बळी आणि कत्तलखाना

अत्रन्गि पाउस's picture
अत्रन्गि पाउस in काथ्याकूट
25 Aug 2013 - 5:02 pm
गाभा: 

(तथाकथित) धार्मिक कार्यासाठी पशू पक्ष्यांचा 'बळी' देणे ह्यात आक्षेप नेमका कशाला आहे ?

सर्वसाधारण पूजा, अर्चा, नवस, व्रत वैकल्ये ह्या वरचे आक्षेप आणि त्यात 'बळी - दान' आले कि येणारे आक्षेप हे एकदम वेगळ्या लेव्हल जाते... नेमके काय होते?

जर केवळ हिंसा हा मुद्दा असेल तर व रोज खाटिकखान्यात अश्या पशु पक्ष्यांची कत्तल होणे हा त्याच्या कितीतरी पट मोठा मुद्दा व्हायला हवा ना ?

बाय द वे, काही यज्ञ विधींमध्ये कोहोळा एका घावात कापणे असा विधी बघितला आहे...तो काही बळी सदृश प्रकार (प्राणी नाही तर फळ) असावा कि काय असे हि वाटते?

प्रतिक्रिया

रोज रात्री आमच्या खान-पान विधीसाठी मासे,कोंबडी आणि शेळी आपापला देह सत्कारणी लावतच असतात.

बाकी, पूजा, अर्चा, नवस, व्रत वैकल्ये ह्यांची आम्हाला काहीच गरज नाही.

केवळ हिंसा हा मुद्दा असेल तर आमच्या वेळेची हिंसा सरकारकडून होत असतेच.आजकाल त्याचेही काही वाटत नाही.

काही यज्ञ विधींमध्ये कोहोळा एका घावात कापणे असा विधी बघितला आहे... "आमचा खिसा पण" बायकोने काय तो एकदाच कापावा असे वाटते. (प्रेयसीने मात्र रोज कापावा.)

सासवड्कर's picture

25 Aug 2013 - 10:04 pm | सासवड्कर

अनेक धार्मिक मंडळींना जीभेसाठी दुसर्या जीवाची हत्या करणे मान्य नसल्याने ते याला विरोध करतात . अमुक दिल्यावर देव तमुक करेल असे मानणे म्हणजे देवाचे / देव या कल्पनेचे अवमुल्यन आहे असे मानून संत याला विरोध करतात . तर या व्यवस्थेचा ज्यांना फायदा होतो ते याचे समर्थन करतात .
नवीन येणाऱ्या कायद्यात नरबळी हा गुन्हा मानला आहे . इतर पशूंच्या बळी बद्दल काहीही म्हटले नाही .
पुराणामध्ये यज्ञात पशु बळी देण्याचे विधान आहे . एका यज्ञात तर इतके बळी दिले कि त्या बळीच्या वाळत घातलेल्या कातडीने नदीचे दोन्ही तट लांबपर्यंत भरून गेले आणि त्या नदीला चर्मण्वती असे नाव पडले . पुढे जैन व बौध्द धर्माच्या धर्माच्या प्रभावाने हिंदू वैदिक शाकाहारी होऊ लागले तेव्हा हा प्रकार बंद झाला किंवा प्रतीकात्मक रित्या होतो .

नित्य नुतन's picture

26 Aug 2013 - 5:48 pm | नित्य नुतन

देवाच्या नावाखाली प्राण्याचा बळी देणे आणि नंतर नैवेद्य म्हणून ते मांस खाणे, हा खरंच दुर्दैवी प्रकार आहे.
मांसाहार करायचाच आहे तर तो देवाच्या नावाआड कशाला?
आमच्याकडे लग्न झाल्यानंतर कुलदैवतांचा गोंधळ घालून बकर्याचा बळी देण्याची प्रथा आहे ... आमच्या लग्नात या प्रथेला छेद देत आम्ही फक्त गोंधळ घालूनच थांबलो ... सर्व काही व्यवस्थित चालू आहे ....

दादा कोंडके's picture

26 Aug 2013 - 6:10 pm | दादा कोंडके

आमच्या लग्नात या प्रथेला छेद देत आम्ही फक्त गोंधळ घालूनच थांबलो

मी म्हणतो, गोंधळ तरी का घालावा? उगाच ध्वनीप्रदुषण आणि शेजारपाजार्‍यांना ताप.

नित्य नुतन's picture

26 Aug 2013 - 6:19 pm | नित्य नुतन

नाही नाही गोंधळ घरी नाही, जेजुरीला देवळात घालतात ... त्या निमित्ताने देव दर्शन पण होते ... आणि वाघ्या मुरली च्या performance मधून लोक संगीताची अदाकारी पण बघता येते ... शिवाय अशा प्रथांमधून ग्रामीण भागात रोजगार उपलब्ध होतो ...

दादा कोंडके's picture

26 Aug 2013 - 7:01 pm | दादा कोंडके

त्या निमित्ताने देव दर्शन पण होते ... आणि वाघ्या मुरली च्या performance मधून लोक संगीताची अदाकारी पण बघता येते ... शिवाय अशा प्रथांमधून ग्रामीण भागात रोजगार उपलब्ध होतो ...

एखाद्या गोष्टीचं योग्य जस्टीफिकेशन नसलं की इतर अनेक असंबद्ध गोष्टी पुढे केल्या जातात याचं एक उदाहरण.

शिल्पा ब's picture

26 Aug 2013 - 10:45 pm | शिल्पा ब

कैच्या कै

बाळ सप्रे's picture

27 Aug 2013 - 10:50 am | बाळ सप्रे

अगदी अगदी.. रोजगार निर्माण होतो हे सगळ्यात ridiculous justification वाटतं...

नित्य नुतन's picture

27 Aug 2013 - 11:39 am | नित्य नुतन

बाळ साहेब, टीवी, सिनेमातूनही रोजगार निर्माण होतो ना, देव धर्म या सारख्या गोष्टीवर किती तरी सिनेमे, मालिका निघतात ...ग्रामीण पातळीवर त्यांच्या क्षमतेनुसार ते देवांची महती गाणारे लोकसंगीत सादर करून पोटाची खळगी भरतात ... तरी पण तुम्ही म्हणणार का कि रोजगार निर्माण होतो हे ridiculous कारण आहे?

गवि's picture

27 Aug 2013 - 11:43 am | गवि

नित्य नुतन,

आपण अनिल अवचटांचं वाघ्या मुरळी हे पुस्तक वाचलं नसेल तर जरुर वाचा. हे पुस्तक जुनं जरुर आहे. पण त्या परिस्थितीत चांगल्या अर्थाने बदल घडला असेल तर तो इतकाच की या प्रथा कमी झाल्या. एरवी ज्या थोड्या प्रमाणात त्या चालू आहेत त्यामधे त्यांचं शोषण कमी झालं असण्याची कोणतीही तार्किक शक्यता नाही.

या पुस्तकात लेखकाने प्रत्यक्ष त्या त्या समूहांमधे जाऊन वाघ्या मुरळी आणि अन्य कलाकारांच्या त्या "कला" प्रदर्शनामागची तपशीलवार सत्यं आणि "रोजगारा"चं वास्तवही स्पष्ट समोर आणलं आहे.

नित्य नुतन's picture

27 Aug 2013 - 1:54 pm | नित्य नुतन

नवीन पुस्तकाचा नाव सुचवल्याबद्दल धन्यु गवि साहेब .. पण वाघ्या मुरळीच्या प्रथेचं मी समर्थन करते आहे असा कृपया गैरसमज करून घेऊ नका ... देवांचा गोंधळ घालण्यामागे त्यांचे गुणगान गाणे देवादिकांच्या कथा ऐकणे हाच मूळ उद्देश असतो ... आता वाघ्या मुरळीच्या जागी तिथे जी skilled व्यक्ती उपलब्ध असेल ती सुद्धा चालू शकते ..

माझा मूळ मुद्दा बाजूलाच राहिला .. आणि कोणीतरी चुकीच्याच रुळावर ही गाडी नेवून ठेवल्याचा भास मला सतत होत आहे

नाही नाही. तुम्ही समर्थन करताहात म्हणून नाही सुचवलं पुस्तक. वाघ्या मुरळीची हलाखी किंवा अन्य काही वाचून मन कष्टी व्हावं असाही उद्देश नाही.

फक्त ते नेमके मुद्दे जे तुम्ही मांडले आहेत (कला, रोजगार) त्यांची आणि फक्त त्यांची सत्यस्थिती लक्षात येण्यासाठी सुचवलं.

बाळ सप्रे's picture

27 Aug 2013 - 12:02 pm | बाळ सप्रे

प्रत्येक व्यवसायाचे एक महत्व असते .. मूळ कारण असते.. जसे टीवी, सिनेमा हे मूळ मनोरंजनासाठी आहे.. मनोरंजन हे मूळ कारण आहे.. रोजगार हा त्यातला दुय्यम भाग आहे.. तसे एखाद्या व्यवसायातले मूळ कारणच अर्थहीन, कालबाह्य असेल तर केवळ रोजगार हे justification जर व्यवसाय तगवण्यासाठी दिले तर ते ridiculuous आहे.. लोकसंगीत व त्यातून होणारे मनोरंजन हे जिथे लोकांना भावतयं त्याला काहीच हरकत नाही...
काल्पनिक उदाहरण घ्या.. जसे फाशी द्यायला मांग (??) असतात तसे नरबळी देणारे समजा एक विशिष्ट लोक असतील तर त्यांचा रोजगार जाईल म्हणून नरबळीप्रथा चालू ठेवणे कितपत योग्य??

नित्य नुतन's picture

27 Aug 2013 - 1:45 pm | नित्य नुतन

वाघ्या मुरली सादर करीत असलेल्या लोक संगीताचे मूळ कारण हे देवाचे गुणगान गाणे हे आहे .. ते केल्याबद्दल त्यांना चार पैसे मिळतात ... आता हे कारण अर्थहीन आणि कालबाह्य असूच शकत नाही ... नाही का साहेब ? .. मी काही वाघ्या मुरली प्रथेचे समर्थन करत नाही आहे ... देवाचे गुणगान गाणे हे काम वाघ्या मुरली च्या ऐवजी इतर कोणीही केले तरीही देवाला ते तितकेच प्रिय असेल ... आणि देवांचा गोंधळ घालण्यामागे हाच मूळ मुद्दा आहे आणि असलाच पाहिजे ... हं आता अशा लोकसंगीताच्या कार्यक्रमाव्यतिरिक्त हे वाघ्या मुरली काय करतात तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, याच्याशी 'गोंधळ' घालणं न घालणं याचा काही संबंध असूच शकत नाही.. ...

पण तुमच्या बोलण्यात तर असा सूर दिसतो कि सिनेमे हे पांढरपेशे लोकांनी बनवलेले असल्याने त्यांना महत्व आहे पण समाजातील मागास स्तराने त्यांच्या लेवल वर केलेले देवादिकांचे कार्यक्रम मात्र ridiculuous आहेत .. जर रोजगार हे दुय्यम कारण आहे तर मग significant लेवल वर पैशांची उलाढाल ही याच सिनेक्षेत्रात होताना दिसते .. कास्टिंग काउच हा प्रकार इथुनच आम्हाला कळला...

नरबळीच्या प्रथेला कोणताही विवेकी माणूस कडाडून विरोधच करेल ..आणि मी सुद्धा यास अपवाद नाही ... पण, वाघ्या मुरलीच्या प्रथेविरुद्ध बोलताना हे उदाहरण म्हणजे (माफ करा पण) थोडी अतिशयोक्तीच वाटते ... मी पुन्हा एकदा अधोरखित करते कि मी वाघ्या मुरली प्रथेचे समर्थन करत नाही .. पण तरीही त्रयस्थपणे पाहिल्यास कोणीही सांगू शकेल कि नरबळी च्या प्रथेने समाजाची जर २००% हानी झाली असेल तर वाघ्या मुरलीच्या प्रथेने ती त्याच्या अर्धीही नसावी ...

बाळ सप्रे's picture

27 Aug 2013 - 2:32 pm | बाळ सप्रे

आता हे कारण अर्थहीन आणि कालबाह्य असूच शकत नाही

मी लोकसंगीताला अर्थहीन म्हटलेले नाही.. उलट ते उदाहरण म्हणून वापरलय.. लोकसंगीताने मनोरंजन होत असल्याने रोजगार हा मुद्दा वापरायची गरज नाही.

पण तुमच्या बोलण्यात तर असा सूर दिसतो कि सिनेमे हे पांढरपेशे लोकांनी बनवलेले असल्याने त्यांना महत्व आहे पण समाजातील मागास स्तराने त्यांच्या लेवल वर केलेले देवादिकांचे कार्यक्रम मात्र ridiculuous आहेत

अत्यंत चुकीचा अर्थ घेतलात तुम्ही..
माझ म्हणण एवढच आहे की व्यवसायाचा मूळ हेतु अर्थहीन, कालबाह्य असेल तर रोजगार हा मुद्दा आणला जातो जो त्या परिस्थितीत ridiculuous वाटतो..

नरबळीच्या प्रथेला कोणताही विवेकी माणूस कडाडून विरोधच करेल

याच कारणासाठी हे उदाहरण वापरलं. मूळ व्यवसाय अर्थहीन असल्याने त्याच्या रोजगाराचा विचार करुन हा व्यवसाय justify करणे हे ridiculuous.

नित्य नुतन's picture

27 Aug 2013 - 4:26 pm | नित्य नुतन

माझ म्हणण एवढच आहे की व्यवसायाचा मूळ हेतु अर्थहीन, कालबाह्य असेल तर रोजगार हा मुद्दा आणला जातो जो त्या परिस्थितीत ridiculuous वाटतो..

हे वाक्य विधान म्हणून एकदम बरोबर आहे बाळ साहेब...तथापि निव्वळ हा व्यवसाय चालावा म्हणून देवांचे गोंधळ घातले पाहिजेत असे मी कोठेही म्हटलेले नाही ...

देवांचे गोंधळ घालताना अनेकांचे योग्य अयोग्य असे अनेक उद्देश असतील.. केवळ प्रथा म्हणून करणारे जसे लोक आहेत तसेच भक्ती भावाने गुणसंकिर्तन करणारेही लोक आहेत ... . पण अशा कार्यक्रमातून एखाद्या गरिबाला त्याच्या (under the sun केलेल्या) कामाचा मोबदला मिळत असेल तर त्यात आक्षेपार्ह काय आहे...

लोकसंगीताने मनोरंजन होत असल्याने रोजगार हा मुद्दा वापरायची गरज नाही.

भारतासारख्या सामाजिक विषमता असलेल्या देशात एखाद्याचे निव्वळ मनोरंजन हे काही लोकांचे उपजीविकेचे साधन असते .. म्हणूनच रोजगाराचा मुद्दा आला ..ते तसे नसावे अशी माझीसुद्धा अगदी मनापासून इच्छा आहे हो ...

मी या आधी सुद्धा दोन तीन वेळा म्हटले आहे आणि आता ही सांगते की वाघ्या मुरलीच्या प्रथेचे समर्थन करण्याचा माझा हेतु नाही ...

असे वाटत नाही जरा स्पष्ट करुन सान्गाल का?

नित्य नुतन's picture

27 Aug 2013 - 1:57 pm | नित्य नुतन

तुम्हाला असे का वाटत नाही याचे आधी स्पष्टीकरण दिल्यास बरे होईल

अनिरुद्ध प's picture

27 Aug 2013 - 3:05 pm | अनिरुद्ध प

हा प्रतिसाद वजा प्रष्ण हा आपल्याला नसुन श्री बाळ सप्रे यान्च्यासाठी होता हे आपण नीट वाक्य हे कोणाच्या प्रतिसादातिल आहे हे तपास्ल्यावर कळले असते,असो सप्रे साहेब याना माझ्या प्रष्णाचे स्पष्टीकरण द्यावे ही विनन्ती.

बाळ सप्रे's picture

27 Aug 2013 - 3:23 pm | बाळ सप्रे

वरील २ प्रतिसाद वाचा..

अनिरुद्ध प's picture

27 Aug 2013 - 3:46 pm | अनिरुद्ध प

सप्रे साहेब,
पण माझ्या प्रश्णाचा रोख हा ,"

जसे टीवी, सिनेमा हे मूळ मनोरंजनासाठी आहे.. मनोरंजन हे मूळ कारण आहे.. रोजगार हा त्यातला दुय्यम भाग आहे.."

आपल्या या प्रतिसादाबद्दल होता,माझ्या माहिती प्रमाणे सर्व द्रुक्शाव्य वाहिन्या या एक रोजगाराचेच
स्वरुप आहेत.

बाळ सप्रे's picture

27 Aug 2013 - 3:52 pm | बाळ सप्रे

रोजगाराचे एक साधन आहे.. पण मूळ हेतु मनोरंजन हे आहे.. भविष्यात जर यातून होणारे मनोरंजन लोकांना रुचेनासे झाले तर केवळ वाहिन्यांतील कर्मचार्‍यांचा रोजगार जाउ नये म्हणून या वाहीन्या चालू ठेवाव्यात असा मुद्दा आल्यास तो योग्य नाही .. म्हणून मनोरंजन प्राथमिक आणि रोजगार दुय्यम..

अनिरुद्ध प's picture

27 Aug 2013 - 7:01 pm | अनिरुद्ध प

आता ज्या काही बातम्याना वाहिलेल्या वाहिन्या आहेत त्या कसले मनोरन्जन करतात पुर्वी जेव्हा दुर्दर्शन होते तेव्हा बहुसन्ख्य लोक बातम्या सुरु झाल्या की बाजुला जात असत व बातम्या सम्पल्यावर परत येत असत्,आता तर २४ तास फक्त बातम्याच्या वाहिन्या आहेत मग त्यासुद्धा मनोरन्जनासाठी आहेत असे म्हणने आहे का?

बातम्यांच्या वाहिन्यांचा मूळ हेतु माहिती प्रसारण. परत त्यातील कर्मचार्‍यांचा रोजगार हा दुय्यमच..

अनिरुद्ध प's picture

29 Aug 2013 - 2:23 pm | अनिरुद्ध प

असे वाटत नाही

बाळ सप्रे's picture

29 Aug 2013 - 2:24 pm | बाळ सप्रे

ठीक आहे..

डॉ सुहास म्हात्रे's picture

29 Aug 2013 - 3:54 pm | डॉ सुहास म्हात्रे

सर्व वाहिन्यांचा मूळ हेतू "पैसा कमावणे"... आणि त्यासाठी जास्तितजास्त प्रेक्षकवर्ग (TRP) खेचणे. कारण जेवढा जास्त TRP तेवढ्या जास्त बातम्या मिळतात आणि त्यांचा दरही वाढवता येतो.

हाच मूळ हेतू (पैसा कमावणे) सफल करण्यासाठी एखाद्या वाहिनीने फक्त एखाद्याच खास विषयाची निवड केली (ह्याला इंग्लिशमध्ये टॅक्टीक म्हणतात) की ती झाली स्पेशालिस्ट वाहिनी, उदा बातम्यांची वाहिनी, चलत्चित्र वाहिनी, इ. पण पैसे कमावणे हाच मूळ हेतू. त्यामुळेच बर्‍याचश्या बातम्यांच्या वाहिन्या त्यांच्या बातम्यांचीही एखाद्या सिरियलसारखी जाहिरात करतात आणि बातम्यांचे सादरीकरण अत्यंत नाटकीय पद्धतीने करतात.

अनिरुद्ध प's picture

30 Aug 2013 - 12:01 pm | अनिरुद्ध प

पुर्णपणे सहमत.

डॉ सुहास म्हात्रे's picture

30 Aug 2013 - 1:43 pm | डॉ सुहास म्हात्रे

वरच्या प्रतिसादात कृपया "...जास्त बातम्या मिळतात..." ऐवजी "...जास्त जाहिराती मिळतात..." असे वाचावे.

नित्य नुतन's picture

27 Aug 2013 - 11:42 am | नित्य नुतन

दादा साहेब , लोक कीर्तनाचे , अभंगांचे कार्यक्रम ठेवतात .. भक्तीची ती एक अभिव्यक्ती आहे ... मग अशा गोंधळ, लोक संगीताच्या माध्यमातून देवाचे गुणगान गाणारे कार्यक्रम केले तर ते असंबद्ध ? कळले नाही बुवा ...

दादा कोंडके's picture

27 Aug 2013 - 1:57 pm | दादा कोंडके

भक्तीची ती एक अभिव्यक्ती आहे ... मग अशा गोंधळ, लोक संगीताच्या माध्यमातून देवाचे गुणगान गाणारे कार्यक्रम केले तर ते असंबद्ध?

लोककला वगैरे ठिक आहे हो, पण मुळात एक देव आहे. त्याचं गुणगान केल्यावर तो खूष होतो. हा शूद्ध भंपकपणा आहे. रीत पाळली नाही तर कोप होइल. किंवा स्वतःची समजूत म्हणून इतक्या पिढ्या करत आलोय म्हणून करू असली कारणं काही कामाची नाहीत.

नित्य नुतन's picture

27 Aug 2013 - 2:13 pm | नित्य नुतन

दादा साहेब, संत तुकाराम, ज्ञानेश्वर महाराज देवांचे अभंग रचून त्यांची महती आळवत असत.. असे वाटते कि तुमच्या दृष्टीने तो सुद्धा भंपकपणा असावा .. तुम्ही सांगितलेल्यापैकी एकही पोकळ कारण माझ्या बोलण्यात अजूनपर्यंत तरी आलेले नाही ..तुम्ही नका पाळू रिती रिवाज ... ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे तो ..

दादा कोंडके's picture

27 Aug 2013 - 2:41 pm | दादा कोंडके

अनिंस वाल्यांनी खुळचट चमत्कारांचा बुरखा पाडल्यावर पुरोगामी महाराष्ट्रातल्या (हो, त्याच राज्यातल्या ज्यात मुख्यमंत्री जोडीने शासकीय इतमामात विठ्ठलाच्या देवळात जाउन पूजा करतो.) लोकांनी मग विविध संतांना पांडूरंगाचा साक्षातकार झाला तो खोटा का? असं विचारलं. त्यावर दाभोळकरांनी संतांकडे खूप प्रतिभा होती असं मार्मिक उत्तर दिलं होतं.

नित्य नुतन's picture

27 Aug 2013 - 2:55 pm | नित्य नुतन

संतांच्या पातळीवरील भक्ती सामान्य माणसाला करता येउ शकत नाही म्हणून त्याने भक्तीच करू नये असं कुठे म्हटले आहे की काय ...

दादा कोंडके's picture

27 Aug 2013 - 5:38 pm | दादा कोंडके

आज जो आजुबाजूला किडका समाज बघताय ना. तो दहा-वीस वर्षात तयार झाला नाहिये. कित्येक पिढ्यांपासून चालत आलय हे. एंट्रॉपी थोडी कमी-जास्त होत असेल. अंधश्रद्धा, जातीयवाद, अस्वच्छता, स्त्रियांचा छळ वगैरे वगैरे. याचा फुकाचा अभिमान बाळगायचा की हे सगळं विसरून नविन, स्वच्छ समाजासाठी नविन मुल्यं तयार करायची ते तुम्ही ठरवा.

नित्य नुतन's picture

27 Aug 2013 - 6:33 pm | नित्य नुतन

एखाद्या गोष्टीचं योग्य जस्टीफिकेशन नसलं की इतर अनेक असंबद्ध गोष्टी पुढे केल्या जातात याचं एक उदाहरण.

अनिरुद्ध प's picture

28 Aug 2013 - 3:25 pm | अनिरुद्ध प

+१११

ब़जरबट्टू's picture

28 Aug 2013 - 1:21 pm | ब़जरबट्टू

शिवाय अशा प्रथांमधून ग्रामीण भागात रोजगार उपलब्ध होतो ...
हे म्हणजे आम्ही बाहेरच जाऊन बसतो, कारण यामुळे डुक्करांना जेवण मिळते, असे म्हणण्यासारखे आहे... :)

बॅटमॅन's picture

28 Aug 2013 - 3:12 pm | बॅटमॅन

=)) =)) =))

मालोजीराव's picture

26 Aug 2013 - 6:50 pm | मालोजीराव

मांसाहार करायचाच आहे तर तो देवाच्या नावाआड कशाला?

असं काही नाही, आमच्याकडे पूर्वी रेडा बळी द्यायची पद्धत होती, पण रेडा कोण खात नव्हत

अनिरुद्ध प's picture

27 Aug 2013 - 7:16 pm | अनिरुद्ध प

मी शाळेत शिकत असताना आमच्या सन्स्क्रुत च्या शिक्षकानी सान्गितले होते की यज्ञात जो बळी (बोकड) देतात तेव्हा तो त्याच्या शरिरावर ठरावीक ठिकाणी खुण करुन कापतात व त्याच्या ह्रुदयावरचे आवरण काढुन ते यज्ञात आहुती म्हणुन वापरतात व उरलेला बोकड नन्तर पुरला जातो त्याचा खाण्यासाठी उपयोग केला जात नाही,अर्थात ही माझी ऐकीव माहीती आहे,बाकी मी स्वता कुठलाही यज्ञ पाहिलेला नाही आणि मला स्वतालासुद्धा बळि देणे हे मान्य नाही.

मालोजीराव's picture

28 Aug 2013 - 3:27 pm | मालोजीराव

त्याचा खाण्यासाठी उपयोग केला जात नाही

बोकडाला बळी देऊन नंतर पुरणारच असतील माझा या बळीप्रथेला प्रखर विरोध असेल !

अनिरुद्ध प's picture

28 Aug 2013 - 4:58 pm | अनिरुद्ध प

आता विरोधासाठी सुद्धा असे यज्ञ होत नाहीत तर ते प्रखर असुन काय फायदा.

अत्रुप्त आत्मा's picture

26 Aug 2013 - 10:40 pm | अत्रुप्त आत्मा

@बाय द वे, काही यज्ञ विधींमध्ये कोहोळा एका घावात कापणे असा विधी बघितला आहे...तो काही बळी सदृश प्रकार (प्राणी नाही तर फळ) असावा कि काय असे हि वाटते?>>> तसेच आहे... नवचंडी होमात मुख्य यज्ञ पार पडल्यानंतर क्षेत्रपाल/बलिपूजा विधि असतो.. त्यानंतर कूष्मांड(कोहोळा)बली चा विधि असतो... कोहोळा हा शिजायला/पचायला मांसाइतकाच जड असतो..(म्हणे!) म्हणून पशूबळीवर टीका झाल्यानंतर हे असे पर्याय धर्मव्यवस्थेत स्विकारण्यात आले!

सौंदाळा's picture

27 Aug 2013 - 10:52 am | सौंदाळा

नारळ फोडण्याबद्दल पण असेच काहीसे ऐकुन आहे.
नरबळीला पर्याय म्हणुन नारळ फोडतात. नारळाला शेंडी, डोळे असतात. नारळपाणी म्हणजे रक्त आणि खोबरे म्हणजे मांस.
हे खरे आहे आहे का?

सुनील's picture

27 Aug 2013 - 11:15 am | सुनील

नरबळीला पर्याय म्हणुन नारळ फोडतात.

ठीक.

नारळाला शेंडी, डोळे असतात

शेंडीचा खास उल्लेख करण्याचे प्रयोजन समजले नाही!! ;)

सौंदाळा's picture

27 Aug 2013 - 2:11 pm | सौंदाळा

हे मी वाचलेले दिले आहे. शेंडीचा उल्लेख त्यात होता म्हणुन आला.
सगळा काथ्या तसाच ठेऊन नारळ फोडायला अवघड जातो म्हणुन माणसाच्या केसाचे प्रतिक म्हणुन म्हणुन थोडा काथ्या तसाच ठेवत असावेत. त्याला आता शेंडीच म्हणणार की.
तुम्ही बट म्हणा हवं तर ;)

ब़जरबट्टू's picture

27 Aug 2013 - 11:10 am | ब़जरबट्टू

कोहोळा हा शिजायला/पचायला मांसाइतकाच जड असतो..(म्हणे!) फक्त शेवटी म्हणे लिव्हलय म्हणून सोडतोय बघा... आव, नुसते गरम पाण्यात बुडवले तरी शिजेल की व्हो ते.. एक ट्पलावर मारायची स्मायली टाका..

गवि's picture

27 Aug 2013 - 11:34 am | गवि

आणि असलाच समजा जड, तर बुवांच्या आधीच्या प्रतिसादावरुन असं दिसतं की (मनुष्याला) पचायला जड असं काहीतरी बळी देणं आवश्यक आहे. बकरा नाही तर कोहळा..

राही's picture

27 Aug 2013 - 2:33 pm | राही

अहो, नैवेद्य दाखवल्यानंतर ते काहीतरी खायचेच असते ना? मग ते चावायला, पचायला सोपे असायला नको का? म्हणून दुर्बळ आणि नाजुकसाजुक असा प्राणीच पाहिजे. म्हणून तर हत्ती-घोडे नकोत, वाघ तर नकोच नको, पण अजापुत्रं मात्र बलीं दद्यात् !

बॅटमॅन's picture

27 Aug 2013 - 11:41 am | बॅटमॅन

+११११११११

सुनील's picture

27 Aug 2013 - 2:40 pm | सुनील

नुसते गरम पाण्यात बुडवले तरी शिजेल की व्हो ते

पेठा कोहळ्याचाच बनतो ना? जिभेवर ठेवला की विरघळतो बघा!

पेठा बनविण्यासाठी कोणी कोहळ्याचा बळी देणार असेल तर, आपली नाय ना बॉ!!

पिलीयन रायडर's picture

27 Aug 2013 - 1:41 pm | पिलीयन रायडर

काही घरां मध्ये कोहळा बांधतात तो कशासाठी?

दत्ता काळे's picture

27 Aug 2013 - 2:03 pm | दत्ता काळे

घराला आणि घरातल्या व्यक्तींना दृष्ट लागू नये म्हणून.

दत्ता काळे's picture

27 Aug 2013 - 2:05 pm | दत्ता काळे

कोहळा घरात नाही, घराबाहेर दारात बांधतात

पिलीयन रायडर's picture

27 Aug 2013 - 2:29 pm | पिलीयन रायडर

ओके..
पण ह्याला काही शास्त्रीय कारण आहे का?

ईडा पीडा (किंवा जे काही असेल ते) उंबरठयाबाहेरच थांबावी, घरात प्रवेश होऊ नये असं काहीसं असेल.
पण बर्‍याचशा प्रथांबद्दल "का" या प्रश्नाचं उत्तर नसतं. कोहळा प्रकरणही तसच असावं. पूर्वीचे लोक करायचे म्हणून आपणही करायचं.

राही's picture

27 Aug 2013 - 2:54 pm | राही

बळीप्रथेच्या मागची संकल्पना देवतांना प्रसन्न करून घेणे ही जशी आहे, तशीच आलेले/येणारे संकट दुसर्‍यावर जावो अशी इच्छासुद्धा आहे. म्हणजे बळी हा आपण व शत्रू यातला एक बफर. या बळीला शत्रूच्या तोंडी दिले की आपण सुरक्षित. गावातल्या उरलेल्या स्त्रियांचे रक्षण व्हावे म्हणून कुठल्यातरी एक स्त्रीला शत्रूच्या गोटात आपणहून पाठवायची पद्धत मध्ययुगात होती, तसेच हे.
जाता जाता : कोंबडा किंवा बोकड जसा कापायचा असतो, तसाच नारळ हाही फोडायचाच असतो. 'वाढवायचा' नव्हे. जुन्या मराठी साहित्यात 'मुहूर्ताचा नारळ फुटला' असाच वाक्प्रचार आढळतो. कुंकू वाढवणे/अधिक होणे किंवा बांगडी वाढवणे ठीक आहे कारण त्यात अशुभसूचक शब्दांचा उच्चारही नको अशी भावना असे. पण नारळ फोडणे हे तर शुभसूचक कारण आपल्यावरचे संकट दुसर्‍यावर गेले.

अनिरुद्ध प's picture

27 Aug 2013 - 3:15 pm | अनिरुद्ध प

काचेची वस्तु फुटणे हे सुद्धा चान्गले असे ऐकले आहे.

मी_आहे_ना's picture

27 Aug 2013 - 3:21 pm | मी_आहे_ना

आरसा फुटणे पण चांगले समजतात का?

अनिरुद्ध प's picture

27 Aug 2013 - 4:04 pm | अनिरुद्ध प

घरातली कुठलीही काचेची वस्तु फुटली तर 'बला टली' असे म्हणतो आणि पुढच्या कामाला (साफसफाइला)लागतो.

श्रीगुरुजी's picture

29 Aug 2013 - 3:36 pm | श्रीगुरुजी

>>> जर केवळ हिंसा हा मुद्दा असेल तर व रोज खाटिकखान्यात अश्या पशु पक्ष्यांची कत्तल होणे हा त्याच्या कितीतरी पट मोठा मुद्दा व्हायला हवा ना ?

हिंसा कोणत्याही कारणासाठी केलेली असो व कोणत्याही जातीधर्माच्या व्यक्तिने केलेली असो, ती वाईटच. जिभेचे चोचले पुरविण्यासाठी जिवंत प्राणी मारून खाणे हे जितके वाईट तितकेच धर्माच्या नावाखाली जिवंत प्राण्यांचा बळी देणे हेही वाईट.

बॅटमॅन's picture

29 Aug 2013 - 3:56 pm | बॅटमॅन

काही वाईट इ. नाही प्राणी मारून खाण्यात. धर्मव्याधाची कथा वाचलीत काय?

अत्रन्गि पाउस's picture

29 Aug 2013 - 10:09 pm | अत्रन्गि पाउस

नाय ब्वा ...सांगा कि जरा...

बॅटमॅन's picture

29 Aug 2013 - 11:21 pm | बॅटमॅन
डॉ सुहास म्हात्रे's picture

29 Aug 2013 - 4:02 pm | डॉ सुहास म्हात्रे

जीवो जीवस्य जीवनम् ।

बाळ सप्रे's picture

29 Aug 2013 - 4:05 pm | बाळ सप्रे

जिभेचे चोचले पुरविण्यासाठी जिवंत प्राणी मारून खाणे हे जितके वाईट

अहो तुम्ही मांसाहाराच्या मुद्द्यावर भाष्य करताय.. मग जीवंत वनस्पती मारण्याचा युक्तिवाद होतो त्यावर उत्तर नसतं... खूप फाटे फुटतात या चर्चेला..
माझ्यामते कत्तलखाना हा खाद्यपदार्थ तयार करणे हे प्रामाणिक काम करतो. बळी देताना त्याच्या बदल्यात काहितरी होईल असे मानून दिलेला असतो, ज्याला काहिही आधार नसतो.

मालोजीराव's picture

29 Aug 2013 - 9:57 pm | मालोजीराव

जिभेचे चोचले पुरविण्यासाठी जिवंत प्राणी मारून खाणे हे जितके वाईट

त्या बेर ग्रिल ला हाना रे कुनीतरी...आन त्या ब्याटया ला पन :))

बॅटमॅन's picture

29 Aug 2013 - 11:23 pm | बॅटमॅन

ए पण मला का बरे? माझ्याइतका साधा सरळ सभ्य माणूस शोधले (गूगलले, याहूवले, बिंगवले) तरी मिळणार नै.

मोदक's picture

30 Aug 2013 - 12:54 am | मोदक

और आन्दो... :-))

ब़जरबट्टू's picture

30 Aug 2013 - 12:24 pm | ब़जरबट्टू

त्या बेर ग्रिल ला हाना रे कुनीतरी...
तो जिभेचे चोचले पुरावायसाठी हाणत नाय ना, जिवंत साप किडे. तो बिचारा तर चोचले पुरवलेल्या पोटासाठी खातो, तेव्हडेच ते किडे नशिबवान, नाय तर कोण ईच्चारतो त्याना जंगलात

बॅटमॅनला कशाला ? ते काय खातात ? आणि समजा खात ही असतील तर 'बॅट ' म्हणल्यावर हक्क आहे त्यांचा तो,
:)

आनंदी गोपाळ's picture

29 Aug 2013 - 10:04 pm | आनंदी गोपाळ

की मी माणूस झालो.
अ‍ॅनिमल किंग्डम मधे फोटोसिंथेसिस करून जगणारे, व फक्त सूर्यप्रकाश व जमीनीतून शोषलेली मूलद्रव्ये वापरून लाईफ सस्टेनन्स मिळवणार्‍यांत माझा समावेश व्हायला हवा होता..
पण काये ना,
>>
हिंसा कोणत्याही कारणासाठी केलेली असो व कोणत्याही जातीधर्माच्या व्यक्तिने केलेली असो, ती वाईटच. जिभेचे चोचले पुरविण्यासाठी जिवंत प्राणी मारून खाणे हे जितके वाईट तितकेच धर्माच्या नावाखाली जिवंत प्राण्यांचा बळी देणे हेही वाईट.
>>
गाईपासून वासराला तोडून मिळवलेले 'अहिंसक' खरवस वा दूध.
दुधाळ हुरडा हवा म्हणून धाटातून तोडलेली कणसे, वा कोवळ्या शेंगा वेलीवरून खुडणे, अन अंडी खाणे वा कोवळे बकरू मारून खाणे यात तौलनिक फरक मला तरी दिसत नाही.

साहेबा, जीवो जीवस्य जीवनम, हे सत्य मानायला शिकलेच पाहिजे..

अत्रन्गि पाउस's picture

29 Aug 2013 - 10:12 pm | अत्रन्गि पाउस

'मुळासकट'उपटलेले कांदे बटाटे...निर्घृण पणे कापलेली तरारलेली उभी पिके..हे सगळे.'सात्विक आणि अहिंस.'???

दादा कोंडके's picture

30 Aug 2013 - 2:01 pm | दादा कोंडके

गळ्याशी नख खुपसून, अंदाज घेत क्रूर पणे त्वचा सोलली जातीये दुधी भोपळ्याची,

सपासप सुरी चालवत कांद्याची कापा काप चालली आहे, डोळ्याची आग आग होतीये,

शहाळ्या-नारळावर कोयत्या ने दरोडा घातला आहे,

हे भाजलं जात आहे वांग, निथळतंय त्वचेतून पाणी, टप टप,

तडतडल्या मोहोरी, हा खेळ चा फड फडात,

कडीपत्या च्या पंखांचा उकड्त्या तेलात,

आणि तिखट टाकला जात आहे, भाजीच्या अंगावर डोळ्यात,

धारेवर खिसली जात आहे गजर,

पिळवणूक चालली आहे आंब्याची, सर्व हारा बनलीये कोय,

वर्वान्त्या खाली चिरडली जाते आहे मीठ मिरची,

बत्ता घातला जातो आहे वेलदोड्याच्या डोक्यात,

फडक्याने गळा ओढून मुसक्या बांधून दह्याला फासावर चाडवला आहे चक्का बनवण्यासाठी,

हे भरडले जाताहेत गहू, लाही लाही होतीये मक्याची ज्वारीची,

भर बाजारात सुरा खुपसला जातोय कलिंगडा च्या पोटात,

पोलीस नुसतेच बघतायत,

संत्र्या मोसंबी केळ्यांची वस्त्र उतरवली जातायत,

हे काय चाललायं, हे काय चाललायं….

- अशोक नायगावकर

डॉ सुहास म्हात्रे's picture

30 Aug 2013 - 2:05 pm | डॉ सुहास म्हात्रे

=)) =)) =))

मजेशीर तर आहेच पण एकदम सत्यही आहे.

असं पहा. मांसाहारी लोक्स कधीही मांसाहाराचा प्रचार करत नाहीत. शाकाहारी करतात.

शाकाहारी मांसाहाराविरुद्ध बोलताना १. आहारशास्त्रीय २. उत्क्रांती ३. मानववंशशास्त्रीय ४. धार्मिक ५. तामसी आहाराने मनही तामसी ६. हिंसा व्हर्सेस अहिंसा

असे अत्यंत विविध मुद्दे काढून कोणत्यातरी एकाने का होईना पण मांसाहार सोडावा अशा मताचे असतात.

यातला हिंसेचा मुद्दा हा प्राणी विरुद्ध वनस्पती या सोयीस्कर विभागणीवर अवलंबून असतो.

प्राणी मारताना तडफड / ओरडणं / वेदना / रक्त दिसतं म्हणून ती हिंसा.

वनस्पती मारताना एक जगू इच्छिणार्‍या जीवाचं जीवन संपवणे असा सरळसरळ मामला असतानाही ते तुलनेत अहिंसक कारण वनस्पती तर बिचार्‍या आवाजही करत नाहीत. म्हणजे मग काही हरकत नाही मारायला.

बाकी त्यांना वेदना होत नसणारच.. कारण त्यांना सेंट्रल नर्व्हस सिस्टीम नसते.. अशा दिशेने मात्र सोयीस्कर "सायन्स"मधे शिरलं जातं.

यामधे अर्थातच वनस्पती या प्राण्यांच्या (सोयीसाठी ही दोन नावं वेगळी घेतोय) तुलनेत अगदीच कनिष्ठ दर्जाचे जीव मानलेले असतात शाकाहाराला हिंसा न ठरवण्यामधे. मुंगीला मारताना थोडाच आपण विचार करतो? क्षुद्र जीव तो.

त्यात मुख्य लक्षात घेतलं जात नाही ते हे की खाल्लं तर आपल्याला पाहिजेच.. आणि अन्य जीवांना मारुन खाणं हा केवळ आपापल्या पूर्वग्रहांचा भाग आहे. लहानपणापासून मासे खातो तर खातो..म्हणून क्रौर्य / घृणा वगैरे नाही वाटत. हिंसा वगैरेच्या पलीकडे जाऊन हा एक सवयीचा भाग आहे.

प्राणीहत्येतलं क्रौर्य हाही एक आपापल्या पूर्वग्रहांचाच भाग आहे.

आजोबांच्या काळापासून असलेला एक वटवृ़क्ष तोडायची वेळ आली तर आपण हळहळतो. तोडणं टाळतो. कारण आपल्याला त्याची सवय झालेली असते. पण मेथीची रोपटी मात्र आठवड्यापूर्वी बागेत उगवली तर ती लगेच तोडून त्याची भाजी करतो.. कारण त्यांच्याशी मानसिक "लगाव" झालेला नसतो. शिवाय ते क्षुल्लक रोपटं असतं.. भाजीच तर आहे ती.. त्यासाठीच लागवड केली होती...मेथी म्हणजे वृक्ष नव्हे.. आणि आपण मेथी खाण्यासाठी तोडतोय.. सोयीसाठी नव्हे.. वगैरे आपण स्वतःला समजावूच अशा वेळी.

असो.

चिगो's picture

30 Aug 2013 - 4:15 pm | चिगो

अंगावर काटा आला हे अमानुष क्रौर्यवर्णन वाचून.. त्या मुक्या भाजीपाल्यांच्या किंकाळ्या मनात उमटल्या आणिवहादरलो मी.. :-(

श्रीगुरुजी's picture

29 Aug 2013 - 10:55 pm | श्रीगुरुजी

जर मांसाहार वाईट नसता व शाकाहार व मांसाहारात काहीच फरक नसता, तर गांधीजी, टॉलस्टॉय, संत तुकाराम/ज्ञानेश्वर/रामदास इ. सारखे महान संत इ. महान व्यक्तींनी फक्त शाकाहाराचे समर्थन न करता स्वतः मांसाहार देखील केला असता. टॉलस्टॉय एकदा म्हणाले होते की माझ्यासारखी आध्यात्मिक व्यक्ती मृत प्राण्याचे मांस कधीही खाणार नाही. गांधीजींची सून एकदा खूप आजारी पडून दुर्बल झाल्यावर डॉक्टरांनी तिला अंडी द्यायला सांगितल्यावर गांधीजींनी अंड्यात सुद्धा जीव असतो असे सांगून अंडी देण्यास विरोध केला होता.

मग असे असेल तर व्याध गीतेची कथा कशी काय आली असती? प्राणी मारण्याला विरोध नसून निव्वळ चोचल्यांना विरोध आहे. मग त्यात तंदुरी चिकन आले तशीच बासुंदीपुरीही आली.

बाकी मग वसिष्ठ ऋषींसाठी आपली गाय मारली म्हणून शिव्या देणारा उत्तररामचरितातला सौधीतकी, मांस खाणारे राम व कृष्ण हे पाहिल्यास त्याचा अध्यात्माशी तादृश संबंध नाही.

आनंदी गोपाळ's picture

29 Aug 2013 - 11:47 pm | आनंदी गोपाळ

पोटची पोरे चिरून दारी आलेल्या अतिथीला शिजवून खाऊ घातल्याच्या कथा आहेत, अन बुद्धाचा मृत्यू सूकरमद्दव खाऊन झालयाच्या ही आहेत.
बाकी गांधी म्हटले म्हणून अंडी खाऊ नका अन आसाराम म्हटले म्हणून ६ मुले झालेली अमेरिकन स्त्री ६ पुरुषांची सोबत करत असेल असे म्हणणे हे इक्वली बावळटपणाचे आहे.
धन्यवाद.

आनंदी गोपाळ's picture

29 Aug 2013 - 11:52 pm | आनंदी गोपाळ

टॉलस्टॉय, गांधी इ. ना बाबा बनवून शाकाहारी कॉण्टेक्टसाठी व तेवढ्या पुरता त्यांचा बाबा वाक्यं प्रमाणं साठी वापर करण्याच्या प्रयत्नांचा निषेध.

सुनील's picture

30 Aug 2013 - 8:36 am | सुनील

श्रीगुर्जींकडून गांधीबाबाचा महान संत म्हणून उल्लेख झालेला पाहून ड्वाले पानावले ;)

(सद्गदित) सुनील

श्रीगुरुजी's picture

30 Aug 2013 - 2:46 pm | श्रीगुरुजी

हरकत नाही. पण यापेक्षा खाटकाची सुरी प्राण्यांच्या मानेवर फिरल्यानंतर त्यांना होणार्‍या वेदनांमुळे डोळे पाणावेत असे वाटते.

दादा कोंडके's picture

30 Aug 2013 - 2:57 pm | दादा कोंडके

या पैकी काय पाहिल्यानंतर आपले डोळे पाणावतील?

- मुंग्यांच्या बिळात भस्सकन डिडिटी किंवा रॉकेल टाकल्यावर
- पेस्ट कंट्रोलींग करताना पिशवीभर झुरळं मारल्यावर
- खाण्याचं आमिष दाखवून किंवा न दाखवता उंदीर मारल्यावर
- मॉस्क्टीटो किलर वापरल्यावर
- इलेक्ट्रीफाइड फ्लाय किलर्सने माश्या मारल्यावर
- अनेक प्राण्यांचे जीव घेउन तयार केलेली औषधं वापरताना
- शेतात पिकांवर जंतुनाशक फवारल्यावर

मालोजीराव's picture

30 Aug 2013 - 3:00 pm | मालोजीराव

दादा…ह्येच ल्हिनार होतो…धन्यवाद

जबरी हो दादा....हा दुटप्पीपणा नेहमीचाच आहे. तथाकथित हिंसेचा निषेध करणारे अहिंसावादी शाब्दिक हिंसेत मात्र कायम पुढे असतात.

बाळ सप्रे's picture

30 Aug 2013 - 10:25 am | बाळ सप्रे

तर गांधीजी, टॉलस्टॉय, संत तुकाराम/ज्ञानेश्वर/रामदास इ. सारखे महान संत इ. महान व्यक्तींनी

त्या त्या व्यक्तिंचे विशेष गुण, विचार नक्कीच जवळ करावेत पण त्यांना सरसकटपणे देवपण देउ नये. त्यांनी केलेले सर्व योग्य असे सरसकटपणे ठरवू नये. उदा. गांधींचे ब्रह्मचर्य, कुटुंब नियोजनाविषयीचे विचार , भूकंप म्हणजे देवाने केलेली शिक्षा इ खरच विचार आजच्या विचारसरणीवर पूर्णपणे अयोग्य वाटू शकतात हे स्वीकार करावे.
म्हणून सगळ्यांनीच मांसाहार करावा असे नव्हे. पण करणार्‍यांवर हिंसकतेचा शिक्काही मारु नये.

अनिरुद्ध प's picture

30 Aug 2013 - 12:11 pm | अनिरुद्ध प

सहमत

श्रीगुरुजी's picture

30 Aug 2013 - 2:47 pm | श्रीगुरुजी

डॉ. कल्याण गंगवाल यांचा खालील लेख सर्वांनी अवश्य वाचावा.

http://article.viewsandissues.org/2013/03/25/the-scientific-basis-of-veg...

तुषार काळभोर's picture

1 Sep 2013 - 10:19 am | तुषार काळभोर

शाकाहारी प्राण्यांना सपाट असे पटाशीचे दात असतात. मांसाहारी प्राण्यांना सुळे असतात. माणसांनाही सुळे दात असतात.

सशाचे आणि मांजर/कुत्रा या प्राण्यामध्ये नखांमध्ये (क्लॉज्) सारखेपणा असतो. पण ससा कुणालाही फाडून खात नाही.

मांसाहारी प्राण्यांचे दोन्ही डोळे समोर असतात. त्याने त्रिमितीय दॄष्टी मिळते. अंतराचा अचूक अंदाज घेऊन हल्ला करायला मदत होते. शाकाहारी प्राणी हे "शिकार" असतात. त्यामुळे त्यांना त्रिमिती दृष्टीपेक्षा मोठ्या "व्ह्युविंग अँगल"ची गरज असते. त्यामुळे त्यांचे डोळे समोर नसून चेहर्‍याच्या २ बाजूंना असतात.
"माणसाचे डोळे चेहर्‍यावर समोर असतात, त्यामुळे माणसाला त्रिमिती दॄष्टी असते.

राही's picture

30 Aug 2013 - 3:00 pm | राही

भारत सोडून उर्वरित जगात ९९% विचारवंत, तरल प्रतिभेचे लेखक, कवी, चित्रकार, शिल्पकार, शास्त्रज्ञ, नोबेल विजेते, संशोधक, कलाकार, चित्रपटदिग्दर्शक, समाजसुधारक हे मिश्राहारी आहेत. भारतात हे प्रमाण ८०-८५ % पडेल. रामकृष्ण परमहंस, विवेकानंद,(आणि त्यांची सर्व बंगाली शिष्यपरंपरा), भारतीय वंशाचे नोबेल विजेते, रवीन्द्रनाथ ठाकुर, नंदलाल बसु, सुभाषचंद्र बसु,सत्यजित राय आणि चित्रपट्सृष्टीतले अनेक दिग्गज, गायक, वादक, गिरीश कार्नाड, विजय तेंडुलकर, अमिताभ बच्चन (वैद्यकीय कारणांमुळे प्रथिनसंपृक्त अन्न टाळावे लागले ती वेगळी गोष्ट.) इ. इ. इ. यात मुसलमान आणि क्रिस्टिअन समाजाचे योगदानही आलेच. चित्रसृष्टीतील आपल्या एकुलत्या एक ऑस्कर विजेत्या भानु अथय्या वगैरे.
एक-दीड हजार वर्षांपूर्वीचे सर्व क्षेत्रांतले धुरीण वगैरे. (म्हणजे कालीदास वगैरे). सर्व ऋषि-मुनि वगैरे. रामकृष्णादि सर्व महापुरुष वगैरे.

मोदक's picture

30 Aug 2013 - 10:40 pm | मोदक

सहमत.. श्रीराम, लक्ष्मण, सीतामैया, सर्व पांडव, द्रौपदी, कर्ण, भीष्म, गौतम बुद्ध आणि (बहुदा) शिवाजी महाराज!

श्रीकृष्णाच्या मांसाहारी असण्याबाबत शंका आहे.

व्यासमुनी, अरूंधती, धृवबाळ यांबाबत माहिती नाही. दुर्वास मात्र पक्के मांसाहारी असावेत!! :-D

अत्रन्गि पाउस's picture

31 Aug 2013 - 8:34 pm | अत्रन्गि पाउस

मंगेशकर / पु ल देशपांडे / जयवंत दळवी पण आहेतच कि

अत्रन्गि पाउस's picture

1 Sep 2013 - 11:24 am | अत्रन्गि पाउस

शाकाहारी पाण्यात तोंड बुचकळून पितात
मांसाहारी जिभेने लपक लपक पितात...

(पण शार्क/ गरुड ...माहित नही) :)