हे खरे आहे का?

वेताळ's picture
वेताळ in काथ्याकूट
29 May 2013 - 9:40 am
गाभा: 

आजच फेबुवर ही माहिती मिळाली. साबुदाणा हा खरच उपवासाचा पदार्थ आहे का ह्यावर खुपदा चर्चा झाली आहे.त्याबद्दल आज मला फेबुवर खालील माहिती मिळाली. तर साबुदाणा बनवण्याची प्रक्रिया खरेच जर अशी असेल तर साबुदाणा उपवासाला चालु शकतो का?
साबुदाणा कसा तयार होतो किंवा बनतो याबाबतची हाती लागलेली माहिती शेअर करावी अशी इच्छा होती म्हणून...

'साबुदाणा ' हे उपवास अथवा धार्मिक कार्यक्रमांमध्ये वापरले जाणारे लोकप्रिय खाद्य आहे परंतु 'साबुदाणा ' हे शाकाहारी कि मांसाहारी खाद्य...?

दक्षिण भारतातील तामिळनाडूमध्ये सालेम परिससरात सालेम ते कोईम्बतूर मार्गावर साबुदाण्याचे अनेक कारखाने आहेत. कारखान्यापासून दोन कि.मी. अंतरावरुनच आपल्याला अत्यंत घाणेरडा वास येऊ लागतो. साबुदाणा हे बटाटयासारख्या गोड कंदापासून बनविले जाते. केरळात हे कंद मोठया प्रमाणावर उपलब्ध असून ते साधारण ६ कि.ग्रॅ. वजनाचे असतात. कारखान्याचे मालक सीजन मध्ये घाऊक प्रमाणात या कंदांची खरेदी करुन त्याचा लगदा सुमारे ४० फूट X २५ फूट खडयात साठवतात. खड्डे उघडे असतात व त्यातील लगदा आंबवण्यासाठी कुजवतात. हजारो टन कंद खड्डयात कुजत असतो. त्यावर रात्रभर प्रचंड मोठे विजेचे दिवे लावलेले असतात. त्या भोवतीचे लक्षावधी किडे, पाखरे खड्डयात पडतात. हा लगदा कुजत असताना रोज त्यात पाणी मिसळले जाते. परिणामी त्यात दोन इंचाएवढे मोठया अळया आपोआप उत्पन्न होतात. ज्याप्रमाणे गटारात किडे आपोआप तयार होतात तसे. खड्डयांच्या भिंती या लक्षावधी अळयांनी/किडयांनी झाकून गेलेल्या असतात. कारखान्याचे मालक हा लगदा त्या अळयांसह एकत्रितपणे यंत्राद्वारे क्रश (Crush) करुन पेस्ट सदृश बनवतात.
ही कृती ५-६ महिन्याच्या कालावधीत अनेक वेळा repeat केली जाते.

अशा रीतीने अळया व किडयांसह पेस्ट तयार होते. ही पेस्ट नंतर गोल चाळण्यांमधून काढली जाते व छोटे छोटे गोळे बनविले जातात व नंतर त्यास पॉलिश केले जाते. हाच तो उपवासाचा 'साबूदाणा' होय.
म्हणूनच अनेक जण साबूदाणा मांसाहारी समजून टाळतात.

आता आपणच ठरवा की 'साबूदाणा' शाकाहारी व उपवासाचा पदार्थ म्हणून वापरावा का ? तसेच जर आपल्याला उचित वाटत असेल तर ही माहिती अधिकाधिक मित्रांना/ मैत्रिणींना व नातेवाईकांना सांगा.
आपल्याला काही माहिती असेल तर इथे सर्वांशी शेअर करा.

प्रतिक्रिया

वेताळ's picture

29 May 2013 - 9:41 am | वेताळ

अमित केदार ह्यांनी टाकली आहे.

सुबोध खरे's picture

29 May 2013 - 9:53 am | सुबोध खरे

किती सत्य आणि किती पूर्वग्रह आहे हे सांगणे कठीण आहे.
तरी खालील दुवा वाचावा
http://sabuindia.com/index.html

सुबोध खरे's picture

29 May 2013 - 9:59 am | सुबोध खरे

प्रत्यक्ष तयार करण्याची प्रक्रिया इथे पहा
http://sabuindia.com/gallery.html.

प्रभाकर पेठकर's picture

29 May 2013 - 10:06 am | प्रभाकर पेठकर

पूर्वीही ही माहिती वाचली होती. संपूर्ण अविश्वसनिय आहे. पूर्वीच्या काळी कधी कुठे ह्या पद्धतीने (त्यातील अतिशयोक्ती वगळून) साबुदाणा बनविला जात असेल तरी ते प्रमाण अतिशय तुरळक असणार. हल्लीच्या काळात हे शक्य वाटत नाही.
बाकी प्रत्यक्ष काहीच पाहिलेले नाही, त्यामुळे हे सत्य आहे की निव्वळ खोडसाळपणा हे सांगणे कठीण आहे.

सेलममधे बर्‍यापैकी काळ राहिलेलो असल्याने आणि सेलम कोईंबतूर रस्त्यावर रोजचा प्रवास असल्याने या साबुदाणा फॅक्टरीजमधून अत्यंत घाण वास येतो हे शंभर टक्के सत्य आहे असं फर्स्ट हँड सांगू शकतो. त्यामुळे फर्मेंटेशन / कुजणे असा काहीतरी भाग नक्कीच यात असणार. पण बाकी किडे वगैरे काही माहीत नाही. पण तो प्रोसेसचा स्टँडर्ड भाग नक्कीच नसावा. वाईट ठिकाणी उत्पादन झालं तर कोणत्याही पदार्थाच्या बाबतीत असं होऊ शकतं. आमरसाचे पॅकिंग किंवा आंबापोळी, फणसपोळी बनवण्याच्या दुय्यम दर्जाच्या ठिकाणांमधे प्रत्येक आंबा / फणस पाहून न घेतल्याने आणि रसाची वेळोवेळी पाहणी न केल्याने त्यातही अळ्या वळवळताना पाहिल्या आहेत. नंतर तो रस घोटला जाऊन एकजीव होणे आणि उन्हात सुकल्यावर त्यात मिसळलेल्या अळ्याही सुकणे हे होतच असणार.

चांगल्या दर्जाच्या फॅक्टरीत बनलेले सामान घ्यावे हे उत्तम. बर्‍याचदा आपण गावात बनलेले / घरगुती उत्पादन म्हणून उलट प्राधान्याने घेतो, पण मॅप्रो किंवा तत्सम फॅक्टरीत पाळले जाणारे नॉर्म्स अशा "घरगुती" पण व्यावसायिक उद्देशाने बनणार्‍या उत्पादनाबाबत पाळले जातातच असं नाही.

साबुदाणा मळीचा हा वास मात्र उसाच्या मळीपेक्षाही जास्त घाणेरडा असतो.. एकदमच असह्य.

साबुदाणा हे बटाटयासारख्या गोड कंदापासून बनविले जाते.

साबुदाणा "टॅपिओका" नावाच्या झाडापासून बनवला जातो. हे झाड भारतात पोर्तुगीजांनी आणलं. त्यांनी आणलेल्या बटाट्याचा आणि साबुदाण्याचा शिरकाव उपासाच्या पदार्थांत कसा झाला हे मात्र नकळे.

(माझ्या एका ब्राझीलियन मित्राने "आलगाडो" की काहीशा नावाचा पुडिंगसारखा प्रकार शिजवून आणला होता. त्यात टॅपिओका, दालचिनी हे रेड वाईनमध्ये शिजवलं होतं. सगळ्या लॅटिन अमेरिकनांनी जिभल्या चाटत त्याचा फडशा पाडला, पण माझ्या भारतीय जिभेला काही त्याची चव झेपली नाही.)

अत्रुप्त आत्मा's picture

29 May 2013 - 11:50 am | अत्रुप्त आत्मा

@त्यांनी आणलेल्या बटाट्याचा आणि साबुदाण्याचा शिरकाव उपासाच्या पदार्थांत कसा झाला हे मात्र नकळे. >>> या गोष्टिंना तात्विक कारण आहे... उपासाला ''खरकटं'' म्हणजेच धान्य/काहि भाज्या हे घटक चालत नाहीत असं ते तत्व... म्हणून उपवासाचा अजुन एक शब्द,ज्याला निराहार(गरजे इतके सहज पचणारे अन्न सेवन-ते ही एकदाच खाणे) असा आहे.अता यात फळं/दूध आणी उकडलेली कंदमुळं इत्यादीच पदार्थ येत होते/येत असावे. पण माणसातली तत्वनिष्ठ नावाची जमात जी आहे,तिच्या परम दयाळू मनांना ''हे'' असे शोध लागतात,त्यांना फक्त तत्व ''पाळल्याचं'' समाधान हवं असतं.त्यापाठिमागच्या ''व्यवहाराची'' वाट लागते की काय होतं याच्याशी काहिही देणं घेणं नसतं,त्यामुळे-साबुदाणा/बटाटे.रताळे-यांचे चमचमीत(पचायला जड असे) पदार्थ/शेंगदाण्याची उसळ/कुटाची आमटी/उपासाचं थालिपिठ असे वात-कारक/पित्त-वर्धक पदार्थ उपासाला केवळ ते धान्य-नसल्याच्या तात्विक कारणानी चालतात.(पोटाचे १२ का वाजेनात?) पण त्याच्या सेवनानी दुपारच्याला जी छान कचकावून झोप लागते,तिचा उपवासाशी-परमेश्वराच्या संन्निध जाऊन बसण्याशी/उपासना करण्याशी काय संमंध लागतो??? हे कोण सांगणार!? :(

मला आपलं असं वाटतं की हे पदार्थ खायला अवडत असतील..मग त्रास होत असो अगर नसो,त्यासाठी ते हवे तेंव्हा करावे,आणी खावे...त्या साठी-

आज आमचा उपास आहे!!!

असं दांभिकपणानी बोलू नै...त्यांनी आपण मानत असलेल्या देवा/धर्माचा काय मान रहातो,हा ही विचार करावा! :)

टिवटिव's picture

29 May 2013 - 11:26 am | टिवटिव

मागे एकदा ई टिवि वर ७/१२ च्या बातम्या मध्ये बीड च्या काहि शेतकर्यांनी टाकलेल्या साबुदाणा कंदमुळाचे ऊत्पादन आणि प्रक्रिया प्रकल्पाची माहिती पाहिलि त्यात असे काहिहि नव्ह्ते...

बाकि वास काय साखरेच्या मळीचा पण येतो.