हिन्दू धर्म म्हणजे काय ?

विटेकर's picture
विटेकर in काथ्याकूट
23 Jul 2013 - 12:44 pm
गाभा: 

मागच्या आठवड्यात श्री. विजुभौ च्या वारीच्या धाग्यासंदर्भात हा विषय आलेला होता पण सांगोपांग चर्चा झाली नाही. म्ह्णून तिथे टंकलेलेच इथे पुन्हा लिहित आहे. मिपाकर जरुरीप्रमाणे भर घालतील.

माझ्या मते खालील बाबी हिंदू धर्माची वैशिष्ट्ये म्हणून सांगता येतील.
१. कर्माचा सिद्धांत
२. पुनर्जन्म
३. अन्तिम सत्य एकच आहे . ( GOD IS ONE and not GOD ARE ONE )

या प्रत्येक मुद्द्याचा ऊहापोह करता येईल पण तो अनेक्वेळा येथे झाला आहे. हे सारे मुद्दे परस्परपूरक आणि एकमेकांत कमालीचे गुंतलेले आहेत. या वरील तीन बाबींना केन्द्रीभूत ठेऊन उभी राहीलेली सर्वंकष जीवन पद्धती म्हणजे हिंदू जीवन पद्धती ! म्हणजे Hinduness (and NOT Hinduism, Hindu is not"ism" , it's way of life)

वरील तीन गोष्टी अनिवार्य तर पुढील काही गोष्टी पुष्टयर्थ:
१. चार वेद
२. चार पुरुषार्थ
३. चार आश्रम
४. चार वर्ण
या आणि अशाच संलग्न बाबींवर हिंदू समाज बेतलेला आहे. त्यामध्ये कमालीची विविधता आणि टोकाची लवचिकता आहे. अन्य उपासना पंथांप्रमाणे हिंदू जीवन पध्दतीमध्ये आचरणाचे काहीही नियम सांगितले नाहीत.हिंदूचे जे अनेक पंथ आहेत त्यामधील काही पंथांमध्ये काही नियम सांगितले आहेत पण ते सर्वच पंथात काटेकोरपणे पाळले जातात असे नाही.
आणि सर्वात महत्वाचे म्ह्णजे, हे नियम पाळले नाहीत म्हणून तुमच्या हिंदुपणावर गंडांतर येत नाही.
तसेच एखाद्या विशिष्ट ग्रंथाचा अथवा वेदांचा अभ्यास अथवा पठण करण्याची आवश्यकता नाही . बहुतेक संतानी तो केलेला नाही. हिंदू मान्यतेप्रमाणे, मोक्ष मिळवणे हेच नरदेहाचे अंतिम ध्येय आहे. तोच ४ था आणि अंतिम पुरुषार्थ आहे.आणि त्यासाठी वेद अभ्यासण्याची अजिबात गरज नाही.

वेदांचे सार चार महावाक्यात सांगितळे आहे.

त्याचे मला समजलेले सार असे की, सर्वांभूती एकच अंतरात्मा वास करत आहे आणि ही सारी मायिक सॄष्टी ही त्या परमात्म्याची लीला आहे. हे ध्यानात घेऊन केलेले व्यवहार त्या मोक्षाप्रत नेतात. ( म्हणजे नेत असावेत , मला अजून अनुभव यायचा आहे पण माझी तशी श्रद्धा आहे.)
धर्माच्या चौकटीत राहून अर्थ आणि कामाचा विवेकी उपभोग ( म्हणजे अभाव ही नव्हे आणि प्रभाव ही नव्हे ) मोक्षाप्रत नेतो अशी हिंदू मान्यता आहे.
या चौकटीत राहण्यासाठी म्हणून चारी आश्रम (1. व्रह्मचर्य आश्रम 2. ग्रहस्थ आश्रम 3. वानप्रस्थ आश्रम 4. संन्यास आश्रम) आणि चार वर्ण !
कालौघात या मूलभूत संकल्पना जर विवेकाने अंगिकारल्या नाहीत तर केवळ कर्मकांडाच्या बजबजपुरीलाच धर्म म्हणले जाते, मूल संकल्पनेला मालीन्य येते, आणि मग सगळा गोंधळ होतो. ( हे ही भगवंताला माहीत आहे म्हणून तोच म्हणतो ..यदा यदा ही धर्मस्य.. आणि येथे धर्माला ग्लानि येते असे म्ह्तले आहे , धर्म कधीच "नाश " पावत नाही)
धर्म शब्दाची व्याख्याच मुळी " जे धारण करतो ते" अशी असल्याने हा सारा आचरणाचा आणि अंगिकारण्याचा विषय आहे.

प्रतिक्रिया

प्रसाद प्रसाद's picture

23 Jul 2013 - 1:17 pm | प्रसाद प्रसाद

GOD IS ONE and not GOD ARE ONE

म्हणजे काय म्हणायचं आहे तुम्हाला?

विटेकर's picture

23 Jul 2013 - 1:24 pm | विटेकर

त्यात अनेक वचन नाही.. तो एकच आहे. जैन , बौद्ध , ईसाई, महमद् दीय, सीख असे त्याचे विविध प्रकार अथवा रुपे नाहीत. तो एक आणि एकच आहे .. त्याचाकडे जाण्याचे विविध उपासना मार्ग असतील पण गन्तव्य एकच आहे. सबका मालिक एक !

प्रसाद प्रसाद's picture

23 Jul 2013 - 1:32 pm | प्रसाद प्रसाद

ओ के

प्रभाकर पेठकर's picture

24 Jul 2013 - 2:09 am | प्रभाकर पेठकर

सबका मालिक एक !

विटेकर

हे वाचून डोळे पाणावले.

कपिलमुनी's picture

23 Jul 2013 - 1:31 pm | कपिलमुनी

जगण्याची समृद्ध अडगळ

प्रसाद गोडबोले's picture

24 Jul 2013 - 7:57 pm | प्रसाद गोडबोले

सही बोललात...

सदर पुस्तक वाचलेले नाहीये ...पण एकुणच मिपावरच्या अनेक तात्विक आणि व्यवहारौपयोगशुन्य अशा काथ्याकुटात(पक्षी इं.मा.) लक्ष घातल्यापासुन " हिंदु ही खरच जगण्याची समृध्द अडगळ " असल्याचे पटायला लागले आहे .

असो.

..................................................................तत्र मौनं हि शोभनम् ||.

पुण्याचे वटवाघूळ's picture

23 Jul 2013 - 1:44 pm | पुण्याचे वटवाघूळ

हिंदू धर्म म्हणजे नक्की काय हा प्रश्न असतानाही अनेक लोक (लेखकाला उद्देशून नव्हे) हिंदू धर्माचा किंवा त्या धर्मात स्वतः जन्माला आल्याचा अभिमान धरताना बघितले की जरा गंमतच वाटते.ही मंडळी अभिमान धरतात तो नक्की कसला?

स्पा's picture

23 Jul 2013 - 3:55 pm | स्पा

शिळी जिलबी

अग्निकोल्हा's picture

23 Jul 2013 - 3:57 pm | अग्निकोल्हा

मला समजलेले सार असे की,

हे वाचलं अन लेख सोडुन दिला... सार समजुन काय उपयोग जर तो २४ तास अनुभव नसेल तर ?

आशु जोग's picture

23 Jul 2013 - 4:42 pm | आशु जोग

यांना काश्मीरला पाठवा. राहु द्या काही काळ. ताजे होतील.

दादा कोंडके's picture

23 Jul 2013 - 4:53 pm | दादा कोंडके

मिपाकर जरुरीप्रमाणे भर घालतील.

पब्लिक खड्डा खणायला कुदळ-फावडे घेउन बसलंय इथं. :|

अत्रुप्त आत्मा's picture

23 Jul 2013 - 7:19 pm | अत्रुप्त आत्मा

http://www.sherv.net/cm/emoticons/rage/troll-typing-by-feet-smiley-emoticon.gif

बॅटमॅन's picture

24 Jul 2013 - 3:31 am | बॅटमॅन

ही स्मायली निराकाराबद्दलसुद्धा लागू पडते बरं आत्मूस =))

अनिरुद्ध प's picture

24 Jul 2013 - 3:32 pm | अनिरुद्ध प

अत्रुप्त पिशाच्च फारच थयथयाट करत आहे(बहुदा हिन्दु धर्माचे ड्यान मिळाल्याने आपले सावज हातातुन निसटेल म्हणुन भयभीत झाले वाटते.)

बॅटमॅन's picture

24 Jul 2013 - 3:37 pm | बॅटमॅन

हिन्दु धर्माचे ड्यान मिळाल्याने

म्हंजे हो काय? ड्यान ब्रौन वैग्रे तर कै नै ना =))

अनिरुद्ध प's picture

24 Jul 2013 - 4:00 pm | अनिरुद्ध प

'ज्ञान' असे टन्कायचे होते,बाकि बट्ट्मण्ण अगदि हुशार हो नेमके चुकिवर बोट ठेवलेत.

अत्रुप्त आत्मा's picture

24 Jul 2013 - 6:10 pm | अत्रुप्त आत्मा

(बहुदा हिन्दु धर्माचे ड्यान मिळाल्याने आपले सावज हातातुन निसटेल म्हणुन भयभीत झाले वाटते.)>>>>>>> जे धर्माचे बुद्ध्याची जाहले सावज,त्यांसी आंम्ही काय मारावे??? http://www.easyfreesmileys.com/smileys/free-innocent-smileys-834.gif

असो.......................................!

चालू द्या निवांत! http://www.easyfreesmileys.com/smileys/free-innocent-smileys-824.gif

असे ऐकिवात आहे कि मनुष्य मेल्यानन्तर पिशाच्च योनित जातो खितपत पड्तो वगैरे,तर ते पिशाच्च माण्साला धर्ण्यासाठि शोधत असते असे हिन्दु धर्मिय मानतात,तर असे सावज हातातुन निसटले तर अशी पिशाच्चे थयथयाट करतात हे मी आपल्या स्मायली सन्दर्भात विनोदाने टन्कले होते कारण ट्वाळा आवडे विनोद या उक्तिने, बाकी आमची मति (बुद्धी) ही आधीच धार्मीक असल्याने आपणास चिन्ता करण्याचे काहि कारण नसावे तसेच आपण पिशाच्च नसल्याने आम्हास मारण्याचा प्रश्ण्च येत नाही कारण आप्ल्या म्हण्ण्या प्रमाणे धर्माने आम्हाला आधीच मारले आहे.

अत्रुप्त आत्मा's picture

25 Jul 2013 - 12:30 am | अत्रुप्त आत्मा

@हे मी आपल्या स्मायली सन्दर्भात विनोदाने टन्कले होते कारण ट्वाळा आवडे विनोद या उक्तिने, >>> http://mimarathi.net/modules/smileys/packs/Example/19.gif म्हणजे मी टवाळ का??? बरं...असो..असते एकेकाची समज!

@बाकी आमची मति (बुद्धी) ही आधीच धार्मीक असल्याने आपणास चिन्ता करण्याचे काहि कारण नसावे>>> असू दे की मति धार्मिक... आंम्ही कधी चिंता असल्याचं म्हटलं? http://mimarathi.net/modules/smileys/packs/Example/10.gif

@तसेच आपण पिशाच्च नसल्याने आम्हास मारण्याचा प्रश्ण्च येत नाही कारण आप्ल्या म्हण्ण्या प्रमाणे धर्माने आम्हाला आधीच मारले आहे>>>>>> असं का???? ब्वार्र...ब्वार्र...! .http://mimarathi.net/modules/smileys/packs/Example//16.gif

श्रीगुरुजी's picture

23 Jul 2013 - 11:39 pm | श्रीगुरुजी

सगुणोपासना (मूर्तीपूजा) हे हिंदू धर्माचे अत्यंत महत्त्वाचे अंग आहे. इतर कोणत्याही धर्मात सगुणोपासनेला इतके महत्त्व दिलेले नाही. सगुणोपासना, पुर्नजन्म व कर्मानुसार फलाचा सिद्धांत, सर्व प्राणीमात्रात एकच ईश्वर आहे व आत्म्याचे अस्तित्व हे हिंदू धर्माचे प्रमुख गुण आहेत. नवविधा भक्ती तसेच भक्तीमार्ग, योगमार्ग, कर्ममार्ग व ज्ञानमार्घ हे चार मार्ग परमेश्वरप्राप्तीकडे नेणार मार्गे आहेत असे हिंदू धर्म मानतो. हे मानणारा कोणीही हिंदू असू शकतो. अर्थात हिंदू धर्माने नास्तिकांनासुद्धा दूर लोटलेले नाही. एखादी व्यक्ती पूर्ण नास्तिक असूनसुद्धा किंवा परमेश्वरप्राप्तीचा कोणताही मार्ग न अवलंबता सुद्धा हिंदू असू शकते. हिंदू धर्माचा कोणीही एक प्रेषित किंवा व्यक्ती संस्थापक नाही किंवा कोणतेही एकमेव पुस्तक हे धर्मग्रंथ म्हणून दाखविता येत नाही. अनेक वेगवेगळ्या उपासना मार्गांचा संगम म्हणजे हिंदू धर्म. या धर्मात परमेश्वरप्राप्तीसाठी प्रयत्न करण्याची सक्ती नाही किंवा एखादी विशिष्ट प्रार्थना म्हणणे किंवा एखादा विशिष्ट उपासना मार्ग निवडण्याची सक्ती नाही.

विटेकर's picture

24 Jul 2013 - 1:02 pm | विटेकर

अगदी बरोबर आहे. हा मुद्दा राहीला होता. पण हिंदू उपासना पद्धतीत शेवटी पुन्हा सगुणाकडून निर्गुणाकडेच जायचे आहे. आणि अशी थेट निर्गुण उपासना करणारे पंथ ही आहेत. अगदी अलिकडचे उदाहरण म्हणजे स्वामी विवेकानंद ! पण रामकृष्ण मिशनने पुन्हा माताजी आणि रामकृष्णांच्या प्रतिमा आण्ल्याच आहेत.
सामान्य माणसाला प्रतिकांशिवाय उपासना हे जरा अवघड जाते, म्ह्णून अशी सोय केली असावी.

अर्धवटराव's picture

24 Jul 2013 - 2:00 am | अर्धवटराव

अगदी एका वाक्यात सांगायचं तर सत्याप्रती जिज्ञानेसेवर आधारीत (अथातो ब्रह्मजिज्ञासा) ति एक प्राचीन जीवन प्रणाली आहे.

वर्णाश्रम व्यवस्था, भक्ती-कर्म-योग आदि उपासना पद्धती, वेद-पुराणादी साहित्य, एक/बहु/निरीश्वरवाद , ज्ञानसंपादनाच्या पद्धती... हे सगळं काळाच्या ओघात या व्यवस्थेत समाविष्ट होत गेलं. ज्ञानमार्ग गर्विष्ठ झाला तर त्याला कर्मकांडाने आव्हान दिलं. कर्मकांडाने जनतेच्या सुख-दु:खांकडे दुर्लक्ष्य केलं तर त्याला ध्यानमार्गाने आवर घातला. ध्यानमार्गाने निवृत्तपणाचा कळस गाठला व समाजाची घडी बिघडली तर त्याला भक्तीने रिप्लेस केलं. भक्तीत पाखंड माजलं तर तिथे विवेकाने लाथा मारल्या.

या सर्व घडामोडीत मनुष्यमात्राने अगदी सर्व भोग भोगले. प्रेमाचे पाट वाहले तर रक्ताचेही. हा प्रवाहीपणाच बहुतेक या व्यवस्थेचा प्राण आहे.

अर्धवटराव

दादा कोंडके's picture

24 Jul 2013 - 9:01 am | दादा कोंडके

छान प्रतिसाद.

आतिवास's picture

24 Jul 2013 - 2:14 am | आतिवास

असा प्रश्न विचारला कुणी, किंवा स्वतःला कधी पडला तर मी हे पुस्तक पुन्हा पाहते.
दरवेळी उपयोग होतो असा अनुभव आहे.

अग्निकोल्हा's picture

24 Jul 2013 - 4:02 am | अग्निकोल्हा

परंतु इज द लिंक इज लेजिट्मेट ?

The Harvard University PIN System, and the systems, data, and other resources that require PIN authentication for access, are only for legitimate Harvard University users. Use may be monitored, and improper use of the PIN System or those resources may result in disciplinary action and civil and criminal charges.

अवांतर :- Copyright © 1999 - 2013 The President and Fellows of Harvard College जबरा नोटिस आहे.

परंतु इज द लिंक इज लेजिट्मेट ?

एरवी माझ्या संग्रहात असलेलं पुस्तक वाचते. घराबाहेर/गावाबाहेर असले की मात्र या दुव्यावरुन उतरवून घेतलेलं पुस्तक वाचते. गरज पडेल तसं. अजून तरी काही शंकास्पद फरक दिसला नाहीये - पण आता जरा एकदा नीट पाहायला हवं :-)

विटेकर's picture

24 Jul 2013 - 9:28 am | विटेकर

जरा सवडीने वाचीन. या पुस्तकाबद्दल ऐकले होते. तुमच्यामुळे वाचायची संधी मिळाली. धन्यवाद.

धमाल मुलगा's picture

24 Jul 2013 - 5:35 am | धमाल मुलगा

तसं पहायला गेलं तर मी स्वतः हिंदूत्वाबद्दल कमालीचा आग्रही (आक्रस्ताळा म्हणू शकता) असतो. हिंदूधर्माचा मला अभिमान/प्रेम का वाटतो/ते असा प्रश्न कधी पडला नाही. जन्मदात्या आईबद्दल प्रेम वाटतं, लाज नाही, बापाबद्दल प्रेम वाटतं, लाज नाही...तसंच हिंदूधर्माबद्दल प्रेम वाटतं. कदाचित जे आपलं आहे त्यावर प्रेम करायची शिकवण आहे आपल्याकडं म्हणून असेल! मग जिथं प्रेमाचा प्रश्न येतो तिथं माणूस उसळतोच (जनरली!)

आता हे एव्हढं पाल्हाळ वर लाऊन झाल्यानंतर पुढं हे सांगावंस वाटतं, की वर लेखात जे तीन मुद्दे दिलेले आहेत, त्यातल्या तिसर्‍या मुद्द्याचा अर्थच नीट कळला नाही. बाकी त्याआधीचे दोन मुद्दे हे निव्वळ टाकाऊ वाटतात..अन अशाच मुद्द्यांमुळं बर्‍याचदा तथाकथित सेक्युलरवादी उर्फ कुर्‍हाडीच्या दांड्यांचं फावतं.

पुनर्जन्म! ही एक भानगड काय कधी कळली नाही बॉ. शिंचं ते चौर्‍यांशी लक्ष योनी हिंड हिंडून परत बोंबलत मनुष्यप्राण्याच्या जन्माला यायचं म्हणजे पीडाच की वो! वर आणि चौर्‍यांशी लक्ष योनींपुर्वी आपण घातलेली काशी लक्षात ठेवायची किंवा सध्याच्या अवतारात त्या अनुशंगानं स्वतःच्या नकळत वागायचं! कसं काय जमतं बॉ? मला मजा वाटते तेव्हा, जेव्हा एखाद्या घरचं एखादं पिकलं पान वयानुसार गळतं; पुढं त्या घरात वर्षादिडवर्षात एखाद्या नातवा/नातीकडं पाळणा हलतो अन मग "आमच्या माईचा फार जीव होता हो ह्याच्या/हिच्यावर! लेकराच्या रुपानं आली ती परत" वगैरे ऐकायला मिळतं. च्यायला! भडव्यो चौर्‍यांक्षी लक्ष योनीचं गणित कुठं गेलं? किडा-मुंगी, अल्पजिवी जनावरं, अपघाती मृत्यू असं सगळं क्यालक्युलेट करुनसुध्दा वर्षा-दिडवर्षात परत सेकंड इनिंग खेळायला तयार? एक जरा कासव घेतलं तर पाचशे-सातशे वर्षं कुठं गेली नाहीत, त्यात परत हत्ती वगैरे म्हणजे ऐंशी शंभर सालं आणखी...आता अशा जन्तेला म्हणलं, "घे पाटी, अन घाल त्रैराशिक.." तर आपलं तोंड झोडलं जायचं म्हणून गप बसायचं. पण ह्या अशा येडेपणामुळंच आजूबाजूच्या विचारजंतांना हिंदूधर्माला शिव्या घालायला, कमी लेखायला कोलीत मिळतं. पण लक्षात कोण घेतो?

आता तो कर्माचा सिध्दांत!
आयला! ते पुस्तक एकदा वाचून पाह्यलं. काय सालं लिहिलंय पण. मानलं. शप्पत! मानसिकदृष्ट्या खचलेल्यांसाठी समजूत घालण्याचा हा सगळ्यात बेष्ट उपाय आहे. पण तात्पुरता! नायतर माणूस झालाच साला पांगळा. अरेऽऽ...लाथ मारीन तिथं पाणी काढीन अशी जिद्द ठेवायची, का घडणार्‍या गोष्टी मनासारख्या होत नाहीत म्हणून त्याचा दोष पुर्वजन्मीच्या सुकृतावर (सुकृतच ना? नक्की शब्द आठवेना आता.) ढकलायचा? आपलं कुठं चुकतंय हे पहायचं, त्या अनुशंगानं प्रयत्न करायचे की कुठल्यातरी पुर्वजन्मातल्या कृत्यावर दोष ढकलायचा?
म्हणजे, गणित असंय, दुर्बळाची हत्या हे पाप. समजा, मी गेल्याजन्मी साप असेन, तर उंदीर ह्या दुर्बळ जीवाची हत्या करुन त्याला खाऊन मी आयुष्य काढलं म्हणजे माझ्या खात्यात सगळं पापच पाप! आता हेच जर झाडं, पिकं कापून अन्न बनवणं, जमीन खोलवर उकरुन त्यातून धातू/कोळसा काढणं हे जर इतर कोणत्या योनीतल्या पॅरामिटर्सप्रमाणं पाप असेल तर? म्हणजे, मला असं म्हणायचंय, पाप-पुण्य म्हणा, केल्या कर्मांचं वर्गिकरण म्हणा, हे सगळं निरनिराळ्या योनीमध्ये एकच असतं का? नसेल तर त्याची डिफाईन करण्याची काही विशिष्ट पध्दत आहे का? की ज्यायोगे चौर्‍यांशी लक्ष योनींमधल्या निरनिराळ्या पाप-पुण्यांची वर्गवारी होऊन नंतर तुमचा सिबिल रिपोर्टसारखा एक 'कन्सोलिडेटेड रिपोर्ट' तयार होईल?

हे असंय. त्यामुळं असे फसवे मुद्दे घेऊन ज्यांना धंदा करायचा असतो ते पोटभर धंदा करतात. ज्यांना गरज असते ते येनकेन कारणे त्यांच्याकडे ओढले जाऊन अशा गोष्टींमध्ये विश्वास ठेवतात...हरकत नाही! तत्कालिन वेदनाशमनासाठी मॉर्फिन दिलं म्हणजे काही लगेच व्यसन लागत नाही, पण पुढे उठसूठ मॉर्फिनचा डोस घेणं योग्य नाही. इतकंच माझं म्हणणं.

विटेकरबुवा, तुमच्या मूळ भावनेचा आदर आहेच, सहमतीदेखील आहे. पण माझं स्पष्ट मत आहे की जे तीन मुद्दे प्रमुख म्हणून मांडले आहेत त्यातले पहिले दोन मुद्दे (तिसरा मला अडाण्याला कल्लाच नाय) हिंदूधर्माच्या कुचेष्टेला कारणीभूत असणार्‍या प्रमुख मुद्द्यांपैकी एक आहेत...कारण ते तसेच आहेत.(असं माझं मत आहे.) ह्याउप्पर, जर खरोखर कुणी मला कर्माच्या सिध्दांताबद्दल आणि पुनर्जन्माबद्दल नीट समजाऊन सांगणार असेल तर नक्कीच मी माझं मत बदलायला तयार आहे.

सर्वांभूती एकच अंतरात्मा वास करत आहे आणि ही सारी मायिक सॄष्टी ही त्या परमात्म्याची लीला आहे. हे ध्यानात घेऊन केलेले व्यवहार त्या मोक्षाप्रत नेतात. ( म्हणजे नेत असावेत , मला अजून अनुभव यायचा आहे पण माझी तशी श्रद्धा आहे.)
धर्माच्या चौकटीत राहून अर्थ आणि कामाचा विवेकी उपभोग ( म्हणजे अभाव ही नव्हे आणि प्रभाव ही नव्हे ) मोक्षाप्रत नेतो अशी हिंदू मान्यता आहे.
या चौकटीत राहण्यासाठी म्हणून चारी आश्रम (1. व्रह्मचर्य आश्रम 2. ग्रहस्थ आश्रम 3. वानप्रस्थ आश्रम 4. संन्यास आश्रम) आणि चार वर्ण !
कालौघात या मूलभूत संकल्पना जर विवेकाने अंगिकारल्या नाहीत तर केवळ कर्मकांडाच्या बजबजपुरीलाच धर्म म्हणले जाते, मूल संकल्पनेला मालीन्य येते, आणि मग सगळा गोंधळ होतो. ( हे ही भगवंताला माहीत आहे म्हणून तोच म्हणतो ..यदा यदा ही धर्मस्य.. आणि येथे धर्माला ग्लानि येते असे म्ह्तले आहे , धर्म कधीच "नाश " पावत नाही)
धर्म शब्दाची व्याख्याच मुळी " जे धारण करतो ते" अशी असल्याने हा सारा आचरणाचा आणि अंगिकारण्याचा विषय आहे.

हे मात्र आवडलं. शेवटी काय, सारासार विचार, सद्सदविवेकबुध्दी, आणि विनम्रपणा ह्यांचा एक सुंदर मिलाफ म्हणजे हिंदूधर्म. पुढे त्या त्या काळातल्या धर्मदंडांनी स्वतःच्या सोयीच्या पण अयोग्य प्रथा घुसडून मूळ संकल्पनेचं मातेरं केलं ही बाब अलाहिदा! पण कुणी सांगावं, कदाचित त्या-त्या काळी त्या गोष्टी करणं त्यांच्या बुध्दीला योग्य वाटून त्या तत्कालिन परिस्थितीशी सुसंगत म्हणून ठरवल्या गेल्या असाव्यात. पुढे आहेतच आपले आंधळे आचरणकर्ते...माझा बा करित व्हता...त्याचा बा करित व्हता...त्याच्या बा चा बा करित व्हता...मग मलापण केलंच पाहिजे म्हणणारे!

थोडक्यात काय, तर हे सालं हिंदूधर्म म्हणजे सालं एक मोठी गुंतागुंतीची चीज आहे. भल्याभल्यांना आजवर झेपलं नाही, की भल्याभल्यांकडून आजपर्यंत झोपलं नाही!

असो! टंकनकंडातून बरंच काही भलं बुरं लिहून गेलो! चुकलंमाकलं माफ करा..

-(अभिमन्यू) धम्या.

मन१'s picture

24 Jul 2013 - 11:50 am | मन१

आता कसा खराखुरा धमाल ष्टाइल प्रतिसाद दिसला.
पुनर्जन्म! ही एक भानगड काय कधी कळली नाही बॉ. शिंचं ते चौर्‍यांशी लक्ष योनी हिंड हिंडून परत बोंबलत मनुष्यप्राण्याच्या जन्माला यायचं म्हणजे पीडाच की वो! वर आणि चौर्‍यांशी लक्ष योनींपुर्वी आपण घातलेली काशी लक्षात ठेवायची किंवा सध्याच्या अवतारात त्या अनुशंगानं स्वतःच्या नकळत वागायचं! कसं काय जमतं बॉ? मला मजा वाटते तेव्हा, जेव्हा एखाद्या घरचं एखादं पिकलं पान वयानुसार गळतं; पुढं त्या घरात वर्षादिडवर्षात एखाद्या नातवा/नातीकडं पाळणा हलतो अन मग "आमच्या माईचा फार जीव होता हो ह्याच्या/हिच्यावर! लेकराच्या रुपानं आली ती परत" वगैरे ऐकायला मिळतं. च्यायला! भडव्यो चौर्‍यांक्षी लक्ष योनीचं गणित कुठं गेलं? किडा-मुंगी, अल्पजिवी जनावरं, अपघाती मृत्यू असं सगळं क्यालक्युलेट करुनसुध्दा वर्षा-दिडवर्षात परत सेकंड इनिंग खेळायला तयार? एक जरा कासव घेतलं तर पाचशे-सातशे वर्षं कुठं गेली नाहीत, त्यात परत हत्ती वगैरे म्हणजे ऐंशी शंभर सालं आणखी...आता अशा जन्तेला म्हणलं, "घे पाटी, अन घाल त्रैराशिक.." तर आपलं तोंड झोडलं जायचं म्हणून गप बसायचं. पण ह्या अशा येडेपणामुळंच आजूबाजूच्या विचारजंतांना हिंदूधर्माला शिव्या घालायला, कमी लेखायला कोलीत मिळतं. पण लक्षात कोण घेतो?

ह्याबद्दल ऐकलय ते असं.
मानव योनीत तुम्ही आलात म्हणजे एकच मानव जन्म असे नसून इन टोटल तुम्हाला ब्याक टू ब्याक सात मानव जन्म मिळतात.सर्व सातही जन्माचे मिळून चारेकशे वर्षे टेन्युअर असतं. त्यानंतर पुढील योनी सुरु होते.
एक योनी = एक जन्म असे नेहमीच असेल असे नाही.एका योनीत एकाहून अधिक जन्म तुम्ही घेउ शकता अशी ती थिअरी.
ही माझी ऐकिव माहिती. विश्वास वगैरे अजिबातच नाही.
पुन्हा एकदा तुपले प्रतिसाद पाहून मपल्याला लै बरं वाटतय हे साम्गू इच्छितो.

विटेकर's picture

24 Jul 2013 - 2:49 pm | विटेकर

पुनर्जन्म! ही एक भानगड काय कधी कळली नाही बॉ. शिंचं ते चौर्‍यांशी लक्ष योनी हिंड हिंडून परत बोंबलत मनुष्यप्राण्याच्या जन्माला यायचं म्हणजे पीडाच की वो!

८४ लक्श योनी म्हणजे प्रत्येक योनीमध्ये जयलाच लागते असे नव्हे ! तुमच्या कर्मांशाप्रमाणे ( reward points) तुम्हांला जी योग्य ती योनी मिळेल. हे reward points तुम्हीच मिळवले आहेत , तेव्हा कोणत्या योनीत जायचे हा तुमचाच विकल्प आहे. आणि महत्वाचे म्हणजे या चक्रातून बाहेर पडायचा विकल्प ही तुमच्याकडेच आहे ना ?

एक जरा कासव घेतलं तर पाचशे-सातशे वर्षं कुठं गेली नाहीत, त्यात परत हत्ती वगैरे म्हणजे ऐंशी शंभर सालं आणखी..

ही काळाची गणिते आपण आपल्या कुवतीनुसार मांडतो. काळ अनंत आहे आणि आपली मोज-मापे अपुरी आहेत. सातशे वर्ष म्हणजे फार मोठ्ठा काळ असे जेव्हा म्हणतो , ते सापेक्षच नव्हे का ?

समजा, मी गेल्याजन्मी साप असेन, तर उंदीर ह्या दुर्बळ जीवाची हत्या करुन त्याला खाऊन मी आयुष्य काढलं म्हणजे माझ्या खात्यात सगळं पापच पाप!

मनुष्य योनी सोडून बाकी सार्या योनी या पाप योनीच आहेत, तिथे भोगून संपवणे आहे. अन्य योनीमध्ये प्रज्ञा विकसित झालीच नाही ,तिथे पाप- पुण्याचा हीशेब नाही , केवळ फेडणे!

असो! टंकनकंडातून बरंच काही भलं बुरं लिहून गेलो! चुकलंमाकलं माफ करा..

छे हो , आपण सगळेच एकमेकांना मदत करत आहोत, जे मला समजले ते मांडायचा प्रयत्न केला आहे. ते पूर्ण सत्य आहे असे थोडेच आहे ? परिप्रश्नेन सेवया ....

आशु जोग's picture

24 Jul 2013 - 10:13 am | आशु जोग
चौकटराजा's picture

24 Jul 2013 - 10:44 am | चौकटराजा

माझ्या साठी माझा साथी हिंदु धर्म आहे.
म्हणजे काय बॉ....?
तर यात धर्मग्रंथ म्ह्णणतो तेच खरे असा दुराग्रह नाही.
माणूस परमेश्वराचे अस्तित्व मानणारा असलाच पाहिजे असा दुराग्रह नाही.
नास्तिकाने " प्रसाद " खाउ नये .असा दुराग्रह नाही.
हिंदूने नमाज पढू नये चर्च मासला हजर राहू नये. मस्जीदमधे वा चर्चमधे वा बुद्धविहारात जाउ नये असा दुराग्रह नाही.
पुनर्जन्म मानलाच पाहिजे असा दुराग्रह नाही
विशिष्ट दिशेला तोड करून देवाची प्रार्थना केली पाहिजे असे बंधन नाही.
एवढेच काय .. मृताला जाळलेच पहिजे वा पुरलेच पाहिजे असे बंधन नाही.
आस्तिक असलात तर रोजच्या रोज पुजा झालीच पाहिजे असे बंधन नाही.
बंधनेच कमी असल्याने धर्माच्या बाहेर टाकणे , फतवा काढणे ईई धोके नाहीत.
मी ही सारी स्वातंत्र्ये भोगली आहेत. सबब कोणी मला कोट्यावधीचे धन दिले तरी मी माझ्या हिंदू धर्माखेरीज कोणताही धर्म स्विकारणार नाही.

आलं का ध्येनात मंडळी ??? .

आशु जोग's picture

24 Jul 2013 - 2:14 pm | आशु जोग

अगदी नेमकेपणाने लिहिलेत

माझ्या साठी माझा साथी हिंदु धर्म आहे.
म्हणजे काय बॉ....?
१. तर यात धर्मग्रंथ म्ह्णणतो तेच खरे असा दुराग्रह नाही.

न्हाय बा. हिंदुधर्मातही आमचे पुस्तकच खरे असे कितीतरी ठिकाणी आहे. आमचा देव न पूजला तर नर्कात जाणार वगैरे भीतीही आहे. जर कोणताही देव कुणीही पूजला तर कुणाचेही पोट नसेल दुखत तर शंकराचार्यांना मंडनमिश्राला बुद्धाला सोड आणि विष्णूला भज असे का बरे सांगावे लागले?

२. माणूस परमेश्वराचे अस्तित्व मानणारा असलाच पाहिजे असा दुराग्रह नाही.

मग नास्तिक व्यक्ती आणि पंथ यांच्यासाठी पाखंडी असा अनादरपूर्वक उल्लेख का बरे केला जातो?
३. नास्तिकाने " प्रसाद " खाउ नये .असा दुराग्रह नाही.
पण प्रसाद नाही खाल्ला तर साधुवाण्याची नाव बुडाली तशी तुझीही बुडेल अशी भीती घालणं, हाही दुराग्रहच नाही का?
४. हिंदूने नमाज पढू नये चर्च मासला हजर राहू नये. मस्जीदमधे वा चर्चमधे वा बुद्धविहारात जाउ नये असा दुराग्रह नाही.
पुनर्जन्म मानलाच पाहिजे असा दुराग्रह नाही

बाकी धर्मातही असे नाही. शेजारी ख्रिश्चन असेल तरच प्रेम करा असे येशूने / ख्रिस्ताने/ पैगंबराने सांगितलेले नाही.
५. विशिष्ट दिशेला तोड करून देवाची प्रार्थना केली पाहिजे असे बंधन नाही.

हो का? शिवलिंगांची दिशा एकच असते. मेलेले मढेही विशिष्ट दिशेतच असावे. रात्री झोपताना अमक्या दिशेकडे तोंड करुन झोपू नये. वास्तुशास्त्र वगैरे वाचा. तुमच्या या अज्ञानाचे निरसन होईल.
६. एवढेच काय .. मृताला जाळलेच पहिजे वा पुरलेच पाहिजे असे बंधन नाही.

कंच्या गाढवाने सांगितले? हिंदुंच्या लिंगायत वगैरे काही जातीतच पुरण्याची प्रथा आहे. त्यांचे स्मशान वेगळे असते. इतर जातीतल्या लोकाना दहनच करावे लागते. सरसकट मी माझ्या मर्जीनुसार हे किंवा ते करीन असा चॉईस माणसाला नसतो.
अधिक माहितीसाठी ..... http://www.mimarathi.net/node/9579

७. आस्तिक असलात तर रोजच्या रोज पुजा झालीच पाहिजे असे बंधन नाही.

इतर धर्मातही असे नाही.

८. बंधनेच कमी असल्याने धर्माच्या बाहेर टाकणे , फतवा काढणे ईई धोके नाहीत.

काही विशिष्ट लोकाना जन्मजात बाहेरच ठेवण्याची प्रथा होती. मग पुन्हा वेगळे फतवे कोण कसे काढेल? आणि फतवे निघत नाहीत, असे म्हणताय तर ज्ञानोबा/ तुकोबा / सत्यमेव जयते मधील खाप पंचायती हे सगळे फतव्यांचे ब्ळी नव्हते की काय?
मी ही सारी स्वातंत्र्ये भोगली आहेत. सबब कोणी मला कोट्यावधीचे धन दिले तरी मी माझ्या हिंदू धर्माखेरीज कोणताही धर्म स्विकारणार नाही.

आनंद आहे.

आलं का ध्येनात मंडळी ???

विटेकर's picture

29 Jul 2013 - 11:03 am | विटेकर

१.न्हाय बा. हिंदुधर्मातही आमचे पुस्तकच खरे असे कितीतरी ठिकाणी आहे. आमचा देव न पूजला तर नर्कात जाणार वगैरे भीतीही आहे. जर कोणताही देव कुणीही पूजला तर कुणाचेही पोट नसेल दुखत तर शंकराचार्यांना मंडनमिश्राला बुद्धाला सोड आणि विष्णूला भज असे का बरे सांगावे लागले?

आमचीच पुस्तके श्रेष्ठ असे हिंदू धर्मांतर्ग्ंत सांगत असतील तर ते निष्चितच चुकीचे आहे. कदाचित आपल्याच पंथाचे मार्केटिंग करण्याच्या नादात असे झालेही आहे पण त्यावरून सारा धर्मच वाईट आहे असे म्हणणे अतोशयोक्तीचे आहे असे मला वाटते. बौद्धपंथ उदयाला आला आणि त्यामुळे वैदिक धर्माला ग्लानि आली. लोक अतिरेकी अहिंसा मानू लागले. असा कोणताही अतिरेक समाजाच्या हिताचा नसतो आणि म्हणून आचार्यांना खंडन- मंडन करावे लागले. यातही वाद - विवाद करुन हरविले आहे. तलवारीचा धाक दाखवून नव्हे ! याच धर्माने सांगितले आहे - सर्व देवं नमस्करां केशवं प्रतिगच्छती.

२. मग नास्तिक व्यक्ती आणि पंथ यांच्यासाठी पाखंडी असा अनादरपूर्वक उल्लेख का बरे केला जातो?

कारण अस्तिक लोकांना " अंधश्रध्दाळू" असा उल्लेख होतो म्हणून ! आपण हे ही लक्षात घ्यावे की. याच देशात नास्तिक चार्वाकाचा उल्लेख देखील दार्शनिक असाच होतो.

३. पण प्रसाद नाही खाल्ला तर साधुवाण्याची नाव बुडाली तशी तुझीही बुडेल अशी भीती घालणं, हाही दुराग्रहच नाही का?
लोकांना सन्मार्गाला लावण्यासाठी काही गोष्टी प्रतिके म्हणून वापरावी लागतात. लोकांच्या सहज पचनी पडेल अशीच उदाहरणे द्यावी लागतात. आलंबन घ्यावे लागते. मुलाला समजावे म्हणून आई बोबडे बोलते ते चुकीचे का ? आणि अतिरेक होतो हे मान्य आहेच . आपण तेच धरुन बसणार का ?

४.बाकी धर्मातही असे नाही. शेजारी ख्रिश्चन असेल तरच प्रेम करा असे येशूने / ख्रिस्ताने/ पैगंबराने सांगितलेले नाही.
अभ्यास वाढवावा. शेजारयावर प्रेम करायला संगितले पण " माझ्या मार्गाने गेलात तरच मोक्ष मिळेल अन्यथा तुम्ही पापी किंवा काफिर आहात" असे स्प्ष्ट सांगितले आहे. आणि प्रेम कशासाठी करा ? त्यांच्याशी गोड बोलून त्यांना आपल्या धर्मात घ्या - आजूबाजूला होणारे मतांतर उघड्या डोळ्यानी बघितले तर सेवाकार्यांच्या बुरख्याआड काय चालते ते सहज समजून येईल.

५.हो का? शिवलिंगांची दिशा एकच असते. मेलेले मढेही विशिष्ट दिशेतच असावे. रात्री झोपताना अमक्या दिशेकडे तोंड करुन झोपू नये. वास्तुशास्त्र वगैरे वाचा. तुमच्या या अज्ञानाचे निरसन होईल.
शिवलिंग उत्तरेकडे आहे म्ह्णून उत्तरेकडेच प्रार्थना करावी असे कोणत्या धर्ममार्तंडाने तुम्हाला सांगितले ? प्रेताची दिशा अशी असावी असा संकेत आहे , काहीतरी संकेत असायला हवा म्हणून , आचरणाच्या सोयीसाठी. फोन उचलल्यावर आपण "हालो" असे म्हणतो ते कोणत्या धर्मात सांगितले आहे म्हणून ? समाजाच्या हितासाठी आणि सोयीसाठी काही संकेत ठरवावे लागतात. वास्तुशास्त्र हे एक शास्त्र आहे आणि हा या धाग्याचा विषय नाही. आजच्या काळात अपार्टमेंट मधे राहताना वास्तुशास्त्र पाळ्णे अशक्य आहे. मग महानगरामध्ये राहणारे लोक अहिंदू झाले का ?

६.कंच्या गाढवाने सांगितले? हिंदुंच्या लिंगायत वगैरे काही जातीतच पुरण्याची प्रथा आहे. त्यांचे स्मशान वेगळे असते. इतर जातीतल्या लोकाना दहनच करावे लागते. सरसकट मी माझ्या मर्जीनुसार हे किंवा ते करीन असा चॉईस माणसाला नसतो.

दह्न अथवा द्फन याशिवाय मृतदेहाची विल्हेवाट लाव्ण्याची आणखी एखादी सोपी पद्धत असेल तर आपण जरुर सुचवावी. तुम्ही तुमच्या म्रूत्युपत्रात तुमच्या देहाची कशी विल्वेवाट लावावी हे जरुर सुचवावे. स्वीकारार्ह असेल तर आपण " दार्शनिक" व्हाल.

७.इतर धर्मातही असे नाही.

अभ्यास वाढवावा , चर्च्मध्ये मास साठी विशिष्ट दिवसांची हजेरी असेल तरच चर्च तुमच्या कुटुंबातील धार्मिक कार्यक्रमाना परवानगी देते. माझ्या एका मित्राला हजेरी पूर्ण करण्यासाठी दर रविवारी जावे लागे आणि मग एका वर्षाने त्याला चर्चने लग्नाला परवानगी दिली.

८.काही विशिष्ट लोकाना जन्मजात बाहेरच ठेवण्याची प्रथा होती. मग पुन्हा वेगळे फतवे कोण कसे काढेल? आणि फतवे निघत नाहीत, असे म्हणताय तर ज्ञानोबा/ तुकोबा / सत्यमेव जयते मधील खाप पंचायती हे सगळे फतव्यांचे ब्ळी नव्हते की काय?
हजारो वर्षांच्या परंपरेत काही कुप्रथा शिरल्या आहेत, ज्याला वास्तविक धर्मांचा काडीचाही आधार नाही. पण कालानुरुप बदल घडत आहेत. उदा. सति प्रथा पूर्ण बंद पडली आहे . तशीच जातव्यवस्था ही मागे पडत चालली आहे. राजकारण्यांनी हस्तक्षेप केला नसता तर कदाचित संपलीही असती. ज्यावेळी अशा कुप्रथा निर्माण झाल्या त्या त्या वेळी त्याला विरोध करणारे ही याच मातीत निर्माण झाले , प्रत्येक वेळी त्यांन मर्यादित यश ही मिळाले.
घरात ढेकूण झाले म्हणून कोणी घर जाळत नाही.

आनंद आहे.
आनंद आहेच. तुम्हाला ही आहे , उद्दामपणाने छिद्रान्वेषीपणा न कराल तर !

चौकटराजा's picture

3 Aug 2013 - 12:37 pm | चौकटराजा

आमचे चिंतन हे चिंतन नाही अनुभव आहे.माझ्या वडीलांच्या पायाचे आम्ही दफन केले आहे. दहन नाही.जेंव्हा उर्वरित देहाचा मृत्यू झाला त्यावेळी दहन करण्यात आहे.

मी स्वत: नमाज पढलेला नसला तरी त्यावेळी मशिदीत हजर राहिलेला आहे
मी स्वत: मास ला हजर राहिलेला आहे.
मला कधी कोणी बाटलेला म्हटलेले नाही. वा जीवन जगायला नकोसे केलेले नाही. आपण फतव्यांची सांगितलेली उदाहरणे त्यावेळच्या तथाकथित हिंदू धर्मप्रमुखांची असतील. मुळात हिंदु धर्माला काही code आहे म्हणून जातीव्यवस्था, बहिष्कार असे आहे का ? नक्कीच नाही. बाकी समाज गप्प्प बसायचा म्हणून काही जणांचे फावले एवढेच. रूढी वेगळ्या धर्माचे कोड ऑफ कंडक्ट वेगळे. धर्म असा काही देहाबरोबर येत नसतोच हो ! आपण ज्याला स्वेछ्चेने वा बळजबरीने उरावर घ्यावे अशी संहिता म्हणजे धर्म !

चौकटराजा's picture

3 Aug 2013 - 12:41 pm | चौकटराजा

अरार !!!!! प्रतिसाद देण्यात घोटाळा झाला. हा प्रतिसाद श्री रा रा उद्दाम बुवा याना समजावा !

चौकटराजा's picture

3 Aug 2013 - 12:47 pm | चौकटराजा

नुकतेच मी व मिपावरील काही जण एक सहल करून आलो . एका दिवसात तीन तरी महादेवाची मंदिरे पाहिली त्यातील एकाचे लिगाची दिशा इतरांपेक्षा उलटी होती. व तिथेही भाविकांची गर्दी होती. ही जागा सासवड जवळ आहे.

प्रचेतस's picture

3 Aug 2013 - 12:51 pm | प्रचेतस

तीन नाही, पाच आणि ती पण मध्ययुगीन. :)

अमेरिका धूर्त सर्व युद्ध दुसऱ्या chya भूमीत लढली हरले तरी नुकसान क्षत्रूच .
त्यामुळे जे खरे धर्म आहेत त्या वर चर्चा न करता जो धर्मच नाही आशा हिंदू धर्मा वर चर्चा करण्याचा साफ हेतू आहे ..

मंदार कात्रे's picture

24 Jul 2013 - 11:10 am | मंदार कात्रे

धर्म आणि ईश्वर यासारख्या संकल्पनांचा प्रभाव ओसरण्याचे एक प्रमुख कारण म्हणजे विकसित जगात तर्कशुद्ध विचारसरणीचा उदय आणि प्रसार आणि दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे पाप-पुण्य यासारख्या संकल्पनांच्या बाबतीतला भोंगळपणा होय

भारतातच नव्हे तर जगात इतरत्र देखील धर्म ही संकल्पना न मानणार्या लोकांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसते याचे प्रमुख कारण नीतिसूत्रे आणि पाप-पुण्य यात ताळमेळ नसणे

मांसाहार जर एका माणसासाठी पाप ठरत असेल तर दुसर्यान माणसासाठी ते पाप नाही. दारू पिणे पाश्चात्य जगात अतिशय कॉमन असताना आपल्याकडे अपेयपान/अभक्ष्यभक्षण इत्यादि धर्मनियम लावण्यात येतात.

सामाजिक स्वास्थ्य व आरोग्य दृष्ट्या जे अयोग्य ते निषेधार्ह ठरवणे यात काहीच गैर नाही, पण जेव्हा गुरुचरित्रा सारख्या ग्रंथात कपडे धुवून ,पिळून वाळत घालणे हेही पाप असे सांगितले जात असेल, तर अशा भाकड आणि भ्रामक धर्मनियमांचे पालन करणे हे खुळेपणाचे आणि हास्यास्पद ठरते . तीच गत परान्न-भोजन आणि तत्सम कालबाह्य नियमांची...

धर्म वाचवायचा असेल तर तो प्रवाही बनवला पाहिजे ,कालानुरूप बदल घडलेच पाहिजेत .सतीप्रथा ,विधवा केशवपन यासारख्या कुप्रथा धर्माने कधीच बंद केल्या नाहीत , सामाजिक चळवळी /कायद्याच्या रेट्यानेच अशा कर्मठ प्रथा बंद कराव्या लागल्या , हे सत्य आहे.

सती जाणारी स्त्री आपल्या बेचाळीस पिढ्यांचा उद्धार करते , विधवा स्त्रीने आपले केस कापले नाहीत तर त्या केसांचा फाशीचा दोर होवून मृत नवर्यासच्या गळ्याला अडकून पडतो अशा अनेक भ्रामक कपोलकल्पित रूढी/शास्त्र / समजुती गेल्या 70-80 वर्षापूर्वी प्रचलित होत्या .अशा गोष्टींना आज आपण अंधश्रद्धा म्हणतो, मग सध्या अस्तीत्वात असलेले भ्रामक धर्मनियम भविष्यकाळात अंधश्रद्धा ठरू शकतात .

अर्थात सर्वच श्रद्धा या अंधश्रद्धा नसतात हे मान्य. पण म्हणून धर्म आणि शास्त्राचा /नियमांचा बडेजाव न करता कालानुरूप धर्माने प्रवाही व्हायला हवे,आणि समाजधुरीणानी याबाबतीत पावले उचलावीत ,अशी अपेक्षा!

वामन देशमुख's picture

24 Jul 2013 - 11:33 am | वामन देशमुख

धर्म वाचवायचा असेल तर तो प्रवाही बनवला पाहिजे ,कालानुरूप बदल घडलेच पाहिजेत

या सल्ल्याची गरज असलेल्यांच्या रांगेत हिंदू धर्म/ पंथ/ जीवनपद्धती/ विचारप्रवाह/ ज्याला हिंदू धर्म म्हणतात ते शेवटच्या स्थानावर आहे.

हे केवळ माझे मत नाही, वस्तुस्थिती आहे.

सुनील's picture

24 Jul 2013 - 11:52 am | सुनील

या सल्ल्याची गरज असलेल्यांच्या रांगेत हिंदू धर्म/ पंथ/ जीवनपद्धती/ विचारप्रवाह/ ज्याला हिंदू धर्म म्हणतात ते शेवटच्या स्थानावर आहे.

म्हणजे, जे कोणी रांगेत पुढे आहेत ते नामशेष व्ह्यायच्या मार्गावर आहेत. असा व्यत्यास घ्यावा काय? ;)

अवांतर - धाग्याला २४ तास उलटून गेले तरी आता कुठे पाव-शतक होतेय!! फारच स्लो बॉ! ;)

मालक, एकच रस्सा शिजवून शिजवून किती ठिकाणी वाढत बसला आहात?

http://www.maayboli.com/node/44280

ऋषिकेश's picture

24 Jul 2013 - 2:05 pm | ऋषिकेश

नास्तिक असणं (अर्थात ते परमात्मा वगैरे न मानणं) धर्माने मान्य असणारा हिंदु हा एकमेव धर्म असावा.
तेव्हा वरील लेखातील मुद्दे अर्धेच आहेत. अजून हिंदुपणाची प्याप्ती बरीच मोठी आहे

अनिरुद्ध प's picture

24 Jul 2013 - 2:38 pm | अनिरुद्ध प

तुर्तास ईतकेच.

चिंतामणी's picture

24 Jul 2013 - 4:38 pm | चिंतामणी

https://lh6.googleusercontent.com/-o_DAOTqKHdo/TK4hRMLj7OI/AAAAAAAAAU0/hMYyTRZg23I/s610/popcorn.jpg

कवितानागेश's picture

24 Jul 2013 - 8:10 pm | कवितानागेश

इथे प्रत्येकजण आपल्याला हवी तशी व्याख्या बिनधास्त टाकतोय... हाच तो हिन्दूधर्म असावा... :)

धर्मराजमुटके's picture

24 Jul 2013 - 9:44 pm | धर्मराजमुटके

अगदी एका वाक्यात सांगायचं तर "कोणीही शेंबड्या पोराने यावे आणि टपली मारुन जावे" असा धर्म म्हणजे हिंदू धर्म.

अनिरुद्ध प's picture

25 Jul 2013 - 1:45 pm | अनिरुद्ध प

असहमत.

श्रीगुरुजी's picture

25 Jul 2013 - 3:12 pm | श्रीगुरुजी

हिंदू धर्माची अजून एक व्याख्या अशी की "आपण या धर्माचे आहोत हे सार्वजनिकरित्या सांगितले तर त्या व्यक्तिवर जातीयवादी असा आरोप होतो तो धर्म म्हणजे हिंदूधर्म" किंवा "आपल्या धर्माचे सार्वजनिकरित्या नाव घेणे ज्या धर्माच्या व्यक्तींना अपराधीपणाचे वाटते तो धर्म म्हणजे हिंदूधर्म" किंवा "आपण या धर्माचे आहोत असे अभिमानाने सांगणे म्हणजे एक पाप आहे असा धर्म म्हणजे हिंदूधर्म".

आशु जोग's picture

25 Jul 2013 - 3:51 pm | आशु जोग

सापाला दूध पाजणार्‍यांनाही हिंदूधर्मीय म्हणतात.

अनिरुद्ध प's picture

25 Jul 2013 - 4:52 pm | अनिरुद्ध प

साप दुध पीत नाहीत असे विज्ञानाने सिद्ध केले आहे. जर सापने दुध प्यायले तर ते मरुन नाहीका जाणार्,मग ही सरळ्सरळ हिन्सा हिन्दु धर्माला मान्य आहे का?

सहमत. हिंदू धर्मीयांवर असा हिंसारोप करणार्‍यांचा निषेध!

उद्दाम's picture

25 Jul 2013 - 8:25 pm | उद्दाम

साप दूध पीत नाहीत.. :)

२०१४ च्या निवडणुका, पावसाळा, २६जुलै ... सगळ्या मूहुर्तावर साप बाहेर यायला सुरुवात झाली.

विटेकर's picture

25 Jul 2013 - 9:44 pm | विटेकर

सापाला नाही " सापांनाही" दूध पाजतात हिंदू ! आणि सहिष्णु म्हणवले जातात. अपकार करणार्यावरही उपकार करणारे !

विटेकर's picture

25 Jul 2013 - 9:41 pm | विटेकर

हिंदू धर्मात हिंसा बिल्कुल चालते..!
..नाठाळाची माथी हाणू काठी !
देश्द्रोही तितुके कुत्ते..मारुनी घालावे परते.
प्रत्यक्ष देवच आधी मारतो आणि मग भक्ताला म्हणतो मी आधीच मारून टा़कले आहे , तू फक्त निमित्त मात्र हो !
..निमित्त्मात्रेन भव सव्यसाची |
हिंसा चालत नाही ती हिंदू धर्मांतर्गत जैन पंथात !पण तो ही एक अतिरेकच होय !

बाळ सप्रे's picture

26 Jul 2013 - 10:19 am | बाळ सप्रे

पण पूर्वी एका काथ्याकूटात जगात फक्त एक हिंदू धर्म आहे असं वाचल्याच आठवतं.. बाकी सगळे पंथ आहेत .. जसे नास्तिक हिंदू असु शकतात तसेच मुस्लिम हिंदू, ख्रिश्चन हिंदू असही म्हणता येत असं ठरलं होतं..
आणि सगळेच हिंदू म्हटल्यावर व्याख्या वगैरे कशाला करायची..
माणूस म्हणजे हिंदू .. (प्राणी, पक्षी, झाडं त्यात येतात की नाही माहित नाही :-) )

अनिरुद्ध प's picture

26 Jul 2013 - 2:36 pm | अनिरुद्ध प

जो ( भारतात/जगात?) जन्माला येतो तेव्हा तो हिन्दु असतो मग तो आपला धर्म /पन्थ ई (सुन्ता/बाप्तिस्मा) बदलतो असे ऐकले आहे.

कवितानागेश's picture

26 Jul 2013 - 3:17 pm | कवितानागेश

असं मी एका मुसलमान बाईकडून ऐकले होते पूर्वी. तिनी हे सिरियसली सांगितलं होतं. :D

विटेकर's picture

26 Jul 2013 - 3:40 pm | विटेकर

हाच हिंदूना मोठा शाप आहे ! सार्या जगाला जे सहज समजते / उमगते तेच हिंदूना पुन्हा पुन्हा सांगायला लागते.. तेच तेच पुनः पुन्हा !म्ह्णून व्याख्या सांगावी लागते. वयं सुपुत्रं अमृतस्य नूनं हे सतत सांगावे लागते.
कर्म केलेचि करावे | ध्यान धरलेचि धरावे|
विवरलेचि विवरावे | पुनः पुन्हा ||

बाळ सप्रे's picture

26 Jul 2013 - 4:00 pm | बाळ सप्रे

धर्म एकच असेल तर बदलता कसा येईल?

अनिरुद्ध प's picture

26 Jul 2013 - 4:15 pm | अनिरुद्ध प

फक्त तुम्हीच मानताय,बाकिचे पान्थिक स्वताचा पन्थ हाच धर्म समजतात आणि त्यामुळे धर्माची व्याख्याच सन्कुचीत झाली आहे.(ईतर पन्थीयान्ची चु भु दे घे)

अनिरुद्ध प's picture

26 Jul 2013 - 3:58 pm | अनिरुद्ध प

पण काय ? आणि हिन्दुना काय समजत नाही? ते जरा विस्त्रुत करुन सान्ग्ता का?

विटेकर's picture

26 Jul 2013 - 4:21 pm | विटेकर

http://www.defence.pk/forums/seniors-cafe/266483-when-germany-christian-india-hindu.html
When Germany is Christian, is India Hindu?
By Maria Wirth
May 11, 2013
(Denying One’s Own Roots)

Though I live in India since long, there are still some points that I find hard to understand - for example why many educated Indians become agitated when India is considered as a Hindu country. The majority of Indians are Hindus. India is special because of its ancient Hindu tradition. Westerners are drawn to India because of it. Why then is there this resistance by many Indians to acknowledge the Hindu roots of their country?

बॅटमॅन's picture

26 Jul 2013 - 5:15 pm | बॅटमॅन

अतिशय रोचक.पण बर्‍याच भारतीयांना आपली पाळेमुळे स्वीकारण्याची लाज वाटते. हिंदू असण्याची लाज का बाळगावी याला भले कोणी हजारो कारणे देऊ पाहीलही, पण शेवटी तो मूर्तिभञ्जनाचा हव्यास आहे. अन शेवटी त्यांना आपली चूक कधी ना कधी उमगेलच.

आशु जोग's picture

26 Jul 2013 - 10:44 pm | आशु जोग

सगळे प्रो. शास्त्री बनलेत

मूकवाचक's picture

26 Jul 2013 - 5:17 pm | मूकवाचक

हिंदू धर्म- विचारवंतांना ज्या धर्मातल्या वैविध्याची अडगळ वाटते, पण समृद्धी नाकारता येत नाही. तर्ककुतर्कमार्तंडांना ज्याची सर्वसंमत व्याख्या ठरवणे अवघड जाते पण अस्तित्व नाकारता येत नाही. धर्मरक्षणासाठी, धर्मसंवर्धनासाठी टिचभरही प्रयत्न न करता फक्त बुद्धीभेद करून धन्य होणारे करोडो कपाळकरंटे पिढ्यानपिढ्या ज्या धर्माला झोडून काढत त्याच्याच वळचणीला सुखेनैव जगत आले तरीही त्याचा प्रभाव आजवर टिकून कसा राहिला याचे आश्चर्य वाटायला लावणारा एक धर्म. असो.

विटेकर's picture

26 Jul 2013 - 5:36 pm | विटेकर

तुमचे म्हणणे पटले ...हा एक प्रकारचा न्यूनगंडच आहे. पराकोटीच्या सहिष्णुतेमुळे कदाचित हा आला असावा काय ?
पण दुसर्याचे कौतुक करताना आपल्याकडे कमीपणा घ्यायलाच ह्वा का? mutual co-existance असू शकते ना?
की शतकानुशतकांच्या गुलामगिरीतून आलेली पराभूत मानसिकता आणि अगतिकता आहे ?
आणि मग अशा पराभूत मानसिकतेने ग्रस्त समाजाला एखादा शिवप्रभू अथवा महात्मा फार काळासाठी जिवंत ठेऊ शकत नाही. त्याच्या मागे त्यांचेच अनुयायी वाट लावतात. औषधाची मात्रा उतरली की पुन्हा रोग बळावतो.हीच खरी शोकांतिका आहे!
बलदंड हिंदू समाज / सशक्त हिंदू समाज हाच यावरील कायमस्वरुपी उपाय आहे.

याचीच तर वानवा आहेना आणि तो कोणी व कसा घड्वायचा? कारण ईथे फक्त यदायदाही धर्मस्य यावरच अव्लम्बुन असणारेच जास्त आहेत.

कवितानागेश's picture

26 Jul 2013 - 6:14 pm | कवितानागेश

या विषयावर पांडुरंगशास्त्री आठवल्यांचे 'विजिगिषु जीवनवाद' नावाचे एक पुस्तक आहे.

आशु जोग's picture

2 Aug 2013 - 9:26 pm | आशु जोग

"राममंदिरापेक्षा रोजीरोटी महत्त्वाची" असे उद्गार अलिकडेच ऐकले एका महानुभावांचे.
रामंदिरात रोजीरोटी अंतर्भूत नसते का ?
मला उत्तर हवय (नि वा स्टाईल)

आशु जोग's picture

7 Aug 2013 - 2:54 pm | आशु जोग

हिंदू धर्म म्हणजे काय याचे उत्तर देणे अवघड आहे. पण हिंदू समाज म्हणजे काय हे सांगता येइल.
हिंदू समाज म्हणजे निद्रिस्त ज्वालामुखी.

अत्रुप्त आत्मा's picture

7 Aug 2013 - 4:07 pm | अत्रुप्त आत्मा

@हिंदू समाज म्हणजे निद्रिस्त ज्वालामुखी.>>>निद्रिस्त ज्वालामुखी'च्या ऐवजी,प्रत्येक हिंदूच्या मुखी निद्रिस्त ज्वाला! असे म्हणा..ते जास्त अन्वर्थक होइल. :)

हिंसेने दु:खी होतो तो हिंदू असा 'हिंदू' या लघुरूपाचा व्यापक मानवतावादी अर्थ आचार्य विनोबा भावे यांनी एके काळी मांडला होता.

हिंदू शब्दाची व्याख्या
आसिंधु सिंधु पर्यन्ता, यस्य भारतभूमिका ।
पितृभू: पुण्यभूश्चैव स वै हिंदुरिति स्मृत: ॥
- (१९२३ हिं., स.सा.वा. ६ : ७५)
सिंधुस्थान ही ज्याची केवळ पितृभूमी नव्हे, तर पुण्यभूमीही आहे तो हिंदू. - (१९२३ हिं., स.सा.वा. ६ : ७४)

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर

अनिरुद्ध प's picture

7 Aug 2013 - 4:41 pm | अनिरुद्ध प

विटेकर काका आता यावर आप्लि प्रतिक्रिया अपेक्शित आहे,कारण आप्ल्या म्हणण्यानुसार हिन्दु धर्मात हिन्सेला मान्यता आहे.

विटेकर's picture

7 Aug 2013 - 6:12 pm | विटेकर

अहो, दु:ख होते ना हिंसा केल्यावर ! साधा डास मारल्यावर देखील मला वाईट वाटते .
आणि मोदिंना तर गाडीखाली कुत्रे आल्यावर देखील वाईट्ट वाटते ! विचारा की मेडियावाल्यांना.

अनिरुद्ध प's picture

8 Aug 2013 - 3:31 pm | अनिरुद्ध प

आपल्या दुक्खात सहभागी आहे

दुखावलेला अनिरुद्ध

व्ही. डी. सी.'s picture

7 Feb 2019 - 11:15 am | व्ही. डी. सी.

हिंदू हा शब्द अपमानजनक आहे व हिंदू धर्म म्हणजे गुलामांचा / पराजितांचा धर्म आहे. थोडे हिंदू शब्दाबद्दलचे मत पाहू. हिंदू शब्द जर सिंधू शब्दाचा अपभ्रंश असेल तर सिंधू नदीच्या खोऱ्यात राहणारे व्यक्ती पंजाबी अथवा सिंधी असे म्हटले जातात, त्यांना हिंदू हे नाव का प्राप्त झालेले नाही? पर्शियन लोकांना सिंधू उच्चारण्यात अडचण येत होती हे प्रमेय आधारहीन व हास्यास्पद आहे. उदा. पर्शियन जे शिया मुस्लिम आहेत ते शिया, सुन्नी व शरियत हे शब्द कसे उच्चारतात? पंजाबी भाषेत बरेच पर्शियन शब्द आहेत ते ज्यांची सुरुवात 'स' किंवा 'श' पासून होते. उदा. सरदार, शहीद, शेर इ. पंजाब हा शब्द सुद्धा पर्शियन शब्द पांच आणि आबा (पाच पाणी) पासून तयार झाला आहे.

याच बाबीचा पुनरुच्चार मुद्रारक्षक यांनी धर्मग्रंथोन्का पुनर्रपाठ या ग्रंथात याप्रकारे केला, "इतिहासकारोंने कहा की चूंकि फारस के लोग 'स' को 'ह' बोलते थे, इसलिये उन्होंने सिंधू को हिंदू कहा और यहां रहने वालोंको हिंदू कहना सुरू कर दिया. यह विचित्र तर्क था. ईराण के लोग अपनी भाषा को फारसी कहते रहे, फारही कभी नहीं कहा, सुलतान बोलते थे हुलतान नहीं, पर सिंध को उच्चारित नहीं कर शकते थे, यह अविश्वसनीय हैं. विजेता अक्सर विजित समुदाय को निंदनीय मानता हैं और घोषित करता हैं. मुसलमान ने भी भारत को जीतकर यही किया. हर विजेता की तरह वह भी भारत के विजित लोगों को हेच समजता और बताता था. उसने भारत में रहने वालों को इसीलिये हिंदू कहा. फारसी में हिंदू का अर्थ अच्छा नहीं हैं. हिंदू शब्द का अर्थ है गुलाम, काला, लूटेरे, चोर. ये अर्थ फीरोजुल्लगात नामक विख्यात शब्दकोश में हैं. पर यह विचित्र इत्तफाक है और ऐसा शायद ही किसी दूसरी संस्कृति में हुआ हो कि पराजित कौम ने अपने लिये विजेताओ दवारा प्रयुक्त की गई एक अपमानजनक संज्ञा को गौरव के साथ स्वीकार कर लिया हो. भारत में यह हो गया."

"फारसी में हिंदू का अर्थ अच्छा नहीं हैं. हिंदू शब्द का अर्थ है गुलाम, काला, लूटेरे, चोर."

इथे हे चेकवले. तर हे सत्य निघाले. हिंदु शब्द फारसी मध्ये هندو लिहीतात हे गुगल वरुन समजले. हाच शब्द टाइप करुन पाहिला असता खालील उत्तर मिळाले.

# English Farsi
1 Hindu or Hindoo , a black slave , a mole , a mother's mark , Indian , black هندو

खर काय? हिंदु अशा नावाचा कुठलाच धर्म मुस्लीम आक्रमणापुर्वी कधीच नव्हता काय ?

व्ही. डी. सी.'s picture

7 Feb 2019 - 11:29 pm | व्ही. डी. सी.

http://www.farsidic.com/en/lang/FaFa

۱- اهل هند.
۲- سیاه از هر چیز.
۳- بنده، غلام.
۴- نگهبان.
۵- مجازاً به معنای: خال، زلف، کفر، کافر، دزد.

1- भारतातील
2. संपूर्ण काळा.
3- दास, नोकर.
4. रक्षक
5- याचा अर्थ म्हणजे तीळ, केस, निंदा, अविश्वास, अविश्वासू, चोर.

व्ही. डी. सी.'s picture

7 Feb 2019 - 11:56 am | व्ही. डी. सी.

मी हिंदू आहे! असे सांगण्यापूर्वी खालील गोष्टींचा विचार व्हायला नको का?

१. सर्वच धर्मांना संथापक आहेत, तर हिंदू धर्माचा संस्थापक कोण?
२. ज्याला हिंदुधर्म म्हणतात तो खरेच धर्म आहे काय?
३. कोणत्याही तथाकथित धर्मग्रंथात हिंदू हा शब्द आलेला नाही, असे का झाले असावे?
४. कोणत्याही संत वचनांमद्धे हिंदू या शब्दाचा वापर का करण्यात आलेला नाही?
५. वैदिक, ब्राह्मणी, सनातन या नावाने प्रचलित असणाऱ्या संस्कृतीला धर्म म्हणता येईल काय?
६. हिंदू या तिरस्कार दर्शक शब्दाला आपण आपला धर्म का बरे म्हणावे?
७. वेद हे आपले धर्मग्रंथ असतील तर ते याच धर्मातील इतर लोकांना वाचण्यास आणि ऐकण्यास बंदी का होती?
८. ब्रिटीश काळात जनगणनेच्या वेळी आपण हिंदू आहोत, असे नोंद करून घेण्यास खूप जातींनी विरोध का केला होता?
९. आदिवाशी लोक स्वतःला हिंदू का बरे म्हणून घेत नव्हते?
१०. तथाकथित ब्राह्मण लोक हिंदू आहेत काय?
११. ब्राह्मण लोक मरीआई, वेताळ, जोतीबा, बिरोबा, म्हसोबा या देवतांची पूजा का करीत नसावेत?
१२. कागदोपत्री धर्म लिहिणे अनिवार्य असेल तेथे हिंदू असे लिहिणे गरजेचे आहे काय?

बघा विचार करून!

व्ही. डी. सी.'s picture

7 Feb 2019 - 12:00 pm | व्ही. डी. सी.

धर्मग्रंथात हिंदू हा शब्दच नाही.....

हिंदू धर्मग्रंथांच्या यादीत ४ वेद, १८ पुराणे, ६ शास्त्रे, ६४ कला यांचा समावेश करण्याची हौस हिंदूत्ववादी लेखकांना आहे. पण यापैकी एकाही ग्रंथात हिंदू हा शब्द आढळत नाही. हिंदू हा जर धर्म असेल, तर हा शब्द कुठल्या तरी धर्मग्रंथात असायला हवा होता. पण तो नाही. इतकेच काय अगदी अलीकडील काळातील वैष्णव, शैव, चैतन्य, नाथ आदी सांप्रदायांच्या वाङ्मयातही हिंदू हा शब्द आढळत नाही. असे का? याचे उत्तर कोणाकडेही नाही. याउलट आर्य आणि ब्राह्मण यांचे उल्लेख मात्र जागोजाग सापडतात. वैष्णव, शैव, चैतन्य, नाथ आदी हे सांप्रदाय वेद प्रणीत हिंदू पंथ नाहीत. त्यांचे नंतर हिंदुकरण झाले आहे.

हिंदू हा शब्द इस्लामची देण.....

लिखित स्वरूपात हिंदू शब्द पहिल्यांदा येतो शीखांचे आद्य गुरू गुरूनानक यांच्या लिखाणात. हिंदू धर्मातील भेद आणि विशेषाधिकार दूर करण्यासाठी नानकदेवांनी स्वतंत्र धर्मच स्थापन केल्याचे सर्वविदित आहेच. गुरूनानकांचा काळ हा इस्लामी आगमनाचा काळ होय. त्यावरून हिंदू हा शब्द इस्लामी राजवटीतच रुढ झाला, असे दिसते. भारतातील हजारो जातींची नावे, लक्षात ठेवणे नव्या इस्लामी राज्यकत्र्यांना शक्यच नव्हते. त्यामुळे त्यांनी सर्र्वासाठी सरसकट एक संज्ञा रुढ केली. भारतात हजारो जाती असल्या तरी इस्लामी राज्यकत्र्यांच्या दृष्टीने मुस्लिम लोक आणि एतद्देशीय बिगर मुस्लिम भारतीय असे दोनच भेद होते. त्यामुळे त्यांनी एतद्देशियांसाठी हिंदू ही संकल्पना रूढ केली. या काळात हिंदू शब्दाचा आणि विशिष्ट धार्मिक विचारधारेचा कोणताही संबंध नव्हता. एतद्देशीय लोकांसाठी वापरली जाणारी ती समूहवाचक संज्ञा होती. हिंदू ही पूर्णत: राजकीय होती, धार्मिक नव्हे. हा मुद्दा समजून घेण्यासाठी आपण आजच्या काळाचे उदाहरण घेऊ या. आपल्या राज्यकत्र्यांनी ठराविक जाती समूहांचे गट करून एससी, एसटी, ओबीसी, ओपन अशा संज्ञा तयार केल्या आहेत. या संज्ञांना धार्मिक अधिष्ठान नाही. या सर्व संज्ञा राजकीय आहेत. तसाच हिंदू हा शब्द आहे. इस्लामी राजवटीच्या प्रारंभकाळी वापरात आला. त्यातून धर्म नव्हे, तर राजकीय अर्थ स्पष्ट होतो.

इंग्रजी राजवटीत हिंदू शब्दाचे धार्मिकीकरण.......

पुढे हजारभर वर्षे हिंदू हा शब्द हेटाळणीच्या स्वरूपातच वापरला जात होता. इंग्रजी राजवटीत इस्लाम आणि हिंदू हे समूह घटक प्रकर्षाने समोर आले. इंग्रजी राजवटीत या देशात कायद्याचे राज्य अस्तित्वात आले. त्यामुळे धर्माची अधिकृत नोंद करणे अनिवार्य ठरले. तेव्हा हिंदू हा शब्द अधिकृतरित्या धर्म म्हणून कागदोपत्री नोंद होऊ लागला. शीख, जैन धर्मांनी आपल्याला हिंदू म्हणवून घेण्यास विरोध केला. त्यामुळे त्यांचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण झाले. तसे ते आधीपासूनच होते. जगभरात पसरलेला बौद्ध धर्मही आधीपासूनच स्वतंत्र होता. परंतु त्याचे अस्तित्व लेह-लदाख, आणि इशान्यभारतापुरते मर्यादित होते.

व्ही. डी. सी.'s picture

7 Feb 2019 - 12:20 pm | व्ही. डी. सी.

मी हिंदू का? हे कसे समजावे?

भारत हा अनेक जातीजामातींचा, संमिश्र समाजाचा देश आहे. त्यात पारशी आहेत, ख्रिश्चन आहेत, मुसलमान आहेत, हिंदू आहेत. या जतिव्यवस्थेचा पाया 'वंश ' नसून 'धर्म' आहे. पण हा वरवरचा उथळ विचार आहे. पारशी हा पारशी का, ख्रिश्चन हा ख्रिश्चन का, मुसलमान हा मुसलमान कसा, आणि हिंदू हा हिंदू कसा हे जाणून घेणे मनोरंजक ठरेल.
पारशी, ख्रिश्चन, मुसलमान यांबाबत हे सांगणे सोपे आहे. एखाद्या पारशाला विचार "तू स्वतःला पारशी का म्हणवतोस?" या प्रश्नाचे उत्तर पारशाला देणे अवघड वाटत नाही. मी पारशी आहे कारण मी झोरास्टरचा उपासक आहे". आता हाच प्रश्न मुसलमानाला विचारा. त्यालाही उत्तराला विलंब होणार नाही. तो लगेच सांगेल "मी इस्लामचा उपासक आहे म्हणून मी मुसलमान आहे".
आता हाच प्रश्न हिंदूला विचारा. तो गोंधळून जाईल. काय उत्तर द्यावं ते त्याला समजणार नाही.
हिंदू जमात ज्या देवांची उपासना करते त्या देवांची उपासना मी करतो म्हणून मी हिंदू आहे" असं उत्तर त्याने दिलं तर ते तितकंसं खरं नाही. सर्व हिंदू एकाच देवाची उपासना करीत नाहीत. काही लोक एकाच देव मानणारे, काही लोक अनेक देवांची उपासना करणारे तर काही लोक ईश्वर आणि सृष्टी एकच आहेत असे मानणारे आहेत. जे एकेश्वरवादी आहेत ते सर्व हिंदू एकाच देवाचे उपासना करतात असेही नाही. कुणी विष्णू, कुणी राम, कुणी शिव, कुणी कृष्ण यांची उपासना करतात. काही हिंदू पुरुष देवतांना न मानणारे आहेत. ते स्त्रीदेवतांचे उपासक, देवी उपासक असतात आणि असे असूनही ते एकाच देवीचे उपासक असतात असेही नाही. कुणी कालीचे उपासक, कुणी पार्वतीचे पूजक, तर कुणी लक्ष्मीचे भक्त.

व्ही. डी. सी.'s picture

7 Feb 2019 - 12:21 pm | व्ही. डी. सी.

काही लोक अनेक देवांची उपासना करतात. विष्णू आणि शिव, राम आणि कृष्ण यांची एकाच वेळी उपासना करणारे लोक आहेत. तेच लोक काली, पार्वती, लक्ष्मी यांचीही पूजा करतात. शिवरात्रीच्या दिवशी शिवोपासना म्हणून उपवास करणारा हिंदू एकादशीच्या दिवशी विष्णूची उपासना म्हणूनही उपवास करील. शंकरासाठी तो बेलाचे झाड लावील तर विष्णूसाठी तुळशीला पाणी घालेल. काही हिंदूंची उपासना हिंदू देवातांपुरतीच मर्यादित नसते. ते मुसलमानी पीर किंवा ख्रिश्चन देवता यांचीही पूजा करतात. अनेच किंदू पिराची पूजा करतात, उरूस असेल तिथं जातात.काही ठिकाणी पीराचे पूजक वंशपरंपरेने ब्राह्मणाच आहेत. ते मुसलमानी वेश परिधान करतात. मुंबई जवळील मत माउली या ख्रिश्चन देवीचे उपासक कितीतरी हिंदू आहेत.
ख्रिश्चन किंवा मुस्लिम दैवतांची पूजा ही प्रासंगिक असते. पण कधीकाळी साऱ्या धर्मनिष्ठाच हिंदूंनी कायम स्वरुपात बदललेल्या आहेत असे दिसून येते. असे अनेक तथाकथित हिंदू आहेत की, ज्यांच्या धर्मात अनेक मुसलमानी तत्वांचा समावेश झाला आहे. पंचपीरीय प्रणाली हा एक हिंदू धर्मपंथ आहे. तो मानणारे हिंदू पाच मुसलमानी फाकीरांची पूजा करतात. दफ़ालि फकीर हा केवळ याच कामासाठी असतो. या पंथाचे हिंदू लोक या पंचपीरांना कोंबडे देतात. भारतात अनेक हिंदू मुसलमानी धर्माच्या पवित्र स्थानांचा तीर्थयात्रा करतात. पंजाबात सखी सरवार या नावाचं एक असं ठिकाण आहे.
मलकानांविषयी लिहिताना श्री ब्लंट यांनी लिहून ठेवलय की मथुरा, इटाह आणि मैनपुरी या आग्रा परिसरात अनेक हिंदूंनी, त्यातील विविध जातींनी, धर्मांतर केलं, आणि हे लोक मुसलमान झाले. त्यापैकी अनेक लोक राजपूत, जाट, आणि बनिया होते. आपण मुसलमान आहोत हे सांगत नाहीत. ते सामान्यतः आपली मुलाची जातच सांगतात. त्यांची नावं हिंदू नावंच आहेत. ते मंदिरात जातात, ते राम राम करतात, त्यांच्यात विवाह फक्त जातीतच होतात. हे एका बाजूला, पण कधीतरी ते मशिदीत जातात. सुंता करतात आणि प्रेतांचे दफन करतात. आपल्या मुसलमान मित्रांसोबत ते पंगतीला बसतात.

व्ही. डी. सी.'s picture

7 Feb 2019 - 12:22 pm | व्ही. डी. सी.

गुजरात मध्ये अशा प्रकारच्या अनेक जाती आहेत. मटिया कुणबी ही त्यातलीच एक जमात. आपल्या घराच्या महत्वाच्या धार्मिक प्रसंगी हे कुणबी लोक ब्राह्मनालाच बोलावतात पण ते इमामशाह आणि त्यांचे वंशज यांचे अनुयायी आहेत. ते दफन करतात. आणखी एका जमातीत विवाहप्रसंगी हिंदू भटजी आणि मुस्लिम मौलालवी या दोघांनाही आमंत्रित करतात. मोमन नावाच्या जमातीत सुंता आहे. गुजराती कुराण वाचण्याचा परिपाठ आहे. दफन आहे. मात्र एवढ्या तीन गोष्टींव्यतिरिक्त बाकी सर्व बाबतीत मोमन लोक हिंदू रीतिरिवाज पाळतात.
"मी हिंदू आहे कारण मी हिंदू धर्मशास्त्राचे पालन करतो " असे तो म्हणत असला तरी ती वस्तुस्थिती नाही. कारण हिंदुत्वाचा कुठलाच एक संप्रदाय नाही. ख्रिश्चन आणि मुसलमान यांच्या धर्मश्रद्धांची तुलना करता हिंदू लोकांच्या एकमेकांच्या धर्मश्रद्धांमध्ये खूपच फरक आढळतो. मुख्य आणि महत्वाच्या धर्म श्राद्धांबाबत हिंदूंमध्ये एकवाक्यता आढळत नाही. काही म्हणतात की हिंदूंचे सर्व पवित्र ग्रंथ स्वीकार्य आहेत; काही लोक तंत्र मानत नाहीत. काही लोक वेदांचेच महत्व मानतात. काहीजण कर्म सिद्धांतावरच विश्वास ठेवणारे आहेत.
अनेक संप्रदायांची आणि तत्वांची संमिश्र असलेली सरमिसळ म्हणजे हिंदुत्व होय. या हिंदुत्वाच्या प्रवेशद्वारात एकेश्वरवादी, अनेकेश्वरवादी सर्वांना प्रवेश आहे; शिव आणि विष्णू यांचे पूजक; पार्वती आणि लक्ष्मी यांचे उपासक; आदिमाता किंवा ग्रामदेवता यांचे उपासक; रक्तविधीने आपल्या देवतेची कृपा संपादन करून घेणारे लोक; पूर्ण अहिंसावादी, सध्या जीवजंतूंना मारणे तर राहोच पण हिंसेचे शब्दसुद्धा ज्यांना व्यर्थ आहेत असे लोक; ज्यांच्या धर्म्विधीत केवळ प्रार्थना आणि स्तोत्रे आहेत असे लोक; धर्माच्या नावाखाली मद्द्यसेवनाने उपचार अवलंबिणारे लोक; आणि अशा प्रचलित मतांविरुद्ध असलेला पण संख्येने खूप मोठा असलेला समाज, ब्राह्मणांचे श्रेष्ठत्व न मानणारा समाज ज्यांचे धार्मिक नेते अब्राह्मण आहेत असा समाज.....हे हिंदू समाजाचे चित्र आहे.

व्ही. डी. सी.'s picture

7 Feb 2019 - 12:23 pm | व्ही. डी. सी.

"मी हिंदू आहे कारण इतर अनेक हिंदू जे रीतीरिवाज पाळतात तेच मी पाळतो" असे एखादा हिंदू म्हणेल तर ते खरे नाही. कारण सर्व हिंदू सारे रीतीरीवास सर्वत्र पाळतात असे नाही.
उत्तरेत निकटच्या नातेवाईकांत विवाह होत नाहीत. पण दक्षिणेत चुलत-मामे भाऊ-बहिण यांची लागणे होतात. याहूनही अधिक निकटच्या नात्यातील लग्नांना मान्यता मिळते. नियम म्हणून स्त्रीची शुद्धता, पावित्र्य यांना खूप महत्व दिले जाते. पण अनेकवेळा ही शुद्धता विवाहापूर्वीच नष्ट केली जाते आणि अनेक मुलींना "भाविणी" करण्यात समाज धन्य मानतो. या देशाच्या काही भागात स्त्रियांना मुक्तपणे वावरण्याची मुभा आहे तर काही भागात त्यांना बंदी आहे.काही ठिकाणी स्त्रिया स्कर्ट वापरतात तर काही ठिकाणी पुरुषांप्रमाणेही वेष परिधान करतात.
आता आणखी एक मुद्दा. एखादा हिंदू म्हणू लागला की मी हिंदू आहे कारण मी जातीव्यवस्था मानतो..... तर हेही खरे नाही. एक खरे की, कोणत्याही हिंदू माणसाला आपल्या शेजाऱ्याचे रीतिरिवाज कोणते याच्याशी कर्तव्य नाही. पण आपण त्याच्याबरोबर बसून खावे का नाही, त्याच्या हातून पाणी प्यावे की नाही याचा तो अवश्य विचार करेल. याचाच अर्थ असा की, जातीव्यवस्था हे हिंदुत्वाचे आवश्यक अंग आहे. आणि अर्थातच जो माणूस कोणत्याही मान्य हिंदू जातीचा नाही तो हिंदू नसतो. हे खरे असले तरी हिंदुत्वाबाबत जातीव्यवस्था पाळणे एवघेच पुरेशे नसते. मुसलमान व ख्रिश्चन या धर्मात रोटी-व्यवहारात नसली तरी बेटी व्यवहारात जात पाहिली जातेच. पण एवढ्याने त्यांना हिंदू म्हणता येणार नाही. आवश्यकता दोन गोष्टींची असते. हिंदू हा हिंदूच असला पाहिजे आणि तो जातिव्यवस्था मानत असला पाहिजे. यातूनच पूर्वीचा प्रश्न उपस्थित होतो........हिंदू कोणाला म्हाणावे?
प्रत्येक हिंदू माणसाला आपण हिंदू का आहोत याचे उत्तर देता यायला पाहिजे. ते पारशाला देता येते, मुसलमानाला देता येते, ते ख्रिश्चनाला देता येते. पण .......हिंदू माणसाला देता येत नाही.
यामागची कारणे कोणती, हा धार्मिक गोंधळ नेमका काय आहे याची जाणीवपूर्वक उत्तरे शोधण्याची वेळ आलेली आहे.
............................................................................................................................................................................................................................................................................................................................................................................................................................................

मुळात धर्म म्हणजे काय ?
धर्म कसे निर्माण झाले ?
जंगलात राहणाऱ्या जंगली मानव प्राणी धर्मात कसा अडकला?
विविध प्रकारचे धर्म निर्माण होण्याचं कारण काय?
धर्माची तुम्ही जी thobhal व्याख्या दिली आहे ती खरी का मानवी तुम्ही सांगता म्हणून की काही प्राचीन पुरावे आहेत .
पहिले ह्या सर्वाची उत्तर शोधून काढावी नंतर विशिष्ट धर्मावर चर्चा करावी .
जे लवचिक धोरण ठेवून वेळेनुसार बदलतात ते चांगले की परस्थिती मध्ये अमुलाग्र बदल होवून सुधा खूप जुन्या जंगली नियमाचे पालन करतात ते श्रेष्ठ हे पहिले ठरवावं .
आता तर माणूस aivdha प्रगत झाला आहे की धर्म हा फक्त मनःशांती मिळावी म्हणूनच पाळावा .मग ती शांती प्रत्येकाला वेगवेगळी मिळू शकते .
हाच धर्म हा धर्मच नाही असल्या binkamachi आणि निघणारा निष्कर्ष कधीच सर्वमान्य होणार नाही अशी vazonti चर्चा म्हणजे वेळेचा दुरुपयोग आहे

व्ही. डी. सी.'s picture

7 Feb 2019 - 4:08 pm | व्ही. डी. सी.

धर्म म्‍हणजे काय? आणि त्‍याची आवश्‍यकता काय? याविषयी स्‍वामी विवेकानंदांनी अतिशय व्‍यावहारिक स्‍पष्‍टीकरण शंभर वर्षांपूर्वीच केले आहे. आणि ते आजही अगदी तंतोतंत लागू पडते.

… केवळ उपयुक्‍तावादाचा आदर्श वाळगून पूर्णपणे निकोप, नीतिमान आणि चांगले झालेले कितीतरी थोर पुरूष ह्या आपल्‍या जगात होऊन गेले आहेत. परंतु जग हलवून सोडणा-या, जगात जणू एका प्रचंड आकर्षणशक्‍तीचा प्रादुर्भाव करणा-या, शेकडो हजारो लोकांवर प्रभाव पाडून त्‍यांना कार्यास प्रवृत्‍त करणा-या, आपल्‍या जीवनाने इतरांमधे आध्‍यात्मिकतेचा वन्‍ही चेतवून देणा-या व्‍यक्‍तींची पार्श्‍वभूमी मात्र आध्‍यात्मिकच असल्‍याचे आपल्‍याला नेहमी आढळून येईल. त्‍यांच्‍या ठायीच्‍या प्रचंड प्रेरणा धर्मातूनच निर्माण झालेल्‍या असतात. जिच्‍यावर मानवाचा जन्‍मसिध्‍द अधिकार आहे आणि जी मानवाच्‍या ठायी स्‍वरूपतःच वसत असते त्‍या अनंत शक्‍तीचा साक्षात्‍कार करून घेण्‍यासाठी जर मानवाला कुणी सर्वात जास्‍त प्रेरणा देत असेल तर तो धर्मच होय. चारित्र्य बनविण्‍यासाठी, जे काही चांगले आहे आणि थोर आहे ते घडविण्‍यासाठी, लोकांच्‍या जीवनात आणि स्‍वतःच्‍या अंतरात्‍म्‍याची प्रेरणा देणारी सर्वात मोठी शक्‍ती म्हणजे धर्म होय, आणि म्‍हणून त्‍या दृष्‍टीने त्‍याचे अध्‍ययन व्‍हावयासच हवे. धर्माचे अध्‍ययन-अनुशीलन आता पूर्वीपेक्षा विशाल दृष्टिकोनातून झाले पाहिजे. धर्मासंबंधीच्‍या सर्व संकुचित, मर्यादित, कलहप्रसू, आक्रमक कल्‍पना आता लयास जावयास हव्‍यात. धर्माविषयीच्‍या सा-या पंथनिष्‍ठ, जमातनिष्‍ठ, राष्‍ट्रनिष्‍ठ कल्‍पना टाकून द्यावयास हव्यात. प्रत्‍येक जाती-जमातीचा फक्‍त स्‍वतःचा असा एकेक विशिष्‍ट देव असावा आणि स्‍वतःखेरीज इतर सगळ्यांचा देव खोटा आहे असे प्रत्‍येकाने मानीत असावे ही भ्रामक, वेडगळ समजूत आता भूतकाळात जमा व्‍हावयास हवी. असल्‍या सगळ्या कल्‍पनांचा सपशेल त्‍याग करावयास हवा….

…. एक धर्म खरा ठरला तर सर्व धर्म खरे ठरतात आणि एक खोटा ठरला तर सगळे खोटे ठरतात हे जाणून निरनिराळ्या प्रकारच्‍या धर्मांमधे आपसात मैत्रीची भावना बळावणे आवश्‍यक आहे…..

….. धर्म आणि आधुनिक विज्ञान यामधे मिलाफ घडून यावयास हवा…..

(स्‍वामी विवेकानंद ग्रंथावली 3, पृष्‍ठ 77-78)

मामाजी's picture

8 Feb 2019 - 1:00 am | मामाजी

आपली स्वता:ची विचारसरणीच कशी बरोबर आहे हे सिद्ध करण्यासाठी स्वामी विवेकानंदांच्या साहित्यातील फक्त एका परिच्छेदाचा संदर्भ (जो आपण समजता की आपल्या विचारसरणीशी मिळताजुळता आहे तो ) देऊन इतरांची दिशाभूल करू नये ही आपणास विनंती. आपल्या सारख्यांच्या माहिती साठी.

Life of Swami Vivekananda by Eastern and Western Disciples, Chapter : In Madras and Hydrabad, Page 268

In that same meeting, when a Westernised Hindu spoke in a belittling manner of the "meaningless teachings" of the Vedic Seers, the Swami fell upon him with a thunderbolt vehemence, crying out, "How dare you criticise your venerable forefathers in such a fashion! A little learning has muddled your brain. Have you tested the science of the Rishis Have you even as much as read the Vedas? There is the challenge thrown by the Rishis! If you dare oppose them, take it up."

व्ही. डी. सी.'s picture

8 Feb 2019 - 9:46 am | व्ही. डी. सी.

त्यात विशेष असे काहीच नाही! तुम्ही काय सिद्ध करू पाहत आहात? तुम्हाला काय सुचवायचे आहे? वेद वाचायला? वेदांची, ऋषींची समीक्षा करायला तुमचा विरोध आहे काय?

व्ही. डी. सी.'s picture

7 Feb 2019 - 4:09 pm | व्ही. डी. सी.

हिंदू, मुस्लिम, ख्रिश्‍चन, बौध्‍द, जैन ही धर्माची केवळ बाह्यांगे आहेत. या प्रत्‍येक विचारसरणीच्‍या मूळाशी जाऊन अभ्‍यास केल्‍यास असे दिसून येते की, हे सर्व एकाच सत्‍याचे अनुसरण करीत आहेत.

धर्म – जे धारण केले जाते तो धर्म ! प्रत्‍येक व्‍यक्‍तीचा धर्म वेगळा आहे आणि त्‍यात इतर कुणीही ढवळाढवळ करता कामा नये. आमचा धर्म, तुमचा धर्म, श्रेष्‍ठ धर्म, कनिष्‍ट धर्म, सनातन धर्म, पुरोगामी धर्म अशी गोष्‍टच वास्‍‍तविक अस्तित्‍वात नाही.

प्रत्‍येकाने स्‍वतःचा धर्म ओळखून त्‍याचे प्रामाणिकपणे आचारण केले तरी या मानवजातीचा उध्‍दार होईल. इंजिनिअरचा धर्म तांत्रिक शाखेत अधिकाधिक प्रगती साधणे, डॉक्‍टरचा धर्म आपल्‍याकडे येणा-या प्रत्‍येक रोग्‍याचे रोगनिवारण, एक भारतीय म्‍हणून आपला धर्म या राष्‍ट्राच्‍या हितार्थ प्रयत्‍न करणे, एक माणूस म्‍हणून आपला धर्म आपल्‍या हिताबरोबरच इतरांचेही हित साधणे.

आज आपण आपलाच धर्म विसरलो आहोत. त्‍यामुळेच इतरांचा धर्म चुकीचा, कनिष्‍ट, आणि आपलाच धर्म श्रेष्‍ठ अशी ओरड केली जाते. आणि याचा फायदा सत्‍तापिपासू, संपत्‍तीलोलूप स्‍वार्थी माणसे घेतात. स्‍वार्थपरायणता म्‍हणजे अधर्म आणि जिथे निःस्‍वार्थ भाव तिथेच धर्म.

आपल्‍या देशात देशभक्‍तांची काही कमी नाही. पण त्‍यांच्‍यासमोर कुठलाही आदर्श नाही. इतिहासातील आदर्श समारे ठेऊन वाटचाल करावी तर त्‍या आदर्शांचीही चिरफाड करून त्‍यांची लक्‍तरे वेशीवर टांगली जातात. तथापि कोणताही आदर्श परीपूर्ण असूच शकत नाही. म्‍हणून आपला आदर्श श्रेष्‍ठ आणि इतरांचा आदर्श निकृष्‍ट, खोटा हे आपण ठरवू नये. आपण आपल्‍या आदर्शांवर ठाम असावे, इतरांना भलेही त्‍यांच्‍या आदर्शांचे अनुसरण करू द्या.

धर्म, इश्‍वर, संस्‍कृती यांवर तर्कटे लढवून आपला अमूल्‍य वेळ वाया दवडवण्‍यापेक्षा काहीतरी कार्य करण्‍याची वेळ आली आहे. जुनी थडगी उकरून काय साध्‍य होणार ? आपल्‍यासमोर वर्तमान भारत आणि त्‍यातील समस्‍या उभ्‍या आहेत. प्रचंड कार्य उभे आहे. त्‍यासाठी आपला वेळ आणि शक्‍ती कारणी लावण्‍याची नितांत आवश्‍यकता आहे.

“शंभर विचारांपेक्षा एक आचार श्रेष्‍ठ !”

व्ही. डी. सी.'s picture

7 Feb 2019 - 4:09 pm | व्ही. डी. सी.

प्रत्‍येकाने सर्वस्‍वाचा त्‍याग करून प्राणांची आहूती द्यावी, अशी अपेक्षा मुळीच नाही. परंतु प्रत्‍येकाने आपला धर्म जाणून तो जरी प्रामाणिकपणे निभावला तरी खूप काही होण्‍यासारखे आहे. धावण्‍याच्‍या शर्यतीत प्रत्‍येक धावपटू वेगवेगळ्या ट्रॅकवर उभा असतो, पण प्रत्‍येकाला समान अंतर आणि समान लक्ष्‍य गाठायचे असते. असे असताना प्रत्‍येक जण इतरांचे गुण अवगुण काढून एकमेकांचे पाय ओढू लागला, इतरांच्‍या मार्गात अडथळा निर्माण करू लागला तर ती शर्यत निरर्थक ठरेल आणि कुणीही लक्ष्‍य गाठू शकणार नाही. म्‍हणूनच इतरांच्‍या मार्गांवर, श्रध्‍दांवर, मतांवर चिखलफेक करण्‍यापेक्षा इतरांना त्‍यांच्‍या वाटेने जाऊ द्या. आपण आपले मार्गक्रमण करीत रहावे. पण एखाद्याला काहीच करावयाचे नसेल तर …… तर मग ही कुरघोडी चालूच राहणार.

अंतर्गत वादविवादांनीच या देशाचे वाटोळे झाले आहे. चर्चिलच्‍या “या गाढवांना (भारतीयांना) स्‍वातंत्र्य देऊ नका. त्‍यांची ती लायकी नाही. ते देश चालवू शकत नाहीत.” या उद्गारांची प्रचिती येऊ लागली आहे. तरूणपिढीने आपली ऊर्जा विरोध, वाद यांच्‍यावर खर्च न करता त्‍याचा उपयोग राष्‍ट्रहितार्थ विधायक कामासाठी करावा, अन्‍यथा आणखीही दुरावस्‍था अटळ आहे.

आपल्‍यासमोर भरपूर कार्य पडले आहे. केवळ शासनावर अवलंबून न राहता वैयक्तिक स्‍तरावर हे कार्य करीत राहिले पाहिजे. आज भारताला स्‍वामी विवेकानंदांच्‍या विचारांची नितांत आवश्‍यकता आहे. प्रत्‍येक व्‍यक्‍तीत ईश्‍वर पाहा, म्‍हणजे वादविवाद उरणार नाहीत. माणसासाठी धर्म आहे, धर्मासाठी माणूस नाही. मानवधर्म हाच श्रेष्‍ठ धर्म आहे. ईश्‍वराच्‍या साक्षात्‍कारासाठीच धर्मांची उत्‍पत्‍ती झाली आहे आणि राष्‍ट्रसेवा हीच ईश्‍वरसेवा, शिवभावे जीवसेवा. या सेवेतूनच ईश्‍वरसाक्षात्‍काराप्रत पोहोचणे शक्‍य आहे. अन्‍यथा कीड्यामुंग्‍याप्रमाणे आपापसात निरर्थक भांडून, लढून मरून जा. असल्‍या मरण्‍यांतून काहीही साध्‍य होत नसते. कसे मरावे हे ज्‍याचे त्‍याने ठरवावे.

ह्या सृष्टी मध्ये सर्वच प्राणी संघर्ष करत आसतात जगण्यासाठी त्यात ऐकपेशीय पासून मानव सारखं प्रगत प्राणी सुधा संघर्ष करत आसतात .
पोटपानी आणि निवारा हे दोन प्रश्न सुटले की वर्चस्वाची लडाई चालू होते ती aikte पने लढली जात नाही ती सामूहिक रित्या लढावी लागते त्यासाठी समूह आसने गरजेचं आणि आताच्या पॅरिस धर्म म्हणजेच विशिष्ट समूह मतभेद श्रेष्ठ कनिष्ठ हा जो प्रकार आहे ते म्हणजे वर्चस्व स्थापन करण्यासाठी चाललेली धडपड बस आणि काही नाही .
प्रत्येक समूह (धर्म) आशि भीती वाटते की आपला समूह हरला तर आपले अस्तित्व च संपेल .
आणि तीच भीती विविध समूहात ( धर्मात) युद्ध घडवून आणते किंवा दंगली घडवून आणते किंवा द्वेष निर्माण करते ..
त्या मुळे शहाण्या सारखं वागा आणि धर्म घरातच ठेवा हयात च हित आहे

व्ही. डी. सी.,

तुमचा इथला संदेश वाचला. 'मी हिंदू आहे' असे सांगण्यापूर्वी खालील गोष्टींचा विचार करायची मलातरी गरज वाटंत नाही. पण कुतूहल शमावं म्हणून उत्तरं देत आहे.

१. सर्वच धर्मांना संथापक आहेत, तर हिंदू धर्माचा संस्थापक कोण?

उत्तर : परमेश्वर. धर्मं तु साक्षात् भगवत्प्रणितम् अशी भागवतात उक्ती आहे.

२. ज्याला हिंदुधर्म म्हणतात तो खरेच धर्म आहे काय?

उत्तर : हो. कारण जो धारणा करतो तो धर्म. निव्वळ जन्म घेऊन कोणी हिंदू होत नसतो. त्यासाठी साधना करावी लागते.

३. कोणत्याही तथाकथित धर्मग्रंथात हिंदू हा शब्द आलेला नाही, असे का झाले असावे?

उत्तर : कारण की हिंदू धर्माचं स्वनाम (= self addressing) सनातन धर्म आहे.

४. कोणत्याही संत वचनांमद्धे हिंदू या शब्दाचा वापर का करण्यात आलेला नाही?

उत्तर : कारण की हिंदू धर्माचं स्वनाम (= self addressing) सनातन धर्म आहे.

५. वैदिक, ब्राह्मणी, सनातन या नावाने प्रचलित असणाऱ्या संस्कृतीला धर्म म्हणता येईल काय?

उत्तर : हो.

६. हिंदू या तिरस्कार दर्शक शब्दाला आपण आपला धर्म का बरे म्हणावे?

उत्तर : मूर्ख लोकांनी तिरस्काराने भारतातल्या सनातनधर्मीयांना हिंदू असं संबोधून त्यांच्या कत्तली केल्या. तसंच वित्तहानी देखील केली. त्यामुळे अशा आक्रमकांच्या विरुद्ध एकजूट करणं सोपं जावं म्हणून सनातन धर्मीयांनी हिंदू हीच प्रचलित संज्ञा वापरणं चालू ठेवलं. उदा. : शिवाजीमहाराजांनी हिंदुपदपातशाहीचा पुरस्कार केला.

७. वेद हे आपले धर्मग्रंथ असतील तर ते याच धर्मातील इतर लोकांना वाचण्यास आणि ऐकण्यास बंदी का होती?

उत्तर : वेद ऐकायची कोणालाही कसलीही बंदी कधीही नव्हती. खरंतर वेदघोष सर्वत्र पसरायला पाहिजे अशी अपेक्षा आहे.

८. ब्रिटीश काळात जनगणनेच्या वेळी आपण हिंदू आहोत, असे नोंद करून घेण्यास खूप जातींनी विरोध का केला होता?

उत्तर : माहित नाही. बहुधा पैसे वा इतर सवलतींच्या लोभाने या जाती स्वत:स अहिंदू म्हणवून घेत असाव्यात.

९. आदिवाशी लोक स्वतःला हिंदू का बरे म्हणून घेत नव्हते?

उत्तर : बहुधा अज्ञानामुळे वनवासी लोक स्वतःला हिंदू म्हणवून घेत नसावेत.

१०. तथाकथित ब्राह्मण लोक हिंदू आहेत काय?

उत्तर : हो.

११. ब्राह्मण लोक मरीआई, वेताळ, जोतीबा, बिरोबा, म्हसोबा या देवतांची पूजा का करीत नसावेत?

उत्तर : माहित नाही. पण हिंदू धर्मीयांत कोणीही कोणत्याही देवाची पूजा करू शकतो.

१२. कागदोपत्री धर्म लिहिणे अनिवार्य असेल तेथे हिंदू असे लिहिणे गरजेचे आहे काय?

उत्तर : हो. कारण की हिंदूंची संख्या कमी असल्याचं कारण देऊन भारतातून पाकिस्तान ओरबाडून काढला गेला. त्यामुळे शक्य तिथे सनातनधर्मीयांनी स्वत:स हिंदू म्हणून घोषित करावं या मताचा मी आहे.

आ.न.,
-गा.पै.

व्ही. डी. सी.'s picture

7 Feb 2019 - 11:36 pm | व्ही. डी. सी.

मोघमपणे दिलेली उत्तरे, अस्वीकार्य !

गामा पैलवान's picture

8 Feb 2019 - 2:15 am | गामा पैलवान

व्ही.डी.सी.,

मोघम उत्तरांनी तुमचं काय घोडं मारलंय हो? उत्तरं मोघम असली तरी अचूक आहेत. मला फापटपसारा आवडंत नाही.

आ.न.,
-गा.पै.

व्ही. डी. सी.'s picture

8 Feb 2019 - 9:18 am | व्ही. डी. सी.

विवेकवादी, बुद्धिप्रामाण्यवादी, वैज्ञानिक दृष्टी स्वीकारलेल्या कोणासही न पटणारी तर्कटे !

सुबोध खरे's picture

8 Feb 2019 - 7:29 pm | सुबोध खरे

हायला
हे बुबुडविपुमाधवि आहेत असं दिसतंय

गामा पैलवान's picture

8 Feb 2019 - 8:47 pm | गामा पैलवान

वी.डी.सी.,

तुम्हांस माझा युक्तिवाद पटंत नसल्यास वस्तुस्थितीच्या आधारावर खोडून काढा.

आ.न.,
-गा.पै.

व्ही. डी. सी.'s picture

8 Feb 2019 - 8:58 pm | व्ही. डी. सी.

नक्कीच खोडून काढेन!
पण असे धर्मान्ध, अविचारी, अंधश्रध्द उत्तरे लिहिण्यात कसले आहे हशील?

गामा पैलवान's picture

9 Feb 2019 - 2:44 am | गामा पैलवान

व्ही.सी.डी.,

उगीच विशेषणे चिकटवण्यापेक्षा माझा युक्तिवाद सप्रमाण खोडून दाखवा.

आ.न.,
-गा.पै.

व्ही. डी. सी.'s picture

9 Feb 2019 - 12:06 pm | व्ही. डी. सी.

मानवता हाच धर्म मानून विवेकशील बुद्धीने विचार केल्यास खालील प्रश्नांना खालीलप्रमाणे उत्तरे देता येतील!

१. सर्वच धर्मांना संथापक आहेत, तर हिंदू धर्माचा संस्थापक कोण?

उत्तर : परमेश्वर. धर्मं तु साक्षात् भगवत्प्रणितम् अशी भागवतात उक्ती आहे.------------ साफ चूक! परमेश्वर हा धर्म किंवा माणसाचा निर्माता नसून माणसानेच परमेश्वर व धर्माची निर्मिती केलेली आहे!

२. ज्याला हिंदुधर्म म्हणतात तो खरेच धर्म आहे काय?

उत्तर : हो. कारण जो धारणा करतो तो धर्म. निव्वळ जन्म घेऊन कोणी हिंदू होत नसतो. त्यासाठी साधना करावी लागते.--------------मुळीच नाही! हिंदू नावाचा कोणताच धर्म या धरतीवर अस्तित्वात नाही! तथाकथित धर्माचे ठेकेदार त्यांचा वैदिक धर्म हिंदू शब्दाच्या आडून चालवीत आहेत!

३. कोणत्याही तथाकथित धर्मग्रंथात हिंदू हा शब्द आलेला नाही, असे का झाले असावे?

उत्तर : कारण की हिंदू धर्माचं स्वनाम (= self addressing) सनातन धर्म आहे.------------- हा शब्दच भारतीय नाही! पारशी शब्द ज्याचा अर्थ आहे काळा, गुलाम, चोर, लुटेरा! विजेत्यांनी पराजितांसाठी दिलेली हि एक राजकीय सज्ञा आहे! हा शब्द १००० वर्षांपेक्षा जास्त जुना नाही!

४. कोणत्याही संत वचनांमद्धे हिंदू या शब्दाचा वापर का करण्यात आलेला नाही?

उत्तर : कारण की हिंदू धर्माचं स्वनाम (= self addressing) सनातन धर्म आहे.--------------- जो शब्दच भारतीय नव्हता तो शब्द संत वचनांमध्ये येणे अशक्य होते! त्या काळी तो शब्द प्रचलित नसल्यामुळेच हे घडलेले असावे, नाही काय?

व्ही. डी. सी.'s picture

9 Feb 2019 - 12:07 pm | व्ही. डी. सी.

५. वैदिक, ब्राह्मणी, सनातन या नावाने प्रचलित असणाऱ्या संस्कृतीला धर्म म्हणता येईल काय?

उत्तर : हो.----------------- खरे पहिले तर, नाही! तिला आदिम संस्कृतीच म्हणणे योग्य होईल!

६. हिंदू या तिरस्कार दर्शक शब्दाला आपण आपला धर्म का बरे म्हणावे?

उत्तर : मूर्ख लोकांनी तिरस्काराने भारतातल्या सनातनधर्मीयांना हिंदू असं संबोधून त्यांच्या कत्तली केल्या. तसंच वित्तहानी देखील केली. त्यामुळे अशा आक्रमकांच्या विरुद्ध एकजूट करणं सोपं जावं म्हणून सनातन धर्मीयांनी हिंदू हीच प्रचलित संज्ञा वापरणं चालू ठेवलं. उदा. : शिवाजीमहाराजांनी हिंदुपदपातशाहीचा पुरस्कार केला. ---------------- 'हिंदवी स्वराज्य' हिंदुपदपातशाही नव्हे! हिंदवी या शब्दाचा अर्थ भारतीय (प्रदेश वाचक) असा होतो! हा तिरस्कार दर्शक शब्द धर्माला जोडणे योग्य नव्हे!

७. वेद हे आपले धर्मग्रंथ असतील तर ते याच धर्मातील इतर लोकांना वाचण्यास आणि ऐकण्यास बंदी का होती?

उत्तर : वेद ऐकायची कोणालाही कसलीही बंदी कधीही नव्हती. खरंतर वेदघोष सर्वत्र पसरायला पाहिजे अशी अपेक्षा आहे.------- साफ खोटे! मनुस्मृतीत (मानवशास्त्र) शुद्राने वेद मंत्र ऐकले तर त्याच्या कानात गरम शिसे अथवा उकळते तेल अथवा गरम लाख ओतण्याची आज्ञा आहे!

८. ब्रिटीश काळात जनगणनेच्या वेळी आपण हिंदू आहोत, असे नोंद करून घेण्यास खूप जातींनी विरोध का केला होता?

उत्तर : माहित नाही. बहुधा पैसे वा इतर सवलतींच्या लोभाने या जाती स्वत:स अहिंदू म्हणवून घेत असाव्यात.--------------- हिंदू या शब्दाचा आणि त्यांचा दूर-दूर कोठेच संबंध नसू शकतो, जुलमी वैदिक लोकांचा हा बेगडी धर्म बनला आहे, हिंदू शब्दा आडून हे लोक ब्राह्मणी फास आपल्या गळ्याभोवती आवळत आहेत, हे त्यांनी पक्के हेरले असेल!

व्ही. डी. सी.'s picture

9 Feb 2019 - 12:09 pm | व्ही. डी. सी.

९. आदिवाशी लोक स्वतःला हिंदू का बरे म्हणून घेत नव्हते?

उत्तर : बहुधा अज्ञानामुळे वनवासी लोक स्वतःला हिंदू म्हणवून घेत नसावेत.-------------- त्यांना तथाकथित ब्राह्मणांचे वर्चस्व अमान्य असणार, हे उघड आहे!

१०. तथाकथित ब्राह्मण लोक हिंदू आहेत काय?

उत्तर : हो.------------- मुळीच नाही! त्यांचा धर्म (संस्कृती) आर्य / सनातन / ब्राह्मणी / वैदिक. त्यांचे देव वेदातले, इतर देवांचा व त्यांचा दुरान्वे संबंध नाही!

११. ब्राह्मण लोक मरीआई, वेताळ, जोतीबा, बिरोबा, म्हसोबा या देवतांची पूजा का करीत नसावेत?

उत्तर : माहित नाही. पण हिंदू धर्मीयांत कोणीही कोणत्याही देवाची पूजा करू शकतो.------------- ब्राहमण लोक त्या अनार्य देवांना देव मानत नाहीत, हे उघड आहे.

१२. कागदोपत्री धर्म लिहिणे अनिवार्य असेल तेथे हिंदू असे लिहिणे गरजेचे आहे काय?

उत्तर : हो. कारण की हिंदूंची संख्या कमी असल्याचं कारण देऊन भारतातून पाकिस्तान ओरबाडून काढला गेला. त्यामुळे शक्य तिथे सनातनधर्मीयांनी स्वत:स हिंदू म्हणून घोषित करावं या मताचा मी आहे.------------- अजिबात नाही! धर्माच्या रकान्यात आपण भारतीय सुद्धा लिहू शकतो!

आसे विज्ञानवादी ,बुधीप्रमण्या वादी,विवेक वादी ऐक तरी kutumbh भारतात आसेल का .
खरोखर प्रत्येक घराचा सर्व्ह केला आणि ते रोजच जीवन कसं जगतात ह्याची माहिती घेतली तर भारतात ऐक सुधा kutumbh वरील सर्व गुण आसलेल्या सापडणार नाही .
बोलायला फक्त ठीक बरे नशीब हे शब्द मराठी पुराण काळापासून आहेत नाही तर वर्णन करायल शब्द पण
नसते मिळाले .हेच सत्य आहे .डोळे उघडे ठेवून फक्त सर्वधर्मीय समाज बघा मग पटेल

स्वतःच्या घरातील वातावरण बघून पूर्ण भारताबद्दल निष्कर्ष काढणे योग्य नव्हे! भारतात असंख्य कुटुंबे बुद्धिवादी, विवेकवादी, विज्ञानवादी विचारांचे आहेत, हे जर माहीत नसेल तर खूपच अवघड आहे!

ह्या धाग्यावरील तुमचे सर्वच प्रतिसाद आवडले.

व्ही. डी. सी.'s picture

8 Feb 2019 - 8:59 pm | व्ही. डी. सी.

धन्यवाद!

जगात तसे महत्वाचे चार धर्म ख्रिश्चन ,मुस्लिम , बुद्ध,आणि हिंदू .
लोकसंख्या हा पाया आसेल तर जगात हिंदू लोकसंख्या 70 ते 80 करोड पेक्षा जास्त आसेल म्हणजे कित्येक लहान धर्मा पेक्षा जास्त (जैन वैगेरे)
त्यात मुस्लिम ,ख्रिश्चन हे दोन्ही धर्म भारता बाहेरचे आणि बुद्ध आणि हिंदू हे दोन धर्म भारतीय उपखंडातील .
ज्यांना हिंदू हा धर्म आहे का प्रश्न पडतो
त्यांनी पाहिले धर्माची व्याख्या .
हिंदू सोडून (कारण हिंदू हा धर्म नाही आस प्रश्न कर्त्याला शंका आहे )
नंतर हिंदू सोडून बाकी तिन्ही धर्म किती वर्षा पूर्वी स्थापन झाले आणि का स्थापित झाले ह्याच सविस्तर उत्तर द्यावे .
हे सर्व धर्म लोकांनी स्वतः स्वीकारले की तलवार आणि हिंसा करून अनुयायी वाढवले व विचार जबरदस्ती लादले.
तो इतिहास सांगणे .
कर्मकांडाचे विविध प्रकार जे खरे धर्म आहेत त्यांच्यात आहे का ह्याची पण माहिती द्या
फक्त ह्याच पॉइंट वर चर्चा करून नंतर tharvuya हिंदू धर्म आहे का .
पहिले धर्म म्हणजे काय हे तर सर्वांना समजावं

गामा पैलवान's picture

11 Feb 2019 - 6:51 pm | गामा पैलवान

व्ही.सी.डी.

तुमचे वरील प्रतिसाद वाचले. पहिल्याप्रथम माझ्याकडून प्रतिसादास उशीर झाल्याबद्दल क्षमा मागतो.

आता माझी मतं सांगतो.

१.

साफ चूक! परमेश्वर हा धर्म किंवा माणसाचा निर्माता नसून माणसानेच परमेश्वर व धर्माची निर्मिती केलेली आहे!

माणूस म्हणजे नक्की काय? देह तर सतत बदलंत असतो. देह मेला तरी त्यातली चेतना मरंत नाही. ती पुनर्जन्म घेते. म्हणून परमेश्वराने माणूस उत्पन्न केला हेच सत्य आहे.

२.

हिंदू नावाचा कोणताच धर्म या धरतीवर अस्तित्वात नाही! तथाकथित धर्माचे ठेकेदार त्यांचा वैदिक धर्म हिंदू शब्दाच्या आडून चालवीत आहेत!

हिंदू धर्म म्हणजेच वैदिक परंपरा हे तुमचं नितीक्षण अगदी अचूक आहे. मात्र त्यासाठी धर्माचा ठेकाबिका घ्यायची काय गरज आहे? ज्याप्रमाणे विज्ञानाचा ठेका घेता येत नसतो त्याप्रमाणेच वैदिक परंपरेचाही कोणी ठेका घेऊच शकंत नाही.

३.

हा शब्दच भारतीय नाही!

मी सनातन या शब्दाबद्दल म्हणंत होतो.

४.

हा शब्द १००० वर्षांपेक्षा जास्त जुना नाही!

हिंदू हा शब्द इ.स.पू. ५०० पासनं म्हणजे गेले २५००+ वर्षं अस्तित्वात आहे. संदर्भ : https://en.wikipedia.org/wiki/Hinduism#Etymology

५.

त्या काळी तो शब्द प्रचलित नसल्यामुळेच हे घडलेले असावे, नाही काय?

असू शकतं.

६.

तिला आदिम संस्कृतीच म्हणणे योग्य होईल!

मान्य.

७.

हिंदवी या शब्दाचा अर्थ भारतीय (प्रदेश वाचक) असा होतो! हा तिरस्कार दर्शक शब्द धर्माला जोडणे योग्य नव्हे!

तिरस्कार करणारे कशाचाही तिरस्कार करतात. मारणाऱ्याचा हात धरता येतो, पण बोलणाऱ्याचं तोंड नाही पकडता येत.

८.

मनुस्मृतीत (मानवशास्त्र) शुद्राने वेद मंत्र ऐकले तर त्याच्या कानात गरम शिसे अथवा उकळते तेल अथवा गरम लाख ओतण्याची आज्ञा आहे!

हे धडधडीत खोटं आहे. कुठल्याही श्लोकात ही आज्ञा नाही. इथे मनुस्मृती मराठीतनं उपलब्ध आहे : http://ebooks.netbhet.com/2016/12/manusmruti.html

त्यातूनही तुम्हाला कानांत वितळतं शिसं हवं असेल तर ते इथे मिळेल : http://www.islamhelpline.net/node/4392

कृपया वाळवंटी प्रथांच्या धोंडी हिंदूंच्या गळ्यात बांधू नयेत.

९.

जुलमी वैदिक लोकांचा हा बेगडी धर्म बनला आहे,

वैदिकांनी या जातींवर नक्की काय जुलूम केले त्याची यादी मिळेल काय?

१०.

त्यांना तथाकथित ब्राह्मणांचे वर्चस्व अमान्य असणार, हे उघड आहे!

कुठल्या ब्राह्मणांनी वनवासी विभागांत जाऊन आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं आहे? काही विदा उपलब्ध आहे काय? वनवासी क्षेत्रांत ख्रिस्ती मिशनऱ्यांची बाटवाबाटवी जोरात चालते. तर मग वनवाशांना ख्रिस्त्यांचं वर्चस्व मान्य असतं असा अर्थ काढायचा का ?

११.

त्यांचा धर्म (संस्कृती) आर्य / सनातन / ब्राह्मणी / वैदिक. त्यांचे देव वेदातले, इतर देवांचा व त्यांचा दुरान्वे संबंध नाही!

हे तुम्हांस कोणी सांगितलं? शिवाय, समजा जर संबंध प्रस्थापित करायचा असेल तर रोखणारे कोण आहे?

१२.

ब्राहमण लोक त्या अनार्य देवांना देव मानत नाहीत, हे उघड आहे.

नसले किंवा असले तरी त्यामुळे काय मोठं आकाश कोसळून पडणार आहे?

१३.

अजिबात नाही! धर्माच्या रकान्यात आपण भारतीय सुद्धा लिहू शकतो!

हिंदूंची संख्या कमी असल्याचं कारण देऊन भारतातून पाकिस्तान ओरबाडून काढला गेला. हा प्रकार पूर्वी घटना अस्तित्वात नसतांना झालेला आहे. आता धर्माच्या रकान्यात भारतीय लिहिता येतं कारण घटना अस्तित्वात आहे. मात्र 'घटनादत्त अल्पसंख्याक' या नावाखाली मुस्लिमांचं लांगूलचालन होत असल्याने परत दुसरी फाळणी होऊ शकते. ती टाळण्यासाठी हिंदू ही ओळख आवश्यक आहे.

आ.न.,
-गा.पै.

विशुमित's picture

12 Feb 2019 - 1:42 pm | विशुमित

((कारण की हिंदू धर्माचं स्वनाम (= self addressing) सनातन धर्म आहे.))
==)) हे नाही रुचले. याबद्दल कृपया थोडे विस्तृत लिहा.
===
तुमच्या बाकी दाव्यांबद्दल अजून निश्कर्षापर्यंत पोहचलो नाही.
त्यामुळे तुर्तास हिंदू धर्मावरील वाद-संवादाचा आनंद घेत आहे.

इरसाल's picture

13 Feb 2019 - 3:26 pm | इरसाल

बंद पडली की हरवली.

गामा पैलवान's picture

13 Feb 2019 - 10:40 pm | गामा पैलवान

विशुमित,


हे नाही रुचले. याबद्दल कृपया थोडे विस्तृत लिहा.

यांत न रुचण्यासारखं काय आहे? हिंदू धर्मग्रंथांत हिंदूधर्माचा उल्लेख सनातनधर्म असा आला आहे. सनातन याचा अर्थ नित्यनूतन.

आता हिंदू विरोधकांनी सनातनी या शब्दाचा अर्थ मागासलेला असा बरोब्बर विरुद्ध लावलेला आहे, त्याला आपण काहीच करू शकंत नाही.

आ.न.,
-गा.पै.

बहुधा अज्ञानामुळे वनवासी लोक स्वतःला हिंदू म्हणवून घेत नसावेत.

{{ सगळ्या दुनियेचे ज्ञानी आपणच..
आदिवासी ला आदिवासी न म्हणता वनवासी म्हणायचे.
आदिवासी म्हटले तर आपण उपरे ठरतो आक्रमणकारी ठरतो ही भिती.
वनवासी म्हणता अज्ञानी म्हणायचं. एकुन काय आम्हीच श्रेष्ठ.

गामा पैलवान's picture

21 Feb 2019 - 6:35 pm | गामा पैलवान

अर्वाच्य,

केलीत ना नावाप्रमाणे अर्वाच्य चूक! मेकॉलेछाप शिक्षणातनं बुद्धी कशी भरकटते त्याचं उत्तम उदाहरण आहे तुमचा प्रतिसाद.

जंगलातले बांधव जसे आदिवासी आहेत अगदी तस्सेच हिंदूसुद्धा भारताचे आदिवासीच आहे. हिंदूंचे बापजादे अनादि अनंत काळापासून भारतात वास्तव्यास आहेत. हिंदूंस कोण्या कनिंगह्यामाच्या वा मोक्षमूलशास्त्र्याच्या प्रमाणपत्रांची गरज नाही. तुमच्या मेकॉलेछाप शिक्षणात शिकवतात की आर्य भारतात बाहेरून आले, मात्र पुराव्याच्या नावाने पार बोंबाबोंब असते.

मग जंगली बांधवांचा नेमका उल्लेख करण्यासाठी वनवासी हीच संज्ञा उपयुक्त नव्हे काय?

आ.न.,
-गा.पै.

Rajesh188's picture

23 Feb 2019 - 10:03 pm | Rajesh188

हिंदू धर्माचे 90 कोटी पर्यंत अनुयायी असतील त्यानं हिंदू धर्म म्हणजे काय हा प्रश्न पडला नाही .
त्यांना सर्व सविस्तर माहिती आहे बाकी धर्म म्हणजे काय आहेत ते सुधा माहीत आहे
जास्त योग्य धर्म म्हणून खूप मोठी लोकसंख्या हा धर्म jopaste आहे आणि किती ही आकड तांडव केले ,कितीही खोटे दाखले दिले तरी हिंदू आपल्या धर्मा वरच प्रेम् kartil उगाच शक्ती नका वाया घालवू त्या पेक्षा स्वधर्म सुधारा

मागे एका धाग्यावर दिलेला हा प्रतिसाद इथेही लागू पडतो असं वाटलं म्हणून...

https://www.misalpav.com/comment/144200#comment-144200