नमस्कार! मला एका महत्वाच्या विषयावर मदत हवी आहे कृपया मदत करा…
माझी आई वय वर्षे ७९, तिला २००४ साली एक हार्ट अटेक आला होता त्या नंतर यावर्षीच्या संक्रांतीपर्यंत तिला फ़ारसा त्रास झाला नाही अर्थात त्यासंबंधी गोळ्या नियमीत चालू होत्या.
अशी स्थिती असताना किंक्रांतीच्या दिवशी तिला अस्वस्थ वाटू लागले श्वास घेताना त्रास होऊ लागला म्हणून हॊस्पिटलमध्ये दाखल केले असता तिथे एक दिवस ठेवण्यात आल्यानंतर डॊक्टरांनी घरी सोडले.
या वेळी तिला नायट्रोग्लिसरीन सलाईनद्वारे देण्यात आले.
त्याच्या दुसयाच दिवशी तोच त्रास पुन्हा सुरू झाल्याने तिला पुन्हा हॊस्पिटलमध्ये दाखल केले असता हार्टऎटॆकचे निदान डॊक्टरांनी केले, यावेळी तिला ३ दिवस हॊस्पिटलमध्ये ठेवण्यात आले.
यावेळी देण्यात आलेल्या ट्रीटमेंटमध्ये प्रामुख्याने स्ट्रेप्टोकायनेज, नायट्रोग्लिसरीन व लो मॊलिक्युलर वेट हिपारीनचा समावेश होता.
त्यानंतर तिला किमान पाच ते सहा वेळा तोच त्रास पुन्हा उदभवल्याने हॊस्पिटलमध्ये दाखल करावे लागले. या प्रत्येक वेळी तिला देण्यात आलेल्या ट्रीटमेंटमध्ये प्रामुख्याने नायट्रोग्लिसरीन व लो मॊलिक्युलर वेट हिपारीनचा समावेश होता. शेवटच्या वेळी तिला घरी आणल्यानंतर दुसर्या दिवसापासून जोरात दम लागू लागला अक्षरश: कफ़ दाटल्याप्रमाणे घुर्रघुर्र आवाज येत होता. यावेळी तिला पुन्हा हॊस्पिटलमध्ये नेले असता हे काय होते आहे ते मला कळत नाही तुम्ही पेशंटला अन्यत्र हलवा असा सल्ला डॊक्टरांनी दिल्यांने आम्ही तिला पिंपरी येथील डी.वाय.पाटील हॊस्पिटल व रीसर्च संटरमध्ये दाखल केले २८ मार्च ते ३० मार्च या कालावधीत ती आयसीयुमध्ये दाखल होती त्या वेळेच्या डीस्चर्ज कार्डवरून तेथील डॊकटरांनी हायपरटेशंन व अन्युट्रोसेप्टल एम आय असे निदान केल्याचे दिसते. यावेळी तिला
लॆसिक्स २०, सकाळी---दुपारी
एकोस्प्रिन ७५, दुपारी
इस्मो १०, सकाळी
क्लोपिटॆब ७५, दुपारी
रॆमिप्रिल २.५, सकाळी
स्टेटॊर ४० रात्री
पॆन ४० सकाळी अशी ट्रीटमेंट लिहून देण्यात आली होती. त्यानंतर बाकी सर्व ठीक होते परंतु रात्री झोप न येणे, निरर्थक हवेत एखादी गोश्ट पकडण्याचा प्रयत्न करण्यासारखे हातवारे करणे हा त्रास सुरू झाला. त्यानंतर तिला १२ एप्रिल रोजी चेकअपसाठी पुन्हा तेथे नेले असता त्यांनी तिला हॊस्पिटलमध्ये दाखल करून घेतले. व दुसया दिवशी तातडीने आयसीयुमध्ये दाखल केले. यावेळी तेथील डॊकटरांनी तिच्या शरीरातील पोटॆशियमची लेव्हल वाढल्याचे सांगितले. आयसीयुमध्ये दोन दिवस ठेवल्यानंतर तिला पुन्हा जनरल वॊर्डमध्ये आणण्यात आले व १८ एप्रिल रोजी घरी सोडण्यात आले. त्यावेळचे निदान इस्चिमिक कार्डियोमायोपथी व हायपरटेंशन होते असे डिस्चार्ज कार्डवरून दिसते. सध्या त्यावेळी सुचविल्याप्रमाणे
डायगॊगसिन ०.७५ एमजी. आठवड्यातून ५ दिवस सकाळी
रॆमिप्रिल २.५ एमजी सकाळी
एकोस्प्रिन गोल्ड २० एमजी दुपारी
कार्वेडिलॊल ३.१२५ एमजी दुपारी
डायटॊर १० एमजी सकाळी
शेलकॆल ५०० एमजी सकाळी
ऒट्रीन सकाळी---रात्री
पॆन ४० एमजी सकाळी अशी ट्रीटमेंट चालू आहे.
गेल्या महिन्याभरापासून तिला सतत ढेकर येणे व सांधे दुखणे या तक्रारी सुरू झाल्या आहेत. शिवाय थंडी वाजणे, तोंडाला चव नसणे, भूक न लागणे या करीता तिला परत रुग्णालयात घेऊन गेलो असता त्यांनी परत पॆन ४० व म्युकेन जेल दिवसातून दोनदा घेण्यास सांगितले त्याप्रमाणे घेऊनही फ़रक नाही. त्यामुळे असे वाटते की, सध्या सुरू असलेल्या औषधांमध्ये फ़ेरबदल करण्याची गरज आहे की काय? या शिवाय अन्य पॆथीमध्ये काही उपाययोजना या समस्येकरीता आहे का? कृपया मला या विषयी मदत करा, कोणी अनुभवी तद्न्य सुचवा.
नमस्कार! मला एका महत्वाच्या विषयावर मदत हवी आहे कृपया मदत करा…
गाभा:
प्रतिक्रिया
12 Sep 2013 - 3:21 pm | उद्दाम
हार्ट अटॅकला स्ट्रेप्टोकायनेज, लो मोलेकुलर हेपारिन, अॅस्पिरिन, क्लोपिडोग्रेल, नायट्रोग्लिसरीन अशी औषधे दिली जातात.
हार्ट अटॅकने फुफुसात सूज ( पाणी ? , इंग्रजीत याला पल्मोनरी इडिमा ) म्हणतात. त्याला लॅसिक्स देतात.
हार्ट अटॅक येऊन गेला आणि हृदय स्नायु वीक झाले तर त्यानंतर इस्चेमिक कार्डिओमायोपथी स्टेज निर्माण होते. २ डी इको, अँजिओ वगैरे केल्यास निश्चित निदान कळेल. डिगॉस्किन हे औषध त्यासाठी दिलेले आहे.
या औषधान्नी शरीरातील सोडियम, पोटॅशियम, क्लोराइड, बायकार्बोनेट, पी एच यांच्यावर परिणाम होऊ शकतो. त्यातून तुम्ही आता जी सांगताय ती लक्षणे दिसू शकतात. पण त्यासाठी इमर्जन्सी औषधे बंद करणे / बदलणे बर्याचदा शक्य नसते.
त्याना थोड्या थोड्या वेळाने पण अनेकदा खायला द्या. सात्विक, ताजे अन्न ठेवा. काय खावे, काय नको, याची दिली असेलच. शेलकॅल ही कॅशियम , विट डी सप्प्लीमेंटसाठी आहे. ऑट्रीन ही लोह आणि इतर काही रक्तवाढीची जीवनसत्वे यासाठी आहे. अन्न कमी जात असले तरी यांची कमतरता होऊ नये म्हणून ही खबरदारी घेतली जाते. डाएटिशैयनला कन्सल्ट केलेत तर ते अगदी डिटेलवार काय काय कधी खायचे ते लिहून देतील.
अन्य पॅथीतही उपचार असतील, पण ते इतक्या इमर्जन्सी स्टेजला काम करतील का, माहीत नाही.
12 Sep 2013 - 3:36 pm | मुक्त विहारि
उपयुक्त माहितीबद्दल धन्यवाद
12 Sep 2013 - 3:38 pm | सार्थबोध
डॉक्टर नाईक - कृष्ण हॉस्पिटल पौड रोड पुणे यांचा एकदा सल्ला घ्यावात असे मला वाटते.
०२०४१४०३७००, ०२०४१४०३७०२
12 Sep 2013 - 6:53 pm | मोदक
तुमच्या भावनांचा आदर आहेच मात्र तरीही एक सुचवू इच्छितो,
सध्या सुरू असलेल्या औषधांमध्ये फ़ेरबदल करण्याची गरज आहे की काय?
तुम्हाला मेडीकल अॅडव्हाईस हवा असल्याने मिपासारख्या फोरमवरती तो मिळवणे चुकीचे वाटते. प्रत्येक पेशंट वेगळा असतो व त्या व्यक्तीच्या शरीरप्रकृतीनुसार औषध पद्धती ठरत असल्याने धाग्यात दिलेली माहिती कितीही विस्तीर्ण असली तरी पेशंट प्रत्यक्ष पाहिल्या शिवाय कोणताही डॉक्टर औषधपद्धतीवर आपले मत व्यक्त करेल (विशेषतः संस्थळावरती!) याची शक्यता कमी वाटते. मला असलेल्या माहितीनुसार शुगर, बीपी, अस्थमा असल्यास उपचारपद्धतीमध्ये कमालीचा बदल होतो त्यामुळेही असा प्रश्न पब्लीक फोरमवर विचारणे थोडे चुकीचे वाटत आहे. (तसेच, "येथे मिळालेल्या सल्ल्यानुसार उपचारपद्धतीमध्ये बदल करणे" हाही मुद्दा थोडा गंभीर वाटतो आहे. मला येथे मिळणार्या सल्ल्याबद्दल शंका आहे असा अर्थ कृपया घेवू नये)
मिपावरील डॉक्टर महोदयांना असा सल्ला देणे थोडे ऑकवर्ड वाटल्यास मला आश्चर्य वाटणार नाही.
तुमचा तसा उद्देश नसला तर वरील संपूर्ण प्रतिसाद गैरलागू समजावा.
तुमच्या मातोश्रींच्या तब्बेतीमध्ये सुधारणा व्हावी ही सदिच्छा!
12 Sep 2013 - 8:42 pm | चौकटराजा
मिपा हे जनरल माहिती घेण्याचे ठिकाण आहे. इथे काही जण वैद्यकात उद्यम करणारे आहेतही. पण ते फार साधारण विषयांवरच व्यक्त होतील्से वाटते.
उद्दाम याना मात्र धन्स !
तुमच्या मातोश्रींच्या तब्बेतीमध्ये सुधारणा व्हावी ही सदिच्छा!
हीच माझी पण भावना !
12 Sep 2013 - 9:50 pm | खटपट्या
मोदक यान्च्याशी सहमत !
मझ्या वडीलान्चे वय ८५ आहे. डॉक्टरानी ९०% ब्लॉकेज सान्गीतले होते. बायपास चा सल्ला दीला होता. वडीलान्चा बायपास ला सक्त विरोध होता. मी चीलेशन थेरपी चा पर्याय स्विकारला. गेली ५ वर्षे वडीलाना ह्र्यदयाचा काहीही त्रास नाही आहे.
http://en.wikipedia.org/wiki/Chelation_therapy
मी ईथे फक्त माझा अनुभव सान्गत आहे. कोणतीही उपचार पध्द्ती सुचवू ईच्छीत नाही. (माझी तेवढी योग्यताही नाही)
13 Sep 2013 - 12:34 am | अग्निकोल्हा
याचे हा धाग एक उत्तम उदाहरण गणावे. ज्या प्रमाणे आपण आपल्या गंभिर समस्यांवर आप्तस्वकियांकडुन सल्ला मागतो वा मन मोकळे करतो, अगदि तिच प्रांजळता इथे दिसते आहे.
लेखक जर इथे समान अनुभव, अडचण वा परिस्थितीतुन गेलेल्या व्यक्ति/संबधितांकडुन मार्गदर्शन, अनुभव वा माहितीची देवाण-घेवाणाची अपेक्षा करत आहात तर ति नक्किच मिळेल कारण विवीध समस्यांवर मैत्रिभावनेने शक्य ती मदत/मार्गदर्शन मिपाकरही नेहमीच करतात यात अतिशयोक्ति नाही.
परंतु आपल्या विषयासंदर्भात रुग्णाची प्रत्यक्ष तपासणी हिच निदानाची प्राथमिक गरज आहे हे दुर्लक्षिता येत नसल्याने व आपण विषद केलेल्या नेमक्या परिस्थितीतुन गेलेल्या व्यक्तिंचे तौलनिक दुर्भिक्ष बघता इथे कितपत महत्वाची माहिती मिळेल या बद्दल मनात बरिच उत्सुकता आहे. आपल्या मातोश्रींच्या तब्बेतीमध्ये सुधारणा व्हावी ही सदिच्छा!
13 Sep 2013 - 6:42 am | स्पंदना
तुम्ही एकुण जी केस ची माहीती दिली आहे त्यामुळे थोडेफार लोक त्यांचे अनुभव सांगु शकतील पण डॉक्टरलोक जोपर्यंत स्वतः पेशंट बघत नाहीत तोवर काहीही बोलणार नाहेत. खात्री बाळगा. जनरल प्रकृती स्वास्थ्याबद्दल बोलण वेगळ अन स्पेश्शली एखाद्या पेशंट्ला अस नुसत वाचुन काही सुचवण वेगळ.
तुमच्या आई बर्या व्हाव्यात अशी देवाकडे प्रार्थना.
13 Sep 2013 - 8:56 am | पैसा
या आजारावर डॉक्टर्स काय सांगतील ते ऐकणे हे ठीक. पुढच्या भेटीत या नव्याने उद्भवलेल्या त्रासाबद्दल बोलायला विसरू नका. ढेकरा येणे म्हणजे गॅसेस होत आहेत. ते अॅलर्जीमुळे आहे की जेवलेले नीट पचत नाहीये, अॅसिडिटी होते आहे हे घरी लक्षात येतंय का बघा. जर का मूळ आजाराशी रिलेटेड नसेल तर आणि औषधांमुळे अॅसिडिटी होत असेल तर कदाचित एखादा घरगुती उपाय तात्पुरता उपयोगी पडू शकेल. पण डॉक्टरंना भेटणे हेच पहिले काम करा. सांधेदुखीही हालचाल कमी झाल्यामुले होते आहे का? तेही त्यांना नियमित तपासणारे डॉक्टर्स सांगू शकतील. त्यांना लवकर बरं वाटू दे हीच सदिच्छा!
13 Sep 2013 - 11:45 am | अनंत छंदी
या संस्थळावर वाचनमात्र असलेल्या माझ्यासारख्या अपरिचिताच्या मदतीच्या हाकेला आपण आपुलकीने प्रतिसाद दिलात त्याबद्दल आपणासर्वांचे मनापासून आभार!
रुग्णाला औषधोपचाराचा फ़ायदा होत नाही आणि औषधोपचारात बदलही केला जात नाही अशी स्थिती उद्भवल्यावर मनाची जी भांबावल्यासारखी स्थिती होते त्यातून ह्या धाग्याची निर्मिती झाली आहे. पुढील उपचारांची दिशा कळावी, तज्ज्ञांचे संदर्भ मिळावेत हा हेतू आहे.
@ उद्दाम आपण दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद.
@ सार्थबोध आपण दिलेल्या संदर्भाबद्दल आभार, दखल घेतली आहे.
@ खटपट्या किलेशन थेरपी कुठून घेतली? जरा तपशील द्याल का?
आपणासर्वांचे पुन्हा एकदा मनापासून आभार!
13 Sep 2013 - 7:17 pm | डॉ सुहास म्हात्रे
घरातले कोणी आजारी पडले... आणि त्यात आईसारख्या अतीव मायेच्या नात्यातले... तर मन भांबावून जाणे सहाजिक आहे.
तुमच्या मातोश्रींचे उपचार योग्य दिशेने व्हावे म्हणून काही सूचना...
तज्ज्ञांचे संदर्भ मिळावेत हा हेतू आहे.
या हेतूने येथे लिहिणे योग्य आहे... मात्र त्या हेतूचा स्पष्ट उल्लेख केल्यास योग्य मार्गदर्शन मिळण्यास सोपे जाईल.पुढील उपचारांची दिशा कळावी.
ही अपेक्षा करणे येथे योग्य का नाही याबाबत अनेक जणांनी अगोदरच लिहीले आहे. मात्र अशा तर्हेने संस्थळावरून कळलेले उपचार घेणे--- विषेशतः तुम्ही वर्णन केलेल्या जुन्या आणि / अथवा गुंतागुंतीच्या रोगामध्ये--- अत्यंत धोक्याचे ठरू शकते.अजून थोडे:
एकाद्या वैद्यकीय व्यावसायिकाच्या उपचाराने रुग्णाला फायदा होत नसला तर (किंबहुना रुग्ण अथवा त्याच्या जवळच्या नातेवाईकांना नुसते तसे वाटत असले तरीसुद्धा) दुसर्या तज्ञ वैद्यकीय व्यावसायिकाचा सल्ला घेणे (याला इंग्लिशमध्ये सेकंड ओपिनियन असे म्हणतात) हा रुग्णाचा मुलभूत हक्क आहे.
असे करण्यात पहिल्या वैद्यकीय व्यावसायिकाचा अपमान होत नाही. किंबहुना गरज असल्यास बर्याच वेळेला पहिल्या वैद्यकीय व्यावसायीकाने असा सल्ला देणे व रुग्णाच्या / नातेवाईकांच्या अनुमतीनंतर योग्य तज्ञाच्या सल्ल्याची व्यवस्था करणे अपेक्षित आहे. किंवा ती सोय रुग्ण स्वतःच्या निवडीप्रमाणेही करू शकतो.
तुमच्या मातोश्रींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी हीच सदिच्छा!
14 Sep 2013 - 3:52 am | खटपट्या
मे चीलेशन थेरपी डॉ बी. एम. देसाई, बोरिवली यान्च्याकडून घेतली. सधारणतः १० सीटीन्गस असतात. एका सीटीन्ग चे रु ८०० होते २००५ मधे. गुगल वर तुमच्या भागातील चीलेशन थेरपीस्ट ची लीस्ट तुम्हाला मीळेल.