लहानपणी एक दोन तीन चार शिकताना आकड्यांशी झालेली ओळख पुढे इतकी घट्ट होते की आपल्या रोजच्या जीवनात या आकड्यांशिवाय पानही हलत नाही....घड्याळातील आकडे, टिव्हि च्या रिमोट वरील आकडे, मोबाईल वर आकडे, पगाराचे तसेच बिलाचे आकडे....एक ना दोन (परत आकडेच)
अभिजितचं 'म्हणी मॅटर्स ' वाचलं आणि एकदम डोक्यात आलं - आपल्या भाषेत आकड्यांचेही कितीतरी वाक्प्रचार आणि म्हणी आहेत.
पुराण, धर्मग्रंथ, इतिहास, साहित्य , बोलीभाषा ,चालीरिती वगैरे मध्ये डोकावले तर आकड्यांचा शब्दांशी घातलेला मेळ दिसून येईल.
बर्याच आकड्यांना काही ना काही महत्व आहे आणि त्या गोष्टी त्या आकड्यांमध्येच बसतात. उदा. जेवायला नाही म्हणणार्याला आपण 'जरा दोन घास खा' असे म्हणू तिथे तीन घास , पाच घास असा शब्दप्रयोग वापरत नाहीत.
अगदी शून्यापासून सुरवात करता येईल.
शून्यातून विश्व निर्मिती
एकाक्षरी मंत्र - ओम
दोनाचे चार हात
तिन्ही त्रिकाळ , त्रिनेत्र, पळसाला पाने तीन, त्रिगुण,त्रिभुवन
चार्तूमास
पंचपात्र , पंचेंद्रिय
षटकार, षड्रिपू
साता समुद्रापार, सप्तनद्या , सात वार, साता जन्मी
साडेसाती
अष्टांग, 'अष्टपुत्र सौभाग्यवती भव', अष्टविनायक
नवरस, नव्याचे नऊ दिवस, नवग्रह, नवरत्ने
दशावतार, दशानन
११ प्रदक्षिणा
१२ राशी , बारमाही
तीन तेरा वाजणे
चौदावं रत्न
सोळा सोमवारचं व्रत
अठराविश्व दारिद्र्य
गणपतीला एकवीस मोदक, अर्थवशीर्शाची २१ आवर्तने.
गद्धे पंचविशी
सत्तावीस नक्षत्र
बत्तीशी , 'सिंहासन बत्तीशी '
३६ चा आकडा , पत्रिकेतील ३६ गूण
चाळिशी (चष्मा) लागणे
एकसष्ठी
विष्णुसहस्र नाम
अशा अजून काही आकड्यांमध्ये बसणार्या गोष्टी तुम्हाला माहित असल्यास जरूर लिहा.
प्रतिक्रिया
14 Sep 2008 - 3:16 pm | गारंबीचा बापू
एकसष्ठ- बासष्ठ
14 Sep 2008 - 5:03 pm | चंबा मुतनाळ
69
14 Sep 2008 - 8:33 pm | गोविंदराव
बापू
तू सुधारणार नाहीस हो.
गोविंद कृष्णाजी पटवर्धन
14 Sep 2008 - 3:32 pm | वेलदोडा
सप्तपदी
१२ वर्षाची तपःश्चर्या
'युगे २८ विटेवरी उभा ' - विठ्ठलाची आरती
14 Sep 2008 - 3:35 pm | प्रभाकर पेठकर
बावन्नकशी सोनं
सत्राशेसाठ विघ्न
साठी बुद्धी नाठी
एखाद्याची 'षष्ठी' करणे
सटी सहामासी
चतुर्वैक्ष सत्यम
चातुर्मास
तेहतीस कोटी देव
दशदिशा
तिन्ही त्रीकाळ
तिन्ही लोक
सप्तपदी
शेरास सव्वाशेर
बापसे बेटा सवाई (सव्वापट जास्त)
14 Sep 2008 - 3:53 pm | ब्रिटिश टिंग्या
एक शष्टांश गोरेपण ;)
द्विभार्या
तिन्हीसांजा
चतुर्थी
पंचमहाभुते
षोडोपचार
सप्ताह
अष्टकोन
नऊवारी
दशमस्थानीचा ग्रह
14 Sep 2008 - 4:08 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
ऐशी तिथे पंच्याऐंशी!
(एक षष्ठांश विक्षिप्त) अदिती
14 Sep 2008 - 5:29 pm | अवलिया
तुझी शंभरी भरली रे पक्या
नाना
15 Sep 2008 - 9:28 pm | पक्या
शंभरी तरी नाही भरली अजून्...पण वरचे काही प्रतिसाद बघता पाचावर धारण मात्र बसली.
14 Sep 2008 - 7:40 pm | विनायक प्रभू
http://vipravani.wordpress.com/
६९ च्या उलट ९६
वि.प्र.
14 Sep 2008 - 8:11 pm | प्राजु
पंचामृत
सप्तस्वर
अष्टबाहू
नव्याचे नऊ दिवस
दहा तोंडी रावण
दो आँखे बारा हात
तेरावं घातलं
सतरा भानगडी
अठरा विश्वे दारिद्र्य
एकवीस दुर्वा
१२ महिने ३० दिवस
चाळीशी
अब तक छपन्न
छपन्न टिकली
साठी
पंचाहत्तरी
शेकडा
१०१ आवर्तने
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
14 Sep 2008 - 8:13 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
>> छपन्न टिकली
हे बाकी भारीच! =))
15 Sep 2008 - 12:09 am | ईश्वरी
चातुर्वर्ण
पंचक्रोशी
अष्टभुजा देवी
१२ ज्योतीर्लिंग
पंधरवडा
षोडशा
शताब्दी
ईश्वरी
14 Sep 2008 - 8:26 pm | यशोधरा
पळसाला पाने तीन
तेरड्याचा रंग तीन दिवस
तीन तिघाडा, काम बिघाडा
चांडाळ चौकडी
14 Sep 2008 - 8:30 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
चांडाळ चौकडी कोणती, जालावरची? ;-)
14 Sep 2008 - 8:36 pm | गोविंदराव
चाळीशी, पन्नाशी, साठी बुद्धी नाठी, एकसष्ठी, सत्तरी, पंच्याहत्तरी, सहस्रचंद्रदर्शन, पंचविधामैत्री, नवरत्न, नवग्रह,
अजून बरेच शब्द आहे. स्मरल्यास लिहितो.
गोविंद कृष्णाजी पटवर्धन
15 Sep 2008 - 1:21 am | सैरंध्री
पंचखाद्य (जे ड्रायफ्रूट्स वापरून करतात ते)
दहावा (मृतात्म्याचा विधी)
सप्तर्षी
बाराखडी
सोळा आणे सत्य
सैरंध्री
Painting is poetry that is seen rather than felt,
and poetry is painting that is felt rather than seen. -- Leonardo da Vinci
15 Sep 2008 - 9:39 am | ऋचा
पाचवारी
दशमग्रह (जावई)
बारा गावच पाणी प्यालेला
अष्टावक्र
"No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"
15 Sep 2008 - 9:39 am | अनिल हटेला
बाराचं ......................
लाखाचे बारा हजार.............
बारा भानगडी.................
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
15 Sep 2008 - 11:41 am | वेलदोडा
अजून काही ---
चारी मुंड्या चीत (चार मुंड्या कशा काय?)
सोळा संस्कार
९६ कुळी मराठा (असं ९६ आडनिडं का? १०० का नाही ?)
शतकोटी प्रणाम
15 Sep 2008 - 1:06 pm | विसुनाना
पावणे आठ
बारा
;)
15 Sep 2008 - 9:48 pm | प्रकाश घाटपांडे
आमचे आकडेशास्त्री इथे वसतात.
प्रकाश घाटपांडे
15 Sep 2008 - 10:13 pm | श्रीकृष्ण सामंत
एकदां दोन म्हणे एकाला
आहेच मी तुझ्या पेक्षा मोठाला
ऐकून हे वाटे तीनाला
माहीत नाही का एक आणि दोनाला
मीच आहे त्यांच्या पेक्षा मोठाला
दोन शिंगी चार होता आपल्या घरात
हे संभाषण गेले त्याच्या कानात
ओरडून तो म्हणाला वरच्या आवाजात
ऐकल कारे एक दोन आणि तिना
पांच सहा सात आठ आणि मीना
कबूल झालो आहे नऊना
तेच आहेत आमच्या पेक्षा मोठे
शून्य बिचारा कोपऱ्यात होता बसून
ऐकून सारे आले त्याला भरभरून
स्वतःशीच म्हणाला
ठाऊक नाही त्यांना माझी किंमत
घेऊन मला शेजारी,जेव्हां
एखादा दाखवील हिम्मत
वृद्धि होईल त्याची कळत नकळत
सूर्य,चन्द्र,ताऱ्यांचा आहे
माझ्या सारखा आकार
पण सांगतात का ते कधी
आमचाच आहे सर्वांवर अधीकार
नको स्वतःची शेखी मिरवूं
चढावर वरचढ असतो छपून
करा बेरीज अथवा गुणाकार सगळे मिळून
त्यामूळे
घ्याल तुम्ही तुमची किंमत वाढवून
लागू नका भागाकार वा
वजाबाकीच्या नादाला
लागेल ग्रहण तुमच्या किंमतीला
एकाने केली तक्रार शून्याकडे
नाही उपयोग माझा
करताना गुणाकार वा भागाकार
त्यावर
शून्य म्हणाला त्याला
करशील तूं वृद्धि बेरीज करताना
नंतर
शून्य पुसतो एकाला
आहे का माझा उपयोग
बेरीज करताना
खोड मात्र मोडतो मी
गुणाकार करताना
तात्पर्य काय?
म्हणे शून्य ईतर आकड्याना
कमी लेखू नका कुणा
वेळ आली असताना
शून्यसम आकडाही
होत्याचे नव्हते
करतो सर्वाना
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com
16 Sep 2008 - 8:49 am | प्रकाश घाटपांडे
जो तो आपल्या जागी मोठा . सुंदर काव्य.
प्रकाश घाटपांडे
16 Sep 2008 - 10:27 am | मनीषा
तीन तेरा
पहिले पाढे पंचावन्न
सत्राशे साठ
नव्याचे नउ दिवस
अष्टपदी
सप्तक
पाचामुखी परमेश्वर
दशावतार
नवग्रह
चौक
चारचौघे /चारचौघी
पंचपाळ
एकेरी , दुहेरी
18 Sep 2008 - 8:29 pm | भास्कर केन्डे
आमच्या आजोबांनी लहानपणी शिकवलेले...
गुढी पाडवा एकाचा
तुकाराम बीज दोनाचा
अक्षय तृतीया तिनाचा
गणेश चतुर्थी चाराचा
नागपंचमी पाचाचा
चंपा षष्ठी सहाचा
रथसप्तमी साताचा
कालाष्टमी आठाचा
राम नवमी नवाचा
विजया दशमी दहाचा
आषाढी एकादशी आकराचा
कार्तिकी द्वादशी बाराचा
धनत्रयोदशी तेराचा
नरक चतूर्थी चौदाचा
हनुमान जयंती पंधराचा
आपला,
(भटजी) भास्कर
आम्ही येथे वसतो.
18 Sep 2008 - 8:31 pm | चतुरंग
लक्षात ठेवायला किती सोपे आणि सुंदर आहे! :)
चतुरंग
18 Sep 2008 - 10:21 pm | पक्या
>> नरक चतूर्थी चौदाचा
चतुर्दशी हवे. चतुर्थी नव्हे .
बा़की लक्षात ठेवायला मस्तच