पुरोगामीत्वाचा शोध

arunjoshi123's picture
arunjoshi123 in काथ्याकूट
25 Aug 2013 - 4:13 pm
गाभा: 

काळ:
उत्क्रांतीचा सिद्धांत मानला तर पुरोगामीत्व माणसाचा नैसर्गिक गुणधर्म असायला हवा. जसा जसा काळ पुढे लोटेल तसे तसे उत्क्रांतीच्या वरदानांनी मानवाचे जीवन एका आदर्श स्थितीकडे आपोआप लोटले जाईल. परंतु उत्क्रांतीच्या परिणामांनी होणारा एखादा छोटासाही बदल दॄश्य स्वरुपात प्रगट होण्यासाठी लागणारा काळ हा मोजक्या पिढ्यांच्या माळेच्या जीवनकाळाच्या तुलनेत हजारो पट असतो. त्याकरिता काय पुरोगामी आहे आणि काय प्रतिगामी आहे हे ठरवताना उत्क्रांतीजन्य बाबींना बाजूला ठेवले पाहिजे अन्यथा ते निसर्गावर केलेले भाष्य असेल. उदाहरणार्थ, आपले पूर्वज रानटी होते हे टीकात्मक सुराने नाही म्हटले पाहिजे. पुरोगामीत्वाच्या चर्चेचा कालखंड कसा असावा? त्यात उत्क्रांतीच्या भूतकाळातील रुपांवर मागासलेपणाचा आरोप होता कामा नये आणि उत्क्रांतीच्या भविष्यातील थेट पुढच्या टप्प्यातील वर्तनाचीच डायरेक्ट अवास्तव अपेक्षा होता कामा नये.

विस्तार:
साधारणतः सर्व मनुष्य उत्क्रांतीच्या एकाच मैलाच्या दगडावर येऊन थांबले आहेत हे एक मोठे गृहितक आहे. तरीही सर्व माणसांकडून पुरोगामीत्व दर्शक वर्तनाच्या समान अपेक्षा करणे जगात स्वीकार्य मानले जाते. पुरोगामीत्व झेपायची प्राकृतिक ऐपतच मानवसमूहांनुसार वेगळी असू शकते याची थोडीशी जाणीव मनात ठेवलेली बरी.

संदर्भ:
निसर्ग आपल्याला आपसुक पुढे घेऊन जात असताना अधिकचा पुरोगामीपणा कशासाठी? दुर्दैवाने लोक स्वतःचे पुरोगामीत्व किती आहे हे इतरांचे पुरोगामीत्व मोजून सांगतात. तो मागास विचारांचा म्हणून मी पुढारलेल्या विचारांचा असा काहीसा लोकांचा पावित्रा असतो. तसे पाहता पुरोगामीत्वाचे आंतरपीढीय (inter-generational) आणि आंतरव्यक्तीय असे दोन प्रकार होतात. ते मिसळले तर चर्चेत संभ्रम निर्माण होतो.

संकल्पना:
निसर्गाने उत्क्रांतीचा वेग शून्य केला तरी, मानवाची स्वतःची अशी काही भविष्यगामी, सुखी, समृद्ध किंवा आदर्श जीवनाची कल्पना आजच आणि आजच्या मर्यादांना मनात धरून आहे. ही कल्पना कोणी केली आहे? ही कल्पना समाजधुरीणांनी आणि तत्त्ववेत्यांनी केली आहे. तुम्ही आम्ही तिला केवळ हातभार लावला आहे. या कल्पनेपासून दूर जाणे ते प्रतिगामीत्व आणि तिच्याकडे सरकणे ते पुरोगामीत्व. ही संकल्पना कुठे एकत्र लिखित संकलित झालेली नाही कि तिच्यावर देशांच्या घटनांप्रमाणे शिक्कामोर्तब झालेले नाही. या आदर्श संकल्पनेचा आणि तिच्याकडे नेणार्‍या दिशेचा शोध जो तो आपल्या परीने घेत आहे. परंतु कोण कुठे जात आहे असे प्रत्येकास विचारले असता तो म्हणतो कि 'मी या संकल्पनेकडे जात आहे आणि पहा, बरेच लोक तर विपरित दिशांनी भरकटलेले आहेत.'

चालक (Drivers):
आपण कुठे चाललो आहोत, आपले वर्तन पुरोगामीत्व आहे कि प्रतिगामीत्व , हे कसे सिद्ध होते? कसे कळते? तर या गमनाचे अनेक चालक आहेत. कोणत्याही क्षणी समाजात मागे ओढणारे, मागे ओढले जाणारे, स्थिर, पुढे ओढले जाणारे, पुढे ओढणारे असे गमकांचे पाच प्रकार आढळतील. यात प्रत्येकच मी 'स्थिर वा पुढचा' असे म्हणेल. इतरत्र जाणारे अन्य या चर्चेच्या दृष्टीने महत्त्वाचे नाहीत. समाजातले जास्तीत जास्त लोक 'स्थिर' किंवा त्याच्या जवळच्या प्रकारात मोडतात आणि ते टोकाच्या ओढणारांचे युद्ध पाहतात किंवा काहीतरी बुळबुळीत पक्ष घेतात. पुढे जाणारांचेच बळ नेहमी जास्त असते हा भाबडा समज नको. निसर्ग तटस्थ असतो तेव्हा मानवसमाज सर्व दिशांना हिंदोळके खात असतो.

प्रवर्तके:
इथे कोणता व्यक्ति कोणत्या प्रकृतीचा बनणार हे कसे ठरते? माणसाची विचार करायची एक पद्धत आहे. तो अगोदर सगळा विचार करून मग जीवन जगायला चालू करत नाही. जीवनाप्रारंभी मला कमी गोष्टी माहीत होत्या म्हणून मला प्रत्येक गोष्टीत 'फार' किंवा 'फार वेळ' विचार करावा लागला असे स्मरत नाही. मोठ्या ढगाच्या आडून इवलासा चंद्र हळूहळू बाहेर येतो, तसे माणसाचे स्वतःचे असे विचार उशीरा आणि कमी विषयांवर बनतात. अन्यथा सारा संदर्भ बाकी समाजाचाच असतो. भावना आणि जाणिवा यांचे अनंत प्रकार, किती लोक भेटले, त्यांनी काय काय सांगीतले, कशा सुरात सांगीतले, काय घटना घडल्या, त्यांचे काय काय परिणाम काय झाले, काय पाहिले, काय ऐकले, काय वाचले, काय ठसवले गेले, काय स्वार्थाचे होते, इ. सर्व सूक्ष्मानंतांनी कर्षणाकर्षणाची कितीतरी बले बनतात. शेवटी हा प्रकार इतका जास्त होतो कि माणूस आपण कसे आहोत इतकेच लक्षात ठेवतो, आपण तसे का आहोत याची फार सखोल उत्तरे देऊ शकत नाही. जी उत्तरे माहीत आहेत तीच सखोल आहेत या भ्रमात राहतो.

माणसाचे स्वमत आणि वास्तव:
मनुष्य स्वतःकडे काही विशिष्ट चांगल्या किंवा वाईट मूल्यांची टोपली आहे असे समजतो. परंतु प्रत्येक वेळी त्यातली दोन काढून पैकी एकच निवडायला सांगीतले (elimination by option) तर शेवटी एकच मूल्य त्याच्याकडे शिल्लक राहते, तोच त्याचा सारांश. The resultant vector of all value led forces. हा सार कधी त्याला वरच्या आदर्श संकल्पनेकडे नेतो तर कधी विरुद्ध! वेगवेगळ्या वेळी वेगवेगळे वागणे! वेगवेगळ्या विषयावर वेगवेगळे वागणे! त्यामुळे व्यक्ति पुरोगामी कि प्रतिगामी असा काळा पांढरा करता येत नाही. परंतु स्वतःच्या दिशितावस्थेबद्दल त्याचे फार अढळ मत असते. पाठी एकमेकांकडे करून 'स्थिर' लोकांना आपल्याकडे ओढण्यापेक्षा वास्तवात टोकाच्या लोकांचा डोळ्यास डोळे भिडवून युद्ध करण्याचाच पावित्रा जास्त असतो. या युद्धाचे मानसिक सुख सर्वांना आदर्श संकल्पनेकडे नेण्यापेक्षा जास्त मिळत असावे का?

आदर्श संकल्पनेची अव्यवहार्यता:
स्वातंत्र, समता हे आदर्श स्थितीचे पहिले निकष आहेत. आदर आणि प्रेम हे त्यानंतरचे दोन आहेत. वरची आदर्श संकल्पना मांडतानाची मूळ समस्या ही आहे कि या चार संकल्पना आणि त्यांचे सर्व उपप्रकार सर्वत्र आणि सर्वांना लावले तर ते infeasible बनतात. उदाहरणार्थ समता ही कल्पना घेऊ. वास्तविक पाहता २६ जानेवारी १९५२ पासून भारतात सर्वांना दिलेली समता, तिचा काहीच अर्थ नाही. प्रारंभीच्या क्षणालाच इतकी विषमता होती कि नंतर कितीही समता राखली तर हवी तशी स्थिती येत नाही. चला, मानून चलू कि आपल्या सगळ्या प्रयत्नांना यश येऊन समता येणार आहे. संपत्तीची समता घ्या. संपत्ती दरडोई समान असावी कि संपत्ती उत्पन्न करण्याच्या क्षमतेच्या प्रमाणात असावी? बरे, ते कसे मोजणार ? आणि समजा काही ठरलेच तर, प्रत्येकदा जेव्हा अधिकची संपत्ती निर्माण होते, जूनी नष्ट होते, depreciate होते, इ, इ , तेव्हा मोजणार कोण आणि कसे? वितरण कसे करणार? त्याची नियमावली बनवायला गेलो तर लक्षात येईल कि हे सगळे अव्यवहार्य आहे. समता सर्व गोष्टींना आणि पूर्णतः लावणे महाकठीण, अशक्य!

यापुढे जाऊन स्वातंत्र्य आणि समतेचा किस पाडायला गेलो तर त्या परस्परविरोधी संकल्पना निघतात. तसेच प्रेम आणि आदराचेही. तेही सूक्ष्मात नेले तर परपस्परविरोधीच! मी आपल्याला प्रेमाने एकेरी संबोधले तर मी आपल्याला आदर दिला नाही असे आपल्याला वाटणे हे याचे उदाहरण म्हणून सांगता येईल.

व्यवहार्य पुरोगामीत्वाच्या सीमारेषा:
ही अव्यवहार्यता टाळायची असेल तर 'पुरोगत स्थितीच्या' किमान या चार मानकांना व्यवहार्य सीमा घालून देणे गरजेचे आहे. म्हणजे किती समानता पाळायची, किती स्वातंत्र्य द्यायचे हे ठरवायचे, इ. अर्थात ही सीमा प्रत्येकाने ठरवली तर वेगवेगळी निघेल आणि संघर्ष होईल. म्हणून ही सीमा अधिकृत आणि सक्षम अश्या संस्थेने बनवली पाहिजे. ती कालामानाप्रमाणे बदलली पाहिजे.

सद्यस्थिती:
आज ज्ञानाच्या प्रत्येक शाखेचा वेगळा असा विस्तार आहे. प्रत्येक शाखेची प्रगती वेगळ्या प्रमाणात झाली आहे आणि वेगळया गतीने होत आहे. ज्ञानाच्या प्रत्येक शाखेचा माणसाच्या जीवनात खूप सहभाग आहे आणि माणसाला जे नवे निर्णय घ्यायचे आहेत त्यातला प्रत्येकात कितीतरी शाखांचा समावेश होतो. घर घ्यायचे असेल इंजिनिअरींग, बँकिंग, इ इ कितीतरी गोष्टींचे ज्ञान लागेल. त्यात काय काय करावे व काय काय करू नये यांची 'एकत्र' सामाजिक किंवा सरकारी पोझिशन कुठेच मिळणार नाही. पण एखाद्या माणसाने त्याच्या सामान्य ज्ञानाने सगळ्या गोष्टी केल्या तर २५ लोक तू हे का नाही केले आणि अजून २५ लोक तू हेच का केले म्हणून त्याला दोन्हीकडून धूणार. पैसे त्याचे, घर त्याचे, ० माणसांची मदत, ५० माणसांचा मार! ५००० वर्षांपासून जर civil engineering चालू आहे तर एका जन्मात एका घरासाठी मी किती तर्क चालवावा? किती विवेक लावावा? किती ज्ञान घ्यावे? किती जवळच्या नाजूक नात्यांशी भांडावे? ही सद्यस्थिती आहे. स्वार्थामुळे वाईट वागणारे बरेच लोक प्रतिगामीत्वाला बळावा देत असावेत, पण त्यांना द्यायच्या तीव्रतेचा मार सर्वांना मिळणे चूक आहे. त्यामुळे पुरोगामीत्वाबद्दल भय उत्पन्न होते. जे सहजाचरण आहे ते एक ओझे बनून जाते. काय, कसे करायचे करायचे ते सांगणार नाही पण चूकलास तर मार खाशील म्हणणारा गुरू कोणालाही नको असतो ना?

नाविन्य आणि परंपरांची भूमिका:
नाविन्य आणि पुरोगामीत्वाची गल्लत हे ही आजच्या काळाचे एक लक्षण आहे. हाय फाय मोबाईल घेऊन चालणारी, जीन्स घालणारी स्त्री भयंकर प्रतिगामी व्यक्ति असू शकते. तंत्रज्ञानाची नवी उत्पादने, त्यांचे नवे उपयोग आणि पुरोगामिता यांचा संबंध नाही. पुरोगामिता म्हणजे वरील संकल्पनेला ओळखण्याची आणि तिच्याकडे स्वतःला आणि इतरांना नेण्याची पात्रता. आणि या नेण्याचा अर्थ फरफटणे असा नसणे! परंपरागत मानवी मूल्यांचा त्याग हे ही पुरोगामीत्वाचे दुसरे लक्षण मानले जाते हे अजून एक दुर्दैव. काही पारंपारिक मूल्ये, असू शकते कि, त्या पुरोगत स्थितीशी अगोदरच एकदिक्त झालेली आहेत. शिवाय परंपरा अंध पण तरीही उपद्रवरहित असेल तरीही इतर मोठ्या समस्यांपेक्षा तिच्यावर खूप जास्त फोकस केला जातो.

विज्ञानाची दडपशाही:
विज्ञान पुराव्याने सगळे बोलते म्हणून वै़ज्ञानिक दृष्टीकोन असावा, ते मानावे असा एक आजकालचा युक्तिवाद आहे. विज्ञानाने मानवी मूल्यांशी निगडीत एकही विधान केलेले नाही, एकही शोध लावलेला नाही तरीही विज्ञानाचे नियम जबरदस्तीने मूल्यांना लावून वागण्याची वि़ज्ञानांधता बळावली आहे. काय नैसर्गिक आहे आणि काय 'विज्ञानाने शक्य असणार आहे' याचा विचार करायला लावून वि़ज्ञानाने माणसाला जास्त भ्रमित केले आहे. विज्ञान कळायला क्लिष्ट असूनही आणि माणसाची सगळ्या ज्ञानशाखांना समान विश्वासार्ह मानण्याची मूलभूत प्रवृत्ती असूनही विज्ञानाला जास्त मानावे अशी अपेक्षा केली जाते. शिवाय केवळ वि़ज्ञानाला १००% मानून जो रसभंग होतो तो एक महान मेगाक्लायमॅक्स असतो.

कायदा:
सध्याला महाराष्ट्रात अंधश्रद्धा निर्मूलन कायदा झाला आहे. ज्या ठार अंधश्रद्धा आहेत त्याच तिथे लिहिल्या आहेत. (तत्सम गुन्ह्यांना, जे निव्वळ अंधश्रद्धा नाहीत, सवते कायदे आहेत म्हणून या कायद्यातील गुन्ह्यांत अंध भाग नक्की काय आहे ते नीट कळते.) पण या कायद्याचा मसूदा केवळ ताटातलं मीठ आहे. इतर पक्वान्ने कधी मिळणार? ती कोण देणार? कधी देणार?

पुरोगामीत्वाचे मार्गदर्शक नियम, प्राधान्यानुसार :
माणसाच्या वर्तनाचे सगळेच कायदे, नियम, इ पक्के तर जीवन रटाळ होईल अशी भिती साहजिक आहे. पण हा युक्तिवाद एकाच नियमाने हरभर्‍याच्या पीठाचे मिश्रण बनवले तर सारे भजे नेहमी 'त्याच' आकाराचे बनतील असा आहे. मानवी मूल्यांचे, वर्तनांचे वैविध्य अफाट आहे, छोट्याश्या दिशादर्शनाने ते कमी होणार नाही. वैविध्याच्या नावाखाली प्रतिगामीतेला पाठबळ दिले जाते.

१. तत्त्व म्हणून स्वतःला पुरोगामी बनवणे थांबवावे.
२. पुरोगाम्यांचे अगोदरच मार्गदर्शन घ्यावे. नंतर त्यांना टीकेस मज्जाव करावा.
३. स्वतःची वैचारिक, प्रापंचिक मर्यादा स्वीकारावी.
४. आपले पुरोगामी असणे हे तज्ञांकडून तपासून घ्यावे.
५. विज्ञानाने पुराव्याने दिलेल्या कोणत्याही सत्यास खोटे मानू नये.
६. परंपरा निष्कारण सोडू नयेत.
७. सामाजिक नावीन्य , झेपले तर, पूर्णत: अंगिकारावे
८. स्वतःच्या आणि इतरांच्या प्रेम, आदर, स्वातंत्र्य आणि समता यांना बाधा आणतील असली सगळी मूल्ये त्यागावी.
९. स्वतःचे, पटलेले वेगळे विचार मांडावेत.
१०. व्यवहार्य असेल तर अशा विचारांनी काम करावे.
११. आर्थिक, मानसिक, शारीरिक, इ , इ स्पष्ट नुकसान करणार्‍या सगळया परंपरा पर्यायी नाविन्य उपलब्ध असेल तर त्यागाव्यात.

अर्थात ही यादी आणि प्राधान्य अचूक देण्याची एक सामान्य माणूस म्हणून माझी पात्रता नाही हे वेगळे सांगायची गरज नसावी.

प्रतिक्रिया

बराच मोठा आवाका आहे.

arunjoshi123's picture

30 Aug 2013 - 4:59 pm | arunjoshi123

ज्योतिजी,
http://www.aisiakshare.com/node/2053 इथे याच नावाच्या धाग्यावर काही स्पष्टीकरणे आहेत. आपणास ती उपयुक्त वाटू शकतात.

काही पारंपारिक मूल्ये, असू शकते कि, त्या पुरोगत स्थितीशी अगोदरच एकदिक्त झालेली आहेत. >>>> सत्यवचन!

शिवाय केवळ विज्ञानाला १००% मानून जो रसभंग होतो तो एक महान मेगाक्लायमॅक्स असतो.>>>> खरे आहे.

अर्थात ही यादी आणि प्राधान्य अचूक देण्याची एक सामान्य माणूस म्हणून माझी पात्रता नाही हे वेगळे सांगायची गरज नसावी.>>> हे खरेही असेल कदाचित. मात्र ज्या कुणा पहिल्यास परिस्थितीचे तपशीलवार वर्णन प्रथम करता येते, तोच समस्येच्या समाधानाप्रत नेऊ शकेल, ह्यात मुळीच संशय नाही. त्यामुळे ह्या विचारमंथनाचे मी मनापासून स्वागत करतो.

arunjoshi123's picture

10 Sep 2013 - 6:44 pm | arunjoshi123

नरेंद्रजी,
त्या 'बेहद्द' शब्दाबद्दल धन्यवाद. आपले विचार इतरांना आवडावेत हा खूप आनंददायक प्रकार असतो.

या एका परिच्छेदाने बासुंदीत लिंबु पिळलं. पुरोगामीत्वाचं आरोहण, अवलंब हे व्यक्तीकेंद्रीत आहे. त्याला संस्थात्मक प्रारूप द्यायचा प्रयत्न झाला कि त्यातनं "पुरो" निघुन केवळ "गामित्व" शिल्लक उरतं.

त्यापेक्षा आपल्या सुख-दु:खांना कारणीभूत व्यवहार जाणुन इतरांप्रती वागणं सजग करावं आणि सत्याची व्याप्ती नेहमी एका वर्तमान क्षणापुरती असते हे भान ठेवणं हेच काय ते पुरोगामित्वाचे व्यवच्छेदक लक्षण.

अवांतरः तुमच्या भाषेला, वाक्य रचनेला, विषय मांडणीच्या स्टाईलला त्रिवार सलाम.

arunjoshi123's picture

12 Sep 2013 - 2:41 pm | arunjoshi123

अर्धवटरावजी,
जगातला कुठलाही माणूस तो प्रतिगामी आहे हे मान्य करणार नाही. आणि याचा फेस व्हॅल्यूवर अर्थ काढायचा झाला तर जग हे अतिशय पुरोगामी आहे असा निघेल. पण वास्तव असे नाही. समाजाला एका सद्स्थितीला पोहोचायला अजून प्रचंड वाव आहे.
व्यक्तिगत पुरोगामीत्व बिनमहत्त्वाचे आहे. पुरोगामी बनलेला माणूस आजच्या घडीला स्वतःला समाजापासून फार वेगळा समजतो. समाज देखिल त्याला तितका नॉर्मल समजत नाही आणि आदरणीय वा अनुकरणीय मानत नाही. मानले तरी रडत रडत, नाक मुरडत मुरडत, घाबरत, अर्धवट मानतो.
एक माणूस पुरोगामी बनल्याचे किती महत्त्व आहे? अमिताभ बच्चन नावाची, तो स्वतःच एक या अर्थाने, जाहिरात पाहून कितीतरी लोक कलाक्षेत्रात नशीब काढायला येतात. अमिताभने किती मोठा कळस गाठला आहे यापेक्षा मला या सर्व छोट्या मोठ्या लोकांच्या आयुष्यात काय झाले आहे ते महत्त्वाचे वाटते. तसेच पुरोगामीत्वाचे आहे. चार लोक काय करत आहेत यापेक्षा समाज काय करत आहे, कोठे जात आहे ते महत्त्वाचे.
पुरोगामीत्वाचे एक तत्त्व, त्याचा एक नियम आणि तद्नुषंनाने येणारे वर्तन हे महाकठीण कर्म आहे. म्हणजे काय ते साधे उदाहरण देऊन सांगतो. संगीत ऐकावे का नाही? एका अर्थाने पाहिले तर संगीतात अनैसर्गिक आवाज असतात. मग आपल्याला संगीत आवडते यात परंपरांचा किती प्रभाव आहे? 'शांती समाधान सर्वां भूतां' असे आळवून आळवून वाद्ये बडवून न ऐकता सरळ 'सर्व प्राण्यांना शांती समाधान असावे' असे थंड गद्यात ऐकले तर काय वेगळा फरक पडावा? परिणाम तोच व्हायला हवा. पण असे होत नाही. संगीताने आपण भारावून जातो. का? संगीत उद्योगाने आपल्या अंधश्रद्धेचा गैरफायदा घेऊन करोडो रुपये तर वसूलले नाहीत? मग संगीत त्यागावे का? मला थंड गद्याने तितकाच अभिनिवेष अभिप्रेत होत असेल तर मी तसे करून पुरोगामी का बनू नये?
थोडक्यात काय एक विचारी माणूस म्हणून आपण मनुष्याचे संपूर्ण वर्तनच चिकित्सेच्या ऐरणीवर आणू शकतो. सोंड असलेल्या माणसाचा देव म्हणून मिपावर फोटो आहे, तेथे लेखन करून मी प्रतिगामीत्वास बढावा देत नाहीय काय असे प्रश्न उभे राहतात. जीवन जीवन न राहता फक्त चिंतन आणि तेही वैचारिक क्लेष इतकेच उरते.
क्लिष्ट अशा तात्विक बाबींवर प्रत्येक माणसाचा विचार करायचा मूड नसतो. इच्छा नसते. वेळ नसतो. बुद्धिमत्ता नसते. ज्ञान नसते. त्यातून येणारे निष्कर्ष दरवेळी वेगळे निघू शकतात, निघतात. मग माणसाला आपल्या वागण्याचा पश्चात्ताप होतो. सर्वात वाइट म्हणजे तथाकथित पुरोगाम्यांत एकमत नसते. देव, धर्म पाळणारे पुरोगामी न पाळणारांना आपल्यापेक्षा जास्त पुरोगामी मानणार नाहीत, इ.
सबब लेखात कोणी एक महाशय कसे पुरोगत व्हावेत याबद्दल मार्गदर्शन नाही. सगळाच समाज कसा विकसित व्हावा यावर जोर आहे. प्रत्येकाकडून फर्स्ट प्रिंसिपल्स वापरून पुरोगत बनण्याची अपेक्षा करणे म्हणजे प्रत्येकाला quantum physics शिकवणे आहे. याकरिता एक संस्था असावी किंवा असलेल्या संस्थांचे 'अधिकृत' जाळे असावे. या संस्थेने भयंकर डोकेफोड करून सामान्य माणसाच्या वागण्याची मार्गदर्शक तत्त्वे बनवावीत. अशी तत्वे म्हणजे कायदा नाही, निव्वळ रेफरन्स. ज्याला इच्छा आहे तो तत्त्वाच्या मागचा कार्यकारणभाव वाचू, पाहू, तपासू शकतो आणि पटले नाही तर आपल्या मताप्रमाणे वागू शकतो. आजच्या परिस्थितीत ज्ञानाच्या अनंत शाखा आहेत, अनंत माहिती आहे, अनंत विषय आहेत, अनेकांच्या अनेक विषयांवर अनेक भूमिका आहेत. हे सगळे लोक प्रामाणिकपणे पुरोगामी वागण्याची इच्छा असणार्‍या माणसाला भ्रमित करतात. अशा लोकांत राहिल्याने माणसाला नेहमी आपण भूतकाळात कसे प्रतिगामी होतो याचे शल्य राहते. असा संस्थागत संदर्भ असेल तर माणूस नेहमीच काळाबरोबर, समाजाबरोबर राहतो. अशी संस्था असू शकते का, कशी असावी, तिचे कामकाज कसे असावे आणि फिल्ड अ‍ॅक्टीव्हेटीज काय असाव्यात हा पूर्णत: वेगळा विषय आहे.

सर्वानी मिळून बासुंदीचा आनंद कसा घ्यावा यासाठी कोणी वाढप्या प्रयत्न करत आहे, त्याचा तिच्यात लिंबू पिळण्याचा परिणाम झाला नाही पाहिजे.

अर्धवटराव's picture

12 Sep 2013 - 10:53 pm | अर्धवटराव

>>जगातला कुठलाही माणूस तो प्रतिगामी आहे हे मान्य करणार नाही. आणि याचा फेस व्हॅल्यूवर अर्थ काढायचा झाला तर जग हे अतिशय पुरोगामी आहे असा निघेल. पण वास्तव असे नाही. समाजाला एका सद्स्थितीला पोहोचायला अजून प्रचंड वाव आहे
-- व्यक्तीचं पुरोगामित्व नकारल्यास समाजाचं पुरोगामित्व लंगडं पडतं. समुद्र म्हणुन काहि अस्तित्वात नाहि. पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे आपापल्या गुणधर्मासहीत प्रकटीकरण म्हणजे समुद्र.

>>व्यक्तिगत पुरोगामीत्व बिनमहत्त्वाचे आहे. पुरोगामी बनलेला माणूस आजच्या घडीला स्वतःला समाजापासून फार वेगळा समजतो. समाज देखिल त्याला तितका नॉर्मल समजत नाही आणि आदरणीय वा अनुकरणीय मानत नाही. मानले तरी रडत रडत, नाक मुरडत मुरडत, घाबरत, अर्धवट मानतो.
-- पुरोगामित्वाला हे काहि नवीन नाहि. पुरोगामी व्यक्तीचं वेगळेपण असणारच. अन्यथा पुरोगामित्वाची गरजच काय ?

>>एक माणूस पुरोगामी बनल्याचे किती महत्त्व आहे? अमिताभ बच्चन नावाची, तो स्वतःच एक या अर्थाने, जाहिरात पाहून कितीतरी लोक कलाक्षेत्रात नशीब काढायला येतात. अमिताभने किती मोठा कळस गाठला आहे यापेक्षा मला या सर्व छोट्या मोठ्या लोकांच्या आयुष्यात काय झाले आहे ते महत्त्वाचे वाटते. तसेच पुरोगामीत्वाचे आहे. चार लोक काय करत आहेत यापेक्षा समाज काय करत आहे, कोठे जात आहे ते महत्त्वाचे.
-- व्यक्तीबदल दृष्टीआड करुन समाज बदलाचे स्वप्न कसं बघता येईल? तसंही समाज आपली स्थितीप्रियता सोडु शकत नाहि. आणि एकुण समाज एकसाथ पुरोगामि होऊ शकत नाहि.

>>पुरोगामीत्वाचे एक तत्त्व, त्याचा एक नियम आणि तद्नुषंनाने येणारे वर्तन हे महाकठीण कर्म आहे.
-- पुरोगामित्व एक वृत्ती आहे हे आधि उमगायला हवं. नियम, वर्तन वगैरे आपोआप येतात.
>>म्हणजे काय ते साधे उदाहरण देऊन सांगतो. संगीत ऐकावे का नाही? एका अर्थाने पाहिले तर संगीतात अनैसर्गिक आवाज असतात.
-- चूक. संगीत म्हणजे एका विषिष्ट लयीला मनाने दिलेला प्रतिसाद. त्याय अनैसर्गीक काहिच नाहि.
>>मग आपल्याला संगीत आवडते यात परंपरांचा किती प्रभाव आहे?
-- शुण्य प्रभाव.
>> 'शांती समाधान सर्वां भूतां' असे आळवून आळवून वाद्ये बडवून न ऐकता सरळ 'सर्व प्राण्यांना शांती समाधान असावे' असे थंड गद्यात ऐकले तर काय वेगळा फरक पडावा? परिणाम तोच व्हायला हवा. पण असे होत नाही.
-- काव्य आणि संगीत हे भिन्न विषय आहेत. त्यांची रंजकतेची तुलना करणे मुळातच चुक आहे.
>>संगीताने आपण भारावून जातो. का? संगीत उद्योगाने आपल्या अंधश्रद्धेचा गैरफायदा घेऊन करोडो रुपये तर वसूलले नाहीत?
-- अंधश्रद्धेचा आणि संगीताचा संबंध कळला नाहि. आणि एकदा समाज म्हणुन मान्यता मिळवली तर व्यापाराला देखील मान्यता मिळते. तिथे बाजार आलाच.
>> मग संगीत त्यागावे का? मला थंड गद्याने तितकाच अभिनिवेष अभिप्रेत होत असेल तर मी तसे करून पुरोगामी का बनू नये?
-- तितकाच अभिनिवेष प्राप्त होत असेल तर ते गद्य आणि काव्य एकाच क्वालिटीचे आहेत असं म्हणता येईल फार तर. दोन वेगळ्या अभिरुचींना एकाच साच्यात बसवायचा अट्टहास कुठलं पुरोगामित्व मिरवतोय?

>>थोडक्यात काय एक विचारी माणूस म्हणून आपण मनुष्याचे संपूर्ण वर्तनच चिकित्सेच्या ऐरणीवर आणू शकतो.
-- निश्चितच. पण त्यातल्या कृत्रीमतेचं भान ठेवायलाच हवं.
>> सोंड असलेल्या माणसाचा देव म्हणून मिपावर फोटो आहे, तेथे लेखन करून मी प्रतिगामीत्वास बढावा देत नाहीय काय असे प्रश्न उभे राहतात.
-- इथे पुरोगामी-प्रतिगामी अशा वादात जाणं हेच मुळी प्रतिगामित्वाचं लक्षण आहे. आपल्याला एखादी गोष्ट कळत नाहि, पटत नाहि तर सर्वांनाच तसं वाटावं हे कुठलं पुरोगामित्व?
>> जीवन जीवन न राहता फक्त चिंतन आणि तेही वैचारिक क्लेष इतकेच उरते.
-- पुढे जाणं आणि योग्य दिशेने जाणं यांचा ताळमेळ व्यक्तीलाच शक्य आहे. तसा नसला तर वांझोट्या पुरोगामित्वाचं वैचारीक क्लेष हेच फळ आहे.

>>क्लिष्ट अशा तात्विक बाबींवर प्रत्येक माणसाचा विचार करायचा मूड नसतो. इच्छा नसते. वेळ नसतो. बुद्धिमत्ता नसते. ज्ञान नसते.
-- नसतच ना. आणि तसं असायचा अट्टहास देखील वेडेपणा आहे.

>> त्यातून येणारे निष्कर्ष दरवेळी वेगळे निघू शकतात, निघतात.
--निघायलाच हवेत.

>> मग माणसाला आपल्या वागण्याचा पश्चात्ताप होतो.
-- बीग डील. आगीत हात टाकला तर जळणाच. सोन्याला जर आपली अशुद्धी जाळुन भस्म करायची असेल तर असा चान्स घेण्याला पर्याय नाहि.

>>सर्वात वाइट म्हणजे तथाकथित पुरोगाम्यांत एकमत नसते. देव, धर्म पाळणारे पुरोगामी न पाळणारांना आपल्यापेक्षा जास्त पुरोगामी मानणार नाहीत, इ.
-- बीग डील अगेन. तसंही, देव-धर्म (व इतर तत्सम आचार विचार) पाळणार्‍यांना प्रतिगामी समजणार्‍या पुरोगाम्यांनी आपण खुंटीला बांधलेले आहोत हे समजुन घेणं अत्यंत महत्वाचं आहे. समाज प्रबोधन वगैरे फार लांब राहिलं.

>>सबब लेखात कोणी एक महाशय कसे पुरोगत व्हावेत याबद्दल मार्गदर्शन नाही.
-- मला तर कुठलच मार्गदर्शन दिसलं नाहि.

>>सगळाच समाज कसा विकसित व्हावा यावर जोर आहे. प्रत्येकाकडून फर्स्ट प्रिंसिपल्स वापरून पुरोगत बनण्याची अपेक्षा करणे म्हणजे प्रत्येकाला quantum physics शिकवणे आहे.
-- कुठल्यतरी पायरीवर हे केल्याशिवाय गत्यंतर नाहि.

>> याकरिता एक संस्था असावी किंवा असलेल्या संस्थांचे 'अधिकृत' जाळे असावे. या संस्थेने भयंकर डोकेफोड करून सामान्य माणसाच्या वागण्याची मार्गदर्शक तत्त्वे बनवावीत. अशी तत्वे म्हणजे कायदा नाही, निव्वळ रेफरन्स. ज्याला इच्छा आहे तो तत्त्वाच्या मागचा कार्यकारणभाव वाचू, पाहू, तपासू शकतो आणि पटले नाही तर आपल्या मताप्रमाणे वागू शकतो.
-- आजवर असे शेकड्याने प्रयोग झाले आहेत, आजही होताहेत आणि पुढेही होतील.

>>आजच्या परिस्थितीत ज्ञानाच्या अनंत शाखा आहेत, अनंत माहिती आहे, अनंत विषय आहेत, अनेकांच्या अनेक विषयांवर अनेक भूमिका आहेत. हे सगळे लोक प्रामाणिकपणे पुरोगामी वागण्याची इच्छा असणार्‍या माणसाला भ्रमित करतात.
-- हि त्या पुरोगामी वागण्यार्‍या व्यक्तीची मर्यादा झाली. आणि भ्रमीत होण्यात काहिही वाईट नाहि.

>> अशा लोकांत राहिल्याने माणसाला नेहमी आपण भूतकाळात कसे प्रतिगामी होतो याचे शल्य राहते.
-- तसं शल्य राहाण्याचं काहि कारण नाहि. आणि असलच तर ते सकारात्मक रित्या घेतल्या जाऊ शकतं.

>> असा संस्थागत संदर्भ असेल तर माणूस नेहमीच काळाबरोबर, समाजाबरोबर राहतो.
-- आशावाद म्हणुन असं मानणं ठीक आहे. पण ते सत्य नाहि.

>> अशी संस्था असू शकते का, कशी असावी, तिचे कामकाज कसे असावे आणि फिल्ड अ‍ॅक्टीव्हेटीज काय असाव्यात हा पूर्णत: वेगळा विषय आहे.
-- यावर देखील बराच काथ्याकुट झाला आहे मानव इतीहासात.

>>सर्वानी मिळून बासुंदीचा आनंद कसा घ्यावा यासाठी कोणी वाढप्या प्रयत्न करत आहे, त्याचा तिच्यात लिंबू पिळण्याचा परिणाम झाला नाही पाहिजे.
-- स्वयंपाक्याच्या/वाढप्याच्या रेसीपीतच लिंबु पिळणं अंतर्भूत असेल व्हायचा तो परिणाम होणारच.

आपल्या वैचारिक मतांतराचा मला आदर आहे. उदाहरण द्यायचे झाले तर मी 'भारतीय शिक्षण विषयक धोरण' बद्दल बोलत आहे. आपण मिस्टर क्ष च्या शिक्षणाबद्दल बोलत आहात. भारतीय शिक्षण विषयक धोरण काही का असेना, मिस्तर क्ष यांचा काय विचार आहे, वर्तन आहे हा मुद्दा महत्त्वाचा आहे हा आपला विचार मान्य आहे.

arunjoshi123's picture

12 Sep 2013 - 3:43 pm | arunjoshi123

तुमच्या भाषेला, वाक्य रचनेला, विषय मांडणीच्या स्टाईलला त्रिवार सलाम.

http://www.aisiakshare.com/node/1944 इथे मी भाषांच्या उणिवांबद्दल एक धागा काढला होता. तेथिल काही प्रतिसाद वाचण्यासारखे आहेत. मी, माझे व्यक्तित्व, भाषा, मांडणी, बुद्धी, इ इ वर तेथे व्यक्त झालेले विचार पाहिले तर आपला प्रतिसाद सद्गतीत करून सोडणारा आहे.

प्रसाद गोडबोले's picture

12 Sep 2013 - 1:08 am | प्रसाद गोडबोले

५. विज्ञानाने पुराव्याने दिलेल्या कोणत्याही सत्यास खोटे मानू नये.

>>> का?

उलट विज्ञानाने पुरावा दिलेल्या गोष्टी नक्की सत्य आहेत का , की आपण आपल्या मनाची खोटीच समजुत करुन घेवुन बसलोय ?? हा प्रश्न सतत विचारत रहायला पाहिजे आपण आपणाला !

arunjoshi123's picture

12 Sep 2013 - 2:56 pm | arunjoshi123

गिरीजाजी,
अर्थातच आपण म्हणत आहात ते योग्य आहे. इथे थोडा संदर्भ वेगळा आहे. म्हणजे आपल्याकडे 'विज्ञानाच्या नियमांना' चॅलेंज करण्याचे सामर्थ्य असेल तर तसे अवश्य करावे. पण सहसा ते शास्त्रज्ञ करतील. या लेखात सामान्य माणसाचे बर्डन शक्यतो कमी करण्याचा प्रयत्न आहे. मग 'सरकारचे कायदे पाळावेत' असे लिहिले आहे. अर्थात असलेले काय्दे गरजेचे आहेत का, योग्य आहेत का, त्यांचा अर्थ नीट काढला जातोय का हे पाहणेही आलेच. पण ते सामान्य माणसाचे काम नाही. त्या त्या क्षेत्रातल्या लोकांनी ते काम करावे.
आपण ज्या अर्थाने प्रतिसाद लिहिला आहे तो त्या अर्थाने योग्य आहे.

प्रसाद गोडबोले's picture

12 Sep 2013 - 11:15 pm | प्रसाद गोडबोले

पण ते सामान्य माणसाचे काम नाही. त्या त्या क्षेत्रातल्या लोकांनी ते काम करावे.

आणि ह्यावाक्यावर मला ठेच लागली ...कारण ह्या वाक्याचा अर्थ असा होतो कि त्या त्या क्षेत्रातील तज्ज्ञ माणसेच खर्‍या अर्थाने पुरोगामी आहेत बाकीचे थोड्याश्या हायर लेव्हलचे अंधश्रधाळुच !!
मग अशा अंधश्रधाळुंना जरा खालच्या लेव्हलच्या अंधश्रध्दाळुंना प्रतिगामी (की अजुन काही) म्हणण्याचा काय अधिकार ?

arunjoshi123's picture

13 Sep 2013 - 5:52 pm | arunjoshi123

गिरीजाजी,
आपण अगदी योग्य अर्थ घेतला आहे मला काय म्हणायचं आहे त्याचा. तज्ञ ते पुरोगामी आणि आपण ते डोळस अनुयायी. असे म्हणण्याचे मुख्य कारण हे आहे कि ज्ञानाच्या अनेक मुख्य शाखा आहेत. अनेक उपशाखा आहेत. प्रत्येक शाखेत ज्या ज्या गोष्टीचे ज्ञान करून घ्यायचे त्यादेखिल हजारो आहेत. शिवाय प्रत्येक गोष्टीची माहिती इतक्या खोलात उपलब्ध आहे कि सगळी माहिती घेणे एक क्लिष्ट काम आहे. साधे मला 'उपवास करावा का?' या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी जीवशास्त्र, शरीरशास्त्र, पचनसंस्थाशास्त्र, अन्नशास्त्र, पाकशास्त्र, धर्म, अध्यात्म, इतिहास, पर्यावरण, आरोग्यशास्त्र, उर्जाशास्त्र, कुटुंबशास्त्र, इ इ ची कितीतरी माहिती लागेल. समजा देवासाठी 'उपवास करणे' अंधश्रद्धा आहे, पण अन्यथा उपवास करणे चांगले आहे असा निष्कर्ष निघाला तर अजून बरेच प्रश्न उभे राहतात. जसे, उपवासात काहीच खाउ नये का? तो किती काळाचा असावा? महिन्यातून कितीदा करावा? आपण जर एक 'उपवासनिती' अवलंबायला जाल तर हजारो प्रश्न उभे राहतील ज्यांचे समाधानकारक उत्तर हवे असेल. ही उत्तरे मिळवण्यासाठी पुन्हा प्रचंड अभ्यास करावा लागेल. कोणी म्हणेल कि काही हरकत नाही, आपल्यासमोर आयुष्य पडले आहे उत्तरे शोधायला. पण अशी निती प्रस्थापित करण्यासाठी एक सुसूत्र पद्धत उपलब्ध नाही. म्हणून आपण समाधानकारक उत्तराकडे पोहोचणार नाही. आपली निती चांगली आहे असे समाधान मिळणार नाही कारण इतर लोक वेगळ्याच निष्कर्षाप्रत पोहोचलेले आढळतील.
उपवासासारख्या आपण हजारो गोष्टी करतो. जो कोणी त्याच गोष्टी आपल्यापेक्षा वेगळ्या प्रकारे करतो तो आपल्याला एक प्रकारे खालच्या, वरच्या, वेगळ्या लेवलचा/पुरोगामीत्वाचा समजतो. जीवन प्रत्येक शास्त्राच्या प्रत्येक अंगाला स्पर्श करते. अशा प्रत्येक ठिकाणी स्वतःचा निर्णय घेऊ अशी प्रत्येकाची क्षमता नसते.
जीवनात एका विशिष्ट थ्रेशोल्डपर्यंत भिन्न व्यक्तिंमधे भिन्न विचार, वर्तन असणे आवश्यक, योग्य, नैसर्गिक, स्वागतार्ह आहे. पण त्यांनंतर मात्र ते कसे असावे यासाठी मार्गदर्शन हवे. ते तज्ञांनी करणे बरे. 'लठ्ठ असाल तर आठवड्यात एक दिवस केवळ फलाहार करा', 'विठ्ठल पावण्यासाठी एकादशीला उपास करा', 'उपासाने पचनशक्ती वाढते, रोग ठीक होतात, म्हणून करा', 'इंद्रीये ताब्यात राहतात, मन प्रसन्न राहते...', 'करू नका, कधीच करू नका', इ इ पैकी काहीतरी एक असावे. समजा उपवास हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे, आणि प्रत्येकाचे वेगळे मत आहे, तर हा समाज भरकटलेला वाटेल.
'अधिकृत असे तज्ञ लोक ' यासाठी कि प्रत्येकास आपण तज्ञच आहोत असे वाटते. तज्ञ लोकच खरे पुरोगामी असतात, आपण त्यांच्या तज्ञतेचे साक्षी असतो आणि आपण त्यांच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. प्रश्न आपल्या इगोचा नाही, प्रश्न खरोखरीच योग्य वागण्याचा आहे. आणि जे लोक हुशार असतात ते कशा ना कशाचे तज्ञ, इच्छा असेल तर, बनू शकतात.

मंदार कात्रे's picture

12 Sep 2013 - 3:12 pm | मंदार कात्रे

सहमत