गणेशाची स्थापना. मूर्ती एक की दोन ? लहान की मोठी ?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे in काथ्याकूट
13 Sep 2013 - 8:46 pm
गाभा: 

नमस्तस्मै गणेशाय ब्रह्मविद्याप्रदायिने
यस्यागस्त्यायते नाम विघ्नसागरशोषणे.

ज्याच्या नामामधे विघ्नसमुद्राचे अगस्तीप्रमाणे शोषण करण्याचे सामर्थ्य आहे आणि वेदान्ताचे ज्ञानही जो करुन देतो असे मानले जाते त्या गणपतीचा वार्षिक उत्सव सर्वत्र भक्तीभावाने साजरा होत आहे. सार्वजनिक गणेश मंडळापासून ते घरगुती गणेशाच्या स्थापनेपर्यंत सर्वत्र आनंदी आनंद आहे गणेशोत्सवाच्या विविध परंपरा श्रद्धेने श्रद्धाळू पाळत असतात. गणपतीच्या उत्त्पत्तीबाबत अनेक कथा पुराणात सापडतात. मुद्गलपुराण, गणेशपुराण व गणेशभागवत हे तीन संस्कृत ग्रंथ आणि इतर ग्रथांमधूनही गणेशाबाबतच्या उत्पत्तीबाबतच्या कथेत एकवाक्यता नाही असे म्हणतात. आपल्याला पारंपरिक अशी एक कथा माहितच आहे की पार्वती स्नानाला बसली आणि तिने मळापासून एक पुतळा स्थापन केला आणि पुढे काय घडले ते सर्वांना माहित आहे. पुराणात अस म्हटलं आहे म्हणतात की लेखा नावाच्या देवगण होते आणि गणपती नावाचा एक श्रेष्ठ लेखक होता. गणपती हा मूळचा गणेश नसून गुणेश आहे, गाणपत्य पंथ वगैरे. असो.

मित्र हो, गणेशाच्या उत्त्पत्तीच्या कथेत मला काही इंट्रेष्ट नाही. सध्या सार्वजनिक गणेशोत्सव सुरु आहे. गणेशाच्या स्थापनाची सुरुवात होऊन काही ठिकाणी गणेशाचे विसर्जनही झाले आहे. गणेशाच्या मूर्तीबाबत एक प्रश्न मला पडला आहे की घरी गणेशाच्या मूर्तीची स्थापना करतांना गणपतीची मूर्ती लहानच असावी असं काही आहे का ? गणपतीची मूर्ती मोठी नसावी ? गणेशाची एक मूर्ती मोठी आणि एक लहान अशी स्थापना करावी लागते काय ? घरी गणेशाची स्थापना करतांना गणेशमूर्ती लहानच असली पाहिजे, याबाबतीतचे काही नियम आहेत काय ? माझं मत असं की हे सर्व श्रद्धेचे विषय आहेत याबाबतीत असे काही नियम नाहीत, नसावेत. असलेत तर त्याबाबती असे काही नियम आहेत काय ? गणेशाची स्थापना करतांना एक हात गणेशाच्या र्‍हदयावर ठेवून दुसरा हात यजमानाच्या र्‍हदयावर ठेवून नेत्रापासून ते पायापर्यंत एक एक मंत्र म्हणत त्या मूर्तीत चैतन्य भरले जाते आणि त्याची प्राणप्रतिष्ठा केली जाते, गणपती अथर्वशीर्षाने प्राणप्रतिष्ठा केली जाते.

गणेशाची मूर्ती वितभर हाताची असावी ज्यामुळे एकेक मंत्र म्हटल्यामुळे मातीच्या मूर्तीत मंत्राद्वारे चैतन्य त्यात उतरावं. खरं तर श्रद्धाळु लोकांना ते बरोबरही वाटत असावे, परंतु मोठ्या मूर्तीत असं चैतन्य उतरत नाही, असे काही म्हणता येणार नाही. एकूणच काय याबबतीत असं एकमत दिसत नाही की मूर्ती लहान असावी की मोठी असावी. तसेच, गणेशाची मूर्ती घरात स्थापन करत असतांना एकावेळी दोन मूर्त्यांची स्थापना का करतात ?

गणेशाच्या मूर्तीची स्थापना करतांना काही भागात पूर्वी म्हणे केवळ गणपतीच्या चित्राचेही पूजन केले जात असायचे, असे म्हणतात त्याबाबतीत मला मात्र काही माहिती नाही, मग अशा चित्रांमधे प्राणप्रतिष्ठेची पद्धत कशी असते ?

मित्रहो, गणेशाची स्थापना कशी केली जाते मला काही माहिती नाही. आमच्याकडे कधीच घरी गणेशाची स्थापना केली जात नव्हती. लोकमान्य टीळकांनी सुरु केलेला सार्वजनिक उत्सव आमच्याकडे अगदी अलिकडे घरातला उत्सव झाला आणि यावेळेस घरी स्थापनेसाठी सार्वजनिक उत्सवासाठी जशी मंडळे मोठी मूर्ती आणतात तशी मूर्ती आणली आहे. पण, अशा मूर्त्यांची स्थापना करतांना मूर्ती लहान, मोठी, एक-दोन असाव्यात त्याबाबतीत काही नितिनियम पाळावे लागतात काय, पाळले पाहिजेत काय त्याची माहिती मिळावी यासाठी हा काथ्याकुटाचा प्रपंच.

प्रतिक्रिया

प्यारे१'s picture

13 Sep 2013 - 9:12 pm | प्यारे१

असं काही नसावं.
एका व्यक्तीच्या घरी गणपती बसवताना शहरांमध्ये तरी मुख्यत्वे जागेची सोय बघितली जाऊन लहान मूर्तीची प्रथा पडली असण्याची शक्यता आहे. किमान एक टेबल लागतेच. मूर्ती मोठी असली तर मूर्तीसाठी टेबल नि त्यापुढचा सजावटीच भाग आणखी त्यानुसार मोठा असं होत असावं.
एकाच मूर्तीची मनोभावे पूजा घडावी व ती व्यवस्थित केली जावी हा उद्देश असावा.
जाणकार अधिक माहिती देतीलच.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

13 Sep 2013 - 9:48 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

एक मोठी मूर्ती आणि एक अगदी लहान अशी पूजेसाठी मूर्ती असते, असं का करतात. काही ठिकाणी एकच मूर्ती स्थापन केलेलीही द्सिली आहे. एकच मूर्ती आणून तिची घरी स्थापना करावी, दहा दिवस आनंदात घालवावे, इतकेच मला कळते.
बाकी, असंच केलं पाहिजे आणि तसंच केलं पाहिजे हे काही पटत नाही. पण, वडील धा-यांचे मन सांभाळता सांभाळता नाकी नऊ येते.

मूर्तीत प्राण भरणे ही एक गम्मतच आहे.

-दिलीप बिरुटे

प्यारे१'s picture

13 Sep 2013 - 10:12 pm | प्यारे१

पैसाताईशी सहमत आहे.

मोठ्या मूर्तीचे विसर्जन दरवर्षी केलं जात नाही. कदाचित काही मंडळाच्या कार्यकर्त्यांची ही चलाखी असावी. ;) पण इतर ठिकाणी मोठी मूर्ती तीच असते तिचं थोडं रंगकाम इ. केलं जातं. लहान मूर्तीची प्रतिष्ठापना होते. विसर्जनावेळी लहान मूर्ती विसर्जित होते

बाकी, तुकाराम महाराजांचा अभंग 'केला मातीचा पशुपती...' लक्षात ठेवून परंपरांचा प्रवाह खंडीत होणार नाही इतपत नि तेवढ्याच परंपरा पाळाव्यात असं आपलं आमचं मत. मात्र त्या मोडू नयेत हे निश्चित.

पैसा's picture

13 Sep 2013 - 9:51 pm | पैसा

याबाबतीत नियम असा नाही पण पूजेची मूर्ती शास्त्रानुसार एक वीत उंचीची असावी असे मत आहे. ती नदीकाठच्या मृत्तिकेची असावी असा संकेत. स्पर्धेच्या धाग्यावर स्नेहाराणीकडचा जो गणपती आहे तो याबाबतीत आदर्श असावा. बाकी प्राणप्रतिष्ठा मोठ्या मूर्तींचीही करतात, पण कोकणात मंडळांच्या मोठ्या गणपतीबरोबर प्राणप्रतिष्ठा करायला छोटासा दुसरा गणपतीही आणतात. अर्थात विसर्जन दोन्ही गणपतींचे करतात. याला शास्त्रानुसार पूजेची मूर्ती लहान असावी हे एक कारण आहे, तसेच मोठ्या मूर्ती शाडूमातीच्या नसतात, आतून पोकळ असल्याने कधी कधी पूर्ण बुडत नाहीत हेही असावे.

आणखी एक कारण म्हणजे खूपदा हौसेखातर गणपतीला वेगवेगळ्या अवतारात पेश केले जाते. आमच्या गावात तर एकदा राजेश खन्नाच्या अवतारात गुरुशर्ट घातलेला गणपती, खांद्यावर हात टाकून हेमामालिनी उभी आणि बाजूला स्कूटर अशा अवतारात गणपती पाहिला आहे. (या प्रकाराला बाहुली गणपती) असे म्हणतात. अशा अवतारातल्या त्या गणपतीची प्राणप्रतिष्ठा करायला लोक नाही म्हटलं तरी जरा कचरतात! मग पूजेसाठी छोटुकली दुसरी मूर्ती आणली जाते.

पूजेची मूर्ती अभंग असावी असाही संकेत आहे. मोठ्या मूर्ती ने आण करताना कुठेतरी काहीतरी तुटलं फुटलं तर ते लगेच जोडून मूर्ती पहिल्यासारखी करतात खरी, पण अशा मूर्तीची पूजा करत नाहीत. मूर्ती जेवढी मोठी तेवढी काहीतरी तुटण्याची भीती जास्त!

अशी अनेक कारणे आहेत की त्यासाठी पूजेसाठी दुसरी लहानशी मूर्ती आणण्यात येते. पण तसा काही लिखित नियम नाही. प्रत्येकाची आवड आणि सोय.

कागदाच्या गणपतीबद्दल http://www.misalpav.com/node/22802 इथे जरा जास्त माहिती आहे. ही पद्धत गोव्यात पोर्तुगीजांच्या भीतीने सुरू झाली. इतरत्र का आणि कशी सुरू झाली याबद्दल मला माहिती नाही. त्या कागदातील गणपतीतील देवत्वाचे विसर्जन मातीच्या मूर्तीप्रमाणेच "आवाहनं न जानामि" वगैरे मंत्र म्हणून करतात आणि पाण्याचे प्रोक्षण करून तसबीर परत भिंतीवर लावून टाकतात.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

13 Sep 2013 - 10:20 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>> शास्त्रानुसार एक वीत उंचीची असावी असे मत आहे.

प्रार्थनापर अशी जी सुक्ते आहेत आणि जी उत्तम आहेत त्यांचे शास्त्र झाले. (चुभुदेघे). वेदकाली पृथ्वी,जल,तेज,वायु व आकाश यांची महती गाण्यात लोक पूर्वी तल्लीन झाले म्हणतात आणि मग पुढे आपण असे म्हणु की वेगवेगळ्या कलांच्या बाबतीत प्रगती झाली आणि वेगवेगळ्या कलांपैकी एका कलेत दगडांपासून मूर्ती बनविणे सुरु झाले आणि मूर्तिपुजेची सुरुवात झाली असे म्हणू या. गणेशाच्या बाबतीत आपण अनेकदा चर्चा केली आहे की गणेश हा अगदी अलिकडचा म्हणजे हजार वर्षापूर्वीचा त्याचं महत्त्व त्यानंतर वाढत गेले आहे. असेच जर असेल तर या अशा हजारवर्षापूर्वीच्या गणेशासाठी कोणत्या शास्त्राने (संदर्भ) ठरविले की मूर्ती एक वितीची पाहिजे म्हणून. गणेश आलाच हजारवर्षापूर्वी त्याचं शास्त्र कधी बनले आणि बनलेच असेल तर शास्त्रीयपद्धतीने स्थापनेच्या बाबतीत त्याची तपशीलवार माहिती कुठे वाचायला मिळेल ?

-दिलीप बिरुटे

रामपुरी's picture

13 Sep 2013 - 10:35 pm | रामपुरी

हे "धन्स" म्हणजे काय असतं?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

13 Sep 2013 - 10:50 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विकेंड चे विकांत. 'बाय द वे' चे 'रच्या कने' तसे 'थ्यांक्स' चे 'धन्स. 'थ्यांक यु' चे 'धन्यू' *dash1*

अवांतर : रावसाहेब नावाचे एक गृहस्थ होते म्हणजे आहेत. त्यांनाही या 'धन्स' शब्दाचा राग यायचा. त्यांचं बीपी हाय व्हायचा. मराठी भाषेचं कसं वाटोळ होत आहे म्हणायचे. काही दिवस खरडीतून सांगायचे मला. मी आणि माझे मित्र त्यांच्या या भाषाशुद्धीच्या चळवळीला इतकं इग्नोर करायचो की विचारु नका. 'धन्स' या शब्दाच्या रागापायी त्यांनी मिपावर येणं बंद केलं तरी मिपा त्यांच्या ल्यापटॉपवर सतत चोवीस तास उघडलेलं दिसतं. ( असं घाटपांडे साहेब, म्हणाल्याचे आठवतं. घाटपांडेच म्हटले होतं की दुसरं कोण. असो. ) मिपाचा राग येऊन त्यांनी मिपाद्वेषापोटी काही दिवस 'नमोगत ते नमोगत' आणि 'उपक्रम' सारखं जगात उत्तम संकेतस्थळ नाही, असे म्हणायचा धोषा लावला. दोन्ही बंद पडले. हे जिथे जातील तिथले संकेतस्थळे बंद पडत आली आहेत. आज अशा या मराठी जालावर लिहिणा-या थोर लेखक रावसाहेबांची खुप आठवण आपल्या निमित्तानं आली. धन्स.

-दिलीप बिरुटे

अद्द्या's picture

14 Sep 2013 - 2:45 pm | अद्द्या

हो
आणि माझी आयडी तशीच असली तरी तो मी नव्हेच :D

पैसा's picture

13 Sep 2013 - 10:39 pm | पैसा

६ शास्त्रे आणि १८ पुराणे यांचा नक्की काळ कोणता, गणपतीची पद्धत कधी सुरू झाली याबद्दल मला काहीच माहित नाही. बर्‍याच गोष्टी परंपरेने चालत आलेल्या आहेत एवढं खरं. कदाचित अशा काही गोष्टी मग शास्त्रात आहेत्/नाहीत वगैरे सांगितलं की बर्‍याच लोकांची तोंडं आपोआप बंद होत असावीत.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

14 Sep 2013 - 6:42 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>> ६ शास्त्रे आणि १८ पुराणे यांचा नक्की काळ कोणता,

पूर्वयुगात एकच पुराण अस्तित्त्वात होते असे मत्सपुराणात म्हटले आहे. सध्या उपलब्ध असलेली पुराणे प्राचीन काळच्या पुराणांची पुनर्रचना करुन तयार केलेली आहेत. इ.स.च्या प्रारंभीच्या काही शतकात ज्यावेळी बुद्ध आणि जैन धर्माचा ब्राह्मणविशिष्ट धर्मावर झालेल्या हल्ल्याचा जोर कमी झाला आणि जुन्या धर्माचे, तत्त्वज्ञानाचे आणि वाड;मयाचे पुनरुज्जीवन झाले त्यावेळी अशी पुनर्रचना झाली असावी. कुमारीलभट्टच्या तंत्रवार्तिकामधे सध्या उपलब्ध असलेल्या अनेक पुराणात आलेल्या विषयांचा उल्लेख केला असून त्यातील काही अवतरणेही उधृत केली आहेत यावरुन सध्या उपलब्ध असणारी सर्व पुराणे नसली तरी त्यांच्यापैकी काही तरी इ.स.च्या ६ व्या शतकाच्या पूर्वी झालेली होती हे सिद्ध होते. (धर्मशास्त्राचा इतिहास)

अशा या पुराणात धर्मशास्त्राचे जे विषय आहेत त्यात एक 'देवालयदिकांची प्रतिष्ठा' हाही विषय आहे तेव्हा त्याबद्दल काही माहिती मिळाली तर (मीही तसे शोधतोच आहे) उत्तमच होईल.

-दिलीप बिरुटे

प्रचेतस's picture

14 Sep 2013 - 8:58 am | प्रचेतस

ब्रह्मपुराण, अग्नीपुराण, स्कंदपुराण अशी काही पुराणे निश्चितच गुप्तकाळातील असावीत असे म्हणता येते.
गणपतीविषयक पुराणे मात्र १० व्या ते १३/१४ व्या शतकांच्या दरम्यान निर्मांण झाली असावीत असे म्हणता यावे कारण ह्या दरम्यानच गणपतीचे हळूहळू प्रमुख देवतांत येऊ लागले.

बॅटमॅन's picture

13 Sep 2013 - 10:00 pm | बॅटमॅन

कसलं काय हो. शक्यतोवर एक मूर्ती आणावी. साईझ वैग्रे तुमच्या मगदुराप्रमाणे. प्राणप्रतिष्ठेची मॅन्युअल्स मिळतात त्यात पाहून केले की झाले. डेकोरेशनही तुमच्या मताप्रमाणे. प्रसाद काय असावा इ. त्या मॅन्युअलमध्ये दिलेले असतेच. पाहिजे तर तसे नैतर थोडे व्हेरिएशन केले की झाले. अन विसर्जन टिपिकली गौरीबरोबर ५-६व्या दिवशी करतात. पण अगदी असेच पाहिजे असेही नाही. दीड दिवसापासून १० दिवसांपर्यंत कधीही करा.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

13 Sep 2013 - 10:33 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आधुनिकीकरणाच्या काळात आपण अनेक सण उत्सव आपण आपल्या पद्धतीने साजरे करीत आहोत. प्रसाद, सजावट, अगदी आपण जमेल तसेच करतो त्यात कोणतेही शास्त्र नसते. ते केवळ शास्तर मारे आपण करतो. पण पारंपरिक पद्धतीने शास्त्राने जे सांगितले तसे किंवा त्याप्रमाणे असे जे गणेशाची स्थापना करतात तेव्हा दोन दोन मूर्त्यांची स्थापना करायचा उद्देशच मला समजत नाहीहे. एक मोठी मूर्ती आणि एक पिटूकली मूर्ती हे कशासाठी असतात ? कोणत्या धार्मिक ग्रंथात असे उल्लेख आहेत ? असे शोधायचे होते.

-दिलीप बिरुटे

अनुप ढेरे's picture

13 Sep 2013 - 11:13 pm | अनुप ढेरे

दोन मूर्त्या हा प्रकार घरच्या गणपतीसाठी मी तरी कुठे बघितला नहिये अजून तरी. सार्वजनिक मंडळच हे करतात. मोठी मूर्ती दरवर्षी नवीन घेणं परवडत नसेल म्हणून मोठी मूर्ती शोभेला आणि छोटी पूजेला. मोठया मूर्तीच विसर्जन पण अवघड असेल... खासकरून जिथे नदीमध्ये विसर्जन करतात.

बाळ सप्रे's picture

13 Sep 2013 - 11:15 pm | बाळ सप्रे

आपला आव्वाज असायला हवा असेल तर मोठ्यात मोठी मूर्ती असावी.. त्याहून मोठ्ठा मांडव घालता येतो.. अर्ध्याऐवजी अख्खा रस्ता अडवता येतो.. जास्त वर्गणी, जास्त मोठ्ठा dolby/ DJ वगैरे लावता येतो.. मिरवणुकीत हळु जायला लागतं मूर्ती मोठी असली की.. मग २६-२७-२८ तास नाचता येतं.. एक दोन वर्षात त्याला राजा किंवा नवसाला पावणारा असा बहुमान मिळवता येतो.. तिरुपतीला टक्कर देता येईल इतक सोननाणं जमा करता येतं.. जेवढी मूर्ती मोठी तेवढी कोणाच्या बापाची टाप नसते कशावर आक्षेप घ्यायची..

सिरीअसली शास्त्रावर वगैरे विश्वास असेल तर सनातन साईट किंवा तत्सम पुस्तकात बघा detail specifications मिळतील मूर्ती कशी असावी/ किती असाव्यात त्याची.. त्याला कुठली फुलं घाला, कुठला नैवेद्य दाखवा, त्याच तोंड कुठे असावं..
पण एकच गुरु माना बरं का.. कारण सगळ्यांची specifications वेगळी असतील..

प्रचेतस's picture

14 Sep 2013 - 12:07 am | प्रचेतस

पैसाताईशी सहमत. शास्त्राप्रमाणे मूर्ती पार्थिव आणि वीतभर आकाराचीच असली पाहिके असा संकेत आहे. पुण्यातल्या मोठ्या मंडळातसुद्धा हा संकेत बर्‍यापैकी पाळला जातो. प्राणप्रतिष्ठा त्या लहानशा मूर्तीतच केली जाते आइ शेवटी विसर्जनही त्याच मूर्तीचे करतात. मोठ्या मूर्तीला फक्त थोडेसे पाणी लावून मग ती मंडळाच्या लहानग्या मंदिरांत आणून तशीच ठेवली जाते आणि दगडूशेठसारखी काही मोठी मंडळे त्यांचीही मोठी मंदिरे बांधून वर्षभर धंदा करत बसतात.

बाकी अधिक माहिती आत्मारामबुवा देऊ शकतील.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

14 Sep 2013 - 6:57 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आत्मारामबुवांचीच कालपासून मला आठवण होत आहे. नेमका विधीचा प्रकार आणि गणेशाच्या स्थापनेची पद्धत नेमकी काय आहे, हे ते सांगतीलच.

मूर्ती कशी असावी आणि त्याचे संकेत आणि शास्त्र काय यावर संदर्भाने चर्चा व्हावी म्हणून तर तुम्ही,गणपा आणि पैसा च्या रेट्यामुळेच मला हा चर्चेचा हा काथ्या कुटावा लागतोय.

आपण आता कोणीही वेळेअभावी म्हणा की माहिती नसल्यामुळे म्हणा शास्त्रोक्त पद्धतीने कोणी गणेशाची स्थापना करत असतील असे काही वाटत नाही. कारण नुसते गणपतीपुजन नव्हे तर त्याबरोबर आणखीही काही गोष्टींचे त्यासोबत पुजन केले जाते (बरोबर का बुवा) तेव्हा कुठे एक संकल्प पुरा होता.

पुजासामग्री, बसण्याच्या दिशा, यजमानांची शुचिता, 'गणांना त्वां गणपति' असे तांदुळावर ठेवलेल्या सुपारीवर गणेशदेवतेचे आवाहन करतात...एकूण काय गणेशाच्या मूर्तीबद्दल आकाराबद्दल काही विशेष संकेत आहेत, असं मला सध्या तरी काही वाट्त नाही.

-दिलीप बिरुटे

प्रचेतस's picture

14 Sep 2013 - 9:07 am | प्रचेतस

ह्या दुव्यात गणेश प्रतिष्ठापनेची बर्‍यापैकी तपशीलवार माहिती दिली आहे. तरीही मूर्तीच्या आकाराचा वा तिच्या पार्थिवतेचा यात उल्लेख नाही.

बाकी ते आत्मुबुवा कुठे गायबलेत?

अत्रुप्त आत्मा's picture

14 Sep 2013 - 1:21 pm | अत्रुप्त आत्मा

संध्याकाळी येइन! अत्ता याच गणपतिच्या पूजां मधे आहे! ;-)

अत्रुप्त आत्मा's picture

15 Sep 2013 - 1:03 am | अत्रुप्त आत्मा

मी लिहिण्याचं विशेष असं काही राहिलेलं नाही, पैसा ताईंनी दिलेले प्रतिसाद म्हणजे परंपरेतल्या सर्व गोष्टींच सारं-रूप आहे. आता प्राणप्रतिष्ठा म्हणजे नक्की काय केले जाते,तेव्हढे मांडतो. आणी नंतर अनुषंगिक पुजनाबद्दल सांगतो.

कोणत्याही मूर्ती/प्रतिमा(सूर्य/वास्तुपुरुष/ब्रम्हा इ.. सर्व देवता),(गरज पडली तर)अगदी फोटो सुद्धा... या सगळ्यांच्या प्राणप्रतिष्ठेसाठी बीजाक्षर मंत्र म्हणायची पद्धती रूढ आहे.

१)प्राणप्रतिष्ठेसाठी सर्व प्रथम,आपला डावा हात स्वतःचे हृदयावर आणी उजवा हात मूर्तीचे हृदयावर किंवा प्रतिमा असतील तर त्यांना लाऊन धरतात,खालील बीजाक्षर मंत्राची ३ प्रकटीकरणे- नंतर म्हटली जातात.
औम.. आं ह्रीं क्रों .. अं यं रं लं वं शं षं सं हं ळं क्षं अ: अस्यां मूर्तौ* प्राण इह प्राणा: । (*आसू प्रतिमासु प्राण इह प्राणा:।)

औम.. आं ह्रीं क्रों .. अं यं रं लं वं शं षं सं हं ळं क्षं अ: अस्यां मूर्तौ जीव इह स्थित: ।

औम.. आं ह्रीं क्रों .. अं यं रं लं वं शं षं सं हं ळं क्षं अ: अस्यां मूर्तौ सर्वेंद्रियाणी... स्वाहा: ।
नंतर--
२)गर्भाधानादी पंचदश संस्कार सिध्यर्थं पंचदश प्रणवा$ वृत्ती: करिष्ये। >>> गणपति/प्रतिमा.. इ. च्या हृदयाला उजवा हात लाऊन पंधरा वेळा मनातल्या मनात ओंकाराचा जप करायचा असतो.यामुळे मूर्तीमधे वरिल तीन मंत्रानी आलेलं प्राणात्मक दैवत्व हे षोडश संस्कारांपैकी देवाला आवश्यक मानलेल्या पहिल्या पंधरा संस्कारानी युक्त होतं.
यानंतर---
३)ओम तच्चक्षुर्देवहितं पुरस्तात् शुक्र मुच्चरत्। पश्येम शरदः शतम। जीवेम शरदः शतम॥ >>> या मंत्रानी देवतेच्या डोळ्यात साजूक तूपानी अंजन घातलं जातं (गणपतीच्या डोळ्यांमधून तूप लावलेली दूर्वा वरिल मंत्र म्हणत,काडीनी नेत्रांजन किंवा सुरमा घातल्या सारखी फिरवतात.)
यानंतर
४)*प्राण शक्त्यै नमः हा नाम(मात्र)मंत्र म्हणत पंचोपचारी पूजन केलं जातं. इथे देवतेचे प्राण प्रतिष्ठित झाले असे समजावे. या नंतर नेहमीची षोडशोपचारी पूजा घडते.

=========================
@आपण आता कोणीही वेळेअभावी म्हणा की माहिती नसल्यामुळे म्हणा शास्त्रोक्त पद्धतीने कोणी गणेशाची स्थापना करत असतील असे काही वाटत नाही. कारण नुसते गणपतीपुजन नव्हे तर त्याबरोबर आणखीही काही गोष्टींचे त्यासोबत पुजन केले जाते (बरोबर का बुवा) तेव्हा कुठे एक संकल्प पुरा होता. >>> बरोबर आहे. गणपतिची पूजा होताना बरोबर अक्षता वाहूनअंगपूजन(अवयव पूजन),पत्रार्चना-पत्री वहाणे, आणी दूर्वायुग्म-म्हणजे गणपतिची विशेष नाव उच्चारत प्रतिनामाला दोन/दोन दूर्वा वहातात.. पत्रार्चना/अंगपूजा यातही गणपतिची विशेष नावं म्हटली जातात.

@पुजासामग्री, बसण्याच्या दिशा, यजमानांची शुचिता, 'गणांना त्वां गणपति' असे तांदुळावर ठेवलेल्या सुपारीवर गणेशदेवतेचे आवाहन करतात...एकूण काय गणेशाच्या मूर्तीबद्दल आकाराबद्दल काही विशेष संकेत आहेत, असं मला सध्या तरी काही वाट्त नाही. >>> मूर्तींचं असं विशेष कोणतंही शास्त्र नाही. पण निरनिराळ्या श्रद्धांमधून रूढ झालेले संकेत आहेत. आणी ते परंपरेनी(च) जतन झालेले आहेत. बाकि विशेष काहिही नाही.

आता पार्थिव गणेश पूजना बद्दल- मूळात हे पुरुषांनी धर्म/अर्थ/काम/मोक्ष हे चारही पुरुषार्थ प्राप्त व्हावे,त्यांची वृद्धी व्हावी म्हणून आचरायचं एक व्रत आहे.भाद्रपद शु.चतुर्थीला ब्राम्हमुहुर्ती(पहाते ३ ते ४ यावेळात) उठावे. नदीवर जाऊन स्नान/संध्या इत्यादी आन्हिके करावीत. नंतर ओलेत्या वस्त्रांनिशी (अती शयं सोवळ्यामधे) पहिल्यांदा नदीकाठाची हरळ/हरळी/कोवळ्या दूर्वा दोन/तीन मुठी घ्यावा. त्यानंतर दोन्ही हतात मावेल एव्हढी चिकणमाती घ्यावी. हे सर्व घरी आणून पाटावर हरळ पसरावी.. आणी नंतर वरती दिलेले प्राणप्रतिष्ठेचे पहिले तीन मंत्र म्हणत हातानी मूर्ती घडवावी.(आता मूर्ती तयार असते,म्हणून उपचाराचा भाग म्हणून नुस्ता हृदयाला हात लाऊन आपण हे मंत्र म्हणतो/पुरोहिताकडून म्हणवितो). मूर्ती घडवून झाल्यावर पंधरावेळा ओंकार जप इत्यादी पुढिल सर्व विधि करावा. षोडशोपचार पूजा पूर्ण झाल्यावर मूर्तीच्या पायाशी पाटावर ज्या हरळ दूर्वा पसरल्या होत्या,त्यातील बाहेरची एखादी काढून जटा/शेंडी मधे बांधावी. त्यानंतर शास्त्र भेदा प्रमाणे (दुसरे दिवशी सायंकाळी/अकारवे दिवशी/एकविसावे दिवशी) मूर्ती विसर्जन करतांना,शेंडीतील दूर्वा सोडून द्यावी/विसर्जित करावी...... हे झालं पार्थिव गणेश व्रत! (पुढे लो.टिळकांनी याला राष्ट्रीय हितास्तव लोकोस्तवाचे रूप दिले.)
======================

या निमितानी काही....

अता इथे गणपति "बसवायच्या" आजकाल "दिल्या" जाणार्‍या मुहुर्ताचा संमंध कुठेही नाही हे प्रथम स्पष्ट व्हावे. वेळ जी गृहीत आहे.ती पहाटे ३ वाजल्यापासून(ब्राम्ह मुहुर्त) सुरु होते कारण ती देवतांच्या आगमनाची वेळ समजली जाते. यातला ब्राम्ह मुहुर्तंही रोजचा/सर्व देवतांचा आहे. गणपति साठीचा त्या दिवसाचा स्पेशल नव्हे. हे सांगायचे कारण म्हणजे हल्ली पेपरात पंचांगकर्त्यांकडून जाहिर होणारे मुहुर्त ही अलिकडच्या काळाची "देन" आहे. याचा व्रताशी काहिच संमंध नाही. (मूळात हे ज्योतिषीय मुहुर्ताचं प्रकरणच काहि शे वर्ष जुन आहे. सबब..व्रताच्या अनुषंगानी ते निरर्थक आहे.)

दुसरं असं की गेली काहि वर्ष- या सनातनी संघटना, नदीतच मूर्ती विसर्जनाचा हट्टग्रह रूढ करू पहात आहेत. तो किती खुळा आहे हे कळावे. नदीत विसर्जन करण्यासाठी-आधी नदी शुद्ध हवी, त्यानंतर तिथली माती स्वच्छ हवी.मग वरिल प्रमाणे तिची(च) मूर्ती व्हायला हवी...(तिला कोणताही रंग नको) आणी त्यानंतरच तिचे "नदित विसर्जन" सु-संगत ठरते. जसे आणी ज्या स्वरुपामधे, आवाहन करणे -आणणे---त्याच स्वरुपामधे/घटकांमधे, विघटीत करणे-विसर्जन करणे,हे नैसर्गिक रित्या किति सुसंगत आहे! जसं निसर्गातून घेतलं..तसच्या तसं परत दिऊन टाकलं.

आजचे चित्र काय आहे?---आता मूर्ती "वेगवेगळ्या मातिच्या" असतात.त्यांना अनेकानेक रंग चढवलेले... म्हटल्यावर त्याचे नदिमधे शुद्ध-पर्यावरण-वादी विसर्जन "शक्य" तरी आहे काय? सनातनी या गोष्टी कानाबाहेर फेकून देतात,आणी लोकांनिही फेकाव्या म्हणून मोहिम चालवतात... त्यांचं न ऐकता आपण "फक्त धार्मिक" असणार्‍या लोकांनी मूर्ती विसर्जनाचे हे* नवे पर्याय बहुसंख्येनी स्विकारायला काय हरकत आहे? :)
===============================================

*विसर्जन हौद/घरी बादलीमधे/मूर्ती दान/सुपारीगणपति/धातूमूर्तीचा कायम-गणेश

पैसा's picture

15 Sep 2013 - 9:02 am | पैसा

माहितीपूर्ण प्रतिसाद! निसर्गातून घेतलेलं तेवढंच त्याला परत द्यावं याबद्दल हजार वेळा सहमत!

प्रचेतस's picture

15 Sep 2013 - 9:35 am | प्रचेतस

हेच म्हणतो.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

15 Sep 2013 - 12:23 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बुवा यथासांग पुजा मांडल्याबद्दल आभार. एक अशा मूर्तीच्या आकाराबद्दल फारसा आग्रह दिसत नाही.

बाकी, वस्त्र आणि काही दक्षिणेच्या ऐवजी आता आपण औरंगाबादला याल तेव्हा एक मस्तपैकी जेवण व्हेज/नॉनव्हेज आपण म्हणाल तसे ते प्रेमाने देईन. :)

दोन मूर्त्यांबद्दल तुम्ही लिहिलं नै वाटत. मंडळवाले आणि काही घरात असं का करतात तेवढं करुन उत्तरपूजा मांडावी म्हणजे या काथ्या कुटाची साठा उत्तराची कहाणी सफळ संपुर्ण होईल.

आभार....!

-दिलीप बिरुटे

अत्रुप्त आत्मा's picture

15 Sep 2013 - 2:19 pm | अत्रुप्त आत्मा

२ मूर्तिंबद्दल पैसा ताई आणि वल्लीनि दिलेलीच कारणे आहेत.

बाकि औरंगाबादला (फक्त) व्हेज जेवायला नक्की येइन. :)

अनिरुद्ध प's picture

16 Sep 2013 - 6:29 pm | अनिरुद्ध प

आपण फारच त्रोटक माहीती दिलित्,मला आपल्या कडुन खरच खुपच माहितीची अपेक्षा होती,असो कदाचीत आपण ती वेळेअभावी विस्त्रुतपणे देवु शकत नसावात.

दोन मुर्त्या हा प्रकार फक्त सार्वजनिक गणपतीतच पाह्यला आहे. मूर्ती खरंतर मातीची असावी जेणेकरुन ती पाण्यात पुन्हा विरघळेल. निसर्गातून आणून ते पुन्हा निसर्गातच सोडण्याचा संकेत असावा, शास्त्र वैगरे माहीत नाही. माझ्या एका मैत्रिणीने सांगितलेली त्यांच्याकडची पद्धत फार आवडली. ती अशी की अक्षता घेऊन त्या एकापुढे एक जोडून पाटावर गणपतीची प्रतिकृती रेखायची (ती त्याला मोत्याचा गणपती म्हटली होती असं आठवतंय.) तिचीच प्राणप्रतिष्ठा आणि दीड दिवसांनी विसर्जन.

गौरींचा त्याहून निराळा प्रकार. आमच्याच एका आडनावबंधूंकडे गौर आणतात पण आमच्याकडे नाही. आजोबांना विचारलं तेव्हा आपली गौर वाघाने नेली असं उत्तर मिळाल्याचं आठवतंय. आणखी एक म्हंजे आमच्याकडे गौरींच्या पुजायच्या आदल्या दिवशी सोळा वीत सोळा मूठ आणि सोळा चिमटी असा धागा घेतात त्याला धान्याच्या लोंब्या, विड्याची पानं अशा सोळा गोष्टी गाठी मारुन बांधायच्या. हे सगळं काम सोवळ्यात. ह्या झाल्या लक्ष्म्या. गौरी पुजायच्या दिवशी मुखवट्यासोबत त्यांची पूजा करायची पण त्यांचं विसर्जन गौरींसोबतच करायला पाह्यजे असं नाही. नंतर गोडाचा नैवेद्य करुन दिवाळीच्या आत त्यांचं विसर्जन करायचं.

थोडक्यात प्रत्येकजण ज्याच्यात्याच्याकडच्या परंपरेनुसार हा उत्सव साजरा करतो असं माझं मत झालंय.

गाणेशची मूर्ती लहान असावी कि मोठी ?
आमच्या कडे आम्ही लंहानपना पासून गणपतीची मूर्ती लहानच पाहत आलो आहोत. व मंडळात असलेली मूर्ती मोठी असली तरी पार्थिव पूजनाची मूर्ती हि छोट्या स्वरुपातीलच बघावायास मिळते । त्यामागचे कारण केवळ पूजनाचे सोपस्कार करणे सोपे जावे असेच वाटते . आणि शास्रोकत पद्धतीने स्थापना करणे म्हणजे तरी काय ? केवळ गणपती ची स्तुती त्याची नावे हि सगळी संस्कृतात उच्चारणे व पंच तत्वांना आवहन करून त्या नंतर मूर्तीत चेतना जागवणे हा केवळ श्रधेचाच भाग असू शकतो . पण गणपती स्थापनेचे मुल उदीष्ट्या काय आहे ह्यावर हि जर प्रकाश टाकला गेला पाहिजे असेच वाटते . हे आपण अनेक पिढ्यान पासून करत आले आहोत आणि ते करावे किवा करू नये ह्या बद्दल अनेक मत -मतांतरे असतील . पण केवळ आनंद . उस्हाह , घरात एक प्रकारचे मंगलमय वातावरणाची अनुभूती आणी रोज वेग वेगळा प्रसाद :) ह्यासाठी का होइना ह्या गणेशाचे आगमन हे झालेच पाहीजे असे मनापासून वाटते मग ती मुर्ति मोठी असो किंवा लहान काय फरक पडतो.

गम्मतीचा भाग म्हणजे अशी प्रथा हि ऐकण्यात आहे कि गणेश चतुर्थीला जर कोणी चुकुनही चंद्र पहिला तर म्हणे त्यावर चोरीचा आळ येतो :( आणि चुक्कून पहिलाच तर त्याने दुसर्याच्या गच्चीवर त्याला न दिसत लपून दगड मरावयचा अशी पद्धत आहे हे कितपत खरे असावे :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

14 Sep 2013 - 2:18 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बालपणी कृष्णाने चतुर्थीला चंद्र बघितला आणि त्यांच्यावर मणीचा चोरल्याचा आरोप झाला होता मग त्यांनी वरीजनल मणी चोरणा-यांचा पत्ता लावून आपले निर्दोषत्व सिद्ध केल्याची गोष्ट वाचनात आहेच.

विसरुन गेलो नै तर मीही यावेळेस चतुर्थीला चंद्र नक्कीच पाहिला असता......! ;)

-दिलीप बिरुटे

-दिलीप बिरुटे

प्रचेतस's picture

14 Sep 2013 - 2:55 pm | प्रचेतस

हाहाहा.

स्यमंतक मण्याची गोष्ट.
बाकी ती गोष्ट कृष्णाच्या बालपणीची नै. तर द्वारकेतली. हरीवंशात ही कथा अगदी डिट्टेलवार आहे. पण यात चतुर्थीला चंद्र बघितला म्हणून कृष्णावर आळ येतो असा कै उल्लेख नै (निदान तसे वाचल्याचे मला आठवत तरी नै).

बाकी महाभारतात मौसलपर्वात यादव झिंगून फुल्ल्टू झालेले असतांना कृतवर्मा आणि सात्यकी जुनी भांडणे उकरून काढतात त्यात हार्दिक्य सात्यकी/ कृष्णाला भूरीश्रवाच्या अन्यायाने झालेल्या वधाची आठवण करून देतो तर सात्यकी हीच वरची स्मयंतक मण्याची गोष्ट सांगून कृतवर्म्याने कृष्णावर कसा चोरीचा आळ घेतला होता असे सांगून कृष्णाला उचकवतो आणि लगेचच हार्दिक्याचा वध करतो ते पाहून हार्दिक्याचे समर्थक यादव भोज आणि अंधक एकत्र येऊन सात्यकी आणि प्रदुम्नाचा वध करतात. मग लैच यादवी माजते आणि सर्वजण एकमेकांत लढून नष्ट होतात.

मंदार कात्रे's picture

14 Sep 2013 - 3:01 pm | मंदार कात्रे

घरात असो वा सार्वजनिक ,मोठी वा छोटी , पूजा फक्त एकाच मुर्तीची करावी . दोन कधीही नाही

घरातही पार्थिव मूर्ति असतानाही अभिशेकासाठी पितळी / चान्दी किम्वा सुवर्ण मूर्ति घेतात तेही चुकीचे आहे .

ज्या मूर्तिची प्राणप्रतिश्ठा करायची त्याच मातीच्या मूर्ति वर पायाशी पन्चाम्रुत व पाण्याने अभिशेक करून मग ते स्वच्छ कपड्याने पुसून घ्यावे. एका घरात /मखरात दोन मूर्तिन्ची पूजा करणे शास्त्रिय द्रुश्त्या सर्वथैव वर्ज्य आहे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

15 Sep 2013 - 10:17 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>> पूजा फक्त एकाच मुर्तीची करावी . दोन कधीही नाही
दोन मूर्त्यांची स्थापना का करु नये ?

-दिलीप बिरुटे

पैसा's picture

15 Sep 2013 - 12:10 pm | पैसा

माझ्या माहेरच्या घराण्याचा मूळ गाव गणपतीपुळे. गणपतीपुळे गावात महागणपती असल्यामुळे त्या गावाच्या पंचक्रोशीत आणि ते मूळ गाव असलेल्या लोकांनी पार्थिव गणपती आणू नये अशी पद्धत आहे. तो एक कायमचा महागणपती असल्याने दुसर्‍या गणपतीची प्रतिष्ठापना किंवा विसर्जन करू नये अशी पद्धत. मात्र देव्हार्‍यात नर्मदे गणपती किंवा धातूची मूर्ती कायमस्वरूपी असते ती चालते. अर्थात देव्हार्‍यातल्या गणपतीची प्राणप्रतिष्ठा आणि विसर्जन नसते हे ओघाने आलेच. पण पार्थिव गणपती नसला तरी खड्याच्या गौरी (५ खडे) मात्र आणतात आणि त्यांची पूजा नैवेद्य घरातल्या बायकाच करतात. शोधायला जाल तितक्या प्रथा आणि पद्धती सापडतील!

जिथे गणपतीच्या लहान आणि मोठ्या अशा २ मूर्ती आणतात तिथे मोठा गणपती शोभेचाच असतो. आणि पूजा लहान गणपतीची करतात.

स्पंदना's picture

18 Sep 2013 - 7:18 am | स्पंदना

नाही ग पैसाताई, माझ्या घरी अजुनही नेहमीच्या गणपतीबरोबर "टोक्या" गणपती असतो. याला सुद्धा उपवस्त्र घालायला लागते, अन त्याच्या डोक्यावर टोक असते. म्हणजे मुकुट नसतो. याला सोंडसुद्धा विशेष नसते, अन हा पुरा मातीचा एक चार इंचाचा असतो. पुजा-अर्चा सगळी तीच.पण अगदी खर सांगते प्राणप्तिष्ठा हा प्रकार मी कधीच नाही पाहिला. मेन म्हणजे आमच्या भागात कोणत्याच कार्याला ब्राह्मण बोलवत नाहीत. काय प्रकार आहे माहीती नाही, पण सगळी कार्य विदाउट ब्राह्मण घडतात.

पैसा's picture

18 Sep 2013 - 9:14 am | पैसा

नवीन प्रथा कळली. गणपतीचा पूजाविधी पाहिलास तर खरं म्हणजे मनापासून केलेली पूजा गणपतीला पोचते असंच म्हणतात. ब्राह्मणानेच पूजा केली पाहिजे हे नंतर कधीतरी त्यात घुसवलं गेलं. आत्माबुवांनी सांगितलंय तो विधी घरच्या माणसांनीच करायचा. त्यात पैसे देऊन भटजी बोलवा असं कुठे म्हटलंय? प्राणप्रतिष्ठा हा मजेशीर प्रकार आहे खरा. आपण काहीतरी विशेष करतोय हे जाणवून देण्यासाठी हा प्रकार सुरू झाला असावा. त्याचे मंत्र सुद्धा काही वेगळेच म्हणजे तंत्र मार्गाचे वाटतात!

अनिरुद्ध प's picture

18 Sep 2013 - 2:16 pm | अनिरुद्ध प

आपल्या गावात किवा पन्च्क्रोशीत कोणी पुरोहीत किवा भटजी नसावा जो कोणी गावातल्या सर्व घरान्साठी बान्धील असतो,पण फार हाल असतात त्यान्चे पहिल्या दिवशी जवळजवळ साठ पासस्ट पूजा सान्गणे म्हणजे शर्थच होते,काय आत्माराम खरे आहे ना?

अत्रुप्त आत्मा's picture

18 Sep 2013 - 5:13 pm | अत्रुप्त आत्मा

@आत्माराम खरे आहे ना? >>> हम्म्म्म्म्म,,! ज्यांच्याकडे (खेडेगाव पातळीवर) गावं सांभाळायला असतात,त्यांच्यावर अस्ते अशी अशक्य जबाबदारी! पण इकडे शहरी भागात असे नसते! मी माझ्यापुरते सांगायचे झाले तर, माझ्या कडे नको..नको..म्हणत २७ (घरच्या) गणपतिपूजा असतात.. मी दरवर्षी साधारण पहाटे ४ वाजल्यापासून तसाच्या अंतरानी १२ गणपति बसवतो.इतर ठिकाणी सहकारी लोकांना मॅनेज करतो. आणी दरवर्षी मी तेच गणपति रिपिट करत नाही,त्यामुळे या सगळ्या यजमानांना सांगितलय.. मी दर २ वर्षांनी तुमच्याकडे असणार.इतर वर्षी माझ्या टीमचे दुसरे गुरुजी! :) पण धावपळ मेली भयंकर होते या १० दिवसात! त्यात गणेश मंडळं सांभाळणं हे एक अग्निदिव्य असतं.मी ते गेली ८वर्ष बंद केलं आहे.

स्पंदना's picture

19 Sep 2013 - 7:21 am | स्पंदना

आहेत ना ब्राह्मण! नाही अस नाही. त्यांच शेत आहे, त्याला भटाची भटकी म्हणतात ;)
आहेत ब्राह्मण पण कधी कुठल्याच कार्याला त्यांना कुणी बोलावत नाही. अगदी एकाकी पडल्यासारखे असतात ते माहीला. (माही-ग्रामदैवताची यात्रा-मटन-मटन-मटन!!!)

(माही-ग्रामदैवताची यात्रा-मटन-मटन-मटन!!!)

+१११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११!!!!!!!!!!!!!!!

काय प्रकार आहे माहीती नाही, पण सगळी कार्य विदाउट ब्राह्मण घडतात.

रोचक. मध्ये द ग गोडसे यांच्या "समंदे तलाश" या लेखसंग्रहात वाचल्याप्रमाणे, प्रसिद्ध अष्टविनायकांचे मूळ पुजारी ब्राह्मणेतर गुरवच होते आणि पेशवाईच्या अधेमधे कधीतरी ब्राह्मण पुजारी नियुक्त केले गेले असे वाचले होते त्याची आठवण या निमित्ताने झाली.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

18 Sep 2013 - 4:35 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मेन म्हणजे आमच्या भागात कोणत्याच कार्याला ब्राह्मण बोलवत नाहीत. काय प्रकार आहे माहीती नाही, पण सगळी कार्य विदाउट ब्राह्मण घडतात.

हाहाहा. रोचक माहिती. काही तरी कथा नक्की असेल यापाठीमागे.

-दिलीप बिरुटे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

15 Sep 2013 - 12:11 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पुराणे ती पुराणेच. अग्निपुराण आणि भविष्यपुराणाचा गणेशाच्या निमित्तानं उल्लेख येतो. म्हणून दोन पुराणे चाळुन काढली.

अग्निपुराणात

७१ व्या अध्यायात ''गणपतिपूजनकी विधि'' सांगितले आहेत. भगवान शंकर म्हणाले कार्तिकेय ! मी विघ्नांचा नाश करण्यासाठी गणपतिपुजाची विधि सांगतो. 'गणंजयाय स्वाहा’ -दय, एकदंष्ट्राय हुं फट - अचलकर्णिने नमो नम. गजवक्त्राय नमो नम: कवच. महोदराय चण्डाय नम: डोळे आणि इतर.....गण, गुरु-पादुका शक्ती अनंत आणि धर्म आणि कमल मण्डलात पुजन करायचंचं कमलकरर्णिकाच्या बीजांची पुजा करायची. तीव्रा, ज्वालिनी, नन्दा, भोगदा, कामरुपिणी, उग्रा, तेजोवती, सत्या आणि विघ्ननाशिनी या नौ पीठशक्तींचीही पुजा करायची. नंतर चंदनाचे चुर्ण करुन आसनांची पुजा करायची. "य" शोषकवायु ’र’ अग्नि’ 'लं’ प्लव (पृथ्वी) आणि वं यांना अमृताचे बीज मानले आहे. ऒम लम्बोदराय विद्महे महोदराय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात हा गणेशाचा गायत्री मंत्र आहे. गणपति, गणाधिप, गणेश, गणनायक, गणक्रीड, वक्रतुण्ड, एकदंश, महोदर, गजवक्त्र, लम्बोदर, विकट, विघ्ननाशन, धूम्रवर्ण तथा इन्द्र आणि दिक्पाल या सर्वांची पूजा गणपतिच्या पूजेच्या वेळेस पूजन करावे. (अग्निपुराणात मूर्तीबद्दल काही सापडले नाही) (टंकण्यात लैच मिष्टेक आहेत. मान्य)

भविष्यपुराण

यज्ञ आणि संबंधित कर्मकांडासाठी वेद प्रमाण मानले पाहिजेत. गृहस्थांसाठी स्मृर्त्या प्रमाण मानल्या पाहिजेत. वेद आणि स्मृतीशास्त्र (धर्मशास्त्र) या दोन्हींचा समन्वय पुराणात आहे. (इति. भविष्यपुराण)
अर्थात आता पुराणात गणेशपुजनाच्या बाबतीतल्या ब-याच कथा आहेत. राजा शतानिक आणि सुमन्तीमुनीच्या प्रश्न उत्तराने ही कथा रंगते.

विघ्नहर्त्यांच्या ऐवजी विघ्नकर्ता या गणेशाने जेव्हा कार्तिकेय स्त्री आणि पुरुषांमधे काही लक्षणं भरत होता तेव्हा या गणेशाने येऊन विघ्न घातला आणि रागाच्या भरात कार्तिकेयने त्याचा एक दात मोडला तेव्हा शंकर भगवान आले आणि कार्तिकेयाला म्हणाले बेटा, असं का करतोय मग त्याने सांगितले की मी असं असं करत होतो आणि गणेशाने विघ्न घातले. शंकर हसत म्हणाले बेटा, सांग बरं पुरुषाची लक्षणं तु जर बनवली आहेत तर पुरुषाच्या लक्षणातील माझ्यात कोणती लक्षणं आहेत, तेव्हा कार्तिकेय म्हणाला की तुम्ही संसारात कपालिका नावाने प्रसिद्ध व्हाल. गेलं इथून शंकराचा मूड बिघडला त्याने ही गोष्ट ऐकून पुरुषाच्या लक्षणाचं बाडबिस्तर उचललं आणि समुद्रात दिलं फेकून... पुढे शंकराचा राग शांत झाल्यावर समुद्राला म्हणाले आण बाबा इकडे दप्तर आणि आता तु स्त्रीयांच्या आभुषणाच्या लक्षणाची रचना कर आणि मग पुढे तेच सामुद्रिक शास्त्र म्हणून प्रसिद्धीला येईल असे ते म्हणाले. पुढे विघ्नकर्त्याचा दात कार्तिकेयेने परत केला. आणि तेव्हा सुमन्ती मुनीने सांगितले की विनायकाच्या हातात दात असलेल्या प्रतिमेचे पुजन होईल. गणेशाची ही कथा सर्वांना ऐकावी असे केल्याने अशी पूजा करणा-यावर देवलोक आणि भूततलाववर कोणतेही संकटं येत नाही तो पराभूत होत नाही. ऋद्धि, वृद्धी, ऐश्वर्य प्राप्त होतं (इति. भविष्यपुराण)

वरील उता-यावरुन लक्षात येते की गणेशाच्या कोणत्या मूर्तीचे पूजन होईल तर ज्या विनायकाने हातात दात धरलेला आहे, अशा मूर्तीचे पूजन व्हावे. सर्वौषधी, सुंगंधित द्रव्यासहित भद्रासन बसून शंकर पार्वतीची आणि गणेशाची पूजा करावी. शेवटी ब्राह्मणाला वस्त्र आणि दक्षिणा द्यावी, असे केल्याने सर्व कर्माचे फळ आणि सिद्धी मिळते. (हे मात्र बरंय राव)

अग्णिपुराणातली एक गोष्ट मला आवडली. गणेशाच्या आराधनेत कोणत्याही व्रत वैकल्याशिवाय श्रद्धेने व भक्तीभावाने पुजा केल्यास सर्व फळ मिळतात. ''कामना भेद से अलग अलग वस्तूओसे गणपति की मूर्ती बनाकर उसकी पूजा करणेसे मनोवाच्छित फल की प्राप्त होती है” पाच अथवा दहा तोळ्याच्या सोन्याची मूर्ती करुन पूजा केल्यास उत्तमच.

असो, भविष्यपुराण आणि अग्निपुराणातुन मूर्ती कशी असावी त्याबाबत काही हाती लागले नाही. मूर्तीतून गुणांचे आदानप्रदान व्हावे, कर्मकांडात न अड्कता श्रद्धेमुळे आनंद वाढत असेल, रुटीन जगण्यात चैतण्य सळसळणार असेल, तरच अशा उत्सवांना आणि त्याच्या मूर्त्यांना अर्थ राहील असे वाटते.

सर्व पुराणांचे पीडीएफ स्वरुपातील दुवे.

चर्चेत सहभागी चर्चकांचे आणि वाचकांचे आभार.

-दिलीप बिरुटे

दादा कोंडके's picture

16 Sep 2013 - 10:56 am | दादा कोंडके

गणेशाची स्थापना. मूर्ती एक की दोन ? लहान की मोठी ?
प्रेषक, प्रा.डॉ.दिलीप बिरुटे,

असे प्रश्न पडणारे धन्य ते प्राध्यापक आणि त्यांचे विद्यार्थी. बाबा-बुवा-अम्मा यांच्या मागं लागणारा किडका समाज तयार करणार्‍यांचं श्रेय खूप प्रमाणात शिक्षक आणि प्राध्यापकांना (हो हो तेच वेतनवाढीसाठी सारखे संपावर जाणारे :) ) जातं.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

16 Sep 2013 - 1:05 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कोंडकु बाळा, एवढ्याशा प्रश्नावरुन स्वर्ग गाठण्याचा प्रयत्न आवडला. आमच्या विद्यार्थ्यांना आम्ही अभ्यासक्रमात असेल ते सांगूच आणि आलाच विषय तर अनेक गोष्टींची माहिती पुरवू. बाकी, राहीला व्यक्तिगत रोखाच्या बाबतीत प्रश्न तर आपल्याला सांगितलं पाहिजे की मी अनेकदा आधुनिक बांधिलकीच्या गोष्टी केल्या आहेत आपण ते कधी शोधलं नसेल वाचलं नसेल.... समाजाला उत्तम ते देण्याचा प्रयत्न केला आहे. आणि मी तर पडलेल्या प्रश्नांचा उत्तम शोधही घेतला आहे.

चर्चा प्रस्ताव आवडला नाही. अनावश्यक विषय आहेत. असे उत्सव अवडंबर आहेत, असं काही म्हटलं असतं तर समजलं असतं. पण, समाजात आपल्यासारखे किडके विचारांचे लोकही असतातच. काहीही न वाचता शेंडी ना बुडुखचा आधार नसतांना आपलं पुरोगामीत्त्व सिद्ध करायच्या मागे लागतात त्याचे आश्चर्य नाही. काही न वाचता टीका करण्याचा नाद असतो. पण, चालायचंच.

मूर्तीतून गुणांचे आदानप्रदान व्हावे, कर्मकांडात न अड्कता श्रद्धेमुळे आनंद वाढत असेल, रुटीन जगण्यात चैतण्य सळसळणार असेल, तरच अशा उत्सवांना आणि त्याच्या मूर्त्यांना अर्थ राहील असे वाटते.

हे जर वाचलं असता तर प्रश्न पडला नसता... असो. आपल्या बुद्धीची दया आली. लवकर बरे व्हा...!!!

-दिलीप बिरुटे

दादा कोंडके's picture

16 Sep 2013 - 1:45 pm | दादा कोंडके

कोंडकु बाळा, एवढ्याशा प्रश्नावरुन स्वर्ग गाठण्याचा प्रयत्न आवडला. आमच्या विद्यार्थ्यांना आम्ही अभ्यासक्रमात असेल ते सांगूच आणि आलाच विषय तर अनेक गोष्टींची माहिती पुरवू. बाकी, राहीला व्यक्तिगत रोखाच्या बाबतीत प्रश्न तर आपल्याला सांगितलं पाहिजे की मी अनेकदा आधुनिक बांधिलकीच्या गोष्टी केल्या आहेत आपण ते कधी शोधलं नसेल वाचलं नसेल.... समाजाला उत्तम ते देण्याचा प्रयत्न केला आहे. आणि मी तर पडलेल्या प्रश्नांचा उत्तम शोधही घेतला आहे.

अच्छा. मग ठिक आहे. पुढचा प्रश्न, जास्त पावरबाज डाव्या सोडेचा गणपती की उजव्या सोडेचा गणपती असतो? हा आहे का? ;)

चर्चा प्रस्ताव आवडला नाही. अनावश्यक विषय आहेत. असे उत्सव अवडंबर आहेत, असं काही म्हटलं असतं तर समजलं असतं. पण, समाजात आपल्यासारखे किडके विचारांचे लोकही असतातच.

हॅ हॅ, अहो ही आमच्या शिक्षकांची आणि प्राध्यापकांची कृपा.

काहीही न वाचता शेंडी ना बुडुखचा आधार नसतांना आपलं पुरोगामीत्त्व सिद्ध करायच्या मागे लागतात त्याचे आश्चर्य नाही. काही न वाचता टीका करण्याचा नाद असतो. पण, चालायचंच.

मूर्तीतून गुणांचे आदानप्रदान व्हावे, कर्मकांडात न अड्कता श्रद्धेमुळे आनंद वाढत असेल, रुटीन जगण्यात चैतण्य सळसळणार असेल, तरच अशा उत्सवांना आणि त्याच्या मूर्त्यांना अर्थ राहील असे वाटते.

हे जर वाचलं असता तर प्रश्न पडला नसता... असो.

प्रश्न आम्हाला नै हो तुम्हाला पडलाय.

ऑन अ सिरियस नोट. आपला व्यासंग अनेक धाग्यामधून आणि प्रतिसादामधून बघितला आहे. संतवांडमयापासून ते मोबाईलच्या नव्या तंत्रज्ञानापर्यंत तुम्हाला बरंच माहिती आहे. त्याबद्द्ल मला आपलं कौतुकच वाटतं. नवनवीन माहिती मिळवत रहाणं आणि तुमच्या मुद्द्याचं व्यवस्थित खंडन केल्यावर प्रांजळपणे एखाद्या गोष्टीबद्दल मत बदलण्याचा तुमचा दिलदारपणासुद्धा काही धाग्यातून बघितलाय. पण अगदी मनापासून विचारतो, शिक्षक आणि प्राध्यापकांना वैयक्तीक जीवनात आणि पब्लिक फोरम वरती आमच्या सारख्या मॅगो पिपल पेक्षा थोडसं दक्ष रहायला एव्हडं अवघड जातं का? ही लोकं समाजाच्या सद्ध्याच्या परिस्थिचं थोडंसुद्धा उत्तरदायित्व स्विकारत का नाहीत? आपल्याकडून अगदी भाषाशुचितेचा किंवा विवेकाचा थोडासा जास्तं आग्रह धरल्यावर एव्हडं चवताळून का जातात?

आपल्या बुद्धीची दया आली. लवकर बरे व्हा...!!!

ही दोन वाक्य अजिबात आवडली नाहीत.

>>>>शिक्षक आणि प्राध्यापकांना वैयक्तीक जीवनात आणि पब्लिक फोरम वरती आमच्या सारख्या मॅगो पिपल पेक्षा थोडसं दक्ष रहायला एव्हडं अवघड जातं का? ही लोकं समाजाच्या सद्ध्याच्या परिस्थिचं थोडंसुद्धा उत्तरदायित्व स्विकारत का नाहीत? आपल्याकडून अगदी भाषाशुचितेचा किंवा विवेकाचा थोडासा जास्तं आग्रह धरल्यावर एव्हडं चवताळून का जातात?

बिरुटे सर उत्तर देतीलच.
बाकी त्यांनी देखील दया अथवा कीव हे शब्द वापरायला नको होते असं आमचं मत.
(दादा कोंडके नामाभिधान घेतलेल्या कडून आणखी काय अपेक्षा करणार असं विचारण्याचा मोह टाळतो आहे.)

शिक्षक अथवा प्राध्यापक कुटुंबाचा एक सदस्य असतो नि कु टुंबामध्ये काही कारणाने सुरु झालेली प्रथा सांभाळण्याचा अथवा जुनी परंपरा जपण्याचा प्रयत्न करत अस्तो. देव न मानणारे 'जाहीर नास्तिक कम्युनिस्ट' निव्वळ कुटुंबियांच्या 'प्रेमापोटी' श्राध्द घालताना सापडतात त्यापेक्षा शिक्षक, प्राध्यापकांची ही प्रश्नार्थक भूमिका कितीतरी पटीनं चांगली आहे.

विवेकानं वागायचं म्हणजे काय? घरच्या वृद्ध व्यक्तींचा अपमान करुन (कारण त्यांनी परंपरा जपलेल्या असतात), योग्य चर्चा न करता, त्यांना न जुमानता परंपरांना मोडीत काढण्याचा प्रयत्न करायचा?

सरांनी इथं काय केलं? एक चर्चाप्रस्ताव टाकला जो तुमच्या आमच्या कडून माहिती मिळवू शकेल. अशी माहिती मिळाल्यावर त्यांना वाटेलसं योग्य वर्तन करतील की ते.

फुटकळ सिनेनट नट्यांना, ऐपतीपेक्षा जास्त पैसे मिळतात तेव्हा लोक विचारत नाहीत. ते अडून बसतात तेव्हा चालतं मग सर लोकांनी संप केला तर बिघडलं कुठं? समाज घडवण्याचा ठेका काय त्यांनीच घेतलाय काय?

विद्यार्थी शाळे/ कॉलेजाबाहेर १० तास असतो नि शाळेत कॉलेजात ५-६ तास. (झोपेचे तास वगळून)
५-६ तासातला एक तास एक शिक्षक एका दिवसात ५० जणांना शिकवतो. एकच शिकवतो. घरात २ पोरांना १० तास आईवडील शिकवतात. त्यातली किती चांगली निघतात?
घ्या हो सर तुम्ही आणखी पगार वाढ घ्या.

बॅटमॅन's picture

16 Sep 2013 - 10:02 pm | बॅटमॅन

प्रतिसादाशी बर्‍याच अंशी सहमत. धागा टाकणारा प्राडॉ असो अथवा दहावी नापास, मुद्दा अन सूर महत्त्वाचा. इथे तसे आक्षेपार्ह दिसत नाही काही. हां आता वैयक्तिकरीत्या ही चर्चा मलाही अंमळ हुकलेली वाटते पण त्याने काही कुणाचे बिघडत नाही किंवा अंधश्रद्धेला नत्र-स्फुरद-पालाशदेखील मिळत नाही. त्यामुळे या चर्चाप्रस्तावाबद्दल खास काही मत नाही. एकूण सूर पाहता प्रतिकूल तर नाहीच नाही.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

17 Sep 2013 - 9:45 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>> धागा टाकणारा प्राडॉ असो अथवा दहावी नापास, मुद्दा अन सूर महत्त्वाचा. इथे तसे आक्षेपार्ह दिसत नाही काही.
धन्स...!

>>>> हां आता वैयक्तिकरीत्या ही चर्चा मलाही अंमळ हुकलेली वाटते पण त्याने काही कुणाचे बिघडत नाही किंवा अंधश्रद्धेला नत्र-स्फुरद-पालाशदेखील मिळत नाही.

चर्चेचे जालावर विविध प्रकार मी आता बरेच पाहिले आहेत. काथ्याकूट टाकून वेळ जात नाही म्हणुनचे धागे. गम्मत बघत बसायचे म्हणुनचे धागे, माहितीची आदानप्रदानाचे धागे. ओळी दोनोळीचे काथ्याकुट. प्रस्ताव नीट नसला तरी उत्त्म उंचीवर गेलेले धागे. आणि राहीलं या धाग्याचे म्हणाल तर समीश्र अशी स्वरुपाची माहिती मिळाली, मला वाटतं आलेल्या प्रतिसादांनी माझं तरी समाधान झालं आहे. या आणि अशा अनेक उत्तम धाग्यांचे काथ्याकुट मिपावर झाले आहेत. चर्चा अंमळ हुकणे हे तसे 'कोना' वर अवलंबून असलेली गोष्ट आहे. माझा उद्देश माहिती घेणे हाच होता. पारंपरिक विचारांचा प्रसार प्रचार नव्हता हे एव्हाना लक्षात आले आहे, तसे तुम्ही म्हणालाही आहात. माझा उद्देश मला सफल झाल्यासारखा वाटतो. मूर्तीपुजेच्या आकाराच्या बाबतीत शास्त्रीय अशास्त्रीय असे काही नसते, हे या काथ्याकुटाचं सार आहे.

आपण नेहमीच म्हणतो की मानव हा बुद्धियुक्त प्राणी आहे. मानवाच्या जीवनाच्या अगदी सुरुवातीच्या काळापासून तर ते चालू क्षणापर्यंत माणूस ज्ञान मिळविण्याचा प्रयत्न करत असतो, त्याचे तसे प्रयत्न चाललेले असतात (अपवाद असतीलच) भोवतालच्या आजूबाजूच्या घटनांचे संबंध जाणून घेण्यात अनेकांना रस असतो. कारण संबंधित घटकांमुळे ज्ञानाबरोबर मिळणारे आनंद आणि असणारे दु:ख याचा एक शोध माणुस घेत असतो, असे मला वाटते.

मूर्ती लहान असावी की मोठी याच्यातही माणूस रुढी, प्रथा पाळतांना दिसतो आणि मिळणा-या आनंदासोबत होणा-या चुकांचा बाबतीच चुकचुकतांना दिसतो. यात शास्त्रीय अशास्त्रीय असे काही नसते पण माणुस बनलाय मोठ्या गमतीदार नमुन्याचा. असंख्य अशा पारंपरिक गोष्टी एकीकडे करायच्या आहेत पण त्या गोष्टीत तरी किती तो डोळस असतो हेच आपण आपल्या विवेकाद्वारे बघायचे आहे.

माझं म्हणाल तर मी कधीही पुराणं चाळली नाहीत, या निमित्तानं मला वाचायला मिळालं. शोधता आलं. भविष्यपुराणात असं म्हटलं आहे आणि अग्निपुराणात असं म्हटलं आहे. मला वाचतांना मोठी मौज वाटत होती. पडलेले प्रश्न विचारलेच पाहिजेत नाही का, खरं तर मी उद्या ऋणादान म्हणजे काय ? असाही धागा काढू शकतो. आणि याबाबतीत शास्त्र काय म्हणते, धर्म काय म्हणतो, तेही विचारेल. असं विचारलं म्हणजे मी प्रतिगामी ठरत नाही. धाग्याचे शीर्षक पाहून काय तुम्ही मला 'तुम्ही काय आम्हाला कर्ज घ्यायचे आणि फेडायचे कसे' हे धर्मनियमानुसार शिकवित आहात काय असे म्हणाल काय...! नाही, म्हणनार. सार्वजनिक रस्त्यावर बैलगाड्या उभी करुन रहदारीला अडथला आणू नये, असे शास्त्रकारांनी म्हटलं होतं. अडचणीत नसतांना सार्वजनिक रस्त्यावर मलविसर्जन करु नये, असे शास्त्र म्हणते. गुरु, शिक्षक, आणि राजांना रस्त्यावर अगोदर पुढे जाऊ द्यावे, असे शास्त्र म्हणते. शास्त्राचे सर्व सोडून द्या. शिक्षकाला कमीत कमी चूक असेल किंवा बरोबर पण प्रश्न विचारण्यासाठी तरी मिपावर पुढे येऊ द्या....! :)

मराठवाडा मुक्तिदिनाच्या सर्वांना शुभेच्छा....!

-दिलीप बिरुटे

बाळ सप्रे's picture

23 Sep 2013 - 1:34 pm | बाळ सप्रे

धागा टाकणारा प्राडॉ असो अथवा दहावी नापास, मुद्दा अन सूर महत्त्वाचा

मुद्दा अन सूर महत्वाचा बरोबर पण
बाबाबुवांच्या दरबारातले पंतप्रधान, मंत्रीगण जसे खटकतात तसेच हे देखिल..
बाकी किडका वगैरे शब्द जरा जास्तच बोचरे वाटले त्यामुळे रोख वैयक्तिक वाटतो. वेतनवाढीचा उल्लेख तर पूर्णपणे अनावश्यक.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

24 Sep 2013 - 6:45 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>> बाबाबुवांच्या दरबारातले पंतप्रधान, मंत्रीगण जसे खटकतात तसेच हे देखिल..

आता यातले ’हे’ म्हणजे आम्ही (आम्ही म्हणजे शिक्षक, डॉक्टर, अभियंते, वगैरे इ.) असू तर आता सांगण्यास आनंद वाट्तो की काही दिवसापासून मिपावरच्या पुरोगामीच्या चर्चा वाचून वाचून मी तरी बाबाबुवांपासून आणि पारंपरिक परंतु माणुसपण नाकारणा-या विचारांपासून हळुहळु दूर चाललो आहे.

>>>> बाकी किडका वगैरे शब्द जरा जास्तच बोचरे वाटले त्यामुळे रोख वैयक्तिक वाटतो. वेतनवाढीचा उल्लेख तर पूर्णपणे अनावश्यक.

Thanks Sir.....!

-दिलीप बिरुटे

दादा कोंडके's picture

17 Sep 2013 - 10:14 am | दादा कोंडके

(दादा कोंडके नामाभिधान घेतलेल्या कडून आणखी काय अपेक्षा करणार असं विचारण्याचा मोह टाळतो आहे.)

वरील वाक्य आवडलं नाही.

शिक्षक अथवा प्राध्यापक कुटुंबाचा एक सदस्य असतो नि कु टुंबामध्ये काही कारणाने सुरु झालेली प्रथा सांभाळण्याचा अथवा जुनी परंपरा जपण्याचा प्रयत्न करत अस्तो. देव न मानणारे 'जाहीर नास्तिक कम्युनिस्ट' निव्वळ कुटुंबियांच्या 'प्रेमापोटी' श्राध्द घालताना सापडतात त्यापेक्षा शिक्षक, प्राध्यापकांची ही प्रश्नार्थक भूमिका कितीतरी पटीनं चांगली आहे.

एखाद्या पोलिसानी चोरी केली किंवा डॉक्टरने रुग्णाचं मूत्रपिंड काढून घेतल्यावर कुणितरी निषेध करायला जावा तर शेवटी पोलिस/डॉक्टर म्हणजे एक माणसेच आहेत. आणि उलट समाजात काही चोरी न करणारी आणि मूत्रपिंड न काढून घेणारी लोकं तर बलात्कार आणि खून करतात, असलं काहितरी जस्टीफिकेशन देण्यासारखं वाटलं.

विवेकानं वागायचं म्हणजे काय? घरच्या वृद्ध व्यक्तींचा अपमान करुन (कारण त्यांनी परंपरा जपलेल्या असतात), योग्य चर्चा न करता, त्यांना न जुमानता परंपरांना मोडीत काढण्याचा प्रयत्न करायचा?

विवेक म्हणजे अपमान, चर्चा न करणं हे कुठून आलं?

सरांनी इथं काय केलं? एक चर्चाप्रस्ताव टाकला जो तुमच्या आमच्या कडून माहिती मिळवू शकेल. अशी माहिती मिळाल्यावर त्यांना वाटेलसं योग्य वर्तन करतील की ते.

हे बरंय. मग वरतीच माझ्या प्रतिसादात म्हणल्याप्रमाणे जास्त पावरबाज गणपती कोणता? हा प्रश्न विचारून, वर उत्तर मिळाल्यावर योग्य ते वर्तन करतीलच असही म्हणाल.

फुटकळ सिनेनट नट्यांना, ऐपतीपेक्षा जास्त पैसे मिळतात तेव्हा लोक विचारत नाहीत. ते अडून बसतात तेव्हा चालतं मग सर लोकांनी संप केला तर बिघडलं कुठं? समाज घडवण्याचा ठेका काय त्यांनीच घेतलाय काय?

परत एकदा अजुन वाईटाची तुलना करून हे कसं समर्थनिय हे सांगण्याचा प्रयत्न.

विद्यार्थी शाळे/ कॉलेजाबाहेर १० तास असतो नि शाळेत कॉलेजात ५-६ तास. (झोपेचे तास वगळून)
५-६ तासातला एक तास एक शिक्षक एका दिवसात ५० जणांना शिकवतो. एकच शिकवतो. घरात २ पोरांना १० तास आईवडील शिकवतात. त्यातली किती चांगली निघतात?

तासांचे हिशेब सांगू नका. फारसं जग न बघितलेल्या मुलांचे रोल मॉडेल शिक्षक आणि प्राध्यापक असतात. त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात प्रभाव असतो.

घ्या हो सर तुम्ही आणखी पगार वाढ घ्या.

वरचंही वाक्य आवडलं नाही.

तुमचा मुद्दा बरोबर आहे मात्र सांगण्याची पद्धत साफ चुकीची आहे.

>>> वरील वाक्य आवडलं नाही.
मला तुमचा अ‍ॅटिट्युड आवडला नाही. किडकी मेंटॅलिटी वगैरे. गणपती सजावटीच्या धाग्यावर देखील हा अ‍ॅटीट्युड दिसतो आहे.
उत्सव साजरे करणं मान्य नाही ते मूर्खपणाचं मात्र पार्ट्या अगदी रिलिजियसली आठवड्याला, आऊटींग श्राद्धाप्रमाणे दरसाल करणार, 'तीर्थप्रसाद' महिन्यातून. असं 'रुटीन' असतं. नि त्यात पुरोगामीत्व दिसतं असं आहे का? कुणाला कशात आनंद मिळेल ह्याबद्दल कोणी सांगू नये. आपण का निष्कर्ष काढताय?

>>>एखाद्या पोलिसानी चोरी केली किंवा डॉक्टरने रुग्णाचं मूत्रपिंड काढून घेतल्यावर कुणितरी निषेध करायला जावा तर शेवटी पोलिस/डॉक्टर म्हणजे एक माणसेच आहेत. आणि उलट समाजात काही चोरी न करणारी आणि मूत्रपिंड न काढून घेणारी लोकं तर बलात्कार आणि खून करतात, असलं काहितरी जस्टीफिकेशन देण्यासारखं वाटलं.

अ‍ॅनालॉजी सपशेल हुकलेली आहे. माझं उदाहरण चुकलेलं असेल मान्य मात्र तुमचं चुकलेलं आहेच. कारण माझ्या उदाहरणात कुणालाही अर्थाअर्थी नुकसान होत नाही. ठीक आहे आर्थिक तोशीस समजून उमजून सोसली जाते. चोरी, खून, बलात्कारानं माणसांचं नुकसान होतं. तुम्ही वैचारिक नुकसान वगैरे म्हणत असाल तर चर्चांमधून उद्बोधन हा पूर्वीपासूनच सगळेच करत आलेत. रुढी मोडून उपयोग होत नाही, नवीन रुढी स्वीकारली जात नाही. मुळासकट बदल झाला तर नि तरच रुजते.

बाकी मुद्दे नंतर खरडवहीत बोलेन. वेळ मिळाल्यावर!

प्यारेकाकांच्या फ्यानक्लबात आपली एन्ट्री.

स्पंदना's picture

18 Sep 2013 - 7:26 am | स्पंदना

सरांनी इथे चर्चा प्रस्ताव नुसता टाकलाच नाही तर त्याबद्दल जास्तीचे वाचुन मिळालेली माहीतीही इथे शेअर केली.
प्रत्येक गोष्टीला परंपरा म्हणुन आग लावायची काही गरज आहे का? राखल्या आपल्या गोष्टी तर काही बिघडणार आहे का? किती वेगवेगळ्या प्रथा कानावर पडल्या, किती वेगवेगळे मुद्दे मांडले गेले, याचा विचार नाही. काय तर फक्त तुम्ही प्राध्यापक आहात. आहेतच ते प्र-अध्यापक, दिसुन येतच ते.