गाभा:
ICC च्या सर्व ट्रॉफी जिंकून तिरंगी मालिकाही खिशात घालणार्याa जिगरबाज कप्तान MS Dhoni याचे हार्दिक अभिनंदन.....
आजवर कोणालाही न जमलेले जबरदस्त winning team spirit निर्माण करून भारतीय क्रिकेटला अत्त्युच्च मानाचे पद मिळवून देणारा कप्तान मात्र काही दिवसापूर्वी match fixing च्या आरोपाखाली संशयाच्या जाळ्यात ओढला गेला होता ................
तुम्हाला काय वाटते ?
MS Dhoni भारताचा सर्वश्रेष्ठ कर्णधार आहे का?
प्रतिक्रिया
12 Jul 2013 - 9:03 pm | पिंपातला उंदीर
धोनि आणि मॅच फिक्सिंग? काहीतरी गल्लत होत आहे. बाकी तो भारताचा सर्वश्रेष्ठ कर्णधार आहे हे माझे मत
12 Jul 2013 - 9:07 pm | अभ्या..
मला वाटते तुम्ही अपघाताच्याच स्टोर्या लिहा. भारी जमतेत तुम्हाला. आमची ही करमणूक व्हतीय. :)
12 Jul 2013 - 9:09 pm | मंदार कात्रे
;)
12 Jul 2013 - 10:37 pm | वेल्लाभट
धाग्याचा केवळ 'विषय' वाचून उत्तर देतोय.
सौरव गांगुली हा भारतीय क्रिकेटचा सर्वश्रेष्ठ कर्णधार होय. धोनी, माझ्यामते नाही.
12 Jul 2013 - 10:43 pm | अत्रुप्त आत्मा
असेच काहिसे मत...
गांगुलिने किल्ला बांधला,आणी धोनीने तो बर्यापैकी अभेद्य ठेवलेला आहे...अजुनतरी!!!
12 Jul 2013 - 10:44 pm | विजुभाऊ
धोनीला बाईक्स आवडतात.
बाईक जीपला धडकली तर जीप नदीत उलटून पडते.
धोनी हा सर्वोत्कृष्ठ खेळाडू कर्णधार आहे
12 Jul 2013 - 10:51 pm | अभ्या..
बाईक जीपला धडकली तर जीप नदीत उलटून
पडते.
साक्षीला साक्षी हायेच. ;-)
12 Jul 2013 - 10:55 pm | बॅटमॅन
आणि सर रवींद्र जडेजा हा सर्वोत्कृष्ट खेळाडू आहे.
12 Jul 2013 - 11:13 pm | श्रीगुरुजी
>>> आजवर कोणालाही न जमलेले जबरदस्त winning team spirit निर्माण करून भारतीय क्रिकेटला अत्त्युच्च मानाचे पद मिळवून देणारा कप्तान मात्र काही दिवसापूर्वी match fixing च्या आरोपाखाली संशयाच्या जाळ्यात ओढला गेला होता ................
धोनी हा नक्कीच चांगला कर्णधार आहे. पण ऑस्ट्रेलिया व इंग्लंडमध्ये त्याच्याच नेतृत्वाखाली भारतीय संघाने सपाटून मार खाल्ला. त्यामुळे तो सर्वोत्कृष्ट नक्कीच नाही.
तसेच तो कर्णधार असणार्या चेन्नई सुपर किंग्ज संघाची कामगिरी संशयास्पद आहे. ६ वर्षांत ५ वेळा हा संघ अंतिम फेरीत आला आहे हा योगायोग नाही आणि हा संघ इतरांपेक्षा खूप उत्कृष्ट आहे म्हणून तो अंतिम फेरीत येतो असे तर अजिबात नाही. या संघाच्या मालकाने फिक्सिंगच्या माध्यमातून या संघाला काही वेळा वर आणले आहे या संशयाला नक्कीच जागा आहे.
12 Jul 2013 - 11:14 pm | अग्निकोल्हा
देव करो अन त्याचा परफॉर्मन्स असाच बहरत राहो. स्वतःपेक्षा देशासाठी खेळणार्या भारतिय क्रिडापटुंमधे धोनिचे स्थान फारच वरचे आहे. तो मॅच विनर आहेच, तो कुलही आहे.
13 Jul 2013 - 12:05 am | लीलाधर
करदे होनी उसका नाम है महेंद्रसिंग धोनी :)
13 Jul 2013 - 11:53 am | नितिन थत्ते
गांगुली सर्वोत्तम कर्णधार हे पटते.
पण धोनी बर्याच वेळा संकटमोचकाची भूमिका निभावतो असे दिसते आहे. स्टीव्ह वॉची आठवण यावी असा.
13 Jul 2013 - 2:32 pm | श्रीगुरुजी
धोनी चांगला कर्णधार आहेच पण त्याच्या बर्याच मर्यादा दिसून येतात.
धोनीने ५० षटकांच्या एकदिवसीय सामन्यात खूपच यश मिळविले आहे. देशात व परदेशात तो खूपच यशस्वी आहे. २००८ मध्ये ऑस्ट्रेलियातील तिरंगी स्पर्धेत ऑस्ट्रेलिया हरवून मिळविलेले विजेतेपद, २०११ च्या विश्वचषकातील विजेतेपद, २०१३ मधील चॅम्पियन्स चषक ही काही उदाहरणे.
पण कसोटी सामन्यात तितक्या प्रमाणात तो यशस्वी नाही. ऑस्ट्रेलियात व इंग्लंडमध्ये २०११-१२ मध्ये कसोटी सामन्यात भारताचा दारूण पराभव झाला होता. इंग्लंडने नंतर भारतात येऊन भारताला हरविले होते. भारताला अजून द. आफ्रिका व श्रीलंकेला त्यांच्या भूमीत जाऊन मालिका जिंकता आलेली नाही. भारताने ऑस्ट्रेलियाला नंतर ४-० हरविले ते भारतात. एकंदरीत कसोटी सामन्यात तो फारसा यशस्वी नाही.
२०-२० मध्ये सुद्धा २००७ चा विश्वचषक सोडला तर नंतरच्या सर्व स्पर्धांमध्ये भारताला उपांत्य फेरीत सुद्धा प्रवेश करता आलेला नाही. आयपीएलचा अतिरेक करूनसुद्धा भारताची कामगिरी २०-२० मध्ये फारशी चांगली नाही.
एकंदरीत धोनी एकदिवसीय प्रकारात सर्वाधिक यशस्वी कर्णधार आहे. पण कसोटी सामन्यात व २०-२० मध्ये त्याला अजून तितके यश मिळालेले नाही.
13 Jul 2013 - 3:08 pm | मी-सौरभ
+१
13 Jul 2013 - 2:38 pm | तुमचा अभिषेक
धोनी हा मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये जगातील सर्वोत्तम कर्णधार आहे.
धोनीच्या कर्णधारपदाची तुलना नेहमीच दादा गांगुली बरोबरच केली जाते, जे साहजिकच आहे..
पणमला हि तुलना करायची नाही कारण मी दादा गांगुलीचा फुल्ल स्पीड पंखा असल्याने इथे मला योग्य ते प्रामाणिक मत देता येणार नाही.
13 Jul 2013 - 3:10 pm | मृत्युन्जय
माझे गांगुलीप्रेम लक्षात घेता धोनी सर्वश्रेष्ठ कप्तान नाही असे मी म्हणणे चुकीचे होइल. पण तरीही सर्वश्रेष्ठ कप्तान तर गांगुलीच आहे ब्वॉ. धोनी वाईट आहे असे मात्र नाही आणि आजघडील तो सगळ्यात चांगला पर्याय आहे हे नक्की. आणि एक कप्तान आणि एक खेळाडु म्हणुनही तो मला आवडतो यात काही वाद नाही.
15 Jul 2013 - 9:25 am | बेकार तरुण
मी सहमत आहे. दादा आणि धोनि ज्या परिस्थितीत कप्तान झाले ते पण विचारात घेतलं पाहिजे. दादा च्या वेळि संघ फिक्सिंगच्या गर्तेत सापडला होता आणि इतर कोणिहि तयार नव्ह्ते. तसेच दादाच्या आधि भारतानि परदेशी कसोटी सामन्यात काहि म्हणाविशि कामगिरि केलि नव्हती. दादाच्या संघानि कांगारून्च्या देशात जाउन सरस कामगिरी केलि. तसेच त्यांचा संघ इथे आल असतान स्टीव वॉ ला जे काहि रडवल (नाणेफेकिला उशिरा जाणे, कोट न घालता जाणे, तसेच पन्च बघण्या आधिच नाणे स्वता उचलुन आपण जिंकलो हे जाहिर करणे) ते फार आनंददायी होत. कारण त्या आधि आपण ह्या सगळ्याच्या रिसिव्हिंग एंड ला होतो. दादा नि पाया रचुन दिला आणि धोनिनि कळस.
13 Jul 2013 - 4:04 pm | चौकटराजा
मी गॅरी सोबर्स चा १९६६ साली दौरा भारतात आला होता. तेंव्हा पासून क्रिकेटचा चाहता आहे. थोडाफार अभ्यासक ही.कोणत्याही कर्णधाराला चांगले वा वाईट ठरविण्यापूर्वी बेरजा व परसेंटेज जा खेळ करून चालत नाही. एखाद्या काळात
एखाद्या देशात पराक्रमी खेळाडूंचे पीकच येते. वेस्ट इंडीज ,ऑस्त्रेलिया काही काळ श्रील़ंका ही त्याची उदाहरणे आपल्याला माहीत आहेत. त्याकाळात जो कप्तान असेल तो स्टॅटिस्टिकली यशस्वी होणार यात शंका नाही. खरे तर क्रिकेट हा टीमचा खेळ आहे. अचूक पणे एखाद्याला गोलंदाजी देणे, फलंदाजीत बदल करून तो यशस्वी करून दाखविणे, क्षेत्ररक्षकाना प्रोत्साहित करणे. खेळाडूत आत्मविश्वास निर्माण करणे , खिलाडू वृती जोपासणे , खेळपट्टी खेळाडू हवामान यांच्या बर्या वाईटावर सतत चितन करणे हे कर्णधाराचे काम असते. प्रत्यक्षतः: खेळाडूची खेळाची समज, संयम
फिटनेस यात कितीही वरील सर्व कामे व्यवस्थितपणे करणारा कसबी कप्तान काही बदल करू शकत नाही. कर्णधार व खेळाडू म्हणून धोनी शांत, संयमी, चिंतन शील आत्मविशवासू असून त्याने गांगुलीपेक्षा ही जास्त जबाबदार खेळ्या खेळल्याचे दिसून येते. गांगुलीच्या खेळातली नजाकत मात्र त्याच्या खेळात नाही. पण तो दादा पेक्षा दादा कर्णधार आहे. नुसताच नशीबवान नाही. व नेपोलियन च्या म्हणण्यानुसार योद्धा नशीबवान ही असावा लागतो.
13 Jul 2013 - 7:13 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>> MS Dhoni भारताचा सर्वश्रेष्ठ कर्णधार आहे का ?
नाही. 'लक' त्याच्यासोबत खूप आहे. कालचेच उदाहरण पाहा. गेली दोन सामन्यात बसला होता आणि अंतिम सामन्यात हिरोच झाला. असं अनेकदा झालंय. फलंदाजीची सरासरी फार उत्तम असेल असे वाटत नाही. पण, सामने जिंकायची क्षमता धोनीच्या संघात जास्त आहे.
-दिलीप बिरुटे
13 Jul 2013 - 10:18 pm | श्रीगुरुजी
>>>> नाही. 'लक' त्याच्यासोबत खूप आहे. कालचेच उदाहरण पाहा. गेली दोन सामन्यात बसला होता आणि अंतिम सामन्यात हिरोच झाला. असं अनेकदा झालंय. फलंदाजीची सरासरी फार उत्तम असेल असे वाटत नाही. पण, सामने जिंकायची क्षमता धोनीच्या संघात जास्त आहे.
२०११ च्या विश्वचषकात भारत एकूण ९ सामने खेळला. त्यापैकी उपांत्य फेरीपर्यंतच्या पहिल्या ८ सामन्यात धोनीची फलंदाजी पूर्ण अपयशी ठरली होती. पहिल्या ८ सामन्यात सचिनने २ शतके व २ अर्धशतके, गंभीरने ३ अर्धशतके, युवराजने ४ अर्धशतके, सेहवागने १ शतक व १ अर्धशतक, कोहलीने १ शतक अशी चांगली फलंदाजी केली होती. ६ व्या क्रमांकावर पहिले ६ सामने खेळलेला युसुफ पठाण पूर्णपणे अयशस्वी ठरला होता आणि ७ व्या क्रमांकावरील धोनी देखील पहिल्या ८ सामन्यात अयशस्वी होता.
पण ९ व्या म्हणजे अंतिम सामन्यात सेहवाग ० व सचिन १८ वर बाद झाले. पण धोनी नेमका या सामन्यात चमकला (नाबाद ९१ धावा) व त्यामुळे त्याचे आधीच्या सर्व ८ सामन्यातले अपयश झाकले गेले. याला म्हणतात नशीबाची साथ!
13 Jul 2013 - 10:27 pm | विविवि
धोनीची निर्णय घेण्याची पद्धत खूप वेगळी आहे; याशिवाय त्याला सहकारी खूप चांगली साथ देतात.
13 Jul 2013 - 10:52 pm | श्रीगुरुजी
>>> धोनीची निर्णय घेण्याची पद्धत खूप वेगळी आहे; याशिवाय त्याला सहकारी खूप चांगली साथ देतात.
धोनी एकदिवसीय सामन्यात जितका आक्रमक आहे, तितकाच तो कसोटी सामन्यात बचावात्मक आहे. २०११ मध्ये वेस्ट इंडिजमध्ये ३ कसोटींच्या मालिकेत पहिले २ सामने भारताने जिंकले असताना व तिसर्या सामन्यात सामना जिंकण्यासाठी ५ व्या दिवशी ४६ षटकांत १८० च्या आसपास धावा करायच्या असताना धोनीने सहकार्यांना संथ खेळून सामना अनिर्णित ठेवण्यासाठी (म्हणजेच जिंकलो नाही तरी चालेल पण हरू नका) खेळण्यास सांगितले होते. इतके सोपे लक्ष्य व फारशी प्रभावी गोलंदाजी नसताना भारताने नांगी टाकून विजय हातचा घालविला होता. त्याचे हे बचावात्मक धोरण कसोटी सामन्यात अनेकवेळा दिसून आले आहे.
15 Jul 2013 - 10:01 am | बाळ सप्रे
पहिला एकच सामना भारताने जिंकला होता.. तिसरा हरल्यास मालिका बरोबरीत सुटली असती..
पण १८० साठी प्रयत्न करायलाच हवे होते..
14 Jul 2013 - 3:17 pm | चौकटराजा
भारताचा एक ऑस्ट्रेलियाचा दौरा आठवतो त्यात कर्णधार होता अजित वाडेकर .त्या मालिकेत भारत तीन सामने जिंकू शकला नाही.( मला वाटते त्या वेळी एम एल जयसिंहा हा बदली खेळाडू म्हणून गेला होता.) मी त्यावेळी दौरा संपल्यावर अजित वाडेकरना फोन केला त्यावर वाडेकर म्हणाले " आपले लक कमी पडले सर्व सामन्यात. " म्हणजे लक हा फॅक्टर या वाडेकराना देखील महत्वाचा वाटत होता तर ! cricket is a game of chance !
दोनात मिळविलेली अबू शेवटात घालविली असा मथळा द्यायला भारतीय पत्रकारिता वा माध्यमाना संधी मिळू नये म्हणूनही धोनीने असे धोरण स्वीकरले असेल की !
14 Jul 2013 - 7:55 pm | श्रीगुरुजी
>>> दोनात मिळविलेली अबू शेवटात घालविली असा मथळा द्यायला भारतीय पत्रकारिता वा माध्यमाना संधी मिळू नये म्हणूनही धोनीने असे धोरण स्वीकरले असेल की !
असे वाटत नाही. कारण कसोटीत त्याचे बचावात्मक धोरण इतर काही वेळा दिसले आहे. २०११ च्या द. आफ्रिकेच्या दौर्यात १-१ अशी बरोबरी झाली होती. तिसर्या सामन्यात ५ व्या दिवशी भारताला विजयासाठी अंदाजे ३२५ च्या आसपास धावा हव्या होत्या. आव्हान अवघड होते पण अशक्य नव्हते. सामना जिंकला असता तर द. आफ्रिकेत इतिहासात प्रथमच भारताला मालिका जिंकता आली असती. पण भारत नांगी टाकून खेळला. सलामीचे दोघे फलंदाज व नंतर सचिन व द्रविडने अत्यंत संथ खेळून सामना हरणार नाही व अनिर्णित राहील याची खबरदारी घेतली. सचिनने तब्बल ८६ चेंडू खेळून नाबाद १४ धावा केल्या व इतर तिघांनीही याच वेगाने धावा करून दिवसभरात जेमतेम १५० धावा केल्या. सामना जिंकायचा कणभरसुद्धा प्रयत्न केला नाही. हे कर्णधाराच्या सूचनेशिवाय शक्य नव्हते.
विंडीजविरूद्ध जून २०११ मध्ये अत्यंत संथ खेळ करून ४६ षटकात १८० धावा करून सामना जिंकण्याची संधी पराभवाच्या भीतिने कशी घालविली ते वर लिहिले आहे. एकंदरीत धोनी कसोटीत फारसा धोका पत्करत नाही असं दिसंतय.