मुस्लिमांचा मसिहा, गरीबांचा कैवारी, महिषमित्र लालूप्रसाद यादव हा (एकदाचा) चारा घोटाळ्यात दोषी ठरला आणि त्याची रवानगी तुरुंगात झाली.
ह्या सगळ्यामागे नादान जॉर्ज फर्नांडिस, धर्मांध मोदी, संघ, भाजपाच हेच कसे आहेत ह्याविषयीचा सुरस आणि चमत्कारिक अग्रलेख वाचला नसेल तर जरूर वाचा.
http://divyamarathi.bhaskar.com/article/EDT-lalu-prasad-yadav-rjd-chief-...
असो.
मुख्य मुद्दा असा की हा गरिबांचा कैवारी, गोठाभूषण लालू जेव्हा जेलमधे गेला तेव्हा त्याला म्हणे ढेकूण चावले, झोप नीट आली नाही त्यामुळे त्याने आपल्याकरता एअर कंडिशन कोठडी असावी अशी प्रेमळ मागणी केली आहे. त्याच प्रमाणे एका अस्सल समाजवाद्याच्या साध्या रहाणीला अनुसरुन एका फ्रिजचीही मागणी केली आहे. शिवाय घरचे जेवण, तंबाखू मळून द्यायला एक डी एस पी(!) अशी बडदास्त ठेवली जात असल्याचे कळते.
भ्रष्टाचारात दोषी ठरणे हे काय स्वातंत्र्यलढ्यात सहभागी होण्यासारखे पवित्र, आदरणीय बनले आहे की काय अशी शंका येऊ लागली आहे.
लोकांचा पैसा आपली सत्ता वापरून स्वतःचे उखळ पांढरे करुन घेण्याकरता वापरणे हे चोरी किंवा त्याहूनही हीन कृत्य आहे अशी समजूत होती पण ते तसे नाही की काय असे वाटत आहे.
http://maharashtratimes.indiatimes.com/nation/lalu-has-asked-ac-and-free...
हा काय प्रकार आहे?
प्रतिक्रिया
3 Oct 2013 - 7:24 am | चौकटराजा
हा धागा 'लाडावलेला लाडू' किंवा 'लालू समोसा' असे काहीतरी नाव द्या. पाक़कृती या सदरात टाका. मिपावर धाग्यास प्रतिसाद मिळण्याचे ते सर्वात खात्रीचे ठिकाण आहे !
3 Oct 2013 - 8:17 am | मुक्त विहारि
मेरा भारत महान..
3 Oct 2013 - 1:27 pm | मृत्युन्जय
दिव्य मराठी मध्य इतक्या चतुरपणे लेख लिहिणारे लोक आहेत हे बघुन कौतुक वाटले.
3 Oct 2013 - 2:10 pm | इष्टुर फाकडा
ह्या सुमार बुद्धीच्या कुमार पत्रकारावर मी कधीही चिडायचे नाही असं ठरवलं होतं… पण याचा यडझवेपणा मोदींना मिळणाऱ्या पाठिंब्याच्या समप्रमाणात वाढत चालला आहे. शिवसेनेने याला हानला ते त्यांनी चुकीचंच केलं होतं पण संघटनांकडूनही चुका का होतात याचे कारण कळू लागले आहे. असो, तुलनेसाठी लोकसत्ताचा लेख बघावा….
http://www.loksatta.com/sampadkiya-news/lalu-prasad-yadav-found-guilty-i...
3 Oct 2013 - 3:38 pm | रमेश आठवले
लालू बेचारा
आदतका मारा
घरमेथी रबडी लेकिन
खा रहा था चारा
3 Oct 2013 - 3:51 pm | खबो जाप
लालू ला शिक्षा वेगेरे झाली ते ठीक आहे पण जो ९५० कोटी चा घोटाळा झाला ती रक्कम कशी वसूल करणार हे म्हत्वाचे आहे.
कारण ५ वर्षांनी हा माणूस बाहेर येनार आणि तो पैसा वापरून सुखाने उरलेला वेळ घालवणार.
स्वताच्या तिन्ही पोरांच्या भविष्याची( राजकारणातील) सोय लावून ठेवली आहे आत्ताच.
किसका फाट्या किअसक टूट्या त्याला काय फरक पडणार आहे.
3 Oct 2013 - 5:19 pm | पैसा
आणि त्याना कमी शिक्षा द्या कारण त्यांचं वय ६७ आहे असं त्यांचा वकील सांगत होता. म्हणजे बाकी गुन्हेगार म्हातार्यांना या प्रमाणात कमी, हलक्या शिक्षा द्यायच्या असं आहे का? अपीले होतील. त्यात आणखी ३४ वर्षे जातील. तोपर्यंत लालू बहुतेक वरची हवा खायला निघून जातील. तुम्ही बसा पैसे कुठे गेले विचार करत, नाहीतर गायींना चारा घालत!
4 Oct 2013 - 12:58 pm | प्रभाकर पेठकर
इथे मस्कतमध्ये, मागे एकदा एका बँकेच्या अफरातफरी प्रकरणात, जेवढी अफरातफर झाली त्याच्या ४ पट दंड आणि अफरातफरीच्या रकमेची वसूली + ५ वर्षे तुरुंगवास अशी शिक्षा ठोठावण्यात आली.
4 Oct 2013 - 1:10 pm | क्रेझी
अपने देश में कानून अंधा है! हे परत एकदा सिध्द झालं.
फक्त ५ वर्ष शिक्षा पण तिही अगदी राजेशाही थाटातली. परवा न्यूजमधे असंही वाचलं की राबडीदेवी पक्षाची धुरा सांभाळणार आहेत आणि सगळ्यांचा सूर असा होता की जणू एखादा क्रांतिकारक देशासाठी महान त्याग करून तुरूंगवास भोगायला जात आहे!
5 Oct 2013 - 10:43 am | तिमा
या माणसाएवढा उर्मट,निर्लज्ज आणि घमेंडखोर राजकारणी यापूर्वी या देशांत झाला नाही. त्याचे दोष आणि त्याची सगळी करणी माहित असताना देखील मिडिया आणि काही पक्ष त्याला विनाकारण सन्मानाची वागणुक देत होते. अनेक वर्षे रेल्वेची भाडी न वाढवून याने रेल्वेचे अतोनात नुकसान केले आहे. तसेच बनावट हिशोब दाखवून रेल्वे फायद्यात आणल्याचा टेंभा मिरवला आहे. (रेल्वेची बरीच प्रॉपर्टी विकून याने रेल्वे फायद्यात दाखवली असे रेल्वेतीलच उच्चपदस्थ म्हणतात.)
6 Oct 2013 - 2:37 am | हुप्प्या
ह्या उन्मत्त माणसाचे थोबाड पाहिले तरी तळपायाची आग मस्तकात जाते.
तो फुगलेला, माजोरडा चेहरा, डोक्यावरील केसापेक्षा घनदाट आणि भरघोस कानातले केस!
बोलण्याची अत्यंत मग्रूर, घमेंडखोर पद्धत, ते तथाकथित विनोद आणि कायम भ्रष्टाचाराने काळवंडलेली कारकीर्द.
पत्रकारांनी असल्या रासवट माणसाला डोक्यावर का बसवला आहे हे मला अनाकलनीय आहे. दोषी ठरुन शिक्षा मिळाली तरी हेच चालू राहील असे वाटते.
कुणीतरी ह्याचे श्रीमुख चपलेने फोडून काढावे असे सारखे वाटत असते.
14 Oct 2013 - 4:49 pm | कपिलमुनी
त्यात केसांचा काय दोष > बाह्यरूप राजकारण्यांच्या हे टीकेचे किंवा कौतुकाचे कारण कसे काय होउ शकते ??
( प्रशांत दामलेच्या पण कानावर केस आहेत)
14 Oct 2013 - 9:09 pm | हुप्प्या
दोन मुद्दे आहेत
१. राजकारणी हे त्यांच्या चेहर्यानिशी वारंवार सामोरे येत असतात त्यामुळे त्यांच्याविषयीचे मत बनण्याकरता त्यांचा चेहरा कारणीभूत असतो. ही एक शुद्ध नैसर्गिक प्रतिक्रिया आहे. बर्याचदा आपण दिसतो कसे, बोलतो कसे ही प्रतिमा जाणीवपूर्वक तयार केलेली असते. नव्हे, राजकारण्यांना ती करावीच लागते. लालूप्रसाद ह्याचा हा अवतार जाणून बु़जून, एका विशिष्ट वर्गाला आपण आपलेसे वाटावे म्हणून बनलेला असावा. कारण असले अस्ताव्यस्त केस कापणे अवघड नाही.
२. हे एक वैयक्तिक मत आहे. जो माणूस लोकांपुढे येताना आपल्या कर्णकेशसंभाराची निगा राखत नाही त्याविषयी माझे मत चांगले होत नाही. बाकी राजकीय प्रतिमा उजळ असती तर एकवेळ ह्या वैगुण्याकडे दुर्लक्ष केले असते. पण तिथेही आनंद आहे त्यामुळे हे वैगुण्य अधिकच सलते.
15 Oct 2013 - 9:47 am | आशु जोग
अहो मग त्यांच्या कानांवरच्या केसाच्या राबडीने वेण्या घालाव्यात का !
5 Oct 2013 - 11:00 am | आशु जोग
हे टायमिंग महत्त्वाचे वाटते. कुणी दोषी ठरते. कुणी निर्दोष ठरते. त्याला किती किंमत द्यायची ?
निवडणूक आली की सज्जनकुमार 'निर्दोष' ठरतात.? आमचे साहेब कध्धी दोषी ठरत नाहीत. जगनमोहन काँग्रेसमधे होता तेव्हा सोनियाचा लाडका मुलगा होता. काँग्रस सोडल्याबरोबर त्याच्यावर केसेस लागल्या. आजकाल तर आपल्या प्रतिस्पर्ध्याचा काटा काढण्यासाठी विनयभंगाची सुद्धा केस टाकतात. त्यामुळे कुणीतरी कुणाच्या तरी खांद्यावरून कुणाचातरी सतत गेम करत असतो. आज कुणी रामशास्त्री प्रभुणे नाहीत.
14 Oct 2013 - 4:23 pm | दिनेश चिले
तुम्ही कुमार केतकर सारख्या लाल बावटा पत्रकार कडून काय अपेक्षा थेवत.लोकसत्ता होता त्यावेळी लोकसत्ताचा खपाच कमी झाला. लोकांनी लोकसत्ताच वचने सोडले होते. आता दिव्यामराठीला शुभेच्छा. असो.
14 Oct 2013 - 4:38 pm | मदनबाण
चला इतका वर्ष चारा खाउन लालु जेलयात्रा करणार तर !
जाता जाता :- संजुबाबा उर्फ संजय दत्त याला त्याची रजा वाढवुन मिळाली आहे म्हणे !तर ३र्या स्टेजच्या ब्रेस्ट कॅन्सर ने ग्रस्त साध्वी प्रज्ञा सिंग हिचे हाल तर कुत्रे देखील विचारत नाही असे म्हणतात म्हणे...
15 Oct 2013 - 12:28 pm | अनिरुद्ध प
+१११ सहमत
15 Oct 2013 - 1:17 pm | arunjoshi123
कुमार केतकरांची प्रॉपर्टी कशी वाढतेय (म्हणजे बदलतेय या अर्थाने) याबद्दलचे ज्ञान कूठे मिळेल का?
18 Oct 2013 - 1:24 am | खटपट्या
काही दीवसापुर्वी कुमार केतकराना युवराजान्ची बाजू घेताना आय बी एन लोकमत वर पाहीले. राहुल गान्धीना युवराज सम्बोधल्यावर त्याना भयन्कर राग आला होता...
22 Oct 2013 - 11:55 am | खटासि खट
मी लालूंचा फॅन. तुमचा फेकू लाडावलाय, नाही त्याला सोशल मेडीयातून लाँच केलाय, त्याची प्रकरणे बाहेर येतील तो सुदिन. मी लालूंचा फॅन आहे, पण भ्रष्टाचारात शिक्षा होऊ नये असं म्हणणार नाही. फेकूचे पाठीराखे म्हणतील असं ? लगेच सुरू कॅसेट, त्यांनी अमकं केलं म्हणून यांनी असं केलं तर बिघडलं कुठं ? केजी बेसिन चा भ्रष्टाचार तर बाहेर सुद्धा आलेला नाही. अनिल अंबानीला ठेका मिळाला नाही म्हणून त्याने कोर्टात धाव घेतली आणि मोठा भाऊ कसा फसवतोय याची यादीच दिली. मग कोकिळाबेन मध्यस्थ झाली. म्हणून अनिलरावांनी केस मागे घेतली, तेव्हां कोर्टाने दोघांना झाडले. नैसर्गिक गॅस देशाचा, त्यावरून भांडणारे दोन बोके आणि आर्ब्रिट्रेटर म्हणून काम पाहणारी कोकिळाबेन हे कोण लागून गेले ? तो लेख होता लोकसत्तावर. आता हटवण्यात आलाय. या भ्रष्टाचारात भाजप - काँग्रेस दोघेही मिळून आहेत. गूगळून आकडे तपासून पहा. चारा घोटाळ्यावरून लालूंना शिव्या देणा-यांच्या तोंडात चारा जाईल. आणि जर हे आकडे वाचूनही संताप येत नसेल तर त्या शिव्या स्वतःलाच द्याव्यात.
कोळसा खाणी, टू जी स्पेक्ट्रम या सगळ्यात आपले भाजपभाई, काँग्रेसीभाई व्यवस्थित एकत्र आहेत. बरं कंपन्याही त्याच त्या. स्वातंत्र्यापासून देशाच्या मानगुटीवर बसलेली व्यापारी घराणी. पण च्यायला आपली मानसिकताच अशी शिक बनलीय कि हे खातात तेव्हां गार गार वाटतं. बिर्ला टाटा, जिंदाल, मित्तल, अंबानी, धूत....धुवा साल्यांनो !
लालूंना शिक्षा झालीय ती ३७ कोटीच्या घोटाळ्यात गुन्हेगारांना पाठीशी घातल्याबद्दल. लाज वाटली आकडावाचून . ७६००० कोटी महाराष्ट्रात पाण्यात गेलेत. सहकारी तत्वावर गडा-यांची पूर्ती झाली. हवाहवासा प्रोजेक्ट धरणात वसलाय. गौण खनिजाच्या नावाखाली सोने आणि प्लॅटिनम लुटून नेलं जातंय..
लुटा साल्यांनो. तुमच्या बापाचंच राज्य आहे. लालू एकटा देशद्रोही ! तुम्ही साले सगळे धुतला तांदळासारखे देशप्रेमी. नमो नमः , गांधी नमः
22 Oct 2013 - 12:20 pm | दिपक.कुवेत
वर्षात भारताची व्याख्या बदलेल....भारत हा गरीबांचा, विविध सणांचा, एकात्मतेचा राहिलेला नसुन विविध भ्रष्टाचारांचा होईल.
22 Oct 2013 - 2:42 pm | बलि
तुम्ही दिलेल्या दुव्यामध्ये संघ परिवार आहे म्हणून तुम्ही मोदींच नाव जोडत असाल तर हे म्हणजे बलात्कार झालेल्या शहरातील प्रत्येकालाच बलात्कारी म्हणल्याप्रमाणे आहे.
आणि प्रत्येक वेळी संघ परिवाराला दोषी ठरवताना लोकांनी मुंबईतला आझाद मैदानावरील हिंसाचार विसरता कामा नये
धर्मांध कोण आहेत , कोण कोणाच्या मतांचं राजकारण करतात हे जनतेला कळून चुकलं आहे.