ऋषी आणि लांडगा... :)

विसोबा खेचर's picture
विसोबा खेचर in काथ्याकूट
19 Sep 2008 - 11:18 pm
गाभा: 

राम राम मिपाकर सभ्य स्त्रीपुरुषहो,

कृपया हे वाचा!

वरील दुव्यातली कथा वाचल्यानंतर माझ्या मनात आलेले विचार येथे नोंदवत आहे. आपल्याही मनातले विचार इथे नोंदवून हा धागा अंमळ मजेशीर करा ही विनंती.. :)

माझ्या मनातले विचार -

१) हा ऋषी चक्क थापा मारतो आहे. "माझ्यावर लांडग्याने उडी मारली तरी मी कसा शूर! अन् मी कसा वाचलो आणि पर्यायाने तो लांडगा माझं काहीच वाकडं करू शकला नाही.." हेच त्या ऋषीला, सॉरी! गोसावड्याला भासवायचं असावं! :)

२) जर ही ष्टोरी खरी असेल तर त्या ष्टोरीत लांडग्याच्या ऐवजी एखादा जबरदस्त भुकेला पट्टेरी वाघ असता तर किती बरं झालं असतं! :)

येऊ द्यात आपलेही विचार... :)

आपला,
(थापाड्या ऋषी!) तात्या.

प्रतिक्रिया

विकी शिरपूरकर's picture

19 Sep 2008 - 11:34 pm | विकी शिरपूरकर
३_१४ विक्षिप्त अदिती's picture

19 Sep 2008 - 11:36 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

"ऋषी आणि लांडगा" या ऋचेतल्या गोष्टीचा निरो, फिडल आणि शिवराज पाटीलांशी काय संबंध, तेही जरा सांगाल का, मला कळला नाही.

विसोबा खेचर's picture

19 Sep 2008 - 11:43 pm | विसोबा खेचर

"ऋषी आणि लांडगा" या ऋचेतल्या गोष्टीचा निरो, फिडल आणि शिवराज पाटीलांशी काय संबंध, तेही जरा सांगाल का, मला कळला नाही.

अग अदिती, ते ठीक आहे परंतु वरील कथेबद्दल तुझे विचार तर कळू देत! :)

आपला,
(व्रात्य ऋषी) तात्या.

प्रियाली's picture

20 Sep 2008 - 12:24 am | प्रियाली

थोड्यावेळाने ऋषी कपूर झालात तर झूठा कहीका म्हणावं लागेल.

विसोबा खेचर's picture

20 Sep 2008 - 12:38 am | विसोबा खेचर

थोड्यावेळाने ऋषी कपूर झालात तर झूठा कहीका म्हणावं लागेल.

:)

आपला,
(करिष्मा कपूर आवडणारा ऋषी) तात्या.

भाग्यश्री's picture

19 Sep 2008 - 11:49 pm | भाग्यश्री

मलाही आवडेल कळून घ्यायला.. ! इथे काय संबंध ?

तो धागा वाचला.. फारच विनोदी वाटला.. पोक काढलेल्या सुतारासारखा अरूण रंगाचा लांडगा ऋषिवर धावून गेला..
यात कस्ला आलाय डोंबलाचा गुढ अर्थ ? मलातरी नाही दिसत बुआ..

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

19 Sep 2008 - 11:52 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

मी आजवर लांडगा नाही पाहिला आहे, पण कोल्ह्याचं वर्णन अरुणवर्णी करायला तर काहीही हरकत नाही. बाकी गूढार्थ वगैरे काही असेल तर मलाही नाही समजलं तसं काही असेल तर.

आणि तात्या, तुम्ही म्हणता तसा पट्टेवाला वाघ आला असता तर आपल्या साक्षीजींना पाठवू तिथे! काय झकास फोटो काढतात ते!

भाग्यश्री's picture

20 Sep 2008 - 12:05 am | भाग्यश्री

अरूण रंग म्हणजे केशरी किंवा तत्सम रंग असावा असे कळते त्या धाग्यावरून..
कोल्हा या रंगाचा असेल असं वाटत नाही.. कोल्हा, ऑफ व्हाईट ,राखाडी,काळ्सर अशा रंगांचा असू शकतो..
लांडगा असेल.. चित्रं पाहीलीएत, त्यावरून लांडगा असेल त्या रंगाचा..

चला या निमित्ताने कोल्हा व लांडगा यांच्यावर चर्चा झाली!

अवांतर : साक्षीजींसारखं भाग्यवान होण्याची संधी आली होती, ती मी घालवली.. कॅमेरा गळ्यात नसल्याने.. एका व्हॅलीमधून फिरताना चक्क आख्खा कोल्हा आम्हाला आडवा गेला होता! थक्क झाले होते मी पाहून.. दुर्दैवाने कॅमेरा नव्हता बरोबर.. :(

विसोबा खेचर's picture

20 Sep 2008 - 12:12 am | विसोबा खेचर

एका व्हॅलीमधून फिरताना चक्क आख्खा कोल्हा आम्हाला आडवा गेला होता!

धत् तेरेकी! मग त्या प्रसंगावरून तूदेखील एखादी संस्कृत ऋचा ठोकून देऊ शकली असतीस! :)

काय भाग्यश्री तू पण! संस्कृत ऋचेचा आधार घेऊन त्या ऋषीसारखी एक सणसणीत थाप मारायचा चान्स घालवलास! छ्या...! ;)

आपला,
(कोल्हेकुई करणारा ऋषी!) तात्या.

भाग्यश्री's picture

20 Sep 2008 - 12:15 am | भाग्यश्री

हेहे.. ही चर्चा जर्रा उशीरा सुरू झाली! अशा ओळींना लई भाव असतो संस्थळावर हे आधी कळलं असतं तर नक्की रचल्या असत्या २-४ ओळी! संस्कृत मधे तब्बल ८८ पडले होते मला! :))

विजुभाऊ's picture

20 Sep 2008 - 10:48 am | विजुभाऊ

ही घ्या संस्कृत ऋचा
एकस्मिन अरण्ये; एके दिने
जायन्ती तत्र माम एक फॉक्सः आडवा:
हा हन्त हन्त हन्त ; अहम कॅमेरा विसरिष्यामी.
( अवांतरः सदर श्लोक ऋषी विजुभौ यानी पाणिनी होण्याच्या १००० वर्षे अगोदर लिहीली आहे. पाणिनी ने व्याकरणाचे नियम नन्तर लिहिले)

तुमची प्यान्ट ढील्ली होत असेल तर जाडी कमी झाल्याची तारीफ करू नका, हे मान्य करा की प्यान्टची नाडी ज्योतिषा कडे विसरलात

भाग्यश्री's picture

20 Sep 2008 - 12:50 pm | भाग्यश्री

विजुभाऊ तुम्ही खरंच महान आहात!!!

प्रभाकर पेठकर's picture

20 Sep 2008 - 2:01 pm | प्रभाकर पेठकर

सदर श्लोक ऋषी विजुभौ यानी पाणिनी होण्याच्या १००० वर्षे अगोदर लिहीली आहे. पाणिनी ने व्याकरणाचे नियम नन्तर लिहिले

हा:... हा:... हा:....
विजुभाऊ, मस्तच.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

20 Sep 2008 - 2:10 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

>> सदर श्लोक ऋषी विजुभौ यानी पाणिनी होण्याच्या १००० वर्षे अगोदर लिहीली आहे. पाणिनी ने व्याकरणाचे नियम नन्तर लिहिले

मला हीपण एक कूटऋचा वाटते. कारण मला या वाक्याचा अर्थ समजला तो असा:
ऋषी विजुभौ यांनी "सदर" ऋचा लिहिली आणि एक हजार वर्षांनंतर ते पाणिनी झाले.

गुरुदेव विजुर्षी, काही चूकभूल असल्यास आपल्या अजाण शिष्येला अज्ञानी बालिका समजून क्षमा करावी.

(नतमस्तक) अदिती

विनायक प्रभू's picture

20 Sep 2008 - 5:07 pm | विनायक प्रभू

http://vipravani.wordpress.com/
टोपी ऑफ विजुभाउ
वि.प्र.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

20 Sep 2008 - 12:12 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

मी इंग्लंडात कोल्ह्याची पिल्लं पाहिली होती, अगदी जवळून, दोनेक फुटावरुन! अगदी अरुणवर्णाची म्हणता येतील अशी, म्हणून म्हटलं. अर्थात मोठी होताना त्यांचा रंग बदलत असेल तर मोठे कोल्हे तसे नाही दिसणार. त्यांची आई मी दुरुनच पाहिली, ती तुम्ही म्हणता तशी राखाडीच होती. पण मीपण तुमच्यासारखीच कॅमेरा हातात नव्हता. कॅमेरा घेऊन परत जाईपर्यंत पिल्लं आईच्या पाठीमागे लांब पळाली होती.

सर्वसाक्षी's picture

21 Sep 2008 - 3:32 pm | सर्वसाक्षी

अहो बाई,

बिचार्‍या वाघाला पट्टेवाला नका हो म्हणू, पट्टेवाला म्हणताच न्यायालयातला गळ्यात लाल पट्टा घातलेला पांढर्‍या डगल्यातला 'हाजीर हो' असे ओरडणारा डोळ्यापुढे येतो. कृपया पट्टेरी वाघ म्हणा (तसा नियम वा कायदा नाही हो, पण आपली एक विनंती)

बाकी तात्याने पत्ता दिला तर चित्रणाला जायला हरकत नाही.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

21 Sep 2008 - 3:42 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

बिचार्‍या वाघाला पट्टेवाला नका हो म्हणू, पट्टेवाला म्हणताच न्यायालयातला गळ्यात लाल पट्टा घातलेला पांढर्‍या डगल्यातला 'हाजीर हो' असे ओरडणारा डोळ्यापुढे येतो. कृपया पट्टेरी वाघ म्हणा

=)) बरं बरं, चुकलंच माझं. ते काय झालं, आधीच ती ऋचा वाचून गोंधळ उडला हो माझा .... हे घ्या पट्टेरी वाघ, आता ठीक?

पण बाई काय? तो टार्‍या म्हणतो तेवढी म्हातारी नाही हो मी!

पण तुम्ही ते फोटू काढा आणि दाखवा आम्हाला, ते महत्त्वाचं!

विसोबा खेचर's picture

19 Sep 2008 - 11:55 pm | विसोबा खेचर

पोक काढलेल्या सुतारासारखा अरूण रंगाचा लांडगा ऋषिवर धावून गेला..
यात कस्ला आलाय डोंबलाचा गुढ अर्थ ?

हा हा हा! :)

आपला,
(कैच्या कैच थापाड्या) डोंबल ऋषी. :)

भास्कर केन्डे's picture

19 Sep 2008 - 11:55 pm | भास्कर केन्डे

तात्या, तुमच्या दुव्यामुळे आम्हाला बरेच महिन्यांनी उपक्रमाचे दर्शन झाले... नव्हे उपक्रमाला आमच्या पदस्पर्शाचा लाभ झाला असे त्या ऋषींप्रमाणे म्हणायची इच्छा झाली पण ... असो.

असे अनेक लेखक आपल्या देशात होऊन गेले ज्यांना कथारंजन व कल्पनाविस्तार आवडत असे. तसेच ते स्वतःला ऋषी, मुनी वगैरे मनवून घेत व खरे ऋषी-मुनी त्यांच्यामुळे बदनाम होत. हे ही त्यापैकीच एक असवेत असे दिसते.

काही दिवसांपूर्वी पांडवांवर तुम्ही एक चर्चा सुरु केली होती. त्याच्या प्रतिसादात एकाने छान विश्लेषन केले होते की मूळ महाभारत कथेत चमत्कार कसे जोडले गेले... जसे की कॄष्णाने द्रौपदी वस्त्रहरणाच्या वेळी साड्या पुरवल्या. हे चमत्कार जोडणारे असेच कोणी हौशी लेखक असावेत.

आपला,
(हौश्या) भास्कर

प्रियाली's picture

19 Sep 2008 - 11:57 pm | प्रियाली

सदर लेखकाला ऋचेत नवे कंगोरे सापडले असण्याची शक्यता मी नाकारत नाही पण त्यात गूढ आणि गहन असे काही वाटले नाही.

गूढ आणि गहन मिसळपावावर बरेच असते. त्यांना विप्रंचे लेख वाचायला देऊन कोण कोणते कंगोरे सापडतात ते विचारायला हवे.

अवांतरः हे विप्र लवकरच मला समुपदेश करायला लागणार. :(

भास्कर केन्डे's picture

20 Sep 2008 - 12:07 am | भास्कर केन्डे

हे विप्र लवकरच मला समुपदेश करायला लागणार.
-- काळजी नको. आमच्या खास खबर्‍याकडून मिळालेली माहिती आहे की विप्रंचे येत्या एक-दोन महिन्यांचे कॅलेंडर अगदी भरगच्च फुल्ल आहे.
तसेच जोपर्यंत शिक्षाण क्षेत्रात झालेला विचका सुधारत नाही तोपर्यंत त्यांचे कॅलेंडर तसेच राहणार. व शिक्षण क्षेत्रातला विचका २-३ पिढ्यांत तरी नीट होईल का नाही ही शंकाच आहे.

आपला,
(काळजी वाहू) भास्कर
आम्ही येथे वसतो.

प्रियाली's picture

20 Sep 2008 - 12:19 am | प्रियाली

मिपा त्यांचे ऍड्रिनलिन असेल तर फावल्या वेळांत इथे समुपदेशन करणार नाहीत कशावरून? :)

खास खबर्‍याकडून मिळालेली माहिती आहे की विप्रंचे येत्या एक-दोन महिन्यांचे कॅलेंडर अगदी भरगच्च फुल्ल आहे.

ही खबर खरीच असावी ;) पण त्यांच्याकडे मिपावर येण्याचा टैम आहे, लिहिण्याला टैम आहे मग एखादं माझ्यासारखं कोकरू (इथे लांडग्याची चर्चा सुरू आहे, कोकरावर येता कामा नये) हाती लागलं तर कशावरून समुपदेशन करणार नाहीत? :(

विनायक प्रभू's picture

20 Sep 2008 - 5:11 pm | विनायक प्रभू

http://vipravani.wordpress.com/
डायरी बघावी लागेल.
वि.प्र.

मुक्तसुनीत's picture

20 Sep 2008 - 12:04 am | मुक्तसुनीत

ऋचेबद्दल वाचले. मला वाटते अशा प्रकारचे दुर्बोध उल्लेख कितीतरी ग्रंथांत सापडतील. प्राचीन ऋचांपासून अर्वाचीन ग्रेस कवीपर्यंत दुर्बोधतेची असंख्य उदाहरणे मिळतील. मूळातच दुर्बोध असणार्‍या या ऋचेच्या संदर्भातल्या इतर ऋचा वगैरे दिल्या असत्या तर जरा तरी मदत झाली असती.

विसोबा खेचर's picture

20 Sep 2008 - 12:08 am | विसोबा खेचर

मूळातच दुर्बोध असणार्‍या या ऋचेच्या संदर्भातल्या इतर ऋचा वगैरे दिल्या असत्या तर जरा तरी मदत झाली असती.

अहो ती ऋचा ठार दुर्बोध आहे म्हणूनच तर इथे प्रत्येकाने आपापले विचार सांगायचे आहेत! ती ऋचा म्हण्जे कच्चामाल समजा हो! :)

आपला,
(मेनकेला पाहून जपजाप्य विसरणारा!) तात्यामित्र! :)

भडकमकर मास्तर's picture

20 Sep 2008 - 12:36 am | भडकमकर मास्तर

ती ऋचा म्हण्जे कच्चामाल समजा हो!
रंगराव त्यावर विडंबन पाडतील काय?

______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

लालरंगी लांडगा मारतो मोठी उडी
तो 'ऋषी' अन ती 'ऋचा' मारती कोठे दडी
गूढ, गहन काय कोठे? काहीतरी सांगू नका
घ्या विडंबन त्या ऋचेचे, 'रंगा' करी आता कडी!

चतुरंग

प्राजु's picture

20 Sep 2008 - 12:08 am | प्राजु

दुर्बोध... बास !!बाकी काही नाही. यात गूढता काय आहे हे ही नाही समजलं आणि कोणते कंगोरे आहेत ते तर त्याहूनही नाही समजलं..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

टग्या's picture

20 Sep 2008 - 12:14 am | टग्या (not verified)

लहानपणी आजोबांकडून ऐकलेल्या मामा वरेरकर आणि (बहुधा) आचार्य अत्र्यांच्या (दंत)कथेची आठवण झाली...

वरेरकर ही असामी म्हणे अशीच बाता मारण्यात नंबर वन. एकदा अत्र्यांशी गप्पा मारताना ठेवून दिली. स्थळ जिल्हा रत्नागिरी. (तज्ज्ञांनी तपशिलातल्या चुका दुरुस्त कराव्यात.) "आज पहाटेपहाटे मी गावाबाहेर गेलो आणि बसलो, आणि बसलोच होतो तर समोरून हा भला मोठा वाघ आला. माझी पंचाईत! आता काय करायचे? मग मी काय केले, तर माझ्याजवळच्या टमरेलातले पाणी त्याला फेकून मारले. वाघ पळून गेला."

अत्र्यांचे उत्तर: "अगदी खरी गोष्ट. कारण आज पहाटे मीही गेलो होतो आणि माझ्याहीसमोर वाघ आला, म्हणून मी चिडून त्याच्या थोबाडीत मारली, तर हाताला ओले लागले!"

असो.

विसोबा खेचर's picture

20 Sep 2008 - 12:23 am | विसोबा खेचर

हा हा हा!

टग्याऋषींनी सांगितलेली ष्टोरी लै भारी! :)

आपला,
(अंमळ घाईत असलेला) आचार्य तात्या अत्रे.

:)

चंबा मुतनाळ's picture

20 Sep 2008 - 1:09 am | चंबा मुतनाळ

मला वाटते त्या ऋषीला त्या सायंकाळी दोन पेग अंमळ जास्त झाली असेल, व जेंव्हा बायको शेंदरी वन् पीस घालून बोहारणीकडून चांगले डीलवर मिळालेली विळी दाखवायला आली तेंव्हा ह्याची फाटल्याने, त्याला ती लांडगीणीसारखी दिसली असेल!!

आजानुकर्ण's picture

20 Sep 2008 - 1:13 am | आजानुकर्ण

तेंव्हा ह्याची फाटल्याने

दोन पेग अंमळ जास्त झाल्याने दृष्टीदोष निर्माण होऊन चुकून काट्याबिट्यावर बसल्याने ऋषीची कफनी फाटली असण्याची शक्यता आहे.

आपला,
(पौराणिक) आजानुकर्ण

थोडी विनोदबुद्धी, लहानपणचे भाव जागवून करून ही कथा वाचावी.
"एक होताऽऽ लांडगा. लाल लाऽऽल लांडगा. एकदा मीऽऽ जंगलातून जात-होतो. लांडग्यानी मलाऽऽ बघितले. लांडगा अस्साऽऽ वाकला. कुबड्याऽऽ सुतारासारखा. लांडग्यानेऽऽ झपकन उडी-घेतली. हाय रे दैवाऽऽ, ..., बाप्पांनोऽऽ, बायांनो, आता माझेऽऽ काय होणाऽऽर?"

("वित्तं मे अस्य रोदसी" = हे स्वर्ग पृथ्वींनो माझी ही [दैना] जाणा, हा ऋचेचा शेवटचा भाग उपक्रमाच्या त्या लेखकाने दिलेला नाही.)

(गायींचे कळप हाकताना कुठेतरी राहुटी टाकून शेकोटी पेटवून गाणी म्हणायची - अशीच वेदांतली कित्येक सूक्ते आहेत. हे लोकसाहित्य आहे. हा कवी गोसावी नसून गुराखी असावा. सूक्ताच्या आदल्या ऋचांमध्ये "बायको नवर्‍याला बिलगते", "मी पुर्वी पिऊन गाणी म्हणत असे" वगैरे म्हणणारा कवी आजन्म "ज़ाहिद" ब्रह्मचारी तर मुळीच नसावा.)

लोकसाहित्यात दुर्बोध गोष्टी असतात हे खरेच आहे. पण त्यांच्यात मोठी गंमत असते.

"कापूसकोंड्याची गोष्ट" ही बरीच दुर्बोध कथा आहे. मला त्याचा अजूनही मुळीच अर्थ लागत नाही. पण लहानपणी ती ऐकायला मोठी मजा येत असे.

"काऊचे घर शेणाचे, चिऊचे घर मेणाचे" ही कथाही खूपच दुर्बोध आहे. आमच्या घरासमोरचा हुशार कावळा असे वेडपटासारखे शेणाचे घर कधीच बांधत नसे. मस्तपैकी काटक्याकुटक्यांचे घर बांधे. तरी लहानपणी ही कथा ऐकताना खूप मजा यायची. आज "प्रौढपणी" माझ्या छोट्या भाचे-पुतणे मंडळींना ही दुर्बोध कथा सांगताना खूप मजा येते.

मी म्हणतो : काऊचे घऽऽऽर...
भाची : शेणाचंऽऽऽ
मी म्हणतो : चिऊचे घऽऽऽर...
भाची : मेणाचंऽऽऽ

या आपल्या आजकालच्या मराठी ऋचा आहेत.
- - - -

लांडगे सहसा माणसांना मारत नाहीत, पण अगदीच कोकरे नसतात. नरभक्षक लांडगेही असतात.

हा विकी दुवा बघावा :
http://en.wikipedia.org/wiki/List_of_fatal_wolf_attacks

विसोबा खेचर's picture

20 Sep 2008 - 9:33 am | विसोबा खेचर

धन्याशेठच्या प्रतिसादातला बराचसा भाग कळला...! :)

आपला,
(दुर्बोध ऋषी) तात्या.

आनंदयात्री's picture

20 Sep 2008 - 5:42 pm | आनंदयात्री

=)) =)) =)) =))
तात्यासाहेब लै लै फॉर्मात !! बर्‍याच दिसांनी फुटलो इतपत लिहण्याइतके खदाखदा हसलो !!
=))

-आपलाच

(हलकट ऋषी) आंद्या कोळी

*संस्कृत आणी शुद्धलेखन आमचे ऍड्रिनलिन आहे*

ऋषिकेश's picture

20 Sep 2008 - 9:27 am | ऋषिकेश

शीर्षक वाचून वाटले मी आणि लांडगा????
:)
पुढे वाचल्यावर कळाले वेगळीच गंमत चालु आहे, असो, या दुर्बोध लिखाणात मला काहि कंगोरे सापडायचे नाहित.. आम्हाला भैतिक दुनियेत तसे बरेच कंगोरे दिसतात पण हा हंत हंत!!! ते संस्कृत ऋचांमधले नाहित. ;)

तेव्हा चालु द्या ! ;)

-(सावळ्या रंगाचा माणूस) ऋषिकेश

रामदास's picture

20 Sep 2008 - 11:13 am | रामदास

चर्चा आवडली. सगळ्यांनी मिळून आणखी मनोरंजक आणि गहन केली आहे.
http://ramadasa.wordpress.com/ हा माझा ब्लॉग आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

20 Sep 2008 - 4:36 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

संस्कृत भाषाच आमच्या सारख्या वाचकांना गुढ-गहन वाटते, तेव्हा त्या ऋचा- बिचा, लै लांबची गोष्ट.
एखाद्या मरणोत्तर भाषेला चिटकून त्याचा चोथा पाडणा-या संस्कृतप्रेमी लोकांचे आम्हाला लैच कौतुक वाटते. :)

विजुभाऊ's picture

21 Sep 2008 - 12:25 pm | विजुभाऊ

सहमत भौ ....संस्कृत ऐवजी ती ऋचा अर्धमागधी वा पालीत असती तर निदान विद्यापिठात अभ्यासाला तरी लावता आली असती.( ह घ्या )
तेवढीच गायडे लिहुन पाडता आली असती. मिपावरची सगळीच्या चर्चा संदर्भासह स्पष्टीकरण म्हणुन दिली असती
तुमची प्यान्ट ढील्ली होत असेल तर जाडी कमी झाल्याची तारीफ करू नका, हे मान्य करा की प्यान्टची नाडी ज्योतिषा कडे विसरलात

देवदत्त's picture

20 Sep 2008 - 6:38 pm | देवदत्त

मला काही ती ऋचा कळली नाही. पण इतर प्रतिसाद/कथा मस्तच. :)

"कापूसकोंड्याची गोष्ट" ही बरीच दुर्बोध कथा आहे. मला त्याचा अजूनही मुळीच अर्थ लागत नाही. पण लहानपणी ती ऐकायला मोठी मजा येत असे.
मलाही लहानपणी त्याची मजा वाटायची. पण आता मनात विचार येतो, ह्यात ऐकणार्‍यापेक्षा ती सांगणार्‍यालाच जास्त त्रास होतो.
समोरचा गप्प बसला तरी, 'अरे गप्प काय बसलास? कापूसकोंड्याची गोष्ट सांगू?' ;)

मनीषा's picture

21 Sep 2008 - 3:04 am | मनीषा

ही एक रुपक कथा असावी. तो ऋषी सांगत असेल कि आयुष्याच्या वाटेवरुन चालताना वाटेत अनेक संकटे दबा धरुन बसलेली असतात.. या कथेत संकट त्यच्यावर झेप घेण्याच्या तयारीत होते (लांडगा सुतारा सारखा बाक काढून झेप घेण्याच्या तयारीने वाट पहात होता) आणि हे कळून सुद्धा त्याच्यापासून वाचण्यासाठी त्याने काही प्रयत्न केला नाही त्या मुळे त्याला दु:ख /निराशेच्या खोल (विहिरीत) गर्तेत पडावे लागले . त्यातून बाहेर येण्याचा त्याला मार्ग मिळत नाही म्हणून तो देवाची प्रार्थना करत असणार. (यात लांडगा अरुण म्हणजे केशरी रंगाचा आहे असे सांगायचे कारण म्हणजे केशरी लांडगा कधी नसतो म्हणजे तो uncomman आहे म्हणजे संकट जे दबा धरुन बसले आहे ते अनपेक्षीत / अकल्पित आहे असे सांगायचे असेल. म्हणजेच आपला मार्ग हा निर्विघ्न असेल असे गृहित धरु नये असेच त्याला म्हणायचे असेल)
या कथेत तो माणूस ( दु:ख /निराशेच्या खोल (विहिरीत) गर्तेत पडलेला) हा ऋषी आहे ... म्हणून असे वाटते कि तो सांगतो आहे साधनेच्या मार्गावरुन चालत असताना अनेक (अनपेक्षित/अकल्पित) मोह साधकाला पथभ्रष्ट करु शकतात . सावध राहून त्यांना टाळले नाही तर साध्यापासून दूर रहावे लागते .

विसोबा खेचर's picture

21 Sep 2008 - 8:44 am | विसोबा खेचर

म्हणून असे वाटते कि तो सांगतो आहे साधनेच्या मार्गावरुन चालत असताना अनेक (अनपेक्षित/अकल्पित) मोह साधकाला पथभ्रष्ट करु शकतात .

अहो पण हे तर आम्हालाही माहित्ये! ह्यात कसला आलाय गूढ अर्थ?

आपला,
(साधनारत ऋषी!) तात्या.

मनीषा's picture

21 Sep 2008 - 11:25 am | मनीषा

अहो पण हे तर आम्हालाही माहित्ये! ह्यात कसला आलाय गूढ अर्थ?

हे ही एक गूढच आहे ... कोणाला तरी हाच अर्थ सुद्धा गूढ वाटला असण्याची शक्यता आहे .
काही लोकांना नाही का राम गोपाल वर्माचे चित्रपट हे भयपट आहेत असे वाटते .

काही लोकांना नाही का राम गोपाल वर्माचे चित्रपट हे भयपट आहेत असे वाटते .
राम गोपाल वर्मा की रामसे बंधू? कारण रामसे बंधूंचे तथाकथित भयपट हे प्रत्यक्षात अत्यंत भीषण विनोदी वाटतात!

मूळ विषय - या कथेत मला तरी काही गूढ अर्थ-बीर्थ आढळ्त नाही.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

मनीषा's picture

21 Sep 2008 - 11:27 pm | मनीषा

चित्रपट .. आणि काहींना तर त्याचा रामगड के शोले सुद्धा भयपटच असावा असे वाटते ..

देवदत्त's picture

21 Sep 2008 - 11:49 pm | देवदत्त

'रामगड के शोले' नाही हो, रामगड के शोले हा विनोदी चित्रपटच होता.
राम गोपाल वर्माचा ' राम गोपाल वर्मा की आग' हा होता.

फूंकबद्दल माझी प्रतिक्रिया इथे वाचा. रामसे आणि रामू यांत फार फरक नाही हे पटेल. ;)

असो, फूंक हा चित्रपट मी रात्री एकटीने (कारण घरातले माझ्यापेक्षा शहाणे आहेत. ते असे फालतू चित्रपट बघत नाहीत.) मोठ्या टिव्हीवर पाहिला आणि वेळ वाया गेला म्हणून रामूला चार शिव्या हासडल्या.

विनायक प्रभू's picture

22 Sep 2008 - 10:25 am | विनायक प्रभू

मला काय कळ्ले नाही. एवढ्च समजल की सुताराला पोक का येते. खुप रंधा मारावा लागतोना. लांड्ग्याने का बरे त्याचे अनुकरण करावे?
वि.प्र.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

22 Sep 2008 - 10:27 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

>> मला काय कळ्ले नाही. एवढ्च समजल की सुताराला पोक का येते. खुप रंधा मारावा लागतोना. लांड्ग्याने का बरे त्याचे अनुकरण करावे?

सुतार म्हणजे सुतार पक्षी का सुताराचं काम करणारा माणूस?

(शंकासूर) अदिती

चतुरंग's picture

6 Oct 2008 - 9:06 pm | चतुरंग

सुतार म्हणजे फर्निचर बनवणारा सुतार (पक्षी : कार्पेंटर ;) )

चतुरंग

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

6 Oct 2008 - 9:59 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

चतुरंग,

सुतार म्हणजे फर्निचर बनवणारा सुतार (पक्षी : कार्पेंटर Wink )

तुम्हीपण आता ऋचा लिहायला सुरुवात कराच!

ऋचा's picture

22 Sep 2008 - 11:13 am | ऋचा

मूळातच दुर्बोध असणार्‍या या ऋचेच्या संदर्भातल्या इतर ऋचा वगैरे दिल्या असत्या तर जरा तरी मदत झाली असती.
अहो ती ऋचा ठार दुर्बोध आहे म्हणूनच तर इथे प्रत्येकाने आपापले विचार सांगायचे आहेत! ती ऋचा म्हण्जे कच्चामाल समजा हो!
>:P :B :?

"No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"

विजुभाऊ's picture

6 Oct 2008 - 5:11 pm | विजुभाऊ

लांडग्याच्या ओरडण्याला " हम्म " असे म्हणतात असा एक नवा शोध लाग्ला आहे

विसोबा खेचर's picture

6 Oct 2008 - 10:59 pm | विसोबा खेचर

हा धागा वाचून उपक्रमावरील मूळ लेखाचा लेखक ऋजू माझ्यावर अंमळ वैतागला आणि त्याचं मानसिक संतुलन बिघडल्यामुळे तो बापडा माझ्यावर व्यक्तिगत शेरे मारू लागला! :)

मजा आली! :)

तात्या.

'ऋच्या' असे म्हणावे करण ते 'ऋजूने' मारलेले आहेत! ;)

चतुरंग

विजुभाऊ's picture

7 Oct 2008 - 10:08 am | विजुभाऊ

जे काही व्यक्तिगत शेरे असतील ते सगळे एकत्र गोळा करावेत आणि एक नवा ग्रन्थ तयार होईल
त्या नव्या ग्रन्थाचे नाव "व्यक्तिगत शेरोपनिषद"
असे ठेवावे. तेवढाच प्राचीन ग्रन्थात एक अर्वाचीन भर