वेदातील विज्ञान समजून घेणे आणि आचरणात आणणे अगत्याचे आहे. अजूनही शोध न लागलेल्या कित्येक गोष्टींचे सांकेतिक उल्लेख वेदात असू शकतात .
उदा. नुकतेच हाती आलेल्या वृत्तनुसार आता ,माऊस , voice यासोबत नुसत्या विचारानेही वेब सर्चिंग करता येईल ,असे संशोधन विकसित होत आहे. म्हणजे एक helmet डोक्यात घालायचे ज्यात electrodes बसवलेले असतील ,जे तुमच्या मेंदूतील विचारांचे electrical pulse किंवा brainwaves चे पृथक्करण /विश्लेषण करून तुम्हाला काय सर्च करायचे आहे,याचे प्रारूप बनवून त्यानुसार सर्च इंजिनला ते शोधायला सांगतील . हे तंत्र यापूर्वी computer games मध्ये वापरले गेलेले आहे .
मला वाटते आपण आता कुठेतरी अध्यात्मातील telepathy किंवा तत्सम सिदधींच्या जवळपास पोहोचत आहोत . ज्यामध्ये फक्त विचारशक्तींचा वापर करून विविध कार्ये साध्य केली जातात. म्हणजे आध्यात्मने कित्येक हजारो वर्षापूर्वी जे सिद्ध केलेले आहे,तेच विज्ञान आता साध्य करू पहात आहे. प्रश्न हा आहे की आपण आध्यात्मिक ज्ञांनाची हेटाळणी थोतांड म्हणून करत राहणार की त्यातून काही बोध घेवून काही शोध लावणार ?
http://en.wikipedia.org/wiki/Brain%E2%80%93computer_interface
प्रतिक्रिया
19 May 2013 - 9:12 pm | राजेश घासकडवी
होना. पण आपलं तंत्रज्ञान कितीतरी मागे आहे. अजूनही आपल्याल कादम ऋषींप्रमाणे हरिणाचं रूप घेऊन हरिणीशी कामक्रीडा करता येत नाहीत. किंवा इंद्राने कुठच्यातरी ऋषीचं रूप घेऊन त्याच्या बायकोबरोबर हवं ते करता येत नाही.
20 May 2013 - 9:20 pm | टवाळ कार्टा
;)
19 May 2013 - 9:59 pm | बॅटमॅन
20 May 2013 - 12:59 am | बिपिन कार्यकर्ते
20 May 2013 - 2:36 am | बॅटमॅन
20 May 2013 - 2:39 am | प्रभाकर पेठकर
हा: हा: कस्स्सल्ल्ल भारी आहे बंड्याचं छायाचित्र.
20 May 2013 - 7:13 am | अत्रुप्त आत्मा
आज चेहेय्रा वरिल किंवा वरिल चेहेय्राचे अव शेषं ;-) बघता सहि'तल्या वाक्या वाक्याची ओळख पटली. =)) =)) =))
19 May 2013 - 10:08 pm | अत्रुप्त आत्मा
हे असलं सं-शोधन मांडणार्यांच्या बाबतीत एक गोष्ट कायम बघण्यासारखी असते, ती ही... की, जेंव्हा आधुनिक विज्ञानात एखादा शोध लागतो,तेंव्हा त्याची संगती हे लोक प्रचीन ज्ञानात हुडकतात...पण त्याच आधुनिक शोधाचा पुढचा टप्पा या आधिच-तयार असलेल्या ज्ञानातुन शोधुन दाखवा म्हटलं..की यांची दातखिळ बसलीच!!!
19 May 2013 - 10:18 pm | संग्राम कदम
कशाला त्रास करुन घेताय कात्रे काक.पु ना ओक आणि प वी वर्तक यांची पुस्तके वाचल्यास आपल्याला अनेक महाचमत्कार त्यात सापडतील
20 May 2013 - 12:10 pm | आदूबाळ
+१ करेक्ट!
20 May 2013 - 12:24 pm | आदूबाळ
सर्नला देवकण सापडल्यावर सकाळमध्ये (बहुदा) बाला तांब्यांचा लेख आला होता. त्यात काहीतरी असेच तारे तोडले होते...
20 May 2013 - 8:39 pm | प्रसाद गोडबोले
कोण तांबे ? पिचुफेम बालाजी तांबे का ?
एक नंबरचे सेल्स्मन वाटतात ते ... देवकण देवाला विकुन येतील ...(अन आमच्या घरी त्यांना जणु धन्वंतरीचा अवतार मानतात )....डोक्याला शॉट नुसता.
डोक्याला शॉट लागणे ह्या प्रकारावर काही आयुर्वेदिक/वैदिक version 2013 औषध आहे असे मी पत्र पाठवुन त्यांनाच विचारणार आहे !!
20 May 2013 - 12:43 pm | वेल्लाभट
वेद श्रेष्ठ आहेतच. निर्विवाद ! पुराणात अनेक गोष्टींचे संदर्भ आढळतात ज्या आपण आत्ता बघतो. पण मानवाची जिज्ञासा, मानवाचं कुतुहल हे उत्तरोत्तर वाढतच गेलं आहे. आणि त्यामुळे आधुनिक विज्ञानाने वेध घेतलेल्या अनेक गोष्टींचा वेध वेदांनी घेतलेला नाही असंही चित्र आहे. त्यामुळे कुण्या एका पारड्याला जड म्हणता येणार नाही.
20 May 2013 - 1:59 pm | प्रसाद गोडबोले
आवरा ह्या प्सुडोसायन्सला ... ह्या असल्या लेखांमुळे चर्चांमुळे असली नसलेली श्रध्दाही सम्शयाच्या फेर्यात येते .
मान्य करा की वैदिक लोक सामान्य माणसं होती तुमच्या आमच्या सारखी ...रादर आपल्यापेक्षा कमी प्रगत भौतिक जगात .
पण त्यांनी लिहिलेले वेद , महाकव्य अप्रतिम साहित्य कृती आहेत , , उपनिषदे ,षडदर्शन क्लासिकल फिलॉसॉफी आहे !!
येवडं पुरेसं नाही का ?
उगाचच कशाचा संबंध कशाशीही लावण्यात काय मिळतं लोकांना देव जाणे !
20 May 2013 - 2:31 pm | सामान्य वाचक
पूर्वज प्रगत होते का नाही, हा वादाचा मुद्दा का असावा?
अजून हि बऱ्याच प्राचीन गोष्टीचे अर्थ व कारणमीमांसा करणे आपल्याला जमले नाही
उदाहरणार्थ पिरामिड : बांधणी & आतली वातावरण निर्मिती.
मायन संस्कृती च्या खगोल अभ्यासा बद्दल हि तेच.
२-४ हजार वर्षां नंतर आपल्या बद्दल हि असेच वाद होतील कदचित.
(त्यानाही रिकामा वेळ असेल तर :) )
20 May 2013 - 4:32 pm | प्रकाश घाटपांडे
मिसळपावचा ही उल्लेख वेदात आहे. शोधा म्हणजे सापडेल.
20 May 2013 - 5:35 pm | प्रसाद गोडबोले
नसेल तर आपल्या बॅटम्यॅनरावांना सांगु एखादे मिसळसुक्त , मिसळयाग , पावांजली किंवा मिसळोपनिषद लिहायला ...मग आपण घुसडु ते वेदात ....हा.का.ना.का.
=))
20 May 2013 - 6:00 pm | अनिरुद्ध प
धन्यवाद घाट्पान्डे साहेब,आपल्या वरिल वर्णनावरुन पु ल च्या,पानवाला या कथा कथनाची आठ्वण झाली,जसे आपण वेद कालात आहोत आणि आश्रमात (होटेलात) बसुन मिसळपाव चा आस्वाद घेत आहोत्,झोपुन उठलेले बट्ट मण्ण,मिसळ कधी मिळ्ते याची वाट पहात आहेत्,कार्यकर्ते साहेब मिसळ पावा ऐवजी भाकरी बरोबर अधिक चान्गली लागते अशी चर्चा करण्याचा विफल प्रयत्न करत आहेत.
20 May 2013 - 6:37 pm | अत्रुप्त आत्मा
@मिसळपावचा ही उल्लेख वेदात आहे. शोधा म्हणजे सापडेल.>>> =)) अहो ,म्हणजे काय? आहेच! =)) मिसळ कशी करावी? याचा अख्खा सं स्कृतात विधि आहे...
हरि: औम--- आचम्य...प्राणानायम्य... देश(भुक)कालौ संकिर्त्य ;) ..संकल्पः-मम आत्मनः आद्य खाद्य फलप्राप्त्यर्थं...उदरभरणार्थं तथा शीघ्रगत्या करंटप्राप्त्यर्थं... तर्रीसहित मिसळं करिष्ये। करिष्यमाण करंट-पाक-कृत्या>>>आदौ निर्विघ्नता सिध्यर्थं अर्धांगिनी स्मरणं ;) च करिष्ये॥
क्रमशः.............
बाकिचा विधि रात्री देणेत येइल...
हे असलं लेखन,मानवताधर्म वर्धक म्हणजेच धर्मशास्त्र-विरोधी आणी त्यामुळे पर्यायानी पा-खांडी... असल्यामुळे
स्वाभाविकच त्याला लिहिण्याचा खरा करंट रात्री(च) येतो... :-p
20 May 2013 - 10:57 pm | संजय क्षीरसागर
मस्त प्रतिसाद! झाली रात्र, आता पुढचे विधी लिहा
23 May 2013 - 4:33 am | पाषाणभेद
आत्म्या, हसवून मारतोस काय रे बाबा!
20 May 2013 - 8:58 pm | निवांत पोपट
बोध घेवून काही शोध लावला नसला तरी प्रेरणा घेऊन 'प्लॅनेट ऑफ द एप्स' काढलाय की! ;)
20 May 2013 - 9:01 pm | अत्रुप्त आत्मा
आगागागागा... :D
20 May 2013 - 10:48 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
400 ग्राम गोमूत्र की बैटरी से 3 वाट का बल्ब 400 घंटे तक जलाया जा सकता है। 12 बोल्ट की इस ‘गो- ज्योति बैटरी’ से मोबाइल भी चार्ज हो सकता है।
इसे कानपुर (उत्तरप्रदेश) की गौशाला में बनाया गया है। इसे बिजली से चार्ज करने की जरूरत भी नहीं होती। कानपुर गोशाला के महामंत्री पुरूषोत्तम तोषनीवाल के प्रयासों से यह सब संभव हुआ है।
तोषनीवाल के अनुसार यह बिजली का वैकल्पिक साधन बन सकती है। तोषनीवाल ने दावा किया है की बिजली से चार्ज होने वाली बैटरियां 5-6 घंटे तक ही काम करती हैं, जबकि गौ- ज्योति बैटरी 400 ग्राम गो-मूत्र से 400 घंटे तक चलती है।
मध्यप्रदेश उर्जा विकास निगम ने इस बैटरी को परीक्षण के लिए भोपाल के राजीव गांधी विश्वविद्यालय में भेजा था। परीक्षण में 400 घंटे में मात्र 3 फीसदी वोल्ट कम हुआ। इससे 12 घंटे तक मोबाइल चार्ज करके भी देखा गया।
तोषनीवाल के अनुसार इस गौ- ज्योति बैटरी की लागत 3500 रूपये आती है। उतराखंड सरकार ने अपने कई दफ्तरों में इसका उपयोग करना शुरु कर दिया है। छत्तीसगढ़ सरकार भी कार्यालयों में उपयोग के लिए बैटरी खरीदने वाली है...
इथे सापडला.
20 May 2013 - 11:05 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
आयला, भारीये.
आता रोज सकाळी लोटा घेऊन गोठ्यात जायला पाहिजे. एक १०-१२ दिवसात भरपुर जमा होईल. महिना-दोन महिना मोबाईल चार्ज करता येईल.
20 May 2013 - 11:14 pm | डॉ सुहास म्हात्रे
असल्या होक्सेस आंतरजालावर सतत भटकत असतात. कोण्या एका तोषनीवालचा बदला घेण्यासाठीसुद्धा हे कुणी केल्याची शक्यता आहे. किंवा बातमीला खरेपणाची झलक देण्यासाठीही कपोलकल्पीत तोषनीवाल निर्माण केल्याची शक्यता आहे.
आजकाल आंतरजालावर हा उद्योग फार भरभराटीस आला आहे ;)
21 May 2013 - 1:36 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
आपल्याला काय! करमणूक झाली की हसायचं, पुढचं पान.
असाच आणखी एक फेकू गडी फेसबुकावरूनच सापडला होता, हा पहा:
http://www.youtube.com/watch?v=I9aR_xfm-gE
हा बावाजी आयायटीत गणित शिकलेला आहे. काही वेळा गणितातल्या संकल्पनाही उत्तमरित्या सांगतो; म्हणून त्याच्या थापा आणखीनच धोकादायक वाटतात.
21 May 2013 - 1:58 am | विकास
होक्सेस नसावे असे टाईम्स मधील बातमी वाचल्यावर वाटले...
University develops simple apparatus that generates energy from cow's urine
V Senthil Kumaran, TNN May 16, 2013, 04.10AM IST
Tags:
Dr V Ramesh Saravana Kumar|
cow's urine
NAMAKKAL: With the entire state reeling under a severe power crisis, especially the rural areas, the department of livestock production and management at the Veterinary College and Research Institute in Namakkal has come up with a simple electricity generating apparatus whereby farmers will be able to generate energy from cow's urine.
Talking to TOI, head of the department Dr V Ramesh Saravana Kumar said the apparatus is based on a simple scientific principle and will be able to generate 10 volts of electricity continuously for 120 hours (five days) from two litres of cow urine. "All we need is 10 to 12 plastic cups, each filled with 200ml of urine, thin copper plates as the positive poles and a thin zinc plates as negative poles. One needs to spend just Rs80 to setup the apparatus," he said.
Describing the apparatus Ramesh said the positive and negative poles in the cups are connected by single core wires or hook-up wires that form two separate networks. The two output wires can be connected to any desired device. "When copper and zinc plates come in contact with uric acid movement of electrons begin, generating electricity. The output dips after five days, when the urine has to replaced," he added.
With the help of the model, college students demonstrated that five wall clocks and a zero watts bulb can be operated simultaneously. "While electricity can also be generated from urine of other cattle, cow's urine is used as it is abundantly available. A cow can produces 16 to 20 litres of urine every day. Proper collection of urine from cows can help farmers generate more electricity," Ramesh said.
Ramesh said the pungent urine smell can be avoided by keeping the apparatus outdoors and using a long wire to connect it to the output device. He said the apparatus was a boon for children residing in rural areas as connecting it with an LED bulb, like the ones used in powerful torches and positioning them properly can provide hours of light for study.
A bigger model can be used to light up an entire house, including the cow shed. Farmers, who have already seen the model, have appealed to technical institutions to generate bigger and more efficient models with provisions to store electricity.
बाकी मूळ चर्चा प्रस्तावासंदर्भात इतकेच म्हणेन की ज्यांना असे संशोधन करायचे असेल त्यांनी ते करावे. नुसतेच नंतर सद्यकालीन विज्ञानातील घडामोडींशी नवीन काही अस्तित्वात आल्यावर सांगड घालत बसू नये, जे चर्चा प्रस्तावात जाणवले. असो.
21 May 2013 - 7:35 am | मराठीप्रेमी
यात नवीन काहीच नाहिये. हा या video मध्ये दाखवल्यासारखा प्रकार आहे. कोणतेही दोन वेगळे standard electrode potential असलेले धातू आणी electrically conductive solution वापरुन हे करता येते. zinc आणी copper वापरल्यावर zinc oxidize होतो आणी या oxidation प्रक्रियेतून मुक्त झालेली उर्जा electricity च्या रूपात मिळते (electrolyte आहे तसेच राहते). गंमत अशी आहे की zinc तयार करताना हीच प्रक्रीया याउलट वापरलेली असते, त्यामुळे प्रत्यक्षात काहीच फायदा होत नाही.
आणी वरील बातमी ज्याने लिहीली आहे त्याला electeical ची जुजबी माहिती देखील नाही अस वाटतय. 10 volts of electricity हा काय प्रकार असतो?
21 May 2013 - 2:50 pm | अनिरुद्ध प
आपल्याला electeical बद्दल खूपच माहिती आहे असे वाटते, तरी आपण 10 volts of electricity हा काय प्रकार असतो?,
या बद्दल जरा महिती देवुन उपक्रुत करावे.
21 May 2013 - 5:08 pm | विकास
यात नवीन काहीच नाहिये.
बहुतेक माझा प्रतिसाद नीट वाचला नसावात, कारण मी कुठे तसे म्हणले आहे? मी त्याचा वेदांशी अथवा कशाचीच संबंध लावलेला नाही. फक्त आधी ज्या पद्धतीने ती बातमी दिली गेली त्यावरून हे विज्ञान होते का अज्ञान हे पहाण्यासाठी म्हणून उत्सुकतेपोटी गुगलले तर टाईम्स मधील गेल्या २-४ दिवसातीलच बातमी मिळाली.
आणी वरील बातमी ज्याने लिहीली आहे त्याला electeical ची जुजबी माहिती देखील नाही अस वाटतय. 10 volts of electricity हा काय प्रकार असतो?
"10 volts of electricity" असे वाक्यात म्हणत नाहीत असे म्हणायचे आहे का? उत्तर कळल्यास अजून समजावून सांगेन. :)
21 May 2013 - 5:37 pm | अनिरुद्ध प
हा प्रश्ण मी मराठीप्रेमी यान्ना विचरला होता.
21 May 2013 - 7:02 pm | विकास
प्रतिसाद त्यांनाच दिला होता, तुम्हाला नाही. म्हणून तर तो तुमच्या प्रतिसादाखाली त्याच ठिकाणी आहे, अजून टॅब मिळून आत गेलेला नाही. (जसा हा प्रतिसाद आतल्या बाजूस दिसेल तसा). :-)
21 May 2013 - 9:52 pm | मराठीप्रेमी
@ विकास : आपण याचा वेदांशी संबंध लावत आहात असे मला म्हणायचे नव्हते. तसे ध्वनीत होत असेल तर ती माझी वाक्यरचनेतील चूक म्हणावी लागेल.
आता थोडे सविस्तर लिहीतो. खाली लिहीलेले आपल्याला उद्देशून नाही, times मधील बातमी आणी आदितीने दिलेली fb link यावर भाष्य आहे. मूळ बातमीत म्हटल्याप्रमणे
हे वर्णन आणी मी याआधी दिलेल्या विडियो मधील लिंबे वापरून electricity तयार करणे हे एकाच तत्वानुसार काम करतात. किंबहुना सगळे electrical cells याच तत्वानुसार काम करतात. स्वस्त 1.5V batteries zinc आणी manganese dioxide हे electrodes म्हणून आणी ammonium chloride किंवा zinc chloride electrolyte म्हणून वापरतात. alkaline 1.5V batteries सुद्धा zinc आणी manganese dioxide हे electrodes म्हणून आणी potassium hydroxide electrolyte म्हणून वापरतात. (potassium hydroxide is alkaline, hence the name). सर्व rechargble batteries (lithium-ion, lithium-polymer, lead-acid, nickel-metal hydride, nicket-cdmium etc.) सुद्धा हेच तत्व वापरतात. फरक इतकाच असतो की यात electrodes आणी electrolytes असे निवडलेले असतात की जी chemical rection electricity तयार करते ती reaction reversible असते. ही प्रक्रिया बहुतेक ४००० वर्षांपासुन माहीत आहे आणी कदाचीत electroplating साठी वापरली गेली असावी. (see : Baghdad Battery )
बातमी वाचून मलातरी अस वाटतय की त्यांचे काम एखाद्या ७-८ वी मधील मुलाने विज्ञान प्रदर्शनात केलेल्या प्रयोगाच्या दर्जाचे आहे.
हे विज्ञान प्रदर्शनात ठीक आहे पण जर हे जास्त गांभिर्याने घ्यायचे असेल तर या controlled experiments ची गरज आहे. जर तसे controlled experiments केले असतील तर "college students demonstrated that five wall clocks and a zero watts bulb can be operated simultaneously" हे वाक्य बातमीत आलेच नसते. त्यांनी जे काही केले आहे ते वर्तमानपत्रात छापून आणणे म्हणजे अर्ध्या हळकुंडाने पिवळे होण्यातला प्रकार आहे.
आणी यात गोमूत्र फक्त electrolyte म्हणून आहे. त्याऐवजी इतर कुठल्याही प्राण्याचे (not only cattle as the article says), माणसाचे पण, मूत्र वापरून हेच करता येइल.
हा प्रयोग Veterinary College च्या लोकांनी केला आहे, त्यामुळे कदाचीत त्यांना यातील बर्याच तांत्रिक बाबी माहीत नसतील आणी त्यांनी जे काही केले आहे ते प्रामाणीक हेतूने केले असावे पण होत काय, यामुळे काही लोकांना propoganda साठी कच्चा माल मिळतो. वर आदितीने दिलेली facebook वरील post याचेच उदाहरण आहे. त्या post मध्ये म्हटल्याप्रमाणे
थोडक्यात, त्या battery मधील stored energy 1200 W.Hr आहे असा दावा आहे. तुलनेसाठी laptop batteries 30-60 W.Hr च्या मध्ये असतात (laptop च्या आकारानुसार), car batteries पण याच range मध्ये असतात. माझा common sense मला सांगतो की 400 gram गोमूत्रातून एव्हढी उर्जा मिळवणे शक्य नाही पण बर्याच लोकांना हा fact check शक्य नसेल आणी ते या बातमीवर विसंबून राहू शकतात. तुम्हालाही हा hoax नसावा असे वाटले होते. असाच आणखी एक hoax video.
now about "10 volts of electricity"
10 volts of electricity असे वाक्यात बहुतेक म्हणू शकतो, बर्याच ठिकाणी मी असे वापरलेले बघीतलेले आहे. I think it is little lousy to say as electricity comprises of many physical phenomena associated with the presence and flow of electric charge such as electric charge, electrical field, electric current, electric potential etc. मी स्वतः "batterie's voltage is 10" or "battery is at 10V" असे म्हणेन पण कदाचीत मी जास्त छिद्रान्वेशी बनतोय, 10 volts of electricity असे बोलणे सुद्धा बहुतेक ठीक ठरेल. माझा आक्षेप थोडा वेगळा होता.
10 volta of electricity ने काहीच उपयुक्त माहिती मिळत नाही. त्यासाठी त्या battery ची capacity द्यायला पाहिजे (W.Hr मध्ये किंवा mA.Hr@V). एक उदाहरण द्यायचे झाले तर हा cell आणी हा cell यांचे voltage सारखेच आहे पण दुसर्याची capacity पहिल्यापेक्षा २.५ पट जास्त आहे. थोडक्यात दुसरे cells जर कॅमेर्यामध्ये वापरले तर जवळपास २.५ पट फोटो काढता येतील. ही उपयुक्त माहीती आहे, दोन्ही cells चे voltage 1.2V आहे ही नाही. (यात आणखी काही parameters असतात, maximum rate of discharge, internl resistance etc., पण सध्या ते बाजुला ठेवू)
"10 volts of electricity हा काय प्रकार असतो?" हे माझे वाक्य खरेतर "why are you giving me useless information?" या उद्वेगातून होते.
21 May 2013 - 9:56 pm | मराठीप्रेमी
२५०० mA.Hr च्या cell ची link द्यायची विसरलो. (शेवटून दुसरा परिच्छेद).
http://www.all-battery.com/aa2500mahhighcapacitynimhrechargeablebattery1...
22 May 2013 - 1:28 am | विकास
सविस्तर प्रतिसादाबद्दल धन्यवाद. तुमच्या तांत्रिक विश्लेषणाशी बहुतांशी सहमत पण तो मुद्दा नव्हताच.
तुम्हालाही हा hoax नसावा असे वाटले होते.
पण आधी जे काही संदर्भ-प्रतिसाद होते त्यात चारशे ग्रॅम गोमूत्र आहे का ४ लाख वोल्टेज आहे यावर तांत्रिक चर्चा चालू नव्हती आणि त्यांनी जर येथे स्पष्टीकरण दिले तर गोष्ट वेगळी आहे, पण नाहीतर केवळ गोमूत्र म्हणजे काय सनातनी, गोमाता करत फिदीफिदी हसण्याचाच मुद्दा इतकेच त्यात उर्धृत होत होते असे वाटण्यासारखी परीस्थिती आहे.
आता जे काही लिहीत आहे ते गोमुत्राचा, वेदांचा अथवा गोमुत्रावर चाललेल्या बॅटरीच्या डिफेन्ससाठी नसून नक्की आपण हसत असताना सगळे बघात असतो का या संदर्भात आहे...
गोमूत्राचा वापर संशोधनासाठी करण्यावरून आधी हसण्यावारी नेले गेले होते ज्यात तशा संशोधनासच होक्स म्हणले गेले होते. आता चर्विचर्वण करतच आहोत म्हणून व्याख्येपासून जाऊयात, Hoax means something that has been established or accepted by fraudulent means. पण मग एक प्रश्न पडला की, The National Council of Rural Institutes was established by the Government of India in 1995 पण हे संशोधन ग्राह्य का धरत असावेत का? Naturebased livelyhood development या त्यांच्या संस्थळावरील प्रेझेंटेशनमधे (पान ४-५) मधे २५० मिली गोमूत्र हे ४०० तास लाईट अथवा मोबाईल चार्जर साठी वापरता येते असे लिहीले आहे ते का लिहीले असावे. इतरत्र देखील या संदर्भात असेच म्हणलेले दिसले. यातील लाईट हा एल ई डी असतो हे काही ठिकाणि लिहीलेले आढळले...१२ व्होल्ट ऐवजी ३ व्होल्ट देखील वाचलेले आहे. तीन व्होल्टस चा संबंध हा दोन AA बॅटरींवर चालणार्या लहान एल इ डी बल्बशी आहे. त्यामुळे देखील मला त्याला अजून होक्स म्हणवत नाही....
आता तुम्ही जे काही लॅपटॉपच्या बॅटरीशी तुलना करून असे होणे शक्यच नाही असे म्हणत आहात ते काहीसे पटत नाही. कारण त्यात आय बी एम च्या थॉमस वॅट्सनने १९४० च्या दशकात जे काही संगणकांच्या आवशक्यतेवरून "I think there is a world market for about five computers." म्हणले होते तसेच काहीसे वाटते. असो. तरी देखील एक लक्षात घेतले पाहीजे की लॅपटॉप बॅटरी जशी काँपॅक्ट असते तशी ही गोमूत्र बॅटरी नाही... थोडक्यात अजून तरी (लॅपटॉप बॅटरीपुढे) मोठीच आहे..
टाईम्स मधे दिलेल्या बातमीच्या आणि त्यावरील तुमच्या विश्लेषणासंदर्भात काही उत्तरे
बातमी वाचून मलातरी अस वाटतय की त्यांचे काम एखाद्या ७-८ वी मधील मुलाने विज्ञान प्रदर्शनात केलेल्या प्रयोगाच्या दर्जाचे आहे.
आय विश... म्हणजे त्यांचे संशोधन फार मोठे आहे असे म्हणायचे नाही. त्या संदर्भात मी सहमत आहे. पण आपल्याकडे सातवी-आठवीतील मुलांना प्रयोगशाळेत किती हात लावून देतील याचा विचार आला. संशोधन लांबच राहूंदेत. त्याव्यतिरीक्त क्लासेस सोडून असे प्रयोग करण्यात किती मुले "वेळ वाया घालवतील" हा अजून एक मुद्दा आहेच. :( त्यामुळे कॉलेजातील विद्यार्थ्यांचे कौतूक होते.
आणी यात गोमूत्र फक्त electrolyte म्हणून आहे. त्याऐवजी इतर कुठल्याही प्राण्याचे (not only cattle as the article says), माणसाचे पण, मूत्र वापरून हेच करता येइल.
मला वाटते तसे त्या बातमीत देखील म्हणले आहेच... फक्त गोमुत्राची उपलब्धता ही खेड्यापाड्यात इतर प्राण्यांच्या मुत्राच्या उपलब्धतेपेक्षा कित्येक पटीने अधिक असल्याने त्यावर भर दिला जात आहे. म्हणूनच असे संशोधन करणारे उत्तर -दक्षिण सर्वत्र दिसून येतील.
मी स्वतः "batterie's voltage is 10" or "battery is at 10V" असे म्हणेन पण कदाचीत मी जास्त छिद्रान्वेशी बनतोय,
सहमत. :) जे वाक्य जगार इतरत्रही वापरले जाते त्यावर केवळ येथेच टिका करत चर्चा भरकटवण्याचे कारण काय?
त्याव्यतिरीक्त काही सर्वसाधारण कॉमेंट्स...
१. टाईम्सच काय एकंदरीतच ज्या पद्धतीने बातम्या दिल्या जातात ते बघून खिन्न होयला होते...
२. आपल्याकडे पाश्चात्य पद्धतीने वैज्ञानिक प्रयोग करण्याची सवय अथवा माहिती ही तळागाळापर्यंत जाउंदेत सर्वसामान्यांपर्यंत पोचलेली आहे असे म्हणायची अवस्था नाही. त्याचे परीणाम सर्वत्रच दिसून येतात. त्यामुळे तुम्ही केलेल्या टिकेतील काही भाग या संदर्भात बरोबरच आहे पण त्यामुळे ते होक्स ठरत नाही असे मात्र वाटते.
22 May 2013 - 8:28 am | मराठीप्रेमी
तुमच्याशी बहुतांशी सहमत आहे. काही मुद्यांवर थोडे अजून स्पष्टीकरण देतो.
ग्रामीण भागात जर जवळपास उपलब्ध असणार्या साधनसंपत्तीचा वापर करून काही inovative होत असेल तर त्याचे स्वागतच आहे, परंतु म्हणून काय वाट्टेल ते दावे करु नयेत. यात दोन प्रकार असू शकतात. एक म्हणजे समाजासाठी काहीतरी खरच करायची इच्छा, परंतू तांत्रिक माहितीच्या अभावे चूका किंवा अवास्तव दावे. हे क्षम्य आहे. या व्यक्ती जर प्रामाणिक असतील तर चुका लक्षात आल्यावर त्या सुधारतील. दुसर्या प्रकारातील धोकादायक व्यक्ती म्हणजे स्वतःच्या फायद्यासाठी मुद्दामून चुकीचे दावे करणे. Ramar Pillai यात येतो. fb ची post ज्याला तुम्ही पहिला प्रतिसाद दिलात तीपण याच प्रकारात मोडते. अशा प्रकारचे अवास्तव दावे केले की जे काही थोडेफार शक्य असते ते पण संशयाच्या घेर्यात सापडते आणी हळुहळु लांडगा आला रे आला प्रमाणे वर तुम्ही म्हटल्याप्रमाणे "पण नाहीतर केवळ गोमूत्र म्हणजे काय सनातनी, गोमाता करत फिदीफिदी हसण्याचाच मुद्दा इतकेच त्यात उर्धृत होत होते असे वाटण्यासारखी परीस्थिती आहे." अशी परिस्थिती निर्माण होते.
Hoax : माझ्या मते खालीलप्रमाणे
१) गोमुत्रापासून वीजनिर्मिती : शक्य (hoax नाही)
२) त्या वीजेने एखादा दिवा लावणे : शक्य (hoax नाही)
३) त्या वीजेने mobile charge करणे : तांत्रिकदृष्ट्या शक्य, पण बहुतेक impracticle (but still not a hoax)
४) ४०० gram गोमुत्रापसून १२०० W.Hr उर्जा : definately hoax (स्पष्टीकरण खाली आहे)
लॅपटॉपच्या बॅटरीशी तुलना : लॅपटॉपच्या बॅटरीशी तुलना करण्याचा उद्देश थोडा वेगळा होता. त्या fb post प्रमाणे गोमुत्र बॅटरी १२०० W.Hr उर्जा पुरवते. ४०० gram गोमुत्रापासुन हे शक्य नाही (unless it is stone soup type of thing). लॅपटॉपच्या बॅटरीची क्षमता देण्याचा उद्देश हा होता की ज्यांना १२०० W.Hr हे interpret करता येणार नाही त्यांना तुलनेसाठी सध्याची best technology काय करु शकते ते कळावे. गोमुत्र बॅटरी लॅपटॉपच्या बॅटरीइतकी लहान आणी compact नसेल, पण ४०० gram electrolyte असणारी बॅटरी असुन असुन किती मोठी असेल? ही बाजारात उपलब्ध असणारी ~११०० W.Hr ची बॅटरी, जवळपास १० किलो वजन आहे. या विशिष्ट बॅटरी ची link देण्याचा उद्देश हा आहे की ही battery technology हलकी आहे, याच क्षमतेची lead-acid बरीच जड असेल. so, unless proven otherwise ४०० gram गोमुत्रापसून १२०० W.Hr उर्जा is Hoax. पहिले दोन दावे मान्य आहेत. कदाचीत अजुन काही वर्षांनी ५०० gram वजनाची १२०० W.Hr बॅटरी येइलही, graphene मध्ये potential आहे, पण आजतरी ते शक्य नाही.
तुम्ही दिलेले presentation वाचले. त्यात काहीच बारकावे नसल्यामुळे जास्त भाष्य करणे शक्य नाही. परंतु काही वाक्ये उदा. "Requires no engineering & mechanics", "No acid, distilled water etc are used", "Normal mobile charger is used" असे दर्शवतात की कदाचीत हे काम करणारी व्यक्ती मी वर म्हटल्याप्रमाणे पहिल्या प्रकारात येत असावी.
याविषयी थोडे स्पष्टीकरण देतो. ते वाक्य तुम्ही किंवा मिपा वर इतर कोणीही वापरले असते तर काहीच हरकत नव्हती, मी अजिबात आक्षेप घेतला नसता. आपण रोज बर्याच ठिकाणी असे करतो. समांतर उदाहरण द्यायचे झाले तर मला कोणी माझे वजन विचारले तर मी ६० किलोच सांगीन, ५८८ Newton असे सांगून विचारणार्याला वजन हवे का वस्तुमान असा प्रतिप्रश्न करणार नाही. किंवा कोणी जर पाककृती विभागात "काय छान गोल पराठा लाटला आहे" अशी प्रतिक्रिया दिली की त्याखाली "या आकाराला वर्तूळ म्हणतात, गोल नाही" अशी प्रतिक्रिया देणार नाही.
पण मूळ बातमी ही एका शोधाबद्दल आहे. त्यात scientific rigor ची अपेक्षा ठेवणे चूक नाही. आणी मूळ आक्षेप हा 10 volts of electricity ने काहीच उपयुक्त माहिती मिळत नाही, आणी जो ती माहिती देतो आहे त्याला ते समजतच नाहिये, हा आहे.
किंबहुना या अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या तुम्ही जे बोलत आहात की नुसती पोपटपंची करत आहात ते दर्शवतात (and sometimes it can go terribly wrong). "10 volts of electricity" किंवा "five wall clocks and a zero watts bulb can be operated simultaneously" यासारखी lousy वाक्ये scientific community मध्ये विश्वासार्हता घालवतात आणी वर म्हटल्याप्रमाणे लांडगा आला रे आला होतं.
22 May 2013 - 10:43 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
तुमचे दोन्ही प्रतिसाद विज्ञान आणि वैज्ञानिक पद्धत याबद्दल अतिशय उत्तम प्रकारे माहिती, विवेचन देणारे आहेत.
22 May 2013 - 11:26 am | मराठीप्रेमी
धन्यवाद
22 May 2013 - 5:21 pm | अनिरुद्ध प
लहान तोन्डी मोठा घास घेत आहे,पण माझ्या माहिती नुसार बाजारात मिळणार्या Battery ह्या watt/Hr या वर नाहित तर AH rating वर मिळ्तात जसे 12V 7AH etc.,तसेच त्यान्नी वरिल छायाचित्रात दाखव्लेला बल्ब हा 3 W LED Bulb,aahe तेव्हा तो बल्ब त्यान्नी सन्गित्ल्या प्रमाणे ४०० तास चालु शकतो कारण त्यात inbuilt inverter circuit असते, बाकी विकास यानी म्हट्ल्या प्रमाणे मी सहमत आहे.
22 May 2013 - 5:36 pm | नितिन थत्ते
watt hr आणि Ampere hr ही कन्व्हर्टिबल युनिट्स आहेत. साठवलेल्या एकूण ऊर्जेचे माप.
22 May 2013 - 5:57 pm | अनिरुद्ध प
watt hr आणि Ampere hr ही दोन्ही मापने मझ्या माहिती प्रमाणे वेगवेगळी आहेत्,जसे आपल्या घरात असलेली वीज मापके (electrical meters) ही माझ्या मते KW/Hr असतात,आणि Battery Capacity हि Ampere /Hr मध्ये असते,ईथे आपल्याला Watts calculate करावे लागते. तसेच मराठीप्रेमी यान्नी सुद्धा २५०० mA.Hr च्या cell ची link अशी दिली होति बाकी यात काही चुक असेल तर स्पस्तिकरण द्यावे म्हणजे आमच्या ज्ञानात भर पडेल.
22 May 2013 - 6:42 pm | नितिन थत्ते
Ampere-hr ला बॅटरीच्या व्होल्टेजने गुणले की watt-hr येतात. म्हणून कन्व्हर्टिबल युनिट आहेत असे म्हटले आहे.
22 May 2013 - 6:46 pm | नितिन थत्ते
watt-hr हे अधिक योग्य युनिट आहे. सेम अॅम्पिअर-अवरच्या दोन बॅटर्या वेगवेगळ्या व्होल्टेजच्या असतील तर अॅम्पिअर-अवर ची तुलना करता येत नाही.
22 May 2013 - 7:03 pm | अनिरुद्ध प
आपले म्हणणे समजले नाही,आणि माझ्यामते AH rating हे ISO मानान्कित Battery मापक आहे,तसेच आपण दिलेल्या सुत्रानुसार सुद्धा तुलना लगेच होवु शकते P=V*I.
22 May 2013 - 6:52 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
रोजच्या वापरातल्या बॅटरीज, ज्यांना आपण पेन्सिल सेल म्हणतो, त्यातल्या रिचार्जेबल प्रकारच्या बॅटरीजवर mAh असं एकक दिसतं. एक उदाहरणः
छोटे कॅमेरे वापरणार्यांना अशा बॅटरीज निश्चितच माहित असतील.
ठराविक बॅटरी पॅकमधून किती पावर तासाला मिळेल ते kW·h (किंवा W·h) मधे रूपांतरीत करतात नॉमिनल काही अवरोध (resistance) किंवा उपकरणाला लागणारं व्होल्टेज पकडून गणितं केली जातात.
घरात वापरली जाणारी मापकं kW·h या एककात मापन करतात, kW/Hr नव्हे. SI एककांमधे हे एकक रूपांतरीत केल्यास 3600 Joule असं उत्तर येतं. एका तासाला वापरली जाणारी पावर म्हणजे kW·h. घरच्या वीजेच्या बिलात किती 'युनिट' वीज वापरली ते दिसतं, ते हेच एकक, kW·h
(किलोचा k हा नेहेमी small case वापरण्याची पद्धत आहे.)
22 May 2013 - 7:11 pm | अनिरुद्ध प
अदितीताई,आम्ही शिकलो तेव्हा KW/Hr असे आठ्व्ल्या सारखे जाणवते असो मुद्दा मान्य आहे तेव्हा हे बदल नक्किच स्विकारुन ल़क्षात ठेवण्याचा प्रयत्न करिन.
22 May 2013 - 7:19 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
जौंद्या हो ही नॉनष्यांडर एककं. चांगली, सोन्यासारखी SI एककं वापरायची सोडून ही कसली convoluted एककं काढतात कोण जाणे! ;-)
22 May 2013 - 7:22 pm | नितिन थत्ते
KW/Hr असं काही नसतं बहुधा. (चूभूदेघे)
22 May 2013 - 7:32 pm | अनिरुद्ध प
तसेच W .h हे सुद्धा Battery मापना साठी नसत बहुधा. (चूभूदेघे)
22 May 2013 - 7:40 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
(एकाच बॅटरीपॅकवर वेगवेगळा अवरोध असणारी/वेगळं वॉटेज आवश्यक असणारी उपकरणं वापरायची असतील तर) mAh पेक्षा W-h हे एकक अधिक माहिती देणारं, पर्यायाने अधिक उपयुक्त आहे. व्यवहारात याची फार आवश्यकता नसते हे मान्य.
(इलेक्ट्रिकल सर्कीट्सशी खेळून बरीच वर्ष झाली आहेत. चूभूदेघे)
22 May 2013 - 7:17 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
यातून चुकीचा अर्थ निघतो आहे.
ठराविक बॅटरी पॅकमधून ठराविक लोडचं उपकरण किती तास/काळ चालेल हे ठरवताना नॉमिनल काही अवरोध (resistance) किंवा उपकरणाला लागणारं व्होल्टेज पकडून गणितं केली जातात.
चूक लक्षात आणून देण्याबद्दल नितिनचे आभार.
22 May 2013 - 7:35 pm | अनिरुद्ध प
येथे नितिन यान्चे स्पष्टिकरण दिसत नाही आहे.
22 May 2013 - 7:43 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
चूक लक्षात आणून 'तिकडे'* झालं. स्पष्टीकरण मीच दिलंय की इथे.
* जुन्याजाणत्यांना 'तिकडे' याचा अर्थ समजला असेलच. अर्थ लक्षात नाही आला तर वेदात आहे असं समजून टाकू! हाय काय नाय काय!!
22 May 2013 - 7:29 pm | सुबोध खरे
http://www.ehow.com/how_6147644_convert-amp-hours-kilowatt-hours.html
22 May 2013 - 8:59 pm | विकास
नुसतेच फिदीफिदी हसण्यापेक्षा विज्ञानाच्या पातळीवर चर्चा होत आहे, हे तुमच्याशी चालू असलेल्या उपचर्चेचे एक चांगले आउटकम आहे असे वाटते. :) अजून काही उत्तरे. (पण त्याआधी परत एकदा डिसक्लेमरः हे गोमूत्र ग्रेट आहे का, गोमाता की जय, वेदांमधे लिहीले आहे का वगैरे कशाशीही संबंधीत नाही. केवळ आपल्याला जे पटत नाही अथवा पटते त्या संदर्भात अर्थ लावताना कसा अर्थहीन विचार करत असतो याचे उदाहरण आहे - नाण्याची दुसरी बाजू. जशी वेदांची झिंग असू शकते तशीच विज्ञानाची देखील असू शकते. दोन्हीमुळे त्यांच्यातील जे काही चांगले असते त्याची विश्वासार्हता जात असते, इतकाच काय तो निष्कर्ष!)
पण ४०० gram electrolyte असणारी बॅटरी असुन असुन किती मोठी असेल? ही बाजारात उपलब्ध असणारी ~११०० W.Hr ची बॅटरी,
तुम्ही दाखवत असलेला ११०० W.Hr चा खोका (बॅटरी) आणि १२०० W.Hr गोमूत्र बॅटरीचा खोका ह्यांची चित्रे खाली डकवत आहे. त्यात काही फरक दिसतो आहे का? आधीच्या प्रतिसादात दिलेल्या सरकारी प्रेझेंटेशनमधील बॅटरीच्या खोक्याचा आकार ((पृ. ४)देखील बघू शकता... (दोन्ही पिक्चर्सच्या साईझ मधे फरक असला तरी तुलना करता येऊ शकेल.)
बातमीत अथवा सरकारी प्रेझेंटेशनमधे कुठेही गोमूत्राची बॅटरी ही काही हँडहेल्ड डिव्हाईस आहे अथवा हलकी-फुलकी आहे असे लिहीलेले नाही. त्यामुळे नक्की तुम्हाला गोमूत्राची बॅटरी म्हणजे काय वाटले म्हणून पुढे १० किलो वजन, भविष्यातले ५०० ग्रॅम वजन वगैरे लिहीले आहे? त्याचा काही संबंधच कळला नाही. तरी देखील वादापुरते गृहीत धरूया की तुम्ही म्हणता ते खरे आहे. त्यावरून तुम्ही ते होक्स आहे असा निष्कर्ष कसा काय काढलात? त्यात त्याची किंमत दाखवली असली तरी काही विकण्यासाठी प्रयत्न केलेला दिसला नाही अथवा गोमाता / आमचे पूर्वज वगैरे म्हणले गेलेले दिसले नाही.... रामर पिल्लईच्या बाबतीत ज्याचे तुम्ही उदाहरण दिले आहे, त्याने फसवले होते म्हणून सीबायने त्याला अटक देखील केली होती. म्हणूनच मी गो-ज्योतीच्या संदर्भात सरकारी प्रेझेंटेशन देखील दाखवले. (नाहीतर "असले" संदर्भ देखील देता आले असते. ;) ) येथे, जर तुमचे म्हणणे बरोबर आहे असे गृहीत धरले तर फार फार तर "तांत्रिक माहितीच्या अभावे चूका किंवा अवास्तव दावे" असे म्हणू शकता.
ते प्रेझेंटेशन हे केवळ पब्लीक आउटरीच वाटली. टाईम्स ऑफ इंडीयातील बातमी तर काय वृत्तपत्रातील बातमी आहे. त्याला तुम्ही वैज्ञानिक शोधनिबंधांचे निकष कसे लावता? (तरी देखील आपल्याकडे कशा बातम्या देतात या बद्दल आपल्या दोघांमध्ये असहमती आहे असे वाटत नाही.) एकतर अगदी सामाजीक आणि राजकीय बातम्या पण धड दिल्या जात नाहीत तेथे पत्रकाराने जर तुम्हाला वाटणार्या योग्य भाषेत बातमी दिली नाही तर त्यातून ज्यांनी कोणी प्रकल्प केला आहे त्यांची विश्वासार्हता कशी काय ठरवता? त्याही पुढे तुमचा आक्षेप हा "... volts of electricity ने काहीच उपयुक्त माहिती मिळत नाही" असा आहे... तो मान्य असला तरी सर्वसामान्यांना बातमी देत असताना टाईम्सच काय अगदी सायंटीफिक अमेरीकन पण " It's packing a deadly 5,000 volts of electricity." असली वाक्यरचना करताना आढळतात. तेच बीबीसी, न्यूयॉर्क टाईम्स, टाईम मॅगझीन वगैरे मधे पण दिसते. पण त्यावरून, ज्यासंदर्भात लेख लिहीला आहे त्यासंदर्भालाच रदबादल करणे काही पटत नाही. "डेंजर हाय व्होल्टेज" अथवा "डेंजर २२० व्होल्ट्स" वगैरे मधून जे समजले जाते तसेच (तितके नसले तरी) जेव्हढे सामान्य वाचकांना समजायला हवे तितक्या सोप्या पद्धतीने लिहायचा तो प्रकार आहे. त्या दृष्टीने मिसळपाववर आदी संस्थळांवर लिहीणे आणि वृत्तपत्रात लिहीणे यात फरक नाही आहे कारण ते सर्वसामान्यांसाठीच असते. म्हणूनच अगदी शास्त्रीय संशोधनावरील वृत्तपत्रीय बातमीत देखील सायंटीफिक व्हर्बोज नसते...
"10 volts of electricity" किंवा "five wall clocks and a zero watts bulb can be operated simultaneously" यासारखी lousy वाक्ये scientific community मध्ये विश्वासार्हता घालवतात आणी वर म्हटल्याप्रमाणे लांडगा आला रे आला होतं.
बातमी ही केवळ घटनेबद्दल असते, माहिती ही त्यातील डिटेल्स असतात. जर सायंटीफिक कम्युनिटी ही सायन्सवरील माहिती टाईम्स ऑफ इंडियावरील बातमी अथवा निव्वळ फेसबुकावरून वरून ठरवत असेल तर सर्वप्रथम सायंटीफिक कम्युनिटीचीच विश्वासार्हता किती असा प्रश्न विचारण्याची वेळ येईल. जर खरेच कोणी सायंटीफिक विचारांचे असले आणि त्यांना यात खरेच रस असेल तर निव्वळ लांडगा आला रे म्हणल्यावर, "थापच असणार" असे म्हणणार नाही तर त्यातील व्यावहारीकता पडताळून पाहून बाजूने अथवा विरुद्ध लिहीतील (जे तुम्ही करत आहात), जे योग्य आहे. नुसतेच करमणूकीचे साधन समजणार नाहीत. पण दुर्दैवाने तसे होते आणि जे काही लोकशिक्षण झाले पाहीजे ते होत नाही शिवाय सायन्सची पण विश्वासार्हता कमी होते ते वेगळेच.. असो.
23 May 2013 - 11:20 am | मराठीप्रेमी
तुमच्या डिसक्लेमर विषयी : याची खरतर गरज नाही. तुमच्या एकंदरीत प्रतिक्रिया वाचून ते बर्यापैकी स्पष्ट आहे.
पुढे जाण्याआधी एक मुद्दा हातावेगळा करतो. टाईम्स मधील बातम्यांची एकंदरीत विश्वासार्हता वगैरे बाबतीतली आपली मते मान्य आहेत. बातमीला शोधनिबंधांचे निकष लावू नयेत हे मान्य. "जर सायंटीफिक कम्युनिटी ही सायन्सवरील माहिती टाईम्स ऑफ इंडियावरील बातमी अथवा निव्वळ फेसबुकावरून वरून ठरवत असेल तर सर्वप्रथम सायंटीफिक कम्युनिटीचीच विश्वासार्हता किती असा प्रश्न विचारण्याची वेळ येईल." हे सुद्धा मान्य, परंतू या स्वरूपाच्या बातम्या वाचून हे काम करणारे नक्की किती पाण्यात आहेत याचा एक अंदाज नक्की बांधता येतो. आता जर त्या व्यक्ती माहितगार नसतील असे वाटले तर त्या अज्ञानातून तसे वागत आहेत का काही सुप्त malicious intent ने तसे वागत आहेत याचा अंदाज बांधणे / शोधणे हा नंतरचा भाग झाला. यात कुठे किती rigor योग्य हा थोडा वैयक्तिक मताचा भाग आहे. माझी तुमच्यापेक्षा जास्त rigor ची अपेक्षा आहे असे एकंदरीत चर्चेवरून दिसत आहे. Lets agree to disagree here (unless you want to continue).
आता मी मुळ मुद्द्याकडे येतो, FB post मधले दावे मला hoax का वाटतात या कडे. मला बहुतेक बर्याच गाळलेल्या जागा भरण्याची गरज आहे. मी माझी एकंदरीत विचारप्रक्रिया स्पष्ट करण्याचा प्रयत्न करतो.
गोमुत्रापासून वीज हे मी या धाग्यावर पहिल्यांदा वाचले. या धाग्यावर त्याचा पहिला उल्लेख आला तो आदिती ने fb post दिली तेव्हा, त्याआधी असे काही आहे याची मला कल्पना नव्हती. तुमचा प्रतिसादही तोपर्यंत आला नव्हता. मला ती post प्रचारकी थाटाची वाटली. त्यात जर त्यांनी गोमुत्रापासून वीज बनवण्यात यश मिळाले आहे इतकाच उल्लेख केला असता तर मी फार जास्त लक्ष दिले नसते, फारफारतर they are reinventing the wheel असे म्हणून दुर्लक्ष केले असते. पण खालील दोन वाक्यांनी माझ्या डोक्यात alarm वाजले.
"400 ग्राम गोमूत्र की बैटरी से 3 वाट का बल्ब 400 घंटे तक जलाया जा सकता है" आणी "तोषनीवाल ने दावा किया है की बिजली से चार्ज होने वाली बैटरियां 5-6 घंटे तक ही काम करती हैं, जबकि गौ- ज्योति बैटरी 400 ग्राम गो-मूत्र से 400 घंटे तक चलती है"
ही दोन वाक्ये मला अतिरंजित वाटली. या स्वरुपाच्या बर्याच गोष्टी (free energy, perpetual motion etc) मी याआधी बघितल्या आहेत, म्हणुन मी काही order of magnitude calculations केली आणी मला खात्री पटली की हे दावे चूकीचे आहेत. आणी ज्या fb page वर ती post होती ते बघून त्यांना संशयाचा फायदा द्यावासा वाटला नाही. ती fb post मुद्दाम खोडसाळ हेतूने लिहीलेली आहे असा मी माझ्यापुरता निष्कर्ष काढला. माझी order of magnitude calculations मी खाली थोडे अजुन खोलात जाऊन देतोय जेणेकरुन मला हा निष्कर्ष का काढावासा वाटला ते तुम्हाला समजेल.
दावा असा आहे की त्या बॅटरीचे व्होल्टेज १२V असून बॅटरी ३W power ४०० तास पुरवू शकते, थोडक्यात, ०.७५ A current (3W/12V). मला जी काहि माहिती आहे त्यानुसार मी खालील गणित केले.
१) zinc आणी copper वापरुन जो cell बनतो त्याचे voltage ~ 1V असते, थोडेसे कमीच, पण आपण 1V पकडून चालू. 12 V साठी असे किमान 12 cells parallel configuration मध्ये लागतील.
२) प्रत्येक cell 400 तासांसाठी 0.75A current पुरवेल. थोडक्यात, total charge = 0.75A*(400*3600)seconds = 1080000 Coulomb.
३) आता, एक Coulomb म्हणजे ~6.24*10^18 electrons, म्हणून 1080000 Coulomb = 6.74*10^24 electrons. zinc चा एक अणु २ electrons देतो, म्हणजे 6.74*10^24 electrons साठी 3.37*10^24 zinc चे अणु लागतील.
४) Avogadro's number वापरुन zinc चे वस्तुमान सहज काढता येइल. ते येते जवळपास ३६० grams. आणी हे 1V च्या cell साठी. 12V साठी जवळपास 4.5 Kg zinc electrolyte मध्ये dissociate व्हावे लागेल.
५) आता यात अजुन एक मजा आहे, electrolyte मध्ये Zn च concentration वाढले तर ते voltge कमी करतात कारण solid zinc मधून ions dissociate होणे कठिण होत जाते. म्हणजेच 4.5 Kg zinc solution मध्ये आल्यानंतर देखील त्या solution चे concentration moderate राहीले पाहीजे. यासाठी कदाचीत १०० ते १००० liters electrolyte लागेल (मला नक्की माहीत नाही पण या range बद्धल खात्री आहे). infact, या प्रक्रियेत जवळपास २.५ liter पाण्याचे विघटन होउन एक छानसा स्फोट होइल इतका hydrogen तयार होइल. ४०० gram गोमुत्राने काही होणार नाही.
आता "गोमुत्रापासून वीज" या मथळ्याखाली जर मी असा अवास्तव दावा सगळ्यात पहिल्यांदा वाचत असीन तर परत कधी "गोमुत्रापासून वीज" असे वाचले तर पुर्ण analysis न करता मी तो दुसरा दावा टाकाउ ठरवला तर दोष माझा कि अवास्तव दावा करणार्यांचा?
तुम्ही दिलेले बाकी दुवे वाचून अस वाटतय की एखादा छोटा दिवा लावण्याइतपत गोष्टी लोकांनी केल्या आहेत. आणी ते मान्य आहे. पण त्यापेक्षा फार जास्त दावे कोणी करत असेल तर ते hoaxच आहेत.
मी बाकी बॅटरीचे जे काही details दिले होते त्यात पण वर दिल्याप्रमाणे काही order of magnitude comparison शक्य होत म्हणून दिले होते, आता details देत नाही, प्रतिसाद फारच लांबलाय. पण याची पार्श्वभूमी नसताना हे करणे शक्य नाही, त्यामुळे ती माहिती का दिली आहे हा प्रश्न पडणे वाजवी आहे. मला बर्याचदा काही गोष्टी माहीत असताना ज्याला माहीत नाही त्याच्या दृष्टिकोनातून विचार करायला त्रास होतो आणी नंतर गाळलेल्या जागा भरायला लागतात.
यात गोमुत्र फक्त electrolyte चे काम करते, त्याजागी इतर कोणतेही electrolyte वापरता येइल हे तर या चर्चेत सहभागी झालेल्या सर्वांना मान्य आहे. मग दुसरे कोणते electrolyte वापरून zinc-copper cells बाजारात का मिळत नाहीत? कारण ते feasible नाहिये. zinc-copper cells वापरून एक 3W चा दिवा १५ दिवस चालू ठेवण्याची किंमत जवळपास ४५० रुपये होइल आणी प्रचंड प्रदूषण होइल (dissolved zinc मुळे). प्रामाणिक हेतूने काम करणार्या लोकांना ते एकदा proof of concept च्या पायरीपुढे गेले की हे स्वतःहून समजेल.
23 May 2013 - 2:52 pm | बॅटमॅन
_/\_ _/\_
तुस्सी ग्रेट हो निव्वळ.
मराठीप्रेमी आणि वस्तुनिष्ठ असा आयडी करा बघू तुमचा!!!
24 May 2013 - 7:17 pm | अनिरुद्ध प
आपले गणीत कळले नाही.
P=V*I हे सुत्र वापरले तर
I=P/V म्हणजेच 3/12=1/4=.0.25A ईतका current consume होइल,आपण 0.75A हे कसे calculate केले हे कळ्ले नाही म्हणुन हा प्रश्न प्रपन्च.
24 May 2013 - 7:56 pm | मराठीप्रेमी
धन्यवाद. घाईगडबडीत चूक झाली. ०.२५ बरोबर आहे. त्यामुळे पुढे पण सर्व ठिकाणी ३ ने भागावे लागेल, आणी १.५ Kg zinc लागेल असे उत्तर येइल. त्यामुळे फारसा फरक पडत नाही कारण हा आकडा पण दाव्याच्या कित्येक पटीने जास्त आहे.
अवांतर : तुम्ही चूक शोधल्यामुळे बरे वाटले. निदान कोणीतरी रस घेउन माझा प्रतिसाद वाचला याचे समाधान.
24 May 2013 - 10:03 pm | शिल्पा ब
असं नै हां...मी पण लक्ष देउन वाचला तुमचा प्रतिसाद. टेक्नीकल गोष्टी माहीत नाहीत ही वेगळी गोष्ट !
25 May 2013 - 3:09 am | मराठीप्रेमी
तुम्हालाही धन्यवाद हं.
24 May 2013 - 8:43 pm | विकास
Lets agree to disagree here (unless you want to continue).
सहमत
परंतू या स्वरूपाच्या बातम्या वाचून हे काम करणारे नक्की किती पाण्यात आहेत याचा एक अंदाज नक्की बांधता येतो.
अंदाज मी सुद्धा तुमच्यासारखाच काढला होता. किंबहूना आधी मी फेसबुकावरील ते हिंदी वाचायचा प्रयत्न देखील केला नाही, असल्या बातम्या दुर्लक्ष करण्यासाठीच असतात आणि मी दुर्लक्षच करतो. पण नंतर जेंव्हा त्यावर अधिक चर्चा दिसली तेंव्हा उत्सुकतेपोटी जास्त पाहू लागलो. पण त्यावर आधारीत मी अंदाज बांधला, निष्कर्ष काढला नाही. आणि अजूनही मी निष्कर्ष काढलेला आहे असे म्हणणार नाही. केवळ हे असू शकते, इतकेच म्हणत राहीलो आहे. (माझा सर्वात प्रतिसाद देखील पाहीलात तरी त्यातील पहील्याच वाक्यात मी ते स्पष्ट केले आहे. "होक्सेस नसावे असे टाईम्स मधील बातमी वाचल्यावर वाटले... ") त्यानंतर देखील मी जे काही लिहीले आहे ते फेसबूक पोस्ट विषयी लिहीण्याऐवजी असा प्रकल्प होत असेल का या संदर्भात लिहीले आहे आणि ते होक्स नाही हे देखील दाखवले आहे. खाली श्री. नितिन थत्ते यांना दिलेल्या प्रतिसादातील एक भाग जर वाचला नसेल तर येथे चिकटवतो:
हे अजून एक गोमूत्रावरील उदाहरण... (अवांतरः हा प्रकल्प देशपांडे फाउंडेशन ने फंड केला आहे. (माझ्याशी संबंध नाही). हे स्वत: देशपांडे सध्या बॅटरीच्या संदर्भातील बॉस्टनमधील एका कंपनीचे अध्यक्ष आहेत आणि गुंतवणूकदार ही आहेत.)
यात अथवा इतरत्र कुठेही गोमूत्र म्हणजे गो माता वगैरे कसलाही संदर्भ मी पाहीलेला नाही. त्या मधे सरकारी संस्था आणि स्थानिक महाविद्यालये पण संशोधन/प्रयत्न करताना दिसतात. त्यातही अजून एक गंमत म्हणजे, सरकारी प्रेझेंटेशनमधे लिहील्याप्रमाणे, ही बॅटरी वापरून वीज वापरल्यास कार्बन क्रेडीट्स पण मिळतात!
त्यात बरोबर-चूक असू शकते या बद्दल कदाचीत संशोधन करणारे देखील वाद घालणार नाहीत... पण त्यातील हेतू केवळ गोमाताप्रचार आहे, असे कुठेही आढळलेले नसताना निष्कर्ष काढणे हे समाजशास्त्रीय दृष्टीकोनातून अयोग्य वाटते आणि सुरवातीपासून माझा इतकाच मुद्दा आहे. असो.
25 May 2013 - 3:08 am | मराठीप्रेमी
याच्याशी सहमत आहे. काय झाल की यासंदर्भातील पहिला प्रतिसाद आपण दोघांनीही वाचला आणी त्यावर दोघांचीही प्रतिक्रिया वेगळी होती. मी काही मिनीटांतच त्याला hoax चे label लावून मोकळा झालो, तुम्ही बाकी काही संदर्भ शोधलेत आणी तुम्हाला ते थोडेफार तरी विश्वासार्ह वाटले. मला मात्र तुमच्या प्रतिसादातले संदर्भ तपासण्याची गरज वाटली नाही, मी तेसुद्धा तसेच झिडकारून टाकले. थोडक्यात माझे लांडगा आला रे आला सारखे झाले. वरील प्रतिसाद हे केवळ आपल्या दोघांची विचारप्रक्रिया नक्की कशी वेगळी होती आणी माझे नक्की कोणत्या कारणामुळे आणी कोणत्या वेळी लांडगा आला रे आला सारखे झाले ते स्पष्ट व्हावे केवळ यासाठीच होते. ते जर स्पष्ट केले नसते तर कदाचित मलासुद्धा "वेद किंवा गोमुत्र इत्यादी शब्दांची allergy असणारा" या साच्यात बसवले गेले असते.
देशपांडे फाउंडेशन विषयी : मी तो प्रतिसाद वाचला होता. देशपांडे फाउंडेशन विषयी मला फार माहिती नाही पण माझ्या मते त्यांची उद्दिष्टे थोडी वेगळी असावीत. अशा प्रकारचे प्रयोग, किंवा अशी विज्ञानप्रदर्शने यांची उद्दिष्टे थोडी वेगळी असतात असे वाटते (mostly human capacity development). या प्रतिसादात यावर अधिक भाष्य करत नाही, जर अजुन काही संदर्भ मिळाले ( फक्त देशपांडे फाउंडेशन नाही, तर इतरही असे उपक्रम) तर पुढील आठवडयात एक लेख अथवा चर्चाप्रस्ताव टाकीन.
22 May 2013 - 8:39 am | नितिन थत्ते
याचे उत्तर बहुधा "गो"मूत्राचे फाजील स्तोम हे असावे.
गोमूत्रातून वीजनिर्मिती होईल की नाही यात कोणालाच शंका नाही. असे जरी असले तरी तशी वीज निर्मिती कुणाच्याही मूत्रातून (कुठल्याही न्यूट्रल नसलेल्या द्रावातून) होईल हे ही उघड आहे. किंबहुना (पाण्याचा इनटेक कमी > जास्त ष्ट्राँग मूत्र असल्याने ) उंटाच्या मूत्रातून अधिक वीजनिर्मिती होऊ शकेल.
या गोष्टींकडे डोळेझाक करून सदर पोस्ट/ढकलपत्रे तयार करणार्यांचा (आणि मूळ संशोधन करणार्यांचाही) उद्देश गोमूत्रात(च) हा विशेष गुण असल्याचे भासवणे हा असतो. त्यातले पुढचे अध्याहृत विधान म्हणूनच-आपल्या-पूर्वजांनी-गोमूत्राला-पर्यायाने-गायीला-महत्त्व वगैरे-वगैरे असते.
म्हणून असल्या संशोधनांकडे स्केप्टिकली पाहिले जाते.
22 May 2013 - 9:08 pm | विकास
उंटाच्या मूत्रातून अधिक वीजनिर्मिती होऊ शकेल.
भारतात खेडोपाडी गायी आहेत पण वीज नाही, म्हणून गोमूत्राचा उपयोग करून वीजउत्पादनाचे व्हाएबल सोल्यूशन निघू शकते का यावर अनेक जण संशोधन करत आहेत. पण घरचे गोमूत्र सोडून अधिक निर्मिती म्हणून परत काय अरबांकडून उंटांचे मूत्र देखील आयात करायचे का?
हे अजून एक गोमूत्रावरील उदाहरण... (अवांतरः हा प्रकल्प देशपांडे फाउंडेशन ने फंड केला आहे. (माझ्याशी संबंध नाही). हे स्वत: देशपांडे सध्या बॅटरीच्या संदर्भातील बॉस्टनमधील एका कंपनीचे अध्यक्ष आहेत आणि गुंतवणूकदार ही आहेत.)
म्हणून असल्या संशोधनांकडे स्केप्टिकली पाहिले जाते.
मी स्केप्टिकली पहात होतो म्हणूनच आधी जरा शोधून माहिती काढली. आधीच निष्कर्ष काढून करमणूक करून घेतली नाही. त्याला वैज्ञानिक दृष्टी म्हणता येईल असे वाटत नाही. असो.
22 May 2013 - 9:48 pm | अर्धवटराव
अहो तो कुंभकर्ण होता... म्हणुन तो सहा महिन्यातुन एकदा तरी जागा व्हायचा.
अर्धवटराव
22 May 2013 - 10:13 pm | शिल्पा ब
थोडक्यात युरीनमधुन छोट्या स्केलवर विजनिर्मीती शक्य आहे..खरं ना? इतक्या लिंका वाचुन अन बघुन एवढंच समजलं.
24 May 2013 - 7:27 pm | अनिरुद्ध प
पुर्णपणे सहमत
21 May 2013 - 7:22 pm | टवाळ कार्टा
वेगळे उत्तर अपेक्शीत आहे???
20 May 2013 - 11:44 pm | प्यारे१
चालतंय की!
पाच सात आमी पन घिऊ... गाई! ;)
21 May 2013 - 12:17 am | मंदार कात्रे
21 May 2013 - 12:24 am | मंदार कात्रे
याचा अर्थ thoughts transfer from brain to other medium is possible! telepathy मध्ये हेच तंत्र संगितले आहे ना?
19 व्या शतकात मॅडम ब्लोव्होत्स्की , एनि बेजंट , सी डब्ल्यू लेडबीटर यासारख्या theosophist नी या सर्व भारतीय आध्यात्मिक सिद्धीचा अनुभव घेवून अनेक ग्रंथ लिहून ठेवलेत .ते वाचायचे कष्ट कोण घेणार ?
उगाच थट्टा करायची म्हणून काहीही लिहायचे असेल तर मग विवेकानंद/योगानंद यासारख्या महान भारतीय हिंदू तत्त्वज्ञ/योगी पुरुषांचीही थट्टा उडवणार का ?
इकडे थट्टा करणारे अडचणीत सापडल्यावर मग कशाला सिद्धीविनायकाच्या मंदिरात रांगा लावतात काय माहीत?
याचा अर्थ thoughts transfer from brain to other medium is possible! telepathy मध्ये हेच तंत्र संगितले आहे ना?
19 व्या शतकात मॅडम ब्लोव्होत्स्की , एनि बेजंट , सी डब्ल्यू लेडबीटर यासारख्या theosophist नी या सर्व भारतीय आध्यात्मिक सिद्धीचा अनुभव घेवून अनेक ग्रंथ लिहून ठेवलेत .ते वाचायचे कष्ट कोण घेणार ?
उगाच थट्टा करायची म्हणून काहीही लिहायचे असेल तर मग विवेकानंद/योगानंद यासारख्या महान भारतीय हिंदू तत्त्वज्ञ/योगी पुरुषांचीही थट्टा उडवणार का ?
इकडे थट्टा करणारे अडचणीत सापडल्यावर मग कशाला सिद्धीविनायकाच्या मंदिरात रांगा लावतात काय माहीत?
;)
21 May 2013 - 9:05 am | आबा
चुकीच्या आय.डी. ने प्रतिसाद दिलात काय कात्रे साहेब ? ! :)
21 May 2013 - 5:28 am | स्पंदना
२०१० मध्ये एकदा संजया अस नाव असलेली टेक्नॉलॉजी दोन इंडीयन तरुणांनी अमेरिकेत डेव्हलप केली होती. त्याचा व्हिडीओ मला आता सापडत नाही आहे.त्या टेक्नॉलॉजीनुसार कंप्युटरच्या मॉनीटर, सीपीयु अन किबोर्डची गरज नव्हती. पण हातात अन डोक्याला दोन हेडफोन साईझची गॅजेटस होती.
कल्पना अशी होती की बाहेर फिरताना आपण जेंव्हा कंप्युटर्वरुन ही माहीती मिळाली असती तर अस मिस करतो, जास्त करुन लांबच्या प्रवासात, तेंव्हा तेथील ऑलरेडी इन्स्टॉल्ड माहीतीचा उपयोग करुन कोणत्याही सरफेसवर प्रोजेक्ट करुन बोटांना असलेल्या गॅजेटच्या थ्रु ऑपरेट करायच अस काहीस होत. अर्थात याला वेदांचा काही बेस नाही पण हे नाव ठेवताना त्या दोघांना महाभारतातल्या संजयची आठवन आली अस ते म्हणाले होते.
माझी माहिती बरीच विस्कळीत आहे माफ करा, पण कोणाला ही माहीते असेल तर इथे शेअर होउ शकेल.
21 May 2013 - 7:14 pm | खबो जाप
http://www.youtube.com/watch?v=YrtANPtnhyg
21 May 2013 - 7:21 pm | टवाळ कार्टा
ही घ्या...
hee
भारी आहे
21 May 2013 - 10:01 am | आनंद घारे
१ अ = क
२. ब = क
म्हणून अ = ब
याच प्रकारे
१.नॅनोटेक्नॉलॉजी म्हणजे काय ते मला माहीत नाही.
२. वेदात काय काय लिहिले आहे हे मला माहीत नाही.
याचाच अर्थ वेदात नॅनोटेक्नॉलॉजी लिहिलेली आहे
असले तारे तोडायचा लोकांना कंटाळा कसा येत नाही ते सुद्धा बहुतेक वेदांमध्येच लिहिलेले असावे.
21 May 2013 - 10:24 am | नितिन थत्ते
वेड लागले आहे असा शब्दप्रयोग बदलून "वेद लागले आहे" असा शब्दप्रयोग रूढ करावा का?
21 May 2013 - 12:22 pm | सहज
२०१४ ला भ्रष्टाचारी असुर राज संपून वैदिक अनुष्ठान स्थिर झाले तर अणुउर्जा ह्या बेसिक उर्जेने सुरवात होउन आपले सर्व महान गुह्य ज्ञान टपटपलेच समजा. मग बघा जगाला वेद लागेल वेद!
21 May 2013 - 2:58 pm | अनिरुद्ध प
२०१४ ला भ्रष्टाचारी असुर राज संपून वैदिक अनुष्ठान स्थिर झाले तर अणुउर्जा ह्या बेसिक उर्जेने सुरवात होउन आपले सर्व महान गुह्य ज्ञान टपटपलेच समजा. मग बघा जगाला वेद लागेल वेद!'
सहजरावान्चे हे महान भविष्य कथन ऐकुन खूपच मनोरन्जन झाले,ही ही ही.
21 May 2013 - 4:23 pm | अविनाशकुलकर्णी
कामसशात्राचे विद्यान हे उपयोगी असे शास्त्र आहे...
व सर्व जगात त्याचा उपयोग होतो..
योग शास्त्र प्राणायाम पण जगाने स्विकारले आहे.
शुन्याचा शोध जगाला उपयुक्त असा आहे.
भाजणे तळणे शेकणे ह्या स्वयंपाकाच्या क्रिया पण जगाने मान्य केल्या आहेत.
ता.ना.पि.हि.नि.पा.जा व सारेगमपधनिसा..हे शोध पण जग्न्मान्य आहेत जे भारतिय आहेत.
भारतिय खद्य पदार्थानी जगास वेड लावले आहे.
21 May 2013 - 7:24 pm | टवाळ कार्टा
हे इतके सगळे असताना निवडणुकीच्यावेळी साली आपली अक्कल कुठे ***त जाते
21 May 2013 - 4:27 pm | बॅटमॅन
हा धागा पाहून वैदिक ऋषी चिडले आणि त्यांनी अस्मादिकांना खालील मिथ्याशास्त्रप्रचारखंडनसूक्त लिहावयास फर्मावले.
अध्ययनविहीना: ये भ्रमन्ति पण्डिता इव |
अज्ञजनान् वञ्चयन्ति शठा: मूढा: भयङ्करा: ||
सर्वमाधुनिकं ज्ञानं वेदेष्विति ब्रुवन्ति ये |
न च ते वैदिका: सर्वे न च वैज्ञानिका: स्मृता:||
न जानन्ति घनपाठः न शास्त्रं आभियान्त्रिकम् |
न जानन्ति श्रौतं ते न च सङ्गणकं खलु ||
गूगलमपि तैर्नैव हि खलु उपयुज्यते |
निजतर्कप्रयोगो हि तेषां तु प्रतिबन्धितः ||
अस्मदीयेषु सर्वेषु धर्मग्रन्थेषु सर्वतः |
अनेकवारं हि कथितं महात्म्यं ऋतसत्ययो:||
पठित्वा काव्यमध्यात्मं सुन्दरं चापि नैतिकम् |
तेन सर्वे जना: कुर्यु: सुन्दरं निजजीवनं ||
पठित्वा चतुरो वेदा: ज्ञातो पूर्वेतिहास सः |
उपनिषत्सु सर्वेषु तत्वज्ञानं महत्तरम् ||
युद्धस्य या हि कथा: रम्या: प्राप्ता रामायणे जये |
पुराण-भागवतेषु विभिन्नाश्च कथा: खलु ||
योगस्तु योगवासिष्ठे योगसूत्रेषु चापि सः |
तथा गीतोपनिषत्सु पठितव्यो हि सर्वतः ||
यद् यत्र पठितव्यं तत् तत्रैव पठयेत् खलु |
तन्मुञ्च्य किमप्यज्ञानं ये सर्वे पाठयन्ति वै ||
हरिणाक्षीत्युपमया योषित् वा यदि वर्णिता |
शृङ्गे कुत्रेति पृष्टं तै: मूर्खैश्च मुञ्च्य योषितम्||
मुखाच्च वाल्गुदेयस्य वदन्ति पूर्वसूरिणः |
पापीयान् स भवेदेकः असत्यं योऽपि पाठयेत् ||
पठित्वा अर्धसत्यानि सत्यानीव वदन्ति ये |
असत्यभाषणात्सर्वे नरकं यान्ति सत्वरम् ||
21 May 2013 - 4:55 pm | मैत्र
मिपा मराठी संस्थळ आहे असे कुठेतरी वाचले होते...
21 May 2013 - 5:00 pm | बॅटमॅन
बरं मग??? मिपाला संस्कृतची किंवा फॉर द्याट म्याटर अन्य भाषांची अॅलर्जी असल्याचे वाचलेले कुठे आढळत नाही. एकाच भाषेबद्दल इतके आग्रही असणे हे नॉर्थ इंडियनांना शोभते, मराठी लोकांना नाही. :)
21 May 2013 - 9:53 pm | मैत्र
मिपाला अन्य भाषांची अॅलर्जी आहे असं कुठे वाचलं नाही.
नॉर्थ इंडियन वगैरे फालतू कॉमेंट्सची अॅलर्जी नाहि तर मग कशाचीच नसावी.
आणि एकाच भाषेबद्दल आग्रही दक्षिण भारतीयही आहेत बरं का..
यापूर्वी हिंदी / इतर भाषातले प्रतिसाद / इंग्रजी यावर कचकून टिका, चर्चा प्रतिसाद आणि प्रतिवाद झाले आहेत. बॅमॅ तात्यांइतकाच जुना असल्याने तुम्हाला सर्वच माहीत असेलच.
आपल्याला अनेक भाषा येत असतील. आदर आहेच. पण त्यातून काय साध्य होते आहे माहीत नाही.
मला काही दक्षिण भारतीय भाषा येत असतील तर मी त्यात प्रतिसाद लिहायला लागू काय?
वाचणार्याला काय फरक पडत नसेल तर नसू दे .. मी मुद्दामून लिहिणारच मग सरळ संस्कृत मध्येही धागा काढा..किंवा इंग्रजी / हिंदी / कानडी / तमीळ मध्ये.. कारण इतर भाषांची अॅलर्जी नाही.. आणि इथे कोणी नॉर्थ इंडियन नाही..
आनंद आहे..
21 May 2013 - 10:04 pm | प्रसाद गोडबोले
अगदी बरोबर , आनंद साऊथ इंडीयन आहे , तमिळनाडुचा आहे तो . पण तो इथे आहे ? मिपावर ?
21 May 2013 - 10:07 pm | बॅटमॅन
हिंदीचा आग्रह धरणारे उत्तर भारतीय हे जास्त डोक्यात जातात म्हणून तसे म्हणालो. बाकी सहमत आहेच.
मजा आहे. सर्रास इतर भाषांतील प्रतिसाद येत असतील तर ठीके, पण माझ्याकडून असे किती प्रतिसाद टंकले गेले? त्यामुळे काय झाले? याचा टंकण्याआधी सारासार विचार करावा आणि मग लिहावे.
आणि सर्वांत डोक्यात गेलेला प्रश्न म्हंजे यातून साध्य काय होते???
तर हा प्रश्न उपस्थित करणारे तुम्ही कोण? हा एग्झिबिशनिझमचा प्रकार तुम्हाला वाटत असेल तर मिपावरचा प्रत्येक धागाच कमीअधिक फरकाने लोकांनी चान चान म्हणावे म्हणून काढला जातो असे म्हणायला हरकत नसावी. असा प्रश्न विचारून काय साध्य होते?
राहता राहिला तुम्ही अजून तमिळ किंवा चिनी भाषेत काही लिहिले तर...पब्लिक घेईल काय तो निर्णय. चान चान म्हणेल किंवा फाट्यावर मारेल, इतकी काळजी करण्याचे काही कारण नाही. आणि जेव्हा जेव्हा आम्ही संस्कृतमधून बरळलोय तेव्हा पब्लिकला प्राब्ळम असल्याचे दिसले नाही. तुम्हाला जर इतका प्राब्ळम असेल तर तुम्ही आमचे बरळणे फाट्यावर मारा. फाट्यावर मारण्याची अॅलर्जी तर मिपाला मुळीच नसावी.
22 May 2013 - 5:34 pm | मैत्र
सारासार विचार -- तुमच्याकडून असे अनेक प्रतिसाद आल्यावरच हे टंकायला हवे होते असा अर्थ होतो.. नोंद घेतली आहे.
उपस्थित करणारे तुम्ही कोण? -- मी कोणी विशिष्ट उदा. संपादक किंवा कोणी महत्त्वाची व्यक्ती असेल तरच काही प्रश्न उपस्थित करावा का?
हो पण मिपावरचा प्रत्येक धागाच कमीअधिक फरकाने लोकांनी चान चान म्हणावे म्हणून काढला जातो असे म्हणायला हरकत नसावी. -- या गोष्टीशी सहमत आहे.
तुम्ही बरळता असं काही म्हणणं नाही.. मुद्दा भलतीकडे नेण्याचा प्रयत्न कशाला..
काळजी करण्याचे खरं तर कारण नाही.. असं मनात आलं होतं.. इथे काही आयडी अतिशय उद्धटपणे लिहितात. काही कायमस्वरुपी एकच बाजू घेऊन लिहितात किंवा काही विनाकारण शब्दबंबाळ.. काही काळानंतर मीच काय एकूण मिपाकरांनी त्यांच्याशी यावर वाद घालणे अनुभवांती सोडून फाट्यावर मारायला सुरुवात केली आहे..
बॅमॅ आयडीचा आजवर असला अनुभव नव्हता म्हणून लिहिलं..
असो.. तुमचा प्रतिसाद सल्ला आहेच त्याप्रमाणे फा. मा. आ. आ.
22 May 2013 - 5:51 pm | बॅटमॅन
नाह! तुम्ही सोडून अजून कोणीच असे बोलताना दिसले नाही म्हणून विचारले.
वोक्के.
21 May 2013 - 5:10 pm | विकास
तुमची संस्कृत प्रतिभा जागृत होऊन आम्हाला वाचण्यास मिळण्यासाठी तरी असले धागे अधनंमधनं(च) यावेत असे वाटते! :)
मस्तच!
21 May 2013 - 7:14 pm | बॅटमॅन
धन्यवाद :)
कधीकधी पिन लागते मग होतं असं काहीतरी ;)
21 May 2013 - 7:48 pm | मदनबाण
कधीकधी पिन लागते मग होतं असं काहीतरी
हॅहॅहॅ... वटवाघुळ मानवा खरं खरं सांग तुला संस्कॄतोमेनिया झाला आहे ना ? ;)
21 May 2013 - 7:59 pm | बॅटमॅन
काश असं काही असतं ;) मज्जा आली असती ;)
21 May 2013 - 5:33 pm | अनिरुद्ध प
हे अर्थासहीत लिहीले असते तर आमच्यासार्ख्या पामरन्ना तरि कळले असते.
21 May 2013 - 5:43 pm | बॅटमॅन
सारांश सांगतो.
"कसलेही अध्ययन न करता पंडित असल्याच्या थाटात भोळ्या लोकांना गंडवणारे हे मूर्ख लोक भयंकर असतात. वेदांमधले आणि विज्ञानामधले अशा दोहोंतीलही त्यांना काही कळत नाही. घनपाठ कळत नाही तसे इंजिनिअरिंगही कळत नाही. श्रौत कळत नाही तसे कंप्यूटरही कळत नाही. ते गूगलही वापरत नाहीत आणि स्वतःची बुद्धी वापरणे त्यांच्यासाठी जणू बॅन असते. आपल्या सर्व धर्मग्रंथात सत्य बोलण्याचे महत्व वर्णिलेले आहे. अनेकविध मूल्ये वर्णिली आहेत. त्यांच्या सहाय्याने स्वतःचे जीवन सुंदर केले पाहिजे. वेद वाचून जुना इतिहास कळतो, उपनिषदांत तत्वज्ञान मांडले आहे. रामायण-महाभारतात युद्धादिंची वर्णने, तर पुराणे-भागवत येथे अनेक प्रकारच्या कथा आहेत. योगवासिष्ठ, भगवद्गीता, योगसूत्रे यांसारख्या ग्रंथांत योगशास्त्राचे वर्णन आहे. जिथे जे वाचणे योग्य आहे तेच वाचले पाहिजे. ते सोडून भलतेच काहीतरी घुसडणे असे प्रकार हे अज्ञानी लोक करतात. म्हणजे मग कुणा स्त्रीचे वर्णन हरिणाक्षी असे केले तर बाकीचं सोडून शिंगे कुठे आहेत असे विचारण्यापैकी प्रकार झाला.
"वाल्गुदेयाच्या मुखाने पूर्वीचे ऋषी/कवीच जणू बोलत आहेत, की खोट्यानाट्या गोष्टींचा प्रचार करणारे लोक पापाचे धनी होतात.अर्धवट सत्य गोष्टी पूर्ण खर्या म्हणून दडपणारे लोक असत्य भाषणाच्या योगे नरकास जातात."
21 May 2013 - 6:39 pm | निवांत पोपट
हा! हा! मस्त आहे ..
पण हे सुदध्दा आम्ही वेदात वाचलं आहेच की !;) ;)
21 May 2013 - 7:03 pm | बॅटमॅन
हीहीही ;)
21 May 2013 - 7:04 pm | विकास
बॅटमॅन महाराज की जय! :-)
21 May 2013 - 7:24 pm | अनिरुद्ध प
बॅटमॅन महाराज की जय!जय
21 May 2013 - 9:55 pm | मैत्र
हेच वर संस्कृत बरोबर किंवा कोणी विचारायच्या आधी दिले असते तर अधिक आवडले असते..
21 May 2013 - 11:47 pm | मराठीप्रेमी
छान. किमान शब्दात कमाल आशय. पण या गोष्टी ज्यांना समजायला पाहिजेत त्यांना समजत नाहीत. ते तेच तेच दळण दळत बसतात. तिकडे बायबलवाले पण हेच करतात.
22 May 2013 - 1:55 am | महाबळ
ते वाचल्यावर कळालं, आधि सगळं डोक्यावरुन गेलं होतं. :)
22 May 2013 - 11:47 pm | अत्रुप्त आत्मा
@"वाल्गुदेयाच्या मुखाने पूर्वीचे ऋषी/कवीच जणू बोलत आहेत, की खोट्यानाट्या गोष्टींचा प्रचार करणारे लोक पापाचे धनी होतात.
अर्धवट सत्य गोष्टी पूर्ण खर्या म्हणून दडपणारे लोक असत्य भाषणाच्या योगे नरकास जातात.">>> __/\__/\__/\__
या वाल्गुदेयाची वाणी,भासे जणू वेद वाणी
आज सारे 'सत्य' जणू,प्र 'कटले' आपुल्या चरणी ;)
21 May 2013 - 6:38 pm | पैसा
साधु: साधु: !!
22 May 2013 - 8:32 am | प्रचेतस
जबरी रे बॅट्या.
21 May 2013 - 4:35 pm | मदनबाण
ह्म्म्म... चालु ध्या.
ज्यांना या विषयात रस असेल त्यांच्यासाठी काही दुवे देवुन ठेवतो...
Origin of Environmental Science From Vedas
Science in Ancient India
Vedanta and Quantum Physics
Particles, Consciousness, Volition: A Vedantic Vision
Vedic Knowledge and Quantum Mechanics Part - 1
जाता जाता :- बाकी गोमुत्रावरुन हंबरडा फोडणार्यासांठी एक वेगळी जुनी बातमी देतो...
Cow urine drug developed by RSS body gets US patent
21 May 2013 - 6:38 pm | मूकवाचक
Vedic Friends Association
21 May 2013 - 4:39 pm | कवितानागेश
पण विज्ञान म्हणजे काय?
आणि प्रगती म्हणजे काय?
21 May 2013 - 4:42 pm | बॅटमॅन
व्याख्या कशीही करा, त्याने काही फरक पडत नाही. एकदा व्याख्या हातात आली की वेदाच्या फूटपट्टीने हे सगळे आधीच मोजले होते असे सांगणे औघड नाही. :)
21 May 2013 - 5:21 pm | मदनबाण
माउ हे वाच :-
From Newton to Nirvana:Science, Vigyan and Gyan
प्रगती म्हणजे काय?
अधोगतीच्या उलट जे असते ते ! ;)
21 May 2013 - 5:29 pm | अनिरुद्ध प
वेदाच्या फूटपट्टीने ही कोणती नवी मापन पद्धत ? बट्ट मण्ण यान्चा नवा शोध.
21 May 2013 - 7:08 pm | खबो जाप
http://www.youtube.com/watch?v=YrtANPtnhyg
ह्याचा वेदांशी काही संबंध नाही आहे पण खूप इंत्रेस्तिंग गोष्ट आहे आणि महत्वाचे कि एका भारतीय माणसाने हे सध्या केले आहे
पूर्ण विदेओ जरूर बघा
प्रनव मिस्त्रि ज्यने हे सध्य केले आहे तो एका मुलाखतीत म्हणाला होता कि भारतीय पुराणे हि सायन्स फ़िच्कशन पेक्षा ज्यादा समृद्ध आहेत आणि त्याने त्यापासूनच प्रेरणा घेतली आहे ( http://www.youtube.com/watch?v=vaXTeEMi9PA)
22 May 2013 - 12:08 am | मराठीप्रेमी
भारतीय पुराणे हि सायन्स फिक्शन पेक्शा जास्त समृद्ध आहेत यात तर कोणालाच आक्षेप नसावा.
22 May 2013 - 6:24 pm | प्रसाद गोडबोले
ही समृध्दी कोणत्या युनिटमध्ये मोजतात ?
22 May 2013 - 6:38 pm | अनिरुद्ध प
शोध सुरु आहे,पुर्ण झाल्यावर जाहिर करण्यात येईल.
22 May 2013 - 6:47 pm | प्रसाद गोडबोले
मग जोवर संशोधन पुरण होत नाही तोवर हे विधान
कंजक्चर आहे असे मानुयात अन त्याच्या विषयी स्केप्टिकलच राहुयात !
22 May 2013 - 6:48 pm | बॅटमॅन
नै म्हंजे कल्पनाशक्ती हा निकष लावला तर काळाच्या मानाने पुराणे खतरनाक कल्पक मानावयास काहीच हरकत नसावी.
22 May 2013 - 7:00 pm | प्रसाद गोडबोले
नॉट कन्व्हिन्सड .
अशी कशी तुलना करता येईल ? करायचीच असेल तर दोन्ही , पुराणे आणि सायन्सफिक्शन एकाच प्लॅटफॉर्मवर असले पाहिजेत . आता उदाहरणार्थ : मॅट्रीक्क्ष पिच्कर सत्यत उतरायला कदाचित १०००-२००० वर्ष अजुन लागु शकतील (कदाचित जास्तही )
आत्ताच ही सायन्स फिक्शन आपल्या पुराणाम्पेक्षा कमी संमृध्द आहे असे कसे म्हणता येईल ? We cannot compare two different things in two different & space time frame .
मला म्हणायचे इतकेच होते की जे ते आपापल्या जागी संमृध्दच आहे ! पुराणे पुराणांच्या जागी अन सायन्सफिक्शन सायन्सफिक्शनच्या जागी !!
22 May 2013 - 9:31 pm | बॅटमॅन
अर्थातच, असा दावा करणे चूकच आहे.
अशा गोष्टींची परस्परांशी केलेली तुलना पूर्णपणे वॉटरटाईट नसते हे मान्य. पण अशी तुलना करणे चूकच आहे असेही नाही. एंड रिझल्ट पाहिला तर इमॅजिनेशन तुल्यबळ आहे किंवा नाही हे पाहणे रोचक ठरावे. आणि ज्या काळात पुराणे लिहिली गेली त्या काळच्या प्रत्यक्ष भौतिक प्रगतीच्या तुलनेत ते इमॅजिनेशन नक्कीच डोळ्यात भरण्याजोगे आहे. जसे आत्ता आसपास तांत्रिक प्रगती पाहिली तर त्या तुलनेत साय-फाय खत्रा वाटते, तसे तेव्हा पुराणांतील गोष्टींबद्दलही वाटले असणारच. काही भाग हा आजही फ्यूचरिस्टिक वाटतो हे रोचक आहे असे माझे म्हण्णे.
अर्थातच!! साय-फायमधल्या रिगरची तुलना पुराणांशी होऊ शकत नाही. पण काही भाग तरी स्टँड्स आऊट असं आपलं मला वाटतं, असो. :)
24 May 2013 - 6:12 pm | श्रीनिवास टिळक
२ ० ० ९ पासून श्री सतीश कुलकर्णी (satish.kulkarni@kpmi.biz) यांच्या मार्गदर्शनाखाली वैदिक विज्ञान दिन पुण्यात साजरा होत आहे. २ ० १ ० मी अनायासे पुण्यात होतो तेव्हा मुक्तांगण (सेनापती बापट मार्ग) येथे त्याला उपस्थित होतो. गेल्या तीन वर्षांपासून तो Ferguson College मध्ये होत आहे. मागील पाच वर्षात झालेल्या काही कार्यक्रमांची माहिती खाली देत आहे त्यावरून वेद आणि विज्ञान यांच्यामधील संबंधाबद्दल काही कल्पना यावी.
Keynote addresses
Dr. Shrinathan Chakravarthi, Dr. Vijay Bhatkar.
Seminars:
(1) Consciousness: scientific & Vedic perspectives with Dr. S. Gowarikar as chairman and Dr. Deepak Ranade (Neurosurgeon), Dr. S. R. Talghatti (Red. Prof. of Philosophy U.O.P.), and Dr. B.D. Kulkarni (Distinguished Scientist) as participants.
(2) Relevance and acceptability of oriental sciences and technologies in present era.Participants included: Dr.Medha Dhurandhar, Dr.Ulrich Berk, Dr. A. S. Nene, Dr. S. Madavgane, Dr. Mangla Mirasdar, Dr. Vijay Didolkar, Dr. D.M. More (Ex Director General – Jal Sampada, Govt Of Maharashtra).
(3) Policy on inducting Vedic science subjects in university curriculums. Participants included Dr. Vijay Didolkar, Dr. Chandragupta Varnekar, Dr Madangopal Varshne, Mr. Prafulbhai Pandya, Dr. Madan Gopal Varshney, Mr. Satish Kulkarni.
Presentations:
(1) Vedic science and modern technology: the relation between the two by Manuscriptologist Dr Shankar Nene.
(2) Neuroscience & Yoga, an Indo-German project presentation By Dr. Sanjay Phadake & his research team;
(3) Agnihotra: an Effective Remedy to Counter Nuclear Radiations by Dr Ulrich Burk
Papers:
Dr. Sudhakar Shasti: Vedic Technology to Produce Nano-Particles
Dr. Anirudhha Joshi: Demonstration of Different Types of Pulse (Nadi) on Computer Screen
Dr. Manohar Kotwal: Successful & Stress free management techniques as prescribed by ancient sages.
Release of books by Prof Narayan Gopal Dongre of Benares Hindu University
(1) Translation of Amshubodhini, which is a cosmological text dealing with the evolution of the universe, which began, it states, with a bindu visphuta or mahavisphuta (big bang).
(2) Physics in Ancient India (New Age International Publishers, 1994) presenting the Hindu understanding of physics based mainly on the Vaisisika Darsana. It describes the methodology of science and elaborates the concepts of mechanisms, physics and chemistry in 17 Chapters and two Appendices.
24 May 2013 - 6:49 pm | विकास
माहिती खूपच रोचक आहे. आपल्याकडे यातील एखादे पुस्तक असेल तर त्यावरील माहिती-परीक्षण एक स्वतंत्र लेख म्हणून येथे द्यावेत ही विनंती.
27 May 2013 - 4:07 pm | अनिरुद्ध प
आपण श्री श्रीनिवास टिळक यान्च्याशी सम्पर्क करुन वरिल विषयावर एक अभ्यासपूर्ण धागा निर्माण करावा हि विनन्ति.
28 May 2013 - 6:29 pm | श्रीनिवास टिळक
(1) प्रा डोंगरे यांची पुस्तके डॉ शंकर नेने (चांदणी चौक, पुणे) यांच्याकडे उपलब्ध आहेत. मी त्यांना सुचविले आहे की त्यांनी मिपावर येउन त्याबद्दल अधिक माहिती द्यावी.
(2) प्रा सुभाष काक (Head, Dept of Computer Science, Oklahoma State University, Stillwater, OK) आणि श्री सुबोध कुमार (Director Gosamvardhan Kendra, New Delhi ) यांच्या अनुमतीने वेद आणि विज्ञान या विषयावर त्यांनी लिहिलेल्या साहित्याचे दुवे खाली देत आहे.
(3) गोसंवर्धन वरून एक आठवण झाली. वेदात प्रजापतीची शिकवण आहे की मानवाने पशु आणि पक्षी यांच्या सान्निध्यात निसर्गात एकोप्याने राहून उत्कर्ष साधावा (परस्परं भावयन्तः). तदनुसार श्रीमती शुभा राउळ या मुंबईच्या महापौर असताना (2007-2009) त्यांनी त्यांच्या दादरच्या राहत्या परिसरात एक गाय ठेवली होती. तसेच सध्या प्रचलित सहकारी गृहरचनांमध्ये गो सदनेही राखावी असं मत त्यांनी व्यक्त केलं होतं.
(1) Writings of Prof Subhash Kak
http://www.cs.okstate.edu/~subhashk/MindSelf.pdf
http://www.ece.lsu.edu/kak/sutra.pdf
http://www.cs.okstate.edu/~subhashk/THE%20NATURE%20OF%20PHYSICAL%20REALI...
http://www.cs.okstate.edu/~subhashk/AstronomicalCodeRgveda.pdf Chapter 12 of this book discusses origins of Indian astronomy.
(2) Writings of Shri Subodh Kumar (subodh1934@gmail.com )( संगणक तंत्रात फारशी गती नसल्यामुळे हा दुवा बरोबर आला नाही तर श्री सुबोध कुमार यांच्याशी परस्पर संपर्क साधावा)
About GOSHALMilk for DelhiAS.doc
57K View Download
big goshalas food courts.doc
37K View Download
28 May 2013 - 7:48 pm | अनिरुद्ध प
वाचन करत आहे,महिती बद्दल आभार