काल बायकोने ठाण्याहून खर्वस मागवला होता... रात्री टी.वी . पहाता पहाता तो आम्ही चापला.
"कसा मस्त आहे की नाही ?"
हो ....छान आहे.दुधात जिलेटिन घालून केलेला "चिक" व त्यापासून बनवलेला खरवस मी पहिल्या चम्च्यात ओळ्खला होता . पण बयाको समोर हो ....छान आहे आसे म्हणावे लागले.
आमच्या गोठ्यात ( एके काळी ) वर्षाला ४ /५ म्हशी वीत असत. आणि मग खरवस , नासकोणी , खरवसाची बर्फी असे विविध प्रकार आई / आजी करत असत.
हे खरवस बनवणारे रोज २०० /२५०किलो खरवस बनवतात. तो दादर पर्यन्त अनेक "हाटेलात" पुरवतात.
आता विचार करा , २०० कि. खरवस बनवायला किमान १०० कि. चीक हवा > त्यासाठी कमीत कमी ५० म्हशी व्यायला पाहिजेत > त्यासाठी किमान ५००० म्हशी गोठ्यात हव्या. असे अनेक खरवस वाले मुंबापुरीत आहेत. मला तरी हे केवळ अशक्य वाट्ते.....एवध्या म्हशी बाळगण्या परीस तो गोठ्याची जागा विकून बक्कळ पैसा कमवेल.
थोडा विचार +विचारपुस करता " जिलेटिन " + दुध = खरवस हा फॉर्मुअला समजला.
बाटली बंद " लोणची " आणि त्यावर तरंगणारे तेल पाहून मला असाच संशय आला. गोडेतेलाची किंमत , लोण्च्यामधील तेलाचे प्रमाण व लोण्च्याची किंमत ह्याचा मेळ लागेना......
दोन चार ठिकाणी चापापणी केली . मग ऊलगडा झाला. " लोणच्या मध्ये वापरले जाणारे तेल गोडेतेल ( शेंगदाणा) नसून सरकीचे (कापुस बी )आसते.
बाजारात लस्सी प्यायची म्हट्ले की मला आठवण होते "सायट्रिक आसिड " ची . ब्लोटिंग पेपर + सायट्रिक आसिड = फक्कड लस्सी.
हेच सायट्रिक आसिड दूधाच्या भुकटी बरोबर आले की "छास " तय्यार. ताक प्यायल्यावर जिभेवर कडवट आंबट चव राहिली कि ओळखा ही सायट्रिक आसिड ची कमाल.
हे सायट्रिक आसिड / चुन्या बरोबर " पाणी-पुरी " मध्ये सापड्ते. चुना मिर्ची म्हणून न सायट्रिक आसिड चिंच म्हणून आपण पितो .....भैय्यजी थोडा पानी ऑर्.....कारण ही दोनिही रसायने मिर्ची व चिंचे पेक्शा खूप स्वस्त आहेत.
ऊसाचा रस ऊन्ह्ळ्यात चांगला . पण काही "कलाकार" ह्यामध्ये "सॅकरिन " वापरतात्..... थोढ्या रसात भरपूर पाणी +सॅकरिन = भरपूर रस व भरपूर नफा.पण ह्यचा वापर एवढा सर्रास नाही.
टोमॅटो सॉस केवळ "भोपळ्या पासून " बनवतात म्हणुनच हॉटेलातून बाटल्या भर्भरून ठेवलेला असतो व परवडतो .
नेस्ले / एच्.एल्.एल. इ. कंपन्या टोमॅटो सॉस टोमॅटोपासून बनवत असतील ही...
ही थोडी झलक.
एक चुना सोड्ल्यास ह्यामधील कोणतीही भेसळ शरीरास विशेष हानी कारक नाही. फक्त फसवणुक आहे .
शरीरास विशेष हानी कारक भेसळी विषयी परत केंव्हा तरी .
तो पर्यन्त " वडापावाच्या" लसूण चट्णीत " लाकडाचा नारळ /खोबरे / शेंगदाणा व समप्रमाणात लाकडाचा भुसा / बारीक केलेला पुठ्ठा नाही ना ? एवढी खात्री करा झाले.
एका खरवसाचे हे स्फुरण.....
प्रतिक्रिया
4 Aug 2010 - 7:39 pm | चिरोटा
जीवन भेसळमय झाले आहे खरे.
अवांतर-भेसळीचा संबंध स्वयंपाक न करण्याशी कोणी लावला नाही म्हणजे झाले!!
--
4 Aug 2010 - 7:44 pm | विकास
एकदम मस्त माहीती. पाणिपुरीतील चुना-सायट्रीक अॅसिड हा प्रकार नवीनच आहे. आपण आपली प्रतिकारशक्ती वाढवतो असा (गोड गैर) समज करून खायचे झाले. :(
अमेरिकेत (आणि कदाचीत इतरत्रही) वेगवेगळ्या प्रकारचे रंगीबेरंगी तयार खाद्यपदार्थ बनवताना कोचिनील आणि कार्माईन नावाचे दक्षिण आणि मध्य अमेरिकेतील किडे चिरडून वापरतात. खाली कोचिनील किडा दाखवला आहे:
त्यातून तयार होणारा रंग स्ट्रॉबेरी योगर्टमधे किती मस्त दिसतो की नाही! ;)
शिवाय नंतर कंपन्या म्हणायला मोकळ्या हा "all natural product" आहे म्हणून!
गंमत म्हणजे अमेरिकेतील तयार खाद्यपदार्थ आणि औषधांचे नियंत्रण करणारे फूड अँड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशन तयार खाद्यपदार्थांच्या लेबलवर त्यातील अनेक गोष्टी जाहीर करायचे बंधन घालते पण हे किडे आहेत हे सांगायचे बंधन मात्र घालत नाही. हे पदार्थ येथील प्रत्येकानेच कधीनाकधी खाल्लेले असल्याने, इथल्या लोकांच्या डोक्यात असतात का ते माहीत नाही, पण पोटात नक्कीच किडे असतात! ;)
4 Aug 2010 - 7:54 pm | रेवती
आईग्ग! आता मुलाला हे दाखवतेच!
ग्रोसरी स्टोअर मध्ये गेल्यावर लहान मुलांना आकर्षून घेणारे रंगीबेरंगी योगर्टाचे डबे पाहिले कि मलाच मळमळते. एका योगर्टात तर एका डबीत दोन रंग असतात. त्यात निळा, गुलाबी, हिरवा असे रंग असतात. कितीवेळा मुलाला सांगून झाले याबद्दल!
5 Aug 2010 - 1:56 am | आमोद शिंदे
किड्यांच्या पासून बनवलेला रंग प्रयोग शाळेत निर्मिलेल्या घातक रसायनांपेक्षा चांगला नाही का?
15 Sep 2010 - 7:01 pm | Arun Powar
इथल्या लोकांच्या डोक्यात असतात का ते माहीत नाही, पण पोटात नक्कीच किडे असतात!
कोणास ठाऊक, ते लोक डोक्यातले किडेसुध्दा पदार्थात घालत असतील..!!!
जो जे पचवेल तो ते खावो, प्राणीजात||
4 Aug 2010 - 7:50 pm | रेवती
ही फसवणूक आहेच. धान्यामधे मिसळलेले खडे, लावलेल्या पावडरी असेही प्रकार आहेत.
लाल तिखटात रंगवलेला लाकडाचा भूस्सा असतो. धान्यातली भेसळ कशी ओळखायची त्याचे एक पुस्तक भारतात माझ्याकडे आहे.
चार महिन्यांपूर्वी ज्या नावाचे केशर आतापर्यंत वापरत होते तेच घेतले तर त्यात फसवणूक पदरी आली. पदार्थात केशर घातल्यावर स्वाद लगेच येतो पण रंग येण्यास थोडा वेळ जावा लागतो. या केशराचे तंतू अतोनात लांब आहेतच पण वास तर घमघमत असतो. पदार्थाचा रंग घातल्यापासून दोन सेकंदात पिवळसर केशरी न होता भगवा होतो. बरे, केशर हा प्रकार असा सारखा वापरून संपवण्याचा नसल्याने आता बरेच दिवस वापरावा लागणार आहे.
4 Aug 2010 - 7:59 pm | गणपा
बरीच नवी माहिती मिळाली.
4 Aug 2010 - 8:08 pm | लिखाळ
छान.. माहितीपुर्ण.
हॉटेलातली नारळाची चटणी तेल काढून झालेल्या नारळाच्या केकची असते ऐकले आहे. हॉटेलातल्या पुन्हा पुन्हा तापवलेल्या तेला विषयी इथेच बहुधा चर्चा झाली होती.
विकास यांनी दिलेली माहिती तर अवाक् करणारी.
जिलेटिन प्राणिज आहे ना? म्हणजे प्राण्यांच्या चरबीपासून बनवतात ना? जीलेटिन आईस्क्रिम मध्ये सुद्धा वापरतात असे ऐकले आहे. अशा (प्राणिज / जीलेटिनयुक्त) पदार्थांवर तो हिरवा ठिपका (व्हेज फुडचा) असतो का?
5 Aug 2010 - 1:58 am | आमोद शिंदे
>>हॉटेलातली नारळाची चटणी तेल काढून झालेल्या नारळाच्या केकची असते ऐकले आहे.
मग त्यात भेसळ काय? उलट फॅटफ्री चटणी झाली की. खोबरेल तेल अति प्रमाणात तब्येतीस चांगले नव्हे.
>>हॉटेलातल्या पुन्हा पुन्हा तापवलेल्या तेला विषयी इथेच बहुधा चर्चा झाली होती.
पुन्हा पुन्हा तापवलेले तेल आरोग्यास हानिकारक असल्याचे काही संशोधन झाले आहे का?
5 Aug 2010 - 4:39 am | विकास
पुन्हा पुन्हा तापवलेले तेल आरोग्यास हानिकारक असल्याचे काही संशोधन झाले आहे का?
Reheating Vegetable Oil Releases Toxin: Study
4 Aug 2010 - 8:09 pm | मराठमोळा
कोणत्या गोष्टीत भेसळ/फसवणुक नाही सांगा. सगळीकडेच आहे.
धान्यात त्या त्या रंगाचे खडे, मिरीमधे पपईचं बी, मसाल्यात घोड्याची लीद, तिखटात वीटकरीची पावडर, दुधात युरिया,
गुलाबजाममधे उकडलेला बटाटा, वॅक्स लावलेलं सफरचंद, कृत्रीम पद्धतीने रंग आणलेली गाजरे, बनावट बीयर्/दारु, द्युप्लीकेट मिनरल वॉटर ई.ई. असंख्य उदाहरणे आहेत.
एका ठिकाणी मिसळ चविष्ट/झणझणीत लागावी म्हणुन त्यात सुकट पावडर आणी चुना टाकायचे.
बेंगलोरात मी काही काळ रहात होतो तिथे (हेब्बाल फ्लायओव्हर) थोड्याच अंतरावर बोकड्/मेंढीच्या मटणाच्या नावावर कुत्र्याचे मटण विकण्याचे प्रकार चालु होते, कुत्रे कमी कसे होत आहेत यावरुन पोलिसांना संशय आला आणी हे वीर सापडले.
काय करावं कळत नाही? :(
4 Aug 2010 - 8:12 pm | लिखाळ
ह्म्म ! ऐकावे ते नवलच.
4 Aug 2010 - 8:22 pm | गणपा
मेरे मन को भाया मै कुत्ता काट के खाया असा काहीसा डायलॉग आहेना 'चायना गेट' चित्रपटात.
इथे नायजेरियातही औषधालाही कुत्रं शोधुन सापडत नाही.
(कुत्र्या पासुन कुठले औषध तयार होते विचारु नका. ती एक फ्रेज (मराठी ?) आहे.)
.
4 Aug 2010 - 8:34 pm | इन्द्र्राज पवार
"मसाल्यात घोड्याची लीद"
तुम्ही केलेले हे वर्णन ऑगस्ट २०१० सालातील आहे. पण सन १९६८ साली (म्हणजे चक्क ४२ वर्षापूर्वी) आलेल्या "नीलकमल" या वहिदा-मनोज-राजकुमार अभिनित चित्रपटात मेहमूदच्या तोंडी मन्ना डे यांचे "खाली डिब्बा, खाली बोतल ले ले मेरी जान..." असे भेसळीवर गाणे आहे. त्यात एका ठिकाणी "क्यूं लेता है तू, गरम मसाला लीद भरा हो.....!!!" असे नेमके वाक्य आहे.
परिस्थितीत अक्षरश: काहीही फरक नाही.
4 Aug 2010 - 8:38 pm | प्रभो
>>तुम्ही केलेले हे वर्णन ऑगस्ट २०१० सालातील आहे
१९९९ मधे १०वी मधे पण शिकवलं होतं आम्हाला हे... भेसळ आहे का नाही ह्याचं प्रात्यक्षीक असायचं त्यासाठी.. :)
5 Aug 2010 - 4:39 am | शिल्पा ब
कुत्र्याचे मटन ? विश्वास बसत नाही... भयानकच म्हणायचं ... आणि लीद वगैरे मला माहिती नव्हतं ... वर कुठेलेसे किडे वापरतात ते सुद्धा माहिती नव्हतं...
मी बाहेरून फारसे काही रेडीमेड आणतच नाही...आणि आणले तरी शक्यतो प्रत्येक गोष्ट घेताना लेबल वाचूनच घेते ... पण जर त्यावर लिहिलेच नसेल आणि अशी भेसळ असेल तर काय करणार? शक्यतो इंटरनेटच्या माध्यमातून माहिती मिळवायचा प्रयत्न करते...खबरदारी म्हणून... organic पदार्थ शक्यतो वापरते... पण हल्लीच कुठेतरी वाचलं का टी व्ही वर पाहिलं कि organic लिहिलेले पदार्थ सुद्धा तसे असतीलच असे नाही..
4 Aug 2010 - 8:16 pm | नितिन थत्ते
काही गोष्टींना भेसळ म्हणायचे की नाही याबद्दल शंका....
मँगो आइसक्रीम हे बर्याचदा पपईचे असते. आणि आंबा फ्लेवरपुरता असतो. आता याला भेसळ म्हणावे का हे कळत नाही.
हल्लीच कळलेली बातमी म्हणजे स्किम मिल्क पावडर, मैदा आणि वनस्पती (डालडा) एकत्र भाजून बनवलेला 'खवा'. (मी सध्या जिथे आहे ते असा खवा बनवत नाहीत पण बाजारात असा खवा असतो हे मला तिथे कळले).
धान्यातले खडे ही भेसळ नसून धान्य वेगळे करण्याच्या जागेवरील हाउसकीपिंगचा प्रॉब्लेम असतो असे माझे मत आहे. पोतंभर धान्यात वाडगाभर खडे मुद्दाम मिसळले जातात यावर विश्वास बसत नाही. नॉट वर्थ द एफर्ट.
4 Aug 2010 - 8:26 pm | गणपा
थत्ते साहेब अहो पोतभर धान्यात वाडगाभर खड्याने फरक पड्त नाही म्हणता, पण १०० पोत्यांमागे २-४ पोती खडे मिक्स केले तर? आणि विश्वास ठेवा हे अस होत ही.
4 Aug 2010 - 8:29 pm | मेघवेडा
धान्यात २-४% खडे? कठीण वाटतं..
4 Aug 2010 - 8:31 pm | प्रभो
२-४% कमी आहे ना जरा?? ;)
4 Aug 2010 - 8:42 pm | गणपा
दाता खाली खडा येउ नये म्हणुन कमी म्हणालो.
गुगलंल असत तर कदाचीत खरा % कळलाही असता. पण तेवढा धीर आहे कुणाकडे?
4 Aug 2010 - 11:20 pm | कानडाऊ योगेशु
जो पर्यंत धान्य धान्यासारखे दिसते आणि खडे खड्यासारखे दिसतात तो पर्यंत ठिक आहे.पण धान्यासारखाच खडा जेव्हा असतो आणि तो जेवतानाच नेमका दाताखाली येतो तेव्हा त्याला भेसळ म्हटल्याशिवाय राहवत नाही.शेंगदाण्यांमध्ये हुबेहुबे शेंगदाण्यांसारखे दिसणारे खडे पाहीलेले/चावलेले आहेत.एक दोनदा तर असा खडा दाताखाली आल्यानंतर दात हलायला लागला होता.
4 Aug 2010 - 8:48 pm | असुर
>>>काल बायकोने ठाण्याहून खर्वस मागवला होता
तात्यांच्या ठाण्यात भेसळ.. हे हे हे हे!!!
तात्यांच्या ठाण्यात भेसळ???? सिपाहियो...
--असुर!
4 Aug 2010 - 9:02 pm | गणपा
भेसळीवर गुगलताना हे मिळालं.
4 Aug 2010 - 9:32 pm | असुर
एक नंबर माहिती!!!
गणपा भौ, धन्स!!!
-असुर
5 Aug 2010 - 1:31 pm | तिमा
११ नंबरमधे 'डायक्लोरिक अॅसिड' म्हणजे काय ते कळले नाही.
31 May 2013 - 12:46 am | पिवळा डांबिस
तिथं 'हायड्रोक्लोरीक अॅसिड' असं हवं...
:)
5 Aug 2010 - 12:05 am | हुप्प्या
बातमी पाकिस्तातली आहे पण हे भारतातही होत असेल ह्याची खात्री आहे. प्राण्यांचे मृतदेह (त्यात कुत्रे, उंदीर, गाढव, गुरेढोरे, डुकरे हे सगळे येतात) जमवून त्यावर प्रक्रिया करून त्यातील चरबी काढून त्याची विक्री करणे. मग मिठाया व अन्य स्वस्त तळलेला माल बनवायला हेच चरबी म्हणून वापरले जाते.
हे वाचून शहारे आले. तेव्हा रस्त्यावरील तळलेल्या गोष्टी खाताना जपून. कदाचित फरसाण व अन्य तळीव पदार्थात काही प्रमाणात हा पदार्थ वापरला जात असेलही. स्वस्त असल्यामुळे कुणाही उत्पादकाला ह्याचा मोह होणे शक्य आहे.
अमेरिकेत गेल्या ३० वर्षात जवळजवळ सगळे गोड पदार्थ बनवताना साखर न वापरता मक्यापासून विविध रसायने घालून, प्रक्रिया करून बनवलेला पाक (हाय फ्रुक्टोज कॉर्न सिरप) वापरतात. गोळ्या, चॉकलेटे, योगर्ट, ग्रॅनोला बार हे गोड पदार्थ आहेतच शिवाय मांस, पाव, औषधे ह्यातही हा पाक घुसखोरी करतो. पेप्सी, कोक, अन्य प्यायच्या कँड्या (ज्याला ज्यूस समजतात!) ह्यातही हा पदार्थ मोठ्या प्रमाणात असतो. ही सरकारमान्य भेसळ आहे. मक्याच्या शेतकर्यांची एक जबरदस्त ताकदवान लॉबी असल्यामुळे हे होते. करदात्यांच्या खर्चाने मक्याच्या शेतकर्यांना मोठी सबसिडी दिली जाते आणि मग मक्याचे अफाट उत्पन्न होते आणि असले पदार्थ वापरणे स्वस्त पडते.
तमाम डॉक्टरांच्या मते इतके कॉर्न सिरप पोटात जाणे घातक आहे. त्याने कुठलासा डायबेटिस होण्याची शक्यता कित्येक पटीने वाढते. पण नजिकच्या काळात ह्यात बदल होणे नाही.
5 Aug 2010 - 1:55 am | आमोद शिंदे
हुप्या तुम्ही अर्धवट माहितीवर छातीठोक प्रतिसाद दिला आहे.
>>तमाम डॉक्टरांच्या मते इतके कॉर्न सिरप पोटात जाणे घातक आहे. त्याने कुठलासा डायबेटिस होण्याची शक्यता कित्येक पटीने वाढते.
असे काहीच सिद्ध झालेले नाही. कॉर्न सिरप आणि लठ्ठपणावर बरेच संशोधन झाले आहे पण त्यातून काहीच ठोस अनुमान निघालेले नाही.
5 Aug 2010 - 3:59 am | हुप्प्या
अर्धवट माहिती वगैरे काही नाही
प्रिन्स्टन विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी हे सप्रमाण सिद्ध केले आहे
http://www.princeton.edu/main/news/archive/S26/91/22K07/index.xml?sectio...
मक्याच्या पाकावर पोसलेले उंदीर इतर उंदरांपेक्षा कितीतरी लठ्ठ बनले. हा मार्च २०१० चा निष्कर्ष आहे.
गुगल केले तर अजून खूप प्रयोग सापडतील.
मका लॉबीने अशा प्रयोगांना प्रत्युत्तर म्हणून काही शास्त्रज्ञ लोकांना हाताशी धरून काही उलटे दावे केले आहेत. पण त्यांनी आपले हितसंबंध विचारात घेऊन लोकांना ते निष्कर्ष काढायला भाग पाडले आहे. प्रिन्सटनच्या प्रयोगात अमुक एक सिद्ध करायचेच असे ठरवून प्रयोग केले नव्हते त्यामुळे त्यांचे तटस्थपणे काढलेले निष्कर्ष जास्त ग्राह्य मानले पाहिजेत.
अमेरिकेत मक्यावर अफाट संशोधन झाले आहे. त्याचे मूळ रूप जेनेटिक इंजिनियरींग वापरून पार बदलले आहे. नैसर्गिक मका हा प्रोटिन आणि पिष्टमय पदार्थ दोन्ही बाळगून असायचा. पण हव्यासापोटी आता बनणारा मका हा जास्तीत जास्त पिष्टमय असतो. तण मारण्याकरता जो विषाचा फवारा मारतात त्याला तोंड देण्याकरताही ह्या मक्यात बदल केले गेले आहेत. एकंदरीत मका ह्या पिकाचे रुप पार बदलले आहे. ऊस वा अन्य साखरेचे स्रोत हे इतक्या प्रमाणात अभियंत्रित आहेत का? माझ्या माहितीप्रमाणे नाही.
दुसरे असे की कृत्रीमरित्या, सबसिड्या देऊन हा पदार्थ स्वस्त केला आहे आणि म्हणून तो मोठ्ठ्या प्रमाणात वापरला जातो आहे. मानवी शरीराला मुळातच इतकी साखर पचवायची शक्ती नसते. बाकी प्रकारच्या साखरा इतकी सबसिडी मिळत नसल्यामुळे तितक्या स्वस्त नाहीत. आणि त्यामुळे त्या अफाट प्रमाणात पोटात जाणे थोडे अवघड आहे.
5 Aug 2010 - 6:42 am | आमोद शिंदे
हुप्प्या,
तुम्ही आधी डायबेटीसचे म्हणाला होता. प्रिन्सटनचा स्टडी हा लठ्ठ्पणाचा आहे. डायबेटीसचा नव्हे!! माझा प्रतिसाद पुन्हा एकदा वाचा. . "कॉर्न सिरप आणि लठ्ठपणावर बरेच संशोधन झाले आहे" असे मी आधीच्या प्रतिसादात लिहिले आहे.
तुम्ही जसा प्रिन्स्टनचा स्टडी दिला आहे तसे तुम्हाला अनेक असे स्टडीजही माहित असतील;
http://www.ajcn.org/cgi/content/full/87/5/1194
लठ्ठपणावर दोन्ही बाजूने चिक्कार डेटा आहे. त्यामूळे निष्कर्षाप्रत येणे अवघड आहे असे मी म्हणालो.
5 Aug 2010 - 6:54 am | हुप्प्या
चला, कॉर्न सिरपमुळे लठ्ठपणा जास्त येतो हे तुम्ही मान्य करता.
आता कुठल्याही डॉक्टरला विचारलेत तर तो/ती सांगेल की लठ्ठ लोकांना डायबेटिस होण्याची शक्यता जास्त आहे. अन्य विकारही जसे हृदयविकार, रक्तदाब, सांधेदुखी इत्यादी हे लठ्ठ लोकांत जास्त आढळतात.
मग कॉर्न सिरपमुळे लठठपणा आणि त्यामुळे डायबेटिस असे मानले तर चूक आहे का?
मला वाटत नाही.
5 Aug 2010 - 7:21 am | आमोद शिंदे
कॉर्न सिरपमुळे लठ्ठपणा 'जास्त' येतो असे मी कुठे मान्य केले बुवा? गोड खाल्ल्याने लठ्ठपणा येतो हे जगजाहीर आहे. त्यातही कॉर्नसिरप वापरल्याने अधिक लठ्ठपणा येतो का? ह्याविषयी संदीग्धता आहे. इतकेच मी म्हणतो आहे.
तुम्ही मात्र डायरेक्ट डायबेटीस पर्यंत पोहोचला आहात. अतिलठ्ठपणाने हृदयरोगापासून मेंदूच्या विकारापर्यंत अनेक व्याधी जडू शकतात. डायबेटीसच वेगळा का काढायचा?
त्यासाठी कॉर्न सिरपच्या वापराने 'साखरेच्या तुलनेत' कसलासा डायबेटीस (तुमचाच शब्द) होण्याची शक्यता वाढते हे दाखवणारा स्ट्डी दाखवा,
5 Aug 2010 - 11:23 pm | पक्या
अहो ठीक आहे ना, पण कॉर्न सिरप शरिरास चांगले नाही हे तरी मान्य करा की. शब्दखेळ करण्यापेक्षा आपल्याला माहित असलेली अचून माहिती पुरवणे चांगले नाही का?
5 Aug 2010 - 5:01 am | शिल्पा ब
अशा प्रकारे तयार होणारे तेल अमेरिकेत कुठेतरी बनवतात याचा असाच रीपोर्ट पहिला होता... अगदी सेम प्रकार पण मोठ्या प्रमाणावर...
horrible .... मी इथे घरीच दही करायचा प्रयत्न केला होता पण दुधाला साय नसल्याने काही जमले नाही...कोणाला माहित असेल तर कृपया सांगावे.
5 Aug 2010 - 5:29 am | मदनबाण
प्राण्यांचे मृतदेह (त्यात कुत्रे, उंदीर, गाढव, गुरेढोरे, डुकरे हे सगळे येतात) जमवून त्यावर प्रक्रिया करून त्यातील चरबी काढून त्याची विक्री करणे. मग मिठाया व अन्य स्वस्त तळलेला माल बनवायला हेच चरबी म्हणून वापरले जाते.
हा प्रकार हिंदुस्थानात देखील होतो, हल्ली अश्या प्रकारे बनवलेले तूप देसी घी म्हणुन विकण्यात येत होते, त्या तूपाला रवेदारपणा येण्यासाठी काही केमिकल देखील वापरण्यात आली होती.
ज्या ठिकाणी हे असले पदार्थ बनवतात तिथे प्रचंड घाण असते,वास तर इतका भयानक असतो की तिथे काम करणारी मंडळी दारु प्यायल्या शिवाय काम करुच शकत नाहीत !!! हे असले तूप मॉल मधे देखील वितरीत होत आहे.
१ रुपयाच्या सनसिल्क शॅपू +वनस्पती तेल = दूध. हे सुद्धा मोठ्या प्रमाणात वितरीत होताना बातम्यात दाखवले गेले आहे.
5 Aug 2010 - 1:15 am | रेवती
भयानक आहे हे सगळं.
पूर्वीपासून चालत आलेल्या पद्धतीने वर्षाची हळद, तिखट, मसाले, भाजण्या हे तयार करावे असे वाटायला लागले आहे. बरे, अमेरीकेत मिळणारे रोजच्या वापरातील साधे दही तरी बरे असते का? नाहीतर मी आपली विरजण लावायला सुरुवात करते आता (मिभोंची आठवण आल्याशिवाय राहिली नाही.).
माझी एक चुलत बहीण अजूनही घरच्याघरी तिच्या कुटुंबाला पुरेल एवढे वाळवणाचे प्रकार करते. फार नाही पण उगीच ४० ते ५० पापड्या, ५० एक पापड वगैरे. शी! मला तर प्रत्येक पदार्थाचा संशय येतो आहे. माझ्या इथे तर तिखट, हळद असे प्रकार तयार स्वरूपात घेण्याशिवाय पर्यायच नाही. आता पुढच्या वेळेस भारतवारीत सगळे कांडण केंद्रातून आपल्या डोळ्यासमोर तयार करून आणावे हे बरे! तान्ह्या बाळांची अश्यावेळेस दया येते. त्यांना तरी शुद्ध पौष्टीक दूध, तूप कसे मिळत असेल?
आम्ही नशिबवान म्हणून एक गवळी भारतात असताना चांगला भेटला. अगदी शुद्ध दूध आणून देत असे व सगळ्या लहान मुलांना कृष्ण मानत असे. माझ्या मुलाला त्या दुधाचा कधीही त्रास झाला नाही. देव भलं करो त्या गवळ्याचं!
5 Aug 2010 - 4:25 am | बहुगुणी
दही दीर्घकाळ घट्ट रहावं म्हणून अमेरिकेत सर्वत्र मिळणारे योगर्ट (दही) हे edible प्रमाणात Guar Gum घालून करतात. 'गुआर गम' हे galactomannan नावाचा स्टार्च आहे (galactose + mannose या sugars चं complex). त्याला 'गम' म्हणायचं कारण बहुधा हे असावं की calcium च्या संपर्कात आल्यावर या संयुगाचं gel तयार होतं. दह्याला घट्टपणा येतो तो यामुळे. पूर्वी दह्यात (yogurt मध्ये) thickening agent म्हणून corn starch वापरत असत, पण गुआर गम मध्ये कॉर्न स्टार्च पेक्षा ८ पटींनी आधिक thickening properties आहेत हे कळल्यापासून सगळीकडे गुआर गम च वापरला जातो. माझ्या अंदाजाप्रमाणे भारतात (मी मुंबई-पुण्यात पाहिलं) "गोवर्धन दही" हे घट्ट दही हल्ली मिळतं त्यातही याचा वापर आहे. (हे दही किती घट्ट आहे ते या जाहिरातीवरून कळेल!)
असो, तर यात प्रॉब्लेम कुठे आहे? गुआर गम हे water soluble fiber प्रमाणे काम करत असल्याने ते laxative म्हणून काम करतं, आणि म्हणून bowel movement regularize करायला ते उपयोगी आहे म्हणून खूप योगर्ट्स ची जाहिरात झालेली तुम्ही पाहिली असेल. ते खरंच आहे, पण हा असा fibrous
पदार्थ weight loss foods मध्ये घातला तर कमी अन्न खाऊन भूक 'भागते' आणि त्यामुळे वजन कमी करता येतं असा दावा असल्याने खूप मोठ्या प्रमाणावर याचा वापर अशा fitness foods मध्ये झाला, पण
१९८० च्या दशकात अन्न कमी खाऊन बर्याच obese पेशंट्स मध्ये esophageal blockage होऊन त्यांना गंभीर प्रकृतीत रुग्णालयात दाखल करण्यात आलं, तेंव्हा US FDA ने diet foods मधील गुआर गम च्या वापरावर निर्बंध आणले.
याच्या दह्यातील अति-वापराने त्रास होतो का? तर jury is still out on that; संशोधन चालू आहे. तो पर्यंत (भारतात किंवा कुठेही) घरचं खवलेकाठी दही हेच बरं असं वाटतं.
जाता जाता: हा गुआर गम पदार्थ सर्वाधिक प्रमाणात जगभर येओ तो भारतातून, आणि तो करतात कशापासून माहितीये? - गवारीच्या शेंगातील बियांपासून.
5 Aug 2010 - 9:23 am | रेवती
अच्छा असं आहे तर!
गोवर्धन दही हे नैसर्गीकरित्या घट्ट बनलेले नाही हे पाहिल्यावर कळते.
मलाही आता दही घरीच विरजावे असे वाटायला लागले आहे.
हिवाळ्यात थोडी कटकट वाटली तरी हरकत नाही.
मैत्रिणीकडून विरजण आणते आता (मिभोंकडून मिपावर विरजण मिळेल काय?;)).
माहीतीबद्दल धन्यवाद बहुगुणी!:)
6 Aug 2010 - 12:17 am | मिसळभोक्ता
(मिभोंकडून मिपावर विरजण मिळेल काय?Wink).
स्वारी, गेल्या दोन दिवसात सगळे विरजण संपले. आता नवीन लावले आहे. अजून दोन दिवस वाट पहा.
5 Aug 2010 - 5:26 am | मधुशाला
अमेरीकेत दही लावणं सहज शक्य आहे. आम्ही असं दही लावून चक्का करून श्रीखंड सुद्धा केलं आहे.
पापडावरून आठवलं, इथे(आणि भारतातही एकदा हे अनुभवलेलं आहे) लिज्जत पापडाला साबण पावडरचा वास येत होता. इतका की जणू काही पापडातच साबण पावडर घातली आहे. आणखी एक अनुभव म्हणजे सनफिस्ट्च्या मारी बिस्कीटांना कसल्यातरी तेलाचा उग्र वास. अतिशय घाणेरडा.
5 Aug 2010 - 6:57 am | हुप्प्या
प्राण्यांच्या मृतदेहातील चरबीचे बनवलेले तेल/तूप व खरे तेल/तूप हे कुठले हे कळण्याकरता काही सोपी टेस्ट आहे का? कुणी अशी टेस्ट सुचवेल का? मिसळपाववर विविध क्षेत्रातील जाणकार मंडळी येत असतात म्हणून विचारतो.
5 Aug 2010 - 7:29 am | चतुरंग
शुद्ध तुपाचा दिवा जळताना एकप्रकारचा मंद वास येतो तो हवाहवासा वाटतो.
प्राण्यांची चरबी जर त्यात घातलेली असेल तर त्याच्या दिव्याचा जळताना बार्बेक्यू प्रमाणे उग्र आणि वेगळाच वास येईल असा अंदाज आहे. (हा प्रयोग मी करुन बघितलेला नाही फक्त अंदाज आहे.)
चतुरंग
5 Aug 2010 - 8:07 am | नितिन थत्ते
बहुतेक फरक कळणार नाही (चरबीखेरीज अन्य भेसळ नसेल तर). कारण शेवटी शुद्ध तूप ही 'अॅनिमल फॅट'च आहे.
अॅनिमल फॅट ही व्हेजिटेबल फॅट पेक्षा पचायला हलकी असते असे ऐकले आहे. (चू भू दे घे). तसे असेल तर डालडा खाण्यापेक्षा चरबी खाणे हे अधिक 'हेल्दी' असू शकेल.
5 Aug 2010 - 9:25 pm | हुप्प्या
तूपाचा प्रवास हा दूध, दही, लोणी आणि मग तूप असा लांबचा आहे. याउलट प्राण्याच्या शरीरातली चरबी ही बाकी शुध्दीकरण होत असले तरी जशीच्या तशी वापरली जाते. मला वाटते दोन्हीमधे गुणात्मक फरक असावा.
एक महत्त्वाचा मुद्दा भावनिक वा धार्मिक आहे. शाकाहारी माणसाला, काही प्राणी वर्ज्य मानणार्याला आपण खात असलेली जिलबी कुत्र्याच्या चरबीत तळली आहे किंवा डुकराच्या हे कळल्यावर तो ती खाईल का? मग ती कितीही स्वादिष्ट वा स्वस्त असो.
स्वतःचे पैसे खर्चून पदार्थ विकत घेणार्याला तो पदार्थ कशाचा बनवला आहे हे कळण्याचा हक्क आहे. आणि त्यात फसवणूक होत असेल तर त्याविरुद्ध दाद मागायचा हक्क आहे.
6 Aug 2010 - 2:53 am | धनंजय
चरबी शुद्ध केल्यास वासावरून/सुवासावरून सहज सांगता येणार नाही. कधीकधी आइसक्रीममध्ये चरबी घालतात, ते काही "बार्बेक्यू"सारखे लागत नाही.
मात्र कुठल्याही प्राण्याच्या दुधातील स्निग्ध पदार्थातल्या वेगवेगळ्या "फॅटी अॅसिड"चे गुणोत्तर जनावराच्या अंगातल्या चरबीपेक्षा वेगळे असते. (दुवा. लोण्यात ब्युटिरिक अॅसिडचे प्रमाण ४-५% असते. चरबीत फार कमी.)
हे रासायनिक विश्लेषण केल्यास स्निग्ध पदार्थ अंगातील चरबीतला, की दुधातला, असे बहुधा सांगता येईल.
स्निग्ध पदार्थ तापवला, तर उडणार्या धुरातल्या ब्यूटिरिक अॅसिडचा काही लोकांना वास कळत असावा. (मात्र तुपाच्या दिव्याचा मंद वास तो नसावा, अन्य अॅरोमॅटिक पदार्थ असावे, असे मला वाटते.)
16 Sep 2010 - 12:39 am | Pain
सहमत
5 Aug 2010 - 11:04 am | स्वाती दिनेश
'त्या ' धाग्यांच्या धुरळ्यात 'हा' धागा राहूनच गेला वाचायचा.
खूप नवी माहिती. धन्यवाद,
स्वाती
6 Aug 2010 - 2:15 am | रेवती
हो, हा धागा माहितीपूर्ण तरी आहे.
कालच एका मैत्रिणीने भारतातून आणलेली मिठाई प्रेमाने दिली.
तो बॉक्स घेताना ज्याम अवघडलेपण आले होते.
त्यात थोड्या जिलब्या, पेढे, काजू कतली होती आनि फरसाण पण दिले.
5 Aug 2010 - 9:18 pm | हुप्प्या
ह्या लिंकवर असे म्हटले आहे की कॉर्न सिरप आणि डायबेटिस ह्यांचे नाते आहे.
http://www.newswise.com/articles/view/532433/
शिवाय प्रिन्सटनचा प्रयोग असा दावा करतो की कॉर्न सिरपमुळे अन्य पदार्थांपेक्षा लठ्ठपणा जास्त येतो.
कॉर्न सिरपच्या वाढत्या प्रमाणामुळे वाढते वजन आणि बाकी विकार तर होतातच पण साखरेचे जिथे पचन होते त्या स्वादुपिंडावर जास्त ताण पडून त्यामुळे डायबेटिस होतो आणि डायबेटिस असला तर तो अधिकच बळावतो असे माझ्या इंटरनेटवरील आणि अन्य वाचनाने समजले.
काही डॉक्युमेंटर्या पाहिल्या आहेत ज्यात विविध डॉक्टर, संशोधक हेच मत मांडतना पाहिले आहेत.
5 Aug 2010 - 11:34 pm | अश्विनीका
खूप नवीन माहिती मिळाली. धन्यवाद.
बाहेरचे पदार्थ शक्य होतील तेवढे टाळून घरीच बहुतेक पदार्थ बनवावे असे वाटू लागले आहे.
रेवती, अमेरिकेतील काही ब्रँडच्या दह्यामध्ये जिलेटीन घातलेले असते. जिलेटिन हा प्राणिज पदार्थ आहे.
30 May 2013 - 10:35 am | स्मिता चौगुले
धागा वर आणते आहे
30 May 2013 - 6:19 pm | अजो
माहितीपूर्ण धागा.
31 May 2013 - 8:41 am | अर्धवटराव
पण जोपर्यंत कुठलिही भेसळ आरोग्यास, अर्थव्यवस्थेस अपायकारक नाहि तोपर्यंत आमची त्याला ना नाहि. चरबी कुत्र्याची असु दे वा गाढवाची, साखर उसाची असु दे वा मक्याची... फायनल प्रोसेसींग झाल्यावर अल्टीमेटली जर तिची आरोग्यविशयक गुणवत्ता सारखीच असेल तर मोस्ट वेलकम.
तसंही, भरपूर (आपापल्या कुवतीने) सूर्यनमस्कार घातले तर दगड देखील पचतो (नॉट लिटरली) अशी आमची (अंध)श्रद्धा आहे.
अर्धवटराव
31 May 2013 - 10:22 am | खबो जाप
मागच्या वेळी डल्लास ला गेलो होतो तेव्हा चीपोटले (chipotle Mexican रेस्तोरन्त ) मध्ये मी शुद्ध शकाहारी आहे सांगितल्यावर, तो म्हणाला बिन्स देवू का ?
मी म्हणलो काही प्रॉब्लेम आहे का तर तो म्हणाला त्यांच्याकडे येणाऱ्या बिन्स च्या शेतीत मेलेल्या प्राण्यांपासून किव्हा चरबी पासून बनवलेले खत घालतात..
31 May 2013 - 11:40 am | सुबोध खरे
तसेही आपल्याकडे शेण खत आणि सोन खत वापरतोच शिवाय सुपर फोस्फेट हे खत नसेल तर प्राण्यांच्या हाडांचा चुरा वापरला जातोच. वनस्पती आपल्याला निरुपयोगी असणार्या गोष्टीचा उपयोग करून उपयुक्त वस्तूंची निर्मिती करत असतात
31 May 2013 - 12:31 pm | खबो जाप
तुमच म्हणणे बरोबर आहे, माझा हा अनुभव सांगण्याचा मुद्दा एव्हढंच कि त्याने सांगितले तसे, सगळ्या उत्पादनात काय वापरले आहे त्याची पारदर्शत असावी एवढेच, मग आपण ठरवू शकतो कि एखादी गोष्ट घ्यावी कि नाही.