नुकतीच मटा मधली बातमी वाचली. सचिनचा एक निस्सीम चाहता म्हणून मनापासून वाईट वाटलं.
परंतु कालाय तस्मै नमः......
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/17372506.cms
ही परिस्थिती आज न उद्या येणारच....तो एक खेळाडू म्हणून महान आहेच पण वयपरत्वे त्याच्या हालचालींवर मर्यादा आल्या आहेत. निवृत्त होताना "का?" असे लोकांनी विचारले पाहिजे." का नाही? असे विचारेपर्यंत खेचायला नको.......
एकदा असे ऐकले होते की सचिन २०२४ साली धोनी,गंभीर ह्यासारख्या "ज्येष्ठ" खेळाडूंच्या हस्ते वर्ल्ड कप मधला सर्वोत्कृष्ट खेळाडू पुरस्कार घेऊनच निवृत्त होणार आहे. अतिशयोक्ती सोडली तर तो खरच त्या दिशेने चालतोय असे वाटतंय.
तसंही सतत कुठे न कुठे तरी टुकार सामने चालू असल्याने क्रिकेटचं अजीर्ण झालंय .....पहिल्या सारखी शान आणि चुरस राहिली नाही आता......त्याच्या समवयस्कांनी निवृत्ती घेतली किंवा घ्यावी तरी लागली.....सचिन,विचार कर रे बाबा !!
प्रतिक्रिया
28 Nov 2012 - 10:31 am | श्री गावसेना प्रमुख
तो बहुतेक पुजाराच्या हस्ते पुरस्कार घेउनच रिटायर होनार.
28 Nov 2012 - 11:31 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मला वाटतं आपल्या भारतीय संघात दहाच खेळाडु खेळत आहेत, असे समजून क्रिकेट पाहात राहावे. सचिनला वाटतं तोपर्यंत खेळू द्यावे. :)
-दिलीप बिरुटे
28 Nov 2012 - 2:40 pm | विश्वनाथ मेहेंदळे
का ???
28 Nov 2012 - 3:26 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आता का ? गेल्या नऊ कसोटी सामन्यात सचिनला एकदाच पन्नास धावा करता आल्या आहेत. असतो एकेकाचा बॅडपॅच आणि बॅडपॅचमधून निघायला अजून दोनचार वर्ष जाऊ द्या असे चाहते म्हणुन म्हणालही पण, माझ्यासारखे तुम्ही जर सचिनचे चाहते असाल आणि सचिनची फलंदाजी पाहात असाल तर सचिनला आता धावा रेटत नाही,असेच दुर्दैवाने म्हणावे लागेल. इतके वर्ष खेळूनही त्याचा आत्मविश्वास आता डगमगायला लागला आहे की काय असे वाटायला लागले आहे. आता पुढच्या दोन सामन्यात सच्याकडून चुकुन ९०/९५ धावा निघाल्या किंवा शतक केले तर कुठे गेली ती सच्याला रिटायला व्हा किंवा ''हाय हाय '' म्हणनारी मंडळी असा जयघोष सुरु करता येईल. त्यापेक्षा, सचिनला वाटतंय तो पर्यंत खेळु द्यावं कारण सच्या आपल्या क्रिकेटचा देव आहे. आणि दहाच खेळाडूंवर आपण विसंबून राहील्यामुळे सच्याने धावा केल्या काय आणि नाही केल्या काय, त्याच्याकडून आपण अपेक्षा करायच्या नाहीत. आपल्या आणि सच्याच्या सुदैवानं झाल्याच धावा तर आपण पुन्हा आहोतच इथे सच्याचं कौतुक करायला हाजीर.
खरं म्हणजे, सच्यानं शंभर शतकांचा विक्रम केला तेव्हाच क्रिकेटला अलविदा म्हणायचा उत्तम चान्स होता. पण, हाय रे माझ्या कर्मा...
-दिलीप बिरुटे
28 Nov 2012 - 3:46 pm | परिकथेतील राजकुमार
अहो प्रा. डॉ., इकडे लोक वर्षानुवर्षे साधी संपादकपदाची खुर्ची सोडायला तयार होत नाहीत. वरती 'आम्ही तर बॉ कधीच मालकांना आम्हाला काढा म्हणून सांगीतले आहे, पण ते काढतच नाहीत' असले उपकार ऐकवतात. मग त्या दर सामन्यामागे लाखात कमाई करणार्या सचीनला तरी का दोष द्या ?
28 Nov 2012 - 4:00 pm | नाना चेंगट
हा हा हा
सहमत आहे. त्याचे काय आहे परा शेट अहो चावडीवरती कुचाळक्या करायला कुणाला आवडत नाही. ;)
28 Nov 2012 - 4:00 pm | गणपा
=))
अस्स्ल 'परा'कोटीतला प्रतिसाद.
बादवे : आज टोलनाका बंद काय रे ? ;)
28 Nov 2012 - 4:11 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मिसळपाववर आपलं पुन्हा स्वागत आहे.
प्रा. डॉ., इकडे लोक वर्षानुवर्षे साधी संपादकपदाची खुर्ची सोडायला तयार होत नाहीत. वरती 'आम्ही तर बॉ कधीच मालकांना आम्हाला काढा म्हणून सांगीतले आहे, पण ते काढतच नाहीत' असले उपकार ऐकवतात.
उपकार-बिपकार कधी कोणालाच ऐकवले नाही, तसा विचार येणेही शक्य नाही. बाकी, संपादक म्हणून मिळणार्या फॅसिलिटीचा मोह मात्र खूपच आहे, हेही लम्रपणे मान्य करतो.
-दिलीप बिरुटे
(सच्यासारखाच संपादकपदाचा मोह सुटत नसलेला)
28 Nov 2012 - 4:14 pm | नाना चेंगट
अर्रर्रर्र ते संपादक तुम्ही आहात होय? ब्वार ब्वार ब्वार....
28 Nov 2012 - 4:36 pm | परिकथेतील राजकुमार
तुम्हाला कुठे काय बोलतोय मी प्रा. डॉ. ??
नो कॉमेंटस. ;)
28 Nov 2012 - 4:38 pm | नाना चेंगट
>>>तुम्हाला कुठे काय बोलतोय मी प्रा. डॉ. ??
हॅ हॅ हॅ चोराच्या मनात चांदणं असतं हे ईसरलास जणू.. ;)
चौपाटी लेख पाडाच जरा किस्सा कुर्सी का...
28 Nov 2012 - 5:36 pm | कवितानागेश
किती ते विषयांतर?!
इथे लोक सचिननी काय करावं याची चर्चा करतायत तर त्याला योग्य तो सल्ला द्यायचा सोडून तुम्ही लोक संपादकांचे प्रॅक्टिकल मॅन्युअल तयार करायला निघालात.
खोळंबलाय बिचारा सचिन. आधी त्याच्याकडे बघूयात बरं... ;)
28 Nov 2012 - 5:40 pm | नाना चेंगट
असे कसे म्हणता तुम्ही?
अहो याच चर्चेच्या आधारावर सचिनने ठरवावे की त्याने काय करायला हवे ते..
लेकी बोले सुने लागे माहित असेलच त्याला ;)
नसेल तर आता समजेल.
तुम्ही मधेच असे अडवू नका बरे....
एक तर हल्ली आमच्या गप्पा कमी झाल्या आहेत.. त्यात तुम्ही असं ओरडता... !!
28 Nov 2012 - 5:57 pm | कवितानागेश
काहीतरीच काय?
लेकी बोले सुने लागे माहित असेलच त्याला>
इतका तो हळवा/हुश्शार असता तर....... :)
28 Nov 2012 - 6:06 pm | परिकथेतील राजकुमार
तर.. एखाद्या संस्थळावरती 'मदतनीस' झाला असता.
28 Nov 2012 - 6:11 pm | नाना चेंगट
सल्लागार म्हणून मिरवता पण येईल.
28 Nov 2012 - 6:18 pm | परिकथेतील राजकुमार
आणि 'सल्लागाराचं काय करावं ?' असा काथ्या कुटण्याची पण सोय होईल.
28 Nov 2012 - 6:17 pm | विश्वनाथ मेहेंदळे
नशीब देवाने एकच सचिन बनवला. नाहीतर आज ५-६ खेळाडूच आहेत असे समजून खेळायला लागले असते.
अवांतर :- माणसाला देव बनवू नये, माणूसच राहू द्यावे. नाहीतर असे प्रॉब्लेम होतात.
28 Nov 2012 - 7:22 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>>> माणसाला देव बनवू नये, माणूसच राहू द्यावे. नाहीतर असे प्रॉब्लेम होतात.
सहमत. बाकी, सच्याला अजून काही धोका नाही. राजीव शुक्ला नावाचं एक धंदेवाईक प्रकरण क्रिकेट नावाच्या धंद्यात आहे. खेळाडू ठरवतील केव्हा निवृत्त व्हायचं ते असं म्हणून '' सच्या खेळ रे बाबा अजून '' असा संदेश दिला आहे. आणि सच्या खेळपट्टीवर म्हणजे स्टँपसमोर दगडासारखा ढीम्म उभा राहीला तरी बॅटीला कटरकुटर लागून पाच पचंवीस धावा होतील,याच्यावर माझा अजून तरी ठाम विश्वास आहे. :)
-दिलीप बिरुटे
29 Nov 2012 - 9:16 pm | क्लिंटन
अगदी १००% मान्य. पण आपल्या चाहत्यांनी आपल्याला "देव" समजावे अशी सचिनची इच्छा/अपेक्षा नसेल कदाचित. पण "इंडियन मेन्टॅलिटी" मध्ये व्यक्तिपूजा, एखादा माणूस चांगला आहे असे वाटले की त्याला भगवंताचा अवतार समजणे अशा गोष्टी आहेतच त्याला सचिन तरी काय करणार?
28 Nov 2012 - 1:09 pm | अत्रुप्त आत्मा
असले फोटो माळ घालुन
त्याच्या घरी पाठवुन द्यायला सुरवात करा.
28 Nov 2012 - 1:23 pm | क्लिंटन
काहीही करू नये.पण आपण मात्र क्रिकेटमध्ये वेळ व्यर्थ न घालवता इतर कामे करावी, हवे तर चित्रपट बघावेत, गाणी ऐकावी आणि अगदी काही नाही तर शांत झोप काढावी.
काय म्हणता मंडळी?
28 Nov 2012 - 2:02 pm | शिद
अगदी...असेच म्हणतो.
28 Nov 2012 - 2:41 pm | विश्वनाथ मेहेंदळे
१००+
28 Nov 2012 - 3:08 pm | सुधीर काळे
सचिनने 'ईडन गार्डन्स'वर शतक ठोकून या विषयाला "फट्कन" तिलांजली द्यावी!
28 Nov 2012 - 3:16 pm | श्री गावसेना प्रमुख
म्हणजे एखाद्या राजकीय पार्टी ने ग्रामपंचायतीची निवडणुक जिंकुन पानभर जाहीरात द्यावी ,अन नगरपलिकेत तोंडावर आपटावे तसे
28 Nov 2012 - 3:34 pm | अत्रुप्त आत्मा
@अन नगरपलिकेत तोंडावर आपटावे तसे>>> =)) =)) =))
30 Nov 2012 - 3:16 am | दादा कोंडके
सहमत!
मराठी माणसांनी तरी यावेळी 'आपण तुच्छ नाही आहोत' हे दाखवून द्यावं आणि सचिनला पाठींबा द्यावा.
या बातमी नुसार,
याला म्हणतात जिगर. :)
28 Nov 2012 - 3:14 pm | परिकथेतील राजकुमार
एखादे उखाण्याचे पुस्तक लिहावे किंवा माललेदारांकडे कांदा वैग्रे कापायची जबाबदारी घ्यावी.
मामलेदारांच्या पन्ख्याचा एयर कन्डीशनर
परा
28 Nov 2012 - 3:51 pm | रमेश आठवले
सलमान खुर्शीद यांनी राहुल गांधी म्हणजे कॉंग्रेसचे सचिन तेंडूलकर असे विधान काही दिवसापूर्वी केले आहे. या विधानाचा परिणाम सचिनच्या फलंदाजीवर झाला असेल का ?
28 Nov 2012 - 4:10 pm | नाना चेंगट
घंटा.....................................................वाजवावी सिध्दीविनायकाच्या मंदीरात जाऊन.. चांगला फार्म येऊ दे म्हणून साकडे घालावे.
28 Nov 2012 - 4:11 pm | रमेश आठवले
वर विषय मध्ये राहु ल वक्र असे लिहिले होते.
28 Nov 2012 - 5:44 pm | सुहास..
श्या !
देवा॑ला रिटायर करायचे सोडुन सचिन चे काय मध्येच उपटलंत ...
आधी देवाला मग सचिन ई.ई.ई.
29 Nov 2012 - 5:50 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अरेरे, गरुडाचे पंख गळाले ! मित्रहो, दै. सामनामधील शिरीष कणेकर यांचा लेख वाचला की नाही. मस्त हं.....!!! सुप्पर लाईक. :)
-दिलीप बिरुटे
29 Nov 2012 - 9:08 pm | माम्लेदारचा पन्खा
कणेकर हे कणेकर आहेत.......
लेखाची जाणीव करून दिल्याबद्दल धन्यवाद...
12 Oct 2013 - 2:23 am | खटपट्या
हा लेख द्वारकानाथ सन्झगीरीन्चा आहे वाटत....
13 Oct 2013 - 1:33 pm | सुहासदवन
तुम्ही दिलेली लिंक संझगिरींच्या लेखाची आहे कणेकरांच्या नव्हे.
http://www.saamana.com/2013/August/29/Link/Main5.htm
13 Oct 2013 - 3:02 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
लेख शिरीष कणेकरचाच होता.
-दिलीप बिरुटे
29 Nov 2012 - 7:23 pm | आशु जोग
देवाला रिटायर का करा?
29 Nov 2012 - 9:38 pm | पुण्याचे वटवाघूळ
सचिनने आता आपली अजून मानहानी टाळन्यासाठी रिटायरच व्हावे.
29 Nov 2012 - 11:19 pm | आशु जोग
सचिन पुढचा वर्ल्डकपही खेळणार आहे
अशी घोषणा त्याने नुकतीच केली होती
30 Nov 2012 - 11:37 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
रिकी पाँटींगचं काही तरी ठरलं सचिनचं काय ठरलं म्हणे ? रिकी पाँटींगची कॅप्टन्सी आणि त्याची फलंदाजी आवडायची. संघावर विजयाचं कितीही दडपण असू दे, शांतपणे चिंगम चघळणारा रिकी मला खूपच आवडायचा.
पाँटींग शेठ, क्रिकेटचा जेव्हा जेव्हा विषय येईल तेव्हा तेव्हा तुमची आठवण क्रिकेट रसिकांना निश्चितच होइल. आज दैनिकामधे माझ्यात अजूनही खूप क्रिकेट शिल्लक आहे, पण ते मी इतर क्रिकेट सामन्यात तो लुप्त घेईल असे म्हणाल्यामुळे तुमच्याबद्दलचा आदर आणखीच वाढला आहे.
क्रिकेट चाहत्याकडून तुमच्या दुस-या इनिंगला आमच्या भरभरुन शुभेच्छा.
6 Dec 2012 - 3:17 pm | अन्तर्यामी
सचिन ला खरच कळायला हवा....
10 Oct 2013 - 5:17 pm | माम्लेदारचा पन्खा
देवाने आजच जाहीर केली निव्रुत्ति........२०० वी कसोटी अखेरची........
10 Oct 2013 - 6:04 pm | बॅटमॅन
ते आपण का सांगावं? तसेही तो रिटायर होणारच आहे आता. एका युगाचा अस्त होणार.
10 Oct 2013 - 6:34 pm | मुक्त विहारि
येस्स...
साला त्या सचिनने खेळणे बंद केले आणि आमचे पण क्रिकेट प्रेम आटले..त्याला निदान १२वा खेळाडू म्हणून तरी ठेवायला हवे होते..(टिपीकल मुंबईकर)
10 Oct 2013 - 6:15 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
सुटला एकदाचा यांच्या जाचातून.
धड खेळूही देत नाही आणि खेळू नकोही म्हणत नाहीत, असे झाले होते त्याचे.
10 Oct 2013 - 8:28 pm | उद्दाम
काँग्रेसची खासदारकी करत जीवन जगावे.
11 Oct 2013 - 9:09 am | कपिलमुनी
अर्धवट ज्ञान असताना प्रतिसाद दिल्याबद्दल अभिनंदन !!
11 Oct 2013 - 9:26 am | उद्दाम
यात अर्धवट काय आहे? तुम्ही ज्ञान द्यावे गुरुवर्य!
11 Oct 2013 - 9:27 am | उद्दाम
सचिनमुनीनी काय करावे असे आपणास वाटते, तेही लिहावे.
आपला नम्र
उद्दाममुनी
11 Oct 2013 - 10:12 am | कपिलमुनी
सचिन हा काँग्रेसचा अधिकृत खासदार नाहिये ..
राष्ट्रपती कला , साहित्य , शिक्षण, समाजसेवा, खेळ यांमधून राज्यसभेवर खासदार नियुक्त करू शकतात (बहुधा १२ खासदार) ..
त्यामुळे सचिनची निवड काँग्रेसने नाही तर त्याच्या खेळाप्रती असलेल्या निष्ठेने आणि योगदानामुळे राष्ट्रपती नी केली आहे ..
"काँग्रेसची खासदारकी " हेच ते अर्धवट ज्ञान
11 Oct 2013 - 10:17 am | सुनील
खिक्
सुनील (मुनी)
11 Oct 2013 - 10:26 am | सुनील
(हास्याचा भर ओसरल्यावर आता ही उर्वरीत प्रतिक्रिया)
राष्ट्रपती कुणाचीही "आपणहून" निवड करीत नसतात. निवडलेल्या व्यक्तींची यादी सरकारकडूनच राष्ट्रपतींकडे जाते.
11 Oct 2013 - 11:49 am | उद्दाम
त्याची आताची खासदारकी काँग्रेसची नाही. पण ती 'काँग्रेसने' नॉमिनेट केलेली होती. हे आपणास माहीत असेलच.
कोणत्याही पक्षात नसलेल्या माणसाला खासदारकी मिळाली, तर कालांतराने त्याला कोणत्याही पक्षात प्रवेश करायची मुभा असते. त्यामुळे यापुढील जीवन 'काँग्रेसची खासदारकी करत त्याने आयुष्य कंठावे' असे म्या म्ह्टले, तर यात माझे काय चुकले?
11 Oct 2013 - 12:00 pm | उद्दाम
सचिनने काँग्रेसात रीतसर प्रवेश करावा, अन मग ती काँग्रेसची खासदारकी भोगत आयुष्य कंठावे, असे मला सुचवायचे आहे.
कपिलमुनी, वाक्याचा अर्थ समजून मग लेबलं लावावीत,
न्हायतर उगाचच 'मुनी बदनाम हुआ, डार्लिंग तेरे लिये' असे व्हायची वेळ यायची. :)
11 Oct 2013 - 12:14 pm | ग्रेटथिन्कर
राष्ट्रपती आरपीआयचे आहेत का काँग्रेसचे.?
ते देशाचे आहेत असे' पुस्तकी उत्तर देऊ नका. :-P :-P
11 Oct 2013 - 9:36 am | सुनील
सचिन गेल्यावर्षी (२०१२) काँग्रेसचा राज्यसभेतील खासदार झाला. अजून ५ वर्षे अजून तो त्या पदावर राहील. पुढे काय?
बादवे, "मी आता काय करावे" असा सल्ला सचिनने मिपाकरांकडे कधी मागितला होता काय? (की मिपाकरच आपले चालले सल्ले द्यायला!) ;)
11 Oct 2013 - 5:50 am | निनाद मुक्काम प...
सचिन ने आता काय करावे
सर्वात प्रथम अर्जुन नैय्या क्रिकेट विश्वात कशी पार पडेल ह्या बाबत व्यवस्थित फिल्डिंग लावली
रोहन च्या डोक्यात निळी टोपी आली तेव्हा कुठे सुनील चा जीव भांड्यात पडला होता
11 Oct 2013 - 9:44 am | चौकटराजा
क्रिकेटचा खेळ हा सांघिक खेळ आहे.त्यात रेकॉर्डस करणे याचा मूळ खेळाशी संबंध नाही,मूळ खेळाचा खेळण्याचा आनंद खेळडूना, खेळ पहाण्याचा आनंद प्रेक्षकाना व हार वा जीतचा फैसला असे त्याचे खरे स्वरूप आहे. कोण कोणत्या परिस्थेतीत कसा खेळला व त्या खेळामुळे खेळाचा रंगच पालटला का यावर खेळाडूची महानता ठरते. या निकषांवर सचिन बेस्ट ऑफ ऑल टाईम क्रिकेटर ठरत नाही एवढेच नव्हे तर त्याच्या समकालीन खेळातही तो उच्च ठरत नाही. पण खेळाडू म्हणून त्याचा विचार करण्याची पद्धत, मेहनत, माणूस म्हणून त्याने स्वतः चीच केलेली जडणघडण अलौकिकच आहे. त्याचे क्रिकेटच्या खेळावर जितके प्रेम आहे तितकेच त्याच्यावर लोकानी प्रेम केले याची त्याला पूर्णपणे जाणीव आहे. त्याला मिळालेला अमाप पैसा ही काळाने दिलेली देणगी आहे.खेळाचे स्वरूप त्याला पक्के माहीत असल्याने आपण कदाचित परत पूर्णपणे फॉर्मात येउ शकतो असे वाटत राहिल्याने त्याने निवृती घ्यायला वेळ लावला असेल ही. त्याला काही व्यावसायिक बंधने ही कारणीभूत झाली असतील. सचिन तेडूलकर ही एक महान गाथा आहे यात शंकाच नाही पण
खेळ हा खेळाडूपेक्षा मोठा असतो. सचिन नाही म्हणून क्रिकेटची लोकप्रियता काही कमी होणार नाही. कारण कोणत्या ना कोणत्या तरी प्रकारे संघात कामगिरी करण्याची जास्तीत जास्त शक्यता जेवढी क्रिकेटच्या खेळात आहे तेवढी ती इतर कोणत्याही खेळात खचितच नाही.
11 Oct 2013 - 8:21 pm | आशु जोग
पिळगावकरांच्या सचिनचं काय करायचं !
12 Oct 2013 - 1:50 am | रामपुरी
विग काढून घ्यायचा. स्वतःहून लपून बसेल.
13 Oct 2013 - 3:11 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सचिन निवृत्त झाला, हे एकदाचं बरं झालं. हल्ली, कसली बोगस ब्याटींग करायचा मुझसे तो देखा नही जाता था. शेवटच्या दोन कसोट्यात एकदा त्याला डोळे भरुन पाहुन घेतो. आपण त्याच्या वयाबरोबर वाढलो आणि आमच्या वेळी सच्या काय खेळायचा, हे सांगायला आम्ही मोकळे. आता तो तो कॉमेट्री करेल की, क्रिकेट खेळाडुच्या निवड पॅनलमधे येईल. मला वाटतं क्रिकेटमधे जास्तीत जास्त पैसे जिथे असतील तेच सच्या निवडेल असं वाटतं. पण, निवडू द्या. आपल्याला काय त्याचं. नाय का...? आपण त्याने दिलेल्या आनंदाच्या क्षणाचा आस्वाद घेत राहू.
-दिलीप बिरुटे