स्वीडनमध्ये राहण्याबाबत माहिती हवी आहे...

शिद's picture
शिद in काथ्याकूट
21 Aug 2013 - 9:33 pm
गाभा: 

नमस्कार मिपाकर,

हा माझा मिपावर लिहिण्याचा पहिलाच प्रयत्न आहे. मला मिपावरच्या सर्व जाणकार मंडळींकडुन थोडीशी माहिती हवी आहे व आशा करतो कि तुम्ही सगळे मला पुर्णपणे मदत करतील.

मी सध्या कामानिमित्त लंडन येथे आहे आणि लवकरच काम संपवून भारतात परत जाणार होतो. पण, आज अचानक सकाळीच डिलीवरी मॅनेजरचा फोन आला कि मला एका नवीन प्रोजेक्टसाठी Stolkholm, स्वीडन येथे जावे लागेल. माझे जाणे नक्की झाले तर माझ्यासोबत बायको आणि मुलगा (वयः १ वर्ष) सोबत येतील.

गुगलवर स्वीडनची सगळी माहिती तर मिळाली तरीपण बरेच प्रश्न अनुत्तरीत आहेत. कोणी मिपा सदस्य तेथे राहत असतील किंवा जावून आले असतील तर खालील प्रश्नांची उत्तरे कळ्वून योग्य ती मदत करावी हि नम्र विनंती.

१) हवामान फार थंड असते हे माहिती आहे पण साधारण १ वर्ष मुलाकरीता राह्ण्यायोग्य आहे का?
२) भारतीय पदार्थ सहज उपलब्ध आहेत का?
३) घर भाड्याने घेण्यास काही अडीआडचणी आहेत का?
४) भाडेकरार करवयाचा असला तर कमितकमी किती महीने/वर्षे साठी करावा लागतो?
५) योग्य वैद्यकीय सेवा उपलब्ध आहे का? व त्वरीत मिळ्ते का? (लंडनमध्ये वैद्यकीय सेवा मिळ्ण्यास बरीच कटकट आहे. Doctor ची appointment ३-४ दिवसांनी मिळ्ते तोपर्यंत आपला ताप पळालेला तरी असतो किंवा आणखीन भयंकर तरी झालेला असतो.)
६) फॅमीलीला घेउन जाण्यासाठी व १-२ वर्षे राहण्यासाठी स्वीडन ठिक आहे का?

प्रतिक्रिया

श्रीरंग_जोशी's picture

21 Aug 2013 - 9:39 pm | श्रीरंग_जोशी

माहिती हवी आहे / मदत हवी आहे या प्रकारच्या धाग्यांच्या शीर्षकात थोडक्यात कशाबद्दल त्याचा उल्लेख करावा.
उदा. स्वीडनमध्ये राहण्याबाबत माहिती हवी आहे.

भविष्यात कुणाला मिपावर या विषयाशी संबंधीत नेमका शोध घेण्यासही अशा शीर्षकांची मदत होईल.

पाषाणभेद's picture

22 Aug 2013 - 12:30 am | पाषाणभेद

तेच तर. असले फुकटसल्ले मी कितीदातरी असल्या धाग्यांवर देत असतो/ होतो. संपादक महोदयांनादेखील विनंती केली होती.
उदा.
मदत हवी आहे.

बरेचसे नविन मिपाकर असा दुर्दैवी धागा काढतात. या असल्या मदत मागणार्‍या धाग्यांच्या नावामध्येच तो प्रश्न अंतर्भूत असावा असा नियम संपादकांनी करावा.

अन्यथा संपादकांनी दुरूस्त करावा. संपादकांना दुरूस्त करायला वेळ नसेल तर पडीक मिपाकर निवडून 'दुरूस्ते' असले मानांकन तयार करून त्यांचेकडून दुरूस्ती करवून घ्यावी.

उगाचच आपण काय मदत हवी आहे हे पाहण्यासाठी तातडीने धागा उघडतो अन त्यात फारसे काही तथ्य आढळत नाही.

मागे एकाने असलाच धागा काढला होता कुणाचे तरी नाव विचारण्यासाठी की काहीतरी. कालपरवाच एक धागा होता स्मार्ट फोनबद्दल. त्या भावाला फोन घ्यायचा होता.

टीपीके's picture

22 Aug 2013 - 1:50 am | टीपीके

१) हवामान फार थंड असते हे माहिती आहे पण साधारण १ वर्ष मुलाकरीता राह्ण्यायोग्य आहे का?
मी थंडी बघितली नाही अजून इकडची, पण कपडे घेतले, बुट घेतले की सगळे चालते, आहे काय आणि नाही काय
२) भारतीय पदार्थ सहज उपलब्ध आहेत का?
लंडनशी तुलना करत असल तर नाही, पण मिळतात, फारसे काही अडत नाही, कढीपत्ता सुकलेला मिळतो, फार भाज्या नाही मिळत, पण काम चालून जाते
३) घर भाड्याने घेण्यास काही अडीआडचणी आहेत का?
कंपनी घराची सोय करणार नसेल तर कठीण आहे, घराची इकडे जरा बोंबाबोंबच आहे
४) भाडेकरार करवयाचा असला तर कमितकमी किती महीने/वर्षे साठी करावा लागतो?
घर मालकावर आहे, उदाहरण म्हणून इकडे बघा http://bostaddirekt.se/
५) योग्य वैद्यकीय सेवा उपलब्ध आहे का? व त्वरीत मिळ्ते का? (लंडनमध्ये वैद्यकीय सेवा मिळ्ण्यास बरीच कटकट आहे. Doctor ची appointment ३-४ दिवसांनी मिळ्ते तोपर्यंत आपला ताप पळालेला तरी असतो किंवा आणखीन भयंकर तरी झालेला असतो.)
थोडे लंडन सारखेच आहे असे ऐकतो, पण सुदैवाने अजून अनुभव नाही
६) फॅमीलीला घेउन जाण्यासाठी व १-२ वर्षे राहण्यासाठी स्वीडन ठिक आहे का?
तुमच्या काय अपेक्शा आहेत तसे, पण अनेक कुटुंब आहेत, मझ्या माहीती प्रमाणे, सुमारे १०० मराठी कुटुंबे तरी असतील, भारतीय पण खुप आहेत. सुरक्शीत जागा आहे, स्वच्छ आहे, त्यामुळे हरकत नाही.

स्पंदना's picture

22 Aug 2013 - 4:32 am | स्पंदना

मेडीकल फॅसिलिटीज साठी सरळ इमर्जन्सी वापरायची . निदान लहाण मुलांसाठी तरी मी हेच करते.
अन माझ्या मते अशी इमर्जन्सी सगळ्या हॉस्पिटल्स मध्ये असावी.

रमेश आठवले's picture

22 Aug 2013 - 9:57 am | रमेश आठवले

स्वीडन मधे आणि इतर scandinavian देशात पगार आपल्या पेक्षा खूपच जास्त असतो आणि त्याचप्रमाणे आयकर सुद्धा जबरदस्त घेतात. तुमच्या सारख्यांच्या पगारातून ५० टक्के आयकर कापून घेतील. यावर उपाय म्हणजे भारत आणि त्या देशामध्ये दुहेरी आयकर टाळण्याचा असलेला करार. तेथे पोहल्यावर आपण भारतात कर भरतो आणि भरू असे कळवले तर पगारातून आयकर कापत नाहीत आणि याचा छान फायदा होतो कारण भारतातील कर आकारणीचे दर स्वीडन पेक्षा बरेच कमी आहेत.मात्र परत आल्यावर त्यांना भारतात कर भरल्याचा पुरावा द्यावा लागू शकतो. दोन्ही देशांची आर्थिक वर्षे वेगळी असल्याने त्याचाही लाभ मिळू शकतो.

अहो आठवले साहेब, जर स्वीडन

आपण भारतात कर भरतो आणि भरू असे कळवले तर पगारातून आयकर कापत नाहीत

अशी एकतर्फी सवलत (unilateral relief) देत असते, तर मुळात "दुहेरी आयकर टाळण्याचा करार" करायची गरजच काय होती?

भारत-स्वीडन टॅक्स ट्रीटीच्या कलम १५ प्रमाणे खालील तीन्ही बाबींची पूर्तता झाली तरच स्वीडन कर कापणार नाही:

  1. स्वीडनमध्ये १८३ दिवसांपेक्षा कमी वास्तव्य असले पाहिजे
  2. पगार देणारी कंपनीचा "निवास" भारतात असला पाहिजे
  3. सदर भारतीय कंपनीची स्वीडनमध्ये "स्थावर आस्थापना" नसली पाहिजे

धागाकर्त्याने आपण १-२ वर्षे तिथे रहाण्याबद्दल लिहिले आहे. त्यामुळे स्वीडनमध्ये कर भरावाच लागेल.

[यातला स्थूल-अर्थशास्त्रीय भाग असा: जर एखादा माणूस २ वर्षे देशात रहात असेल, तर देशातल्या सार्वजनिक मालमत्तेचा त्याने नियमित स्वरूपात उपभोग घेतलेला आहे. त्यासाठी त्याने आयकर भरलाच पाहिजे.]

...याचा छान फायदा होतो कारण भारतातील कर आकारणीचे दर स्वीडन पेक्षा बरेच कमी आहेत.मात्र परत आल्यावर त्यांना भारतात कर भरल्याचा पुरावा द्यावा लागू शकतो.

हेही बरोबर नाही कारण कलम २४(३) प्रमाणे भारतात भरलेला कर स्वीडनच्या करदायित्वातून वजावट (credit) म्हणून मिळतो. संपूर्ण करातून सुट्टी मिळत नाही.

दोन्ही देशांची आर्थिक वर्षे वेगळी असल्याने त्याचाही लाभ मिळू शकतो.

हे अगदी बरोबर आहे, कारण आयकराच्या पातळ्यांचा (slabs) फायदा मिळतो.

विटेकर's picture

22 Aug 2013 - 10:52 am | विटेकर

खुप सुंदर देश आहे .. निदान बारा वर्षांपूर्वी होता असे नक्की सांगेन.
मी स्टोकहोमला नाही पण गोटेन्बर्ग , माल्मो आण उमियोला राहिलो आहे.
घर मात्र कंपनीने दिलेले हवे , लाईट्बील पण फार येते .

खूप भट्का , सुंदर जंगले आहेत , सरोवरे आहेत . मजा येईल .

स्वीडीश माणूस मात्र जरा थंड्गारच ! पि़कल्याशिवाय त्याच्यात ऊब येत नाही ! जर्मनांचा द्वेश करतात पण थोडेफार तसेच वागतात!!

भारतीय पुष्कळ आहेत, उमिया ( इथून कर्क वृत्त फक्त ४०० किमी आहे ) येथे एक शल्मस विद्यापीठ आहे, तिथे भारतीय विद्यार्थी आहेत. तसेच भारतीय म्हणाल तर इस्कॉन सर्वत्र आहे..( तिथे खिचडी मस्त मिळायची!)
भारतीय उपहारगृहे आहेत. एकट्या गोटेन्बर्ग मध्ये ५ भारतीय उपहारगृहे होती तेव्हा, आता वाढली असतील्च
एन्जोय !

शिद's picture

22 Aug 2013 - 1:05 pm | शिद

श्रीरंग_जोशी: धन्यवाद. चुक निदर्शनास आणून दिल्याबद्दल. पुढच्यावेळी योग्य ती काळजी घेण्यात येईल.
टीपीके, aparna akshay, रमेश आठवले, आदूबाळ व विटेकर: धन्यवाद.

रमेश आठवले's picture

22 Aug 2013 - 1:40 pm | रमेश आठवले

अहो आदुबाळ तुम्हाला स्वानुभव आहे का ? मी scandinavia मधील स्वानुभवावरून लिहित आहे. आधी केले आणि मगच सांगितले. थापा नाही आणि माझे मत पुस्तकी वाचनावरून नाही. ज्याना तिथे जावून राहीचे आहेत ते शिद या बाबत आणखी माहिती काढतीलच . double taxation agreement is for stay for a period of two years .

आदूबाळ's picture

23 Aug 2013 - 3:43 am | आदूबाळ

मला स्वानुभव आहे म्हणूनच बोलतोय आठवलेसाहेब.

तुम्ही थापा मारत आहात असं मला अजिबात म्हणायचं नाही. तसा माझ्या प्रतिसादाचा सूर नाही असं मला वाटतं. मला असलेल्या स्वल्प ज्ञानाचा आधार घेऊन त्या करारामागचा अर्थशास्त्रीय कार्यकारणभाव समजावा हा हेतू होता. तुम्हाला झोंबलं असेल तर आमचं मंडळ दिलगीर आहे.

शिद या बाबत आणखी माहिती काढतीलच

हे एकदम मान्य.

double taxation agreement is for stay for a period of two years

हा निष्कर्ष आपण कुठून काढलात हे कृपया सांगावे.

रमेश आठवले's picture

23 Aug 2013 - 9:17 am | रमेश आठवले

मी वर लिहिल्याप्रमाणे- (Avoidance of ) double taxation (up to) a period of two years) ही सोय मी स्वत: वापरली आहे.जर दोन देशामध्ये असा करार असेल तर एका देशाचा नागरिक दुसर्या देशात नोकरी साठी गेला असेल आणि मायभूमीत आयकर भरत असेल तर दुहेरी आयकर वाचवण्यासाठी त्याला फक्त एकाच देशात दोन्हीकडील आयकर भरावयाची सोय देण्यासाठी हा करार आहे.आणि ही सोय भारताने ज्या ज्या देशांशी हा करार केला आहे त्याच देशात वापरता येते. उदाहरणार्थ , अमेरिकेबरोबर भारताचा असा करार नाही .
माझ्या मूळ प्रतीसादामागे एका मिपा स्द्स्य्याने मदत मागितल्यावर त्या सम्बन्धी ची आपल्याजवळ असलेली माहिती त्याला द्यावी हा होता. मी आयकराच्या कायद्याचा अभ्यासक नाही आणि त्या कायद्यातील कलमे आणि पोट कलमे या वर अधिकावाणीने बोलू शकत नाही.
माझया लिहिण्याने शिद यांचा फायदा होतो कि नाही हे त्यांनी ठरवायचे आहे.
आयकर विषयावर आधी वादात पडण्यासाठी मी पात्र नाही

अत्रन्गि पाउस's picture

23 Aug 2013 - 7:33 am | अत्रन्गि पाउस

kista उच्चार शिस्ता...व आणखीन काही ठिकाणी दाण्याचे कूट साबुदाने इथपर्यंत मिळते ...त्यामुळे टी चिंता नसावी...
थंडी प्रचंड असते...पण युरोपात आधी वास्तव्य होते असे धरले तर जुळवून घ्याला प्रोब्लेम नको.
खुशाल जावे आणि एन्जॉय करावे...१-२ वर्षे स्टोकहोम म्हणजे फारच छान....

भडकमकर मास्तर's picture

23 Aug 2013 - 3:51 pm | भडकमकर मास्तर

आम्हाला स्टॉकहोमविषयी काहीही माहिती नाही...
ज्ञान वाढवायला या धाग्यावर आलो..
तुमच्या वास्तव्यासाठी शुभेच्छा...
आणि भटकंती सदरात लिहा फटू टाका अशी विनंती

शिद's picture

23 Aug 2013 - 6:57 pm | शिद

अत्रन्गि पाउस: धन्यवाद.
भडकमकर मास्तर: नक्कीच. शुभेच्छांबद्द्ल धन्यवाद.