ITR संबंधी मदत हवी आहे

टवाळ कार्टा's picture
टवाळ कार्टा in काथ्याकूट
22 Jun 2013 - 7:01 pm
गाभा: 

माझा गेल्या वर्षीचा Form-16 रिटर्न फ़ाइल केल्यावर जो ITR मिळतो तो दुसर्याच कोणाच्या नावाचा मिळाला. हा माझा वेन्धळेपणा की ITR घेताना मी नाव चेक नाही केले. (ज्या agent कडे Form-16 दिलेला त्याच्या घोळामुळे माझा ITR दुसर्या कोणाकडेतरी पोहोचला…agent ला विचारले असता त्याने सांगीतले १ वर्षानंतर ITR शोधणे शक्य नाही)
सध्या भावाच्या उच्चाशिक्षणासाठी माझे गेल्या ३ वर्षांचे ITR बैंकेमधे दाखवायचे आहेत.

मिपावर कोणाला या संबंधी माहिती आहे का? आधीच्या वर्षीच्या ITR ची डुप्लिकेट मिळवणे शक्य आहे का?

प्रतिक्रिया

त्याला रिटर्न फाईल करावं लागतं. तुम्हाला इतर कुणाचा आयटीआर फाइव मिळाला तो त्यानं रिटर्न फाईल केल्याचा पुरावा आहे. तुम्ही पेपर रिटर्न फाईल करता असं दिसतायं आणि ते ही अत्यंत फ्रॉड व्यक्तीकडून. तुमचं प्रत्येक रिटर्न तुमच्या इन्कमटॅक्स वॉर्डला उपलब्ध असतं. एक वर्षानंतर आयटीआर फाइव (म्हणजे रिटर्न फाईल केल्याची स्थळप्रत) मिळत नाही असं होत नाही.

तुमच्या ऑफिसमधे चवकशी करून तुमच्या इन्कमटॅक्स वॉर्डला जा आणि ऑफिसरला भेटून मागच्या आयटीआर फाइवची झेरॉक्स मागा. तुमच्या सल्लगारानं रिटर्नच फाईल केलं नसेल तर तुम्हाला ते ही कळेल. (आणि तीच शक्यता आहे)

आदूबाळ's picture

24 Jun 2013 - 10:26 am | आदूबाळ

संक्षींना +१

काही प्रॅक्टिकल सूचना:

१. ऑफिसमध्ये चौकशी कराच, पण वॉर्ड ऑनलाईनसुद्धा शोधून, त्याची प्रिंट घेऊन जा.
वॉर्ड शोधण्यासाठी:
https://incometaxindiaefiling.gov.in/e-Filing/Services/KnowYourJurisdict...
(तुमचा पॅन क्रमांक वापरून)

२. संक्षी म्हणतात त्याप्रमाणे थेट "ऑफिसर"ला भेटा. (बाहेर बसलेल्या कारकुनांना टाळून.) जमलं तर फोन करून अपॉइंटमेंट घेऊन. तुमची निकड सांगा. बँकेत द्यायचं आहे म्हणजे कालमर्यादा असेल. इन्कम टॅक्स ऑफिसरला सांगितलं तर तो भरभर सूत्रं हलवेल.

३. त्या एजंटाची हजामत करा. त्याला सांगा की योग्य आयटीआर देणं ही त्याची जबाबदारी आहे, आणि ताबडतोब हवा आहे. (तुमचे प्रयत्न चालूच ठेवा.)

वॉर्ड शोधण्यासाठी:

= बरोबर.

>इन्कम टॅक्स ऑफिसरला सांगितलं तर तो भरभर सूत्रं हलवेल.

= जवळजवळ प्रत्येक ऑफिसर चांगला असतो (हा अनुभव आहे). आणि आपण प्रोफेशनली वागलो तर समोरच्याची लेवलच उंचावते. उगीच पडीक धोरण किंवा धसका घेण्याचं कारण नाही. एकदम सरळ आणि साधं काम आहे.

>त्या एजंटाची हजामत करा.

= आणि काय झालं ते इथे लिहा, तुमच्या अनुभवाचा इतरांना उपयोग होईल. लोकांना वाटतं इंटरनेट फुकट आहे म्हणजे `वापरा आणि विसरा!'

जवळजवळ प्रत्येक ऑफिसर चांगला असतो (हा अनुभव आहे).

माझापण असाच अनुभव आहे. विशेषतः आय. आर. एस. ऑफिसर्स.

श्रीगुरुजी's picture

24 Jun 2013 - 11:59 am | श्रीगुरुजी

एखाद्या अनुभवी सी. ए. ला भेटून त्याची मदत घेऊन मागील काही वर्षांचे आयटीआर मिळविता येतील.

संजय क्षीरसागर's picture

24 Jun 2013 - 12:12 pm | संजय क्षीरसागर

आहो मला सत्य गवसलं की नाही याबद्दल आधीच पब्लिकला डाऊट आहे. आता तुम्ही तर त्याच्या पुढची पायरी गाठली!

जोक्स अपार्ट, क्वेरी विचारणार्‍या सदस्यानं मात्र कोणताही प्रतिसाद न देता `इंटरनेट मानसिकता' काय आहे याचा डेमो दिला आहे.

टवाळ कार्टा's picture

24 Jun 2013 - 8:04 pm | टवाळ कार्टा

मदतीबद्दल धन्यवाद...सध्ध्या मी परदेशात असल्यामुळे भावाला ई ITO मधे चौकशी करायला सांगीतले आहे

जोक्स अपार्ट, क्वेरी विचारणार्‍या सदस्यानं मात्र कोणताही प्रतिसाद न देता `इंटरनेट मानसिकता' काय आहे याचा डेमो दिला आहे.

कैच्याकै

संजय क्षीरसागर's picture

7 Aug 2013 - 9:41 am | संजय क्षीरसागर

काय झालं पुढे?

टवाळ कार्टा's picture

7 Aug 2013 - 7:36 pm | टवाळ कार्टा
संजय क्षीरसागर's picture

7 Aug 2013 - 8:16 pm | संजय क्षीरसागर

आहो ते उघड आहे. इ -फायलिंग २००७ पासून अस्तित्वात आहे. तुमच्या केसचं काय झालं असा प्रश्न होता?

आणि काय झालं ते इथे लिहा, तुमच्या अनुभवाचा इतरांना उपयोग होईल. लोकांना वाटतं इंटरनेट फुकट आहे म्हणजे `वापरा आणि विसरा!'

टवाळ कार्टा's picture

8 Aug 2013 - 8:50 pm | टवाळ कार्टा

मी या वर्शीच वर्षीच पहिल्यांदा online e-filing केले

पासवर्ड नीट जपून ठेवा.

आता एकदम पुढच्या वर्षीच वापरणार असल्याने लक्षात रहात नाही - विसरतो. (स्वानुभव!)

एक प्रामाणिक शंका - इ-फाईलिंग का केले नाही..?

टवाळ कार्टा's picture

24 Jun 2013 - 8:36 pm | टवाळ कार्टा

य वर्षीपासुन तेच करणार आहे

दिपस्तंभ's picture

18 Jul 2013 - 8:43 pm | दिपस्तंभ

मग हा दुवा उपयुक्त आहे आणि चकटफु...:)

https://www.paytm.com

या वर्षीचे इ फाईलींग मागच्या वर्षीच्या तुलनेत खूपच सोपे होते.

एक्सेल शीट तयार करा - डाऊनलोड करा वगैरे भानगड नव्हती ते बरे झाले.

पिलीयन रायडर's picture

19 Jul 2013 - 4:56 pm | पिलीयन रायडर

एक प्रश्न..
मी आणि नवर्‍याने मिळुन एकत्र होमलोन घेतले आहे. ज्याचा EMI = Principal + Interest असा आहे, पण possession अजुन मिळालेले नाही. possession letter शिवाय Tax Benefit मिळते का?

नवर्‍याच्या कंपनीत दिले आहे , तर माझ्या कंपनीत नाही.. असे कसे ते कळत नाही.
बँके कडुन मिळालेले Tax Certificate पाहुन सी.ए म्हणाला की घेऊ शकता ...
अजुन माहिती काढत आहेच, तरी कुणाला काही माहिती आहे का?

पझेशनपूर्वीच्या प्रिन्सिपलचं मिळत नाही (८०सी). इंटरेस्टचं मिळेल (२४बी), पण या वर्षी नाही; तर पुढच्या ५ वर्षांत समप्रमाणात.

आयकर विभागाचं हे उपयुक्त प्रकाशन पहा:
http://incometaxindia.gov.in/Archive/House_Property_18062012.pdf

तुमचा सीए असं का म्हणतोय कळायला मार्ग नाही.

पिलीयन रायडर's picture

19 Jul 2013 - 7:04 pm | पिलीयन रायडर

सीए तर जाऊच द्या हो, साक्षात कंपनीने ह्याच वर्षी आयकरा मध्ये सुट दिली आहे नवर्‍याला. मी हाच नियम सांगत होते पण त्याच्या फोर्म १६ मध्ये तर दिसतेय सुट दिलेली..
काही कळत नाही..
परत एकदा नीट वाचते..

सार्थबोध's picture

7 Aug 2013 - 9:48 am | सार्थबोध

इथे देखील भरू शकता

https://incometaxindiaefiling.gov.in/