे विज्युअलाइज करायला लागतो…
आपला निधर्मीवाद/सर्वधर्मसमभाव सापेक्ष असतो का किंवा का असतो ?
अन्नसुरक्षा बिल हे सोनियांचे स्वप्न असायचे कारण काय या प्रश्नाचे उत्तर कदाचित या घटनेतून मिळू शकेल का ?
(बालबुद्धी- इष्टु)
प्रतिक्रिया
14 Oct 2013 - 3:19 pm | इरसाल
शाकाहारी पदार्थ व वस्तु असतील तर ते शंकराचार्यांच्या पायावर
मांसाहारी पदार्थ व वस्तु असतील तर ते इमाम बुखारींच्या पायावर
या व्यतिरिक्त मैदा आणी किण्वयुक्त पदार्थ व वस्तु असतील तर पाद्र्यांच्या पायावर घालावेत. (चुभुदेघे.)
14 Oct 2013 - 3:35 pm | बॅटमॅन
निधर्मीवादाचा मक्ता घेतलेल्यांचा निधर्मीवाद सापेक्ष अन तर्कदुष्ट असतो. पण तसे नाही बोलले तर यांना भाव कोणी देणार नाही त्यामुळे त्यांना ते करणे भागच आहे.
बाकी किण्व हा शब्द इयत्ता दहावीनंतर आज पहिल्यांदा वाचला, त्या फर्मेंटेड स्मृतींनी अंमळ हळवा झालो.
14 Oct 2013 - 3:41 pm | ग्रेटथिन्कर
पोपही धर्मगुरुच आहेत, त्यांचे आशिर्वाद भारतीयांना मिळाले तर बिघडले कुठे?
14 Oct 2013 - 3:47 pm | बॅटमॅन
अरेरेरे...धर्मगुरूच्या आशीर्वादाने कुणाचं काही भलं होतं यासारख्या हास्यास्पद फ्यांटसीला तुम्हीही बळी पडलात तर...तुमच्यासारखे ट्रोलभैरवच असे वागू लागले तर कसं होणार म्हराठी विचारजंतांचं?
15 Oct 2013 - 9:37 am | सुबोध खरे
पोप धर्मगुरू आहेत आणी ते वंदनीय आहेत या बद्दल कोणताही आक्षेप नाही किंबहुना थोमस साहेब त्यांच्या पाया पडले तरी त्यात काहीही गैर नाही. मी स्वतः सुद्धा कोणत्याही धर्माच्या गुरूच्या पाया पडेन(आणी पडतो) .
पण जर कोणी भारतीय घटनेचे पुस्तक किंवा आपला तिरंगा कोणत्याही धर्मगुरूच्या पायावर ठेवेल तर तो घटनेचा(आणी राष्ट्राचा) अवमान आहे असे मला वाटते कारण भारतीय घटना हि पूर्णपणे निधर्मीवादाचा पुरस्कार करते आणी असे पुस्तक कोणत्याही धर्मगुरूच्या पायावर लोटांगण घालते (मग त्यात पोपच काय शंकराचार्य व शाही इमाम सुद्धा येतात) हे मान्य होणारे नाही. यात राजकारण(किंवा धर्मकारण) नसावे असे मला वाटते.
15 Oct 2013 - 1:57 pm | arunjoshi123
नक्कीच. जगातल्या कोणत्याही पुण्यप्रद व्यक्तिचे आशिर्वाद इतर कोणाही व्यक्तिस, याला काही शास्त्रीय वा भावनिक आधार असेल तर, मिळाले तर हरकत नसावी.
एक महान विचार म्हणून सोनिया -थॉमस द्वयींनी, कोणी कोणत्या का देशाचे असेना, ख्रिश्चन आहेत म्हणून , आणि एक चांगले वर्तन म्हणून, भारताच्या संघराज्याचा कोणता नियम वा शिष्टाचार मोडून वा न मोडून, बिलाचा प्रत पोपांना दिली हे ही उत्तम मानू.
पण, केवळ 'कल्याणकारी कामातून पुण्य मिळते' अशा ख्रिश्चन धारणेतून, भारताच्या अन्य आर्थिक वा राजकीय परिस्थितीचा विचार करून वा न करून, या बिलाला बल प्राप्त तर झाले नसावे ना आणि अशा यशाचा दृश्य समारोह म्हणून ही घटना का पाहिली जाऊ नये असा एक आशयघन प्रश्न लेखकास अभिप्रेत असावा.
लेखकाचा प्रतिवाद करताना या प्रश्नाचे उत्तर देणे आणि शक्य तितके प्रांजळ होणे आवश्यक आहे कारण सोनिया आणि थॉमस नक्की किती धार्मिक असावेत, आणि त्यांच्या धार्मिकतेचा भारतीय राजकारणावर किती परिणाम होत असावा हे ते स्वतःही सांगू शकतील कि नाही ठाऊक नाही. असे या करिता म्हणायचे कि चिदंबरम् यांना कितीही संतुलित नेता मी म्हणायला जातो तेव्हा ते मला 'दिल्लीत' मोठ्या मोठ्या काँफरन्सात लूंगी घालून आलेले दिसतात. लूंगी विना पाहिल्याचे आठवतच नाही. कोणती अस्मिता, भावना किती दृश्य असते, किती खोल असते हे निर्णायकरित्या आपण सांगू शकतो का?
14 Oct 2013 - 4:02 pm | ग्रेटथिन्कर
प्रसाद खाल्ला नाही म्हणून साधूवाण्याचं जहाज बुडालं, यावर इश्वास असणार्याने इचारवंतांची काळजी करु नये
14 Oct 2013 - 4:10 pm | बॅटमॅन
विचारजंतांना विरोध करतो म्हणून मी अंधश्रद्धाळू आहे हा निष्कर्ष तुम्ही काढणारच. अन हो, विचारवंतांची काळजी मला नाही, तर विचारजंतांची आहे. डोळे अन मेंदू उघडा ठेवा अन स्वतःची पाठ थोपटू नका उगीच =))
14 Oct 2013 - 8:13 pm | डॉ सुहास म्हात्रे
डोळे अन मेंदू उघडा ठेवा
ग्रेट थिंकींग ला या दोन्हीची (किंवा इतर काहीची) अजिबात गरज नाही असा काहींचा समज असल्याचा माझा समज होत चाललाय ;)
14 Oct 2013 - 8:35 pm | बॅटमॅन
हा हा हा, अगदी खरेय. हे थिंकरमहाशय अॅरिस्टॉटल परंपरेतले दिसतात. कुठलीही गोष्ट निव्वळ (वाटेल तशा) विचाराने समजून घेता येते, प्रयोगांती प्रमाणाची गरज नै असा त्यांचा (पानिपतावर न गेलेला) विश्वास असतो =))
14 Oct 2013 - 5:46 pm | इष्टुर फाकडा
ओ ग्रेटथिंकर (?) उगा डोक्यावर पडल्यासारखे सगळ्या धाग्यांवर उथळ थैमान घालत जावू नका.
पोपही धर्मगुरुच आहेत, त्यांचे आशिर्वाद भारतीयांना मिळाले तर बिघडले कुठे?
--- कोण म्हटलंय बिघडलंय म्हणून ?
प्रसाद खाल्ला नाही म्हणून साधूवाण्याचं जहाज बुडालं, यावर इश्वास असणार्याने इचारवंतांची काळजी करु नये
--- तुम्हाला माझ्या (वाक्य माझ्यासाठी असेल तर) किंवा इतर लोकांबद्दल ट माहिती असायचं कारण नाही, गोष्टी गृहीत धरू नका.
14 Oct 2013 - 5:56 pm | पैसा
बाकी सगळं र्हाऊ द्या. कायद्याचा मसुदा, कायदा होण्यापूर्वी असा बाहेरच्या देशाच्या नागरिकाला दाखवला तर चालतो का?
14 Oct 2013 - 5:59 pm | बॅटमॅन
दशलक्ष रुपयांचा प्रश्न!!!!
14 Oct 2013 - 6:10 pm | डॉ सुहास म्हात्रे
+१११
दशलक्ष युरोंचाही प्रश्न ! जाणकारांच्या मतांची वाट पहात आहे !
14 Oct 2013 - 6:13 pm | अनिरुद्ध प
+१११ सहमत
14 Oct 2013 - 6:07 pm | प्यारे१
पोप 'वैश्विक नसतो' असं म्हणायचंय का तुम्हाला पैसातै ? ;)
14 Oct 2013 - 6:19 pm | पैसा
पोप आम्हाला प्रातःस्मरणीय आहेत. पण ते भारताचे नागरिक आहेत का?
14 Oct 2013 - 6:28 pm | प्यारे१
ह्यावेळी चान्स होता म्हणे पोप भारतीय बनण्याचा. हुकला.
आता किती वर्षं वाट बघायची कुणास ठाऊक पांढर्या धुराची ;)
बाकी कायदा बनताना पोपना भारतीय नागरिक असले तर काही आक्षेप नसेल ना तुमचा?
रेशनकार्डच पायजे ना?
तुमच्या शेजारचा गोव्यातलाच पत्ता द्यायला सांगू.
हाय काय नि नाय काय? ;)
14 Oct 2013 - 6:33 pm | पैसा
आक्षेप घेणारे आम्ही कोण? म्या फक्त एक शंका विचारली! तसं काय रेशन कार्ड अन आधार भारताचे नागरिक नसलेल्यांना आमच्या आधी मिळतंय!
14 Oct 2013 - 6:51 pm | इष्टुर फाकडा
ह्यावेळी चान्स होता म्हणे पोप भारतीय बनण्याचा. हुकला.
'पोप' आणि 'भारतीय' यांच्या जागेची अदलाबदल सुचवतो ;)
15 Oct 2013 - 10:16 am | इरसाल
इइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइ !
काय्य्तरीच्च क्कॉय ?
15 Oct 2013 - 11:13 am | पैसा
तुम्हीच काय ते बोल्ल्लांव. आपण नाय ब्वॉ.
16 Oct 2013 - 4:19 pm | चिगो
लिंकमध्ये जे वाचलं त्याप्रमाणे अन्न सुरक्षा कायद्यावरील पुस्तिका पोपना भेट देण्यात आली. ह्या बातमीनुसार बिलला राष्ट्रपतींची सहमती मिळून तो आता कायदा झालाय, त्यामुळे ह्यात कायदेशीररित्या काही गैर नाही..
बाकी, सोनिया गांधी किंवा थाॅमस ह्यांच्या धार्मिक भावना किंवा पुण्यप्राप्तीसाठी हा कायदा बनवला नसावा,अशि अपेक्षा आहे.. कायदा किंवा योजना ह्यांचे प्रयोजन 'जनकल्याण' हे असावे, पुण्यप्राप्ती नव्हे..
15 Oct 2013 - 9:19 am | उद्दाम
छान . कुणाच्या ना कुणाच्या आशिर्वादानं का होईना, लोकाना अन्न मिळावे.
न्हायतर एकेक परमेश्वरी अवतार असतात, छाताडावर हात मारुन सांगतात - योगक्षेमं वहाम्यहम ! सगळ्यांचं योगक्षेम मी बघतो. आणि यांच्याआसपास पिठात पाणी कालवून पिणारा कुणी अश्वत्थामाही नांदत असतो , त्याची यान्ना कल्पनाही नसते.
15 Oct 2013 - 11:36 am | अनिरुद्ध प
आपल्याला अश्वत्थामाच आठवला ? अहो त्यच्याकडे निदान पीठ आणि पाणि तरि होते,योगक्षेम चालवायला तेही नसे थोडके?
15 Oct 2013 - 11:42 am | उद्दाम
आण्णा, ते थोडकेच असते. त्याने पोट भरत नाही.
कुपोषण म्ह्णजे काय हे तुम्ही शिकवायला येऊ नका.
--- सुदृढ उद्दाम
15 Oct 2013 - 11:52 am | अनिरुद्ध प
अश्वत्थामा जर कुपोषित असता,तर एव्हड्या पान्डवान्च्या मुलांचा ध्रुष्ट्दुम्ना सहीत वध करु शकला असता काय?
15 Oct 2013 - 11:54 am | उद्दाम
आण्णा, त्याच्या डॅडीना कौरवांची मास्तरकी मिळण्याआधीची ती गोष्ट आहे.
15 Oct 2013 - 11:42 am | बॅटमॅन
देशाबाहेरच्या नागरिकाला असे दाखवणे यात गैर काही नाही असेच शिकवले असेल तुमच्या डाव्या शाखेत, नैका? गुलाग सपोर्टर्सचे उफराटे लॉजिक पाहिले की मजा येते, कारण लॉजिकच नसते.
15 Oct 2013 - 11:52 am | उद्दाम
लोकाना अन्न पुरवणे, कुपोषण टाळणे, एखादी रोग प्रतिबंधात्मक स्कीम जसी पल्स पोलिओ, टी बी योजना, मलिएरिया योजना वगैरे आंतरराष्ट्रीय सहकार्याने पार पाडायच्या असतात. या प्रकरणात जागतिक एन जी ओ , वर्ल्ड ब्यान्क, इतर डॉनर यांची मदत होत असते.
शिवाय, एका देशाच्या डेटाचा अभ्यास करुन दुसर्या देशातील स्कीम आणखी मजबूत करता येते.
अर्थात, हे समजायला विश्वबंधुत्व म्हणजे काय याचे ज्ञान असावे लागते. आसिंधुसिंधुच्या आतले लोक आमचे, त्याच्या आतलेच देव आमचे, पुण्यभू आणि पितृभु वगैरे जप करणार्या लोकाना ही समज असण्याची शक्यता कमीच.
--- जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शनाने आणि पाचपन्नास देशांच्या अनुभवाने तयार झालेला, भारतात सुरु असणार्या एच आय व्ही केंद्रात काम करणारा आणि त्याबद्दल बिल गेटच्या डोनेशनच्या पैशातून पगार घेणारा डॉ. उद्दाम.
15 Oct 2013 - 12:42 pm | आनन्दा
एव्हढ्या सगळ्या गोष्टी पोप महाराजांच्या मुठीत आहेत हे पाहून डोळे पाणावले. काय हो, जागतिक बँक पण त्यांच्या योजना पोप साहेबांच्या पायावर वाहूनच काम सुरू करते वाटते?
15 Oct 2013 - 1:08 pm | डॉ सुहास म्हात्रे
कमीत कमी इटलीचे संविधान / सरकार त्यांच्या देशाचे कायदे / योजना पोपसाहेबांना सांगून मग मंजूर करत असले तर त्याची नक्की माहिती वाचायला आवडेल.
सार्वभौम सरकारच्या वागणूकीचे काही मानदंड असतात यात हे असले काम बसत नाही... अगदी परक्या सरकारने अथवा गैरसरकारी संस्थेने अगदी भरघोस मदत केली असली तरी "योजनेचा मसुदा बनवण्यात काही प्रमाणात मतप्रदर्शन" यापलिकडे देशाच्या सार्वभौम अधिकारांना कोणत्याही प्रकारे बाधा येईल असे कोणतेही प्रावधान योजनेत असू शकत नाही.
अशी मागणी करणार्या कोणत्याही प्रकारच्या मदतगाराची मदत अस्विकार्य करण्याचा सार्वभौम सरकारचा हक्क असतो. यासंदर्भात राष्ट्रसन्मान अबाधित राखण्यासाठी अनेक गरजू देशांनी (म्यानमार, श्री लंका, इ.) अनेकदा परकीय मदत नाकारलेल्याची उदाहरणे आहेत.
राष्ट्राच्या सार्वभौम अधिकाराची अवहेलना करणार्या सरकारवर नीट राज्य करता येत नाही (failure of governance) असा शिक्का बसतो. येत्या निवडणूकीच्या धसक्याने सद्या असा शिक्का मारून घेण्यासाठी केल्या जाणार्या धडपडींची मालिका सुरू आहे हे काही गुपित नाही.
अवांतरः चर्चेत एखादा मुद्दा आंधळेपणाने (किंवा आपल्या एखाद्या गोष्टिचा सोईस्कर पाठपुरावा करायला) पकडला की मग फार पंचाईत होते ! म्हणतात ना की, धरलं तर चावतं आणि सोडलं तर पळतं ! मग एक इल्लॉजीकल वचन लपवायला दुसरे... त्यातून सावरायला तिसरे... इ. इ.
15 Oct 2013 - 1:32 pm | पैसा
आणि समजा, असा बिलाचा मसूदा तिसर्या कोणाला दाखवायला हरकत नसेल तर बजेटबद्दल एवढी गुप्तता कशासाठी असते? मग ते बिलसुद्धा हामेरिका, युरोपियन युनियन आणि चीनला दाखवायला हरकत नसावी. आणि संरक्षण बजेट तर पाकिस्तान आणि चीनला दाखवून मगच तयार करावे.
15 Oct 2013 - 2:37 pm | बॅटमॅन
अगदी खरंय!!!!!!!! अशी इल्लॉजिकल मुक्ताफळे पाहून अलीकडे मणोरञ्जण व्हायचेही बंद झालेय :P
15 Oct 2013 - 2:50 pm | उद्दाम
हा सगळा धागाच इलॉजिकल लोकान्नी भरलेला आहे.
मूळ लेखात 'कायद्याचा गोषवारा' सादर केला असे वाक्य आहे. गोषवारा याचा अर्थ एक प्रकारची जाहिरात / षिनेमाचा ट्रेलर . यात आपण काय करणार, किती लोकाना फायदा मिळेल, किती आन लागेल, याने कोणते चांगले परिणाम होतील, यातील अडचणी काय यांचे सारांशरुपाने विवेचन असते. जसे ट्रेलरमध्ये सस्पेन्स सिनेमा, अमूक अमुक हिरो, हिरॉइन, एखादी गाण्याची ओळ आणि रिलिजिंग डेट .. इतकेच असते.
तसा गोषवारा सादर केला गेलेला आहे.
पण इथे प्रत्येकजण जणू अख्खा कायदा/ विधेयकच जणू पोपच्या सही शिक्क्यासाठी पाठवले की काय! आणि त्याना हे अधिकार आहेत का आणि काय नि काय चर्चा करत बसले आहेत.
म्हाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याने इठोबाला साकडं घातलेलं चालतं, ख्रिश्चन पक्षनेत्यानं पोपला नमन केलं तर कुणाच्या पोटात का दुखावे?
१. पोपला नमायला जाणं हेही चुकीचं नाही.
२. योजनेचा ' गोषवारा' सांगणं यातही काही चुकीचं नाही.
15 Oct 2013 - 3:00 pm | मुक्त विहारि
"हा सगळा धागाच इलॉजिकल लोकान्नी भरलेला आहे."
हे मात्र एकदम पटले भाऊ.
पटले म्हणजे काय? एकदम मनापासुन पटले बघ...
मला पण काही काही धागे आवडत नाहीत, मग अशावेळी मी काय करतो माहेती आहे?
मी आपला मला आवडतील असे धागे शोधतो आणि वाचत बसतो.
सध्या जॅक डॅनियलचे सापावरचे लेख वाचत आहे.
15 Oct 2013 - 3:09 pm | बॅटमॅन
ट्रोलिंगचा क्षीण केविलवाणा प्रयत्न. तुमच्याकडून अजून बर्याची अपेक्षा होती =))
15 Oct 2013 - 3:13 pm | मुक्त विहारि
"तुमच्याकडून अजून बर्याची अपेक्षा होती."
"कुणाकडूनही कसलीही अपेक्षा बाळगू नका" असे परवाच जे.डी. नावाचा माझा मित्र म्हणत होता.
15 Oct 2013 - 3:21 pm | अनिरुद्ध प
हो कारण विठोबा हा देव (ईश्वर) आहे,(निदान आमच्यासाठीतरी),आणि पोप हे माझ्यामते धर्मगुरु (ईश्वराचे सेवक) आहेत.
15 Oct 2013 - 4:01 pm | ग्रेटथिन्कर
विठोबा आणि मुख्यमंत्री यांच्यामध्ये बडवे नावाचा कमिशन एजंट असतो हे माहीत आहे काय! ज्याला दक्षिणा चारल्याशिवाय तो काही एजंटगिरी करत नाही.
(पोप निदान फुकट तरी निवेदन स्विकारतात ते ही हिंदूबहुल देशाचे आणि इथे हिंदुंच्याच देशात कमिशन एजंट लै बोकाळलेत.)
15 Oct 2013 - 4:08 pm | बॅटमॅन
देणार्याचं जातं आणि कोठावळ्याचं पोट दुखतं अशी म्हण ऐकली असेलच. तदुपरि ग्रेटस्टिंकरमहाशयांना काय कळणार म्हणा.
15 Oct 2013 - 4:12 pm | अनिरुद्ध प
रहाता आपण? माझ्या माहिती प्रमाणे सद्ध्या पंढरपूर देवस्थानाचा कारभार हा सरकारी आहे,आणि एकादशीच्या वेळी तिथला सुद्धा घोटाळा बाहेर आला होता.आणि पोप यान्ची व्यवस्थासुद्धा तिथले सरकारच बघते म्हनजेच त्यान्चा योगक्षेम चालवते,राहिली गोष्ट ती मुख्यमन्त्र्याची त्यनी साकडे बडव्याना नाही तर विठोबाला (देवाला) घातले.
15 Oct 2013 - 4:15 pm | ग्रेटथिन्कर
मग के व्ही थॉमसने पोप थ्रु येशुला साकडे घातले, तुमच्या पोटात का दुखले!
15 Oct 2013 - 4:29 pm | अनिरुद्ध प
साकडे घालायला भारतातील गीरजाघरे (चर्च) ओस पडली होती का?का पोप हे येशुच्या अधीक जवळचे एजन्ट आहेत म्हणुन त्यन्च्याकडुन येशुला साकडे घातले?
15 Oct 2013 - 6:41 pm | डॉ सुहास म्हात्रे
एक इल्लॉजीकल वचन लपवायला दुसरे... त्यातून सावरायला तिसरे... इ. इ
हायला, ही तीनशेव्या वचनाकडे चाललेली यशस्वी चाल म्हणावी काय .... शुभेच्छा :)
15 Oct 2013 - 2:55 pm | उद्दाम
Prof. K.V.Thomas, Minister for Consumer Affairs, Food & Public Distribution who is leading the Indian delegation to the 40th FAO Conference on World Food Security at Rome today called on the Pope Francis at Vatican City and submitted a booklet on Food Security Act.
ती अनेक देशांची जागतिक अन्न सुरक्षा यावरील बैठक होती. म्हणजे तुमचाच देश नव्हे, अनेक देश यात सहभागी होते.
15 Oct 2013 - 4:18 pm | पैसा
आंतर्रष्ट्रीय परिषद होती. ओके. तिथे हजेरी लावली. ओके.
त्यात पोपचा काय संबंध?
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विठोबाची सर्कारी पूजा करतात. एखाद्या कायद्याची प्रत बडव्यांच्या पायावर ठेवत नाहीत. पोपचा दर्जा शंकराचार्यांसारखा असावा. विठोबासारखा नव्हे.
सोन्या बाई आणि थॉमस व्यक्तिगत जीवनात धार्मिक ख्रिश्चन असतील तर ठीक. त्यांनी खाजगीरीत्या पोपला देणग्या द्याव्यात. आपल्या मुलांना त्यांच्या मठात संन्याशी होण्यासाठी पाठवावे. आमचं काही म्हणणं नाही, भारताचा कायदा/कायद्याचा मसूदा ही सोन्या बाई किंवा थॉमस यांची खाजगी मालमत्ता नाही.
भारताचे संविधान निधर्मी आहे. अशा प्रकारे कोणत्याही धर्माच्या गुरूला कायद्याच्या/मसुद्याच्या प्रती देणे यामागचा उद्देशच कळला नाही. निवडणुकीत विजय मिळावा म्हणून पोपचा आशीर्वाद घेणे, किंवा स्वतःच्या मुलांना पोपकडून बाप्तिस्मा देणे आणि एखाद्या कायद्याच्या प्रती अशा सादर करणे यातला फरक सर्वांना चांगलाच कळत असावा.
15 Oct 2013 - 4:38 pm | ग्रेटथिन्कर
उद्या सांगाल कि मनमोहन सिंग देशाचे पंतप्रधान आहेत, फक्त शिखांचे नव्हेत ,त्यामुळे त्यांनी डोक्यावरची पगडी,राखलेली दाढी काढून टाकावी. काय लॉजिक लावतात लोक ,नै.
ख्रिस्ति धर्म जगाला शांती शिकवणारा धर्म आहे .अगदी आपल्या पंतप्रधानाने त्यांची भेट घेतली आणि कायद्याची माहीती दीली आणि पोपचे मार्गदर्शन घेतले तर कुठे बिघडले?
(ख्रिस्ती धर्माचा आदर करणारा आणि ख्रिस्ती नसल्याबद्दल हळहळ व्यक्त करणारा- ग्रेटथिन्कर)
15 Oct 2013 - 4:42 pm | सौंदाळा
ख्रिस्ती नसल्याबद्दल हळहळ कशाला व्यक्त करताय.. बाप्तिस्मा घेऊन व्हा की ख्रिस्ती
15 Oct 2013 - 4:43 pm | पैसा
फारच ब्वॉ इनोदी तुम्ही!
15 Oct 2013 - 4:50 pm | अनिरुद्ध प
याला म्हणतात 'गान्डुळनीती' म्हणजेच एकी कडे आपण 'निधर्मी' आहोत असे भासवायचे आणि शेवटी धर्माची कास धरायची.
15 Oct 2013 - 4:51 pm | बॅटमॅन
अगदी अगदी. क्रूसेड करणारे, इ.स. १५०० पासून आफ्रिका-अमेरिका-आशिया खंडांतील लोकांवर अनन्वित अत्याचार करून ख्रिस्ताच्या कैकांचा वंशविच्छेद, संस्कृतिउच्छेद करणारे लोक बहुतेक शांतीचाच संदेश देत होते. कॅथलिक-प्रोटेस्टंट झगडे, गोवा इन्क्विझिशन, जेरूसलेम क्रूसेड मध्ये मुसलमानांवरचे केलेले अत्याचार, अमेरिका खंडातील आदिवासींचे हत्याकांड, जगभरच्या वसाहतींमध्ये केलेले अत्याचार, इ.इ. सगळे शांतिप्रिय लोकांनीच केले, हो की नाही? इतका जर तो धर्म शांतिप्रिय होता तर त्या धर्माने नास्तिकांचा इतका छळ का बरे केला? जिओर्डानो ब्रूनोसारख्यांना पृथ्वी सूर्याभोवती फिरते इतकेच सांगितल्याने जिवंत का जाळले गेले? हायपॅटिया सारख्या महिला फिलॉसॉफरला दगडांनी चेचून का मारले? बहुतेक शांती प्रस्थापित करायलाच असेल.
अन पोपला राजकारणातलं काय कळतं म्हणून मनमोहन सिंगाने त्याच्याकडे जावं मार्गदर्शनासाठी?
15 Oct 2013 - 4:54 pm | पिलीयन रायडर
एक तर तुम्ही अजिबात त्या बाजुचे नाही आहत जे तुम्ही दाखवायचा प्रयत्न करताय.. (पराने ब्राह्मणांविरुद्ध काइतरी इतिहासाचे पुनर्लेखन धागा लिहीला ना त्या टाईप..)
किंवा काहितरी सिरीयस लोचा आहे तुमच्या डोक्यात...
त्याशिवाय असं वाट्टेल ते कसं लिहील माणुस..??
15 Oct 2013 - 5:04 pm | अनिरुद्ध प
यालाच ग्रेट थिन्किन्ग म्हणत असावेत.
15 Oct 2013 - 6:33 pm | डॉ सुहास म्हात्रे
काहितरी सिरीयस लोचा आहे तुमच्या डोक्यात...
तुम्हाला या सगळ्या भानगडीतली मेख कळली आहे असे आम्ही जाहीर करत आहोत +D15 Oct 2013 - 6:30 pm | डॉ सुहास म्हात्रे
काही जणांना त्यांच्याच भरवशावर सोडलेले बरे, हेच खरे.
झोपलेल्याला जागे करता येते, झोपेचे सोंग घेतलेल्या नाही ;)
नाहीतर ग्रेट थिंकींग कशाला हवे... केवळ ऑर्डिनरी थिंकिंगवाल्या माणसालाही एका देशाच्या मंत्र्याच्या "पब्लिक / संवैधानिक" आणि "खाजगी" जीवनातला आणि जबाबदार्यांतला फरक कळला असता !
अर्थात जेव्हा एखादा देशाचा मंत्री अशी कृती करतो तेव्हा तो एकतर अज्ञानी असला पाहिजे (ज्याची शक्यता कमी आहे... कारण हेच लोक स्वतःच्या फायद्याचे कायदे फार चतुराईने बनवतात / बनवण्याचा प्रयत्न करतात *) किंवा सर्वसामान्य जनतेला फाट्यावर मारले तरी आपले "बांधलेले" लोक सारासार विवेकबुद्धी** न वापरता आपल्याला आंधळे समर्थनच देतील याची खात्री (हे आता सिद्ध होत आहेच)... कारण लोकशाही केवळ दिखाऊ तोंडीलावणे, मुख्य "खाणे" वेगळेच असते.
भारताचे दुदैव असे की आपल्यात राजकारणी गल्लीबोळात हू म्हणून आहेत... देशकारण करणार्यांची कमतरता आहे.
*: नुकतीच लोकसभेतील गुन्हेगार सभासदांचे सभासदत्व रद्द करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाविरुद्ध कायदा बनविण्याची झालेली अयशस्वी तडफड.
**: हीला ग्रेट थिंकिंग करताना विचारपूर्वक बासनात बांधून ठेवली जाण्याची राजकारणी प्रथा पाहतो आहोतच.
15 Oct 2013 - 12:57 pm | बॅटमॅन
दुसर्यावर टीका करायच्ञा आधी फ्याक्ट तपासणे महत्त्वाचे. विश्वबंधुत्वाचे डांगोरे पिटून आपल्याच देशबांधवांना शिव्या घालण्यात धन्यता मानणार्यांपैकी आम्ही नाही.
तुम्ही सांगितलेल्यापैकी कुठल्या मुद्द्याला पोपमुळे कशी मदत होणारे ते सांगा, मग आमच्या तुम्हीच आरोपिलेल्या जपजाप्याबद्दल खल करू. कसे?
15 Oct 2013 - 2:12 pm | डॉ सुहास म्हात्रे
बिल गेटने किंवा अजून कोणी कोणत्याही (यात सामाजिक, वैद्यकीय, इ सर्व प्रकारचे प्रकल्प अंतर्भूत आहेत) अगदी बिलियन्समध्ये डॉलर ओतले तरी त्याला भारतीय सार्वभौमत्वाला धक्का लागेल असे कोणतेही अधिकार मिळणार नाहीत... मिळू नयेत. कारण तो १२० कोटी भारतीयांचा (त्यात तुम्ही आम्ही सगळे भारतीय आलो) अपमान असेल. देशाच्या सार्वभौमत्वाला मूठमाती देऊन/देणारा कोणताही प्रकल्प स्विकारायचा हक्क भारतिय सरकारला नाही.
शिवाय, भारत सरकारच्या कोण्या एका बिलाची माहिती करून घेण्याएवढी पोपसाहेबांना उसंत / गरज आहे असे वाटत नाही. गरिबांच्या दोन वेळच्या अन्नाची सोय होणारी बातमी कोणी दिली तर त्याची कोणीही सज्जन माणूस वाखाणणी करण्याचा उपचार करून भेटीला आलेल्या पाहुण्याचा मान राखणारच. इतकाच केवळ पोप महाशयांच्या कृतीचा अर्थ.
मंत्रिमहोदयांच्या कृतीचा अर्थ मात्र संशयास्पद आहे. या सगळ्या प्रकरणात पोप महाशयांचा मतपेटीच्या राजकारणासाठी "उपयोग" केला जात आहे हे काही फार लपलेले गुपित नाही ! लोकपाल बिलही पोपसाहेबांच्या सल्ल्याने पुढे गेले असते तर मात्र इतर विचारास वाव होता (अर्थात, तसे करण्याचाही हक्क भारतिय सरकारला नाही, ही गोष्ट वेगळी.).
15 Oct 2013 - 9:35 pm | अर्धवटराव
आणि या अशा छातीबडव्यांना पुजणार्या लोकांना जगण्याचा काहिच अधिकार नाहि. म्हणुनच जिहाद पुकारण्यात आलाय.
15 Oct 2013 - 9:44 am | नितिन थत्ते
लेखाच्या खालची सही आवडली
15 Oct 2013 - 2:31 pm | इष्टुर फाकडा
तुम्हाला आवडेल हे अगदीच अपेक्षित आहे. काही ज्ञानाचे किरण सोडा कि आमच्यावर…
15 Oct 2013 - 3:18 pm | मदनबाण
कोण पोप ? ;)
15 Oct 2013 - 3:24 pm | मुक्त विहारि
आता तुम्हाला पण कसले कसले प्रश्र्न पडायला लागले नाही?
मग आता मी कुणाकडे बघावे?
15 Oct 2013 - 3:33 pm | अनिरुद्ध प
अस काय करताय? मु वि त्यान्चा प्रतिसाद वाचुन मी सुद्धा आधी सम्भ्रमात पडलो होतो मग नीट वाचले आणि आपल्याला हवा तसा अर्थ काढायला मोकळा झालो.
15 Oct 2013 - 5:04 pm | प्यारे१
मी ग्रेट थिन्कर, उद्दाम आणि 'तमाम' सेक्युलरिस्ट काँग्रेसी, तसेच वामकुक्षी आपलं लेफ्टिस्ट कम्युनिस्ट सदस्यांचा 'फॅन' झालेलो आहे असं अत्यंत नम्रपणे सांगू इच्छितो.
त्यांच्याशिवाय तरणोपाय नाही हे वारंवार सिद्ध झालेलं आहे.
धन्यवाद!
-माणूस बनण्याच्या प्रयत्नात
15 Oct 2013 - 5:14 pm | ग्रेटथिन्कर
धन्यवाद
15 Oct 2013 - 5:35 pm | मुक्त विहारि
अहो ग्रे.थि.
त्या आमच्या प्रश्र्नाचे काय?
15 Oct 2013 - 8:01 pm | सुनील
राईचा पर्वत करणे म्हणजे काय याचे उत्तम उदाहरण म्हणजे हा धागा!
खरे तर अन्नसुरक्षा विधेयक भारतीय संसदेने पारीत केले असून त्यावर राष्ट्रपतींची मोहोरदेखिल उठली आहे. आता ते संपूर्ण विधेयक जगजाहीर आहे (जालावर फुकट उपलब्धदेखिल आहे). अशा परिस्थितीत, त्या बिलाचा गोषवारा (संपूर्ण विधेयक नव्हे आणि अख्खी घटनातर नव्हेच नव्हे) भेटीला गेल्यानंतर पोपना दिली (पुस्तिका पोपच्या पायावर घालून आले, हा धागाकर्त्याचा समज (इंटरप्रिटेशन), तर त्यात कुठल्या गोपनियतेचा भंग होतो वा कुठे आपली सार्वभौमिकता धोक्यात येते, ते समजले नाही.
थॉमस हे अन्नसुरक्षेच्या परिषदेला रोम येथे गेले होते. तेव्हा हे समयोचितदेखिल म्हणता येईल. (कुठला मंत्री अफ्रिकेत अणूउर्जा परिषदेला गेला आणि मुद्दम वाट वाकडी करून रोमला जाऊन पोपना अन्नसुरक्षा विधेयकाचा गोषवारा दिला असता, तर आक्षेप समजण्यासारखा होता).
खेरीज, पोप हे जसे कॅथलिक पंथियांचे प्रमुख धर्मगुरू आहेत तसेच वॅटिकन ह्या सार्वभौम देशाचे देशप्रमुखदेखिल आहेत.
असो.
15 Oct 2013 - 9:32 pm | अर्धवटराव
+१
16 Oct 2013 - 11:14 am | उद्दाम
अन्न सुरक्षा परिषदेत जे बुकलेट वाटले, त्याचीच एक कॉपी पोपलाही दिली, तर पोपला कायद्याचा मसुदाच दिला म्हणून लोक गळा काढत बसले आहेत.
आणि राईचा पर्वत झाला तरी आनंदच आहे.
अन्नसुरक्षेत जे अन्न मिळेल, त्याला फोडणी घालायला राई लागेलच की! :)
16 Oct 2013 - 11:28 am | शैलेंद्रसिंह
+ १
16 Oct 2013 - 2:29 pm | इष्टुर फाकडा
संपूर्ण परिषदेत पोप हे कुठल्याही 'देशाचे' प्रतिनिधी म्हणून उपस्थित न्हवते. त्यामुळे थॉमस यांनी धार्मिक भावनेतूनच पुस्तिका पोपना अर्पण केली (म्हणून पायावर घालून आणली- जसे आपण अपत्याला देवीच्या पायावर घालून आणतो तसेच).
जसे मी लेखात म्हटले आहे कि, पुण्याच्या भावनेतून त्यांनी ते केले ज्याला वरवर हरकत असू नये. मी फक्त दुसर्या एका परिस्थितीमध्ये हीच घटना माणसे आणि धर्म बदलून कल्पना करत होतो. त्या परिस्थितीमध्ये आपल्या माध्यमांनी या घटनेकडे दुर्लक्ष केले असते का?
शिवाय जिथे पोप राहतात तिथे शिवाय बहुतेक सर्व युरोप मध्ये सरकारी धर्म ख्रिस्ती आहे. त्यांच्या सरकारी माणसाने हे केले तर त्याची वाहवा होईल. आपल्या देशाचे सरकार 'निधर्मी' आहे. ज्या पक्षाचे सरकार आहे ते त्या मुद्द्यावरून टिर्या बडवून घेत असतात. या सर्व पार्श्वभूमीवर या घटनेची साधी दखल सुद्धा घ्यायची नाही असे तुमचे म्हणणे आहे काय ?
16 Oct 2013 - 2:41 pm | सुनील
सदर न-घटनेची मिडियाने कितपत "दखल" घेतली हे तुम्ही एव्हाना पाहिले असेलच!
इत्यलम.
16 Oct 2013 - 2:46 pm | इष्टुर फाकडा
आपल्या दोघांनाही चकवा लागलेला दिसत आहे. असो.
16 Oct 2013 - 1:23 pm | ग्रेटथिन्कर
नॉनइश्युवरुन लोकांमध्ये भांडणं लावून द्यायची ,म्हणजे लोक मुख्य मुद्द्याकडे येतच नाहीत...
लोकांना अन्न मिळेल याचा आनंद नाही, पोपच्या नावाने चुना लावत बसायचे..
16 Oct 2013 - 1:45 pm | इष्टुर फाकडा
१. तुमच्या दृष्टीने मुख्य मुद्दा कोणता हे सांगाल का ?
२. हा जर तुमच्या दृष्टीने 'नॉनइश्यु' होता तर इतक्या प्रतिक्रिया का दिल्या तुम्ही ?
16 Oct 2013 - 2:48 pm | मुक्त विहारि
+ १
16 Oct 2013 - 3:14 pm | ग्रेटथिन्कर
मुख्य मुद्दा -लोकांना अन्न मिळणे
प्रतिक्रिया देतोय कारण खरा इश्यु वाचकांच्या लक्षात आणुन देणे.
16 Oct 2013 - 3:51 pm | मुक्त विहारि
हा मुद्दा "मुख्य मुद्दा -लोकांना अन्न मिळणे" तुमच्या लक्षांत आला तर......
हे मात्र लक्षात नाही आले
"प्रतिक्रिया देतोय कारण खरा इश्यु वाचकांच्या लक्षात आणुन देणे."
कारण तुमचा खरा इश्यु माझ्या तरी लक्षांत आला आहे...
तरी पण आपले ते मूळ प्रश्र्न आहेतच ,,,,
बाकी नेहमीप्रमाणे......
16 Oct 2013 - 3:15 pm | डॉ सुहास म्हात्रे
लोकांना अन्न मिळेल याचा आनंद नाही
हे फक्त गृहित आहे. याच्यासाही खरी राजकीय इछाशक्ती आहे की नाही याकरिता "शिधापत्रिकांच्या घोळांची पाश्वभूमी + गेले शतक दोन शतके होणार्या गलथान साठवणूकीने होणार्या हजारो टन अन्नाच्या नासाडीची पार्श्वभूमी" चांगले उत्तर देत नाही. किंबहुना "अन्नाची नासाडी थांबवण्यासाठी योग्य गोदामे तयार करा आणि शिधापत्रिकेवरून नीट अन्न्वाटप होईल अशी व्यवस्था करा... इतर काहीही करण्याची गरज नाही" हा सल्ला तज्ञांकडून सरकारला अनेकदा दिला जातो आणि त्याकडे सतत डोळेझाक केली जाते. यात या योजनेतून काय साधायचे आहे ते दिसतच आहे... डोळे उघडे असल्यास. सद्याचे पुरावे हे फक्त गृहितच राहील किंवा भ्रष्टाचारासाठी अजून एक कुरण होईल असेच पुर्वानुभव आहे.
जर सरकारला खरंच गरिबांच्या पोटाची काऴजी असेल तर ती (१) थोड्या काळासाठी भ्रष्टाचारमुक्त शिधापत्रीकेवरील अन्नचे वितरण आणि (आ) कायम स्वरूपी देशव्यापी रोजगार योजनेचे नियोजन यानेच होऊ शकेल. हे करण्याची राजकीय इच्छाशक्ती आणि त्यासाठी भ्रष्ट सबळांना काबूत ठेवून दंड करण्याची कुवत असल्याचे पुरावे अजूनपर्यंत उपलब्ध नाहीत. त्यामुळे केवळा पुस्तिका वाटुअन किंवा अगदी कायदा करूनही (शिधापत्रिका कायदा आहेच की अनेक वर्षे) लोकाना ना अन्न मिळेल असा आनंद व्यक्त करायचा असेल तर स्वतःच्या बँकेच्या खात्यात एकाएकी करोडो रुपये जमा झालेत असाही आनंद व्यक्त करायला हरकत नाही... शेवटी सगळा खयालोंमे हंगामा.
पोपच्या नावाने चुना लावत बसायचे...
प्रतिसाद नीट वाचले तर असे दिसून येईल (किंवा खरे हे आहे की तिकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे) की बहुतेक जण असेच म्हणत आहेत की हा पोपबद्दलचा मुद्दा नाही तर "परदेशी माणूस किंवा कोणीही धर्ममार्तंड*" यांना आपल्या देशातल्या कायदाव्यवस्थेत दखल देण्याची अथवा सामील करून घेण्याची परवानगी सरकारला आहे काय? याचं उत्तर नाही असे आहे (हे माहित नाही असे दिसत आहे म्हणून मुद्दा भरकटवण्याच्या प्रयनाअगोदरच ते देऊन ठेवतो.)
* :यात सगळे-- हिंदू, मुस्लीम, शिख, ख्रिश्चन, बौद्ध, इ. --- धर्म येतात.
16 Oct 2013 - 6:40 pm | पैसा
प्रतिसाद आवडला. फक्त रेशन कार्डांबद्दल बोलायचे तर २०११ ची ही बातमी बघा.
२०११ च्या जनगणनेत गोव्याची लोकसंख्या १४.५९ लाख असताना तत्कालीन काँग्रेस सरकारच्या कारकीर्दीत गोव्यातल्या रेशन कार्डधारकांची संख्या १६ लाखावर पोचली होती!!!
अजूनही पर्रीकर सरकार नेपाळी आणि बांगलादेशी घुसखोरांना कसे शोधून काढायचे या विवंचनेत आहे!
संपूर्ण अवांतरः सरकारी गोदामांमधे लाखों करोडों टन अन्नधान्य कुजून वाया गेल्याच्या बातम्या रोज उठून येत असतातच. त्याशिवाय या सगळ्या उपक्रमाला प्रत्यक्षात किती खर्च येणार आहे ते एक देवच जाणे! शिवाय करामती करून दारिद्र्य रेषा वर नेण्यात आली आहे. मग आता गरीब कुटुंबे कुठून उत्पन्न झाली? एकीकडे सबसिडी काढून टाकायच्या गोष्टी बोलायच्या, आणि एकीकडे सबसिडी या ना त्या प्रकारे वाढवत रहायची यामागचे अर्थकारण कोणीतरी समजून सांगा प्लीज!
16 Oct 2013 - 6:46 pm | मुक्त विहारि
....कसे शोधून काढायचे या विवंचनेत आहे!"
कठीण आहे...
आसामचे उदाहरण पटकन डोळ्यासमोर आले....
अति अवांतर....
तुमच्या गोव्यात पण मुंबई सारखे आझाद मैदान आहे का?
16 Oct 2013 - 6:51 pm | पैसा
ही बाहेरून येणारी मंडळी सुरे-खुकर्या-कट्टे घेऊनच येतात. वरिजिनल गोंयकार फक्त तोंडपाटिलकी करणारे.
16 Oct 2013 - 7:00 pm | मुक्त विहारि
थोडक्यात...
येत्या १०/१२ वर्षांत गोव्यात पण दंगली व्हायचा चानस दिसतोय.