गाभा:
नमस्कार मिपाकर....
आज सकाळी मिपावर काथ्याकुट मधे विकास यांचा "पाणीच पाणी चहुकडे" हा लेख वाचला.
त्यानंतर ई-सकाळवर नजर फिरवताना या संदर्भात आणखी माहिती मिळाली.
या संदर्भातील आणखी माहिती आणि छायाचित्रे इथे टाकत आहे.
(स्त्रोत - ई-सकाळ)
मिपाच्या नियमांमधे हे बसत नसेल तर हा लेख उडवावा ही तात्यांना नम्र विनंती.
सविस्तर माहिती -
http://www.esakal.com/esakal/09202008/SpecialnewsEDDB762911.htm
पुरपरिस्थिची छायाचित्रे -
प्रतिक्रिया
20 Sep 2008 - 12:08 pm | मृगनयनी
मिंटे..... खरच गं पुण्यात २-३ वर्षांपुर्वी आलेल्या पुराची आठवण झाली....
माझं आजोळ नाशिक चं आहे..त्या एरियातही पाणी शिरलय...
सुदैवाने.. आमचा वाड्याचं रुपांतर एका कॉम्प्लेक्स मध्ये झालय्...काही वर्षांपुर्वीच....
नैतर काही जुन्या वाड्यांच्या भिंती कोसळुन सामान वाहुन गेलंय.......
हे वरुणराजा..... थांबव आता हा रुद्रावतार!
:|
20 Sep 2008 - 12:22 pm | निशा
काल नाशिक मध्ये आलेला महापुर बघीतला आणि अनुभवलाही!!!!!
20 Sep 2008 - 4:18 pm | भोचक
देवा आमच्या नाशिकला वाचव. इथे पहा नाशिकचा महापूर.
http://marathi.webdunia.com/newsworld/news/regional/0809/20/1080920007_1...
21 Sep 2008 - 3:38 pm | अरुण वडुलेकर
मिंटी आणि महापुराने व्यथित झालेल्या सर्व नाशिकवाल्या मिपाकरांना , त्यांनी या महापुराची वार्ता छायाचित्रांसकट मिपावर दिल्याबद्दल धन्यवाद.
मीही नाशिककरच आहे आणि या महापुरात यथाशक्ति मदतकार्यात होतो. १०७९ नंतरचा हा दुसरा महापूर. त्याही माहापूरात मी असाच धडपडलो होतो.
यावेळी अहिल्याबाई होळकर पूल व कन्नमवार पूल वगळता बाकी तीन पूल पाण्याखाली होते.
या निमित्ताने मिपावरच्या नाशिककरांची खानेसुमारी होऊन मिपाचा एक नाशिक कट्टा व्हायला हवा.
अरुण वडुलेकर
(एक नाशिककर)
21 Sep 2008 - 7:02 pm | प्रभाकर पेठकर
१०७९ नंतरचा हा दुसरा महापूर. त्याही माहापूरात मी असाच धडपडलो होतो.
आपले आजचे अंदाजे वय?
21 Sep 2008 - 7:04 pm | अभिज्ञ
आपल्याला १९७९ असे म्हणायचे आहे का?
:)
टंकलेखनातील त्रुटि समजू शकतो,पण इथे त्यातुन झालेला विनोद पाहता रहावले नाहि म्हणुन हा प्रतिसाद.
:)
अभिज्ञ.
21 Sep 2008 - 6:59 pm | देवदत्त
:(
एवढं काही चाललं आहे ह्याचा अंदाजच नव्हता.
पुन्हा बिहारमधीलही.