गाभा:
उगाच प्रतिसाद/लेखांची कापाकापी करत सुटणार्या "अति कार्यक्षम"संपादक सदस्यांवर जाहीर अविश्वास ठराव आणण्यासाठी हा प्रस्ताव आहे. 'प्रभारी संपादक' ह्या पदापासून 'संपादक' असे प्रमोशन घेण्यापूर्वी समस्त संपादक मंडळाने ह्या ठरावाला सामोरे जावे. अर्थातच ह्यावर प्रभारी संपादक ह्या नात्याने आमच्यावरही अविश्वास ठराव गुदरल्यास आम्ही आमचे अधिकार मालक श्री. तात्या अभ्यंकर ह्यांच्या स्वाधीन करून एक सामान्य सदस्य म्हणून मिसळपावचा आस्वाद घ्यायला मोकळे होऊ.
जय मिसळपाव!
-कोलबेर
प्रतिक्रिया
27 Nov 2007 - 12:44 pm | कोलबेर
अरे वा! २५ मिनिटे झाली तरी एकही प्रतिसाद नाही? काल, अवकाश आणि पुंज भुमिती वरील क्लिष्ट लेखाला ३० मिनिटात प्रतिसाद देणारे एका 'यूसलेस' संकेतस्थळाचे इथले सभासद कुठे गेले?
27 Nov 2007 - 12:54 pm | आनंदयात्री
रात्र झाली हो आता. का चिडचिड करता ?
27 Nov 2007 - 1:26 pm | विसोबा खेचर
उगाच प्रतिसाद/लेखांची कापाकापी करत सुटणार्या "अति कार्यक्षम"संपादक सदस्यांवर जाहीर अविश्वास ठराव आणण्यासाठी हा प्रस्ताव आहे.
माझ्यापुरतं बोलायचं झालं तर तूर्तास तरी मी कुणावरही अविश्वास ठराव आणू इच्छित नाही. माझा मिसळपाववरील सध्याच्या पंचायत समितीवरील प्रत्येक सदस्यावर पूर्ण विश्वास आहे, तेव्हा तूर्तास तरी अविश्वासाचा वगैरे प्रश्नच येत नाही!
आणि हो, आम्ही मालक आहोत, पण ते फक्त कोपर्यातलं चित्र बदलण्यापुरते! :)
मुख्य मुद्दा असतो तो संकेतस्थळावर काय लिहिलं जावं, काय जाऊ नये, या बाबतच्या कंटेंटचा. तसेच कुणाचा प्रतिसाद संपादित करायचा, कुणाचा नाही, या बाबतचा. त्या करता चूक/बरोबर ठरवायला पंचायत समिती समर्थ आहे!
आपला,
(एक सामान्य मिसळपाव ग्रामस्थ) तात्या.
27 Nov 2007 - 1:50 pm | बेसनलाडू
मुख्य मुद्दा असतो तो संकेतस्थळावर काय लिहिलं जावं, काय जाऊ नये, या बाबतच्या कंटेंटचा.
--- क्या बात है!!!!!!!
(चकित!)बेसनलाडू
27 Nov 2007 - 2:13 pm | झकासराव
काय आहे?????////
काहिच कळाल नाहि?????????????????
27 Nov 2007 - 10:42 pm | सर्किट (not verified)
वरुण देवा,
या आठवड्यात सोमवारी रात्रीच का रे ? व्हॉलंटियर्स जिंकले म्हणून ?
- सर्किट
27 Nov 2007 - 11:21 pm | कोलबेर
आमच्याकडे दर सोमवारी रात्री 'फ्लाइंग सॉसर' ह्या आमच्या लाडक्या पबात २ डॉलर पाईंट नाईट असते त्यात व्हॉलंटीयर्स काय जबरी जिंकले :-)
28 Nov 2007 - 12:00 am | देवदत्त
काय चाललंय काय?
कोणी आम्हालाही सांगेल का?
आम्हाला काही कळेल असे बोला की ? कोणी काही सरळ सांगतच नाही.
की ह्यावरही अविश्वास ठराव मांडायचा?