रिझर्व बॅंकेचे नवे गव्हर्नर रघुराम राजन यांची Monetary Policy आणि त्यांच्याकडूनच्या अपेक्षा

क्लिंटन's picture
क्लिंटन in काथ्याकूट
23 Sep 2013 - 11:32 pm
गाभा: 

५ सप्टेंबरला रिझर्व्ह बॅंकेचे नवे गव्हर्नर म्हणून रघुराम राजन यांची नियुक्ती झाली. त्याबरोबरच आय.आय.टी/आय.आय.एम मधून सुवर्णपदक विजेते, एम.आय.टी मधून पी.एच.डी, IMF मधील अनुभव, University of Chicago मधील Booth School of Business मध्ये प्राध्यापक आणि ८-१० पुस्तके तसेच ७०-८० रिसर्च पेपर्सचे लेखक अशी भारदस्त शैक्षणिक पार्श्वभूमी असलेल्या रघुराम राजनकडून सध्याच्या आर्थिक परिस्थितीत मार्ग काढण्यात महत्वाचे योगदान द्यायची जबाबदारी आली.आपल्या पहिल्याच पत्रकार परिषदेत मी फेसबुक लाईक्ससाठी नव्हे तर माझ्या अनुभवातून माझ्या मते योग्य निर्णय असेल तोच घेईन भले तो short term मध्ये कोणाला आवडो की न आवडो अशा प्रकारचे वक्तव्य करून आपण रिझर्व्ह बॅंकेचे एक स्वतंत्र गव्हर्नर असणार आहोत याची नांदी त्यांनी दिली. मागच्या शुक्रवारी (२० सप्टेंबरला) त्यांनी त्यांच्या कारकिर्दीतील पहिली Monetary Policy जाहीर केली.या लेखाचा उद्देश या पॉलिसीचा आढावा घेणे आणि त्या अनुषंगाने बॅंकिंगशी संबंधित इतर महत्वाच्या गोष्टींचा परामर्श घेणे हा आहे.

बॅंकांमध्ये तुमच्यामाझ्यासारखे वैयक्तिक खातेदार आणि कंपन्या त्यांच्या खात्यांमध्ये पैसे ठेवतात.बॅंकेत खातेदारांकडून एकूण जमा झालेल्या रकमेपैकी काही रक्कम बॅंकांनी रिझर्व्ह बॅंकेकडे ठेवणे गरजेचे असते.याला ’Cash to Reserve Ratio' (CRR) म्हणतात.या CRR चा महागाई नियंत्रणात ठेवण्यात कसा महत्वाचा सहभाग असतो याविषयी अधिक इथे .सध्या CRR ४% आहे. तसेच खातेदारांकडून जमा झालेल्या एकूण रकमेपैकी काही रक्कम बॅंकांनी सक्तीने सरकारी bonds मध्ये गुंतविणे गरजेचे असते.याला Statutory Liquidity Ratio (SLR) म्हणतात. सध्या SLR २३% आहे.तेव्हा खातेदारांकडून जमा झालेल्या १०० रूपयांपैकी ४ रूपये CRR मध्ये तर २३ रूपये SLR मध्ये गेले.उरलेले जास्तीतजास्त ७३ रूपये बॅंका पुढे कर्जाऊ द्यायला वापरू शकतात.अर्थातच बॅंका सगळे ७३ रूपये कर्जाऊ द्यायला वापरत नाहीत तर त्या ७३ पैकी काही रक्कम बाजारात गुंतवितात.

कोणत्याही दिवशी बॅंकेत खातेदार पैसे ठेवतात तसेच काढूनही घेतात.तसेच नवीन कर्ज दिले जाते त्याचप्रमाणे कर्जाची परतफेडही होते.तेव्हा कोणत्याही दिवशी बॅंकेत पैसे येतात त्याचप्रमाणे बाहेरही जातात.एखाद्या दिवशी जर बॅंकेतून बाहेर जाणारे पैसे आत येणाऱ्या पैशापेक्षा जास्त असतील तर अडचण व्हायला नको म्हणून बॅंका काही रक्कम स्वत:कडे ठेवतातच.त्यातूनही जर का बॅंकेतून बाहेर जाणारे पैसे आत येणाऱ्या पैशापेक्षा जास्त असतील तर बॅंका मधला फरक इतर बॅंकांकडून आणि रिझर्व्ह बॅंकेकडून पैसे तात्पुरते कर्जाऊ घेऊन आपली गरज भागवितात. रिझर्व्ह बॅंकेकडून असे पैसे तात्पुरते कर्जाऊ घ्यायच्या facility ला Liquidity Adjustment Facility (LAF) म्हणतात. LAF अंतर्गत रिझर्व्ह बॅंक ज्या व्याजदराने बॅंकांना पैसे कर्जाऊ देते त्या दराला Repo Rate म्हणतात.अर्थातच बॅंकांना हे पैसे कर्जाऊ मिळवायला सरकारी bonds तारण म्हणून ठेवावे लागतात.सर्वात महत्वाचे म्हणजे हे bonds हे SLR अंतर्गत जे bonds घेतलेले असतात त्यापेक्षा वेगळे असावे लागतात.

मे २०११ मध्ये माजी गव्हर्नर सुब्बाराव यांनी Marginal Standing Facility (MSF) ही नवी facility बॅंकांना उपलब्ध करून दिली.समजा LAF अंतर्गतही पैसे कमी पडत असतील तर MSF अंतर्गत सरकारी bonds तारण ठेऊन पैसे कर्जाऊ घेता येण्याची व्यवस्था केली.अर्थातच या MSF चा व्याजाचा दर Repo rate+1% इतका ठेवला.तसेच MSF साठी SLR अंतर्गत जे bonds बॅंकांनी घेतले होते ते तारण ठेवता येणार होते.

ICICI बॅंकेची बॅलन्स शीट इथे बघता येईल.या बॅलन्स शीटवरून असे कळते की ३१ मार्च २०१३ रोजी बॅंकेकडील एकूण ठेवी २,९२,६१३ कोटी रूपये होत्या तर एकूण कर्जाऊ घेतलेले पैसे १,४५,३४१ कोटी रूपये होते.

यावरून कळते की बॅंकेकडील काही ठेवी करंट अकाऊंटमध्ये,काही ठेवी सेव्हिंग्ज अकाऊंटमध्ये तर काही ठेवी fixed deposit मध्ये होत्या.यापैकी अर्थातच करंट अकाऊंटवर बॅंकेला ०% व्याज द्यावे लागते तर Savings Account वर Fixed Deposit पेक्षा कमी व्याज द्यावे लागते.बॅंकेच्या एकूण ठेवीपैकी जास्त ठेवी जर Current Account आणि Savings Account या स्वरूपात असतील तर बॅंकेला व्याजावर खर्च कमी होतो.बॅंकेकडील एकूण ठेवींपैकी किती % ठेवी Current Account आणि Savings Account मध्ये आहेत या रेशोला CASA Ratio म्हणतात. या बॅलन्स शीटवरून समजते की ICICI बॅंकेचा CASA Ratio सुमारे ४२% होता.

Schedule ४ मध्ये बॅंकेने किती पैसे कर्जाऊ घेतले आहेत याची माहिती आहे.त्यावरून समजते की बॅंकेने ३१ मार्च २०१३ रोजी रिझर्व्ह बॅंकेकडून १५,६२५ कोटी रूपये कर्जाऊ घेतले होते.अर्थातच बॅलन्स शीट ही त्या दिवशीची परिस्थिती दाखविते.इतर दिवशी बॅंकेने रिझर्व्ह बॅंकेकडून कर्जाऊ घेतलेली रक्कम कमी किंवा जास्त असेल.

सुब्बारावांनी जुलै २०१३ मध्ये जाहिर केलेले निर्णय

गेल्या काही महिन्यात अमेरिका आणि युरोपात परिस्थिती काही प्रमाणावर सुधारू लागली.परिस्थिती वाईट असते तेव्हा अमेरिकेतील Financial Institutions आपली जास्त गुंतवणुक शेअरपेक्षा अधिक सुरक्षित असलेल्या अमेरिकन सरकारच्या bonds मध्ये करतात. पण परिस्थिती सुधारल्यावर बॉंडमधील गुंतवणुक कमी करून शेअरमध्ये वळवली जाते.यातूनच बॉंडच्या किंमती कमी होतात आणि बॉंडवरील परतावा वाढतो.अमेरिकेतल्या Financial Institutions ना भारतातील bond मार्केटमध्ये गुंतवणुक करायची असेल तर अमेरिकेत जेवढा परतावा मिळतो त्यापेक्षा जास्त परतावा हवा असतो. नाहीतर अमेरिकेपेक्षा अधिक धोकादायक असलेल्या भारतीय bond मार्केटमध्ये या संस्था गुंतवणुक करणार नाहीत.पण अमेरिकेत bonds वरील परतावा वाढल्यामुळे भारतातील bonds वरील परतावा आणि अमेरिकेतील bonds वरील परतावा यातील फरक कमी झाला.अशा वेळी भारतातील bond मार्केटमधील गुंतवणुक या संस्था कमी करून अमेरिकेत वळवायचा धोका होता.तसे झाले असते तर भारतातून डॉलरचा ओघ बाहेर जाऊन रूपया आणखी कोसळला असता.तेव्हा यावर उपाय काय?कृत्रिम उपाय करून भारतातील बॉंडवरील परतावा वाढविणे म्हणजेच भारतातील बॉंडच्या किंमती कमी करणे!!

हे कसे करावे? तर तत्कालीन गव्हर्नर सुब्बारावांनी जुलै २०१३ मध्ये काही निर्णय जाहिर केले.ते पुढीलप्रमाणे:
१. CRR अंतर्गत बॅंकांना एकूण ठेवींच्या ४% रक्कम रिझर्व्ह बॅंकेकडे ठेवावी लागते हे आपण वर बघितले आहेच.ही सरासरी रक्कम तिमाहीतील एकूण सरासरी ठेवींच्या ४% इतकी ठेवणे गरजेचे असते.पण प्रत्येक दिवशी या गरजेच्या कमितकमी ७०% इतकी ठेवणे गरजेचे होते (पण तिमाहीत सरासरी maintain झाली पाहिजे). सुब्बारावांनी ही गरज ७०% वरून ९९% वर नेली.
२. MSF अंतर्गत मे २०११ पासून दर Repo rate+१% होता तो Repo Rate+३% केला.

या दोन निर्णयांमुळे बॅंकांकडील खेळता पैसा (liquidity) कमी झाली.पूर्वी असा जास्तीचा खेळता पैसा थोड्या कालावधीसाठी बॉंड मार्केटमध्ये गुंतवला जात असे.पण अशी liquidity कमी झाल्यामुळे या बॉंडची मागणी आणि म्हणून किंमत कमी झाली तर बॉंडवरील परतावा कृत्रिमरित्या वाढविला गेला. इथे दिलेल्या माहितीवरून कळते की सुब्बारावांनी जाहिर केलेल्या निर्णयानंतर १६ जुलै २०१३ रोजी भारतातील बॉंडवरील परतावा सुमारे ६.७% ने वाढला.तसेच नंतरही एकूण बॉंडवरील परताव्याचा आलेख चढता होता.

रघुराम राजन यांची Monetary Policy

रघुराम राजन यांनी २० सप्टेंबरला जाहिर केलेल्या monetary policy मध्ये Repo Rate मध्ये ०.२५% ने वाढ करून नवा Repo Rate आता ७.५% आहे. Repo Rate वाढला की बॅंकांचा कर्जावरील खर्च वाढतो आणि अर्थातच ज्या दराने बॅंका कर्जाऊ देतात तो व्याजाचा दरही वाढतो.राजन असा दर वाढवायची शक्यता लक्षात घेऊन स्टेट बॅंकेने आधीच व्याजाचे दर ०.१% ने वाढविले.तसे झाल्यास Aggregate demand कमी होऊन सध्या ६.१% वर असलेला महागाईचा दर कमी व्हावा या aim ने हा दर वाढविला आहे.

तसेच सुब्बारावांनी १५ जुलै २०१३ ला घेतलेले काही निर्णय राजन यांनी अंशत: शिथील केले.म्हणजे दररोज CRR च्या ९९% ऐवजी ९५% रक्कम रिझर्व्ह बॅंकेकडे ठेवणे गरजेचे केले.त्याचबरोबर सुब्बारावांनी MSF चा दर Repo+३% केला होता तो Repo+२% केला.यातून असे दिसते (माझा तर्क) की सध्या डॉलरच्या दरामधील volatility कमी होणे अपेक्षित आहे त्यामुळे सुब्बारावांच्या tight liquidity ची गरज आता तितक्या प्रमाणावर राहिलेली नाही.

रघुराम राजन यांनी भविष्यात काय करायला हवे याविषयी माझ्या अल्पमतीला जे समजते ते लिहावेसे वाटते.आज भारतातील एकूण बॅंकिंग सेक्टरपैकी सुमारे ७०% बिझनेस सरकारी बॅंका चालवतात.गेल्या २० वर्षात अनेक क्षेत्रांमध्ये भारताची वाटचाल समाजवादी मिश्र अर्थव्यवस्थेपासून बऱ्यापैकी market economy पर्यंत होत आहे/झाली आहे. असे असताना बॅंकिंग सारख्या अर्थव्यवस्थेत अत्यंत महत्वाच्या असलेल्या क्षेत्रात सरकारने अंग हळूहळू कमी करणे श्रेयस्कर ठरेल.जानेवारी २०१४ मध्ये काही नव्या बॅंकांना लायसेन्स दिली जायची शक्यता आहे.हा ट्रेंड चालू ठेऊन हळूहळू खाजगी बॅंकांना आणखी विस्तार करायला दिला पाहिजे.आणि सर्वात महत्वाचे म्हणजे खाजगी बॅंका छुपे चार्जेस लावून ग्राहकांची लुबाडणुक करतात त्यावर कडक लक्ष ठेवायला हवे.

दुसरे म्हणजे २३% SLR कमी करायला हवा.याचे कारण म्हणजे सरकारचा fiscal deficit फायनान्स करायचा एक मार्ग म्हणजे सरकारी bonds जारी करणे. खातेदारांनी खात्यात ठेवलेल्या प्रत्येक १०० रूपयांपैकी २३ रूपये हे SLR अंतर्गत सरकारी बॉंडमध्ये गुंतविले पाहिजेत ही बॅंकांवर सक्ती आहे.म्हणजे Fiscal Deficit वाढला तरी तो फायनान्स करायला बॅंका हा एक हक्काचा बकरा आहेच.सरकारी बॉंडमधून परतावा कमी असल्यामुळे आणि २३% इतकी घसघशीत रक्कम बॉंडमध्ये अडकल्यामुळे इतर कर्जदारांसाठीचे व्याजाचे दर वाढतात.म्हणजे सरकारने प्रवासी वाहतुकीसाठीच्या डिझेलवर आणि इतर अनेक गोष्टींवर सबसिडी द्यायची आणि त्यातून अर्थव्यवस्थेतील एकूणच व्याजाचे दर या कारणाने वाढणार.वाढत्या व्याजाच्या दराचे दुष्परिणाम होतातच. Food Security Bill मुळे यावर्षी तितका बोजा पडणार नसला तरी पुढच्या वर्षी त्याचे परिणाम जाणवतील.हा वाढीव बोजा नक्की किती याविषयी मतभेद आहेत पण आणखी बोजा पडणार इतके नक्की.त्यातून असे व्याजाचे दर वाढतील आणि अर्थव्यवस्थेचा वेग आणखी मंदावेल ही भिती आहेच.तेव्हा SLR या holy cow चा साईझ कमी झाला तर ते चांगले होईल.

प्रतिक्रिया

एस's picture

24 Sep 2013 - 8:52 am | एस

काल मिपा पुन्हा एकदा सुपर पाचसो एक टिकियाची जाहिरात एकाची भर घालून मध्येच करू लागल्याने प्रतिसाद देता आला नव्हता. मला वाटतं यात तुम्ही अजून विश्लेषण करू शकाल. विशेषतः बॅंकींग रेग्युलेटरी आणि वैधानिक तरलता दर यामधील सुधारणा व त्यांचे अर्थव्यवस्थेवर भविष्यात होणारे फायदे अजून विस्ताराने सांगू शकाल.

क्लिंटन's picture

30 Sep 2013 - 9:49 am | क्लिंटन

विशेषतः बॅंकींग रेग्युलेटरी आणि वैधानिक तरलता दर यामधील सुधारणा व त्यांचे अर्थव्यवस्थेवर भविष्यात होणारे फायदे अजून विस्ताराने सांगू शकाल

सरकारचे उत्पन्न आणि खर्च यातील फरक "फिस्कल डेफिसिट" एक तर सरकारचे उत्पन्न कमी झाल्यामुळे किंवा खर्च वाढल्यामुळे (किंवा दोन्ही झाल्यामुळे) उद्भवतो.सरकारचा डेफिसिट जर विकासकामांसाठी खर्च केल्यामुळे वाढत असेल (रस्ते, शाळा, धरणे इत्यादी)तर त्याविषयी फार तक्रार करायची गरज नाही.पण असा खर्च सबसिडी (डिझेल सबसिडी वगैरे) किंवा सरकारी पांढरे हत्ती पोसायला होत असेल तर मात्र ते कितपत योग्य आहे? शेवटी भारतासारख्या देशात विकासकामांवर होणारा खर्च अगदी अनिवार्यच आहे.मग इतर खर्चांना कात्री लावून "अंथरूण पाहून पाय पसरले पाहिजेत" अशी अपेक्षा केली तर चुकीचे कसे? सगळ्या प्रकारच्या सबसिडी एका रात्रीत बंद करता येणार नाहीत पण निदान त्या दिशेने पावले उचलायला नकोत का? १९९१ मध्ये नरसिंह राव सरकारने खतांवरील सबसिडी कमी करायचा निर्णय घेतला.असा निर्णय घेणे हे अलोकप्रिय ठरेल हे पुरते माहित असूनही.योग्य तो निर्णय घेणारे (भले तो निर्णय मतदारांना पटला नाही तरी) राज्यकर्ते बहुदा यापुढे कमीच होत जाणार.

आता हे फिस्कल डेफिसिट फायनान्स कसे करावे? तर सरकार एक तर नोटा छापून किंवा पैसे कर्जाऊ घेऊन हे डेफिसिट फायनान्स करते.पैसे कर्जाऊ घेण्याचा बाँड हा एक मार्ग आहे.मार्च २०१२ मध्ये भारतीय बँकांमध्ये एकूण ठेवी ६४ लाख १० हजार ९६७ कोटी होत्या . या ठेवींच्या २३% म्हणजे सुमारे १४ लाख ७५ हजार कोटी रूपये बँकांना सरकारी बाँडमध्ये सक्तीने गुंतवावे लागले.मार्च २०१२ मध्येच केंद्र सरकारने एकूण ३१ लाख २३ हजार ८२२ कोटी रूपये अंतर्गत कर्जातून घेतले होते.तेव्हा केंद्र सरकारच्या एकूण कर्जापैकी सुमारे ४७% कर्ज बँकांना सक्ती केल्यामुळे होते!! आणि सक्ती केली की बँकांना या बाँडमध्ये गुंतवणुक करणे भाग आहे.या सक्तीमुळे डेफिसिट वाढले तरी ते बर्‍यापैकी फायनान्स करायला बँकांसारखा हक्काचा बकरा आहेच अशी परिस्थिती निर्माण झाली.अशी सक्ती समजा नसेल (किंवा २३% ऐवजी रेशो कमी असेल) तर आपले डेफिसिट सहजासहजी फायनान्स होणार नाही हे लक्षात येऊन तरी सरकारी डेफिसिटवर चाप बसेल अशी अपेक्षा.

आता २३% इतका मोठा रेशो एका झटक्यात ०% वर आणता येणार नाही हे नक्कीच.पण मग तो टप्प्याटप्प्याने कमी करणे किंवा जरी बँकांवर सरकारी बाँड घ्यायची सक्ती केली तरी ते सरकारी बाँड "जनरल परपज" न ठेवता एखाद्या विशिष्ट प्रकल्पासाठी असावेत. अन्यथा असे कर्जाऊ उचललेले पैशांचा पांढरे हत्ती पोसायला किंवा सबसिड्या द्यायला गैरवापर व्हायची शक्यता आहे.

पैसा's picture

24 Sep 2013 - 12:40 pm | पैसा

अगदी सोप्या भाषेत लिहिलेला उत्तम लेख. सुरुवातीचे विवेचन पटले पण बॆंकाच्या खाजगीकरणाबद्दल असहमत आहे. (कदाचित मी बॆंक वर्कर्स युनियन A.I.B.E.A. च्या विचारसरणीत वाढल्यामुळे असेल.)

बॆंका खाजगीकरण करून फार काही साध्य होईल असे वाटत नाही. उलट सरकारी बॆँका सरकारला डिव्हिडंड आणि उत्तम फायदा देत आहेत. शिवाय खेडेगावातील लोकांना शक्य त्या सोयी पुरवत आहेत. खाजगी बॆंका खेड्यात जायला नाखूष असतात. अमेरिकेत मोठ्या बॆंकांनी दिवे लावले त्या काळातही भारतातल्या सरकारी बॆंका बहुतांशी फायद्यातच होत्या. म्हणजेच संकटकाळात असे सरकारी नियंत्रण फायद्याचे ठरू शकते.

SLR कमी करणे हा चांगला उपाय ठरू शकेल. पण त्यासाठी out of the box जाऊन विचार करावा लागेल. आपल्या ओळखीच्या अर्थशास्त्रीय नियमांप्रमाणे चलनवाढ कमी करण्यासाठी नेहमी लोकांच्या हातातील पैसे कमी करण्याचे उपाय योजले जातात. (ते किती उपयोगी ठरतात ही गोष्ट अलाहिदा.) त्यासाठी SLR कमी केला जाईल किंवा व्याजदरांचा सामान्य माणसावरील बोजा कमी होईल याची फार शक्यता नजीकच्या भविष्यकाळात दिसत नाही. उलट पुढचे निवडणुकांचे वर्ष विचारात घेता सबसिडीची खैरात वाढेल आणि दुसर्‍या बाजूने व्याजदर वाढतील असेच वाटते.

या वाढीव व्याजदरांची एक गंमतच आहे. मोठे Corporates त्याना पाहिजे तसे व्याजदर dictate करून मंजूर करून घेतात. त्यामुळे त्याना वाढलेल्या व्याजदराची झळ फारशी लागत नाही. अति गरीब लोकाना व्याजात सबसिडी असते आणि ते फारशी कर्जेही घेऊ शकत नाहीत. शेवट भरडला जातो तो तुमच्या माझ्यासारखा मध्यमवर्गीय माणूस.

क्लिंटन's picture

30 Sep 2013 - 10:39 am | क्लिंटन

बॆंका खाजगीकरण करून फार काही साध्य होईल असे वाटत नाही.

मी आर्थिक दृष्टीने एक "उजवा" माणूस आहे आणि मी जे काही लिहित आहे ते उजव्या व्ह्यूपॉईंटने आहे.

बँकांचे राष्ट्रीयीकरण झाले तेव्हा त्यामागचे राजकारण (इंदिरा विरूध्द सिंडीकेट) वगैरे गोष्टी बाजूला ठेऊ या.पण आर्थिक दृष्टीने विचार केला तरी राष्ट्रीयीकरण करणे १००% गरजेचेच होते का? आजही रिझर्व्ह बँक भारतातील बँकिंग क्षेत्रावर उत्तम देखरेख ठेऊन आहे आणि शहरी भागात नव्या बँकांच्या शाखांचे परवाने मिळण्यासाठी ग्रामीण भागातही बँकांनी शाखा उघडल्या पाहिजेत असा रिझर्व्ह बँकेचा दंडक आहे.दुसरे म्हणजे Priority Sector Lending अंतर्गत बँकांना त्यांनी एकूण कर्जाऊ दिलेल्या रकमेच्या ४०% रक्कम शेती,छोटे उद्योग इत्यादींना द्यावे लागते. याविषयी अधिक इथे. आणि असे नियम बँकांना पाळावेच लागतात. तेव्हा सांगायचा मुद्दा म्हणजे जर बँकांनी गावांमध्ये अधिकाधिक शाखा उघडाव्या असे सरकारला वाटत असेल तर त्याविषयीच्या नियमांमध्ये बदल करून अपेक्षित परिणाम साध्य झाला नसता का?त्यासाठी राष्ट्रीयीकरणच करायला हवे होते का?

दुसरे म्हणजे सरकारला बँकिंगमध्ये पडायचे असेल तर स्वतः नव्या बँका स्थापन करण्यापासून कोणी अडविले होते?ज्या बँका आधीच बँकिंग बिझनेसमध्ये होत्या आणि मोठ्या झाल्या होत्या त्यांना सक्तीने ताब्यात घेणे कितपण समर्थनीय आहे?अर्थातच बँकांचे राष्ट्रीयीकरण झाल्यानंतर देशात बँकांच्या शाखांचे जाळे झपाट्याने वाढले हे कोणी अमान्य करूच शकणार नाही.माझा मुद्दा आधीच बिझनेसमध्ये असलेल्या बँका सक्तीने ताब्यात घेण्याविषयी आहे.

तिसरे म्हणजे इथे विविध बँकांचा Gross Non-Performing Assets to Gross Advances रेशो दिला आहे.त्यात असे दिसते की सरकारी बँकांचा रेशो खाजगी बँकांपेक्षा थोडा जास्तच आहे.सरकारी बँकांचा CASA ratio जास्त असतो त्यामुळे त्यांचा व्याजावरील खर्च कमी असतो.अर्थातच त्यांना इन जनरल खाजगी बँकांपेक्षा कमी व्याजदराने कर्ज देणे परवडते.त्यामुळे अधिक चांगले मानांकन असलेल्या कंपन्यांना खाजगी बँकांपेक्षा सरकारी बँका नक्कीच अधिक चांगल्या वाटतील. (समजा एखादी चांगले मानांकन असलेली कंपनी असेल तर त्या कंपनीला कमी दराने कर्ज मिळावे ही अपेक्षा असेल कारण चांगले मानांकन म्हणजे धोका कमी.पण त्या दराने कर्ज देणे खाजगी बँकांपेक्षा सरकारी बँकांना परवडेल कारण सरकारी बँकांचा व्याजावरील खर्च कमी असेल).तेव्हा इन जनरल सरकारी बँकांची Asset quality खाजगी बँकांपेक्षा चांगली असायला हवी. तरीही सरकारी बँकांचा Gross Non-Performing Assets to Gross Advances रेशो जास्त आहे हे कोडे कसे सोडविणार?

चौथे म्हणजे अमेरिकेतल्या २००८ च्या आर्थिक संकटात खाजगी संस्था अडकल्या त्याचप्रमाणे फॅनी मे आणि फ्रेडी मॅक या सरकारी संस्थाही अडकल्याच.(इतकेच काय तर इंग्लंडमधील नॉर्थन रॉक ही चांगली Asset quality बँकही लेहमन ब्रदर्सच्या आधी कोसळली :( ). तेव्हा मला वाटते की जर देशातील सेंट्रल बँकेचे सुपरव्हिजन कडक असेल (जसे रिझर्व्ह बँकेचे आहे) तर असे संकट टाळले जाऊ शकते.बँका/संस्था सरकारी आहेत की खाजगी आहेत याचा त्याच्याशी तितकासा संबंध आहे असे वाटत नाही. (भारतातील मार्केट अजून तितके "मॅच्युअर" झालेले नाही म्हणून रिझर्व्ह बँकेने "क्रेडिट डिफॉल्ट स्वॅप" ना अजूनही मान्यता दिलेली नाही. नाहीतर त्याचा "इन्स्युरन्स" म्हणून वापर होण्याऐवजी "स्पेक्युलेशन" साठी गैरवापर व्हायची शक्यता आहे--जसे अमेरिकेसारख्या "मॅच्युअर" बाजारातही झाले आणि त्याचे दुष्परिणाम होतील). तेव्हा जोपर्यंत रिझर्व्ह बँक हा कडक पर्यवेक्षक आपली भूमिका व्यवस्थितपणे वठवत आहे तोपर्यंत तितके घाबरायला नको. २०१० च्या अर्थसंकल्पीय भाषणात प्रणव मुखर्जींनीही भारत जागतिक संकटापासून दूर राहिला त्याबद्दल बँकांचा राष्ट्रीयीकरणाचा निर्णय जबाबदार आहे असे म्हटले होते.त्याचे कारण मला तेव्हाही कळले नव्हते आणि आजही कळलेले नाही.

पाचवे म्हणजे जे काही समाजवादी छापाचे निर्णय पूर्वी घेतले ते कदाचित त्या काळाची गरज म्हणून घेतले गेले असतील्.पण आजही त्याच निर्णयांना चिकटून राहायची गरज आहे का? पूर्वी नेहरूंच्या काळात खाजगी उद्योगांकडे कदाचित तितका पैसा/तंत्रज्ञान नव्हते म्हणून सरकार अनेक प्रकारच्या उद्योगात उतरले.पण गेल्या २० वर्षात ह्ळूहळू आपली वाटचाल उजव्या दिशेने होत आहे.म्हणजे It is not government's business to be in business आणि सरकारने विविध उद्योगांसाठी योग्य असे कायदे आणि इतर नियम बनवावेत.कुठेही कोणीही खाजगी उद्योग गैरफायदा घेऊन पैशाच्या लोभाने ग्राहकांची पिळवणूक करत असेल तर नक्कीच सरकारने मध्ये पडून तो प्रकार थांबवावा.पण एकूणच कल असा आहे की सरकार हळूहळू विविध उद्योगांमधून अंग काढून घेत आहे.मग बँकिंग याला का अपवाद असावे?

असो.वर म्हटल्याप्रमाणे हे सगळे उजवे "व्ह्यूपॉईंट" आहेत्.ते सगळ्यांनाच मान्य होतील असे नक्कीच नाही. :)

पैसा's picture

30 Sep 2013 - 3:37 pm | पैसा

इतर गोष्टींबद्दल चर्चा होणार हे अपेक्षित आहेच.

एन पी ए चे प्रमाण सरकारी बँकांमधे जास्त का, याला अनेक उत्तरे आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे सरकारी (अधिकृत आणि अनधिकृत) हस्तक्षेप. सरकारी नियंत्रण जसे काही चांगल्या गोष्टी घडवून आणते तसे काहीवेळा कर्जे देताना माहिती असूनदेखील बाहेरून हस्तक्षेप होतो आणि कर्ज बुडणार हे माहित असताना कर्जे मंजूर करावी लागतात. आमची ए.आय.बी.ए. अशा एन पी ए चे प्रमाण कमी करावे यासाठीदेखील लढत आहे.

आपली वाटचाल उजव्या दिशेने होत असली तरीही अजून आपली अर्थव्यवस्था इतकी प्रगल्भ नाही. त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात गरिबी असताना समाजवादी छापाचे निर्णय आवश्यकच आहेत. संपूर्ण बाजार नियंत्रित अर्थव्यवस्था आपल्याकडे तरी सामाजिक न्याय आणू शकणार नाही. या बाबतीत अन्नधान्याचे भाव वाढायला शरद पवारांनी सुरू केलेली कमॉडिटी मार्केटमधील अन्नधान्याच्या वस्तूंची फ्युचर कॉण्ट्रॅक्ट्स असा बहुतांश समज आहे याची आठवण झाली.

क्लिंटन's picture

30 Sep 2013 - 4:32 pm | क्लिंटन

एन पी ए चे प्रमाण सरकारी बँकांमधे जास्त का, याला अनेक उत्तरे आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे सरकारी (अधिकृत आणि अनधिकृत) हस्तक्षेप.

याविषयी लोकसत्तामध्ये गिरीश कुबेर यांनी लिहिलेला हा लेख वाचनीय आहे.

एकूणच काय की सरकारचा बँकिंगमध्ये सहभाग आणि बँकिंगमध्ये (किंवा अन्यत्र कुठेही) झालेल्या गैरव्यवहाराला चाप लावायची जबाबदारीही सरकारवरच इथे बराच Conflict of interest आहे असे वाटते.तपास करणारे, न्यायनिवाडा करणारे आणि प्रत्यक्ष बिझनेसमध्ये असलेले यात कधीच ओव्हरलॅप असू नये.

त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात गरिबी असताना समाजवादी छापाचे निर्णय आवश्यकच आहेत. संपूर्ण बाजार नियंत्रित अर्थव्यवस्था आपल्याकडे तरी सामाजिक न्याय आणू शकणार नाही.

चर्चेला वेगळे वळण लागू नये म्हणून सध्या याविषयी काहीच लिहित नाही.

नाईकांचा बहिर्जी's picture

18 May 2016 - 12:26 pm | नाईकांचा बहिर्जी

सरकारी बँक फायद्यात होत्या ? करंट अफेयर्स मधले "लोन राइटऑफ़" चे आकड़े पाहुन तर डोळे पांढरे व्हायला आले होते (माझेतरी) एकावर एक बोजड़ NPA चे आकड़े पुढे येत असताना सरकारी बँक फायद्यात् होत्या असे कसे म्हणता येईल पैसा जी ? (तुम्ही बँकर आहात हे समजले म्हणून तुम्हाला अन धागाकर्त्यासरांना हा माझा प्रमाणिक प्रश्न आहे)

मला स्पर्धा परिक्षांत उपयोगी असते तितपत अर्थशास्त्रीय ज्ञान हवे आहे (थ्योरी + चालू घडामोडी + दोन्हीची सांगड) ह्या अर्थाने माझ्या वरील प्रश्नाला आपण कृपया उत्तर देऊ शकलात तर आनंद होईल

काही माझे अंदाज

1 भारतीय बँकींग क्षेत्र हे कात्री मधे सापडल्यासारखे वाटते मला, त्याचे कारण

अ . सरकारी बँक ज्या पेनेट्रेशन अन रीच राखून आहेत अन ज्या उत्तम प्रॉफिट बुकिंग करू शकतात त्यांचे कंबरडे खुद्द सरकार मोड़ते/मोडत आले आहे ते बिज़नसला बिज़नस म्हणून न चालवु देता एक सोशल डिविडेंट डिस्पेंसिंग mechanism म्हणून चालवायला सांगुन, उत्तम बिज़नस करण्याची ती ही किफायतशीर दरात क्षमता असुन सरकारी बँक मरतात त्या गवर्नमेंट टारगेट खालीच त्यातही कृषि विकास शाखा अन ग्रामीण ब्रांचेस ना जनधन ते स्वयंसहायता गट ह्यांची दिलेली टारगेट्स अन त्याचे प्रेशर हे एक महत्वाचे कारण वाटते

ब. धागाकर्ते सर म्हणाले आहेत तसे प्राइवेट बँक ह्या बंधनात बंदिस्त नसल्यामुळे व्यासायिक दृष्ट्या सक्षम असतात पण त्या अवाजवी प्रोसेसिंग फी घेऊन आपली बाजारातली पत ख़राब करत असतात

वरील अंदाजात काही चुक असल्यास कृपया दुरुस्ती करावी अशी विनंती करतो दोघांनाही

गंम्बा's picture

18 May 2016 - 2:00 pm | गंम्बा

स्पर्धा परिक्षांत उत्तर द्यायला जनधन , गवर्नमेंट टारगेट ही कारणे ठीक आहेत.

सरकारी बॅ़कांचा खरा प्रॉब्लेम भ्रष्टाचार करुन दिलेली कर्ज हा आहे. पुरेसे तारण नसताना कोणती बॅ़क कर्ज देइल, पण ह्यांनी दिलय. मल्या कडुन तारण घेउन कर्ज दिले असते तर मल्या देशा बाहेर पळुन जाउन पण सर्व पैसे बँकांना परत मिळाले असते.
जी कर्ज कधी फेडली जाणार नाहीत हे माहीती असुनच कर्ज दिली गेली आहेत. त्यात राजकारणी, दलाल, चोर उद्योगपती आणि बँकेची माणसे सर्व गुंतलेले आहेत.

प्रचेतस's picture

24 Sep 2013 - 7:27 pm | प्रचेतस

उत्कृष्ट लेख.
बाकी प्रतिसादांमधून अजूनही अधिकाधिक माहिती मिळत जाईल अशी अपेक्षा.

श्रीरंग_जोशी's picture

30 Sep 2013 - 4:10 am | श्रीरंग_जोशी

हेच म्हणतो.

सोप्या भाषेतला सुरेख लेख ! :)
जानेवारी २०१४ मध्ये काही नव्या बॅंकांना लायसेन्स दिली जायची शक्यता आहे.
Full list: These 26 companies applied for new banking licences
House committee red flags new bank licence norms

जाता जाता :- सध्या येस बँकवर लक्ष ठेवुन आहे,सध्याचा भाव :- 304.65 हा Multibagger ठरेल असे वाटते.

सरकारी बॅका केवळ सरकारी आहेत म्हणून ईनएफिशीअंट आहेत? खाजगी बँका ग्रामीण भागात जायला तयार होतिल? नाही तर कमी नफा मिळणारे भाग आणि सेक्टर या साठी सरकारी बॅका असुदेत असेही म्हणायला खाजगी बॅका तयार असतिल. प्रायवेटायझेशन वाईट नाही पण भारत दुर्दैवाने एवढा प्रगत नाही की तो सरकारी हस्तक्षेपाशीवाय (मद्त) राहु शकतो. principal of exclusion cannot be implemented till we have majority of population under poverty line.

सरकारी बॅका केवळ सरकारी आहेत म्हणून ईनएफिशीअंट आहेत?

याची कल्पना नाही.

खाजगी बँका ग्रामीण भागात जायला तयार होतिल? नाही तर कमी नफा मिळणारे भाग आणि सेक्टर या साठी सरकारी बॅका असुदेत असेही म्हणायला खाजगी बॅका तयार असतिल.

हो बरोबर आहे ना. आज जर ७०% बँकिंग सरकारी बँकांच्या हातात असेल तर ते एका रात्रीत ०% वर येणार नाही आणि तशी अपेक्षाही नाही.सरकारी बँका ज्या आहेत त्या बंद करा असेही म्हणणे अजिबात नाही.मला वाटते की इतर क्षेत्रांप्रमाणेच बँकिंगमध्येही खाजगी क्षेत्राला अधिक वाव द्यायला हवा. इतर क्षेत्रात असे वेगाने करता आले पण बँकिंगमध्ये ही वेळखाऊ प्रक्रीया असेल.

मी एका खाजगी बँकेत २-२.५ वर्षे काम केले आहे.अनुभव फार नाही पण जे काही बघितले आहे त्यात कर्ज देताना काही चांगले संकेत्/नियम यातून पळवाटा कशा काढल्या जातात हे अगदी जवळून बघितले आहे. हे एका प्रकारे गैरप्रकारच झाले.अशा गैरप्रकारांना चाप लावणार कोण? तर अर्थातच रिझर्व्ह बँक आणि सरकार कारण इतर कोणाकडे याचे मॅन्डेट नाही.पण सरकारही स्वतः बँकिंगमध्ये असेल तर थोडासा कॉन्फ्लिक्ट ऑफ इन्टरेस्ट येणारच. त्या अर्थीही बँकिंगमध्ये खाजगी क्षेत्राला अधिक वाव द्यावा असे वाटते.

प्रायवेटायझेशन वाईट नाही पण भारत दुर्दैवाने एवढा प्रगत नाही की तो सरकारी हस्तक्षेपाशीवाय (मद्त) राहु शकतो. principal of exclusion cannot be implemented till we have majority of population under poverty line.

उजवे आणि डावे हे दोघेही गरीबी कमी करावी असेच म्हणतील.पण ती कमी कशी करावी याविषयी मात्र अगदी टोकाची मतभिन्नता या दोन मार्गांमध्ये आहे.या चर्चेचा सूर उजवे विरूध्द डावे असा जाऊ नये म्हणून याविषयी अधिक काही लिहित नाही. मूळ लेखातील इतर मुद्द्यांवर चर्चा करायला नक्कीच आवडेल.

पिशी अबोली's picture

30 Sep 2013 - 3:28 pm | पिशी अबोली

मस्तच माहिती... :)
हे अर्थशास्त्र आवडायचं हो आम्हाला.. ते पंचवार्षिक योजनांमधे कशात काय झालं याचे आकडे पाठ करायला लावून पुणे विद्यापीठाने आमच्या इंटरेस्टची हत्या केली. :(

चौकटराजा's picture

30 Sep 2013 - 4:26 pm | चौकटराजा

प्रामाणिक पणा व प्रशासन दोन्हीकडे सारखे असेल तर पूर्ण नियंत्रित अर्थव्यवस्था उत्तम , अर्ध नियंत्रित व्यवहार्य व मुक्त अर्थव्यवस्था बेक्कार असे माझे मत झाले आहे. मुक्तपणात वेग आहे पण स्वार्थ व स्वैराचार अधिक. यात उपाय म्हणजे मालकी समाजाकडे पण व्यवस्थापन खाजगीकडे असा सुवर्णमध्य काढता येउ शकतो.

उत्तम लेख!! जरा एकदोनदा नीट वाचून मग प्रश्न (काही असलेच तर) विचारतो.

सुधीर's picture

30 Sep 2013 - 4:46 pm | सुधीर

लेख उत्तम आहे. नेहमीप्रमाणे अर्थशास्त्रातल्या गोष्टी तुम्ही मायबोलीत सहजसुंदर लिहिल्या आहेत.

सस्टेनेबल ग्रोथ (धारणीय विकास) आणि कंट्रोल्ड इन्फ्लेशन (मर्यादीत भाववाढ) हे दोन्ही उद्देश एकाच धोरणातून साध्य करणं तसं अवघडचं. अर्थात आरबीआय बरोबर अर्थमंत्रालयाकडूनही वेळोवेळी "पुरक" धोरणं अवलंबविणं तेवढंच गरजेचं असतं. राजन यांच्या प्रमाणेच "अर्थशास्त्रातल्या होली ट्रिनिटीचे" जनक असलेले सुब्बारावही या क्षेत्रातले एक विद्वान आहेत. (जाता-जाता "एक्सेंज रेट" या चौथ्या पदराने त्यांना आपला रंग चांगलाच दाखवला असावा) पण अर्थमंत्रालयाबरोबर सुब्बाराव यांचं सूत फारसं जुळलं नाही असा सूर वाचनात आणि चर्चात ऐकू यायचा. राजन यांच्याबाबतीत असं होऊ नये असं वाटतं.

दुसरं म्हणजे, मला एक प्रश्न पडतो तो असा की, अमेरिकन अर्थव्यवस्थेत बर्‍याच काळापासून पैसा खेळतो आहे तरीही त्यांची भाववाढ मर्यादीत कशी (२% च्या खालीचं)? अनपेक्षितपणे आरबीआय गव्हर्नर जेंव्हा रेपो रेट वाढवतात तेव्हा गुंतवणूकदार म्हणून पोटात गोळा येतो. कारण लगेचच इक्विटी मार्केट पोर्टफोलिओवर आणि काही काळाने बाँड मार्केट पोर्टफोलिओवर त्याचे नकारात्मक पडसाद दिसून येतात. राजन साहेब रेपो रेटशी फारसं न खेळता (शक्यतो न वाढवता) भाववाढ मर्यादीत राखून विकासदर वाढवू शकतील तर आनंद होईल (कसं ते मला माहीत नाही, हल्लीच त्यांचं एक विधान होतं कमीदर हा काही उपाय नाही म्हणून तरीही मी असं म्हणतोय).

क्लिंटन's picture

30 Sep 2013 - 5:27 pm | क्लिंटन

दुसरं म्हणजे, मला एक प्रश्न पडतो तो असा की, अमेरिकन अर्थव्यवस्थेत बर्‍याच काळापासून पैसा खेळतो आहे तरीही त्यांची भाववाढ मर्यादीत कशी (२% च्या खालीचं)?

अमेरिकन अर्थव्यवस्थेत बर्‍याच काळापासून पैसा खेळत आहे यावरून तुम्हाला Quantitative Easing म्हणायचे आहे असे गृहित धरतो.याविषयी चाणक्य यांच्या या लेखात उत्तम माहिती आहे.Quantitative Easing केल्यानंतर बँकांच्या हातात पैसा आला पण जोपर्यंत ग्राहक कर्जाऊ पैसे घेत नाहीत तोपर्यंत तो पैसा अर्थव्यवस्थेत जात नाही आणि पैशाचा पुरवठा वाढल्यामुळे महागाई वाढली असे होत नाही.अमेरिकेत हळूहळू सुधारणा आहे म्हणून Quantitative Easing कमी करायचे फेडने जाहिर केले आहे.तेव्हा उद्योग कर्ज घेऊ लागले आहेत आणि त्यामुळे सुधारणा आहे पण अजून महागाई त्यामुळे वाढावी अशी परिस्थिती आलेली नाही.तशी परिस्थिती आली की फेड बाँड विकून मिळालेले पैसे चलनातून बाहेर काढेल.

राजन साहेब रेपो रेटशी फारसं न खेळता (शक्यतो न वाढवता) भाववाढ मर्यादीत राखून विकासदर वाढवू शकतील तर आनंद होईल

तसे राजन साहेबांना करता आले तर फारच चांगले :)

हल्लीच त्यांचं एक विधान होतं कमीदर हा काही उपाय नाही

हो मागच्याच आठवड्यात जर्मनीत त्यांना कुठला तरी अ‍ॅवॉर्ड मिळाला.त्यावेळी त्यांनी भाषण केले त्यात त्यांनी असे म्हटले आहे.व्याजाचे कमी दर आणि सुपरव्हिजन व्यवस्थित न होणे हे बुडबुडे (बबल) तयार होण्याचे रसायन आहे.तसेच सबप्राईम क्रायसिसच्या वेळी अमेरिकेत झाले होते.अमेरिकेत रिअल इस्टेटमध्ये बबल तयार होत आहे आणि तो कधीनाकधी फुटणार आहे हे राजन यांनी अगदी २००५ मध्येच म्हटले होते.कदाचित व्याजदर कमी ठेवायला त्यांच्या विरोधाला ही पार्श्वभूमी असावी.

चाणक्य's picture

1 Oct 2013 - 11:19 am | चाणक्य

यांनी रेटस् वाढवले नाहीत हे एका अर्थाने बरच केलंय. फेड आजना उद्या टेपरींग करणारच. त्यामुळे मिळालेला वेळ आपण आपली अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी वापरला पाहिजे हे त्यांचं मत अत्यंत बरोबर आहे.महागाई दर आटोक्यात ठेवण्यासाठी हे बरोबर आहे पण अन्नधान्य महागाई दर अजून चिंताजनक आहे आणि तो आटोक्यात यायची काही चिन्हेही दिसत नाहीयेत.

पैसा's picture

1 Oct 2013 - 10:18 pm | पैसा

रघुराम राजन यांच्याकडे आपल्या गोंधळलेल्या अर्थव्यवस्थेला वठणीवर आणण्यासाठी काही जादू असेल अशी सध्या अपेक्षा करूया. पण चिदंबरम, आणि मनमोहनसिंग यांच्यासारखी तज्ञ माणसे सरकारमधे असताना फारसे काही होताना दिसले नाही.

आता अमेरिकन शट डाऊनचा आपल्या अर्थव्यवस्थेवर आंणि कोसळणार्‍या रुपयावर काय परिणाम होईल असे वाटते?

चौकटराजा's picture

2 Oct 2013 - 5:04 am | चौकटराजा

मनमोहन तज्ञ असतील पण ते प्रामाणिक व सक्षम व निर्दय नाहीत.हे सारे गुण असणारा एकही प्रधानम़ंत्री भारत देशाला
मिळालेला नाही. प्रशासन निर्दय असलेच पाहिजे आपली प्रशासने निर्लज्ज असतात.

चाणक्य's picture

2 Oct 2013 - 8:29 am | चाणक्य

अमेरिकन शटडाउन चा आपल्या अर्थव्यवस्थेवर काही परीणाम होणार नाही. कारण ती त्यांची अंतर्गत समस्या आहे. शिवाय ते फक्त सरकारी कार्यालयांपर्यंत मर्यादित आहे. लवकरच रिपब्लिकनस् पडती बाजू घेतील असे वाटते.

क्लिंटन's picture

2 Oct 2013 - 11:54 am | क्लिंटन

मला वाटते की हा प्रश्न नक्की किती काळ रेंगाळतो यावर बरेच काही अवलंबून आहे.जर प्रश्न लवकरच सुटला तर त्याचा फार परिणाम व्हायला नको.पण प्रश्न त्यापेक्षा अधिक काळ (१९९५-९६ प्रमाणे ३ आठवडे) चालला तर इथे म्हटल्याप्रमाणे अमेरिकन जीडीपीच्या तिमाहीतील वाढीच्या दरावर ०.९% इतका फरक पडेल.मुळात जीडीपी वाढीचा दर २.५% असताना त्या तुलनेत ०.९% हा फरक बराच मोठा आहे.

तसे झाल्यास काय होईल?
१. अमेरिकन अर्थव्यवस्थेत सुधारणा आहे म्हणून QE मागे घ्यायचे ठरविले होते.मध्यंतरी तो प्लॅन काही महिन्यांसाठी पुढे ढकलला.तो आणखी पुढे ढकलावा लागेल.त्यामुळे भारतातून ताबडतोब डॉलर मोठ्या प्रमाणावर बाहेर जायची शक्यता कमी होईल आणि ते रूपयासाठी चांगले होईल.
२. इथे दिल्याप्रमाणे भारतातून अमेरिकेत होणारी वस्तूंची निर्यात २०१२-१३ मध्ये ४०.५ बिलिअन डॉलर होती.तसेच आय.टी सारख्या सेवांची निर्यात नक्की किती होते याचा आकडा मला लगेच मिळाला नाही.पण सुमारे १०० बिलिअन डॉलरची आय.टी इंडस्ट्री लक्षात घेता हा आकडाही बऱ्यापैकी असावा.भारतीय आय.टी कंपन्यांना अमेरिकेतील अनेक सरकारी विभागांकडून कंत्राटे मिळतात. शटडाऊन संपल्यावरही नवी कंत्राटे देणे,जुन्या कामांचे पैसे देणे या सगळ्यांना वेळ लागेलच आणि मधल्या काळात भारतीय निर्यातीचे नुकसान होईल.यातून Current Account Deficit वाढेल आणि त्याचा रूपयावर वाईट परिणाम होईल.

३. शटडाऊनपेक्षाही मोठा परिणाम घडविणारा घटक आहे १७ ऑक्टोबरपर्यंत डेट सिलिंग वरचे मत.जर तोपर्यंत अमेरिकन कॉंग्रेसने debt ceiling वाढवायला मान्यता दिली नाही तर मात्र अमेरिकेवर पहिल्यांदाच डिफॉल्ट करायची वेळ येईल.आजपर्यंत होत होते की अमेरिकन सरकारचे बॉंड म्हणजे सर्व प्रकारच्या संकटांच्या वेळी सगळ्यात सुरक्षित गुंतवणुक होती.त्यावरच डिफॉल्ट झाला तर मात्र मोठी गोंधळाची परिस्थिती निर्माण होईल.तरीही इतर कोणतीच समकक्ष सुरक्षित गुंतवणुक नसल्यामुळे गुंतवणुकदार डॉलर बॉंड विकून ती गुंतवणुक इतरत्र वळवतील अशी परिस्थिती सध्या तरी नाही.त्यातूनही सुमारे ५ ट्रिलिअन डॉलरचे बॉंड चीन, जर्मनी आणि जपानच्या सरकारने विकत घेतले आहेत.हा आकडा महाप्रचंड आहे आणि ही सगळी गुंतवणुक विकता येणे कठिणच आहे.त्यातील बऱ्यापैकी गुंतवणुक जरी या सरकारांनी विकली तर अमेरिकन बॉंडच्या किंमती जोरदार कमी होणे (म्हणूनच परतावा वाढणे आणि अमेरिकेतील व्याजाचे दर वाढून अर्थव्यवस्थेला खीळ बसणे) आणि डॉलर कोसळणे हे परिणाम घडतील.आज चीनच्या जीडीपीमधील २४% भाग हा निर्यातीपासून येतो.त्यामुळे अमेरिकन अर्थव्यवस्थेला खीळ बसणे आणि डॉलर कोसळणे या दोन्ही गोष्टी चीन आणि जर्मनीला परवडणाऱ्यातल्या नाहीत.तेव्हा अमेरिकन सरकारने डिफॉल्ट जरी केला तरी अमेरिकन बॉंड तितके सुरक्षित राहिलेले नाहीत पण त्याचवेळी इतर समकक्ष सुरक्षित गुंतवणुक उपलब्ध नाही अशी परिस्थिती येईल.अशा वेळी काही गुंतवणुक सोन्यामध्ये जाऊन सोन्याच्या किंमती वाढायची शक्यता आहे.पण अर्थातच ट्रिलिअन डॉलर्सची गुंतवणुक सोन्यात होऊ शकणार नाही. तरीही शॉर्ट टर्ममध्ये सोन्याच्या किंमती वाढतील.तसे झाले तर भारताचे Current Account Deficit अजून वाढेल आणि ते रूपयासाठी चांगले नसेल.

तेव्हा अमेरिकेतील परिस्थितीचा भारतावर नक्की काय परिणाम घडेल हे वरील ३ घटकांवरून ठरेल.हे तीन घटक किती strong आहेत हे या संकटाच्या कालावधीवर अवलंबून असेल.आणि हा प्रश्न किती काळ चालेल यावर भाष्य करण्याइतकी माहिती मला नाही त्यामुळे त्यावर काही लिहित नाही.

पैसा's picture

2 Oct 2013 - 12:24 pm | पैसा

असंच काहीसं वाटत होतं. पण नक्की काही परिणाम माहित नव्हते. तसंही आता अर्थव्यवस्थेशी संबंधित कोणताही, कोणत्याही देशाचा मामला "त्यांचा अंतर्गत मामला आहे" असं म्हणून बाजूला राहता येणार नाही. त्यातून अमेरिकेच्या तंगड्या इतक्या ठिकाणी अडकल्या आहेत की अमेरिका शिंकली तर सगळ्या जगाला सर्दी होऊ शकते आणि काही देशांना तर न्युमोनिया होऊ शकतो!

चाणक्य's picture

2 Oct 2013 - 1:18 pm | चाणक्य

मला वाटते की हा प्रश्न नक्की किती काळ रेंगाळतो यावर बरेच काही अवलंबून आहे.

१००% सहमत.

अमेरिकन नागरिकांचं मत ओबामांच्या बाजूने आहे. ५ वेगवेगळ्या जनमत चाचण्यांनुसार. ३२%-३७% जनतेने या कार्यक्रमाला निधी देऊ नये असे मत व्यक्त केले आहे. आणि ८०% जनतेने शटडाऊन नको म्हटले आहे. ओबामाकेअर तसं पहायला गेलं तर जनतेच्या हिताचे आहे. (आणि ओबामांना ते म्हणूनच हवे आहे. आजचा लोकसत्तातला यावरचा अग्रलेख चांगला आहे. ) त्यामुळे मला असे वाटते की रिपब्लिकन्स ना पडती बाजू घ्यावी लागेल. पण १७ ऑक्टोबर पर्यंत काही विशेष झालं नाही तर ओबामांना पडती बाजू घ्यावी लागेल.

शटडाऊनपेक्षाही मोठा परिणाम घडविणारा घटक आहे १७ ऑक्टोबरपर्यंत डेट सिलिंग वरचे मत.

खर आहे. या परिस्थितीत ओबामांना खर्चाला कात्री लावावी लागेल आणि त्याचा परिणाम भारतासारख्या देशांच्या निर्यातीवर होईल.

सुमारे ५ ट्रिलिअन डॉलरचे बॉंड चीन, जर्मनी आणि जपानच्या सरकारने विकत घेतले आहेत.हा आकडा महाप्रचंड आहे आणि ही सगळी गुंतवणुक विकता येणे कठिणच आहे.त्यातील बऱ्यापैकी गुंतवणुक जरी या सरकारांनी विकली.....

एक शंका- अमेरिकेची अर्थव्यवस्था कोसळणं चीनच्या द्रुष्टीने धोकादायक आहे. मग या परिस्थितीत चीन सारखे देश आपली गुंतवणूक काढून घेतील की अजून गुंतवणूक करून (बॉड विकत घेऊन ) अमेरिकन अर्थव्यवस्थेला टेकू देतील?

डॉ सुहास म्हात्रे's picture

2 Oct 2013 - 4:55 pm | डॉ सुहास म्हात्रे

एक शंका- अमेरिकेची अर्थव्यवस्था कोसळणं चीनच्या द्रुष्टीने धोकादायक आहे. मग या परिस्थितीत चीन सारखे देश आपली गुंतवणूक काढून घेतील की अजून गुंतवणूक करून (बॉड विकत घेऊन ) अमेरिकन अर्थव्यवस्थेला टेकू देतील?

छोटा कर्जदार डिफॉल्टर झाला तर बॅक त्याच्यावर नियम वापरून कडक कारवाई करते कारण त्या एका कर्जदाराच्या बुडण्या-तगण्याने बँकेला फारसा फरक पडत नाही. याउलट, ज्याला काहीशे कोटी ऋण दिले आहे अशा मोठ्या उद्योगाला बुडीत होण्यापासून वाचवण्यासाठी बँक काहीवेळेस नियम शिथील करूनसुद्धा काही दशकोटीचे जास्त कर्ज देते. कारण असा कर्जदार बुडाला तर बँकेलाही खाली खेचतो... कधी कधी बुडवूही शकतो.

अमेरिका वरच्यापैकी दुसर्‍या प्रकारचा कर्जदार आहे.

याशिवाय चीन, जपान, जर्मनी यांचा अमेरिकेतल्या (खाजगी व सरकारी) गुंतवणूकीत इतका पैसा गुंतला आहे की:

(अ) तो सगळा (अथवा बहुतेक सगळा) थोड्या कालावधीत काढून घेणे शक्य नाही... बरे काढावा म्हटले तर अमेरिकन सरकारचा रोष आणि त्यामुळे होणारे राजकीय परिणाम भोगावे लागणार. कारण अमेरिका जरी कर्जबाजारी असली तरी आजच्या घडीला ती सामरिक आणि त्याबळावर राजकिय ताकद राखून आहे. (जणू काही कर्जबाजारी पेशवे ! ) चीन, जपान, जर्मनीही हे धाडस करण्याच्या भरीस पडणार नाहीत... आणि राष्ट्रीय गंगाजळी राखून असलेल्या इतर देशांची (उदा. खाडीचे आणि आसियन टायगर देशांची) असा विचार करण्याइतपत ताकद तर नाहीच उलट "अमेरिका नसली तर मग आपला तारणहार कोण?" या यक्षप्रश्न त्यांना भेडसावत आहे ! (खाडी देशांना इराणची आणि आशियाई वाघांना चीनची धास्ती आहे.)

(आ) आणि तरीही समजा या देशांनी आपली गूंतवणूक काढून घ्यायला सुरुवात केली तर अर्थातच डॉलरची किंमत घसरेल. म्हणजे अमेरिकेइतकाच अथवा त्यापेक्षा जास्तच तोटा गुंतवणूकदार देशांचा होणार... उदा. समजा डॉलर २५% ने घसरला तर अमेरिकेत उरलेल्या दर १ बिलियन डॉलर गुंतवणूकीची किंमत जागतीक चलनात ०.७५ बिलियन इतकीच राहील... आणि अमेरिका पूर्ण बुडित गेली तर हातात शून्य राहील!

अशा परिस्थितीला चपखल बसणारी म्हणः "धरलं तर चावतं, सोडलं तर पळतं."

उपायः कर्जदार बुडेल असे काहिही करू नका आणि देवाचा धावा चालूच ठेवा !

क्लिंटन's picture

3 Oct 2013 - 10:18 am | क्लिंटन

माझ्या वरील प्रतिसादात सुधारणा: अमेरिकन सरकारच्या बाँडपैकी सुमारे ५.५९ ट्रिलिअन डॉलर्सचे बाँड इतर देशांनी घेतले आहेत.त्यात चीन,जपान नंतर कॅरिबिअन देश आणि ओपेक (Organization of Petroleum Exporting countries) चा समावेश आहे.अधिक माहिती इथे. यात जर्मनीचा नंबर बराच खालचा आहे.

या देशांपैकी चीनची अमेरिकेत किती निर्यात होते हे वॉलमार्टला दिलेल्या एका भेटीतच समजून येईल.जपानची अर्थव्यवस्था गेली अनेक वर्षे stagnant आहे.अशा वेळी जपानमधल्या मोटार कंपन्या आणि इलेक्ट्रॉनिक्स कंपन्यांकडून अमेरिकेत होणारी मोठी निर्यात कमी होईल असे चीन-जपानला काहीही करता येणे शक्य नाही.तेव्हा वर इस्पिक एक्का यांच्या प्रतिसादाला +१.

या देशांनी समजा बाँड मोठ्या प्रमाणावर विकले तर अमेरिकन बाँडच्या किंमती कोसळतील.बाँडच्या किंमती आणि त्यावरील परतावा यांचे प्रमाण व्यस्त असते.त्यामुळे सरकारी बाँडवरील परतावा वाढेल्.अर्थव्यवस्थेमधील सगळे व्याजाचे दर हे सरकारी बाँडवरील परतावा अधिक डिफॉल्ट प्रिमिअम असतात.त्यामुळे सरकारी बाँडवरील परतावा वाढला तर सगळेच व्याजाचे दर वाढतील.तसे झाले तर कंपन्यांचा कर्जाने घेतलेल्या व्याजावरील खर्च वाढून नफा कमी होईल किंवा काही कंपन्या तोट्यात जातील्.म्हणजे नोकर्‍या कमी होतील आणि बेकारी वाढेल.तसे झाले तर जपानी गाड्या आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि चीनमधून आयात केलेल्या वस्तूंची मागणी आपोआप कमी होईल.म्हणजे याचा परिणाम चीन्/जपानच्या अर्थव्यवस्थांवर होईल.तेव्हा अमेरिकन सरकारचे बाँड चीन-जपानने "डम्प" करणे म्हणजे आपल्याच पायावर धोंडा पाडून घेण्यासारखे आहे. किंबहुना म्हणूनच या बाबतीत अमेरिका फारशी चिंतीत दिसत नाही. मागे कुठेतरी वाचले होते--If China dumps US government bonds, it will bring US to its knees but it will bring China to its ankles.

तेव्हा अमेरिकन अर्थव्यवस्था कोसळली तर त्याचे परिणाम आपल्यावर होऊ नयेत या धास्तीने का होईना चीन-जपानला ते बाँड आपल्याकडे ठेवणे आले आणि गरज पडल्यास आणखी बाँड घेणेही आले. एकूणच पैसाताईंनी म्हटल्याप्रमाणे सध्याच्या जगात कुठलाच (विशेषतः अर्थव्यवस्थेतील) प्रश्न एखाद्या देशाचा अंतर्गत प्रश्न नसतो.

सध्या ही परिस्थिती आहे.आणि जोपर्यंत चीनी अर्थव्यवस्थेचा मोठा भाग निर्यातीतून येत आहे तोपर्यंत ही परिस्थिती कायम राहिल.

सध्या तरी ही परिस्थिती आहे.भविष्यातले सांगता येत नाही.

मुक्त विहारि's picture

2 Oct 2013 - 11:06 am | मुक्त विहारि

वादे वादे जायते संवादः

चे एक उत्तम उदाहरण....

काही वर्षांपूर्वी स्वदेशी जागरण हा व्हिडिओ बघितला होता त्याची आठवण झाली, थोडी अतिशयोक्ती वगळता बराच माहितीपूर्ण वाटला. २००८ च्या घडामोडींच्या आसपासचा आहे हा.
वरती इस्पिकच्या एक्क्यांनी म्हटलं तसचं आहे, गुंडगिरी करणार्‍या 'दादा'ला दिलेली कर्जाऊ दिलेली रक्कम परत मिळणं सोडाच पण ती परत मिळवायची शक्यता अबाधित राखण्यासाठी अजून कर्ज देण क्रमप्राप्त ठरणं हा एक भाग आणि कर्ज जे द्यायचं त्याचं मूल्य पण तो दादाच ठरवणार हा दुसरा भाग! कर्ज देणारा बुडणारच कधीना कधी, मरण पुढे ढकलणं एवढच काय ते हातात.. दादा मात्र राडे करायला मोकळा :)
माझं मत : ग्लोबलायझेशनचा फायदा भारत आणि अमेरिकेसंदर्भात उतरंडीतल्या फक्त वरच्या थरातल्या लोकांना झाला, खालचा थर बेरोजगारी, जागतिक स्पर्धा ह्यात भरडलाच जातोय. सरकार कसं काम करत त्यावर्गासाठी हे महत्त्वाचं आणि त्यात ओबामाकेअर आणून अमेरिका काही करु पाहातेय आणि अन्नसुरक्षा विधेयक आणून भारत!
पुढे काय काय होतं ते बघण्यात मजा आहेच आपण फक्त ह्यात संधी शोधून डॉलर कधी कुठे वळवायचे ते पाहायचं त्याशिवाय करुही काय शकतो म्हणा ;)

उपास's picture

4 Oct 2013 - 4:49 am | उपास

क्लिंटन साहेब आणि इतर, १७ तारीख अतिशय महत्त्वाची आहेच पण अमेरिका (निर्लज्जपणे) डिफॉल्ट करेल ह्याची कितपत शक्यता वाटतेय? मागे नाही का गोल्ड किती आहे ते दाखवणार नाही पण आमच्याकडे ते आहे हे समजून त्याच्यावर पैसे द्या असा गेम केला होता त्यांनी! कुणी काही वाकडं करु शकलं नाही..
खरं म्हणजे फुकटचे पैसे कुणी उसने देतोय तर का नाही घ्यायचे असा विचार आहेच थिंक टँक मध्ये.. आणि मला तर वाटतं पुढच्या पिढ्यांचा विचार, कर्जाचा वाढता बोजा ह्याचा विचार करायचाच नाहीये त्यांना, माझं अत्ता मस्त कसं होईल एवढच बघायचय. ओबामा सुरुवातीला डेत सिलिंग बद्दल, पुढच्या पिढी बद्दल बोलायचा, चिंतित वाटायचा त्याने पण सगळं गुंडाळून ठेवलय विशेषतः ओबामा केअर आणलं तेव्हाच हे जाणवलं.

अमेरिका (निर्लज्जपणे) डिफॉल्ट करेल ह्याची कितपत शक्यता वाटतेय?

२०११ मध्ये डेट सिलींगचा प्रश्न अगदी शेवटच्या काही तासात सोडविला गेला होता.जर यावेळी राजकारण अजून ताणले गेले तर डेट सिलींग वेळेत न वाढून डिफॉल्ट होऊ शकेल का?गेल्या ३-४ वर्षात माझा अमेरिकेच्या अंतर्गत राजकारणातला इंटरेस्ट बराच कमी झाला आहे त्यामुळे तसे करण्यापर्यंत रिपब्लिकनांची मजल जाईल का यावर भाष्य करण्याइतकी माझ्याकडे माहिती नाही :( तसे न झाल्यास उत्तम.

क्लिंटन's picture

4 Jun 2014 - 9:33 am | क्लिंटन

SLR या holy cow चा साईझ कमी झाला तर ते चांगले होईल.

यावेळच्या मोनेटरी पॉलिसीमध्ये राजनसाहेबांनी SLR या होली काऊचा आकार २३% वरून २२.५% इतका केला आहे.भविष्यात हा आकार आणखी कमी केला जाईल ही अपेक्षा.

गॅरी ट्रुमन's picture

18 May 2016 - 11:13 am | गॅरी ट्रुमन

कालच सुब्रमण्यम स्वामींनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहून रघुराम राजन यांना पदावरून हटवायची मागणी केली आहे. या मागणीचा मी स्वतः विरोध करत आहे. रघुराम राजन हे मनाने पूर्णपणे भारतीय नाहीत हे एक कारण स्वामींनी त्यामागे दिले आहे. आता मनाने पूर्णपणे भारतीय कोण हे ठरविणार कोण आणि कोणत्या आधारावर? आणि मनाने कोण भारतीय आहे आणि कोण नाही हे ठरविण्याचा अधिकार स्वामींना कोणी दिला? असो. हे राजकीय प्रश्न आहेत.या लेखाचा मूळ गाभा आणि सर्व चर्चा अर्थशास्त्रीय असल्यामुळे या राजकीय बाबींवर अजिबात भाष्य करत नाही.

एकंदरीतच सर्वत्र सेंट्रल बँकांचे प्रमुख आणि सरकार यांच्यातील नाते थोडे अवघडच असते. रॉनाल्ड रेगन यांच्या दुसर्‍या टर्ममध्ये फेडचे चेअरमन पॉल व्होल्कर यांच्याशी त्यांचे जमत नसे. नेहरूंच्या सरकारमधील अर्थमंत्री टी.टी.कृष्णम्माचारी यांनी रिझर्व्ह बँक गव्हर्नर बेनेगल रामाराव यांचा एका बैठकीत सर्वांसमोर पाणउतारा केला होता आणि नेहरूंनीही रामारावांची बाजू घेतली नाही.त्यामुळे रामारावांनी राजीनामा दिला. संजय गांधींच्या मारूतीला बँकांनी दिलेल्या कर्जाविषयी आक्षेप घेतल्यामुळे इंदिरा सरकारने एस.जगन्नाथनना पदावरून काढले. चंद्रशेखर सरकारमध्ये अर्थमंत्री असलेल्या यशवंत सिन्हांनी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर आर.एन.मल्होत्रांना राजीनामा द्या असे प्रत्यक्ष सांगितले नाही पण त्या अर्थाचे पुरेसे संकेत दिले होते त्यामुळे मल्होत्रा पदावरून गेले. राजन यांच्यापूर्वीचे गव्हर्नर सुब्बाराव यांनी १०-१२ वेळा व्याजाचे दर वाढविले तेव्हा अर्थमंत्री चिदंबरम यांनीही नाराजी व्यक्त केलीच होती. तेव्हा सरकार आणि रिझर्व्ह बँक गव्हर्नर यांच्यातील नाते थोडे अवघडच असते हे समजून येईलच.

तरीही राजन साहेबांनी काही निर्णय नक्कीच चांगले घेतले आहेत.उदाहरणार्थ बँका आपले एन.पी.ए लपवायचा कसा प्रयत्न करतात हे जगजाहीर आहे.त्यावर त्यांनी चाप लावायचा प्रयत्न नक्कीच केला. मध्यंतरी बँकांचे शेअर गडगडले होते त्याचे कारण तेच होते.दुसरे म्हणजे रिझर्व्ह बँकेचे मॅन्डेट केवळ महागाईवर नियंत्रण ठेवणे 'इन्फ्लेशन टारगेटींग' असावे यासाठी डिसेंबर २०१४ मध्ये रिझर्व्ह बँकेने आणि अर्थमंत्रालयाने करार केला. त्याप्रमाणे महागाईचा दर २ ते ६% दरम्यान ठेवावा हेच रिझर्व्ह बँकेचे मॅन्डेट असणार हे राजनसाहेबांनी मान्य केले. याचे श्रेय राजनसाहेब आणि जेटली या दोघांनाही जाते. गेल्या वीस वर्षांपासून जगात अनेक ठिकाणी इन्फ्लेशन टारगेटींगवर सेंट्रल बँकांचा भर राहिला आहे. न्यू झीलंडमध्ये तर महागाईचा दर करारातील दिलेल्या रेंजमध्ये राहिला नाही तर गव्हर्नरच्या पदालाच धोका होतो.

एकूणच फिस्कल आणि मोनेटरी पॉलिसीमध्ये कोणत्याही परिस्थितीत बंधनकारक असे नियम असावेत की त्यावेळच्या परिस्थितीला अनुसरून निर्णय घ्यावेत याविषयी अर्थतज्ञांमध्ये मतभेद आहेत. मिल्टन फ्रिडमनसारखे अर्थतज्ञ म्हणतात की कोणत्याही परिस्थितीत बंधनकारक असलेले नियम ठेवले पाहिजेत आणि इतर काही अर्थतज्ञ असे नियम ठेवायच्या विरोधात आहेत. याविषयी चर्चा अधिक रंगल्यास अजून थोडे लिहेनच. मिल्टन फ्रिडमन यांच्यासारख्या मोठ्या माणसांची मते अनेकदा त्यावेळी पटत नाहीत पण भविष्यात त्यांचे महत्व लक्षात येते. तसेच काहीसे याबाबतीतही झाले आणि १९९० च्या दशकापासून अधिकाधिक सेंट्रल बॅंका असे नियमबध्द इन्फ्लेशन टारगेटिंग करू लागल्या. वाजपेयी सरकारने २००३ मध्ये Fiscal Responsibility and Budget Management Act पास केला त्याप्रमाणे सरकारने फिस्कल पॉलिसीसाठी तसा नियम आणला (तो युपीए सरकारने पाळला नाही ती गोष्ट वेगळी) तर २०१४ मध्ये मोदी सरकारने आणि राजन साहेबांनी असाच नियम मोनेटरी पॉलिसीसाठी आणला ही गोष्ट चांगलीच झाली.

रघुराम राजन हे मधूनमधून त्यांच्या अधिकारात येत नसलेल्या गोष्टींवरही भाष्य करत असतात. अशा मोठ्या पदावरील व्यक्तीने आपल्या डोमेनमध्ये नसलेल्या गोष्टींवर भाष्य करणे कितपत योग्य आहे? ही एक गोष्ट सोडली तर राजनसाहेबांची आतापर्यंतची कारकिर्द खरोखरच उल्लेखनीय आहे यात अजिबात शंका नाही. तेव्हा त्यांना पदावरून काढावे या सुब्रमण्यम स्वामींच्या म्हणण्याशी मी तरी सहमत नाही.

पिलीयन रायडर's picture

18 May 2016 - 11:54 am | पिलीयन रायडर

मनानी पूर्णपणे भारतीय नाहीत म्हणजे??

गॅरी ट्रुमन's picture

18 May 2016 - 1:51 pm | गॅरी ट्रुमन

मनानी पूर्णपणे भारतीय नाहीत म्हणजे??

म्हणजे नक्की काय ते स्वामीच जाणोत. मला वाटते की रघुराम राजन हे वयाच्या २४ व्या वर्षापासून ५० व्या वर्षापर्यंत (२६ वर्षे) भारताबाहेर वास्तव्याला होते आणि त्यांचे प्रोफेशनल करिअर बॉस्टन, शिकॅगो आणि वॉशिंग्टनला झाले म्हणून ते मनाने पूर्ण भारतीय नाहीत असे स्वामींना वाटत असावे. फक्त या युक्तीवादात एक घोळ आहे. आणखी एक व्यक्ती २८ वर्षे भारताबाहेर होती (वय वर्षे १८ ते ४६). वास्तव्य अमेरिकेत नव्हते तर ते होते इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेत. आणि त्या व्यक्तीचे नाव होते मोहनदास करमचंद गांधी!!

बोका-ए-आझम's picture

18 May 2016 - 5:10 pm | बोका-ए-आझम

रघुराम राजन हे मधूनमधून त्यांच्या अधिकारात येत नसलेल्या गोष्टींवरही भाष्य करत असतात.

आणि तरी स्वामींना ते भारतीय वाटत नाहीत? हे भारतीय असल्याचं काय म्हणतात ते, खास व्यवच्छेदक लक्षण आहे.

रघुराम राजन हे त्यांच्या पूर्वसूरींप्रमाणे होयबा नाहीत. Indian Economic Service मधून आलेले नाहीत आणि त्यांना जागतिक अर्थव्यवस्था आणि त्यातील बदलांची चांगली जाणीव आहे. मुळात भारताच्या अर्थव्यवस्थेत रोख रकमेचं प्रमाण हे विकसित देशांपेक्षा कैकपटीने जास्त आहे आणि अन्नधान्याचं उत्पादन हे पावसावर अवलंबून आहे. थोडक्यात सांगायचं तर भारतीय अर्थव्यवस्था ही inflation-prone आहे. मला वाटतं त्याचमुळे राजन यांनी सवंग लोकप्रियतेसाठी व्याजदर मोठ्या प्रमाणात न उतरवता सावधानीचा मार्ग स्वीकारला आहे. जर पाऊस चांगला झाला आणि अन्नधान्याचं उत्पादन घसरून किंमत वाढण्याचा धोका टाळला गेला - थोडक्यात आॅगस्टपर्यंत ९०% + पाऊस पडला, तर व्याजदर उतरवणं चांगलं होईल. पण स्वामींना काँग्रेसने नियुक्त केलेला माणूस खपत नसल्यामुळे ते कांगावा करत आहेत. राजकीय कांगावा करणारे योगी आदित्यनाथ, साक्षी महाराज वगैरे गणंग आता गप्प बसले आहेत, तर आर्थिक कांगावा करणारे स्वामींसारखे लोक उगाचच पाणी गढूळ करत आहेत.

गॅरी ट्रुमन's picture

18 May 2016 - 2:11 pm | गॅरी ट्रुमन

रघुराम राजन हे त्यांच्या पूर्वसूरींप्रमाणे होयबा नाहीत.

सहमत आहे.प्रवाहाविरूध्द पोहायचे धाडस त्यांच्यामध्ये आहे.आणि दुसरे म्हणजे कितीही विरोध झाला तरी आपले म्हणणे बरोबर आहे म्हणून त्यावर ठाम राहायचे कन्व्हिक्शन त्यांच्याकडे आहे.२००८ मध्ये आर्थिक संकट आले त्याचे भाकित २००५ मध्येच रघुराम राजन यांनी केले होते. आय.एम.एफ सारख्या संस्थांमधील आणि विविध विद्यापीठातील नामवंत अर्थतज्ञांची परिषद वायोमिंग राज्यात 'जॅकसन होल' या ठिकाणी भरते. २००५ मध्ये फेडचे चेअरमन अ‍ॅलन ग्रीनस्पॅन निवृत्त होणार होते.त्यामुळे त्या वर्षीच्या परिषदेत इतर सर्वांनी ग्रीनस्पॅन यांची कारकिर्द किती चांगली होती आणि जगाला वैभवाच्या शिखरावर नेण्यात त्यांची धोरणे कशी कारणीभूत होणार आहेत अशा स्वरूपाचे म्हणणे मांडले होते. त्याचवेळी ग्रीनस्पॅन यांची धोरणे आर्थिक संकट येण्यात कारणीभूत ठरतील असा इशारा रघुराम राजन यांनी दिला होता. त्यांचा २००५ मधला Has Financial Development Made the World Riskier? हा पेपर (http://www.nber.org/papers/w11728.pdf) अगदीच क्लासिक पेपर आहे. त्यावेळी त्यांना कोणीच फारसे गांभीर्याने घेतले नव्हते. किंबहुना त्यांच्यावर जोरदार टिकाही झाली होती.पण तीनच वर्षांनी जगाला राजनसाहेब बोलत होते ते योग्य होते हे समजले.

अवांतरः २००८ चे संकट नक्की का आले आणि यापुढे जागतिक अर्थव्यवस्थेपुढे कोणती आव्हाने आहेत याविषयीचे फॉल्टलाईन्स हे त्यांचे पुस्तक अगदीच जबरदस्त आहे. या विषयात रस असलेल्यांनी वाचलेच पाहिजे असे हे पुस्तक आहे.

बोका-ए-आझम's picture

18 May 2016 - 2:42 pm | बोका-ए-आझम

त्यात मला वाटतं त्यांनी अमेरिका perpetual liquidity trap मध्ये अडकली आहे असं विवेचन केलेलं आहे, आणि एकप्रकारे त्याचं खापर हे अॅलन ग्रीनस्पॅन यांच्या व्याजदर कमी ठेवण्याच्या धोरणावर फोडलेलं आहे. जर गल्फ-२ झालं नसतं तर हा crisis पुढे ढकलला गेला असता पण तो एकप्रकारे अटळ होता असंही प्रतिपादन त्यात आहे. तुम्हाला असं वाटतं का? म्हणजे राजन यांनी ते पाहिलेलं असल्यामुळे ते भारतासारख्या तुलनेने बेशिस्त अर्थव्यवस्थेवर व्याजदर कमी करुन खैरात करत नाहीयेत?

गॅरी ट्रुमन's picture

18 May 2016 - 4:13 pm | गॅरी ट्रुमन

जर गल्फ-२ झालं नसतं तर हा crisis पुढे ढकलला गेला असता पण तो एकप्रकारे अटळ होता

हो. यासाठी राजनसाहेबांनी काही कारणे दिली आहेतः

१. गेल्या काही दशकांमध्ये नॉलेज बेस्ड इकॉनॉमी आली आणि त्यामुळे पूर्वी कमी शिकलेल्या लोकांना ज्या नोकर्‍या सहज मिळत होत्या (टायपिस्ट, टेलिफोन ऑपरेटर इत्यादी) हद्दपारच झाल्या.तसेच चांगली नोकरी मिळण्यासाठी किमान डिग्री असणे गरजेचे झाले. अनेकांना वाटते की सगळे अमेरिकन लोक खूप हुषार आणि शिकलेले असतात. पण प्रत्यक्ष परिस्थिती नक्कीच तशी नाही.नव्या प्रकारच्या अर्थव्यवस्थेत पदवीधारकांना त्यातल्या त्यात चांगल्या नोकर्‍या मिळत गेल्या आणि त्यांचे उत्पन्न भराभर वाढले पण सामान्य लोकांचे उत्पन्न मात्र स्टॅगनेट झाले. ही सुरवात १९८० च्या दशकापासून झाली. त्यातून गरीब-श्रीमंत ही दरी मोठ्या प्रमाणावर वाढली.

अशा परिस्थितीत बिल क्लिंटन आणि जॉर्ज डब्ल्यू बुश यांच्या प्रशासनाने गृहकर्जाची सुलभ उपलब्धता ही एक अफूची गोळी (palliative) म्हणून लोकांना दिली. त्यातून झाले असे की जर स्वतःचे मालकीचे घर होणे अर्थात अमेरिकन ड्रीम जगता येणे शक्य झाले की मग लोक गरीब-श्रीमंत दरी वाढत होती त्याविषयी तक्रार करणार नाहीत. त्यातूनच मग अगदी फॅनी मे आणि फ्रेडी मॅकवर दबाव आणणे हे पण प्रकार झाले.

२. गृहकर्जांचे सेक्युरटायझेशन वाढले त्याप्रमाणे गृहकर्जे मोठ्या प्रमाणावर कोअर बँकिंगमधून शॅडो बँकिंगमध्ये गेली. राजनसाहेबांनीच एक उदाहरण दिले आहे. लास वेगास, नेवाडा मधील एका घरमालकाला गृहकर्ज कोण देत होता? तर स्टुटगार्ट, जर्मनीमधील एक दंतवैद्य. हे कसे झाले? तर लास वेगासमधील बँकेने दिलेले गृहकर्ज सिक्युरटाईझ झाले आणि त्यात जर्मनीतल्या म्युचुअल फंडाने गुंतवणुक केली आणि या फंडात स्टुटगार्टमधल्या त्या दंतवैद्याने पैसे ठेवले होते. त्यातून झाले असे कर्ज आपल्या बॅलन्स शीटवर २०-२५ वर्षे राहणार नाही हे लक्षात आल्यावर लास वेगासमधील बँकेच्या अधिकार्‍यांना कर्जासाठी ड्यू-डिलीजन्स व्यवस्थित पार पाडायची गरज तितक्या प्रमाणात राहिली नाही. त्यातून बेसुमार कर्जे दिली गेली आणि निंजा लोन (नो इनकम-नो जॉब-नो अ‍ॅसेट) दिली गेली.

३. १९९९ साली बिल क्लिंटन अध्यक्ष असताना ग्लास-स्टीगल अ‍ॅक्ट रद्द करण्यात आला आणि अर्थसंस्थांवर त्यापूर्वी असलेली बरीच बंधने काढून टाकण्यात आली. त्यातूनच मग हे इनोव्हेटिव्ह प्रॉडक्ट, सी.डी.ओ, सी.डी.ओ स्क्वेअर्ड, मग सी.डी.ओ ट्रान्चेसवर क्रेडिट डिफॉल्ट स्वॅप्स इत्यादी प्रकार अधिक बोकाळले.

हे सगळे लक्षात घेता २००८ चे संकट येणे क्रमप्राप्त होते असे पश्चातबुद्धीने म्हणता येईल. फक्त फरक इतकाच की आपल्यासारख्यांना हे सगळे संकट आल्यावर कळले तर राजनसाहेबांना आधीच कळले होते म्हणून राजनसाहेब हे (या बाबतीत तरी) नक्कीच द्रष्टे आहेत असे म्हणता यायला अडचण नसावी.

बोका-ए-आझम's picture

18 May 2016 - 2:44 pm | बोका-ए-आझम

त्यात मला वाटतं त्यांनी अमेरिका perpetual liquidity trap मध्ये अडकली आहे असं विवेचन केलेलं आहे, आणि एकप्रकारे त्याचं खापर हे अॅलन ग्रीनस्पॅन यांच्या व्याजदर कमी ठेवण्याच्या धोरणावर फोडलेलं आहे. जर गल्फ-२ झालं नसतं तर हा crisis पुढे ढकलला गेला असता पण तो एकप्रकारे अटळ होता असंही प्रतिपादन त्यात आहे. तुम्हाला असं वाटतं का? म्हणजे राजन यांनी ते पाहिलेलं असल्यामुळे ते भारतासारख्या तुलनेने बेशिस्त अर्थव्यवस्थेवर व्याजदर कमी करुन खैरात करत नाहीयेत?

प्रसाद गोडबोले's picture

18 May 2016 - 3:38 pm | प्रसाद गोडबोले

२००५ मध्ये फेडचे चेअरमन अ‍ॅलन ग्रीनस्पॅन निवृत्त होणार होते.त्यामुळे त्या वर्षीच्या परिषदेत इतर सर्वांनी ग्रीनस्पॅन यांची कारकिर्द किती चांगली होती आणि जगाला वैभवाच्या शिखरावर नेण्यात त्यांची धोरणे कशी कारणीभूत होणार आहेत अशा स्वरूपाचे म्हणणे मांडले होते. त्याचवेळी ग्रीनस्पॅन यांची धोरणे आर्थिक संकट येण्यात कारणीभूत ठरतील असा इशारा रघुराम राजन यांनी दिला होता.

<सारक्यॅस्टीक प्रश्न> बरं मग हे अ‍ॅलन ग्रीन स्पॅन २००९ पासुन कोणत्या तुरुंगात कैद आहेत ? कि त्यांना फासावर लटकवले ? तसे असल्यास रघुराम राजन ह्यांना किती बाऊंटी मिळाली ???

ख्यॅ ख्यॅ ख्यॅ !!!

प्रकाश घाटपांडे's picture

18 May 2016 - 12:08 pm | प्रकाश घाटपांडे

आमची यकच अपेक्षा आहे. जे लोकांचे पैशे बुडवित्यात त्यान्ला चांगली शिक्शा कर. पन आदुगर लोकांचे पैशे परत करायला लाव.

मुळ लेख पुर्वी वाचला नव्हता तो या निमित्तान वर काढल्या बद्दल घन्यवाद. या बाबतीत आम्ही पार अडाणी आहोत व पुर्वी कधी समजुन घ्यायचा प्रयत्न केला तर त्यातील क्लिष्टते मुळे सोडुन दिला होता. पण या लेखात (व लींका मधुन तुम्ही इतरत्र दिलेल्या प्रतीसादां मध्ये) तुम्ही तो खुप सोपा करुन सांगीतला आहे. त्यामुळे तो आता अभ्यास म्हणुन वाचण्यात येइल अर्थात वा.खु. साठवली आहे
पुनश्य घन्यवाद.

मार्मिक गोडसे's picture

18 May 2016 - 4:46 pm | मार्मिक गोडसे

Has Financial Development Made the World Riskier? ह्या पेपरची लिंक दिल्याबद्दल धन्यवाद.

मिल्टन's picture

18 Jun 2016 - 5:48 pm | मिल्टन

आजच रघुराम राजन यांनी सप्टेंबरमध्ये रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरचा कार्यकाल संपल्यावर शिकॅगोमधील बूथ स्कूल ऑफ बिझनेसमध्ये प्राध्यापक म्हणून परत जायचा निर्णय जाहिर केला आहे. तसेही राजनसाहेब हे हाडाचे शिक्षक आणि संशोधक आहेत. त्यामुळे त्यांचे या वातावरणात तितके मन रमले नाही असे दिसते.

एकूणच राजनसाहेबांनी बँकिंग क्षेत्राच्या स्थिरतेसाठी काही निर्णय चांगलेच घेतले. त्यातला सगळ्यात चांगला निर्णय म्हणजे एन.पी.ए चे आकडे किती आहेत हे बँकांना जाहिर करायला लावले.

आता राजनसाहेबांचा उत्तराधिकारी म्हणून कोणाची नियुक्ती होते ते बघायचे.

मराठी_माणूस's picture

20 Jun 2016 - 12:50 pm | मराठी_माणूस

उत्तराधिकार्‍या संबधात आज लोकसत्ता मधील व्यंगचित्र खुप सुचक आहे.
http://epaper.loksatta.com/846903/indian-express/20-06-2016#page/1/2

श्रीगुरुजी's picture

20 Jun 2016 - 2:39 pm | श्रीगुरुजी

रघुराम राजन यांना दुसरी टर्म न देणे ही मोदी सरकारची घोडचूक ठरणार आहे. ज्या पद्धतीने स्वामीने त्यांना लक्ष्य केले, त्यावर ज्या पद्धतीने केंद्र सरकारमधील सर्वांनी मौन पाळले व त्यामुळे उद्वेगाने त्यांनी दुसरी टर्म ने घेण्याचा निर्णय जाहीर केला, हा सर्वच प्रकार निषेधार्ह आह.

Hope better sense prevails!

बोका-ए-आझम's picture

20 Jun 2016 - 2:51 pm | बोका-ए-आझम

स्वामींनी टीका केल्यामुळे व्यथित होऊन जाणाऱ्यांमधले राजन नाहीत. त्याहीपेक्षा वाईट टीका त्यांच्यावर अमेरिकन प्रसारमाध्यमांनी २००५ मध्ये केली होती. पण त्यांनी आपलं म्हणणं ठामपणे मांडलं होतं.
ही इकाॅनाॅमिक टाइम्समधील बातमी वेगळंच सांगते आहे -Did RBI Governor Raghuram Rajan want shorter second stay?
http://economictimes.indiatimes.com/news/economy/policy/did-rbi-governor...

via The Economic Times App(Download Now):
http://ecoti.in/etapps

श्रीगुरुजी's picture

20 Jun 2016 - 2:55 pm | श्रीगुरुजी

हे कदाचित खरे असेल. परंतु लोकांचे पर्सेप्शन असे होत आहे की स्वामी राजन यांच्यावर जी सातत्याने टीका करीत आहेत त्यामागे केंद्र सरकार आहे व त्यामुळेच जेटली व मोदींनी मौन पाळून राजन यांना पाठिंबा दिलेला नाही व स्वामी यांना गप्प बसण्यास सांगितलेले नाही. सर्वसामान्य जनतेतून व उद्योगजगतातून देखील याविषयी नाराजी दर्शविण्यात येत आहे.

बोका-ए-आझम's picture

20 Jun 2016 - 3:22 pm | बोका-ए-आझम

ही सरळसरळ मोदी आणि भाजपविरोधी असल्यामुळे ते असा प्रचार करत आहेत. आजचं लोकसत्ता मधलं गिरीश कुबेरांचं संपादकीय त्यावरच आधारित आहे. मजा म्हणजे भाजपवर मोदींवर अवलंबून असलेला पक्ष अशी टीका करणाऱ्यांना आपण राजन यांना भारतीय अर्थव्यवस्था आणि रूपया वाचवणारा मसीहा असं project करुन नेमकं तेच करतोय हे समजत नाहीये. दुसरा विरोधाभास म्हणजे एकीकडे हीच वृत्तपत्रे मोदी सरकारला उद्योगपतीधार्जिणं सरकार म्हणतात. राजन उद्योगपतींचे लाडके होते. म्हणजे सरकारने जर त्यांना मुदतवाढ दिली असती तर उद्योगपतीधार्जिणं धोरण अवलंबलं असतं. पण बरोबर उलटं केल्याबद्दल सरकारवर टीका होते आहे. ही इटीमधली बातमी जर तथ्यपूर्ण असेल तर सरकारचं काहीही चुकलेलं नाही असंच म्हणावं लागेल आणि राजनही व्यथित होऊन जात नाहीयेत असं म्हणावं लागेल.

श्रीगुरुजी's picture

20 Jun 2016 - 3:28 pm | श्रीगुरुजी

खालील बातमीत वेगळंच कारण दिलंय.

http://www.loksatta.com/arthasatta-news/raghuram-rajan-felt-undermined-i...

खरी कारणं काहीही असली तरी माध्यमातून नकारात्मक संदेश गेलेला आहे. हे प्रकरण योग्य पद्धतीने हाताळायला हवं होतं.

http://linkis.com/newindianexpress.com/4AnuK
सर्वात महत्वाचा मुद्दा हा आहे की आता राजन यांच्या बाजूने गखा काढणाऱ्या चिदंबरम साहेबांनी राजनना ३ वर्षांसाठीच का नियुक्त केलं? RBI governor ची मुदत ५ वर्षांची असते, ३ वर्षांची नव्हे.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

20 Jun 2016 - 2:46 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

त्यामुळे त्यांचे या वातावरणात तितके मन रमले नाही असे दिसते.

शिकवायच्या पलिकडेही राजन ह्यांनी कामे केली आहेत रे मिल्टना. आय.एम.एफ.मध्ये ते चीफ ईकॉनॉमिस्ट होते शिवाय भारत सरकरमध्ये प्रमुख आर्थिक सल्लागारही होते.
सरकारने सुब्रम्हण्यम स्वामींच्या आचरटपणाला पायबंद घातला असता तर कदाचित राजन राहिले असते असे आमचे मत.

गामा पैलवान's picture

20 Jun 2016 - 9:51 pm | गामा पैलवान

श्रीगुरुजी,

तुम्ही दुवा दिलेल्या लोकसत्तेतल्या लेखातून पुढे संपादकीय लेखावर गेलो. तिथे हे रोचक विधान सापडलं :

>> सरकारला मदत करणे हे रिझव्‍‌र्ह बँकेच्या प्रमुखाचे काम नसते. चलन व्यवहारावर नियंत्रण ठेवणे आणि रुपया
>> स्थिर राहील हे पाहणे हे त्यांचे काम. ते राजन यांनी चोख बजावले.

एकाअर्थी चलन व्यवहारावर नियंत्रण ठेवणे आणि रुपयाचे स्थैर्य राखणे म्हणजेच सरकारला मदत करणे होय. पण त्याचसोबत देशांतर्गत अर्थव्यवस्थेसाठी योग्य तेव्हढा पैसा उपलब्ध करून देणेही आवश्यक आहे. या मुद्द्यावर राजन यांनी काय काम केले ते कळेल काय?

आ.न.,
-गा.पै.

मिल्टन's picture

20 Jun 2016 - 11:00 pm | मिल्टन

पण त्याचसोबत देशांतर्गत अर्थव्यवस्थेसाठी योग्य तेव्हढा पैसा उपलब्ध करून देणेही आवश्यक आहे. या मुद्द्यावर राजन यांनी काय काम केले ते कळेल काय?

राजन साहेबांनी स्टॅट्युटरी लिक्विडिटी रेशो २३% वरून २२% वर आणला. मार्च २०१५ मध्ये सगळ्या बँकांमधील एकूण डिपॉझिट ८९ लाख २२ हजार १११ कोटी रूपये होत्या . याच्या १% म्हणजे ८९ हजार कोटींपेक्षा जास्त रूपये कर्जाऊ देण्यासाठी बँकांमध्ये उपलब्ध झाले.

हा लेख लिहिला होता सप्टेंबर २०१३ मध्ये. त्यावेळी म्हटले होते की एस.एल.आर कधीतरी ०% आणावा असे म्हटले होते. त्यापूर्वी बँका स्वतःहून सरकारी बाँडमध्ये गुंतवणुक करायला लागतील अशी परिस्थिती निर्माण होणे गरजेचे आहे. कारण मोनेटरी पॉलिसिमधून व्याज दरांवर नियंत्रण ठेवायला रिझर्व्ह बँक हे बाँड बँकांकडून विकत घेते किंवा बँकांना विकते. जर मुद्दलात बँका अशी गुंतवणुक सरकारी बॉंडमध्ये स्वतःहून करत नसतील तर मात्र एस.एल.आर मधून सक्ती करणे गरजेचेच आहे. अन्यथा रिझर्व्ह बँक व्याजदरांवर नियंत्रण ठेऊ शकणार नाही. अर्थातच हा आकडा नक्की किती असावा? म्हणजे सध्या आहे तितका २१.५% की त्यापेक्षा कमी हवा याचे उत्तर माझ्याकडे नाही. अर्थातच तो ०% असू नये (निदान बँका स्वतःहून बॉंड विकत घेतात ही परिस्थिती निर्माण होत नाही तोपर्यंत). गेल्या ३ वर्षात मी आणखी वाचन केले आणि त्यातून हा रेशो ०% असू नये हे लक्षात आले. सप्टेंबर २०१३ मध्ये या बाबतीत माझी माहिती पूर्ण नव्हती.

खटपट्या's picture

21 Jun 2016 - 3:21 am | खटपट्या

_/\_

बोका-ए-आझम's picture

22 Jun 2016 - 2:12 pm | बोका-ए-आझम

याचा एक अर्थ असाही होतो की बँकांना त्यांच्या ठेवींपैकी ब-याच ठेवींचं कर्जांमध्ये रूपांतर करता येईल. त्याने - १. महागाई वाढेल २. या कर्जांची परतफेड होऊ शकली नाही तर बँकिंग प्रणालीच धोक्यात येईल. शिवाय SLR ० म्हणजे बँकांमध्ये दैनंदिन व्यवहारांसाठी लागणाऱ्या रोख रकमेवर RBI चं नियंत्रण नाही. परिणामी bank run अाणि deposit flight सारख्या गोष्टी होऊ शकतात आणि अर्थव्यवस्था तरलतेच्या सापळ्यात किंवा liquidity trap मध्ये अडकू शकते.

दिगोचि's picture

21 Jun 2016 - 7:15 am | दिगोचि

राजन यानी परत जायचे ठरवले याचे एक कारण म्हणजे स्वामीनी केलेल्या टीकेवर राजन यान्ची बाजू जेतली व मोदीनी घेतली नाही. मोदीन्च्यातला एक मुख्य दोष म्हणजे देशात होणार्या घडामोडीवर न बोलणे. केजरीवालने काहीहि बोलावे व यानी गप्प बसावे किम्वा शेतक्र्यान्च्या आत्महत्या होत आहेत आणि तरिहि हे गप्पच. त्यामुळे पवार आणि राहुल गान्धी मोदीना शेतकर्याविषयि सहानभूती नाही असे म्हणु शकतात. नुसते देशोदेशी भटकणे व तेथल्या पुढार्याबरोबर चर्चा करणे एव्हढच फक्त पन्तप्रधानाच काम आहे अस त्यान्चा समज अहे असे वाटते

दिगोचि's picture

21 Jun 2016 - 7:26 am | दिगोचि

राजन गेल्यानन्तर एक आपण सन्गु तसे करणारा गव्हर्नर भ्हजपला हवा आहे. राष्त्रीय ब्यन्काना पण हेच हवे आहे. कारण त्याना झालेला नुकसानाची भरपाइ करण्यासाठी रिझर्व्ह ब्यान्केची मदत हवी आहे. पूर्विन्च्या मन्त्रानी शेतकर्याना कर्जे दिलि व माफ केली व त्यातुन म्हणजे अस निर्णय घेतला म्हणुन शेतकर्याकडून पैसे पण खाल्ले. पूर्वीच्या मन्त्र्यान्ची चौकशी करा म्हणजे सर्व उकलेल.

गामा पैलवान's picture

21 Jun 2016 - 5:24 pm | गामा पैलवान

मिल्टन,

विधिनिर्दिष्ट द्राव्यत्व ( = statutory liquidity ratio) कमी केल्याने पैसा अर्थव्यवस्थेत वापरण्यासाठी खुला होतो. अर्थात त्यामुळे अर्थव्यवस्थेस चालना मिळते आणि परिणामी महागाई वाढते. ही वाढीव महागाई आटोक्यात आणण्यासाठी व्याजदर वाढवला, असा राजन यांचा युक्तिवाद आहे.

मात्र असं करतांना छोट्या व्यावसायिकांना या वाढीव व्याजदराचा जबर फटका बसला आहे. व्याजदर वाढवतांना समयसाधन ( = टायमिंग) महत्त्वाचे असते. ते न साधल्याने भारतातले तुलनेने दुर्बल व्यवसाय (जे पावसावर अवलंबून असतात) अडचणीत आले आहेत. माझ्या आकलनानुसार स्वामींचा दावा अशा अर्थाचा आहे.

मात्र राजन यांच्या जाण्यामागचं खरं कारण वेगळंच आहे. चिडुच्या कार्ट्याचे ( = चिदंबरम यांचे सुपुत्र श्री कार्टी ) सिंगापुरातले काही व्यवहार संशयास्पद वाटल्याने सक्तवसुली संचालनालयाने रिझर्व्ह बँकेकडे माहिती मागितली होती. ती राजन यांनी दिली नाही. स्वामींनी जानेवारी २०१५ मध्ये राजनना पत्र लिहून ही माहिती का अडवून धरली आहे म्हणून पृच्छा केली.

तसेच राजन यांनी चौकशी सुरू असल्याचा गौप्यस्फोट चिडुकडे केला. अशा पद्धतीने चिडुच्या कार्ट्याला सहाय्य करणे हा सर्वोच्च न्यायालयाचा अपमान ठरू शकतो अशी चेतावणी स्वामींनी राजनना दिली. एकंदरीत झाली तेव्हढी शोभा पुरे झाली म्हणून आता राजननी आपणहून गाशा गुंडाळायचं ठरवलेलं दिसतंय. कशाला उगीच कोर्टाच्या लफड्यात पडा !

अधिक माहितीसाठी (इंग्रजी दुवा) : https://www.pgurus.com/unpublished-letter-subramanian-swamy-rbi-governor...

आ.न.,
-गा.पै.

मिल्टन's picture

21 Jun 2016 - 9:30 pm | मिल्टन

विधिनिर्दिष्ट द्राव्यत्व ( = statutory liquidity ratio) कमी केल्याने पैसा अर्थव्यवस्थेत वापरण्यासाठी खुला होतो. अर्थात त्यामुळे अर्थव्यवस्थेस चालना मिळते आणि परिणामी महागाई वाढते. ही वाढीव महागाई आटोक्यात आणण्यासाठी व्याजदर वाढवला, असा राजन यांचा युक्तिवाद आहे.

या बातमीत काहीतरी घोळ दिसत आहे. राजनसाहेबांच्या कारकिर्दीत रेपो दर कसे बदलले ते बघू:

२० सप्टेंबर २०१३: ७.५% (पूर्वी तो ७.२५% होता)
२९ ऑक्टोबर २०१३: ७.७५%
२८ जानेवारी २०१४: ८.००%
१५ जानेवारी २०१५: ७.७५%
४ मार्च २०१५: ७.५०%
२ जून २०१५: ७.२५%
२९ सप्टेंबर २०१५: ६.७५%
५ एप्रिल २०१६: ६.५०%

तर एस.एल.आरचे दर कसे बदलले ते खालीलप्रमाणे:
६ ऑगस्ट २०१४: २२% (पूर्वी तो २३% होता)
३ फेब्रुवारी २०१५: २१.५%

राजनसाहेबांनी व्याजाचे दर शेवटचे वाढवले ते जानेवारी २०१४ मध्ये. तर एस.एल.आर कमी करायला सुरवात केली ऑगस्ट २०१४ मध्ये. त्यामुळे एस.एल.आर कमी केल्यामुळे अधिक पैसा खेळायला लागला आणि म्हणून महागाई वाढली आणि ती कमी करायला व्याजाचे दर वाढवले हे संभवनीय नाही.

मात्र असं करतांना छोट्या व्यावसायिकांना या वाढीव व्याजदराचा जबर फटका बसला आहे. व्याजदर वाढवतांना समयसाधन ( = टायमिंग) महत्त्वाचे असते.

राजनसाहेबांनी व्याजाचे दर पाहिजे तितके कमी केले नाहीत असे अनेकांचे म्हणणे आहे. कदाचित २००० सालानंतर अमेरिकेत अ‍ॅलन ग्रीनस्पॅननी व्याजाचे दर कमी ठेवले होते त्यामुळे बुडबुडा तयार व्हायला मदत झाली हे राजनसाहेबांनी स्वतः बघितले असल्यामुळे ते व्याजदर त्या वेगाने कमी करायला तयार नसतील. रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरची मुख्य जबाबदारी अर्थव्यवस्थेच्या दिर्घकालीन हिताच्या दृष्टीने मोनेटरी पॉलिसी ठेवणे ही असते. जर २०१९ मध्ये निवडणुका येणार आहेत म्हणून सरकारला अधिक जॉब क्रिएशनसाठी व्याजदर कमी हवे असतील तर शॉर्ट टर्ममध्ये बेकारी कमी झाली तरी त्यातूनच पुढे महागाई वाढून बेकारी परत वाढते. याविषयी १९५० च्या दशकाच्या शेवटी फिलिप्स कर्व्ह आणि त्याला मिल्टन फ्रिडमन यांनी दिलेले उत्तर हा अर्थशास्त्रातील एक अत्यंत रोचक चर्चेचा विषय आहे. कदाचित राजनसाहेबांना ही भिती वाटली असेल.

सरकारने राजनसाहेबांना मुदतवाढ दिली नाही हा सरकारचा निर्णय त्यांच्या दृष्टीने विचार केला तर चुकीचा आहे असे नाही. आणि एक राजनसाहेब गेले म्हणून आभाळ कोसळणार आहे असेही नाही. तसेच सेंट्रल बँकेचे गव्हर्नर आणि सरकार यांच्यातील नाते नेहमी नाजूक असते. रॉनाल्ड रेगन आणि पॉल व्होल्कर यांचे जमले नाही. यशवंत सिन्हा अर्थमंत्री असताना (चंद्रशेखर सरकारमध्ये) त्यांनी आर.एन.मल्होत्रांना स्पष्टपणे जायला सांगितले नाही पण तसे संकेत दिले. अशी इतरही उदाहरणे आहेत. तेव्हा मला वाटते दोघेही आपापल्या बाजूने योग्यच आहेत. पण दोघांचेही उद्दिष्ट वेगळे असल्यामुळे संघर्ष अटळ होता.

मात्र राजन यांच्या जाण्यामागचं खरं कारण वेगळंच आहे. चिडुच्या कार्ट्याचे ( = चिदंबरम यांचे सुपुत्र श्री कार्टी ) सिंगापुरातले काही व्यवहार संशयास्पद वाटल्याने सक्तवसुली संचालनालयाने रिझर्व्ह बँकेकडे माहिती मागितली होती. ती राजन यांनी दिली नाही. स्वामींनी जानेवारी २०१५ मध्ये राजनना पत्र लिहून ही माहिती का अडवून धरली आहे म्हणून पृच्छा केली.

हो हे मी पण वाचले आहे. राजनसाहेबांनी खरोखरच असे केले असेल तर मात्र त्यांना मुदतवाढ दिली नाही हे योग्यच केले असे मी म्हणेन. पण सुब्रमण्यम स्वामींचा पूर्वेतिहास लक्षात घेता त्यांनी केलेल्या आरोपांवर किती विश्वास ठेवायचा हा प्रश्नच आहे.

रच्याकने, मी क्लिंटन उर्फ गॅरी ट्रुमन आहे. अर्थशास्त्रावरील चर्चांसाठी हा मिल्टन हा नवा आय.डी घेतला आहे. या आय.डी वरून केवळ अर्थशास्त्राशी संबंधित चर्चांमध्ये सहभाग घेणार आहे आणि इतर चर्चांमध्ये गॅरी ट्रुमन या आय.डी वरून प्रतिसाद देणार आहे.

राघवेंद्र's picture

21 Jun 2016 - 9:34 pm | राघवेंद्र

रच्याकने, मी क्लिंटन उर्फ गॅरी ट्रुमन आहे. अर्थशास्त्रावरील चर्चांसाठी हा मिल्टन हा नवा आय.डी घेतला आहे. या आय.डी वरून केवळ अर्थशास्त्राशी संबंधित चर्चांमध्ये सहभाग घेणार आहे आणि इतर चर्चांमध्ये गॅरी ट्रुमन या आय.डी वरून प्रतिसाद देणार आहे.

या साठी स्पष्टीकरणासाठी धन्यवाद !!!

बोका-ए-आझम's picture

22 Jun 2016 - 2:04 pm | बोका-ए-आझम

असं म्हणणं होतं/आहे की राजननी व्याजदर न वाढवल्यामुळे ज्या प्रकारे अर्थव्यवस्थेत तेजी यायला हवी होती तशी आली नाही. राजनना महागाई नियंत्रित करायची होती. इथे Philips Curve चा संदर्भ येतो. पण Philips Curve हा long run मध्ये टिकत नाही. म्हणजेच long run मध्ये बेकारी आणि महागाई यांच्यातलं short run मधलं व्यस्त नातं तसं राहात नाही. बेकारी वाढून किंमतीही वाढायचा धोका असतो. जो आपल्यासारख्या भरपूर लोकसंख्येच्या देशात खूपच जास्त आहे - कारण Population = demand.
त्यामुळे राजन यांचे निर्णय हे short आणि long या दोन्हीही काळांसाठी योग्य होते. मान्य आहे, ते जरा जास्तच सावधपणे पुढे जात होते पण त्यावरून त्यांच्यावर आगपाखड करण्याची स्वामींना गरज नव्हती. त्यांच्या टीकेत एक मुद्दा job creation चा आहे. पण जर महागाईकडे दुर्लक्ष करुन फक्त बेकारी कमी करण्याकडे लक्ष दिलं तर उत्पादनखर्च वाढून परत बेकारी येऊ शकते (अमेरिकेत १९७३ मध्ये ओपेक धक्क्यामुळे झालं तसं) त्यामुळे राजन यांनी RBI मध्ये त्यांना असलेल्या अधिकारांचा वापर करत महागाई आणि बेकारी यापैकी एका गोष्टीवर लक्ष केंद्रित केलं. ही काही चूक म्हणता येणार नाही.

मिल्टन's picture

22 Jun 2016 - 3:02 pm | मिल्टन

इथे Philips Curve चा संदर्भ येतो. पण Philips Curve हा long run मध्ये टिकत नाही. म्हणजेच long run मध्ये बेकारी आणि महागाई यांच्यातलं short run मधलं व्यस्त नातं तसं राहात नाही.

अर्थशास्त्रातील हा अत्यंत रोचक भाग आहे. मिल्टन फ्रिडमन आणि एडमंड फेल्प्स यांनी स्वतंत्रपणे फिलिप्स कर्व्ह ही थोड्या कालावधीसाठी लागू होत असली तरी लॉन्ग रनमध्ये ती टिकत नाही हे दाखवून दिले. थोडी जास्त महागाई असेल तरी जास्त लोकांना नोकर्‍या मिळणार असतील तर राजकीय दृष्ट्या ते सरकारला अधिक फायदेशीर असते. त्यासाठी शॉर्ट रनमध्ये व्याजाचे दर कमी करून महागाई वाढली तरी फिलिप्स कर्व्हप्रमाणे अधिक नोकर्‍या उपलब्ध होऊ शकतात.पण लॉन्ग रनमध्ये मात्र हे नाते कोलमडते. लॉन्ग रनमध्ये बेकारी पूर्वीच्याच पातळीला येते आणि महागाई पूर्वीपेक्षा जास्त वाढते. दिर्घकालीन हिताच्या दृष्टीने रिझर्व्ह बँकेला हे करणे धोकादायक वाटणे स्वाभाविक आहे पण सरकारचे हितसंबंध थोड्या कालावधीसाठी अधिक नोकर्‍या निर्माण करून देण्यात गुंतलेले असतात.

त्यामुळे राजन यांनी RBI मध्ये त्यांना असलेल्या अधिकारांचा वापर करत महागाई आणि बेकारी यापैकी एका गोष्टीवर लक्ष केंद्रित केलं. ही काही चूक म्हणता येणार नाही.

सहमत आहे.

नंदन's picture

22 Jun 2016 - 3:11 pm | नंदन

रच्याकने, मी क्लिंटन उर्फ गॅरी ट्रुमन आहे. अर्थशास्त्रावरील चर्चांसाठी हा मिल्टन हा नवा आय.डी घेतला आहे.

श्री. राजन यांच्या निर्णयानंतर जी 'पॅराडाईझ लॉस्ट' सारखी टोकाची, knee-jerk प्रतिक्रिया उमटते आहे, त्या संदर्भातही हा आय.डी. चपखल! ;)

अनुप ढेरे's picture

22 Jun 2016 - 3:49 pm | अनुप ढेरे

हा व्हिडो धमाल आहे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

23 Jun 2016 - 3:28 am | डॉ सुहास म्हात्रे

ही मालिका माझी ऑल टाईम फेवरीट आहे.

विनोदी अंगाने राजकारणावर सतत टीका करत असतानाच, मालिकेची वस्तूस्थितीशी असलेली नाळ कोणी नाकारू शकत नाही. मुख्य म्हणजे वाचाळपणा, अंगविक्षेप आणि अनावश्यक अतिरेक टाळून हे सर्व केलेले आहे.

कैलासवासी सोन्याबापु's picture

23 Jun 2016 - 10:04 am | कैलासवासी सोन्याबापु

ब्रिटिश लोकं 'इंटेलिगेंट ह्युमरचे भोक्ते' असतात हे यथार्थ ठरवणाऱ्या काही गोष्टी असतात/आहेत पी जी वोडहाऊसचं लेखन किंवा येस मिनिस्टर अन जेरेमी ब्रेटनं रंगवलेला शेरलॉक हे त्यातलेच काही नमुने!

अस्वस्थामा's picture

23 Jun 2016 - 6:21 pm | अस्वस्थामा

अवांतर होतंय पण माँटी पायथन आणी "येस, मिनिस्टर" क्लासिक्स आहेत.. :)

रमेश आठवले's picture

23 Jun 2016 - 8:35 pm | रमेश आठवले

जेरॉम के जेरॉम यांचे थ्री मेन इन या बोट हे पुस्तक म्हणजे हसून हसून पुरेवाट.

गामा पैलवान's picture

22 Jun 2016 - 2:16 am | गामा पैलवान

मिल्मि,

>> त्यामुळे एस.एल.आर कमी केल्यामुळे अधिक पैसा खेळायला लागला आणि म्हणून महागाई वाढली आणि
>> ती कमी करायला व्याजाचे दर वाढवले हे संभवनीय नाही.

गुड क्याच. द्राव्यत्व वाढण्यापूर्वीच व्याजदर वाढवले असतील तर परिस्थिती अधिकच गंभीर होते, नाहीका? व्याजदर वाढवण्यामागे नक्की काय तर्क होता ते कळू शकेल काय? की द्राव्यत्व वाढवल्यावर अडचणी नकोत म्हणून अगोदरपासनंच व्याजदर वाढवून ठेवले साहेबांनी?

असो.

स्वामींचा आरोप खरा असण्याची शक्यता आहे. त्यांनी चक्क भाजपच्या अधिकृत कागदावर राजनना (पोहोच : मोदी) पत्र पाठवलंय.

https://www.pgurus.com/wp-content/uploads/2016/05/Subramanian-Swamy%20s-letter-to-RBI-Governor-Raghuram-Rajan-on-hushing-up-ED-case-on-Karti-page-001.jpg
https://www.pgurus.com/wp-content/uploads/2016/05/Subramanian-Swamy%20s-letter-to-RBI-Governor-Raghuram-Rajan-on-hushing-up-ED-case-on-Karti-page-002.jpg

आ.न.,
-गा.पै.

डॉ सुहास म्हात्रे's picture

22 Jun 2016 - 6:22 am | डॉ सुहास म्हात्रे

चिदंबरम पितापुत्रांच्या संबंधात रघुराम राजन यांच्यावर स्वामींनी केलेले आरोप खरे असल्यास हे प्रकरण खूपच धक्कादायक आहे ! अर्थात, आपला इतिहास पाहता, "राजवटीच्या/राजवटीतील शक्तीशाली माणसांचे हितसंबंध जपण्यासाठी प्रशासकाने बेकायदेशीर/अनैतिक कृती करणे" याचे हे काही पहिले उदाहरण नाही. मात्र, राजन यांची "सार्वजनिक" प्रतिमा पाहता त्यांच्याकडून ते अपेक्षित नव्हते, इतकेच.

तसे खरोखरच घडल्याचे सबळ पुरावे असल्यास, "राजन यांनी पदासाठी परत अर्ज न करणे" या पलिकडे काही न होणे ही फारच सौम्य कारवाई झाली... याला "ऑप्शन ऑफ ऑनरेबल एक्झिट अ‍ॅन्ड नो फर्दर अ‍ॅक्शन" असे म्हणता येईल.

असे असले तर याचे कारण, "हे लफडे (स्कँडल) बाहेर येण्याने भारतिय वित्तव्यवस्थेवर व राजकिय वातावरणावर होणारे दुष्परिणाम टाळणे", हेच असावे. एकंदरीत (अ) ब्रेक्झिट आणि (आ) सद्य नाजूक भारतिय व जागतीक राजकिय व अर्थ व्यवस्था या वस्तुस्थितींनी राजन यांना आपली अब्रू सांभाळण्यात बरीच मदत केली आहे, असे म्हणता येईल. :) :(

मिल्टन's picture

22 Jun 2016 - 10:50 am | मिल्टन

चिदंबरम पितापुत्रांच्या संबंधात रघुराम राजन यांच्यावर स्वामींनी केलेले आरोप खरे असल्यास हे प्रकरण खूपच धक्कादायक आहे ! अर्थात, आपला इतिहास पाहता, "राजवटीच्या/राजवटीतील शक्तीशाली माणसांचे हितसंबंध जपण्यासाठी प्रशासकाने बेकायदेशीर/अनैतिक कृती करणे" याचे हे काही पहिले उदाहरण नाही. मात्र, राजन यांची "सार्वजनिक" प्रतिमा पाहता त्यांच्याकडून ते अपेक्षित नव्हते, इतकेच.

सहमत आहे.

तसे खरोखरच घडल्याचे सबळ पुरावे असल्यास, "राजन यांनी पदासाठी परत अर्ज न करणे" या पलिकडे काही न होणे ही फारच सौम्य कारवाई झाली... याला "ऑप्शन ऑफ ऑनरेबल एक्झिट अ‍ॅन्ड नो फर्दर अ‍ॅक्शन" असे म्हणता येईल.

सहमत आहे. खरोखरच सबळ पुरावे असतील तर एअरसेल-मॅक्सिस प्रकरणी राजन यांनाही आरोपी करायला हवे होते.

अप्पा जोगळेकर's picture

22 Jun 2016 - 10:22 am | अप्पा जोगळेकर

अधिकॄत कागदावर लिहिले म्हणून आरोप खरा कसा ठरतो ? स्वामी यांनी पुरावे दिले का ? कीपींग द पीम इन्फर्म्द असे म्हटले म्हणून आरोप खरा मानायचा का ? बाकी राजन इन्डिस्पेन्सिबल नाहीत तसे मोदीही नाहीत आणि स्वामीसुद्धा.

मिल्टन's picture

22 Jun 2016 - 10:46 am | मिल्टन

द्राव्यत्व वाढण्यापूर्वीच व्याजदर वाढवले असतील तर परिस्थिती अधिकच गंभीर होते, नाहीका? व्याजदर वाढवण्यामागे नक्की काय तर्क होता ते कळू शकेल काय? की द्राव्यत्व वाढवल्यावर अडचणी नकोत म्हणून अगोदरपासनंच व्याजदर वाढवून ठेवले साहेबांनी?

"द्राव्यत्व वाढवल्यावर अडचणी नकोत" यात एक गोष्ट गृहित धरली जात आहे आणि ती म्हणजे राजनसाहेबांना एस.एल.आर कमीच करायचा होता.ते कशावरून?

बाकी व्याजाचे दर त्यांनी जानेवारी २०१४ पर्यंत का वाढवले? २००८ मध्ये आर्थिक संकट आल्यानंतर व्याजदर कमी केले गेले होते. मार्च २०१० पासून सप्टेंबर २०१३ पर्यंत महागाई वाढल्यामुळे राजन यांच्या आधीचे गव्हर्नर सुब्बाराव यांनी १०-१२ वेळा व्याजाचे दर वाढवले होते. किंबहुना त्या कारणामुळे सुब्बारावही युपीए सरकारला तितकेसे आवडत नव्हते. राजन गव्हर्नर झाल्यावरही महागाईचा दर जास्तच होता म्हणून त्यांनीही व्याजाचे दर वाढवले.

अरूण जेटलींनी पहिले बजेट सादर केले १० जुलै २०१४ रोजी. त्यात फिस्कल डेफिसिट जीडीपीच्या ४.१% ठेवायचे त्यांनी उद्दिष्ट ठेवले होते. कदाचित हे उद्दिष्ट जेटली पूर्ण करू शकतील हा विश्वास राजनसाहेबांना वाटला असावा (याचे कारण भाजप सरकारने १९९८ ते २००४ या काळात या आघाडीवर चांगली कामगिरी केली होती त्यामुळे यावेळीही ते यशस्वीपणे हे उद्दिष्ट प्राप्त करू शकतील असे वाटणे हे असेल किंवा २०१४-१५ या वर्षात पहिल्या तीन महिन्यात स्थिती नियंत्रणात होती म्हणून पूर्ण वर्षात ती नियंत्रणात ठेवणे फार कठिण जाणार नाही असे त्यांना वाटले असेल ही पण शक्यता आहे. आपल्याला खरेखोटे काहीच माहित नाही. आपण नुसते तर्क लढवायचे). त्यामुळे एस.एल.आर कमी करायला जागा आहे असे वाटून राजनसाहेबांनी एस.एल.आर कमी केला असावा असे मला वाटते.

स्वामींचा आरोप खरा असण्याची शक्यता आहे. त्यांनी चक्क भाजपच्या अधिकृत कागदावर राजनना (पोहोच : मोदी) पत्र पाठवलंय.

हा आरोप खरा आहे की नाही याची चौकशी नक्कीच व्हायला हवी. कारण हा आरोप भ्रष्टाचाराला पाठिशी घालण्यासंबंधी आहे आणि गंभीरही आहे. गरज पडल्यास त्यांना भारत सोडायला बंदीही घालावी. पण स्वामी म्हणतात म्हणून तो खराच असेल असे म्हणण्याइतकी स्वामींची विश्वासार्हता नक्कीच नाही.

गंम्बा's picture

22 Jun 2016 - 5:52 pm | गंम्बा

म्हणून तो खराच असेल असे म्हणण्याइतकी स्वामींची विश्वासार्हता नक्कीच नाही.

ह्याचे कारण कळले नाही.

माझ्या आठवणीत स्वामींनी केलेल्या आरोपा साठी त्यांना कधीही माफी मागावी लागली नाही आणि त्यांना ते मागे पण घ्यावे लागले नाहीत.
उलट २ जी मधे त्यांनी देशाला प्रचंड फायदा करुन दिला. नंतर जयललिता ला सुद्धा थोडे दिवस का होइना दणका दिला.

मिल्टन's picture

23 Jun 2016 - 1:44 pm | मिल्टन

माझ्या आठवणीत स्वामींनी केलेल्या आरोपा साठी त्यांना कधीही माफी मागावी लागली नाही आणि त्यांना ते मागे पण घ्यावे लागले नाहीत.

काहीकाही आरोप तर अगदीच हास्यास्पद होते. कदाचित ते आरोप ज्यांच्यावर केले होते त्यांनी 'मुर्खाकडे कुठे लक्ष द्या' असे म्हणून सोडून दिले असायची शक्यता आहे म्हणून त्यांना कधी माफी मागावी लागली नाही.

कैलासवासी सोन्याबापु's picture

25 Jun 2016 - 6:37 am | कैलासवासी सोन्याबापु

बाकी मला राजन बरे का वाईट किंवा आता ते निघून गेले आहेत त्यामुळे ते किती जास्त वाईट ह्यावर काहीच बोलायचे नाहीये कारण मी तितकासा माहितगार नाही अर्थशास्त्रातील, तरीही हे पत्र म्हणजे एक विलक्षण जोक वाटतो आहे, हजर असलेले सगळे लोकं पत्र ओरिजिनल आहे पण स्वामींवर भरोसा नाही असा सूर लावुन बसलेत (अप्पा सोडून), बसोत! ज्याची त्याची इच्छा, पण मुळात मला ते पत्रच खरे का मानावे हा प्रश्न पडतोय,फक्त भाजपचा लोगो आहे म्हणून ते पत्र खरे मानावे?? का त्यावर कोणीतरी एक 'पीएमओ डाक अनुभाग' नामे ठसा उमटवला आहे म्हणून ते खरे मानावे??? इथून तिथून एका राजकीय पक्षाचा लोगो मग तो काँग्रेसचा असो वा भाजपचा, त्याला खरे मानायला कारण अन गरज काय? फक्त राजन कसा हलकट होता हे दाखवायची धडपड म्हणून? 2015 चे पत्र आहे (खरे असलेच तर!) मग आजवर ते कधी बाहेर आले नाही ते? का 2015 मध्ये सोशल मीडिया नव्हता भारतात? ते नेमके आत्ताच बाहेर येणे म्हणजे चाणक्यनीतीचा कळस मानावा काय? बरं पत्र लिहिणारा कॅबिनेट मंत्री, पत्र लिहितोय दणदणीत जनादेश घेऊन आलेल्या प्रधानमंत्री महोदयांना , ते पत्र सुद्धा एका राष्ट्रहितात असलेल्या तपासकार्यासंबंधी , राजकीय दृष्ट्या तपास सुद्धा कट्टर विरोधकांच्या म्होरक्या अन त्याच्या दिवट्या विरुद्ध, अश्यावेळी साक्षात केंद्रीय बँक गव्हर्नर फॅक्ट दाबतोय हे प्रधानमंत्री महोदयांना कळवायला पार्टी लेटरहेडची गरज का पडावी?? खासदार उर्फ एमपी लेटर हेड कुठं गेलं अन का? ह्या प्रश्नांची उत्तरे मिळाल्यास बरे पडेल कोणाकडूनही

सहज टवाळ विचार :- उद्या भाजप लेटर हेडवर अगदी सुंदर लोगो वगैरे लावून जावक क्रमांक लावून मी गामाजी मतिमंद आहेत असे लिहून घेतले ओपी नड्डाची सही चिकटवून तर फक्त भाजपचा लोगो आहे अन आरोग्यमंत्री महोदयांनी सही दिली आहे ह्या (शहानिशा न करता काढलेल्या) निष्कर्षाला बरोबर अन अचूक मानतील काय आमचे आ.न. गापै???

ता.क.- जरी हे पत्र खरे असले तरी कोणीतरी ती वैधता सिद्ध करावी, माझा स्वामीशी उभा दावाही नाही अन राजनकडून मला काही मिळालेलेही नाही, फक्त भाजप लेटर हेड आहे म्हणून मी पत्र खरे आहे हे मानणार नाही, हे एक, दुसरे म्हणजे, जर पत्र खरे सिद्ध झाले तर थेट पीएमओ मधले आत येऊन आवक झालेले पत्र सोशल मीडिया मध्ये बाहेर आलेच कसे? चाल तपासा संबंधित कागद बाहेर आणले जाऊ शकतात का आरटीआय मधून? असल्यास सादर कागद मागवणारी आरटीआय कुठली तिचा आवक क्रमांक किती होता कधी आवेदन केले होते, कोणी केले होते, हे जर समजले तर पत्राची सत्यसत्यातता कळायला बरे पडेल कसे??

कैलासवासी सोन्याबापु's picture

25 Jun 2016 - 6:41 am | कैलासवासी सोन्याबापु

......निष्कर्षातुन तो खरा असल्याची 'शक्यता' कितपत मानतील आमचे आ.न. गापै???

गामा पैलवान's picture

25 Jun 2016 - 12:26 pm | गामा पैलवान

सोन्याबापू,

स्वामी माणूस कसाही असो, आपण हे पत्र खोटं आहे असं धरून चालूया. एअरसेल घोटाळा तर खराच आहे ना? चिदुच्या कारट्याचा खातेविदा सक्तवसुलीवाल्यांकडे देण्याविषयी श्री. राजन यांची भूमिका काय होती ते आपली माध्यमे शोधून काढू शकत नाहीत का? पत्राचा खरेखोटेपणा हा मुद्दा नाहीये. स्वामींचा खोटारडेपणा सिद्ध करायची संधी प्रसारमाध्यमे का दवडत आहेत? राजन यांची वर्तणूक काय आहे यावर माध्यमांचं भाष्य का नाही?

आ.न.,
-गा.पै.

गामा पैलवान's picture

22 Jun 2016 - 12:45 pm | गामा पैलवान

मिल्टन,

१.
>> आपण नुसते तर्क लढवायचे

नेमकी इथेच जाणकारांची उणीव भासते. सोप्या शब्दांत आर्थिक घडामोडी समजावून देणारं कोणी आहे का?

२.
>> पण स्वामी म्हणतात म्हणून तो खराच असेल असे म्हणण्याइतकी स्वामींची विश्वासार्हता नक्कीच नाही.

मुख्य माध्यमे केवळ राजन यांचे गुणगान करण्यात व्यग्र आहेत. माध्यमे स्वामींना खोपच्यात घेऊन उघडं का पाडंत नाहीत? स्वामी हा माणूस कसाही असला, तरी हे आरोप अतिशय गंभीर आहेत. दुसरं म्हणजे राजन यांनी दोनतीन महिने माहिती दिली नव्हती. मात्र स्वामींच्या चेतावणीनंतर लगेच आठवड्याभरात सुपूर्त केली. ही तथ्ये प्रकाशात आणण्यास माध्यमांना कसली अडचण वाटते?

या आरोपांची प्रत्यक्षात चौकशी देखील चालूच आहे. मध्यंतरीच्या काळात माध्यमांच्या मौनामुळे हे आरोप खरे का मानू नयेत, असा प्रश्न पडतो.

आ.न.,
-गा.पै.

मिल्टन's picture

22 Jun 2016 - 2:46 pm | मिल्टन

नेमकी इथेच जाणकारांची उणीव भासते. सोप्या शब्दांत आर्थिक घडामोडी समजावून देणारं कोणी आहे का?

राजन यांचे उत्तराधिकारी म्हणून जी काही नावे चर्चेत आहेत त्यात विजय केळकर यांचेही नाव आहे असे वाटते. ते रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर झाले तर त्यांना आपण मिपावर आणू शकलो तर बर्‍याच गोष्टींचा उलगडा होईल :)

जोक्स अपार्ट, धोरण बनविताना मागे नक्की कोणत्या घडामोडी होत होत्या हे आपल्यासारख्या सामान्यांना कळणे शक्य नाही. म्हणूनच आपण या बाबतीत तर्क लढवायचे सोडून फार काही करू शकत नाही.

या आरोपांची प्रत्यक्षात चौकशी देखील चालूच आहे. मध्यंतरीच्या काळात माध्यमांच्या मौनामुळे हे आरोप खरे का मानू नयेत, असा प्रश्न पडतो.

याविषयी मी काहीच सांगू शकत नाही.

llपुण्याचे पेशवेll's picture

22 Jun 2016 - 1:20 pm | llपुण्याचे पेशवेll

राजन साहेब सध्या कुठल्या टाईम बॉम्ब बद्दल बोलत आहेत जो म्हणे राजन यानी लावला आहे आणि डिसेंबर मधे फुटणार आहे.

बोका-ए-आझम's picture

22 Jun 2016 - 2:20 pm | बोका-ए-आझम

How many of you remember when Swamy told everyone that Raghuram Rajan had set a time bomb which will explode in Dec 2016.

Many ignorants laughed at him.
Let us know his secret deeds naked. No Media will expose him. Raghuram Rajan knows it. See below

In 2008 USA was in economical disaster and its main banking system collapsed. At that time Raghuram Rajan was sent to India and at the same time Western Media made this guy a champion and claimed that He predicted 2008 disaster which was bullshit.

Till 2013 Raghuram Rajan was well settled and this guy gets post of RBI Governor. Just after he become Governor, he devalued Indian currency and Rupee started falling.

Then citing reasons of Rupee fall he purchased 28 billion USD bonds which helped USA to recover feom disaster.

Most surprising fact, He while purchasing 28 billion USD bonds put maturity date as Dec 2016 which is post retirement.

Now Indian Banks have to pay this 28 billion USD to USA.

Do you know What the amount is ? 1.33 lakh crore and this has to returned till December.

Hope you understand the reason of MODI's visit to USA.

Our Foreign Currency Reserve is at present 363 billion USD which will help us to recover.

But Certainly it is a burden. 28 billion USD is not a small amount.

Hopefully you will understand. Fact is fact.

And that why he does not want to continue.

And thats why congress is supporting him.

Dr. Subramaniam Swamy attacks ONLY after doing thorough RESEARCH & HOME WORK.

यात एक मोठा problem आहे. जर भारताने अमेरिकन bonds विकत घेतले तर भारताला अमेरिकेने पैसे द्यायला हवेत. भारताने अमेरिकेला का पैसे परत करायचे? ज्याने हा forward लिहिलाय त्याला bonds म्हणजे काय ते माहित नसावं असा माझा अंदाज आहे.

मिल्टन's picture

22 Jun 2016 - 2:42 pm | मिल्टन

दोन दिवसांपूर्वी एका फेसबुक ग्रुपवर आणि काल आमच्या शाळेतल्यांच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर या फॉरवर्डची ऐशी की तैशी केली आहे. पण तिथे इंग्लिशमधून लिहिले आहे. ते मराठीत भाषांतरीत करून इथे लिहितोच.

डॉ सुहास म्हात्रे's picture

22 Jun 2016 - 10:48 pm | डॉ सुहास म्हात्रे

वरच्या इंग्लिश मजकूराच्या लेखकाला तो काय लिहीत आहे हे माहीत नाही (किंवा तो सर्वसामान्य व्हॉट्सॅप वाचक "येडे" आहेत असे समजतो आहे... जे, अर्थातच, पूर्णपणे चूक आहे असेही नाही ;) )

तेव्हा, देवा त्याला माफ कर ! :)

व्हॉट्सअ‍ॅपवरील बहुसंख्य फॉरवर्डप्रमाणेच हे फॉरवर्डही अर्थहिन दिसत आहे.

१. भारतीय रूपया १९९३ पासूनच 'फ्लोटिंग' आहे. म्हणजेच रूपयाची पातळी मागणी आणि पुरवठ्याप्रमाणे ठरवली जाते. मनमोहनसिंगांनी १९९१ मध्ये दोन वेळा रूपयाचे अवमूल्यन केले होते तसे आता करणे शक्य नाही. आणि जरी असे अवमूल्यन करणे शक्य असते तरी तो अवमूल्यन करायचा अधिकार केंद्र सरकारचा असता. रिझर्व्ह बँकेने त्याची अंमलबजावणी केली असती तरी तो निर्णय घ्यायचा अधिकार केंद्र सरकारचाच असता. रिझर्व्ह बँकेचा नाही.

२. रघुराम राजन यांनी २००८ च्या संकटाचा इशारा आधीच दिला होता याला चुकीचे का म्हटले आहे हे समजण्याच्या पलीकडचे आहे. दरवर्षी आय.एम.एफ सारख्या संस्थांमधील अर्थतज्ञ आणि विविध विद्यापीठांमधील अर्थशास्त्राचे प्राध्यापक वायोमिंग राज्यात जॅकसन होल या ठिकाणी अर्थविषयक घडामोडींवर चर्चा करायला एकत्र भेटतात. नोव्हेंबर २००५ मधील जॅकसन होल परिषद फेडचे प्रमुख अ‍ॅलन ग्रीनस्पॅन यांची शेवटची परिषद होती. त्यावेळी इतर सर्वांनीच ग्रीनस्पॅन यांची धोरणे जगाला वैभवाच्या शिखरावर कशी घेऊन जाणार आहेत अशा स्वरूपाचे वक्तव्य केले होते. पण त्यावेळी रघुराम राजन यांनी "Has Financial Development Made the World Riskier" हा पेपर सादर करून एका अर्थी ग्रीनस्पॅन यांना त्यांच्या तोंडावरच तुमची धोरणे मोठ्या संकटाला आमंत्रण देण्यास कारणीभूत ठरणार आहेत असे सांगितले होते. त्यावेळी त्यांना प्रचंड टिकेलाही सामोरे जावे लागले होते. पण त्यानंतर तीन वर्षातच ते नक्की काय म्हणत होते हे जगाला समजले.

३. या फॉरवर्डमध्ये दिलेली माहिती दिशाभूल करणारी तर आहेच पण त्याबरोबर चुकीचीही आहे. पोस्ट म्हणत आहे की २०१३ मध्ये राजन यांनी अमेरिकन सरकारचे २५ बिलिअन डॉलर्सचे बाँड खरेदी करायचा निर्णय घेतला आणि त्यामुळे अमेरिकन अर्थव्यवस्थेला पाठबळ मिळाले!! यापेक्षा मोठा विनोद असू शकत नाही. अमेरिकन अर्थव्यवस्थेचा विचार करता २५ बिलिअन डॉलर हे त्यांच्या जीडीपीच्या ०.१% पेक्षा थोडे जास्त आहे. या रकमेचे बाँड घेतले म्हणून अमेरिकन अर्थव्यवस्थेला पाठबळ मिळाले असे म्हणण्यासारखी परिस्थिती आहे का? तसेच २०१३ मध्ये अमेरिकन अर्थव्यवस्था २००८ च्या खाईतून बरीच सावरली होती. त्यामुळे २०१३ मध्ये भारताकडून २५ बिलिअन डॉलर अशी तुटपुंजी मदत लागेल अशी परिस्थिती नक्कीच नव्हती. चीनकडे अमेरिकन सरकारचे १.२ ट्रिलिअन डॉलरचे बाँड आहेत. ही रक्कम राजन यांनी तथाकथित गुंतवलेल्या रकमेच्या ४१ पटींनी जास्त आहे.

४. समजा असे गृहित धरले की राजन यांनी २०१३ मध्ये २५ बिलिअन डॉलर अमेरिकन सरकारच्या बाँडमध्ये गुंतवायचा निर्णय घेतला आणि हे बाँड २०१६ मध्ये मॅच्युअर होणार असतील तर २०१६ मध्ये या भारतात डॉलरची आवक होईल आणखी डॉलर भारतातून बाहेर जाणार नाहीत. २०१३ मध्ये २५ बिलिअन डॉलर्स भरून बाँड घ्या आणि २०१६ मध्ये बाँड मॅच्युअर व्हायची वेळ आल्यावर आणखी २५ बिलिअन डॉलर्स भरा हे समजण्यापलीकडचे आहे.

५. स्वामी ज्याला टाईम बॉम्ब म्हणत आहेत तो खरा तर राजन यांचा रूपयाची घसरगुंडी थांबवायचा प्रयत्न होता. ही घसरगुंडी मुळात सुरू का झाली? याचे कारण २०१३ पर्यंत अमेरिकेतली परिस्थिती थोडी सुधारल्यानंतर अमेरिकेतील 'क्वांटिटेटिव्ह इजिंग' कमी होईल अशी शक्यता निर्माण झाली.तसेच परिस्थिती सुधारल्यावर वित्तीय संस्था बाँडमधील गुंतवणुक कमी करून शेअरमध्ये वाढवतात. या दोन कारणांमुळे बाँडच्या किंमती कमी होऊन बाँडवरील परतावा वाढला. त्यातूनच भारतीय बाँड आणि अमेरिकन बाँड यातील परताव्यामधील फरक कमी झाला. अमेरिकेतील वित्तीय संस्थांना भारतासारख्या देशात गुंतवणुक करण्यासाठी अमेरिकेत मिळेल त्यापेक्षा जास्त परतावा भारतात हवा असतो. याला 'रिस्क प्रिमिअम' म्हणतात. याचे कारण त्यांच्या दृष्टीने भारतीय बाँडमधील गुंतवणुक अमेरिकन बाँडमधील गुंतवणुकीपेक्षा अधिक जोखमीची आहे. ज्यावेळी अमेरिकन वित्तीय संस्थांना वाटते की पुरेसा भारतात रिस्क प्रिमिअम मिळत नाही त्यावेळी ते आपली गुंतवणुक भारतातून काढायला सुरवात करतात. २०१३ मध्ये हीच गोष्ट झाली आणि अमेरिकन वित्तीय संस्थांनी भारतातील बाँडमध्ये गुंतवलेले डॉलर काढून घ्यायला सुरवात केली.त्यातून रूपया जोरदार आपटला.

अशावेळी रूपयाची घसरगुंडी थांबवायला काहीतरी करणे भाग होते. जुलै २०१३ मध्ये राजन यांच्या आधीचे रिझर्व्ह बँक गव्हर्नर सुब्बाराव यांनी भारतीय बाँडवरील परतावा कृत्रिमरित्या वाढवायचा प्रयत्न केला (हे या लेखात लिहिलेच आहे) आणि अमेरिकन वित्तीय संस्थांसाठी 'रिस्क प्रिमिअम' वाढवायचा प्रयत्न केला. यातून बाँड मार्केट आपटले आणि रूपयाची घसरगुंडी काही काळासाठी थांबली. पण ते पुरेसे ठरले नाही.

सप्टेंबर २०१३ मध्ये राजन रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर झाल्यावर त्यांनी foreign currency non-resident (bank) (FCNRB) deposits ही एक स्किम सुरू केली. या अंतर्गत डॉलरमधील ठेवींवर लायबॉर + ४% इतके व्याज दिले जाणार होते. हे व्याज अमेरिकेत मिळणार्‍या व्याजापेक्षा बरेच जास्त असल्यामुळे अनेक परदेशस्थ भारतीयांनी तिकडे डॉलरमध्ये कर्ज घेऊन या ठेवींमध्ये गुंतवणुक केली. यातून तब्बल २५ बिलिअन डॉलर विविध बँकांमध्ये उभे केले गेले. या डॉलरचे हेजिंग करायला रिझर्व्ह बँकेने या बँकांना आकर्षक दरात हेजिंग उपलब्ध करून दिले. यामुळे रिझर्व्ह बँकेकडील गंगाजळी ७-८% ने वाढली आणि डॉलर मार्केटमध्ये अधिक हस्तक्षेप करून रिझर्व्ह बँकेने रूपयाची घसरगुंडी थांबवली. अशी अपेक्षा आहे की यापैकी बहुसंख्य डीपॉझिट रिन्यू केली जाणार नाहीत आणि सप्टेंबर ते डिसेंबर २०१६ या काळात किमान २० बिलिअन डॉलर परत करावे लागतील.

६. माझा प्रश्न हा की त्यावेळी राजन यांनी रूपयाची घसरगुंडी थांबवायला नक्की काय करायला हवे होते? १९९१ मध्ये बॅलन्स ऑफ पेमेंटचे संकट उभे राहिल्यानंतर चंद्रशेखर सरकारने बँक ऑफ इंग्लंडकडे सोने गहाण ठेऊन २ बिलिअन डॉलर उभे केलेच होते ना? ती रक्कमही कधीना कधी परत करावीच लागली होती. आणि त्यावेळी हेच सुब्रमण्यम स्वामी त्याच चंद्रशेखर सरकारमध्ये मंत्रीही होते. संकटसमयी अशी पावले उचलावीच लागतात. मग त्यावेळीही 'चंद्रशेखर सरकारने टाईमबॉम्ब भारतीय अर्थव्यवस्थेत पेरला आहे' असे म्हणता आले असते. हा फॉरवर्ड मुळात लिहिणार्‍या व्यक्तीने रघुराम राजन यांनी सप्टेंबर २०१३ मध्ये रूपयाची घसरगुंडी थांबवायला नक्की काय करायला हवे होते याविषयी आपली इनसाईट सगळ्यांना सांगून सगळ्यांच्याच ज्ञानात भर पाडली तर बरे होईल.

अर्धवटराव's picture

23 Jun 2016 - 11:46 am | अर्धवटराव

राजन साहेबांना मोदि-जेटली जोडीने का जाऊ दिले??
मोदि इतर कुठल्याहि भाजपेयी नेत्यापेक्षा जास्त रॅशनल वाटतात. मोदिंना अर्थशास्त्रातलं अत्युच्य ज्ञान नसेलही, पण योग्य व्यक्तींकडुन नेमका ताळेबंद समजुन घेण्याचा प्रयत्न त्यांनी नक्कीच केला असणार. शक्य तितक्या ठिकाणी योग्य व्यक्ती भरतीची त्यांचे प्रयत्न आपण बघतोच (प्रभू, पर्रिकर वगैरे).

मग राजन साहेबांच्या बाबतीत माशी शिंकली कुठे?
एक कारण हे असावं, कि केंद्र सरकारच्या कामचे दृष्य परिणाम म्हणावे तसे दिसत नाहि म्हणुन मोदि जास्तच सावध झाले असावे. आणि २०१९ पर्यंत एकुणच रोजगार, महागाई वगैरे मुद्दे थोडे थंड करायला म्हणुन त्यांना एका खमक्या गव्हर्नरऐवजी सरकारी कलाने काम करणारा माणुस हवा असावा...
असो. सगळ्या जर-तर च्या बाता.

महेश हतोळकर's picture

23 Jun 2016 - 12:16 pm | महेश हतोळकर

यातून तब्बल २५ बिलिअन डॉलर विविध बँकांमध्ये उभे केले गेले. या डॉलरचे हेजिंग करायला रिझर्व्ह बँकेने या बँकांना आकर्षक दरात हेजिंग उपलब्ध करून दिले. यामुळे रिझर्व्ह बँकेकडील गंगाजळी ७-८% ने वाढली आणि डॉलर मार्केटमध्ये अधिक हस्तक्षेप करून रिझर्व्ह बँकेने रूपयाची घसरगुंडी थांबवली. अशी अपेक्षा आहे की यापैकी बहुसंख्य डीपॉझिट रिन्यू केली जाणार नाहीत आणि सप्टेंबर ते डिसेंबर २०१६ या काळात किमान २० बिलिअन डॉलर परत करावे लागतील.

हिच फॉरवर्डमधे उल्लेखलेली रक्कम आहे का?

बोका-ए-आझम's picture

23 Jun 2016 - 1:52 pm | बोका-ए-आझम

नाही. Forward मध्ये उल्लेख केलेली रक्कम ही अमेरिकन बाँड्समध्ये गुंतवलेली आहे असं सरळ सांगितलेलं आहे. बाँड्समध्ये भारताने गुंतवलेली रक्कम हे अमेरिकेसाठी कर्ज आहे. त्यामुळे ती अमेरिकेला परत करावी लागेल. भारताला का? तोच तर त्यातला हास्यास्पद मुद्दा आहे.

महेश हतोळकर's picture

23 Jun 2016 - 2:04 pm | महेश हतोळकर

बाँड की आणखी काही हे थोडावेळ बाजूला ठेवू. मला विचारायचयं की भारतानं २५ बिलीयन डॉलर कर्ज घेतलं आणि आता ते परत करायचं आहे. Forward वाला मूर्ख आहे त्याला बाँड आणि कर्ज यातला फरक कळला नाही. ते सोडून देऊ.

डॉ सुहास म्हात्रे's picture

24 Jun 2016 - 2:45 am | डॉ सुहास म्हात्रे

१. ते कर्ज जर बँकांतील फिक्स्ड डिपॉझिट या स्वरूपात असेल तर त्याची मुदत संपल्यावर ते परत करावेच लागते... जसे इतर फिक्स्ड डिपॉझिट बाबतही करावे लागते.

२. कोणत्याही फिक्स्ड डिपॉझिट बाबत ते घेतानाच त्याच्या परतीचे पूर्वनियोजन करणे नेहमीचे आहे... हे न कळण्याइतका मूर्ख एखाद्या सहकारी बँकेतला कारकूनही असणार नाही. अश्या परिस्थितीत परतिची वेळ म्हणजे "बाँब" म्हणणे हास्यास्पद आहे.

३. किंबहुना, काही विषेश अटी/करार करून घेतलेल्या फिक्स्ड डिपॉझिट शिवाय इतर कोणतेही भारतिय फिक्स्ड डिपॉझिट ठराविक पेनल्टी स्विकारून ग्राहक केव्हाही परत मागू शकतो. ही शक्यताही फिक्स्ड डिपॉझिट स्कीम करताना बँकेने जमेस धरणे हा सर्वसामान्य पायंडा आहे.

४. एनआरई रुपी (कन्व्हर्टीबल) आणि फॉरिन करन्सी फिक्स्ड डिपॉझिट्स याच प्रकारात मोडतात व त्यांतही वरील सर्व फायदे/तोटे सरकार अनेक दशके जाणून /सोसून आहे. ८०च्या दशकात एक काळ असा होता की एनआरई डिपॉझिट्सवर सरकार सर्वसामान्य भारतिय रुपयाच्या दरापेक्षा सरसकट २% जास्त व्याजदर देत असे, जे बराच काळ ५-१० वर्षे मुदतीवर १८% पर्यंत होते ! तरीही, ती डिपॉझिट्स मुदतीअगोदर किंवा मुदतीनंतर परत करण्यास सरकारने (बँकांनी) खळखळ तर सोडाच पण दोन-चार दिवसांची दिरंगाई केलेली ऐकीवात नाही.

या पार्श्वभूमीवर, लेखकाची पैसे का परत करायचे आहेत (फिनान्शियल इन्स्ट्रूमेंट) याबद्दल काही गफलत झाली असे गृहित धरूनही, $३५२ बिलियन पेक्षा जास्त परकिय चलन गंगाजळी ताब्यात असलेले भारतिय सरकार $२८ बिलियन डॉलर उभे करण्यास असमर्थ आहे, हे विधान हास्यास्पद आहे म्हणणे हास्यास्पद या शब्दाचा अपमान होईल ! :)

अगदी समजा एखाद्या फिक्स्ड डिपॉझिट स्कीमची मुदत संपत आली आहे आणि सरकारला ते पैसे त्याच्याकडेच रहावे असे वाटत असले, तर इतर कोणती आकर्षक स्कीम काढून किंवा आहेच त्या लोकांनी स्कीमची वाढीव मुदत स्विकारावी अश्या आकर्षक व्याजदर अथवा करविषयक सोई/सवलती/अटी/करार करून ते पैसे सरकार स्वतः जवळ ठेऊ शकते.

भारताची सद्याची अर्थपरिस्थिती पाहता $२८ बिलियन ही कोणत्याही परिस्थितीत "बाँब" म्हणण्याइतकी मोठी रक्कम नाही, हे मात्र नक्की.

महेश हतोळकर's picture

24 Jun 2016 - 8:55 am | महेश हतोळकर

शंका निरसन झाले.

अस्वस्थामा's picture

24 Jun 2016 - 9:01 pm | अस्वस्थामा

शंका निरसन झाले हे चांगलेच पण एक प्रश्न उद्भवतो.
ज्याने प्रश्न (पक्षी :वॉट्सप मेसेज) तयार केला त्याचा हेतू इतका स्वच्छ होता का ?
ज्यांनी हे पुढे पुढे पाठवले वॉट्सपवर (इथे पोचेपर्यंत) त्यांपैकी कोणी तरी उत्तरे शोधायचा प्रयत्न केला का ? खासकरुन जेव्हा प्रत्येकजणाला गुगल हाताशी आहे. मिपावर हा मेसेज येईपर्यंत प्रसिद्ध होतो म्हणजे तितका तो पुढे ढकलला गेलाय. असे विष पसरवत फिरणारे, गैरसमज भरलेले मेसेज लोक्स स्वतः खात्री न करता सिरियसली घेतात, विना-प्रश्न स्वीकारायला तयार असतात, पुढेपण पाठवतात पण त्याला दिलेली उत्तरे मात्र उलट तपासणीशिवाय स्विकारायला तयार नसतात. हे खरंच कॉमेडी आहे.

असंका's picture

24 Jun 2016 - 9:57 pm | असंका

हा हा हा...अगदी खरंय.

जे आधी कळतं तेच खरं असं गृहित धरलं जातं, त्यानं होत असेल.

महेश हतोळकर's picture

24 Jun 2016 - 11:37 pm | महेश हतोळकर

पण त्याला दिलेली उत्तरे मात्र उलट तपासणीशिवाय स्विकारायला तयार नसतात.

इतरांबद्दल मला माहित नाही, पण मी प्रश्न विचारले कारण इथं उत्तर मिळेल याची खात्री आहे. बाकी हाच काय मी कोणताच मेसेज न तपासता पुढे ढकलला नाही.

डॉ सुहास म्हात्रे's picture

25 Jun 2016 - 12:02 am | डॉ सुहास म्हात्रे

"व्हॉट्सअ‍ॅप व इतर सोशल मिडियामधे आले हेच नाही, तर वर्तमानपत्रात छापून आले किंवा टिव्हीवर दाखवले म्हणजे ते सगळे सत्य असतेच असे नाही. त्याबरोबरच इतर विश्वासू स्त्रोत पाहणे व स्वतःची सारासारविवेकबुद्धी कामाला लावणेही जरूर असते.", हे समजण्याइतकी समजूत असली तर दिशाभूल होणार नाही.

"दुर्दैवाने, इतकी तोशीस न घेता, आपल्या (किंवा आपल्या दादा/मामा/नाना/काका साहेबांच्या) हितसंबंधाच्या कलाने असलेली विधाने स्विकारणे आणि ती पुढे ढकलणे" यात सर्वसाधारण लोकांना रस असतो ! :(

सुंदर!!! खरोखर सुरेख माहिती!!

धन्यवाद!!

श्रीगुरुजी's picture

22 Jun 2016 - 3:19 pm | श्रीगुरुजी

Then citing reasons of Rupee fall he purchased 28 billion USD bonds which helped USA to recover feom disaster.

Most surprising fact, He while purchasing 28 billion USD bonds put maturity date as Dec 2016 which is post retirement.

Now Indian Banks have to pay this 28 billion USD to USA.

काहितरी गडबड आहे. जर भारताने २८ अब्ज डॉलर्स किंमतीचे बाँड्स खरेदी केले असतील (ज्यांची मुदत डिसेंबर २०१६ पर्यंत आहे), तर डिसेंबर २०१६ मध्ये ज्यांच्याकडून हे बाँड्स खरेदी केले (म्हणजेच अमेरिकेकडून) त्यांनीच ही मुदत संपल्यावर २८ अब्ज डॉलर्स व त्यावरील जे काय असेल ते व्याज (अमेरिकन बाँड्सचा कूपन रेट अत्यंत कमी असावा असा अंदाज आहे) भारताला रोख परत द्यायला पाहिजे. पण त्याऐवजी भारतीय बँक्स कशासाठी २८ अब्ज डॉलर्स अमेरिकेला देतील?

अनुप ढेरे's picture

22 Jun 2016 - 3:53 pm | अनुप ढेरे

हेच बोल्तो. कैच्याकै फॉर्वर्ड आहे तो. लोक त्यावर विश्वास ठेवतात हे त्याहून मोठं दुर्दैव.

टवाळ कार्टा's picture

22 Jun 2016 - 9:07 pm | टवाळ कार्टा

यापेक्शा कैच्याकै फॉरवर्ड्स येत असतात...

श्रीगुरुजी's picture

22 Jun 2016 - 3:31 pm | श्रीगुरुजी

रघुराम राजन यांना मुदतवाढ ने देण्यामागे किंवा त्यांनी मुदतवाढ न घेण्यामागे काहीही कारणे असली तरी हा मुद्दा केंद्र सरकारने चुकीच्या पद्धतीने हाताळला असे मला वाटते. त्यांचे काम उत्तम होते परंतु ते सरकारला नकोसे झाले होते व स्वामींनी त्यांच्याविरूद्ध गरळ ओकल्यामुळे त्यांना जावे लागले अशी सार्वत्रिक समजूत पसरलेली आहे.

यापूर्वी याच सरकारने एफटीआयआयमधील टग्यांचे आंदोलन, जेएनयू मधील देशद्रोह्यांच्या घोषणा, रोहीत वेमुला इ. प्रकरणे अत्यंत संयमाने व प्रगल्भतेने हाताळली होती. सुरवातीला या प्रकरणात केंद्राचा दोष आहे असे चित्र निर्माण झाले होते. परंतु केंद्र सरकारने आततायीपणा न करता संयम दाखविल्यामुळे हळूहळू ते चित्र बदलत गेले व या प्रकरणांमध्ये विद्यार्थ्यांचीच काळी बाजू बाहेर आली. परंतु राजन प्रकरणात केंद्राची नाचक्की होत आहे.

बोका-ए-आझम's picture

22 Jun 2016 - 5:54 pm | बोका-ए-आझम

जे या प्रकरणात सरकारविरोधी बोलताहेत ते सरकारचे नेहमीच विरोधक राहिलेले आहेत. म्हणजे राजन राहिले असते तरी ते सरकारविरोधातच बोलले असते. आणि जे सरकारच्या बाजूने बोलताहेत ते सरकारच्या किंवा भाजपच्या बाजूनेच बोलतात. त्यामुळे परिस्थिती जशी आहे तशीच आहे. उलट राजन यांच्या निर्णयांच्या ब-या-वाईट परिणामांची चर्चा माध्यमांमध्ये होतच नाहीये. सर्वजण हेच म्हणताहेत की कसं त्यांनी २००५ मध्ये २००८ च्या आर्थिक अरिष्टाबद्दल भाकित केलं होतं. ज्यांना ते हवे आहेत त्यांना ते नक्की का हवे आहेत तेच सांगता येत नाहीये. Business as usual. नाचक्की वगैरे काहीही नाही.

रमेश आठवले's picture

22 Jun 2016 - 8:35 pm | रमेश आठवले

राजन पद सोडणार या बातमीवरून खूप गदारोळ होत आहे. मोदींचे आणि सरकारचे विरोधक या बातमीचे भांडवल करून तीचा उपयोग सरकारवर टीका करण्यासाठी करत आहेत. राजन यांना आणखी तीन वर्षांसाठी पदावर रहाण्याची इछा होती पण सरकारने त्यांना प्रोत्साहन दिले नाही असा सोयीस्कर गैरसमज त्यांनी त्यासाठी करून घेतला आहे. पण राजन यांनी स्वतः ते या पदावर आणखी तीन वर्षे राहण्यासाठी उत्सुक आहेत असे कुठेही दर्शविलेले नाही. त्यांच्या सुविद्य पत्नी त्यांच्या सारख्याच शिकागो विद्यापीठात प्राध्यापक आहेत आणि दोन्ही मुले अमेरिकेतच वाढलेली आणि शिकलेली आहेत. भारतात सरकारशी सम्बन्ध चांगले असले तरीही तुलनेने नोकरीतील कमी पगार ,लाल फीत,मुंबईतले हवामान ,रस्त्यावरील रहदारी या गोष्टी त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना एव्हाना जाणवल्या असतील.
म्हणून सर्वकाळ परदेशी रहात असलेल्या या कुटुंबाने परत जाण्याचा निर्णय घेतला तर त्यावर एवढा खल आणि उहापोह करण्याचे प्रयोजन काय ?

अर्धवटराव's picture

22 Jun 2016 - 10:50 pm | अर्धवटराव

आर. बी. आय. खुर्ची ची पॉवर, आव्हानं, निर्णयांची परिणामकारकता प्रचंड असते. राजन साहेब सहज शेती करायला म्हणुन भारतात आले असते तर त्यांच्या परतिची हि कारणं एक वेळ गृहीत धरता आलि असती.

रमेश आठवले's picture

23 Jun 2016 - 9:15 pm | रमेश आठवले

राजन यांनी आणखी तीन वर्ष पदावर रहाण्याची इछा व्यक्त केली होती पण सरकारने त्याला नकार दिला असे सिद्ध करणारा काही पुरावा असेल तर तो मांडा. कारण हे गृहीत धरूनच सरकार वर टीका चालली होती. तसे शाबीत झाल्यावर पुढील तीन वर्षात राजन कोणते पीक घेणार होते त्यावर आपण चर्चा करू.

पण राजन साहेबांचा कार्यकाळ कंटिन्यु करावा कि नाहि याबद्दल उलटसुलट चर्चा सुरु असताना व राजनसाहेबांवर स्वामी वगैरे मंडळींची टिका होत असताना जेटली साहेबांनी 'हि प्रशासनीक बाब आहे व त्यावर योग्यवेळी निर्णय घेण्यात येईल' असले उत्तर दिले...'राजन साहेबांचा कार्यकाळ वाढवण्याबद्द्ल सकारात्मक चर्चा सुरु आहे' वगैरे स्टेटमेण्ट कधि आले नाहि. जनरली संवेदनशील मुद्द्यांवर अशाच भाषेत हिंट दिली जाते.
असो.

बोका-ए-आझम's picture

23 Jun 2016 - 10:32 pm | बोका-ए-आझम

ही ५ वर्षांची असते. राजन हे त्या पदावर नियुक्त झालेले सर्वात तरुण governor होते. तरीही आता त्यांची भलावण करणाऱ्या पी.चिदंबरम यांनी त्यांना ३ वर्षांच्याच मुदतीवर आणलं. जर त्यांना तेव्हाच ५ वर्षांसाठी आणलं असतं तर सप्टेंबर २०१८ मध्ये म्हणजे २०१९ च्या लोकसभा निवडणुकांच्या ७-८ महिने आधी राजन यांचा कार्यकाल संपला असता. पण चिदंबरम यांनी तसं केलं नाही आणि स्वतः एकेकाळी RBI Governor असलेल्या तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनाही त्यात काही वावगं वाटलं नाही. त्यामुळे राजन यांना नीट न वागवल्याचा जो आरोप सरकारवर होतोय तो करणाऱ्या विरोधकांनी राजन यांना काही रेड कार्पेट ट्रीटमेंट दिली नव्हती हे लक्षात घ्यायला पाहिजे.

बोक-ए-आझम, स्वामीनाथन गुरूमूर्तींच्या लेखाबद्दल धन्यवाद !
आ.न.,
-गा.पै.

मिल्टन's picture

23 Jun 2016 - 10:03 pm | मिल्टन

२३ सप्टेंबर २०१३ रोजी सुरवात झाल्यानंतर शतक गाठायला या धाग्याने ३३ महिने घेतले. मिपावर असा प्रकार त्यामानाने फार बघायला मिळत नाही.

असो. माझ्या माजी आय.डी वरून सुरू केलेल्या धाग्यावर माझ्या दुसर्‍या आय.डी वरून काही प्रतिसाद देऊन अर्थशास्त्रावरील चर्चांसाठीच्या या आय.डी वरून त्यावर शंभरावा प्रतिसाद द्यायचा मानही माझाच.

या चर्चेत इतर काही मुद्दे आले आहेत. त्यांविषयी उद्या लिहितो.

चर्चेत भाग घेतल्याबद्दल सर्वांना धन्यवाद.

शतका बद्दल श्री.क्लिंटन आणी श्री.ट्रुमन यांचा सत्कार मिल्टन कंपनीचा थर्मास देऊन करण्यात येत आहे..

-शुभेच्छुक- जेपी आणी तमाम 3 आयडी वाले मिपाकर ..

श्रीगुरुजी's picture

23 Jun 2016 - 11:20 pm | श्रीगुरुजी

राजन हे स्वतःहूनच मुदतवाढ घेणार नाहीत. आपल्याला मुदतवाढ मिळणार नाही असे त्यांना खात्रीशीर समजले असावे. त्यामाग नक्की काय कारणे होती हे अजूनतरी बाहेर आलेले नाही. त्यामुळे त्याविषयी गॉसिप करण्यात अर्थ नाही. परंतु त्यामुळे केंद्र सरकारवर टीका करण्यासाठी विरोधी पक्षांना व माध्यमांना एक नवीन मुद्दा मिळाला आहे व केंद्र सरकारकडून त्या मुद्द्याचा प्रतिवाद कोणीही करत नाहीय्ये. केंद्र सरकारने असा बचावात्मक पवित्रा का घेतला आहे ते समजत नाही. एकंदरीत या प्रकारात पारदर्शकतेचा पूर्ण अभाव दिसतो. टीका सहन करावी लागली तरी हरकत नाही, परंतु टीकेला कोणतेही उत्तर न देता आम्ही मौन पाळणार असा सरकारचा पवित्रा दिसतो. त्यामुळे टीकेचा भडीमार अजूनच वाढत आहे.

यातील दोन मुद्दे असे आहेत.

१) राजन यांची कामगिरी उत्कृष्ट होती का? व ती तशी असल्यास त्यांच्या जाण्याने तोटा होईल का?

माझ्या दृष्टीने या प्रश्नाचे उत्तर होय असे आहे.

२) राजन यांच्या जाण्यामागे नक्की कोणती कारणे आहेत?

याविषयी सर्वांनीच मौन पाळले आहे. जे काही सुरू आहे ते सर्व गॉसिप आहे व त्यामुळे केंद्र सरकारवर दोष येत आहे. केंद्र सरकारने यावर पारदर्शकता दाखवून खुलासा करणे आवश्यक आहे. अन्यथा प्रतिमाहानी होत राहील.

श्रीगुरुजी's picture

25 Jun 2016 - 2:32 pm | श्रीगुरुजी

दीपक घैसासांच्या शब्दात राजन प्रकरणाची एक वेगळी बाजू

http://maharashtratimes.indiatimes.com/edit/article/rbi-governer-rajan-c...

अनुप ढेरे's picture

25 Jun 2016 - 3:14 pm | अनुप ढेरे

हा लेख बहुधा इंडिअन एक्सप्रेसमधल्या लेखाचा अनुवाद आहे. It takes two या नावाचा. मटावाल्यांनी कुठे म्हटलं पण नाहिये. डांबिस लोक.

गामा पैलवान's picture

25 Jun 2016 - 3:52 pm | गामा पैलवान

अनुप ढेरे,

मूळ स्रोत सांगितल्याबद्दल धन्यवाद. वरवर चाळायला घेतला तर मध्येच सोडून दिला. आधी मटात वाचलाय म्हणून ! इंएमधला लेख इथे आहे : http://indianexpress.com/article/opinion/columns/raghuram-rajan-rbi-rexi...

आ.न.,
-गा.पै.