गट्टा पुलाव

Primary tabs

रेवती's picture
रेवती in अन्न हे पूर्णब्रह्म
3 Jul 2013 - 3:29 am

राजस्थानी खाद्यमेळाव्यात या आठवड्यात आपण गट्टा पुलाव शिकणार आहोत. जालावरील पाककृती पाहून व मारवाडी मैत्रिणीच्या बहिणीचे सल्ले घेऊन ही कृती बेतलेली आहे.
साहित्य: एक मोठी वाटी बासमती तांदूळ, तूप, पाणी, मीठ, आले, हिरवी मिरची, एक छोटी वाटी डाळीचे पीठ (बेसन), हळद तिखट, बडीशेपेची पूड, धण्याची पूड, गरम मसाला, कांदा, हिंग, दालचिनी, मसाला वेलची, मिरे, लवंग, कढई, व झाकणासाहित पातेले.
कृती: प्रथम तांदूळ धुवून ठेवावेत . अर्ध्यातासाने दुप्पट पाणी, किंचित मीठ व तूप घालून मऊ, मोकळा भात शिजवून घ्यावा. बेसनात तिखट, मीठ चवीप्रमाणे घालावे. एक टेबलस्पून तेलाचे मोहन घालावे. छोटा चमचा बडीशेपेची पूड (बडिशेपेऐवजी ओवाही वापरतात), थोडी हळद, हिंग,धण्याची पूड, गरम मसाला घालून त्यावर एक मोठा चमचा कांदा किसून घालावा. हे सगळे कालवावे. कांद्याला पाणी सुटल्यामुळे मिश्रणाचा गोळा होत येईल पण लागल्यास वरून साधे पाणी शिंपडत घट्ट पीठ भिजवावे. पाव पातेले पाणी गरम करण्यास ठेवावे. त्यास उकळी आल्यावर अर्धा वित लांबीचे शेंगोळे वळून घालावेत. शेंगोळे बोटाएवढे जाड असावेत. पातेलीवर झाकण ठेवावॆ. साधारण सात मिनिटात शिजलेले शेंगोळे पाण्यावर तरंगू लागतात. आच बंद करून शेंगोळे काढून घ्यावेत. शिजल्याची खूण म्हणजे त्यावर बुडबुडे आलेले असतात व रंग पांढरा झालेला असतो. त्याचे पेरभर लांबीचे तुकडे करून घ्यावेत. आता कढईत दोन मोठे चमचे तूप घालावे. गट्टे अगदी अर्धा मिनिट परतून काढावेत. नंतर जिऱ्याची फोडणी करून हळद घालावी . आख्ख्या गरम मसाल्याची पूड, आलं, मिरचीचे तुकडे (काहीजण बरोबरीने लसूणही वापरतात), किसलेलं आलं, तळलेले गट्टे, व मोकळा केलेला भात घालून मीठ घालावे. वरून कोथिंबीर घालावी. हा भात मसालेदार असतो.

a

प्रतिक्रिया

यशोधरा's picture

3 Jul 2013 - 3:50 am | यशोधरा

मस्त लागत असेल हा भात!

स्पंदना's picture

3 Jul 2013 - 4:18 am | स्पंदना

झाकणासहित पातेले.....:))

नविनच ऐकते आहे. एकुण भारतभर साधारण सारखेपणा आहे पदार्थात, पण चव वेगळी! कारण नागपूरकरांचा "वडाभात" खाल्लाय. साधारण तसच असावं.
भात आणि शेंगोळे वेगवेगळे तयार ठेवुन ऐनवेळी फोडणी देउन गरमागरम तयार होत असेल अस वाटतय.
चला आज रात्रीचा मेन्यु तयार. हे लिहितानाच तोंडाला पाणी सुटलय.

सस्नेह's picture

3 Jul 2013 - 6:30 am | सस्नेह

झाकणासहित पातेले....इतकी तपशीलवार पाकृ पाहून आनंद झाला.
मसालेदार दिसतोय पुलाव. उद्या करणार आहे.

उदय के'सागर's picture

3 Jul 2013 - 10:13 am | उदय के'सागर

भाताचा अजून एक नवीन प्रकार समजला, धन्यवाद! प्रकार तरी सोप्पा वाटतोय त्यामुळे बनवून पाहिला जाईल ... :)

आज्जीने बासमती तांदुळावर राजस्थानी पाकॄ चा प्रयोग केलेला दिसतोय ! ;)

स्वाती दिनेश's picture

4 Jul 2013 - 2:21 pm | स्वाती दिनेश

मस्तच दिसतो आहे पुलाव,
स्वाती

सानिकास्वप्निल's picture

4 Jul 2013 - 2:34 pm | सानिकास्वप्निल

पाकृ आवडली :)
गट्टे की सब्जी खाल्ली आहे पण हा पुलाव जास्तं सोप्पा व छान वाटत आहे, करुन बघेन नक्की :)

पैसा's picture

4 Jul 2013 - 4:13 pm | पैसा

सोपा पुलाव आहे आणि झक्कास लागत असणार! फोटो सुंदरच आलाय!

कवितानागेश's picture

6 Jul 2013 - 7:12 am | कवितानागेश

मला करण्यासारखा सोपा वाटतोय. :)

इन्दुसुता's picture

6 Jul 2013 - 9:17 am | इन्दुसुता

पाकॄ आवडली. नक्की करून बघणार.

प्रभाकर पेठकर's picture

6 Jul 2013 - 9:26 am | प्रभाकर पेठकर

कांही साहित्याची प्रमाणे न दिल्याने मनांत गोंधळसदृष परिस्थिती निर्माण झाली आहे. पण पाहीन प्रयत्न करून.
गट्ट्यांमध्ये खायचा सोडा नाही टाकायचा?

त्रिवेणी's picture

6 Jul 2013 - 12:18 pm | त्रिवेणी

गट्टेकी भाजी खुप आवडते. सो पुलाव पण करुन बघेन. भाजीत टाकतो त्याप्रमाणे थोडे(१-२ चमचे दही) टाकून बघेन.

अनन्न्या's picture

6 Jul 2013 - 4:36 pm | अनन्न्या

याच्याबरोबर काय चांगले लागेल? म्हणजे सार, रायते वगैरे.

अनन्या, याबरोबर दह्यातली कोशिंबीर चांगली लागेल.
पॆठकरकाका, प्रमाणे ही अंदाजे घेतली आहेत, आपापल्या आवडीप्रमाणे.
त्रिवेणी, गट्टे करताना दही घातले तरी चालते, किंबहुना घालतातच पण मी कांदा घातल्याने त्यात दही घातले नाही .

गट्टे की सब्जी जशी असते तसाच हा भात पण जबरीच लागणार..

उद्दाम's picture

7 Jul 2013 - 2:25 pm | उद्दाम

http://www.misalpav.com/node/9275

इथे पहा. अगदी डिटेलवार आहे.

स्वाती२'s picture

7 Jul 2013 - 7:56 pm | स्वाती२

मस्त पाकृ! नक्की करून बघेन.

अत्रुप्त आत्मा's picture

7 Jul 2013 - 11:06 pm | अत्रुप्त आत्मा

http://www.sherv.net/cm/emoticons/hungry/super-hungry.png

सुहास झेले's picture

8 Jul 2013 - 2:30 pm | सुहास झेले

मस्त... करून बघण्यात येईल :) :)

प्रभो's picture

8 Jul 2013 - 2:38 pm | प्रभो

:)

प्रतिसादकर्ते व वाचकांचे आभार.

प्यारे१'s picture

11 Jul 2013 - 4:47 am | प्यारे१

आभार मानून झालेत, संपला का भात? :(

छान झाला असणार.

स्वगतः पुढच्या वेळेला वेळेत पातेले (तेच झाकणासकट) आणलेस तरच भात मिळेल बरंका प्यारे.

रेवती's picture

11 Jul 2013 - 4:51 am | रेवती

हे हे हे. संपला बरं का, पण तुम्हाला हवा असल्यास पुन्हा करून द्यायला आमची ना नाही प्यारेभौ!

प्यारे१'s picture

11 Jul 2013 - 4:59 am | प्यारे१

आभार्स. मात्र आपला 'अंतःस्थ' हेतू साफ तर आहे ना? ;)

आतिवास's picture

11 Jul 2013 - 12:30 pm | आतिवास

हा पुलाव बाहेर पण मिळतो का? :-)

हा पुलाव रेस्टॉरंटात कुठे मिळतो हे माहित नाही. मैत्रिणीला या पुलाबद्दल विचारले तर तिने बरेच काही सांगितले. जावई घरी येण्याच्यावेळी गट्ट्यात सुकामेवा घालून करतात. त्याला थोडे वेगळे नाव आहे. कांदा किसून न घालता दही घालतात, पनीर घालून करतात असे प्रकार समजले.

jaypal's picture

11 Jul 2013 - 7:56 pm | jaypal

रंगा रगीला होगया होंगा. हो की नाही ? ;-)
एकदा करायलाच हवा

कुसुमावती's picture

8 May 2014 - 11:17 am | कुसुमावती

*ok*

गट्टेकी सब्जी आवडते आता पुलाव करुन बघायला हवा.

चिंतामणी's picture

30 Jul 2014 - 11:09 pm | चिंतामणी

आज्जे

लै दिवसानी इथ आलो आन हे वाचून त्वांडाला पानी सुटले.

रेवती's picture

31 Jul 2014 - 12:30 am | रेवती

धन्यवाद चिंतुकाका!

मधुरा देशपांडे's picture

31 Jul 2014 - 12:54 am | मधुरा देशपांडे

मस्त. गट्टा पुलाव आवडला.