मायक्रोवेव्ह ओव्हन्सचा उपयोग-मदत ?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे in काथ्याकूट
13 May 2013 - 10:36 am
गाभा: 

नमस्कार, मंडळी खूप दिवसापासून काथ्याकूट लिहितो पूर्वपरिक्षणापर्यंत जातो आणि पुन्हा धागा कशाला काढायचा असा विचार करुन पुन्हा धागा क्यानसल करायचो. पण आज रहा न गया. मंडळी, माझ्याकडे एल.जीचा मायक्रोव्हेव ओव्हन आहे. त्याच्या उपयोग कसा करावा ते काही समजत नाही. एल्जीचे मॅन्युअल पाठ होत आले आहे, पण त्याचा नीट उपयोग अजून करता येत नाही. एलजी माओ मधे विविध प्रकारचे अ‍ॅटोमॅटीक असे फंक्शन्स आहेत. पण, गेली काही वर्षापासून मावेओ चा उपयोग फक्त पापड भाजण्यापूर्ताच केला आहे.

मायक्रोव्हेव ओव्हन्स उपयोग कसा करावा त्यासाठी तुनळीवर अनेक धागे पाहिले, गुगलून पाहिलं. मायबोलीवरचा एक मायक्रोवेव्हबद्दल सर्वकाही एक उत्तम असा धागा काळजीपूर्वक वाचून झाला पण आमच्या ज्ञानात काही उजेड पडेना. मायक्रोव्हेव च्या सेटींग, त्याचे तापमानाचे सेटींग आणि मग आपल्यालाला पाहिजे तसा मेनू भाजून-करुन झाला पाहिजे.

आमच्याकडे मिळणारे 'वामट' नावाचा माश्याचा प्रकार त्याला कसाही करा त्याची भाजी जबरा होते. या माशांचे फ्राय करण्याचा मूड काल उसळून आला. कंटकी टाईप. मासे मस्त कापून बिपून आलं,लसून,मिरचीचा पेष्ट लावले आणि ग्रील सेटींमधे अगदी २५ मिनिटे त्यात ठेवले अजिबात व्यवस्थित असा फ्राय झाला नाही. पुन्हा ग्यासवर ते फ्राय करण्यात आले, काल आमचं किचनमधे प्रचंड हसं झालं.

मायक्रोवेव्ह ओव्हन मधे शीरा,उकमा,पोहे, करता येतात. चिकन,मासे, मस्त फ्राय करता येतात. वांग्याचं चांगलं भरीत करता येतं. वगैरे मित्र हो, या सर्व कृती त्यात होत असतील, करता येत असतील तर त्याला मी मूकलो आहे. तेव्हा, मायक्रोवेव्ह ओव्हनस मधे काय शिजवता येतं, काय फ्राय करता येतं, ते कसं केलं पाहिजे, भांडे कोणते वापरले पाहिजे, कोणत्या सेटींग्स कशा केल्या पाहिजेत, विविध मायक्रोवेव्ह ओ. मधे हे सर्व कसं करतात त्याची माहिती मिळाली तर काथ्याकूटाचा हेतू सफल होईल म्हणून हा प्रपंच.

विनंती : चुलीवरचे भरीत अहाहा. चुलीवरच्या भाकरी अहाहा. ग्यासवर जी मजा ती मजा इथे नाही. वगैरे टाळता आले तर टाळावे.

प्रतिक्रिया

मायक्रोवेव्ह ओव्हनचा उपयोग मी फक्त अन्न गरम करणे, पाणी /दुध इ. उकळणे, भाज्या उकडणे, डी फ्रॉस्टींग अन क्वचित भात करणे यापलिकडे करत नाही. बाकी अन्न गॅसवर किंवा कन्व्हेन्शन ओव्हन मधेच छान होते.

राजेश घासकडवी's picture

13 May 2013 - 10:49 am | राजेश घासकडवी

मायक्रोवेव्हमध्ये एखादं अंडं शिजवून पहा. म्हणजे पाणी वगैरे काही घ्यायचं नाही. नुसतं अंडं ठेवायचं मध्यभागी आणि मायक्रोवेव्ह ओव्हन हायवर दोन मिनिटं ठेवा. ओव्हन स्वच्छ करून झाल्यावर उरलेला पदार्थ कसा काय झाला ते जरूर कळवा. ;)

सौंदाळा's picture

13 May 2013 - 11:02 am | सौंदाळा

बर्‍याच पुरुषानी हा प्रयोग केला असावा.
अस्मादिकानी देखिल ओव्हन मध्ये अन्डा बॉम्ब फोडले आहेत. :)

कपिलमुनी's picture

13 May 2013 - 2:32 pm | कपिलमुनी

मी एकदा ६ अंड्यांचा बाँब फोडला आहे .. संपूर्ण किचन साफ करावा लागला मला...ते सुद्धा रविवारी :(

काकाकाकू's picture

13 May 2013 - 10:02 pm | काकाकाकू

सांगू नका हो. नुसत्या शेवटच्या स्मायलीवरून गंमतीत लिहित आहात हे कळत नाहिये.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

15 May 2013 - 11:52 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

अंडं न खाणार्‍यांना हाच प्रयोग आख्ख्या माशावरही करता येईल. स्वतः केलेला नाही, पण डोळ्यांसमोरच स्वच्छतेपर्यंतच्या सगळ्या पायर्‍या पाहिल्या आहेत.

पैसा's picture

13 May 2013 - 10:51 am | पैसा

आधी एकदा डोळे चोळले. हा अनाहिताचा धागा नाही याची खात्री केली.

http://www.lg.com/in/recipe
http://www.youtube.com/watch?v=tCotRqL5fsk

या लिंकांचा काही उपयोग होतोय का बघा!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

13 May 2013 - 10:58 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>> एकदा डोळे चोळले. हा अनाहिताचा धागा नाही याची खात्री केली.
अनाहिताच्या सदस्यांच माहिती देतील त्यात काही वाद नाही, पण सर्वांनीच सर्वोतोपरी मदत केली तर आनंद वाटेल. बाकी, एलजीच्या दुव्याबद्दल आभार. पण प्र्याक्टीकली कोणी व्यवस्थित समजून सांगितलं तर मला ती माहिती अधिक थेट पोहचेल असे वाटते. वाटल्यास एखाची चिकन फ्रायची कोणी पाककृती समजून सांगत असेल तर चार वाजेच्या नंतर एका चिकनचा बळी द्यायची माझी तयारी आहे.

-दिलीप बिरुटे

शिल्पा ब's picture

13 May 2013 - 11:31 am | शिल्पा ब

बरं का ! यावरुन एक आठवलं :
एकदा एक बटाटा उकडायला म्हणुन नुसताच पोटॅटो सेटींगवर मॅन्युअल न वाचताच ठेवला. काही सेकंदानी जाळ झाला मग स्फोट झाला अन मी घाबरुन फायरवाल्यांना बोलावलं. नवीन मायक्रोवेव्ह घ्यावा लागला तो वेगळाच. अर्थात काय शिजवायचं ते शिजवा पण आधे मॅन्युअल वाचा.

मैत्र's picture

13 May 2013 - 2:14 pm | मैत्र

गेल्याच आठवड्यात एक प्रयोग पुन्हा एकदा यशस्वीपणे केला.
बटाटा नुसताच किंवा थोडंसं पाणी लावून (खूप नाही फक्त जरा ओला होईल इतकंच) एका पॉलिथिनमध्ये गुंडाळून २ मिनिटे साध्या हीटींगवर ठेवला तर नीट शिजतो. झटपट शिजवण्यासाठी सोपी कृती .. पण पॉलिथिन इतकी पातळ नको की प्लास्टिक वितळेल / चिकटेल / जळेल..
स्फोट कशामुळे झाला / पोटॅटो सेटिंग काय असते? उसगावाप्रमाणे ते इथल्या मायक्रोवेव्हवर पण असतं का?

पाषाणभेद's picture

13 May 2013 - 10:48 pm | पाषाणभेद

आणखी एक. बटाटा, वांगी माओ मध्ये शिजवायचा असेल तर त्याला काट्याने (चमचा-काटा) त्याला टोचे मारून घ्यावेत. तो प्लास्टीकच्या पिशवीत ठेवायचा की नाही हे नक्की आठवत नाही सौ. ला विचारावे लागेल!

तुम्ही अन बाकीच्यांनीदेखील माओ बिनधास्त वापरा. कोणतीही काळजी करू नका.

माझ्या घरी माओ अगदी वरचेवर (जसे काही एक नवीन स्वयंपाक बनवण्याची शेगडी घ्यावी तसा) वापरला जातो.
एलजीचाच आहे. वॉरंटी संपल्यानंतर एकदा मॅग्नेट्रॉन उडाला होता. १२०० की १३०० रूपयांत बदलून घेतला.
या माओ वर सौ. अगदी सगळे पदार्थ बनवते. केक अन बिस्कीट सारे काही. भाज्या वैगेरे सारे सारे. आम्ही नॉनव्हेज खात नाही पण ती माहेरी बनवायची. तिला तर माओमध्ये नॉनव्हेज बनवण्याचाही कॉन्फिडन्स आहे.

बाकी माओ मध्ये मी साबूदाणा खिचडी एकदम झकास करू शकतो.

फक्त
१) अंडे त्यात शिजवू नका. नाहीतर पुन्हा धडाम!
२) गरम काचेचे भांडे लगेचच किचन ओट्यावर ठेवू नका. खाली काहीतरी फडके किंवा लाकडी पाट घेवून त्यावर ठेवा.

प्लॅस्टीक वापरु नका. सिरॅमिक किंवा जाड ग्लास वापरा. प्लॅस्टीक अन्नात शोषलं जातं.

आमच्या घरी मायक्रोव्हेव ओव्हन घ्यायचे ठरले त्यावेळी केक करायची हौस म्हणुन कन्व्हेक्शन ओव्हन घेतला, २-३ हजार रुपडे जास्त घालुन (कन्डक्शन पेक्षा)
१-२ केक प्रयोग देखिल झाले.
पण सध्या त्याचा उपयोग फक्त आधीच केलेले अन्न गरम करणे, कोणाला सर्दी झाली की पाणी गरम करणे, दाणे, पापड भाजणे, सुप करणे इतकाच होतो.
अवांतर: फुड प्रोसेसरचा वापरदेखिल आता फक्त मिक्सर म्हणुन होतो. :(

मिपावरील सुगरण्स आणि बल्लवाचार्याच्य प्रतिसादाच्या प्रतिक्षेत.
तुमच्या प्रश्नाची उत्तरे मिळाल्यास मला (पत्नीला)देखिल खुप फायदा होइल. :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

13 May 2013 - 11:02 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आता तुम्हाला म्हणून सांगतो याबाबतीत समजून न घेता केलेल्या कृती अंगलट येतात असे वाटते. तुम्हाला म्हणून सांगतो. मी पापडं क्वीक मोडवर लावली होती असा प्रचंड भडका उडाला होता की पुछो मत आणि पापडांचा पार कोळसा झाला होता. प्रचंड धूर...बरं तेव्हा घरी नव्हतं म्हणून आपला हा प्रकार झाकला गेला.

>>> मिपावरील सुगरण्स आणि बल्लवाचार्याच्य प्रतिसादाच्या प्रतिक्षेत.

अगदी मनातलं बोललात. माओवे चा उत्तम वापर कसा करता त्याची प्रचंड उत्सूकता मला आहे.

-दिलीप बिरुटे

पिलीयन रायडर's picture

13 May 2013 - 11:05 am | पिलीयन रायडर

मग आता विषय निघालाच आहे तर कुणी तरी हे ही सांगा की काही लोक म्हणतात की मायक्रोवेव्ह वापरणे आरोग्यास चांगले नाही. चे.पु वर ह्या संबंधी एक पोस्ट पण फिरत आहे.. खरे आहे काय हे?

आणि बिरुटे सर, मलाही पापडा व्यतिरिक्त काहीहि भाजता येत नाही..

प्रा.डॉंच्या धाग्याने अतिशय आवश्यक आणि उपयोगी माहिती कोणीतरी देईल अशी आशा आहे. मायक्रोवेव्हचा उपयोग त्यावर टेबलक्लॉथ टाकून इतर वस्तू ठेवण्यासाठी केला जात असल्यामागे खरोखरचे कारण म्हणजे त्याच्या वापराविषयी अज्ञान आणि भीती हेच आहे. कन्व्हेक्शन, कन्व्हेन्शन की काय असे तीन modes आहेत असं ऐकलं आहे. पण कोणत्या मोडमधे काय बनते हे ठावूक नाही. लोक ब्रेड, नानकटाई, तंदुरी चिकन असे नानाविध पदार्थ मायक्रोवेव्हमधे बनवतात आणि अमुक डिग्रीवर "प्रीहीट" करुन घ्या आणि पंधरा मिनिटे "बेक" करा वगैरे लिहीतात पण अरे, नेमके काय करायचे?

आता इतक्या अडाणीपणाच्या पार्श्वभूमीवर असला ओव्हन घेतलाच कशाला अशी मिसळपावीय शंका येईल. त्याला उत्तर हे की तो भेट म्हणून आलेला आहे.

आता कोणीतरी सुलभ शब्दात कसा वापरायचा हे सांगील का?

राजेश घासकडवी's picture

13 May 2013 - 11:23 am | राजेश घासकडवी

आता इतक्या अडाणीपणाच्या पार्श्वभूमीवर असला ओव्हन घेतलाच कशाला अशी मिसळपावीय शंका येईल. त्याला उत्तर हे की तो भेट म्हणून आलेला आहे.

याला मिसळपावीय भाषेत 'आपल्याला मायक्रोवेव्हसारख्या महागाच्या गोष्टी भेट म्हणून मिळतात हे सांगण्याचा क्षीण प्रयत्न' असं म्हणतात.

आजानुकर्ण's picture

13 May 2013 - 5:10 pm | आजानुकर्ण

मायक्रोवेव किंवा अगदी मिक्सरसारखी वस्तू ही चटकन वापरता यावी अशा पद्धतीने हाताशी असावी असे माझे मत आहे. (अस्मादिकांच्या मातोश्रींसह) अनेक लोक या वस्तू लहान मुलाला गुंडाळून ठेवावे तशा अगदी झाकून पाकून ठेवतात. त्यामुळे जेव्हा ही वस्तू वापरायची आवश्यकता भासते तेव्हा ते टेबलक्लॉथ, त्यावर ठेवलेल्या इतर वस्तू वगैरे काढून टाकायचे जिवावर येते. व शेवटी टेबलप्रमाणे किंवा शोपीसप्रमाणेच त्याचा वापर होतो. मायक्रोवेव्ह घरी आणल्यावर तो झाकून ठेवू नये या गोष्टीवरुन बायकोशी भांडण झाल्यावर आम्हाला त्या दिवशी चहा मिळाला नाही व मायक्रोवेवमधील चहाची अनमोल पाककृती सापडली. सध्या मायक्रोवेव झाकून ठेवलेला नाही. :)

गणपा's picture

13 May 2013 - 6:54 pm | गणपा

त्यामुळे जेव्हा ही वस्तू वापरायची आवश्यकता भासते तेव्हा ते टेबलक्लॉथ, त्यावर ठेवलेल्या इतर वस्तू वगैरे काढून टाकायचे जिवावर येते. व शेवटी टेबलप्रमाणे किंवा शोपीसप्रमाणेच त्याचा वापर होतो.

+१
तंतोतंत.

(देवाच्या), पण मी मायक्रो घेतला नाही. ते योग्यच झालं याची आता खात्री पटली!

सुबोध खरे's picture

13 May 2013 - 12:15 pm | सुबोध खरे

मा वे ओ हा मूळ पदार्थाच्या आत असलेले पाण्याचे रेणू अतिशय वेगाने आणि जोराने हलवले जातात त्यामुळे त्यात आतून उष्णता निर्माण होते. भारतीय स्वयंपाकाच्या पद्धतीत फोडणी देणे किंवा गोष्ट परतणे या गोष्टी यात करता येत नाहीत.तसे पाहता गैस वर सुद्धा वांगे कणीस किंवा कांदा जसा निखार्यावर भाजला जातो तसा भाजला जात नाहीच. मंदाग्नी वर भाजल्या जाणार्या गोष्टी भाजण्यासाठी गैस वर सुद्धा जाळी ठेवून भाजल्या तरच त्याला चुलीच्या भाजण्याची चव येऊ शकते.
मा वे ओ हा पाश्चात्य पद्धतीच्या पाक क्रियांसाठी जास्त उपयुक्त आहे. पण जाहिरात केल्याने आपल्याला भूल पडते जसे अमुक तमुक फ्रीज घेतल्याने आपले आयुष्य बदलून जाईल वगैरे. पण प्रत्यक्ष तो घरी आल्यावर आपल्या आयुष्यात ५ पैशाचा फरक पडलेला नाही असे जाणवते.
मा वे ओ चा वापर सहज करता येतील अशा गोष्टी म्हणजे चहा करताना फ्रीज मधील फक्त एक कप दुध गरम करून घेत येते. फ्रीज मध्ये ठेवलेली भाजी/ चिकन चा पदार्थ न जळता आतून अत्यंत कमी कष्टामध्ये गरम करता येते. आपण लक्ष दिल्यास मिठाच्या पाण्यात भिजवलेले दाणे/ काजू/ बदाम भाजून उत्कृष्ट खारे दाणे/ काजू बनवता येतात. यासाठी प्रत्येक ३० सेकंदानंतर ती वस्तू बाहेर काढून पहा आणी जेंव्हा होत आली असे वाटेल तेंव्हा त्यावर दर दहा सेकंदानी लक्ष ठेवा. बटाटा सुद्धा अशाच तर्हेने आतून फार छान भाजला जातो. शेवटी तो काही सेकंद मंद गैसवर फिरवला तर चुलीवर भाजल्यासारखी चव येते. फ्रीज मध्ये ठेवलेले गोठवलेले/ थिजलेले पदार्थ साधारण तापमानाला आणण्यासाठी सुद्धा याचा वापर करता येतो.अतिशय कडक असलेले आईस क्रीम सुद्धा जर १० ते १५ सेकंद ठेवले तर न वितळता मृदू आणी मुलायम होऊ शकते.
सर्वात उत्तम उपयोग म्हणजे शिळी पोळी जर १० ते १५ सेकंद ठेवली तर एकदम गरम गरम ताज्या पोळी सारखी लागते. फक्त ती ताबडतोब खायला घ्यावी अन्यथा पुढच्या ३-४ मिनिटात ती कडक होते. आदल्या दिवशीचे (पाव भाजीचे) शिळे पाव सुद्धा अतिशय मउ करता येतात. असे गरम गरम पाव भुर्जी बरोबर खाऊन पहा. पापडाला दोन्ही बाजूनी तेलाचा हात लावला तर पापड तळ्ल्या सारखा छान लागतो(प्रत्यक्ष तळणी सारखा फुलत नाही)यात आपल्याला कुरडया मिरगुंड इ पदार्थ भाजता किंवा वर वर्णन केल्याप्रमाणे तळता येतात.
कोणताही पदार्थ करण्यासाठी त्यावर सुरुवातीच्या दिवसात( अनुभव येईपर्यंत) लक्ष ठेवणे हे फार मोलाचे ठरते.(जसे दोन चर चटके बसल्याशिवाय स्वयंपाक करत येत नाही तसेच दोन चार पदार्थ जाळल्याशिवाय आपल्याला याचा उपयोग करता येणार नाही.
मा वे ओ मध्ये केलेले बरेचसे भारतीय पदार्थ आपल्या मूळ चवीचे लागत नाहीत. त्यामुळे गाजर हलवा इ च्या नादाला न लागलेले बरे. यात असलेला ग्रील हा फक्त वरच्या बाजूला असल्याने OTG सारखा केक सुद्धा दोन्ही बाजू नि भाजता येत नाही. कन्व्हेक्षन चा फायदा हा जड पदार्थ आतपासून शिजवण्य सठी होतो. चिकन गलेलट्ठ असेल, केक मोठा असेल तर.
मुळात चैनीची वस्तू आवश्यक केंव्हा होते ? जेंव्हा तुमचे शेजारी ती विकत घेतात तेंव्हा.
याचे उत्तम उदाहरण म्हणजे व्हैकयूम क्लीनर आणी दुसरे उदाहरण म्हणजे मायक्रोवेव्ह ओव्हन (ग्रील आणी कन्व्हे क्शन सहित)
असो

संजय क्षीरसागर's picture

13 May 2013 - 1:59 pm | संजय क्षीरसागर

नाही तरी मायक्रोला माझा पहिल्यापासनं विरोध होताच (फुकट मिळत होता तरी). आता तर विषयच संपला!

प्रभाकर पेठकर's picture

13 May 2013 - 1:31 pm | प्रभाकर पेठकर

माझ्या भारतातील घरी मायक्रोवेव्ह + पारंपारीक असा संयुक्त ओव्हन आहे.

मायक्रोवेव्ह ओव्हन पाणी, चहा, थंड अन्न गरम करणे, भात बनविणे इ.इ.इ. साठी वापरला जातो. पैकी त्याच्या पारंपारीक ओव्हन (कन्व्हेक्षन) मध्ये केक, पाव, पिझ्झा बेस, गार्लिक ब्रेड आदी पदार्थ यशस्वीरित्या बनविले आहेत.

मायक्रोवेव्हचा उपयोग पदार्थ 'झटपट गरम' करण्यापलीकडे होत नाही.परंतु, 'मायक्रोवेव्ह कुकींग' ह्या विषयावरील पाककृती पुस्तके मिळतात त्यात अनेक पाककृती दिलेल्या असतात. कधी करून पाहिलेल्या नाहीत.

आमच्या घरी जेंव्हा मायक्रोवेव्ह प्रथम आला तेंव्हा आमच्या सौंनी (तिचे माहेर को़कणात असल्याने...) सर्व प्रथम फणसाच्या आठळ्या (तशाच) शिजविण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला कांहीच झाले नाही. थोड्याच वेळात स्फोट, धूर, आग अशा पायरी पायरीने दुर्बोध घटना घडल्या आणि मायक्रोव्हेव, त्या मागची भिंत काळी पडून मायक्रोवेव्ह ओव्हनने पहिल्याच प्रयत्नात मान टाकली.

तो ओव्हन आणि मागची भिंत स्वच्छ पुसून दुसर्‍या दिवशी पुन्हा (नुसता पाण्याने भरलेला कप ठेवून) प्रयत्न केल्यावर मायक्रोवेव्हचा राग कमी झाल्याचे जाणवले. पुढे आठ-दहा वर्षे चांगला चालून शेवटी त्याला नैसर्गिग मरण प्राप्त झाले.

मायक्रोवेव्ह ओव्हन पाणी, चहा, थंड अन्न गरम करणे, भात बनविणे इ.इ.इ. साठी वापरला जातो. पैकी त्याच्या पारंपारीक ओव्हन (कन्व्हेक्षन) मध्ये केक, पाव, पिझ्झा बेस, गार्लिक ब्रेड आदी पदार्थ यशस्वीरित्या बनविले आहेत.

हेच म्हणतो.
मॅरिनेटेड पनीर ज्वाळेवर भाजण्यापेक्षा कन्व्हेक्शन मोडवर भाजून लाजवाब बनते आणि एकेक पनीरचा तुकडा भाजत बसण्याचा त्रासही वाचतो

तुषार काळभोर's picture

13 May 2013 - 1:38 pm | तुषार काळभोर

सर्वसामान्यपणे मराठी घरात सोलो मायक्रोवेव्हचा उपयोग फ्रीज मधील पदार्थ गरम करण्या खेरीज होत नाही.
डॉ(खरे)साहेबांनी सांगितल्याप्रमाणे थोडेसे दूध गरम करून हवे असेल तर, शिळी चपाती गरम करण्यासाठी, इ होतो.
तेसुद्धा गॄहिणी उत्साही असेल तर. नाहीतर ओवनचा उपयोग हलक्या वस्तू ठेवण्याचा प्लॅटफॉर्म म्हणुन होतो.

१००%, इंडक्शन प्लेटचं नशीब ही काही वेगळं नसतं, गॅसवर स्वयंपाक करुन गरम भांडी ठेवणं हा एक उत्तम उपयोग होतो तिचा.

पैसा's picture

15 May 2013 - 6:22 pm | पैसा

इंडक्शन प्लेट इतकी सोयिस्कर वस्तू नाही. मी अर्ध्याहून जास्त स्वयंपाक इंडक्शनवर करते. आणि मला एक गॅस सिलेण्डर बरोब्बर ३ महिने पुरतो.

>>इंडक्शन प्लेट इतकी सोयिस्कर वस्तू नाही.

कसं ते वाचायला आवडेल. एका विश्वासाच्या व्यक्तिकडून मिळालेला रिप्लाय असा आहे की इंडक्शनचा फक्त दूध गरम करणे, चहा करणे इतपतच उपयोग आहे. बाकी रोजच्या स्वयंपाकासाठी वापर शून्य.

माझा अनुभव विचारशील तर माझ्याकडे गेले ६ महिन्याहून जास्त काळ इंडक्शन वापरात आहे. दूध तापवणे, पोळ्या, डाळ भात भाजीचा कूकर, चिकन शिजवणे अशा गोष्टी मी सहसा इंडक्शनवर करते. दोन्ही वेळा गॅस सिलेंडर ३ महिने चालला. विजेचे बिल काही फार वाढले नाही. महिना १०० रुपये असेल साधारण. म्हणजे एकूण फायदा झाला. शिवाय एकाच वेळी गॅसचे २ बर्नर्स आणि इंडक्शन कूकटॉप अशा ३ ठिकाणी स्वयंपाक चालू राहिल्यामुळे वेळेची पण बरीच बचत होते. गॅसपेक्षा इंडक्शन कूकटॉपवर ६०% वेळात सर्व पदार्थ तयार होतात.

बाजारात बर्‍याच कंपन्यांचे इंडक्शन कूकटॉप उपलब्ध आहेत. पण मी केवळ प्रयोगाखातर घेतल्यामुळे महागडा न घेता हायर कंपनीचा १५०० रुपयांचा घेतला. अजूनपर्यंत काही प्रॉब्लेम आला नाही.

सपाट तळाची आणि मॅग्नेटिक बेस असलेली अशीच भांडी इंडक्शन कूकटॉपला लागतात. अ‍ॅल्युमिनियम, माती, तांबे, कॉपर बॉटम अशी नाही चालत. अगदी लोखंडाची चालतात. एनॅमलची आतमधे लोखंड असलेली चालतात. इंडक्शन बेस असलेला एक जास्तीचा कूकर, कढई, तवा आणि एक पातेले एवढ्या ४ भांड्यांमधे बहुतेक कामे होतात. चहासाठी वगैरे घरात असलेल्या लहान पातेल्यांमधे सपाट तळाची स्टेनलेस स्टील पातेली एखादी सहज सापडून जाते!

त्यातल्या १४० किंवा १६० सेटिंगवर पोळ्या मस्त होतात. माझा रोजचा कोटा २०/२२ पोळ्यांचा आहे. न थांबता होऊन जातात. फोडणी करता येत नाही असे काही जण म्हणतात, पण मला तीही अनुभवांती जमली आहे. सँडविच बेसचे जाड तळाचे पातेले इंडक्शन कूकटॉपवर ठेवून तेल गरम करायचे, मग वीज बंद करून फोडणी करायची आणि नंतर नेहमीप्रमाणे जो काही पदार्थ असेल तो करायचा. गॅस सिलेंडर मिळत नाही. सबसिडीच्या भानगडी सगळ्यातून सुटका!

तुषार काळभोर's picture

13 May 2013 - 1:51 pm | तुषार काळभोर

आता वापरायचाच असेल तर पॉवर सेटिंग आणि वेळ गॅसच्या तुलनेत ठरवावी.
म्हणजे माय्क्रोवेव्ह ओवन साधारण १२०० वॉट्सचा असतो. आणि त्यात MIN(२०% .) DEFROST(४०% .) MED(६०% .) HIGH(१००% .) असे मोड्स असतात. जे गॅसच्या लहान, मध्यम, मोठ्या आंचेशी समांतर असतात. (वेळ गॅसपेक्षा थोडा कमी लागतो.)

मला ४ महिन्यापुर्वी मिपावर मिळालेले हे उत्तरः

हसरी - Sat, 12/01/2013 - 08:55

१. मायक्रो मोड(हा एकच मोड आहे) मध्ये कोणते पदार्थ करता येतात?>>> या मोडमधे पदार्थ गर्म करण्याखेरीज रवा/ शेंगदाणे भाजणे, साबुदाण्याची खिचडी, गाजर हलवा वगैरे पदार्थ करता येतात. 'अन्न शिजवणे' या प्रक्रियेसाठी मायक्रोवेव मोड असतो.

२. खूप पाककॄतींमध्ये ओवन ठराविक तापमानाला प्रीहीट करावा लागतो. आणि ठराविक तापमानाला ठराविक वेळ पदार्थ शिजवावा लागतो. पण या ओवन मध्ये तापमानाचं ऑप्शन नाहीये. २ मेकॅनिकल कंट्रोल आहेत. एकः पॉवर-min(२०% ), ४० (=डिफ्रॉस्ट), ६०, ८० आणि max(१००%=८०० Watts). दोनः टाईमर
"१८० ला ३० मिन बेक करा" -हे या मायक्रोवेव्ह मध्ये कसं करावं?>>> हे यात होणार नाही. त्यासाठी मायक्रोवेवला कन्वेक्शन मोड असणे आवश्यक असते.
३. रोजच्या कोणत्या गोष्टी मायक्रोवेव्ह मध्ये करता येतात?(भाज्या, भात, वरण, चहा, पापड, अंडी, चिकन, मटन)>>> पापड मस्त एकसारखे भाजले जातात. अंडी मायक्रोवेवमधे उकडायला ठेवू नका, मायक्रोवेवमधे अंड्यांचा स्फोट होतो. चहा/ दूध गरम करता येईल. भाज्या करताना कडधान्ये, फ्लॉवर, गाजर, फरसबी, तोंडली इत्यादी भाज्या मायक्रोवेवमधे शिजवून घेऊन मग गॅसवर फोडणीला टाकता येतील. मायक्रोवेवमधे कमी वेळात भाज्या शिजतात.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

13 May 2013 - 2:33 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

माय्क्रोवेव्ह ओवन साधारण १२०० वॉट्सचा असतो. आणि त्यात MIN(२०% .) DEFROST(४०% .) MED(६०% .) HIGH(१००% .) असे मोड्स असतात. जे गॅसच्या लहान, मध्यम, मोठ्या आंचेशी समांतर असतात. (वेळ गॅसपेक्षा थोडा कमी लागतो.)

अगदी बरोबर. याच वॅट्स वर किंवा मोड मलाही दिसतात.

समजा वरण करायचं असेल तर तुरदाळ आणि पाणी घेतलं आहे. (स्टीलची भांडी वापरायची नाहीत) मग वरणाला खळाखळा उकळी किंवा शीजवायचं असेल तर कोणत्या मोडमधे आणि कोणती भांडी वापरली तर फिकं वरण तयार होईल ?

-दिलीप बिरुटे

तुषार काळभोर's picture

13 May 2013 - 2:59 pm | तुषार काळभोर

पन,
डाळ, पाणी, मीठ, ह्ळद एकत्र करून भांडं ठेवायचं.
पहिल्या प्रयत्नासाठी ६०% वर करा. उकळलेलं दिसतंच. उकळल्यावर ४०% वर अजून २-३ मि ठेवा.
जमल्यावर ८०%-४०% करून बघा.

भडकमकर मास्तर's picture

13 May 2013 - 1:57 pm | भडकमकर मास्तर

मी स्वतः पापड भाजणे आणि चहा गरम करणे , आदल्यादिब्वशीच्या भाज्या फ्रीज मधून काढून त्या गरम करणे अस ली थोर थोर कामे करायला कन्वेक्शन वगैरेचा विकत घेतलेला मायक्रोवेव वापरतो...
कुठली सेटिंग कशाला वापरायची ते ** कळत नाही...
गवि आणि प्राडॉ यांच्याशी सहमत...
धाग्यावरती नजर ठेवून अहे

मला स्वतःला मा.वे. वापरायला अजिबात आवडत नाही. मी तो वापरलाच तर फक्त भाजी गरम वैगरे करायला वापरते.
एकदा मागच्या वर्षी इथे एकाच्या घरी जेवायला गेलो होतो. त्याच्या आईने मा.वे. मधे गाजराचा हलवा, इडली, पुलाव हे सगळे केले होते. पण मला त्यातले काहीच आवडले नाही. गाजराच्या हलव्याला जी एक चव असते ती चव नव्हतीच.. तो फ॑त कोणीतरी गाजराचा कीस, साखर आणि दुधात शिजवुन काढलाय एवढेच वाटत होते. इडली म्हणाल तर, अतीशय कडक... कधी-कधी इडलीच्या पीठा मधे पाणी जास्त झाले की, इडली जशी कडक होते, तसेच ते लागत होते आणि पुलाव तर मला थोडा कच्चाच वाटत होता. पण करणार काय, तसेच मस्त आहे, चव छान आहे अस करत सगळे खावे लागले.

daredevils99's picture

13 May 2013 - 2:50 pm | daredevils99

Mrunalini - Mon, 13/05/2013 - 14:20

जेवायला गेलो होतो

बॉर बॉर :)

आहो, जेवायला गेलो होतो.. म्हणजे आम्ही दोघे गेलो होतो.

स्मिता.'s picture

13 May 2013 - 5:46 pm | स्मिता.

मावे मधे इडली खूप छान होते गं. अगदी मऊ आणि हलकीसुद्धा होते. मी टप्पर-वेअरचं इडलीपात्र घेतल्यापासून गॅसवर इडली वाफवणं सोडून दिलंय. शिवाय १५ मिनीटे वाट बघायची गरज नाही, ६ ते ७ मिनीटात छान वाफवल्या जातात.

अर्थात इडलीचं चांगलं-वाईट होणं त्याच्या बॅटरवर जास्त अवलंबून असतं. जर बॅटरच गंडलेलं असेल तर इडली गॅसवरसुद्धा कडकच होईल.

सानिकास्वप्निल's picture

13 May 2013 - 11:16 pm | सानिकास्वप्निल

मला सुध्दा मावे मध्ये इडल्या बनवायला सोपे जाते,शिवाय मायक्रोवेव्ह सेफ इडलीपात्र असेल तर छान वाफवल्या जातात. मी तर हमखास साधा भात, व्हेज पुलाव मावे ला बनवते अगदी छान , मोकळा होतो शिवाय डब्यासाठी झटपट होतो (लवकरच देणार आहे पाकृ ;) ). हे तर काहीच नाही हल्ली पुरण-पोळीसाठी मी पुरण शिजवून झाले की मिक्सरला फिरवून घेते व मावेमध्ये घट्ट होण्यासाठी गरम करते, पूर्ण मुलायम वाटलेले असल्यामुळे पोळ्या ही अजिबात फाटत नाही व पुरणयंत्रातून पुरण फिरवायचे कष्ट व वेळ दोन्ही वाचतं. मावे मध्ये भरली भोपळी-मिरची, पोहे, साबुदाणा खिचडी, बटाटे, रताळे उकडणे, शेंगदाणे, रवा भाजणे, पालक ब्लांच करणे, पापड भाजणे , हे मी नेहमीच करते.

नुसत अन्न गरम करण्यासाठी काय वापरायचे. सुधा कुलकर्णी ह्यांचे मराठीतले मायक्रोवेव्ह ग्रिल्-कन्व्हेक्श्न कुकरी गाईड मला खूप उपयोगी पडले. त्यात त्यांनी तांत्रिक माहिती ही छान दिली आहे.

स्मिता चौगुले's picture

14 May 2013 - 8:29 am | स्मिता चौगुले

सानिकाताई, तुमच्याच उत्तराच्या प्रतिक्शेत होते.
आता माओ पाकक्रुती सेरिज होवून जावूदे..:)

कपिलमुनी's picture

13 May 2013 - 2:41 pm | कपिलमुनी

तंदूर करण्यासाठी बेष्ट उपयोग होतो बघा

tandoor

हे ओव्हन मधे केलेले आहे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

13 May 2013 - 2:45 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

चिकनला मसाल्याचे पेष्ट लावून कोणत्या मोडवर कितीवेळ हे चिकन ठेवायचे ते सांगा की ?

-दिलीप बिरुटे

स्पंदना's picture

13 May 2013 - 2:57 pm | स्पंदना

बिरुटे सर, काय करायच आहे?
१) साबुदाणा खिचडी- साहित्य सगळं तेच. फक्त एक मायक्रोवेव्हेबल बाउल. या बाउल मध्ये भिजवलेले अन पाणी गाळुन काढलेले साबुदाणे, मिठ, साखर, शेंगदाने कुट सगळ व्यवस्थीत मिसळा. आता एका छोट्या भांड्यात गॅसवर मिरचीची अथवा जिरे मिरचीची फोदणी करुन घ्या. ती या मिक्स्चरवर व्यवस्थीत पसरा. आता हा बाउल दोन मिनिट फुल पावरवर मावे मध्ये ठेवा. बाहेर काढुन एकदा मिक्स करा, वर खाली सगळीकडुन परत एकदा मिसळुन आण्खी दोन मिनीट फुल पावरवर आत ठेवा. जर साबुदाण शिजला नसेल तर परत एकदा एखादा मिनीट आत घाला. खिचडी तयार.
फायदा-कुणी यायच असेल तर गॅसवर खाली लागेल की काय म्हणुन एकसारखा झारा हलवत भाजावी लागत नाही. ऐन वेळी नुसता बाउल आत घालुन चार मिनीटात पदार्थ तयार.
तुम्हाला मासा तळायचा होता तो तळाला न जाता भाजला जातो, म्हणुन सगळा मसाला लावुन तेल घालुन हे तुकडे आत ठेवा पण तेल उडुन मावे तेलकट होतो.
कोणत्याही कामासाठी बटाटे हवेत, पदार्थ खारट झाला, ऐनवेळी भाजी संपली, बटाटा तसाच्या तसा मावेत ठेवा. साधारण मध्यम आकाराचा बटाटा १.३० मिनिटस एक साइड अन १.३० मि. दुसरी साइड असा मस्त् तयार होतो. पाणी लावल तर बाहेरच मॉइस्चरच गरम होइल. म्हणुन बटाटा कोरडा आत ठेवा.
गरमा गरम तुप घतलेल्या पुरण पोळ्या खायला मिळण मला मावेमुळ शक्य झाल.
भात साधारण १४ मिनिट तयार होतो.
बर्‍याचश्या भाज्या फोडणी घालुन मग मावेत ठेवल्यातर ऐन जेवणाच्या वेळी शिजवुन घेउ शकता.
एल जी चा पहिला मावे मी वापरत होते.
मासे मी बहुतेकवेळा तेलात फ्राय केल्यासारखे करुन मग मावेत ठेवुन जेवायच्या वेळी गरम करुन घेते.
मावे सगळा स्वयंपाक भारतिय चविचा देउ शकत नाही, पण आधी जर फोडणी घालुन ठेवले तर सारे पदार्थ कमी वेळात शिजतात, गॅसवर जे कायम लक्ष ठेवुन जे स्टर करावे लागते तो वेळ अन व्याप वाचतात.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

13 May 2013 - 3:11 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अ.अ. धन्स.

शाबुदाण्याची खिचडी जमेल असं वाटायला लागलं आहे. तंदूर आणि मासे याबद्दल जरा माहिती येऊ दे. माशाचे पीस पेष्ट करुन जाळीवर ठेवले तर माशांमधील शिल्लक असेलेले पाणी गोल फिरतं त्या चाकावर पडलेले दिसले होते. याबद्दल काही मदत करा ?

अजून एक :मायबोली मराठी संस्थळावर सुधा कुलकर्णी यांचं नाव मला दिसलं होतं. मा.वे.ओ. वर २५० पाककृतींवर त्यांनी एक पुस्तक लिहिलं आहे. आमच्या मित्रानं सहज पणे सुधा कुलकर्णी यांच्या काही पाककृतीचे व्हिडियो असलेले दुवे दिले आहेत. हा ब्लॉग बघा. काही करणार असाल केले असेल तर जरुर लिहा.

-दिलीप बिरुटे

मावेत तुम्ही तळु शकत नाही सर. पण तेलात अगदी थोडावेळ फ्राय करुन ते पिसेस मी मावेत टाकते त्यामुळे, मासा शिजला, कच्चा राहिला, जळला हा प्रश्न निकालात निघतो.
एक पारशी रेसिपी मला फार आवडते, पात्रानी मच्छी. ती मात्र या मावेत अगदी सुरेख होते.
पुदिन्याची जरा जास्त मिरची घालुन चटणी बनवायची, ती प्रत्येक माश्याला अगदी सढळ हाताने लावुन, एक एक पिस केळीच्या पानात रॅप करायचा अन असे चार पिस एका वेळी पाच मिनिट असे मावेत शिजवायचे. आतल्या आत मासा असा शिजतो म्हणुन सांगु. आहाहा!!
तंदुरी मी ही करायचे पण मग त्याला तो कोळश्याचा वास येत नाही म्हणुन मसाल्यात घातलेले पिसेस १० मिनिट कव्हर करुन मावेत शिजवायचे अन नंतर सरळ कोळश्यात जाळीवर ठेवायचे, फायदा....वास सुटल्याबरोबर खावेसे वाटतात तेंव्हा "अरे थांबा शिजायचे आहेत"अस ओरडावं लागत नाही. माझी ती शक्ती वाचते.

बॅटमॅन's picture

13 May 2013 - 4:02 pm | बॅटमॅन

एक अवांतरः

पात्रानी मच्छीच्या तुम्ही दिलेल्या वर्णनावरून "भेटकी पातुडी" नामक बंगाली डिश आठवली. भेटकी मासा आवडला होता.

सूड's picture

13 May 2013 - 5:21 pm | सूड

पातुडी शब्द वाचून हे कोकणातल्या पातोळ्यांचं चुलत मावस भावंडं असावंसं की काय असं वाटलं.

आजानुकर्ण's picture

13 May 2013 - 5:33 pm | आजानुकर्ण

तातुडी हा शब्द वाचून पातुडी हा शब्द कोकणाशीच संबंधित असावा असे मलाही वाटले. बाकी शब्दव्युत्पत्तितज्ज्ञ बॅटमॅन खुलासा करतीलच. ;)

तुषार काळभोर's picture

13 May 2013 - 3:16 pm | तुषार काळभोर

केक करताना कन्वेक्शन ओवन पेक्षा थोडे पातळ मिश्रण असावे. नाही तर केक कोरडा होतो.
किती पातळ ते २-३दा ट्राय केल्यावर कळेल.
मिश्रण बाऊल मध्ये ठेऊन ६०% ला ३ मि ठेवा. सुरी खुपसून बघा मिश्रण सुरीला चिकटतय का. चिकटत असेल तर १ अजून ठेवायच अन् परत सुरी खुपसायची असं करत राहा.

रुमानी's picture

13 May 2013 - 3:18 pm | रुमानी

काय बिरुटे सर.
ह्या वेळीच्या उन्हाळी सुट्या बोहोतेक माय्क्रोवेव्ह रेसिपि शिकण्यात सत्कारणी लावयच्या असे दिस्ते.....:)

तुषार काळभोर's picture

13 May 2013 - 3:54 pm | तुषार काळभोर

३ महिने झाले, ते सुट्टीवरच हैत!:;-)

कुंदन's picture

13 May 2013 - 6:37 pm | कुंदन

थकबाकी मिळाल्यावर ओवन घेतला काय की?

कवितानागेश's picture

13 May 2013 - 3:39 pm | कवितानागेश

मी भरपूर वापरते मायक्रोवेव्ह. कारण मला गॅससमोर उभे राहायचा भयंकर कंटाळा येतो. :)
पण सध्या इंटर्नेट कनेक्शन गंडलय. :(
ते सुधारलं की सांगते.

मोहन's picture

13 May 2013 - 3:53 pm | मोहन

मा.ओ. हे किचन मधले सहयोगीक उपकरण आहे. हे ध्यानात घेतले की त्याच्या मर्यादा पाळून बरेच उपयोग करता येतात.
शेंगदाणे , रवा इ. भाजणे अप्रतीम होतात.
उपमा, सांजा , भाज्या , इ. ना फोडणी घालून आणि गाजर /दुधी हलवा वगैरे दुध्,साखर इ. घालुन फक्त शिजवण्याचे काम फार कमी वेळात व कमी त्रासात होते.
माझा आवडता पदार्थ सूप. भाज्या आवडतील तशा उकडून पाणी, मीठ, मीरे/सूप क्यूब टाकून ७-८ मी. गरमा गरम सूप तयार !
हे सर्व सोलो मा.ओ. वापरून करता येतात. ग्रील, किंवा कन्वेक्शन फारसे वापरात येत नाही.
काही गोष्टींची काळजी घ्यायला लागते.
कुठलाही पदार्थ "फिट & फरगेट" पध्धतीने होत नाही. एक , दोन मिनीटांनी सारखे ढवळावे लागते. अगदी पाणी / कॉफीत सुद्धा एक-दोन वेळा चमचा हलवावा लागतो. बटाटे , कांदे, वांगे इ. शीजवायचे/भाजायचे असल्यास , ४-५ ठिकाणी टोचुन आतली वाफ बाहेर पडेल असे करावे लागते म्हणजे स्फोट वगैरे होत नाही. अंडे म्हणुनच उकडता येत नाही.
मा.ओ. मधे शक्य तोवर काचेचीच भांडी वापरवी. मा.वे. सेफ प्लास्टीक हे बहुत करून जाहिराती पर्यंतच मर्यादित असते.

माझ्या लहानपणी आमच्या गावी, घरी ग्यास घेतला . काकांनी पहिल्याच दिवशी ह्यावरच्या स्वयंपाकाला काही चुलीवरच्या स्वयंपाकाची सर नाही म्हणून तो फक्त चहा - कॉफी पुरताच मर्यादित ठेवला. आमची आजी बिचारी लाकडा -़कोळ्शाचा धुर सहन करत राहीली.

दिपक.कुवेत's picture

13 May 2013 - 3:54 pm | दिपक.कुवेत

अजुन ओव्हन घ्यायचा मुहुर्त लागला नाहिये. आय मीन नुसता मायक्रोवेव्ह आहे पण त्याचा उपयोग असाच चहा, पाणी, पापड भाजणे, हलक्या वस्तुंचा प्लॅटफॉर्म ह्या गोष्टिंसाठि होतोय. ईकडे गॅस (शेगडि) आणि ओव्हन असं दुहेरी कॉम्बिनेशन मिळतं ज्यात केक वगैरे करु शकतो. मुळात जरा जास्त वेळ लागला तरि चालेल पण मला स्वःताला गॅसवर शीजवलेलं अन्नच आवडतं.

आजानुकर्ण's picture

13 May 2013 - 5:05 pm | आजानुकर्ण

मायक्रोवेव्ह ओवन ही अत्यंत उपयोगी गोष्ट आहे असा माझा अनुभव आहे. माझ्या आवडत्या पाककृती

१. चहाः मायक्रोवेवचा वापर करुन अत्यंत उत्कृष्ट चहा होतो. प्रत्येक वेळी कन्सिस्टंटली चांगला चहा मला तरी गॅसवर करता येत नाही. शिवाय गॅसवर केलेल्या चहामध्ये अनेकदा चहाचा खरा स्वाद जाणवत नाही. मायक्रोवेवमध्ये २ मिनिटे पाणी उकळावे, शक्यतो पाणी चांगले उकळू द्यावे. नंतर कप बाहेर काढून त्यात चहाच्या पुडीची पिशवी किंवा चहा पूड (ही ठेवण्यासाठी एक दांडीचा साचाही मिळतो) टाकावी. साधारण २ ते २.५ मिनिटे ब्रू होऊ द्यायवा. नंतर चहापूड काढून टाकावी. चहाचे तापमान साधारणपणे ९० से. पर्यंत उतरते. आता यात चवीप्रमाणे रुम टेंपरेचरला आलेले दूध टाकावे. चहाचे तापमान ७० ते ७५ पर्यंत उतरते. आणखी पाच से तापमान उतरले की चहाची परफेक्ट चव लागते. ही रेसिपी सापडल्यापासून चहाचे गाळणे, काळे झालेले भांडे, एकट्यासाठी चहा करायचा असला तरी १० मिनिटे बेसिनसमोर घालवणे या गोष्टी माझ्या आयुष्यातून कमी झाल्या आहेत. याचे सर्व श्रेय माझ्या ९०० वॅटच्या मायक्रोवेवला आहे. चवीत बदल म्हणून मी कधीकधी सोयामिल्क वापरतो त्यानेही एक छान नट्टी चव येते.

२. बटाट्याची किंवा रताळ्याची कोशिंबीरः अनेकदा भाजी वगैरे केल्यानंतर ती कमी पडते आहे किंवा पटकन संपेल असे लक्षात येते. किंवा काहीतरी तोंडी लावणे असावे असे वाटते. बटाट्याची किंवा रताळ्याची कोशिंबीर हे माझे ऑल टाईम फेवरिट तोंडीलावणे आहे. मात्र जेव्हा ही कोशिंबीर करावीशी वाटते तेव्हा कुकर ऑलरेडी लावून झालेला असतो. मग मायक्रोवेवमध्ये पाच मिनिटात पटकन बटाटा किंवा रताळे उकडून घेतले की छानपैकी कोशिंबीर करता येते.

३. ढोकळाः चितळेंचे ढोकळा मिक्स पाण्यात मिसळून मायक्रोवेवमध्ये चार मिनिटात मस्त जाळीदार आणि चविष्ट ढोकळा तयार होतो.

बाकी शिळे अन्न गरम करणे वगैरे उपयोग आहेतच. मला स्वतःला त्यात गरम केलेली पोळी आवडत नाही. फार ओलसर व चिकट वाटते. कधीकधी मी त्यात अंड्याचे हाफ फ्राय वगैरेही करतो. पण त्याचा फारच घमघमाट घरात सुटतो. :(

थोडक्यात 'जेवढे खातो तेवढेच धुतो' असे संक्षी ष्टाईल म्हणायचे असले आणि खाण्यासाठी जास्त व भांडी धुण्यासाठी कमी वेळ खर्च करायचा अल्यास मायक्रोवेव ओवन उत्तम.

आदूबाळ's picture

13 May 2013 - 6:15 pm | आदूबाळ

गुलामखान्यातून घरी यायला मला बर्‍याचदा भरपूर उशीर व्हायचा. सर्वत्र निजानीज. गारगोट्या अन्न मेजावर झाकून ठेवलेले.
मगः

  • काचेच्या ताटात सगळे जेवण वाढून घ्यावे
  • आख्खं ताटच्या ताट मा वे ओ मध्ये सरकवावे
  • मोडबीडची चिंता न करता ५० सेकंद लावावे
  • 'टिंग' असा घंटानाद होताच बाहेर काढून त्वरित पोटात लोटावे
  • तृप्तीची ढेकर येते का, याची दोन मिन्टे वाट पहावी
  • बर्मुडा घालून निवांत झोपून जावे
दिपक.कुवेत's picture

13 May 2013 - 7:28 pm | दिपक.कुवेत

पहिल्या पायर्‍या समजु शकतो पण शेवटच्या कॄतीच म वे ओशी कन्केशन कळलं नाहि....म्हणजे मा वे ओ मधील जेवला नाहिस तर बर्मुडा घालून तुला निवांत झोप येत नाहि? (कॄ.ह.घे. रे)

आदूबाळ's picture

13 May 2013 - 8:42 pm | आदूबाळ

:)

प्रभाकर पेठकर's picture

14 May 2013 - 3:02 am | प्रभाकर पेठकर

बर्मुडा घालून निवांत झोपून जावे

म्हणजे सुरुवातीच्या पाचही पायर्‍या बर्म्युडा न घालताच करावयाच्या आहेत??

डॉ सुहास म्हात्रे's picture

14 May 2013 - 11:50 am | डॉ सुहास म्हात्रे

smiley

कपिलमुनी's picture

14 May 2013 - 8:19 pm | कपिलमुनी

काका ....हसवून मारताय आता !!

खाद्यप्रेमी's picture

13 May 2013 - 6:21 pm | खाद्यप्रेमी

प्रथम स्टेटस सिम्बॉल म्हणून आलेला मायक्रोवेव खर तर गुणी आहे. पण सर्वसाधारणपणे त्याचा उपयोग अन्न गरम करण्यासाठीच केला जातो. मायक्रोवेव आपल्याकडे पाश्चात्य देशातून आला. पाश्चात्य आणि भारतीय पाककृतींमध्ये काही मूलभूत फरक आहेत त्यामुळे आपल्या तर्‍हेचा स्वयंपाक मायक्रोवेवमध्ये बनविताना काही मर्यादा येणे अपरिहार्य आहे. कारण आपल्याकडे फ्रोझन फूड वापरले जात नाही. उलट तळणे, परतणे अधिक. पण मायक्रोवेवमधे ही कामे करता येत नाहीत.
केवळ मायक्रोवेव वापरुन संपूर्ण स्वयंपाक करणे शक्य नाही मात्र त्यातील गुणांचा योग्य वापर करुन काही आपले व काही परप्रांतीय/परदेशीय पदार्थ त्यात करता येतात. म्हणूनच मायक्रोवेव आणला म्हणजे आता गॅसला सुट्टी अस म्हणता येणार नाही.

ही वरील वाक्ये "उषा पुरोहित" यांच्या "मायक्रोवेव खासियत" या पुस्तकातील आहेत.

मायक्रोवेवमधे रवा, शेंगदाणे, लाडू साठी बेसन, चिवड्यासाठी पोहे या गोष्टी विनासायास भाजता येतात.
सुरळीच्या वड्या मायक्रोवेवमधे सुरेख होतात.
पण साधा भात, वरण (डाळ) या गोष्टी मात्र कुकरमधेच पटकन होतात. त्यामुळे या गोष्टींसाठी मात्र मायक्रोवेव वापरु नये.

समजण्यासाठी एक कृती देत आहे.

सुरळीच्या वड्या:

साहित्यः
१/२ कप बेसन
१ चमचा मैदा
साखर व लिंबू रस प्रत्येकी १/२ चमचा
पाऊण कप दही
पाऊण कप पाणी
हिरवी मिरची पेस्ट थोडीशी
मीठ चवीनुसार
फोडणीसाठी - तेल, मोहोरी, हींग, हळद
खोबरं, कोथींबीर - सजावटी साठी

कृती:
गॅसवर नेहेमीसारखी फोडणी करुन घ्यावी.
काचेच्या बाऊल मधे दही व पाणी एकत्र घुसळुन घ्या. यात मिरची पेस्ट, साखर, लिम्बाचा रस, मीठ घालून ढवळा. यात बेसन आणि मैदा घालून मिक्स करा.
बाऊल "हाय" मोड वर ४ मिनिटे ठेवा. बाहेर काढून मिक्स करा.
पुन्हा "हाय" मोड वर ४ मिनिटे ठेवा. बाहेर काढून मिक्स करा.
जर मिश्रणाला चकाकी आलेली असेल तर पीठ तयार आहे असे समजावे.
आता पीठ चांगले घोटून घ्यावे व पटकन ताटाच्या मागच्या बाजूला किंवा ओट्यावर पसरावे. पसरताना पीठ पातळ पसरावे. ही क्रिया पटकन करावी लागते कारण शिजवलेलं पीठ पटकन घट्ट होत जातं.
२ मिनिटांनी साधारण १.५ - २ इंचाच्या पट्ट्या कापाव्या व त्यांचा रोल करावा. या रोलवर फोडणी घालावी व खोबरं, कोथींबीर घालावी.

माझीही शॅम्पेन's picture

13 May 2013 - 6:41 pm | माझीही शॅम्पेन

का हो ह्या मध्ये जिल्ब्या पाडून मीपा-वर डकावता येतात का ?

त्यात काय काय बनवता येते ते खालील प्रमाणे देत आहे.
१)चिकन तंदुरः एका दिवशी मस्त पणे आपल्याकडील गाडीतुन बाहेर फिरायला पडावे.जास्तीत जास्त करुन रहदारी किंवा खवैयागल्लीतुन फिरावे. फिरण्याची वेळ ज्यादा करुन संध्याकाळची ७ ते ८ वाजताची असावी.फिरताना एकाद्या मस्त हॉटेल किंवा ठेल्यावर जिथे प्रसिध्द तंदुर मिळते अश्या ठिकाणी जावावे. मस्तपैकी तंदुर विकत घ्यावे. सोबत तंदुर कांदामिक्स पण घ्यावे.इकडुन तिकडुन फिरुन झालेवर घरी यावे.
घरी आलेनंतर चिकन तंदुर नीटपणे बाहेर काढुन प्लेट मध्ये घ्या.आता आपला ओव्हन गरम करण्याच्या मोडवर सेट करा. तंदुर त्यात ठेवुन मस्तपैकी गरम करा.
आता गरम केलेले तंदुरचे वेगवेगळे पीस करुन घ्या.प्लेट मध्ये ते पीस व तंदुरवाल्याकडुन आणलेला कांदामिक्स व्यवस्थित भरुन सर्व्ह करा.
टिपः तंदुर विकत घेताना शक्यतो ज्यादाच घ्या. कारण घरी ओव्हनवर गरम करुन खाताना भान हरपुन जाते.

बाकीच्या पाकृ पुन्हा कधीतरी टाकेन.
परत एकदा बिरुटेसर ओव्हन घेतल्याबद्दल अभिनंदन.

मायक्रोवेव बंद असताना पण वापरता येतो.
मटकी/ मूग साताठ तास भिजवून चाळणीत निथळत ठेवावेत. एका तासाने कपड्यात घट्ट बांधून थोड्या उबदार झालेल्या मायक्रोवेव ओवन मध्ये ठेवावेत. स्विच बंद असल्याची खात्री करावी. दुसऱ्या दिवशी झकास मोड येतात.

मावेओ अन माओ वाचून हा माओवाद तर नव्हे ना अशी शंका येऊ लागली आहे ;) :D

प्यारे१'s picture

14 May 2013 - 12:12 pm | प्यारे१

हेच म्हणायला आलो होतो, ब्याम्याने मुह की बात छीन ली.
बाकी हा मा.ओ.वाद म्हणजे 'कौटुंबिक साम्यवाद' तर नव्हे? :)

कौटुंबिक साम्यवाद>>कहर!!!!!! =)) =)) =))

भारीच हो प्यारेजी. :D

ज्ञानोबाचे पैजार's picture

14 May 2013 - 9:37 am | ज्ञानोबाचे पैजार

मायक्रोवेव्ह मधे पोहे फार मस्त होतात. पोहे धुवुन चाळाणीत निथळत ठेवावे. मावे मधे एका काचेच्या बाउल मधे तेल मोहरी, जीरे कडीपत्ता, मिरच्या इ घालुन साधारण दिड ते दोन मिनीट ठेवावे मोहरी तडतडली की त्यात हळद घालुन हलवुन पुन्हा एक ते दिड मिनीट ठेवावे. फोडणी जळत नाहीना या कडे लक्ष ठेवावे. तो पर्यंत पोह्यातले पाणी पुर्णपणे निथळलेले असेल. त्यावर चवी प्रमाणे मिठ आणि थोडी साखर घालावी व पोहे मा.से.मधे असलेल्या फोडणीत टाकावे.निट ढवळुन फोडणी सगळी कडे निट पसरली आहेना याची खात्री करावी व परत साधारण दोन ते तिन मिनिट मा.वे. मधे ठेवावे. बाहेर काढुन हलवुन परत दोन ते तिन मिनीट. मग त्यावर चिरलेली कोथिंबीर, खोवलेले खोबर घालुन चांगले हलवुन परत दोन मिनिटे. झाले पोहे तयार. बाउल वर एक झाकण ठेउन चार ते पाच मिनीटे वाफ पोह्यात मुरुन द्यावी. मग मस्त पैकी डिश मधे घेउन लिंबु पिळुन हदडावेत. ज्यांना पोह्यात दाणे आवडत असतील त्यांनी फोडणीतच दाणे घालावे. यातला कोणताही पदार्थ सोयी नुसार / आवडीनुसार कमी जास्त करावा. पोहे करताना कन्व्हेक्षन किंवा ग्रील वापरु नये.

मा.वे. मधे शिरा, सांजा व साबुदाणा खिचडी सुध्दा फार छान होते.

वैधानिक इशारा :- पोहे खरोखर अप्रतिम होत असल्या मुळे लग्न झालेल्या पुरुषंनी हा प्रयोग घरी एकटे असतानाच करावा. अन्यतः होणार्‍या परीणामांना आम्ही जबाबदार असणार नाहि.

(पोहेकर)

सूड's picture

14 May 2013 - 4:53 pm | सूड

>>मायक्रोवेव्ह मधे पोहे फार मस्त होतात.
म्हणजे पोह्यांची चव नेहमीपेक्षा वेगळी आणि अप्रतिम असणं हे मुलीच्या घरी मायक्रोवेव्ह असल्याचं लक्षण आहे तर !!.

अभ्या..'s picture

14 May 2013 - 7:44 pm | अभ्या..

नुसते ओक्के नाही रे सूड. ;)
मुलीला आपल्या प्राडाँनी विचारलेलाच प्रश्न विचारायचा. मावे मध्ये काय काय करता येते?

काही म्हणा, हा सुडक्या आजकाल लग्नाळू झालाय फार ;)

आजानुकर्ण's picture

14 May 2013 - 5:00 pm | आजानुकर्ण

कांदेपोहे खूप आवडतात. पण यात कांदा दिसत नाही. असो. प्रयोग केल्या जाईलच. आजच करतो ब्रेकफाष्टला.

ज्ञानोबाचे पैजार's picture

15 May 2013 - 9:38 am | ज्ञानोबाचे पैजार

अगबाई कांदा राहिलाच की. कामाच्या गडबडीत विसरायलाच झाल. चिरलेला कांदा हळदी बरोबरच टाकावा.

तसे कांद्या शिवाय पण पोहे चांगले लागतात. फक्त केल्या केल्या लगेच खाल्ले पाहिजे.

सखी's picture

15 May 2013 - 10:05 pm | सखी

माफ करा, पण पोहे मावेमध्ये करणे मला वेळखाऊ वाटते.
प्रत्येक १-२ मिनीटांनी, ५-६ वेळा काढुन बघायचे असेल तर गॅसवर सोप्पे पडणार नाही का?
फोडणी पण मावेमध्ये दिली तर जिरे-मोहरी आतमध्ये उडणार नाही का? व परत सगळे साफ करावे लागणार ना?
कांदा पूर्णपणे शिजेल का?
शंका खरोखरच मनात आल्या म्हणून विचारते आहे.

ज्ञानोबाचे पैजार's picture

17 May 2013 - 9:31 am | ज्ञानोबाचे पैजार

फोडणी उडत नाही,फोडणीतली मिरची सुध्दा उडत नाही, कांदा मस्त खरपुस होतो. अगदि बिन्धास्त वापरा. वेळेचे म्हणाल तर गॅस आणि मावे मधे जवळ जवळ सारखाच लागतो.
पण मावेचा फायदा असा की एकदा टायमिंग सेट केले की झाले. गॅस लक्षात ठेवुन बंद करावा लागतो. जास्तवेळ गॅस चालु राहिला तर पोह्यातन धुर निघतो. (खालचा कारपलेला पोह्यांचा थर बाजुला काढला तर उरलेले कुरकुरीत पोहे पण छान लागतात.) घरात एकटे असताना शक्यतो मावेच वापरावा.

(मावे. मधे बरेच यशस्वी प्रयोग केलेला)

सस्नेह's picture

14 May 2013 - 11:43 am | सस्नेह

अन उपयुक्त !
मावेओ मध्ये रवा, शेंगदाणे, कोरडे मसाले जसे धणे, जिरे इ. फारच छान भाजले जातात.
पोहे, साबुदाण्याची खिचडी गॅसपेक्षा चांगले होतात.
दूध, पाणी इ. गरम करण्यासाठी उपयुक्त. (उकळण्यासाठी नव्हे.)
वांगी फार छान आतपर्यंत शिजतात. नंतर पुन्हा गॅसवर भाजल्यास भरीत 'स्मोक टच' बनते.
बाकी, मावेओ अन गॅसची तुलना होऊ शकत नाही असे मत आहे.

स्पंदना's picture

14 May 2013 - 1:39 pm | स्पंदना

हो ना! गॅस अन चुलीचीपण होत नव्हती, अन त्या आधी कुकरमध्ये शिजलेला भात लोकांना घश्याखाली उतरत नव्हता.

सुनील's picture

14 May 2013 - 2:34 pm | सुनील

बाकी, मावेओ अन गॅसची तुलना होऊ शकत नाही असे मत आहे

अगदी अगदी ...

मावेओची अन् गॅसची तुलनाच शक्य नाही!

चुलीची चव गॅसला अजिबातच नाही!!

गारगोटीने पेटविल्रेल्या काटक्या नि वाळक्या पानांची सर तर कश्शा-कश्शालाच नाही!!!

...
...

अन् कच्च्या कंदमूळांची तर बातच वेगळी!!!!!

(आदिमानव) सुनील

सौंदाळा's picture

14 May 2013 - 2:41 pm | सौंदाळा

+१
चिखल लावून शेकोटीत टाकून उकडलेली अंडी
आणि वालाच्या शेंगा, बटाटे आणि मसाला लावून मडक्यात टाकलेलं चिकन म्हणजेच पोपटी याची सर चिकन ग्रीलला नाही.

आजानुकर्ण's picture

14 May 2013 - 4:58 pm | आजानुकर्ण

+१

सूड's picture

14 May 2013 - 5:19 pm | सूड

करण्याचा विषय निघालाच आहे म्हणून विचारतो, भरीत करताना घ्यायची वांगी आतून किडलेली नाहीत हे कसं ओळखावं? भाजल्यानंतर वांगं किडलेलं असल्याचं समजलं तर सगळ्या प्लानचा विचका झाल्यासारखं होतं.

प्रभाकर पेठकर's picture

14 May 2013 - 8:19 pm | प्रभाकर पेठकर

वांग्यांवर कुठेही छोटे-मोठे छिद्र असेल तर ते वांगे आतुन किडलेले असू शकते. त्यामुळे विकत घेताना पाहूनच घ्यावे.
बाकी, मिपावर कोणी शेतकरी-बागायतदार असतील तेच सांगू शकतील.

स्मिता.'s picture

14 May 2013 - 8:27 pm | स्मिता.

साधारणपणे वांगी घेतांना ती ताजी, मऊसर असावीत. बाहेरून तरी कोठून कीड किंवा तत्सदृश्य काही असायला नको. आकार गोल आणि बसका नसून लांब असावा. भरीताची वांगी मोठी असतात त्यामुळे त्यांच्यावर हाताने चापट्या मारून बघावं. त्यातून येणारा आवाज नक्की कसा ते असं लिहून सांगता येणार नाही पण नेहमी भाज्या-फळं घेणार्‍यांना सवयीने कळते. सबंध वांग्याची आतून घनता एकसारखी असल्याचे त्या आवाजाने कळते. तश्या वाग्यात कीड निघायची शक्यता कमी असते.

अवांतरः भरीताची वांगी सुरीने टोचे पाडून सिरॅमिक प्लेटमधे ठेवल्यास मावेओमधे छान शिजतात. त्याला भाजल्याची आणि धूराची खरपूस चव येत नाही पण गॅस नसल्यास हा एक उत्तम पर्याय आहे.

सस्नेह's picture

14 May 2013 - 10:13 pm | सस्नेह

वांगी किडकी असल्याचे दोन गोष्टींमुळे समजते
१)वांग्यावर काळे छिद्र असते,
२)वांग्याचा आकार एकाच बाजूला आकसलेला दिसतो.

सस्नेह's picture

19 May 2013 - 1:19 pm | सस्नेह

मावेओ अन गॅसची तुलना होऊ शकत नाही , कारण दोन्ही आपापल्या जागी फिट्ट आहेत. काही पदार्थ मावेओ मध्ये उताम होतात अन काहीना गॅस बरा.
काहीतरी गोंधळ वाटला म्हणून स्पष्टीकरण.

सुप्रिया's picture

14 May 2013 - 5:31 pm | सुप्रिया

मला मात्र वांगी मावेत भाजता आली नाहीत. घरभर विचित्र वास सुटला होता. तेव्हापासून कानाला खडा. ग्रील मोडवरच भाजायची असतात नं?

वांग्याना बाहेरून टोचे देऊन तेल लावून मायक्रो मोडमधे ३-४ मिनिटे ठेवावीत. नंतर बाहेरून गॅसवर भाजावीत.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

15 May 2013 - 10:39 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मिपाकर मित्र हो, आपल्या प्रतिसादानं मा.वे.ओ.तील पाककृती करण्याचा आत्मविश्वास वाढला आहे. आज गिनिपिंगसाठी काबूलीचनाचा वापर करण्यात आला. काबूली चना पातळबेसनपीठ मीठ,मिरचीच्या साह्याने मस्त स्नॅक्सचा फ्राय अ‍ॅटम जमला. (म्हणजे भाजला) काबूलीचनाची भाजी मस्त जमली आहे. एकूणच काय कॉम्फीडन्स वाढला आहे. ज्ञानोबाचे पैजार यांनी समजावून सांगितलेले कांद्या पोह्यांचा प्रयोग करण्यात येईल. बाकी, पाककृत्या अजून येऊ द्या. (फोटो लवकरच डकवतो)

रुमानी's picture

15 May 2013 - 11:21 am | रुमानी

छान मस्त आलेत फोटो.
मस्त जमतय कि ओ सर तुम्हला :)

सुप्रिया's picture

15 May 2013 - 11:30 am | सुप्रिया

मावे मधे sandwitches पण करतात काही लोक. कुठल्या मोडवर ब्रेड भाजावा? वातड नाही का होत?

छ्या.. तसा प्रयत्न करुन झाला. मस्त टोस्ट होतील अशा आशेने ब्रेड आत टाकले. अगदी काही सेकंद गरम केले आणि उघडून पाहिले तर भाजले जाणे सोडाच, आक्रसून निम्म्या आकाराचे झाले होते आणि तेही वातड.

तवा बेष्ट.

प्रभाकर पेठकर's picture

15 May 2013 - 11:31 am | प्रभाकर पेठकर

अरे व्वा..! मिपाच्या बल्लवाचार्यांच्या टोळक्यात स्वागत आहे.

स्पंदना's picture

15 May 2013 - 5:46 pm | स्पंदना

आता आठवल.
काँबीनेशन नावाचा मोड आहे आहे का हो तुमच्या मावेला सर?
तर कोंबडी मसाल्यात (तंद्उर) टाका. काँबीनेशन मोड मध्ये बारिक तारांच ग्रील चालत. तर त्या ग्रील्वर कोंबडीचे तुकडे एका डीशमध्ये ठेवा, अन कोंबडीच्या वजनाचा आकडा फिड करा. हुवी गया तंदुर !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

15 May 2013 - 6:39 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>> काँबीनेशन नावाचा मोड आहे आहे का हो तुमच्या मावेला सर?
हो आहे.

>>>तर त्या ग्रील्वर कोंबडीचे तुकडे एका डीशमध्ये ठेवा,
ग्रीलवर डीश कशाला ठेवायची मग ? नुसते ग्रीलवर पसरुन टाकले असते पीस. पण, आता तुम्ही म्हणत आहात तर करुन पाहीन.

>>>>कोंबडीच्या वजनाचा आकडा फिड करा
हाहा. गंमतच असते या ओव्हनमधे. पाहतो आणि फीड ब्याक देतो.

-दिलीप बिरुटे

वरील सगळे प्रतिसाद वाचले नाहीत, बरेच आहेत. मी मावेमध्ये जे पदार्थ करते त्यांची कृती एकतर जालावरून किंवा मावे कुकिंग टाईप भेट आलेल्या पुस्तकातून घेतली आहे याची कृपया नोंद घ्यावी. ;)माझ्या माहेरी सगळी सेतीम्ग्ज वापरली जातात. मला तेवढा उत्साह नाही. पण पोहे, उपमा, शिरा, भाज्या शिजवणे, दाणे भाजणे, खारे शेम्गादाने तयार करणे, दूध, पाणी गरम करणे, पापड भाजणे, गडबडीच्यावेळी बटाटा उकडणे. कधीतरी पावभाजी करणे. मोदकाची उकड, सारण करणे असे करते. आता दरवेळी करतेच असे नाही पण बरेचदा करते. आपण जसजसे वापर करत जातो तश्या नवीन युक्ती सुचत जातात. माझा हा दुसरा मावे आहे. पहिला काही कारण नसताना (स्फोट वगैरे) बंद पडला. पदार्थ गरम करताना म्हणून जे झाकण मिळते ते माझ्याशिवाय वापरायचा उत्साह कोणाला नसतो. मग पदार्थाचे शिंतोडे उडतात. बटाटे उकडताना त्याला सुरीने, फोर्कने टोचून घेते. अजूनही आठवायला बसले तर बरेच पदार्थ करते असे वाटते. याशिवाय मावेचा एक फायदा दिसून आलाय. घरातील सदस्यांखेरीज जे पाहुणे असतात त्यांना प्रत्येकाला आपापल्या पसम्तीने दूध पाणी गरम करून मिळते, बरेचजण त्यांचे तेच हे काम करून टाकतात.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

17 May 2013 - 11:12 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पोहे, उपमा, शिरा, भाज्या शिजवणे, दाणे भाजणे, खारे शेम्गादाने तयार करणे, दूध, पाणी गरम करणे, पापड भाजणे, गडबडीच्यावेळी बटाटा उकडणे. कधीतरी पावभाजी करणे. मोदकाची उकड, सारण करणे असे करते. आता दरवेळी करतेच असे नाही पण बरेचदा करते.

खरं म्हणजे अजून या धाग्यातून व्यवस्थित अशी माहिती मिळालेली नाही. आपण सांगाल अशी अपेक्षा. आम्हाला बेसीक माहिती हवी आहे. जसं की एका काचेचं झाकणबंद भांड घ्या. भांड्यात पोहे,हळद,शेंगदाणे,मीठ,अमूक तमूक टाकून झाल्यानंतर भांडे काँबीग मोड मधे १० मिनिटे (पॉवर किती ? ) ठेवा पैकी पहिल्या चार मिनिटातर बटन स्टॉप करुन भांडे बाहेर काढा त्याला चमच्याने पोहे खालीवर करुन घ्या. पुन्हा भांडे मावेओत ठेवा. आता पुन्हा राहीलेले मिनिट्स पूर्ण करण्याकरिता स्टार्टचे बटन दाबा आता पुन्हा तीन मिनिटानंतर पोहे खालीवरुन करुन घ्या. पुन्हा राहीलेली मिनिटे पूर्ण करण्यासाठी भांडे मधे ठेवा. आता तुमचे पूर्ण दहा मिनिटे झाली आहेत. आता एकदम भांडे मावेओतून काढू नका. कमीत कमी दोन मिनिटे त्याला मावेओतच ठेवा. आता आपले पोहे तयार झाले आहेत. धन्यवाद. ( असं तपशीलवार माहिती हवी आहे)

-दिलीप बिरुय्टे

अशी सगळी माहिती तूनळीवर सुधा कुलकर्णी या बाईंचे व्हिडीओ आहेत. चांगले आहेत.
नमुन्यादाखल खारे दाणेhttp://www.youtube.com/watch?v=OR2sKQ8_en4&feature=share&list=UUr56P0A09...
उप्पिट http://www.youtube.com/watch?v=qEiuSBm8vwA&feature=share&list=UUr56P0A09... यामध्ये अगदी मिनिटामिनिटाचा हिशोब आहे.

आणि निशामधुलिका बाईंचेही व्हिदीओज तूनळीवर आहेत. त्यात मावे रेसिप्या मिळतील.

सानिकास्वप्निल's picture

17 May 2013 - 11:57 pm | सानिकास्वप्निल

सूधा कुलकर्णी ह्यांचेच मी पुस्तकं सुचवले होते ह्या धाग्यावर.
मायक्रोवेव्ह ग्रिल - कन्व्हेक्शन कुकरी गाईड

अनुप ढेरे's picture

17 May 2013 - 10:42 am | अनुप ढेरे

माओचा पदार्थतल्या जीवनसत्वांवर विपरीत परिणाम होतात असं ऐकल होतं. त्यात कितपत तथ्य आहे?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

17 May 2013 - 11:16 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आवं ढेरे साहेब, आपला प्रश्न एकदम बरोबर आहे. पण, एकदा मावेओत हे पदार्थ जमायला लागले की मग जीवनसत्त्वांवर परिणाम होतो का ? माणसावर त्याचा परिणाम होतो का ? वीज बील किती येते ? मावेओचे संभाव्य धोके ? असं टप्प्या टप्पानं चर्चा पुढे नेऊ असे वाटते, काय म्हणता ?

-दिलीप बिरुटे

म्हण्जे इंचा इंचाने धागा पुढे नेणार तर!

लक्ष ठेवून आहे हां! (धाग्यावर. मिळणार्‍या माहितीमुळे..)

अतिशय कमी. खरं तर मा वे ओ ने अन्नद्रव्यांचा र्हास सर्वात कमी होतो
खालील दुवे पहा
http://www.health.harvard.edu/fhg/updates/Microwave-cooking-and-nutritio...
http://www.arimifoods.com/microwave-oven-kills-nutrients-%E2%80%93-who-s...

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

19 May 2013 - 8:59 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मित्र हो, आत्ता सकाळी (भ्राप्रवे) ला मस्त पोहे मावेओत करता आले. पोहे खातांना कोण आनंद झाला काय सांगू. आपण म्याट्रीकला चांगल्या मार्कानं पास झालो तेव्हाची त्या आनंदाची आठवण झाली.

सर्वप्रथम शेंगदाणे क्वीक मोडमधे म्हणजे एक मिनिट चांगले भाजून घेतले. गळाबंद काचेच्या भांड्यात तेल, जीरे,मोहरी,कांदे, मिरची,कढीपत्ता दोन मिनिटे मायक्रो मोडमधे फोडणी दिली.

फोडणी दिलेल्या भांड्यात भिजवले पोहे, शेंगदाणे, ह्ळद,मीठ, टाकून मायक्रोमोडमधे पाच मिनिटे ठेवले. मित्र, हो पोहे तयार. एकूणच काय आपल्या प्रतिसादांनी 'कुछ करणे की चाहत' निर्माण झाली. आपलं मला माहिती नाही. पण, मावेओचं दडपण सालं निघून गेलं.

मात्र गेल्या दोन तीन दिवसात मासे आणि चिकनपीस मात्र मस्त पैकी तांबूस होतील असे भाजता आले नाहीत. नॉनव्हेज अ‍ॅटम फसू लागले आहेत. असो....! यापुढेही, मायक्रोवेव्ह ओव्हन्समधे काही प्रयोग केला, यशस्वी झाला, फसला तर त्या पाककृतीच्या सुख दु:खाच्या गोष्टी तुम्हाला नै सांगायच्या तर मग कोणाला सांगायच्या नै का... तेव्हा सवडीनं सर्वं सांगेनच.

-दिलीप बिरुटे

प्रचेतस's picture

19 May 2013 - 9:06 am | प्रचेतस

फोटू कुठायत?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

19 May 2013 - 9:17 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मोबाईल अजिबात चालू नव्हता त्याला चार्जींगला लावल्यामुळे फोटो काढता आले नाहीत पण फोटो हवेच होते, असे मलाही वाटत होतं. पुढल्या वेळी फोटो काढेन.

मन की बाते. : प्राडॉ. वल्लीशेठ तुमच्यावर अविश्वास तर दाखवत नाही ना.... ;)

-दिलीप बिरुटे

प्रचेतस's picture

19 May 2013 - 9:20 am | प्रचेतस

नै नै. तसं नै.
पण मिपावर पाकृला फोटोंशिवाय मजा नै. :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

19 May 2013 - 9:34 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पाककृतीला फोटो हे पाहिजेच. कोरड्या पाककृत्यांना मजा नाही.
आपण अनेकदा पाककृतींना फोटोची मागणी करतो ती यासाठीच.

बाकी, अविश्वासाची नुसती गम्मत. :)

@ पैजार बॉ, कौतुकाबद्दल धन्स. अजून खूप शिकत राहू....!!!

-दिलीप बिरुटे

प्रचेतस's picture

19 May 2013 - 10:54 am | प्रचेतस

अरे हो!!!!!!!!!
ह्या फोटूच्या गडबडीत सरांच्या यशस्वी पाकृबद्दल अभिनंदन करायचं राहिलंच.

अभिनंदन सर.

ज्ञानोबाचे पैजार's picture

19 May 2013 - 9:18 am | ज्ञानोबाचे पैजार

चला, गंगेत घोड न्हायल.
अभिनंदन प्रा.डॉ.

प्यारे१'s picture

19 May 2013 - 2:50 pm | प्यारे१

>>>चला, गंगेत घोड न्हायल.
आज रव्वार आहे, तुम्हाला काय माहिती? 'घोडं' अजून आळसावलेलंच असेल ;)

मावेओ मधले पोहे मस्त लागतात.
-सासुरवाडीहून 'सप्रेम' मिळालेल्या मावेओ चे पोहे खाल्लेला प्यारे ;)

शिल्पा ब's picture

19 May 2013 - 9:33 am | शिल्पा ब

हे नुसताच मायक्रोवेव्ह कि मायक्रोवेव्ह + कन्व्हेक्शन असं आहे? कारण नुसत्याच मायक्रोवेव्ह मधे फोडणी होईल का ही शंका आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

19 May 2013 - 9:55 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आपली शंका बरोबरच असेल पण मी केलं ते असंच केलं. अधिक वेळ दिला पाहिजे याच्याशी सहमत.
पोहे आणि अन्य पाककृती करणार्‍यांनी फोडणीसाठी किती वेळ आणि कोणता मोड वापरला पाहिजे, त्याची जर माहिती दिली तर आनंद वाटेलच.

-दिलीप बिरुटे

मी अजुन मायक्रोवेव्ह मधे एकही पाकृ केलेली नाही त्यामुळे काहीच सांगु शकत नाही पण तुम्ही म्हणताय तसे पोहे करुन बघते जमताहेत का.

प्रभाकर पेठकर's picture

19 May 2013 - 10:16 am | प्रभाकर पेठकर

प्रचंड अभिनंदन, बिरुटे सर.

एखाद्या कट्ट्याला हे असे मायक्रोवेव्ही पोहे घेऊन यावे. आपण हे यश साजरे करू.

डॉ सुहास म्हात्रे's picture

19 May 2013 - 10:41 am | डॉ सुहास म्हात्रे

मासे आणि चिकनपीस मात्र मस्त पैकी तांबूस होतील असे भाजता आले नाहीत.

काँबी मोड वापरून पहावा. मावे मोड अन्न आतपर्यंत खोलवर समप्रमाणात शिजवतो पण अन्नाचा रंग बदलत नाही. कन्व्हेक्शन मोड अन्नपदार्थांचा बाहेरचा थर जास्त गरम करतो आणि त्यांला तांबूस रंग आणतो (ब्राउनींग) व खरपूस (क्रिस्प) बनवतो. काँबी मोड मध्ये माओ आणि कन्व्हेक्शन हे दोन्ही मोड वापरत असल्याने दोन्हींचा फायदा मिळतो.

ब्राउनिंग न केल्यास उत्तम शिजलेले पदार्थही दिसायला कच्चे असल्यासारखे "दिसतात". त्यामुळे काँबी मोड मांस-मासे यांना विशेषतः उपयुक्त आहे.

तुमच्या माओ प्रयोगांना शुभेच्छा !

फोटो बघणेच्छूक...

प्रभाकर पेठकर's picture

19 May 2013 - 11:41 am | प्रभाकर पेठकर

दोन्ही ओव्हन कशापद्धतीने पदार्थ गरम करतात/शिजवतात हे लक्षात घेतल्यास 'काँबिनेशन' का, कसे, किती आणि केंव्हा वापरावे हे ठरवता येते.

मायक्रोवेव्ह ओव्हन मध्ये ठराविक किरण पदार्थावर पडून त्या पदार्थातील सूक्ष्म जलबिंदूंना इतक्या जोरात घुसळतात की ते एकमेकांवर घासून उष्णता निर्माण होते. हे पदार्थाच्या संपूर्ण वस्तुमानात एकाच वेळी होत असल्याने पदार्थ थेट आंत पासून गरम होतो/शिजतो.

पारंपारीक (कन्व्हेक्षन) ओव्हन मध्ये, गरम झालेल्या कॉइलवरून आलेल्या गरम लाटा आतील पंख्यामुळे पदार्थाच्या संपर्कात येतात. आणि विज्ञानाच्या उष्ण्तेच्या नियमानुसार उष्ण हवेच्या संपर्कात आलेला पदार्थाचा सर्वात बाहेरचा थर प्रथम तापतो आणि अतिरिक्त उष्णता पुढच्या (आंतील) थराकडे पाठवितो, तसा तो आतला थर तापू लागतो. ही साखळी पदार्थाचा सर्वात आंतील थर तापे पर्यंत चालू राहाते आणि पदार्थ शिजतो.

आधीच शिजलेला पदार्थ 'ब्राऊनिंग्' साठी कन्व्हेक्षन मोडमध्ये ठेवला जातो.
ह्यात उष्णतेची पातळी किती ठेवली आहे ह्यावर शिजलेल्या पदार्थाचे 'ब्राऊनिंग' अवलंबून असते. एका थराकडून दुसर्‍या थराकडे उष्णता पाठविण्याच्या वेगापेक्षा, येणार्‍या उष्णतेचा वेग जास्त असेल तर बाहेरचा थर जास्त शिजून 'करपू' लागतो. ते 'करपणे' नियंत्रीत ठेवून पदार्थ आपल्याला पाहिजे तेवढाच करपविणे म्हणजेच 'ब्राऊनिंग'. गॅसच्या किंवा कोळशाच्या शेगडीवरही ह्याच नियमाने पदार्थ शिजतो, करपतो, जळतो. बार्बिक्यू करताना बार्बिक्यू शेगडीत कोळशांची रचना कमी आणि भरपूर अशी दोन विभागात करतात. कमी कोळशांच्या विभागात चिकन शिजते. कारण येणारी उष्णता आणि पुढच्या थराकडे हस्तांतरीत होणारी उष्णता ह्यांचा वेग समान असतो त्यामुळे चिकन करपण्याआधी उष्णता पुढच्या थराकडे गेल्याने चिकन करपत नाही. पण चांगले आंत पर्यंत शिजते. ते तसे शिजल्यावर जास्त कोळशांच्या विभागावर ठेवले जाते. इथे येणार्‍या उष्ण्तेचा वेग हस्तांतरीत होण्यार्‍या उष्णतेच्या वेगापेक्षा जास्त असतो त्यामुळे चिकन बाहेरून 'ब्राऊन' होऊ लागते.

'ब्राऊनिंग' का होते?

प्रत्येक पदार्थात साखरेचा अंश असतो. अति उष्ण्तेने, उष्णतेच्या संपर्कातील पाण्याचे बाष्पीभवन होऊन साखरेला उष्णता मिळते. आणि त्या साखरेचे 'कॅरमलायझेशन' होऊ लागते. 'कॅरमलायझेशन' प्रक्रियेत साखरेचे रुपांतर कार्बनमध्ये होते ते किती प्रमाणार झाले आहे त्या नुसार 'बाऊन' ते 'ब्लॅक' असा रंगाचा प्रवास असतो. तोच आपण नियंत्रीत करत असतो.
ह्या प्रक्रियेसाठी उष्णता १४० अंश सेंटी पेक्षा जास्त असावी लागते.

मायक्रोवेव्ह मोडवर ब्राऊनिंग का होत नाही?

मायक्रोवेव्हचे कार्य वर सांगितल्याप्रमाणे पदार्थातील जलबिंदूंना घुसळण्याच्या प्रक्रियेतून होते. पाण्याचा गुणधर्म म्हणजे १०० सेंटी ला पाण्याचे वाफेत रुपांतर होते म्हणजे पाणी १०० सेंटीच्या वर तापू शकत नाही. आणि कॅरमलायझेशन प्रक्रिया १४० सेंटीच्या पुढे सुरु होते. त्यामुळेच पाण्यात बटाटा फक्त शिजतो. पण तेलात शिजतो सुद्धा आणि ब्राऊन सुद्धा होतो. कारण तेलाची उष्णता १४० सेंटीच्या वर जाऊ शकते. (उत्कलन बिंदूतील फरक).

ह्या प्रक्रियेची कारणमिमांसा मायलार्ड नांवाच्या कोणी शास्त्रज्ञाने शोधून काढली त्यामुळे ह्या प्रक्रियेला 'मायलार्ड प्रक्रिया' असेही म्हणतात.

सुरवातीला तंदुर प्रकार करुन बघितले. पदार्थामधिल अंगचा ओलावा नष्ट झाल्याने पदार्थ चिवट/ रबरी झाले होते.
हॉटेल सारखे रसदार/लुसलुशीत तंदुरी कबाब कसे करायचे?

प्रभाकर पेठकर's picture

19 May 2013 - 2:10 pm | प्रभाकर पेठकर

कुठला पदार्थ केला होता?

आंच कमी ते मध्यम असावी. प्राथमिक शिजल्यावर पदार्थ बाहेर काढून त्यावर बटर किंवा तुप लावावे. अशाने बाहेरील थर शिजून पदार्थातील नैसर्गीक ओलावा टिकून राहतो. ही बटर किंवा तुप लावण्यची प्रक्रिया २ ते ३ वेळा करावी लागते.बटर/तुप इ.इ. बरोबर मधून मधून जे उरलेले मॅरिनेशन असते त्याचेही थर द्यावेत. त्यानेही पदार्थातील पाणी शिल्लक राहुन पदार्थ शिजतो पण चिवट होत नाही.

कोळशाच्या शेगडीवर बार्बिक्यू करताना शेगडीत भरमसाठ कोळसे घालू नये. आवश्यक असतील तेवढेच घालावेत. जसजसे कमी होतील तसतसे वाढवावे. निखार्‍यापासून पदार्थ ६ इंच वर असावा.

jaypal's picture

19 May 2013 - 2:23 pm | jaypal

मी चिकन तंदुर आणि चिकन बोनलेस कबाब करुन बघितले होते.
आता नव्याने तुम्ही सांगतल्या प्रमाणे करुन बघतो

नॉनव्हेज अ‍ॅटम फसू लागले आहेत.

प्रा.डॉ. बिरूटेसर, मावे सुचवतोय तुम्हाला नॉन्वेज सोडा म्हणून ;) पोहे कशे छान्छान झाले बघा. :)

अविनाशकुलकर्णी's picture

19 May 2013 - 2:17 pm | अविनाशकुलकर्णी

विजेच्या बिलावर लक्ष ठेवणे गरजेचे.....

मायक्रोवेव्हचा वापर शक्यतो टाळावा,यात तयार केलेले अन्न शरीरास अपायकारक आहे.मी स्वतः ऑफिस मधल्या मायक्रोवेव्हचा सुद्धा वापर टाळतो...आणि घरी मायक्रोवेव्ह विकत घ्यायचे टाळले आहे.
अधिक माहिती इथे :-
The Proven Dangers of Microwave Ovens
Microwave Ovens Kill Food, and Eventually, YOU!

https://www.youtube.com/watch?v=EsaxhMvSv3Y

डॉ सुहास म्हात्रे's picture

19 May 2013 - 10:43 pm | डॉ सुहास म्हात्रे

अशा प्रकारच्या चुकीच्या बातम्या आंतरजालावरून सतत प्रसिद्ध होत असतात. त्यांना साध्या इंग्लिशमध्ये होक्स (hoax) म्हणतात. अशा बातम्या बर्‍याचदा इतक्या शास्त्रिय वाटतील अशा प्रस्तावित केलेल्या असतात की सर्वसामान्य जनता त्याला सहज बळी पडून बकरा बनतात. बर्‍याचदा अशा बातम्यांचा लोकांना उल्लू बनवणे हाच उद्देश असतो. पण त्यातल्या काही, विशेषतः आरोग्याशी संबद्धीत असलेल्या होक्सवर विश्वास ठेवणे धोकादाय ठरू शकते.... तेव्हा सावधान !

हा प्रकार इतका बोकाळला आहे की याच्या विरोधी अनेक अँटी-होक्स संस्थळे आहेत जी शास्त्रीय कसोटीवर अशा बातम्या तपासून त्यांचे खरेखोटेपण प्रसिद्ध करतात. नमुन्यादाखल वरच्या वरच्या बातमीची शहानिशा करणारे एक संस्थळ :

museum of hoaxes

internet hoaxes हे कीवर्डस् वापरून शोध घेतल्यास अजून अशी अनेक होक्सबस्टर संस्थळे सापडतील.

एक्का काका, तुमच्या मताशी मी काही प्रमाणात सहमत आहे.बर्‍याचदा दुवा देताना तो योग्य माहितीचा आहे का हे पहायला हवे आणि हा विचार अनेकवेळा माझ्या मनात डोकावतो... इंटरनेटवर योग्य आणि खात्रीशीर माहिती शोधणे हल्ली कठीण होत चालले आहे,वॄत्तपत्र्,वॄत्तवाहिन्या या वरील दुवे ग्राह्य धरले जातात्,पण इतर माहिती देताना ती योग्यच असेल असे सांगणे कठीण आहे.
आत्ता या मायक्रोव्हेव विषयावर अनेक माहिती जालावर उपलब्ध आहे,अगदी विकीपिडीयावर सुद्धा.पंरंतु कुठली माहिती कितपत पूर्ण आहे हे सांगणे कठीण्,कारण यात सातत्याने भर पडत असते...
www.huffingtonpost.com या संकेस्थळावर मायक्रोव्हेव संबंधी माहिती आहे,ती सुद्धा एका डॉक्टर ने दिलेली,मग विचार केला की हा डॉक्टर सुद्धा होक्स आहे का ? कारण इंटरनेटवर नुसत्या माहितीचा नव्हे तर व्यक्तींच्या प्रोफाइलचा होक्स असु शकतो,किंवा ती व्यक्ती सुद्धा होक्स असु शकते,ज्या संस्थळावरुन माहिती आपण वाचतो तेच किती सत्य माहिती सांगते या विषयी कुठेतरी माहिती मिळायला हवी...huffingtonpost.com या संस्थळा बाबत अजुन तरी मला तशी माहिती मिळवता आली नाही.
आता या संस्थाळावरील दुवा देतो:-
http://www.huffingtonpost.com/dr-mercola/microwave-cancer_b_684662.html

जालावरील योग्य माहितीचा पडताळा कसा केला जावा ? किंवा या विषयी कुठे अधीक माहिती मिळेल ?

जाता जाता :- होक्स साईट सुद्धा मिळणारी माहिती कितपत सत्य असु शकते असा सध्या विचार मनात डोकावत आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

23 May 2013 - 9:25 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अरे लेका, दुष्परिणाम कशाचे होत नाही ते एकदा सांग बरं....!!!

आम्ही आता ओव्हन्समधे पापड भाजण्याच्या पुढे चाललो आहोत हे काय बघवेना का तुम्हाला. :)

-दिलीप बिरुटे

दुष्परिणाम कशाचे होत नाही ते एकदा सांग बरं....!!!
हॅहॅहॅ... ;)

अवांतर :---
मनुष्य प्राणी ज्या वेगाने निसर्गाचा र्‍हास करतोय्,आणि त्याच्या पासुन वेगाने लांब जातो आहे... तेव्हा कशा कशाचे दुष्परिणाम येणार्‍या मानव जातींच्या पिढीला भोगायला लागतील ते सांगणे कठीणच !

जाता जाता :---
सर जर वेळ मिळाला तर या वेगळ्या विषयावर सुद्धा वाचा.
REPORT ON CELL TOWER RADIATION