गाभा:
नमस्कार मंडळी,
मिसळपाव सदस्यांकडून एक मदत हवी आहे.
माझ्या पतिदेवाना एका नवीन नोकरीची संधी चालून आली आहे. जॉब साईट केनिया किंवा ब्राझिल यांपैकी एक असेल. साधारण एक ते दीड वर्षासाठी पाठवणार आहेत. आमच्यापैकी कोणालाही परदेश प्रवासाचा अनुभव नाही. त्यातून एकदम नोकरीसाठी जाणे म्हटल्यावर अनेक प्रश्न मनात आलेत. त्यामुळे मग मिपाची मदत घेण्याचे ठरवले.
पहिला प्रश्न असा की वरील निर्देशित देशांमधे दरमहा साधारण खर्च किती येतो (रुपयांमधे). (पगाराच्या मागणीसाठी जरूरी माहिती).
तसेच प्रवासासाठी आवश्यक पूर्वतयारी काय करायला हवी? (परदेश प्रवासाच्या बाबतीत आम्ही साक्षात "ढ ' असल्यामूळे) अगदी बारीक सारीक माहिती, आवश्यक सूचना, धोके, ई. सर्व बाबतीत येथील जाणकारांनी मदत करावी ही विनंती.
आपल्यापैकी कोणी केनिया किंवा ब्राझिल या देशांमधे वास्तव्याला आहे का?
धन्यवाद
प्रतिक्रिया
5 Sep 2013 - 8:18 pm | मुक्त विहारि
१. केनिया असो अथवा ब्राझिल अथवा या प्रुथ्वी तला वरील कोणताही देश.. तो भारतापेक्षा नक्कीच सुखावह असतो..
२. शक्यतो अमेरिका. युरोप , न्युझीलंड आणि ऑस्ट्रेलिया शिवाय इतर देशात १ ते २ वर्षांसाठी फॅमिली न नेणे चांगले. सेव्हिंग जास्त होते.
३. खालील साईट वर जा..
http://www.expatriates.com/
मी सौदीला असतांना ह्याच साईटचा वापर करून घर मिळवले होते.कुणालाही एक नवा पैसा पण न देता.फुकट आणि भरवशाची साईट आहे.
४. परदेश प्रवास जेव्हढा बिंधास्त पणे करता येईल तेवढा करा.जास्त सामान नेवू नका.भारतीय वस्तू मिळणारी दुकाने (अगदी नारळा पासून ते चिंचे पर्यंत आणि पोळ्पाटा पासून ते पाटा वरवंट्या पर्यंत) सगळ्या मोठ्या शहरांत असतात. केनिया आणि ब्राझिल मध्ये गुज्जू वस्ती बर्यापैकी असल्याने खाण्याचा प्रॉब्लेम यायचे शक्यता कमी आहे.
५. जातांना कमीत कमी सामान नेणे. तर येतांना काहीच न आणणे हा प्रवासाचा मुलमंत्र आहे.. पुण्यात आणि मुंबईला जर एखादी गोष्ट मिळत नसेल तर ती जगांत कुठेही मिळत नाही ह्यावर माझा तरी ठाम विश्वास आहे..
5 Sep 2013 - 8:28 pm | श्रीरंग_जोशी
ज्येष्ठ मिपाकर विलासराव यांनी त्यांच्या ब्राझिल भेटीबाबत १० भागांची लेखमालिका लिहिली आहे. ती अवश्य वाचा.
http://www.misalpav.com/node/13708
एक सूचना - शीर्षक अधिक स्पष्ट हवे, माहिती केनिया / ब्राझिल येथे नव्याने वास्तव्य करण्यासाठी हवी आहे असे दिसते.
शुभेच्छा!!
15 Sep 2013 - 12:51 pm | चित्रगुप्त
तुम्हाला कदाचित या गोष्टी ठाऊकच असतील, तरी लिहितो आहे:
१. कोणतीही बॅग बाहेरून चेनचे कप्पे/खिसे असतील अशी घेऊन नका. (तुमच्या नकळत कोणी ड्रग्स वगैरे ठेवू नयेत म्हणून). शिवाय एयरपोर्टवर बॅगांना संपूर्णपणे प्लास्टिकने सीलबंद करण्याची सोय असते ते करून घ्या.
२. खसखस वा खसखस लावलेले पदार्थ ( अनारसे इ.) नेऊ नका. खसखस म्हणजे अफूच्या बिया असल्याने कित्येक देशात त्यावर बंदी असून कडक शिक्षा असते.
३. एयरपोर्टवर खरेदी केलेल्या प्रत्येक वस्तूची पावती सांभाळून ठेवा. मुख्य म्हणजे अशी खरेदी करण्याच्या जागी कुणी लहान मुलाला चॉकलेट वगैरे, वा अन्य अगदी किरकोळ वस्तु जरी 'फ्री गिफ्ट' म्हणून दिली, तर अजिबात घेऊ नका.
काही देशात हे एक फार भयंकर जाळे आहे, त्यात सहजपणे लोक अडकतात.
४. खरेदी करताना तुम्ही पेमेंट करत असताना कुणी घाईघाईत येऊन काही विनंती वगैरे केली तर सावध रहा. त्यांना मदत करण्याच्या भानगडीत पडू नका. तुमचा पासपोर्ट दाखवून अन्य कुणाला काही खरेदी करून देऊ नका.
15 Sep 2013 - 4:08 pm | डॉ सुहास म्हात्रे
अजून काही...
५. तुमच्या सामानाचे वजन कमी असले आणि म्हणून दुसर्या कोणी अनोळखी व्यक्तीने पैसे (एक्सेस लगेज चार्ज) वाचविण्यासाठी त्यांचे काही सामान तुमच्या सामानाबरोबर चेक् इन करा म्हटले तर अजिबात म्हणून हो म्हणू नका... हा मार्ग अंमली पदार्थांच्या तस्करीसाठीही वापरला जातो. पकडले गेलात तर "ही माझी बॅग नाही" हे विधान तुम्हाला वाचवू शकत नाही. बर्याचे देशांत याला फार कडक शिक्षा आहेत... सौदी अरेबियात तर देहदंड आहे.
६. पैशाचे पाकीट, पासपोर्ट आणि इतर महत्वाच्या गोष्टी कधिही काऊंटर अथवा टेबलावर ठेऊ नका... खिश्यात अथवा हातातल्या बॅगेत/पिशवितच ठेवा. काहितरी चौकशी करून बोलण्यात गुंतवून अशा गोष्टी लंपास करणे विरळ गोष्ट नाही.
15 Sep 2013 - 4:12 pm | डॉ सुहास म्हात्रे
परंतू काही मूलभूत काळजी घेतली तर परदेश प्रवासात घाबरण्यासारखे काही नाही... उलट खूप मजा येईल. उगाच खूप काळजी करून तिला मुकू नका :)
15 Sep 2013 - 5:57 pm | प्रसाद गोडबोले
उलट खूप मजा येईल. उगाच खूप काळजी करून तिला मुकू नका
>> +१