साहित्य :- २-३ मध्यम आकराची कारली २ इन्चावर गोल कापुन घ्यावित,बिया काडून टाकाव्यात, आल्-लसुन पेस्ट ४ चमचे, सुके खोबरे अर्धा कप, मिर्चि पुड २ चमचे, मिठ , थोडासा गुळ, अर्धा लिन्बु , चिरलेली कोथिम्बिर, २ चम्चे गरम मसाला , तेल,
क्रुती :- प्रथम एका बाउल मधे आल्-लसुन पेस्ट +सुके खोबरे + आवश्यक मिर्चिपुड + चविपुरत मिठ +चिरलेली कोथिम्बिर+२ चम्चे गरम मसाला+ गुळ + १ चमचा तेल घेवुन एकत्र करावे. वरुन लिन्बु पिळावे. हा तयार झालेला मसाला कारलेच्या प्रत्येक तुकड्यात भरावा. कढई मधे २-३ चमचे तेल घ्यावे, तेल गरम झाल्यावर त्यावर कारल्याचे तुक्डे टाकावेत, वरुन झाकण ठेवावे १-२ मिनिटानि तुक्डे परतावेत, परत झाकण ठेवुन ५-१० मिनिट शिजु द्यावेत.
भरलेली कारलि रुचकर लागतात...
मिपा वर मी नविन आहे...त्यामुळे शुध्द्लेखन चुका भरपुर झाल्या आहेत्..क्रुपया समजुन घेणे...
प्रतिक्रिया
17 Sep 2008 - 3:31 pm | जैनाचं कार्ट (not verified)
मस्त वाट आहे कृती !!
पण कार्ले रुचकर लागू शकते ह्या गोष्टीवर मी गेली ३५ वर्षे विश्वास नाही हो ठेवू शकलो :D
कार्लेदुश्मन - कार्ट
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
आमचा ब्लॉग
18 Sep 2008 - 1:16 pm | गणा मास्तर
राजे एक्दम खर हाये पघा
कारल म्हणजे य्या~क
- गणा मास्तर
भोकरवाडी (बुद्रुक)
18 Sep 2008 - 1:33 pm | बेधुन्द मनाची लहर
सगळीच कारली कडु नसतात... :) खरे पाह्ता हि रेसिपि माझ्या आई ची आहे... तिच्या हातचे भरलेले कारले रुचकर लागते...
गणा मास्तर, भारतात याल तेन्वा जरुर आमच्या सातारयाला या. आईच्या हातचे कार्ले खायल....
पुनम...
17 Sep 2008 - 4:23 pm | सुनील
पाकृ छान वाटते आहे.
कारली किंचित तासून घेतली (टोके बोथट केली) तर खरपूस तळून निघतील. तसेच, सुके खोबरे आणि गरम मसाला कारल्यात भरण्यापूर्वी थोडा भाजून घेतला तर अधिक खुमासदार लागेल!
(कारली आवडणारा) सुनील
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
18 Sep 2008 - 12:46 pm | अरुण वडुलेकर
कारल्याच्या कांही पाककृती रुचकर आणि मधुरही लागतात यावर माझा मात्र पूर्ण विश्वास आहे.
कारल्याची रस भाजीही करतात तशी कोरडी भाजीही (चटणी सारखी) छान लागते. त्या पाककृती स्वतंत्रपणे देण्याचा
मी लवकरच प्रयत्न करीन.
18 Sep 2008 - 1:10 pm | मनस्वी
छान पाकृ! जमल्यास फोटो पण टाका.
मनस्वी
*उलटा केलेला पिरॅमिड कधीच उभा राहू शकत नाही . *
आलं लसूण मिक्सरवर / पाटा-वरवंट्यावर वाटून घ्यावे. (काहीच नसल्यास बारीक तुकडे करून पोळपाटावर ठेवून लाटण्याने च्चेप्पून घ्यावेत).
18 Sep 2008 - 1:44 pm | गणा मास्तर
आलं लसूण मिक्सरवर / पाटा-वरवंट्यावर वाटून घ्यावे. (काहीच नसल्यास बारीक तुकडे करून पोळपाटावर ठेवून लाटण्याने च्चेप्पून घ्यावेत).
नाहीतर हल्ली दुकानात तयार मिळते ती आणावी :)
(दुकानातुन आल लसुन पेस्ट घेणारा)- गणा मास्तर
भोकरवाडी (बुद्रुक)
18 Sep 2008 - 10:47 pm | विसोबा खेचर
कारलं हा आमचा दुश्मन नम्बर एक...! :)
कार्ल्याची कुठलीही पाकृ आवडत नाही...
तात्या.
19 Sep 2008 - 5:21 am | रेवती
लहर,
मला ही भाजी खूप आवडते पण भरलेला बराचसा मसाला कारली परतत असताना बाहेर पडतो व तेलात जळतो. काय करावं बरं?
रेवती
19 Sep 2008 - 10:31 am | मनस्वी
बरेच जण कारली शिजेस्तोवर त्यात मसाला भरून दोरा बांधून ठेवतात. आणि शिजल्यावर दोरा काढून टाकायचा.
मनस्वी
*उलटा केलेला पिरॅमिड कधीच उभा राहू शकत नाही .*
आलं लसूण मिक्सरवर/पाटा-वरवंट्यावर वाटून घ्यावे. (काहीच नसल्यास बारीक तुकडे करून पोळपाटावर ठेवून लाटण्याने च्चेप्पून घ्यावेत).
19 Sep 2008 - 11:39 am | बेधुन्द मनाची लहर
रेवती,
अ ग , माझी आई या मसाल्या मधे १ चमचा तेल घालते... जेणे करुन मसाला चिकट बनतो आनि कारल्या मधे तो घट्ट बसतो...
पुनम....