माझ्या सर्व सहकारी शिक्षक मित्रांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
आज "शिक्षक दिन" ! हा दिवस भारताचे प्रथम उपराष्ट्रपती आणि डॉ. राजेन्द्रप्रसाद यांच्यानंतर झालेले द्वितीय राष्ट्रपती, भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून साजरा केला जातो. त्यांचा जन्म ५ सप्टेंबर १८८८ रोजी झाला. त्यांच्यावर स्वातंत्रवीर सावरकर व विवेकानंद यांच्यासारख्या तत्ववेत्यांचा जबरदस्त प्रभाव होता. त्यांनी तर्कशात्र या विषयात पदवीत्युर पदवी प्राप्त केली आणि मद्रास निवासी कॉलेज मध्ये ते प्राध्यापक म्हणून काम करू लागले. त्यांनी आपल्या लेख आणि भाषणातून भारतीय संस्कृती आणि तर्कशास्त्र यांना जगामध्ये आदराचे स्थान मिळवून दिले. त्यांची हीच प्रतिभा आणि योग्यता पाहून त्यांना भारतीय राज्यघटना बनवणाऱ्या समितीमध्ये काम करण्याची संधी मिळाली. सन १९६२ मध्ये राजेन्द्रप्रसाद यांच्या नंतर त्यांना राष्ट्रपती बनण्याचे सौभाग्य मिळाले. त्या कार्यकालामध्ये त्यांनी भारताला विज्ञान क्षेत्रामध्ये मजबूत बनवण्याचे कार्य केले. आपण ज्या युद्धतंत्राचा किंवा अवकाशामध्ये सोडण्यात येणाऱ्या उपग्रहाचा शोध लावू तो संपूर्ण भारतीय बनावटीचा असण्यावर त्यांचा जोर होता. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या "अग्निपंख" या जीवनीमध्ये त्यांनी डॉ. राधाकृष्णन यांचा कार्याचा आणि विज्ञाननिष्ठ दृष्टीकोणाचा विस्तृत उल्लेख केला आहे. ते एक आदर्श शिक्षक होते. त्यांनी ४० वर्ष शिक्षक म्हणून ज्ञानदानाचे पवित्र काम करतानाच एक सुसंस्कारीत पिढी घडवण्याचे काम केले. मूल्याधारित शिक्षण देऊन सामाजिक स्तर उंचावण्याकामी त्यांचे योगदान अतुलनीय आहे. त्यांच्या याच कार्याचा सन्मान म्हणून या दिवशी शिक्षण क्षेत्रात विशेष आणि उल्लेखनीय काम करणाऱ्या शिक्षकांचा पुरस्कार देऊन गौरव केला जातो.
पुन्हा एकदा शिक्षक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा !
- साजीद पठाण
प्रतिक्रिया
5 Sep 2013 - 10:51 am | उद्दाम
शुभेच्छा
5 Sep 2013 - 12:43 pm | अनिरुद्ध प
निदान शिक्षक दिना मुळे एक दिवस तरी शिक्षकाना मानवन्दना मिळते,हे ही नसे थोडके.
5 Sep 2013 - 8:55 pm | पैसा
शुभेच्छा आणि धन्यवाद! इथे सगळ्यांनी आपल्या शिक्षकांबद्दलच्या बर्यावाईट आठवणी जरूर द्या! त्या निमित्ताने शिक्षकांची आठवण काढली जाईल!