परंपरा

rakhee's picture
rakhee in काथ्याकूट
20 Sep 2013 - 9:14 pm
गाभा: 

आताच एक खूप सुंदर लेख वाचला लोकसत्ता मध्ये Dr राजीव शारंगपाणी यांचा . "लोढणी टाका " आयुष्य मजेत जाईल.

http://www.loksatta.com/lokrang-news/add-to-liability-190768/

खरच आपण कळत नकळत किती ओझी वाहत असतो नाही !! गणपती, गौरी अनेक गोष्टी फक्त पूर्वापार चालत आल्यात म्हणून करतो . आजच्या जीवनात त्याचा काही एक मेळ बसतो का ?
गणपती बसवणे लोकमान्य गंगाधर टिळकांनी ज्या कारणाने सुरु केला तो हेतू आता उरला आहे का ?
मात्र आता आपण गणपती बसवून फक्त पैशाची नासाडी करतो . प्रदूषण वाढवतो . loud speaker लाऊन धिंगाणा घालतो . काहीही समाज उपयोगी काम त्यात होत नाही . अपवाद सोडून . आजारी रुग्णांना , जेष्ठ नागरिकांना , विद्यार्थ्यांना त्रास मात्र होतो . आता त्यात गोकुळ अष्टमी , नवरात्र पण सार्वजनिक सुरु झाले आहेत . किती प्रदूषण , ध्वनी प्रदूषण ,पैशाचा अपव्यय . वेळेचा , शक्तीचा अपव्यय. मला वाटते कुठे तरी हे थांबायची वेळ आली आहे .
दिवाळीचे फटाके म्हणजे प्रदूषण आणि दुर्घटनांना आमंत्रण . आणि पैशाचा चुराडा . लोक म्हणतात आपली संस्कृती जपली पाहिजे . ते खरंच आहे पण गणपती ला नाचणे दारू पिउन धांगड धिंगा हि आपली संस्कृती नाही . आपले सण आपण शांतपणे त्याच पावित्र्य राखून पण करू शकतो . हि कुठली पूजा ज्यात सर्वाना त्रास होतो ?. पूजेमुळे शांत वाटले पाहिजे . मनामध्ये एक समाधान वाटले पाहिजे ती पूजा .
आपली संस्कृती जपायची तर सगळे सण साधेपणाने साजरे व्हावेत .
परंपरा बाबत एक गोष्ट वाचलेली आठवते .
हजारो वर्षांपूर्वी एक योगी एका जंगलात राहत होता . तिथे तो एक गुरुकुल चालवत असतो . वीस एक शिष्यगण त्याच्या जवळ राहून शिक्षण घेत असतात . एके दिवशी एक मांजर गुरु शिकवत असतांना येते . आणि मध्ये मध्ये करू लागते . त्यामुळे शिष्यगण विचलित होतात . मग योगी एका शिष्याला त्या मांजरीला बांधून ठेवायला सांगतो . मग दुसऱ्या दिवशीही असेच होते . परत योगी शिष्याला ,वर्ग चालू असेपर्यंत मांजरीला बांधून ठेवायला सांगतात. मग रोज असे सुरु राहते वर्ग चालू होण्याआधी मांजरीला बांधणे . मग अनेक वर्ष जातात जुने शिष्य गुरु होतात . ते पण मग मांजरीला बांधण्याचा कार्यक्रम चालू ठेवतात . मध्ये अनेक वर्ष जातात . आता ते मांजर पण राहत नाही ते गुरु आणि शिष्य पण राहत नाहीत .पण वर्ग चालू होण्यापूर्वी नवीन गुरु नवीन मांजर आणून दारात बांधतात शिष्य विचारतात हे मांजर का बांधले आहे ? गुरु सांगतो ते माहित नाही पण हि आपली परंपरा आहे .
या प्रमाणे आपण विचार न करता परंपरा पाळत असतो. .
गौतम बुद्ध यांनी सांगितलेले वचन मला खूप छान वाटते .
"मी काही सांगितलं त्यावर केवळ मी सांगितलंय म्हणून विश्वास ठेवू नकोस. केवळ परंपरा सांगते म्हणून तू काही ऐकू नकोस . कोणी प्रसिद्ध व्यक्ती सांगते म्हणून विश्वास ठेवू नकोस . जे तुझ्या सद्विवेकबुद्धीला योग्य वाटते त्यावर तू विश्वास ठेव व त्याच आचरण कर. "

प्रतिक्रिया

भ ट क्या खे ड वा ला's picture

20 Sep 2013 - 9:32 pm | भ ट क्या खे ड वा ला

विंदा करंदीकरांची एक छान कविता आहे शीर्षक आठवत नाही बहुदा "परंपरा" असावे. बघा मिळते का.
मी घरी गणपती आणणे सुरु करू दिले नाही. सार्वजनिक गणपतींना भेट दिल्याचे आठवत नाही. आरत्या त्यातील गेयते मुळे आवडतात ,जशी कविता आवडते तश्याच, भजने,नाथांच्या गवळणी सुद्धा आवडतात पण कविता ,चाल ,संगीत आवडते तसेच. गावच्या उत्सवात सहभागी होतो पण त्यात भक्ती कमी मित्र मंडळीना भेटणे हाच उद्देश असतो
" आयुष्य मजेत जाईल" या सदराचा मी सुद्धा चाहता आहे.

अगोचर's picture

24 Sep 2013 - 1:31 am | अगोचर

हस्तांतर.......

विसर्जनसाठी गणपती नेताना...,
मला गणेशची मूर्ती अवजड झाली तेव्हा..,
उसळत्या तारुण्याचा..., नवीन पिढीचा...,
माझा मुलगा मला म्हणाला : द्या इकडे

मी गणेशची मूर्ती तात्काळ मुलाच्या हातावर ठेवली चोरांगासाहित...,
मुलानेही मूर्ती हातात ठेवली नीट सावरून तर...,
मी एका देंवी आनंदात अकल्पित परंपरा पुढे सरकल्याचा

मी पुन्हा तरुण ययातीसारखा...,
माझा मुलगा जाक्ख म्हातारा
परंपरेच्या ओझ्यांनी वाकलेला........

- द. मा. धामणस्कर

सस्नेह's picture

20 Sep 2013 - 10:01 pm | सस्नेह

याबाबत एक अशीच गोष्ट आठवली.
एका धनागाराकडे एक ओढाळ गुरु होते. ते पळू नये म्हणून तो त्याच्या पायाला दोरी बांधे. एकदा त्याने खुंटाला दोरी घातली पण गाठ बांधायला विसरला. आश्चर्य म्हणजे म्हसराने पळायचा बिलकुल प्रयत्न केला नाही. बेट्याला वाटले, आहेच खुंटाला दोरी बांधलेली ! मग काय, धनगर रोज दोरीचा वळसा मारून ठेवी अन म्हसरू गप्पगार उभे राही !
परंपरेच्या खुंटाचा हा एक फायदा निश्चित आहे, की ओढाळ मनाला लगाम घातला जातो...

कवितानागेश's picture

21 Sep 2013 - 12:30 am | कवितानागेश

एका धनागाराकडे एक ओढाळ गुरु होते. >> ?????
=))

विश्वनाथ मेहेंदळे's picture

21 Sep 2013 - 12:49 am | विश्वनाथ मेहेंदळे

बरोबर आहे मौताई. गुरे हे अनेकवचन आहे. गुरु हे एकवचन आहे. असे शाळेत शिकवल्याचे आठवते.

वामन देशमुख's picture

21 Sep 2013 - 11:51 am | वामन देशमुख

एकवचन- लेकरू, अनेकवचन- लेकरे,
एकवचन- गुरु, अनेकवचन- गुरे !!!

आजकाल जो येतो तो "आयुष्य कसे जगायचे" यावरच उपदेशाचे डोस पाजायचा प्रयत्न करतो.
असो... चालू द्या.
अवांतरः "लोढणी टाका आयुष्य मजेत जाईल " हे वाचून लिन्क उघडण्याचा धीर झाला नाही

बन्या बापु's picture

20 Sep 2013 - 11:28 pm | बन्या बापु

असेच चालायचे...

जगात विद्वान मंडळी कमी नाही आहेत.

आपले ते कार्टे आणि दुसर्याचा ते बाळ. अशी गत आहे.

पिवळा डांबिस's picture

20 Sep 2013 - 11:03 pm | पिवळा डांबिस

आणि मांजराचं उदाहरणही समर्पक आहे....
पण त्याचं काय आहे राखीताई, मांजराच्या गळ्यात घंटा कुणी बांधायची हा मुख्य प्रश्न आहे. कारण तसं करायला गेलं की सगळी भाविक मांजरं आपली भाविकता विसरून एकदम फिसकारून अंगावर येतात आणि बोचकारतात!!!
आमच्या हातांवरचे ओरखडे याला साक्ष आहेत...
तरी काही हरकत नाही. आमचं सोडा, तुम्ही नव्या दमाने प्रयत्न करून पहा...
:)

कवितानागेश's picture

21 Sep 2013 - 12:32 am | कवितानागेश

गणपतीचं ओझे??
बरं बरं...
मला वाटायचं हल्लीच्या तथाकथित स्पर्धेच्या युगामुळे माणसांवर पैसे मिळवायचं ओझे वगरै येत असेल.......

भ ट क्या खे ड वा ला's picture

22 Sep 2013 - 10:31 pm | भ ट क्या खे ड वा ला

नवीन घरात गणपती आणावा / एकदा घरी गणपती आणला कि तो कायम आणायला लागतो/ त्याचे सर्व सोपस्कार करावे लागतात या परंपरेचे आहे. वडिलांनी हौसेने गणपती आणायला सुरुवात केली ,त्यांच्या हयातीत त्यांनी आणला पण मुलगा निव्वळ आवड नसून परंपरा म्हणून आणत असेल तर ?
जसे वडिलांना गणपती आणण्याचे स्वातंत्र्य आहे तसे मुलाला न आणण्याचे सुद्धा असावे असे वाटते .

मिपाच्या क्षितिजावर सहसा न उगवलेले तारे आताशा लिहीते झाले हे बघून बरं वाटलं! :D

इरसाल's picture

21 Sep 2013 - 9:35 am | इरसाल

aaNee mipaachyaa kShiteejaavar kaahee taare nasalyaane titakaach gondhal, kaMpubaajeehee band aahe.

देशपांडे विनायक's picture

21 Sep 2013 - 10:59 am | देशपांडे विनायक

कोणतीच लिंक उघडू नका फक्त लोढणे ओळखा
ते ओळखल्यावर लोढणे मिरवायचे की टाकून द्यायचे हि तुमचीच मर्जी !!!
सगळा घोळ होतो तो इतकाच कि एकाच्या लोढ्ण्याला दुसरा लोढणे समजत नाही आणि ते लोढणे मिरवण्यात
झालेला आनंदही समजू शकत नाही
वैतागाचे कारण आनंद होणे हि परिस्थिती न मानवणारी च असते

अनिल तापकीर's picture

21 Sep 2013 - 11:11 am | अनिल तापकीर

सुंदर लेख प्रत्येकाने आपल्या सद्बुद्धीने कसे वागायचे ते ठरविले पाहिजे

पैसा's picture

22 Sep 2013 - 6:26 pm | पैसा

आपलं डोकं वापरा.

अनुप ढेरे's picture

22 Sep 2013 - 10:47 pm | अनुप ढेरे

'गणपतीउत्सवामधला खर्च होणारा पैसा म्हणजे अपव्यय आहे, यात समजोपयोगी काही नाही' याच्याशी असहमत. यात होणार्‍या खर्चामुळे अनेकांना काम/पैसा मिळतो. देखावे केल्याने मांडववाले, लायटिंगवाले, देखावे करणारे कारागिर, सुतार यासारख्या कितीतरी लोकांना काम मिळते. देखावे बघायला अनेक लोक बाहेर पडतात. बाहेरगावहून लोक येतात. ते पैसे खर्च करतात त्यातून खाणं विकणारे, फुगे, धनुष्य-बाण आणि तत्सम खेळणी विकणारे लोक बर्‍यापैकी पैसा कमावत असतील. एकंदर खूप पैश्याची उलाढाल होते जे चांगलच आहे. कारण हा पैसा समजात फिरतो.
स्पीकर्सच्या भिंतींचा त्रास होतो पण वर्षातून २-३ दिवसच असतो तो...

//स्पीकर्सच्या भिंतींचा त्रास होतो पण वर्षातून २-३ दिवसच असतो तो...//

अहो कोणी धरून बडवले तरी १५-२० मिनिटांपेक्षा जास्त त्रास होत नाही.

rakhee's picture

23 Sep 2013 - 9:20 pm | rakhee

धन्यवाद सर्वांना तुम्ही लेखाची दखल घेतलीत.

स्पीकर्सच्या भिंतींचा त्रास होतो
हल्ली जोरात स्पीकर बडवल्या शिवाय आनंद साजरा करता येत नाही असे काहीसे वाटु लागले आहे.कुठलाही सण असो कानठल्या बसणार्‍या आवाजात डोक फिरलयां आणि तत्सम गाणी जोरात वाजत असतात ! नक्की कोणाचं डोक फिरलय ? आणि कोणाचे डोके फिरायचे बाकी आहे हेच काही कळत नाही !
दहीहंडी आणि गणेश उत्सव हे आता उत्सव राहिले नसुन फक्त इव्हेंट बनले आहेत. :(
अनंत चतुर्दशी आमच्या कॉलनीतला एका सार्वजनिक मंडळाच्या गणपतीचे विसर्जन सुरु होते... पहिला ट्रक जनरेटरना, दुसरा मोठ्या स्पीकर्सचा आणि तिसरा बाप्पाचा ! इतका भयानक आवाज होता की साधारण १ किलोमिटर तरी त्याचा आवाज जात असावा ! घरातल्या सर्व खिडक्या बंद करुन सुद्धा डोक कलकलायला लागल होत !
सतत डिजे लुंगी डान्स लुंगी डान्स वाजवत बसला होता !
तरी नशिब की माझ्या अंगात नाना पाटेकरचा संचार झाला नाही ते ! ;)